Home Blog Page 2632

गोदरेज इंटेरियोतर्फे ‘वर्क फ्रॉम होम’ गाइड प्रकाशित

  • होम- ऑफिसमध्ये काम करताना योग्य पद्धतीने बसण्यासाठी टिप्सचा गाइडमध्ये समावेश

 मुंबई– फर्निचर क्षेत्रातील भारतातील आघाडीचा ब्रँड असलेल्या गोदरेज इंटेरियोने आज स्टे हेल्दी. बी प्रॉडक्टिव्ह – अ वर्क फ्रॉम होम गाइड या खास गाइडचे अनावरण केल्याचे जाहीर केले. या गाइडमध्ये आधुनिक होम- ऑफिस सेटअपमधील आव्हाने आणि त्यावरच्या उपाययोजना देण्यात आल्या आहेत.

कोविड- 19 च्या उद्रेकामुळे सर्व भारतीय शहरांतील नोकरदार लोकसंख्येला अनपेक्षितपणे वर्क फ्रॉम होम (डब्ल्यूएफएच) करावे लागत असून बहुतेक व्यावसायिकांना याची सवय नसली आणि दरम्यान तंत्रज्ञान व मूलभूत सुविधांशी संबंधित आव्हाने येत असली, तरी त्यांना ही पद्धत आकर्षक वाटत आहे. गोदरेज इंटेरियोने आज विविध क्षेत्रांतील कंपन्यांसाठी डब्ल्यूएफएचचा पर्याय अनिश्चित काळासाठी व्यवहार्य व्हावा यासाठी मदत करणारे गाइड प्रकाशित केले आहे.

हे गाइड व्यावसायिकांना आरामदायीपणे काम करून अनावश्यक ताण व दुखापत टाळून त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मदत करेल. घरी काम करण्यासाठी योग्य वातावरण असल्यास चुकीच्या पद्धतीने बसणे- उभे राहाणे टाळले जाऊन एमएसडीजला (मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर) प्रतिबंध करता येईल.

 गोदरेज इंटेरियोचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी अनिल माथुर म्हणाले, आधुनिक ऑफिसच्या कामाचे स्वरुप बैठे असल्यामुळे तसेच घरून काम करताना कित्येक तास बसून राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. अत्यानुधिक तंत्रज्ञानामुळे कुठूनही काम करणे शक्य झाले असले, तरी घरून काम करताना चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या तयार होऊ शकतात. लोक सोफा, बीन बॅगवर, पाय एकमेकांवर टाकून जमिनीवर बसून किंवा अगदी आडवे पडून काम करू शकतात. यामुळे त्यांच्या स्नायू यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेऊन आम्ही वर्क फ्रॉम गाइड तयार केले आहे, ज्यात होम- ऑफिस सेटअपसाठी योग्य कार्यपद्धती (अर्गोनॉमिक्स) असण्याचे महत्त्व नमूद केले आहे. आजच्या आधुनिक कर्मचाऱ्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि होम- ऑफिस सेटअपमधअये त्यांना सतत गुंतून ठेवणारे वातावरण तयार करणे आवश्यक आहे. घरी योग्य प्रकारच्या आसनाचा वापर केल्यास कामातून विश्रांती घेतल्यानंतर त्यांना थकवा, आखडलेले स्नायू आणि स्नायूंमध्ये गोळे येणे यांसारखे प्रकार टाळता येतात हे लक्षात येईल. यामुळे त्यांना जास्त कार्यक्षम व उत्पादनक्षम राहाण्यास मदत होईल.

 नव्याने प्रकाशित करण्यात आलेल्या वर्क फ्रॉम होम गाइडमध्ये आधुनिक कर्मचाऱ्यांसाठी पुढील टिप्स देण्यात आल्या आहेत –

  • योग्य टेबल आणि खुर्ची – अर्गोनॉमिक खुर्ची आणि टेबलामध्ये पैसे गुंतवणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारे बसताना मदत होते. ज्या खुर्चीमध्ये पैसे गुंतवणार आहात, ती जास्तीत जास्त आराम देणारी हवी आणि त्यासाठी त्यात अडजस्टेबल सुविधा असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पाठ ताठ व सरळ राहावी यासाठीही आवश्यक त्या अडजस्टेबल सुविधा असणे गरजेचे आहे. टेबल योग्य उंचीचे असायला हवे. टायपिंग करतानाची सर्वात आदर्श स्थिती म्हणजे, हाताचे कोपर 90 अंशात असणे.
  • टेबल स्वच्छ ठेवा (आणि वातावरणही) – तुमच्यासाठी कामाची वेगळी जागा असणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे एकाग्रता वाढते व व्यत्यय कमी होतात. सलग काही तास काम करताना जास्तीत जास्त आरामदायीपणे बसला आहात याची खात्री करा.

 योग्य अक्सेसरीज घ्या – स्क्रीनची उंची अयोग्य असल्यास मान आणि त्यासंदर्भातल्या समस्या वाढतात. कम्प्युटरचा पडदा वापरणाऱ्याच्या डोळ्यांच्या उंचीच्या समान रेषेत असायला हवा, म्हणजे त्याकडे पाहाण्यासाठी मान जास्त खाली किंवा वर करावी लागणार नाही. त्याशिवाय कीबोर्डवर टायपिंग करताना कम्प्युटरचा पडदा किमान एक हात दूर हवा. यासाठी दर्जेदार लॅपटॉप स्टँड, एक्स्टर्नल कीबोर्ड आणि माऊसमध्ये गुंतवणूक करणे केव्हाही चांगले होईल, कारण त्यामुळे कोणत्याही वेळेस काम करताना शरीरावर ताण येणार नाही.

स्मार्ट प्रॉप्स – काम करताना थोडा वेळ सोफा किंवा बीन बॅगवर बसायला हरकत नाही, मात्र अशावेळेस लॅपटॉपखाली उशी ठेवून त्याची उंची वाढवावी तसेच पाठीला आधार म्हणून उशांचा वापर करावा. आडवे पडून काम करणे टाळा, कारण त्यामुळे पाठ व संबधित दुखण्याच्या समस्या उद्भवू शकतील.

 फिरत राहा – खूप वेळ काम करताना अधेमधे जागेवरून उठणे फार महत्त्वाचे आहे. चहा- कॉफीसाठी ब्रेक घ्या, बाल्कनीमध्ये जा, बाहेरच्या शांततेचा आनंद घ्या, गप्पा मारण्यासाठी मित्र- मैत्रिणींना फोन करा किंवा मोबाइलमधील ईमेल्स तपासा. परत काम सुरू करण्यासाठी घरातल्या घरात फिरा. बसण्याची स्थिती योग्य असली, तरी खूप वेळ एकाच जागी बसल्यास शरीर व मनावर ताण येतो. ब्रेकमध्ये स्ट्रेचिंगसारखे सोपे व्यायाम करून रक्ताभिसरण सुधारता येईल.

उभे राहून काम करा – काही वेळ उभे राहून काम केल्यास पाठीचे दुखणे कमी होते, एकाग्रता वाढते आणि जलद काम करणे शक्य होते. त्यामुळे काही प्रमाणात कॅलरीजही खर्च होतात. त्याशिवाय अधेमधे थोड्या वेळासाठी ड्रेसर, इस्त्रीचे टेबल किंवा स्टोअरेज युनिट यांचा उंच वर्कस्टेशनसारखा वापर करता येईल.

  • प्रकाशयोजना काळजीपूर्वक निवडा – तुम्ही काम करत असलेल्या खोलीत पुरेसा प्रकाश असेल याची खात्री करा. त्याचबरोबर नैसर्गिक उजेड यावा म्हणून खिडक्या उघड्या ठेवा. उजेड चमकत (ग्लेयर) असल्यास पडदे लावा किंवा योग्य अँगलमधे ब्लाइंड्स लावा. रात्रीच्या वेळेस रात्रीच्या वेळेस काम करताना टेबलावर दिवा लावा.

दुकानदारांसाठी ‘करोना व्हायरस विमा’ विमा उद्योगातील पहिलाच उपक्रम

मुंबई: ‘भारतपे’ या भारतातील सर्वात मोठ्या मर्चंट पेमेंट व कर्जपुरवठादार कंपनीने ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’बरोबर भागिदारी करून खास दुकानदारांसाठी ‘कोविड-19 संरक्षण विमा योजना’ सादर केली आहे. करोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यास दुकानदारांना रुग्णालयीन खर्चाव्यतिरिक्त या नव्या योजनेनुसार विमा उतरविलेल्या रकमेचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे. दुकानदारांसाठी अनेक उपक्रम सादर करणाऱ्या ‘भारतपे’च्या कार्यक्रमांत हा नवीन उपक्रम अनोखी भर घालणार आहे. तसेच ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’चीदेखील ही व्यापाऱ्यांसाठीची अशा प्रकारची पहिलीच विमा योजना आहे.

या विम्याचे छत्र 25 हजार रुपये असून ते केवळ 199 रुपये इतक्या नाममात्र प्रीमियममध्ये मिळू शकेल. यामध्ये आरोग्य सहाय्य व चॅट/व्हर्च्युअल सहाय्य, दूरध्वनीवरून सल्ला आणि रुग्णवाहिका सहाय्य असे मूल्यवर्धित फायदेही पुरविण्यात येणार आहेत. या अनोख्या ‘कोविड-19 विमा संरक्षण’ कवचाचा लाभ 18 ते 65 या वयोगटातील व्यक्तींना घेता येईल.

या नवीन योजनेची माहिती देताना ‘भारतपे’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक अशनीर ग्रोव्हर म्हणाले, ‘’व्यापाऱ्यांचे कल्याण हे आमचे उद्दीष्ट आहे. करोना व्हायरसची साथ पसरत चालल्यामुळे व्यापाऱ्यांच्या हितासाठी आम्ही हे खास विमा संरक्षण तयार केले आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड व्यापाऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवणार आहे. करोनाची लागण झाल्यास त्याच्या पहिल्या निदानाच्या वेळीच दुकानदारांना एकरकमी साह्य म्हणून विमा उतरविलेली 100 टक्के रक्कम मिळेल. शा साथीच्या आजारांचा छोट्या व्यवसायांवर आर्थिक परिणाम होत असतो आणि दुकानदारांना त्यांची लागण होण्याचा सर्वाधिक धोका असतो. हा विमा ‘भारतपे अ‍ॅप’वर उपलब्ध आहे. पुढील काही दिवसांत आमच्या लाखो व्यापार्‍यांना डिजिटल पद्धतीने या विम्याचा लाभ घेता येईल, अशी आमची अपेक्षा आहे.’’

‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’चे कार्यकारी संचालक संजीव मंत्री म्हणाले, “आयसीआयसीआय लोम्बार्डमध्ये आम्ही ग्राहकांना काळानुरूप सुसूत्र अशी उत्पादने नेहमीच पुरवित असतो, तसेच त्यांचे अतिरिक्त लाभ देऊ करीत असतो. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वत्र होत असताना आम्ही त्या संदर्भात ‘कोविड-19 संरक्षण विमा कवच’ सादर केले आहे. ‘भारतपे’शी भागिदारी करून आम्ही त्यांच्या व्यापारी सदस्यांपर्यंत पोहोचू शकतो. या व्यापाऱ्यांना करोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका असल्याने त्यांना हे विम्याचे संरक्षण आवश्यक आहे. ‘निभाये वादे’ (आम्ही वचन पाळतो) या ब्रॅंड मूल्यासह आम्ही ग्राहक व व्यावसायिक यांच्या विमासंबंधित गरजा पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”

भारतपेविषयी –

भारतीय व्यापाऱ्यांसाठी आर्थिक समावेशन प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने 2018  मध्ये ‘भारतपे’ची स्थापना अशनीर ग्रोव्हर आणि शाश्वत नाकरानी यांनी केली. ‘भारतपे’ने भारतातील पहिला ‘यूपीआय इंटरऑपरेबल क्यूआर कोड’ सादर केलेला आहे. तसेच देशातील पहिली ‘झीरो एमडीआर पेमेंट स्वीकृती सेवा’, पहिले ‘यूपीआय पेमेंट आधारीत मर्चंट कॅश अ‍ॅडव्हान्स प्रॉडक्ट’ आणि व्यापाऱ्यांना 12 टक्क्यांपर्यंत व्याज देऊ करणारी ‘पी2पी एनबीएफसी गुंतवणूक योजना’ ‘भारतपे’ने सुरू केली आहे. सध्या बंगळूर, दिल्ली, हैदराबाद, पुणे, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, इंदूर, भोपाळ, नागपूर, चंदीगड, जोधपूर, लुधियाना, सूरत, पाटणा, करीमनगर, म्हैसूर, विशाखापट्टणम, विजयवाडा आणि वरंगळ या शहरांतील एकूण 40 लाख व्यापाऱ्यांना भारतपे सेवा देत आहे. 2019 पर्यंत या कंपनीचा व्यवसाय 30 पटींनी वाढलेला आहे. एका महिन्यात 5 कोटींहून अधिक व्यवहार करणारी (वार्षिक टीपीव्ही 2.7 अब्ज डॉलर) भारतपे ही देशातील ‘यूपीआय ऑफलाइन’ क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीने आतापर्यंत 140 कोटींहून अधिक रकमांची 25 हजार कर्जे वितरीत केलेली आहेत.

टीव्हीएस मोटरतर्फे पंतप्रधान रिलीफ फंडासाठी 25 कोटी रुपयांची मदत

नवी दिल्ली30 मार्च (पीटीआय) – टीव्हीएस मोटर कंपनीने कोविड- 19 साथीविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान रिलीफ फंडासाठी (पीएम – केयर्स) 25 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सोमवारी जाहीर केले.कंपनीने टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लि.सुंदरम क्लेटन लि आणि अशा इतर कंपन्यांच्या वतीने हे योगदान दिले आहे.हे योगदान समाज समृद्ध आणि शाश्वत राहावा यासाठी कंपनीतर्फे सातत्याने केल्या जात असलेल्या प्रयत्नांचाच एक भाग असल्याचे टीव्हीएस मोटर कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.समूहाचा सीएसआर विभाग असलेल्या श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टतर्फे (एसएसटी) सध्या विविध उपक्रम केले जात असून त्याव्यतिरिक्त हा निधी देण्यात आला आहे.कोविद- 19 साथीचा हा काळ आधुनिक इतिहासातील सर्वात अनपेक्षित काळ मानला जात असून त्यावर मात करण्यासाठी मानवजातीला सर्वोत्तम प्रयत्न करावे लागणार आहे. या संघर्षात सरकार करत असलेल्या दमदार प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. आज राष्ट्र म्हणून सर्वांनी अभूतपूर्व एकी दाखवण्याची अतिशय गरज आहे, असे टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन म्हणाले.एसएसटीद्वारे मास्कसारख्या पूरक उपकरणांचे उत्पादन व पुरवठाआरोग्यसेवा क्षेत्र आणि पोलिस अधिकाऱ्यांसाठी जेवणाचा पुरवठा असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

टाटा पॉवरचे जॉर्जियामधील जॉईंट व्हेंचर शुआखेवी जलविद्युत प्रकल्पामध्ये व्यावसायिक वीज निर्मितीचा शुभारंभ

जॉर्जियामध्ये उभारण्यात आलेला गेल्या सात दशकांतील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प

 हा प्रकल्प म्हणजे जॉर्जियाच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने उचलले गेलेले महत्त्वाचे पाऊल आहे. 

 मुंबई:  टाटा पॉवर, नॉर्वेचे क्लीन एनर्जी इन्व्हेस्ट (सीईआय) आणि इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन (आयएफसी) यांच्यातील भागीदारीने सुरु करण्यात आलेल्या ऍडजरिस्ट्सकली जॉर्जिया एलएलसी या कंपनीने शुआखेवी जलविद्युत प्रकल्पाच्या व्यावसायिक संचालनाचा शुभारंभ झाल्याची घोषणा केली आहे.  १७८ मेगावॅट क्षमतेचा हा जलविद्युत प्रकल्प नैऋत्य जॉर्जियामध्ये आहे.  एजीएल लवकरच ९ मेगावॅट क्षमतेचा स्खलता जलविद्युत प्रकल्प  सुरु करणार असून हा देखील एकंदरीत शुआखेवी जलविद्युत योजनेचा भाग आहे.

शुआखेवी जलविद्युत प्रकल्प हा जॉर्जियाच्या ऊर्जा क्षेत्रातील एकमेव असा प्रकल्प आहे ज्याला युरोपियन बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट (ईबीआरडी), एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) आणि जागतिक बँक समूहातील सदस्य आयएफसी या तीन सर्वात मोठ्या आर्थिक संस्थांनी वित्तपुरवठा केला आहे.

या प्रकल्पातून जवळपास ४५० जीडब्ल्यूएच शुद्ध ऊर्जेचे उत्पादन केले जाईल, ज्यामुळे ग्रीनहाऊस वायूंच्या उत्सर्जनात दरवर्षी २००,००० टनांपेक्षाही जास्त घट होईल.  या प्रकल्पाची उभारणी यशस्वीपणे पूर्ण होऊन व्यावसायिक संचालनाची सुरुवात होणे ही बाब जॉर्जियाची अखंडता, सुरक्षितता आणि ऊर्जा स्वावलंबनासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.  या प्रकल्पातून निर्माण केली जाणारी ऊर्जा फक्त जॉर्जियामध्ये संपूर्ण हिवाळ्यात विकली जाईल.  हिवाळ्यामध्ये जॉर्जियामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा कमतरता भासत असते.

टाटा पॉवरचे सीईओ व मॅनेजिंग डायरेक्टर श्री. प्रवीर सिन्हा यांनी सांगितले, “शुआखेवी एचपीपीचे व्यावसायिक संचालन हा टाटा पॉवरसाठी आणि आमच्या भागीदारांसाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.  शुआखेवी एचपीपी हा गेल्या ७० वर्षातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक प्रभावी ऊर्जा प्रकल्प आहे.  १७८ मेगावॅट क्षमतेच्या शुआखेवी एचपीपीचे यश हे जॉर्जियाची अखंडतासुरक्षितता आणि ऊर्जा स्वावलंबन यासाठी खूप महत्त्वाचे आहे.” 

 ऍडजरिस्ट्सकली जॉर्जिया एलएलसी ही टाटा पॉवर, नॉर्वेची क्लीन एनर्जी इन्व्हेस्ट आणि इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन – आयएफसी (जागतिक बँक समूहातील सदस्य) यांच्या भागीदारीतून सुरु करण्यात आलेली कंपनी असून प्रकल्पाचा एकंदरीत खर्च जवळपास ५०० मिलियन यूएस डॉलर्स इतका आहे.

टाटा पॉवरची संस्थापित जलविद्युत क्षमता जवळपास ५०० मेगावॅट आहे.  महाराष्ट्रात त्यांचे तीन प्रकल्प आहेत.  ही ऊर्जा देशांतर्गत बाजारपेठेसाठी वापरली जाते.  टाटा पॉवरने जवळपास एक शतकभर आधी महाराष्ट्रातील खोपोली येथे भारतातील पहिले हायड्रोइलेक्ट्रिक वीज निर्मिती केंद्र (क्षमता ४० मेगावॅट) उभारले आहे.

कोविड-१९: टाटा सन्सचे चेअरमन श्री. एन. चंद्रशेखरन यांचे निवेदन

मुंबई:  भारतात आणि जगातील इतर अनेक भागांमध्ये कोविड-१९च्या प्रभावामुळे निर्माण झालेली परिस्थिती अतिशय चिंताजनक असून यावर तातडीने सर्वतोपरी कृती करणे आवश्यक आहे.  टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष श्री. रतन एन टाटा यांनी सद्यस्थिती हाताळण्यासाठी काही कृतियोजनांची आणि ५०० कोटी रुपये बांधील केल्याची घोषणा केली आहे.

कोविड-१९ विरोधातील लढ्यासाठी आणि इतर पूरक कामांसाठी टाटा सन्स अतिरिक्त                  १००० कोटी रुपयांची मदत जाहीर करत आहे. टाटा ट्रस्ट्स आणि आमचे मानद अध्यक्ष                श्री. टाटा यांच्यासोबत आम्ही काम करू आणि त्यांच्या उपक्रमांना आमचा संपूर्ण पाठिंबा असेल.  आमच्या समूहची सर्व नैपुण्ये उपयोगात आणता यावीत यासाठी आम्ही सहकार्याने काम करू.

टाटा ट्रस्ट्सने आखलेल्या उपक्रमांच्या बरोबरीनेच आम्ही आवश्यक व्हेंटिलेटर्स देखील आणत आहोत आणि लवकरच भारतात त्यांचे उत्पादन केले जावे यासाठी तयारी करत आहोत.

सध्या आपला देश एका अभूतपूर्व स्थितीचा आणि संकटाचा सामना करत आहे.  आपण ज्यांना सेवा प्रदान करतो त्या समुदायांचे जीवनमान उंचावून त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण सर्वांनी जे जे करणे आवश्यक आहे ते सर्व आपण केले पाहजे.

वीज, टीव्ही, फोन, इंटरनेट व मोबाईलच्या बिलाला स्थगिती देण्याची मागणी

0

भाजपा अध्यक्ष लोढ़ा ह्यांनी केंद्र सरकार व खाजगी कंपन्यांना पत्र लिहिले

मुंबईभारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा ह्यांनी वीजटीव्हीइंटरनेटमोबाईल व टेलीफोनच्या बिलांना स्थगिती देण्याची मागणि केली आहेबिल भरता आले नाही तर कोणाचे कनेक्शन बंद केले जाऊ नयेअशीही त्यांनी मागणी केली आहेभाजपा अध्यक्ष लोढ़ांनी म्हंटले आहे कीकोरोनामध्ये लॉकडाउनमुळे लोक त्रस्त आहेत आणि वेळेवर बिल भरण्यासाठी असमर्थ आहेत.

दूरसंहार मंत्री रविशंकर प्रसादमाहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावड़ेकरबेस्टचे महासंचालक व टाटा पॉवर व अदानी इलेक्ट्रिसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना भाजपा अध्यक्ष लोढ़ा ह्यांनी पत्र लिहून लोकांच्या ह्या अडचणीची माहिती दिली आहेआपल्या पत्रात त्यांनी म्हंटले आहे कीराष्ट्रीय पातळीवर लॉक– डाउनमुळे आपल्या घरी बसलेल्या कोट्यवधी लोकांसाठी वीजटीव्हीइंटरनेटमोबाईल व टेलिफोन आत्ताची सर्वांत महत्त्वाची गरज आहेपण इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये वीजटिव्हीइंटरनेटमोबाईल व टेलिफोनचे बिल वेळेवर भरणे कोणत्याच ग्राहकाला सहजपणे शक्य नाही आहेत्यांनी मागणी केली आहे कीज्या प्रकारे रिजर्व बँकेने बँकांना वसुलीला तीन महिने पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेतत्याच प्रकारे मुंबईतील बेस्टटाटाअदानी इलेक्ट्रिसिटी सहित टीव्हीमोबाईलटेलीफोन व इंटरनेटच्या ग्राहकांच्या बिलाच्या वसुलीला थांबवून मुंबईच्या जनतेला मोठा दिलासा देता येऊ शकतो.

मुंबई भाजपा अध्यक्षांनी एमटीएनएल सह बीएसएनएलवीएसएनएल व मोबाईल व इंटरनेटच्या सर्व प्रायव्हेट सर्विस प्रोव्हायडर्सना ग्राहकांना सध्या पुरते बिल पाठवण्यापासून थांबवण्याची मागणी दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद ह्यांच्याकडे केली आहेह्याच प्रकारे त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री जावड़ेकर ह्यांनी डिश टीव्ही व केबल संचालकांनी ग्राहकांना बिल पाठवणे थांबवायला सांगावेअशी मागणी केली आहेभाजपाचे ज्येष्ठ आमदार लोढ़ा ह्यांनी ह्याच प्रकारे बेस्टटाटा पॉवरअदानी इलेक्ट्रिसिटी ह्यांच्याकडेही मागणी केली आहे कीत्यांनी तत्काळ आदेश जारी करावा व संकटाच्या वेळी बिल न भरल्यामुळे पुढील तीन महिन्यांपर्यंत कोणत्याच ग्राहकाचे कनेक्शन बंद केले जाऊ नयेत्यांनी म्हंटले कीकोरोना वायरसच्या भीषण आपत्तीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय प्रभावशाली पद्धतीने काम करत आहेतअशा संकटाच्या वेळी वीजटीव्हीइंटरनेटमोबाईल व टेलीफोन कंपन्यांद्वारे ग्राहकांना बिल देणे थांबवले तर कोट्यवधी लोकांना दिलासा मिळेल.

पुण्यात झोपडपट्टीतील दोघांना कोरोना ..

0

पुणे-परदेश वारी करून आलेल्यांना अथवा श्रीमंतांना होणारा आजार म्हणून कोरोनाकडे पाहिले जात असतानाच पुण्यात झोपडपट्टीतील दोन रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने आता हा विषाणू झोपडपट्टीपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी यापुढे सर्वांनाच विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

पुण्यात गुलटेकडी भागातील सुमारे 20 हजार लोकवस्ती च्या झोपडपट्टीत राहणारा एक 70 वर्षीय भाजी विक्रेता  वृद्धास व त्याच्या नातलग एका 30 वर्षीय महिलेचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. संबंधित भाजी विक्रेता सौदी अरेबियाला 9 तारखेला जाऊन आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हा कोरोनाबाधित रुग्ण यापूर्वी भाजी विक्रीच्या व्यवसायामुळे अनेकांच्या संपर्कात आलेला आहे.

त्यामुळे कोरोना संसर्ग आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

झोपडपट्ट्यांमध्ये अत्यंत छोट्या छोट्या झोपड्या व दाट लोकवस्ती असल्याने त्या ठिकाणी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखणे अतिकठीण असते. त्यामुळे झोपडपट्टीमध्ये कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होण्याचा धोका आहे. आता झोपडपट्टीतच कोरोनाबाधित दोन रुग्ण सापडल्याने तो शहराच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरणार आहे. दोन्ही रुग्णांना पुण्याच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घरातच बसा; करोनाचा वेग वाढला, दिल्लीत एकाच दिवशी सापडले २३ रुग्ण

0

दिल्ली-आठवडाभरापासून देश घरातच वावरतो आहे. पण, सुरक्षित राहायचं असेल तर घरातच बसा, असं सांगणारी आकडेवारी समोर येत आहे. राजधानी दिल्लीत रविवारी म्हणजे एकाच २३ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तर महाराष्ट्रात दोघांचा मृत्यू झाला. देशातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २४ झाली असून, आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९६ जणांची प्रकृती बरी झाल्यानं घरी सोडण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

सीमा सील करून स्थलांतरीतांना रोखा – केंद्र सरकारचे आदेश

0

नवी दिल्ली – केंद्र सरकारने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना स्थलांतरीत मजुरांना जागच्याजागी रोखण्याच्या व सर्व राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचा आदेश दिला आहे. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांना चौदा दिवसांच्या विलगीकरणाच्या कक्षांमध्ये पाठवा अशी सक्त सुचनाही केंद्र सरकारने दिली आहे. शहरातून मुळ गावी परतण्यासाठी देशभरात अक्षरश: लक्षावधी स्थलांतरीत मजूर पायीच आपल्या गावाकडे चालत निघाले असून अशा लोकांचे लोंढे सर्व सीमांवर थांबवण्यात आले आहेत.

केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे संपर्क साधून या सुचना केल्या आहेत. राज्यांच्या पोलिस महासंचालकांशीही त्यांनी संपर्क साधून या सुचना केल्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळात लोकांचे काठेही स्थलांतर सुरू राहता कामा नये अशी सुचना केंद्रीय गृह सचिवांनी केली आहे. जीवनावश्‍यक वस्तुंच्या मालाची नेआण मात्र थांबवता कामा नये अशीही सुचना सर्व राज्यांना करण्यात आली आहे.

या सुचनांचे पालन करण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांवर टाकण्यात आली आहे. या मजुरांना कामाच्या ठिकाणीच राहण्या जेवण्याची सोय करण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच गरीबांचीही अशीच सोय करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने राज्यांच्या मुख्य सचिवांशी आणि पोलिस महासंचालकांशी केंद्रीय गृह सचिव व कॅबिनेट सचिव सतत संपर्कात आहेत. शनिवारी सायंकाळी आणि रविवारी सकाळी या केंद्रीय सचिवांनी राज्यांच्या अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे संपर्क साधला. लोकांचा एकमेकांशी असलेला संपर्क तोडणे आणि लॉकडाऊन परिणामकारकपणे अंमलात आणणे याला प्राधान्य असून यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी एकमेकांशी संपर्कात आहेत. या सर्व कार्यासाठी राज्य आपत्ती निवारण दलासाठीचा राखीव निधी वापरण्यास सांगण्यात आले आहे.

या निधीत सर्व राज्यांकडे पुरेसे पैसे आहेत असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सर्व कामगारांना कामाच्या ठिकाणी कोणतीही वेतन कपात न करता पैसे मिळत राहतील याची दक्षता घेण्याची सुचनाही राज्य सरकारांना करण्यात आली आहे. या काळात कोणाही घरमालकांनी कामगारांकडून घरभाडे वसूल करू नये तसेच त्यांना भाडे दिले नाही म्हणून घरातून काढूनही टाकता कामा नये अशीही सुचना करण्यात आली आहे.

मार्केट यार्ड -डमी बाजारात; अडते घरी-लॉक डाउन चा फायदा घेऊन ग्राहकांची लूटमार सुरुच

0

पुणे-
बाजार समितीने मार्केट यार्ड सुरू करण्याची भूमिका घेतल्या नंतर रविवारी तरकरी भाजीपाला बाजारात बहुसंख्य डमी विक्रेते होते. डमी विक्रेत्यांनी बहुतांशी शेतीमाल विकला. अडते असोसिएशने बंदची भूमिका घेतल्याने रविवारी डमी विक्रेते बाजारात आणि अडते घरी असल्याचे चित्र पाहवयास मिळाले.सध्या कोरोनासंकट असताना आडत्यानी शेतकऱ्यांना व शासनाला सहकार्य करण्याची गरज असताना अडते मात्र, बाजार बंद करून घरी बसले होते.

ग्राहकांची लूटमार सुरुच –

दरम्यान किरकोळ विक्रेत्यांनी आणि क सोसायटया मधून भाजीपाला विक्रीतुन  लॉक डाउन चा फायदा घेत ग्राहकांची प्रचंड लूटमार सुरुच ठेवली असल्याचे चित्र कायम आहे. ग्राहकचळवळ ,कार्यकर्ते, शासन, या स्तरावर याबाबत निव्वळ डोळेझाक होत असल्याचे दिसते आहे.

दरम्यान

बाजार समितीने आवाहन केल्यानंतर बरेच अडते आणि कामगार बाजारात आले. तसेच नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये. नियमित गुळ भुसार, फळे, भाजीपाला विभाग सुरू राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी देशमुख यांनी केले.देशमुख म्हणाले, कामगार, अडते, कामगार यांनी बाजार चालवण्यासाठी सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे. रात्री ९ ते पहाटे ४ वाजेपर्यंत शेतीमाल बाजारात आला. आलेला सर्व शेतीमाल गेट नंबर ४ वरून सर्व गाड्या आत सोडल्या. तसेच साधारणतः १५०० तीन चाकी टेम्पो मधून शेतीमाल शहरात पाठवण्यात आला. बाजारात गर्दी होऊ नये म्हणून बाजार समितीचे सर्व कर्मचारी आणि १२०-१३० पोलिसांचा फौजफाटा होता. त्यामुळे बाजारात आवारात घाऊक खरेदीदारांना ओळखपत्र बघूनच आत सोडले. त्यामुळे इतर कोणालाही बाजारात प्रवेश दिला नाही. तसेच सुरक्षित अंतर ठेऊन सर्व बाजार सुरळीत चालू होता. बाजार समितीच्या उत्तम नियोजनामुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे मार्केट यार्ड नियमित सुरू झाले आहे.

 

७४९ बेघर नागरिकांना महापालिकेने दिला निवारा

0

पुणे- कोरोना संकटा च्या पार्श्वभूमीवर काम ,रोजी रोटी बंद झाल्याने बेघर,बेरोजगार झालेल्या  सुमारे ७४९ नागरिकांना पुणे मनपाच्या शाळा,रात्रनिवारा ( night shelter ) मधून निवारा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे,त्याचबरोबर अंथरून पांघरून उपलब्ध करून देण्यात आले आहे,
या नागरिकांकरिता चहा,नाष्टा, जेवणाची व्यवस्था क्षेत्रीय अधिकारी स्थानिक कार्यकर्ते,स्वयंसेवी संस्था यांच्या साहाय्याने करीत असल्याचे समाजविकास विभागाचे उपायुक्त सुनील इंदलकर यांनी कळविले आहे.

करोना प्रतिबंध आणि गरजूंना सोयी सुविधा यासाठी राज्य, जिल्हा आणि महानगरपालिकास्तरावर संनिंयत्रण समित्या

0

 

मुंबई दि. 29 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यासंदर्भात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजूंना निवारागृह, पाणी, अन्नधान्य तसेच भोजन व्यवस्था आणि वैद्यकीय सेवा या सुविधा स्वायंसेवी संस्थाच्या साहाय्याने उपलब्ध करून देण्यासाठी या समित्या त्यांच्या स्तरावर नियंत्रणाचे काम करतील. राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला.
राज्यस्तरीय समितीचे मुख्य सचिव हे अध्यक्ष आहेत. अपर मुख्यस सचिव (महसूल), अपर मुख्य सचिव (नगरविकास), प्रधानसचिव (अन्न व नागरी पुरवठा), प्रधानसचिव (सहकार), प्रधानसचिव (कामगार) हे सदस्य असून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन हे सदस्य सचिव आहेत.​
​​जिल्ह्यातील महानगराचे क्षेत्र वगळता अन्य भागासाठी जिल्हाधिकारी स्तरावर तर शहरी भागासाठी महानगरपालिकास्तरावर समित्या असतील. करोना प्रतिबंध व लॉकडाऊन कालावधीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व उपाययोजनांचे नियोजन करणे व निर्णयांची अंमलबजावणी करणे आणि संनियंत्रण ठेवणे यासाठी समित्या काम करतील.
​ लॉकडाऊनच्या कालावधीत अडकलेल्या मजूर, विस्थापित व बेघर व्यक्तींना आवश्यकतेनुसार निवारागृह व अन्न, पाणी व वैद्यकीय देखभाल सुविधा देण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हास्तरावर जिल्हायधिकारी यांची राहणार आहे. शहरी भागासाठी महानगरपालिका व जिल्हाधिकारी यांची संयुक्तरित्या काम करतील. ‘जिल्हाास्तरीय संनियंत्रण समिती’ व ‘महानगरपालिकास्तरीय संनियंत्रण समिती’ या दोन्हीही समित्या‍ राज्यिस्तरीय संनियंत्रण समितीच्याअंतर्गत काम करतील.
​जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे कामकाज पुढीलप्रमाणे राहील- जिल्ह्यातील विविध भागामध्ये विविध घटकातील जीवनावश्यक सुविधा ज्यांना मिळालेली नाही असे मजूर, विस्थापित व बेघर यांची यादी निश्चित करणे, त्याप्रमाणात अन्न्धान्याची आवश्यकता व उपलब्धता याचा तपशील ठरविणे, मदत देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, धर्मादाय संस्था, सहकारी संस्था, तसेच सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देणा-या खाजगी कंपन्या यांची यादी तयार करणे, शिजवलेले अन्न वितरित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणे.
जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्या जबाबदा-या पुढीलप्रमाणे आहेत – गरजूंना तात्पुरती निवारागृहे उपलब्ध करून देणे; शाळा, महाविद्यालये, समाजमंदिर, मंगल कार्यालय व इतर निवास योग्य सभागृहे अशी योग्य ती ठिकाणे निवडून प्राधान्याने जिल्हयाच्या मुख्यालयी व आवश्यकतेनुसार इतर सर्व ठिकाणी स्थानिक पातळीवर विशेषत: औद्योगिक वसाहतीनजिक तात्पुरत्या राहण्याची सोय करावी. ऊसतोड कामगारांकरिता संबंधित साखर कारखान्यांनी निवारागृहाची व्यवस्था करावी. त्यांना अडचणी आल्यास जिल्हाधिकारी अथवा महानगरपालिका आयुक्त सहाय्य करतील. सर्व महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर हेल्पलाईन तयार करुन ते जाहीर करावेत.
कम्युरनिटी किचनची सुविधा
लॉकडाऊनच्या कालावधीत विस्थापित झालेले मजूर, बेघर व्यक्ती यांच्यासाठी नजिकच्या जिल्हापरिषद अथवा महानगरपालिका शाळा व विद्यालये, सार्वजनिक मैदाने, समाज मंदिर, खाजगी मंगल कार्यालये, धार्मिक प्रार्थना स्थळे अथवा संस्था, कृषी उत्पंन्न बाजार समिती आवारातील लिलावगृहे, औद्योगिक वसाहती, इत्यादी ठिकाणी आवश्कतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात कम्युनिटी किचन सुरू करावीत. प्रत्येक कम्युनिटी किचनमध्ये आवश्यकतेप्रमाणे भांडी, स्वयंपाकासाठी आवश्क असणारे साहित्य पाणी उपलब्ध करुन दयावे. कम्युनिटी किचनमार्फत अन्न तयार करणाऱ्या व्यक्तींना अथवा समुहाला अवश्यक अन्नधान्याचा पुरवठा हा स्वयंसेवी संस्था व इतर संस्थामार्फत गोळा करण्यात आलेले अन्नधान्यातून वा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीव्दारे उपलब्ध झालेल्या निधीमधून भागविण्यात यावा. या सोयी सुविधांपासून कोणतीही गरजू व्यक्ती वंचित राहणार नाही याची खातरजमा करावी. महानगरपालिका क्षेत्रामध्ये उपरोक्त सर्व बाबींचे नियोजन वॉर्डनिहाय सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत करून घ्यावे.

राज्यातील ३५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी- नवीन २२ रुग्णांची नोंद;राज्यातील एकूण रुग्ण संख्या २०३

0

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई, दि. २९: राज्यात कोरोनाचे २२ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, करोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आज राज्यात २ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका ४० वर्षीय महिलेचा काल के ई एम रुग्णालयात तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता. ती करोना बाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलढाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू करोना मुळे झाला तो मधुमेही होता. राज्यातील करोना बाधित एकूण मृत्यूची संख्या आता ८ झाली आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील :-

मुंबई ८५
पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ३७
सांगली २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा २३
नागपूर १४
यवतमाळ ४
अहमदनगर ५
सातारा २
औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, जळगाव, बुलढाणा प्रत्येकी १
इतर राज्य – गुजरात १
एकूण २०३

राज्यात आज एकूण ३९४ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ४२१० जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३४५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २०३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत ३५ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७ हजार १५१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ९६० जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

 

 

कोरोना फाईट -डॉक्टर,नर्स,सफाई कामगार,अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी २५ लाख रुपयांचा विमा महापालिकेने करावा -आबा बागुल

0
पुणे-कोरोनाशी सुरु असलेल्या या लढ्यात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी,डॉक्टर,नर्स,सफाई कामगार यांच्या आरोग्याची काळजी घेणे पुणे महानगरपालिकेची जबाबदारी असून त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे  देखील आपले काम आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी २५ लाख रुपयांचा एक वर्षाचा  विमा पुणे महानगरपालिकेने काढून त्याचा एक वर्षाकरिता येणारा प्रीमियम भरावा.अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ,माजी उपमहापौर आबा बागुल यांनी महापालिका आयुक्तांसह राज्य सरकारकडे  केली आहे.
बागुल यांनी या संदर्अभात से म्हटले आहे कि, भरात कोरोना विषाणूचे संकट आले असून या विषाणू चा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र,राज्य शासन तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून योग्यता खबरदारी घेण्यात येत आहे. पंतप्रधानांनी २१ दिवस लॉकडाउन करून नागरिकांना घरातून बाहेर न येण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संशयित व कोरोना बाधित नागरिकांवर उपचार सुरु आहेत. सर्व आपत्कालीन व्यवस्थेमधील कर्मचारी आपल्या जीवाची व कुटुंबाची काळजी न करता आपले कर्तव्य पार पाडत आहेत. कोरोना विषाणूशी लढा देत आहेत. यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी,डॉक्टर,नर्स,सफाई कामगार व इतर सेवक  यांचा सहभाग लाख मोलाचा असून आपल्या कर्त्यव्याशी एकनिष्ठतेने प्रामाणिकपणे आपली सेवा करत आहेत. अश्या कर्त्यव्य दक्ष सेवकांची काळजी घेणे हि देखील पुणे महानगरपालिका व आपल्या सर्वांची  जबाबदारी आहे असे आबा बागुल म्हणाले,
कोरोनाशी सुरु असलेल्या या लढ्यात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी,डॉक्टर,नर्स,सफाई कामगार यांच्या आरोग्याची काळजी घेणे पुणे महानगरपालिकेची जबाबदारी असून त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे  देखील आपले काम आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी २५ लाख रुपयांचा एक वर्षाचा  विमा पुणे महानगरपालिकेने काढून त्याचा एक वर्षाकरिता येणारा प्रीमियम भरावा. त्यामुळे कोरोना विषाणूच्या लढाईत कर्मचाऱ्यांवर कोणते संकट आल्यास त्याला सामोरे जाण्यास हे कर्मचारी आणखी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास वाटतो. यासाठी आपण लवकरात लवकर पावले उचलून या कर्मचाऱ्यांचा एक वर्ष मुदतीचा विमा काढावा याबाबत आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी पत्रव्यवहार सुरु असल्याचे आबा बागुल म्हणाले .
बेघर ,गरीब मजुरांची निवारा सोय मंगल कार्यालयात करा- सूचना 
दरम्यान पोटापाण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या आणि आता कोरोना च्या भीतीने महारष्ट्र सोडून गावी निघालेल्या बेघर,गरीब ,हातावर पोट असणाऱ्यांना मंगलकार्यालयात आसरा देण्यात यावा अशी सूचना त्यांनी महारष्ट्र सरकारकडे केली आहे.

गरजू, गरीब आणि कामगार यांच्यासाठी निवास व भोजन व्यवस्था करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाचे निर्देश

0

मुंबई, दि. २९ – कोरोनाचा प्रभाव वाढू नये, यासाठी केलेल्या उपाय योजनांमुळे अडकलेल्या गरीब व गरजू नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचे तसेच लॉकडाऊनमुळे अडकलेल्या तसेच आपल्या मूळ गावी जाणाऱ्या राज्यातील व परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची ते जेथे असतील त्या जवळपास तात्पुरती निवारा केंद्रे स्थापून त्यांची राहण्याची व  जेवणाची सोय करण्याचे निर्देश राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोवीड १९ चा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे अनेक कामगार हे आपल्या कामाच्या ठिकाणाहून मूळ गावी परत जाण्यासाठी निघाले आहेत. यामुळे सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे उल्लघंन होत आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची भीती वाढत आहे. त्यामुळे अशा कामगारांची व गरीब गरजू नागरिकांची निवासाची व जेवणाची सोय करण्याचे आदेश  केंद्र शासनाच्या गृह विभागाने परिपत्रकाद्वारे सर्व राज्यांना तसेच प्रत्येक शहराच्या जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख यांना दिले आहेत. या आदेशाचे काटेकोर पालन करून कामगार, कष्टकरी व गरीब गरजूंसाठी तात्पुरती निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था करण्यास सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

त्यानुसार कामगारांसाठी ते ज्या भागात आहेत, त्या भागामध्ये राहण्याची तात्पुरती व्यवस्था तसेच गरीब व गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात यावी.

तसेच लॉकडाऊन काळात गावी जाण्यास निघालेल्या कामगार, नागरिकांची ते ज्या भागात आहेत, त्याच्या जवळच्या भागातील तात्पुरत्या निवारा केंद्रात त्यांची व्यवस्था करण्यात यावी. त्यापूर्वी त्यांची योग्य प्रकारे वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. आवश्यकता वाटल्यास वैद्यकीय नियमानुसार १४ दिवस क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्याचीही सोय करावी.

लॉकडाऊन काळात जरी काम बंद असले तरी, दुकाने, व्यावसायिक आस्थापना, उद्योग येथील कामगारांचे त्या काळातील पगार हे कोणतेही वजावट न करता देण्याच्या सूचना सर्व संबंधित आस्थापनाना व मालकांना देण्यात यावेत. कामगार तसेच स्थलांतरित नागरिक हे जर भाड्याने घर घेऊन राहत असतील तर त्यांच्या घर मालकांनी त्यांच्याकडून एक महिन्याचे घरभाडे घेऊ नये. तसेच कोणत्याही घर मालकाने विद्यार्थी अथवा कामगारांना घर किंवा परिसर सोडण्यास सांगत असेल, तर अशा घर मालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही या परिपत्रकात केल्या आहेत.

केंद्र शासनाने आदेशित केलेल्या वरीलपैकी कोणत्याही सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.