Home Blog Page 2437

चित्रपटगृहे 15 ऑक्टोबर पासून उघडली जातील.

0

नवी दिल्ली – केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज चित्रपट प्रदर्शनासाठी एसओपी जारी केली.  आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाशी चर्चेनंतर ही एस ओ पी निश्चित करण्यात आली आहे.

“गृहमंत्रालयाच्या निर्णयानुसार 15 ऑक्टोबर 2020 पासून चित्रपटगृहे खुली होतील. त्यादृष्टीने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही सामायिक मानके प्रक्रिया  (एसओपी) तयार केली आहे,” असे ही एसओपी जारी करताना मंत्री महोदय म्हणाले.

यातील प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे ही आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने दिलेल्या नियमानुसार आहेत. यामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांचे आणि कर्मचाऱ्यांचीही तापमान तपासणी, पुरेसे शारीरिक अंतर राखणे,  मुखपट्टीने चेहऱा झाकणे, सातत्याने हात धुणे,  हँड सॅनिटायझरचा वापर, कर्मचाऱ्यांची सुरक्षा, बाहेर पडण्यासाठी ठराविक मार्ग इत्यादी आहेत. एकूण क्षमतेच्या पन्नास टक्केच आसनक्षमता वापरली जाईल याची व्यवस्था इत्यादींचा समावेश आहे. मल्टिप्लेक्स मधे चित्रपटाच्या खेळांच्या वेळा एकापाठी एक न ठेवता विखूरलेल्या असाव्यात. चित्रपटगृहातील तापमान 24०C तरी ते 30०C दरम्यान असणे आवश्यक.

चित्रपट प्रदर्शनाला सुरूवात करतानाच सर्व राज्ये व संबंधितांनी   ह्या मार्गदर्शक सूचनांचा आणि एसओपीचा वापर करावा.

चित्रपटांचे प्रदर्शन सुरू करणे ही मोठी आर्थिक घटना असून आपल्या देशाच्या जीडीपीवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. आताच्या कोविड-19 प्रकोपाच्या पार्श्वभूमीवरही चित्रपट प्रदर्शन सुरु करताना सर्व संबंधितांनी महामारी पसरू नये म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

गृहमंत्रालयाने 30 सप्टेंबर 2020 ला चित्रपटगृहे, थिएटर, मल्टीप्लेक्स उघडण्यासाठी जारी केलेल्या याव्यतिरिक्तच्या  मार्गदर्शक तत्वां (inter alia ) नुसार  कन्टेनमेंट झोनबाहेरील चित्रपटगृहे 15 ऑक्टोबर-2020 पासून उघडली जातील.

अजय देवगणचा भाऊ अनिल देवगणचे निधन

0

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा चुलत भाऊ अनिल देवगण यांचे सोमवारी रात्री मुंबईत निधन झाले. मीडिया रिपोर्टनुसार, ते 51 वर्षांचे होते. अजयने मंगळवारी दुपारी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. कोरोनाच्या सद्य परिस्थितीमुळे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे अजयने सांगितले.

अनिल देवगण यांच्या निधनाची माहिती देताना अजयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘काल रात्री मी माझा भाऊ अनिल देवगणला कायमचे गमावले. त्यांच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अजय देवगण फिल्म्स आणि मला त्यांची खूप आठवण येईल. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. कोरोनामुळे प्रार्थना सभा घेण्यात येणार नाहीये,’ असे अजयने ट्विटमध्ये सांगितले.

अजयच्या बर्‍याच चित्रपटाचे होते सहाय्यक दिग्दर्शक
अनिल देवगण यांनी आपल्या कारकीर्दीतील बहुतेक काम अजय देवगणसोबत केले. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. 1996 मध्ये आलेल्या ‘जीत’ या चित्रपटाव्यतिरिक्त अजय देवगणच्या जान, इतिहास, प्यार तो होना ही था आणि हिंदुस्थानच्या कसम या चित्रपटांचे ते सहाय्यक दिग्दर्शक होते.

अजय देवगणचे दोन चित्रपट दिग्दर्शित केले होते
2000 मध्ये अनिल यांनी दिग्दर्शक म्हणून ‘राजू चाचा’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यानंतर 2005 मध्ये ‘ब्लॅकमेल’ आणि 2008 मध्ये ‘हाय-ए-दिल’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. ‘ब्लॅकमेल’ मध्ये अजय मुख्य भूमिकेत होता. अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाचे ते क्रिएटिव्ह डायरेक्टर होते.

अनेक सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक
अजय देवगणच्या ट्विटवर इंडस्ट्रीशी संबंधित अनेकांनी प्रतिक्रिया देताना अनिल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. अभिषेक बच्चन, बोनी कपूर, आयशा श्रॉफ आणि मुकेश छाब्रा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबाची बीएमसीकडून आरोग्य तपासणी

0

 ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ . याअंतर्गत महापालिकेच्या आरोग्य पथकाने मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची आरोग्य तपासणी केली.बीएसीचे आरोग्य पथक वांद्रे पूर्व येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवास्थान असलेल्या मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी या आरोग्य पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी केली. यात त्यांनी सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासले.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 61 हजार 868

0

पुणे विभागातील 3 लाख 80 हजार 939 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,
विभागात कोरोना बाधित 4 लाख 54 हजार 970 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि.6 :- पुणे विभागातील 3 लाख 80 हजार 939 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 54 हजार 970 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 61 हजार 868 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 163 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 83.73 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 95 हजार 251 रुग्णांपैकी 2 लाख 53 हजार 605 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 34 हजार 890 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.89 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 445 रुग्णांपैकी 30 हजार 753 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 441 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 251 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 35 हजार 241 रुग्णांपैकी 28 हजार 112 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 913 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 216 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 160 रुग्णांपैकी 31 हजार 961 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 756 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 443 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 873 रुग्णांपैकी 36 हजार 508 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 868 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 497 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 220 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 240, सातारा जिल्ह्यात 277, सोलापूर जिल्ह्यात 281, सांगली जिल्ह्यात 343 तर कोल्हापूर जिल्ह्यात 79 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये ब-या होणाऱ्या रुग्णांचो प्रमाण
पुणे विभागामध्ये रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 437 रुग्णांचा समावेश आहे. यात पुणे जिल्हा 2 हजार 804, सातारा जिल्हयामध्ये 661, सोलापूर जिल्हयामध्ये 407, सांगली जिल्हयामध्ये 660 व कोल्हापूर जिल्हयात 905 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 20 लाख 8 हजार 866 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 54 हजार 970 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 5 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

अ‍ॅन्टी गुंडा स्क्वाड पुन्हा स्थापन करा-खा.बापट

0

पुणे, दि. 6 : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ऑंटी गुंडा स्कॉड पुन्हा स्थापन करावे. अशी मागणी खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर यांच्यावतीने एक निवेदन आज नवनियुक्त पोलीस आयुक्त यांना देण्यात आले. खासदार बापट यांनी अभिनव गुप्ता यांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर झालेल्या चर्चेत खासदार बापट यांनी महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था वाढवणे. या मुद्यावर भर दिला. हेल्मेट सक्ती दाट वस्तीच्या ठिकाणी नसावी.तसेच पोलीस दक्षता समित्या लवकरात लवकर स्थापन कराव्यात. अशी मागणीही त्यांनी केली. शहरातील मुख्य चौकातील भिक्षेकऱ्यांचा प्रश्न सोडवून ,नागरिकांना त्यांचा त्रास होणार नाही. यासाठी प्रयत्न करावेत. मंदिरात देव दर्शनासाठी जाणा-या भक्तांना योग्य त्या अटीसह परवानगी देण्याची शिफारस शासनास करावी. अशी सूचना बापट यांनी या चर्चे दरम्यान केली. पोलीस दलातील उपायुक्त व इतर अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखण्याबाबत आदेश देण्यात यावेत.व वाहतूक सुरक्षतेसाठी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. याकडे लक्ष वेधून ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही बापट यांनी केली. जप्त केलेल्या वाहनांची तात्काळ विल्हेवाट लावावी. व अशा वाहनांसाठी जागेचे योग्य नियोजन करावे. या सर्व गोष्टी शहराच्या व पुणेकर नागरिकांच्या दृष्टीने तातडीने होणे.आवश्यक आहेत. जेणेकरून सुसंस्कृत पुण्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना मुक्त वातावरण उपलब्ध होण्यास मदत होईल. अशी आशा बापट यांनी व्यक्त केली.

पत्रकारांना काढून टाकणे,भरमसाठ पगार कपात करणे याकडे शासनाचे दुर्लक्ष; एनयुजे राज्यभर आवाज उठविणार

0


राज्य कार्यकारिणी बैठकीत महत्त्वाचे ठराव मंजूर

माध्यमकर्मी हिताचे धोरणात्मक निर्णयासाठी
माध्यमकर्मी विकास महामंडळ चे गठण

पत्रकार सामुहिक आरोग्यवीमा रजिस्ट्रेशन!

माध्यमांसाठी व माध्यमकर्मींसाठी आर्थिक सहायता!
मागणीसह पत्रकारावर होत असलेल्या अन्याय, अत्याचार, मुस्कटदाबीविरोधात
राज्य पातळीवर चळवळ उभी करणार!

पुणे- वृत्तपत्रे व चँनल्समधून तडकाफडकी कर्मचाऱ्यांना काढले जात आहे कोणतीही बोलणी न करता पगारात भरमसाठ कपात होत आहे त्याबाबत निवेदने सरकारला दिली असून नवीन कामगार कायद्यात ज्या प्रकारे पत्रकारांची मुस्कटदाबी आणि इतर कर्मचारी यांचेवर अन्याय करण्यात आला असून सर्व माध्यमकर्मींसाठी राज्य सरकारने तातडीने त्रिपक्षिय समिती गठण करणे आवश्यक आहे,तसेच सर्वसमावेशक हितासाठी पत्रकार विकास महामंडळ निर्माण करुन त्याद्वारे समस्या सोडविण्याची धोरणे ठरवली जावीत असा ठराव एनयु जे च्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला,सरकारला निवेदने देऊन तातडीने कृती करणार नसेल तर यासाठी राज्यभरात आंदोलन केले जाईल अशी भूमिका अध्यक्ष शीतल करदेकर यांनी जाहीर केली आहे .

ब्रुसेल्सच्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टस्ची सदस्य असणा-या,एनयुजे इंडियाशी संलग्न नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र ची राज्य कार्यकारिणी सभा
आँनलाईन आयोजित करण्यात आली होती.
एनयुजे महाराष्ट्र च्या अध्यक्ष शीतल करदेकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला एनयुजे इंडियाचे वरिष्ठ नेते,एनयुजे महाराष्ट्रचे मार्गदर्शक शिवेंद्रकुमार यांचे मार्गदर्शन लाभले.
कोरोना काळ संकटातही पत्रकारांना व इतरांना सहकार्य करणेबाबत शिवेंद्रकुमार यांनी अभिनंदन करुन वर्तमान कार्यकारिणीला मुदतवाढ दिलेबद्दल सर्वानी त्यांचे आभार मानले.
एनयुजे इंडियाचे राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिवपदी नियुक्ती होऊनही महाराष्ट्रातील माध्यमकर्मी हितासाठी काम करणेसाठीचा एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांचे सर्वानी अभिनंदन केले.संघटन सचिव कैलास उदमले यांनी प्रास्ताविकात सांगितले की,ज्या मजबुतीने एनयुजे महाराष्ट्र ची उभारणी शीतल करदेकर यांनी केली ती अभिनंदनीय असून महाराष्ट्रभरातील पत्रकार युनियनला जोडले जात आहेत. राज्यातील पत्रकार समस्या व केलेली कामे जिल्हयाचे पदाधिकारी यांनी सादर केली, नवी मुंबईचे सुनिल कटेकर,रायगड अध्यक्ष सुवर्णा दिवेकर,पालघर अध्यक्ष विजय देसाई,कोल्हापुर अध्यक्ष डाँ सुभाष सामंत ,औरंगाबादचे अध्यक्ष डाँ अब्दूल कादीर,पुणे कार्याध्यक्ष रायचंद शिंदे,नाशिक अध्यक्ष राम ठाकूर,नंदुरबार अध्यक्ष जितेंद्रसिंह राजपूत, जळगावचे उमेश धनराळें,सांगलीअध्यक्ष खटके,सातारा कार्याध्यक्ष डाँ खाडे, रत्नागिरीचे समन्वयक प्रकाश वराडकर,ठाणे समन्वयक तुषार गोसावी, उस्मानाबादचे गुणवंत दांगट, नागपुर समन्वयक कृष्णा म्हस्के, सिंधुदुर्गचे लक्ष्मण आढाव,धुळे अध्यक्ष विशाल ठाकूर यांनी जिल्ह्यातील कामे व समस्यांची माहिती दिली.
यांचेसह कायदेसल्लागार अँड स्वप्निल पाटील,शेखर धोंगडे , महेश चौगुले,अनिल गुरव, ज्येष्ठ पत्रकार मकरंद जहागिरदार ,राज्य सहसचिव महेंद्र जगताप,कार्यकारिणी सदस्य रचना बो-हाडे,संतोष राजदेव, प्रवक्ते संदिप टक्के ,सचिव नमिता,पुनम शर्मा यांनी आपल्या भुमिका व्यक्त केल्या.सरचिटणीस सीमा भोईर यांनी एनयुजे इंडियाचे आंदोलन व एनयुजे महाराष्ट्रचे कामाची माहिती देताना पुढील कामाची माहिती दिली. संघटन सचिव विशाल सावंत यांनी येत्या काळात संघटन मजबूतीसाठीचे कामाची माहिती दिली.
येत्या काळात एनयुजेएम महाराष्ट्रात एक चळवळ उभी करणार आहे,पत्रकार रजिस्ट्रेशन त्यात सामुदायिक आरोग्य विमा,पत्रकार महामंडळ,पत्रकार सर्वसुरक्षाधोरण,माध्यमांसाठी व माध्यमकर्मींसाठी आर्थिक सहायता याबाबत निवेदन देण्यात येतील ,ज्यांचेवर खोट्या तक्रारी दाखल करून खटले दाखल केले ते मागे घेणे,वृत्तपत्रे व चँनल्समधून तडकाफडकी कर्मचाऱ्यांना काढले जात आहे कोणतीही बोलणी न करता पगारात भरमसाठ कपात होत आहे त्याबाबत निवेदने सरकारला दिली असून नवीन कामगार कायद्यात ज्या प्रकारे पत्रकारांची मुस्कटदाबी आणि इतर कर्मचारी यांचेवर अन्याय करण्यात आला असून सर्व माध्यमकर्मींसाठी राज्य सरकारने तातडीने त्रिपक्षिय समिती गठण करणे आवश्यक आहे,तसेच सर्वसमावेशक हितासाठी पत्रकार विकास महामंडळ निर्माण करुन त्याद्वारे समस्या सोडविण्याची धोरणे ठरवली जावीत असा ठराव मंजूर करण्यात आला,सरकार निवेदने देऊन तातडीने कृती करणार नसेल तर यासाठी राज्यभरात आंदोलन केले जाईल अशी भूमिका अध्यक्ष शीतल करदेकर यांनी व्यक्त केली .
कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांनी कोरोना योद्धा म्हणून घोषित करुनही कोरोनाने बाधित होऊन मृत्यु पावलेल्या पत्रकार व इतर माध्यमकर्मींसाठीचा ५०लाखाचे विमा संरक्षण सहायता त्या कुटुंबाला तातडीने मिळावी म्हणून सरकारकडे युनियन करत असलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली

छोट्या शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याने काँग्रेसचा कृषी विधेयकांना विरोध-रावसाहेब दानवे

0

पुणे:- मोदी सरकारच्या कृषी विधेयकांमुळे छोट्या शेतकऱ्यांचे कल्याण होणार असल्यानेच काँग्रेस या विधेयकांना विरोध करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे पाटील यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केले. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर, खासदार भागवत कराड, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, माजी मंत्री दिलीप कांबळे, बाळा भेगडे, गणेश बिडकर यावेळी उपस्थित होते.
श्री रावसाहेब दानवे पाटील म्हणाले की, ‘ शेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभता) विधेयक, शेतकरी (सबलीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा विधेयक या तीन विधेयकांवरून काही विरोधी पक्षांनी काहूर उठविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. लोकसभेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी या विधेयकाच्या प्रती फाडल्या, काहींनी काळा कायदा असे या विधेयकाचे वर्णन केले. आपल्याच पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात अशा पद्धतीच्या सुधारणा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. या तीन विधेयकांमध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत हे जाणून न घेताच या विधेयकांना आंधळा विरोध सुरु आहे.’
१९५५ चा अत्यावश्यक वस्तू कायदा मोदी सरकारने रद्द केला. या कायद्यानुसार शेतमाल साठवणुकीत खासगी गुंतवणुकीस मर्यादा घालण्यात आली. व्यापारी, धान्य – फळांवर प्रक्रिया करणारे, अन्न -धान्य, फळांची निर्यात करणारे व्यापारी यांना साठवणुकीवर मर्यादा घालण्यात आल्या. परिणामी शेतमाल साठवणुकीची व्यवस्था ही फक्त सरकारी यंत्रणेच्या ताब्यातच राहिली. भाजीपाला, धान्य, फळे हंगामात एकाच वेळी बाजार समित्यांमध्ये येऊ लागल्याने भाव आपॊआपच कोसळू लागतात. जर साठवणुकीच्या व्यवस्था मोठ्या प्रमाणात असत्या तर शेतकऱ्यांनी हंगामात एकाच वेळी माल आणण्याऐवजी टप्प्याटप्प्याने आणला असता. तसे झाले असते तर बाजारात भाव वारंवार कोसळले नसते. आता या कायद्याने शेतमाल साठवणुकीमध्ये ( स्टोअरेज ) मोठ्या प्रमाणात खासगी गुंतवणूक होऊ शकेल. शेतकरी आपला माल स्टोअरेज मध्ये ठेवतील व बाजारातील मालाची उपलब्धता पाहून आपला भाजीपाला, फळे, धान्य बाजारात आणू शकतील. या तीन विधेयकांमुळे शेतकऱ्यांना आपला माल राज्या बाहेर विकता येणार आहे. मोदी सरकारने प्रत्येक गावात गोदाम बांधण्याची योजना जाहीर केली आहे. नाशवंत शेतीमालाची शेतकरी गरजेवेळी मिळेल त्या किमतीत विक्री करतो. आता गोदामांसारखी साठवणुकीची व्यवस्था आकारास येईल. परिणामी शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे, धान्य, तेलबिया यांची साठवणूक करून त्याची विक्री बाजारातील तेजी मंदी पाहून करता येणे शक्य होणार आहे.
दुसरा मुद्दा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा, खासगी कंपन्या, व्यापारी शेतकऱ्यांच्या समूहाला विशिष्ट शेतमाल पिकवण्याचे कंत्राट देऊ शकतील. हा शेतमाल विशिष्ट भावाला खरेदी करण्याची खात्री कंपन्या देऊ शकतील. बाजारातील सध्याची परिस्थिती पाहून कोणत्या पिकाची लागवड करायची याचा निर्णय शेतकरी करू शकतील. व्यापारी, कॉर्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांची लूट करतील, आपल्याला हव्या त्या भावाने शेतमालाची खरेदी करतील असा प्रचार करणाऱ्या मंडळींनी बाजार समित्यांमधील प्रस्थापितांकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटीबद्दल आजवर अवाक्षर काढलेले नाही. सध्याचे युग स्पर्धेचे आहे. ज्या डॉक्टरकडून गुण येतो, त्याच डॉक्टरकडे रूग्ण जातात. त्यासाठी डॉक्टराला फारशी जाहिरातबाजी करावी लागत नाही. अशाच पद्धतीने ज्या शेतकऱ्यांकडे चांगला माल मिळेल त्याच्याकडे ग्राहक निश्चित जातील, त्यासाठी व्यापारी, आडते , एजंट कशाला हवेत ? बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून अडीच टक्के आडत घेतली जात होती. ही पद्धत देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केली. या शिवाय बाजार समित्यांचा सेस, मापाई, तोलाई, वाराई, हमाली अशा वेगवेगळया शुल्काच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून वसुली जाते. केंद्र सरकारच्या नव्या विधेयकांमुळे शेतीमालाला अधिक भाव मिळणार आहे.
या विधेयकांमुळे शेतमालाच्या आंतर राज्य व्यापारावर असलेले निर्बंध हटविण्यात येणार आहेत. म्हणजे शेजारच्या राज्यात एखाद्या भाजीपाल्याची, धान्याची, फळाची टंचाई आहे तर तिकडे शेतकरी आपला माल कोणत्याही परवानगीविना विक्रीसाठी पाठवू शकतील.

आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोररला भारत सरकारमार्फत “स्टार्ट-अप” चा दर्जा

0

 आतापर्यंत देशातील 4,34,917 रजिस्टर्ड कंपन्यांपैकी फक्त 38,030 कंपन्यांना DPIIT, Gov. of India यांच्याकडून मान्यता

– साहसी पर्यटन, आउटडोअर एज्युकेशन, स्पेस टुरिझम यामधील युनिक बिजनेस आयडियासाठी मिळाला दर्जा.

सोलापूर: आपल्या प्रत्येक कामगिरीने सोलापूरकरांना अभिमानाचे क्षण देणाऱ्या आनंद बनसोडे याने उद्योग क्षेत्रातही आपला पाया रोवला असून नुकताच 360 एक्सप्लोरर या त्यांच्या कंपनीला ‘डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन अँड इंटरनल ट्रेड, भारत सरकार’ मार्फत “स्टार्ट-अप” चा दर्जा देण्यात आला आहे.

              आतापर्यंत देशातील 4,34,917 रजिस्टर्ड स्टार्ट-अप पैकी फक्त 38,030 कंपन्यांना DPIIT, Gov. of India यांच्याकडून मान्यता देण्यात आली आहे. यात एखादा बिजनेसची आयडिया ओरिजनल आहे का? बिजनेस इतर सर्वांपेक्षा वेगळा व वाढ होणारा आहे का? याची पडताळणी करूनच अशी मान्यता देण्यात येते. 

        2017 पासून साहसी क्षेत्रात काम करत असलेल्या 360 एक्सप्लोरर ने आतापर्यंत सह्याद्री पासून वेगवेगळ्या खंडात मोहिमा आयोजित केलेल्या आहेत. शिवाय 2019 मध्ये रशियन स्पेस टूर कंपनीसोबत भविष्यात अवकाश मोहिमा व त्याबद्दल विविध शैक्षणिक टूर्स आयोजित करण्याचा करार केलेला आहे. विश्वविक्रमी मोहिमा, स्पेस टुरिझम, वेगळे शैक्षणिक स्ट्रक्चर असलेले 360स्कुल या सर्व बिजनेस आयडियासाठी 360 एक्सप्लोरर ला असा दर्जा मिळाला आहे. 

         स्टार्ट- अप चा दर्जा मिळवणे ही खूप मोठी बाब समजली जात असून विविध सरकारी योजनांचा फायदा मिळवता येतो. शिवाय बिजनेस वाढीसाठी इनक्युबेशन सेंटर मार्फत मदतही घेता येते. “स्टार्ट-अप” चा दर्जा मिळाल्यामुळे सर्वच स्तरातून 360 एक्सप्लोरर चे कौतुक होत आहे.

    आनंद बनसोडे

          फिजिक्स सारख्या विषयात MSc, M.phil, PhD पर्यंतच्या शिक्षणाचा, लहानपणापासून असलेल्या स्पेस व साहसी टुरिझमच्या आकर्षणाचा अनुभवाचे डॉट्स कनेक्ट करत 360 एक्सप्लोरर ही कंपनी उभी केली आहे. ही फक्त सुरवात आहे अजून खूप काही करावयाचे आहे.

का झाली योगेश टिळेकर आणि भाजपच्या ‘त्या ‘ नगरसेविकांना अटक (व्हिडीओ )

0

पुणे- पूर्वी पाणी व्यवस्थित येत होते ,पण मग आता दीड वर्षातच काय झाले.. पाउस तर कोसळतोय चांगला .. धरणे ओव्हरफुल्ल होताहेत मग पाणी मुरतंय कुठे ? सत्ताधारी असून भाजप ची होणारी मुस्कटदाबी आज ओसंडून बाहेर पडली . माजी आमदार योगेशटिळेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यांच्या समवेत होते . मनीषा कदम, राजाभाऊ कदम ,राणी भोसले, रायबा भोसले ,स्वतः टिळेकर यांच्या मातोश्री नगरसेविका रंजना टिळेकर आणि शंभरावर कार्यकर्ते आणि मग काय सुरु झाले ‘आंदोलन ‘

संशय: पाण्याचे राजकारण ,अधिकाऱ्यांना हाती धरून .. मरण मात्र जनतेचे …

खरे तर या पूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी दक्षिण पुण्याला रोज सकाळी ४ तासाचा पाणी पुरवठा नियमित होत होता . आणि टिळेकर यांच्या भागात म्हणजे पूर्वेकडील पुण्याला पाणी पुरेसे मिळत होते . दक्षिण पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात कशी झाली ? हे या सर्व आंदोलनातून स्पष्ट झाले. कोणाच्या भागाला सातत्याने पाणी , कोणाच्या नशिबी कधी येईल भरोसा नाही … हे सारे राजकारण ,महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही राजकीय लोकप्रतिनिधी स्वतःची राजकीय पोळी भाजायला तर करीत नाही ना ? असा संशय यावा अशी स्थिती . सर्वत्र समान पाणी पुरवठ्याचे न्यायालयात आश्वासन देणाऱ्या महापालिकेने वर्षानुवर्षे चालविलेला हा कारभार .. आज जनतेचा नाही बनला तरी राजकीय उद्रेक मात्र बनू पाहतो आहे .. या सर्व कार्यकर्त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले आहेच …पण प्रश्न आहे ..तो कायमचा सुटणार आहे काय ? हा महत्वाचा मुद्दा आहे.. पहा या राजकीय उद्रेकाची ..आंदोलनाची हि व्हिडीओ झलक

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/3363313337048818/

पुण्यात कॉंग्रेसचा सत्याग्रह न्यायासाठी…

0


पुणे- हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियाला न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केलेल्या डाँ बाबासाहेब आंबेडकर पुणे कँम्प येथे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली व इतर मान्यवरांच्या उपस्तिथीत सत्याग्रह करण्यात आला. या वेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम,माजी आमदार मोहन जोशी,अभय छाजेड,गटनेते आबा बागुल,माजी .आमदार .दीप्ती चौधरी,अरविंद शिंदे, नगरसेवक .अविनाश बागवे, नगरसेवक रामचंद्र कदम, लताताई राजगुरू, कमलताई व्यवहारे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमीर शेख, तसेच काँगेस पक्षाचे नगरसेवक, सेवादल, युवक काँग्रेस,विद्यार्थी काँग्रेस, महिला काँग्रेस, शहर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

२५ हजार शेतक-यांना दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा : डॉ.नितीन राऊत

0

संबंधित वाहिनीवरील ८० टक्के ग्राहकांनी चालू वीजदेयक भरणे बंधनकारक

मुंबई ५ ऑकटोबर 2020: रात्रीच्या वेळेस कृषिपंपांना देण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यामधील अडचणी, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या विधायक सूचना विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन निर्माण होणारी वीज कृषी वाहिनीद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येणार आहे, असे ऊर्जामंत्री ना.डॉ नितीन राऊत यांनी सांगितले.

      राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील किमान ५० वीजवाहिन्यांवरील सुमारे २५ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याबद्दल ऊर्जामंत्र्यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार ही योजना सुरू करण्यात आली आहे.

       राज्यातील कृषिपंपाच्या थकबाकीचा आकडा हा व्याज व दंडासहित सुमारे ४२००० कोटी रु. पर्यंत पोहचला आहे व कृषीपंपाच्या थकबाकीसंबंधाने स्वतंत्र धोरण करण्याची बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे. तथापि सध्याची महावितरणची आर्थिक परिस्थिती बघता वरील योजनेची अंमलबजावणी करतेवेळेस त्या वीजवाहिन्यांवरील किमान ८० टक्के कृषी ग्राहकांनी चालू वीजबिलांचा भरणा करणे अपेक्षित आहे.

      सदर योजना यशस्वी करण्याकरिता आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याकरिता वरील उपकेंद्रातील वाहिन्यांवरील ग्राहकांनी चालू वीजबिल भरुन उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शासकिय अथवा खाजगी जागा उपलब्ध करुन देण्याकरिता महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आहे.

सद्यस्थितीत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार राज्यातील कृषिपंपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास आठवडयात चक्राकार पध्दतीने तीन फेज वीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

संपूर्ण शहरात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार त्वरित थांबवावा- बाप्पू मानकर

0

पुणे -शहरात दरदिवशी अधिकाधिक करोना रुग्णांची भर पडत आहे अशातच रेमडेसिव्हिर हे उपचारात महत्वाचे औषध असल्याने त्याची उपलब्धता सुरळीत होणे अपेक्षित आहे. पण, पुणे शहरात या औषधांचा तुटवडा भासत असून यामुळे गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. हे औषध उपलब्ध करून देण्यात यावे. काळाबाजार थांबवावा, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा तीव्र स्वरूपात आंदोलन करेल, असा इशारा युवा मोर्चा शहराध्यक्ष बाप्पू उर्फ राघवेंद्र मानकर यांनी दिला आहे.

या औषधांचा काळा बाजार रोखण्यासाठी आज अन्न व औषध प्रशासन आयुक्त कार्यालया समोर भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीने आंदोलन करण्यात आले त्या वेळी मानकर बोलत होते.या आंदोलनाचे आयोजन पुणे शहर युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रतीक देसरडा, निहाल घोडके, अभिजित राऊत, अक्षय वायाळ, अरविंद गोरे यांनी केले. या आंदोलनाला अमित कंक, अपूर्व खाडे, दुष्यांत मोहोळ, राहुल दळवी, प्रमोद कोंढरे, छगन बुलाखे, राजेंद्र काकडे, राजू परदेशी यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राघवेंद्र मानकर म्हणाले, या औषधाचा पुरवठा चार कंपन्या करतात. त्यामध्ये कॅडेलाची किंमत 2800 रुपये, सिपलाची किंमत 4000 रुपये, ज्यूबिलटची किंमत 4700 रुपये, हेटरोची किंमत 5400 रुपये, अशी आहे. मात्र, या संकट काळात एकच समान किंमत सर्वसामान्यांना परवडेल, अशी माफक किंमत होणे अपेक्षित आहे.

या आंदोलनाला भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वरदा बापट या ही उपस्थित होत्या. त्यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. त्या म्हणाल्या, हेटरो कंपनी दररोज 30000 लशी पुणे जिल्ह्यात पाठवते, तिथून हे औषध इतर ठिकाणी चढ्या किमतीने विकले जाते हे दुर्दैवी आहे. त्यामुळे प्रशासनाने हे औषध सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा किमतीत विकण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना द्यावे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या नियंत्रणाच्या मार्गावर, सध्या 65 हजार 196 रुग्ण

0

पुणे विभागातील 3 लाख 75 हजार 502 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 52 हजार 750 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.05 :- पुणे विभागातील 3 लाख 75 हजार 502 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 52 हजार 750 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 65 हजार 196 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 52 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.66 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 82.94 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 94 हजार 11 रुग्णांपैकी 2 लाख 50 हजार 801 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 36 हजार 505 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 705 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.30 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 168 रुग्णांपैकी 30 हजार 92 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 842 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 234 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 34 हजार 960 रुग्णांपैकी 27 हजार 705 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 53 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 202 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 817 रुग्णांपैकी 31 हजार 301 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 94 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 422 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 794 रुग्णांपैकी 35 हजार 603 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 702 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 489 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 830 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 373, सातारा जिल्ह्यात 450, सोलापूर जिल्ह्यात 300, सांगली जिल्ह्यात 299 तर कोल्हापूर जिल्ह्यात 408 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 4 हजार 909 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 870, सातारा जिल्हयामध्ये 598, सोलापूर जिल्हयामध्ये 269, सांगली जिल्हयामध्ये 795 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 377 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 19 लाख 96 हजार 371 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 52 हजार 750 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 4 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनच्या वतीने बुधवारी मूकमोर्चा आंदोलन

0

पुणे : कोरोना महामारीमुळे जवळपास ७ महिने कोणतेही कार्यक्रम झाले नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतर ‘अनलॉक’मध्ये इतर व्यवसायांना टप्प्याटप्प्याने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, जाहीर कार्यक्रम, लग्न समारंभ, इव्हेंट्स, सांस्कृतिक सभागृहे, थिएटरमधील कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यासंबंधित क्षेत्रात काम करणारे साउंड, लाईट, एलईडी वॉल, जनरेटर्स, ट्रस, कलाकार, फ्लोरिस्ट, डेकोरेटर्स, मंडप, व्हिडीओग्राफर्स, फोटोग्राफेर्स, बँड, इव्हेन्ट कोऑर्डिनेटर डी. जे. असे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. लाखो रुपयांची इक्विपमेंट्स धूळ खात पडून आहेत. तर या व्यवसायावर उपजीविका अवलंबून असलेल्या जवळपास चार ते पाच लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पैशांची भ्रांत, थकलेले हप्ते आणि निराशा यामुळे या क्षेत्रातील अनेकजण आत्महत्येचा मार्ग पत्करू लागले आहेत. त्यामुळे सरकारने याचे गांभीर्य ओळखून जाहीर कार्यक्रम आयोजिण्यास त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनने पत्रकार परिषदेत केली.

सरकारदरबारी आमच्या समस्या मांडण्यासाठी, तसेच कार्यक्रम चालू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. ७)  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी, सोमनाथ धेंडे, शिरीष पाठक, सूर्यकांत बंदावणे, शैलेश गायकवाड आदी उपस्थित होते.

बबलू रमझानी म्हणाले, “इतर व्यवसायाप्रमाणे अटी-शर्थींसह आम्हालाही व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. आम्हाला कोणतीही आर्थिक मदत नकोय, केवळ आमचा व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी. त्यातून आमची उपजीविका भागू शकते. त्याचबरोबर व्यावसायिकांच्या बँक कर्जाचे हप्ते भरण्यास शिथिलता द्यावी, कारण आमचे व्यवसायला अजून परवानगी नसून आम्ही बँकेच्या हफ्ते भरणार कुटून हा एक मोटा प्रश्न आमच्या समोर सध्या निर्माण झालेला आहे,वाहतुकीसंदर्भात गाड्यांचे पासिंग, इन्शुरन्स, कर भरणा याबात सवलत मिळावी. सर्व तंत्रज्ञाना कलाकाराचा दर्जा मिळावा . व्यावसायिकांना त्यांच्या मुलांच्या शाळा व कॉलेजच्या फीसमध्ये सवलत मिळावी. व्यावसायिकांना आपले साहित्य ठेवण्यासाठी महापालिका हद्दीत जागा किंवा गाळे नाममात्र भाडेतत्वावर उपलब्ध करून द्यावेत. तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या कलावंतांचा आरोग्य विमा शासनाने काढून द्यावा. कलाकार, तंत्रज्ञ कल्याण मंडळांची स्थापना करावी, यापुढे असे होऊ नये आणि, तसेच आमच्या व्यवसायाशी निगडीत असलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे. आमच्या मागण्या आहेत.”

शिरीष पाठक म्हणाले, “इव्हेंट्सशी संबंधित पुण्यात १० हजार व्यावसायिक आहेत. प्रत्येक व्यावसायिकाकडे १० ते ५० कामगार आहेत. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या १० ते १२ लाख इतकी आहे. लग्न समारंभ, गणेशोत्सव यासह इतर अनेक कार्यक्रमांचा सिझन गेल्या सहा महिन्यात होऊन गेला. त्यात ५० ते ६० कोटीची उलाढाल झाली असती. परंतु, कोरोनामुळे हे सगळे व्यावसायिक घरात बसून असल्याने आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.” शासनाने आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आम्हा तंत्रज्ञ-कलावंतांना न्याय द्यावा, असे आवाहन सोमनाथ धेंडे यांनी केले.

यंदाचा पुणे नवरात्रौ सांस्कृतिक महोत्सव रद्द, धार्मिक विधी साध्या पद्धतीने.

0

पुणे-कला,संस्कृती,गायन,वादन,नृत्य यांचा मनोहारी संगम असणाऱ्या 26 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाची आज बैठक झाली.बैठकीमध्ये  कोविड-19 कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावाच्या परिस्थितीत यंदाचा पुणे नवरात्रौ  सांस्कृतिक महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.गेल्याच वर्षी दिमाखदार रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सव या सांस्कृतिक महोत्सवाचे दरवर्षी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे नवरात्रीच्या दहा दिवसांत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यंदा होणार नसून शिवदर्शन येथील महालक्ष्मी मंदिर येथे देवीची आरास,देवीची पूजा व आरती हे कार्यक्रम चालू राहतील. आज मंदिर परिसरात मंडप उभारण्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून भाविकांच्या सोयीकरिता कोरोनाचे सर्व नियम पाळून श्री महालक्ष्मी देवीचे ऑनलाईन दर्शन देखील आयोजित केले जाईल. याची भक्तांनी नोंद घ्यावी. पुणे नवरात्रौ महोत्सव रद्द झाला असेल तरी सर्वत्र  कोरोनाचे संकट आलेले आहे. ते त्वरित दूर व्हावे.सुखा-समाधानाने भक्‍तांना जगता यावे व कोरोना  दृष्ट राक्षसाचा नाश करावा. अशी प्रार्थना श्रीमहालक्ष्मी देवीला सर्वांनी करूया. तसेच पुढील वर्षी आणखी दिमाखात पुणे नवरात्रौ  महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल असे पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष व पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी पत्रकात म्हटले आहे.
या बैठकीस पुणे नवरात्रौ महोत्सवाचे ट्रस्टी घनश्याम सावंत,नंदकुमार बानगुडे,नंदकुमार कोंढाळकर,रमेश भंडारी,अमित बागूल,सागर बागूल,सागर आरोळे आदी उपस्थित होते.