Home Blog Page 2563

पगारासाठी ‘करोना योद्धा’ रस्त्यावर

पुणे- पुणे महापालिकेत आयुक्तालयात आपली तुटपुंज्या वेतनाची गाऱ्हाणी मांडून पुन्हा रणांगणात गेलेय आरोग्य सेविकांचा किस्सा मायमराठी णे चव्हाट्यावर आणल्यानंतर आज श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल मध्ये गेले सहा महिने पासून कर्मचाऱ्यांचे पगार मिळाले नसल्यामुळे आज डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांनी पगारासाठी आंदोलन केले.

सध्या पुणे शहरातील करोना बधिताचा आकडा सहा हजारापेक्षा जास्त झाला असून काशीबाई नवले हॉस्पिटल मध्ये ८० करोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच ६० जण आयसोलेशन मध्ये आहेत. असे असताना इथले डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून त्यांचेवर उपचार करीत आहेत. परंतु गेली सहा महिने या कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आज सर्वजण रस्त्यावर उतरले व पगाराची मागणी केली.

सदर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्स क्लार्क लॅब टेक्निशियन, स्वच्छता कर्मचारी असे एकूण 2 हजार 500 पर्यंत कर्मचारी काम करत असून रुग्णालय प्रशासनाने गेले सहा महिने पगार केलेला नसल्यामुळे येथील कर्मचारी आर्थिक अडचणीत आले असून जीवनावश्यक वस्तू ही घेणे त्यांना अवघड झाले आहे.

आत्तापर्यंत सदर कर्मचाऱ्यांनी आपल्या ओळखीच्या दुकानदाराकडून उधारीवर किराणामाल वगैरे भरला असला तरी आता पैसे दिले नसल्यामुळे दुकानदारांनी किराणामालही देणे बंद केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरीही हे कर्मचारी काम करीत आहे. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनाची गाजरे दाखवली जात असल्यामुळे तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे असे कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे.

याबाबत येथील हॉस्पिटलच्या डीन, शालिनी सरदेसाई यांना माहिती विचारली असता आमचे प्रयत्न चालू असून समाज कल्याण कार्यालयाकडून व विद्यार्थ्यांकडून फी मिळाली की पगार देणेबाबत कार्यवाही केली जाईल अशी माहिती दिली.

३ हजारांहून अधिक नागरिक महाराष्ट्रात

0

मुंबई दि. ३०:  वंदेभारत उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात २६ फ्लाईट्सच्या माध्यमातून ३ हजार ४५९ नागरिक परत आले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या ११३७ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १५७२ असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ७५० इतकी आहे. दि. ७ जून २०२० पर्यंत साधारणत: आणखी सहा फ्लाईटस येणे अपेक्षित आहे.  आतापर्यंत महाराष्ट्रात ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया  या देशातून प्रवासी आले आहेत.

बृहन्मुंबईतील प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. तिथे गेल्यावर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांकडून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याची कार्यवाही केली जात आहे.

आलेल्या नागरिकांचे कडक क्वारंटाईन होईल यावर प्रशासनाचे कडक लक्ष असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात असून या नागरिकांचा प्रवासी पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे पार पाडत आहे.

४१ हजार ८७४ बस फेऱ्यांतून ५ लाखांहून अधिक परप्रांतीयांचे स्थलांतर -९४ कोटी रूपयांहून अधिक खर्च

0

मुंबई दि. ३०: परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली. काल २९ तारखेपर्यंत ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांच्या माध्यमातून ५ लाख ८ हजार ८०३ स्थलांतरितांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा नजीकच्या रेल्वे स्टेशनपर्यंत नेऊन सोडण्यात आले आहे. परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत बसने  पाठविण्यासाठी  शासनाने १०० टक्के निधी उपलब्ध करून दिला असून आतापर्यंत ९४.६६ कोटी रुपये  यावर खर्च झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आभार

हे काम एसटी महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांनी हातात हात घालून केले आहे. एसटी महामंडळाने बसेस उपलब्ध करून दिल्या तर रस्त्याने पायी जाणाऱ्या लोकांना थांबवून तसेच ट्रक किंवा अन्य माध्यमातून जाणाऱ्या लोकांना थांबवून त्यांच्या प्रवासासाठी  बसची व्यवस्था उपलब्ध करणे, त्यांना नियोजनबद्धरित्या बसमध्ये बसवून देण्याचे काम संबंधित जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. अवैधरित्या लोकांना घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि इतर वाहनांवर आरटीओ कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली आहे.

अशा आपत्तीच्या प्रसंगी मदतीचे अनेक हात पुढे येत असताना सर्वसामान्य लोकांसाठी  सेवा देणाऱ्या एसटी महामंडळ तसेच आरटीओ कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले असून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. अडचणीच्या काळात यंत्रणेतील या सर्व कर्मचाऱ्यांची मदत खूप मोलाची आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

स्थलांतरितांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अर्थात आपल्या राज्याची रक्त वाहिनी म्हणून जिचा आदराने उल्लेख होतो त्या एसटी महामंडळाच्या बसेस पुढे आल्या आणि  आता या बसेसमधून इतर राज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा जवळच्या रेल्वे स्टेशनपर्यंत नेऊन सोडण्यात येत आहे.

आतापर्यंत आपल्या लाल परीने मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत जाऊन स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे.

यातील काही स्थलांतरित मजुरांनी पुढच्या प्रवासासाठी श्रमिक रेल्वे सेवेचाही लाभ घेतला आहे.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून जसे इतर राज्यातील स्थलांतरित मजूर आणि कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले जात आहे तसेच इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्याचेही काम केले जात आहे.

पुणे विभागातून 2 लाख 4 हजार 32 प्रवाशांना घेऊन 153 विशेष रेल्वेगाडया रवाना – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे, दि. 30 – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम,ओरीसा व पश्चिम बंगाल या राज्यामधील 2 लाख 4 हजार 32 प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून 30 मे 2020 अखेर 153 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तरप्रदेशसाठी 61, उत्तराखंडसाठी 2, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 36, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी 8, छत्तीसगडसाठी 5, जम्मू आणि काश्मिर साठी 1, मणिपूरसाठी 1,आसामसाठी 1, ओरीसासाठी 2 व पश्चिम बंगालसाठी 12 आणि मिझोराम 1 अशा एकूण 153 रेल्वेगाडया 2 लाख 4 हजार 32 प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत.

पुणे विभागात 206 शिवभोजन केंद्रामध्ये
23 हजार 148 गरजूंना लाभ
पुणे विभागातील स्वस्तधान्य दुकानांची संख्या 9 हजार 95 असून आज रोजी 9 हजार 92 सुरूआहेत. (ऑनलाईननुसार) स्वस्तधान्य दुकानांमधून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे माहे मे 2020 साठी धान्यवाटप सुरू झाले असून 93.17 टक्के धान्यवाटप झालेले आहे.
29 मे 2020 रोजी विभागात एकूण 206 शिवभोजन केंद्र असून सर्व सुरू आहेत. त्यामध्ये 23 हजार 148 गरजूंनी लाभ घेतला आहे.

पुणे जिह्यातील ग्रामीण भाग कोरोना मुकाबल्‍यासाठी सज्‍ज

0

       प्रारंभीच्‍या काळात पुणे महानगर पालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिका वगळता पुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कमी होता. लॉकडाऊन शिथील झाल्‍यावर मुंबई तसेच पर जिल्‍ह्यात गेलेले नागरिक ग्रामीण भागात परत आले, त्‍यामुळे जिल्‍ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येवू लागला. जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्‍यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी विविध उपाय योजण्‍यास सुरुवात  केली.

       पुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागात (28 मे 2020 पर्यंत) एकूण रुग्‍ण 241 तर बरे झालेले रुग्‍ण 91 होते. एकूण क्रियाशील 143 रुग्ण असून 7 रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. नगरपालिका क्षेत्रात एकूण रुग्‍ण 63 तर बरे झालेले रुग्‍ण 31 होते. एकूण क्रियाशील रुग्‍ण 30 असून दोन रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. महाराष्‍ट्राचा मृत्‍यूदर 3.2 टक्‍के तर पुणे ग्रामीणचा मृत्‍यूदर 2.9 टक्‍के इतका आहे. पुणे ग्रामीण भागात एकूण कन्‍टेनमेंट झोन 107 तर क्रियाशील कन्‍टेनमेंट झोन 71 आहेत. यातील  पूर्ण झालेले कन्‍टेनमेंट झोन 36 आहेत. नगरपालिका क्षेत्रात एकूण कन्‍टेनमेंट झोन 12 तर क्रियाशील कन्‍टेनमेंट झोन 8 आहेत. यातील पूर्ण झालेले कन्‍टेनमेंट झोन 4 आहेत. जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील 241 रुग्‍णांपैकी 96 रुग्‍ण मुंबई येथून तर 70 रुग्‍ण पुण्‍यातून आलेले आहेत. नगरपालिका क्षेत्रातील 63 रुग्‍णांपैकी 47 रुग्‍ण मुंबई येथून तर 4 रुग्‍ण पुण्‍यातून आलेले आहेत.

       पुणे जिल्‍ह्यात गेल्‍या 15 दिवसात इतर जिल्‍ह्यातून 55 हजार 545 नागरिक परत आले आहेत. जिल्‍ह्यात 111 चेकपोस्‍ट असून त्‍यावर 912 कर्मचारी कार्यरत आहेत. 3990 नागरिकांचे संस्‍थात्‍मक विलगीकरण करण्‍यात आले असून 67 हजार नागरिकांचे गृह विलगीकरण करण्‍यात आले आहे. जिल्‍ह्याच्‍या 13 तालुक्‍यात 33 कोविड केअर सेंटर (सीसीसी) असून उपलब्‍ध खाटांची संख्‍या 3880 इतकी आहे. कोविड रुग्‍णालये 21 असून उपलब्‍ध खाटांची संख्‍या 1181 इतकी आहे. नजीकच्‍या काळात 18 कोविड केअर सेंटर आणि 4682 खाटा, 28 कोविड रुग्‍णालये आणि 1830 खाटा उपलब्ध करण्‍याचे नियोजन आहे. तात्‍पुरत्‍या कोविड रुग्‍णालयाची व्‍यवस्‍था करण्‍यात येत असून विप्रो हिंजेवाडी हॉस्‍पीटल येथे 450 खाटांचे नियोजन आहे. हे हॉस्‍पीटल 3 जूनपासून कार्यरत होईल. मर्सिडीज म्‍हाळुंगे इंगळे हॉस्‍पीटलमध्‍ये 1408 खाटा असून सध्‍या 40 रुग्‍ण दाखल आहेत. नागरिकांच्‍या मदतीसाठी विशेष नियंत्रण कक्ष (स्‍पेशल कंट्रोल रुम) स्‍थापन करण्‍यात आला असून तेथील टोल फ्री क्रमांक 1800 233 4130 असा असून एकूण 15 लाईन्‍स उपलब्ध आहेत. यावर आतापर्यंत 23 हजार 830 नागरिकांनी कॉल करुन माहिती घेतली.

       शरद भोजन योजना– जिल्‍हा परिषदेच्‍यावतीने कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर निराधार ज्‍येष्‍ठ नागरिक, निराधार दिव्‍यांग नागरिकांना शरद भोजन योजनेचा लाभ देण्‍यात येत आहे. तयार जेवण थाळी दिवसातून दोन वेळा 1094 निराधार ज्‍येष्‍ठ नागरिक आणि 192  निराधार दिव्‍यांग नागरिकांना देण्‍यात येत आहे. परिपूर्ण रेशन कीट 6000 अतितीव्र दिव्‍यांग नागरिक, 200 तृतीयपंथी आणि 500 कलावंतांना वाटप करण्‍यात आले. 1 लिटर खाण्‍याचे तेल 1 लक्ष 67 गरजूंना तसेच 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू प्रती व्‍यक्‍ती 1 लक्ष 75 हजार गरजूंना वाटप करण्‍यात आल्‍याची माहिती देण्‍यात आली. नियमित रेशन वाटप 97.64 टक्‍के तर प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजना वाटप 94.76 टक्‍के झाले आहे. 3 लक्ष 57 हजार 518 विद्यार्थ्‍यांना 17 लक्ष 75 हजार 229 किलो तांदूळ आणि 3 लक्ष 52 हजार 822 किलो कडधान्‍य-डाळ वाटप करण्‍यात आली. अंगणवाडी विद्यार्थी तसेच गरोदर मातांनाही घरपोच आहार वाटप करण्‍यात आले. सुमारे 3 लक्ष 53 हजार कुटुंबांना साबण-सॅनिटायझरचे वाटप करण्‍यात आले. 1 लक्ष 67 हजार सॅनिटरी नॅपकीनचे नियोजन पूर्ण झाले आहे. चेकपोस्‍टवरील कर्मचा-यांना 1500 रिफ्लेक्‍टर जॅकेटचे वाटप करण्‍यात आले. 1500 पल्‍स ऑक्सिमीटरचेही  वाटप करण्‍यात आले याशिवाय 20 हजार क्षेत्रीय कर्मचा-यांना वेदनाशामक बाम, बिस्‍कीट पुडे, शक्ति‍वर्धक पेय इत्‍यादींचे वाटप करण्‍यात आले. जिल्‍हा प्रशासनामार्फत शेतक-यांना गावोगावी पेट्रोल-डिझेल पुरवठा करण्‍यात आला. आतापर्यंत एकूण 25 हजार 674 लिटरहून अधिक इंधन पुरवठा करण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

       मजूर व्‍यवस्‍थापन– जिल्‍हा प्रशासनाचे एकूण 40 रिलीफ कॅम्‍प असून त्यामध्‍ये 12 हजार 322 स्‍थलांतरित कामगार आहेत. सुमारे 1 लक्ष 17 हजार नागरिक 91 ट्रेनमधून 14 राज्‍यांना रवाना करण्‍यात आलेत. 17 हजार 512 नागरिक इतर जिल्‍ह्यात व 23 हजार 248 नागरिक विविध राज्‍यांमध्‍ये 3595 बसेसने पाठविण्‍यात आले. 1647 विद्यार्थी  इतर जिल्‍ह्यात व 598 विद्यार्थी विविध राज्‍यांमध्‍ये 115 बसेसने पाठविण्‍यात आले.

        मनरेगा (महात्‍मा गांधी नरेगा) – गेल्‍या दीड महिन्‍यामध्‍ये मनरेगा (महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) कामांना जिल्‍ह्यात मोठया प्रमाणात चालना देण्‍यात आली. ग्रामपंचायत सहभाग 13 वरुन 544 पर्यंत वाढविण्‍ययात आला आहे. मजूर उपस्थिती 131 वरुन  4028 पर्यंत गेली आहे. कामांच्‍या संख्‍येतही 17 वरुन 1390 पर्यंत वाढ झाली आहे.  

     कोरोनाच्‍या संकटाशी मुकाबला करत ग्रामीण भागातील अर्थव्‍यवस्‍थेचे चक्रही बंद पडणार नाही, यासाठी आवश्‍यक त्‍या उपाययोजना करण्‍यात येत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला तर पुण्‍याला रुग्‍ण पाठविण्‍याऐवजी तेथेच आवश्‍यक ते उपचार वेळेत मिळतील यासाठीही नियोजन करण्‍यात येत आहे. सार्वजनिक आरोग्‍य केंद्राच्‍या तसेच ग्रामीण रुग्‍णालयांच्‍या बळकटीकरणावर भर देण्‍यात येत आहे. यासाठी पुरेसा निधीही उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे

पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 4 हजार 140

पुणे विभागातील 4 हजार 799 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 9 हजार 364 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 30 :- पुणे विभागातील 4 हजार 799 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9 हजार 364 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 140 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 209 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 7 हजार 441 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 4 हजार 206 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 913 आहे. कोरोनाबाधित एकूण 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 195 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 383 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 241, सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 41, सांगली जिल्ह्यात 3 कोल्हापूर जिल्ह्यात 68 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 482 कोरोना बाधीत रुग्ण असून 144 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 321 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 836 कोरोना बाधीत रुग्ण असून 321 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 436 आहे. कोरोना बाधित एकूण 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 101 रुग्ण असून 55 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 43 आहे. कोरोना बाधित एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 504 कोरोना बाधीत रुग्ण असून 73 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 427 आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 85 हजार 723 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 80 हजार 520 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 203 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 71 हजार 41 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 9 हजार 364 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप : – दि.30 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
0000

लघुउद्योगांना देण्यात येणाऱ्या पॅकेजमध्ये सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल चा समावेश करावा

पुणे-महाराष्ट्र शासनाकडून लघुउद्योगांना देण्यात येणाऱ्या पॅकेजमध्ये सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल चा समावेश करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार तसेच राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्याकडे करण्यात आली आहे

या सर्वांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे कि ,गेले सत्तर दिवस सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल चा संपूर्ण व्यवसाय पूर्णपणे बंद आहे ड्रायव्हिंग स्कूल चे व्यवसायाची जागा भाडेकरारावर आहे दर् महा भाड्याची रक्कम सुद्धा खूप जास्त आहे तसेच प्रत्येक ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ऑफिस स्टाफ ड्रायव्हिंग प्रशिक्षक अधिकृत प्रशिक्षक असे सर्व मिळून म्हणून किमान सात ते आठ कुटुंब एका ड्रायव्हिंग स्कूल वर अवलंबून आहे सत्तर दिवस सर्व कामकाज बंद असल्यामुळे वरील सर्वांना पगार देणे ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना शक्य होत नाहीये तसेच सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल मध्ये प्रशिक्षणासाठी वापरात असलेली वाहने बँकांकडून कर्जरूपाने घेतलेली आहे त्याचे हप्ते कसे भरायचे या विवंचनेने मध्ये सरकारमान्य मोटर ड्रायविंग स्कूलचे संचालक आहेत covid-19 च्या पार्श्वभूमीवर अजुन किती दिवस लॉक डाऊन मध्ये राहावे लागणार आहे माहिती नाही सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल च्या संचालकांना आकारण्यात येणारे भाडे खूप जास्त आहे covid-19 च्या पार्श्वभूमीवर आपणास विनंती करण्यात येत आहे हे दरमहा ऑफिसचे भाडे भरण्यासाठी मदत मिळावी अथवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सदर खाजगी मालकांना जागा भाडे महाराष्ट्र शासनाकडून देण्यात यावे तसेच ड्रायव्हिंग स्कूलच्या गाड्यांचे हप्ते भरण्यासाठी व प्रशिक्षकांच्या पगारासाठी महाराष्ट्र शासनाकडून एम एस एम ई च्या माध्यमातून प्रत्येक सरकार मान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल ला लघुउद्योग अंतर्गत प्रत्येक ड्रायव्हिंग स्कूल ला किमान दहा लाखाचे कर्ज उपलब्ध करून द्यावे व या अभूतपूर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हातभार लावा अशी मागणी करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन यांनी मदत केली नाही तर सरकार मान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संपूर्ण उद्योग डबघाईस आल्या शिवाय राहणार नाही

वीजपुरवठा सतत खंडित झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा

पश्चिम महाराष्ट्राच्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री डॉराऊत यांचे आदेश

पुणे, दि30 मे 2020 सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. त्यात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यास संबंधीत जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील विविध कामांचा ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी (दि. 29) व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे यावेळी उपस्थित होते. ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, कोरोना विषाणूच्या सावटामुळे बंद असलेले व्यवसाय, उद्योग हळूहळू सुरु होत आहेत. यासोबतच शासकीय व खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम देखील सुरु आहे. सध्या उन्हाळा असल्याने अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्याची अत्यंत गरज आहे. ज्या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे त्याची गंभीर दखल घेऊन संबंधीत जबाबदार व अकार्यक्षम कर्मचारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा अशा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला  

बारामती परिमंडलामध्ये ‘एक गाव- एक दिवस’ हा वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचा, नवीन वीजजोडणी व वीजबिल दुरूस्ती मोहिमेचा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाचे डॉ. राऊत यांनी कौतुक केले. हा उपक्रम राज्यभरात राबविण्याचे त्यांनी निर्देश दिले. वीजग्राहकांना प्रामुख्याने वीजपुरवठ्याबाबतची माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळालीच पाहिजे. देखभाल व दुरुस्तीसाठी वीज बंद ठेवण्याची पूर्वसूचना असेल किंवा इतर कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची ग्राहकांना पूर्वसूचना न मिळाल्यास गंभीर दखल घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी असलेली विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या सदस्यांनी निवडप्रक्रिया सुरु होत आहे. या समितीच्या नियमित बैठकी घेण्यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन वीजविषयक स्थानिक प्रश्न सोडविण्यात यावे तसेच थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करावेत असे ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी सांगितले.

सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी राज्यभरात कंत्राटदार नेमण्यात आले आहे. या कंत्राटदारांकडून तत्परतेने किंवा आवश्यकतेनुसार समाधानकारक कामे होत नसल्यास किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे खंडित वीजपुरवठ्याचा कालावधी वाढत असल्यास अशा कंत्राटदारांविरुद्ध ताबडतोब कारवाई करण्यात यावी आणि त्यांचा काळ्या यादीत समावेश करावा, अशी सूचना यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिली. 

या आढावा बैठकीत महावितरणचे कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) पी. के. गंजू, प्रभारी संचालक (वित्त) स्वाती व्यवहारे, पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे (बारामती), श्री. सचिन तालेवार (पुणे), श्री. अंकुर कावळे (प्रभारी, कोल्हापूर) आदींसह पश्चिम महाराष्ट्रातील वरिष्ठ अभियंते, अधिकारी यांची उपस्थिती होती.

WHO सोबतचे सर्व संबंध तोडले- ट्रम्प यांची घोषणा

0

वॉशिंग्टन:: करोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेनं जागतिक आरोग्य संघटनेशी (WHO) असलेले सर्व संबंध तोडले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी यासंबंधीची घोषणा केली. जागतिक आरोग्य संघटनेवर संपूर्णपणे चीनचं नियंत्रण आहे. त्यामुळं या संघटनेशी अमेरिकेनं आपले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं ट्रम्प म्हणाले यांनी यासंबंधीची घोषणा केली. जागतिक आरोग्य संघटनेवर संपूर्णपणे चीनचं नियंत्रण आहे. त्यामुळं या संघटनेशी अमेरिकेनं आपले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं ट्रम्प म्हणाले.जगभरात करोना विषाणूमुळं झालेल्या मृत्यूंना जागतिक आरोग्य संघटना आणि चीनला दोषी ठरवलं आहे. वर्षाला केवळ ४० दशलक्ष डॉलर इतकी मदत देत असतानाही WHO वर चीनचं संपूर्णपणे नियंत्रण आहे. दुसरीकडे अमेरिकात्या तुलनेत वर्षाला ४५ कोटी डॉलरची मदत देत आहे. तरीही संघटना आवश्यक सुधारणा करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळं आज आम्ही या संघटनेसोबत असलेले संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेत आहोत, असं ट्रम्प यांनी सांगितलं.

जागतिक आरोग्य संघटनेचा रोखण्यात आलेला निधी आता जगातील इतर आरोग्य संघटनांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे, असं सांगतानाच, ट्रम्प यांनी चीनविरोधात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांची यावेळी घोषणा केली.

करोना चीनचा वुहान व्हायरस असल्याचं यावेळी ट्रम्प म्हणाले. चीननं हा वुहान व्हायरस जगभरात फैलावला. त्यामुळं जागतिक महामारीचं संकट कोसळलं. या व्हायरसनं एक लाखाहून अधिक अमेरिकी नागरिकांचा बळी घेतला. संपूर्ण जगभरात लाखो नागरिकांचा या व्हायरसनं जीव घेतला, असं ट्रम्प म्हणाले.

येरवडा जेलबाहेर कैद्याच्या स्वागताला गर्दी; पोलिसासह ८ अटकेत

पुणे-खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या दोन कैद्यांना पॅरोल मंजूर झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी ३० ते ४० तरुणांनी कारागृहाबाहेर गर्दी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करत वाहनांचा कर्णकर्कश आवाज आणि आरडाओरडा केला. पोलिसांनी पाठलाग करून एका पोलीस कर्मचाऱ्यासह आठ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, लोखंडी सळ्या जप्त केल्या आहेत.खुनाच्या गुन्ह्यातील दोन कैद्यांना पॅरोल मंजूर झाला. हे कैदी कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी ३० ते ४० तरुणांनी गर्दी केली. वाहनांमधून जाताना कर्णकर्कश आवाज आणि आरडाओरडा करत लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केला.

अरुण गवळीला शरण येण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

0

नागपूर. पॅरोलला मुदतवाढ देण्याबाबत यापुढे कोणतीही याचिका स्वीकारली जाणार नाही, असे सांगतानाच ५ दिवसांत नागपूर मध्यवर्ती तुरुंगात शरण येण्याचे आदेश उच्च न्यायालयाने अरुण गवळीला दिले आहेत. गवळीने २४ तासांमध्ये मुंबई प्रशासनाकडे नागपूर प्रवास करण्यासंबंधीची परवानगी मागावी. तसेच ती परवानगी एका दिवसात मंजूर करून घ्यावी. त्यानंतर पुढील तीन दिवसांत गवळीने नागपूर गाठावे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळे गवळी पॅरोलवर नागपूर तुरुंगातून जवळपास ४५ दिवसांसाठी बाहेर आला होता. त्याच दरम्यान राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला होता. त्यामुळे गवळीने अर्ज करत पॅरोल वाढवण्याची विनंती केली होती. न्यायालयाने त्यावेळी विनंती मान्य करून १० मेपर्यंत त्याच्या पॅरोलमध्ये वाढ केली होती. त्यानंतर मात्र त्याची विनंती फेटाळण्यात आली.

सुक्ष्म नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे. -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे-महापालिका व जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे,असे आवाहन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.     कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी शासकीय यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या  उपाययोजनाबाबत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम,महापौर मुरलीधर मोहोळ, आ. अशोक पवार, आ. संजय जगताप, आ. अतुल बेनके, आ. राहूल कुल,  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम,  जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीए चे आयुक्त विक्रमकुमार,सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल,  पोलीस अधीक्षक संदीप पाटील,  ससूनचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.     उपस्थित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे म्हणणे व सूचना ऐकून घेतल्यानंतर उप मुख्यमंत्री श्री.पवार  पुढे म्हणाले ,लोकांमध्ये जनजागृती व त्यांच्यात विश्वास निर्माण  करणे आवश्यक आहे.ग्रामीण भागातील लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकते.त्यामुळे कोरोनाबरोबर जगताना घ्यावयाच्या काळजीबाबत लोकांना समजावून सांगणे आवश्यक आहे. महापालिकेने बालेवाडीत बेडची व्यवस्था  केली आहे.पण ग्रामीण भागातही तशी व्यवस्था उभी करावी लागेल.शेवटी माणसांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे.  लाॕकडाऊनच्या अनुषंगाने बोलताना उप मुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, त्या-त्या भागातील भौगोलिक परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागेल.    खाजगी दवाखान्याचे ८० टक्के बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. बी.जे.मेडिकल काॕलेज ससून हाॕस्पिटलच्या नवीन ११ मजली इमारतीचे सर्व मजले उपयोगात आणले पाहिजे. निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही.मागणी केल्यास निधी उपलब्ध करून देऊ,असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.  जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात लक्ष केंद्रित करावे. रुग्णालय सक्षम करावे.पोलिस यंत्रणा व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करावे,असे सांगितले.   ग्रामीण भागात डाॕक्टरांनी निवासी थांबले पाहिजे,या राज्यमंत्री डाॕ.कदम यांच्या सूचनेवर उपमुख्यमंत्री यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,असे निर्देश जिल्हाधिका-यांना दिले.

खाजगी डॉक्टरांना राज्य शासन पीपीई किट उपलब्ध करणार

0

मुंबई दि.२९ : कोविड 19 व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निदेश मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले.

कोविड 19 विषाणू प्रादर्भावाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आज आढावा घेतला. कोविड 19 संदर्भात जनमानसात असलेली भीती दूर होणे आवश्यक आहे. ताप, कोरडा खोकला, अशक्तपणा, अर्धशिशी, नाक चोंदलेले असणे अशा स्वरुपाची लक्षणे दिसत असल्यास लगेच चाचणी करणे गरजेचे आहे. पण अशी चाचणी डॉक्टरांच्या लेखी सल्ल्याशिवाय करता येत नाही आणि अनेक डॉक्टरांना त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतल्याशिवाय रोग्यांची तपासणी करणे योग्य वाटत नाही. त्यांची यासंदर्भातील काळजी दूर करण्यासाठी  त्यांना महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरमार्फत पीपीई कीट पुरविण्यात यावेत, असे श्री. ठाकरे यांनी निदेश दिले. येत्या पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते. या आजारांची आणि कोविड 19ची लक्षणे सारखी असल्याने जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. महापालिकांची आणि  शासनाची रुग्णालये ही कोविड 19 साठी रुग्णालये म्हणून राखून ठेवण्यात आलेली असल्याने पावसाळ्यातील आजारासंदर्भात खाजगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्त्वाची असणार आहे. या रुग्णालयांच्या कर्मचारी वर्गाकरिता सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असणे गरजेचे आहे. म्हणून केंद्राकडे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांकरिता आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सेवांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी आपण केंद्राकडे केली आहे. त्याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज दिल्या.

जगात आणि देशात अन्यत्र कोविड 19 मुळे मरण पावलेल्या रुग्णांचे प्रमाण 5 ते 7 टक्के असताना राज्यातील मृत्यू दर 3.3 टक्के आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. कोविड 19 प्रादुर्भावापूर्वी कोविड विषाणू चाचणीसाठी राज्यात केवळ 2 सध्या शाळा होत्या केवळ 2 महिन्यात आपण राज्यात 72 प्रयोगशाळा सुरू करू शकलो येत्या आठवड्यात नव्याने 26 लॅब येत्या काही दिवसात कार्यान्वित होतील, या कामगिरीबद्दल प्रशासनाचे कौतुक करून मुख्यमंत्र्यांनी कोरोनावर उपचारासाठी नेमण्यात आलेल्या 11 तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृतीदलाचे केंद्राने आणि अन्य राज्याने कौतुक केले आहे, याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या डॉक्टरांनी उपचाराचा प्रोटोकॉल तयार केला आहे. तो सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आला. हे डॉक्टर्स 24 तास उपलब्ध असून कुठल्याही जिल्ह्याला उपचाराबाबत आवश्यकता असल्यास ते त्यांना संपर्क करु शकत असल्याने कोविड 19 मुळे होणार्‍या मृत्यूची टक्केवारी रोखण्यात आपल्याला यश आले आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

राज्याचा रुग्ण दुपटीचा दर (डबलींग रेट) कालावधी तीन दिवसांवरुन १४ दिवसांवर आला आहे आणि राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) 31 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.

येत्या सोमवारपर्यंत मुंबईत एसएससीआय वरळी, महालक्ष्मी, बांद्रा व नेसको, गोरेगाव अशा मिळून २४७५ खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेकरिता उपलब्ध होत आहेत. बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत उभारलेले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल (आयसीयू २०० बेड्स १००० बेड्सची जम्बो सुविधा), महालक्ष्मी येथे सध्या युद्धपातळीवर सुरु. असलेले कोरोना केअर सेंटरचे (CCC) काम, नेस्को गोरेगाव येथे येथे ५३५ बेड्सची जम्बो सुविधा, रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेल्या डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर (DCHC) आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल (DCH) यांची उभारणी यासर्वांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळे घेतला.

खाजगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड्स मुंबई महापालिकेने आपल्या ताब्यात घेण्याचे निदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आता महापालिकेकडे रुग्णांसाठी अधिक चांगल्याप्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या सर्व खाटांचे नियोजन आता संगणकाच्या माध्यमातून रिअल टाईम डॅशबोर्डमध्ये करण्याचे तसेच प्रत्येक बेडला युनिक आयडी देण्याची सूचना श्री. ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना केली.

यावेळी उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई, परिवहन मंत्री श्री. अनिल परब, मुख्य सचिव श्री. अजोय मेहता, महापालिका आयुक्त श्री. आय. एस. चहल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

राज्यात कोरोनाच्या ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.२९ : कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधिक ७३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात २६ हजार ९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २६८२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार ५५७ नमुन्यांपैकी ६२ हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३५ हजार ४६७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार ९६७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११ दिवस होता तो आता १५.७ दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.३८ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे.

राज्यात ११६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ५८ (मुंबई ३८, ठाणे १, भिवंडी ३, नवी मुंबई ९, रायगड २, मीरा-भायंदर ३, पनवेल १, कल्याण डोंबिवली १), नाशिक- ३२ (जळगाव १७, नाशिक ३, मालेगाव ५, धुळे ७), पुणे- १६ (पुणे मनपा १३,सोलापूर ३), कोल्हापूर-३, औरंगाबाद- ५, अकोला- २ (अमरावती २) आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७७ पुरुष तर ३९ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८  रुग्ण आहेत तर ५५  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या ११६ रुग्णांपैकी ७५ जणांमध्ये ( ६५ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २०९८ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १६ मे ते २६ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७० मृत्यूंपैकी मुंबई १६, जळगाव- १४, नवी मुंबई -९, धुळे -६, मालेगाव -५ , औरंगाबाद ३, भिवंडी-३, नाशिक -३ , अमरावती -२ , कोल्हापूर -२, मीरा भाईंदर -२ , रायगड -२ , सोलापूर -२ आणि १ मृत्यू ठाणे येथील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (३६,९३२), बरे झालेले रुग्ण- (१६,००८), मृत्यू- (११७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव रुग्ण- (१९,७४५)

ठाणे: बाधित रुग्ण- (८६३८), बरे झालेले रुग्ण- (२७२९), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५७३७)

पालघर: बाधित रुग्ण- (९१३), बरे झालेले रुग्ण- (२८०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६१०)

रायगड: बाधित रुग्ण- (९९९), बरे झालेले रुग्ण- (५१८), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव रुग्ण- (४५०)

नाशिक: बाधित रुग्ण- (१०७०), बरे झालेले रुग्ण- (८१८), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१९२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३८)

धुळे: बाधित रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (७०), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४९)

जळगाव: बाधित रुग्ण- (५५५), बरे झालेले रुग्ण- (२६३), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२२३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०)

पुणे: बाधित रुग्ण- (७२२३), बरे झालेले रुग्ण- (३४२५), मृत्यू- (३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३४८४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (७६९), बरे झालेले रुग्ण- (३१४), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३९३)

सातारा:  बाधित रुग्ण- (४५९), बरे झालेले रुग्ण- (१४५), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२९८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३७९), बरे झालेले रुग्ण- (८७), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२८८)

सांगली: बाधित रुग्ण- (१०४), बरे झालेले रुग्ण- (५३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२१), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१४)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (२१६), बरे झालेले रुग्ण- (८८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१२३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१४१०), बरे झालेले रुग्ण- (९५९), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३८६)

जालना: बाधित रुग्ण- (११७), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८५)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (९७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४६)

परभणी: बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४०)

लातूर: बाधित रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५१)

बीड: बाधित रुग्ण- (४६), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव रुग्ण- (४१)

नांदेड: बाधित रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (८२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२०)

अकोला: बाधित रुग्ण- (५३७), बरे झालेले रुग्ण- (२७५), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (२३३)

अमरावती: बाधित रुग्ण- (२०२), बरे झालेले रुग्ण- (११७), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१२८), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३६)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (५६), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२४)

वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२)

नागपूर: बाधित रुग्ण- (५११), बरे झालेले रुग्ण- (३४२), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१६०)

वर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०)

भंडारा: बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५५)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३१), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४३)

एकूण: बाधित रुग्ण-(६२,२२८), बरे झालेले रुग्ण- (२६.९९७), मृत्यू- (२०९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव रुग्ण-(३३,१२४)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २८८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

मान्सून उंबरठ्यावर उभा आहे, हे लक्षात घेता येणाऱ्या काळात कोरोना शिवाय इतर साथरोग देखील वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने पूर्वतयारी सुरु आहे. हिवतापासाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये कीटकनाशक फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे तर पाणी गुणवत्तेसाठी राज्यात स्वच्छता सर्वेक्षण सुरु आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोरोनासाठी  निर्माण करण्यात आलेल्या तीन स्तरावरील रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता वाढविण्यात येत आहे.

• राज्यात कोरोनाच्या रुग्णांसाठी त्रिस्तरीय उपचार पद्धती असून २५७६ उपचार केंद्र कार्यान्वित आहेत.

• डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल (DCH) २७५ आहेत. त्यात एकूण खाटा ३३ हजार ५३८ असून अतिदक्षता विभागातील ५००३ खाटा आहेत. २०२८ व्हेंटीलेटर असून २ लाख ५६ हजार ४८५ पीपीई कीटस् आहेत. तर ४ लाख ३१ हजार २१४ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.

• डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर (DCHC) ४४९ आहेत. त्यात एकूण खाटा २८ हजार ९२७ असून अतिदक्षता विभागातील २१३७ खाटा आहेत. ६१५ व्हेंटीलेटर असून ६४ हजार ३०८ पीपीई कीटस् आहेत तर २ लाख ११ हजार ८४७ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.

• कोविड केअर सेंटर (CCC) १६४३ आहेत. त्यात एकूण खाटा २ लाख ६ हजार ४२८ असून १ लाख ५४ हजार ८६० पीपीई कीटस् आहेत. तर ३ लाख २५ हजार ९६१ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.

• वर्गवारी न केलेले २०५ उपचार केंद्र आहेत.

• २५७२ उपचार केंद्रांमध्ये २ लाख ७८ हजार ४५९ आयसोलेशन बेडस् आहेत. त्यातील अतिदक्षता विभागातील एकूण बेडस् ८५०१ आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट २९४१ झोन क्रियाशील असून आज एकूण १७ हजार ६०० सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६७.६८  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

पाकमध्ये क्रॅश झालेल्या विमानाच्या ढिगारातून सापडले 3 कोटी रुपयांच्या बॅगा

0

कराची. पाकिस्तानात 22 मे रोजी झालेल्या विमान अपघातातून एक अजब माहिती समोर आली आहे. विमानाचा ढिगारा उचलताना त्यातून कॅशने भरलेल्या दोन बॅगा सापडलेल्या आहेत. यामध्ये जवळपास 3 कोटी रुपयांच्या चलनी नोटा असल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, एवढी मोठी रक्कम विमानात घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला विमानतळावरील स्कॅनिंग आणि तपासातून सोडलेच कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचा ढिगारा उचलल्यांनंतर प्रवाशांच्या बॅगांचा शोध घेण्यात आला. त्याचवेळी ही रक्कम सापडली. आता या घटनेचा तपास केला जात आहे.

विमान अपघातात 9 चिमुकल्यांसह 97 जणांचा मृत्यू

22 मे रोजी लाहोर येथून कराचीला जाणारे विमान लँडिंग करण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी कोसळले. विमानातील क्रू मेंबर्ससह यात 99 जण प्रवास करत होते. यातील केवळ 2 जण वाचले आहेत. मृतांमध्ये 9 चिमुकल्यांचा देखील समावेश आहे. हा अपघात कराची आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झाला होता.

वैमानिकाने एटीसीच्या इशाऱ्यावर दुर्लक्ष केले

एकीकडे पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातासाठी वैमानिकाला कारणीभूत ठरवले जात आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ने पायलटला तीन वेळा वॉर्निंग दिल्या होत्या. तरीही वैमानिकाने त्यावर दुर्लक्ष केले. तर दुसरीकडे, पाकिस्तानच्या वैमानिक संघटनेने या विमान अपघाताच्या चौकशीसाठी बनवलेल्या तपास समितीवरच शंका उपस्थित केली. ज्या विमानाचा अपघात झाला ते एक कमर्शिअल प्लेन होते तरीही तपास समितीमध्ये एकही कमर्शिअल पायलटला ठेवण्यात आले नाही असा आरोप या संघटनेने केला.