Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे जिह्यातील ग्रामीण भाग कोरोना मुकाबल्‍यासाठी सज्‍ज

Date:

       प्रारंभीच्‍या काळात पुणे महानगर पालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिका वगळता पुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कमी होता. लॉकडाऊन शिथील झाल्‍यावर मुंबई तसेच पर जिल्‍ह्यात गेलेले नागरिक ग्रामीण भागात परत आले, त्‍यामुळे जिल्‍ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येवू लागला. जिल्‍ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्‍यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी विविध उपाय योजण्‍यास सुरुवात  केली.

       पुणे जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागात (28 मे 2020 पर्यंत) एकूण रुग्‍ण 241 तर बरे झालेले रुग्‍ण 91 होते. एकूण क्रियाशील 143 रुग्ण असून 7 रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. नगरपालिका क्षेत्रात एकूण रुग्‍ण 63 तर बरे झालेले रुग्‍ण 31 होते. एकूण क्रियाशील रुग्‍ण 30 असून दोन रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. महाराष्‍ट्राचा मृत्‍यूदर 3.2 टक्‍के तर पुणे ग्रामीणचा मृत्‍यूदर 2.9 टक्‍के इतका आहे. पुणे ग्रामीण भागात एकूण कन्‍टेनमेंट झोन 107 तर क्रियाशील कन्‍टेनमेंट झोन 71 आहेत. यातील  पूर्ण झालेले कन्‍टेनमेंट झोन 36 आहेत. नगरपालिका क्षेत्रात एकूण कन्‍टेनमेंट झोन 12 तर क्रियाशील कन्‍टेनमेंट झोन 8 आहेत. यातील पूर्ण झालेले कन्‍टेनमेंट झोन 4 आहेत. जिल्‍ह्याच्‍या ग्रामीण भागातील 241 रुग्‍णांपैकी 96 रुग्‍ण मुंबई येथून तर 70 रुग्‍ण पुण्‍यातून आलेले आहेत. नगरपालिका क्षेत्रातील 63 रुग्‍णांपैकी 47 रुग्‍ण मुंबई येथून तर 4 रुग्‍ण पुण्‍यातून आलेले आहेत.

       पुणे जिल्‍ह्यात गेल्‍या 15 दिवसात इतर जिल्‍ह्यातून 55 हजार 545 नागरिक परत आले आहेत. जिल्‍ह्यात 111 चेकपोस्‍ट असून त्‍यावर 912 कर्मचारी कार्यरत आहेत. 3990 नागरिकांचे संस्‍थात्‍मक विलगीकरण करण्‍यात आले असून 67 हजार नागरिकांचे गृह विलगीकरण करण्‍यात आले आहे. जिल्‍ह्याच्‍या 13 तालुक्‍यात 33 कोविड केअर सेंटर (सीसीसी) असून उपलब्‍ध खाटांची संख्‍या 3880 इतकी आहे. कोविड रुग्‍णालये 21 असून उपलब्‍ध खाटांची संख्‍या 1181 इतकी आहे. नजीकच्‍या काळात 18 कोविड केअर सेंटर आणि 4682 खाटा, 28 कोविड रुग्‍णालये आणि 1830 खाटा उपलब्ध करण्‍याचे नियोजन आहे. तात्‍पुरत्‍या कोविड रुग्‍णालयाची व्‍यवस्‍था करण्‍यात येत असून विप्रो हिंजेवाडी हॉस्‍पीटल येथे 450 खाटांचे नियोजन आहे. हे हॉस्‍पीटल 3 जूनपासून कार्यरत होईल. मर्सिडीज म्‍हाळुंगे इंगळे हॉस्‍पीटलमध्‍ये 1408 खाटा असून सध्‍या 40 रुग्‍ण दाखल आहेत. नागरिकांच्‍या मदतीसाठी विशेष नियंत्रण कक्ष (स्‍पेशल कंट्रोल रुम) स्‍थापन करण्‍यात आला असून तेथील टोल फ्री क्रमांक 1800 233 4130 असा असून एकूण 15 लाईन्‍स उपलब्ध आहेत. यावर आतापर्यंत 23 हजार 830 नागरिकांनी कॉल करुन माहिती घेतली.

       शरद भोजन योजना– जिल्‍हा परिषदेच्‍यावतीने कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर निराधार ज्‍येष्‍ठ नागरिक, निराधार दिव्‍यांग नागरिकांना शरद भोजन योजनेचा लाभ देण्‍यात येत आहे. तयार जेवण थाळी दिवसातून दोन वेळा 1094 निराधार ज्‍येष्‍ठ नागरिक आणि 192  निराधार दिव्‍यांग नागरिकांना देण्‍यात येत आहे. परिपूर्ण रेशन कीट 6000 अतितीव्र दिव्‍यांग नागरिक, 200 तृतीयपंथी आणि 500 कलावंतांना वाटप करण्‍यात आले. 1 लिटर खाण्‍याचे तेल 1 लक्ष 67 गरजूंना तसेच 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू प्रती व्‍यक्‍ती 1 लक्ष 75 हजार गरजूंना वाटप करण्‍यात आल्‍याची माहिती देण्‍यात आली. नियमित रेशन वाटप 97.64 टक्‍के तर प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजना वाटप 94.76 टक्‍के झाले आहे. 3 लक्ष 57 हजार 518 विद्यार्थ्‍यांना 17 लक्ष 75 हजार 229 किलो तांदूळ आणि 3 लक्ष 52 हजार 822 किलो कडधान्‍य-डाळ वाटप करण्‍यात आली. अंगणवाडी विद्यार्थी तसेच गरोदर मातांनाही घरपोच आहार वाटप करण्‍यात आले. सुमारे 3 लक्ष 53 हजार कुटुंबांना साबण-सॅनिटायझरचे वाटप करण्‍यात आले. 1 लक्ष 67 हजार सॅनिटरी नॅपकीनचे नियोजन पूर्ण झाले आहे. चेकपोस्‍टवरील कर्मचा-यांना 1500 रिफ्लेक्‍टर जॅकेटचे वाटप करण्‍यात आले. 1500 पल्‍स ऑक्सिमीटरचेही  वाटप करण्‍यात आले याशिवाय 20 हजार क्षेत्रीय कर्मचा-यांना वेदनाशामक बाम, बिस्‍कीट पुडे, शक्ति‍वर्धक पेय इत्‍यादींचे वाटप करण्‍यात आले. जिल्‍हा प्रशासनामार्फत शेतक-यांना गावोगावी पेट्रोल-डिझेल पुरवठा करण्‍यात आला. आतापर्यंत एकूण 25 हजार 674 लिटरहून अधिक इंधन पुरवठा करण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

       मजूर व्‍यवस्‍थापन– जिल्‍हा प्रशासनाचे एकूण 40 रिलीफ कॅम्‍प असून त्यामध्‍ये 12 हजार 322 स्‍थलांतरित कामगार आहेत. सुमारे 1 लक्ष 17 हजार नागरिक 91 ट्रेनमधून 14 राज्‍यांना रवाना करण्‍यात आलेत. 17 हजार 512 नागरिक इतर जिल्‍ह्यात व 23 हजार 248 नागरिक विविध राज्‍यांमध्‍ये 3595 बसेसने पाठविण्‍यात आले. 1647 विद्यार्थी  इतर जिल्‍ह्यात व 598 विद्यार्थी विविध राज्‍यांमध्‍ये 115 बसेसने पाठविण्‍यात आले.

        मनरेगा (महात्‍मा गांधी नरेगा) – गेल्‍या दीड महिन्‍यामध्‍ये मनरेगा (महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) कामांना जिल्‍ह्यात मोठया प्रमाणात चालना देण्‍यात आली. ग्रामपंचायत सहभाग 13 वरुन 544 पर्यंत वाढविण्‍ययात आला आहे. मजूर उपस्थिती 131 वरुन  4028 पर्यंत गेली आहे. कामांच्‍या संख्‍येतही 17 वरुन 1390 पर्यंत वाढ झाली आहे.  

     कोरोनाच्‍या संकटाशी मुकाबला करत ग्रामीण भागातील अर्थव्‍यवस्‍थेचे चक्रही बंद पडणार नाही, यासाठी आवश्‍यक त्‍या उपाययोजना करण्‍यात येत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला तर पुण्‍याला रुग्‍ण पाठविण्‍याऐवजी तेथेच आवश्‍यक ते उपचार वेळेत मिळतील यासाठीही नियोजन करण्‍यात येत आहे. सार्वजनिक आरोग्‍य केंद्राच्‍या तसेच ग्रामीण रुग्‍णालयांच्‍या बळकटीकरणावर भर देण्‍यात येत आहे. यासाठी पुरेसा निधीही उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोथरूडमध्ये सात्यकी सावरकर आयोजित ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीने पाडले बंद

नाटकात तथागत गौतम बुद्ध यांच्याविषयी अवमानकारक संवाद असल्याचा...

यूनेस्को हेरिटेज वारसा, जाहिरातीतुन नव्हे तर कृतीने जपण्याची गरज..काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

रयतेच्या राजांना अभिप्रेत कल्याणकारी लोक-राज्याची संकल्पना वास्तवात उतरवावी. बारसू रिफायनरी...

पुणे: बीडीपी झोन निश्चिती संदर्भात नियुक्त समितीने व शासनाने पर्यावरण संवर्धन आणि बाधीत जनतेच्या भावनांचा विचार करावा

BDP करिता आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासोबतच पुणेकरांचे संरक्षणाचे अनुषंगाने...

शहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाड

गानवर्धन, स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित चर्चासत्रात स-प्रात्यक्षिक व्याख्यान पुणे : पुराण...