Home Blog Page 2572

लॉकडाऊनने बंदिस्त झालेल्या झोपडपट्टीतील गरीबांसाठी महापालिकेच्या किट वाटपात ‘गोलमाल’

  • भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात महापालिकेचेच सर्वाधिक अन्नधान्य किट पाठविल्याचा आरोप 

पुणे- शहरात कोरोनाचे संकट असताना ,कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागांत महापालिकेतर्फे अन्नधान्याचे किट वाटप करण्यात येत आहे. ज्या भागांत कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत.जिथे लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे, आणि जे अत्यंत गरीब आहेत अशा झोपडपट्टीत च  हे किट वाटप करणे ठरले  असताना काही पदाधिकारी यांच्याच प्रभागात मोठ्या प्रमाणात किट वाटप झाल्याचा आरोप होऊ लागला आहे. दरम्यान ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी तर आपल्या शिवदर्शन भागात ११०० कीट वाटपाचे ठरले आणि आलेल्या २०० कीट वाटप न करता ते वाटप झाल्याची नोंद महापालिका अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप केला आहे. अजून ९०० कीट येणे बाकी असल्याचे अधिकारी सांगतात असे म्हटले आहे. तर दुसरीकडे नितीन कदम  बाळासाहेब भामरे,तुषार भामरे यांनी ,’ महापालिकेने वाटलेल्या कीट मधून काही वस्तू गायब करून कीट वाटल्याचा आरोप केला आहे. 

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन कदम यांनी म्हटले आहे कि, काल पर्वती दर्शन भागात अन्नधान्य वाटप करताना सदर अन्नधान्य किट वाटपामध्ये मोठा भ्रष्टाचार दिसून आला आहे.प्रत्येक किट मध्ये पुणे महानगरपालिका ने दिलेल्या यादीपैकी प्रत्येक किट मध्ये प्रत्येकी १ लिटर तेल पिशवी नसल्याचे आढळून आले आहे.महानगरपालिकेने यादी जाहीर केली असताना सूद्धा किमान १ लिटर प्रत्येक व्यक्तीगणिक म्हणजे केवळ पर्वती दर्शन भागातच जवळपास ८०० ते ९०० लिटर तेलाची अफरातफर केली गेली आहेआज अडचणींच्या काळात नागरिकांच्या हक्काच्या जिवनावश्यक गोष्टींमध्ये केला गेलेला प्रकार निंदनीय आहे.आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रं:२९ च्या वतिने सदर घटनेचा निषेध करतो.तसेच ह्या गोष्टीची महिनगरपालिकेने दखल त्वरीत घ्यावी,अशी विनंती करतो.तसेच नागरिकांना जर अन्नधान्य किट मिळत असेल तर दिलेल्या यादीप्रमाणे अगोदर तपासून घ्यावी.तसेच काही त्रुटी आढळल्यास निःसंकोचपणे आमच्याशी संपर्क साधावा .

दरम्यान महापालिकेचे आशिष महाडदळकर(सहायक आयुक्त) यांनी असे म्हटले आहे कि,ड्यूटीवरील कर्मचारी बदलल्याने त्यांच्याकडून चुकून एक लिटरच तेल कीटमध्ये टाकले गेले. हा प्रकार एकाच लॉटबाबत घडला. ही चूक लक्षात आल्यावर दोन लिटर तेल कीटमध्ये जाईल याची दक्षता घेतली गेली आहे. तसेच ज्यांना एक लिटर तेल दिले गेले आहे त्यांना आणखी एक लिटर तेल पोहचविण्यात आले आहे. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार नसून वाटप सुरळीत सुरु झाले आहे.

 

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 3 हजार 435

पुणे विभागातील 3 हजार 442 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी-विभागात एकूण संख्या झाली 7 हजार 218 -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 25 :- पुणे विभागातील 3 हजार 442 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 218 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 435 आहे. विभागात कोरोना बाधीत एकुण 341 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 212 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयात 5 हजार 899 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 998 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 623 आहे. कोरोनाबाधित एकूण 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 207 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत आज पुणे विभागात एकूण 395 बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 283, सातारा जिल्ह्यात 31, सोलापूर जिल्ह्यात 20, सांगली जिल्ह्यात 6 तर कोल्हापूर जिल्ह्यात 55 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयात 309 कोरोना बाधीत रुग्ण असून 120 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 182 आहे. कोरोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयात 590 कोरोना बाधीत रुग्ण असून 265 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 273 आहे. कोरोना बाधित एकूण 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयात 79 कोरोना बाधीत रुग्ण असून 46 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयात 341 कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 326 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 72 हजार 855 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 64 हजार 607 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 8 हजार 288 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 57 हजार 280 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 7 हजार 218 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप : – दि.25 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

मुस्लीम समाजाचे योगदान अतुलनीय

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इचलकरंजीतील मुस्लीम समाजाची प्रशंसा

कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) – कोरोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता (आयसीयु) विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात-पात, धर्म-भेद बाजूला ठेवून  कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी इचलकरंजीतील हे योगदान आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

इचलकरंजीमधील समस्त मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरु अतिदक्षता विभागाचे मुख्यमंत्र्यांनी आज ऑनलाईन लोकार्पण केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने केलेल्या आवाहनानुसार समस्त मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची रुपये 36 लाखांची रक्कम कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी दिली. या रकमेतून इंदिरा गांधी असामान्य रुग्णालयात 10 बेडचा अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला आहे. रमजान ईदचे औचित्य साधून याचे लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे संवाद साधताना म्हणाले, इचलकरंजीतील मुस्लिम समाजाने याद्वारे एक मोठा आदर्श देशासमोर ठेवला आहे. आत्तापर्यंत आपण सर्वांनी मिळून कोरोनाला धैर्याने आणि संयमाने रोखून ठेवले आहे. इथून पुढे लोकसहभाग गरजेचा आहे. सण कसा साजरा करायचा याचे उत्तम उदाहरण मुस्लिम समाजाने सर्वांना दाखवून दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांनीही मुस्लिम समाजाच्या कार्याचे कौतुक करून रुग्णालय सर्वच सुविधांनी सुसज्ज करण्याचे आश्‍वासन दिले.

प्रारंभी सलीम अत्तार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार राजू आवळे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, तहसिलदार प्रदिप उबाळे आदी उपस्थित होते.

अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी कैश बागवान, रफिक मुजावर, इरफान बागवान, अजीज खान, कुतबुद्दीन मोमीन, सलीम अत्तार, तौफिक मुजावर, अबु पानारी, इम्रान मकानदार, तौफिक हिप्परगी, फिरोज जमखाने, आयुब गजबरवाडी, समीर शेख, दिलावर मोमीन, फिरोज बागवान, फारूक मकानदार, डॉ.जावेद बागवान, डॉ.राहमतुल्लाह खान, डॉ.अर्शद बोरगावे, डॉ.हिदायतुल्लाह पठाण, इम्तियाज म्हैशाळे यांचे  सहकार्य लाभले.

मुख्यसभा नाही तर नाही,पक्ष निहाय बैठका तरी बोलवा – विशाल तांबे (व्हिडीओ)

पुणे- गेली अडीच तीन महिने झाले , नगरसेवकांच्या ,जनतेच्या प्रश्नांना मुख्य सभे सारखे मिळणारे व्यासपीठ बंद झाले आहे. मग किमान ज्या त्या पक्षाच्या पातळीवर आयुक्तांनी पक्ष निहाय बैठका तरी बोलावून आपणा कोरोनाशी लढत देताना कशा पद्धतीने लढा दिला पाहिजे यावर सविस्तर चर्चा करायला हवी असे मत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक विशाल तांबे यांनी व्यक्त केले आहे . आणि याबाबत ची लेखी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे. पुण्यात नगरसेवक ,प्रशासन सारेच आपापल्या पातळीवर चांगले काम करत आहेत तरीही कोरोनाशी लढाई मुश्कील असल्याचेच दिसते आहे . या परिस्थितीत दशा जाणून दिशा ठरविण्यासाठी तरी प्रशासनाने नाही मुख्य सभा तर किमान पक्षीय पातळीवर बैठक बोलाविली पाहिजे. कोरोनाला संपविण्यासाठी तपास ,शोध आणि कारवाई म्हणजे उपचार याच पद्धतीवर भर द्यायचा आहे .पण या पद्धतीने फाईट करण्यासाठी आपल्याला स्वॅब घेणारी आणि तपासणारी यंत्रणा भक्कम करावी लागेल शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तीच कोरोनाशी २ हाथ करावे लागतील असे सांगून अखेरीस तांबे यांनी पिंपरी महापालिके प्रमाणे पुणे महापालिकेने देखील सलून आणि पार्लर ला नियम अटी घालून परवानगी द्यावी अशी मागणी देखील  केली आहे. नेमके तांबे यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात ऐका आणि पहा ….

अशोक चव्हाण रुग्णालयात दाखल

0

मुंबई- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, चव्हाण यांच्यावर नांदेडमध्येच उपचार सुरु असल्याची माहिती आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सरकारची चिंता वाढली आहे. अशोक चव्हाण यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना कोरोनासोबतची राज्याची लढाई यापुढे अधिक बिकट होणार असून, आता रुग्णांच्या संख्येचा जीवघेणा गुणाकार होईल.

मात्र, घाबरून जाऊ नका, सरकारकडून आरोग्यसेवा निर्माण केली जात आहे, असे सांगताना आता कोरोनासोबत जगण्याची सवय करून घ्या, असा सल्ला दिला होता.
लॉकडाऊन एकदम उठवणे चुकीचे असून, हळूहळू शिथिल केला जाईल. मात्र, गर्दी झाली तर परत सगळे बंद करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने पुढच्या 15 दिवसांत देशातील संसर्गाचे चित्र स्पष्ट होईल. राज्यातील जनतेलाही आपल्या घरी जाता येईल, इतपत सगळे सुरळीत करण्याची आमची इच्छा आहे. मात्र, हे करताना कोरोनाला टाळावे लागणार आहे, असे ठाकरे म्हणाले.

लॉकडाऊनचा प्रत्येकालाच कंटाळा आला असला, तरी एकदम लॉकडाऊन करण्यासारखेच तो एकदम उठवणेही चुकीचे असल्याने हळूहळू सगळे सुरू केले जाईल. मात्र, गर्दी झाली तर पुन्हा सगळे बंद करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. उद्योगधंदे-व्यवसाय सुरू केल्यावर शिस्त पाळली गेली नाही, तर मात्र हे सगळे पुन्हा बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असेही उद्धव यांनी नमूद केले.

कोरोनाचे आज ३०४१ नवीन रुग्ण; राज्यात एकूण ५० हजार २३१ रुग्ण-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

0

मुंबई, दि.२४: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ६२ हजार ८६२ नमुन्यांपैकी ३ लाख १२ हजार ६३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५० हजार २३१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ९९ हजार ३८७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज ५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण संख्या १६३५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील २४ तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २३ एप्रिल ते २० मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ३९, पुण्यात ६,  सोलापुरात ६, औरंगाबाद शहरात ४,लातूरमध्ये १, मीरा भाईंदरमध्ये १, ठाणे  शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३४  पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३०  रुग्ण आहेत तर २७  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १ जण ४० वर्षांखालील आहे. या ५८ रुग्णांपैकी ४० जणांमध्ये ( ६७ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील :(कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ३०,५४२ (९८८)

ठाणे: ४२० (४)

ठाणे मनपा: २५९० (३६)

नवी मुंबई मनपा: २००७ (२९)

कल्याण डोंबिवली मनपा: ८८९ (७)

उल्हासनगर मनपा: १८९ (३)

भिवंडी निजामपूर मनपा: ८६ (३)

मीरा भाईंदर मनपा: ४६४ (५)

पालघर:११४  (३)

वसई विरार मनपा: ५६२ (१५)

रायगड: ४१२ (५)

पनवेल मनपा: ३३० (१२)

ठाणे मंडळ एकूण: ३८,५८५ (१११०)

नाशिक: ११५

नाशिक मनपा: ११० (२)

मालेगाव मनपा: ७११ (४४)

अहमदनगर: ५३ (५)

अहमदनगर मनपा: २०

धुळे: २३ (३)

धुळे मनपा: ९५ (६)

जळगाव: २९४ (३६)

जळगाव मनपा: ११७ (५)

नंदूरबार: ३२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १५७० (१०३)

पुणे: ३४० (५)

पुणे मनपा: ५०७५ (२५१)

पिंपरी चिंचवड मनपा: २६७ (७)

सोलापूर: २४ (२)

सोलापूर मनपा:५२२ (३२)

सातारा: २७९ (५)

पुणे मंडळ एकूण: ६५६२ (३०९)

कोल्हापूर:२३६ (१)

कोल्हापूर मनपा: २३

सांगली: ६९

सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी:  १५५ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: ५०४ (५)

औरंगाबाद:२३

औरंगाबाद मनपा: १२३३ (४६)

जालना: ५६

हिंगोली: ११२

परभणी: १७ (१)

परभणी मनपा: ५

औरंगाबाद मंडळ एकूण: १४४६ (४७)

लातूर: ६७ (३)

लातूर मनपा: ४

उस्मानाबाद: ३१

बीड: २६

नांदेड: १५

नांदेड मनपा: ८३ (५)

लातूर मंडळ एकूण: २२६ (८)

अकोला: ३६ (२)

अकोला मनपा: ३६६ (१५)

अमरावती: १३ (२)

अमरावती मनपा:  १५५ (१२)

यवतमाळ: ११५

बुलढाणा:४० (३)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण:७३३ (३४)

नागपूर: ७

नागपूर मनपा: ४६४ (७)

वर्धा: ४ (१)

भंडारा: १०

गोंदिया: ३९

चंद्रपूर:  १०

चंद्रपूर मनपा: ९

गडचिरोली: १३

नागपूर मंडळ एकूण:  ५५६ (८)

इतर राज्ये: ४९ (११)

एकूण:  ५० हजार २३१  (१६३५)

(टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २६९ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील ९७ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २२८३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६ हजार ९१३ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६६.६०  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

महाराष्ट्रातून ७ लाख ३८ हजार परप्रांतीय कामगार त्यांच्या स्वतःच्या राज्यात परतले

0

५२७ ट्रेनने रवानगी; दररोज १०० ट्रेनची मागणी – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई दि.२४-महाराष्ट्रात विशेष करुन मुंबईमध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आज दि.२४ मेपर्यंत सुमारे ७ लाख ३८  हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले.  यासाठी ५२७ विशेष श्रमिक ट्रेन  महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने कामानिमित्त महाराष्ट्रात आलेले देशातील विविध भागातील कामगार हे त्यांच्या घरी जाण्यासाठी रस्त्याने पायी निघाले होते.  राज्य सरकारने या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी केंद्राकडे मोठ्या प्रमाणात ट्रेनची मागणी केली होती.सुरूवातीला केंद्र सरकारने यास मंजुरी दिली नाही. परंतु राज्य सरकारने वारंवार केलेल्या मागणीमुळे ही मंजुरी मिळाली.

तिकीटासाठी ८५ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून

यानंतर केंद्र सरकारने या श्रमिकांजवळ पैसे नसल्याने ८५ टक्के खर्च हा केंद्र सरकार उचलेल असे जाहीर केले होते. केंद्र सरकारने हा निर्णय सुद्धा लवकरात लवकर द्यावा. या परप्रांतीय कामगारांकडे  पैसे नसल्याने शेवटी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुरुवातीला ५४ कोटी ७५ लाख रुपये मंजूर केले होते. त्यानंतर यात वाढ करण्यात आली असून आतापर्यंत कामगारांच्या तिकिटांसाठी ८५ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात आले आहेत. या सर्व परप्रांतीय मजुरांना त्यांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी राज्य शासनाच्या बसेसचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था राज्य सरकार करीत असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

सुरुवातीच्या काळात बिहार व पश्चिम बंगाल येथे रेल्वे जाण्यास अडचण येत होती. तेथील राज्य सरकार एन.ओ.सी. देत नसल्याने रेल्वेची व्यवस्था झाली नव्हती.  ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत फोनवरून चर्चा करून मार्ग काढला. आता त्या राज्यातसुद्धा  ट्रेन जात होत्या. परंतु पश्चिम बंगालमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे तेथील ट्रेन तात्पुरत्या थांबविण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारला या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या स्वगृही पाठवण्यासाठी दररोज १०० ट्रेनची आवश्यकता आहे. राज्य सरकारची संपूर्ण तयारी झाली असून केंद्र सरकारने जास्तीत जास्त ट्रेन द्याव्या अशी मागणीसुद्धा श्री. देशमुख यांनी  केली आहे.

विविध राज्यात गेलेल्या विशेष श्रमिक ट्रेन

आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये २८१, बिहारमध्ये ११२, मध्य प्रदेशमध्ये ३२, झारखंडमध्ये २७, कर्नाटक मध्ये ५, ओरिसामध्ये १५, पश्चिम बंगालमध्ये ५, छत्तीसगडमध्ये ५ यासह इतर राज्यांमध्ये एकूण ५२७ ट्रेन या सोडण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्वच रेल्वे स्टेशन मधून या ट्रेन सोडण्यात येत असून यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मधून ७६, लोकमान्य टिळक टर्मिनल ७४, पनवेल ३५, भिवंडी १०, बोरिवली ३७, कल्याण ७, पनवेल ३५, ठाणे २१, बांद्रा टर्मिनल ४१, पुणे ५४, कोल्हापूर २३, सातारा ९, औरंगाबाद ११, नागपुर १४  यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून  विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

‘रमजान ईद’ निमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुस्लिम बांधवांना आवाहन

मुंबई, दि. 24: ईद-उल-फित्र तथा ‘रमजान ईद’ आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करणारा पवित्र सण आहे. आज आपला ‘कोरोना’ विरुद्ध लढा सुरु आहे, तो आपण अजून जिंकला नसला तरी निर्णायक टप्प्यावर आहे. ‘कोरोना’ला हरविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच अदा करावी आणि गळाभेटीऐवजी फोनवरुन नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रमजान ईद’च्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘कोरोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून राज्यासह देशात टाळेबंदी सुरु आहे. या टाळेबंदीत पवित्र रमजान महिन्याच्या काळात मुस्लिम बांधवांनी संयम पाळून आपले तरावीहची नमाज, रोजा सहेरी, रोजा इफ्तार आदी धार्मिक कार्यक्रम घरीच पार पाडले. अजूनही ‘कोरोना’चे संकट असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी आपल्या घरात थांबूनच ‘रमजान ईद’ची नमाज अदा करावी. कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर गर्दी करु नये, मशिदीत, रस्त्यावर, मैदानात एकत्र येऊ नये, जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत. ईदची नमाज अदा केल्यानंतर प्रत्यक्ष गळाभेटी, भेटीगाठी घेण्यापेक्षा मोबाईलवर नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्याव्यात. ‘कोरोना’चे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. सर्वांनी केंद्र, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ‘रमजान ईद’ आनंदाने साजरी करावी, असे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
‘कोरोना’ची लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे, आता हळूहळू टाळेबंदी उठविण्याबाबत सरकार योग्य तो निर्णय लवकरच जाहीर करेल. आता आपल्याला ‘कोरोना’ सोबतच राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित करायची आहे. त्यासाठी सरकार योग्य ते नियोजन करत आहे. नागरिकांच्या योग्य साथीची आवश्यकता आहे. या पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी या कामी सरकार सोबत राहण्याचा संकल्प करुया, ‘कोरोना’ची लढाई जिंकल्यानंतरच मिठी ईद उत्साहाने साजरी करुया, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रमजान ईद’च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भारत इराणला मागे टाकत जगातील 10वा आणि आशियातील दुसरा सर्वात संक्रमित देश बनण्याच्या जवळ

0
  • भारतात कोरोनाचे 1 लाख 31 हजार 900 पेक्षा जास्त रुग्ण आहेत, तर इराणमध्ये 1 लाख 33 हजार 521
  • जगात युरोप पहिला, उत्तर अमेरिका दुसरा आणि आशिया तिसरा सर्वात जास्त प्रभावित खंड
  • नवी दिल्ली. भारतात कोरोना व्हायरसचे 1 लाख 32 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. जगभरात भारताचा 11वा नंबर लागतो. तर, संक्रमणाच्या बाबतीत आशियात तिस-या नंबरवर आहे. 10 वा सर्वात संक्रमित देश इराणमध्ये आता 1 लाख 33 हजार 521 रुग्ण आहेत. रविवारची अकडेवारी जाहीर झाल्यावर भारत इराणला मागे टाकत आशियातील दुसरा संक्रमित देश बनण्याची शक्यता आहे.
  • आशियात तिसऱ्या नंबरवर भारतजगातील सर्वात प्रभावित खंडामध्ये युरोप पहिल्या, उत्तर अमेरिका दुसऱ्या आणि आशिया तिसऱ्या नंबरवर आहे. आशियाात तुर्कीमध्ये सर्वात जास्त 1 लाख 55 हजार 686 कोरोना संक्रमित आहेत. यापैकी अंदाजे 4308 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, भारत तिसऱ्या नंबरवर आहे. येथे आतापर्यंत 3868 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    आशियातील 10 सर्वात प्रभावित देश

    देश / संक्रमण / मृत्यू

    तुर्की – 1,55,686 / 4,308

    इराण – 1,33,521 / 7,359

    भारत – 1,31,868 / 3,868

    चीन – 82,974 / 4,634

    सऊदी अरब – 70,161 / 379

    पाकिस्तान – 52,437 / 1,101

    कतर – 42,213 / 21

    बांगला देश  – 32,078 / 452

    सिंगापुर – 31,068 / 23

    यूएई – 28,704 / 244

    इराणमध्ये भारतापेक्षा 1500 हजार रुग्ण जास्त

    इराणमध्ये भारतापेक्षा 1515 रुग्ण जास्त आहेत. इराणमध्ये 96 दिवसात 1 लाख 33 हजार 521 रुग्ण सापडले. तर, भारतात 116 दिवसात 1 लाख 32 हजार 671 रुग्ण सापडले. भारतात मे महिन्यात सर्वात जास्त 94 हजार 749 रुग्ण समोर आले आहेत. तर, इराणमध्ये एप्रिलमध्ये सर्वात जास्त 49 हजार 47 रुग्ण आढळले.

    आशियात 9.37 लाख संक्रमित

    आशियात सध्या 9 लाख 37 हजार 210 संक्रमित आहेत, तर 27 हजार 68 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त 7,359 मृत्यू इराणमध्ये झाले आहेत. आशिया खंडात भारतात सर्वात वेगाने रुग्ण वाढले. 19 मे पासून दररोज भारतात 5 हजारांच्या वर रुग्ण सापडत आहेत. शनिवारी देशात 6661 रुग्ण आढळले. हाच वेग राहिल्यास चार दिवसात भारत तुर्कीला मागे टाकेल.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या झाली 3 हजार 178

पुणे विभागातील 3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात एकूण  कोरोना बाधित संख्या झाली 6 हजार 823 रुग्ण

विभागात आज 336 बाधित रुग्णांची वाढ

-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 24 :- पुणे विभागातील 3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 823 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 178 आहे. विभागात कोरोना बाधीत एकुण 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 210 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयात 5 हजार 616 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 905 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 444 आहे. कोरोनाबाधित एकूण 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 204 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत आज पुणे विभागात एकूण 336 बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 249, सातारा जिल्ह्यात 37, सोलापूर जिल्ह्यात 22, सांगली जिल्ह्यात 3 तर कोल्हापूर जिल्ह्यात 25 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयात 278 कोरोना बाधीत रुग्ण असून 114 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 157 आहे. कोरोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयात 570 कोरोना बाधीत रुग्ण असून 249 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 275 आहे. कोरोना बाधित एकूण 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयात 73 कोरोना बाधीत रुग्ण असून 40 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयात 286 कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 271 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 71 हजार 111 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 62 हजार 159 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 8 हजार 966 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 55 हजार 253 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 6 हजार 823 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 31 लाख 30 हजार 901 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 5 कोटी 84 लाख 54 हजार 69 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 758 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

(टिप : – दि.24 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

9 मार्च 2020 चा तो क्षण … देशाला विळखा घालून ठेवणारा …

0

कोरोना आणि पुणे जिल्‍हा

जगभरात कोवीड-19 (कोरोना) विषाणूचा संसर्ग सुरु झाल्‍यानंतर महाराष्‍ट्रातही आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍यास सुरुवात झाली. पुण्‍यासह मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या महानगरातील शासकीय यंत्रणा सज्‍ज झाल्‍या. पुण्‍यात आंतरराष्‍ट्रीय विमान सेवा असल्‍याने येथे कोरोना संसर्गाचा धोका होताच. त्‍यामुळे पुणे महानगरपालिकेकडून नायडू रुग्‍णालयाच्‍या तयारीसाठी 26 फेब्रुवारी पासून कामाला सुरुवात झाली. 6 मार्च रोजी नायडू रुग्‍णालय सर्व तयारीनिशी सज्‍ज झाले होते. सर्व डॉक्‍टर्स, परिचारिका व संबंधित कर्मचा-यांचे कोव्‍हीड-19 संबंधित प्रशिक्षण झाले. कोरोनाच्‍या जनजागृतीसाठी आवश्‍यक ते साहित्‍य तयार करुन त्‍याचे वितरण करण्‍यात आले. परदेशी प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्‍यास सुरुवात करण्‍यात आली. आवश्‍यकतेनुसार संस्‍थात्‍मक विलगीकरणाचीही सोय उपलब्‍ध करण्‍यात आली.

पुणे जिल्‍ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण 9 मार्च 2020 मध्‍ये नायडू रुग्‍णलयात भरती करण्‍यात आला. हा रुग्‍ण दुबई व आबुधाबी यात्रा करुन मुंबई मार्गे पुण्‍यात आला होता. तो व त्‍याचे 17 सहप्रवासी प्रामुख्‍याने परदेश प्रवासगमन केलेले व मुंबई विमानतळावर उतरुन पुण्‍यात आले होते. यापैकी 9 व्‍यक्‍ती कोरोनाबाधित होत्‍या. त्‍यांना नायडू रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले. 9 मार्च ते 31 मार्च 2020 पर्यंत एकूण 48 रुग्‍ण होते. जिल्‍ह्यातील 190 व्‍यक्‍ती दिल्‍ली येथील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात 4 एप्रिलनंतर सहभागी झाल्‍या होत्‍या. यापैकी 181 व्‍यक्‍तींचा पाठपुरावा करण्‍यात आला आणि त्‍यांचे संस्‍थात्‍मक विलगीकरण करण्‍यात आले. 114 व्‍यक्‍तींची चाचणी करण्‍यात आली त्‍यापैकी 4 व्‍यक्‍तींना कोरोनाची लागण झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. मरकज कार्यक्रमातून आलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या पाठपुराव्‍यापासून त्‍यांना रुग्‍णालयात भरती करण्‍याच्‍या दरम्‍यान त्‍यांचा अनेक लोकांशी संपर्क आला होता. या संपर्कातील 59 व्‍यक्‍तींचा पाठपुरावा करुन त्‍यांचीही तपासणी करण्‍यात आली. 9 मार्च ते 2 एप्रिल पर्यंत रुग्‍ण संख्‍येत प्रतिदिन 1 अंकी वाढ होती. 2 एप्रिल ते 22 एप्रिल या काळात दोन अंकी वाढ आणि 23 एप्रिलपासून प्रतिदिन 3 अंकी वाढ होत आहे.

साधारणपणे 7 मे पासून कोरोनाचा संसर्ग पुणे शहरातील दाट लोकसंख्‍या असलेल्‍या भागात होण्‍यास सुरुवात झाली. प्रामुख्‍याने ढोले पाटील रोड, भवानी पेठ, येरवडा, कसबा-विश्रामबागवाडा आणि शिवाजीनगर या वार्डामध्‍ये मोठ्या प्रमाणामध्‍ये संसर्ग दिसून आला. 15 पैकी 5 वार्डात एकूण रुग्‍णांच्‍या 71 टक्‍के रुग्‍ण होते. या वार्डातील मुख्‍यत: ताडीवाला रोड, येरवडा, खडकमाळ, नवी पेठ, कसबा पेठ या प्रभागामध्‍ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार झाला. 41 प्रभागापैकी 8 प्रभागात एकूण रुग्‍णांच्‍या 65 टक्‍के रुग्‍ण होते. या दाट लोकवस्‍तीच्‍या भागामध्‍ये सामाजिक अंतर, मास्क वापराचा अभाव, लवकर तपासणीस येण्‍यास अल्‍प प्रतिसाद या सारख्‍या कारणांमुळे आजाराचे प्रमाण वाढले.

विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महा‍पालिकेचे आयुक्‍त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्‍यासह पोलीस विभाग, आरोग्‍य विभाग आणि इतर प्रशासकीय यंत्रणा समन्‍वयाने काम करीत आहे. कोरोनाच्‍या संसर्गास आळा घालण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाय योजण्‍यात आले. शासनामार्फत नियुक्‍त वरिष्‍ठ अधिका-यांना पुणे महानगरपालिकेतील विविध भागात विशेष जबाबदारी देण्‍यात आली. प्रतिबंधित क्षेत्रातील दैनंदिन सर्वेक्षण व सहवासित पाठपुराव्‍याच्‍या माध्‍यमातून कोरोनासदृश्‍य लक्षणे असलेल्‍या व्‍यक्‍तींची ओळख आणि गरजेनुसार रुग्‍णालयात जाण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आला. कोरोनासदृश्‍य लक्षणे असलेल्‍या व्‍यक्‍तींचे नमुने मोठ्या प्रमाणात संकलित करुन तपासणी करण्‍यात आली. कोरोना नमुने तपासणी प्रयोगशाळांचे सक्षमीकरण करण्‍यात आले. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्‍णालय येथे स्‍वतंत्र कोवीड-19 रुग्‍णालयाची स्‍थापना करण्‍यात आली. डॉ. दिलीप कदम यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गंभीर रुग्‍ण उपचार पध्‍दती सुचविण्‍यासाठी कृती दलाची स्‍थापना करण्‍यात आली. तज्ञ डॉक्‍टरांच्‍या शिफारशीनुसार गंभीर व अति गंभीर रुग्‍ण व्‍यवस्‍थापन प्रोटोकॉल, औषध प्रोटोकॉलसुचविण्‍यात आला असून त्‍याचा वापर करण्‍यात येत आहे. आयुष उपचारांसाठी डॉ. तात्‍याराव लहाने यांच्‍या अध्‍यक्षतेखाली टास्‍क फोर्स स्‍थापन करण्‍यात आला होता. त्‍यांनी जनतेची प्रतिकारशक्‍ती वाढविणे, आयुर्वेद, योगा, युनानी, सिध्‍दा, होमिओपॅथी उपचार पध्‍दतींचा अवलंब करण्‍याची शिफारस केली.

पुणे जिल्‍ह्यातील खाजगी रुग्‍णालयांचे कोवीड-19 उपचारासाठी अधिग्रहण करण्‍यात आले. डॉक्‍टर व रुग्‍णालयातील इतर स्‍टाफसाठी आवश्‍यक साधनसामुग्रीचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्‍यात आला. जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, ससून यांच्‍याकडे एन-95 मास्‍क, पीपीई कीट, त्रिस्‍तरीय मास्‍क, हायड्रोक्‍लारोक्‍वीन गोळ्या, असिलटॅमिहिर गोळ्या, अजिथ्रोमायसिन गोळ्या, लोपीनावीर गोळ्या या औषधी व साधनसामुग्रीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी आवश्‍यक ती उपाययोजना करण्‍यासाठी शासनामार्फत अतिरिक्‍त अधिकारी नियुक्‍त करण्‍यात आले. पुणे महापालिकेसाठी अतिरिक्‍त मुख्‍य सचिव(महसूल) नितीन करीर, साखर आयुक्‍त सौरभ राव, सहकार आयुक्‍त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक कौस्‍तुभ दिवेगावकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी प्रधान सचिव (नगरविकास) महेश पाठक तर ससून प्रशासनासाठी जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम यांच्‍यावर जबाबदारी सोपविण्‍यात आली.

पुणे विभागीय आयुक्‍त स्‍तरावरही अधिका-यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग यांच्‍याकडे रुग्‍णालय व अतिदक्षता विभाग व्‍यवस्‍थापन, पुणे महानगर विकास प्राधीकरणाचे आयुक्‍त विक्रमकुमार यांच्‍याकडे अलगीकरण (आयसोलेशन) कक्ष व्‍यवस्‍थापन, शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांच्‍याकडे विलगीकरण (क्‍वारंटाईन) सुविधांचे व्‍यवस्‍थापन व अतिरिक्‍त विलगीकरण सुविधा निर्माण करणे, कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांच्‍याकडे जीवनावश्‍यक वस्‍तूंची उपलब्‍धता, पीएमपीएमएल च्‍या संचालक नयना गुंडे यांच्‍याकडे वाहतूक व्‍यवस्‍थापन, अपंग कल्‍याण आयुक्‍त प्रेरणा देशभ्रतार यांच्‍याकडे रेशन व इंधन पुरवठा, मृद व जलसंधारणचे व्‍यवस्‍थापकीय संचालक ऋषिकेश यशोद यांच्‍याकडे अन्‍न व औषधी, वैद्यकीय साधने व इतर जीवनावश्‍यक वस्‍तूंचा पुरवठा याबाबत जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे. या व्‍यतिरिक्‍त अतिरिक्‍त-उप जिल्‍हाधिका-यांची शीर्ष अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.

कोरोनाबाधित व्‍यक्‍तींसाठी विलगीकरण 314 उपलब्‍ध सुविधा असून यात 41 हजार 384 खाटांची सोय आहे. अलगीकरणासाठी 71 उपलब्‍ध सुविधा असून 10 हजार 780 खाटांची सोय आहे. पुणे जिल्‍ह्यात कोरोना नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळा निश्चित करण्‍यात आल्या आहेत. ए.एफ.एम.सी., बी.जे.एम.सी., कमांड हॉस्‍पीटल, नारी लॅब, एन.सी.सी.एस., एनआयव्‍ही लॅब, आय.आर.एल., ए.जी. डायग्‍नोस्‍टीक, गेनेपथ डायग्‍नोस्‍टीक, कृष्‍णा लॅब, मेट्रोपॉलीस गोल्‍वीकर, रुबी हॉल क्लिनीक, सह्याद्री लॅब, सब अर्बन लॅब, थामोकेअर लॅब या प्रयोगशाळांमध्‍ये 3982 इतकी तपासणी क्षमता असून दैनंदिन तपासणी 2507 इतकी आहे. तपासणीसाठी येणारे नमुने हे तपासणी क्षमतेपेक्षा कमी असून सद्यस्थितीत तपासणीसाठी अडचण येत नाही. सर्व प्रयोगशाळांमध्‍ये तपासणीसाठी गोळा होणा-या नमुन्‍यांची संबंधित प्रयोगशाळेकडून तपासणी करण्‍यात येत आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनस्‍तरावरुन वेळोवेळी टाळेबंदी (लॉकडाऊन) घोषित करण्‍यात आली. पहिला टप्‍पा 25 मार्च ते 14 एप्रिल 2020, दुसरा टप्‍पा 15 एप्रिल ते 3 मे 2020, तिसरा टप्‍पा 4 मे ते 17 मे 2020 आणि चौथा टप्‍पा 18 मे ते 31 मे 2020 असा आहे. टाळेबंदीच्‍या चौथ्‍या टप्‍प्‍यामध्‍ये प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर उद्योग भौतिक अंतर ठेवून सुरु करण्‍यात आले आहेत. कोरोनाच्‍या अनुषंगाने मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्‍सिंगद्वारे 16 मार्च, 20 मार्च, 23 मार्च, 26 मार्च, 5 एप्रिल, 12 एप्रिल, 19 एप्रिल, 26 एप्रिल, 13 मे, 21 मे असा नियमित आढावा घेतला. उप मुख्‍यमंत्री आणि पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही 1 एप्रिल, 11 एप्रिल, 18 एप्रिल, 24 एप्रिल, 1 मे, 8 मे, 15 मे, 22 मे रोजी लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिका-यांच्‍या बैठका घेवून वेळोवेळी आवश्‍यक त्‍या सूचना दिल्‍या.

पुणे जिल्‍ह्यासाठी कोरोना मुकाबल्‍याकरिता एकूण 23 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्‍यात आला. जिल्‍हा वार्षिक नियोजनातून सन 2019-20 मध्‍ये ससून रुग्‍णालयाला 16 कोटी 16 लाख निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला. यातून आयसीयू युनिट यंत्रसामुग्री, औषध खरेदी, ऑक्सिजन गॅस पाईपलाईन, वातानुकुलीत सुविधा करणे ही कामे करण्‍यात आली. जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सकांना औषधे व यंत्रसामुग्री खरेदीसाठी 4 कोटी 7 लाख रुपये तर जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांना औषधे व यंत्रसामुग्री तसेच जीवनसत्‍व विषयक औषधे खरेदी करण्‍यासाठी 7 कोटी 89 लाख रुपये उपलब्‍ध करुन देण्‍यात आले. आर्थिक वर्ष 2020-21 मध्‍ये ससून रुग्‍णालयाला विद्युत विषयक कामे व 2500 कोरोना टेस्‍ट कीट खरेदीसाठी 1 कोटी 71 लाख रुपये, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक यांना 9 ग्रामीण रुग्‍णालयांना सेंट्रल ऑक्सिजन गॅस पाईपलाईन तसेच औषधे व यंत्रसामुग्री खरेदीसाठी 11 कोटी आणि जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांना खाजगी दवाखान्‍यांना संदर्भित केलेल्‍या रुग्‍णांच्‍या औषधोपचार खर्चाच्‍या प्रतीपूर्तीसाठी 5 कोटीचा निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला. जिल्‍हा वार्षिक नियोजनातून सन 2019-20 मध्‍ये एकूण 28 कोटी 12 लाख आणि आर्थिक वर्ष 2020-21 मध्‍ये 17 कोटी 71 लाख असा एकूण 45 कोटी 83 लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

सध्‍या पुणे जिल्‍ह्यात एकूण प्रतिबंधित क्षेत्रांची संख्‍या 144 इतकी आहे. पुणे महानगर पालिका 48, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 47, पुणे ग्रामीण 42, पुणे कटक मंडळ 2, खडकी कटक मंडळ 4 आणि देहूरोड कटक मंडळ 1 अशी संख्‍या आहे. टाळेबंदी उठविल्यामुळे रुग्‍णसंख्‍येत वाढ होण्‍याचा धोका आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी कंपनीचे कर्मचारी व इतर व्‍यक्‍तींच्‍या वाह‍तुकीमुळे संसर्गाचा धोका आहे. बाजारपेठा आणि इतर दुकाने उघडल्‍यामुळे लोकांची रस्‍त्‍यावर वर्दळ वाढणार या सर्व बाबींचा विचार करुन भविष्‍यात रुग्‍णसंख्‍येच्‍या वाढीची लाट येण्‍याची शक्‍यता गृहित धरुन 12 हजारपेक्षा जास्‍त रुग्‍णांसाठी आवश्‍यक तयारी करण्‍यात आली आहे. रुग्‍ण भरतीसाठी व संनियंत्रणासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्‍यात आले आहे. वयोवृध्‍द व्‍यक्‍ती, लहान बालके व इतर आजार (मधुमेह, उच्‍च रक्‍तदाब, ह्रदयरोग, मूत्रपिंड विकार, श्‍वसनाचे विकार, गर्भवती महिला इ.) असणा-या व्‍यक्‍ती यांच्‍यावर विशेष लक्ष देण्‍यात येत आहे. उच्‍च रक्‍तदाब व मधुमेह रुग्‍ण शोध व उपचारासाठी विशेष शिबीराचे आयोजन तसेच रुग्‍ण शोधण्‍यासाठी पल्‍सऑक्सिमीटरचा वापर करण्‍यात येणार आहे.

कोरोनावरील खात्रीशीर उपचार किंवा प्रतिबंधीत लसीचा शोध लागेपर्यंत आपणा सर्वांना कोरोनासोबत जगण्‍याची सवय करुन घ्‍यावी लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग होणारे रुग्‍ण आणि बरे होणारे रुग्‍ण याबाबतही सकारात्‍मक विचार करुन वाटचाल करावी लागणार आहे. कोरोनाची भीती न बाळगता आवश्‍यक ती काळजी घेणे आणि शासनाच्‍या आवाहनाला प्रतिसाद देण्‍याची मानसिकता ठेवून कृती करणे या गोष्‍टी आपल्‍याला कोरोनापासून निश्चितच वाचवू शकते.

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे

(भ्रमणध्‍वनी 9423245456)

मुस्लिम बांधवांनी नमाज पठण घरीच करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. २४: राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी ईद-उल-फितर (रमजान ईद) निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच पठण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मंत्री श्री. मलिक म्हणाले, कोरोना विषाणूच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी राज्यात मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. या दरम्यान आलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या काळात मुस्लिम बांधवांनी संयम पाळून आपले सर्व धार्मिक विधी घरीच पार पाडले. कोणतेही गर्दी होणारे कार्यक्रम टाळून मुस्लिम बांधवांनी तरावीहची नमाज, रोजा सहेरी, रोजा इफ्तार आदी धार्मिक विधी घरीच केले. अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने तसेच राज्यातील लॉकडाऊनही सुरु असल्याच्या कारणाने रमजान ईदची नमाजही घरीच पठण करण्यात यावी असे आवाहन विविध मुफ्ती, हजरात व मौलाना आदींनी केले आहे. त्यास अनुसरुन रमजान ईदचे सर्व धार्मिक विधी घरीच करावेत, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे.

ईदनंतर गल्ली, मोहल्ल्यांमध्ये गर्दी करु नका. प्रत्यक्ष भेटीगाठी घेण्यापेक्षा मोबाईलवरुनच नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्या. तसेच जगावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होण्यासाठी प्रार्थना करावी, असेही आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे.

राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. २४: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून शनिवारी त्यासंदर्भात शासन निर्णयदेखील जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता या योजनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आतापर्यंत राज्यातील ८५ टक्के नागरिकांचा या योजनेत समावेश होता. कोरोनाचा उद्रेक पाहता आता उर्वरित १५ टक्के नागरिकांनाही योजनेचा लाभ मिळणार असल्याने राज्यातील १०० टक्के जनतेचा समावेश या योजनेत करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ३१ जुलै २०२० पर्यंत ही योजना अंमलात राहील. त्यानंतर त्याबाबत आढावा घेऊन मुदतवाढीबाबतचा निर्णय घेतला जाईल. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने शनिवारी हा शासन निर्णय जाहीर झाला.

शासन निर्णयात म्हटले आहे की, कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता या दोन्ही योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी उपचार घेता येतील.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १२०९ उपचार पुरविले जातात. त्याचा राज्यातील २ कोटी २३ लाख कुटुंबांना लाभ मिळत आहे. या अंतर्गत राज्यातील सुमारे ८५ टक्के लोकसंख्येचा समावेश होतो. तथापि, राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील नागरिकांनासुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अनुज्ञेय ९९६ उपचार पद्धतींचा लाभ मान्यता प्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.

त्याचबरोबर शासकीय रुग्णालयांकरिता राखीव असलेल्या १३४ उपचारापैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवणयंत्राचा उपचार वगळता १२० उपचार अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये ३१ जुलै २०२० पर्यंत मान्यता प्राप्त दराने करण्यात येतील.  लाभ घेण्यासाठी रहिवासी पुरावा म्हूणन वैध पिवळी, केशरी, पांढरी शिधापत्रिका, तहसीलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यांपैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून सादर करावा लागेल. त्याबरोबरच शासनमान्य फोटो ओळखपत्र देणे आवश्यक राहील. कोरोनाच्या साथीचे गांभीर्य आणि उपचाराची तातडी पाहता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबाबत शिथिलता देण्याचे अधिकार राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कोरोनासाठी शासनाने जाहीर केलेल्या खाजगी अंगीकृत रुग्णालयांकडून कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करण्याकरिता पीपीई किट्स व एन ९५ मास्कचा आवश्यक वापर करण्यात येईल. त्या प्रमाणात शासनाने ठरविलेल्या दरानुसार निधी देण्यात येईल. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचेमार्फत संनियंत्रण केले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकांची असणार आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज

0

मुंबई, दि.24: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज  मिळणार आहे. याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. यासंदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय देखील जारी केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सहकारमंत्री श्री. पाटील म्हणाले,  दिनांक 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यतच्या कालावधीसाठी अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेर पुनर्गठन केलेल्या कर्जामधील दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी रुपये 2 लाखापर्यंत थकित व परतफेड न झालेली रक्कम असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेची कार्यवाही सुरू झाली. मात्र त्याचदरम्यान देशासह राज्यात कोरोनाचे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाले. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे  कर्जमुक्तीच्या पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीतील काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही.

अंतिम यादीमध्ये नाव असूनही ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा  लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक, सहकारी संस्था, ग्रामीण बँकांमध्ये कर्ज आहे.  या बँकांनी  शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असे गृहित धरुन  यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी  कर्ज उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

पाच वर्षाच्या ‘गुडीया’ने दिली, कोरोनाला मात!

0

बुलडाणा: लहान असो वा वयस्क सर्वांचाच कोरोनाने पिच्छा पुरविला आहे. मोठ्या शहरांमध्ये, तर कोरोनाचे साम्राज्य आहे. अशा परिस्थितीत मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील पाच वर्षाच्या ‘गुडीया’ ने कोरोनाशी चिवट झुंज दिली. मुंबई येथून गावाकडे आल्यानंतर कोरोना पॉझीटीव्ह आढळलेली ही मुलगी बुलडाणा येथे कोविड केअर सेंटरला दाखल होती. या गुडीयाने कोरोनावर मात करीत आज सर्वांना सुखद धक्का दिला. ही गुडीया आनंदाच्या भावमुद्रेत सेंटरच्या बाहेर पडली व टाळ्या वाजवून उपस्थितांनी तिचे स्वागत केले.  गुडीयाच्या सुट्टीमुळे मलकापूर तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यात यश आले आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 37 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी 26 रूग्ण बरे होवून आपल्या स्वगृही परतले आहेत. नरवलेच्या गुडीयाला केंद्र शासनाच्या नवीन निकषांनुसार कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळून न आल्यामुळे सुट्टी देण्यात आली. यानंतर तिला घरी विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूर तालुक्यातील येथील पाच, खामगाव तालुक्यातील दोन, शेगाव येथील तीन, सिंदखेड राजा तालुक्यातील 2, देऊळगाव राजा येथील दोन, चिखली येथील तीन, बुलडाणा येथील 8 व जळगाव जामोद येथील एक अशाप्रकारे 26 रुग्णांचा समावेश आहे. सध्या रुग्णालयात आठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नरवलेच्या या चिमुकलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आला. त्यांनी पुष्पगुच्छ देवून चिमुकलीचे स्वागत केले.  यावेळी उपस्थित डॉक्टर्स, नर्सेस व ब्रदर्स यांनी गुडीयाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच गुडीयाला मोठ्या आनंदाने निरोप दिला. शासनाच्या रुग्णवाहिकेतून तिला घरी सोडण्यात आले. यावेळी गुडीयाच्या पालकांनी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या काळजीबद्दल आभार व्यक्त केले. तसेच सर्वांना धन्यवादही दिले.