Home Blog Page 2502

भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’च्या २५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट

0

प्लेसमेंटचे ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण

पुणे:

भारती अभिमत विदयापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ  मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट'(आयएमईडी) च्या २५५  विद्यार्थ्यांना भारतातील नावाजलेल्या कंपन्यांमध्ये विविध पदांवर प्लेसमेंटस मिळाल्या आहेत.प्लेसमेंट चे ९५ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. 
भारती अभिमत विद्यापीठाचे व्यवस्थापनशास्त्र विभागाचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ.सचिन वेर्णेकर  यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. कार्पोरेट रिसोर्स सेल या स्वतंत्र विभागामार्फत प्लेसमेंटससाठी आयोजित प्लेसमेंट ड्राइव्ह सारख्या उपक्रमाला १५० हुन अधिक कंपन्यांनी प्रतिसाद दिला. टेक महिंद्रा,विप्रो,आदित्य बिर्ला,टाटा ,व्हेरीतास अशा नामवंत कंपन्यांचा त्यात समावेश आहे. आयएमईडी मध्ये उदयोगक्षेत्राकडून विद्यार्थ्यांबद्दल असणाऱ्या  अपेक्षा,कुशल मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत वेगवेगळे मार्गदर्शन घेतले जाते. 
संचालक डॉ.सचिन वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.दिपक नवलगुंद,डॉ.श्याम शुक्ला यांनी प्लेसमेंट सेलचे काम पाहिले. विशेष प्रशिक्षण,व्यवसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण,समुपदेशन असे उपक्रम आयोजित करण्यात आले.स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅम मधून  ६ विदयार्थी अर्जेन्टिना ,लिथुवानिया व २ विद्यार्थी युगांडा येथे  शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत गेले आहेत.
कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे,कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनामुळे  ही मजल मारणे शक्य झाले,असे डॉ.सचिन वेर्णेकर यांनी सांगितले. 

कोरोना संकटकाळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार-नोकरीइच्छुक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. २६ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली असून या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्न करीत आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मंत्री श्री. मलिक म्हणाले, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हेसुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.

मागील ३ महिन्यात एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई विभागात २४ हजार ५२०, नाशिक विभागात ३० हजार १४५, पुणे विभागात ३७ हजार ५६२, औरंगाबाद विभागात ३५ हजार २४३, अमरावती विभागात १४ हजार २६० तर नागपूर विभागात ३० हजार ४३५ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यापैकी १७ हजार १३३ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले असून यात मुंबई विभागातील ३ हजार ७२०, नाशिक विभागातील ४८२, पुणे विभागातील १० हजार ३१७, औरंगाबाद विभागातील १ हजार ५६९, अमरावती विभागातील १ हजार ०२२ तर नागपूर विभागातील २३ उमेदवारांचा सहभाग आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने त्यांच्या उपक्रमातून ५८२ उमेदवारांना रोजगार मिळवून दिला आहे.

ऑनलाईन मेळाव्यात ४० हजार नोकरीइच्छुक सहभागी

कौशल्य विकास विभागाने मागील तीन महिन्यात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. मागील ३ महिन्यात २४ ऑनलाईन रोजगार मेळावे संपन्न झाले असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच मेळावे होणार आहेत. झालेल्या मेळाव्यांमध्ये १६७ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १६ हजार ११७ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये ४० हजार २२९ नोकरीइच्छुक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत २ हजार १४० तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरू आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

नोकरीइच्छुक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन

मंत्री श्री. मलिक म्हणाले, यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरीइच्छुक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राष्ट्रीय परीक्षा मंडळात विविध पदांच्या ९० जागा

0

पदाचे नाव : सिनियर असिस्टंट – १८ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी आणि एनबीईची प्रवेश परिक्षा उत्तीर्ण

पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट – ५७ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान

पदाचे नाव : ज्युनियर अकाऊंटंट – ७ जागा

शैक्षणिक पात्रता : गणित आणि सां‍ख्यिकी या विषयांसह पदवी किंवा वाणिज्य शाखेतील पदवी आणि अनुभव

पदाचे नाव : स्टेनोग्राफर – ८ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी, स्टेनोग्राफी व टायपिंगचे ज्ञान आणि अनुभव

वयोमर्यादा : वय वर्षे २७ पेक्षा कमी

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f6Vdri

ऑनलाईन अर्जाकरिता ईमेल : https://bit.ly/2DaVwDR

मुंबईत सातत्याने कमी चाचण्यांमुळे मृत्यूसंख्येत वाढ चिंताजनक!

0

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई, 25 जुलै
मुंबईत सातत्याने कमी चाचण्यांमुळे मृत्यूदर वाढतो आहे. शिवाय, संसर्गाचे प्रमाण सुद्धा चिंताजनक आहे. त्यामुळे तातडीने चाचण्यांच्या संख्येवरील मर्यादा हटवून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याची गरज आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा मुंबईतील चाचण्यांची संख्या कमीच आहे, याकडे लक्ष वेधताना देवेंद्र फडणवीस म्हणतात की, 23 जुलै 2020 पर्यंत मुंबईत 4,62,221 चाचण्या झाल्या आहेत, तर 23 जुलैपर्यंत पुण्यात 3,54,729 चाचण्या झाल्या आहेत. अगदी 17 ते 23 जुलै या आठवड्याचा विचार केला तर 41,376 चाचण्या मुंबईत झाल्या आहेत तर याच कालावधीतील पुण्याच्या चाचण्या 85,139 इतक्या आहेत. याचाच अर्थ मुंबईपेक्षा दुप्पट चाचण्या पुण्यात झाल्या आहेत. पुण्यापेक्षा कितीतरी अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईतील चाचण्या अतिशय कमी होत आहेत. 1 ते 23 जुलै या काळात मुंबईत 1,28,969 चाचण्या झाल्या आहेत. या 23 दिवसांची सरासरी काढली तरी ती 5607 इतकी येते. मुंबईत कमी चाचण्या करणे हे मुंबईकरांच्या जिवाशी खेळण्यासारखे होईल. याचा थेट परिणाम हा मृत्यूदरावर होतो आहे. पुण्याचा मृत्यूदर 2.39 टक्के असून, मुंबईचा मृत्यूदर हा 5.60 टक्के झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर हा 3.68 टक्के असून मुंबईचा मृत्यूदर आटोक्यात न येण्याचे एकमात्र कारण हे कमी संख्येने होणार्‍या चाचण्या आहेत.

एकट्या मे महिन्यातील मुंबईतील मृत्यू पाहिले तर मे 2019 च्या तुलनेत मे 2020 मध्ये मुंबईत 5500 मृत्यू हे अधिकचे झाले आहेत. संसर्गाचे प्रमाण सातत्याने 20 ते 23 टक्क्यांच्या आसपास राहणे, ही चिंतेची बाब आहे. ते किमान 5 टक्क्यांच्या आसपास असावे, यासाठीचे नियोजन आवश्यक आहे. पुण्यात चाचण्यांची संख्या वाढविली जाणे, हे चांगले पाऊल आहे. मात्र, त्या प्रमाणात व्यवस्था राज्य सरकारतर्फे वाढविल्या जात नाही. आरोग्यव्यवस्था ही राज्य सरकारच्या अखत्यारीतील बाब असून सुद्धा महापालिकांना पुरेशी मदत सरकारकडून देण्यात येत नाही. चाचण्यांची संख्या वाढवित असताना पुरेशा व्यवस्था उभारल्या नाही, तर अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे एकिकृत विचार याबाबतीत करण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

एसटी कर्मचार्‍यांच्या समस्येकडे वेधले लक्ष
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या आणखी एका पत्रातून त्यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. या पत्रात ते म्हणतात की, राज्य महामार्ग परिवहन सेवेतील (एसटी) कर्मचार्‍यांची सध्या परवड सुरू आहे. हे सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना मार्च महिन्याचे 25 टक्के वेतन अजून मिळालेले नाही, मे महिन्याचे 50 टक्के वेतन अजून मिळालेले नाही, तर जून महिन्याचे 100 टक्के वेतन अजून मिळालेले नाही. त्यामुळे एसटीच्या अनेक कर्मचार्‍यांवर आपल्या अर्थार्जनासाठी भाजीपाला विकणे, गवंडी काम करण्याची पाळी आली आहे. एसटीच्या लाखावर कर्मचार्‍यांचे कुटुंबीय सध्या अतिशय अस्थिर मानसिकतेत जीवन जगत आहेत. एकिकडे वेतन नाही आणि दुसरीकडे भविष्यात आपल्या नोकर्‍या तरी टिकणार का, ही चिंता त्यांना सतावत आहे. दुष्काळी भागातील ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना आपण 2019 मध्ये एसटीच्या सेवेत सामावून घेतले, त्यातील 4500 जणांना घरी बसविण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत त्यांना सेवेवर येऊ नये, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय, 50 वर्षांवरील कर्मचार्‍यांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्याचाही घाट घातला जात आहे. असे करताना कुठल्याही संघटनांना विश्वासात घेतले गेले नाही, हे तर आणखी दुर्दैवी आहे.

एसटी कर्मचार्‍यांपैकी 328 कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला. ते सुद्धा या काळात कोरोना वॉरिअर्सप्रमाणे सेवा देत असल्याने त्यांच्याही समस्यांकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सरकारने कोरोना बळींना 50 लाख रूपये देण्याची घोषणा केली. तथापि मृत्यू झालेल्या 8 जणांच्या कुटुंबीयांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. या समस्यांकडे आपण तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्यात आज कोरोनाच्या ९२५१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण १ लाख ४५ हजार ४८१ रुग्ण ॲक्टिव्ह

0

मुंबई, दि.२५: राज्यात आज ७२२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या २ लाख ७ हजार १९४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९२५१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ४८१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १८ लाख ३६ हजार ९२० नमुन्यांपैकी ३ लाख ६६ हजार ३६८ नमुने पॉझिटिव्ह (१९.९४ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ९४ हजार ५०९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ६०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६५ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले  २५७  मृत्यू हे मुंबई मनपा-५२, ठाणे-३, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-९,कल्याण-डोंबिवली मनपा-१२, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी निजामपूर मनपा-९, मीरा-भाईंदर मनपा-२, वसई-विरार मनपा-७, पालघर-२, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक-४, नाशिक मनपा-८, धुळे- १, धुळे मनपा-१, जळगाव-५, जळगाव मनपा-४, नंदूरबार-१, पुणे-१७, पुणे मनपा-४५, पिंपरी-चिंचवड मनपा-१०, सोलापूर-८, सोलापूर मनपा-४,सातारा-१, कोल्हापूर-७, सांगली-२, सांगली मिरज कुपवाड मनपा-१, सिंधुदूर्ग-१, रत्नागिरी-५, औरंगाबाद मनपा-४, जालना-३, बीड-१, नांदेड-३, नांदेड-१, नांदेड मनपा-१, अकोला-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-१,नागपूर मनपा-१, वर्धा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                                          

मुंबई: बाधित रुग्ण- (१,०८,०६०) बरे झालेले रुग्ण- (७८,८७६), मृत्यू- (६०३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,८५४)

ठाणे: बाधित रुग्ण- (८४,८५१), बरे झालेले रुग्ण- (४५,८७४), मृत्यू- (२२९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६,६७८)

पालघर: बाधित रुग्ण- (१३,८४०), बरे झालेले रुग्ण- (८१५१), मृत्यू- (२९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३९१)

रायगड: बाधित रुग्ण- (१४,०८९), बरे झालेले रुग्ण-(९३३९), मृत्यू- (२६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४८५)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१४८६), बरे झालेले रुग्ण- (८१४), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१८)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३२१), बरे झालेले रुग्ण- (२५२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)

पुणे: बाधित रुग्ण- (७३,००७), बरे झालेले रुग्ण- (२५,२५६), मृत्यू- (१७३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६,०१३)

सातारा:  बाधित रुग्ण- (२९८७), बरे झालेले रुग्ण- (१६२९), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६०)

सांगली: बाधित रुग्ण- (१३०१), बरे झालेले रुग्ण- (६०९), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३३२४), बरे झालेले रुग्ण- (१०२४), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२२९)

सोलापूर: बाधित रुग्ण- (७४२९), बरे झालेले रुग्ण- (३४७३), मृत्यू- (४३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२०)

नाशिक: बाधित रुग्ण- (१२,१८४), बरे झालेले रुग्ण- (६८८७), मृत्यू- (४२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८७६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२८४४), बरे झालेले रुग्ण- (११८९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६०७)

जळगाव: बाधित रुग्ण- (८९२५), बरे झालेले रुग्ण- (५९७५), मृत्यू- (४६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४८९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४९७), बरे झालेले रुग्ण- (२९५), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८०)

धुळे: बाधित रुग्ण- (२३३३), बरे झालेले रुग्ण- (१५७२), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६९)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (११,५४९), बरे झालेले रुग्ण- (६३६४), मृत्यू- (४३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७५०)

जालना: बाधित रुग्ण- (१७१८), बरे झालेले रुग्ण- (९०९), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४२)

बीड: बाधित रुग्ण- (५२१), बरे झालेले रुग्ण- (१८९), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३१७)

लातूर: बाधित रुग्ण- (१४७६), बरे झालेले रुग्ण- (७०८), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९८)

परभणी: बाधित रुग्ण- (४४१), बरे झालेले रुग्ण- (१९०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३४)

हिंगोली: बाधित रुग्ण- (५०८), बरे झालेले रुग्ण- (३५७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)

नांदेड: बाधित रुग्ण- (१२१२), बरे झालेले रुग्ण (५४४), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१६)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६३४), बरे झालेले रुग्ण- (३९८), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०३)

अमरावती: बाधित रुग्ण- (१५८३), बरे झालेले रुग्ण- (१०८३), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४९)

अकोला: बाधित रुग्ण- (२३२९), बरे झालेले रुग्ण- (१७९३), मृत्यू- (१०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३१)

वाशिम: बाधित रुग्ण- (४९७), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१७)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (९५४), बरे झालेले रुग्ण- (३०७), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२१)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (७१२), बरे झालेले रुग्ण- (४३६), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५३)

नागपूर: बाधित रुग्ण- (३३३२), बरे झालेले रुग्ण- (१६२७), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६६३)

वर्धा: बाधित रुग्ण- (११४), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९)

भंडारा: बाधित रुग्ण- (२०७), बरे झालेले रुग्ण- (१७०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२३५), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (३१३), बरे झालेले रुग्ण- (१९७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२३२), बरे झालेले रुग्ण- (१६९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (३२३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७८)

एकूण: बाधित रुग्ण-(३,६६,३६८) बरे झालेले रुग्ण-(२,०७,१९४), मृत्यू- (१३,३८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०४),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४५,४८१)

(टीप: बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हा स्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

0

मुंबई दि. २५ :  कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद देत परिवहनमंत्री अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी  आज मुंबईतील शिवसेनेच्या विभागांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. एकता मंच तसेच श्री.चैतन्य ओंकार ट्रस्ट यांच्या सहकार्याने १३ रुग्णवाहिकांचे तर जाणीव ट्रस्ट तर्फे १२ रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यासह मुंबईत झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांची लागणारी गरज ओळखत आज त्या उपलब्ध करून देण्यात आल्या. कोरोनासारख्या आजारात शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होण्याची शक्यता असते त्यामुळेच या सर्व रुग्णवाहिका ऑक्सिजन सुविधेने सुसज्ज असून यात नवीन तंत्रज्ञानच्या स्ट्रेचरचा वापर करण्यात आला आहे. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक करताना सांगितले की शिवसेनेच्या पिढ्यांप्रमाणेच रुग्णवाहिका देखील अद्ययावत झाल्या आहेत. रुग्णवाहिका आणि शिवसेना हे नाते जुने असल्याचे ते म्हणाले.

आरोग्य विभागात थेट भरती, लवकरच 17 हजार जागा भरणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

औरंगाबाद- जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाटी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि इतर सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांची उपस्थिती होती. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘राज्याच्या आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे’, अशी माहिती टोपे यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, ‘आरोग्य विभागात आता मुलाखतीशिवाय कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. मेरिटवर थेट भरती करण्याला परवानगी मिळाली असून, राज्यात 17 हजार जागा लवकर भरल्या जाणार आहेत,’ अशी माहिती टोपे यांनी दिली. तसेच, राज्यातील मृत्यूदराबाबत बोलताना टोपे म्हणाले की, ‘राज्यात कोरोना परिस्थिती सकारात्मक आहे. धारावी, मालेगाव झिरोवर आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील स्थिती सुधारत आहे. आमचा प्रयत्न हा मृत्यूदर कमी करणे आहे आणि त्यात यश मिळत आहे’, असेही टोपे यावेळी म्हणाले.

कोरोनाच्या संकटात काम करावंच लागेल- शरद पवार

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, ऑगस्टमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. असं तज्ञांच मत आहे. अशा वेळी सरकारी डॉक्टरांची जास्त गरज असणार आहे. तेव्हा खासगी डॉक्टरांनाही सरकारी करावंच लागेल, त्यांना या कामात पूर्णपणे लक्ष द्यावं लागेलं. यासोबतच रुग्णांना नकार देण्याचे प्रमाणही राज्यात वाढले आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, या कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांनीही डॉक्टरांनी पूर्ण सहकार्य करायलाच हवे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांकडे मदत मागितली तर त्यांना मदत मिळायलाच हवी. कोणी देत नसेल, तर हॉस्पिटल ताब्यात घेऊन समन्स देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. राज्यात सध्या बेड वाढवण्याची गरज आहे. ही एक कमतरता आहे. खासगी डॉक्टरांना या आजारात साथ द्यावी लागणार आहे.

यंदा इयत्ता १ ली ते १२ वीचा २५ टक्के पाठ्यक्रम कमी

0

मुंबई, दि. २५ : कोविड १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रचलित पद्धतीप्रमाणे शाळा सुरु झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी  इयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय, विषय निहाय २५% पाठ्यक्रम कमी करण्यात येत आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

१०१ विषयांचा २५ टक्के पाठ्यक्रम कमी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (बोर्ड) यांच्या समन्वयाने आणि अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार संबंधित विषयाचे सर्व अभ्यासक्रम मंडळ सदस्यांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक स्तरावरील २२, माध्यमिक स्तरावरील २० आणि उच्च माध्यमिक स्तरावरील ५९ असे एकूण १०१ विषयांचा इयत्ता निहाय, विषय निहाय २५% पाठ्यक्रम कमी करण्यात येत असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.

असा आहे निर्णय

·  पाठ्यक्रमातून २५ % भाग वगळत असताना भाषा विषयामध्ये काही गद्य व पद्य पाठ व त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर कोणत्याही कृती विचारल्या जावू नयेत.

· भाषा विषयामध्ये वगळण्यात आलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्य वगळण्यात आलेली नाहीत.

· इतर विषयामध्ये कृतीची पुनरावृत्ती टाळणे तसेच काही भाग विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी देण्यात आला आहे.

·  शालेय श्रेणी विषयासंदर्भात परिस्थिती व त्यानुसार उपलब्ध सोयी सुविधा यांचा विचार करून उपक्रम / प्रकल्प घेण्याबाबत सूचित केले आहे.

·  प्रात्यक्षिकांवर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य हे अध्ययन – अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरूनच उपलब्ध परिस्थिती व सोयी सुविधा विचारात घेवून पूर्ण करणेबाबत सूचित केले आहे.

·  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्फत शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. त्या दिनदर्शिकेमधून पाठ्यक्रमातून कमी करण्यात आलेला भाग वगळण्यात येत आहे.   

·   इयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय, विषय निहाय २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला भाग www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येत आहे.

·  शाळा प्रमुखांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सदर पाठ्यक्रम वगळल्याची नोंद घेवून त्याबाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ च्या वतीने पुणे महानगरपालिकेला वैद्यकिय मदत!

0

पुणे : श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थे’ तर्फे पुणे महानगरपालिकेला ३ एचएफएनसी मशीन व १५ हजार मास्क पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ व आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर सौ. सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता धीरज घाटे, अति महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल, सहा. आरोग्य अधिकारी डॉ अंजली साबणे, डॉ संजीव वावरे, उपायुक्त भूसंपादन वनश्री लाभशेटवार, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे शेखर मुंदडा, आदित्य जोशी व अन्य अधिकारी उपस्थित होते. अक्सा, कॅपजेमिनी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत पुणे महापालिकेला ही वैद्यकीय मदत करण्यात आली.

महापौर मोहोळ म्हणाले की, ‘कोरोना संकटाच्या काळात आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे पुणे महानगरपालिकेला वेगवेगळ्या पद्धतीने मदतीचा हात देण्यात आला आहे. आज ज्या रूग्णांना ऑक्सिजनची गरज खूप प्रमाणात असलेल्या रुग्णांसाठी अशा एचएफएनसी मशीनमुळे रुग्ण बरे होण्याकरिता मदत होणार आहे. या वैधकीय मदतीबद्दल आर्ट ऑफ लिव्हिंग चे समस्त पुणेकरांकडून मनःपूर्वक धन्यवाद!’

पुणे जिल्हा पोलीस सहकारी पतपेढी शिष्टमंडळाने घेतली गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट

0

पुणे, दिनांक २५- पुणे जिल्हा पोलीस सहकारी पतपेढी शिष्टमंडळाने आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. यावेळी स्वभांडवलावर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता वैद्यकीय उपचारासाठी सहकार तत्वावर 226 बेडचे रुग्णालय उभारण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, तसेच इतर विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शक विजय कोलते, अध्यक्ष प्रशांत शिंदे, अतुल भोसले, माजी अध्यक्ष कैलास गावडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
पुणे जिल्हा व शहर पोलीस सहकारी पतपेढीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबतही अध्यक्ष श्री शिंदे यांनी माहिती दिली.
यावेळी पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे यांच्यासह पोलीस अधिकारीही उपस्थित होते.

एअर इंडियामध्ये विविध पदांच्या 33 जागांसाठी भरती

0

एकूण जागा – १८

पदाचे नाव : ट्रान्झिशन कमांडर

वयोमर्यादा : कमाल वय ५३ वर्षे (मागसवर्गीयांना सवलत)

पदाचे नाव : कमांडर (पी १)

वयोमर्यादा : कमाल वय ५५ वर्षे (मागसवर्गीयांना सवलत)

शैक्षणिक पात्रता : फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयांसह १२ वी उत्तीर्ण तसेच इतर तांत्रिक अर्हतेसाठी मूळ जाहिरात पहावी.

अर्ज आणि अधिक माहितीसाठी : https://bit.ly/32RJ8DB   

एकूण जागा – १५

पदाचे नाव : फर्स्ट ऑफिसर (पी २)

वयोमर्यादा : कमाल वय ४५ वर्षे (मागसवर्गीयांना सवलत)

पदाचे नाव : सिनियर फर्स्ट ऑफिसर (पी २)

वयोमर्यादा : कमाल वय ५० वर्षे (मागसवर्गीयांना सवलत)

शैक्षणिक पात्रता : फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयांसह १२ वी उत्तीर्ण तसेच इतर तांत्रिक अर्हतेसाठी मूळ जाहिरात पहावी.

अर्ज आणि अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3jEDQBp

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १८ सप्टेंबर २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Alliance Air, Alliance Bhawan, Domestic Terminal-१, IGI Airport, New Delhi ११००३७

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 31 हजार 522;एकुण 2 हजार 263 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 46 हजार 620 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 80 हजार 405 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 25 :- पुणे विभागातील 46 हजार 620 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 80 हजार 405 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 31 हजार 522 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 60 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.98 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 65 हजार 591 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 40 हजार 45 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 927 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 16 हजार 562, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 5 हजार 117 व पुणे कॅन्टोंन्मेंट 174, खडकी विभागातील 32, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 957 , जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 85 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 619 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 154, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 281 व पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 32, ग्रामीण क्षेत्रातील 79, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 42 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 827 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.05 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.47 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 579 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 783, सातारा जिल्ह्यात 125, सोलापूर जिल्ह्यात 235, सांगली जिल्ह्यात 83 तर कोल्हापूर जिल्ह्यात 353 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 973 रुग्ण असून 1 हजार 603 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 270 आहे. कोरोनाबाधित एकूण 100रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 6 हजार 834 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 331 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 93 आहे. कोरोना बाधित एकूण 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 327 रुग्ण असून 462 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 822 आहे. कोरोना बाधित एकूण 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 3 हजार 680 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 179 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 410 आहे. कोरोना बाधित एकूण 91 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 1 हजार 387 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 3 लाख 95 हजार 178 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 6 हजार 209 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 13 हजार 956 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.

( टिप :- दि. 25 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई वाढविणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

0

मुंबई, दि. २५ : कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर व टोसीलीझुमॅब या औषधाचा पुरवठा मर्यादित असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या औषधांचा काळाबाजार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अन्न व औषध प्रशासनामार्फत संपुर्ण राज्यभरात कारवाया वाढविण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉराजेंद्र शिंगणे यांनी विभागाला दिले आहे

अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने आता पर्यंत मुंबई व ठाणे येथे चार प्रकरणात कारवाई केली आहे, असे सांगुन डॉशिंगणे यांनी पुणेनाशिकऔरंगाबाद येथुन येत असलेल्या तक्रारींकडे लक्ष वेधले आहे. औषधांच्या काळाबाजाराला रोखण्यासाठी राज्यभर कारवाया होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या असून पोलिस गुप्तचर यंत्रणा व पोलिस प्रशासना मार्फत प्राधान्याने कारवाया करण्याच्या सूचना देण्यात याव्यातअशी विनंती डॉशिंगणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका पत्राद्वारे केली आहे.

केवळ सुविधाच नव्हे तर वेळीच रुग्णसेवा, योग्य उपचार मिळण्यास प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. २५ : कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोविड काळजी केंद्रांचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विशेषतः मुंबई महानगर क्षेत्र परिसरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. कोरोना संकटात महाराष्ट्र शासन खंबीर आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी तसेच व्हायरस प्रसाराला अटकाव करण्यासाठी एकत्रित दर्जेदार सुविधा निर्माण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर ट्रेसिंग करण्यावर भर देण्यात यावा अशा सुचना त्यांनी दिल्या.

रुग्ण सेवा अधिक महत्त्वाची

केवळ मोठमोठ्या सुविधा उभारून चालणार नाही, तर योग्य पद्धतीने रुग्ण सेवा, वैद्यकीय उपचार, पुरेशी ऑक्सिजन व्यवस्था तात्काळ उपलब्ध होणे गरजेचे आहे यावर भर  देण्यास सांगितले.

ढिलाई नको

संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले. आज आपण या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढवत आहोत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत आहे. राज्यात 131 प्रयोग शाळा उभारण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधा आणि साथीचे प्रमाण व्यस्त आहे.  प्रभावी औषधे हातात येईपर्यंत आपल्याला अधिक सजग असणे आवश्यक आहे. गलथानपणा, ढिलाई आपल्याला परवडणारी नाही. आपल्याकडे सुरु असलेल्या उपचारांची गाईडलाईन तपासून घेणे आवश्यक आहे. राज्याच्या टास्कफोर्स कडून संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

या संकटात सर्व यंत्रणा न डगमगता पाय रोवून उभे राहिलात त्यामुळे तुमचे मन:पूर्वक धन्यवाद देतो असे सांगुन ते म्हणाले की,संपूर्ण राज्यात जेथे आवश्यकता असेल तेथे प्रयोगशाळा तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य देण्यात येईल. कोरोना व्हायरसला हरविणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान असले तरी आपण एकजुटीने त्यावर मात करु असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्याबाबत नागरिकांच्या मनातील भय दूर करण्याबरोबरच त्यांना दिलासा देण्याबरोबरच  समुपदेशन उपलब्ध करुन देण्यात यावे असेही त्यांनी सांगितले. डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात कच्छी कडवा पाटीदार समाज, मुंबई यांनी पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस उपलब्ध करुन दिली असून सदर इमारत ही तळ + 4 मजल्याची आहे. पहिल्या मजल्यावरील सुमारे 5000 स्क्वे.फीट च्या प्रशस्त जागेत 70 बेड त्यापैकी 60 ऑक्सिजन सुविधा असलेले व 10 सेमी आयसीयू बेड असणार असून दुसऱ्या मजल्यावर काम करणारे डॉक्टरर्स, त्यांचा रहिवास, रेस्ट रुम, त्यांचे कार्यालय असणार आहे. तिसऱ्या मजल्यावरती 5000 स्के.फीटच्या प्रशस्त जागेत ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड व 4 थ्या मजल्यावर देखील ऑक्सिजन सुविधा असलेले 70 बेड रुग्णांकरिता उपलब्ध असणार आहेत. बेसमेंटमध्ये कॅन्टींग सुविधा उपलब्ध असून सीसीटीव्ही कॅमेरे व रुग्णांकरिता उदवाहन देखील पाटीदार समाजाने पुरविले आहे. सदर रुग्णालयात रुग्णांसाठी पंखे, वॉयफाय सिस्टिम तसेच रुग्णांचे तणावरहीत वातावरणात राहण्यासाठी मंद सुरावटीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयात 1 रुपी क्लिनिक डॉ. राहुल घुले यांचेमार्फत चालविण्यात येणार असून एकुण 2 एमडी फिजीशियन, 25 निवासी डॉक्टर, 50 परिचारिका व 30 हाऊसकिपींगचा स्टाफ रुग्णांचा सेवेसाठी तैनात राहणार आहे.

कोविड आरोग्य केंद्र कल्याण

कल्याण पश्चिम येथील आसरा फाऊंडेशनच्या प्रशस्त जागेत कोविड आरोग्य केंद्र उभे राहत असून त्यामध्ये 100 ऑक्सिजनचे बेड, 84 नार्मल बेड, 10 सेमी आयसीयू बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. या सेंटरमध्ये 12 डॉक्टरर्स, 20 नर्सेस, 20 वॉर्ड बॉय आणि फिज‍िशियन देखील उपलब्ध असतील.

कल्याण येथे सुसज्ज प्रयोगशाळा

कल्याण पश्चिम गौरीपाडा येथे महापालिकेचे स्वत:चे सुसज्ज स्वॅब चाचणी केंद्र पी.पी.पी. तत्वावर क्रष्णा डायग्नोस्टिक यांच्या माध्यमातून तयार होत असून तेथे दररोज 3000 चाचण्या होवू शकतात.

यावेळी पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोरोनाची आव्हान पेलण्यासाठी ठाणे जिल्हा सज्ज असून येणाऱ्या काळात या भागातील संसर्ग परिणामकारकरित्या रोखू तसेच उत्तम सुविधांची उभारणी करू असा विश्वास व्यक्त केला. कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविले आहे.  महापालिका व लोकप्रतिनिधी एकत्र मिळुन काम करतायेत त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतो आहे असे सांगितले. तसेच महापालिकांना आर्थिक मर्यादा आहेत परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक त्या सुविधा   उपलब्ध होत आहेत. ट्रॅकींग व ट्रेसिंगवर विशेष भर देण्यात येत असून येथील नागरिकांना सर्व सुविधा कल्याणमध्येच उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका काय उपाययोजना करीत आहे त्याविषयी सांगितले.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, सर्वश्री आमदार राजू पाटील, विश्वनाथ भोईर, रवींद्र चव्हाण महापौर विनिता राणे, सभापती स्थायी समिती विकास म्हात्रे, विरोधी पक्ष नेते राहुल दामले, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांसह नगरसेवक, मनपा अधिकारी उपस्थित होते.

बिबवेवाडीत कोरोना उपचार केंद्र सुरू

0

आमदार माधुरी मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे, २५ जुलै – बिबवेवाडीतील राज्य कामगार विमा योजनेच्या (र्इएसआयसी) रुग्णालयात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोरोना उपचार केंद्र आजपासून सुरू करण्यात आले. या केंद्रासाठी आमदार माधुरी मिसाळ यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, बांधकाम समितीचे सभापती प्रमोद काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, र्इएसआयसीचे आरोग्य अधिकारी सुनील झोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खासदार बापट म्हणाले, ‘कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे परिस्थिती गंभीर झालेली आहे. अशावेळी रुग्णांवर मानवतेच्या दृष्टिकोनातून उपचार करणे आवश्यक आहे. या रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी केंद्र शासनाची सर्वतोपरी मदत मिळवून देऊ. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबरोबर पुरेशा प्रमाणात डॉक्टर, परिचारीका आणि कर्मचारी उपलब्ध करून देऊ.’

आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘या रुग्णालयात सुरुवातीला बाह्य रुग्ण विभाग सुरू होता. आता उपचारांसाठी ३०० खाटा उपलब्ध होऊ शकतात. पहिल्या टप्प्यात ११० खाटांच्या क्षमतेचे कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात येत आहे. अकरा खाटांवर व्हेंटिलेटरची सुविधा देण्यात येणार आहे. साठ खाटांवर ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे. सध्या एकाएका खाटेसाठी रुग्णांचा संघर्ष सुरू असताना या केंद्राची उपयुक्तता अधिक आहे. नजिकच्या काळात रुग्णालय पूर्ण क्षमतेने कायान्वित होर्इल यासाठी पाठपुरावा करणार आहे.’