Home Blog Page 2534

मास्क न घालणाऱ्यांना महापालिका करणार ५०० रुपये दंड

0

पुणे- महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहर आणि महापालिका हद्दीत कुठेही अगदी सरकारी कार्यालयात सुद्धा मास्क विना कोणी नागरिक ,अधिकारी दिसले तर त्यांना तातडीने ५०० रुपये दंड (तडजोड शुल्क ) आकारून तो जागेवर त्यांच्याकडून वसूल करावा असे आदेश महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयातील सर्व प्रमुख ,उप आणि सहायक आरोग्य निरीक्षक यांना दिले आहेत . अन्यथा त्यांच्यावर भा.द वी १८८ नुसार कारवाई करायचे अधिकार हि या महापालिका अधिकारी,कर्मचारी वर्गाला दिले आहेत .

लग्न समारंभासाठी या आहेत अटी आणि शर्ती …

0

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने लग्नसमारंभ साजरा करण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
कोविड १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली असून त्यास ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ आणि टप्पे निहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी “मिशन बिगीन अगेन” (MISSION BEGIN AGAIN) बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे.
कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन दरम्यान, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. तथापि, हे लग्न समारंभ कोणकोणत्या ठिकाणी पार पाडता येतील याबाबतचा उल्लेख सदर आदेशामध्ये नाही. ५० लोकांच्या मर्यादेत घराच्या परिसरात लग्न समारंभ साजरे करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ५० लोकांच्या मर्यादेतच सोशल डिस्टसिंग पाळून खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह येथे समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्याबाबतच्या विविध मागण्या शासनाकडे प्राप्त झाल्या. या सूचना व मागणी विचारात घेता तसेच आता पावसाळा सुरु झाला असल्यामुळे खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग तसेच कोव्हीड -१९ संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास परवानगी देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शासन अधिसूचना सुधारणा पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात लागू करण्यात आल्या असून
सर्व संबंधित प्रशासकिय विभाग यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी. पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात महाराष्ट्र शासन अधिसूचनेत पुढील अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येईल.
अटी व शर्ती :
१. लग्न समारंभाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील.
२. लग्न समारंभाच्या ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास सदरील व्यक्ती दंडनीय कारवाईस पात्र राहील.
३. लग्न समारंभाच्या ठिकाणी जास्तीत जास्त ५० व्यक्ती उपस्थित राहतील व त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टेंसिंग) सहा फूट राखणे बंधनकारक राहील.
४. लग्न समारंभाच्या ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खाण्यास व मद्यपानास सक्त मनाई राहील.
५. लग्न समारंभाची जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

६. लग्न समारंभाच्या आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हात धुणे,सॅनिटायझरचा वापर या करिता संंबंधित विनावातानुकूलित मंगल कार्यालय /हॉल/खुले लॉन/सभागृह व्यवस्थापक/मालक यांच्यामार्फत व्यवस्था करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत वातानुकूलित सेवेचा (एसी) वापर करण्यात येऊ नये.
७. लग्न समारंभाच्या ठिकाणी बसण्याच्या जागा सामाजिक अंतर राहील अशा पद्धतीने खुणा (मार्किंग) करुन निश्चित करण्यात याव्यात.
८. लग्न समारंभाच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापक / मालक यांच्या मार्फत करण्यात यावी.
९. लग्न समारंभाच्या ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले तर सदर भागातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह तात्काळ बंद करण्यात येतील.

या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना विरूध्द भारतीय साथ अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, व भारतीय दंड संहिता (४५ऑफ १८६०) कलम १८८ आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

पुणे ग्रामीण जिल्हयातील शस्त्र परवानाधारकांनी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UNI) प्राप्त करुन घ्यावा. – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे दि.24 : – पुणे ग्रामीण जिल्हयातील 31 जानेवारी 2020 पर्यंतच्या सर्व शस्त्र परवानाधारकांची NDAL-ALIS प्रणालीमध्ये नोंद घेवून UNI क्रमांक प्राप्त करुन घेण्याची मुदत 29 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
पुणे ग्रामीण जिल्हयातील ज्या शस्त्र परवानाधारकांना जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे व तहसिलदार यांच्याकडून शस्त्र परवाना प्रदान करण्यात आलेला आहे त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय यांच्याकडे 29 जून 2020 पर्यंत त्यांच्या कडील परवान्याची केंद्र शासनाच्या NDAL-ALIS या प्रणालीमध्ये माहिती भरुन घेवून त्याबाबतचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UNI) प्राप्त करुन घ्यावा, तसेच ज्या परवानाधारकांना उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून शस्त्र परवाना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांनी संबंधित उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय यांच्याकडे 29 जून 2020 पर्यंत त्याच्यांकडील परवान्याची केंद्र शासनाच्या NDAL-ALIS याप्रणालीमध्ये भरुन घेवून त्याबाबतचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UNI) प्राप्त करुन घ्यावा,असेही त्यांनी सांगितले.
29 जून 2020 पर्यंत जे शस्त्र परवानाधारक हे त्यांच्या परवान्याची डेटा एन्ट्री करुन त्याबाबतचा UNI क्रमांक प्राप्त करुन घेणार नाहीत, अशा सर्व शस्त्र परवानाधारकांचे परवाने 30 जून 2020 नंतर अवैध समजण्यात येतील, अशी तरतूद भारत सरकारने 3 जानेवारी 2020 रोजीच्या अधिसूचनेमध्ये केली आहे, याची सर्व शस्त्र परवानाधारकांनी नोंद घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
पुणे ग्रामीण जिल्हयातील ज्या अग्नीशस्त्र परवानाधारक यांनी अद्याप यु.आय.एन क्रमांक प्राप्त करुन घेतलेला नाही,अशा परवाना धारकांकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाचे www.pune.nic.in या संकेतस्थळावर विहित नमुन्यातील फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या फॉर्ममध्ये अचुक माहिती भरुन संबधित तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात यावी. फॉर्मसोबत परवान्याची साक्षांकित प्रत, आधार कार्ड, लाईट बील, रेशन कार्ड व पॅन कार्ड इत्यादींच्या छायांकित प्रती जोडण्यात याव्यात, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजना निधीतून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्याचे निर्देश

0

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला भोर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा

पुणे दि.24 : – पुणे जिल्हयातील ग्रामीण भागातील आरोग्य विषयक पायाभुत सुविधांचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे सांगतानाच आपत्ती व्यवस्थापन निधी, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी आणि सीएसआर निधीतून आरोग्यविषयक सुविधांचे बळकटीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिले.
भोर पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी राम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी आमदार संग्राम थोपटे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसिलदार अजित पाटील, भोरचे पोलीस निरिक्षक श्री.मोरे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे,पंचायत समिती सदस्य रोहन बाठे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. भोर येथे प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभागाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपण कोरोनाचा प्रसार रोखू शकलो, असे त्यांनी सांगितले. तसेच भोर तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनास यापूर्वी सहकार्य केले तसेच यापुढील काळात देखील असेच सहकार्य करावे असे सांगून नागरिकांचे कौतुक केले.
भोर उपजिल्हा रुग्णालयातील सोईसुविधांचे तातडीने बळकटीकरण करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे सांगून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेत नियोजन करणे आवश्यक आहे. तालुक्याच्या बाहेरील नागरिकांच्या विलगीकरणासंदर्भात सूचना करुन कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जनजागृती करण्यात यावी. असे सांगितले. भोर उपजिल्हा रुग्णालयाकरीता ऑक्सीजन सुविधा, तसेच इतर अत्यावश्यक सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन दिल्या जातील. भोर सारख्या दुर्गम भागात त्याचठिकाणी रुग्णांवर सर्व प्रकारचे उपचार होतील याकरीता आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, लॉकडाऊन शिथील करण्यात आले असले तरी कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर वापर तसेच प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आवश्यक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करुन राष्ट्रीय महामार्गासंदर्भांतील अडीअडचणीचांही आढावा घेतला. तसेच खरीप हंगामातील खते, बियाणे वाटप स्थितीचा आढावा घेवून याचा तुटवडा भासणार नाही यादृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
आमदार संग्राम थोपटे यांनी राष्ट्रीय महामार्गावरील शिवापूर येथील टोलनाका, भोर- वेल्हा तालुक्यातील शेतक-यांना खते, बि बियाण्यांचा पुरवठा, शेतीसाठीचा युरियाचा पुरवठा याबाबतच्या सूचना करुन पीककर्ज, विद्युत विभागांच्या प्रश्नांबाबत या बैठकीत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी याबाबत स्वतंत्ररित्या बैठक घेण्यात येवून या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले.

वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून 2 हजार 441 नागरिकांचे आगमन – विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर

0


पुणे दि.24 : – पुणे विभागामध्ये 23 जून 2020 अखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून एकूण 457 व्यक्तींचे दुसऱ्या टप्प्यामध्ये 789 त्याचप्रमाणे तिस-या टप्प्यात 1 हजार 195 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. असे एकूण परदेशातून 2 हजार 441 व्यक्तींचे आगमन झालेले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 1 हजार 986, सातारा जिल्हयातील 133, सांगली जिल्हयातील 119, सोलापूर जिल्हयातील 99 तर कोल्हापूर जिल्हयातील 104 व्यक्तींचा समावेश आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात कोरोनाचे ॲक्टीव रुग्ण 7 हजार 256

0

पुणे विभागातील 13 हजार 189 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 21 हजार 353 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 24 :- 0पुणे विभागातील 13 हजार 189 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 21 हजार 353 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 7 हजार 256 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 908 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 466 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.77 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.25 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 17 हजार 274 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 10 हजार 288 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 365 आहे. कोरोनाबाधित एकूण 621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 360 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.56 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.59 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 937 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 889, सातारा जिल्ह्यात 6, सोलापूर जिल्ह्यात 33 , सांगली जिल्ह्यात 02 तर कोल्हापूर जिल्ह्यात 07 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 850 रुग्ण असून 678 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 132 आहे. कोरोनाबाधित एकूण 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 2 हजार 187 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 328 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 629 आहे. कोरोना बाधित एकूण 230 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 293 रुग्ण असून 192 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 92 आहे. कोरोना बाधित एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 749 कोरोना बाधीत रुग्ण असून 703 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 38 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 44 हजार 730 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 41 हजार 880 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 850 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 20 हजार 201 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 21 हजार 353 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 24 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

पडळकरांचे विधान अयोग्य – देवेंद्र फडणवीस

0

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पवारांची जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. पडळकराच्या वक्तव्यानं निर्माण झालेल्या वादावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी गोपिचंद पडळकर यांच्याशी संवाद साधला आहे. भावनेच्या भरात हे विधान केल्याचं पडळकर यांनी मान्य केलं आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.   ‘शरद पवार आमचे राजकीय विरोधक आहेत ते शत्रू नाहीत. त्यामुळं कोणत्याही जेष्ठ्य नेत्यांवर अशाप्रकारची टीका योग्य नाही. याबाबत मी पडळकरांशी बोललो आहे. भावनेच्या भरात त्यांनी हे विधान केल्याचं मान्य केलं आहे. त्याबद्दल ते लवकरच स्पष्टीकरण देतील,’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ‘कठोर भावना मांडत असताना शब्द योग्य हवेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी बोलताना संयम बाळगणे महत्त्वाचं आहे,’ असंही ते म्हणाले.  

शरद पोंक्षे यांचा राष्ट्रवादीशी कोणताही संबंध नाही, जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

0

मुंबई. प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचा राष्ट्रवादीशी कधीच संबंध नव्हता, आणि यापुढेही कधीच नसेल, असं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे. शरद पोंक्षे हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात आले होते. यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. आता यावर जयंत पाटलांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. या पलिकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

जयंत पाटलांनी ट्विटमध्ये लिहिलं की, ‘महात्मा गांधींची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हेदेखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष श्री. प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल.’

गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावरुन आव्हाडांचा इशारा-‘ गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल’

0

मुंबई. ‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे,’ अशी जहरी टीका भाजपचे विधापरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘शरद पवारांवर बोलताना जी भाषा वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल.’

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, ‘शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखे आहे. फक्त प्रसिद्धीसाठी केलेला हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, तो आज त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवू नयेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला शरद पवारांनी इथपर्यंत आणलंय.’

‘असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात आले आणि गेले. पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श करु शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा त्यांनी वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी काहीतरी बोललं पाहिजे. पवारांबद्दल बोललं की महान नेता असा भाजपात गोड समज आहे. त्यामुळे हा त्या प्रयत्नाचा भाग आहे. हे ज्यांना नेता मानतात तेच नरेंद्र मोदी आपण शरद पवारांची करंगळी धरुन राजकारणात आल्याचे बोलतात. यांना करंगळीही धरायला मिळणार नाही,’ असे आव्डा म्हणाले. दरम्यान, गोपीचंद पडळकर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत येण्यासाठी विनंती करत होते, असा गौप्यस्फोटही आव्हाडांनी केला.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर

‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असे माझे मत आहे. अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची कायमची भूमिका आहे. ते पुढेही अशीच भूमिका चालू ठेवतील. त्यांच्याकडे कुठली विचारधाराही नाही आणि ना कुठला अजेंडा नाही, ना व्हिजन आहे. केवळ छोट्या छोट्या समूह गटांना भडकावून आपल्या बाजूला करणे, त्यांच्यावरच अन्याय करण्याची शरद पवारांची भूमिका आहे.’

‘धनगर आरक्षणाबाबत शरद पवार हे पॉझिटिव्ह नाहीत. त्यांना केवळ धनगर समजाच्या विषयावरुन आरक्षणाचे राजकारण करायचे आहे. गेल्या बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. या सरकारने एक रुपया सुद्धा धनगर आरक्षणासाठी दिला नाही. त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनात यावर बोलावे लागणार’, असल्याचेही ते म्हणाले.

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना, गोपीचंद पडळकरांची जहरी टीका (व्हिडीओ)

0

शरद पवार यांनी बहुजन समाजातील लोकांवर अन्याय केला असल्याचा आरोपही त्यांनी केला

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/491600781648248/

पंढरपूर. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी टीका भाजपचे विधापरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यासोबतच शरद पवार यांनी बहुजन समाजातील लोकांवर अन्याय केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने अद्याप दिलेले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, मात्र अजुनही त्यांना मदत मिळालेली नाही. हा सगळा फार्स सुरु सुरू असल्याचे म्हणत त्यांनी टीकास्त्र साधले.

पुढे पडळकर म्हणाले की, ‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची कायमची भूमिका आहे. ते पुढेही अशीच भूमिका चालू ठेवतील. त्यांच्याकडे कुठली विचारधाराही नाही आणि कुठला अजेंडाी नाही, ना व्हिजन आहे. केवळ छोट्या छोट्या समूह गटांना भडकावून आपल्या बाजूला करणं, त्यांच्यावरच अन्याय करण्याची शरद पवारांची भूमिका असल्याचा घणाघात त्यांनी केला.

पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, धनगर आरक्षणाबाबत शरद पवार हे पॉझिटिव्ह नाहीत. त्यांना केवळ धनगर समजाच्या विषयावरुन आरक्षणाचं राजकारण करायचं आहे. गेल्या बजेटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. या सरकारने एक रुपया सुद्धा धनगर आरक्षणासाठी दिला नाही. त्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनात यावर बोलावं लागणार असल्याचंही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी आषाढीची पूजा करु नये – गोपीचंद पडळकर पडळकर म्हणाले की, सध्या कोरोना संसर्ग वाढत आहे. यामुळे अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जर पंढरपुरात बाहेरील लोक, महाराज मंडळीना प्रवेश नसेल तर आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करु देऊ नये. त्यांच्या ऐवजी सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटुंबास महापूजेचा मान देण्यात यावा असंही ते म्हणाले.

तीन चीनी कंपन्यांच्या करारांना महाराष्ट्र सरकारची मंजूरी

पुणे. भारत-चीन वादादरम्यान, चीनच्यी तीन कंपन्यांच्या होल्डवर ठेवलेल्या अॅग्रीमेंटला उद्धव सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे. 5000 कोटींच्या या कराराला भारत-चीनच्या वादानंतर स्थगिती देण्यात आली होती. या तिन्ही कंपन्या पुण्यात आपले प्रोजेक्ट सुरू करणार आहेत.

राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी सांगितले की, “यापूर्वीची आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. आम्हाला आज सकाळी समजले की, दोन्ही देशांमधील परिस्थिती नियंत्रणाल आणली जात आहे. आम्हाला विश्वास आहे की, या आर्थिक कराराला पुढे नेण्यात भविष्यात काही अडचण येणार नाही.”

या कंपन्यांसोबत केले करार

कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 15 जूनला मुंबईत झालेल्या ‘मॅगनेटिक महाराष्ट्र 2.0’ इन्वेस्टर मीटचे आयोजन केले होते. यात सरकारने ग्रेट वॉल मोटर्स, पीएमआई इलेक्ट्रो मोबिलिटी अँड फोटोन आणि हेल्गी इंजीनियरिंगसोबत करार केले होते. मंगळवारी भारत सीमेवर झालेल्या वादात 20 शहीद झाल्याची बातमी आली आणि महाराष्ट्र सरकारने या करारांना स्थगिती दिली.

परराज्यातील प्रवाशांसाठी पुण्यातून शंभरावी श्रमिक ट्रेन रवाना

0

पुणे दि .24 : – पुणे ते हतिया (झारखंड) ही 100 वी श्रमिक ट्रेन पुणे येथून दि. 23 जून 2020 रोजी दुपारी 4 वाजता रवाना करण्यात आली. आतापर्यंत परराज्यातील एकूण 1 लाख 25 हजार प्रवासी पुण्यातून श्रमिक ट्रेनमधून रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

               पुणे ते हतिया ( झारखंड)  रवाना झालेल्या या  श्रमिक ट्रेन  मधुन एकुण 682 प्रवासी  रवाना करण्यात आले. त्यापैकी  618 प्रवासी झारखंडला, 57 प्रवासी  उड़ीसा तर 7 प्रवासी पश्चिम बंगाल येथे पाठवण्यात आले. आता पर्यंत पुणे येथून 1 लाख 25 हजार  प्रवासी  श्रमिक ट्रेनने त्या त्या राज्यांमध्ये पाठविण्यात आले आहेत.

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार गुलाबबाई संगमनेरकर यांना जाहीर

0

मुंबई, दि.24 : तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास  राज्य शासनातर्फे  तमाशा सम्राज्ञी विठाबाई  नारायणगावकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०१८-१९ साठीचा हा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर यांना घोषित करण्यात आला आहे. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही निवड केली.

गुलाबबाईंनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून लावणी या कलाप्रकारात स्वतःला झोकून दिले. राधाबाई बुधगावकर पार्टी मधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बबुताई शिर्डीकर, सुगंधाबाई सिन्नरकर, महादू नगरकर यांच्याकडे शिक्षण घेता-घेता वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी स्वतःची संगीत पार्टी सुरू केली. राज्यातील खेडोपाडी तसेच अनेक प्रतिष्ठित  महोत्सवांमध्ये त्याचबरोबर दूरदर्शन वरून  उत्तम कला  सादर करून त्यांनी  अमाप लोकप्रियता मिळवली. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या. “गाढवाचं लग्न” या अतिशय गाजलेल्या वगनाट्यातही त्यांचा सहभाग होता. शासनाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल  गुलाबबाई  संगमनेरकर यांचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

पुण्यात रूग्णांची आर्थिक लूट-कुटुंबांचे निघतेय दिवाळे -फडणवीस

0

पुणे-. पुण्यात चाचण्यांची क्षमता कमी आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे.खाजगी रूग्णालयाचा समन्वय यात प्रशासन अपयशी ठरते आहे. रूग्णांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. एका कुटुंबातील दोघे-तिघांना उपचार घ्यावा लागला तर त्यांचे दिवाळे निघते आहे.अशा शब्दात आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कोरोनाच्या स्थितीवर भाष्य करत आघाडीतील तीन पक्षात समन्वय नाही.हा समन्वय प्रमुखाने घडवायचा असतो.समन्वय योग्य असेल तरच लढाई जिंकता येते. अशा शब्दात सत्ताधारी आघाडीवर टीकाही केली .

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/581498572506373/

पुणे येथे आज विविध रूग्णालयांना भेटी दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मांडलेले प्रमुख मुद्दे असे :
– कोरोनाची स्थिती, प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, त्यात काही कमतरता असली तर त्या शासनापर्यंत पोहोचविणे, या उद्देशाने पुणे आणि सोलापूरचा हा प्रवास.
– पुणे महापालिकेने कोरोना प्रतिबंधासाठी सुमारे 150 कोटी रूपये खर्च केले आहेत. राज्य सरकारने सुद्धा महापालिकांना मदत केली पाहिजे. पुण्यात चाचण्यांची क्षमता कमी आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे.
– पुण्यात चाचण्यांची व्यवस्था आणखी वाढविली गेली पाहिजे, अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे. पुण्यात कोरोना प्रादुर्भावाचा दर गेल्या काही दिवसांत 18 टक्क्यांवर गेला आहे. मृत्यू रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.
– प्रशासन चांगले काम करीत असले तरी खाजगी रूग्णालयाचा समन्वय यात प्रशासन अपयशी ठरते आहे. रूग्णांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. एका कुटुंबातील दोघे-तिघांना उपचार घ्यावा लागला तर त्यांचे दिवाळे निघते आहे.
– कुणाला कमी लेखण्याची ही वेळ नाही. टीका करण्याची तर अजीबात नाही. पण, कुठे काही कमतरता राहत असेल तर ती निदर्शनास आणून देणे, हे आपले कर्तव्य आहे.
– आकडे कमी करण्याच्या नादात रणनीती चुकायला नको.
संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत. त्यातून रूग्ण ओळखतो येतो आणि त्यातून इतरांना सावध करता येतं. हाच सर्वोत्तम मार्ग आहे आणि तो जगाने स्वीकारला आहे.
– मंत्र्या-मंत्र्यांमध्ये समन्वय नाही.
मंत्री-प्रशासनात समन्वय नाही.
आघाडीतील तीन पक्षात समन्वय नाही.
हा समन्वय प्रमुखाने घडवायचा असतो.
समन्वय योग्य असेल तरच लढाई जिंकता येते.

सोनू निगमनंतर आता अदनान आणि अलिशाने उठवला आवाज, म्हणाले – ‘ज्यांना संगीताचे ज्ञान नाही, ते स्वत: ला देव मानतात’

0

मुंबई. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने म्युझिक इंडस्ट्रीतील घराणेशाहीवर आवाज उठवला आहे. दिग्दर्शक, निर्माता तयार असतानाही अनेक नव्या कलाकारांना संगीत कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे काम मिळत नसल्याचे त्याने म्हटले आहे. जर हे वेळीच थांबले नाही तर म्युझिक इंडस्ट्रीतही आत्महत्ये सुरु होतील, अशी भीतीदेखील त्याने व्यक्त केली आहे.सोनूनंतर आता गायक अदनान सामी आणि अलिशा चिनॉय यांनीदेखील म्युझिक इंडस्ट्रीतील माफियांविरोधात आवाज उठवला आहे. अदनाने सोमवारी रात्री सोशल मीडियावर एक पोस्ट करुन भारतीय चित्रपट आणि संगीत क्षेत्रात गंभीर आमूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.अदनान सामीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘भारतीय चित्रपट आणि संगीत क्षेत्रात आता मोठे बदल होणे गरजचे आहे. विशेषत: संगीताच्या बाबतीत, नवीन गायक, ज्येष्ठ गायक, संगीतकार आणि संगीत निर्माता यांचे शोषण केले जात आहे. एकतर त्यांची हुकूमशाही सहन करा, अन्यथा तुम्ही बाहेर पडा… असे चित्र येथे आहे. ‘सर्जनशीलता’ अशा लोकांकडून नियंत्रित केली जात आहे, ज्यांना संगीताचे ज्ञान नाही, ते देव होण्याचा प्रयत्न करीत आहेत??’, असे अदनाने म्हटले आहे.

  • आपण लोकांना काय देतोय फक्त रीमेक आणि रीमिक्स

त्याने पुढे लिहिले की, भारतात 1.33 अब्ज लोकआहेत, त्यांना देण्यासाठी आपल्याकडे काय आहे, फक्त रीमेक आणि रीमिक्स गाण्यांशिवाय आपण प्रेक्षकांना काय देतो?, असे प्रश्नदेखील अदनानने उपस्थित केला आहे.

https://www.instagram.com/p/CBvMlvHl_Yr/?utm_source=ig_embed
  • अलिशा चिनॉयने इंडस्ट्रीला विषारी म्हटले आहे

अलिशा चिनॉय हिनेदेखील अदनान सामीची पोस्ट म्युझिक माफियांच्या विरोधात आवाज उठवत शेअर केली आहे. यासह तिने लिहिले की, ही एक विषारी इंडस्ट्री आहे… जिथे चित्रपट आणि म्युझिक माफिया तुम्हाला भीती व सामर्थ्याने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात.. येथे कोणत्याही नैतिकतेशिवाय काम घेतले जाते आणि निष्पक्ष व्यवहारदेखील नसतात, असे तिने म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CBvTeNFpmOY/?utm_source=ig_embed