Home Blog Page 2521

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. 8:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह महाराष्ट्रातील तमाम जनतेचे तीर्थक्षेत्रच आहे. या राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजकंटकांना इशारा दिला आहे.मुख्यमंत्री म्हणतात, राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला आहे.  राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. याबाबत पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वैष्णाेदेवी मंदिरात रोज केवळ 5 हजार भाविकांनाच दर्शनाची मंजुरी, मार्गावर सॅनिटायझरची व्यवस्था

0

जम्मू – वैष्णोदेवी मंदिरात पूजा-अर्चनेच काम सुरूच आहे. त्याचे थेट प्रसारणही सुरू आहे. ही पूजा बाबा शिवधर यांचे वंशज ५०० वर्षांपासून करत आहेत. पुजारी सुदर्शन म्हणाले, यापूर्वी आम्ही आमच्या पूर्वजांकडून कधीही महामारीमुळे दर्शनसाठी चढाई थांबवल्याचे ऐकले नव्हते. एवढेच नव्हे तर भारत-पाकिस्तान युद्ध काळातही मातेचा दरबार भाविकांसाठी बंद नव्हता.पण आता श्री माता वैष्णाेदेवी मंदिराच्या परिसरात काेराेनामुळे १०० दिवसांपासून परिसरात सन्नाटा पसरला आहे. स्थानिक प्रशासनाने ३१ जुलैपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन नवीन व्यवस्था बनवली जात आहे. बोर्डाचे सीईआे रमेश कुमार म्हणाले, दर्शनासाठी कटरापूर्वीच ऑनलाईन नाेंदणी करावी लागेल. दररोज किमान पाच ते सात हजार लोकांना दर्शनाची परवानगी असेल.रमेश कुमार म्हणाले, आम्ही तयारी केली आहे. दरराेज पाच ते सात हजार लाेकांना दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. सर्वांची स्क्रीनिंग हाेणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंगमध्ये दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील पुजारी भाविकांना थेट टिळा लावणार नाहीत. मार्गावर किमान अर्धा डझन पाॅइंटवर सॅनिटाइझचे केंद्र तयार केले जाणार आहेत. दर्शनासाठी कटराला येण्यापूर्वी आधी आॅनलाइन नाेंदणी करावी लागणार आहे. आता मंदिर सुरू करण्याची परवानगी प्रशासन कधी देते यावर सर्वकाही अवलंबून आहे.

दरम्यान, येथे सुकामेवा विक्रेत्या दुकानांची संख्या ४०० हून जास्त आहे. व्यापाऱ्यांनी सुकामेवा खराब हाेण्यापासून वाचवण्यासाठी शीतगृहात पाठवला आहे. काेल्ड स्टाेरेजमध्ये पाठवलेला हा माल किमान ३०० काेटी रुपयांचा असावा असा अंदाज आहे. एक ट्रक माल एक महिना काेल्ड स्टाेरेजमध्ये ठेवण्याचे भाडे ३५ ते ४० हजार रुपये माेजावे लागते. त्याशिवाय ट्रकचे ५ हजार रुपये भाडे वेगळे. अशा प्रकारे दुहेरी संकट आहे.

क्षेत्राचे दरराेजचे सुमारे ४०० ते ५०० काेटींचे उत्पन्न आता बुडाले

देशाच्या कानाकाेपऱ्यातील सुमारे ४० हजारांवर लाेक येथे दर्शनासाठी येतात. मे-जूनमध्ये ही संख्या सर्वाधिक असते. या दरम्यान सुमारे २० लाख लाेक येतात आणि दरराेज १०-१२ काेटी रुपयांची उलाढाल हाेते. दर्शन बंद झाल्यामुळे त्रिकुटा डाेंगरावरील चहाची दुकाने, ढाबे, हाॅटेल्स, वाहतुकीशी संबंधित लाेकांचे हाल सुरू आहेत. कटरा हाॅटेल असाेसिएशनचे अध्यक्ष राकेश वजीर म्हणाले, यात्रा बंद झाल्यामुळे हाॅटेल क्षेत्राचे दरराेजचे सुमारे ४०० ते ५०० काेटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. ड्रायफ्रूट्सची दुकाने कटराचा आर्थिक कणा मानला जाताे. ही बाजारपेठही बंद आहे.

…अखेर राष्ट्रवादीत गेलेले ‘ते’ पाच नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले, अजित पवारांनी सोपविले मिलिंद नार्वेकरांकडे

पारनेर- येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शिवबंधन सोडून हातात घड्याळ बांधल्याने महाविकास आघाडीमध्ये मोठा तिढा निर्माण झा होता. काही दिवसांपूर्वी थेट बारामती गाठत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र हा प्रवेश शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. यानंतर राजकीय वातावरण तापले. महाविकास आघाडीत काहीच आलबेल नसल्याच्या चर्चा झाल्या. यानंतर आता शरद पवार, अजित पवार यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी चर्चा करत हा तिढा सोडवला आहे. अखेर अजित पवारांनी या पाचही नगरसेवकांना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडे सोपवले असल्याची माहिती समोर आली आहे. 

शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पारनेर नगरपालिकेचे पाचही नगरसेवक आता शिवसेनेत परतले आहेत. या पाचही नगरसेवकांनी पुन्हा एकदा शिवबंधन बांधले. सर्व नगरसेवक मातोश्रीवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. 

दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असल्याचं सांगितलं जात आहे. मिलिंद नार्वेकर यांच्यासह पाचही नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर अजित पवारांनी पाचही नगरसेवकांना मिलिंद नार्वेकरांकडे सोपवले आहे. 

शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उमा बोरुडे यांच्यासह पारनेर नगरपंचायतीत (जि. नगर) शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आमदार नीलेश लंके यांच्या खेळीमुळे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला असल्याचे बोलले जात होते. 

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवक आमदार लंके यांच्या संपर्कात होते. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच हा पक्षप्रवेश करण्याचा लंके यांचा प्रयत्न होता, परंतु काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याचा हट्ट धरल्यामुळे शनिवारी बारामतीमध्ये प्रवेशाचा सोहळा पार पडला होता. दुपारी उमा बोरुडे यांच्यासह डॉ. मुदस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी व किसन गंधाडे यांच्या गळ्यात पक्षाचा पंचा टाकून पवारांनी त्यांचे स्वागत केले होते. मात्र यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता हे नगरसेवक पुन्हा स्वगृही परतले आहेत.  

दुकाने, मार्केट खुली ठेवण्यास आता २ तास वाढीव परवानगी

0

मुंबई, दि. ७ – दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रीत तथा कमी करण्याच्या अनुषंगाने राज्यातील दुकाने तथा मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्यात येत आहेत. राज्यातील कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. ९ जुलैपासून ही संमती देण्यात येत आहे. तथापी, यासाठी आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असतील. मिशन बिगिन अगेन टप्पा ५ अंतर्गत आज यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आला.

मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या क्षेत्रात मिशन बिगिन अगेन टप्पा २ मध्ये मार्केट तसेच अत्यावश्यक नसलेल्या दुकानांना पी वन – पी टू बेसीस वर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास संमती देण्यात आली होती. आता दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रीत तथा कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी दोन तास वाढवून देण्यात आले आहेत. या महापालिकांमधील कंटेनमेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील मार्केटना आठवड्यातील ७ दिवस परवानगी देण्यात येत आहे. दुकानांना पी वन – पी टू बेसीसवर परवानगी देण्यात येत आहे. राज्याच्या उर्वरित भागात मार्केट आणि दुकानांना आठवड्यातील सात दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास संमती देण्यात आली आहे. सामाजिक अंतराचे पालन न केल्याचे आढळल्यास किंवा गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यास प्रशासन संबंधीत दुकाने किंवा मार्केट बंद करेल. मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी या वाढीव वेळेचा संबंधीत मार्केट आणि दुकान मालक वापर करतील.
०००००

पुण्यात हॉटेल, लॉज सुरु करण्याबाबत निर्णय अद्याप नाही

पुणे(प्रतिनिधी) : राज्यशासनाने हॉटेल आणि लॉज सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी दिली असली तरी, पुण्यात मात्र, हॉटेल आणि लॉकचे शटर आणखी दोन ते तीन दिवस डाऊनच असणार आहे. शहरात दिवसें दिवस नवीन बाधितांचा आकाडा वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी सर्व यंत्रणांची पुढील दोन दिवसात संयुक्त बैठक घेऊन अंतीम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

शहरातील हॉटेल आणि लॉज 8 जुलै पासून सुरू करण्यास राज्यशासनाने मान्यता दिली आहे. मात्र,त्याच वेळी रूग्णांची संख्या लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार संबधित यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे पुण्याबाबतचा निर्णय महापालिका आयुक्त घेणार आहेत. मात्र, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे करोना बाधित आढळल्याने पालिका आयुक्त मागील तीन दिवसांपासून सेल्फ क्वारंटाईन आहेत. त्यामुळे अद्याप शासनाच्या या निर्णयाबाबत जिल्हा प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेशी त्यांची कोणतीही बैठक झालेली नाही. तसेच पुण्यात करोनाचे रूग्ण वाढत असताना कोणत्या अटी आणि नियमांनुसार, ही मान्यता द्यायची याबाबतही अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळे, पुण्यात हे दोन्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी आणखी दोन दिवसांनी निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी निर्णयाची शक्‍यता ?

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर शुक्रवारी होणाऱ्या आढावा बैठकीत पुण्यातील करोनाच्या स्थितीबाबत थेट नाराजी व्यक्त केली होती. मुंबईत करोना नियंत्रणात येतो पुण्यात का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून शहरात लॉकडाऊनच्या नियमांची कडक अमंलबजावनी सुरू केली आहे. त्यातच, आता लॉज आणि हॉटेल सुरू झाल्यास शहरात गर्दीची ठिकाणे वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आठवडयात शुक्रवारी होणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीतच त्यांच्याशी चर्चा करून पुण्यातील हॉटेल बाबत निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

आज ५१३४ नवीन रुग्णांचे निदान – २२४ करोना बाधितांचा मृत्यू :आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.७: राज्यात सलग पाचव्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५४ टक्क्यांवर कायम असून आज ३२९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण संख्या १ लाख १८ हजार ५५८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ५१३४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८९ हजार २९४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ६१ हजार ३११ नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह (१८.६९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३१ हजार ९८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४६३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २२४ मृत्यू हे मुंबई मनपा-६४, ठाणे-७,ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-२, कल्याण-डोंबिवली मनपा-१३, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-११, पालघर-२, वसई-विरार मनपा-८, पनवेल मनपा-९, नाशिक-४, नाशिक मनपा-९, अहमदनगर-१, धुळे-१, धुळे मनपा-१, जळगाव-५, जळगाव मनपा-३, पुणे-९, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-१, सोलापूर-३, सोलापूर मनपा-७, सातारा-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-४, जालना-२, लातूर-२, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, यवतमाळ-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे तसेच इतर राज्य १ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (८६.५०९), बरे झालेले रुग्ण- (५८,१३७), मृत्यू- (५००२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(११), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,३५९)

ठाणे: बाधित रुग्ण- (५०,८२९), बरे झालेले रुग्ण- (१९,४५९), मृत्यू- (१३८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,९८८)

पालघर: बाधित रुग्ण- (८०५१), बरे झालेले रुग्ण- (३३४८), मृत्यू- (१५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५५३)

रायगड: बाधित रुग्ण- (६३८१), बरे झालेले रुग्ण- (३०६८), मृत्यू- (११९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१९२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (६६७), बरे झालेले रुग्ण- (४०८), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२४९), बरे झालेले रुग्ण- (१८७), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)

पुणे: बाधित रुग्ण- (३०,१३१), बरे झालेले रुग्ण- (१४,३१३), मृत्यू- (९२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४,८९२)

सातारा:  बाधित रुग्ण- (१४०१), बरे झालेले रुग्ण- (८१५), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३२)

सांगली: बाधित रुग्ण- (४७९), बरे झालेले रुग्ण- (२६१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (९६९), बरे झालेले रुग्ण- (७३५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२१)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३३६९), बरे झालेले रुग्ण- (१७८३), मृत्यू- (३१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७२)

नाशिक: बाधित रुग्ण- (५८१६), बरे झालेले रुग्ण- (३२६१), मृत्यू- (२५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३००)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (६०४), बरे झालेले रुग्ण- (४१५), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७१)

जळगाव: बाधित रुग्ण- (४७१२), बरे झालेले रुग्ण- (२६८०), मृत्यू- (३०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७३०)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२०८), बरे झालेले रुग्ण- (१४३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६)

धुळे: बाधित रुग्ण- (१२८३), बरे झालेले रुग्ण- (७५२), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (७००२), बरे झालेले रुग्ण- (३१९०), मृत्यू- (३०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५०६)

जालना: बाधित रुग्ण- (८३२), बरे झालेले रुग्ण- (४२४), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७७)

बीड: बाधित रुग्ण- (१५४), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (५६)

लातूर: बाधित रुग्ण- (४९३), बरे झालेले रुग्ण- (२५२), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१४)

परभणी: बाधित रुग्ण- (१३६), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२९७), बरे झालेले रुग्ण- (२६०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)

नांदेड: बाधित रुग्ण- (४२७), बरे झालेले रुग्ण (२४२), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६९)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२९२), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३)

अमरावती: बाधित रुग्ण- (७१८), बरे झालेले रुग्ण- (५१९), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६८)

अकोला: बाधित रुग्ण- (१७३१), बरे झालेले रुग्ण- (१२४६), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९५)

वाशिम: बाधित रुग्ण- (१२६), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३४३), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३५६), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२)

नागपूर: बाधित रुग्ण- (१७९२), बरे झालेले रुग्ण- (१३२४), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५२)

वर्धा: बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

भंडारा: बाधित रुग्ण- (९५), बरे झालेले रुग्ण- (८०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१८४), बरे झालेले रुग्ण- (११२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१२२), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (९२), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१४५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

एकूण: बाधित रुग्ण-(२,१७,१२१), बरे झालेले रुग्ण-(१,१८,५५८), मृत्यू- (९२५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१९),ॲक्टिव्ह रुग्ण-(८९,२९४)

 (टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

१२ एकराच्या डोंगरावर साकारणार विशेष वनउद्यान (व्हिडीओ)

नगरसेवक वेडेपाटील यांच्या प्रयत्नांना यश-

 पुणे- लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या दोहोंनी समन्वय ठेऊन काम केले तर काय होत  नाही ? याची प्रचीती बावधन ला येते आहे. भाजपचे नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि वनविभागाने दिलेली साथ यामुळे एन डी ए ते बावधन रस्त्यावरील सुमारे १२ एकराच्या डोंगरमाथा डोंगर उतारावर वन उद्यानाच्या निर्मितीला आजपासून प्रारंभ झाला .एकीकडे बिबवेवाडी, धनकवडी ,कात्रज परिसरात जोरदार डोंगर फोडून बांधकामे होत असताना,बाव धन येथे  राखली गेलेली हि डोंगर माथा , डोंगर उताराची जागा आणि आता त्यावर होणारे वन उद्यान हे नागरिकांच्या आयुष्याला संजीवनी देणारे ठरणार आहे.

मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर ,उपवनसंरक्षक श्री लक्ष्मी, सह उपवनसंरक्षक वैभव भालेराव ,वन परिक्षेत्र अधिकारी पी व्ही कापसे यांनी आज या उपक्रमाचा प्रारंभ केला . २० प्रकारची १६०० झाडे येथे लावून पक्षांचा विहार येथे कसा होईल याकडे लक्ष देताना ८०० मीटर ची पाऊल वाट लोकांना येण्याजाण्यासाठी शुध्द ऑक्सिजन मिळविण्यासाठी ठेवण्यात येईल .कॉन्क्रीटणे  वेढलेल्या शहरात अशा प्रकारची उद्याने करणे आव्हान होऊन बसले असताना होऊ घातलेले हे उद्यान निर्माण करून ते जतन करणे महत्वाचे ठरणार आहे .

‘ज्ञानगंगा’च्या निर्मितीत डीईएसचे मौल्यवान योगदान

पुणे, : कोरोनामुळे शाळा, महाविदयालये बंद असली तरी दहावी आणि बारावीच्या राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचावे यासाठी सुरू केलेल्या ‘जिओ ज्ञानगंगा’ या वाहिन्यांच्या निर्मितीत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) शंभरहून अधिक शिक्षक आणि प्राध्यापकांनी मौल्यवान योगदान दिले आहे.

देशात पहिले लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी संस्थेने ऑनलाइन शिक्षण पद्धती विकसित करण्यासाठी तातडीने पावले उचलली होती. पहिल्याच टप्प्यात बहुतांश शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले होते. अशावेळी शिक्षण विभागाकडून विविध विषयांच्या तासिकांचे व्हिडीओ निर्मितीबाबत संस्थेकडे विचारणा करण्यात आली होती. अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी आणि नियामक मंडळातील सर्वच सदस्यांनी या प्रस्तावाला एका दिवसात मान्यता दिली. संस्थेच्या प्रबंधक डॉ. सविता केळकर यांची या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. एससीईआरटीचे उपसंचालक विकास गरड हे शासनाकडून समन्वयक म्हणून काम पाहात असून मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत.

राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी १३० वर्षांपूर्वी संस्थेची स्थापना करण्यात आली होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल असे किफायतशीर शुल्क आकारून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संस्था कार्यरत आहे. वेळोवेळी समाजाला दिशा देण्याचे आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे काम संस्था करीत आहे. कोरोनाच्या विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीत शासनाला सहकार्य करण्याची भूमिका सर्वच शिक्षक आणि प्राध्यापकांनी घेतली. विशेष म्हणजे कोणतेही मानधन किंवा प्रवास भत्ता न घेता मोठ्या आनंदाने आणि सेवाभावी वृत्तीने हा प्रकल्प पूर्ण करण्याचा विश्वास सर्वांनी दिला.

इयत्ता दहावीसाठी मराठी व इंग्रजी माध्यम आणि इयत्ता बारावीसाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसाठी व्हिडीओ अभ्यासक्रमाच्या तासिका निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांच्याकडे दहावी मराठी माध्यमाची आणि डीईएस इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका ज्योती बोधे यांच्याकडे दहावी इंग्रजी माध्यमाची जबाबदारी सोपविण्यात आली. संस्थेच्या आजीव सदस्या डॉ. सविता केळकर यांच्याकडे बारावी कला, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांच्याकडे बारावी वाणिज्य प्रमुख व रूपाली देशपांडे यांच्याकडे सहायक आणि फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य नारायण कुलकर्णी यांची बारावी विज्ञान शाखेचे प्रमुख आणि जयश्री पाटील यांची सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

लॉकडाउनच्या काळात प्रवास आणि एकत्र येउन चर्चा करण्यावर येणार्या मर्यादा, अध्यापनाचे नवीन माध्यम असल्याने येणारा तणाव, संवादासाठी समोर विद्यार्थी नसल्याने होणारी घालमेल, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सहज समजेल अशी सोप्या भाषेतील मांडणी, शिकविताना येणार्या तांत्रिक अडचणी या सर्व समस्यांवर यशस्वीपणे मात करीत विषयांचा सखोल अभ्यास, प्रदीर्घ अनुभव, शिकविण्याची हातोटी, सादरीकरणाची कला आणि तंत्रज्ञान व आधुनिक संपर्क साधनांचा प्रभावी वापर करून प्रकल्पाचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण करण्यात आले आहे. यापैकी मराठी आणि इंग्रजी माध्यमातील दहावी, तसेच बारावीच्या विज्ञान शाखेसाठी जिओ टीव्हीवरील ‘ज्ञानगंगा’ या तीन शैक्षणिक वाहिन्यांचे ऑनलाइन उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

समाजाच्या शेवटच्या स्तरावरील विद्याथ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्याचा एक छोटा प्रयत्न डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक आणि प्राध्यापकांना मिळाली. याचा फायदा शहरातील आणि ग्रामीय भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना होईल अशी अपेक्षा आहे.

संपर्कासाठी डॉ. शरद कुंटे ९४२३०११८९९ प्रा. धनंजय कुलकर्णी ९२२५३४०९३३ तिलोत्तमा रेड्डी ९८५०८५८१५८ ज्योती बोधे ९४२२५१९८३५ डॉ. सविता केळकर ९२२५३४०९३० डॉ. चंद्रकांत रावळ ९८९०१३२१६६ नारायण कुलकर्णी ९९०७९६०९५६

महाडीबीटी पोर्टलमुळे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला तंत्रज्ञानाची साथ – मुख्यमंत्री

0

कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप

शेतकऱ्यांना आता घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ

मुंबई, : शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ केवळ एकाच ऑनलाईन अर्जावर देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलमुळे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. कोरोना संकट काळात सगळ्यांनाच वर्क फ्रॉम होमची सुविधा असताना शेतकरी मात्र शेतात राबून संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवतो. या अन्नदात्याला अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री श्री. ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत महाडीबीटी पोर्टलचा शुभारंभ आज करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

शेतीक्षेत्रातही बाजारपेठ संशोधन महत्त्वाचे आहे त्यामुळे जे विकेल तेच पिकेल या पद्धतीने पिकांचे नियोजन करून राज्यभरातील शेतकऱ्यांना एका छताखाली आणा. यासाठी विभागवार पद्धतीने पिकांचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, हे शासन शेतकऱ्यांचे आशिर्वाद घेऊन दमदारपणे पावले टाकीत आहे. कोरोना काळात सर्वच जण घरी बसून काम करीत आहेत. शेतकऱ्याला मात्र प्रत्यक्ष शेतात राबावे लागतो. त्याच्यामुळे जगाला अन्नधान्याचा पुरवठा होतो. शेतकरी बांधव कुठल्याही संकटाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडीत आहे.

शेतकऱ्यांना घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ

महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. विकसित तंत्रज्ञानाची जोड प्रयोगशील शेतकऱ्याला दिली तर कमी जागेत भरपूर उत्पादन घेणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ज्या शेतमालाला जगात बाजारपेठ आहे त्याचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे म्हणजे जे विकलं जाईल ते पिकवेल अशी धारणा ठेवून कृषी उत्पादन घेण्याचं आवाहन करतानाच विषमुक्त शेती उत्पादनासाठी पुढाकार घ्यावा राज्य शासनामार्फत त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सेंद्रीय शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा

गडचिरोलीच्या अनिल एलावार या शेतकऱ्याने विषमुक्त शेतीचे महत्त्व पटवून देतांना सेंद्रीय शेतीतून उत्पादित केलेल्या शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची केलेली मागणी आपण तत्काळ मान्य करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  प्रयोगशीलतेने शेतकरी काही नवीन उपक्रम राबवित असतील तर त्याला प्रोत्साहन देणारे हे सरकार आहे, आता शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. कमी जागेत अधिक उत्पादन घेणारे, अत्याधुनिक पद्धतीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शेती करणारे शेतकरी आपल्याकडे आहेत. त्यांच्या या मेहनतीला शाश्वती देण्याचे काम करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी सांगितले.

शेताच्या बांधावर जाऊन बोलणारा कृषीमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले की, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बोलणारा, बोगस बियाणे विकणाऱ्या दुकानांवर धाडी टाकणारा कृषी मंत्री दादा भुसे यांच्यारुपाने राज्याला मिळाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

बोगस बियाण्यांबाबत कारवाई करताना मुळावरच घाव – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, कोरोना काळात सगळे घरी असताना शेतकरी काळ्या आईच्या सेवेसाठी राबतोय. शेतकऱ्याला एक गोष्ट मात्र घरी बसून मिळणार आहे ती म्हणजे सर्व योजनांचा लाभ घेण्याची सुविधा. कोरोना काळात शेतकऱ्यांना बांधावर खते पुरविली गेली त्याचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. कृषीमंत्री केवळ मंत्रालयात बसून राहीले नाहीत तर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जातात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांच्या शेतात नांगर धरतात, बियाणे पोहोचवतात असे सांगत उपमुख्यमंत्र्यानी कृषिमंत्र्यांचे कौतुक केले. कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना अभिवादन करतानाच त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञताही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. बोगस बियाण्यांबाबत आलेल्या तक्रारींवर कारवाई करताना मुळावरच घाव घालावा असे आवाहन उपमुख्यंत्र्यांनी यावेळी केले.

राज्यात सुमारे ७६ टक्के पेरणी पूर्ण- कृषीमंत्री

कृषीमंत्री भुसे म्हणाले, पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसुत्रीवर आधारित कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील २३ हजार ५०६ गावांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.  शेतीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार केली असून त्यात ३६०६ शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांसाठी कौशल्या आधारित प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. राज्यात आतापर्यंत १४१. ९९ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १०७. ४८ लाख हेक्टर क्षेत्रावर (७५.७० टक्के) पेरणी पूर्ण झाल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथील शेतकरी आणि नाशिक येथील सुनंदा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेतकरी मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कृषी राज्यमंत्री डॉ. कदम यांनी आभार मानले. सचिव एकनाथ डवले यांनी प्रास्ताविक केले. आयुक्त सुहास दिवसे यांनी महाडिबीटी पोर्टल विषयी माहिती दिली. यावेळी राज्यभरातील कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते.

प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करा-खासदार सुप्रिया सुळे

पुणे,:- बारामती मतदार संघातील प्रलंबित विकास कामांचे प्रश्न टाळेबंदीत शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करीत तातडीने मार्गी लावा अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. तसेच कोरोनाबाधीत रुग्णाला वेळेत उपचार मिळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती लोकसभा मतदासंघातील दौंड, बारामती, इंदापूर, मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर, हवेली, खडकवासला तालुक्यातील प्रलंबित विविध विकासकामांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बारामती तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेती व शेतीपूरक व्यवसायांचे झालेले नुकसान, घरे, जनावरांचे गोठे यांच्या पडझडीच्या अनुषंगाने शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा महामार्गासाठी संपादन करण्यात आलेल्या जमिनीबाबत मोबदला, निरा डाव्या कालव्यावरील घाटाची दुरुस्ती. इंदापूर तालुक्यातील मौजे कळंब येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या घरांचे प्रश्न मार्गी लावणे. दौंड तालुक्यातील नगर पालिकेच्या सफाई कामगारांना राहण्यासाठी घरे उपलब्ध करुन देणे. वेल्हे तालुक्यासाठी नवीन दिवाणी व फौजदारी न्यायालय, क्रिडा संकुल, प्रशासकीय इमारत उभारणी करीता लागणारी जागा, गुंजवणी, निरा देवधर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे, भोर तालुक्यातील भाटघर धरणग्रस्तांचे पुनर्वसन करणे, मुळशी तालुक्यातील पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्ग, पुरदंर तालुक्यातील जेजुरी येथे येणाऱ्या भाविकांसाठी नाझरे धरणाच्या काठावर घाट बांधणी, ग्रामपंचायत वाल्हे येथील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, नाझरे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कऱ्हा नदीवरील बंधारे दुरुस्ती, श्रीक्षेत्र जेजुरी आणि आळंदी देवस्थानांना ब वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळणे, हवेली तालुक्यातील किरकटवाडी-नांदोशी रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या फुरसुंगी या गावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे, खडकवासला तालुक्यातील कात्रज ते नवले पुल राष्ट्रीय महामार्गावरील कामे पूर्ण करणे, खेड-शिवापूर टोलनाक्याचा प्रश्न मार्गी लावणे आदि विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

राज्य वन्य जीव मंडळाची पुनर्रचना करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

0

मुंबई, : राज्य वन्य जीव मंडळावर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री स्वत: या मंडळाचे अध्यक्ष तर वन मंत्री संजय राठोड उपाध्यक्ष आहेत. 

या मंडळाच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, तसेच विधानसभा सदस्य धीरज देशमुख यांचा समावेश आहे तर वन्य जीव क्षेत्रात काम करणाऱ्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट, इकोप्रो संस्था, चंद्रपूर या संस्थांचे प्रतिनिधी असतील. याशिवाय अशासकीय सदस्यांमध्ये अनुज खरे (पुणे), विश्वास काटदरे (रत्नागिरी), बिट्टू सहगल (मुंबई), किशोर रिठे (अमरावती), पूनम धनवटे, कुंदन हाते (नागपूर), यादव तरटे पाटील, सुहास वायंगणकर (कोल्हापूर) यांचा या मंडळात समावेश आहे.

या मंडळावर अपर मुख्य सचिव वने, प्रधान सचिव आदिवासी विकास, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख), व्यवस्थापकीय संचालक, पर्यटन महामंडळ, आयुक्त पशुसंवर्धन, मत्स्यविकास, पोलीस महानिरीक्षक पदाहून कमी दर्जाचा नसलेला अधिकारी, सैन्यदलाचा प्रतिनिधी, केंद्रीय पर्यावरण व वन विभागाच्या संचालकांचा प्रतिनिधी, भारतीय वन्य जीव संस्था, डेहराडून, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे प्रतिनिधी देखील सदस्य म्हणून आहेत.   राज्य वन्य जीवमंडळ हे उपवने, अभयारण्ये, शिकार स्थाने, बंदिस्त क्षेत्रांच्या बाबतीत राज्य सरकारला सल्ला देणे, वन्य प्राणी यांचे जतन व संरक्षण, लायसेन्स व परवाना देण्याबाबत धोरण ठरविणे ही कर्तव्ये मंडळामार्फत बजावली जातात.

लीला पुनावाला फाउंडेशन तर्फे १००० + पेक्षा जास्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुणे,: करोना मुळे  आज बरीच कुटुंब  आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडली आहेत. दैनंदिन खर्च जीवन आवश्यक गोष्टी परवडेनाश्या झाल्या आहेत कित्येक लोकांचे रोजगार बंद झाले आहेत. म्हणुनच लीला पुनावाला फाऊंडेशन अश्या गरजू कुटंबाना मदत करण्यासाठी पुढे सारसावले आहे.  लीला पुनावाला फाउंडेशन तर्फे आत्तापर्यंत १००० हून अधिक  कुटुंबांना अन्नपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.  कोरोना मुळे आज येणारा प्रत्येक दिवस जगण्याची नवीन आव्हाने घेऊन येतो आहे.  दिवसेंदिव सर्वत्र आणखीणच भीत पसरते आहे.  डोक्यावर छप्पर आणि अन्न असणे ही आता एक गरज बनली आहे. गोष्टी हाताबाहेर गेल्यामुळे लॉकडाऊन वाढण्याची भीती सर्वांनाच वाटू लागली आहे.  अश्या परस्थिती मध्ये  लीला पुनावाला फाउंडेशन वंचितांची काळजी घेण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे.

अलीकडेच फिरोज पुनावाला ( संस्थापक विश्वस्त, लीला पुनावाला फाउंडेशन, एलपीएफ), यांनी आपले  भागीदार अॅनसिस सॉफ्टवेयर प्रा. लिमिटेड यांच्या सहयोगाने फाऊंडेशन तर्फे शिष्यवृत्ती मिळवणार्या  आणि ज्यांना या आपत्तीचा  सर्वाधिक फटका बसला आहे अशा 150 मुलींच्या कुटुंबांना धान्य वाटप केले. या वेळी फाऊंडेशनच्या मुली आणि त्यांच्या कुटुंबियांना एक महिन्याचे रेशन पुरवठा करण्यात आला, ज्यामुळे  या कुटुंबांना त्यांच्या मूलभूत गरजा पुर्ण करता येतील. यापुर्वी ही फाऊंडेशनने कोवीड-१९ विरोधात लढ्यात सहभागी होऊन कित्येक पीडित कुटुंबांची मदत केली आहे.  

यामध्ये दररोजच्या वापरासाठी आवश्यक आणि एक महिन्याहून अधिक काळ टिकणार्या वस्तुंचे वितरण केले गेले.  जसे गव्हाचे पीठ, तेल, तांदूळ, वाटाणे, हरभरा, रवा, शेंगदाणे, तांदूळ, गूळ, साखर, बिस्किटे.   यावेळी फिरोज पुनावाला म्हणाले, आतापर्यंत एलपीएफने 1000 हून अधिक गरीब मुलींच्या कुटुंबांना आवश्यक किराणा वितरण केले आहे आणि परिस्थिती सामान्य होईपर्यंत हे काम सुरूच आहे. गरजू कुटुंबाना आमच्याकडून नेहमिच शक्य ती मदत मिळेल.

रफिक सोमानी,  एरिया व्हाईस प्रेसि़डेंट भारत आणि साऊथ एशिया पॅसिफिक अॅनसीस म्हणाले, “आम्ही नेहमीच समाज हितांमध्ये योगदान देण्यासाठी  वचनबद्ध आहोत. लीला पुनावाला फाऊंडेशनला एक चांगल्या कार्यास पाठिंबा देऊन एक छोटी परंतु महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यास मिळाली यासाठी आम्ही आनंदी आहोत. आम्ही आशा करतो की या प्रयत्नामुळे गरजूंना या कठीण परिस्थिती मध्ये उपजिवीका पुर्ण करण्यास मदत होईल. लीला पुनावाला फाऊंडेशनच्या सक्रिय कार्याचे आम्ही कौतुक करू इच्छितो .

टिव्ही मालिकांचे मानधन 3 महिन्यांनी का? एका महिन्यातच मिळाले पाहिजे-प्रिया बेर्डे

पुणे ः जे प्रश्न सोडवायला पाहिजेत ते कोणी सोडवत नाही असे चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ, बॅकस्टेज आर्टिस्ट यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. ज्येष्ठ कलाकारांचे मानधन वाढविणे, राज्य सरकारच्या जाहिरातींमध्ये मराठी कलाकारांना प्राधान्य मिळवून देणे, टिव्ही मालिकांमधील कलाकारांचे मानधन 90 वरून 30 दिवसांवर आणणे, कर्मचाऱयांच्या शिफ्ट 8 तासांच्या करणे, याला माझे प्राधान्य असेल, असे चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करताना सांगितले.

बेर्डे यांच्यासमवेत अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, लावणी कलावंत शकुंतला नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक-दिग्दर्शक डॉ. सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे यांनी या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण

पुणे -अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालया मध्ये  राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हरित वारी उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण ही काळाची गरज असून, पर्यावरण समृध्दीसाठी झाडे लावणे गरजेचे आहे. वृक्षारोपण करून आपले काम येथेच संपत नाही तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर सोहळ्यामध्ये  पेरू, जांभूळ, फणस, आंबा, कैलासपती, बदाम यासारख्या वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, सर्व  विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा.गणेश कोंढाळकर, क्रीडा संचालक प्रा.नवनाथ सरोदे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.विक्रम घीये यांनी केले. हा वृक्षारोपण सोहळा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टसिंगचे नियम  पळून  पार पडला.

मुंबई, ठाण्यात शिधावाटपात गैरप्रकार करणाऱ्या २९ स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई

0

मुंबई, मुंबई, ठाणे परिसरात शिधावाटपात गैरप्रकार करणाऱ्या  29  स्वस्तधान्य दुकानदारांवर दक्षता पथकाकडून कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व मुंबईचे नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी दिली.

मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना (NFSA), प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आत्मनिर्भर भारत योजना तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य तसेच गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेलचा पुरवठा व वितरण यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याकरिता प्रधान कार्यालय तसेच परिमंडळ कार्यालय व परिमंडळ कार्यालय अधिनस्त शिधावाटप कार्यालयांतर्गत एकूण 44 दक्षता पथके गठीत करण्यात आलेली आहेत. या दक्षता पथकामार्फत लॉकडाऊनच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत आतापर्यंत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

1) एकूण 13 अधिकृत शिधावाटप दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. 

2) एकूण 4 अधिकृत शिधावाटप दुकाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.

3) एकूण 12 अधिकृत शिधावाटप दुकानांवर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

4) प्रधान कार्यालयाच्या फिरते पथकामार्फत 3 ठिकाणी धाडी टाकून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करुन जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अ) दिनांक 04 एप्रिल 2020 रोजी अधिकृत शिधावाटप दुकान क्र.41-फ-218 येथे 1200 कि.ग्रॅ. अतिरिक्त गहू, जप्त   मुद्देमालाची किंमत रुपये 30,072/-, गुन्हा नोंद क्र.233/2020, नयानगर पोलीस ठाणे, जि.ठाणे.

ब) दिनांक 06.जून.2020 रोजी अधिकृत शिधावाटप दुकान क्र.33-ई-143 येथे टेम्पो क्र.एम.एच.-03-सी.पी.-3397, तांदूळ 2783 कि.ग्रॅ. व गहू 446 कि.ग्रॅ. अतिरिक्त, जप्त मुद्देमालाची किंमत रुपये 4,61,420/-, गुन्हा नोंद क्र.167/2020, टिळकनगर पोलीस ठाणे, मुंबई.

क) दिनांक 09.जून.2020 रोजी तुर्भे येथे पेट्रोल/डिझेल टँकर क्र.एम.एच.-06-बी.डी.-3777 मधून अवैधरित्या डिझेल चोरी प्रकरणी जप्त मुद्देमालाची किंमत रुपये 33,15,692/-, गुन्हा नोंद क्र.203/2020, तुर्भे एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे, नवी मुंबई.