Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे आता अनेक मराठी कुटूंबेही भारतात सुखरुप दाखल

Date:

महिला व लहान मुलांचा समावेश असलेला १३६ महाराष्ट्रीयांचा दुसरा जत्था परतला

मुंबई – दुबईत अद्यापही अडकून पडलेल्या गरजू भारतीयांना मायदेशी सुखरुप परत पाठवण्यासाठी मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी १८६ रोजगारवंचित व निर्धन महाराष्ट्रीय कामगारांना स्वखर्चाने चार्टर्ड फ्लाईटने भारतात पाठवले होते. याच मोहिमेअंतर्गत आता दुसऱ्या फेरीत महिला व लहान मुलांचा समावेश असलेल्या अनेक मराठी कुटूंबांना संधी मिळाली आहे. एकूण १३६ महाराष्ट्रीयांचा दुसरा जत्था काल विमानाने येथे परतला आहे. ही कुटूंबे महाराष्ट्रभरातील विविध शहरे व गावांतील आहेत.

कोविड १९ साथ व लॉकडाऊन काळात हजारो भारतीय संयुक्त अरब अमिरातीतील (युएई) अडकून पडले होते. दुबईहून भारतातील विविध ठिकाणी विमान वाहतूक सुरळीत झाल्यानंतरही यातील अनेकांना आर्थिक अडचणींमुळे मायदेशी परतणे अवघड झाले होते. त्यात रोजगारवंचित कामगार, विद्यार्थी, गरोदर महिला व लहान मुले यांचाही समावेश होता. रोजगार गमावल्याने व राहत्या जागेचे भाडे भरण्यासाठीही खिशात पैसे नसल्याने बऱ्याच लोकांनी सार्वजनिक बागांमध्ये आश्रय घेतला होता आणि त्यांच्यापुढे रोजच्या भोजनाचा प्रबंध कसा करायचा याबाबतच्याही अडचणी होत्या. एकट्या महाराष्ट्रातील ६५००० हून अधिक लोक आजही दुबईत अडकून पडले असून मायदेशी परतण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार हे अशा कठीण परिस्थितीत आपल्या निर्धन देशबांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. याआधी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी अडचणीत सापडलेल्या हजारो भारतीयांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ व औषधांचे संच मोफत पुरवले होते. युएई आणि भारतादरम्यानची विमान वाहतूक सुरळीत झाल्यावर त्यांनी कंपनी सामाजिक दायीत्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत जवळपास ३५०० गरजू भारतीयांचा खाण्या-पिण्याचा, वैद्यकीय चाचणीचा व विमान तिकीटाचा खर्च उचलून त्यांना सुखरुप भारतात रवाना केले. त्यामध्ये केरळ, तमीळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, नागालँड, मिझोराम आदी राज्यांमधील रहिवाशांचा समावेश आहे. या मोहिमेसाठी डॉ. दातार यांनी आतापर्य़ंत ३ कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे.

खरोखर गरजू प्रवाशांची यादी निश्चित करणे, त्यातून अल्प मासिक उत्पन्नधारक प्रवाशांना निवडणे, संबंधित कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागाशी संपर्क साधून त्यांचे पासपोर्ट मागवून घेणे, त्यांना विमान प्रवासाची मोफत तिकीटे देणे व होम क्वारंटाईनबाबतही मार्गदर्शन करणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी अल अदील कंपनीच्या वतीने संचालक सौ. वंदना दातार, हृषिकेश दातार व रोहित दातार तसेच प्रवाशांतर्फे प्रतिनिधी म्हणून पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या धनश्री पाटील समन्वयाचे काम करत आहेत. परवानेविषयक औपचारिकता, तिकीटांची व्यवस्था व विमान कंपनीशी संपर्कात राहणे आदी कामांत अकबर ट्रॅव्हल्सचे सुलेमान इक्रम यांची मोलाची मदत होत आहे.

ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून दुबईत अडकून पडलेल्या ज्या गरजू व निर्धन भारतीयांना भारतात परतण्यासाठी मदत हवी असेल त्यांनी स्वतः अथवा नातलगांमार्फत संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. दातार यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सव आता महाराष्ट्र महोत्सव:पुण्यात गणेश मंडळांकडून जल्लोष

पुणे: कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांच्या मागणीनुसार आज...

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. १० : पुणे-नाशिक...

‘बालभारती’ची नवीन सुसज्ज इमारत लवकरच:शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि.१० : ‘बालभारती’ची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाल्यामुळे...

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनाचा बृहत आराखडा सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.१०- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी, अतिक्रमण,...