Home Blog Page 25

उद्याची मतमोजणी रद्द, आता 21 डिसेंबरला निकाल:मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्वाळा; तोपर्यंत आचारसंहिता कायम

मुंबई- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ताण-तणाव वाढत असताना, मतमोजणीच्या तारखेबाबत आता मोठा संभ्रम निर्माण दूर झाला आहे. सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल, असे सांगितले होते. मात्र काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने आयोगाने आपल्या कार्यक्रमात बदल करत, ज्या ठिकाणी वाद सुरू आहे, तेथे 20 डिसेंबर मतदान व 21 डिसेंबरला निकाल असा नवीन आदेश देऊन परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली होती. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यानुसार उद्याची मतमोजणी रद्द करण्यात आली आहे. आता 21 डिसेंबरलाच सर्व ठिकाणचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तोपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे.

खंडपीठाने सोमवारच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या वकिलांना थेट विचारणा केली होती, सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल 21 डिसेंबरलाच देता येतील का? न्यायालयाने विचारलेल्या या प्रश्नामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले होते. आयोगाच्या वकिलांनी मात्र यावर तात्काळ उत्तर न देता, आज दुपारी यासंदर्भातील निवेदन सादर करू असे सांगितले होते. त्यानुसार आता न्यायालयाने सर्वच ठिकाणचा निकाल आता 21 डिसेंबरलाच लागणार आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण केल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयाकडे सादर केले होते. मतदान असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये यंत्रणा केंद्रावर पोहोचली असून, कर्मचाऱ्यांनी आपली तयारी दाखवली आहे. त्यामुळे मतदान थांबवणे योग्य नाही, असे मत न्यायालयाने स्पष्ट केले होते. तथापि निकालाची तारीख पुढे ढकलल्यास जनतेच्या मनातील संभ्रम आणि राजकीय तणाव यावर अधिक परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षणही न्यायाधीशांनी नोंदवले होते. त्यानुसारच न्यायालयाने आजचा निर्णय दिला आहे.

दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 8 ते 10 वर्षांनंतर होत असल्याने मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आज राज्यातील 264 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी मतदानाची वेळ असून, यासाठी 12 हजार 316 मतदान केंद्रांवर 62 हजार 108 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी पोलिस दलाचा मजबूत ताफा तैनात आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये मतदारांचा उत्साह पाहायला मिळत असून, कोणाचा झेंडा सर्वाधिक उंच जातो हे पाहण्यासाठी साऱ्या राज्याचे लक्ष मतपेटीकडे लागले आहे.

मतमोजणीचा दिवसच निश्चित नसल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये बेचैनी

मतमोजणीचा दिवसच निश्चित नसल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये मात्र बेचैनीचे वातावरण होते. मतदारांनी दाखवलेला विश्वास नेमका कधी उघड होणार? निवडणूक आयोग पुन्हा कार्यक्रमात बदल करणार का? न्यायालयाचा आदेश कोणत्या दिशेने वळणार? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत राजकीय तणाव वाढत गेला. मात्र, आता अपेक्षेप्रमाणेच सर्वच निकाल लांबणीवर पडला आहे.

एकनाथ शिंदेंच्या काळ्या बॅगा पुन्हा चर्चेत, कोकणातील VIDEO समोर

:संजय राऊत म्हणाले-लोकशाहीची ऐशी की तैशी? वैभव नाईक यांचे देखील गंभीर आरोप
मालवण- नगरपालिका निवडणुकीत नुकतेच भाजपवर पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्ष वाढला. परंतु आता स्वतः शिंदे गटावरच मतदारांमध्ये पैसे वाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक तसेच खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते नीलेश राणे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत मोठा दावा केला असून, त्यामुळे मालवणच्या निवडणूक राजकारणात नवे वादळ उठले आहे.

वैभव नाईक यांच्या मते, काही दिवसांपूर्वी मालवण दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत पैशांच्या बॅगा घेऊन आले होते. हा पैसा कार्यकर्त्यांमार्फत मतदारांपर्यंत पोहोचवला गेला, असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी व्हिडीओ दाखवत असा दावा केला की शिंदे यांच्या अंगरक्षकांनी कॅमेरापासून लपवत मोठ्या बॅगा उतरवल्या. हे दृश्य म्हणजे राजकीय भ्रष्टाचाराचे प्रत्यक्ष उदाहरण असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. त्यांनी हे पैसेच नीलेश राणे यांनी निवडणूकपूर्व रात्री मतदारांमध्ये वाटले, असा दावा केला आहे. मतांसाठी पैसा वापरण्याचे हे तंत्र लोकशाहीचा अपमानच आहे, अशी टीका त्यांनी केली.

भाजपवर पैसे वाटपाचे आरोप करत नित्यनेमाने कारवाईची मागणी करणारे नीलेश राणे यांच्यावरच आता बोट दाखवले जात आहे. काही दिवसांपूर्वी राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी धाड टाकून 25 लाखांची रोकड जप्त केल्याचा दावा केला होता. तसेच भाजपच्या उमेदवाराच्या जातप्रमाणपत्रावरही त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट आरोपही केले होते. परंतु आता वैभव नाईक म्हणतात की शिंदे-सेनेचेही हात स्वच्छ नाहीत. सत्तेचा गैरवापर करून पैसा कमवायचा आणि त्याच पैशाने सत्ता टिकवायची, हे त्यांचे धोरण झालं आहे.

नाईक यांनी पुढे सांगितले की, राज्यातील सरकारी खाती, प्रकल्प, ठेके यामध्ये भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशाचा गैरवापर होतो. त्यातून निर्माण झालेला पैसा, निवडणुकांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येतो. जनतेला गोंधळात टाकून सत्ता मिळवण्याचा खेळ सर्वांसमोर उघड झाला आहे. त्यांनी मालवणकरांना आवाहन केले की, पैशाची लाट पाहून फसू नका. आपल्या भविष्याचा विचार करून मतदान करा. भ्रष्टाचाराला समर्थन दिल्यास तोच पैसेवाला गट आपला आवाज दाबेल.

भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर दिल्याचा संजय राऊत यांचा आरोपशिंदे मालवणात आले येताना बॅगेतून काय आणले? असा प्रश्न संजय राऊत यांनीही उपस्थित केला आहे. मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर दिल्याचा आरोप राऊत यांनी केला. या आधी नाशिक मध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या. लोकशाहीची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र. अशा खोचक शब्दांत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये तीन सख्ख्या भावंडांना चिरडलं, मायबापाचं विश्व उद्ध्वस्त, मद्यधुंद बस चालकाला पादचाऱ्यांचा चोप

0

पुणे-१ डिसेंबर २०२५:हिंजवडी आयटी पार्क परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन चिमुकल्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला. आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी कंपनीची बस अनियंत्रित होऊन थेट फूटपाथवर घुसल्याने हा अपघात घडला. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये अर्चना देवा प्रसाद (वय ८) आणि सूरज देवा प्रसाद (वय ६) यांचा समावेश आहे. गंभीर जखमींमध्ये प्रिया देवा प्रसाद (वय १८) आणि पादचारी अविनाश चव्हाण यांचा समावेश आहे. बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. मृतदेह औंध रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.

अपघातात प्रिया देवा प्रसाद (वय १८) आणि अविनाश हरिदास चव्हाण (वय २६) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. विमल राजू ओझरकर (वय ४०) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

बस चालक नागनाथ राजाभाऊ गुजर (वय ३६, रा. भोसरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो नशेत बस चालवत असल्याचा संशय आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दोन मुलांच्या मृत्यूला दुजोरा दिला असून, पीडितांची पार्श्वभूमी आणि घटनेचे कारण तपासले जात असल्याचे सांगितले. चालकाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.

हिंजवडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कंपन्या बंद झाल्यानंतर सायंकाळच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होते. या अपघातामुळे नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

महाराष्ट्रातील लंपीग्रस्त पशुपालकांना नुकसानभरपाई द्या:सुविधा सक्षम करा, खासदार मेधा कुलकर्णी यांची संसदेत मागणी

पुणे- राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत लक्षवेधीद्वारे लंपी त्वचा रोगामुळे (एलएसडी) बाधित झालेल्या पशुपालकांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. पुण्यासह महाराष्ट्रात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने पशुपालकांना गंभीर आर्थिक फटका बसला आहे. त्यांनी पशुवैद्यकीय सुविधा सक्षम करण्याचीही मागणी केली.

डॉ. कुलकर्णी यांनी संसदेत सांगितले की, राज्यात आतापर्यंत सुमारे ९८ हजार २३० गायी-म्हशी लंपीने संक्रमित झाल्या आहेत, त्यापैकी अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने, या रोगामुळे दुग्ध उत्पादनात घट झाली असून हजारो पशुपालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.

सरकारने लसीकरण मोहीम राबवली असली तरी, ग्रामीण भागात आरोग्य पायाभूत सुविधा, औषध पुरवठा आणि पशुवैद्यकीय सेवांची कमतरता आहे. यामुळे पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

त्यांनी लंपी त्वचारोगामुळे नुकसान झालेल्या पशुपालकांना तत्काळ भरपाई व मदत देण्याची मागणी केली. तसेच, ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय रुग्णालये, औषधसाठा, मोबाईल व्हेटनरी युनिट्स आणि लस पुरवठा साखळी सक्षम करण्यावर भर दिला.

पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरिनरी बायोलॉजिकल प्रॉडक्ट्सला देशी लसींच्या उत्पादनासाठी केंद्राकडून तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य मिळावे, जेणेकरून भविष्यात राज्य स्वयंपूर्ण होईल, अशी सूचनाही त्यांनी केली. यासोबतच, केंद्र व राज्य शासनाने मिळून राष्ट्रीय निगराणी तंत्र आणि आपत्ती प्रतिसाद प्रणाली विकसित करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

हा विषय केवळ पशुसंवर्धनाशी संबंधित नसून, पशुपालकांच्या आर्थिक सुरक्षेशी निगडित असल्याने केंद्र सरकारने यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. कुलकर्णी यांनी केली

गोव्यात खाणकामाचे 12 वर्षांनंतर पुनरुज्जीवन; काले खाण आणि कुडेगाळ प्लांट कार्यरत

0

मुख्यमंत्र्यांकडून ‘जबाबदार आणि पर्यावरणपूरक खाण’चा संदेश; 193 कामगारांना नियुक्तीपत्रांचे वितरण

पणजी, 1 डिसेंबर 2025: गोवा सरकारने काले आयर्न ओर खाण आणि कुडेगाळ प्रोसेसिंग प्लांटमध्ये खाणकामाला अधिकृतरीत्या सुरुवात झाल्याची घोषणा केली. दोनापावला येथील आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात नव्याने नियुक्त झालेल्या कामगारांना नियुक्तीपत्रांचे वितरणही करण्यात आले. राज्यातील खाण उद्योगाला तब्बल बारा वर्षांनंतर नियमनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पुनरुज्जीवित करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

ऑपरेशनल रोलआउट अंतर्गत काले खाणीत 159 कामगार आणि कुडेगाळ प्रकल्पात 34 कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. काले येथून उत्खनन होणारा लोखंडधातू पूर्णपणे कुदेगाळ येथे प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार असून, त्यामुळे राज्यातच एक एकसंध आणि समन्वित प्रणाली उभी राहणार आहे. ही प्रगती राज्यातील व्यापक खाण सुधारणा प्रयत्नांशी सुसंगत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ई-लिलाव आणि डंप लिलाव यांसारख्या उपाययोजनांमुळे अधिक जबाबदारी, पारदर्शकता आणि क्षेत्रातील स्थिरता सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “बारा वर्षांच्या अनिश्चिततेनंतर गोवा खाण क्षेत्रात स्थिर, शाश्वत आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम असे पुनरुज्जीवन पाहत आहे. प्रत्येक खाण आणि प्रक्रिया प्रकल्पात पारदर्शकता, जबाबदारी आणि पर्यावरणीय कर्तव्य पालन करणे ही आमची ठाम बांधिलकी आहे. खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी आणि स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्यासाठी फोमेंतो ग्रुप आणि विशेषतः श्री. अवधूत तिंबलो यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”

या कार्यक्रमाला डॉ. गणेश गवकर, श्री. अवधूत तिंबलो, डॉ. विवेक मोंतेरो, राजीव कुमार, माजी खासदार विनय तेंडुलकर, खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी, फोमेंतो रिसोर्सेसचे प्रतिनिधी तसेच उद्योगक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पुणे विमानतळ देशात ‘टॉप २० मध्ये;आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत १९ वा क्रमांक

0

पुणे : देशात सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या शहरांपैकी एक असलेल्या पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने देशातील प्रमुख विमानतळांच्या यादीत पुणे विमानतळाने १९ वा क्रमांक पटकावून ‘टॉप २०’ मध्ये स्थान मिळवले आहे. ही रँकिंग अलीकडेच ब्युरो ऑफ इमिग्रेशनने जाहीर केली.

लोहगाव येथे असलेले पुणे विमानतळ हे प्रामुख्याने संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असून, विमानांच्या टेकऑफ आणि लँडिंगसाठी वायुदलाची धावपट्टी वापरण्यात येते. त्यामुळे विमानतळाच्या विस्ताराला नैसर्गिक मर्यादा येतात. या सर्व कार्यात्मक अडचणी असतानाही पुणे विमानतळाने १९ वा क्रमांक मिळवला आहे. पुणे विमानतळाहून दुबई आणि बँकॉक अशा केवळ दोन सेवा सुरू असताना देखील पुण्याने १९ वे स्थान मिळवणे हे उल्लेखनीय यश ठरले आहे. ही रँकिंग पुणे विमानतळावर सुरू असलेल्या विविध विकासकामे आणि आंतरराष्ट्रीय संपर्क वाढविण्याची पुण्याची क्षमता आणि संधीही दाखवते.

पुणे शहर हे आधीच माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील मोठे केंद्र म्हणून ओळखले जाते आणि त्याचबरोबर चाकण एमआयडीसीमधून अनेक आंतरराष्ट्रीय वाहन कंपन्या कार्यरत असल्यामुळे पुणे ‘ऑटोमोबाईल हब’ म्हणूनही झपाट्याने विकसित होत आहे. विमानवाहतूक तज्ञांच्या मते, विद्यमान टर्मिनलचे उन्नतीकरण झाल्यामुळे प्रवाशांची सोय मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एरोमॉलसारख्या सुविधा व विस्तारित टर्मिनल इमारत उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना आता सुलभ आणि सोयीसुविधांनी युक्त प्रवासाचा आनंद मिळत आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे. गेल्या ११ वर्षांत केंद्र सरकारने अनेक नवी विमानतळे उभारली, तसेच विद्यमान विमानतळांवरही मोठ्या प्रमाणावर उन्नतीकरणाची कामे करण्यात आली. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. गेल्या काही वर्षांत विमानतळावरील सुविधा आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या अपेक्षांनुसार मोठ्या प्रमाणात उन्नत झाल्या आहेत.”

मुरलीधर मोहोळ,
खासदार
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री

प्रत्येक बूथवर 51 टक्के मते मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरा-भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई-राज्यात उद्या होणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत प्रत्येक बूथवर 51 टक्के मते मिळवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.
श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे. माझी सर्वांना विनंती आहे, तुम्हाला आम्हाला सर्वांना सशक्त भारत जर बनवायचा असेल तर सशक्त भाजपा बनवणं हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथ वर 51 टक्के मते मिळवण्यासाठीची लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यामुळे उद्या सकाळपासून प्रत्येकाने घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे सर्व उमेदवार आणि नगरसेवकपदासाठीचे सर्व उमेदवार कसे जिंकून येतील यासाठी पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने आपल्याला मैदानात उतरायचं आहे.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला विकसित भारत बनवायचा आहे आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्र तुम्हाला आम्हाला सर्वांना बनवायचा आहे आणि यासाठीच आपल्याला पार्लमेंट टू पंचायत हे सूत्र लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी भाजपाला मतदान करणं हे अत्यंत गरजेचे आहे हे डोक्यात ठेवून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने निवडणुकीच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा, एवढीच विनंती मी या निमित्ताने करत आहे, असेही श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.

घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा २०२५ या स्पर्धेत शितल सुनिल मोहोळ आणि पूर्वा नितीन शिर्के यांनी मिळवला प्रथम क्रमांक.

पुणे- . लेडी रमाबाई हॉल. भारतीय जनता पार्टी पुणे शहर प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ-पर्वती आणि द हिंदू फाउंडेशन आयोजित “घरचा गणपती” आणि “गौरी सजावट स्पर्धा २०२५” या स्पर्धा गणेशोत्सवा मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ लेडी रमाबाई हॉल. स. प महाविद्यालय टिळक रोड येथे आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उदघाट्न आमदार यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकेत धनंजय जाधव यांनी द हिंदू फाऊंडेशन च्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या महिलांसाठीचे विविध प्रशिक्षण वर्ग, युवकां साठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा, तसेच इतर उपक्रमाची माहिती सांगितली.

आमदार हेमंत रासने यांनी आपल्या प्रमुख भाषणात धनंजय जाधव यांच्या कामाचे कौतुक केले. गेली नऊ वर्ष नगरसेवक नसतानाही नगरसेवकां प्रमाणे कामं करत असल्याचा उल्लेख केला. दरवर्षी नित्यनेमाने आयोजित करत असलेल्या उपक्रमांचा उल्लेख करत कार्याची प्रशंसा केली.
दरवर्षी वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये प्रभाग क्रमांक २७ मध्ये नागरिकांसाठी घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेमध्ये ४५० पेक्षा जास्त महिला, युवती, युवक आणि नागरिकांनी सहभाग घेतला. यात महिलांचा सहभाग लक्षनीय होता. सामाजिक, पर्यावरण, धार्मिक, ऐतिहासिक अशा विविध विषयावर स्पर्धेकांनी आपल्या घरात सुंदर आकर्षक आणि पर्यावरणपूरक देखावे केले होते.
या वर्षीच्या सजावट स्पर्धेत घरचा गणपती सजावट आणि गौरी सजावट अशा दोन विभागातील स्पर्धेत अनुक्रमे १ ते १५ आणि १ ते १५ असे ३० पारितोषिक विजेते काढण्यात आले.
अनुक्रमे पहिल्या क्रमांकास रुपये ७००१/- ते पंधराव्या क्रमांकास १५०१/- रोख रक्कम, ट्रॉफी, साडी, प्रमाणपत्र अशी पारितोषिके देउन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्यांना कसबा मतदार संघाचे आमदार हेमंतभाऊ रासने यांचे हस्ते लेडी रमाबाई हॉल. स. प महाविद्यालय आवार टिळक रोड येथे पारितोषिक वितरण करण्यात आले.
घरचा गणपती स्पर्धेत पूर्वा नितीन शिर्के. नवी पेठ यांनी तर गौरी सजावट स्पर्धेत शितल सुनिल मोहोळ राहणार यशवंत नगर. नवी पेठ यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
स्पर्धेचा संपूर्ण निकाल खालील प्रमाणे.

घरचा गणपती १ ते १५ पारितोषिक विजेते.

पहिला क्रमांक पुर्वा नितीन शिर्के. रोख रक्कम रुपये ७००१/- रुपये. ट्रॉफी. साडी प्रमाणपत्र. दूसरा क्रमांक सुवर्णा संजय शिळीमकर. रोख रक्कम रुपये ६००१/-रुपये. ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. तिसरा क्रमांक मनीष मोहन बालकल. रोख रक्कम रुपये ५००१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. चौथा क्रमांक संजोग ज्ञानेश्वर भांडे. रोख रक्कम रुपये ४००१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र.
पाचवा क्रमांक. शुभम बाळासाहेब वैराट. रोख रक्कम रुपये ३००१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. सहावा क्रमांक. मनिषा अनिल बळसाणे. रोख रक्कम रुपये २७०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र.
सातवा क्रमांक. शिल्पा सुहास घोडके. रोख रक्कम रुपये २५०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. आठवा क्रमांक. प्रतिमा प्रकाश हर्डीकर. रोख रक्कम रुपये २४०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. नववा क्रमांक. अजय सुनिल भंडगे. रोख रक्कम रुपये २२०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. दहावा क्रमांक. कुलदीप सुनील मोरे. रोख रक्कम रुपये २१०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. अकरावा क्रमांक. संगिता धनराज मुरगुंड. रोख रक्कम रुपये २००१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. बारावा क्रमांक. अनिता प्रदीप तांदळेकर. रोख रक्कम रुपये १८०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. तेरावा क्रमांक. मोनाली अनिल डोके. रोख रक्कम रुपये १७०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. चौदावा क्रमांक. स्नेहल मंदार ढुमके. रोख रक्कम रुपये १६०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. पंधरावा क्रमांक. सुनिता संजय निरफराके. रोख रक्कम रुपये १५०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र.

‘गौरी सजावट १ ते १५ पारितोषिक विजेते.
पहिला क्रमांक. शितल सुनील मोहोळ. रोख रक्कम रुपये ७००१/- रुपये. ट्रॉफी. साडी प्रमाणपत्र. दूसरा क्रमांक. अर्चना निखिल वरे. रोख रक्कम रुपये ६००१/- रुपये. ट्रॉफी. साडी प्रमाणपत्र. तिसरा क्रमांक. अंजली प्रणव हरपुडे. रोख रक्कम रुपये ५००१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. चौथा क्रमांक. गौरव मदन दातीर. रोख रक्कम रुपये ४००१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. चौथा क्रमांक. अलका पंढरीनाथ चोरगे. रोख रक्कम रुपये ४००१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. पाचवा क्रमांक. मनिषा संदीप माताळे. रोख रक्कम रुपये ३००१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. पाचवा क्रमांक. वंदना दिलीप काळभोर. रोख रक्कम रुपये ३००१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. सहावा क्रमांक. वंदना विलास धुमाळ. रोख रक्कम रुपये २७०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. सातवा क्रमांक. पंकज देशपांडे. रोख रक्कम रुपये २५०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. आठवा क्रमांक. भारती जितेंद्र मन्नत.रोख रक्कम रुपये २५०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. नववा क्रमांक. सोनल राजेश खाडे. रोख रक्कम रुपये २२०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. दहावा क्रमांक. कांचन संदीप काळभोर.रोख रक्कम रुपये २१०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. अकरावा क्रमांक. पूजा भूषण पुराणिक. रोख रक्कम रुपये २००१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. बारावा क्रमांक. शारदा गणेश उबाळे. रोख रक्कम रुपये १८०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. तेरावा क्रमांक. प्रमिला सुरेश कुंभार. रोख रक्कम रुपये १७०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. चौदावा क्रमांक. संगिता सचिन ढोबळे. रोख रक्कम रुपये १६०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र. पंधरावा क्रमांक. रेखा सुरेश थोरात. रोख रक्कम रुपये १५०१/- ट्रॉफी. साडी. प्रमाणपत्र देउन पारितोषिक विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेतील इतर पारितोषके वितरण मा. नगरसेवक राजेश येनपुरे, कसबा मतदार संघ भाजपाचे समन्वयक राजेंद्र काकडे, स्पर्धेचे संयोजक मा. नगरसेवक धनंजय विष्णु जाधव. मा. नगरसेविका मनीषा घाटे. मा. नगरसेविका स्मिता वस्ते. कसबा दक्षिण मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे. कसबा दक्षिण मंडल सरचिटणीस संजय गावडे. भाजपा पर्वती. सिंहगड रोड मंडल अध्यक्ष राजू कदम. भाजपा पर्वती. सिंहगड रोड मंडल सरचिटणीस अक्षय वायाळ. कसबा दक्षिण मंडल भाजयुमो अध्यक्ष योगेश खाटपे.
कसबा दक्षिण मंडल सरचिटणीस निर्मल हरिहर. द हिंदू फाऊंडेशन च्या कार्याध्यक्षा जयश्री धनंजय जाधव. मुक्ता माने. कसबा दक्षिण मंडल ओबीसी मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घनवट.कसबा दक्षिण मंडल अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष निलेश फासगे. प्रभाग २७ भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सुनीता जंगम यांचे हस्ते झाला.
स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ – पर्वती मधील ४७० महिला, युवक, युवती आणि नागरिकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
स्पर्धेचे मुख्य आकर्षण प्रत्येक सहभागी स्पर्धकाला साडी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेत सगळी मिळून एकूण पाच लाच रुपयांची विविध प्रकारे पारितोषिके देण्यात आली.

कार्यक्रमाचे संयोजक मा. नगरसेवक आणि द हिंदू फाऊंडेशन चे सं. अध्यक्ष धनंजय विष्णू जाधव यांनी केले.

सूत्रसंचालन अमोल दिक्षित तर आभार प्रदर्शन रवींद्र कांबळे यांनी केले.

नेत्यांची प्रलोभणे देणारी विधाने .. 20 नेत्यांची यादी तयार, ज्यांची आक्षेपार्ह विधाने

0

मुंबई-

आयोगाच्या रडारवर असलेल्या नेत्यांनी भरसभेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी विविध विधाने केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “तुमच्या हातात मत आहे, तर माझ्या हातात निधी आहे. राष्ट्रवादीला मतदान न केल्यास निधीला कात्री लावणार,” अशा आशयाचे विधान केले होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अप्रत्यक्षपणे ‘तिजोरीच्या चाव्या’ संदर्भातील वक्तव्य केले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदानाच्या आदल्या रात्री ‘लक्ष्मी दर्शन’ होणार असल्याचे विधान केले होते. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी “खा कुणाचंही मटण, पण दाबा कमळाचं बटण,” असे विधान केले होते.
मंगळवारी (उद्या) राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान होत असून, बुधवारी मतमोजणी पार पडणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांनी ताकद पणाला लावली . मात्र, शेवटच्या टप्प्यात ही राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाने , आचारसंहितेचा भंग होईल अशी वक्तव्ये करणाऱ्या 20 नेत्यांची यादी तयार करण्यात आली आहे.आयोगाने ज्या ठिकाणी ही वक्तव्ये झाली, त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई ताम्हणकर, भाऊ कदम व सिद्धार्थ जाधव यांच्यासह कुमार शानू यांना २५वा “नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार” प्रदान

“नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार माझ्या हस्ते देणं हा माझाही सन्मान आहे…” अशा भावना केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केल्या. ज्या काळात कोणतेही इफेक्ट नव्हते त्या काळात बालगंधर्वांनी सगळ्यांवर मोहिनी घातली होती… ही बालगंधर्व नावाची मोहिनी पुढची अनेक दशके कायम राहील असा विश्वास केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत 25 व्या बालगंधर्व पुरस्कार कार्यक्रमात बोलत होते.
साई दिशा प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित २५ व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कारांचं वितरण नुकतंच मुंबईत करण्यात आलं त्यावेळी केंद्रीय सास्कृतिककार्य मंत्री शेखावत बोलत होते. २०२५ ला “नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार” सोहळ्याला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. यंदा हा पुरस्कार सोहळा खूपच खास होता.
अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. मुंबईतल्या माटुंगा इथल्या यशवंत नाट्यगृहात “नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार” सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला..
सिने सृष्टीतील योगदानासाठी मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव यांचा नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराने केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते..


गायन विभागात या पुरस्काराचे मानकरी ठरले कुमार सानू, पियुष पनवर.. कुमार सानू यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर केलेल्या शानदार सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली..
सेवा रत्न पुरस्कारमध्ये सुहास दिवसे (जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे), एम.आय.डी.सी. चे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि महापारेषणच्या कार्यकारी संचालक सुचिता भिकाने यांनाही त्यांच्या प्रशासकीये सेवेतल्या योगदानासाठी सेवा रत्न पुरस्कारने गौरवण्यात आले. तर धर्मप्रचार आणि अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी कालीपुत्र श्री कालीचरण महाराज यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. “नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार” दत्तात्रय माने यांच्या नेतृत्वाखाली साईदिशा प्रतिष्ठान गेल्या २४ वर्षांपासून काम करत आहे.. नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्या नावे “नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार” विविध क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो.. यावर्षी पहिल्यांदाच हा पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता.
ज्या काळात स्त्री नटी म्हणून नाटकात अभिनय करू शकत नव्हती अशावेळी बालगंधर्वांनी रंगमंचावर लक्षणीय स्त्री उभी केली. ए.आय. कितीही पुढारलं तर माणसाची जागा घेऊ शकणार नाही असं अभिनेते मकरंद देशपांडे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितलं.
आपल्या घरच्यांची केलेला सन्मान खूप जास्त जवळचा असल्याचं म्हणत अभिनेत्री सई ताम्हनकर यांनी आयोजकांचे आभार मानले. तर भाऊ कदम यांनीही बालगंधर्वांच्या नावाचा पुरस्कार दिल्याबद्दल आभार मानतानाच साईदिशा प्रतिष्ठान आणि दत्तात्रय माने यांचाही विशेष उल्लेख केला.

नगरपालिका निवडणुका पूर्वीच्याच कार्यक्रमाप्रमाणे घ्याभाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई – राज्यातील काही नगराध्यक्षपदाच्या व नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका अचानक स्थगित करण्याचा निवडणुक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे. या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय बदलावा व पूर्वीच्या कार्यक्रमाप्रमाणे या निवडणुका घ्याव्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्य निवडणुक आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

श्री. चव्हाण यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असून त्यासाठी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उद्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार होते मात्र यापैकी काही निवडणुका तांत्रिक मुद्याच्या आधारे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील 24 नगराध्यक्ष व 204 नगरसेवकांची निवडणूक लांबणीवर पडली आहे. हा निर्णय सर्व उमेदवारांवर अन्याय करणारा आहे.

नगरपालिका निवडणूक नियम 1966, राज्य निवडणुक आयोगाचे 4 नोव्हेंबरचे सहपत्र आणि 29 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश यात समन्वयाचा अभाव असल्याने ज्या ठिकाणी अपिलाचा निर्णय 26 नोव्हेंबर नंतर लागला असेल किंवा उमेदवार स्वत: शपथ पत्र देत असल्यास या निवडणुका स्थगित न करता त्या पूर्वीच्याच कार्यक्रमाप्रमाणे घेण्यात याव्यात अशी मागणी श्री चव्हाण यांनी राज्य निवडणुक आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.

नागरिकांना अधिसूचित सेवा विहीत कालावधीत उपलब्ध करुन द्याव्यात-राज्य सेवा हक्क आयोगाच्या पुणे विभाग आयुक्त चित्रा कुलकर्णी

पुणे, दि.1: महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन नागरिकांना विविध विभागाच्या अधिसूचित सेवा विहीत कालावधीत प्रशासनाने उपलब्ध करुन द्यावेत, या कायद्याबाबत अधिकाधिक नागरिकांना माहिती होण्यासह त्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्याच्यादृष्टीने व्यापक स्वरुपात जनजागृती करावी, पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरिता प्रशासनाला सोबत घेवून महिला बचत गटाने मेळावे आयोजित करावेत, असे प्रतिपादन राज्य सेवा हक्क आयोगाच्या पुणे विभाग आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी केले.

राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित महिला बचत गट मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या उपसचिव अनुराधा खानविलकर, पुणे महानगरपालिकेचे प्रभाग क्र. 3 चे समाजसेवक संदीप कांबळे, आपले सरकार केंद्राचे जिल्हा समन्वयक संदीप खोत तसेच शहरातील महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, राज्यात लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ हा कायदा दिनांक २८ एप्रिल, २०१५ पासून अंमलात आलेला आहे. शासनाच्या 38 विभागांकडून 1 हजार 212 अधिसूचित लोकोपयोगी सेवा केल्या आहेत. या कायद्यामुळे नागरिकांना विहीत मुदतीत प्राप्त करुन घेण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झालेला आहे. या कायद्याखाली अधिसूचित करण्यात आलेल्या ऑनलाइन सेवांची अद्ययावत माहिती राज्य शासनाच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्जदारास सेवा विहीत वेळेत मिळाल्यास आयुक्त, राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, ३ रा मजला, छत्रपती शिवाजीनगर, घोले रोड, क्षेत्रीय कार्यालय, महानगरपालिका शिवाजीनगर, पुणे येथे तीसरे अपील करता येईल. नागरिकांना मिळणाऱ्या सेवांबाबत अधिक माहितीकरिता राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती कुलकर्णी यांनी केले.

श्रीमती खानविलकर यांनी अर्जदांराना सेवांचा लाभ घेतांना अडअडचणी आल्यास राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, आयोगाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही श्रीमती खानविलकर म्हणाल्या.

श्री. कांबळे म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे, याकरिता नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. कांबळे म्हणाल्या.

यावेळी बचत गटाच्या सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले. यामध्ये त्यांना काम करतांना येणांऱ्या शंकाचे निरसन करण्यात आले.

नवले ब्रिज दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावर तात्काळ पाच उपाययोजना कराव्यात – उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

पुणे, दि. 1 डिसेंबर- मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेतली. सदर महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेसाठी, नवा रिंगरोड प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय यंत्रणेनं तत्काळ राबवावयाच्या पाच महत्त्वपूर्ण उपाययोजना घोषीत कराव्यात, अशा ठोस सूचना त्यांनी बैठकीत केल्या.

या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे विभागीय उपायुक्त तुषार ठोंबरे, पुणे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील,विभागीय उपायुक्त तुषार ठोंबरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांचे वरिष्ठ अभियंते, वाहतूक पोलीस, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत नवले ब्रिज परिसरातील अपघातांच्या पुनरावृत्तीची कारणमीमांसा, वाहतूक कोंडी, ट्रक व भारी वाहनांची अनियंत्रित गती, घाट आणि उतारातील वाहन नियंत्रण यावर सविस्तर चर्चा झाली. अनेक अपघातांमध्ये वाहनांच्या वेगावरील अपुऱ्या नियंत्रणामुळे मोठी जीवितहानी झाल्याचे लक्षात घेऊन उपसभापतींनी पुढील उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आदेश दिले.

यामध्ये सर्वप्रथम, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत स्पीड कमी करण्यासाठी सुसंगत रबर स्पीड ब्रेकर किंवा रंबल स्ट्रिप्स बसवण्यावर भर देता येईल. रस्ता ओला असताना वाहनांच्या घसरण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे हे स्ट्रिप्स संपूर्ण सुरक्षा मानकांनुसार बसवावेत, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली.

दुसरे म्हणजे, वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानंतर तातडीने परिस्थिती हाताळण्यासाठी Action Oriented Plan (AOP) तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. रात्री वा पावसाळ्यात अपघात झाल्यास कोंडी वाढू न देता वाहन प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस, महामार्ग प्राधिकरण आणि मनपांच्या पथकांमध्ये समन्वय वाढवण्याची गरजही बैठकीत व्यक्त झाली.

तिसरे म्हणजे, अपघातप्रवण झोनमध्ये मोबाइल चेकपोस्ट किंवा स्थिर चौकीची स्थापना करता येईल का याबाबत नियमांनुसार तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः भारी वाहनांचे वेग नियंत्रण, ब्रेक कंडीशन, ओव्हरलोडिंग यावर नजर ठेवण्यासाठी हे केंद्र प्रभावी ठरतील, असे उपसभापतींनी सांगितले.

चौथ्या उपाययोजनेत अपघातप्रवण परिसरात ध्वनीक्षेपक (Public Address System) बसवून चालकांना सतत वेग, उतार, पावसाळी परिस्थिती आणि ट्रॅफिक अद्यतनांची माहिती देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हे सिस्टम महामार्ग पोलिसांच्या नियंत्रणात राहून त्वरित सूचना देऊ शकतील.

पाचव्या उपाययोजनेत जवळच फायर ब्रिगेडची सुविधा उपलब्ध ठेवणे, रेस्क्यू टीम तैनात करणे, तसेच अपघातानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये मदत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्याचे निर्देश दिले. याशिवाय ट्रक मालक असोसिएशनची बैठक घेऊन ड्रायव्हर ट्रेनिंग, उतारावरील गतीनियंत्रण, वाहनांची नियमित तपासणी अशा मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यासही सांगितले.

बैठकीदरम्यान उपसभापतींनी प्रशासनाला सांगितले की, नवले ब्रिज परिसरातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी जबाबदारी निश्चित करून एक आदर्श नमुना तयार करावा.
प्रशासनाने या सर्व उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, येत्या 26 किंवा 27 डिसेंबर रोजी आपण या संदर्भात आढावा घेणार असल्याचे त्यापूर्वी याबाबीवरचा कार्य अहवाल ठेवावा असे निर्देश दिले.

सैनिक कल्याण विभाग पुणे येथे न्यायालयीन प्रकरणांसाठी करार पद्धतीनेविधी सल्लागार पॅनलची नेमणूक करण्याबाबत

0


पुणे, दि.1: सैनिक कल्याण विभाग, पुणे तसेच राज्यातील सर्व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांच्या अधिपत्याखालील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा अवलंबित संबंधित विविध न्यायालयीन प्रकरणांचा वेळेत व कार्यक्षम निपटारा करण्याच्या उद्देशाने पद्धतीने कंत्राटी अशासकीय स्वरूपात विधी सल्लागार पॅनल नियुक्त करण्यात येणार आहे.

विधी सल्लागार पदावरून सेवानिवृत्त झालेले अनुभवी कर्मचारी/अधिकारी किंवा विधीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त आणि किमान १० वर्षांचा प्रत्यक्ष वकिलीचा अनुभव असलेले विधीज्ञ अर्ज करण्यास पात्र असतील. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर २०२५ अशी आहे.इच्छुक उमेदवारांनी सविस्तर अर्ज आणि सिलबंद दरपत्रके निर्दिष्ट तारखेपर्यंत मा. संचालक, सैनिक कल्याण विभाग रायगड इमारत, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे – ४११००१ दूरध्वनी : ०२०–२६३०२६०३ येथे सादर करावीत व अधिक माहितीसाठी कर्नल दीपक ठोंगे (निवृत्त), संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे संपर्क साधावा.

महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधानपदी दिसेल:अमेरिकेचा संदर्भ देत पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य, म्हणाले – देशात राजकीय भूकंप होईल

निवडणूक आयोगाचा ‘पोरखेळ’ सुरू आहे-आचारसंहिता उरली आहे का?मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचार सभांमध्ये उघडपणे प्रलोभने दाखवत आहेतनिवडणूक आयोग हे सरकारच्या हातचे बाहुले बनले आहे.

सातारा-“अमेरिकेत सध्या गाजत असलेल्या ‘एपस्टाईन फाईल्स’ची माहिती बाहेर आल्यास भारताच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो. या राजकीय उलथापालथीत कदाचित येत्या महिनाभरात एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झालेला पाहायला मिळेल,” असे सूचक आणि खळबळजनक विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आणि सोशल मीडियावरील एका ट्विटमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी कराड येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चव्हाण म्हणाले की, हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. अमेरिकेत मोठा उद्योगपती. जेफ्री अ‍ॅमस्टिन त्याचे नाव आहे. त्या माणसाबद्दलचा हा विषय आहे. त्याने कायदा मोडला. त्याने खूप बेकायदेशीर कारवाया केल्या. त्यात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गुंतवायचे आणि भानगडी करायला लावायच्या असा तो विषय आहे. सर्व मोठ्या राजकीय नेत्यांची नावे अमेरिकेत आली आहेत. त्यात राष्ट्रपती ट्रम्प यांचे देखील नाव आहे. त्यामुळे कदाचित ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागेल. तिकडे निवडणूक आयोगाचे फार कडक निकष आहेत. ट्रम्प यांनी राजीनामा देणे हा त्यांचा विषय आहे.

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, अमेरिकेची संसद ट्रम्प यांच्या मागे लागली आहे. नावे खुले करण्यास सांगत आहे. पण ट्रम्प करत नाहीत. कारण अनेक लोक अडचणीत येणार आहेत. संसद ट्रम्प यांच्या पाठिमागे सहा महिन्यापासून लागली आहे. 10 हजार कागदपत्रे संसदेने ताब्यात घेतले आहेत. संसद ही कागदपत्रे उघड करू शकते.

दरम्यान, ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक व्हिडिओ केला आहे. त्या व्हिडिओमध्ये देखील ती कागदपत्रे लवकरच मला मिळतील असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये उलतापालथी होण्याची शक्यता आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

या विषयासंदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले आहे. त्यामुळे “नेमका कोणता मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, “ते आता तुम्हीच शोधा,” असे मिश्किल उत्तर देत चव्हाण यांनी सस्पेन्स कायम ठेवला.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील गोंधळावरून चव्हाण यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. “निवडणूक आयोगाने सगळा गोंधळ घालून ठेवला आहे. जर तयारी नव्हती, तर निवडणुका घेण्याची गडबड कशासाठी केली? ऐनवेळी निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, हा सर्व पोरखेळ सुरू आहे. या गोंधळाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे,” अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचार सभांमध्ये उघडपणे प्रलोभने दाखवत आहेत, हे आचारसंहितेत बसते का? या प्रश्नावर बोलताना चव्हाण संतापले. ते म्हणाले, “आचारसंहिता आता उरलीच कुठे आहे? निवडणूक आयोग हे सरकारच्या हातचे बाहुले बनले आहे. त्यामुळे सत्ताधारी मनमानी करत आहेत.”