Home Blog Page 2540

पुणे,पिंपवड क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्विकासाचे पथदर्शी काम उभे करणार – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

0

पुणे दि.20: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती घेतली. पुणे तसेच पिंपरी चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समितीची स्थापना केली जाणार असून समितीच्या अभ्यासानंतर पुणे आणि पिंपरी -चिंचवड क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्विकासाचे पथदर्शी काम उभे करणार असल्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज येथे सांगितले.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात पुणे तसेच पिंपरी- चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत आढावा घेतला. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुकत शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, रतन किराड, मनोज सारडा,जयंत शेटे,सतिश मगर आदी उपस्थित होते.
गृहनिर्माणमंत्री आव्हाड म्हणाले, पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरात ज्या सनदी अधिका-यांनी यापूर्वी काम केले आहे, शहरांच्या विकासासाठी योगदान दिले आहे,अशा माजी सनदी अधिका-यांचा सहभाग घेत एक समिती स्थापन केली जाणार आहे, या समितीमध्ये शहराच्या विकासात योगदान देणारे इतर जाणकार प्रतिनिधीही असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून या समिती तसेच झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कार्याला अंतीम स्वरूप देण्यात येईल. पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचे नवीन पथदर्शी मॉडेल तयार करून गती देणार असल्याचे सांगतानाच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या वतीने झोपडपट्टीवासियांना पुढील काही महिन्यात ओळखपत्र देण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी मांडलेल्या मागण्यासंदर्भात गृहनिर्माण विभागाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचेही गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी सांगितले.
तसेच झोपडपट्टी विकासाच्या धोरणाची वाटचाल, योजना अंमलबजावणीची प्रक्रिया, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सद्य:स्थिती, तेथील अडचणी, शासनाचे अर्थसहाय्य, झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन, अंतर्भूत प्रकल्प, सध्याची स्थिती, अडकलेले प्रकल्प, प्रस्ताव आदी विषयांसह शहरातील मध्यवस्तीतील बाजारपेठेच्या अडचणी, त्या सोडवणुकीच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला.

राज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या

0

मुंबई, दि.१९ : राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६२ हजार ७७३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर (ॲक्टिव) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४  नमुन्यांपैकी  १ लाख २४ हजार ३३१  नमुने पॉझिटिव्ह (१६.९ टक्के) आले आहेत. सध्या राज्याचे प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्याचे प्रमाण ५३१७ एवढे असून हे प्रमाण देशपातळीवर ४२१० एवढे आहे. राज्यात ५ लाख  ९१ हजार  ४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-१२४ (मुंबई ११४, ठाणे २, वसई-विरार ५, रायगड ३), नाशिक-९ (नाशिक, धुळे, जळगाव प्रत्येकी ३), पुणे-१ (सोलापूर १), औरंगाबाद-८ (औरंगाबाद ८).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८९ पुरुष तर ५३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १४२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७४ रुग्ण आहेत तर ५७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५८९३ झाली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (६४,१३९), बरे झालेले रुग्ण- (३२,२६४), मृत्यू- (३४२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव रुग्ण- (२८,४४२)

ठाणे: बाधित रुग्ण- (२२,०३३), बरे झालेले रुग्ण- (९२८४), मृत्यू- (६७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (१२,०७३)

पालघर: बाधित रुग्ण- (३०२९), बरे झालेले रुग्ण- (१०१६), मृत्यू- (८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१९२५)

रायगड: बाधित रुग्ण- (२२६७), बरे झालेले रुग्ण- (१४६९), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव रुग्ण- (७०७)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (४७४), बरे झालेले रुग्ण- (३२७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१२९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१६१), बरे झालेले रुग्ण- (११४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४४)

पुणे: बाधित रुग्ण- (१४,७०४), बरे झालेले रुग्ण- (८०२०), मृत्यू- (६१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६०७४)

सातारा:  बाधित रुग्ण- (८१०), बरे झालेले रुग्ण- (५४१), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (२३४)

सांगली: बाधित रुग्ण- (२७४), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१११)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७३७), बरे झालेले रुग्ण- (६६१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६८)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२११३), बरे झालेले रुग्ण- (९५३), मृत्यू- (१८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९७५)

नाशिक: बाधित रुग्ण- (२५१५), बरे झालेले रुग्ण- (१४२२), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९५६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (२०४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४५)

जळगाव: बाधित रुग्ण- (२११८), बरे झालेले रुग्ण- (१०७५), मृत्यू- (१७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८६४)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (३६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४१)

धुळे: बाधित रुग्ण- (४७९), बरे झालेले रुग्ण- (३१८), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (१०६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३१६४), बरे झालेले रुग्ण- (१७१३), मृत्यू- (१७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१२७५)

जालना: बाधित रुग्ण- (३२७), बरे झालेले रुग्ण- (२२६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८९)

बीड: बाधित रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (५६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव रुग्ण- (२४)

लातूर: बाधित रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६६)

परभणी: बाधित रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२४३), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३९)

नांदेड: बाधित रुग्ण- (२७१), बरे झालेले रुग्ण (१६६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१६६), बरे झालेले रुग्ण- (१२५), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३३)

अमरावती: बाधित रुग्ण- (४०५), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०५)

अकोला: बाधित रुग्ण- (११४५), बरे झालेले रुग्ण- (७०८), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (३८०)

वाशिम: बाधित रुग्ण- (६७), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५३)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१५४), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२२२), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६१)

नागपूर: बाधित रुग्ण- (११९१), बरे झालेले रुग्ण- (७८१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३९७)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२)

भंडारा: बाधित रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३०)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३२)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१८)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५२), बरे झालेले रुग्ण- (४३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१०९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८९)

एकूण: बाधित रुग्ण-(१,२४,३३१), बरे झालेले रुग्ण- (६२,७७३), मृत्यू- (५८९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४),ॲक्टिव रुग्ण-(५५,६५१)

 (टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १९२ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर .पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

ससून रुग्णालयातील कोविड चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी १२ कोटी ४४ लाखांचा निधी

0

पुणे, दि. १९: कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्यांची क्षमता वाढविणे आवश्यक असून त्यादृष्टीने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी १२ कोटी ४४ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत ‘कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनां’ चा आढावा घेण्यात आला. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त विक्रम कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल विकास व सर्व्हेक्षण विभागाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोविड-१९ स्राव नमुना तपासणीसाठी लागणा-या साधनसामुग्रीसाठी ८ कोटी ९० लाख ९७ हजार रुपयांचा तर यंत्रसामुग्रीसाठी ३ कोटी ५३ लाख ६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय इतर आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी ७ कोटी १५ लाख ८१ हजार रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. या निधीतून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक वैद्यकीय साधन सामुग्रीची खरेदी करता येणार आहे. याशिवाय परिसेविका व अधिपरिचारिकांच्या भरण्यात आलेल्या पदासाठी आवश्यक निधी देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोविड-१९ चाचण्यांचे अहवाल वेळेत देण्याचे निर्देश देत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोवीड-१९ स्राव नमुने तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळासांठी आवश्यक मनुष्यबळ महापालिका प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावे. ससून, नायडू, यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या तसेच मृत्यूसंख्येची माहिती अद्ययावत होत असल्याची खात्री प्रशासनाने करावी. कोविड आणि इतर आजारांच्या रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांची गय केली जाणार नाही,असे स्पष्ट निर्देशही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिले.

कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे सांगून अत्यावश्यक बाबींसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून खर्च करावा, तसेच ससून रुग्णालय अद्ययावत यंत्रसामुग्रीयुक्त करा, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्राव नमुने तपासणी तसेच अतिदक्षता विभागातील बेड क्षमतेत वाढ करण्याची गरज असल्याचे सांगून यादृष्टीने महानगरपालिका प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

डॉ. सुभाष साळुंखे यांनी गरजूंना खाटा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सेवांचे दिवसनिहाय नियोजन करण्यात आल्याने कामात सुसूत्रता आल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुणे शहरानजीक असलेल्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यापूर्वी रुग्ण आढळलेल्या तालुक्यातील रुग्णसंख्या कमी करण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड तसेच श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेच्या वतीने कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

बैठकीत स्राव तपासणी क्षमता, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या, वैद्यकीय पार्श्वभूमी, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या, कंटेन्मेंट झोन निहाय स्थिती, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, ग्रामीण भागातील स्थिती तसेच उपचारसुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

सोनू निगमने झगमगत्या दुनियेतील कटू सत्यावरुन पडदा उचलला

0

पुणे- आता प्रसिद्ध गायक सोनू निगमने झगमगत्या जगतातील कटू सत्यावरुन पडदा उचलला असून म्युझिक इंडस्ट्रीतूनही आत्महत्येच्या बातम्या येऊ शकता, असा इशारा दिला आहे.सुशांत सिंग च्या आत्म्हत्येनंतर सोनू ने आपले म्हणणे व्हिडीओ द्वारे कथन केले आहे. मी तर वाचलो जुना काळ चांगला होता , आता नव्या मुलांना ,नव्या पिढीला अवघड काळ आहे, अजून आत्महत्या होऊ नयेत म्हणून सोनू ने आपले विचार मांडले आहेत .

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/301938624533369/

सोनू म्हणाला, ‘ माफिया इंडस्ट्रीत आहे’

सोनूने त्याच्या साडेसात मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला आहे. तो म्हणतोय, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी ब-याच काळापासून व्हीलॉग केले नाही. वास्तविक मी मूड मध्ये नव्हतो. भारत अनेक दबावांमधून जात आहे. सुशांत सिंह राजपूत गेल्यानंतर भाविनक आणि मानसिक प्रेशर आले. दुःख होणे स्वाभाविक आहे, कारण आपल्या डोळ्यासमोर तरुण जीवांचा अंत पाहणे सोपे नाही. एखादी निष्ठूर व्यक्तीच असेल, ज्याला यामुळे काही फरक पडत नसेल.

सोनू पुढे म्हणाले, ‘मला या व्हिडीओद्वारे म्युझिक इंडस्ट्रीला एक निवेदन करण्याची इच्छा आहे, कारण आज सुशांत सिंह राजपूतचा आपल्यातून गेला. एका अभिनेत्याचा अंत झाला. उद्या तुम्ही एखाद्या गायक, गीतकार किंवा संगीतकारांबद्दल असे ऐकू शकता. कारण आपल्या देशातील म्युझिक इंडस्ट्रीतील जे वातावरण आहे, दुर्दैवाने चित्रपटसृष्टीपेक्षा मोठे माफिया संगीत उद्योगात आहेत. मी समजू शकतो की लोकांसाठी व्यवसाय करणे आवश्यक आहे. प्रत्येकाला वाटते की त्यांनी इंडस्ट्रीवर राज्य केले पाहिजे. मी नशीबवान होतो, की कमी वयातच या इंडस्ट्रीत आलो आणि यांच्या तावडीतून सुटलो. पण आज जी नवीन मुलं इथे येत आहेत, त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा नाहीये,’ असा खुलासा सोनूने केला आहे.

म्युझिक इंडस्ट्रीवर दोन कंपन्यांचे वर्चस्व : सोनूने म्युझिक इंडस्ट्रीवर दोन मोठ्या कंपन्या वर्चस्व गाजवत असल्याचे म्हटले आहे. पण त्याने या दोन्ही कंपन्यांच्या नावाचा उल्लेख टाळला आहे. तो म्हणाला, ‘अनेक मुलंमुली माझ्याशी या विषयावर बोलले आहेत. त्यांना भविष्याची चिंता आहे. निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, संगीतकारांना काम करायचे आहे, पण म्युझिक कंपनी हा आमचा कलाकार नाही, असे सांगते. मला ठाऊक आहे, तुम्ही मोठे लोक आहात. म्युझिक इंडस्ट्रीवर तुमचा दबदबा आहे. दोन लोकांच्या हातातली ही शक्ती आहे, फक्त दोन लोक… ते ठरवतात की कोण गाणं गाणार आणि कोण नाही’, असे सोनू म्हणाला आहे.

सोनू आपले बोलणे पुढे चालू ठेवत म्हणाला, ‘मी या सर्वांमधून गेलो आहे, मी माझ्या जगात खूप आनंदी आहे. पण नवीन गायक, नवीन संगीतकार, नवीन गीतकारांना पाहिले आहे, ते कधी कधी उघडपणे रडतात. जर उद्या त्यांचा मृत्यू झाला तर तुमच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतील.’

इतकेच नाही तर मी गायलेली गाणी डब करण्यात आली. विचार करा, माझ्यासोबत असे घडू शकते तर मग नवोदितांसोबत काय होऊ शकतं, असेही सोनू म्हणाला आहे.

यशराज प्रॉडक्शन कडे व्यावसायिक बाजू तपासण्यासाठी मागितली कराराच्या सर्व कागदपत्रांच्या प्रती

0

मुंबई. अभिनेता सुुशांत सिंह राजपूतच्य निधनानंतर पोलिस त्याच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आता आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी व्यावसायिक कोनातून शोध सुरू केला आहे. यासाठी पोलिसांनी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस यशराज फिल्म्सकडून सुशांतसोबत केलेल्या कराराच्या कागदपत्रांची प्रत मागितली आहे. प्रॉडक्शन हाऊसला सुशांतबरोबर आतापर्यंत जे-जे करार केले त्या सगळ्यांच्या प्रत लवकरात लवकर पोलिसांकडे सादर करायच्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, पहिल्या हिट चित्रपटानंतर सुशांतला मोठ्या बॅनरच्या 7 चित्रपटांची ऑफर देण्यात आली होती, परंतु नंतर निर्मात्यांनी त्याला काढून रणवीर सिंग आणि इतर अभिनेत्यांना साइन केले. काही लोकांच्या मते, हेच सुशांतच्या आत्महत्येचे कारण ठरले. परंतु पोलिसांनी याची पुष्टी केली नाही. कॉन्ट्रॅक्टची कागदपत्रे पाहून पोलिसांना आर्थिक कोनातून बॉलिवूडच्या सिंडिकेट प्रकरणाची सत्यता शोधायची आहे.

सुशांतच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरूच

सुशांतचे बिझिनेस मॅनेजर श्रुती मोदी यांनी आपल्या जबाबात सांगितले की, ती जुलै 2019 ते 3 फेब्रुवारी 2020 पर्यंत त्याच्यासोबत होती आणि छिछोरे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही तिचा सहभाग होता. सुशांत बॉलिवूडपासून दूर जाण्याच्या तयारीत होता, त्यामुळे अनेक प्रकारच्या रिअॅलिस्टिक व्हर्च्युअल गेम्सची एक कंपनी तयार करण्याच्या तो विचारात होता.

पर्यावरण आणि समाजाबरोबर काम करण्याची सुशांतची होती इच्छा

याशिवाय सुशांत नेशन इंडिया फॉर वर्ल्ड या नावाने एक संस्था स्थापन करणार होता. ही संस्था महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पर्यावरण आणि समाजासाठी काम करणार होती. या संस्थेची नोंदणी झाली की नाही, याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याशिवाय सुशांतचा “जिनिअस अँड ड्रॉप आऊट्स” नावाचा एक सोशल प्रोजेक्ट होता, ज्यात समाजात नाउमेद झालेल्या परंतु अलौकिक बुद्धिमत्तेच्या लोकांसाठी एक प्रोग्राम तयार करण्यात आला होता.

सोनिया गांधींचा सरकारला प्रश्न- इंटेलिजेंस रिपोर्ट मिळाली नव्हती का?

नवी दिल्ली. चीनसोबतचा तणाव आणि गलवानमध्ये झालेल्या हिंसक मारामारीत 20 जवान शहीद झाल्याच्या मुद्द्यावर शुक्रवारी(ता.19)पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत 20 पक्ष सहभागी झाले आहेत. बैठकीच्या सुरुवातीला सर्वांनी गलवानमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, बसपा अध्यक्ष मायावती, तृणमूल अध्यक्ष ममता बनर्जीदेखील उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीसाठी आरजेडी आणि आम आदमी पार्टीला बोलवण्यात आले नाही.

बैठकीत सोनिया गांधींनी मोदींना विचारले की, या घुसखोरीची सॅटेलाइट इमेज मिळाली नव्हती का? याबाबत इंटेलिजेंस रिपोर्ट आली नव्हती का ? सोनिया गांधी म्हणाल्या की, देशाला परिस्थिती पुर्ववत हवी आहे. माउंटेन स्ट्राइक कोरमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे, याबाबत विरोधी पक्षांना माहिती मिळायला हवी.

संवेदनशील प्रकरणांचा आदर करायला हवा- शरद पवार

सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग म्हणाले की, आम्हाला पंतप्रधानांवर संपूर्ण विश्वास आहे. देशाच्या सुरक्षेखातर त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. माजी संरक्षण मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, सैनिकांनी शस्त्र चालवावे का नाही, याचा निर्णय आंतरराष्ट्री कारारानुसार होतो आणि आपल्याला अशा संवेधनशील प्रकरणांचा आदर करायला हवा.

चार क्रायटेरियांच्या आधारे पक्षांना निमंत्रण

एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनुसार, 4 क्रायटेरियाच्या आधारे ऑल पार्टी मीटिंगसाठी इनविटेशन देण्यात आले आहे. पहिला- सर्व राष्ट्रीय पक्ष. दुसरा- ज्या पक्षांचे लोकसभेत 5 खासदार आहेत. तिसरा- नॉर्थ-इस्टमधील प्रमुख पक्ष आणि चौथा- ज्या पक्षांचे नेते केंद्रीय कॅबिनेटमध्ये सामील आहेत. या आधारांवर 20 पक्षांना सामील करण्यात आले आहे.

आरजेडीने विचारले क्रायटेरिया काय आहे?

आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी ट्वीट करुन विचारले की, आरजेडीचे 5 खासदार असूनही पक्षाने सर्वपक्षीय बैठकीत बोलवले का नाही ? अखेर क्रायटेरिया काय आहे ?आम आदमी पार्टी (आप) चे नेते संजय सिंह म्हणाले की, केंद्रात एक वेगळाच अहंकार असलेली सरकार बसलेली आहे. महत्वाच्या विषयावर भाजपला आपचे मत नकोय.

मागील 2 सर्व पक्षीय बैठकीत राजनाथ सिंह होते अध्यक्ष

देशाच्या सीमासुरक्षेच्या मुद्द्यावर 6 वर्षात ही तिसरी सर्व पक्षीय बैठक आहे. मागच्या वर्षी पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 16 फेब्रुवारी 2019 ला सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. यापूर्वी पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राइक झाल्यानंतर 29 सप्टेंबर 2016 ला झाली होती. या दोन्ही बैठकींचेय अध्यक्ष तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह होते.

मोदी म्हणाले- आम्हाला शांती हवीये, पण उत्तर देण्यास सक्षम

सोमवारी(ता 15) लद्दाखच्या गलवान घाटीत चीनच्या सैनिकांच्या हल्ल्यात, भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यात चीनचेही 40 सैनिक शहीद झाले, पण चीन कबुल करत नाहीये. या घटनेच्या दोन दिवसानंतर 17 जूनला मोदी म्हणाले होते की, “आम्हाला शांती हवीये, पण कोणी डिवचण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही उत्तर देण्यास सक्षम आहोत. आम्हाला आमच्या शहीद जवानांवर गर्व आहे. आमच्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अर्बनसेलची राज्यस्तरीय मीटिंग व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा संपन्न

0

पुणे- आज खासदार आणि एनसीपी च्या  अर्बन सेल च्या प्रदेशाध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अर्बन सेलची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाशिक, कोल्हापूर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, नागपूर, सांगली,  आदी शहरांचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व अर्बन सेलचे प्रतिनिधी उपस्थित होते. यांनंतर  अर्बन सेलमार्फत दि. २०, २१ व २२ जुन २०२० रोजी विविध विषयांवर चर्चासत्र राबविण्यात येणार असून सदर चर्चासत्रात श्रीमती. मीरा बोरवणकर, श्री. संजय आवटे, श्रीमती. सुलक्षणा महाजन हे वक्ते सहभागी होणार आहेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यासाठी खासदार वंदना चव्हाण यांनी अनेक मुद्यांवर मार्गदर्शन केले.शहरामध्ये उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी आणि हॉस्पिटल, टेस्टिंग, क्वारंटाईन, ऍम्ब्युलन्स, इम्म्युनिटी, शासकीय यंत्रणा इ. सेवा. त्या सेवांसंदर्भात प्रशासनाकडून लोकांना माहिती पुरवण्याची यंत्रणा उपलब्ध करणे, शिवभोजनथाळी आणि धान्य उपलब्धता यासाठी आग्रही राहणे.घरात / कामाच्या ठिकाणी / तसेच सार्वजनिक ठिकाणी घ्यावयाची काळजी मास्क, सोशिअल डिस्टंसिन्ग, सानीटायझर / हात धुणे याबाबत जनजागृती करणे व लॉकडाऊन नंतर घ्यावयाची काळजी याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. महिलांवर वाढलेला कामांचा ताण, आर्थिक आणि मानसिक बोजा या अनुषंगाने समाजात घडवून आणायचे बदल, नवीन रोजगारांच्या विविध संधी कश्याप्रकारे उपलब्ध होऊ शकतात यांसाठी चर्चासत्र आयोजित करणे. शारिरीक व मानसिक स्वास्थ्य – आहार, योगा; यांसारखे उपक्रम राबविणे.जागतिक तापामानसंदर्भात घ्यावयाची पाऊले, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आदी गोष्टीत  नागरिकांचा सहभाग वाढवणे. असे संकट पुन्हा येऊ नये या दृष्टीने विविध वयोगट व आर्थिकगट यांच्यामध्ये निसर्गाचे रक्षण करणेसंदर्भात विविध पातळीवर जनजागृती करणे.यावर  चर्चा करून निर्देश दिले .सदर बैठकीस विद्या चव्हाण (आमदार व अर्बन सेल उपाध्यक्ष), सुरेश पाटील (उपाध्यक्ष – प्रदेश रा. कॉ.पा, अर्बन सेल)आदी उपस्थित होते.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 6 हजार 151

0

पुणे विभागातील 11 हजार 4 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 17 हजार 929 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 19 :- पुणे विभागातील 11 हजार 4 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 17 हजार 929 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 6 हजार 151 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 774 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 316 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.38 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.32 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 14 हजार 248 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 8 हजार 524 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 172 आहे. कोरोनाबाधित एकूण 552 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 304 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.83 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.87 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 587 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 563, सातारा जिल्ह्यात 11, सोलापूर जिल्ह्यात 8, सांगली जिल्ह्यात 4 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 781 कोरोना बाधीत रुग्ण असून 592 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 151 आहे. कोरोनाबाधित एकूण 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1 हजार 905 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 74 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 663 आहे. कोरोना बाधित एकूण 168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 266 कोरोना बाधीत रुग्ण असून 148 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 110 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत 729 रुग्ण असून 666 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 55 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 30 हजार 573 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 27 हजार 115 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 458 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 8 हजार 929 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 17 हजार 929 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 19 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

महाराष्ट्रात 100 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचे काम ‘टाटा पॉवर’कडे

पुणे-: टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (टीपीआरईएल) या कंपनीला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कं. लि.कडून (एमएसइडीसीएल) महाराष्ट्रात 100 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचे काम मिळाले आहे. या संदर्भात ‘एमएसइडीसीएल’कडून ‘टीपीआरईएल’ला पत्र पाठविण्यात आल्याचे ‘टाटा पॉवर कंपनी’कडून घोषित करण्यात आले. भारतातील सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा कंपनी असलेल्या ‘टाटा पॉवर’ची टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी ही संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

‘टीपीआरईएल’तर्फे ‘एमएसइडीसीएल’ला वीज खरेदी कराराच्या (पीपीए) अंतर्गत वीजपुरवठा केला जाईल. हा करार वीजपुरवठा कार्यान्वित झाल्याच्या तारखेपासून 25 वर्षांच्या कालावधीसाठी वैध असेल. ‘एमएसइडीसीएल’ने डिसेंबर 2019 मध्ये पाचव्या टप्प्यांतर्गत जाहीर केलेल्या बोलीमध्ये ही ऑर्डर ‘टीपीआरईएल’ने मिळवली आहे. कराराच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून 18 महिन्यांच्या आत हा प्रकल्प सुरू करणे ‘टीपीआरईएल’ला आवश्यक राहील.

या कामगिरीबाबत बोलताना ‘टाटा पॉवर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा म्हणाले, महाराष्ट्रात 100 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प मिळाला, ही घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटतो. ही संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकार व ‘एमएसइडीसीएल’च्या अधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. या करारामुळे अपारंपारिक ऊर्जा निर्माण करण्याची आमची एकूण क्षमता 3,557 मेगावॅट इतकी होईल.’’

‘’जीयूव्हीएनएल’कडून मिळालेल्या कराराची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. अपारंपारिक उर्जा निर्मिती, तसेच प्रकल्प विकास, अभियांत्रिकी आणि अंमलबजावणीच्या क्षमता यांच्या पूर्ततेविषयी आम्ही दृढपणे कटिबद्ध आहोत. आपल्या क्षमता वाढविणे, ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि सर्व कामांमध्ये उच्च मापदंड निर्माण करणे हे आमचे कार्य यापुढेही सुरू ठेवू, याची आम्ही हमी देतो,’’ असे ‘टाटा पॉवर’चे रिन्यूएबल्स विभागाचे प्रमुख आशिष खन्ना यांनी सांगितले.

या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 240 मेगायुनिट इतक्या उर्जेचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. दरवर्षी सुमारे 240 दशलक्ष किलो कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन या प्रकल्पातून होईल.

‘टाटा पॉवर’ची अपारंपारिक उर्जा निर्मितीची क्षमता या प्रकल्पामुळे 3,557 मेगावॅटपर्यंत वाढणार आहे.  एकुणातील 2,637 मेगावॅट ऊर्जा कार्यान्वित झालेली आहे आणि या नव्या करारातील 100 मेगावॅट क्षमतेसह 920 मेगावॅट ऊर्जा निर्माण होण्याच्या मार्गावर आहे.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयस्तरावरून लवकरच धोरणात्मक निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे, दि. 19 :- कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.
पुणे येथील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, उपायुक्त श्रीमती साधना सावरकर, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, श्रमीक मुक्ती दलाचे प्रतिनिधी चैतन्य दळवी, तर ‘व्हिडीओ कॉन्फरसिंग’द्वारे श्रमीक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर, साता-याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी आदींसह सबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात शासन सकारात्‍मक आहे. या अनुषंगाने पात्र खातेदारांचे संकलन तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्‍यात यावी. यासाठी विविध विभागांच्‍या कर्मचा-यांची सेवा घेत काम पूर्ण करावे, असेही त्‍यांनी सांगितले. चुकीच्या पद्धतीने किंवा दुबार जमीन वाटप झाले असेल तर जमीन वाटप रद्द करण्यात येईल, सांगली व सोलापूर जिल्हयात उपलब्ध जमिनी कोयना प्रकल्पग्रस्तांना देणे शक्य आहे का, याबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल तसेच ऊर्जा विभागाकडे प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित बाबीसंदर्भात शासनस्तरावरून निर्णय घेण्यात येईल.
सांगली जिल्हयातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भातही मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेउन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगतानाच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या बैठका घेत प्रश्नांच्या सोडवणुकीला गती द्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत माहिती दिली. श्रमीक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी कोयना धरणग्रस्तांच्या संकलन व जमिनीची उपलब्धतेचा विषय तसेच इतर प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अशी मागणी केली.

परिवहन विषयक कामकाजाच्या ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी आगाऊ वेळ घेणे आवश्यक

0


पुणे दि.19 : – लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून बंद असलेले उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमित कामकाज सोमवार 22 जून 2020 पासून सुरु होत आहे. मात्र पक्का व शिकाऊ परवान्याप्रमाणे आता कार्यालयामध्ये प्रत्येक कामासाठी आगाऊ वेळ ( अपॉइंटमेंट) घ्यावी लागणार आहे. कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.
परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयातील वाहन परवाना, योग्यता प्रमाणपत्र, हस्तांतरण यांसह विविध नियमित कामकाज सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड कार्यालयाने सर्वच कामांसाठी आगाऊ वेळ घेणे बंधनकारक केले आहे. पूर्वनियोजित वेळ घेतल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही. त्यानुसार या कार्यालयासाठी प्रत्येक कामासाठी स्वतंत्र कोटा निश्चित करण्यात आला आहे. तसेच सहा.मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परिक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीचे काम प्राधान्याने करण्यात येणार आहे. शिबीर कार्यालयाचे कामकाज मात्र बंद राहणार आहे. पुर्वी केवळ अनुज्ञप्ती व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण या सेवासाठीच ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागत होती. परंतु आता सर्वच कामकाजासाठी पूर्व नियोजित वेळ घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या कार्यालयाकडून घेण्यात येणा-या दक्षता व नागरिकांकरीता सूचना केल्याप्रमाणे दोन अर्जदारामध्ये किमान 6 फुटांचे अंतर असावे, एक अर्जदाराची चाचणी झाल्यानंतर संगणक, की-बोर्ड सॅनिटायझ करणार असून अर्जदारास मास्क व हँडग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश दिला जाईल. कार्यालयामध्ये सॅनिटायजरचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन ठेवण्यात आलेला आहे.
वाहनविषयक कामासाठी सर्व वाहनांकरीता वाहनावरील कर्ज बोजानोंद कमी करणे -10, डुप्लिकेट आरसी देणे-05, नाहरकत प्रमाणपत्र देणे-15,वाहन नावापर सूचना देणे-02, नावापर प्रमाणिक करणे/कमी करणे-02,नोंदणी प्रमाणपत्र रद्द करणे/ निलंबन करणे-01, बाहेरील राज्यातील वाहनांना नंबर देणे (RMA)-02, आरसी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे-02, मोटार वाहनात बदल करणे-05, नाहरकत प्रमाणपत्र रद्द करणे ( NOC)-01, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदल करणे-02, परिवहन संवर्गातून खाजगी संवर्गात वाहनांची नोंदणी करणे (conversion vehicle)-02, वाहनावर कर्ज बोजा नोंद करणे-10,वाहनावर कर्ज बोजा नोंद कायम ठेवणे-02,वाहन हस्तांतरण करणे-10, योग्यता प्रमाणपत्र तपासणे – टॅक्सी-10, योग्यता प्रमाणपत्र तपासणे- बसेस-10, योग्यता प्रमाणपत्र तपासणे- ऑटो रिक्षा-10, योग्यता प्रमाणपत्र तपासणे- मालवाहतूक वाहने-10, कच्ची अनुज्ञप्ती (LLR) सर्व वाहने- 21,पक्की अनुज्ञप्ती- सर्व वाहने-49 अशा प्रकारे दैनंदिन अपॉइंटमेंट कोटा ठरवून देण्यात आला आहे.
या कामकाजाच्या ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर आगाऊ वेळ घेणे आवश्यक असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी – चिंचवड विनोद सगरे यांनी कळविले आहे.

अनलॉक होताच .. मुळशीरोड वरील गरुडमाचीला झाले ‘मनाचे श्लोक’ पूर्ण

0

लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळात कधीही न थांबणारी मनोरंजन सृष्टी थांबली होती. अनेक चित्रपट, मालिका, वेब सीरिज यांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. सलग ३ महिने चित्रीकरण नाही म्हंटल्यावर नवीन चित्रपटाचे प्रदर्शन ही लांबणीवर गेले. आता मात्र अनलॉकमुळे मनोरंजन सृष्टी पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. ऑनलाइन बिनलाईन, बघतोस काय मुजरा कर, मी पण सचिन अशा अनेक वेगळ्या आशय विषयाच्या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या गणराज असोसिएट्सची आणि संजय दावरा फिल्मसची निर्मिती असलेला मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ हा सिनेमाचे जवळ-जवळ पूर्ण चित्रीकरण करून झाले होते. अवघ्या दोन दिवसांच्या आणि महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण लॉकडाउनमुळे राहून गेले होते ते अनलॉकची बातमी मिळताच चित्रपटाच्या टीमने पूर्ण केले.


अनलॉक १ ची घोषणा होताच अनेकांना आशेचा एक किरण दिसू लागला होता. लॉकडाऊनच्या काळात कलाकार चित्रीकरण कधी सुरू होईल याची वाट बघत होते. अनलॉकची घोषणा होताच अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी सज्ज झाले होते. गणराज असोसिएट्स आणि संजय दावरा फिल्म्स निर्मित मनाचे श्लोक या चित्रपटाचे सुद्धा असेच काहीसे झाले होते. या चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे यांची प्रमुख भूमिका आहे. अभिजित अब्दे यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या चित्रपटाच्या काही महत्वाच्या दृश्यांच्या चित्रीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला होता परंतु लॉकडाऊनमुळे चित्रीकरण करणं शक्य झाले नाही. राज्य सरकारने चित्रीकरणाला परवानगी देताच या चित्रपटाच्या टीमने नवीन आराखडा आखत चित्रीकरण पूर्ण करण्याचे ठरवले.
‘शासनाने चित्रीकरणाला परवानगी दिली आहे हे कळताच आम्ही सगळेच कामला लागलो. चित्रीकरण स्थळाची संपूर्ण माहिती घेऊन मी जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो आणि सर्व नियम पाळून चित्रीकरण करणार आहोत हे त्यांच्या लक्षात आणून देत आम्ही परवानगी मिळवळी’ असे चित्रपटाचे निर्माते श्रेयश जाधव यांनी सांगितले. तर निर्माते संजय दावरा या विषयी सांगतात ‘आम्ही एक टीम आहोत, हे चित्रपट पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक होतो. चित्रीकरणाची परवानगी मिळताच सॅनिटाइझेशन, ग्लोवस ,मास्क या सगळ्यागोष्ठी आम्ही आमच्या टीम ला दिल्या आणि नियमानुसार चित्रीकरणाला सुरूवात केली.’
उरलेलं चित्रीकरण कधी करता येईल हे माहितीच नव्हतं तरी नंतर वेळ घालवायचा नाही म्हणून अर्धी तयारी आधीच करून ठेवली होती. प्रत्येक गोष्टीची मांडणी कशी करता येईल या पासून ते कमी लोकांसोबत काम कसे करावे हे सुद्धा आम्ही प्लॅन करून ठेवलं होतं आणि म्हणून हे उरलेलं संपूर्ण चित्रीकरण दोन दिवसात संपवता आलं.’अस मृण्मयी देशपांडे तिच्या या दुसऱ्या दिग्दर्शनीय अनुभवाविषयी सांगते.

सरकारच्या नियमानुसार चित्रीकरण संपूर्ण टीम ऐवजी अवघ्या ३५% टक्के असल्यामुळे टीम मधल्या प्रत्येकाने ३ माणसाची काम एकट्याने केली. मुळशी रोड वरील गरुड माची या गावात चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर संपूर्ण गाव सॅनिटाइझ करण्यात आलं. चित्रीकरणाच्या दरम्यान कलाकारांनी स्वतःचा मेकअप स्वतःच केला. याच बरोबर हे चित्रीकरण सुरू करण्याअगोदर सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी गावात पोहोचताच स्वतःहून काही दिवस क्वॉरनटाईन झाली होती. तसेच सोशल डिस्टनसींगचे सर्व नियम पाळत आणि त्याचबरोबर सॅनिटाइझेशन, ग्लोवस ,मास्क या गोष्टींची योग्य ती खबरदारी घेत हे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. गणराज असोसिएट्स मनाचे श्लोक या चित्रपटानंतर सुद्धा मराठी प्रेक्षकांसाठी वेगळ्या विषयांचे आशयघन चित्रपट घेऊन येत असून ‘बघतोस काय मुजरा कर २’ आणि ‘फकाट’ हे त्यांचे आगामी चित्रपट आहेत.

साताऱ्यामध्ये पुन्हा ‘रोल, कॅमेरा,ॲक्शन’! ‘…… !!

0

पुणे -कोरोना विषाणूच्या संकटामध्ये लॉकडाऊन झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा ‘रोल, कॅमेरा, अॅक्शन’साठी सुरु झाली आहे. थांबलेल्या चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग आता पुन्हा सुरू होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काही नियम आणि अटींसह चित्रीकरणास परवानगी दिली आहे. विशेष बाब म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘टोटल हूबलाक’ या दोन मालिकांच्या चित्रीकरणास प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे.
डोळे दिपवणारं सह्याद्रीचं विस्तीर्ण आणि दाट खोरं, निसर्गाने केलेली मुक्तहस्ताने उधळण, बाराही महिने संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचा काठ, शंभरहून अधिक हेमाडपंथी मंदिरे, नागमोडी रस्ते आणि दुतर्फा हिरवाईच सौंदर्य यामुळे सातारा हा चित्रपट सृष्टीसाठी पूर्वीपासूनच पोषक वातावरण असलेला जिल्हा. मुंबईमध्ये जे काही मिळत नाही आणि जे कृत्रिम पद्धतीने तयारही करता येत नाही ते सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्रीने भरभरुन दिल्यामुळे निसर्गतःच उपलब्ध आहे.
                   जिल्ह्यातील विशेषतः पाटण, वाई, जावळी आणि महाबळेश्वर या तालुक्यांमधील काही ‘लोकेशन्स’ निर्माते आणि दिग्दर्शकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. पाटणमधील कोयना धरण परिसर, नेहरू गार्डन, घाटमाथा, वनकुसवडे, खळे, बनपुरी आदी. महाबळेश्वरमधील अनेक पॉईंट्स, पाचगणी शहरामधील टेबललँड, शाळा, तापोळ्यामधील बोटिंग पॉईंट्स त्याचसोबत जावळीचे खोरं हे सुप्रसिद्ध आहे. तर ऐतिहासिक वाई शहर, धोम डॅम, मेनवली, वरखेडवाडी ही ठिकाण देखील पसंतीस उतरली आहेत.
                  जुन्या काळातील निर्माते आणि कलाकार तर आहेतच, परंतु अलीकडील काही वर्षांमधील प्रकाश झा, विशाल भारद्वाज, आशुतोष गोवारीकर, अरबाज खान, प्रभुदेवा, महेश कोठारे, या दिग्दर्शकांचा साताऱ्याकडे विशेष ओढा आहे. सरगम, मदर इंडिया, ओमकारा, गंगाजल, राजनीति, स्वदेस, मंगल पांडे, बाजीराव मस्तानी, दबंग टू आणि थ्री, चेन्नई एक्सप्रेस, तारे जमीन पर अशा चित्रीत झालेल्या चित्रपटांची नाव न संपणारी आहेत. तर झी मराठी या वाहिनीवरील लागीर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, टोटल हूबलाक या मालिकांचे चित्रीकरण जिल्ह्यामध्ये झाले.
              जिल्ह्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळवून देणारं हे क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने शूटिंगसाठी लोकेशन्स शोधून देणे, स्थानिक स्तरावर हवी ती मदत मिळवून देण्यासाठी तरुणांनी स्वतःच्या पातळीवर तयार केलेली ‘एक खिडकी योजना’ ही निर्मात्यांना सोयीची वाटते. त्याचसोबत फोटोग्राफर, कॅमेरा सहाय्यक, सहाय्यक वेशभूषाकार, सहाय्यक केशभूषाकार, मेकअपमॅन/वुमॅन, प्रोडक्शन लेबर, साऊंड हेल्पर, लाईट हेल्पर, टेक्निकल सपोर्ट, स्थानिक डबिंग आर्टीस्ट, वॉटरबॉय या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार निर्मिती होते.
              चित्रपट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या स्थानिक कलाकारांना मिळालेली संधी, कलाकरांना दळण–वळणासाठी आवश्यक असलेली वाहतूक व्यवस्था, सर्वांना जेवणासाठी सातारी केटरर्स या माध्यमांतुनही अनेक तरुणांच्या हाताला काम मिळते. ज्या गावामध्ये चित्रीकरण आहे तेथील स्थानिक विकासाला मदत, चित्रीकरणाच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीला आर्थिक स्वरूपात मदत देणे यामुळे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. त्याचसोबत चित्रीकरणाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणारे, चित्रीकरण पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये झालेली लक्षणील वाढ, अशा विविधांगी स्वरुपाचा फायदा जिल्ह्याला होतो.
या नियम व अटींसहीत परवानगी.

● चित्रीकरण प्रक्रियेमध्ये सामील असणाऱ्या प्रत्येकाने मास्क आणि पूर्ण शूटींग दरम्यान ग्लोज वापरणे बंधनकारक.
●चित्रीकरणाच्या संपुर्ण प्रक्रियेदरम्यान सामाजिक अंतर पाळणे सक्तीचे.
● हस्तांदोलन, मिठी मारणे अशा प्रकारची सर्व कृत्ये करणेस मनाई.
● दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी एक मीटर अंतर.
●65 वर्षावरील व्यक्तींना चित्रीकरण प्रक्रियेत समाविष्ट करणेस मनाई.
●चित्रीकरण दरम्यान लग्न समारंभ, पुजा, सण, उत्सव, सामुहिक नृत्ये अशा गोष्टी करण्यास मज्जाव.
●केश रचना व मेकअपसाठी डिस्पोजेबल वस्तु वापरणे.
●चित्रीकरणाचे ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅन्डवॉश, सॅनिटायझर, यांची प्रवेशद्वारावर व्यवस्था बंधनकारक.
●चित्रीकरण दरम्यान वापरात येणारे सर्व साहित्य उदा. – कॅमेरा, रिमोट, लाईट स्विच, स्क्रिप्ट पॅड, माईक, इलेक्ट्रिक सिस्टम इ. सर्व साहित्य वापरापूर्वी व वापरानंतर सॅनिटाईज करणे बंधनकारक.

            सातारा ,वाई, महाबळेश्वर हा परिसर नेहमीच हिंदी सिनेमांच्या आकर्षणाचा विषय राहिला आहे ,मराठी सिनेमे तसे मागे नव्हतेच सातारा जिल्ह्याने देखील चित्रपटसृष्टीला दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, गायक, वादक, लेखक यांच्या रुपाने हिरे दिले. यामध्ये सिनेअभिनेते सयाजी शिंदे, किरण माने, श्वेता शिंदे तसेच नवोदित कलाकार सागर कारंडे, संतोष साळुंखे आहेत. पटकथा लेखक प्रताप गंगवणे, अरुण गोडबोले, तेजपाल वाघ हे मान्यवर देखील याच मातीने दिले.वास्तविक सातारा सांगली आणि कोल्हापूर ही पूर्वीपासून मराठी-हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणाचे केंद्र होते. याच ठिकाणी बहुतेक चित्रपटांचे चित्रीकरण केले जाई. ऐतिहासिक चित्रपटांसाठी लागणारी भरपूर लोकेशन्स, ग्रामीण संस्कृती या ठिकाणी आहे. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्राचा लढ्यामुळे एकीकडे राज्यांच्या अस्मितांना खतपाणी मिळत गेले. सोबत नव्याने काही प्रश्न उभे राहिले. आजुबाजूच्या लोकेशन्समध्ये अनेक समस्या किंवा म्हणावी तेवढी स्पेस, बघ्यांची गर्दी यामुळे आपसूकच चित्रीकरणासाठी पश्चिम महाराष्ट्र हे मुख्य केंद्र बनले. सद्य स्थितीतही कोरोनामुळे मुंबईमधील चित्रीकरण पूर्णतः बंद आहे. दूरचित्रवाणी वाहिन्या, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, छोटे-मोठे व्यवसायिक यांचा होत असलेला तोटा लक्षात घेऊन चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा या भागाकडे वळत आहे.
चित्रीकरणामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराचे मोठे क्षेत्र सातारा जिल्ह्यात आहे. कलाकार, शुटींग लोकेशन्स, हॉटेल्स, केटरिंग, वाहतूक व्यवसाय आणि त्याच्याशी जोडलेले अनेक व्यवसाय इथे आहेत. सध्या कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे हे क्षेत्र मोडकळीस आलेले आहे. असे असताना या व्यवसायाला चालना देण्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चित्रीकरणासाठी योग्य ती खबरदारी घेऊन परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातीला हा पहिला निर्णय ठरला आहे. या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. अनेक चित्रपट निर्माते आता सातारची वाट धरत असल्याने इथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. कलाक्षेत्रातील हा सातारा पॅटर्न चित्रपट क्षेत्रातील सर्वांसाठी आशादायक ठरत आहे.                      
– तेजपाल वाघ (पटकथाकार)
              होय, तुम्ही सातारा जिल्ह्यात कुठेही शूटिंग करू शकता. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यासाठी परवानगी दिली आहे. केवळ आता चित्रपट-मालिका क्षेत्रातील सर्व निर्मिती संस्था आणि दिग्दर्शकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. नुकतंच आम्ही ‘टोटल हुबलाक’ या मालिकेचे चित्रीकरण आम्ही सुरू केले आहे. तुम्हाला ही तुमच्या चित्रपट, मालिका आणि वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू करण्यास परवानगी मिळेल. लवकरात लवकर या आणि आता कास, ठोसेघर, बामणोलीच्या दर्याखोर्यांत तसेच माण खटावच्या माळरानांमध्ये पुन्हा एकदा आवाज घुमूद्यात : लाईट, कॅमेरा, अॅक्शन !!!
  -किरण माने (अभिनेते)

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 अंतर्गत 1 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

0

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023’ अंतर्गत 1 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहेत. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.

शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट शाखेच्या वतीने दि. 16 मे, 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसुचनेतील कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल.  अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसुचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसुचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                              

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे (आरबीआय) दिनांक 23 जून, 2020 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 23 जून, 2020 रोजी आरबीआयच्या कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) या संगणकीय प्रणालीनुसार सादर करावयाची आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते सकाळी 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बिडस् याच प्रणालीनुसार (ई- कुबेर) सकाळी 10.30 ते 11 वाजेपर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल आरबीआयच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 24 जून, 2020 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 24 जून, 2020 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा कालावधी 3 वर्षांचा असेल. रोख्यांचा   कालावधी  दि. 24 जून, 2020 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 24 जून, 2023 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ल‍िलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी 24 डिसेंबर आणि 24 जून रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (एसएलआर) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे रोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील अशी माहिती वित्त विभागाच्या 19 जून, 2020  रोजीच्या अधिसुचनेत नमूद करण्यात आली आहे.

भाजपने ठाकरे सरकारला पाठिंबा देऊन पुन्हा एकदा ‘एनडीए’चे सरकार स्थापन करावे- सुब्रमण्यम स्वामी

0

मुंबई. निर्णय प्रक्रीयेत विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत, काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामीयांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला तर भाजपने शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करावे, असे सुब्रमण्यम स्वामींनी वक्तव्य केले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय प्रकीयेत काँग्रेसला विचारात घेतले जात नाही, अशी नाराजी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची बैठकाही झाल्या. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपली खदखद व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सूचक वक्तव्य केले आहे.