लॉकडाऊन काळात रमझान महिन्याचे नमाज पठण घरातच करावे
येवले चहाचा मदतीचा 16 वा टप्पा पुर्ण
पुणे-आज दिंनाक 20एप्रिल 2020 रोजी पुणे येथे येवले अमृततुल्य संचलित येवले फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने करोना विषाणू च्या पार्श्वभूमी वर 18000 क्रिमरोल प्रकृती केअर फांऊडेशन यांच्या कडे सुपुर्द करण्यात आले . गोकुळनगर येथील कार्यक्रमात प्रकृती फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ ज्ञानोबा मुंडे , नवनाथ बारगजे ,सादिक तांबेळी तसेच येवले फांऊडेशनचे निलेश येवले , संजय येवले , निलेश मोरे , हे उपस्थित होते
सदर क्रिमरोल पुण्यातील , सुखसागर नगर ,गोकुळनगर , लक्ष्मीनगर ,अश्रफनगर , लेबर कॅम्प टिळेकर नगर ,येवले वाडी या सर्व भागातील साफसफाई कामगारांना तसेच कोंढवा विभागतील पोलीसबांधवांना वाटन्यात आले
आदिवासी, तृतीयपंथीं,गरजूंना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप
गांधीभवन,युक्रांद,मशाल,रोटरीचे मदतकार्य
‘मशाल’ संस्थाचे पदाधिकारी शरद महाजन,रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्टस् सिटी औंधचे अध्यक्ष विनोद पाटील, संदेश सावंत,सेम्युअल केनडी तसेच मुख्तार मणियार,सचिन पांडूळे ,यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे या मोहिमेसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. चेक ( धनादेश ) ‘ महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘ या नावाने द्यावा.पुढील क्रमांकावर फोन करावा आणि या कार्यात सहभागी व्हावे .संदीप बर्वे,9860387827,जांबुवंत मनोहर 9028633720 ,सचिन चौहान 9637428888,असे आवाहन करण्यात आले आहे.
State Bank of India
Kothrud Branch
Kothrud, Pune – 38.
Account no.
52019302096
IFSC Code SBIN0020734
पुणे विभागात 31 हजार 884 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 726 क्विंटल भाजीपाल्याची आवक
पुणे, दि.20 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 31 हजार 884 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 726 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 4 हजार 634 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 17 हजार 619 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
पुणे विभागात 20 एप्रिल 2020 रोजी 98.272 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 22.627 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
पुणे विभागात 1 लाख 23 हजार 808 स्थलांतरित मजुरांची सोय
1 लाख 96 हजार 340 मजुरांना भोजन
सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 147 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 1 हजार 92 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 1 हजार 239 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 1 लाख 23 हजार 808 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 96 हजार 340 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील ‘लॉकडाऊन’- यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना
जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची माहिती मिळाल्यानंतर देशातही आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणा सावध झाली होती. राज्यातील पुणे येथे 9 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. ‘लॉकडाऊन’ च्या काळात पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला, पण नियोजनबध्द प्रयत्नांनी त्यावर मात करण्यात आली. ‘नम्र’ पण ‘खंबीर’ अशी पुणे पोलिसांनी भूमिका घेतल्यामुळे ‘लॉकडाऊन’ यशस्वी होतांना दिसत आहे.
पुणे जिल्ह्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, कटक मंडळे, जिल्हा परिषद अशा प्रशासकीय यंत्रणाशिवाय पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस अशी पोलीस यंत्रणा आहे. महसूल आणि पोलीस यंत्रणांच्या परस्पर समन्वयाने ‘लॉकडाऊन’च्या आव्हानावर मात करता आली. पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम् यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सोशल पोलीसिंग, नागरिकांचा सहभाग, जनजागृती, सहभागी व्यक्तींचे व्यवस्थापन, पोलीस कल्याण, नियंत्रण आणि अंमलबजावणी या सूत्रांचा अवलंब केल्यामुळे पुणे शहरात ‘लॉकडाऊन’ यशस्वी झालेला दिसत आहे. 9 हजार पोलीस आणि 40 लाख लोकसंख्या अशा विषम परिस्थितीत नियोजनबध्द प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अवघड नाही, हे सिध्द झाले.
‘लॉकडाऊन’ असल्यानंतर नागरिकांवर काही निर्बंध येतात. तथापि, काही नागरिक नियमांची पायमल्ली करण्यात धन्यता मानतात. प्रारंभी पोलिसांनी नम्रपणे त्यांचे समुपदेशन केले. ‘समझनेवाले को इशारा काफी होता है’ या उक्तीप्रमाणे काही सुधरले. मात्र, हेकेखोर नागरिकांना पोलिसांनी ‘खंबीर’पणे धडा शिकवला. सध्या मोबाईल किंवा व्हिडीओ कॅमे-याच्या शूटींगमुळे पोलिसांनी कारवाई करतांना खबरदारी घ्यावी लागते. पोलीस अमानुष वागणूक देतात, असा आरोपही केला जाऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी 117 तपासणी नाक्यांवर बॉडी कॅमेरे, मोबाईल, व्हिडीओ कॅमे-यांद्वारे निगराणी सुरु केली. नियमांचे उल्लंघन करणा-या 7361 व्यक्तींवर 188 कलमाखाली कारवाई करण्यात आली. वाहन पास नसलेल्या 23 हजार 946 वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली. मॉर्निंग वॉक करणा-या 1690 व्यक्तींविरुध्दही कारवाई करण्यात आली याशिवाय मास्क न वापरणा-या 127 जणांनाही कारवाईला सामोरे जावे लागले. महाराष्ट्र होम क्वारंटाईन ट्रॅकींग सिस्टीम (एमएचक्यूटीएस) द्वारे 3211 व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आले. बेकायदेशीर वागणा-या नागरिकांवर कारवाई करत असतांनाच खराब मास्क, अशुध्द सॅनिटायझर विक्री करणा-यांविरुध्दही कारवाई करण्यात आली. यामध्ये 18 हजार हलक्या प्रतीचे मास्क जप्त करण्यात आले. अशुध्द दर्जाचे सॅनिटायझर जप्त करण्यात आले. जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत 28 गुन्हे नोंदविण्यात आले. दारु आणि सिगारेट्चीही जप्ती करण्यात आली. कम्युनिटी लायझन आणि मदतीसाठी 754 विशेष पोलीस अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. पोलीस दलातील अधिका-यांकडून माहितीचे नियमित आदान-प्रदान केले गेले. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी आवश्यकतेनुसार क्षेत्रीय स्तरावर मार्गदर्शन केले. विविध विभागप्रमुखांच्या बैठका घेवून त्यांची जबाबदारी आणि आवश्यक सहकार्य याबद्दल आवाहन करण्यात आले. औद्योगिक आस्थापना, वेगवेगळ्या व्यापारी असोसिएशन, पेट्रोल डिलर्स असोसिएशन यांच्या बैठका घेवून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती, इ-कॉमर्स, होम डिलीव्हरी सर्व्हिसेस यांच्यासह विविध विभागांशी समन्वय ठेवल्याने अन्न-धान्य, दूध, भाजीपाला यांचा कुठेही तुटवडा जाणवला नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरेशा आणि नियमित पुरवठ्याबाबत धोरण आखून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली. पुरवठ्याचा ‘पुणे पॅटर्न’ इतर जिल्ह्यातही यशस्वीपणे राबविण्यात आला.
जनजागृती- ‘लॉकडाऊन’च्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये जनजागृती मोहिमेचाही मोठा वाटा आहे. पोलीस विभागाने मुद्रीत माध्यमांबरोबरच व्हॉट्सअप, बल्क एसेमेस, केबल टीव्ही यांचाही सुयोग्य वापर केला. सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक शिष्टाचार), स्टे अॅट होम (घरीच रहा), वैयक्तिक स्वच्छता या बाबत सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती केली. या विषयावरील 12 फील्म्स तयार करुन व्हायरल करण्यात आल्या. 80 स्मार्ट बाईकवरील सार्वजनिक घोषणा पध्दतीचा (पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम) योग्य वापर करण्यात आला. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे की नाही यासाठी ड्रोन कॅमे-यांची देखरेखीसाठी मदत घेण्यात आली. लॉकडाऊनच्या कालावधीत ट्वीटर द्वारे संदेश पाठविण्याबरोबरच 1 कोटी बल्क एसेमेसेस पाठवण्यात आलेत.
पोलीस विभागाच्यावतीने डिजीटल पासची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून 29 हजार 682 पासेस वितरित करण्यात आले आहेत. या कक्षाचा उपायुक्त दर्जाचा पोलीस अधिकारी प्रमुख म्हणून जबाबदारी पहात आहे. याशिवाय ‘सेवा सेल’ ही मदतीला आहे. 4 विशेष व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यावरुन नागरिकांना पासेससाठी मदत केली जाते. प्रत्येक पोलीस स्थानकांत चोवीस तास मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी त्याचे प्रमुख आहेत. उप विभागीय अधिकारी आणि उद्योग विभागाच्या अधिका-यांच्या समन्वयाने पोलीस विभागाने विविध कंपन्यांच्या अडचणी सोडवून त्यांना मदत करण्यात आली आहे. 163 स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने 3 लाख 58 हजार 42 जणांना शिधा किंवा भोजन वाटप करण्यात आले. याशिवाय 48 निवारा केंद्रातील बेघर व्यक्तींनाही मदत करण्यात येत आहे.
नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत असतांनाच पोलिसांच्या सुरक्षिततेचीही आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. सॅनिटायझर्स, हातमोजे, गॉगल, फेसशिल्ड, थर्मलगन्स, राहुट्या, छत्र्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या कुटुंबियांमध्येही माहिती पत्रके, व्हिडीओच्या माध्यमातून संवेदनशीलता निर्माण करण्यात आली. पोलीस वसाहतींना नियमित भेट देवून अडचणी समजून घेवून त्यावर उपाय योजण्यात आलेत. पोलीस कुटुंबियांना अन्नधान्य व किराणा माल उपलब्ध करुन देण्यात आला.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम्, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि विविध यंत्रणा यांच्या नियमित आढावा बैठका होतात. या यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना म्हणून पुणे जिल्ह्यातील ‘लॉकडाऊन’च्या यशस्वीतेकडे पहाता येईल.
- राजेंद्र सरग, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे
कोवीड सॅम्पल तपासणी होणार जलदगतीने
पुणे दि.21 : – सध्या वाढत जाणा-या कोरोना बाधित रुग्णांची सॅम्पल तपासणी जलदगतीने होण्यासाठी डायना फिल्टर्स या कंपनीने कोविड सॅम्पल कलेक्शन बूथ हे उपकरण विकसीत केले असून ससून हॉस्पीटलमध्ये कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या नाविण्यपूर्ण उपकरणाची विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पाहणी केली.
या उपकरणामुळे पीपीई किटसचा वापर न करताही सॅम्पल कलेक्शन करता येऊ शकेल. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सॅम्पल टेस्टींग घेता येतील. अशी माहिती या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत येमुल यांनी दिली.
यावेळी पाहणी करताना विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी यामध्ये काही सुधारणा सुचविल्या. हे उपकरण निश्चितच उपयोगी राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे उपस्थित होते.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने संकेतस्थळावर उपलब्ध केली ढाबे, ट्रक दुरुस्ती दुकानांची यादी
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2020
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), राज्ये, तेल विपणन कंपन्या अशा विविध संघटनांकडून प्राप्त झालेली देशभरातील उपलब्ध ढाबे आणि ट्रक दुरुस्ती दुकानांची यादी आणि तपशील आपल्या संकेतस्थळावर डॅशबोर्ड लिंक रुपात तयार केला आहे. Https://morth.nic.in/dhabas-truck-repair-shops-opened-during-covid-19 वर ही यादी पाहता येईल. कोविड -19महामारी प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या सध्याच्या आव्हानात्मक काळामध्ये आवश्यक वस्तू देशाच्या निरनिराळ्या ठिकाणी पोहचविताना ट्रक चालक/ मालवाहतूकदार आणि सफाई कामगारांना प्रवास करणे सुलभ व्हावे म्हणून ही सुविधा तयार करण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्ड दुव्यावर अद्ययावत केलेली माहिती पुरवण्यासाठी विविध हितसंबंधितांशी विशेषत: राज्ये / केंद्रशासित प्रदेश, तेल विपणन कंपन्या (ओएमसी) इत्यादींशी नियमित संपर्क ठेवला जातो.
ट्रक चालक आणि क्लिनरला राष्ट्रीय महामार्गालगतच्या ढाब्यांची आणि ट्रक दुरुस्ती दुकानांची माहिती मिळविण्यासाठी आणि संपर्क करण्यासाठी एनएचएआयचा मध्यवर्ती संपर्क क्रमांक 1033 उपयुक्त आहे.
हे ढाबे आणि दुरुस्तीची दुकाने, ड्रायव्हर्स, क्लीनर किंवा मालवाहतूक साखळीतील इतर कोणत्याही व्यक्तीने समाजात वावरताना शारीरिक अंतराच्या, मास्क वापरण्याच्या तसेच स्वच्छतेच्या आरोग्यविषयक नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.
तीन जिल्ह्यात गेल्या 28 दिवसात एकही नवा रुग्ण नाही, गोव्यामध्ये कोविड-19 चे सर्व रुग्ण बरे झाले
दिल्ली-मुंबई, 20 एप्रिल 2020
जी-20 राष्ट्रांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सौदी अरेबिया येथे झाली. या बैठकीत डॉ हर्षवर्धन यांनी सर्व राष्ट्रांच्या एकत्रित आणि परस्पर सामंजस्य व सहकार्य यातूनच कोविड-19 चा लढा दिला जाऊ शकेल, या मुद्यावर प्रामुख्याने भर दिला.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवर पत्रकार परिषद
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव आणि ICMR चे प्रवक्ते श्री रमन गंगाखेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.
- लॉकडाऊन काळातही खरीप हंगामासाठीच्या पेरणी- मशागतीची कामे गतीने सुरु आहेत, गेल्या वर्षीच्या तुलनेत 36% अधिक कामे झाल्याची नोंद आहे, विशेषतः धानाच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे.
- लॉकडाऊन मधून कृषीकामांना वगळण्यात आले आहे, मात्र शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे
- शेतकऱ्यांना कृषिउत्पादन कायम घेता यावे, यासाठी PM किसान योजनेअंतर्गत निधी देण्यात आला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राज्यांना डाळी देण्यात आल्या आहेत. पीएम फसल बिमा योजनेअंतर्गत विम्याच्या दाव्यांची रक्कम देण्यात आली आहे.
- कोविड-19 आपत्तीच्या काळात अन्नधान्य आणि नाशवंत मालाची वाहतूक सुलभतेने करता यावी यासाठी ऑल इंडिया अॅग्री ट्रान्सपोर्ट कॉल सेंटर आणि किसान रथ Mobile App सुरू करण्यात आले आहेत.
- फेस मास्क आणि हँड सॅनिटायझर्सना अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे. मदतकार्यासाठी स्वयंसेवी संस्थाना एफसीआयकडून थेट अन्नधान्य खरेदीची परवानगी देण्यात आली आहे.
- भारतीय अन्न महामंडळाने लॉकडाऊनच्या काळात सरासरीच्या दुप्पट अन्नधान्याचे वाटप केले आहे.
- कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मनरेगा रोजंदारीमध्ये वाढ केली आहे. सरासरी 20 रुपयांची वाढ आहे. प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रधान मंत्री जनधन योजनेच्या खातेधारकांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाते
- ज्या भागात लॉकडाऊनचे उल्लंघन होत आहे, त्या ठिकाणी राज्यांच्या मदतीने योग्य उपाययोजना केल्या जात आहेत. गृहमंत्रालयाने काल राज्यांना यासंदर्भात पत्र लिहिले असून आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे राज्यांनी काटेकोरपणे पालन करायचे आहे.- गृह मंत्रालय
- राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगण्यात आले आहे की या मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलेल्या उपाययोजनांपेक्षा जास्त कठोर निर्बंधांचा ते अवलंब करू शकतात, मात्र त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत असलेल्या मार्गदर्शक तत्वांना शिथिल करू नये
- गृहमंत्रालयाने केरळ सरकारला पत्र पाठवले असून राज्याने परवानगी दिलेल्या काही बाबी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हंटले आहे. केरळने लॉकडाऊन नियमांचे कठोर पालन करावे असेही गृहमंत्रालयाने सांगितले आहे
- कोविड-19 स्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी आणि कोविड-19 च्या फैलावाला प्रभावी पद्धतीने प्रतिबंध करण्याच्या राज्यांच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 6 आंतर- मंत्रालयीन पथके स्थापन केली आहेत.
- आतापर्यंत 2,546 जण उपचारानंतर बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 14.75% इतके आहे. देशात सध्या कोविड चे एकूण रुग्ण 17,265 इतके आहेत. गेल्या 24 तासांत 1553 नवे रुग्ण आले तर 36 जणांचा मृत्यू झाला- आरोग्य मंत्रालय
- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल कोविड-19 व्यवस्थापनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला भेट दिली. लॉकडाऊन 2.0 च्या काळात शिस्तीचे पालन केल्यास कोविड-19 च्या संघर्षामध्ये विजयाच्या रुपाने त्याचे फायदे मिळतील, असे त्यांनी सांगितले
- जी-20 देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की कोविडसाठीची लस आणि औषध विकसित करण्याच्या संशोधनात इतर सदस्य देशांसोबत काम करण्यास भारत उत्सुक आहे.
- सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
- लॉकडाऊनच्या आधी भारतात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 3.4 दिवस इतका होंता, आता त्यात सुधारणा होऊन तो 7.5 इतका झाला आहे. 19 एप्रिलच्या आकडेवारीनुसार, 18 राज्यांत हा दर सरासरी राष्ट्रीय दरापेक्षा चांगला आहे.
- ओदिशा आणि केरळमध्ये कोविड-19 रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 30 दिवसांपेक्षा जास्त झाला आहे. गोव्यामध्ये कोविड-19 चे सर्व रुग्ण बरे झाले आहेत आणि सध्या गोव्यात एकही सक्रिय रुग्ण नाही
- गेल्या 28 दिवसांत कोविड19 चा एकही रुग्ण न आलेल्या माहे आणि कुर्ग या जिल्ह्यांच्या यादीत आता उत्तराखंड च्या पौरी गढवाल जिल्ह्याचाही समावेश झाला आहे. गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण न आलेल्या जिल्ह्यांच्या यादीत आज आणखी सहा जिल्ह्यांची वाढ झाली आहे.
- आजपासून काही राज्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांचे तुम्ही पालन करावे, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. जेणेकरून कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत आणखी घट होईल आणि ग्रीन झोनमध्ये शून्य रुग्ण स्थिती कायम राहील
- रॅपिड अँटी बॉडी चाचणी ही वैयक्तिक निदानासाठी नाही, कारण, शरीरात असलेल्या अँटीबॉडीज विषाणूविरुद्ध किती प्रभावशाली ठरतील, याची आपल्याला कल्पना नाही. ही चाचणी केवळ निरीक्षणासाठी केली जाते. संसर्गजन्य आजाराबाबतच्या सर्वेक्षणात सातत्याने चुका झाल्या तरी,संसर्गाची व्याप्ती/दिशा तपासण्यावर त्याचा परिणाम होणार नाही.- ICMR
- RT-PCR टेस्टिंग किट्सचा वापर करताना ते नेहमी 20°C तापमानाखाली ठेवणे गरजेचे आहे, जर तापमान जास्त असेल तर चाचण्यांचे योग्य निष्कर्ष मिळणार नाहीत. तंत्रज्ञांनी नमुने सामान्य तापमानाच्या स्थितीत ठेवले असल्याच्या शक्यतेमुळे पश्चिम बंगालमधून तक्रारी आल्या असू शकतील
- मुंबईतल्या पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्तावर आरोग्य मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली की ही अत्यंत दुर्दैवी बातमी असून सर्वांनी आपले काम करतांना आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, मास्कचा वापर करावा , सॅनिटायझर वापरावा आणि सामाजिक अंतराचे नियम पाळावेत. नमुना चाचणीच्या निकषानुसार ज्या कोणाचीही चाचणी करण्याची गरज असेल, त्याची चाचणी केली जाईल.
इतर अपडेट्स :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिंक्डइनवर काही विचार व्यक्त केले आहेत ज्यात तरुणांना आणि व्यावसायिकांना रस असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिंक्डइनवर व्यक्त केलेल्या विचारांचा मुख्यांश इथे पाहता येईल
- गृह मंत्रालयाने आज 14 (पाच)या कलमानुसार एकत्रित सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांशी संबंधित नियम वगळण्यात आले असून ई-कॉमर्स कंपन्यांना अत्यावश्यक नसलेल्या मालाचे वितरण करता येणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र कलम13(एक) अनुसार ई-कॉमर्स कंपन्यांना याआधी दिलेल्या परवानगीनुसार जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचवण्यासाठी वितरण यापुढेही करता येणार आहे.
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), राज्ये, तेल विपणन कंपन्या अशा विविध संघटनांकडून प्राप्त झालेली देशभरातील उपलब्ध ढाबे आणि ट्रक दुरुस्ती दुकानांची यादी आणि तपशील आपल्या संकेतस्थळावर डॅशबोर्ड लिंक रुपात तयार केला आहे.
- कोविड -19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशभरातील जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतींच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.
- कोविड-19 च्या महामारीमुळे संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाउन सुरू आहे. अशा संकटकाळात भारतीय रेल्वेच्यावतीने गरजूंना दररोज ताजे, गरम भोजन पुरवले जात आहे. रेल्वेने आत्तापर्यंत 20.5 लाख लोकांना मोफत भोजन वितरित केले.
- लाईफलाईन उडाणच्या विमानांनी सुमारे 507.85 टन आवश्यक वैद्यकीय सामानाची वाहतूक करण्यासाठी सुमारे 3 लाख किलोमीटर हवाई प्रवास केला आहे. एअर इंडिया, अलायन्स एअर, आयएएफ आणि खाजगी विमान वाहतूक कंपन्यांद्वारे लाइफलाईन उडाण अंतर्गत 301 उड्डाणे केली आहेत.
- कोविड-19 मुळे देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय वित्तमंत्रालयाच्या व्ययविभागाअंतर्गत असलेल्या महालेखा नियंत्रक कार्यालयाने सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन व्यवस्थेचा वापर करत, थेट लाभ हस्तांतरण योजनेमार्फत 16.01 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात 36,659 कोटी रुपये जमा केले आहेत.
- नॅशनल अॅल्युमिनीयम कंपनी (नाल्को) आणि महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (एमसीएल) या कोल इंडियाच्या उपकंपन्यांनी ओदिशामधील कोविड-19 रुग्णालयांना आवश्यक असलेला संपूर्ण निधी पुरविण्याचे ठरविले आहे.
- जैवतंत्रज्ञान विभाग(DBT) आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदेने(BIRAC) कोविड-19 वर परस्पर सहकार्याने संशोधन करण्यासाठी अर्ज मागवले होते. या प्रक्रियेचा पहिला टप्पा 30 मार्च 2020 रोजी समाप्त झाला आणि यासाठी विविध उद्योग आणि शैक्षणिक संस्थांकडून सुमारे 500 अर्ज प्राप्त झाले.
- केंद्र सरकारने https://covidwarriors.gov.in वर आयुष डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्यसेवा व्यवसायिक, एनवायकेएस. एनसीसी, एनएसएस आणि पीएमजीकेव्हीवायचे स्वयंसेवक, माजी सैनिक इत्यादींसह डॉक्टरांच्या महत्वपूर्ण माहितीचा ऑनलाईन डेटा पूल उपलब्ध केला आहे जेणेकरून राज्य, जिल्हा किंवा नगरपालिका स्तरावर या माहितीचा स्थानिक पातळीवरील प्रशासनामध्ये उपयोग होईल.
- सध्याच्या काळातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, कृषी क्षेत्र हा आशेचा किरण असून अन्नसुरक्षेचे आश्वासन देखील ती प्रदान करीत आहे. असंख्य अडचणींचा सामना करीत संपूर्ण भारतभर कितीतरी शेतकरी आणि शेतमजूर शेतीकामात घाम गाळत आहेत, कष्ट करीत आहेत. त्यांच्या मूक प्रयत्नांना जोड मिळाली ती केंद्र आणि राज्य सरकारच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपाची. त्यामुळेच रब्बी पिकांची कापणी आणि उन्हाळी पिकांची पेरणी कमीतकमी किंवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरु आहे.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत देशातील कोविड-19 च्या आजाराला नियंत्रणात आणण्याबाबतच्या उपाययोजना आणि लॉकडाऊनच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली. 20 एप्रिल 2020 पासून लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणण्याबाबत सर्व राज्यांशी चर्चा करावी असे निर्देश गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
- कोविड-19 मुळे सुरू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये भारतीय रेल्वे अविरतपणे वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक मालाची वाहतूक प्राधान्यक्रमाने करत आहे. भारतीय रेल्वे औषधे, मास्क्स, रुग्णालयासाठी आवश्यक गोष्टी तसेच इतर वैद्यकीयदृष्ट्या उपयुक्त बाबींचा पुरवठा वेळापत्रकानुसार धावणाऱ्या पार्सल विशेष रेल्वेगाड्यांमार्फत सातत्याने करत आहे. भारतीय रेल्वेने 18.04.2020 पर्यंत देशाच्या विविध भागात 1150 टन वैद्यकीय मालाची वाहतूक केली.
- कोविड-19 प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत पंतप्रधान मदत निधीत देणगी म्हणून केंद्रीय विद्यालय संघटनेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 10,40,60,536 रुपये जमा केले आहेत. यात कोणी एक दिवसाच्या वेतनाइतकी रक्कम तर कोणी 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा केली आहे.
कोरोनाविषयी जागरूक राहा,पण भीती बाळगू नका,असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करा.
कोरोनाच्या अनुषंगाने केन्द्रीय चमूने जाणून घेतली पुणे विभागाची माहिती
पुणे,दि.२०- वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केन्द्रीय स्तरावरील टिम आज पुण्यात आली. या टिमने कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूचे प्रमाण या अनुषंगाने माहिती जाणून घेतली.
या चमूतील केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिव संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सह सल्लागार डॉ. पवनकुमार सिंग,अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक करमवीर सिंग,आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे उपसचिव डॉ. आशीष गवई,आरोग्य सेवेचे अतिरिक्त महासंचालक पी.के.सेन हे उपस्थित होते.
बाधित रुग्णांच्याबाबतीत मुंबई नंतर पुण्याचा क्रमांक लागतो. या मागील वस्तुस्थिती केंद्रीय चमूने जाणून घेतली.
प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. विभागात पुणे शहरात प्रमाण अधिक आहे.एक तर येथील लोकसंख्या आणि झोपडपट्टीचे कारण असले तरी ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये ५५ ते ७० वयोगटातील संख्या अधिक आहे. शिवाय बहुतांशी लोकांना उच्च रक्तदाब,मधुमेह या सारखे आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असले तरी प्रशासनाने अगदी सुरूवातीपासूनच खबरदारी व दक्षता घेतली आहे. जिल्हा ,मनपा,आरोग्य व पोलिस प्रशासन हे संयुक्तपणे हातात हात घालून काम करीत आहे,असे ते म्हणाले.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता शहरातील सर्व रुग्णालये सक्षम केली आहेत. विविध पथके निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. कांही दिवसांत परिस्थिती निश्चित नियंत्रणात येईल,असा विश्वास डॉ. म्हैसेकर यांनी माहिती देताना व्यक्त केला.
पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम् यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आणि लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी पोलिस करीत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. तसेच लोकांमध्ये जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपपक्रमांबद्दलही सांगितले. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आमच्या भागात उद्योग व आय.टी.कंपन्या मोठ्या प्रमाणात आहे. तथापि,कायदा व सुव्यवस्था सुरळीत असल्याचे सांगितले.
पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड व अपर आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शहरातील आरोग्य विषयक परिस्थितीची माहिती देताना शहरातील रुग्णालय सक्षम केले असून कांही रुग्णालयांबरोबर करार करण्यात आला आहे. भविष्यात कोरोनाच्या अनुषंगाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर आपली तयारी असावी,अशा पध्दतीने नियोजन केले आहे.परिस्थिती आव्हानात्मक असली तरी आपण त्याला निश्चितपणे तोंड देऊ,असे स्पष्ट करुन मनपातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आम्ही सुरूवातीपासूनच दक्षता घेतलेली आहे. आमच्या भागात बाधितरुग्ण व मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी आम्ही गाफील नाही. सातत्याने उपाययोजना व जनजागृती करीत आहोत. शिवाय खाजगी रुग्णालयांबरोबरही समन्वय साधून त्यांच्याशी करार केलेला आहे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ससून रुग्णालय अंतर्गात अकरा मजली इमारतीत नव्याने कोविड रुग्णालय विक्रमी वेळेत सुरू केले. आरोग्याबरोबरच अडकून असलेल्या मजूर व कामगारांची निवास व भोजनाची व्यवस्था प्रशासन व विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. येत्या कांही दिवसांत कोरोनाला अटकाव करण्यात यश मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण भागाची माहिती दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही केल्या जाणा-या उपाययोजनांची माहिती दिली.
शेवटी केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिव संजय मल्होत्रा म्हणाले, सर्व विभाग समन्वयाने काम करीत आहे, ही समाधानाची बाब असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच अन्न–धान्याचे वितरण व्यवस्थित करावे आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा, असे सांगितले.
राज्यात ४६६ नवीन रुग्णांचे निदान – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. २०: आज राज्यात कोरोनाबाधीत ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४६६६ झाली आहे. ६५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ०९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४६६६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील २३३६ रुग्णांचे विश्लेषण केले असता त्यापैकी १८९० (८१ टक्के) रुग्ण हे लक्षणविरहित आहेत तर ३९३ रुग्णांना (१७ टक्के) रुग्णांना लक्षणे होती. या रुग्णांपैकी ५३ रुग्ण (२ टक्के) हे अतिदक्षता विभागात भरती आहेत.
सध्या राज्यात ९३ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,८७९. लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील मुंबई येथील ७ आणि मालेगाव येथील २ रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ६ पुरुष तर ३ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर १ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या २ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित ७ जणांपैकी ५ रुग्णांमध्ये (७१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३२ झाली आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ३०३२ (१३९)
ठाणे: २० (२)
ठाणे मनपा: १३४ (२)
नवी मुंबई मनपा: ८३ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: ८४ (२)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: ३
मीरा भाईंदर मनपा: ७८ (२)
पालघर: १७ (१)
वसई विरार मनपा: १०७ (३)
रायगड: १५
पनवेल मनपा: ३३ (१)
ठाणे मंडळ एकूण: ३६०७ (१५५)
नाशिक: ४
नाशिक मनपा: ६
मालेगाव मनपा: ८५ (८)
अहमदनगर: २१ (२)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: १ (१)
धुळे मनपा: ०
जळगाव: १
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: १
नाशिक मंडळ एकूण: १२९ (१२)
पुणे: १८ (१)
पुणे मनपा: ५९४ (४९)
पिंपरी चिंचवड मनपा: ५१ (१)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: २१ (२)
सातारा: १३ (२)
पुणे मंडळ एकूण: ६९७ (५५)
कोल्हापूर: ५
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ७ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४३ (१)
औरंगाबाद:१
औरंगाबाद मनपा: २९ (३)
जालना: १
हिंगोली: १
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ३३ (३)
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ०
लातूर मंडळ एकूण: १२
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ९
अमरावती: ०
अमरावती मनपा: ६ (१)
यवतमाळ: १५
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ४९ (३)
नागपूर: ३
नागपूर मनपा: ६७ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ७३ (१)
इतर राज्ये: १३ (२)
एकूण: ४६६६ (२३२)
(या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा, मनपांनी उपलब्धकरून दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३६८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६३५९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २३.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
महाराष्ट्रात ७५ हजार रॅपीड टेस्ट करणार
कोरोना उपचार करणाऱ्या रग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई, दि. २० : महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहे. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपीड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात ७५ हजार चाचण्या केल्या जातील. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर राज्याच्या कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता
ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती त्यांनी दिली.
आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे असे:
- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय कारण राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. त्यासाठी आयसीएमआरच्या सूचना कटाक्षाने पाळल्या जात आहे. त्याचबरोबर घरोघर जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण देखील केले जात आहे. त्यासाठी ६३५९ पथके कार्यरत आहेत. कुठलीही तडजोड न करता सर्वेक्षण केले जात आहे.
- राज्याचा कोरोना रुग्ण दुप्पटीचा वेग हा मंदावत असून सुरूवातीला दोन दिवसांवर असणारा हा दर आता सुमारे ७ दिवसांवर गेला आहे. हा दर २० ते २५ दिवसांवर यावा तेव्हाच काहीशी समाधानाची बाब मानता येईल.
- कोरोना उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिजन मास्क आणि त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यकता वाटल्यास त्याचा वापर केला जाईल. मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ नये म्हणून त्याच्या उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- हायड्रोक्लोरोक्विनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते म्हणून मुंबईत काही भागात ह्या गोळ्या वाटपासाठी मान्यता देण्यात आली आहे. मात्र ज्यांना हृदयविकार आहे किंवा ६० वर्षांवरील आणि १५ वर्षाखालील व्यक्तींना त्या दिल्या जाणार नाहीत
- काही छोट्या चाचण्या देखील करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये एक्स रे चाचणी तसेच एसपीओटू पल्सऑक्सिमीटर चाचणी करण्यावर भर दिला जाणार आहे.
- ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रोड झोन तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि २८ दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
कोरोनाबाधित पत्रकारांना भाजपच्या वतीने सर्वतोपरी मदत करु-आ. चंद्रकांतदादा पाटील
पुणे-मुंबईतील काही पत्रकारांना कोरोनाची लागण झाली, हे अतिशय धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वतोपरी मदत करु, असे आश्र्वासन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. तसेच, राज्यातील विशेष करुन मुंबईतील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमांच्या पत्रकारांना घरातून काम करण्यासाठी संबंधित वृत्तवाहिन्यांच्या मालकांनी व संपादकांनी परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकारने सूचना द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे. त्यातही लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना ही कोरोना संक्रमण होणं, हे अतिशय धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्ष पत्रकारांच्या पाठिशी उभे असून, कोरोना संक्रमित पत्रकारांना पक्षाच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत करु, असे त्यांनी आश्र्वासन दिले.
ते पुढे म्हणाले की, “इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचा वार्ताहर, छायाचित्रकार हे थेट कोरोनाबधितांशी थेट भिडत असतात. त्यामुळे मुंबईत कोरोना संक्रमणामुळे जे पत्रकार रुग्णालयात दाखल झाले आहेत. अशा पत्रकारांना त्यांच्या मालकांनी त्यांचा पुढील तीन महिन्यांचा पगार द्यावा, यासाठी सरकारने त्यांना सूचित करावे. इलेक्ट्रॉनिक व प्रिंट माध्यमांच्या मालकांनी पगार देण्यासाठी असमर्थता दर्शविल्यास भाजपा यासाठी पुढाकार घेईल.तसेच राज्यातील विशेष करुन मुंबईतील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पत्रकारांना वर्क फ्रॉम होमसाठी संबंधित दैनिक व वृत्तवाहिन्यांच्या मालकांना व संपादकांना राज्य सरकारने सूचना द्याव्यात” अशी मागणी ही श्री. पाटील यांनी केली.
पुणे विभागात कोरोना बाधित 809 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे दि.20 :- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 809 झाली असून विभागात 107 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 647 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 23 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 809 बाधित रुग्ण असून 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 734 बाधीत रुग्ण असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 25 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 9 बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 9 हजार 534 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 9 हजार 10 चा अहवाल प्राप्त आहे. 523 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 8 हजार 154 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 809 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 42 लाख 37 हजार 758 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत 1 कोटी 60 लाख 82 हजार 664 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 882 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
लॉकडाऊन कालावधीत ५७ हजार गुन्हे दाखल ;१२ हजार व्यक्तींना अटक तर ४० हजार वाहने जप्त
मुंबई, दि.20 : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.22 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 57,517 गुन्हे दाखल झाले आहेत तर 12,123 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 40,414 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 73,344 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा 572 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1051 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.
तसेच विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 20 लाख (2 कोटी 20 लाख) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
11 अधिकारी व 38 कर्मचाऱ्यांना पोलिसांना बाधा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने 11 पोलीस अधिकारी व 38 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 117 घटनांची नोंद झाली असून यात 411 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ससून,नायडू व अन्य रुग्णालयांना स्वॅब तपासणी साठीचे सुरक्षित बूथ ( Kiosk ) भेट….रावेतकर ग्रूपचा उपक्रम
पुणे-सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून अनेक नागरिक,स्वयंसेवी संस्था विविध माध्यमातून मदत करत असून अश्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना शी सामना सुरु आहे असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.रावेतकर ग्रूप तर्फे आज नायडू, ससून व कोरोना ची तपासणी करणाऱ्या रुग्णालयांना स्वॅब टेस्टींग बूथ प्रदान करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी रावेतकर ग्रूपचे संचालक अमोल रावेतकर,क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर व मनपा चे उप आरोग्य प्रमुख डॉ वावरे उपस्थित होते.
सध्याच्या परिस्थितीत आपले डॉक्टर्स नर्सेस व तंत्रज्ञ अतिशय उत्तम काम करत असून त्यांना आवश्यक असलेले साहित्य पुरविणे व त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य असून मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत ही कौतुकास्पद आणि पुणे शहराच्या लौकिकाला साजेशी बाब आहे असेही महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
कोरोना बाधित रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर नर्स वा तंत्रज्ञ यांचा रुग्णाशी खूप जवळून संपर्क येतो आणि त्यातून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.यासाठी केरळ मधे सर्वप्रथम स्वॅब टेस्टींग बूथ ( Kiosk ) ची कल्पना सोशल मीडिया वर बघितली आणि मग आपल्या पुण्यात ही हे प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले असे अमोल रावेतकर म्हणाले.
त्यानुसारच असे बूथ बनवून घेतले व आज ससून नायडू व अन्य रुग्णालयात हे प्रदान करताना मी माझे कर्तव्य केल्याची भावना आहे असेही त्यांनी सांगितले.या बूथ मुळे तपासणी करणाऱ्या तंत्रज्ञ आणि रुग्णामधे सुरक्षित अंतर राहील व त्यामुळे रुग्णाच्या शिंकण्याचा किंवा खोकण्याचा थेट परिणाम होणार नाही यासाठी हे महत्त्वाचे असल्याचे ही रावेतकर म्हणाले.
क्रिएटिव्ह फौंडेशन दानशूर व सामाजिक बांधीलकी मानणाऱ्या व्यक्ती/ संस्था आणि प्रशासन यांच्या मधे दुआ म्हणून काम करत असून निधीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. सद्यस्थितीत अनेक नवनवीन कल्पना पुढे येत असून त्या राबवू पाहणाऱ्यांच्या हेतूबद्दल शंका नाही – पण अश्या अनेक कल्पना निरुपयोगी आणि नागरिकांसाठी घातक ठरण्याची शक्यता असल्याने अतिशय विचारपूर्वक प्रशासनाला सहकार्य करुन ही लढाई आपल्याला जिंकायची आहे असे ही खर्डेकर म्हणाले.मनपा ने निर्धारित केलेल्या सर्व केंद्रात हे Kiosk (खोपटे ,बूथ ,केबिन ) बसविण्यात येत आहेत व याद्वारे पी पी ई किट चा खर्च वाचेलच पण त्यासह जादा संशयित रुग्णांची तपासणी होवू शकेल असेही खर्डेकर म्हणाले.
