Home Blog Page 2512

अभिनेत्री रेखा यांचा बंगला कोरोना मुळे सील

0

बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बंगला मुंबई महानगरपालिकेने सील केला आहे. त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पालिकेकडून ही कार्यवाही करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे येथे बँडस्टँड जवळ रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ नावाचा बंगला आहे. याआधी दिग्दर्शक करण जोहर, जान्हवी कपूर आणि आमिर खान यांच्या घरातील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रेखा यांच्या बंगल्यावर दोन सुरक्षा रक्षक होते. त्यापैकी एकाला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. सध्या त्याच्यावर बीकेसी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. मुंबई महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून बंगल्याच्या आसपासचा परिसर सॅनिटाइज केला आहे.

अमिताभ बच्चन कोरोना मुळे रुग्णालयात ..

0

मुंबई – बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयात हलवलं आहे. कुटुंबीयासह इतरांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट यायचे आहेत.अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली आहे. तसंच गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची टेस्ट करावी असंही त्यांनी सांगितलं आहे.

सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना सडेतोड प्रत्युत्तर

0


मुंबई, दि. ११ जुलै :- पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे विधान हे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अश्या प्रकारचे आहे. कारण सरकार म्हणून जी जबाबदारी जनतेमध्ये जाऊन व सुख-दु:ख समजून त्याचे नियोजन करणे व आढावा घेणे व त्यावर उपाययोजना करणे असते ते करण्याएवजी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सरकारचा कारभार सुरु आहे. अश्या वेळी विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी जाऊन जर रुग्णांची दुख समजून घेत असतील व तेथील रुग्णालायांची व्यवस्था पाहत असतील तसेच तेथील व्यवस्था करण्यासाठी मदत होत असेल तर त्यावर अशा प्रकारे टिका-टिप्पणी करणे, म्हणजे महाराष्ट्रातील जनता ज्यापध्दतीने देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कोविडच्या परिस्थितीची आढावा घेत आहे, त्याचे कौतुक करित असताना त्यावर पोटशूळ उठले आहे. त्या उद्विगनेतून अशा प्रकारची भूमिका पर्यटनमंत्र्यांना स्पष्ट करावीशी वाटत आहे. असे सडेतोड प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिले आहे.
पर्यटनमंत्र्यांना आवाहन करताना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, विरोधी पक्ष नेते ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या, रुग्णालयांमध्ये जाऊन या, तेथील कोविड रुग्णांची भेट घ्या,म्हणजे आपली संवेदनशीलता दिसून येईल. केवळ ठाणे महापालिकेला गेले व सर्व आयुक्तांना भेटून एक तासाची बैठक घेऊन नीट माहिती मिळत नाही व योग्य उपाययोजनाही होत नाहीत. त्यामुळे जर ख-या अर्थाने उपाययोजना होत असत्या तर २ लाखांच्या वर रुग्णांची संख्या गेली नसती व १० हजार रुग्ण मृत पावले नसते, त्यामुळे आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे सुख दु:ख नाही त्यामुळे केवळ हे अपयश झाकण्यासाठी अश्या प्रकारचे विरोधकांवर टिका करण्याचे काम येथे होत आहे. आपण इथे अनेक उदाहरणे देऊ शकतो, ठाण्यामध्ये गायकवाड नावाची मृत पावलेली व्यक्ती सोनावणे समजून सोनावणे कुटुंबियांच्या ताब्यात त्यांचे पार्थिव दिले व त्यांचे अंत्यविधी झाले व आम्ही दौ-यावर गेलो असताना तेथे त्यांचे नातेवाईक आम्हाला भेटायला आले व आमच्या रुग्णांचा ठावठिकाणा कळत नाही, अशी कैफियत त्यांनी मांडली, त्यानंतर दोन दिवसांनी ही खली माहिती उघड झाली. दुदैर्वाने सोनावणे मृत पावले. असा या सरकारचा कारभार सुरु आहे आणि सरकारच्या या बेजबाबदार कारभाराची लक्तरे विरोधकांनी वेशीवर टांगली त्यामुळेच त्यांना दुख होत आहे, त्यामुळेच अश्या टुरिझमच्या प्रतिक्रिया ते देत आहेत. दोन वेळा मी क्वारांटाईन झालो, दोन वेळा कोविड चे टेस्टिंग करुन घेतले पण त्यामुळे घाबरुन आम्ही आमचे दौरे रद्द केले नाहीत व लोकांच्या दारात जाणे थांबविले नाही सरकार आपल्या घरात आणि विरोधी पक्ष नेते लोकांच्या दारात याचाच पोटशूळ त्यांना होतोय असा टोलाही दरेकर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना लगाविला.

राज्यात आज कोरोनाच्या ८१३९ नवीन रुग्णांचे निदान- ॲक्टिव्ह रुग्ण ९९ हजार २०२

0

मुंबई, दि.११: राज्यात आज ४३६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ३६ हजार ९८५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८१३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख  ८५ हजार ९९१ नमुन्यांपैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह (१९.१७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २२३ मृत्यू हे मुंबई मनपा-३९, ठाणे-५, ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-७, भिवंडी-निजापूर मनपा-११, मीरा-भाईंदर मनपा-१३, वसई-विरार मनपा-९, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक-४, नाशिक मनपा-६, मालेगाव मनपा-३,धुळे-१, जळगाव-१७, पुणे-३, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-११,सोलापूर-१, सोलापूर मनपा-६,सातारा-४, कोल्हापूर-२, सांगली-१, औरंगाबाद मनपा-९, जालना-८, लातूर-१, लातूर मनपा-२, नांतेड-१, नांदेड मनपा-१, अमरावती मनपा-२, नागपूर मनपा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील २ अशी नोंद आहे.

जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील      

मुंबई: बाधित रुग्ण- (९१,७४५), बरे झालेले रुग्ण- (६३,४३१), मृत्यू- (५२४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,७८२)

ठाणे: बाधित रुग्ण- (५९,४८७), बरे झालेले रुग्ण- (२५,८२९), मृत्यू- (१५९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२,०५९)

पालघर: बाधित रुग्ण- (९३४३), बरे झालेले रुग्ण- (४७७३), मृत्यू- (१८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३९०)

रायगड: बाधित रुग्ण- (८०१०), बरे झालेले रुग्ण- (३६७९), मृत्यू- (१५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१७२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (८५७), बरे झालेले रुग्ण- (५५९), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२५७), बरे झालेले रुग्ण- (२०५), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)

पुणे: बाधित रुग्ण- (३७,३५६), बरे झालेले रुग्ण- (१६,०१६), मृत्यू- (१०६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,२८०)

सातारा:  बाधित रुग्ण- (१६३३), बरे झालेले रुग्ण- (९६३), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०१)

सांगली: बाधित रुग्ण- (५७८), बरे झालेले रुग्ण- (३२२), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४१)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१०९६), बरे झालेले रुग्ण- (७९४), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३७०१), बरे झालेले रुग्ण- (२०५१), मृत्यू- (३७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०८)

नाशिक: बाधित रुग्ण- (६८८४), बरे झालेले रुग्ण- (३७५७), मृत्यू- (२८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८४५)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (७८४), बरे झालेले रुग्ण- (४८५), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७९)

जळगाव: बाधित रुग्ण- (५६०१), बरे झालेले रुग्ण- (३२४२), मृत्यू- (३४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०१६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२४८), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८)

धुळे: बाधित रुग्ण- (१४७३), बरे झालेले रुग्ण- (८३४), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (७९९५), बरे झालेले रुग्ण- (३७३८), मृत्यू- (३३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९२५)

जालना: बाधित रुग्ण- (९०६), बरे झालेले रुग्ण- (५०६), मृत्यू- (४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५६)

बीड: बाधित रुग्ण- (१९१), बरे झालेले रुग्ण- (१०५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (८२)

लातूर: बाधित रुग्ण- (६३०), बरे झालेले रुग्ण- (३१७), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८१)

परभणी: बाधित रुग्ण- (१८६), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३३७), बरे झालेले रुग्ण- (२७६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९)

नांदेड: बाधित रुग्ण- (५५३), बरे झालेले रुग्ण (२५१), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८१)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३४५), बरे झालेले रुग्ण- (२२३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८)

अमरावती: बाधित रुग्ण- (८०६), बरे झालेले रुग्ण- (५७६), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४)

अकोला: बाधित रुग्ण- (१८२४), बरे झालेले रुग्ण- (१४५४), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७८)

वाशिम: बाधित रुग्ण- (१७२), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३८५), बरे झालेले रुग्ण- (२०६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (४१४), बरे झालेले रुग्ण- (२८०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२०)

नागपूर: बाधित रुग्ण- (१९७५), बरे झालेले रुग्ण- (१३६६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७०)

वर्धा: बाधित रुग्ण- (२८), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

भंडारा: बाधित रुग्ण- (१५४), बरे झालेले रुग्ण- (८२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१३९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१५७), बरे झालेले रुग्ण- (९४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (११५), बरे झालेले रुग्ण- (६६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१८३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५३)

एकूण: बाधित रुग्ण-(२,४६,६००), बरे झालेले रुग्ण-(१,३६,९८५), मृत्यू- (१०,११६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७),ॲक्टिव्ह रुग्ण-(९९,२०२)

 (टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो)

मराठी अधिकाऱ्याला दादांनी का बनविले बळीचा बकरा ?

पुणे- लॉकडाऊन करून आणि आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून कोरोनापासून पुण्याला तुम्ही मुक्ती मिळवून देणार आहात काय ? असा सवाल आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होऊ लागला आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली तर अनेकांच्या पचनी पडलेली नाही . गायकवाड यांनी पुण्याच्या पोलिसांसह,अनेक अमहाराष्ट्रीयन अधिकारी यंत्रणाच्या मुसक्या बांधून आपल्या कार्यशैलीने लोकांना धीर देत कोरोना चा मुकाबला सुरु ठेवला होता. औषध उपलब्ध होत नाही तोवर कोरोना सोबत जगावे लागेल आणि त्यासोबत जगण्यासाठी आपल्याला आपली जीवन शैली बदलावी लागेल असे ते वारंवार सांगत होते .गायकवाड यांची बदली म्हणजे त्यांना बळीचा बकरा बनविल्याचे आज सर्वत्र बोलले जात होते. अशा मराठी विनाकलंकित आणि लोकप्रिय अधिकाऱ्याला बळीचा बकरा नेमके का बनविले ? असा सवाल आज वारंवार उपस्थित होत होता. अमराठी आय ए एस अधिकाऱ्यांच्या लॉबीला तर दादा बळी पडले नाहीत .?आज पुण्यातील पथारीवाल्या पासून बड्या व्यापाऱ्यापर्यंत अनेक कंपन्यांच्या कामगारांना आणि उद्योगांना लागलेली झळ जाणून होते .आणि हाच सारा वर्ग या मराठी अधिकाऱ्याच्या अशा तडकाफडकी बदलीने अचंबित झाला आहे. अगोदरच पोटाची भ्रांत , नौकरीची चिंता त्यात आता नव्याने येणारे लॉकडाऊन नवे अधिकारी कसे असतील या या प्रश्नांनी पुढील काळात लोकांत दुही माजू नये याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे.

दादांच्या लॉकडाऊन निर्णयाबाबत कोण कोण काय म्हणाले

गिरीश बापट, खासदार पुणे.

पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यांना सरकारने बळीचा बकरा बनवले. गेल्या काही महिन्यात कोरोना संक्रमण रोखण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना असे अचानक बदलणे योग्य नाही. सरकार आम्हाला राजकारण करू नका असे एकीकडे सांगताना असे निर्णय राजकीय अभिनिवेशातून घेतले आहेत काय अशी मला शंका यायला लागली आहे. पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने असे धरसोडीचे राजकारण राज्य सरकार करू लागले आहे. आधी अचानक लाॅकडाऊन आणि आता प्रमुख अधिकाऱ्यांची बदली ही चुकीची गोष्ट करण्याची मालिका आहे. मी याचा तीव्र निषेध करतो. –

शेखर गायकवाड यांची बदली दुर्दैवी –

पुणे महापालिका व आरोग्य विभाग यांचे प्रशासन अत्यंत ‘डलहौसी’ झालेले आहे. खुर्चीला चिटकून बसलेले बरेच अधिकारी व कर्मचारी ‘मलिदा’ खाण्यासाठी खुर्च्या सोडत नाहीत. पुणे जिल्ह्यातील सर्व खात्यांमध्ये अधिकारी व कर्मचारी एकाच जागेवर १० ते १५ वर्षांपासून फेविकॉल सारखे चिटकून बसलेले आहेत. त्यांना सर्वप्रथम जिल्ह्याबाहेर आऊट केलं पाहिजे. कारण या महाशयांची जरी बदली झाली तरी दोन-चार महिने दुसऱ्या ठिकाणी जाऊन परत पहिल्या जागेवर येउन बसतात. यांची स्वतंत्र मोनोपोली (सवतेसुभे) तयार झालेली आहेत. 100% काम करून सुद्धा १ – २ टक्क्यांवरून आज राजकीय आशीर्वादाने त्याच जागेवर असल्यामुळे 10 टक्केच्या वर मागणी करतात. उपमुख्यमंत्री अर्थात पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी अगोदर सगळ्या खात्यांमध्ये वर्षानुवर्षे चिटकून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्यात. कोरोना महामारी सुद्धा याच लोकांच्या निष्क्रिय प्रशासन कारभारामुळे रुग्ण वाढत आहेत. पालकमंत्र्यांनी मनपा, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे विभाग, महसूल व इतर विभागातील प्रशासनाला लागलेली कीड सर्वप्रथम घालवावी.महानगरपालिकेत सुद्धा बरेच अधिकारी खुर्च्यांना चिटकून आहेत. राजकीय नेत्यांचे आशीर्वाद असल्यामुळे सर्रास टोलधाड सुरू आहे. लाखोंचे व्यवहार मर्जीतल्या लोकांचे असल्यामुळे त्यांना त्या पदावरून अथवा पैशाच्या टेबल वरून हटवलं जात नाही. त्यामुळे पवार साहेबांनी अशा खुर्चीला चिटकून बसलेल्या (लांडग्याच्या) कर्मचाऱ्यांच्या सर्वप्रथम बदल्या कराव्यात जेणेकरून लोकांना न्याय मिळेल. सर्व खात्यातील बदल्यांचे ‘सनीटाईज’ करून प्रस्थापित घाण काढली पाहिजे…

पुणे मनपा आयुक्तांची झालेली बदली दुर्दैवी आहे. कारण आलेले आयुक्त कोरोनाला घाबरतात अशी चर्चा आहे. ‘आम्हाला जगायचय… म्हणून आम्हांला घाबरट आयुक्त नकोत.’

  • संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेड

सिद्धार्थ धेंडे (नेते, रिपाइं) :
लॉकडाऊनमुळे आर्थिक दुर्लब घटकांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले आहेत. घरकामगार महिला, रिक्षाचालक, मजूर, कष्टकरी कामगार यांना एक महिन्याचे रेशन शासनाने भरून द्यावे. त्यानंतर लॉकडाऊनचे असे निर्णय घ्यावेत.

विवेक वेलणकर (अध्यक्ष, सजग नागरिक मंच) :
बेशिस्तांना आवर आता तरी कसा घालणार? कंटेनमेंट झोनमधे कडक लाॅकडाऊन आहेच की कित्येक दिवस, मग तरी का तिथे प्रसार वाढला? जर प्रशासन कंटेनमेंट झोन मधे कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्यात कमी पडतंय तर अख्ख्या जिल्हयात खरंच कडक लाॅकडाऊन होईल? आणि झालाच तर 10 दिवसांनी पुढे परत ये रे माझ्या मागल्या होणार नाही याची काय खात्री? आज साखळी तुटली पाहीजे असं सांगतायत हेच 23 मार्चला ऐकलं होतं.

युक्रांद राज्य संघटक जांबुवंत मनोहर, शहराध्यक्ष सचिन पांडुळे, कार्यवाह सुदर्शन चखाले :
गेले ११३ दिवस आपण लॉकडाऊनमध्ये बंदिस्त आहोत, तरीही रुग्ण वाढत आहेत म्हणजेच लॉकडाऊन हे निष्फळ ठरले आहे. आत्तापर्यंतच्या अनुभवावरुन हा पर्याय युवक क्रांती दलाला योग्य वाटत नाही. सर्वसामान्य जनतेच्या उदरनिर्वाहाची सोय न करता लॉकडाऊनच्या निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे.
आपण घेतलेल्या १० दिवसीय लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा जगण्या-मरण्याचे प्रश्न निर्माण
होतील. सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्याचे प्रमाण वाढु शकेल असे आम्हास वाटते. तसेच बाहेर गावाहुन नोकरीसाठी परत आलेल्या लोकांचे हाल होतील. लॉकडाऊन करण्याच्या निर्णयावर सरकार ठामच असेल तर नागरिकांच्या जिवनावश्यक वस्तु पुरविण्याची जबाबदारी सुध्दा सरकारचीच आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 16 हजार 209

0

पुणे विभागातील 26 हजार 419 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 44 हजार 75 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 11 :- पुणे विभागातील 26 हजार 419 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 44 हजार 75 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 16 हजार 209 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 447 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 591 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.94 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.28 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 36 हजार 964 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 22 हजार 180 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 767 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 10 हजार 5, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 2 हजार 831 व पुणे कॅन्टोंन्मेंट 77, खडकी विभागातील 53, ग्रामीण क्षेत्रातील 735, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 66 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 812, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 106 व पुणे कॅन्टोंन्मेंट 25, खडकी विभागातील 13, ग्रामीण क्षेत्रातील 41, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 20 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 402 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.00 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 711 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 436, सातारा जिल्ह्यात 51, सोलापूर जिल्ह्यात 122, सांगली जिल्ह्यात 27 तर कोल्हापूर जिल्ह्यात 75 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 543 रुग्ण असून 950 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 528 आहे. कोरोनाबाधित एकूण 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 3 हजार 821 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 193 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 301 आहे. कोरोना बाधित एकूण 327 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 608 रुग्ण असून 293 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 300 आहे. कोरोना बाधित एकूण 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 1 हजार 139 कोरोना बाधीत रुग्ण असून 803 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 313 आहे. कोरोना बाधित एकूण 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 34 हजार 461 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 28 हजार 531 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 930 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 84 हजार 44 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 44 हजार 75 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 11 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

कारखान्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले, कामगारांच्या जीवाशी खेळ – यशवंत भोसले

0

पुणे-

सरकारने राज्यातील कारखाने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. परंतू, कारखान्यात योग्य त्या नियमांचे पालन केले जात नसल्याने कामगारांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले असून औद्योगिक क्षेत्रात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. यामुळे शासनाच्या नियमांचे पालन न करणार्‍या कारखान्यांना सील करण्याचे अधिकार पोलिसांना द्यावेत, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष व कामगार नेते यशवंत भोसले यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रात भोसले यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर 22 मार्च 2020 पासून लॉकडावून जाहीर करण्यात आला होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अत्यावश्यक सेवा असलेल्या कारखान्यांना काही निर्बंध घालून 30 टक्के कारखाने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली.

पंधरा दिवसानंतर अत्यावश्यक सेवेशी निगडीत इतरही उद्योग सुरु करण्यात आले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वच कारखाने व उद्योग उद्योगपतींनी सुरु केले. हे कारखाने सुरु करताना जिल्हाधिकारी यांनी नियमावली दिली होती. मात्र, या नियमांचे व निर्बंधांचे उद्योग व कारखान्यांच्या ठिकाणी पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे कामगारांना कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होवू लागले आहे.

बसमधून येताना, तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर राखले जात नाही. कामगारांना टप्याटप्याने उपहारगृहात नाश्ता व जेवणासाठी पाठविले जात नाही. कंटेनमेंट क्षेत्रातून येणार्‍या कामगारांची दर सात दिवसाने वैद्यकीय तपासणी केली जात नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कामगारांच्या जीवीताशी खेळले जात असल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे.

जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमावलीचे पालन काटेकोरपणे केले जात आहे की नाही याची तपासणी करण्याचे अधिकार स्थानिक पोलिस स्टेशनला देणे आवश्यक आहे.

ज्या कारखान्यात कोरोनाबाधित कामगार सापडतील. त्या कारखान्यात हलगर्जीपणा होत आहे का? हे तपासण्यासाठी कामाच्या जागेचे पंचनामे करणे. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासणे. हलगर्जीपणा झाला असल्यास तो कारखाना सील करण्याचे अधिकार पोलिसांना देणे आवश्यक आहे.

शासनाने व कामगार आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे उद्योजक, कारखानदार नियम पाळत आहेत की नाही? कामगारांना नियमाप्रमाणे वेतन मिळते का? कामगारांच्या जीवीतास हानी होणार नाही याची गांभीर्याने दखल घेतली आहे का? या संदर्भातील अहवाल कामगार आयुक्तांकडून आल्यानंतर सदर कारखाना सील करण्याचे अधिकार पोलिस स्टेशनला दिले गेले पाहिजेत.

औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचलनालयाच्या कायद्यानुसार कारखाने व उद्योग सुरु नसल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले जावेत, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.

कारखान्यातील कामगारांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहेत. या उद्योगांवर व कारखान्यांवर कारवाई करण्याचे व चौकशी करण्याचे कर्तव्य महाराष्ट्र शासनाच्या संबंधित खात्याचे आहे.

अनेक उद्योगांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाचे निर्बंध असतानाही कामगारांना तसेच कर्मचार्‍यांना कामावरुन कपात करण्याचे धोरण अवलंबिले आहे. कित्येक उद्योजकांनी आर्थिक स्थिती चांगली असतानाही वेतन कपात करणे, ले ऑफ देणे व निम्सच्या शिकावू कामगारांकडून उत्पादन काढण्याचे काम सुरु केले आहे, असे भोसले यांनी या निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर न्यायालयीन कामकाज संथ गतीने होत असल्याने कामगारांना वेळेत न्याय मिळणे अवघड झाले आहे. कारखानदारांनी कामगारांना बेकायदेशिररित्या कामावरुन काढून टाकणे, वेतन कपात करणे, लॉकडावून कालावधीत कामगारांना वेतन न देणे अशा पद्धतीचे धोरण अवलंबिले आहे.

लॉकडावूनच्या कालावधीत कामगार कामावर न आल्याने कामगारांना कामावरुन बडतर्फ केल्याची अनेक प्रकरणे आहेत. कारखानदारांच्या या चुकीच्या धोरणामुळे लाखो कामगार बेकारीच्या खाईत लोटले जात आहेत.

त्यामुळे शासनाने अशा उद्योगांवर व कारखान्यांवर कायदेशिर कारवाई करावी व फौजदारी स्वरुपाचे दावे दाखल करावेत, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्बंधाचे पालन उद्योग व कारखान्यात केले आहे का? याची तपासणी करण्याचे अधिकार पोलिस, कामगार तसेच औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचलनालय या विभागांना देण्यात यावेत.

कोरोनाच्या कालावधित कामावरुन काढून टाकलेल्या कामगारांना त्वरीत पून्हा कामावर घेण्याचे आदेश दिले जावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी पुणे व पोलिस आयुक्त पुणे व पिंपरी-चिंचवड यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली, विक्रमकुमार नवे आयुक्त

सरकार गोंधळलेले ,घाबरलेले कि बिथरलेले ?

पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची अवघ्या काही महिन्यातच बदली करण्यात आली आहे. पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार हे नवीन महापालिका आयुक्त असणार आहे.शेखर गायकवाड यांना पुणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा कारभार स्वीकारून अवघे काही महिनेच उलटले होते. त्यांनी सौरभ राव यांच्याजागी नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा गायकवाड हे साखर आयुक्त म्हणून काम पाहणार आहे.

शेखर गायकवाड यांनी लॉक डाऊन ला विरोध केला होता ?

आपली जीवन शैली आपल्याला बदलावी लागेल ,जोपर्यंत औषध येत नाही तोवर कोरोना सोबत जगावे लागेल आणि त्यासाठी मुकाबला म्हणून जीवन शैली बदलणे अपरिहार्य राहील असे गायकवाड वारंवार सांगत होते. एवढेच नव्हे तर लॉक डाऊन ला त्यांनी याच शब्दांनी विरोध केल्याचे जाणवत होते . एक मराठी आणि अल्पावधीत जनतेसह अधिकारी वर्गात लोकप्रिय झालेले अधिकारी , सर्वांच्याच समस्या आणि म्हणणे शांतपणे ऐकून घेत प्रत्येकाला जबाबदारीने प्रतिसाद देणारे अधिकारी म्हणून लौकिक त्यांनी मिळविताच त्यांच्या बदलीने अनेकांना धक्का बसला

दरम्यान शेखर गायकवाड यांची ऐन कोरोनाच्या महामारीत बदली होण्यामागे ‘कोरोना ‘ वरील यश अपयशाचाच पाढा वाचला जाणार असून ,विविध क्षेत्रात सरकारकडून वाढत्या महामारीच्या काळात होणाऱ्या बदल्यांच्या राजकारणाने महाविकास आघाडी सरकार गोंधळलेले , घाबरलेले कि बिथरलेले आहे असा सवाल आता निर्माण होणार आहे. नव्या अधिकाऱ्यांनी सूत्रे घेऊन पुन्हा नव्याने महामारीशी सामना कसा करणार हा सवाल अनेकांना सतावतो आहे.

बापट साहेब कोरोना विरोधातील लढाईत तुमची सत्ता असलेली महापालिका अयशस्वी का ? आत्मपरीक्षण करा

पुणे- पुण्याच्या खासदारांनी लॉक डाऊन या विषयाचे राजकारण करण्या पेक्षा महानगरपालिका अपयशी का झाली याच आत्मपरीक्षण करावे,पुण्यातील वाढत्या कोरोनाशी यशस्वी लढा देण्यास महापौर आणि सर्व पदाधिकारी तुमचे १०० नगरसेवकांचे बळ तुमचे, आमदारांचे बळ देखील तुमचे मग कोरोना शी लढताना हे बळ आपण कितपत वापरले ? याबाबतही आत्मपरीक्षण करावे , निव्वळ सोशल मिडिया वरून प्रसिद्धीचा डंका पिटवून,उपदेशांचे डोस पाजीत प्रसिद्धीलोलुप पणा राबवून कोरोनाला हरविता येणार आहे काय ?लॉक डाऊन हे फक्त राज्यसरकरच फेल्युअर नाही त्याला मुख्य जबाबदार मनपा प्रशासन देखील आहे. असा आरोप मनसे चे अजय शिंदे यांनी केला आहे.

खासदार बापट यांनी पुण्यात पुन्हा लॉकडाऊन च्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात वक्तव्ये केल्यानंतर अजय शिंदे यांनी तातडीने हि प्रतिक्रिया दिली आहे …

लॉक डाऊन ला विरोधच पण…..
पुण्याच्या खासदारांनी लॉक डाऊन या विषयाचे राजकारण करण्या पेक्षा महानगरपालिका अपयशी का झाली याच आत्मपरीक्षण करावे . लॉक डाऊन हे फक्त राज्यसरकरच फेल्युअर नाही त्याला मुख्य जबाबदार मनपा प्रशासन देखील आहे शेकडो कोटी खर्च करून देखील करोना आटोक्यात आणण्याच्या उपाय योजना मनपा ला सापडल्या नाही रस्ते बंद करणे आणि पत्रे मारणे या मनपाच्या उपाययोजना असतील तर करोना वाढणारच होता साथी च्या रोगाचा फेलाव होऊ नये या साथीच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करताना मनपा कमी पडली
रुग्ण संख्या वाढत असताना देखील खाजगी हॉस्पिटल चे बेड हेतुपुरस्सर ताब्यात घेण्यास टाळाटाळ करण्यात आली शहरी गरीब अंतर्गत रुग्ण वरचे उपचार करण्यास हॉस्पिटल मधून प्रतिबंध करण्यात आला वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सर्वच हॉस्पिटलचे बेड ताब्यात घेण्यात कुचराई करण्यात आली रुबी जहांगीर सारखी पंचतारांकित हॉस्पिटल हेतू पुरस्सर वगळण्यात आली आणि तेवढ्याच हेतुपुरस्सर पणे सिबॉयसीस सारखी हॉस्पिटल घुसडण्यात आली ( कारण सिबॉयसीस या संस्थेला त्यांच्या हॉस्पिटलच प्रेझन्टेशन करणं सोप्प व्हावं )नियमांना बगल देत शहरातील लहान मोठी हॉस्पिटल का ताब्यात घेण्यात आली नाही रुग्णांना बेड आणि व्हेंटिलेटर मिळत नसताना आणि नवीन रुग्णांना अक्षरशः घरीच उपचार होऊ शकतात अस सांगण्याची वेळ आलेली असताना रोज सरासरी 16 ते 20 दुर्देवी नागरिक मृत्युमुखी पडत असताना आणि सरासरी600 ते 1000 नागरीक करोना बाधीत होत असताना त कोणी च बोलत न्हवत आणि आता व्यापारी वर्ग विरोध करतोय म्हणल्यावर खासदार का बोलायला लागलेत. ए अजय शिंदे यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनला ‘फाम’ चाही विरोध !

0

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला राज्यातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या (फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र) ‘फाम’ने विरोध दर्शविला आहे. लॉकडाऊनचा पुनर्विचार करावा, अशी मागणी ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी केली आहे.

मार्केटयार्डातील गुळ-भुसार बाजार नागरिकांनी शनिवारी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी केली होती. यापूर्वी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अन्नधान्याची मुख्य बाजारपेठ सुरु होती. व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन सर्व व्यवहार सुरळीत पार पाडले. 13 ते 23 जुलै या कालावधीत शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर नागरिक भीतीपोटी खरेदीसाठी गर्दी करत असल्याने सामाजिक अंतर पाळण्याचा नियमाला हरताळ फासण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

दहा दिवस भुसार बाजार बंद ठेवण्यात आल्याने कोरोना नियंत्रणात येईल, अशी शक्‍यता नाही. त्यामुळे भुसार बाजारातील व्यवहार सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, असे शहा यांनी म्हटले आहे. दरम्यान, पुणे शहर व्यापारी महासंघाने शहरात पुन्हा लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला यापूर्वीच विरोध केला आहे.

पुन्हा लॉकडाऊन अजितदादांचा निर्णय जाचक – पहा काय म्हणाले, खासदार बापट (व्हिडीओ)

0

पुणे- पुन्हा लॉकडाऊन अजितदादांचा निर्णय जाचक आहे काय यावर पहा काय म्हणाले खासदार बापट

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/570719560233121/

अजित पवारांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, अन्यथा काय करायचे ते आम्ही ठरवू; पुण्यातील लॉकडाउनवरून खासदार गिरीश बापट आक्रमक

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 13 जुलैपासून पुण्यात कडक लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला. मात्र अजित पवारांच्या या निर्णयाला अनेकांकडून विरोध दर्शवला जात आहे. पुणे व्यापारी संघानंतर भाजप खासदार गिरीश बापट यांनी अजित पवारांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.मास्क लावला नाही, शरीररिक अंतर पाळले नाहीतर कडक कारवाई करा, पण 3 टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी 97 टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून लॉकडाऊन सारखा सोपा निर्णय घेऊ नका, असे एकतर्फी निर्णय जर पुढे घेण्यात आले तर काय करायचे हे आम्ही ठरवू, असा इशारा खासदार गिरीश बापट यांनी दिला. लॉकडाउन जाहीर करताना खासदार आमदारांच्या सूचना विचारल्या नाहीत. केंद्रात नरेंद्र मोदींनी सर्व विरोधी पक्षनेत्यांना बोलवले, त्यांचा सल्ला घेतला. मात्र तसं पुण्यात होत नसून, मनमानी कारभार असल्याचा आरोप गिरीश बापट यांनी केला. यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल. लोकं ऐकत नसेल तर दंडात्मक कारवाई करा. मात्र दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार पुन्हा बुडणार आहे. सरकारने बारा बलुतेदारांना काहीच पॅकेज दिले नाही. यामुळे उपासमारीची भीती असून, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.  जीव जसा महत्वाचा आहे त्यानुसार जीवन सुद्धा महत्वाचे आहे, असे बापट म्हणाले.

मांजरी गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यावर भर द्या -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे,दि.11:- शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने शासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करुन मांजरी बुद्रुक गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यासाठी भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.
हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक येथील कृष्णाजी खंडूजी घुले विद्यालयात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला उप विभागीय अधिकारी सचिन बारावकर, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हडपसर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश साठे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा देशपांडे, सरपंच शिवराज घुले, उपसरपंच सुवर्णा कामठे, ग्रामसेवक मधुकर दाते, समन्वयक ए.बी.मोरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणत वाढत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना करत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मांजरी बुद्रुकच्या गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणेने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यास त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा ताबडतोब शोध घेऊन त्यांची यादी तयार करुन त्यांना नमुना तपासणीसाठी लॅबला पाठविण्यात यावे. नमुना तपासणी अहवाल आल्यानंतर निगेटिव्ह अहवाल असणाऱ्यांना होम क्वॉरन्टाईनचा शिक्का मारुन घरी पाठविण्यात यावे.
कोरोना बाधित गंभीर रुग्णांसाठी लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात जास्तीत जास्त व्हेंटीलेटर बेड व आयसीयु बेड च्या व्यवस्थेबाबतचे लवकरात लवकर नियोजन करावे. यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती मदत करेल. कोरोना बाधित रुग्णामुळे इतरांना प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी. क्वॉरन्टाईन असणाऱ्यांची रोजच्या रोज ऑक्सीमीटरव्दारे तपासणी करावी. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. गावात जर कोणी नियम पाळत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणांनी गावातील कोरोना विषयक आकडेवारी रोजच्या रोज अद्ययावत करुन ठेवली पाहिजे. तसेच या गावच्या प्रतिबंधित क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे. कोरोना प्रतिबंधासाठी मांजरी गावासाठी मास्क, सॅनिटायझर इत्यादी साहित्याची आवश्यकता असल्यास ताबडतोब जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा. प्रशासन सर्वेतोपरी सहकार्य करेल. गावपातळीवर कोरोना विषयक जनजागृती करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

0

बारामती,दि.11 : बारामती शहरासह तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. शहर परिसरात सुरु असणाऱ्या विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेटी देत त्यांनी कामाचा आढावा घेतला.
यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ, नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर उपस्थित होते.
या भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर ते माळेगाव येथील प्रस्तावित सेवा रस्ता , बारामती नगरपरिषद वाहनतळ, बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, गौतम बाग येथील कॅनलच्या दोन्ही बाजूला वाढविण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाची पाहाणी केली.
या पाहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठाणच्या ‘व्हिआयटी हॉल’ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, जलसंपदा यांत्रिकी विभाग मुख्यअभियंता जिवणे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर , नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव , उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत, त्यामध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. विकासकामे करताना रस्त्यांचे सुशोभिकरण करणे, सेवा रस्त्यालागत झाडे लावण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे. शासकीय जागांमध्ये असणारी अतिक्रमण हटवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच अवैद्य वाळू उपसा तसेच अवैद्य धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी पोलीस विभागाला दिले.
तसेच ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कोरोना विरुध्‍दच्‍या लढ्यामध्‍ये कॉर्पोरेट जगताचे सहकार्य

0

            राज्‍यात कोरोनाची पहिली व्‍यक्‍ती पुण्‍यात सापडल्‍यानंतर राज्‍याचेच नव्‍हे तर संपूर्ण देशाचे लक्ष पुण्‍याकडे होते. कोरोनाने इतर देशांत घातलेला धुमाकूळ पाहून चिंता वाटणे स्‍वाभाविक होते. कोरोना संसर्गाचा धोका ओळखून प्रशासकीय यंत्रणा अगोदरपासूनच कामाला लागली होती. उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम, पुणे महापालिकेचे आयुक्‍त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्‍यासह आरोग्‍य यंत्रणा, पोलीस यंत्रणा सज्‍ज झाली होती.
            कोरोनाचे संकट किती मोठे आणि किती काळ राहील, याची कोणालाही माहिती नव्‍हती. तथापि, ते गंभीर असेल याची खात्री होती, त्‍यामुळे अल्‍प‍कालीन आणि दीर्घकालीन उपाय योजण्‍यात आले. सुनियोजित प्रयत्‍नांमुळे केंद्रीय पथकांनी भीती व्‍यक्‍त केलेल्‍या रुग्‍णसंख्‍येपेक्षा कमी रुग्‍ण संख्‍या राखण्‍यात यश मिळाले. हा रोग लपवण्‍यासारखा नसून त्‍यावर योग्य वेळी, योग्य उपचार घेतले तर तो बरा होवू शकतो, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवता आला. रुग्‍ण आणि रुग्‍णालयांना आवश्‍यक ती वैद्यकीय मदत, साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्‍ध करणे, आवश्‍यकतेनुसार सध्‍या असलेल्‍या रुग्‍णालयांची क्षमता वाढविणे, प्रयोगशाळांतील नमुना तपासणीचे प्रमाण वाढविणे,  कोवीड केअर सेंटर, समर्पित कोवीड रुग्‍णालय उभारणे, खाजगी रुग्‍णालयांशी करार करणे, ग्रामीण भागातील रुग्‍णांना उपचारासाठी मदत करणे अशा उपायांचा अवलंब करण्‍यात आला. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी नियोजनबद्ध  आखणी केली. कोरोनाशी लढा देतांना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले. त्यांच्या सूचना विचारात घेण्यात आल्या. नियमित बैठका घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करण्यात आला. कोरोनाशी लढा देतांना आर्थिक मदत कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्‍यात आली. गरजेनुसार वेळोवेळी निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला. पालकमंत्री अजित पवारांनी एक टीम तयार करून अपेक्षित कामांची यादी केली, त्या कामांचे नियोजन करुन भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी नेमून त्‍यांच्‍याकडे जबाबदारी सोपवली. नियोजनाप्रमाणे किती काम झाले, अडचणी काय आहेत, त्‍यावर उपाय काय याचा दर आठवड्याला नियमित आढावा घेण्‍यात आला. गरजेप्रमाणे निधी उपलब्‍ध करुन दिला. ही कामे करत असतांना नियमांचे कुठेही उल्‍लंघन होणार नाही, गुणवत्‍तापूर्ण आणि टिकाऊ कामे होतील, याची दक्षता घेण्‍याच्‍या कडक सूचनाही त्‍यांनी दिल्‍या. या लढ्यात सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सि‍बिलीटी) निधीचीही मदत होऊ शकते, हे लक्षात घेवून उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कॉर्पोरेट जगताला आवाहन केले, तसेच या कामी पाठपुरावा करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती स्‍थापन करण्‍यात आली. त्‍यामध्‍ये पुणे महापालिकेचे आयुक्‍त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त शंतनू गोयल, विशेष कार्य अधिकारी कौस्‍तुभ बुटाला यांचा समावेश आहे. सीएसआर निधीचा उपयोग पुणे महापालिका, पुणे पोलीस आयुक्‍तालय, पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालय, ससून सर्वोपचार रुग्णालय यांना आवश्‍यक ती साधनसामुग्री उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी नियोजन करण्‍यात आले. विशेष कार्य अधिकारी कौस्‍तुभ बुटाला, केपीएमजीचे रोहन सास्‍ते यांच्‍या प्रयत्‍नांमुळे अॅक्सिस बँकेने कोरोना लढ्यासाठी आवश्‍यक 5 कोटी रुपयांची साधनसामुग्री उपलब्‍ध करुन दिली. तसेच आयडीबीआय बँकेनेही 40 लाख रुपयांचा धनादेश पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍याकडे सुपूर्द केला. यावेळी अॅक्सिस बँकेचे अध्‍यक्ष रवी नारायणन, आयडीबीआयचे क्षेत्रीय महाव्‍यवस्‍थापक संजय पणीकर, विशेष कार्य अधिकारी कौस्‍तुभ बुटाला, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. अॅक्सिस बँकेच्‍यावतीने पीपीइ किट 4800, एन 95 मास्‍क (धुवून वापरता येणारे) 10 हजार, सॅनिटायझर (80 टक्‍के इथेनॉल असलेले) 30 हजार, इन्‍ट्युबेशन बॉक्‍स 450, सोडीयम हायपोक्‍लोराइड सोल्‍यूशन 21 हजार किलोग्रॅम, बॅटरीवर चालणारे स्‍प्रे पंप 1126, एक वर्ष वॉरंटी असलेल्‍या थर्मल गन 285, ऑक्झिमीटर 521, निगेटीव्‍ह आयन जनरेटर 141, मोबाईल क्लिनीक 23 (एका महिन्‍यासाठी) उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे. याशिवाय कोरोना उपचार विषयक कार्यवाहीचा प्रतिसाद जाणून घेण्‍यासाठी अॅप सुविधेचीही मदत देण्‍यात आलेली आहे. उपलब्‍ध साधनसामुग्रीतील काही मदत नागपूर,मुंबई, नवी मुंबईसाठीही वापरण्‍यात आली आहे.
            कोरोना लढ्यात ससून रूग्णालय, पुण्यातील प्रशासन आणि लष्कराच्या सदर्न कमांड मध्येही माहिती-तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानाची कार्यवाही सुरू झाली. त्‍यानुसार लष्कराकडे उपलब्ध असलेले मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तसेच मॉड्युलर आयसीयूचे तंत्रज्ञान, उपकरणे कशी ठेवायची, कशी वापरायची याबाबतची माहिती आता प्रशासनाला मिळणार आहे. या बदल्यात राज्याकडे असलेल्‍या कोरोना नमुना तपासणीच्‍या सुविधेचा लाभ लष्कराला मिळणार आहे. एकाच वेळी 96 तपासण्‍या आणि साडेतीन तासांतच अहवाल देण्याची क्षमता पुणे प्रशासनाकडे आहे. याचा फायदा सदर्न कमांडला होणार आहे.
            पालकमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली ससून रूग्णालयात कोरोना (कोविड-19) परीक्षणासाठी अद्ययावत प्रयोगशाळेची उभारणी केली जात आहे. या प्रयोगशाळेत रोबोटीकचाही वापर करण्यात येत आहे. याशिवाय सीबी नॅट यंत्राचा वापरही सुरू करण्यात येत आहे, त्यामुळे येत्या काळात पुण्यात जास्तीत जास्त तपासण्‍या होऊन कोरोनाचे अत्यंत जलद निदान करता येऊ शकेल.
      सीएसआर च्‍या माध्‍यमातून अॅक्सिस बँकेने नॉन कोविड रूग्णांसाठी मोबाईल क्लिनिक व्हॅन, कोविड लक्षणांच्या तपासणीसाठी अद्ययावत मोबाईल व्हॅन, आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून डिजीटल एक्सरेचे विश्लेषण, वस्त्या-वस्त्यांमध्ये फिरती शौचालये, पिंपरी- चिंचवड महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी टेलिमेडीसीन सुविधा पुरवण्यासाठी अद्ययावत अॅपची निर्मिती, कोविड-19 कंटेनमेंट ऍपच्या माध्यमातून कोरोना योद्धे स्टाफ, स्वयंसेवी संस्था, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्‍या उपक्रमांचे संनियंत्रण आणि ट्रॅकींग करणे, कोरोना संसर्गाचा धोका असलेल्या रूग्णालयांमध्ये निगेटीव्ह आयन निर्मिती करणारी संयंत्र देणे, एनट्युबेशन बॉक्स,पीपीई किट-एन-95, सॅनिटायझर तसेच इतर आवश्यक साधनांचा पुरवठा करणे यासाठी मदत केली.
            आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा वापर केलेले डिजीटल एक्सरे सॉफ्टवेअर हे पूर्णपणे भारतात तयार करण्‍यात  आले आहे. तरुण अभियंत्यांची टीम यासाठी धडपड करीत होती. त्यांना या कामी कौस्‍तुभ बुटाला यांनी मार्गदर्शन केले. या सॉफ्टवेअरचे कौतुक अनेक ज्‍येष्‍ठ रेडिओलॉजिस्‍टसह आयुक्‍त श्रावण हर्डीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अगरवाल, ससूनचे अधिष्‍ठाता डॉ. मुरलीधर तांबे, ससूनच्‍या रेडिओलॉजिस्‍ट विभागाच्‍या प्रमुख डॉ. शेफाली पवार आणि त्‍यांचे सहकारी, पुणे मनपाचे डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. वावरे, पिंपरी-चिंचवडचे डॉ. वाबळे यांनी केले आहे.
            कोरोनाच्‍या (कोव्हीड-19) साथीमुळे इतर आजारांनी ग्रस्त रूग्णांना उपचार मिळणे कठीण झाले होते. मात्र, सर्व सुविधांनी युक्त फिरत्या दवाखान्यांमुळे लोकांना त्यांच्या-त्यांच्या विभागात वैद्यकीय सुविधा मिळत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिसांनीही लोकांच्‍या आरोग्याच्या रक्षणासाठी प्राणपणाला लावले. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना असलेला कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन खास पोलीसांसाठीही मोबाईल व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत. या व्हॅनमध्ये प्राथमिक लक्षणांवरून निदान करता यावे म्हणून डिजीटल एक्स-रे ची सोय ही करण्यात आली आहे. 
            रूग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर तसेच आरोग्य सेवकांना संसर्गाचा धोका लक्षात घेता रूग्णालयांमध्ये इनट्युबेशन बॉक्स देण्यात आले आहेत. या बॉक्समुळे रूग्णाशी थेट संपर्क टाळला जातो तसेच त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचारही करता येतात. रूग्णालयांमधल्या संसर्गाचे प्रमाण वाढण्‍याची भीती असते. डॉक्टर तसेच आरोग्य सेवक सतत संसर्गाच्या छायेखाली असतात, यावर उपाय म्‍हणून आता रूग्णालयांमध्ये निगेटीव्ह आयन तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रेही रूग्णालयांना पुरवण्यात आलेली आहेत.
            संसर्गाच्या भीतीमुळे डॉक्टर्सनी आपली क्लिनिक बंद ठेवली. अशा परिस्थितीत रूग्णांना आधार देण्यासाठी सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एक टेलिमेडीसीन अॅप ही सुरु करण्‍यात आले. यासाठी आयडीबीआय बँकेची मदत झाली. स्मार्ट सारथी अॅपच्या जोडीने हे अॅप वापरता येणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने या अॅपच्या माध्यमातून वैद्यकीय साह्य मिळवता येते. या अॅपचा फायदा सामान्य लोकांबरोबरच कोरोनामुळे घरीच विलगीकरण करण्यात आलेल्या रूग्णांना मिळणार आहे.
            कोरोना लढ्यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. बाधित क्षेत्रात पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पुरवण्यात येत असलेल्या सेवा-सुविधांसाठी कार्यरत मनुष्यबळाच्या कामांचे नियोजन करण्यासाठी टेक्नो-पर्पल अॅपचे साह्य घेण्यात आले आहे. या अॅपमुळे सामान्य नागरिक आणि प्रशासन या दोघांनाही खूप मदत होणार आहे. पीसीएमसी सारथी आणि पीएमसी केअर या दोन्ही अॅपमध्ये या अॅपचे  इंटीग्रेशन झाल्यामुळे विविध सुविधांसाठी ‘एक खिडकी’ मांडणी तयार होणार आहे. या अॅपवरील डॅशबोर्डमुळे कंटेनमेंट भागामध्ये वेळेवर सुविधा पोहोचत आहेत की नाहीत यावर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. जीपीएसचा वापर करण्यात आलेल्या या अॅपमुळे केलेल्या कामाची खात्री आणि पडताळणी करता येते. बाधित क्षेत्रामध्ये सार्वजनिक शौचालयांची कमतरता जाणवू नये म्हणून अॅक्सिस बँकेच्या माध्यमातून फिरती शौचालयेही देण्यात आली आहेत. सीएसआरच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्र, प्रशासन, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन प्रेरणादायी काम केलेआहे. कोरोना लढा देतांना लोकांना उत्‍तम आरोग्य सुविधा द्यायच्या, कोरोनाचा प्रसार रोखायचा त्याचवेळी जे या विषाणूशी प्रत्यक्ष लढतायत त्या कोरोना योद्ध्‍यांचे मनोधैर्य सतत वाढवत ठेवायचे, ही एक मोठी तारेवरची कसरत शासन-प्रशासन पार पाडत आहे. कॉर्पोरेट जगताला स्‍वयंस्‍फूर्तीने या लढ्यासाठी सीएसआर निधी उपलब्‍ध करुन देण्‍याचेही आवाहन करण्‍यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्र, प्रशासन, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ, स्‍वयंसेवी संस्‍था, कॉर्पोरेट जगताने सुरु केलेल्या कोरोना लढ्यामध्‍ये लोकांनी स्‍वयंशिस्‍त आणि खबरदारी पाळून साथ दिली तर कोरोनावर मात करण्‍यात नक्‍कीच यश येवू शकते.   


   राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी,  पुणे(मो. 9423245466)

९५ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.१०: राज्यात आज ५३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ३२ हजार ६२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८६२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ५३ हजार ९७८ नमुन्यांपैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने पॉझिटिव्ह (१९.०१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ७४ हजार २५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ५६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २२६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१५ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २२६ मृत्यू हे मुंबई मनपा-७३, ठाणे-९, ठाणे मनपा-८, नवी मुंबई मनपा-१२, कल्याण-डोंबिवली मनपा-१०, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी-निजापूर मनपा-८, मीरा-भाईंदर मनपा-१, पालघर-१, वसई-विरार मनपा-९, रायगड-३, पनवेल मनपा-६, नाशिक-१, नाशिक मनपा-४, धुळे मनपा-४, जळगाव-४, जळगाव मनपा-३, नंदूरबार-२, पुणे-५, पुणे मनपा-२१, पिंपरी-चिंचवड मनपा-११,सोलापूर-२, सोलापूर मनपा-३, कोल्हापूर-१, सांगली-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-५, औरंगाबाद मनपा-४, जालना-१, हिंगोली-१, परभणी-१, लातूर-१, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-३, वाशिम-१, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

टीप:आज रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एप्रिल ते जून २०२० या कालावधीतील इतर कारणांमुळे झालेले २७५ मृत्यू कळविले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (९०,४६१), बरे झालेले रुग्ण- (६१,९३४), मृत्यू- (५२०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८७), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,०३५)

ठाणे: बाधित रुग्ण- (५७,१३८), बरे झालेले रुग्ण- (२४,६२४), मृत्यू- (१५३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०,९७७)

पालघर: बाधित रुग्ण- (८९६३), बरे झालेले रुग्ण- (४५५४), मृत्यू- (१७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२३८)

रायगड: बाधित रुग्ण- (७६१३), बरे झालेले रुग्ण- (३५०७), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९५३)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (८३२), बरे झालेले रुग्ण- (५४३), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२५४), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)

पुणे: बाधित रुग्ण- (३५,२३२), बरे झालेले रुग्ण- (१५,५२६), मृत्यू- (१०२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,६८०)

सातारा:  बाधित रुग्ण- (१५८५), बरे झालेले रुग्ण- (९०९), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६११)

सांगली: बाधित रुग्ण- (५५०), बरे झालेले रुग्ण- (३०२), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१०६२), बरे झालेले रुग्ण- (७६५), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३५९५), बरे झालेले रुग्ण- (१९८६), मृत्यू- (३३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७४)

नाशिक: बाधित रुग्ण- (६५८५), बरे झालेले रुग्ण- (३६३३), मृत्यू- (२६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६८३)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (७०३), बरे झालेले रुग्ण- (४७१), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१२)

जळगाव: बाधित रुग्ण- (५२६०), बरे झालेले रुग्ण- (३१४७), मृत्यू- (३२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७८७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२४०), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)

धुळे: बाधित रुग्ण- (१४२३), बरे झालेले रुग्ण- (८३४), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (७६९१), बरे झालेले रुग्ण- (३५६२), मृत्यू- (३२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८०६)

जालना: बाधित रुग्ण- (८८०), बरे झालेले रुग्ण- (४७५), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६९)

बीड: बाधित रुग्ण- (१९१), बरे झालेले रुग्ण- (१०३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (८४)

लातूर: बाधित रुग्ण- (६०६), बरे झालेले रुग्ण- (२८४), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९३)

परभणी: बाधित रुग्ण- (१८०), बरे झालेले रुग्ण- (९६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३२५), बरे झालेले रुग्ण- (२७५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

नांदेड: बाधित रुग्ण- (५२९), बरे झालेले रुग्ण (२४८), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६२)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३३२), बरे झालेले रुग्ण- (२०९), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०९)

अमरावती: बाधित रुग्ण- (७९६), बरे झालेले रुग्ण- (५५१), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२११)

अकोला: बाधित रुग्ण- (१७९६), बरे झालेले रुग्ण- (१४२७), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७७)

वाशिम: बाधित रुग्ण- (१५७), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३७९), बरे झालेले रुग्ण- (१९७), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६६)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (४०२), बरे झालेले रुग्ण- (२६६), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२)

नागपूर: बाधित रुग्ण- (१९१०), बरे झालेले रुग्ण- (१३६४), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२७)

वर्धा: बाधित रुग्ण- (२८), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

भंडारा: बाधित रुग्ण- (१४८), बरे झालेले रुग्ण- (८२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१९९), बरे झालेले रुग्ण- (१२७), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१४५), बरे झालेले रुग्ण- (९३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (६६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१७५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४७)

एकूण: बाधित रुग्ण-(२,३८,४६१), बरे झालेले रुग्ण-(१,३२,६२५), मृत्यू- (९८९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९६),ॲक्टिव्ह रुग्ण-(९५,६४७)

 (टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)