Home Blog Page 2612

कोरोनामुक्तीसाठी मालेगाव शासनाच्या केंद्रस्थानी

0

पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला संयुक्तपणे आढावा

नाशिक, दि. 29  : नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोना मुक्तीसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने व समन्वयाने काम करीत असून संपूर्ण राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ मालेगांव हे कोरोनाच्या दृष्टीने अतिजोखीमेचे ठिकाण आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे राज्य शासनाच्या दृष्टीने कोरोनामुक्तीसाठी सर्वोच्च केंद्रस्थानी असून मालेगावसाठी कुठलीही तडजोड करू नये, अशा सूचना आज संयुक्तपणे पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य व प्रशासकीय उपाययोजना यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना संयुक्तपणे मार्गदर्शन करतांना पालकमंत्री श्री.भुजबळ, गृहमंत्री श्री.देशमुख, आरोग्यमंत्री श्री.टोपे व कृषीमंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, उपसंचालक आरोग्य डॉ.पठाणशेट्टी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे व विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मोठ्या लढ्याची तयारी ठेवावी : पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनाच्याबाबतीत नाशिक जिल्हा अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. कोरोनाच्या निमित्ताने भविष्यात सामाजिक धार्मिक, राजकीय आणि प्रशासकीय अशा विविध प्रकारच्या समस्या समोर येणार आहेत. या सर्वांसह लोकांचे सार्वजनिक आरोग्य राखण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे, त्यासाठी सर्वांना मोठ्या लढ्याची तयारी ठेवावी लागेल, खूप कष्ट घ्यावे लागतील, असे यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

श्री.भुजबळ म्हणाले, मालेगावमध्ये जी परिस्थती निर्माण झाली त्याबाबतीत सुरूवातीपासूनच उपायोजना थोड्या प्रमाणत सुरू होत्या. सर्वेक्षणाला एनआरसी, एनपीआरची जोड देण्यात आल्याने याबाबतीत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमजाचे वातावरण होते. स्थानिक लोकप्रतिनिधी, धर्मगुरू यांनी या प्रकरणात प्रशासनाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याने आज प्रशासकीय पातळीवर मालेगावमध्ये उपायोजनांना यश मिळतांना दिसत आहे. सुरवातीच्या काळात कोरोनामुक्त असलेल्या नाशिक जिल्ह्याने मालेगावच्या रूपात कोरोनाचा उद्रेक अनुभवला. मालेगावच्या बाहेर तालुक्याच्या काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येते, याचे प्रमुख कारण मालेगाव शहरातील काही लोकांनी आसपासच्या गावांमध्ये केलेला संचार आहे. मालेगावमधून बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार नाही व मालेगाव शहरातून कुणीही आसपासच्या गावांमध्ये जाणार नाही याची खरबरदारी  घ्यावी.

मुंबईहून नाशिककडे येणाऱ्यांची मोठी रांग मुंबई-नाशिक रस्त्यावर दिसून येते. अनेक कुटुंबासोबत लहान मुलेही दिसून येतात. त्यांच्याशी मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने व्यवहार करावा, ज्यांच्याकडे बाहेर जाण्याची परवानगी आहे, त्यांना अडवू नका. अडचणी खूप आहेत. तरीही मतभेद होणार नाहीत याची काळजी सर्व यंत्रणांच्या प्रमुखांनी घ्यावी.

गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत व्यस्त दिनक्रमातून व अडचणीच्या काळात नाशिक जिल्ह्याला भेट देवून सर्व अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवले, त्याबद्दल त्यांचे आभारही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी मानले.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मा होणार नाही याची खबरदारी घ्यावी : गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यात सद्य:स्थितीत स्थलांतरीत मजुरांची समस्या गंभीर असून नाशिक जिल्ह्यातही 1 हजार 900 स्थलांतरीत मजूर आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री केंद्र सरकारच्या संपर्कात असून राज्यातील सर्व स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकार व त्या त्या राज्याकडे प्रयत्नशील आहोत. 3 मे रोजी लॉकडाऊन सुटण्याच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणवर राज्यातील जनता असून 3 मे रोजी ही स्थिती कायम राहिल्यास कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी पोलीस यंत्रणेने घ्यावी, अशा सूचना यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत.

मंत्री श्री.देशमुख म्हणाले, मालेगावातील मुस्लिम वस्त्यांमधील गर्दी सोशल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असा विषय असून ज्या ठिकाणी  मोठ्या प्रमाणावर लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, त्याठिकाणी सर्व सोयी सुविधांवर लक्ष केंद्रित करावे. गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर साधन सामुग्री व पोलिसबळ मालेगावसाठी देण्यात आले आहे व मागणी केल्यास भविष्यातही वाढवून दिले जाईल. मालेगावातील घराघरात सर्वे करण्यावर भर देण्यात यावा. प्रतिनियुक्तीने जे हजर होणार नाहीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाइनशिवाय पर्याय नाही. तसेच भाजीपाल्याच्या गाड्यांच्या माध्यमातून परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना यावेळी गृहमंत्री श्री.देशमुख यांनी दिल्या.

सर्वेक्षणातच कोरोना नियंत्रणाचे यश : आरोग्य मंत्री राजेश टोपे

कोरोना साथ रोगाच्या निमित्ताने होणऱ्या सर्वेक्षणात आरोग्य यंत्रणांची पथके घरोघरी जात आहेत. परंतू लोक घरातील लोकांची खरी संख्या सांगत नाही. सर्वेक्षण करणारे त्यांना ओळखतही नाही, अशा परिस्थितीत मतदार यादी व पल्स पोलिओ अभियानाच्या याद्यांचा संदर्भ घेवून सर्वेक्षण केल्यास मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षणाला यश मिळेल. सर्वेक्षण हाच कोरोना नियंत्रणाचा पहिला टप्पा असून त्यात मिळालेले यश हे महत्त्वाचे असेल, त्यात अपयश आल्यास कोरोना नियंत्रणाची दिशाच चुकू शकते. त्यामुळे अचूक सर्वेक्षणावर भर देण्यात यावा, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

ते म्हणाले, 10 ते 15 दिवस प्रलंबित असलेल्या नमुन्यांचे अहवाल हे निगेटिव्ह येवू शकतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जास्त काळ अहवाल प्रलंबित असलेल्या संशयित रूग्णांचे नव्याने स्वॅब घेण्यात यावेत. नमुन्यांचे अहवाल मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. एनआयबीच्या संचालक व लॅब इनचार्ज यांच्याशी समन्वय साधून किती दिवसांचा जुना अहवाल हा ग्राह्य धरावा याबाबत मार्गदर्शन घेण्यात यावे. एकूण रूग्णांच्या 5 टक्के लोकांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागेल, असे गृहीत धरून तयारी  ठेवावी.

खाजगी हॉस्पीटल्स व क्लिनीक यांची सक्रियता वाढविण्यात यावी. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे, वेळेवर निदान झाल्यास तात्काळ उपचार सुरू करता येतात. सर्वेक्षणामध्ये एक्सरे डायाग्नोसि‍स केल्यास त्याचे परिणाम चांगले दिसून येतील. पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व पोर्टेबल एक्सरेची सुविधा डिजिटल माध्यमातून केल्यास कार्डियोलॉजिस्टच्या माध्यमातून त्याचे तात्काळ निदान करता येवू शकते. स्वतंत्र तापाची तपासणी करणारे क्लिनिक सुरू करण्यात यावेत. प्रसंगी खाजगी डॉक्टर्स व हॉस्पीटलसच्या सेवा अधिग्रहीत करण्यात याव्यात. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता लक्षात घेवून आरोग्य उपसंचालकांमार्फत मालेगाव येथे प्रतिनियुक्तीने वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच भरती करण्याचे उपसंचालक यांचे अधिकार स्थानिक पातळीवरच आहेत, ते तसेच कायम ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार तात्काळ भरती प्रक्रिया राबविण्यात यावी.

गंभीर रूग्णांसाठी नाशिक व मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्यात यावी. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्यात आपण यशस्वी होवू. 60 वर्षे वयाच्या मधुमेह व तत्सम आजारांच्या रुग्णांचेही सर्वेक्षण करण्यात यावेत. एका संसर्गित रूग्णासोबत 10 संशयित क्वारंटाइन करण्याची तयारी ठेवावी. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची स्वतंत्र टिम तयार करण्यात यावी, असेही यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मालेगाव येथील खाजगी रुग्णालयांचा सहभाग महत्त्वाचा : कृषीमंत्री दादाजी भुसे

मालेगाव शहरातील 90 टक्के खाजगी रूग्णालये आज बंद असून त्यामुळे सर्व सामान्य रुग्णांचे व कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेवू इच्छिणाऱ्या रूग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे मालेगाव शहरातील खाजगी रूग्णालये व दवाखाने तात्काळ सुरू करण्यात यावीत. मालेगावच्या पश्चिम भागात वैद्यकीय सुविधा चांगल्या असून प्रादुर्भाव मात्र कमी आहे. ज्याठिकाणी प्रादुर्भाव जास्त आहे त्याठिकाणी वैद्यकीय सुविधा कमी आहेत. त्यामुळे त्याठिकाणच्या वैद्यकीय साधन सामुग्रीच्या बळकटीकरणावर भर देण्यात यावा, असे यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

ते म्हणाले, कोरोनाच्या सर्वेक्षण करणाऱ्या टिमला मनोधैर्याबरोबरच सर्वेक्षणासाठी लागणारी साधन सामुग्री देण्याचीही गरज आहे. सध्या पोलीस यंत्रणेने दिलेल्या साधन सामुग्रीवर मालेगाव मधील आरोग्य पथके सर्वेक्षण करतांना दिसून येत आहेत, असेही यावेळी कृषी मंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.

याबैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.

इरफान खान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

0

मुंबई, दि. २९ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.इरफान खान यांचे निधन धक्कादायक आहे. इरफान खान हे सामाजिक जाण असणारे प्रतिभावंत कलाकार होते. आपल्या सशक्त अष्टपैलू अभिनयामुळे त्यांनी अनेक चित्रपट तसेच मालिकांमधील भूमिका संस्मरणीय केल्या. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना देवो, ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

लॉक डाऊनमुळे स्थलांतरीत मजुरांसह अडकून पडलेल्या अन्य व्यक्तींची आंतरराज्य ने-आण केली सुकर

0

नवी दिल्ली, 29 एप्रिल 2020

 

कोविड-19 महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशात वेगवेगळ्या  ठिकाणी स्थलांतरीत मजूर, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्ती अडकल्या आहेत.या व्यक्तींची रस्ता मार्गे ने-आण करण्यासाठी केंद्र सरकारने आता परवानगी दिली आहे.एका राज्यातून किंवा केंद्रशासित प्रदेशातून दुसऱ्या राज्यात किंवा केंद्र शासित प्रदेशात या व्यक्तींना हलवता येणार आहे मात्र त्यासाठी संबंधित राज्यांनी परस्परांशी चर्चा करून परस्परांची सहमती घेणे आवश्यक आहे.

नियोजित स्थानी पोहोचल्यानंतर अशा व्यक्तींसंदर्भात  स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून मूल्यमापन करून या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणाची आवश्यकता नाही, असे मूल्य मापनात आढळल्यानंतर  त्यांना गृह विलगीकरणात ठेवावे, यावर भर देण्यात आला आहे. वेळो वेळी आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात यावी.

यासाठी अशा व्यक्तींनी आरोग्य सेतू ऐपचा उपयोग करावा यासाठी राज्ये आणि केंद्र शासित प्र्देशानी त्यांना प्रोत्साहन  द्यावे,याद्वारे या व्यक्तींच्या आरोग्यावर देखरेख ठेवता येईल.

‘हरहुन्नरी’ अभिनेता गमावला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

0

मुंबई, दि २९ : एक कलाकार म्हणून प्रत्येक सिनेमात अभिनयाचा दर्जा वाढविणाऱ्या इरफान खान यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने ‘हरहुन्नरी’ अभिनेता गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.अमित देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, इरफान खान यांच्या डोळ्यातील चमक, सहज अभिनय, पडद्यावरचा सुंदर वावर यामुळेच त्यांनी प्रत्येक सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली. टि.व्ही पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या इरफान यांनी दरवेळी वेगवेगळे सिनेमे निवडले. जागतिक सिनेमातही  इरफान यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन आणि प्रबोधन एकाचवेळी केले. त्यांच्या दर्जेदार अभिनयाकरिता भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरविले होते. इरफान यांनी दोन वर्षे कर्करोगाशी झुंज दिली, परंतू ही झुंज अयशस्वी ठरली. इरफान यांच्या निधनाने सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

(संध्या 4.00 वाजेपर्यत)पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1538

0

पुणे विभागातील 264 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि.29:- पुणे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 702 असली तरी आतापर्यंत 264 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
अधिक माहिती देतांना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1538 झाली आहे. 230 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1223 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकूण 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 79 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
पुणे विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 702 असली तरी आतापर्यंत 264 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1344 आहे. कोरोनाबाधीत एकुण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 80 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. आजपर्यत विभागामध्ये एकूण 17747 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 16908 चा अहवाल प्राप्त आहे. 839 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 15151 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1702 चा अहवाल पॉजिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 59,91,999 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2,29,48,395 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1375 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (संध्या. 4.00 वाजेपर्यंत अद्यावयत )

ज्येष्ठ पत्रकार आनंद राणा यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया चे सदस्य म्हणून नियुक्ती

0

एनयुजे महाराष्ट्र च्या वतीने अभिनंदन

नवी दिल्ली. 28एप्रिल 2020
ज्येष्ठ पत्रकार श्री. आनंद राणा यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) चे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री राणा यांच्या नियुक्तीसंदर्भातील प्रक्रिया गेल्या २ February फेब्रुवारी रोजी पीसीआय अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश श्री. चंद्रमौली कुमार प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील माहिती इमारतीत पूर्ण झाली. श्री. राणा यांच्या नियुक्तीची अधिसूचना केंद्र शासनाने राजपत्रात केली आहे.
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स इंडिया (एनयूजीआय) चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले आनंद राणा हे गेल्या अनेक वर्षांपासून हरिभूमीच्या दिल्ली आवृत्तीची जबाबदारी सांभाळली होते. दिल्ली जर्नालिस्ट असोसिएशनचे (डीजेए) माजी सरचिटणीस आनंद राणा पत्रकारांशी संबंधित मुद्द्यांवरून संघर्ष करीत आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही एक घटनात्मक स्वायत्त संस्था आहे जी प्रामुख्याने प्रेस स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्याच्या जबाबदा-या सुनिश्चित करण्याचे कर्तव्य बजावते. स्पीकर हे पीसीआयचे प्रमुख असतात, जे राज्यसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष आणि सदस्यांमधून निवडलेले सभासद नियुक्त करतात. पीसीआयच्या सदस्यांमध्ये लोकसभेचे तीन सदस्य, राज्यसभेचे दोन सदस्य आणि भारतीय परिषदेचे प्रत्येकी एक सदस्य, विद्यापीठ अनुदान आयोग आणि साहित्य अकादमी तसेच पत्रकार बंधू प्रतिनिधींचा समावेश आहे.
राणा यांच्या नियुक्तीबद्दल नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट (एनयूजे) आणि संबंधित राज्य संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे.
एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी राणा यांचे अभिनंदन करुन, आणखी प्रखरपणे पत्रकार हितासाठी काम करणारे प्रतिनिधित्व राणाजींच्या रुपाने लाभले असल्याचे सांगितले . इंडियन जर्नालिस्ट्स युनियन, प्रेस असोसिएशन, वर्किंग न्यूज कॅमेरामॅनस असोसिएशनने श्री राणा यांचे पीसीआय सदस्य झाल्याबद्दल अभिनंदन केले. एनयूजेचे अध्यक्ष श्री रास बिहारी, सरचिटणीस श्री प्रसन्ना मोहंती, भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. के. श्रीनिवास रेड्डी, सरचिटणीस श्री बलविंदरसिंग जम्मू, पी.आय.बी. मान्यताप्राप्त पत्रकार संघटनेचे अध्यक्ष – जयशंकर गुप्ता, प्रेस असोसिएशनचे सरचिटणीस श्री. के. नायक आणि वर्किंग न्यूज कॅमेरामेन्स असोसिएशनचे अध्यक्ष. एन. सिन्हा, सरचिटणीस श्री संदीप शंकर यांनी श्री. आनंद राणा यांच्या नियुक्तीनंतर सांगितले की यामुळे पत्रकारांच्या हिताचा आवाज आणखी वाढू शकेल. दिल्ली पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री राकेश थापलियाल आणि सरचिटणीस श्री केपी मलिक यांनी एनयूजे, आयजेयू, प्रेस प्रेस असोसिएशन आणि वर्किंग न्यूजकॅममेन असोसिएशनच्या सर्व पदाधिका-यांचे आभार मानले आहेत, जेव्हा श्री आनंद राणा यांना पीसीआय सदस्य म्हणून नियुक्त केले गेले होते.
एनयूजे आयचे मावळते अध्यक्ष, श्री. प्रज्ञानंद चौधरी (आनंद बाजार पत्रिका), माजी उपाध्यक्ष श्री. शिवकुमार, माजी कोषाध्यक्ष सीमा किरण, डीजेएचे माजी उपाध्यक्ष अशोक किंकर, उत्तर प्रदेश पत्रकार संघाचे अध्यक्ष रतन दीक्षित आणि सरचिटणीस अशोक अग्निहोत्री (ताऊ) ), जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ राजस्थान (जार) चे अध्यक्ष राकेश शर्मा आणि सरचिटणीस राकेश सैनी, ओडिशा युनियन ऑफ जर्नलिज टीयूएसचे सरचिटणीस अक्षय साहू, जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ आंध्र प्रदेशचे अध्यक्ष पुन्नम राजू, सरचिटणीस युगंधर रेड्डी, झारखंड युनियन ऑफ जर्नालिस्टचे अध्यक्ष रजत गुप्ता आणि सरचिटणीस शिव अग्रवाल, उत्तराखंड एनयूजेचे अध्यक्ष ब्रह्मदत्त शर्मा आणि सरचिटणीस आरसी कन्नौजिया, पश्चिम बंगाल जर्नलिस्ट्स युनियनच्या अध्यक्ष, प्रोबीर चँटर्जी आणि सरचिटणीस कल्याण पंडित, आसाम जर्नालिस्ट असोसिएशनचे सरचिटणीस डलीम फुकण, कर्नाटक एनयूजेचे अध्यक्ष प्रकाश सत्तार महाजन, जम्मू-काश्मीर जर्नलिस्ट ऑफ जर्नालिस्टचे अध्यक्ष सय्यद जुनैद, छत्तीसगड एनयूजेचे अध्यक्ष मनोज व्यास, सरचिटणीस प्रभुल ठाकुर, मध्य प्रदेशचे पत्रकार संघ खिलवान चंद्रकर, त्रिपुरा युनियन आँफ वर्किंग जर्नालिस्ट्सचे सरचिटणीस प्रसन्ना चक्रवर्ती, हिमाचल प्रदेश राज्य अध्यक्ष रणेश राणा ,महासचिव किशोर ठाकूर, तामिळनाडू एनयुजे अध्यक्ष एस मुरुनंदम,महासचिव एम कृष्णावेनी आणि केरळ एनयुजे अध्यक्ष टि एस शालिनी ,
आणि एनयुजे आय केंद्रीय कार्यालय सचिव मनमोहन लोहानीननी श्री राणा नियुक्ती यांचे नियुक्तीचे स्वागत केले आहे.

संकट समयी अग्रेसर पुण्याचीही कोणी घेईल दखल ? (व्हिडीओ)

0

पुणे– नावे ठेवणे ,चुका काढणे मोठे सोपे काम असते ,पुणेकारांच्या पाठीवर असलेल्या दोषांचे ओझे पाहताना संकट समयी अग्रेसर राहिलेल्या पुण्यातील तरुणाई ची दखल घेणे हि महत्वाचे मानले पाहिजे .सेवा परमोधर्म मानून सेवेला वाहून घेणाऱ्या तरुणाई ची कमतरता नसलेल्या पुण्यात कोरोनाच्या संकटाचा मुकाबला शासकीय ,राजकीय पातळीवरून होत असताना प्रत्येकजण आपापल्या परीने खारीचा वाट उचलतो आहे. पुण्यातील वंदेमातरम संघटना संकट समयी अग्रेसर राहण्यात माहीर आहे. मोठ्या हिरारीने सेवेसाठी पुढे येणाऱ्या तरुणाईची संघटना म्हणून लौकिक असलेल्या या संघटनेने कालपर्यंत  ३९ दिवस सलग सेवेचा जमेल तसा भार उचलला . संकटकाळी सेवेत आनंद मिळविणाऱ्या वृत्तीचा हा फैलाव आता कोरोनाशी सामाजिक स्तरावरून हि हिकमतीने लढा देतो आहे. हा लढा देताना अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवाव्या लागत आहेत. घरातल्या पंख्यापासून बल्ब पासून ते बाथरूम मधल्या तुटलेल्या नळाच्या तोटी पर्यंत असंख्य शेकडो समस्या असतांत  कोणाला ऐकायला येत नसल्याने कानाच्या मशीनची संपलेली बॅटरी आणून देणे  ,तुटलेला अगर फुटलेला चष्मा दुरुस्त करवून आणून देणे अशा छोट्या छोट्या पण त्या त्या व्यक्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आणि जगण्यास अत्यावश्यक असलेल्या बाबी पुरविणे अशा विविध कामांचा त्यात समावेश होतो. महाराष्ट्रा तील आणि महाराष्ट्रा बाहेरील पण पुण्यात अडकलेल्या अनेक नागरिकांची सहायता करताना ,बंद पडलेल्या संसाराचे गाडे खांद्यावर असलेल्या गरजूंना  अन्न धान्य  पुरविणे, जेवणाचे फूड पाकिटे पुरविणे या बरोबर अनेक समस्यांचा सामना करण्यास पुढे झालेल्या मंडळीशी माय मराठीच्या अभिषेकआणि मयूर लोणकर यांनी साधलेला हा अल्पसा संवाद

 

ससूनच्या सोईसुविधांचा विभागीय आयुक्तकडून आढावा

0

पुणे, दि.२९ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.  दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात ससून रुग्णालयाच्या विविध विभाग प्रमुखांकडून ससून रुग्णालयात उपलब्ध व आवश्यक सोईसुविधांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्र.अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजय तावरे, भूमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक तथा  समन्वय अधिकारी राजेंद्र गोळे आदी उपस्थित होते.

ससून रुग्णालयात आवश्यक ती पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरू करा, अशा सूचना देत डॉ.म्हैसेकर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांवर वेळेत आणि योग्य प्रकारे उपचार होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार अंमलबजावणी करावी. ससून रुग्णालयात येणा-या प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे आवश्यक आहे,कोरोना विषाणुच्या अनुषंगाने माहितीचे संकलन अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देत रुग्णाला कोविडबाबत समूपदेशन महत्त्वाचे असल्याचे सांगून आवश्यक त्या सर्व सोईसुविधा व साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. यावेळी ससून रुग्णालयातील विविध विभागाचे प्रमुख, डॉक्टर उपस्थित होते.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

0

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशीव्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे साधला संवाद

पुणे दि.२९ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासोबतच नरेगा अंतर्गत ग्रामीण तसेच नगरपंचायत क्षेत्रात सोशल डिस्टिसींग ठेवत आवश्यकता आहे त्या ठिकाणी कामे तात्काळ सुरू करा तसेच  कायदा व सुव्यवस्थेबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे सांगतानाच  प्रतिबंधित क्षेत्राबाबत सुक्ष्म नियोजन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी पुणे विभागातील, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर येथील पोलीस आयुक्त , जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे संवाद साधत कोरोना स्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

या व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये  कायदा व सुव्यवस्था, जिल्हा व महानगरपालिका स्तरावर कोरोनाबाबतच्या वैद्यकीय सुविधा, खाजगी हॉस्पीटलचा सहभाग व उपलब्धता, उपलब्ध क्वारंटाईन व आयसोलेशन सुविधा, अडकून पडलेले मजूर, प्रवाशी यांची व्यवस्था, अन्नधान्य पुरवठा स्थिती, शिधापत्रिका नसलेल्या व्यक्तींसाठी करण्यात आलेली व्यवस्था, भाजीपाला व दूध पुरवठा स्थिती, उद्योग, कारखाने स्थिती, स्वंयसेवी संस्थांचा सहभाग व त्यांच्या अडचणी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे अनुभव तसेच राजस्थानातील कोटा येथून परतणा-या विद्यार्थ्यांची सोय यासोबतच महत्वाचे प्रश्न व कोवीडमुळे होणारे मृत्यू आदी विषयांचा जिल्हा व सबंधित यंत्रणेकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला व आवश्यक त्या सूचना विभागीय आयुक्त्‍ डॉ. म्हैसेकर यांनी सबंधित यंत्रणेला दिल्या. यावेळी कोरोना संदर्भात कार्यरत असलेले विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अभिनेते इरफान खान रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

सहज अभिनयातून साकारलेल्या विविधांगी भूमिकांमुळे

मुंबई, दि. 29 : अभिनेता इरफान खान यांचं निधन हे भारतीय चित्रपटसृष्टी, कलाजगतासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या अकाली निधनानं एक दमदार अभिनेता, संवेदनशील माणूस, लढाऊ व्यक्तिमत्वं आपण गमावलं आहे. सहजसुलभ अभिनयातून साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांमुळे इरफान खान कायम रसिकांच्या स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

अभिनेता म्हणून इरफान खान निश्चितच महान होते. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका त्यांच्या अष्टपैलू अभिनय कौशल्याची साक्ष देतात. कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन त्यांनी त्यांच्यातला लढाऊपणा दाखवून दिला होता, परंतू आज अचानक आलेली त्यांच्या निधनाची बातमी ही माझ्यासारख्या असंख्य चित्रपट रसिकांसाठी, त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, असे उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे.

झोपडपट्ट्यांमध्ये दारोदारी आरोग्य दूत -अरविंद शिंदेंचा प्रयत्न (व्हिडीओ)

0

 

पुणे- कोरोनाला   रोखण्यासाठी झोपडपट्ट्यांमध्ये दारोदारी आरोग्य दूत पोहोचविण्याच्या प्रयत्नासाठी कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीतून महापालिकेला आणि आपल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पिपिई किट  सह इन्फ्रा रेड थर्मामिटर काल उपलब्ध करून दिले 
झोपडपट्टी परिसरात कोरोना ने उच्छाद मांडू नये म्हणून महापालिकेच्या आरोग्य पथकांना यातील काही कीट आणि थर्मोमिटर उपलब्ध करून दिले या शिवाय ताडीवाला रोड झोपडपट्टीत असलेलेया ४८ गल्ल्यांमध्ये प्रत्येकी एका कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपवून त्या गल्लीतली आरोग्यविषयक माहिती या पथकांना रोजच्या रोज कळवावी अशा सूचना दिल्या . या कार्यकर्त्यांना पीपीई कीट देवून प्रथम आरोग्य पथकासोबत पाठविले जाईल आणि नंतर रोजच्या रोज हेच कार्यकर्ते आपल्याकडे देण्यात आलेल्या थर्मो मित्र मार्फत रोज दारोदारी जावून तपासणी करून त्याबाबत चा रिपोर्ट पथकांना व्हाटस एप मार्फत कळवतील अशी संक्ल्प्नां मांडून तिचा प्रारंभ शिंदे यांनी केला आहे. आरोग्य पथक रोज झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून कार्यकर्त्यांची मदत घेवून्त्यांना आरोग्य दूत बनवून कोरोनाला पायबंद घालण्याची हि संकल्पना राबविली जाते आहे असे अरविंद शिंदे यांनी सांगितले. 

अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, इरफान खान यांच्यात गुणी अभिनेत्याबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व सामावले होते. भारतीय  चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक वस्तूपाठ ठरेल असाच आहे.

दुर्धर असा कॅन्सर झाला असूनही न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असतांना परत उत्साहाने उभे राहिले. दुर्दैवाने काळाने त्यांना ओढून नेले आणि अभिनयाचा त्यांचा प्रवास थांबला. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.

कोरोनावरून अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाने चीनविरुद्ध दंड थोपटले.

0

 

वॉशिंग्टन. कोरोना या भयंकर साथरोगाचा उगम चीनमधील वुहान प्रांतातून झाला. फेब्रुवारीमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला तरी याच्या बातम्या चीनमधून बाहेर येण्यास मात्र मार्च उजाडला होता. कारण, तोवर युरोप अमेरिकेपर्यंत या कोरोना विषाणूने थैमान घातले होते. दरम्यान, आता अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यांच्यासह इतर देशांनी या कोरोना विषाणूबद्दल थेट चीनला जबाबदार ठरवत त्या देशाविरुद्ध दंड थोपटले आहेत. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनला लक्ष्य केले. ते म्हणाले, कोरोनाबद्दल अमेरिका चौकशी करत आहे. चीनकडून नुकसान भरपाई वसूल केली जाईल. वास्तविक, जर्मनीतील एका वृत्तपत्राप्रमाणे अमेरिका चीनकडून भरपाई वसूल करणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘आम्ही रक्कम ठरवलेली नाही. मात्र ती खूप मोठी असेल.’

अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी आता थेट चीनमध्ये वुहान प्रांतात असलेल्या प्रयोगशाळांचीच तपासणी करण्याची तयारी सुरू केली असून यासाठी चीनकडे परवानगीही मागण्यात आली होती. परंतु चीनने ही परवानगी नाकारल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी आता थेट चीनला इशारा दिला आहे. वर या कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची वसुलीकरण्याची धमकीही दिली आहे. यासाठी कोरोनाबाधित देशांना चीनविरुद्ध एकत्र करण्याचा प्रयत्न अमेरिकेने सुरू केला आहे. यामुळे जागतिक पातळीवर आता कोरोनाचा वेगळा राजकीय प्रभाव पहावयास मिळू शकतो.

जर्मनीतील एका वृत्तपत्राने चीनकडे कोरोना फैलावाबद्दल दंड म्हणून भरपाई मागण्याची भूमिका मांडली होती. नेमक्या हीच भूमिका आता अमेरिकेनेही घेतली आहे. जर्मनीने चीनकडे मागितलेल्या भरपाईपेक्षाही जास्त दंड असेल, असे संकेत ट्रम्प यांनी दिले. जर्मनीप्रमाणे नुकसानीसाठी चीनकडून १०.६७ लाख कोटी रुपये दंड मागेल का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. यावर ट्रम्प म्हणाले की, जर्मनी वेगळा विचार करत आहे. आम्ही वेगळे पाहत आहोत. जर्मनी जेवढ्या भरपाईबद्दल सांगतोय त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीत ही दंडाची रक्कम असायला हवी.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, जर्मनीला करायची आहे चिनी लॅबची तपासणी

अमेरिका, ब्रिटन, जर्मनी व ऑस्ट्रेलिया शास्त्रज्ञांना वुहानला पाठवून तेथे लॅबची तपासणी करू इच्छित आहेत. कोरोना विषाणू लॅबमध्येच तयार झाला, असा संशय आहे. हे चार देश चीनविरुद्ध आघाडी उघडू पाहत आहेत.

विषाणू तयार करण्याची क्षमता नाही : चीन

वुहान । वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने दावा केला आहे की, विषाणू तयार करण्याची क्षमता चीनकडे नाही. लॅबचे संचालक युयान जिमिंग म्हणाले, कोरोना माणसाने तयार केला याचा पुरावाच नाही. कारण, ते अशक्य आहे.

चीन: वुहानमधील भारतीयांना कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची भीती, लक्षणे नसलेल्या प्रकरणांमुळे चिंता

वुहान | चीनच्या वुहान शहरात आता कोरोनाचा कुठलाही नवीन रुग्ण नसला तरी येथील भारतीय अद्यापही दहशतीत आहेत. कोरोनाचा दुसरा टप्पा येऊ शकतो, असे त्यांना वाटते. ७६ दिवसांच्या लॉकडाऊननंतर अनेक जण कामावर परतले. दुसरीकडे देशात लक्षणे नसलेली प्रकरणे वाढत आहेत. हुबेई प्रांतात असे ५९९ रुग्ण आहेत. वुहान हुबेईची राजधानी आहे. एका भारतीय संशोधकानुसार, वुहानमध्ये २० दिवसांआधीच लॉकडाऊन उठवण्यात आला. अनेक लोक लक्षणे नसलेल्या प्रकरणांच्या भीतीमुळे घरातच थांबले आहेत. एका भारतीयाने सांगितले, आम्ही कामाच्या ठिकाणी किंवा इतर शहरांमध्ये ज्यांना भेटत

अभिनेता इरफान खान यांचे कर्क रोगाने निधन.. बॉलीवूडवर शोककळा..

0

मुंबई. बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. रिपोर्ट्सनुसार, इरफानला पोटाचा त्रास झाला होता. त्याला कोलन इन्फेक्शन झाले होते. गेल्या आठवड्याभरापासून आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरु होते. पण आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली. बॉलिवूडचा हा प्रतिभावंत कलाकार असा अचानक निघून गेल्याने चाहते आणि बॉलिवूडकर यांना मोठा धक्का बसला आहे.

दोन वर्षांपूर्वी झाले होते कॅन्सरचे निदान

दोन वर्षांपूर्वी मार्च 2018 मध्ये इरफानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. 16 मार्च 2018 मध्ये इरफानने आपल्या आजाराविषयी खुलासा केला होता. ‘आपण अपेक्षा करतो, ते देणे आयुष्यासाठी बंधनकारक नाही’ या आशयाचा मार्गारेट मिशेल यांचा कोट इरफानने पोस्ट केला होता. या आजारावर उपचार करण्यासाठी तो लंडनला गेला होता. दहा महिन्यांनी इरफान उपचार पूर्ण करुन मायदेशी परतला आणि आपल्या आजारातून सावरत ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाचे चित्रीकरणही केले होते.

चार दिवसांपूर्वीच झाले होते आईचे निधन

इरफान खान राजस्थानच्या टोंकमधील नवाबी कुटुंबातील होता. त्याचे बालपणही टोंकमध्ये गेले. त्याचे आईवडील टोंकचे रहिवासी होते. आजही त्याचे नातेवाईक आणि कुटुंबातील बरेच लोक येथेच वास्तव्याला आहेत. चार दिवसांपूर्वीच (शनिवारी) जयपूर येथे त्याच्या आईचे निधन झाले. तब्येत बिघडल्यामुळे इरफान खान आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकला नव्हता. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून त्याने आईचे अंत्यदर्शन घेतले होते.

 

इरफान खानचे निवडक चित्रपट आणि सन्मान

जवळपास 30 वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ हे त्याचे निवडक गाजलेले चित्रपट आहेत. त्याला हासिल (निगेटिव्ह रोल), ‘लाइफ इन अ मेट्रो’ (बेस्ट अॅक्टर), ‘पान सिंह तोमर’ (बेस्ट अॅक्टर क्रिटिक) आणि ‘हिंदी मीडियम’ (बेस्ट अॅक्टर) साठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ‘पान सिंह तोमर’साठी राष्ट्रीय पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले होते. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2011 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

गेल्या आठवड्याभरापासून आयसीयूत इरफानवर उपचार सुरु होते. पण आज अखेरच त्याची प्राणज्योत मालवली.

 

इरफान खान यांचा अल्प परिचय.
जन्म. ७ जानेवारी १९६७ जयपुर येथे.
इरफान खान हा केवळ उत्तम अभिनेता नव्हता, तर त्यांना बॉलिवूड आणि हॉलिवूडमधला सर्वांत सक्षम अभिनेता मानला जात असे. अर्थात गुणवत्ता आणि क्षमता असूनही या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी इरफान खान यांना बरीच मेहनत करावी लागली. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा इरफान खानचा आयुष्य जगण्याचा संघर्ष फार मोठा होता. इरफान खान यांचा एका मुस्लिम पठाण कुटुंबियात इरफानचा जन्म झाला. इरफान खान यांचं पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असे होते. इरफान यांच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय होता.
जेव्हा त्याला एनएसडीमध्ये प्रवेश मिळाला, त्याच दरम्यान इरफान यांचे वडील गेले. यानंतर त्यांना घरच्यांकडून पैसे मिळणं बंद झालं.
एनएसडीकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर त्याने कोर्स पूर्ण केला. इरफान खान यांनी त्याच्या करिअरमध्ये एकाहून एक सरस सिनेमे दिले. बॉलिवूडप्रमाणे तो हॉलिवूडमध्येही सक्रिय होता. त्यांनी हॉलिवूड मधील’स्पाइडर मॅन’, ‘जुरासिक वर्ल्ड’ आणि ‘इन्फर्नो’ या सिनेमांमध्ये काम केलं. एका मुलाखतीत हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्सने इरफानचं कौतुक करत म्हटलं होतं की, ‘इरफानचे डोळेही अभिनय करतात.’
इरफान खान यांनी २००५ मध्ये रोग या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हासिल या चित्रपटासाठी इरफान यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. यानंतर इरफान यांनी ‘लंचबॉक्स’, ‘गुंडे’, ‘हैदर’, ‘पीकू’ आणि ‘हिंदी मीडियम’ सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. ‘पान सिंह तोमर’ सिनेमासाठी इरफान यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. २०११ मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. इरफान खान यांनी त्यांची वर्ग मैत्रीण सुतपा सिकंदरशी १९९५ मध्ये लग्न केलं. इरफानच्या अनेक वाईट दिवसांमध्ये सुतपा सिकंदर त्याच्या पाठीशी खंबीर उभी राहिली. २०१८ मध्ये इरफान कॅन्सरने आजारी झाले होते. त्याच्या उपचारांसाठी ते लंडनला गेले होते. एक वर्ष उपचार घेतल्यानंतर इरफान खान भारतात परतले. इरफान खान त्यावेळी पूर्णपणे बरे झाले होते त्यांनी इंग्लिश मीडियम या चित्रपट नुकतात प्रदर्शित झाला होता.

इरफान खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

पुण्यात 50 वर्षांपुढील पोलीस कर्मचार्‍यांना फिल्डवरील डय़ुटी नाही

0

पुणे-करोना विषाणूचे रुग्ण पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. या विषाणूचे रुग्ण पोलीस विभागात आज अखेर 8 जण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची विशेष काळजी घेतली जात असून आम्ही आठवड्याभरापूर्वीच 50 वर्षांपुढील पोलीस कर्मचार्‍यांना फिल्डवरील डय़ुटी देणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी माध्यम प्रतिनिधिना दिली.

राज्यभरात करोना विषाणू बाधित रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. आजवर आपण सर्वसामान्य नागरिक, डॉक्टर, नर्स हे बाधित झाल्याचे पाहिले आहे. मात्र आता आठवड्याभरात पोलिसांना देखील या आजाराने गाठले असून मुंबईत तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

त्या पार्श्वभूमीवर वय वर्ष 55 पुढील कर्मचार्‍यांना रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व घडत असताना. पुण्यात देखील मागील आठवड्याभरात आठ रुग्ण बाधित आढळले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसकडून काय निर्णय घेतले गेले आहेत. त्याबाबत सह आयुक्त आयुक्त रवींद्र शिसवे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, पुणे शहरातील अनेक भागात करोना बाधित रुग्ण आढळत आहे. त्या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून अनेक निर्णय घेतले जात आहे. त्याच दरम्यान मागील आठवड्याभरात 8 कर्मचारी करोना बाधित आढळले आहे. या पार्श्वभूमीवर त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांवर आमचं लक्ष आहे. त्या सर्वांवर प्रशासनाचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, आठवड्याभरापूर्वी आम्ही 50 वर्षांपुढील पोलीस कर्मचार्‍यांना फिल्डवरील डय़ुटी देणार नसल्याचा निर्णय घेतला नाही. तसेच ज्यांना मधुमेह, गर्भवती महिला आणि अगदी लहान मुले असलेल्यांना देखील फिल्डवरील ड्युटी दिली जाणार नाही. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना गंभीर आजार आहेत, अशा कर्मचारी वर्गाला रजेवर पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, एखादा कर्मचारी भविष्यात करोना बाधित आढळल्यास किंवा लक्षणे दिल्यास, अशावर उपचार करण्यासाठी दीनानाथ मंगेशकर आणि सिम्बॉयसिस रुग्णालयामध्ये पोलीस कर्मचारी वर्गासाठी बेड राखीव ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.