Home Blog Page 2600

कार्यकर्ते हे देखील कोरोना वॉरियर- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)

नगरसेवक हेमंत रासने मित्र परिवाराच्या वतीने कोरोना लढाईत लढणा-या ३ हजार कार्यकर्त्यांचा जीवनावश्यक किट देऊन सन्मान-
मुंबई, पुणे हॉटस्पॉट असताना दारु दुकाने उघडी ठेऊ नयेत : चंद्रकांत पाटील   

पुणे : कोरोनाच्या लढाईत सामान्य माणसांप्रमाणे राजकीय पक्षाचे आणि गणेशोत्सव मंडळाचे कायकर्ते देखील जगले पाहिजेत. प्रत्यक्ष काम करणा-या केवळ भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच नाही, तर गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, पोलीस, डॉक्टर्स यांना  नगरसेवक हेमंत रासने यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन सन्मानित केले आहे. कार्यकर्ता हा देखील कोरोना वॉरिअर आहे. तो रस्त्यावर उतरुन गरजूंना किराणा, मास्क वाटतोय. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी स्वत: किंवा दानशूरांकडून रस्त्यावरील कार्यकर्त्यांचा आरोग्य विमा काढायला हवा, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल

नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणातून कोरोना लढाईत प्रत्यक्ष काम करणा-या भारतीय जनता पक्षाच्या व पुण्यातील १ हजार गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकत्यांसह पोलीस, डॉक्टर्स, पत्रकार असे ३ हजार जणांना टप्याटप्याने जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन कार्यकर्ता सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य आयोजक श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक हेमंत रासने, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, राजेश पांडे, राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टीने लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांना पुण्यामध्ये ८ दिवस पुरेल इतके २ लाख ३० हजार किट दिले आहेत. यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व परिस्थिती लक्षात घेता  गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर गणपती उत्सव चालतो, त्यांचे घर कसे चालेल हे आपण पहायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
हेमंत रासने म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करणे शक्य झाले. या काळात प्रत्येक कार्यकर्ता गरजूंसाठी कार्यरत आहे. विद्यार्थी, प्रवासी, मजूर, हातावर पोट असलेल्यांची उपासमार होऊ नये, यासाठी भाजपाने व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काम केले. त्यामुळे या कार्यकर्त्यांचा सन्मान २५ किलो किटमध्ये २५ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू देऊन करण्याचा आम्ही संकल्प केला. त्याची सुरुवात झाली असून हे कार्यकर्ता सन्मान किट या कार्यकर्त्यांपर्यंत टप्याटप्याने पोहोचविण्यात येणार आहे. हे कार्यकर्ते गेले ४० हून अधिक दिवस कोरोनासारख्या अदृश्य शक्तीशी लढा देत आहे. त्यामुळे पंतप्रधानांची केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत आम्ही या कार्यकर्त्यांचा सन्मान करीत त्यांना जीवनावश्यक वस्तू देत आहोत.

मुंबई, पुणे हॉटस्पॉट असताना दारु दुकाने उघडी ठेऊ नयेत : चंद्रकांत पाटील 

केवळ पुण्यात नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केलेली दारुविक्री ही घातक आहे. नागरिकांनी रस्त्यावर मोठया रांगा लावल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळले जात नाही. सगळेजण घरामध्ये एकत्र असल्याने यापूर्वीच अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यात दारुच्या बाटल्या घरात आल्या की आणखी अडचणी निर्माण होत आहेत. दारु विक्रीतून मिळणारे उत्पन्न वगैरे गोष्टी बाजूला ठेऊन सामाजिक अडचणी लक्षात घेता, हे बंद करायला हवे. दारु ही जीवनावश्यक गोष्ट नाही. त्यामुळे मुंबई, पुणे हॉटस्पॉट असताना येथे व संपूर्ण महाराष्ट्रात दारुची दुकाने उघडी ठेऊ नये, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

नॉन कंटेन्मेंट झोन मध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सोमवार ते रविवार कोणती दुकाने राहतील खुली -पहा वर्गवारी …

पुणे : –  पुणे शहर हे रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे पुणे शहराची विभागणी दोन भागांमध्ये करण्यात आली असून त्यामध्ये प्रतिबंधित (संक्रमणशील म्हणजेच कंटेन्मेंट झोन) आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील (संक्रमणशील क्षेत्र सोडून म्हणजेच नॉन कंटेन्मेंट झोन) परिसराचा समावेश आहे. या दोन्ही परिसरात काय उघडे राहणार आणि काय नाही याबाबत पुणे महानगरपालिकेने सविस्तर माहिती दिली आहे. ती खालील प्रमाणे आहे.

1. संक्रमणशील क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) – सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत दुध, भाजीपाला, फळे, मटन, चिकन व अंडी यांची किरकोळ विक्री सुरू राहील. सर्वपक्रारचे दवाखाने, हॉस्पीटल्स, प्रसुतीगृहे व औषधी दुकाने सुरू राहतील. याशिवाय या परिसरात कोणतीही दुकाने उघडी राहणार नाहीत.

क्र2. संक्रमणशील क्षेत्र वगळून (नॉन कंटेन्मेंट झोन) –

अ. अत्यावश्यक दुकाने व सेवा – दुध, भाजपीला, फळे, किराणा दुकाने, मटन, चिकन व अंडी विक्री, सर्व प्रकारचे दवाखाने, हॉस्पीटल्स, क्लिनिक, प्रसुतीगृहे व औषधी दुकाने ही सकाळी 7 ते सायंकाळी 7 दरम्यान सुरू राहतील.

प्रमुख रस्त्यांवरील दुकाने बंद –

ब. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे मॉल, व्यापारी संकुले हे उक्त लॉकडाऊन कालावधीत बंद राहतील. तसेच लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, टिळक रोड, अप्पा बळवंत चौक परिसर, कुमठेकर रोड, एम.जी. रोड, कोंढवा रोड, ज्योती हॉटेल ते एनआयबीएम रोड या रस्त्यावरील अत्यावश्यक नसलेली कोणतीही दुकाने व सेवा सुरू करण्यास मनाई आहे.

क. नागरी वसाहतीमधील व संकुलामधील अत्यावश्यक वस्तु व्यतिरिक्त एकल दुकाने सुरू राहतील.

ड. एक रस्ता किंवा गल्लीमध्ये अशा प्रकारच्या जास्तीत जास्त पाच दुकानांनाच प्रति 1 किलोमीटर प्रमाणे मुभा असेल. मात्र अशा दुकानांची संख्या जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे शहर अद्यापी रेड झोनमध्येच असल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये केवळ खालील प्रकारच्या व्यवसायांना परवानगी देण्यात येत आहे. सदरची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान सुरू राहणार आहेत.

1. सोमवार/बुधवार/शुक्रवार – इलेक्ट्रॉनिक साधने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने-सामुग्री व मोबाईल विक्री व दुरूस्ती, इलेक्ट्रीक वस्तु विक्री व दुरूस्ती, भांडयाची विक्री दुकाने
2. मंगळवार/गुरूवार/शनिवार/रविवार – वाहनांचे दुरूस्तीच्या गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य साधन सामुग्री, कपडयांची दुकाने, डेअरी उत्पादने.

ई. जीवनावश्यक वस्तुंचे व औषधांचे आणि तयार अन्न पदार्थांचे घरपोच वाटप सकाळी 10 ते रात्री 10 दरम्यान राहील.

टीप – अत्यावश्यक असलेल्या व अत्यावश्यक नसलेल्या ठिकाणांबाबत खालील सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.

1. प्रत्येक दुकानांमध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखण्याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची असणार आहे.

2. दुकानदारांनी कामगारांना फोटोसह ओळखपत्र देणे गरजचे आहे.

रुग्णसंख्या जास्त दाखविल्याचा नगरसेवक विशाल तांबेंच्या दाव्याने खळबळ(व्हिडीओ)

पुणे : धनकवडी -सहकारनगर क्षत्रिय कार्यालय अंतर्गत कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त दाखविल्याचा दावा आज राष्ट्रवादीचे धनकवडीतील नगरसेवक विशाल तांबे यांनी केल्याने खळबळ उडाली.महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन यांच्याकडील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीकडून प्रसिद्ध होणाऱ्या मॅपमधील आकडेवारीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे तांबे यांनी सांगितल्याने आकडेवारी पुन्हा-पुन्हा तपासण्याचा आदेश स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिला आहे.

स्मार्ट सिटी प्रशासनाकडून रुग्णांच्या संख्येचा आढावा घेणारा नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. शहरात सुमारे 42 प्रभाग आहेत. 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ते समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात धनकवडी – सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या प्रभागांत (क्र.35, 39,40, 42) 5 आणि 4 मे रोजी 124 रुग्ण असल्याचे दाखविण्यात आले आहे. तर, 1, 2, 3 मे रोजी प्रत्येकी 121 रुग्ण असल्याचे म्हटले होते. मात्र, 26 ते 29 एप्रिल दरम्यान दररोज 62 ते 64 रुग्ण असल्याचे म्हटले आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका, स्मार्ट सिटीतील अधिकाऱयांबरोबर 30 एप्रिल रोजी बैठक आयोजित केली होती. त्यामुळे त्या दिवशी स्मार्ट सिटी प्रशासनाने नकाशा प्रसिद्ध केला नाही. मात्र, 1 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या नकाशात धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारितील चार प्रभागांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 64 वरून 121 वर पोचल्याचे दिसून आले. सुमारे 57 रुग्ण कोठून वाढले, असा प्रश्न येथील लोकप्रतिनिधींना पडला.

स्थानिक नगरसेवक विशाल तांबे यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून, आरोग्य विभागाकडून आकडेवारी गोळा केली तेव्हा या चारही प्रभागांतील रुग्ण संख्या सुमारे 70 असल्याचे दिसून आले. त्यांची यादीही त्यांनी मिळविली. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाकडे 121 रुग्णांबाबत विचारणा केली असता, ते खुलासा करू शकले नाही. तांबे यांनी हे तपशील ‘सकाळ’कडे दिले.

याबाबत अग्रवाल यांच्याकडे विचारणा केली असता त्या म्हणाल्या, आकडेवारीच्या संकलनात काही वेळा त्रुटी राहू शकतात. त्यामुळेच त्यांची पुन्हा-पुन्हा खातरजमा करण्याचे आदेश दिले आहेत. आकडे नेमके स्पष्ट झाल्याशिवाय नकाशा प्रसिद्ध केला जाणार नाही. धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाबाबत नेमका प्रकार काय झाला आहे, याची खातरजमा केली जाईल.

नगरसेवक तांबे म्हणाले, कोरोनाची रुग्ण संख्या 64 असून ती एकदम 121 वर कशी पोचली, याचा शोध घेतला असता, आकडेवारीत गफलत झाल्याचे दिसून आले. महापालिकेच्याच आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या आमच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंर्तगत राहणारे 70 रुग्ण आहेत. त्यात प्रभाग 35 मधील 44, 39 मधील 12, 40 मधील 6, आणि 42 मधील 8 रुग्ण आहेत. मात्र, स्मार्ट सिटीच्या नकाशात 124 रुग्ण कसे काय दाखविण्यात आले, याबद्दल आश्चर्य वाटत आहे. म्हणूनच त्या बाबत आयुक्तांकडेही तक्रार केली आहे.

राज्यात आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १६ हजार ७५८

0

मुंबई, दि.६: राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. आज १२३३ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ९० हजार ८७९ नमुन्यांपैकी १ लाख ७३ हजार ८३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १६ हजार ७५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात २ लाख ११ हजार ११२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २५, पुण्यातील ३, अकोला शहरात ३, जळगाव शहरात १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १८ रुग्ण आहेत तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: १०,७१४ (४१२)
ठाणे: ८६ (२)
ठाणे मनपा: ५४३ (८)
नवी मुंबई मनपा: ५१९ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २४७ (३)
उल्हासनगर मनपा: १३
भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
मीरा भाईंदर मनपा: १८७ (२)
पालघर: ३६ (१)
वसई विरार मनपा: १७५ (४)
रायगड: ६० (१)
पनवेल मनपा: ११५ (२)
ठाणे मंडळ एकूण: १२,७१६ (४४१)
नाशिक: २४
नाशिक मनपा: ४८
मालेगाव मनपा: ३९१ (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ५१ (११)
जळगाव मनपा: १४ (२)
नंदूरबार: १९ (१)
नाशिक मंडळ एकूण: ६३२ (३१)
पुणे: १०३ (४)
पुणे मनपा: १८६१ (११५)
पिंपरी चिंचवड मनपा: १२३ (३)
सोलापूर: ६
सोलापूर मनपा: १६९ (८)
सातारा: ८९ (२)
पुणे मंडळ एकूण: २३५१ (१३२)
कोल्हापूर: १० (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
सिंधुदुर्ग: ४ (१)
रत्नागिरी: १६ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ७१ (४)
औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३७० (११)
जालना: ८
हिंगोली: ५८
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ४४१ (१२)
लातूर: १९ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २८ (२)
लातूर मंडळ एकूण: ५४ (३)
अकोला: ८ (१)
अकोला मनपा: ७५ (८)
अमरावती: ४ (१)
अमरावती मनपा: ६९ (९)
यवतमाळ: ९२
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: २७६ (२०)
नागपूर: २
नागपूर मनपा: १८० (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १८८ (२)
इतर राज्ये: ३२ (६)
एकूण: १६ हजार ७८५ (६५१)
( टीप – ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड१९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. सदरील अहवाल आय सी एम आर टेस्ट आय डी १२८०७४१ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांची आकडेवारी डेटा क्लिनिंगनुसार आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १०४८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ११ हजार ६९२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५१.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत

0

मुंबई दिनांक 6: मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश,  मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व आजी-माजी न्यायधीशांना, कर्मचारी तसेच न्यायिक अधिकारी आणि अधिनस्त कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या मदतीसाठी धन्यवाद दिले आहेत.

ठाणे जिल्हा सहकारी बँकेची 1 कोटी रुपयांची मदत
ठाणे जिल्हा सहकारी बँक लि. ने  ही  मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

ज्येष्ठ नागरिक श्री. चौधरी यांच्याकडून 50 हजार रुपयांची मदत
मी एक ज्येष्ठ नागरिक असून  मी आणि माझा परिवार घरातच राहातो, बाहेर पडत नाही, कोरोना विषाणुशी लढतांना सगळ्यांनी असंच  वागलं पाहिजे, शासनाला सहकार्य केलं पाहिजे.  आज राज्य आणि देश अडचणीत आहे, अशावेळी माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून 50 हजार रुपयांची मदत मी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19 खात्यात जमा करत आहे, मदतीचा खारीचा वाटा उचलत आहे असे सांगून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 50 हजार रुपये जमा करणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे रविंद्र धनंजय चौधरी आणि त्यांचे वय वर्षे आहे  67. ते पुण्याच्या कोथरुड येथील राहणारे आहेत. मुख्यमंत्र्यांनी श्री. चौधरी याना मनापासून धन्यवाद दिले आहेत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 314 कोटी रुपये जमा
आतापर्यंत राज्यातील जनता, स्वंयसेवी संस्था, उद्योजक, व्यापारी वर्ग, लहान बालके आणि कार्पोरेट हाऊसेस यांनी सगळ्यांनी मिळून केलेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 314 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.

दातृत्वाला मनापासून सलाम
कोरोनाशी लढतांना राज्यातील लहानथोर मंडळी शासनासमवेत मदतकार्यात उतरली असून या संकटाचा सामना करत आहेत. श्री. चौधरी यांच्यासारखे ज्येष्ठ नागरिक असोत किंवा आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणारी राज्यातील बालके असोत, शासनाला या आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या सर्वांच्या दातृत्वाला मला मनापासून सलाम करावा वाटतो. या सर्वांच्या सहकार्याने, स्वंयशिस्तीचे आणि नियमांचे कडक पालन करून आपण कोरोनाला नक्की हरवू असा विश्वास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा 50 हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवावी

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना पत्र

मुंबई दि. 6 :- महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांदाखरेदीसाठी नाफेडला यंदा घालून दिलेली 40 हजार मेट्रिक टनांची खरेदीची मर्यादा 50 हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केंद्र सरकारकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांना यासंदर्भात पत्र लिहिले असून त्याद्वारे महाराष्ट्रातील कांदाउत्पादक शेतकरी व ग्राहकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रात यंदा कांद्याचं चांगलं उत्पादन झालं आहे. कृषी उत्पन्न बाजारात आजमितीला कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे त्याला उठाव नाही. अनुकुल वातावरणामुळे रबी हंगामातही कांद्याचं उत्पादन वाढणार आहे. तो कांदा बाजारात आल्यानंतर कांद्याचे भाव गडगडण्याची व त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. सध्या कृषीउत्पन्न बाजारपेठेत आठ ते दहा रुपये प्रतीकिलो असलेला कांद्याचा भाव आणखी गडगडला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. ते टाळण्याची गरज आहे. सद्यस्थितीत केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असला तरी, या खरेदीसाठी गेल्या वर्षी असलेली 45 हजार मेट्रिक टनांची मर्यादा यंदा 40 हजार मेट्रीक टन इतकी कमी करणे अन्यायकारक असल्याचे सांगून यंदाची कांदाखरेदीची मर्यादा 50 हजार मेट्रीक टन इतकी वाढवण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने गेल्यावर्षी ‘प्राईस्‌ स्टॅबिलायझेशन फंड’ योजनेंतर्गत नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 45 हजार मेट्रीक टन कांदा खरेदी केला होता. त्या बफर स्टॉकमुळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करुन देणे सरकारला शक्य झाले होते. त्या पार्श्वभूमीवर, यंदा झालेले कांद्याचे जादा उत्पादन, वाढलेली आवक, कोरोनामुळे ठप्प असलेला उठाव या बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदाखरेदीसाठी यंदा निश्चित केलेली 40 हजार मेट्रीक टनांची मर्यादा वाढवून 50 टनांपर्यंत वाढवण्यात यावी आणि महाराष्ट्रातील शेतकरी व ग्राहकांना दिलासा द्यावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्यात कोरोनाची स्थिती गंभीर

पुणे-राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याची टीका पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.

मुळीक यांनी पुढील बाबींकडे शासनाचे लक्ष वेधले आहे

  1. राज्य सरकारचे पुण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून शहराला वार्यावर सोडले आहे
  2. गेल्या दीड महिन्यात पालकमंत्र्यांनी पुण्यात येऊन केवळ दोन बैठका घेतल्या आहेत.
  3. अधिकार्यांना ते निर्देश देत असतील याची सुतराम शक्यता नाही, अन्यथा अधिकार्यांनी काढलेल्या आदेशांमध्ये एकवाक्यता दिसली असती.
  4. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सात आयएएस अधिकारी नियुक्त आहेत, परंतु त्यांच्या जबाबदार्या निश्चित केलेल्या नाहीत.
  5. अधिकार्यांतील समन्वयाच्या अभावामुळे पुणेकरांमध्ये असुरक्षितता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
  6. बी. जे. मेडिकल वैद्यकिय महाविद्यालयाच्या (ससून सर्वोपचार रुग्णालय) अधिक्षकांची बदली केल्यानंतर तिथे पूर्णवेळ अधिक्षक नियुक्त केलेला नाही. त्यामुळे अजूनही ससूनमधील कोरोनाची स्थितीत कोणताही बदल झालेला नसून, ती अधिक गंभीर होत आहे.
  7. रेशनिंग दुकानातील शिधावाटप वितरण प्रक्रियेतील गोंधळ वाढला असून, अजूनही नागरिकांना धान्य उपलब्ध होत नाही.
  8. बांधकाम मजूरांना जाहीर केलेले अर्थसहाय मिळालेले नाही.
  9. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर जात आहे. पोलीस दलातील कर्मचार्यांचे कोरोनामुळे मृत्यू होण्याची चिंताजनक घटना घडली आहे.
  10. दारूची दुकाने खुली केल्यामुळे याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे त्यामुळे प्रादूर्भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.

कोराना संसर्गामुळे सर्वसामान्य पुणेकरांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणेकरांचे हित लक्षात घेऊन आवश्यक असणारे मोठे निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासकीय गतीमानता, प्रशासकीय अधिकार्यांतील समनव्य आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

आयुर्वेदामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासह कोरोना’वर मात शक्य : डॉ. हरीश पाटणकर यांचा दावा

पुणे :” कोरोनावर मात करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक्षमता चांगली असावी, असे जागतिक आरोग्य संघटनाही म्हणत आहे. मानवाची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याची ताकद आयुर्वेदामध्ये आहे. प्रत्येक शास्त्राची काही वैशिष्ट्ये असतात. मात्र, आयुर्वेदाने रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी ज्या उपचार पद्धती सांगितल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या प्राचीन शास्त्रावर विश्वास ठेवून या संसर्गाचा सामना आपण करायला हवा,” असे प्रतिपादन प्राचीन संहिता गुरुकुलाचे डॉ. हरीश पाटणकर यांनी केले.

आयुर्वेद आणि होमीयोपॅथीक उपचाराच्या साहाय्याने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विलगीकरण (क्वारंटाईन) केलेल्या ६ हजार रुग्णांच्या तपासण्या ‘निगेटिव्ह’ आल्या असल्याचे ‘आयुष’ मंत्रालयाने एका अहवालावात स्पष्ट केले आहे, असा दावा हि  डॉ. पाटणकर यांनी यावेळी बोलताना दिली. आयुष मंत्रालयानेही आयुर्वेदातील अनेक गोष्टीचा रोजच्या जीवनात अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.

डॉ. हरीश पाटणकर म्हणाले, “आयुष मंत्रालयाने दिलेल्या अहवालात ६००० रुग्णांपैकी केवळ ११ रुग्णांची चाचणी ‘पॉजिटीव्ह’ आली आहे. त्याचे कारणही त्यांनी सलग सात दिवस योग्यरीत्या उपचार पूर्ण केले नाहीत. यावरून हेच सिद्ध होते की, आयुर्वेदामुळे कोरोनाला ठरविण्याची क्षमता तुमच्याकडे येते. अशा स्थितीत आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्यांनी आयुर्वेदाचा चांगला उपयोग करून घ्यावा. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले किंवा पारंपारिक आजारांनी त्रस्त लोकांनी आपल्या आहारावर लक्ष द्यावे. चांगला आहार आणि नियमित व्यायाम करावा.”

प्रत्येक शास्त्राचे स्वतः चे असे काही चांगले व वाईट असे दोन्ही भाग असतात. त्यापैकी जेंव्हा आयुर्वेदाच्या बद्दल चांगल्या गोष्टी पहायच्या म्हटलं तर त्या नक्कीच आपल्याला रोग होऊ नये यासाठी व प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आलेल्या पाहायला मिळतील.
याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे कारण हे आपले , भारतीयांचे पूर्वापार चालत आलेले महत्वाचे आरोग्य शास्त्र आहे.चीन ने सुद्धा त्यांच्या पारंपरिक औषधांच्या मदतीनेच यावर नियंत्रण केलेल्याचे अनेक शोध पत्र वाचायला मिळतात.आपणही आपल्या शास्त्राचा फायदा या दुर्धर आजाराशी लढण्यासाठी वापरून सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन याला हरविले पाहिजे.
आयुष काढा म्हणून जो सध्या आयुष ने सर्वांसाठी सांगितला आहे, ज्यात तुळस , दालचिनी, सुंठ, मिरे घालून दोन वेळा किमान दिवसातून घ्यायला हवा. याने उत्तम रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय दिवसभर कोमट पाणी पिणे, हळद, मीठ पाण्याच्या गुळण्या करणे, रोज सकाळी एक चमचा च्यवनप्राश खाणे हेही आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.”

“थंड पदार्थ, बेकारीतील पदार्थ, बिस्कीट, बुरशीजन्य पदार्थ किंवा कफ वाढेल असे कोणतेही पदार्थ खाणे टाळायला हवे. कारण आयुर्वेदातील ‘घोस्ट आणि होस्ट थिअरी’नुसार कोरोना ‘घोस्ट’ असेल, तर आपल्या शरीरातील कफ हा उत्तम ‘होस्ट’ असणार आहे. त्यामुळे जास्त कफ असणारे लोक या संसर्गाच्या जाळ्यात अडकण्याचा धोका अधिक असतो,” असेही डॉ. पाटणकर यांनी नमूद केले.

डॉ. हरीश पाटणकर (९८२३६६१६९९)

सर्वाना सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करण्यात यावा -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे दि. 6 : पुणे जिल्हयातील पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी व देहूरोड छावणी परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत व पुणे ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये पेट्रोल, डिझेल पंपचालकांनी येणाऱ्या सर्व वाहनांना पास, ओळखपत्राची मागणी न करता सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करण्यात यावा. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल, डिझेल शासनाने वेळोवळी निर्गमित केलेल्या विहित वेळेमध्ये सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 13 मार्च 2020 पासून लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्याबाबतची नियमावली संदर्भि य 3 अन्वये प्रसिध्द केली आहे आणि जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केले आहे.
कोविड-19 विषाणूचा साथ संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणुन संदर्भिय 4 अन्वये गृह सचिव आणि अध्यक्ष राष्ट्रीय कार्यकारी समिती भारत सरकार, यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 10 (2) अन्वये संपुर्ण देशभरात मार्गदर्शक सुचना, आदेश लागु केलेले आहेत. या अनुषंगाने नागरिकांची गर्दी होवू नये आणि परस्पर संपर्क होवुन संसर्ग वाढु नये याकरिता जमाबंदी आदेश लागु केलेले आहेत आणि उपरोक्त संदर्भ क्र.1 व 2 अन्वये सदरचे लॉकडाऊनचे आदेशास 17 मे 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुणे जिल्हयातील पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी व देहूरोड छावनी परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत व पुणे ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये पेट्रोल, डिझेल पंपचालकांनी येणाऱ्या सर्व वाहनांना पास, ओळखपत्राची मागणी न करता सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करण्यात यावा. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल, डिझेल शासनाने वेळोवळी निर्गमित केलेल्या विहित वेळेमध्ये सुरु राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

पुणे विभागातील 673 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी-विभागात कोरोना बाधित 2 हजार 574 रुग्ण

-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 6 :- पुणे विभागातील 673 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 574 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 764 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 93 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 287 बाधीत रुग्ण असून 608 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 555 आहे. कोरोनाबाधित एकूण 124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्हयात 92 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 145 बाधीत रुग्ण असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 35 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 15 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 26 हजार 326 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 25 हजार 4 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 322 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 22 हजार 106 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 574 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 78 लाख 94 हजार 830 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 12 लाख 96 हजार 465 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत 24 मजूर राजस्थानकडे रवाना

पुणे दि. 6 : जिल्ह्याच्या व राज्याच्या विविध भागातून मजुरांचे पायी चालत जावून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
या उपाययोजनांचा एक भाग म्हणून मुळशी तालुक्यातील पिरंगुट ग्रामपंचायत क्षेत्रात मिळेल ते काम करणा-या राजस्थान येथील मजुरांना जिल्हा प्रशासनाने राजस्थानला जाण्यासाठी बसचे नियोजन केले. प्रशासनाचे नियोजन, सोशल डिस्टंसिंगचे अत्यंत काटेकोर पालन करत वैद्यकीय तपासणी केलेल्या या 24 मजुरांना आज दुपारी बसने राजस्थानकडे रवाना करण्यात आले. यावेळी तहसिलदार अभय चव्हाण, मंडळ अधिकारी सुहास कांबळे, तलाठी पासलकर व पिरंगुट ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुळशी तालुक्यातील पिरंगुट ग्रामपंचायत क्षेत्रात मिळेल ते काम करुन आपली उपजीविका भागविण्यासाठी कार्यरत असलेले राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील 24 मजुरांना आज त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने मजुरांसाठी निवारागृहे उभारली आहेत. लॉकडाऊन कालावधीत अनेक मजुरांना निवारा गृहांचा आधार मिळत आहे. तिस-या टप्प्यातील लॉकडाऊनमधे काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने आपल्या हाताला इथे रोजगार मिळेल, त्यामुळे आपण इथे राहू शकता, अशी विनंती प्रशासनाने मजुरांना केली. मात्र, मजुरांनी आजपर्यंत केलेल्या व्यवस्थेबाबत प्रशासनाचे आभार मानत गावाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. मजुरांच्या इच्छेवरून प्रशासनाने सर्व मजुरांची पिरंगुट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी व कागदपत्रांची पूर्तता करुन राजस्थान सरकारची परवानगी व जिल्हाधिकारी, पुणे यांची परवानगी घेत मजुरांसाठी बाडमेर जिल्ह्यातील आपल्या गावी जाण्यासाठी बसचे नियोजन केले. आज दुपारी ही बस मजुरांना घेवून राजस्थानकडे रवाना झाली.

एप्रिल महिन्यात ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत 72 टक्क्यांची वाढ; जून 2020 पर्यंत उत्पन्न दुपटीने वाढण्याची अपेक्षा.

0

मुंबई: तंत्रज्ञानाच्या आधारे उच्च शिक्षण देणाऱ्या ‘अपग्रेड’ या भारतातील सर्वात मोठ्या ‘एडटेक’ कंपनीने आपले 40 अभ्यासक्रम आता दर तिमाहीएवजी दरमहा सुरू करण्याचे ठरविले आहे. विविध क्षेत्रांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून या अभ्यासक्रमांसाठी मागणी वाढल्याने ती पूर्ण करण्यासाठी कंपनीने प्रवेशाच्या तारखा बदलल्या आहे. यामुळे कंपनीच्या अभ्यासक्रमांची क्षमताही दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे. प्रत्येक वर्गात शिकणाऱ्यांची संख्या आता एक हजार इतकी झाली आहे.

“ऑनलाईन अभ्याक्रमांचा वर्ग जितका मोठा असेल तितका तो ‘पीअर-टू-पीअर’ पद्धतीने चालवणे अधिक श्रेयस्कर असते. ‘ऑफलाइन’ पद्धतीपेक्षा हे अगदी उलट आहे,’’ असे ‘अपग्रेड’चे सह-संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष रॉनी स्क्रूवाला यांनी सांगितले.

“मागील महिन्यात आमच्या ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी 5 लाख जणांनी नोंदणी केली. हा आकडा गाठणे हे सामान्य काम नाही. आमचे प्रति विद्यार्थी शुल्क सरासरी अडीच लाख रुपये असते, हे येथे लक्षात घेता येईल. 10 कोटी इतक्या संख्येने कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांना व पदवीधरांना शिक्षण देण्याची आम्हाला संधी आहे आणि या आमच्या व्यवसायाची ही तर सुरुवात आहे,’’ असेही स्क्रूवाला म्हणाले.

‘अपग्रेड’चे वार्षिक उत्पन्न 500 कोटी रुपये आहे. या तिमाहीत या दरापेक्षा अधिक उत्पन्न कंपनीला मिळेल, अशी अपेक्षा आहे. अनेक महाविद्यालयांना व विद्यापिठांना कंपनीतर्फे थेट शिक्षण मंच (लाइव्ह लर्निंग प्लॅटफॉर्म्स) विनामूल्य प्रदान करण्यात येणार आहे. त्यायोगे ‘कोविड-19’च्या साथीच्या काळात त्या संस्थांच्या विद्यार्थांना अखंडपणे शिक्षण घेता येईल. या कालावधीत कंपनीने सुरू केलेल्या 350 तासांच्या विनामूल्य अभ्यासक्रमांसाठी 10 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली अहे.

अपग्रेडबद्दल:

सन 2015च्या सुरुवातीस स्थापन झालेल्या ‘अपग्रेड’तर्फे विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सादर करण्यात येतात. गेल्या सुमारे 5 वर्षांच्या अल्प कालावधीत,’ अपग्रेड’ने 53 हजार विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे आणि जगभरातील 5 लाखांहून अधिक जणांना अप्रत्यक्षपणे शिकवले आहे. यामुळे आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारतीय बाजारपेठेतून मिळणाऱ्या कमाईच्या आधारावर ही देशातील सर्वात मोठी ऑनलाइन उच्च-शिक्षण कंपनी बनली आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार-वर्ग आणि कंपन्या यांच्यासाठी डेटा सायन्स, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट आणि एमबीए या क्षेत्रातील अभ्यासक्रम ‘अपग्रेड’तर्फे चालविण्यात येतात. आयआयटी मद्रास, आयआयआयटी बंगळूर, बिट्स पिलानी, एमआयसीए, एनएमआयएमएस ग्लोबल अक्सेस, ड्यूक सीई, डॅकिन युनिव्हर्सिटी, लिव्हरपूल जॉन मूरस युनिव्हर्सिटी यांसारख्या उत्कृष्ट विद्यापीठांच्या सहकार्याने हे अभ्यासक्रम रचण्यात आले आहेत. शिकण्याच्या अनुभवामध्ये आणखी वाढ करण्यासाठी, ‘अपग्रेड’ने एक व्यापक प्रणाली तयार केली आहे. यामध्ये वैयक्तिक मार्गदर्शक, ‘पीअर-टू-पीअर लर्निंग’, ‘इंडस्ट्री नेटवर्किंग’ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांचे करियर पुढील स्तरावर उंचावण्यासाठी तज्ञ करिअर मार्गदर्शकांद्वारे सर्वांगीण मदत, यांचा समावेश करण्यात आला आहे.

या कंपनीला 2019 मध्ये आयएएमएआयतर्फे ‘बेस्ट टेक फॉर एज्युकेशन’ हे पारितोषिक देण्यात आले. ‘इकॉनॉमिक टाइम्स’कडून ‘बेस्ट एज्युकेशन ब्रॅन्ड्स’, ‘फास्ट कंपनी’तर्फे 2017 मध्ये ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह कंपनीज इन इंडिया’ हे सन्मान ‘अपग्रेड’ला मिळाले आहेत. ‘लिंक्डइन’तर्फे ‘टॉप 25 स्टार्टअप्स’ या श्रेणीत 2018 व 2019 या दोन्ही वर्षी पारितोषिक मिळवण्याचा मान ‘अपग्रेड’ने पटकावला आहे.

लॉकडाऊनमध्ये खरीपाची कामे सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

0

मुंबई, दि.६ : राज्यात खरीप हंगामासाठी सुमारे १६ लाख बियाण्यांची आवश्यकता असून सध्या १७ लाख २७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. यंदा राज्यात सोयाबीनचे ४० लाख हेक्टर क्षेत्र अपेक्षित असून त्यासाठी ११ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत तर कापसाची लागवड ४१ लाख हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित आहे. कृषि विभागाने खरीप हंगामासाठी तयारी पूर्ण केली आहे. विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये खरीपाशी निगडीत कामे सुरळीत होतील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा आज कृषिमंत्री भुसे यांनी घेतला. यावेळी विभागाचे सचिव एकनाथ डवले, सहसचिव गणेश पाटील उपस्थित होते. मंत्रालयात झालेल्या बैठकीतून कृषिमंत्र्यांनी कृषि आयुक्त, संचालक, सहसंचालक यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

राज्यात खरीपाचे १४० लाख हेक्टर क्षेत्र असून बियाणे बदलानुसार १६ लाख १५ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि खासगी उत्पादक यांच्या माध्यमातून १७ लाख २७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.

राज्यात तृणधान्य लागवड ३६ लाख २ हजार हेक्टर क्षेत्रावर तर कडधान्य लागवड २० लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्याचे नियोजन असून ४२ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर तेलबिया लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
कापसासाठी १ कोटी ७० लाख बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता असून कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांनी २ कोटी ७२ लाख पाकिटाच्या पुरवठ्याचे नियोजन केले आहे.

खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व कृषी सेवा केंद्रे तसेच कृषी अवजारे विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने पूर्ण वेळ उघडी राहतील तसेच या दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शेतमजुरांना कामासाठी ये-जा करणे सहजसुलभ व्हावे तसेच शेतीविषयक व्यवसायातील व्यक्ती आणि संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी कृषी विभागाने दिलेली प्रवेश पत्रे ये-जा करण्यासाठी  ग्राह्य धरण्यात यावीत, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने याकाळात कोणती दक्षता घेतली पाहिजे यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश यावेळी कृषिमंत्र्यांनी दिले.
000000

लॉकडाऊनचा काळात ‘मनरेगा’चा ग्रामीण भागातील लाखोंना रोजगार

0

मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देणारी एकमेव योजना

 राज्यात ४२ हजार २९२ कामांवर ३ लाख ८२ हजार मजूर; सात हजार कामे पूर्ण, ४० कोटी रुपये मजुरी वाटप

नागपूर, दि. ६ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यातील 3 लाख 81 हजार 930 लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या या योजनेमुळे रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात  सुटला आहे.  त्यामुळे कामासाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नसल्याची माहिती राज्याचे मनरेगा आयुक्त ए.एस.आर. नायक यांनी आज दिली.

लॉकडाऊनमुळे उद्योग व व्यापारावर अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच शेतकरी व शेतमजूर यांच्यासोबत उपजीविकेचा प्रश्न बिकट होऊ लागला आहे. या घटकांना दिलासा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरुपाच्या एकूण 35 हजार कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध झाली आहे. या कामांवर 14 लाख मनुष्यदिन रोजगारनिर्मिती झाली आहे. राष्ट्रीय पातळीपेक्षा राज्यात 4.2 टक्के एवढी जास्त कामे सुरु झाली आहे.

मनरेगाच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ देण्याचा संकल्प असल्यामुळे तात्काळ कामे सुरु करण्यात आली. दिनांक 4 एप्रिल रोजी राज्यात 19 हजार 509 मजूर विविध कामांवर होते. परंतु एक महिन्यानंतर म्हणजेच 4 मे रोजी 3 लाख 81 हजार 930 मजूर राज्याचा विविध भागात वैयक्तिक तसेच सामूहीक स्वरुपाच्या 43 हजार 292 कामांवर उपस्थित आहे. मजुरांची ही संख्या सातत्याने वाढत असून प्रत्येक तालुकास्तरावर मागणी नुसार कामांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यात 7 हजार विविध प्रकारचे कामे पूर्ण झाली असून कामावर असलेल्या प्रत्येकाला 15 दिवसाच्या आत त्यांची मजुरी थेट बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यात येत आहे. आतापर्यंत मजुरीपोटी 40 कोटी रुपयाचे वाटप पूर्ण झाले आहे. राज्यातील सरासरी 96 टक्के मजुरांना वेळेवर मजुरीची रक्कम दिली आहे. तसेच इतर कामांवर 78 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती मनरेगा आयुक्त ए.एस.आर.नायक यांनी दिली.

मनरेगाअंतर्गत ग्राम पंचायतस्तरावर कामांचे नियोजन करण्यात येत असल्यामुळे गावांमध्ये अत्यावश्यक तसेच शेतीसाठी आवश्यक असलेल्या वैयक्तिक  कामांची निवड करणे सुलभ झाले आहे. रोजगार हमीच्या कामांवर पूर्वी 206 रुपये मजुरीचा दर होता. परंतु 1 एप्रिलपासून या दरात वाढ करण्यात आली आहे. प्रतिदिन 235 रुपये याप्रमाणे किमान मजूरी देण्यात येते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकामाला प्राधान्य देण्यात आले असून राज्यात मोठ्या प्रमाणावर बांधकाम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी मनरेगाअंतर्गत कामांना सुरुवात करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याच्या विविध भागात 43 हजार 400 कामे सुरु असून यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 21 हजार 457 कामांचा समावेश आहे. फळबाग योजनेअंतर्गत 6 हजार 569, वृक्ष लागवड 5 हजार 442, सिंचन विहिरी 3 हजार 604, तुती लागवड 947, ग्रामीण भागातील रस्ते 219, नर्सरी, नाला सरळीकरण, गुरांचा गोठा, शोषखड्डे व इतर अशी 5 हजार 162 कामे सुरु आहेत. सर्वाधिक कामे अमरावती 43 हजार 578 मजुरांची उपस्थिती आहे. भंडारा – 40 हजार 453, पालघर – 28 हजार 597, गडचिरोली – 28 हजार 904, बीड – 27 हजार 855, चंद्रपूर – 27 हजार 326, नंदूरबार – 13 हजार 590, नाशिक – 14 हजार 163, यवतमाळ 13 हजार 472, जालना – 12 हजार 143, अहमदनगर – 10 हजार 430 तर इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मजूर कामावर उपस्थित आहेत. मजुरांची उपस्थिती सातत्याने वाढत असून त्याप्रमाणे कामांचे सुद्धा उपलब्धता करुन देण्यात आली आहे.

लॉकडाऊनचा पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामांना सुरुवात केली आहे. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या तसेच सामूहिक विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना वरदान ठरत आहे.

राज्यात आयसीयू बेड्सची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी

0

रेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्ट यांना विनंती

राज्यभरातील केंद्रीय संस्थांनी त्यांच्या सुविधा देण्याचे आवाहन

मुंबई दि ६: गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करीत असून विविध उपाययोजना करीत या साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेगही लक्षणीयरित्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे मात्र नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य शासनाने रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये व संस्था यांना त्यांच्या राज्यभरातील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: वरिष्ठ पातळीवर बोलत आहेत.

सध्या रुग्णांची संख्या वाढत असून रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढते आहे. पण केंद्र शासनाने मे महिन्यात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली असल्याने राज्य शासनाने मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये आयसोलेशन आणि आयसीयु  बेड्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील याचे नियोजन केले आहे. त्यानुसार मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू सायन्स सेंटर, नेहरू तारांगण, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर, जेजे रूग्णालयाजवळील रिचर्डसन कृडास फॅक्टरीची जागा, वांद्रे कुर्ला संकुल आदि ठिकाणी आयसोलेशन आणि आयसीयू बेड्सची सुविधा निर्माण केली आहे तसेच राज्यात इतरत्रही मोठ्या शहरांमध्ये पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवरही सुविधा उपलब्ध होत आहे. यामध्ये राज्यात खासगी रुग्णालये व मोठ्या संस्थांच्या जागाही आयसीयू बेड्ससाठी उपलब्ध होत आहेत.

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर आता राज्याराज्यातून महाराष्ट्रातले नागरिक यायला सुरुवात झाली आहे तसेच परदेशांतून देखील नागरिक परतायला सुरुवात होईल. रुग्णसंख्या अधिक वाढल्यास जास्त आयसीयू बेड्सची गरज लागेल तसेच इतर वैद्यकीय सुविधा लागतील हे गृहीत धरून राज्य शासनाने भारतीय रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर, नेव्ही यांना त्यांच्या रुग्णालयांच्या जागा, तसेच त्यांच्या अखत्यारीतील इतर मोठ्या इमारती व जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती केली आहे. असे झाल्यास वाढीव रुग्णांना विलगीकरण करून ठेवता येणे शक्य होईल.