Home Blog Page 2497

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ८४ आयटीआयमध्ये ८ हजार ३४८ जागांसाठी उद्यापासून प्रवेशप्रक्रिया

0

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. ३१ – अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्याच्या अनुषंगाने यंदा राज्यातील 44 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीतील वर्ग चालविले जाणार आहेत. याबरोबरच 40 खाजगी आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या चालविण्यात येणार आहेत. या माध्यमातून 84 आयटीआयमध्ये एकुण 8 हजार 348 जागांवर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी उपलब्ध होत आहे. उद्या 1 ऑगस्टपासून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर सुरु होणाऱ्या नियमित आयटीआयच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबरोबरच या वर्गांचीही प्रवेशप्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. या समुदायातील इच्छूक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थी नियमित आयटीआयसाठीही अर्ज करु शकतात. तसेच अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय आयटीआयमध्ये असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीतील वर्गामध्ये सर्वसाधारण आणि इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही 30 टक्के जागांवर प्रवेश दिला जाणार आहे, जेणेकरुन सर्व समाजातील विद्यार्थी एकत्र शिक्षण घेऊ शकतील, अशी माहितीही मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता 44 शासकीय व 40 खाजगी आयटीआय मधून प्रवेशासाठी अनुक्रमे 197 व 189 तुकड्या या वर्षी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्याद्वारे एकूण 8 हजार 348 विद्यार्थी या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. शासकीय आयटीआयमध्ये 4 हजार 304 तर खाजगी आयटीआयमध्ये 4 हजार 044 जागा भरल्या जाणार आहेत, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

प्रवेश प्रक्रिया

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून उद्या 1 ऑगस्ट 2020 पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. अल्पसंख्याकांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या वर्गांचीही प्रवेश प्रक्रिया याच पद्धतीतून होईल. तथापी, सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया सुरु होत असून आयटीआय वर्ग कधी सुरु होणार याबाबत लॉकडाऊनसंदर्भातील शासनाच्या नियमांना अनुसरुन नंतर माहिती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.  

उत्तीर्ण, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी

प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुतीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. चालू वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीचा  प्रभावी वापर केला जाणार असून प्रवेश अर्ज व अर्ज नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, प्रमाणपत्रे तपासणी, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे ऑनलाईन करता येणार आहेत. प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

      

आज पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 38 हजार 271

0

पुणे विभागातील 62 हजार 370 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 1 लाख 3 हजार 411 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे :- पुणे विभागातील 62 हजार 370 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 411 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 271 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 21 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.31 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 82 हजार 924 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 52 हजार 450 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 542 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 19 हजार 170 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 822, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 105 , पुणे कॅन्टोंन्मेंट 144, खडकी विभागातील 20, ग्रामीण क्षेत्रातील 2 हजार 281, यांच्याकडील रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 932 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 315, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 350, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 58, पुणे कॅन्टोंन्मेंट 31 , खडकी विभागातील 41 , व ग्रामीण क्षेत्रातील 137, रुग्णांचा समावेश आहे. तसेच 738 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.25 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 754 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 825, सातारा जिल्ह्यात 162 , सोलापूर जिल्ह्यात 204, सांगली जिल्ह्यात 222 तर कोल्हापूर जिल्ह्यात 341 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 824 रुग्ण असून 1 हजार 982 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 713 आहे. कोरोनाबाधित एकूण 129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 8 हजार 443 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 817 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 143 आहे. कोरोना बाधित एकूण 483 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 169 रुग्ण असून 612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 487 आहे. कोरोना बाधित एकूण 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 6 हजार 51 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 509 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 386 आहे. कोरोना बाधित एकूण 156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख 1 हजार 356 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 95 हजार 680 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 3 हजार 411 नमून्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आहे.

( टिप :- दि. 31 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

‘फॉस्टर केअर’ अर्थात प्रतिपालकत्व योजनेची सुरुवात

0

अनाथ लेकरांना कुटुंब मिळवून देणे पुण्याचे काम – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

प्रायोगिक स्वरूपात ५ जिल्ह्यात होणार अंमलबजावणी

ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध

मुंबई, : एक मुलगी, आई अशा भूमिका मीदेखील बजावत आहे. त्यामुळे कुंटुंबाची, त्यांच्या प्रेमाची गरज याची जाणीव मला आहे. त्यामुळे अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देऊ शकणारी प्रतीपालकत्व योजना क्रांतिकारी ठरणार असून अनाथ बालकांना घर मिळवून देण्याच्या कामाइतके मोठे पुण्य नाही, अशी भावना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. 

महिला व बाल विकास विभागांतर्गत पुणे येथील महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्थेच्यावतीने आयोजित तीन दिवसीय प्रतीपालकत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप आणि महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त बालगृहातील अनाथ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सुरक्षित कुंटुंब, घर मिळवून देणाऱ्या प्रतीपालकत्व (फॉस्टर केअर) योजनेची प्रायोगिक स्वरूपात सुरुवात आज ॲड. ठाकूर यांनी ऑनलाईन कार्यक्रमातून केली. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, सहायक आयुक्त मनीषा बिरासीस आदी उपस्थित होते. 

यावेळी मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, अनाथ मुलांना कुटुंब मिळवून देण्यासाठी विभाग करत असलेले अथक प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मुलांना फॉस्टर केअरच्या माध्यमातून घर मिळवून दिले, योजनेची नीट अंमलबजावणी झाली तर उद्याची युवा पिढी मानसिक, शारीरिक तसेच सामाजिकदृष्ट्या सक्षम होईल. भविष्यातील भारत घडविण्याचे कार्य यातून होईल. ही योजना प्रत्यक्षात येताना अनेक अडचणी येऊ शकतात याची मला जाणीव आहे; परंतु, अतिशय काळजीपुर्वक काम करत त्यावर मात करावी लागेल. या लेकरांना आपले समजून काम केल्यास नक्कीच आपण त्यांना न्याय देऊ शकू असा विश्वास व्यक्त करत ॲड. ठाकूर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विभागाला शुभेच्छा दिल्या.

महिला व बाल विकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद म्हणाले, या योजनेबाबत जाणीवजागृती झाली तर अनेक कुंटुंबे पुढे येतील. या योजनेच्या यशस्वीतेसाठी विभाग सजग राहून अमंलबजावणी करेल.

काय आहे प्रतीपालकत्व (फॉस्टर केअर) योजना : 

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ या कायद्याअंतर्गत अनाथ मुलांना महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त बालगृहांमधे ठेवले जाते. कौटुंबिक वातावरणात राहण्याचा बालकांचा हक्क आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करता दत्तक आणि प्रतीपालकत्व प्रायोजकत्व हे संस्थाबाह्य पर्यायही उपलब्ध आहेत. दत्तक प्रक्रियेत कायमस्वरुपी पुर्नवसन होते. परंतु सर्वच बालकांची दत्तक प्रक्रिया होतेच असे नाही. अशावेळी या बालकांचे कायदेशीर पालकत्व न देता त्यांना बाल न्याय कायद्यान्वये प्रतीपालकत्व योजनेत प्रायोजित पालकत्व देता येते. प्रतीपाकलकत्व म्हणजे बालकाला पर्यायी काळजीसाठी प्रायोजकत्व आणि प्रतीपालकत्व मान्यता समितीने निवडलेल्या योग्य कौटुंबिक वातावरणात ठेवणे. 

प्रायोगिक तत्वावर पुणे, सोलापूर, अमरावती, मुंबई उपनगर आणि पालघरमध्ये अंमलबजावणी

कुटुंबात राहिल्याने मुलांचा सर्वांगीण विकास होत असल्याने महिला व बाल विकास विभागाकडून पुणे, सोलापूर, अमरावती, पालघर, मुंबई उपनगर या पाच जिल्ह्यात ही फॉस्टर केअर योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येत आहे. योजनेच्या तयारीच्या अनुषंगाने या पाच जिल्ह्यातील सर्व बाल संरक्षण यंत्रणांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. या योजनेतंर्गत प्रत्येक जिल्ह्यात ४० मुलांची निवड करण्यात येणार असून प्रतीपालकत्व पालकांना (फॉस्टर पॅरेंट्स) मुलांच्या संगोपनासाठी दरमहा दोन हजार रुपये देण्यात येणार आहे. 

संकेतस्थळावर करता येणार नोंदणी प्रायोगिक अर्थात प्रतिपालकत्व स्वीकारून योजनेत भाग घेऊ इच्छिणारे पालक महिला व बालविकास आयुक्तालयाच्या https://wcdcommpune.org या  संकेतस्थळावर अर्ज करू शकतील. 

बकरी ईद च्या दिवशी आझम कॅम्पस मशिदीत ‘ नमाज’ चे ‘फेसबुक लाईव्ह’ पठण

0

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

पुणे:-कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करू नये, या आवाहनाचे पालन करीत पुण्यातील आझम कॅम्पस मशिदीत बकरी ईद नमाजचे ‘फेसबुक लाईव्ह’ द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे . १ ऑगस्ट रोजी   बकरी ईद च्या दिवशी सकाळी ८ वाजता ‘फेसबुक लाईव्ह’ पठण  करण्यात येणार आहे.  मुस्लीम बांधवांना या उपक्रमात घरातूनच सहभागी होता येणार आहे.
येथे दर आठवड्यात   शुक्रवारी दुपारी दीड जुम्मा नमाझचे फेसबुक लाईव्ह द्वारे पठण करण्यात येते.आझम कॅम्पस शैक्षणिक,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली.  आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद  नमाज पठण करणार आहेत तर  आझम कॅम्पस च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत. 
मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शना खाली घरी  नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले असून २९ मे पासून हा उपक्रम दर शुक्रवारी  सुरु आहे. अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.या तंत्रामुळे मशिदीत गर्दी होत नाही,फक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते.दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होतो.

एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये शुक्रवार (जुम्मा) दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते.कोरोना संसर्गचा  धोका लक्षात घेऊन  शुक्रवारी मशिदीत जाता येत  नाही. त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे.आझम कॅम्पस या फेसबुक पेज वर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते.प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्यात येतात. पुढील लिंक द्वारे या नमाज पठणात सहभागी होता येते.  https://www.facebook.com/azamcampus1922
  कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद च्या दिवशी देखील सकाळी ८ वाजता आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद यांनी ईद साठीचे नमाज पठण केले होते.नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे सुरुवातीला नमाज पठण कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले.मग,ईद -उल -फित्र ची नमाज अदा करण्यात आली.त्यानंतर थोडक्यात खुतबा पढण्यात आला आणि दुआ सांगण्यात आली.पेश इमाम यांच्या पाठोपाठ हे लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या बांधवानी घरी  नमाज अदा केली. सुमारे ५ हजार बांधवांनी हे प्रक्षेपण सकाळच्या वेळी पाहिले होते.  

पुणेकरांच्या मदतीच्या हाताने कोरोना विरुद्धच्या लढ्यात शंभर हत्तींचे बळ – महापौर मुरलीधर मोहोळ

0

कोरोना योद्ध्यांच्या सुरक्षेसाठी पी पी ई किट ची मदत कर्तव्यभावनेतून – यशराज शेट्टी

मदतकार्यात युवकांचा सहभाग स्पृहणीय – संदीप खर्डेकर

पुणे- महानगरपालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने कोरोना विरुद्धची लढाई लढत असताना पुणेकरांच्या मदतीच्या हाताने शंभर हत्तींचे बळ येते व सर्वांच्या सहकार्याने ही लढाई जिंकण्याचा विश्वास बळावतो असे प्रतिपादन येथे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.
यशराज शेट्टी मित्र मंडळाच्या वतीने कोरोना योद्धांसाठी १०० पी पी ई किट भेट देण्यात आले त्यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पतित पावन संघटनेचे कार्याध्यक्ष राजाभाऊ पाटील,भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,अविनाश लांजेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
माझ्या शहरातील नागरिकांना कोरोना पासून वाचविण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या योद्ध्यांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यभावनेतून पी पी ई किट ची मदत करून आपला खारीचा वाटा उचलावा या भावनेतूनच मदत कार्य सुरु असल्याचे हॉटेल व्यावसायिक व पुणे बंट्स संघाच्या युवा आघाडीचे अध्यक्ष यशराज शेट्टी म्हणाले.
कोरोनाच्या काळात युवकांनी केलेले कार्य स्पृहणीय असून सतत युवा पिढीवर टीका करणाऱ्यांनी त्यांच्या कार्याची दखल घ्यावी असे आवाहन संदीप खर्डेकर यांनी केले.
राजाभाऊ पाटील यांनी आभार मानले.

“चाटेंच्या विद्यार्थ्यांची दहावीत सुद्धा उतुंग भरारी”

0

कनक महात्मा 100 टक्के तर मानसी देशपांडे ९८.४० टक्के.

पुणे-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२० मध्ये मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चाटें क्लासेसच्या विद्यार्थ्यांसोबतच चाटे स्कूल कात्रज, धनकवडी, गाऊडदरा मधील विद्यार्थ्यांनीही घवघवीत असे यश संपादन करत चाटे समुहाची उज्वल यशाची परपंरा कायम राखली.यामध्ये चाटे समुहाच्या श्रुती नायर ९८.२०, ईशा देशमाने ९७.८०, नेहा सुपे ९७.८०, ईशा खोब्रागडे ९७.६०, मानसी दौंडकर ९७.६० व गायत्री जाधव ९७.४० अशा अनेक विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले.यावेळी प्रा. फुलचंद चाटे यांनी सर्व गुणवतांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चाटे समूहाद्वारे दहावी बोर्ड परीक्षा मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांकरीता झूम मीटिंग द्वारे गुणवंतांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच विद्यार्थ्यांना संबोधून प्रा फुलचंद चाटे सर म्हणाले की या विद्यार्थ्यांना १० वी मध्ये शिकत असतानाच दहावीची तयारी ही पुढील शिक्षणाचा पाया आहे आणि जर दहावी मध्येच चांगले गुण मिळाले तर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवून पुढील शिक्षणाची वाटचाल यशस्वीपणे करता येते म्हणूनच विद्यार्थ्यांना आजची स्पर्धा व उद्याच्या संधी लक्षात घेऊन चाटे समूहातर्फे अकरावी आणि बारावी या दोन वर्षाचे महत्व आम्ही पटवून देत आलो आणि त्याकरिता दहावी बोर्ड परीक्षा किती महत्त्वाची आहे याचेही महत्त्व विद्यार्थ्यांना सांगत आलो. आणि यामुळेच की काय आज या झूम मीटिंगमध्ये जे विद्यार्थी आपले कौतुक ऐकण्यास आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालाच्या अगोदरच आपल्या पुढील प्रवेश परीक्षांची तयारी मे मध्येच सुरू केलेली आहे. आणि म्हणून विद्यार्थी व पालकांनी दहावीच्या निकालामध्ये फारसे अडकून न राहता पुढच्या वाटचालीस सुरुवात करावी असा सल्ला यावेळी चाटे सरांनी विद्यार्थी व पालकांना दिला.
ईशा देशमाने या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करताना आपले पुढील शिक्षण हे आयआयटी मधून घेण्याचे ठरवल्याचे सांगितले व या करिता मी अगोदरच चाटे कॉलेजमध्ये याची तयारी सुरू केल्याची विद्यार्थ्यांना कल्पना दिली व आपल्या यशाचे सर्व श्रेय आपले पालक व चाटे शिक्षण समूहातील सर्व गुरुजन वर्ग यांना जाते असेही यावेळी तिने नमूद केले
चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावी सोबतच बारावी बोर्ड परीक्षेचे मध्येही फार नेत्रदीपक असे यश संपादन केले आहे आणि हे केवळ चाटे शिक्षण समूहाच्या कार्यप्रणाली मुळेच शक्य करता आले आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत मागील ३२ वर्षापासून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अतिशय सक्षम पणे व यशस्वीरित्या चालू आहे यामुळेच आज विद्यार्थी व पालकांचा चाटे शिक्षण समूहावर पूर्ण विश्वास आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बापू काटकर यांनी केले यावेळी मीटिंगमध्ये प्रा विजय बोबडे, प्रा रत्नाकर सोनवणे आदी मान्यवरही उपस्थित होते.

महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व कुटुंबिय करणार ‘प्लाझ्मा’ दान

0

पुणे-कोरोनातून बरे झालेल्या महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोरोना बाधित गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी प्लाझ्मा अर्थात रक्तद्राव देणार आहेत. कोरोना लढ्यात सकारात्मक पाउल टाकणार्‍या धुमाळ यांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून अन्य कोरोना बाधितांनीही गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन धुमाळ यांनी केले आहे.

दिपाली धुमाळ त्यांचे पती प्रदीप आणि मुलगा मनीष धुमाळ यांना कोरोनाची बाधा झाली होती. उपचारानंतर ते बरेही झाले आहेत. नुकतेच विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कोरोना बाधित गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावे असे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही प्लाझ्मा दान करणार असून तसे पत्रही प्रशासनाला दिले आहे, असे दिपाली धुमाळ यांनी सांगितले.

दिपाली धुमाळ म्हणाल्या, की कोरोनावर सध्या कुठलेही औषध नाही. परंतू कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाच्या प्लाझा चा उपयोग गंभीर कोरोना बाधित रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होत असल्याचे केंद्रीय आयोगाने स्पष्ट केल्यानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यात प्लाझ्मा दान करण्यासाठी आवाहन केले जात आहे. प्लाझ्मा दान करणार्‍या व्यक्तीला कोणताही धोका नाही. परंतू एका व्यक्तीच्या प्लाझ्मा पासून दोन जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे कोरोना बाधित व्यक्तिंनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहही धुमाळ यांनी केले आहे.

शहराला व्हेंटीलेटरसह आवश्यक औषधांचा साठा मिळावा : शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

पुणे-शहरात कोरोनाचे संकट वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेला राज्य शासनातर्फे व्हेंटिलेटर, औषधे, इंजेक्शन टेसिलिझुमॅब, रॅमिडिसीविरची मदत मिळावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी पुणे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, शहरप्रमुख संजय मोरे, नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, नाना भानगिरे,अविनाश साळवे, नाना भानगिरे, संगिता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, श्वेता चव्हाण, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे उपस्थित होते.

कोरोनाच्या संकट काळात व्हेंटिलेटर, औषधे तसेच इंजेक्शनाचा पुणे शहरात तुटवडा आहे. त्यामुळे कोविड रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि अत्यवस्थ रुग्णाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी ही मदत मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.

सन 2006 पासून राज्य शासनाच्या प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत नर्स, ऑक्झिनरी नर्स, ज्युनियर नर्स, क्लार्क, शिफाई व इतर असे एकूण 75 ते 80 कर्मचारी कंत्राटी पध्दतीने काम करीत आहेत. त्यांना कायम करण्याबाबत राज्य शासनाकडील प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणीही पुणे शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

राज्यात आज ११,१४७ नवीन रुग्णांचे निदान, १ लाख ४८ हजार १५० रुग्णांवर उपचार सुरू

0

मुंबई, दि.३० : राज्यात कोरोनाचे आज ८८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४८ हजार ६१५ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे. आज ११,१४७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४८  हजार १५०  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज निदान झालेले ११,१४७ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २६६ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२०८ (५३), ठाणे- २६६, ठाणे मनपा-२४२ (६),नवी मुंबई मनपा-३७३ (१०), कल्याण डोंबिवली मनपा-३५७ (६),उल्हासनगर मनपा-७२ (४), भिवंडी निजामपूर मनपा-२७ , मीरा भाईंदर मनपा-१६४ (४),पालघर-१०८, वसई-विरार मनपा-२६६ (५), रायगड-२४५ (६), पनवेल मनपा-१७१ (२), नाशिक-१७० (२), नाशिक मनपा-३१९ (७), मालेगाव मनपा-१४, अहमदनगर-२५४ (४),अहमदनगर मनपा-२१० (३), धुळे-३३, धुळे मनपा-३४ (१), जळगाव-२५६ (७), जळगाव मनपा-११९ (१), नंदूरबार-१५ (१), पुणे- ४३३ (२१), पुणे मनपा-१८८९ (५२), पिंपरी चिंचवड मनपा-९८७ (१०), सोलापूर-२२७ (५), सोलापूर मनपा-९७ (५), सातारा-२०८ (१०), कोल्हापूर-३४८ (१), कोल्हापूर मनपा-४७ (२), सांगली-८६ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१६६ (१), सिंधुदूर्ग-२, रत्नागिरी-२५ (५), औरंगाबाद-२५२, औरंगाबाद मनपा-१६६ (६), जालना-५०, हिंगोली-१०, परभणी-६४, परभणी मनपा-४ (१), लातूर-९२ (२), लातूर मनपा-३९ (२), उस्मानाबाद-९९ (३), बीड-६१, नांदेड-७४ (७), नांदेड मनपा-७७ (४), अकोला-५३, अकोला मनपा-१३, अमरावती-२, अमरावती मनपा-१४८ (१), यवतमाळ-२८, बुलढाणा-२५ (१), वाशिम-९ (१), नागपूर-१४७ , नागपूर मनपा-१९५ (२), वर्धा-१५, भंडारा-२४, गोंदिया-१२, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-५, गडचिरोली-१४, इतर राज्य १४.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ नमुन्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ५४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील          

मुंबई: बाधित रुग्ण- (१,१३,१९९) बरे झालेले रुग्ण- (८६,४४७), मृत्यू- (६३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,१५८)

ठाणे: बाधित रुग्ण- (९१,७८४), बरे झालेले रुग्ण- (५७,३३५), मृत्यू (२५२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,९२३)

पालघर: बाधित रुग्ण- (१५,२७८), बरे झालेले रुग्ण- (९१५५), मृत्यू- (३२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८०१)

रायगड: बाधित रुग्ण- (१६,१६१), बरे झालेले रुग्ण-(१०,६५४), मृत्यू- (३६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१४२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१६९१), बरे झालेले रुग्ण- (८९७), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३३)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३५८), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)

पुणे: बाधित रुग्ण- (८६,२२५), बरे झालेले रुग्ण- (३५,३८२), मृत्यू- (२०२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८,८१५)

सातारा:  बाधित रुग्ण- (३७०४), बरे झालेले रुग्ण- (२०११), मृत्यू- (१३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५५४)

सांगली: बाधित रुग्ण- (२०९२), बरे झालेले रुग्ण- (८८५), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४९)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४५७१), बरे झालेले रुग्ण- (१३९३), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८३)

सोलापूर: बाधित रुग्ण- (८८७३), बरे झालेले रुग्ण- (४२११), मृत्यू- (४९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१६५)

नाशिक: बाधित रुग्ण- (१४,२९५), बरे झालेले रुग्ण- (८४८३), मृत्यू- (४५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३५६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४४१७), बरे झालेले रुग्ण- (२३५१), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२००६)

जळगाव: बाधित रुग्ण- (१०,४३८), बरे झालेले रुग्ण- (७०८८), मृत्यू- (५१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३५)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५८८), बरे झालेले रुग्ण- (३६६), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९१)

धुळे: बाधित रुग्ण- (२८५५), बरे झालेले रुग्ण- (१७३३), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१३,७३२), बरे झालेले रुग्ण- (७८४०), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४१४)

जालना: बाधित रुग्ण- (१९१३), बरे झालेले रुग्ण- (१४२१), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१९)

बीड: बाधित रुग्ण- (७१७), बरे झालेले रुग्ण- (२४६), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (४५२)

लातूर: बाधित रुग्ण- (१९३९), बरे झालेले रुग्ण- (९६४), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८९)

परभणी: बाधित रुग्ण- (५८८), बरे झालेले रुग्ण- (२१९), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४७)

हिंगोली: बाधित रुग्ण- (५४७), बरे झालेले रुग्ण- (४०१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४)

नांदेड: बाधित रुग्ण- (१६१२), बरे झालेले रुग्ण (६७९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (८५८), बरे झालेले रुग्ण- (५१२), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०३)

अमरावती: बाधित रुग्ण- (१९८४), बरे झालेले रुग्ण- (१३६२), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६३)

अकोला: बाधित रुग्ण- (२५३५), बरे झालेले रुग्ण- (१९०९), मृत्यू- (११४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५११)

वाशिम: बाधित रुग्ण- (५६६), बरे झालेले रुग्ण- (३५३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (११८१), बरे झालेले रुग्ण- (६६५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (८५५), बरे झालेले रुग्ण- (४६९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५९)

नागपूर: बाधित रुग्ण- (४४९४), बरे झालेले रुग्ण- (१९२८), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४९५)

वर्धा: बाधित रुग्ण- (१८३), बरे झालेले रुग्ण- (९७), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१)

भंडारा: बाधित रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१९३), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२७१), बरे झालेले रुग्ण- (२२९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (४१२), बरे झालेले रुग्ण- (२४६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण- (२२०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (३७७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२९)

एकूण: बाधित रुग्ण-(४,११,७९८) बरे झालेले रुग्ण-(२,४८,६१५),मृत्यू- (१४,७२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०४),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४८,१५०)

 (टीप: बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हा स्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

‘लवासा ‘तील हॉस्पिटल, हॉटेल्स ताब्यात घेऊन तिथे ‘कोविड सेंटर’ सुरू करा : खा.गिरीश बापट

0

पुणे : लवासामध्ये अद्ययावत असे रुग्णालय तयार आहे. त्याचप्रमाणे तिथे लोकवस्ती देखील कमी आहे. त्यामुळे लवासा हे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. तिथे कोविड रुग्णालय सुरू झाले तर मुळशी तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी थेट पुण्याला यावे लागणार नाही. प्रशासनाने मुळशी तालुक्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लवासामधील रुग्णालय व हॉटेलसह रिकाम्या इमारती ताब्यात घ्याव्यात आणि तिथे कोविड सेंटर सुरू करावे असे स्पष्ट मत पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. तसेच यासंबंधी आपण जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे देखील सांगितले आहे.

मुळशी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय असतानाही या परिसरातील लवासा प्रकल्पातील रुग्णालय, हॉटेल ताब्यात घेण्यात हयगय केली जात आहे. जिल्ह्यातील इतर खासगी रुग्णालयांच्या बाबतीत तातडीने निर्णय घेणारे प्रशासन लवासाकडे का दुर्लक्ष करत आहे, असा प्रश्न मुळशीकरांकडून उपस्थित करण्यात येत आहे..याच धर्तीवर बापटांनी ही मागणी केली आहे.सध्या मनुष्यबळाची मोठी कमतरता असून, कमी कर्मचाऱ्याांमध्ये जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करण्याचे नियोजन आहे. यामुळेच सध्याच्या मोठ्या सुविधा कार्यान्वित झाल्यावर ‘लवासा’तील हॉस्पिटलचा विचार करण्यात येईल,” असे सांगून मावळ-मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी या कडे दुर्लक्ष चालविल्याचा आरोप होतो आहे.

बापट म्हणाले, पुणे जिल्ह्यासह मुळशी तालुक्यात देखील दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या सर्व रुग्णांना कोरोनावरील उपचारासाठी थेट पुण्याला यावे लागते.त्यामुळे इतर ठिकाणचे खासगी,शाळा, रुग्णालये ताब्यात घेण्यासाठी तत्परता दाखवणाऱ्या प्रशासनाने लवासामध्ये असलेले अद्ययावत रुग्णालय व हॉटेल व रिकाम्या इमारती देखील ताब्यात घ्याव्यात. या ठिकाणी असलेल्या अद्ययावत रुग्णालयामुळे वैद्यकीय यंत्रणेवर अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. तसेच डॉक्टर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्यातर तात्काळ कोविड सेंटर उभे राहून तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक व गोर गरीब रुग्णांना त्याचा फायदा होईल. यासंबंधी प्रशासनाला पत्र लिहून त्वरित पावले उचलत कार्यवाही करण्याची मागणी केली असल्याचे बापट यांनी सांगितले.

मुळशी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय असतानाही या परिसरातील लवासा प्रकल्पातील रुग्णालय, हॉटेल ताब्यात घेण्यात हयगय केली जात आहे. जिल्ह्यातील इतर खासगी रुग्णालयांच्या बाबतीत तातडीने निर्णय घेणारे प्रशासन लवासाकडे का दुर्लक्ष करत आहे, असा प्रश्न मुळशीकरांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

केजरीवाल सरकारच्या निर्णयामुळे दिल्लीत प्रति लिटर 8 रुपयांपेक्षाही जास्त स्वस्त होणार डिझेल

0

दिल्ली -येथे डिझेल प्रति लीटर 8 रुपयांपेक्षा जास्त किंमतीने कमी होणार आहे. दिल्ली कॅबिनेटने गुरुवारी डिझेलवर व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (व्हॅट) दर सध्याच्या 30 टक्क्यांपेक्ष कमी करुन 16.75 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, व्हॅट कमी झाल्याने दिल्लीमध्ये डिझेलच्या किंमती 82 रुपये प्रति लिटरवरुन कमी होऊन 73.64 प्रति लीटर होतील. अशा प्रकारे दिल्लीमध्ये डिझेल प्रति लिटर जवळपास 8.36 रुपयांनी स्वस्त होणार आहे.

पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकार व्हॅट तर केंद्र सरकार उत्पाद शुल्क लावते

राज्य सरकार डिझेलवर आणि पेट्रोलवर व्हॅट लावत असते. तर केंद्र सरकार या दोन्ही इंधनांवर उत्पाद शुल्क लावते. केंद्र सरकारनेही मे महिन्यात आपल्या उत्पादन शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. दिल्लीमध्ये डिझेलची किंमत सध्या 81.94 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोलची किंमत 80.43 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल डिझेलवर लागत नाही जीएसटी
देशात पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागत नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलची किरकोळ किंमत आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या किंमती आणि इतर देशांच्या परिस्थितीवर अवलंबून असते. याशिवाय पेट्रोल व डिझेलच्या किंमतींमध्ये उत्पाद शुल्क, व्हॅट, विपणन खर्च, मार्जिन, डीलर कमिशन इत्यादींचा समावेश आहे.

आधारभूत किंमतीपेक्षा तीन पटींनी डिझेल विकले जात आहे

16 जुलै रोजी दिल्लीमध्ये डिझेलच्या किंमतीच्या 2.95 पट दराने विक्री होत होती. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी डिझेलची आधारभूत किंमत 27.52 रुपये प्रति लिटर होती. तर पंपवरील किरकोळ किंमत दिल्लीत प्रतिलिटर 81.18 रुपये होती.

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे आता अनेक मराठी कुटूंबेही भारतात सुखरुप दाखल

0

महिला व लहान मुलांचा समावेश असलेला १३६ महाराष्ट्रीयांचा दुसरा जत्था परतला

मुंबई – दुबईत अद्यापही अडकून पडलेल्या गरजू भारतीयांना मायदेशी सुखरुप परत पाठवण्यासाठी मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी १८६ रोजगारवंचित व निर्धन महाराष्ट्रीय कामगारांना स्वखर्चाने चार्टर्ड फ्लाईटने भारतात पाठवले होते. याच मोहिमेअंतर्गत आता दुसऱ्या फेरीत महिला व लहान मुलांचा समावेश असलेल्या अनेक मराठी कुटूंबांना संधी मिळाली आहे. एकूण १३६ महाराष्ट्रीयांचा दुसरा जत्था काल विमानाने येथे परतला आहे. ही कुटूंबे महाराष्ट्रभरातील विविध शहरे व गावांतील आहेत.

कोविड १९ साथ व लॉकडाऊन काळात हजारो भारतीय संयुक्त अरब अमिरातीतील (युएई) अडकून पडले होते. दुबईहून भारतातील विविध ठिकाणी विमान वाहतूक सुरळीत झाल्यानंतरही यातील अनेकांना आर्थिक अडचणींमुळे मायदेशी परतणे अवघड झाले होते. त्यात रोजगारवंचित कामगार, विद्यार्थी, गरोदर महिला व लहान मुले यांचाही समावेश होता. रोजगार गमावल्याने व राहत्या जागेचे भाडे भरण्यासाठीही खिशात पैसे नसल्याने बऱ्याच लोकांनी सार्वजनिक बागांमध्ये आश्रय घेतला होता आणि त्यांच्यापुढे रोजच्या भोजनाचा प्रबंध कसा करायचा याबाबतच्याही अडचणी होत्या. एकट्या महाराष्ट्रातील ६५००० हून अधिक लोक आजही दुबईत अडकून पडले असून मायदेशी परतण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार हे अशा कठीण परिस्थितीत आपल्या निर्धन देशबांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. याआधी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी अडचणीत सापडलेल्या हजारो भारतीयांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ व औषधांचे संच मोफत पुरवले होते. युएई आणि भारतादरम्यानची विमान वाहतूक सुरळीत झाल्यावर त्यांनी कंपनी सामाजिक दायीत्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत जवळपास ३५०० गरजू भारतीयांचा खाण्या-पिण्याचा, वैद्यकीय चाचणीचा व विमान तिकीटाचा खर्च उचलून त्यांना सुखरुप भारतात रवाना केले. त्यामध्ये केरळ, तमीळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, नागालँड, मिझोराम आदी राज्यांमधील रहिवाशांचा समावेश आहे. या मोहिमेसाठी डॉ. दातार यांनी आतापर्य़ंत ३ कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे.

खरोखर गरजू प्रवाशांची यादी निश्चित करणे, त्यातून अल्प मासिक उत्पन्नधारक प्रवाशांना निवडणे, संबंधित कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागाशी संपर्क साधून त्यांचे पासपोर्ट मागवून घेणे, त्यांना विमान प्रवासाची मोफत तिकीटे देणे व होम क्वारंटाईनबाबतही मार्गदर्शन करणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी अल अदील कंपनीच्या वतीने संचालक सौ. वंदना दातार, हृषिकेश दातार व रोहित दातार तसेच प्रवाशांतर्फे प्रतिनिधी म्हणून पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या धनश्री पाटील समन्वयाचे काम करत आहेत. परवानेविषयक औपचारिकता, तिकीटांची व्यवस्था व विमान कंपनीशी संपर्कात राहणे आदी कामांत अकबर ट्रॅव्हल्सचे सुलेमान इक्रम यांची मोलाची मदत होत आहे.

ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून दुबईत अडकून पडलेल्या ज्या गरजू व निर्धन भारतीयांना भारतात परतण्यासाठी मदत हवी असेल त्यांनी स्वतः अथवा नातलगांमार्फत संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. दातार यांनी केले आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 35 हजार 885 ,एकुण 2 हजार 682 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 60 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 98 हजार 657 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 30 :- पुणे विभागातील 60 हजार 90 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 98 हजार 657 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 35 हजार 885 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 682 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 982 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.91 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.72 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 79 हजार 99 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 50 हजार 573 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 656 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 18 हजार 420 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 227, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 98 , पुणे कॅन्टोंन्मेंट 148, खडकी विभागातील 22 , ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 741, यांच्याकडील रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 870 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 290 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 331, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 56 , पुणे कॅन्टोंन्मेंट 31 , खडकी विभागातील 39 , व ग्रामीण क्षेत्रातील 123 , रुग्णांचा समावेश आहे. तसेच 738 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.94 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 581 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 430 , सातारा जिल्ह्यात 138 , सोलापूर जिल्ह्यात 297, सांगली जिल्ह्यात 182 तर कोल्हापूर जिल्ह्यात 534 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 662 रुग्ण असून 1 हजार 933 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1601 आहे. कोरोनाबाधित एकूण 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 8 हजार 239 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 696 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 63 आहे. कोरोना बाधित एकूण 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 947 रुग्ण असून 612 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 271 आहे. कोरोना बाधित एकूण 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 5 हजार 710 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 276 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 294 आहे. कोरोना बाधित एकूण 140 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 84 हजार 272 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 78 हजार 282 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 950 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 78 हजार 800 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.

ही आहे…मिशन बिगिन अगेनची पुढचा टप्पा नियमावली

0

मुंबई, दि. 30 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत.  काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. तसेच खेळाडुंचा संघ नसलेल्या काही आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून संमती देण्यात आली आहे. 

या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील. लोकांनी या काळात सामाजिक अंतर, व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहील.

कोवीड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना

  • मास्कचा वापर- सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे.
  • सामाजिक अंतर पाळणे (सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान 6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे.
  • ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी, दुकानांमध्ये एका वेळी 5 व्यक्तिंपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये.
  • जमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना यापुढेही प्रतिबंध राहील. विवाह सोहळ्याला 50 पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना 20 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड लागू राहील.
  • सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू इ. चे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.

कामाच्या ठिकाणी पाळावयाच्या मार्गदर्शक सूचना :

  • घरातून काम (वर्क फ्रॉम होम) :  शक्यतोवर  घरातूनच काम करण्याची पद्धत अवलंबली पाहिजे.
  • कार्यालये, कामाची जागा, दुकाने,  बाजारपेठ, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे/ व्यवसायाच्या वेळेचे विभाजन करण्याचा नियम पाळला पाहिजे.
  • तपासणी व स्वच्छता – कार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच  बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे), हात धुणे आणि सॅनिटायझर ची व्यवस्था करावी.
  • संपूर्ण कामाची जागा, सामान्य सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टींची/ वस्तूंची वारंवार स्वच्छता करण्यात यावी. शिफ्टमध्ये काम करताना प्रत्येक शिफ्टनंतर दरवाज्याचे हॅन्डल इत्यादी गोष्टींची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
  • सुरक्षित अंतर :- कामाच्या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी / कामगारांमध्ये प्रत्येक  शिफ्टच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेऊन काम करतील. तसेच भोजनाच्या वेळांमध्ये सुयोग्य अंतर राहील याची दक्षता संबंधित आस्थापना प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे.

मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिकापुणेसोलापूरऔरंगाबादमालेगावनाशिकधुळेजळगावअकोलाअमरावती आणि नागपूर क्षेत्रात खालील कामांनायाआधी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमध्ये सूचित केलेल्या निर्बंधांच्या अधिन राहून संमती देण्यात येत आहे. या कामाच्या नियमावली संबंधीत स्थानिक प्राधिकरणामार्फत निर्गमित केल्या जातील.

  • या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.
  • अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरु ठेवण्यास ३१ मे, ४ जून आणि २९ जून रोजीच्या आदेशांमधील शिथिलता आणि मार्गदर्शिकेनुसार तसेच संबंधीत महापालिकेने निश्चित केलेल्या धोरणाच्या अधीन राहून संमती देण्यात येत आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंचे मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहतील. मद्याची दुकाने ही संमती देण्यात आली असल्यास किंवा होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) सुरु राहील.
  • ऑगस्ट २०२० पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस सुरु राहतील. तथापी, याठिकाणी असणारे थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना सुरु करण्यास संमती नसेल. तथापि, या मॉल्समधील रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलीव्हरी (मोठ्या वाहनांमार्फत (अग्रेगेटर्स) घरपोच सुविधा) देण्यासाठी सुरु ठेवण्यास संमती असेल.    
  • अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक नसलेल्या वस्तु व साहित्यांच्या ऑनलाईन खरेदीसाठी ई-कॉमर्स व्यवस्था सुरु राहील.
  • सध्या सुरु असलेले उद्योग सुरु राहतील.
  • संमती देण्यात आलेली सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बांधकामे सुरु राहतील. संमती देण्यात आलेली सर्व मान्सुनपूर्व सार्वजनिक तसेच खाजगी कामे सुरु राहतील.
  • होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) रेस्टॉरन्ट्स आणि किचन (स्वयंपाकगृहे) सुरु राहतील.
  • ऑनलाईन दूरशिक्षण आणि त्याच्याशी संबंधीत कामे सुरु राहतील. 
  • सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांना वगळून) १५ टक्के कर्मचारी किंवा १५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.
  • सर्व खासगी कार्यालये ही १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.
  • स्वयंरोजगाराशी संबंधित व्यवसाय उदा.  प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कीटक-नियंत्रण (पेस्ट कंट्रोल) आणि तंत्रज्ञ यांची कामे सुरु राहतील.
  • गॅरेजेस, वर्कशॉपमधील कामे नियोजित वेळ घेऊन पूर्वसंमतीसह सुरु ठेवता येतील.
  • मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक कामांसाठी तसेच कार्यालयीन कामासाठी अंतर्गत वाहतुकीस परवानगी असेल.  लोकांनी खरेदीसाठी फक्त जवळपास/ शेजारच्या बाजारपेठामध्ये जाणे अपेक्षित आहे. अनावश्यक वस्तू खरेदीसाठी लांब पल्ल्याच्या प्रवासांना परवानगी दिली जाणार नाही.
  • 23 जून 2020 च्या आदेशानुसार मोकळ्या जागा, लॉन, वातानुकूलित नसलेल्या हॉलमध्ये लग्नाशी संबंधित कार्यक्रमांना परवानगी राहील.
  • काही निर्बंधांसह मोकळ्या भागात शारीरिक व्यायामांना (फिजिकल अॅक्टिव्हिटी) परवानगी राहील.
  • वर्तमानपत्रांचे मुद्रण व वितरण व त्यांचे घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) यांना संमती असेल.
  • शैक्षणिक संस्था (विद्यापीठे/महाविद्यालय/शाळा) मधील कार्यालये, कर्मचाऱ्यांना             ई-सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर करणे आदी कामांसारख्या अशैक्षणिक कामांसाठी परवानगी असेल.
  • राज्य शासनाने परवानगी दिलेली केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर यांना २५ जून २०२० रोजीच्या शासन  आदेशातील निर्बंधांच्या अधीन राहून संमती असेल.
  • गोल्फ कोर्सेस, आऊटडोअर फायरिंग रेंज, आऊटडोअर जिम्नॅस्टीक, आऊटडोअर बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा सांघिक नसलेल्या खेळांना ५ ऑगस्ट २०२० पासून संमती असेल. यात शारीरीक अंतर, स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. जलतरण तलावाला (स्विमींग पुल) परवानगी नसेल.
  • टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २ या प्रवासी क्षमतेनुसार, चारचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार तर दुचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक १ प्रवासी क्षमतेनुसार (हेल्मेट आणि मास्कसह) चालवण्याची परवानगी राहील.
  • कोणत्याही विशिष्ट / सामान्य आदेशाद्वारे परवानगी दिलेली अन्य कोणतीही कामे यांना संमती असेल.

उर्वरित राज्यभरात पुढील बाबींना वेळोवळी निर्गमित केलेल्या अटी-शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे.

  • या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.
  •  जिल्हाअंतर्गत बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. बसमध्ये एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी सामाजिक अंतर आणि सुरक्षेची काळजी घेऊन प्रवास करू शकतील.
  • आंतरजिल्हा प्रवास नियंत्रित स्वरुपाचा राहील.
  • अत्यावश्यक नसलेली मार्केटस्, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस ही ५ ऑगस्ट २०२० पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहू शकतील. त्यातील थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना संमती नसेल. तथापि, रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) देण्यासाठी सुरु ठेवण्यास संमती असेल. संबंधित नागरी किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याबाबत नियमावली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) ठरवून देतील.
  • खुल्या जागा, लॉन्स आणि वातानुकूलित नसणाऱ्या सभागृहातील विवाह सोहळ्यासाठी २३ जून २०२० च्या निर्णयानुसार परवानगी असेल.
  • निर्बंधासह खुल्या जागेतील व्यायाम व इतर शारीरिक हालचाली यांना संमती असेल.
  • छपाई आणि वृत्तपत्रांच्या घरपोच वितरणास परवानगी असेल.
  • विद्यापीठे/महाविद्यालये/शाळा यांची कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांचे अशैक्षणिक   कामांसाठी असणारे कर्मचारी यांना ई कंटेट तयार करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करणे. परीक्षेचे निकाल घोषित करण्यासाठी परवानगी असेल संशोधक आणि शास्त्रज्ञ यांना उपस्थित राहण्यास परवानगी राहिल.
  • केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स यांना दि. २५ जून २०२० रोजीच्या शासन आदेशानुसार काही अटींवर परवानगी.
  • गोल्फ कोर्सेस, आऊटडोअर फायरिंग रेंज, आऊटडोअर जिम्नॅस्टीक, आऊटडोअर बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा सांघिक नसलेल्या खेळांना ५ ऑगस्ट २०२० पासून संमती असेल. यात शारिरीक अंतर, स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. जलतरण तलावाला (स्विमींग पुल) परवानगी नसेल.
  • सार्वजनिक आणि खाजगी वाहनांमध्ये प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी असेल. दुचाकीमध्ये हेल्मेट आणि मास्कसह १ अधिक १ प्रवासी, तीन चाकी वाहनामध्ये चालक आणि २ प्रवासी तर चार चाकी वाहनामध्ये चालक आणि ३ प्रवासी फक्त अत्यावश्यक कामासाठी प्रवास करु शकतील. प्रवासात मास्क परिधान करणे अनिवार्य असेल.
  • याशिवाय ज्या बाबींना परवानगी देण्यात आलेल्या असतील त्या बाबी.

राज्यभरात प्रतिबंधित बाबी नियमावली व कार्यप्रणालीचा (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) अवलंब करुन टप्प्याटप्याने सुरु केल्या जातील किंवा निर्बंध उठवले जातील.

श्रीराम मंदिरासाठी श्रीक्षेत्र वढूची पवित्र मृदा

0

हिंदू जागरण मंचाच्या वतीने मृदाकलश स्वामी गोविंद गिरी महाराजांकडे सुपूर्त 

पुणे : समस्त हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ असलेल्या, त्यांच्या स्मृती जपणाऱ्या श्रीक्षेत्र वढू येथील पवित्र मृदा (माती) पाठवण्यात येणार आहे. हिंदू जागरण मंचाच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परमपूजनीय गोविंदगिरी महाराज यांच्याकडे ही मृदा असलेला चांदीचा कलश गुरुवारी सुपूर्द करण्यात आला.हिंदू जागरण मंचाचे अध्यक्ष सुहास पवार, पुणे शहर प्रमुख निलेश भिसे, सहप्रमुख राजेंद्र गावडे, सुहास साळवी, अक्षय उत्तेकर, महिला प्रमुख नलिनीताई गावडे, सुहास परळीकर, प्रसन्न दशरथ आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मॉडेल कॉलनीतील स्वामी गोविंदगिरी महाराजांच्या निवासस्थानी हा सोहळा झाला. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राममंदिराचा भूमिपूजन सोहळा पुढील आठवड्यात होत आहे. त्या सोहळ्याला गोविंदगिरी महाराज ही मृदा घेऊन जाणार आहेत.स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले, “अयोध्येत श्रीराम मंदिर उभारले जात असल्याने देशभरात चैतन्याचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पावनभूमीतील ही मृदा हिंदू जागरण मंचाच्या वतीने प्रभू श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसाठी अर्पण करताना मला आनंद वाटतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य लोक, विविध समुदाय आपापल्या परीने राम मंदिरासाठी दान देत आहेत. त्यात्या ठिकाणच्या पवित्र वस्तू देत आहेत, ही आनंददायी बाब आहे.”निलेश भिसे म्हणाले, “हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या या राममंदिरासाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळावरील मृदा पाठविताना आम्हा हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांना अतीव आनंद होत आहे. प्रभू रामांची युद्धनीतीचा अवलंब करून संभाजी महाराज अनेक लढाया जिंकल्या. त्यामुळे त्यांच्या बलिदानस्थळावरील मृदा राममंदिराच्या उभारणीत जाणे ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे.”