पिंपरी-
महाराष्ट्र शासनाने उद्योगपतींच्या सल्याने राज्यातील उद्योग सुरू करण्याचा घाट घातला आहे का असा थेट सवाल कामगार नेते यशवंत भोसले यांनी महाराष्ट्र शासनास केला आहे. कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर असे करणे धोकादायक ठरू शकते. जर यामुळे कोरोनाचा उद्रेक झाला व कष्टकरी, श्रमीक, मजुरांचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाचीच राहिल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य होरपळत असताना महाराष्ट्र शासन उद्योजकांना कारखाने सुरू करू देण्याची परवानगी देत आहे.
आज रस्त्यावर युद्धजन्य स्थिती आहे. आपण संचारबंदीचे पालन करत संपूर्ण जगाला आदर्श घालून देण्याचे काम केले आहे. मात्र असे असताना आवश्यक सेवेतील कारखाने सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णय घेतला आहे. मात्र आवश्यक सेवेच्या नावाखाली अनेक उद्योग-व्यवसाय आता सुरू होणार आहेत, त्या पाठोपाठ हे मोठे व्यवसाय ज्या छोट्या उद्योगांवर अवलंबून आहेत ते तसेच त्यासाठीची वाहतुक यंत्रणा या सर्वांना उद्योग सुरु करण्याची परवानगी द्यावी लागणार आहे. ही साखळी असून हळूहळू सर्वच व्यवसाय पुन्हा सुरू होतील.
मुळात अत्यावश्यक सेवेतील कारखाने सुरु करण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाबाबत शासनाचे नक्की धोरण कसे आहे हेच शासन आदेशात निश्चित होत नाही असे यशवंतभाऊ भोसले यांनी म्हंटले आहे.
शासनाच्या भूमिकेमुळे अत्यावश्यक सेवेत नसलेल्याही अनेक उद्योगांनी आपल्या कामगारांना कामावर हजर राहण्याबाबत आदेश काढले आहेत. शासन एकीकडे जिल्हाबंदीचे आदेश काढत आहे, वाहतुकीला परवानगी नाकारत आहे आणि दुसरीकडे कारखाने सुरू करायचे म्हणत आहे. कोरोनाच्या भितीमुळे शहराबाहेर गेलेले कामगार पुन्हा कामावर कसे हजर राहणार? हा प्रश्न आहे. जर कामगार कामावर आला नाही तर त्यामुळे उद्योजकांच्या हातात कामगाराला कामावरुन काढून टाकण्यासाठी सोपे कारण मिळणार आहे व कामगारांच्या नोकर्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पून्हा सर्व व्यवस्था सुरु झाल्यास पोलिसांच्या अविरत परिश्रमामुळे आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा हाहाकार माजवेल, आज लोकांवर नियंत्रण साधताना पोलीस यंत्रणाही वैतागली आहे. मात्र जीवावर उदार होऊन ते परिस्थितीवर नियंत्रण आणत आहेत. पण उद्योग व्यवसाय सुरू झाले तर कोरोनाच्या हाहाकारावर कोणाचेच नियंत्रण राहणार नाही.
शासनाने यासंदर्भात निर्णय घेताना कन्फ्युज न होता निर्णय घेणे गरजेचे आहे. जर उद्योजकांच्या आग्रहाने शासन निर्णय घेत असेल तर ती भविष्यातील मोठी चूक ठरु शकते असे यशवंतभाऊ भोसले म्हणाले.
उद्योग सुरु करण्याची परवानगी ही घोडचूक ठरु शकते कोरोनाचा हाहाकार झाल्यास जबाबदार शासन
आझम कॅम्पस तर्फे लोहिया नगर येथे शंभर ‘किराणा किट’ चे वितरण
‘आयसीएआय’कडून पोलिसांना ५५० बॉटल्स सॅनिटायझर
पाणीपुरवठा मंत्र्यांचे खाजगी सचिव अशोक पाटील यांची मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांची देणगी
मुंबई, दि.20: राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यालयातील खाजगी सचिव अशोक सखाराम पाटील यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19, साठी एक लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द केला.
कोविड विषाणू प्रार्दुभावाच्या विरोधात शासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी अधिकाधिक निधी देणगी म्हणून देण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यानुषंगाने श्री. पाटील यांनी ही देणगी दिली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यापूर्वीच आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देणगी म्हणून दिले आहे.
पुणे विभागात 40 हजार 169 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 498 क्विंटल भाजीपाल्याची आवक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे, दि.20 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 40 हजार 169 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 498 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 5 हजार 172 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 21 हजार 215 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
पुणे विभागात 19 एप्रिल 2020 रोजी 99.06 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 22.84 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
१५०० गरजूंपर्यंत जीवनोपयोगी साहित्यची मदत
पुणे:
युवक क्रांती दल आणि रोटरी क्लब ऑफ पुणे, स्पोर्टस् सिटी (औंध) तर्फे १ एप्रिल पासून कोरोना लॉकडाऊन काळात अडचणीत आलेल्या गरजूंपर्यंत जीवनोपयोगी साहित्य आणि किराणा सामानाची मदत पोहोचविण्यात आली.
२० दिवसात सुमारे १५०० गरजूंपर्यंत सुमारे साडे चार लाख खर्चून हे मदतकार्य करण्यात आले. अनेक संस्था आणि नागरिकांनी आर्थिक मदत करून उभारलेल्या निधीतून हे मदत कार्य करण्यात आले. ३०० रूपयात एका व्यक्तीला आठवडाभर पुरेल एवढे किराणा सामान देता येते,अशा अंदाजावर आधारित ३०० रुपये देणगी देण्याचे आवाहन सोशल मीडिया वरून करण्यात आले होते. कात्रज,पानमळा,कोंढवा,मुंढवा,भवानी पेठ ,न्यु कोपरे,वारजे माळवाडी,सदाशिव पेठ,काळेपडळ,दापोडी,येरवडा,गणपतीमाथा,एरंडवणे,पिंपरी चिंचवड ,मोमीनपूरा,वडगाव,सुखसागरनगर ,न-हे ,सुसगाव,धायरी,फुरसूंगी या ठिकाणी हे मदतकार्य करण्यात आले.
डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर,सचिन चौहान, मुख्तार मणियार,सचिन पांडूळे मशाल संस्थाचे पदाधिकारी शरद महाजन,रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्टस् सिटी औंधचे अध्यक्ष विनोद पाटील, संदेश सावंत,सेम्युअल केनडी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
चेक ( धनादेश ) द्यायचा झाल्यास तो ‘ महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘ या नावाने द्यावा.पुढील क्रमांकावर फोन करावा आणि या कार्यात सहभागी व्हावे .संदीप बर्वे,9860387827,जांबुवंत मनोहर 9028633720 ,सचिन चौहान 9637428888,
देणगी पाठवण्यासाठीचा तपशील
———–
Maharashtra Gandhi Smarak Nidhi
State Bank of India
Kothrud Branch
Kothrud, Pune – 38.
Account no.
52019302096
IFSC Code SBIN0020734
पालघरची घटना दोन धर्मां मधला संघर्ष नाही; आग लावू नका: मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई: पालघर येथील मॉब लिंचिंगची घटना ही दोन धर्मांमधला संघर्ष नाही. त्यामुळे याला धार्मिक रंग देऊन आग लावण्याचं काम करू नका. या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचाही प्रयत्न करू नका, असा इशारा देतानाच पालघर घटनेतील ११० हल्लेखोरांना त्याच दिवशी अटक केली असून कुणालाही सोडलं जाणार नाही. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/695684451246489/
पालघरमध्ये घडलेली घटना लांछनास्पद आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. गेल्या पाच वर्षातही आपल्या राज्यात मॉब लिंचिंग झालं. मुळात जिथे घडलं तो भाग पालघरपासून ११० किमी अंतरावर आहे. दोन साधू दुर्गम भागातून जात होते सरळ मार्गाने जाता येत नाही. हे काहीही घडवून आणण्यात आलेले नाही. जे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे तिथे काही मीटरवर दादरा नगर हवेली म्हणजे केंद्रशासित प्रदेशाची हद्द सुरु होते. तिथे त्यांना अडवलं गेलं, त्यानंतर त्यांना परत पाठवलं गेलं. तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. दादरा नगर हवेलीतही त्यांना प्रवेश नाकारला गेला आणि त्यांना परत पाठवलं गेलं. त्या परिसरात गेले काही दिवस अशी अफवा आहे तिथे चोर फिरत आहेत. त्या सगळ्या गैरसमजातून हा प्रकार घडला. असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
ही घटना रात्री जेव्हा घडली तेव्हा एवढ्या रात्री पोलीस पोहचले. पहाटे पाच्या सुमारास पोलिसांनी आरोपींना पकडलं. आम्ही कारवाई केलेली आहे या प्रकरणावरुन राजकारण नको असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. जे लोक धर्माचं राजकारण करु पाहात आहेत त्यांनी ते करु नये. मी या घटनेत जात-पात-धर्म पाहिलेला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. पालघर प्रकरणात १०० पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. यामध्ये नऊ मुलं अल्पवयीन आहेत त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणातल्या पाच म्होरक्यांनाही अटक केली आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
रुतलेलं अर्थचक्र हळूहळू बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउन संपलेला नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. गर्दी वाढली, सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही तर पुन्हा बंधनं टाकावी लागतील. आज महाराष्ट्रात पहिला रुग्ण सापडून सहा आठवडे पूर्ण झाले आहेत. या सहा आठवड्यांमध्ये आपण संयमाने घरात बसला आहात. मात्र या सगळ्या दिवसांमध्ये पोलीस, आरोग्य सेवेतील कर्मचारी, स्वच्छता विभागातील कर्मचारी हे सातत्याने काम करत आहेत हे आपले लढवय्ये आहेत.
संपूर्ण पुणे सील-काय म्हणाले महापौर …
संपूर्ण पुणे शहर सील करण्याच्या निर्णयावर महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया…
नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने दुकाने बंद राहणार
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचा निर्णय
पुणे, दि. 19 एप्रिल : पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. सतत गर्दी होत असल्याने किरकोळ दुकानदारांच्या आयुष्याचाच आता प्रश्न निर्माण झाल्यामुळे शहरातील कोथरुड, शास्त्रीनगर, वारजे, शिवणे, उत्तमनगर, सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, दत्तवाडी, दांडेकर पूल, कर्वेनगर, शिवदर्शन या भागातील किरकोळ दुकानदारांनी 21 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान (मंगळवार ते शुक्रवार) दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, गरजवंताला घरपोच सामान दिले जाईल, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.
या भागातील मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागत असल्याचेही निवंगुणे म्हणाले. नागरिक सोशल डिस्टन्सिंग व इतर नियम पाळत नसल्याने व्यापाऱ्यांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. दुकाने बंद राहणार असली तरी ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना घरपोच डिलीव्हरी दिली जाणार आहे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी नवनाथ सोमसे, सारंग राडकर, रामभाऊ दोडके, सुनिल गेहलोत आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑनलाईन व्यवहार नाही तरी, बँक खात्यातून पैसै गायब: सायबर पोलिसांनी मिळवून दिले परत
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत काही नागरिकांचे डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड त्यांच्याजवळ असतानाही त्यांच्या बँक खात्यातील पैसे काढण्यात आले होते. याबाबत आलेल्या तक्रारीची दखल घेऊन बँका, वित्तीय संस्था यांच्याकडे पाठपुरावा करून ५८ लाख रुपये आम्ही परत मिळविले, १४१ तक्रारदारांना हे पैसे परत करण्यात आले आहेत.”
– संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा.
पुणे : शहरामध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मागील महिनाभरात १४१ नागरिकांचे डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड त्यांच्याजवळ असतानाही ऑनलाईन व्यवहार होऊन त्यांच्या बँक खात्यातील पैसे काढण्यात आले होते. याबाबत सायबर पोलिस ठाण्याचे बँका, वित्तीय संस्था, ई वॉलेट कंपन्यांकडे पाठपुरावा करून तब्बल ५८ लाख रुपये परत मिळवून संबंधीत नागरिकांना परत केले.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे २३ मार्चपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे बहुतांश नागरीक घरून काम करत आहेत. ऑनलाईन खाद्यपदार्थ, भाजी, फळे, औषधे वगळता अन्य सर्व प्रकारचे व्यवहार सध्या ठप्प आहेत. असे असताना काही नागरिकांनी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांचा वापर करून ऑनलाईन व्यवहार केलेले नसतानाही त्यांच्या बँक खात्यातील लाखो रुपयांची रक्कम काढण्यात आली.
२३ मार्चपासून आत्तापर्यंतच्या एक महिन्याच्या कालावधीत शहरातील १४१ नागरिकांच्या बँक खात्यातील पैसे काढण्यात आले.याबाबत संबंधीत नागरिकांनी पुणे पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.
आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या पथकाने संबंधीत प्रकरणांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी अचानक पैसे काढून घेणाऱ्या बँका, वित्तीय संस्था, ई वॉलेट कंपन्या, ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणाऱ्या कंपन्या यांच्या कार्यालयांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकारची माहिती दिली.तसेच संबंधीत नागरिकांचे पैसे तत्काळ परत करण्याबाबत त्यांना सूचनाही दिल्या होत्या. त्यानुसार १४१ जणांचे तब्बल ५८ लाख रुपये सायबर पोलिसांनी परत मिळविले, तसेच तक्रारदार व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना ते पैसे परत केले.
संपूर्ण पुणे शहर झाले सील ….अंमलबजावणी सुरु ..
पुण्यात कोरोना आणखी पसरण्याची चिन्हे असल्याने आता सबंध महापालिका हद्द येत्या २७ एप्रिलपर्यंत ‘सील’ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने रविवारी घेतला. हा निर्णय रविवारी रात्री बारा वाजल्यापासून लागू होईल. त्यामुळे नागरिकांना आता आपल्या भागातून दुसऱ्या परिसरात ये-जा करता येणार नाही. त्याचवेळी सूंपर्ण शहरातील जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीची दुकाने केवळ दोन तास सुरू राहतील. येत्या २७ एप्रिलपर्यंत महापालिकेच्या हद्दीतील सर्व प्रमुख रस्ते, गल्लीबोळ पूर्णपणे बॅरिकेडच्या माध्यमातून बंद केले जाणार आहे. तसेच, नागरिकांना रोज सकाळी दहा ते बारा या वेळेत जीवनाश्यक वस्तुंची खरेदी करता येणार आहे. गायकवाड म्हणाले, “वेगवेगळ्या पातळ्यांवर उपाय करूनही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळे संपूर्ण शहर सील राहील. त्यामुळे सर्वत्र संचारबंदी असेल. परंतु, नागरिकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.”
शहरातील करोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेता हा प्रसार आता कम्युनिटी ट्रान्सफरच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे महापालिका क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. दि. 19 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी केली जाईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर केले आहे. हे आदेश दि. 27 एप्रिलपर्यंत लागू असतील.
या आदेशानुसार, पुणे शहराच्या सर्व सीमा सील करण्यात येत आहेत. शहरातून बाहेर पडणारे सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने बाहेरील व्यक्तीलाही या भागात प्रवेशबंदी असणार आहे.केंद्र सरकारच्या आदेशानुसार, दि. 20 एप्रिलनंतर देशाच्या काही भागातील लॉकडाऊन निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यातून पुणे महापालिका हद्दीतील विविध आस्थापनांना आणि उद्योगांना सवलती उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी नागरिकांचा वावर वाढून रुग्णांची संख्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, हा धोका लक्षात घेऊन ही उपाययोजना लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने दि.17 एप्रिल रोजी जो आदेश जारी केला, त्यात करोनाचा उद्रेक झालेल्या भागात कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचा अधिकार पालिका आयुक्तांना देण्यात आला आहे. या अधिकाराअंतर्गंत आयुक्तांनी रविवारी रात्री ही नवीन उपाययोजना जारी केली.
राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४२००; राज्यात ५५२ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई, दि. १९ : आज राज्यात कोरोनाबाधीत ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४२०० झाली आहे. १४२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३४७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७२ हजार ०२३ नमुन्यांपैकी ६७ हजार ६७३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४२०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८७ हजार २५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,७४३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात १२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६ आणि मालेगाव येथील ४ तर १ मृत्यू सोलापूर मनपा आणि १ मृत्यू जामखेड अहमदनगर येथील आहे. त्यात ४ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६ रुग्ण आहेत तर ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्यूमुखी पडलेल्या ४ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित ८ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये (७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२३ झाली आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: २७२४ (१३२)
ठाणे: २० (२)
ठाणे मनपा: ११० (२)
नवी मुंबई मनपा: ७२ (३)
कल्याण डोंबवली मनपा: ६९ (२)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: ५
मीरा भाईंदर मनपा: ७१ (२)
पालघर: १७ (१)
वसई विरार मनपा: ८५ (३)
रायगड: १३
पनवेल मनपा: २७ (१)
ठाणे मंडळ एकूण: ३२१४ (१४८)
नाशिक: ४
नाशिक मनपा: ५
मालेगाव मनपा: ७८ (६)
अहमदनगर: २१ (२)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: १ (१)
धुळे मनपा: ०
जळगाव: १
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: १
नाशिक मंडळ एकूण: १२१ (१०)
पुणे: १७ (१)
पुणे मनपा: ५४६ (४९)
पिंपरी चिंचवड मनपा: ४८ (१)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: १५ (२)
सातारा: ११ (२)
पुणे मंडळ एकूण: ६३७ (५५)
कोल्हापूर: ३
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ६ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४० (१)
औरंगाबाद:०
औरंगाबाद मनपा: ३० (३)
जालना: १
हिंगोली: १
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ३३ (३)
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ०
लातूर मंडळ एकूण: १२
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ९
अमरावती: ०
अमरावती मनपा: ६ (१)
यवतमाळ: १४
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ४८ (३)
नागपूर: २
नागपूर मनपा: ६७ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ७२ (१)
इतर राज्ये: १३ (२)
एकूण: ४२०० (२२३)
(या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा, मनपांनी उपलब्धकरून दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत आहेत तसेच मुंबई मनपा कार्यक्षेत्रामध्ये दिनांक १२ एप्रिल २०२० पासूनच्या नवीन निदान झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३६८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६३५९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २३.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
नगरसेवकाने परिवारांना दिला लोकसेवेचा मंत्र (व्हिडीओ)
पुणे- भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड यांना ते भेटले , लॉकडाऊन मध्ये घरात कोंडून घेणे त्यांना पसंत नव्हते ,आणि बाहेर तर जाणे शक्य नव्हते,मग काय करायचे ? हा प्रश्न त्यांनी विचारला आणि उमेश गायकवाड यांनी मोदी यांना चक्क समाज सेवेचा धडा दिला .होय गायकवाड यांच्या प्रभागातले पराग मोदी,माझीन मोदी आणि मुकेश बम्बोली हे जेव्हा गायकवाड यांना भेटले तेव्हा हे घडले …आणि पाहता पाहता ..मोदी आणि बम्बोली नावाचे दोन्ही परिवार लोकसेवेत रमले. भाजीपाला , अन्न धान्य १० हजार लोकांना वाटून झाल्यावर करायचे काय ? या चिंतेत असताना नगरसेवक गायकवाड यांना ते भेटले आणि मग उपक्रम सुरु झाला ..रोज जेवणाचे डबे नाही पण पाकिटे बनवायची , कधी पुरी भाजी कधी पाव भाजी, कधी राजमा अशा विविध मार्गाने रोज बदलते जेवण सुमारे १५०० ते 2000 लोकांपर्यंत पोहोचवायचे या साठी गायकवाड यांनी त्यांना मदत केली . हॉटेल चालू नाहीत ,पोलीस ,पालिकेचे चतुर्थ श्रेणी चे कामगार आणि भेटेल तो गरजू यांना हि पाकिटे वाटण्याची जबाबदारी गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी पत्करली . गायकवाड यांच्या सोबतीने हे दोन परिवार कामाला लागले आणि हा हा म्हणता लॉकडाऊन चे दिवस सरू लागले. …जणू स्पर्धा सुरु झाली आहे कोरोना विरुद्ध ..पाहू यात कोण अगोदर थकनार आहे …तोपर्यंत हि पहा एक अल्पशी व्हिडीओ झलक
पुणे विभागात कोरोना बाधित 726 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे दि.19:- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 726 झाली असून विभागात 82 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 591 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 15 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 726 बाधित रुग्ण असून 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 666 बाधीत रुग्ण असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 15 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून कोल्हापूर जिल्हयात 7 बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 9 हजार 43 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 8 हजार 304 चा अहवाल प्राप्त आहे. 684 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 7 हजार 586 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 726 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 41 लाख 23 हजार 708 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत 1 कोटी 55 लाख 64 हजार 478 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 819 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
सॅनिटेशन डोम अथवा टनेलचा वापर न करण्याच्या सूचना,महापालिकेने उभारलेले गोखलेआणि चितळेंचे टनेल काढले जाणार ..
व्यक्ती किंवा समुहावर होणारी जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक
मुंबई, दि. १९: कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम, अथवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो म्हणून फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये अशी सूचना केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना केली आहे.या सर्व पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने चितळे आणि गोखले यांच्या मार्फत नायडू रुग्णालय आणि महापालिका प्रवेश द्वाराजवळ उभारलेले जंतुनाशक टनेल आता काढावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून राज्यात या प्रकारच्या यंत्रणांचा वापर न करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर होत असून त्याद्वारे व्यक्ती किंवा समुहावर वापर केला जात आहे. यासाठी वापरले जाणारी रसायने मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून अशा फवारणीमुळे कोरोना जंतुसंसर्ग रोखला जातो याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे राज्यात अशा फवारणी यंत्रांचा वापर न करण्याच्या सूचना आरोग्य संचालक डॉ. अर्चना आटील यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.



