Home Blog Page 2628

४१ रुग्णांना घरी सोडले; राज्यात कोरोना बाधित ३३ नवीन रुग्णांची नोंद-राज्यातील एकूण रुग्ण ३३५ संख्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई,दि १: राज्यात आज कोरोना बाधित ३३ नवीन  रुग्णांची नोंद झाली. यातील ३०  रुग्ण मुंबईचे, पुणे येथील २ तर बुलढाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या ३३५ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात करोना मुळे ३ मृत्यूंची नोंद झाली. यातील दोन मृत्यू मुंबईत झाले असून त्यापैकी एक ७५ वर्षीय पुरुष आहे तर दुसरा ५१ वर्षीय पुरुष आहे. याशिवाय ५० वर्षीय पुरुषाचा मृत्यू एक मृत्यू पालघर येथे झाला आहे. या तिन्ही रुग्णांनी कोठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही.   आतापर्यंत  राज्यात करोनामुळे एकूण १३ मृत्यू झाले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील:-

मुंबई – १८१

पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) – ५०

सांगली – २५

मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा – ३६

नागपूर – १६

यवतमाळ – ४

अहमदनगर – ८

बुलढाणा – ४

सातारा, कोल्हापूर  प्रत्येकी  – २

औरंगाबाद, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी – १

इतर राज्य – गुजरात १

एकूण  ३३५ त्यापैकी  ४१ जणांना घरी सोडले तर  १३ जणांचा मृत्यू

राज्यात आज एकूण ७०५ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१२६ नमुन्यांपैकी ६४५६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४१ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २४ हजार ८१८  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १८२८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या – मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

0

वितरणासाठी शासनाची कार्यपद्धती जारी

मुंबई, दि.1: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्ध, अपंग आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुलभतेने उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. शासनाने यासाठी एक कार्यपद्धती निश्चित केली असून त्यानुसार अशा व्यक्तींना सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ही घरपोच सेवा मिळणार आहे.

वयोवृद्ध, अपंग किंवा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित गरजू व्यक्तींने हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर ही सेवा त्यांना उपलब्ध होऊ शकेल.

यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून संपर्क अधिकाऱ्यांची (नोडल ऑफिसर) नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रनिहाय समाजसेवी संस्था निश्चित करण्यात आल्या आहे. अत्यावश्यक वस्तू जसे- अन्नधान्य, औषधे अशा बाबींचा पुरवठा करणाऱ्या संस्था या स्वयंसेवी संस्थांशी जोडण्यात आल्या आहेत.

पोलीस यंत्रणेच्यावतीनेही यासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्था, सेवा पुरवठादार, औषध विक्रेते, घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्ती यांना पोलीस यंत्रणेच्यावतीने प्रवेशपत्र देण्यात आलेले आहेत.

स्वयंसेवी संस्था हेल्पलाईनवर प्राप्त झाल्याप्रमाणे वयोवृद्ध, अपंग व्यक्तींना आवश्यक ते सहाय्य करतील तसेच या व्यक्तींची यादी संबंधीत नोडल अधिकाऱ्यांना सोपवून पोलिस यंत्रणेशी समन्वय राखण्याचे काम करणार आहे. सहाय्यासाठी गरजूंना संबंधित महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा लागेल. मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी 1800 221 292 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. ती सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहतील. या मोहिमेसाठी राज्य समन्वयक म्हणून शासनाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे या काम पहात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’

0

मुंबई, दि. 1 : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल प्लॅटफॉर्म्सची निर्मिती करण्यात आली आहे. ‘नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर’ ही या प्लॅटफॉर्म्सची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

महाकवच अॅप

या डिजिटल प्लॅटफॉर्मची दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि दुसरे- क्वारंटाइन ट्रॅकिंग

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोरोनाबाधित व्यक्ती ही अन्य कोणाच्या संपर्कात आली होती का, याचे ट्रेसिंग. अशा व्यक्तीने स्मार्टफोन बाळगला असल्यास त्याच्याआधारे ती व्यक्ती नेमक्या किती आणि कोणकोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती याचे ट्रेसिंग करणे या ॲपमुळे शक्य होणार आहे. शिवाय, अशी व्यक्ती हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे, रेल्वे स्टेशन अशा कोणत्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी वावरली होती याचे ट्रेसिंगही महाकवच अॅपमुळे अचूकपणे आणि कमीत कमी वेळेत होणार आहे. सध्या ही तपासणी प्रशासनाला मॅन्युअल पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना पाठवून करावी लागते. यात वेळही खूप जातो. पण आता ‘महाकवच’मुळे प्रशासनाला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निश्चित दिशेने प्रयत्न करता येतील आणि तेही कमीत कमी वेळेत.

महाकवच प्लॅटफॉर्मचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे क्वारंटाइन ट्रॅकिंग जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, परदेशातून आलेली व्यक्ती किंवा संशयित रुग्ण यांनी किमान 14 दिवस स्वतःचे विलगीकरण म्हणजेच क्वारंटाइन करणे अतिशय आवश्यक असते. पण, बऱ्याचदा लोक निष्काळजीपणा दाखवतात व नियमांचे उल्लंघन करून अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत जातो.  पण आता अशा व्यक्तींच्या स्मार्ट फोनमध्ये जेव्हा महाकवच ॲप इनस्टॉल केले जाईल तेव्हा अशा व्यक्तींचे क्वारंटाइन ट्रॅकिंगही डिजिटली करता येणार आहे. याची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे जिओ फेन्सिंग व  सेल्फी अटेंडन्स होय. अशा व्यक्तींना एका मर्यादित त्रिज्येतच वावरण्याची मुभा असेल. जेव्हा ही त्रिज्या ओलांडली जाईल तेव्हा ॲपद्वारे ही माहिती प्रशासनाला समजेल. यानंतर योग्य ती कार्यवाही प्रशासनातर्फे होणार आहे. या ॲपचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सेल्फी अटेंडन्स. प्रशासनाकडून जेव्हा जेव्हा विचारणा होईल तेव्हा अशा व्यक्तीला सेल्फी काढून तो ॲपद्वारे प्रशासनाकडे पाठवावा लागेल.

 महाकवच ॲप हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून ते केवळ कोरोना लक्षणीत व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या व्यक्तींसाठी आहे. फक्त अशाच व्यक्ती हे ॲप वापरू शकतात. इतर लोकांना मात्र हे ॲप वापरण्याची परवानगी नसेल

याचबरोबर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून ‘सेल्फ असेसमेंट टूल’चीही निर्मिती करण्यात आली असून ते लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे.

या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीमध्ये आणि अंमलबजावणीमध्ये नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी – भारत सरकार, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी – महाराष्ट्र शासन, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल, नाशिक महापालिका, डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (टीसीएस फाऊंडेशनचा उपक्रम), कुंभेथॉन इनोवेशन फाऊंडेशन या संस्थांचा महत्त्वाचा सहभाग राहिला.

सध्या हा प्लॅटफॉर्म तयार झाला असून नाशिक प्रशासनात त्याचा वापर सुरू आहे. लवकरच तो संपूर्ण महाराष्ट्रभरात लॉन्च करण्यात येईल. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय व्यवस्था, पोलीस आणि समाजातील अनेक मंडळी कोरोनाविरुद्धची ही लढाई लढत आहेत. आता या व्यापक लढ्याला या प्लॅटफॉर्ममुळे एक अत्यंत वेगळा असा डिजिटल प्रयत्नही जोडला जात आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यात याची महत्त्वाची भूमिका असेल.

कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू

0

पुणे दि: 1: कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राज्यात लागू करण्यात आली असून फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्याव्यतीरीक्त प्रति सदस्य प्रति महा 5 किलो तांदुळ मोफत देण्याबाबत शासनाकडुन आदेश प्राप्त झाले आहेत अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली.
पुणे जिल्हा ग्रामिण भागासाठी माहे एप्रिल, मे व जुन 2020 साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार अन्नधान्याचे वाटप विहित दराने त्या-त्या महिन्यात करण्यात येणार आहे. त्यानुसार माहे एप्रिल 2020 करीता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांकरीता 23 किलो गहु व 12 किलो तांदुळ तसेच माहे मे व जुन 2020 या महिन्यांकरीता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका धारकांकरीता 25 किलो गहु व 10 किलो तांदुळ प्रत्येक शिधापत्रिकेवर त्या-त्या महिन्यांमध्ये देण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रती लाभार्थ्यांकरीता दरमहा 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ देण्यात येणार आहे. सदर गव्हाची किंमत 2 रुपये प्रति किलो तर तांदुळ 3 रुपये प्रति किलो आहे.
माहे एप्रिल, मे व जुन 2020 साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार विहित दराने अन्नधान्य वितरण झाल्यानंतरच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या मोफत तांदळाचे वाटप प्रति सदस्य प्रति महा 5 किलो या प्रमाणे प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जुन 2020 महिन्यात करण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर रास्तभाव दुकानांमध्ये गर्दी न करता एक मीटर अंतरावरून अंतर ठेवत धान्य घ्यावे. तरी पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, श्री. गायकवाड यांनी केले आहे.

कोरोना रुग्ण -पुणे 36, पिंपरी चिंचवड 12, सातारा 2,सांगली 25आणि कोल्हापूर 2

0

1) पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 01/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सध्यस्थीती ) रोजी एकुण 5 ने वाढ झाली असून विभागातील एकुण रुग्ण संख्या 77 झाली आहे.

( पुणे 36, पिंपरी चिंचवड 12, सातारा 2,सांगली 25आणि कोल्हापूर 2).

तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 1633 होते. त्यापैकी 1529 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 104 चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवाला पैकी 1413 नमुने निगेटीव्ह आहेत व 77 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 16 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. विभागामधील 7795 प्रवाशापैकी 4276 प्रवाशांबाबत फ़ॉलोअप सुरू असून 3519 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे. आजपर्यंत 1001140 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4591191 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 382 व्यक्तीना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
2) विभागातील शासकीय रुग्णालयामध्ये एकुण PPE (Personal Protective Equipment) 2282,N 95 Mask 29600, Triple Layer Mask 193365 व 2213 वेटीलेंटर्स उपलब्ध आहे. तसेच सह आयुक्त,अन्न व औषध प्रशासन यांचेकडील माहीतीनूसार 1438 PPE (Personal Protective Equipment), N 95 Mask 20799 व 2 ply & 3 ply चे 190712 इतके mask उपलब्ध आहेत. तसेच 30 ml to 500 ml Sanitizer 128211 एवढे उपलब्ध आहेत.
3) विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा साठा
• पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात
• 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे.
• मार्केट मध्ये विभागात एकूण 22913 क्विंटल अन्नधान्याची अंदाजे आवक असून भाजीपाल्याची आवक 9486 क्विंटल , फळांची 16807 क्विंटल तसेच कांदा बटाट्याची 42971 आवक झाली आहे
विभागात दि.31/03/2020 रोजी 92.46 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.24 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले असून उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे. तसेच अन्नधान्याच्या उपलब्धतेबाबत काही अडचण भासल्यास संबधीत जिल्हयातील खालील अधिका-यांशी त्यांच्या नावासमोर दर्शवीलेल्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
पुणे जिल्हा :- 1) श्री.भानूदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी 020-26061013
2) श्रीमती अस्मीता मोरे, अन्नधान्यवितरण अधिकारी 020-26123743
सातारा जिल्हा:- 1) श्रीमती स्नेहल किसवे, जिल्हा पुरवठा अधिकारी 02162-234840
सांगली जिल्हा:- 1) श्रीमती वसुधंरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी 0233-2600512
कोल्हापूर जिल्हा :-1) श्री.दत्तात्रय कवीतके, जिल्हा पुरवठा अधिकारी 0231-265579
सोलापूर जिल्हा :- 1) श्री.उत्तम पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी 0217-2731003/8

4) पुणे शहरातील सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिकांनी कोरोना सदृश्य परिस्थीतीत आपले दवाखाने सुरु ठेवावेत व आपल्या दवाखान्याकडे येणा-या रुग्णांना (SARI) सर्दी, खोकला, घसादुखी या आजाराची लक्षणे असल्यास त्यांना कै.द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी कार्यन्वित करण्यात आले असून येथे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. संपर्क दुरध्वनी क्रमांक 020-25818323 डॉ.स्वाती बढीये (निवासी वैदयकीय अधिकारी, कै.द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी ) 8806668747.
याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या अथवा इतर खाजगी दवाखान्यांमध्ये जर कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळून आला तर अशा रुग्णास यशवंतराव चव्हाण हॉस्पीटल अथवा भोसरी येथील नुतन भोसरी हॉस्पीटलमध्ये (कोरोना बाधित रुग्णांसाठी विशेष व्यवस्था असलेले) दाखल करून त्यावर पुढील उपचार करण्यात येतील. यासाठी संपर्क दुरध्वनी क्रमांक 020-67331307.
5) स्थलांतरीताकरीता तयार करण्यात आलेले रीलीफ कॅम्प : विभागामध्ये जिल्हा प्रशासनमार्फत 89 व साखर कारखान्यामार्फत 26 असे एकुण 115 रीलीफ कॅम्प स्थलांतरीत मजूरांसाठी उभारण्यात आले आहेत. यामध्ये एकुण 8199 स्थलांतरीत मजूर असून एकुण 63171 मजूरांना जेवण देण्यात येत आहे.

(शासकीय स्तरावरून मिळालेली अधिकृत माहिती जशीच्या तशी …)

निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील 106 जण पुणे विभागात आढळले..(व्हिडीओ)

0

पुणे, दि.1: निजामुद्दीन येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी प्राप्त झाली असून त्यामध्ये 106 आढळून आले आहेत. उर्वरितांचा शोध गतीने सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील 182 जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 136, सातारा जिल्ह्यातील 5, सांगली जिल्ह्यातील 3, सोलापूर जिल्ह्यातील 17 व कोल्हापूर जिल्ह्यातील 21 जणांचा समावेश आहे. या माहितीची छानणी करतांना त्यातील नावे दुबार आढळून आली आहेत. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त 7 व्यक्ती आहेत. 182 पैकी 106 जण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 70, सातारा जिल्ह्यातील 5, कोल्हापूर जिल्ह्यातील 10 व उर्वरित सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील यादीत समाविष्ट व्यक्तींना ट्रेसिंग करण्यात आले आहे. पुणे विभागातील आढळून आलेल्या 106 पैकी 94 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचे स्त्राव नमुने घेतले जातील. त्या व्यक्तींचा स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनास प्राप्त झालेल्या यादीतील 51 व्यक्तीच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. काही प्रकरणात काहींनी भ्रमणध्वनी सिमकार्ड बदलले असल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे. काही राज्यांच्या किंवा इतर जिल्ह्यात ज्यांचे संपर्क आढळून आले ती माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुण्यातील 51 जण इतर राज्यातील असल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात खात्री केली जात आहे. पुणे विभागातील 182 जणांचा तपास सुरु असून ते विभागात असतील तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल व त्यांचे स्त्राव नमुने घेतले जातील. स्त्राव नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

लवकरच वयोवृद्ध कलावंताचे मानधन खात्यात जमा होणार.. तेरा कोटींची तरतूद..!

0

मुंबई (खंडूराज गायकवाड) -गेले अनेक दिवसांपासून सरकारी मानधनाकडे डोळे लावुन बसलेल्या वयोवृद्ध लोककलावंताचे तीन महिन्याचे थकीत मानधन येत्या आठवडयात आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे.सुमारे २७ हजार वयोवृद्ध कलावंताना याचा लाभ मिळणार आहे.
सरकारच्या आर्थिक परिस्थितमुळे गेले अनेक महिन्यापासून वयोवृद्ध लोककलावंताना वेळेवर मानधन मिळत नसल्याने अनेक गरीब लोकलावंतांकडे आज घडीला औषधे घ्यायला सुद्धा खिशात पैसे नाहीत.त्यामध्ये करोना सारख्या महामारी या आजारामुळे महाराष्ट्रातील लोकलावंतांवर आज उपासमारीची परिस्थिती ओढवली आहे.संपूर्ण कार्यक्रम बँद असल्याने आता कोणी कलावंत एकमेकांच्या मदत करायला तयार नाहीत.
यातच गेले डिसेंबर महिन्यापासून सांस्कृतिक कार्य खात्याकडून या वयोवृद्ध लोककलावंताचे हक्काचे मिळणारे मानधन त्यांच्या खात्यात जमा केले नसल्याने वयोवृद्ध कलावंतामध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.
परंतु दोन दिवसांपूर्वी वित्त विभागाने सांस्कृतिक कार्य खात्याला १३ कोटी रुपये वयोवृद्ध कलावंताचे थकीत मानधन देण्यासाठी निधी वितरित केला आहे.त्यामुळे येत्या आठवड्याभरात सुमारे २७ हजार वयोवृद्ध कलावंताचे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्यांचे थकीत मानधन आपल्या बँकेत जमा होणार आहे.
सप्टेंबर २०१९पासून सुधारित शासन निर्णयानुसार वयोवृद्ध कलावंताच्या मानधनात वाढ झालेली असून “अ”श्रेणीतील वयोवृद्ध कलावंताला तीन हजार,१५०रुपये, “ब”श्रेणी साठी-दोन हजार,७००रुपये आणि “क”श्रेणीतील लाभार्थ्यांना दोन हजार,२५०रुपये मानधन मिळणार आहे.

सर्व हॉटेल्समधे उजळवली व्हर्च्युअल हृदये…..

मुंबई– शॅलेट हॉटेल्स लि. च्या पोर्टफोलिओमधील हॉटेल्स आज निर्माण झालेल्या कठीण काळात आपल्या सर्व प्रॉपर्टीजवरील व्हर्च्युअल हृदय उजळवतएकजूट, चिकाटी आणि शक्तीचा संदेश पसरवण्यासाठी एकत्र आली आहेत. रात्रीच्या वेळेस रिकाम्या रस्त्यावर, शहराच्या नेहमीच्या गजबजाटाऐवजी नीरव शांतता असताना,दूरवरूनही दिसणाऱ्या या हृदयांचे नागरिकांनी कौतुक केले, कारण त्यांना यातून येणाऱ्या चांगल्या दिवसांची आशा दिसली.

 या उपक्रमाविषयी शॅलेट हॉटेल्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय सेठी म्हणाले, ‘#लाइट्सऑफलव्ह उजळवून आम्ही या अवघड काळात आशा जागवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे यातून आम्हाला सध्याच्या परिस्थितीतही आव्हानांना तोंड देत जनतेची सेवा करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करायचीआहे. आमच्या हॉटेलमध्येही पाहुण्यांना सेवा देण्यासाठी कामावर हजर असणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांनाही यावेळेस विसरून चालणार नाही. पोलिस तसेच कामावर असलेल्या सर्वांना खाद्यपदार्थ आणि पेये पुरवण्यासाठी आम्ही हॉटेलचे दरवाजे खुले ठेवले असून त्याचबरोबर पॅकबंद अन्नपदार्थ आणि वैयक्तिक सुरक्षा उपकरणेही आम्ही पुरवत आहोत. या संकटातून आपण एकत्रितपणे बाहेर पडूया.

शॅलेट हॉटेल्स लिमिटेड

शॅलेट हॉटेल्स लिमिटेड (सीएचएल) ही भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये उच्चभ्रू हॉटेल्सची मालकडेव्हलपरमालमत्ता व्यवस्थापक कंपनी आहे. आमच्या हॉटेल प्लॅटफॉर्ममध्ये एका को- लोकेटेड सर्व्हिस्ड रेसिडन्स असलेल्या हॉटेलसह सहाकार्यरत हॉटेल्सचा सममावेश असून ती मुंबई मेट्रोपोलिटन, हैद्राबादबेंगळुरूपुणे या शहरांत वसलेली आहेत. सीएचएल हॉटेल्स हा जगभरात नावाजला गेलेला हॉस्पिटॅलिटी ब्रँड असून हा ब्रँड लक्झरी अप्पर अपस्केल आणि अपस्केल हॉटेल क्षेत्रात कार्यरत आहे. हॉटेल प्लॅटफॉर्मद्वारे मध्यवर्ती ठिकाणकार्यक्षम डिझाइन आणि विकासहॉटेल क्षेत्रातील योग्य स्थान ब्रँडिंगआघाडीच्या हॉस्पिटॅलिटी कंपन्यांबरोबर आवश्यक कार्यकारी करार यांवर भर दिला जातो. सीएचएलद्वारे आतापर्यंतच्या अनुभवाच्या मदतीने हॉटेल मालमत्तांचे प्रभावी व्यवस्थापन केले जाते.

सिम्बॉयोसिस रुग्णालयातही आता कोरोनावर उपचार !

0

– महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
– ५०० विलगीकरण आणि ३० अतिदक्षता बेड्स उपलब्ध

पुणे (प्रतिनिधी)-
‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने आणखी वेगाने पावले उचलायला सुरुवात केली असून सिम्बॉयोसिस विद्यापीठासोबत महापालिकेने करार केला आहे. यामुळे कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक असलेले विलगीकरणाचे ५०० आणि अतिदक्षताचे ३० बेड्स उपलब्ध झाले आहेत’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे महापालिका आणि सिम्बॉयोसिस विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असून लवळे येथील सिम्बॉयोसिस हॉस्पिटल आता महापालिका कोरोना उपचारांसाठी वापरणार आहे. महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाची यंत्रणा कमी पडल्यानंतर सिम्बॉयोसिस रुग्णालयात कोरोनाबाधितांना भर्ती केले जाणार आहे.

या संदर्भात बोलताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘शहरात कोरोनाबाधितांची संख्या सद्यस्थितीत नियंत्रणात असली तरी भविष्यातील धोके आणि इतर देशात आलेले अनुभव लक्षात घेता हे पाऊल उचलले आहे. या रुग्णांवर होणाऱ्या उपचारांचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून केला जाणार आहे. शिवाय जे रुग्ण या योजनेला पात्र झाले नाही तर महापालिका संबंधित रुग्णाचा खर्च सीजीएचएस दराप्रमाणे अदा करणार आहे.

‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’तर्फे वंचित नागरिकांसाठी ‘कोविड-19’ची विनामूल्य चाचणी

अपोलो हेल्थ अॅंड लाइफस्टाईल आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअर यांच्या भागिदारीत उपक्रम

मुंबई, एप्रिल 1, 2020 : भारतातील सर्वसाधारण विमा कंपन्यांमध्ये अग्रगण्य असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने ‘कोविड-19’च्या साथीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी एक अनोखा ‘सीएसआर’ कार्यक्रम सुरू केला आहे. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय अनुभव असलेल्या अपोलो हेल्थ अॅंड लाइफस्टाईल लि., अपोलो हॉस्पिटल्स एन्टरप्राइज लिमिटेड आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअर लि. या कंपन्यांशी ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ने भागीदारी केली असून  देशातील वंचितांमध्ये ‘कोविड-19’चा प्रसार होऊ नये, यासाठी चाचणी घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ‘कोविड-19’चे संक्रमण झालेल्या संशयितांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या चाचणी किटसाठी, तसेच संपूर्ण तपासणी प्रक्रियेसाठी ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’कडून वित्त पुरवठा करण्यात येणार आहे. या कंपनीने या उपक्रमासाठी  5 कोटी रुपयांची तरतूद केली असून याचा फायदा समाजातील वंचितांना होणार आहे.

‘कोविड-19’च्या चाचणीसाठी सध्या 4500 रुपयांचा खर्च येतो. यामध्ये चाचणी किटची किंमत, रुग्णांच्या घरी जाऊन नमुना गोळा करणे, त्याचे निदान करणे, चाचणीचे निष्कर्ष तय़ार करणे असे खर्च आहेत. करोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आढळलेल्या आणि चाचणी करण्याची अतिआवश्यकता असणाऱ्या 11 हजारहून अधिक वंचितांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. चाचणी किटची किंमत काही काळाने कमी झाल्यास आणखी काही रुग्णांना या उपक्रमाचा फायदा होईल. अंत्योदय रेशन कार्ड आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठीचे रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी हा उपक्रम खासकरून आखण्यात आला आहे.

‘आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भार्गव दासगुप्ता म्हणाले, “सध्याच्या आव्हानात्मक काळात समाजातील वंचित नागरीक ‘कोविड-19’ची बाधा होण्याबाबत सर्वाधिक संवेदनशील आहेत. त्यांची वेळेवर तपासणी होणे ही या विषाणूच्या प्रसारास आवर घालण्याची पहिली पायरी आहे. आरोग्य विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी या नात्याने आम्ही आरोग्य सेवा देणाऱ्यांशी असलेले संबंध सुधारण्याचा विचार केला. अपोलो हेल्थ अॅंड लाइफस्टाईल, मेट्रोपोलिस हेल्थकेअर यांच्याशी आम्ही यासाठीच भागीदारी केली. ‘कोविड-19’च्या तपासणी मोहिमेत पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये या उपक्रमातून आम्ही भर घालीत आहोत.’’

अपोलो हेल्थ अॅंड लाइफस्टाईल लि. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका संगीता रेड्डी म्हणाल्या,  “आरोग्य क्षेत्रातील या आणीबाणीच्या काळात ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’ने इतर कंपन्यांशी भागीदारी करून हा उपक्रम चालविला, याचे आम्ही कौतुक करतो. ‘कोविड-19’च्या संभाव्य रुग्णांची तपासणी अगदी वेळेत व जलद केल्याने या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्याचे आपले प्रयत्न यशस्वी होतील. ‘अपोलो हेल्थ अॅंड लाइफस्टाईल’मध्ये आम्ही या उपक्रमाची तयारी केली असून यामुळे देशातील वंचितांचा खरोखरीच फायदा होईल.”

‘मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड’च्या व्यवस्थापकीय संचालिका अमिरा शहा म्हणाल्या, “या अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड’बरोबर भागीदारी करण्याचा आम्हाला आनंद आहे. ‘कोविड-19’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजातील वंचित घटकांची तपासणी अगदी त्वरीत केली जाण्याची गरज आहे. आम्ही महाराष्ट्रात हा चाचणी उपक्रम लवकरच सुरू करणार आहोत. पुढील काळात आम्ही स्वतः पुढाकार घेऊन इतर राज्यांतही या उपक्रमाचा विस्तार करू.”

आयसीआयसीआय लोम्बार्ड, अपोलो हेल्थ अँड लाइफस्टाईल आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअर या कंपन्या आपापल्या जनसंपर्क माध्यमांतून या मोफत चाचणी उपक्रमाबाबत जागरुकता निर्माण करणार आहे. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

कोविड- 19 विरोधात लढा देण्यासाठी होंडा इंडिया फाउंडेशनची11 कोटीची मदत

नवी दिल्ली, 1 एप्रिल 2020 –होंडा समूहातील सर्व कंपन्यांचा कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी विभाग असलेल्या होंडा इंडिया फाउंडेशनने आज भारतातील कोविड- 19 साथीविरोधात सुरू असलेल्या मदत कार्यासाठी 11 कोटी रुपयांचे योगदान जाहीर केले आहे.

 या मदतीचा एक भाग म्हणून होंडातर्फे तातडीने विविध सरकारी एजन्सीजना होंडा इंजिन बसवलेले तीव्र दाबाचे 2000 बॅकपॅक स्पेयर्स दिले जाणार आहेत. वजनाला हलके असलेले हे स्पेयर्स हॉस्पिटल, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे स्थाने, सार्वजनिक कँटीन्स आणि अशा इतर ठिकाणांचे जंतूनाशकांची फवारणी करण्यास अतिशय उपयोगी आहेत. होंडाने सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्यानिमित्ताने कोविड- 19 विरोधात देश करत असलेल्या प्रयत्नांसाठी वाहन उद्योगाच्या वतीने योगदान दिले आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हात धुणे व इतर प्रयत्नांबरोबरच सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

त्याशिवाय होंडाद्वारे आपल्या उत्पादन कारखान्यांतून स्थानिक प्रशासनाला मदत केली जाणार आहे. होंडाने आपल्या सर्व उत्पादन कारखान्यांतील रुग्णवाहिका वैद्यकीय इमरजन्सीजसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच गरीब आणि वंचित समाजाला खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सचे वितरणही कंपनीतर्फे केले जात आहे.

कोविड- 19 साथीच्या भयानक परिणामांशी लढण्यासाठी होंडा इंडिया फाउंडेशनद्वारे केंद्रीय सरकार तसेच आपले उत्पादन कारखाने कार्यरत असलेल्या हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान या राज्यांतील रिलीफ फंडासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. त्याशिवाय भारतातील होंडाच्या 5 समूह कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी एकूण रिलीफ निधीमधअये आपल्या एका दिवसाचा पगार दान करण्याचे ठरवले आहे.

होंडा इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. मिनोरू कातो म्हणाले, ‘कोविड- 19 साथीने देशात अनपेक्षित परिस्थिती निर्माण केली असून या घडीला समाजाच्या सर्व स्तरात एकत्र येण्याची गरज आहे. आर्थिक मदतीबरोबरच आम्ही तातडीने होंडा इंजिन बसवलेले तीव्र दाबाचे 2000 बॅकपॅक स्पेयर्स दान करणार असून त्यामुळे सार्वजनिक तसेच महत्त्वाच्या ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सरकारला मोठी मदत होईल. कोविड- 19 चा प्रसार रोखण्यासाठी आम्ही सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.’

होंडा इंडिया फाउंडेशन (एचआयएफ) बद्दल

होंडा इंडिया फाउंडेशन (एचआयएफ) हा होंडा कार्स इंडिया लिमिटेड, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि., होंडा सिएल पॉवर प्रॉडक्ट्स लि., होंडा आर अँड डी (इंडिया) प्रा. लि. आणि होंडा अक्सेस इंडिया या सर्व होंडा समूह कंपन्यांचा सीएसआर विभाग आहे. या फाउंडेशनतर्फे रस्ते सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, शिक्षण आणि आरोग्य सेवा यांच्याशी संबंधित सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. जगभरात समाजाला हवी असणारी कंपनी बनण्याचे होंडाचे ध्येय असून आपल्या सामाजिक योगदान उपक्रमांद्वारे जगभरातील लोकांना त्यांच्या आयुष्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ घेण्याचा आनंद मिळवून देत शाश्वत समाजाची सेवा कंपनीला करायची आहे.

स्टँडर्ड चार्टर्डकडून कोविड- 19 विरोधातल्या लढ्यासाठी 5 कोटी रुपयांची मदत

मुंबई, 1 एप्रिल 2020 – स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने आज भारतातील कोविड- 19 विरोधातल्या लढ्यासाठी मदत म्हणून 5 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. समाजात खरा बदल घडवून आणण्याचे आपले तत्व जपत आणि या साथीविरोधातील लढ्यास चालना मिळावी म्हणून बँक विविध स्वयंसेवी संस्थांबरोबर (एनजीओ) भागिदारी करून स्थलांतरित कामगारांसारख्या उपेक्षित वर्गाला मदत करणार आहे.

 सुरुवातीच्या टप्प्यात बँक युनायटेड वे ऑफ मुंबई, स्वदेस फाउंडेशन आणि सीआयआय फाउंडेशन यांच्या सहकार्याने समाजातील कोविड- 19 चा सर्वाधिक फटका बसलेल्या आणि अर्थार्जनापासूनही दूर राहावे लागत असलेल्या गरजू लोकांना अन्नधान्य, जेवण आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार आहे. यामुळे स्थलांतरित कामगारांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे, कारण लॉकडाउनमुळे आर्थिक कामकाज पूर्णपणे बंद आहे.

बँकेतर्फे हा उपक्रम देशाच्या प्रमुख शहरांमध्ये (मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई आणि बडोदा) तसेच ग्रामीण भाग (सुंदरबन, जयपूर, टाँक आणि मराठवाडा) इत्यादी ठिकाणी राबवला जाणार आहे.

या तीन भागिदारांच्या माध्यमातून बँकेने वर नमूद केलेल्या ठिकाणच्या किमान 70 हजार लाभार्थींना अन्नधान्य, जेवण आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या बांधिलकीविषयी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झरिन दारूवाला म्हणाल्या, ‘कोविड- 19 हे प्रत्येक सीमा ओलांडत असलेले आव्हान आहे. या साथीमुळे रोजंदारीवर जीवन जगणाऱ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. या देशात गेल्या 160 वर्षांपासून कार्यरत असलेली बँक या नात्याने कोविड- 19 विरोधातल्या लढ्यात सहभागी होणे आणि नागरिक व समाजासाठी सुरक्षित तसेच निरोगी वातावरण तयार करणे हे आमचे कर्तव्य आहे.’

याचाच एक भाग म्हणून आम्ही ‘हियर फॉर गुड’ हे आमच्या ब्रँडचे आश्वासन प्रत्यक्षात आणत समाजात बदल घडवून आणणार आहोत.

स्टँडर्ड चार्टर्डबद्दल

आम्ही आघाडीचा आंतरराष्ट्रीय बँकिंग समूह असून जगातील सर्वात दमदार अशा 59 बाजारपेठांमध्ये आम्ही कार्यरत राहून आणखी 85 ठिकाणच्या ग्राहकांना सेवा देत आहोत. आमच्या अभिनव वैविध्यपूर्णतेतून व्यापार व समृद्धीला चालना देणे आणि वारसा व मूल्यांच्या माध्यमातून ब्रँडचे ‘हियर फॉर गुड’ हे आश्वासन व्यक्त करणे हे आमचे ध्येय आहे.

स्टँडर्ड चार्टर्ड ही लंडन आणि हाँग काँग शेअर बाजारात तसेच भारतातील मुंबई आणि राष्ट्रीय बाजारातील नोंदणीकृत पीएलसी आहे.

माझ्या प्रभागात उपाशी कोणी झोपणार नाही- भिमाले (व्हिडीओ)

0

पुणे-प्रभाग माझा माझी जबाबदारी ,इथे कोणी उपाशी राहणार नाही ..अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला पहिला प्रतिसाद देत महापालिकेतील माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी उद्या प्रभागातील गरजूंच्या  घरी किराना माल पोहोचविण्याचा निर्धार केला आहे .या साठी आज त्यांनी जय्यत तयारी केली आहे. बासमती तांदूळ ,तुरडाळ ,साखर अशा किराणा मालाच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ते आमदार चंद्रकांतदादा पाटील, माधुरी मिसाळ यांच्या हस्ते औपचारिक शुभारंभ करीत सुरु करणार आहेत . यावेळी जमावबंदी आणि कोरोना संदर्भात सर्व शासकीय नियम आणि स्वतः सह जनसुरक्षा जनआरोग्य  लक्षात घेऊन घरोघरी जीवनावश्यक वस्तू पोहोचविणार आहेत .

पुण्यातील रुग्णालये अद्ययावत करण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या आमदार निधीतून ५० लाख उपलब्ध

0

पुणे-

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे महानगरपालिकेची रुग्णालये अद्ययावत करण्यासाठी कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून ५० लाख निधी उपलब्ध करुन दिला आहे. यासंदर्भात श्री पाटील यांनी आज पुण्याचे महापौर आणि आयुक्तांना पत्र लिहून कळवले आहे.

पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अद्ययावत साधन समुग्रीची कमतरता भासत आहे. याची दखल घेऊन श्री. पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी अजून निधीची गरज असल्यास निधीची उभारणी करु, असे देखील श्री. पाटील यांनी कळवले आहे.

दरम्यान, मंगळवारी श्री. पाटील यांनी संवेदना फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांच्या वतीने २० हजार मास्क तयार करुन घेऊन पुण्याचे महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्याकडे सुपूर्द केले. या मास्कचे महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी, पोलीस कर्मचारी, पत्रकारांना आणि विविध रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर, परिचारिका यांना वाटप करण्यात येणार आहे.

मुंबईत महापालिकेकडून १४६ परिसर सील-या ठिकाणी ..’नो गो’

0

मुंबई-महापालिकेने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईत करोना रुग्ण आढळलेल्या आणि त्याच्या आसपासच्या १४६ विभागांना महापालिकेने सील केले असून त्या परिसराला ‘नो गो झोन’ असं नावही दिलं आहे. नागरिकांनी या ‘नो गो झोन’मध्ये येऊ नये असं आवाहन पालिकेने केले आहे.

  • मालमत्ता ताब्यात घेणार

    दरम्यान, मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सर्व २४ वॉर्डातील रिकाम्या जागा, इमारती, इमारतीतील फ्लॅट, लॉज, हॉटेल्स, क्लब्स, प्रदर्शन केंद्र, महाविद्यालये, हॉस्टेल्स, जिमखाने शोधून त्यात विलगीकरण कक्ष तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

दक्षिण मुंबईतील ४८ परिसरांमध्ये करोनाचे संशयित रुग्ण किंवा करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मलबार हिल, वाळकेश्वर, पेडर रो, बेलासीस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीचा समावेश आहे. वरळीत आठ रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी वरळी कोळीवाड्यातील रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. दक्षिण मुंबईत सर्वाधिक १३ रुग्ण प्रभादेवीच्या चाळीत आढळून आले आहेत. २४ मार्च रोजी येथील एका खानावळ चालवणाऱ्या महिलेला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर तीन दिवसानंतर या महिलेचा मृत्यू झाला होता.

वरळी कोळीवाड्यात एकूण ८० हजार लोक राहतात. त्यामुळे प्रत्येकाची करोनाची चाचणी करणं पालिकेला शक्य नाही. त्यामुळे कोळीवाड्यात आजपासून आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच या परिसरात २४ तासांसाठी दवाखाना सुरू करण्यात आला असून एक रुग्णवाहिकाही या परिसरात ठेवण्यात आल्याचं पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. तसेच कोळीवाड्यात दूध आणि किराणा सामानाचा दररोज पुरवठा करणं ही अत्यंत कठिण गोष्ट असल्याचंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.पश्चिम उपनगरात करोना संशयित असलेले एकूण ४६ विभाग निश्चित करण्यात आले आहेत. त्यात वांद्रे पश्चिम आणि खारमध्ये सर्वाधिक रुग्ण असल्याचं आढळून आलं आहे. वांद्रे पूर्वेतील हिल रोड, एसव्ही रोड, २१वा रोड, गव्हर्नंमेंट कॉलनी, गोरेगाव पूर्वेतील बिंबीसार नगर सील करण्यात आले आहे. अमेरिकेतून आलेली एक २५ वर्षीय तरुणी करोना पॉझिटिव्ह आढळल्याने सोमवारी संध्याकाळी हे परिसर सील करण्यात आले आहेत.