Home Blog Page 2588

छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, विद्वत्ता संघर्षाचा इतिहास महाराष्ट्राला प्रेरणा देत राहील – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. १४ :- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्य, स्वाभिमान, स्वराज्यबाणा, पुरोगामी विचार दिला. ते निष्णात योद्धे, प्रकांड पंडित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी सलग नऊ वर्षे संघर्ष केला. स्वराज्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांचा संघर्षमय इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज अखेरच्या श्वासापर्यंत लढले. छत्रपती संभाजी महाराज राज्यकारभारात, युद्धनीतीमध्ये कुशल होते. मराठीसह हिंदी, संस्कृत भाषांवर त्यांचं प्रभुत्व होते. त्यांची ग्रंथसंपदा ही त्यांच्या असामान्य विद्वत्तेचं अलौकिक बुद्धीमत्तेचं उदाहरण आहे. छत्रपती संभाजीराजांनी रणांगणावर शौर्य गाजवलं. युद्धनीती, राजनीती कौशल्यांचा उपयोग करुन नऊ वर्षे मोगल, आदिलशाहा, सिद्दी, पोर्तुगीज, तसंच अंतर्गत शत्रूंविरुध्द लढा दिला. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांनी दिलेला लढा, केलेला संघर्ष महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यात ॲक्टीव (प्रत्यक्ष ) रुग्णसंख्या झाली 1 हजार 949

पुणे विभागातील 1 हजार 697 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 3 हजार 849 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 14 :- पुणे विभागातील 1 हजार 697 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 849 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 949 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 203 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 127 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्हयात 94, सोलापूर जिल्हयात 9, सातारा जिल्हयात 1 तर व कोल्हापूर जिल्हयात 3 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 3 हजार 352 बाधीत रुग्ण असून 1 हजार 533 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 641 आहे. कोरोनाबाधित एकूण 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 116 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्हयातील 124 कोरोना बाधीत रुग्ण असून 39 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 83 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 308 कोरोना बाधीत रुग्ण असून 87 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 200 आहे. कोरोनाबाधित एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 41 कोरोना बाधीत रुग्ण असून 29 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 24 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 40 हजार 438 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 37 हजार 552 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 876 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 33 हजार 654 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 3 हजार 849 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 2 लाख 20 हजार 936 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 41 लाख 94 हजार 348 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 635 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

प्रत्येक राज्यात लागू होणार ‘वन-नेशन वन-रेशन कार्ड’ योजना-निर्मला सीतारामन

0

नवी दिल्ली -देशातल्या प्रत्येक राज्यात वन-नेशन वन रेशन कार्ड योजना लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातली घोषणा केली. या योजनेचा फायदा ६७ कोटी लोकांना फायदा होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ही योजना लागू झाल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही कार्ड धारकाला देशातल्या कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेण्याची मुभा असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

काय आहे वन नेशन वन रेशन कार्ड योजना?

वन नेशन वन रेशन कार्ड ही मोदी सरकारची महत्त्वांकाक्षी योजना आहे. ही योजना लागू झाल्यानंतर कोणताही रेशनकार्डधारक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही राज्यातल्या रेशन डेपोवरुन धान्य घेऊ शकतो. समजा एखादा माणूस महाराष्ट्रात कामगार म्हणून आला आहे. तो परप्रांतीय आहे. तर ही योजना लागू झाल्यानंतर त्याला महाराष्ट्रातल्या रेशन दुकानातही तेच कार्ड दाखवून रेशन मिळू शकणार आहे. या योजनेनुसार लाभार्थ्यांची ओळख ही त्यांच्या आधार कार्डवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल डिव्हाइसद्वारे केली जाऊ शकते. कारण यामध्ये लाभार्थ्यांची माहिती फिड करण्यात आली आहे.

निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतले ठळक मुद्दे

लघु आणि मध्यम शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी ३० हजार कोटींची मदत, नाबार्ड अंतर्गत मिळणाऱ्या मदतीशिवाय ही मदत मिळणार

मोलकरीण, फेरीवाले, ट्रेनमध्ये वस्तू विकणारे यांच्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत कमी भाडे असणारी घरं उपलब्ध करुन देणार

वन नेशन वन रेशन कार्ड योजना राबवली जाणार

स्थलांतरित मजुरांना २ महिने मोफत अन्नधान्य पुरवलं जाणार

रात्रपाळी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष सहाय्य

मजुरांच्या मजुरीतील तफावत कमी करणार

निर्मला सीतारामन यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय

  • MSME ची व्याख्या बदलण्यात आली आहे. त्यामुळे स्क्षूम, लघु, मध्यम आणि कुटीर उद्योगाचा विस्तार होत असेल तर त्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्यांना MSME चे सर्व लाभ मिळतील.
  • आधी २५ लाख गुंतवणूकीचा उद्योग MSME समजला जात होता. पण आता एक कोटी पर्यंत गुंतवणूक असलेल्या उद्योगांचा MSME मध्ये समावेश करण्यात आला आहे.
  • सरकारला २०० कोटी रुपयापर्यंत खरेदी करायची असेल तर त्यामध्ये जागतिक कंपन्यांना निविदा भरता येणार नाहीत. मेक इन इंडियाला चालना देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजतंर्गत पीएफ फंडात कंपनीकडून देण्यात येणारे १२ टक्के आणि कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येणारे १२ टक्क्याचा भार सरकार भरणार आहे.३.६७ लाख कंपन्या आणि ७२.२२ लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल. यामुळे उद्योगांना २५०० कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे.
  • इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
  • शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी नाबार्ड ग्रामीण बँकांना अतिरिक्त ३० हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार. तीन कोटी शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल.
  • सर्व स्थलांतरित मजुरांना पुढच्या दोन महिन्यांसाठी मोफत धान्य देण्यात येईल. रेशन कार्ड नाही अशा कुटुंबांना सुद्धा पाच किलो तांदूळ/गहू आणि एक किलो चणे पुढचे दोन महिेने मोफत देण्यात येतील.
  • ८ कोटी प्रवासी मजुरांना याचा फायदा होईल. यासाठी येणारा ३५०० कोटी रुपये खर्चाचा सर्व भार केंद्र सरकार उचलेल.
  • एक देश, एक रेशन कार्डची यावेळी घोषणा करण्यात आली. या योजनेचा  ६७ कोटी लोकांना फायदा होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ही योजना लागू झाल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही कार्ड धारकाला देशातल्या कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेण्याची मुभा असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
  • रस्त्यावरच्या फेरीवाल्यांसाठी पाच हजार कोटी रुपयापर्यंत कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे. १० हजार रुपयांपर्यंत त्यांना भांडवल देण्यात येईल.
  • गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी सहा ते १८ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी २०१७ साली आणलेली हाऊसिंग लोन सबसिडी योजना ३१ मार्च २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. आतापर्यंत ३.३ लाख कुटुंबांनी याचा फायदा घेतला आहे. आणखी २.५ लाख लोकांना या योजनेचा फायदा होईल. बांधकाम साहित्य, स्टील यांची मागणी वाढल्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल.
  • मच्छीमार आणि पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सुद्धा किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज मिळणार आहे.

विधान परिषद निवडणूक: उद्धव ठाकरेंसह सर्व उमेदवार बिनविरोध

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आज, गुरुवारी अधिकाऱ्यांनी दिली.

  • पक्षनिहाय उमेदवार
    शिवसेना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नीलम गोऱ्हे
    राष्ट्रवादी – शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी
    भाजप – प्रवीण दटके , रमेश कराड, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडाळकर
    काँग्रेस – राजेश राठोड

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, भाजपचे रणजीतसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दाटके आणि रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.विधान परिषदेसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दुपारी ३ नंतर संपली. त्यानंतर अधिकृत निकाल घोषित केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, राज्यावर करोनाचं संकट गहिरं झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः प्रयत्नशील होते.आता उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्य विधी मंडळाच्या एका सभागृहाचे सदस्य झाले आहेत. ते पहिल्यांदाच विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणार आहेत. गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यानी नोव्हेंबरमध्ये राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. ते राज्य विधी मंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे प्रतिनिधी नसल्यानं २७ मे २०२० पूर्वी त्यांना एका सभागृहाचे सदस्य होणे गरजेचे होते.

 

महाराष्ट्रातील हॉटस्पॉटमध्ये लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे ठाकरे सरकार ?

0

मुंबई. महाराष्ट्रासह देशभरातील लॉकडाउनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपुष्टात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा लॉकडाउन वाढणार असल्याचे मंगळवारीच स्पष्ट केले. परंतु, हा लॉकडाउन आधीपेक्षा वेगळा राहील असे देखील सांगण्यात आले. तरीही कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील हॉटस्पॉटमध्ये असलेल्या यात दिलासा मिळणार नाही. कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनवर घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवण्यावर विचार करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थांंशी संवाद साधताना राज्यातील लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढणार असे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची गुरुवारी बैठक घेण्यात आली. यामध्ये 17 मे नंतरचे लॉकडाउन आणि निर्बंध कसे असतील त्यावर चर्चा करण्यात आली. यातच “मुंबई आणि उपनगरांमध्ये, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, मालेगाव आणि नाशिकमध्ये 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार आपले मत केंद्र सरकारला लेखी स्वरुपात कळवणार आहे.” उल्लेखनीय बाब म्हणजे, मोदींनी जनतेशी मंगळवारी संवाद साधला. त्याच्या 24 तासांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत 6 तास व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी मोदींना लॉकडाउन आणखी वाढवणे आणि निर्बंध कमी करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी साधलेल्या संवादानंतर त्या सर्वांची मते मागवण्यात आली होती. सर्वच राज्यातील परिस्थिती आणि राज्य सरकारांची मते जाणून घेतल्यानंतर केंद्र सरकार चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनवर गाइडलाइन जारी करणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, जल संपदा मंत्री जयंत पाटील, शहरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते.

आंबील ओढा पुन्हा धोक्यात ? पुन्हा हवा आहे वरुणराजाचा कोप ..हाहाकाराची काळ रात्र ?

पुणे-कात्रज ची पेशवेकालीन धरणे ते मुठा नदीपर्यंत  निसर्गावर केलेल्या कॉंक्रीटच्या प्रहाराचे,  काही जीव गामावून ,लाखोंचे मोल दिल्यानंतरही पुणेकरांना याबाबतची गंभीरता लक्षात आली कि नाही ?असे वाटावे अशी परिस्थिती आहे अगदी कात्रजच्या धरणालगत जंगल नष्ट करून उभे करण्यात आलेले  लेक टाऊन पासून ते संपूर्ण आंबील ओढ्यावरील अतिक्रमणांना एवढे जीव जाऊन , एवढे सरकारी मोल देऊन हि कोणताही धोका पोहोचल्याचे दिसून आलेले नाही .काटकोनात वळविलेला नाला तेव्हा न पाहता बिल्डरला लाखो रुपये मोजून करोडोच्या सदनिका घेतलेले जेव्हा आपल्या मोटारी बुडाल्या तेव्हा जागे झाले आणि आता पुन्हा झोपले कि काय ? असा प्रश्न उपस्थित व्हाह अशीच स्थिती कायम आहे .गेल्यावर्षी झालेला महापूर आणि झालेली हानि  याची आठवण येता असे प्रश्न निर्माण होत आहे.

या भागातील  नगरसेविका अश्विनी कदमांच्या पुढाकाराने महापालिकेतील नगर अभियंता  प्रशांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात आंबील ओढ्याला दिनांक 25सप्टेंबर 2019 रोजी आलेल्या पुराच्या अनुषंगाने दिनांक16मार्च २०२० रोजी  बैठक झाली . मलनिस्सारण विभागाचे अधीक्षक अभियंता  प्रविण गेडाम   उद्यान अधीक्षक घोरपडे  बांधकामविभागाच्या हर्षदा शिंदे , सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे  लखानी , व प्राईममूव्ह संस्थेचे  विशाल उजागरे इत्यादी अधिकारी या  बैठकीस उपस्थित होते. यावेळी अनेक मुद्द्यांवर  चर्चा होऊन कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले होते.परंतु आजपर्यंत तरी  या संदर्भामध्ये ठरविण्यात आलेली कोणतीही कामे पूर्ण झालेली नाहीत.पावसाळा पंधरा-वीस दिवसांवर आलाय, पण पूर आला तेव्हा जेवढी अतिक्रमणे होती तेवढीच अतिक्रमणे आंबील ओढ्यावर अजूनही आहेत . त्याची रुंदी-खोली वाढवलेली नाही ,पुलांची उंची वाढवलेली नाही , अनावशक लोखंडी पूल काढून टाकलेले नाहीत . नाल्यातील सीमा भिंतीची कामे असो,ड्रेनेज लाईन,चेंबर असो किंवा इतर कामे ही जागेवर झालेलीच नाहीत.

जी कामे प्रशासनाने करायची ठरवली ती देखील झाली नाहीत हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. अन्यथा लोक तर फ्लॅॅट घेताना पहात नाहीत आजू बाजू च्या निसर्गावर प्रहार करून ,निसर्गावर अगणित वार करून उभी राहिलेल्या बिल्डींग मध्ये फ्लॅॅट घेतून त्यांना मोठा मोठेपणा प्राप्त झाल्याचा आनंद होतो . करोडो रुपयांच्या नोटांचा  पूर  बिल्डर घेऊन जातो आणि नंतर आता होऊ नये तसं घडू लागलंय, निसर्गाकडून

आता या मानवी वृत्तीच्या दानाची परतफेड होऊ लागलीय . अधिकाऱ्यांना,प्रशासनाला दोष देणे सोडा ,पण दुर्दैवाने माणसेदेखील अजूनही जागी झाली नाहीत.निसर्गाचा कोणता कोप त्यांना अपेक्षित आहे तेच जाणोत .

 

पुणे विभागात ३० हजार ८८७ क्विंटल अन्नधान्याची आवक

पुणे, दि. 14 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 30 हजार 887  क्विंटल अन्नधान्याची तर  9 हजार 272 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.  विभागात 3 हजार 265 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक 6 हजार 934  क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात 13 मे 2020 रोजी 101.260 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.946 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 12 हजार 670 स्थलांतरित मजुरांची सोय

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 125 कॅम्प, कामगार विभागामार्फत 56  कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 14 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 195  रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 12 हजार 670 स्थलांतरित मजूर असून  75 हजार 560 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शिवाजीनगर परिसरातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची केली पाहणी

पुणे- शिवाजीनगर-घोले पाटील क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या पाटील इस्टेट, संगमवाडी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक तसेच जुना तोफखाना परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी संयुक्तरित्या या परिसरातील उपाययोजनांबाबतची पाहणी केली. प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे राबवा व कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

शिवाजीनगरलगतच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या पाहणी दरम्यान महानगरपालिकेच्या वॉर्ड अधिकारी श्रीमती शिंदे, आरोग्य अधिकारी, परिचारिका तसेच कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासणीवर भर देणे गरजेचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करावे, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेवर भर देण्यासोबतच नागरिकांनी मास्क व सॅनिटायझर वापरणे आवश्यक आहे. प्रतिबंधित परिसरातील नागरिकांची गतीने आरोग्य तपासणी करा तसेच निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कुणाला येथून बाहेर जाता येणार नाही अथवा बाहेरून या ठिकाणी येता येणार नाही याबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकचे वॉर्ड अधिकारी श्रीमती शिंदे यांनी महापालिकेच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी पुणे महानगरपालिका तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

सनदी लेखापाल अर्थकारणाचा ‘ऑक्सिजन’

जय छायरा यांचे मत; ‘आयसीएआय’तर्फे लाईव्ह वेबिनारद्वारे करिअर कौन्सलिंग

पुणे : “माणसाला जगण्यासाठी जसा ऑक्सिजन महत्वाचा आहे. तसाच देशाच्या अर्थकारणाला आकार देण्यासाठी सनदी लेखापाल (सीए) गरजेचा असतो. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या ‘सीए’ना देशासह परदेशातही मोठ्या संधी आहेत. त्यामुळे बारावीनंतर कोणीही सीए होऊ शकतो आणि आपल्या करिअरला योग्य वळण देऊ शकतो,” असे मत दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कौन्सिलचे सदस्य सीए जय छायरा यांनी व्यक्त केले.

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स व सीए क्षेत्रातील संधी या विषयावर ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेतर्फे वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) आणि ‘आयसीएआय’ अभ्यास मंडळाच्या सहकार्याने युट्युबवरून लाईव्ह वेबिनारद्वारे मोफत करिअर मार्गदर्शन सत्र आयोजिले होते. विदयार्थी आणि पालकांच्या मनातील अनेक शंकाचे निरसन करण्यासह सीएची भूमिका, सीएचे महत्त्व, सीए नंतर विविध क्षेत्रातील संधी, सीए होण्यासाठीची तयारी कशी करावी, याबाबत माहिती देण्यात आली.
‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘डब्ल्यूआयआरसी’ खजिनदार सीए आनंद जाखोटीया, सीए प्रसन्नकुमार, सीए के. डी. गारगोटे, सीए एम. एस. जाधव, पुणे शाखेचे चेअरमन सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव व खजिनदार सीए काशीनाथ पठारे आदींनी यात मार्गदर्शन केले.
सीए जय छायरा म्हणाले, “करिअरची निवड पुन्हा पुन्हा करता येत नाही. त्यामुळे हा टप्पा महत्वाचा असतो. तीन टप्प्यात सीए पूर्ण करता येते. वर्षातून दोनदा या परीक्षा होतात. सीएनंतर तुम्हाला उद्योग, सरकारी क्षेत्रात नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करता येतो. सीएला अमेरिका, युरोप, आफ्रिका आदी देशांतही मोठ्या संधी आहेत. सीए करण्यासाठी कॉमर्स असलेच पाहिजे, असे नाही. विज्ञान किंवा अभियांत्रिकीचे विद्यार्थीही सीए करू शकतात. सीएबरोबर पदवी घेता येते. तंत्रज्ञानामुळे सीए क्षेत्रातही विविध पर्याय खुले झाले आहेत. आज ५० हजारपेक्षा अधिक सीए विविध देशांत काम करत आहेत.”
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सीएचा अभ्यासक्रम आवाहनात्मक असला, तरी अवघड नाही. अगदी सामान्य कुटुंबातले विद्यार्थीही या परीक्षेत यश मिळवू शकतो. सीए इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. डिजिटल हबमुळे अभ्यासक्रम, लेक्चर्स उपलब्ध झाले आहेत. अतिशय कमी खर्चात होणारा हा अभ्यासक्रम असल्याने आपल्यातील जिद्द जागृत ठेवून याचा अभ्यास करावा.”
प्रसन्नकुमार म्हणाले, “सीए देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान देणारा घटक आहे. यामध्ये येऊन देशसेवा करण्याची संधी मिळते. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत. कॉमर्स अलिम्पियाड सारख्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावा.” एम. एस. जाधव यांनी सनदी अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक शिक्षणावर भर दिला जातो. शिवाय विद्यार्थ्यांना काम करता करताही शिकता येते. त्यामुळे आपल्या जीवनाची दिशा ठरवून त्यानुसार सीएच्या अभ्यासक्रमाला यावे, असे सांगितले.
सीए अभिषेक धामणे यांनी वेबिनारचे संचालन केले. सीए समीर लड्ढा यांनी यांनी आभार मानले.

बेंगळुरू, पुण्यातील रिअल इस्टेट बाजार सावरणार जलद गतीने

‘मॅजिकब्रिक्स ग्राहक सर्वेक्षणा’तील निरीक्षण

· ‘कोरोना’च्या संकटामुळे घरखरेदीचा निर्णय रद्द करण्याचे ग्राहकांचे प्रमाण बेंगळुरू व पुण्यात सर्वात कमी

· घरांच्या जास्त किंमतींमुळे दिल्ली/एनसीआर व मुंबईतील ग्राहकांमध्ये घरखरेदीबाबत अनिश्चितता

नोएडा – ‘कोविड-19’च्या उद्रेकामुळे देशभरातील रिअल इस्टेट व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असला, तरी बेंगळुरू व पुण्यातील ग्राहकांच्या मनस्थितीवर त्याचा कमीतकमी परिणाम झालेला दिसतो. दिल्ली/एनसीआर व मुंबईतील ग्राहकांमध्ये मात्र तेथील घरांच्या किंमतींच्या मुद्द्यामुळे अनिश्चितता आहे, असे निरीक्षण ‘मॅजिकब्रिक्स कोविड-19 प्रॉपर्टी बायर्स सेंटिमेंट सर्व्हे’मध्ये मांडण्यात आले आहे.

‘मॅजिकब्रिक्स’च्या सर्वेक्षणानुसार, मोठ्या शहरांमध्ये ग्राहकांच्या घरखरेदीच्या 80 टक्के निर्णयांवर ‘कोविड-19’च्या प्रसाराचा तात्पुरता परिणाम झालेला आहे; तथापि पुणे व बंगळुरू या शहरांतील ग्राहक ‘कोविड-19’ची साथ ओसरल्यावर घरखरेदी करण्यावर ठाम आहेत. दिल्ली/एनसीआर व मुंबई येथील बाजारपेठा टाळेबंदीपूर्वी मंदावल्या होत्या व टाळेबंदीनंतरही ही परिस्थिती तशीच राहील, अशी चिन्हे आहेत.

‘कोविड-19’मुळे घरखरेदी लांबणीवर पडण्याचा अंदाजे कालावधी

ग्राहकांच्या मनस्थितीबाबतच्या या सर्वेक्षणाविषयी बोलताना ‘मॅजिकब्रिक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पै म्हणाले, ‘’कोविड-19चा उद्रेक व त्यानंतरची टाळेबंदी यांमुळे भारतातील रिअल इस्टेट बाजारपेठेवर मोठा परिणाम झालेला आहे. तथापि आमच्या सर्वेक्षणानुसार, 67 टक्के ग्राहक अजूनही घरखरेदी करण्यास अनुकूल आहेत. त्यांनी यासाठी थोडे काटकसरीचे धोरण आखले असले, तरी ते घरखरेदीबाबत ठाम आहेत. बेंगळुरू व पुणे येथील बाजारांत प्रत्यक्ष वापरकर्त्या ग्राहकांचे वर्चस्व असते. गेल्या 6 महिन्यांत या बाजारात चांगली उलाढाल झालेली आहे. ही उलाढाल यापुढेही अशीच चालू राहील, असे या बाजारातील वातावरण आहे. तयार घरे घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला असल्याने, जलद आणि पुरेसा पुरवठा झाल्यास या बाजारांत पुन्हा जोम निर्माण होण्याल मदत होईल.’’

यापुढील काळात घरांच्या किंमती कशा असतील, याविषयी खूप निश्चितता असली, तरी टाळेबंदीच्या काळातही बेंगळुरू (5 टक्के) आणि पुणे (2 टक्के) या शहरांमध्ये किंमतींमध्ये किरकोळ स्वरुपाचीच घट झाली आहे. तुलनेने हैदराबाद व अहमदाबाद येथील बाजारांत किंमतींमध्ये टाळेबंदीच्या काळात जास्त घट झालेली आढळते. या दोन्ही शहरांमध्ये गेल्या वर्षभरात घरांच्या किमती बऱ्यापैकी वाढलेल्या होत्या. हैदराबादमधील किंमती गेल्या 12 महिन्यांत त्याअगोदरच्या वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढल्या होत्या, मात्र टाळेबंदीच्या कालावधीत त्या तब्बल 9 टक्क्यांनी घसरल्या. त्याचप्रमाणे अहमदाबादमधील किंमती गेल्या 12 महिन्यांत अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत 8 टक्क्यांनी वाढल्या होत्या, मात्र टाळेबंदीमध्ये 7 टक्क्यांनी घसरल्या.

देशातील 8 मोठ्या शहरांमध्ये सरासरी 4 टक्क्यांनी सध्या किंमती उतरलेल्या आहेत; अर्थात बेंगळुरू, अहमदाबाद, पुणे व चेन्नई येथील ग्राहकांनी, टाळेबंदीच्या काळात किंमतींमध्ये चढउतार होतील, असे गृहीत धरलेले आहे.

किंमतींबद्दल अनिश्चितता वाटणार्‍या ग्राहकांची शहरांगणिक टक्केवारी

‘कोविड-19’चे संकट दूर झाल्यानंतर घरांच्या किंमतींवर सवलती मिळतील, या आशेने बहुसंख्य नागरिकांनी खरेदीची इच्छा बाळगली असल्याचे ‘मॅजिकब्रिक्स’ला आढळून आले आहे. घरांची खरेदी पुन्हा जोमाने सुरू होण्याकरीता 20 टक्के सवलत देणे पुरेसे होईल. तसेच किमती 10 ट्क्क्यांपेक्षा कमी उतरल्या, तर केवळ 2 टक्के ग्राहक खरेदीचा निर्णय त्वरीत घेतील, असेही निरीक्षण सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे.

घरांच्या किमती उतरण्याबरोबरच, ‘डाऊनपेमेंट’ करण्यासंबंधीच्या अटी शिथिल झाल्यास, घरखरेदीनंतरची दगदग कमी होण्याकरीता सुतारकाम व स्वयंपाकघरातील उपकरणे विकसकांनी लावून दिल्यास, साईटला भेटी देणे कमी करण्याकरीता व्हिडिओ व छायाचित्रांची मदत मिळाल्यास, कागदपत्रे ऑनलाईन स्वरुपात स्वीकारली गेल्यास आणि घरनोंदणी ऑनलाईन झाल्यास ग्राहकांचा घरखरेदीचा उत्साह आणखी वाढू शकतो, असे सर्वेक्षणात आढळले आहे.

अडवाणींप्रमाणे खडसेंनाही ‘मार्गदर्शकमंडल’मध्ये टाकण्याची भाजपची तयारी

मुंबई. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणेच खान्देशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ‘मार्गदर्शक मंडल’मध्ये टाकण्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तयारी केली आहे. अर्थात अडवाणी यांच्याप्रमाणेच खडसे यांनीही सक्रिय राजकारणातून बाजूला व्हावे असेच संकेत पक्षश्रेष्ठींकडून विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने देण्यात आले आहेत. खडसेंना पक्षाने खूप काही दिले. आता त्यांनी पक्षाला मार्गदर्शक म्हणून सेवा द्यावी, अशी अपेक्षा केंद्राची असू शकते, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याचे सूतोवाच केले.

कट-कारस्थाने करून मला पक्षाबाहेर ढकलण्याचे प्रयत्न पक्षातील काही लोक जाणीवपूर्वक करीत आहेत, असा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावरून भाजपत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बुध‌वारी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर तोफ डागली. त्यानंतर पाटील-खडसे कलगीतुरा रंगला

फडणवीस यांचे वडील, काकूही आमदार… ते कसे दिसले नाही?

पाटील यांना फडणवीस कसे दिसले नाहीत? त्यांचे वडील, काकू आणि ते स्वत: आमदार, मंत्री हाेते. मुळात चंद्रकांत पाटील हे पक्षात नवखे आहेत. भाजपबद्दल त्यांना शून्य माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाची भूमिका मांडली असेल. परंतु पक्षाने जे दिले ते उपकार नाहीत, मीदेखील पक्षासाठी खस्ता खाल्ल्या हे कसे विसरता ? असा सवालही खडेसंनी केला.

11 हजार जनांनी घेतले ई टोकन द्वारे मद्य , पहा ई टोकन कसे घ्यायचे …

पुणे – ग्राहकांना अवघड वाटत असले तरी सुमारे 11 हजार पुणेकरांनी मद्य खरेदी साठी यशस्वी रित्या ई  टोकन घेऊन विना गर्दी, विना झंझट मद्य खरेदी केले आहे.

असे खरेदी करा मद्य
– ई-टोकनसाठी mahaexcise.com या संकेतस्थळावर नोंदणी करा.
– त्यात नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, मद्याचा प्रकार लिहा.
– पत्त्यातील पिनकोडनुसार दुकानांची यादी डिस्प्ले होईल.
– त्यानुसार ग्राहकाने जवळचे दुकान निश्‍चित करावे.
– त्यावर क्‍लिक केल्यानंतर अर्ध्या तासांचे स्लॉटस निश्‍चित होतील.
– ग्राहकाने स्लॉट निश्‍चित केल्यानंतर डिजिटल ई- टोकन तयार होईल.
– त्यानंतर ग्राहकाने त्या दुकानात जाऊन ई-टोकन दाखवून मद्य घ्यावे.

पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये 179 दुकानांत हा प्रयोग सुरू झाला आहे. पुण्यात यशस्वी झाला तर राज्यात त्याची अंमलबजावणी करण्याचा उत्पादन शुल्क विभागाचा मानस आहे.
– संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

मद्य (दारू) खरेदी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ई-टोकन प्रणाली सुरू केल्यावर मंगळवारी पहिल्याच दिवशी 10 हजार 877 पुणेकरांनी घरात बसून मद्य खरेदीसाठी नोंदणी करून डिलिव्हरी घेतली.

पुणे-नागरिकांना घरात बसून दुकानदाराची अपॉइंटमेंट घेऊन त्यानुसार मद्य खरेदी करता येणार आहे. mahaexcise.com या संकेतस्थळावर नोंदणी केल्यावर ग्राहकाला ई-टोकन मिळेल. त्यामुळे उन्हात रांगेत उभे राहून मद्य खरेदीच्या त्रासापासून ग्राहकांची सुटका होणार आहे. या वेबसाइटचे संचलन सुरळीतपणे सुरू राहील, यासाठी संबंधितांना सूचना दिल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.राज्य सरकारने 5 मे पासून मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिलीत्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास महापालिका आणि पोलिसांनी परवानगी दिली. मात्र, अनेक ठिकाणी रांगा लागत असल्यामुळे टोकन पद्धतीने मद्यविक्रीची सूचना उत्पादन शुल्क विभागाने केली. टोकन पद्धत रूळेपर्यंत ग्राहकांना नेहमीच्या पद्धतीनेही मद्यविक्री होणार आहे, असेही झगडे यांनी सांगितले.

 

येत्या सात दिवसांत प्रत्येक व्यक्‍तीची तपासणी करण्याचा महापालिकेचा निर्धार..

पुणे – महापालिकेने जाहीर केलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम सुरू केली असून, 1 लाखांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी केली आहे. आता प्रभावित पाच क्षेत्रीय कार्यालय परिसरांतील रेड झोनमधील सुमारे साडेसात लाख लोकांच्या स्क्रिनिंगचे काम हातात घेतले आहे. येत्या सात दिवसांत या भागातील प्रत्येक व्यक्‍तीची पूर्ण तपासणी करण्याचा निर्धार महापालिकेने केलाआहे.

येरवडा, भवानी पेठ, शिवाजीनगर-घोलेरस्ता, कसबा-विश्रामबाग वाडा, ढोले पाटील रस्ता या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत महापालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून 1 लाख 2 हजार नागरिकांची तपासणी केली आहे.त्यात 200 बाधित सापडले आहेत. महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

कंटेन्मेंट झोनमधील प्रत्येकाची तपासणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी महापालिकेच्या 13 मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनसह शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या 60 व्हॅनही खासगी डॉक्‍टरांसह या कार्यात सहभागी झाल्या आहेत. या माध्यमातून आता रेड झोन, हॉटस्पॉटमधील दाट वस्ती आणि 8 प्रमुख झोपडपट्टी भागांवर लक्ष केंद्रित करून ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर अधिक लक्ष देण्यात येत आहे.मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या तपासणीतून 200 जण करोनाबाधित असल्याचे आढळून आले असून, त्यांना विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले आहे. तर ज्यांना करोना संबंधित लक्षणे आढळून आली आहेत, अशा नागरिकांना त्यांच्या घरापासून दूरच्या क्‍वारंटाईन सेंटरमध्ये न हलवता, त्याच परिसरातील शाळांमध्ये क्‍वारंटाईन करण्यात येत आहे. परिणामी संबंधित व्यक्‍तीही या क्‍वारंटाईन होण्यास तयार होत असून, यामुळे आपण घरापासून दूर नसल्याची भावनाही त्यांच्यात निर्माण होत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या पाठपुराव्यानंतर पुणे रुग्णवाहिका चालकांना सुरक्षा किट

पुणे- शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असताना या आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांची ने आण करण्याचे काम करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांच्या सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष होत होते, अखेर शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पुणे महापालिकेकडून रुग्णवाहिका चालकांना सुरक्षा किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आज कोथरुड येथे सुतार यांच्याकडून महापालिकेने उपलब्ध केलेले १०० पीपीई किट, १०० मास्क , १०० हॅन्डग्लोव्ह्ज ,सॅनिटायझर्स पुणे जिल्हा अँम्ब्युलन्स असोसिएशनच्या सदस्यांकडे देण्यात आले.
या अडचणीच्या परिस्थितीमध्ये आम्ही रुग्णवाहिका चालक, मालक, सेवक या कोविड-१९ च्या रुग्णाची ने आण करीत आहोत.

आमच्या पुणे जिल्हा अँम्ब्युलन्स असोसिएशनचे ४५० -५०० सभासद आहेत. असोसिएशन मार्फत आमची सेवा पुणे मनपा प्रशासन, जिल्हा रुग्णालय, ससून रुग्णालय व इतर खाजगी हॉस्पिटलला चालू आहे.

परंतु हे काम करीत असताना आमच्या चालक व सहाय्यक यांच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी घेतली जात नव्हती, आम्ही जीवावर उदार होऊन हे काम करीत होतो. आम्ही आमची अडचण ‘ शिवसेना ‘ गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या कानावर घातली, त्यांनी आमच्या अडचणीचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्वरित महापालिका आयुक्त, आरोग्यधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे आम्हाला सुविधा पुरविण्याची मागणी केली होती.सुतार यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आज आम्हाला सुरक्षा किट मिळाल्याचे असोसिएशन चे सचिव गोपाल जांभे, उपसचिव अब्बास अली इनामदार यांनी सांगितले.

एकनाथ खडसे यांच्यावर अशी वेळ येणे दुर्भाग्यपूर्ण – नितीन गडकरी

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने ते संतापले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ खडसे यांच्यावर अशी वेळ येणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. भाजप वाढीसाठी एकनाथ खडसे यांचं काम मोठं आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप वाढण्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं.महाराष्ट्रात भाजप पक्षवाढीसाठी एकनाथ खडसे यांनी भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अतिशय प्रतिकुल काळात त्यांनी पक्षाचं काम केलं आणि पक्षाला मोठं यश मिळवून दिलं.