पुणे:
‘शरीराद्वारे तालाच्या बिंदुनी मिळून तयार झालेले रेखाचित्र म्हणजे नृत्य असून नृत्याचा अंकाशी जवळचा संबंध आहे, नृत्य हा खेळ असून तो गणिताच्या सहाय्याने खेळावा लागतो,असे प्रतिपादन ज्येष्ठ नृत्य गुरु सुचेता भिडे-चापेकर यांनी केले.
मॅप एपिक कम्युनिकेशन प्रा लि च्या ‘अंकनाद’ या गणितविषयक गोडी निर्माण करणाऱ्या ऍप द्वारे ‘नृत्यमय गणित’ या विषयावरील वेबिनार चे आयोजन शनिवारी अकरा वाजता करण्यात आले होते .नृत्यगुरु सुचेता भिडे -चापेकर यांनी मार्गदर्शन केले.नृत्यांगना सई लेले-परांजपे ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या वेबिनार मध्ये मार्गदर्शन करणार आहेत.शैक्षणिक सल्लागार प्राची साठे यांनी चर्चेचे संचालन केले. नृत्यगुरू सुचेता भिडे -चापेकर म्हणाल्या,’गणिताशी व नृत्याची एकमेंकांशी गट्टी आहे .टाळ्यांचा तालावर नृत्य म्हणजे अंकांची ओळख होय. विभाज्यतेच्या कसोट्या वर आधारित स्वरबद्धता केली जाते . भागाकार येणं हे विद्यार्थ्याना बऱ्याचदा अवघड जाते . पण नृत्यातून हे सहज शक्य होते . अंकनाद मधून पाढे ही पाठ होतात .तालाची जाण समजून घेण्यासाठी गणिताची पावलोपावली मदत होते .
‘नृत्यात आकृतिबंध , सममिती , संख्यारेषा , संख्यांचे प्रकार जसे मूळ , संयुक्त , सम, विषम संख्या दिसून येते . नृत्य सादर करताना विविध प्रकार, आयाम दाखविले जातात त्यासाठी भूमितीची जाण असणे आवश्यक असते . त्यामध्ये बिंदू , अनेक बिंदूना जोडून रेषा तयार होते .आडवी रेषा , उभी रेषा , तिरकी रेषा असे भौमितिक आकार असतात . योग्य कोनातून , आयत , चौरसाकृतीतून आकार दिसून येतात . द्विमिती , त्रिमिती दिसून येते ,’असेही सुचेता भिडे -चापेकर यांनी सांगितले.
पालकांनी देखील पाल्याना गणितात रस घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे,गणित हा रुक्ष विषय न राहता तो आनंदाचा विषय व्हावा,असे प्राची साठे यांनी सांगितले पराग गाडगीळ,मंदार नामजोशी,निर्मिती नामजोशी ,समीर बापट यांच्यासह ‘गणितालय’ चे सदस्य विद्यार्थी या वेबिनार मध्ये सहभागी झाले
वैशाली चंद्रवदन,मुग्धा यांनी नृत्य प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.
नृत्याचा खेळ गणिताच्या सहाय्याने खेळावा लागतो :सुचेता भिडे-चापेकर
पालकमंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे जिल्हास्तरीय मानधन निवड समित्या रखडल्या. .!, हजारो वयोवृद्ध कलावंत “मान”धनाच्या प्रतिक्षेत..!!
मुंबई (खंडूराज गायकवाड) – राज्यातील पालकमंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे गेल्या दहा महिन्यापासून जिल्हास्तरीय जेष्ठ वयोवृद्ध कलावंत मानधन निवड समितीच्या नियुक्त्या राखडल्याने, हजारो वयोवृद्ध लोककलावंत आणि। साहित्यिक “मान”धन लाभाच्या प्रतिक्षेत आहे.सध्या सहा जिल्ह्यात मानधन निवड समित्या अस्तित्वात आहेत.राज्यात एकूण ३६ जिल्हे आहेत.त्यापैकी ३४ जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरीय मानधन निवड समिती स्थापन केली जाते. एक जेष्ठ कलावंत अथवा साहित्यिकांची या समितीचा अध्यक्ष म्हणून निवड केली जाते.तर समितीचे सदस्य सचिव म्हणून संबंधित जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे काम पाहतात.या समितीमध्ये इतर ही चार ते पाच वेगवेगळया कला क्ष्रेत्रातील मान्यवर सदस्यांचा समावेश असतो.
तर मुंबई आणि उपनगर (मुंबई) या दोन जिल्ह्यात पालकमंत्री यांनी निर्देशित केलेल्या एका मान्यवर जेष्ठ। कलावंतांची निवड समिती प्रमुख म्हणून केली जाते.या समितीचे सदस्य सचिव म्हणून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे काम पाहतात. या समितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी किंवा तहसिलदार आणि इतर विविध कला क्ष्रेत्रतील चार ते पाच मान्यवराचा समावेश असतो.
समितीला वयोवृद्ध कलावंत/साहित्यिक यांनी मानधनासाठी केलेल्या अर्जाची छाननी करून राज्य शासनाला लाभार्थ्यांचे अर्ज शिफारशीसह पाठविण्यात अधिकार असतात.पूर्वी वर्षात केवळ ६० अर्ज मंजूर करण्याचे अधिकार जिल्ह्यास्तरीय समितीला होते.आता शंभर अर्ज मंजूर करण्याचे अधिकार प्रत्येक जिल्हा निवड समितीला दिले आहेत.
दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी ना.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. परंतु अद्याप सत्तेच्या ओढातानीत अशासकीय महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.याचा फटका सांस्कृतिक कार्य खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या समित्यांना ही बसला आहे.
या संदर्भात सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना, तातडीने जिल्हास्तरीय जेष्ठ कलावंत/साहित्यक मानधन निवड समिती गठीत करण्याचे पत्र धाडले आहे.परंतु यापैकी सांगली,रायगड,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी मानधन निवड समित्या गठीत केल्या आहेत.समित्या लवकर गठीत।कराव्या म्हणून संबंधित संचालनालयाने स्मरण पत्र ही दिल्याचे समजते.मात्र अद्याप कोणत्याच हालचाली पालकमंत्र्यकडून झालेल्या दिसत नाही.यामुळे हजारो नवीन अर्ज सध्या।जिल्हा परिषदेच्या कार्यालयात धूळ खात पडून आहेत.याबाबत लवकरच या क्ष्रेत्रतील कार्य।करणाऱ्या संघटना आपापल्या भागातील पालकमंत्री महोदयाना जाब विचारतील अशी अपेक्षा सर्वांनी करू या..
पर्वती, पद्मावती विभागात वीजपुरवठा सुरळीत
पर्यायी व्यवस्थेतून चक्राकार भारनियमन टाळले
पुणे, दि. 10 ऑक्टोबर 2020 : महापारेषणच्या नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आल्यानंतर महावितरणच्या पर्वती व पद्मावती विभागात आज दुपारी 1.13 वाजेनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. महापारेषण व महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर तांत्रिक उपाययोजना करून दुपारनंतर चक्राकार भारनियमन टाळण्याची कामगिरी केली.
याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ते जेजुरी या 400 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड झाला व वीजपुरवठा बंद पडला होता. त्यामुळे जेजुरी ते कोयना टप्पा क्र. 4 या 220 केव्ही अतिउच्चदाब वाहिनीचा व त्यावरील नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राचा देखील वीजदाब कमी झाला होता. या उपकेंद्रातील कमी वीजदाबामुळे महावितरणच्या पर्वती व पद्मावती विभागातील 82 वीजवाहिन्यांवर आज (दि. 10) सकाळी 8.35 वाजेपासून चक्राकार पद्धतीने दोन ते अडीच तासांचे विजेचे भारनियमन सुरु करण्यात आलेहोते. परंतु, महापारेषण व महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राचा पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरु करण्यासाठी तसेच चक्राकार भारनियमन टाळून पर्वती व पद्मावती विभागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर केले. यामध्ये तांत्रिक उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1.13 वाजता नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आणि पर्वती व पद्मावती विभागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
मार्चअखेर 7000 कुटुंबांना बंद पाईपलाईन द्वारे घरोघरी गॅस पुरवठा करा- खासदार बापट
एमएनजीएल बैठक :
पुणे- मार्चअखेर 7000 कुटुंबांना बंद पाईपलाईन द्वारे घरोघरी गॅस पुरवठा करा त्यादृष्टीने १८ किलोमीटर पाईप लाईन टाकण्याचे उद्दिस्थ पूर्ण कर अशा सूचना आज खासदार गिरीश बापट यांनी एमएनजीएलशी आयोजित केलेल्या बैठकित केली .
बंद पाईपलाईन द्वारे घरोघरी गॅस पुरवठा करतांना येणा-या अडचणींवर मात करण्यासाठी आज शिवाजीनगर मतदार संघाची बैठक झाली. आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक आदित्य माळवे, ज्योत्स्ना एकबोटे, .नीलिमा खाडे, राजश्री काळे,स्वाती लोखंडे, प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, भाजपा मंडल अध्यक्ष रविन्द्र साळेगावकर, कंपनीचे संचालक राजेश पांडे, व्यवस्थापकीय संचालक हलदर, यावेळी उपस्थित होते.
एचसीएमटीआरच्या ६० कोटी रुपयांच्या वर्गीकरणा मागे दडलेय काय? …आबा बागुल (व्हिडिओ)
पुणे-महत्वाकांक्षी एचसीएमटीआरसाठी राखून ठेवलेल्या १७२ कोटी पैकी ६० कोटी रुपये वर्गीकरणास कॉंग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. चांदणी चौकाच्या जमीन भूसंपादनासाठी पुणे मनपाच्या ट्रेझरी मध्ये उपलब्ध ३९७ कोटी रुपयातील ६० कोटी रुपये वापरावेत अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.
ते म्हणाले,’ जमीन भूसंपादनासाठीची असलेली रक्कम दीर्घकाळ वापरली जात नाही, त्यातील ६० कोटी रुपये चांदणी चौक पुलाच्या भूसंपादनासाठी देणे हा चांगला पर्याय उपलब्ध असताना पुण्याच्या रहदारीच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा एचसीएमटीआर प्रकल्पातून ६० कोटी रुपयांचे वर्गीकरण करणे हि शहराच्या विकासाच्या दृष्टीने घातक बाब आहे. हा निर्णय न बदलल्यास कॉंग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल. मागील ५ वर्षातील पुणे शहरातील रस्त्यावरील अपघातांची व मृत्यूंची संख्या पाहता सरासरी वर्षाला ५०० हून अधिक मृत्यूमुखी पडतात व १००० हून अधिक गंभीर जखमी झाल्याची नोंद पुणे मनपाकडे उपलब्ध आहे. अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या, वाहतूक पोलिसांची कमी संख्या याच बरोबर बेशिस्तीने वाहने चालविणार्यांची संख्या अशा अनेक कारणांमुळे हे अपघात होत आहेत. आगामी काळात हि संख्या वाढण्याची मोठी भीती आहे. यासाठी सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने रामबाण उपाय ठरणारा ३५ वर्षांपूर्वीचा उच्च क्षमता द्रुतगती उन्नत मार्ग (एचसीएमटीआर) त्वरित मार्गी लावणे आवश्यक आहे. सलग १३ ते १४ वर्षे मी अखंडित व सातत्याने पाठपुरावा करत आहे. प्रयत्न केले. पुणे शहराच्या अंतर्गत वाहतुकीसाठी संजीवनी ठरणारा एचसीएमटीआर मार्ग हा पाठपुरावा करून मंजूर करून घेतल्यानंतर टेंडर प्रक्रिया देखील झाली होती. मात्र टेंडर जादा दराने आल्यामुळे ही निविदा रद्द करण्यात आली व पुन्हा टेंडर प्रोसेस करणे अपेक्षित असताना हे टेंडर न काढता तरतूद केलेल्या 172 कोटी रुपयांपैकी 60 कोटी रुपये चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी वर्गीकरण करणे हे पूर्णतः चुकीचे आहे. शहरातील लाखो प्रवासी व नागरिकांच्या सोयीसाठी असणारा एचसीएमटीआर रोड होऊ नये, अथवा होणार नाही, असे गृहीत धरुनच केलेली ही कृती आहे काय? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. तसेच त्याचे टेंडर आपण का काढत नाही? चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी अन्य प्रकल्पातून पैसे का घेत नाही? हे प्रश्न अनुत्तरितच आहे. वर्गीकरणाचा या आपल्या निर्णयाला काँग्रेस पक्षाचा कडाडून विरोध असून चांदणी चौकाच्या पुलाला आवश्यक निधीबाबत आम्ही दिलेला पर्याय अथवा अन्य पर्याय उपलब्ध करावा. एचसीएमटीआरच्या पैशातून वर्गीकरण करू नये अशी विनंती काँग्रेस पक्षा कडून होत आहे
‘त्या ‘ पाण्याच्या टाकीचे उद्घाटन पुढे का ढकलले ..आमदार आणि महापौर पहा काय म्हणतात …
पुणे- कात्रज येथील महादेवनगर मधील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन जे आज होणार होते ते पुढे का ढकलले ? यावरून राजकीय कलगीतुरा रंगत असताना , राष्ट्रवादी ने महापौरांनी घेतलेल्या या निर्णयाने लोकांना आणखी काही दिवस पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचा आरोप केला आहे. तर असे काही होणार नाही तेथून पाण्याचे वितरण सुरु केले आहे .असा दावा करत या भागातील पाण्याच्या प्रश्नावर एकीकडे उद्घाटन होत असताना दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन कसे केले ? यावर मात्र या दोन्ही गोष्टी परस्परांशी संबधित नसल्याचा दावा हि महापौरांनी केला आहे. या संदर्भातील हकीकत अशी कि , कात्रज येथील महादेव नगर मधील पाण्याच्या टाकीचे उद्घाटन ९ तारखेला होणार होते त्यासाठी महापौरांनी उपमुख्यमंत्री यांना पत्र हि दिले होते . मात्र याच दिवशी येथील पाण्याच्या प्रश्नावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नगरसेवकांनी जोरदार आंदोलन केले ज्यावरून त्यांना तुरुंग वारी घडली . एकीकडे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन होत असताना दुसरीकडे आंदोलन करून भाजपने राष्ट्र वादीच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी कडून करण्यात येतो आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष आणि या परिसरातील विद्यमान आमदार चेतन तुपे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शी ‘माय मराठी’ ने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पहा नेमके कोण काय म्हणाले …..
मुख्यमंत्री योगी राजीनामा द्या – मातंग समाजाची मागणी
पुणे – हाथरस येथील दलीत महिला अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने आणि प्रशासनाने पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देऊ शकली नाही त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली . हाथरस प्रकरणी देशभर लोक आंदोलन करीत आहेत तरीसुद्धा उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मातंग समाजाच्या विविध संघटनेकडून आज करण्यात आला .व या सरकारचा निषेध म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन येथे तीव्र निदर्शनं करण्यात आली .या वेळी योगी सरकार राजीनामा द्या ,पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे ,बंद करा ,बंद करा दलितांवरील हल्ले बंद करा अशा घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता .
या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री ,मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे,राष्ट्रवादीचे नेते सुभाष जगताप, रिपब्लिकन मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे ,शिवसेनेचे नेते बाळासाहेब भांडे,अनिल हातागळे ,नगरसेवक अविनाश बागवे ,राष्ट्रवादी सामजिक न्याय शहराध्यक्ष विजय डाकले ,महिला अध्यक्ष सुरेखा खंडागळे ,दलीत महासंघ जिल्हाध्यक्ष आनंद वैराट ,भास्कर नेटके ,रावसाहेब खंडागळे ,या मातंग समाजातील प्रमुख संघटना चे नेते यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले .तर या वेळी पुणे शहरातील विविध पक्ष संघटनाचे कार्यकर्ते ,महिला व युवक मोठ्या संख्यने आंदोलनात सहभागी झाले होते.
राज्यातील देवस्थान परिसरात भाविकांना सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई दि. 9 : आळंदी, लेण्याद्री, पंढरपूर, एकवीरा आणि जेजुरी यासह राज्यातील देवस्थानात येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याचे नळ, विश्रामगृह, प्रकाश योजना, बैठक व्यवस्था या सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करुन द्याव्यात. मंदिराची पुरातत्व विभागाकडे असलेली प्रलंबित कामे पूर्ण करण्यास वेग द्यावा. या कामासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
आळंदी, लेण्याद्री, पंढरपूर, एकवीरा आणि जेजुरी येथील देवस्थान परिसरातील भाविकांसाठीच्या सुविधा, पुरातत्व विभागाकडे असलेले प्रलंबित प्रश्न याबाबत ऑनलाईन आढावा बैठक विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जुन्नरचे लेण्याद्रीचे तहसिलदार हणमंत कोळेकर, मावळचे तहसिलदार श्री. बर्गे, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने, तेजस्विनी आखळे उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लेण्याद्री परिसरात भाविकांना मुख्यत्वे पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह वापरासाठी उपलब्ध होतील यासाठी तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. तसेच, रोप-वे साठी हेलिपॅड जिथे आहे त्या परिसरात जागेसाठीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. रोप वे किंवा एलिव्हेटर यापैकी सुरक्षेच्या दृष्टीने काय योग्य ठरेल याचा अभ्यास करूनच पुढील प्रस्ताव सादर करावा, अतिक्रमण केलेल्या दुकानांवर विहित कार्यपद्धतीने कारवाई करावी.
लेण्याद्री परिसरात पिण्याच्या पाण्याची जोडणी तातडीने देण्यात यावी. स्वच्छतागृहाच्या जागेसाठीच्या वादासंदर्भात देवस्थान, स्थानिक आदिवासी आणि पुरातत्व विभाग यांच्या समन्वयाने 15 दिवसांत सुनावणी घेऊन अहवाल सादर करावा. विश्रामगृहे बांधण्यासाठीच्या उपाययोजना आखून अहवाल सादर करावा असे निर्देशही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पंढरपूर देवस्थानासंदर्भात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिर मजबुतीकरणाचे काम करावे. स्कायवॉक, स्वच्छतागृह, विश्रामगृह, दर्शनमंडप यासंदर्भातील कामे दर्जेदार करण्यात यावीत. आळंदीसंदर्भात तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या निधीसंदर्भात अहवाल तातडीने सादर करण्यात यावा. याचबरोबर जेजुरी देवस्थान येथील विकासकामांना देखील गती देण्यात यावी. राज्यातील देवस्थानात भाविकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून, त्यासाठीच्या कामांना गती द्या. या कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य देण्यात येणार असल्याचेही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
प्रभाग समिती अध्यक्षपदावर भाजपचे वर्चस्व.
- महाविकास आघाडीचा पराभव
पुणे – पुणे महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांपैकी ११ जागांवर विजय मिळवून सत्ताधारी भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले ,राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा,तर काँग्रेसला १ जागेवर विजय मिळवता आला. महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांची शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी निवडणूक झाली. ५ जागा बिनविरोध जाहीर झाल्या तर अन्य जागांसाठी प्रत्येक्ष मतदान घेण्यात आले. राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब भागडे हे पीठासीन अधिकारी होते. स्थायी समिती सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे निवडणूक घेण्यात आली.
- निवड झालेल्या सदस्यांची नावे व क्षेत्रीय कार्यालय पुढील प्रमाणे.
१) शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय – सोनाली लांडगे , भाजप (बिनविरोध)
२) सिंहगडरोड क्षेत्रीय कार्यालय – अश्विनी पोकळे ,भाजप ,(बिनविरोध)
३) औंध -बाणेर क्षेत्रीय कार्यालय – अर्चना मुसळे ,भाजप ,( बिनविरोध)
४) बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय – राजश्री शिळीमकर,भाजप ,(बिनविरोध)
५) वानवडी – रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय – हमीद अनिस सुंडके,राष्ट्रवादी काँग्रेस,( बिनविरोध)
६) कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय – राणी रायबा भोसले,भाजप ( विजयी), प्रकाश कदम – राष्ट्रवादी ( पराभूत)
७) येरवडा – कळस -धानोरी क्षेत्रीय कार्यालय – ऐश्वर्या जाधव ,भाजप (विजयी), श्वेता चव्हाण – शिवसेना ( पराभूत)
८) कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय – योगेश समेळ ,भाजप (विजयी) , सुजाता शेट्टी – काँग्रेस ( पराभूत)
९) कोथरूड- बावधन क्षेत्रीय कार्यालय – हर्षाली माथवड ,भाजप (विजयी),
१०) नगररोड – वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय – संदीप जऱ्हाड ,भाजप ( विजयी) भैय्यासाहेब जाधव ,राष्ट्रवादी (पराभूत)
११) धनकवडी – सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय – स्मिता कोंढरे ,राष्ट्रवादी ( विजयी) , वर्षा तापकीर ,भाजप ( पराभूत)
१२) वारजे -कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय – राजाभाऊ बराटे ,भाजप ( विजयी) , लक्ष्मी दुधाने , राष्ट्रवादी ( पराभूत)
१३) हडपसर – मुंढवा क्षेत्रीय कार्यालय – गणेश ढोरे ,राष्ट्रवादी (विजयी) ,उज्वला जंगले ,भाजप ( पराभूत)
१४) भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय – विजयालक्ष्मी हरिहर ,भाजप ( विजयी) , रफिक शेख ,काँग्रेस ( पराभूत)
१५) ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालय – चांदबी हाजी नदाफ ,काँग्रेस (विजयी), लता धायारकर ,भाजप (पराभूत)
मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. ९ : मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांचा आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH), पूर्व द्रुतगती महामार्ग (EEH), एसव्ही रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस रोड), अंधेरी – घाटकोपर लिंक रोड, जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोड (JVLR), सांताक्रुझ – चेंबुर लिंक रोड (SCLR) या रस्त्यांच्या सुधारणांबाबत पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आर. एल. मोपलवार, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, सोनिया सेठी, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) यशस्वी यादव, मुंबई महापालिका रस्ते विभागाचे संजय दराडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले की, शहरातील ७ प्रमुख महामार्ग, त्यावरील फ्लाय ओव्हर यांची हाताळणी वेगवेगळ्या विभागांकडून होते. मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे हे मार्ग आहेत. शहरातील वाहतूक ही कोंडीविरहित तसेच सुरक्षित होण्यासाठी संबंधित एमएमआरडीए, एमएसआरडीसी, महापालिका, वाहतूक पोलीस आदी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. रस्त्यांच्या सुधारणा तसेच त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
मान्सून तसेच कोरोना संकटकाळामुळे थांबलेली रस्त्यांची कामे लवकरच सुरु करण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी रस्त्यांच्या मान्सूनोत्तर केल्या जाणाऱ्या कामांबाबत सादरीकरण करण्यात आले. यामध्ये फूटपाथ सुशोभीकरण, बांबूसह इतर शोभेच्या झाडांचे रोपण, रोड मार्किंग, ट्राफिक सायनेजेस, कॅरेजवेंचे अद्ययावतीकरण, ई-टॉयलेट्स, उड्डाणपुलांखालील भागाचे सुशोभीकरण आणि विकास आदींबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. तसेच शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी प्रस्तावित असलेल्या इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचे सादरीकरण करण्यात आले.
दरम्यान, वरळी येथील रस्त्यांची कामे आणि तेथील वाहतूक व्यवस्थेबाबतही आज मंत्री श्री. ठाकरे यांनी चर्चा केली. वाहतूक विभागाचे पोलीस सहआयुक्त यशस्वी यादव यांच्यासह महापालिका अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सफाई कामगारांची मुले, अनाथ बालके, भटक्या, विमुक्त जाती जमातीच्या मुलांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक संपन्न
मुंबई, दि. 9 : सफाई कामगारांची मुले, अनाथ बालके, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुलांच्या प्रश्नासंदर्भात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली.
राज्यामध्ये असणाऱ्या अनुसूचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठीच्या आश्रम शाळा व वसतिगृह यांच्या दुरुस्ती व पुनर्विकासाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बी.डी.डी. चाळ, वरळी येथील मागासवर्गीय वसतिगृहासंदर्भात प्रस्ताव म्हाडाकडे दिला असल्याचे समाज कल्याण आयुक्तांनी सांगितले.
समाजकल्याण आयुक्त डॉ.नारनवरे यांनी समाजकल्याण विभागांतर्गत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
आफ्टर केअर होमची राज्यात सात ठिकाणी वसतिगृहे आहेत. त्यांच्या स्थितीबाबत अनाथ मुलांसाठी एक टक्का आरक्षण, या आरक्षणाबाबत अंमलबजावणीची सद्यस्थिती याबाबतही आढावा घेण्यात आला. सफाई कामगारांना व त्यांच्या कुटुंबासाठी, अनाथ बालके, भटक्या विमुक्त जाती जमातीतील कुटुंब यांच्यासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात करता येऊ शकते का याबाबत तात्काळ माहिती सादर करण्याच्या सूचना डॉ.गोऱ्हे यांनी केली.
महानगरपालिका तसेच नगरपालिका यात कंत्राटी सफाई कामगार असणाऱ्या कुटुंबातील मुलांना देखील समाज कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी विभागाने निर्णय घेतला असल्याचे श्री.नारनवरे यांनी सांगितले.
MPSCची परीक्षा पुढे ढकलली, बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई – राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी आणि ११ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. तसेचा या परीक्षेची पुढील तारीख चर्चा करून घोषित केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात जाहीर झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेबाबत आज झालेल्या बैठकीत चर्चा केली. सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती होती. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अभ्यास करायला अवधी मिळावा, अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे एमपीएससीची ११ ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एमपीएससीला माहिती देण्यात आली आहे. आता एमपीएससीशी बोलून परीक्षेची पुढची तारीख जाहीर केली जाईल. मात्र या तारखेला निश्चितपणे परीक्षा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्यानंतर ११ ऑक्टोबरला होणाऱ्या एमपीएससी परीक्षेविरोधात मराठा समाज आक्रमक झाला होता. ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती. मराठा आरक्षणाबाबत आक्रमक झालेले संभाजीराजे छत्रपती यांनीही परीक्षा रद्द न झाल्यास एमपीएससीच्या केंद्रे ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, एमपीएससीची रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाच्या नेत्यांशी गुरुवारी दीर्घ चर्चा केली होती. या बैठका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचा दावा बैठकीनंतर मराठा नेत्यांनी केला होता.
राष्ट्रवादीच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी भाजपाचे ‘ते’ तोडफोड आंदोलन -प्रकाश कदम यांचा आरोप (व्हिडीओ )
पुणे- कात्रज कोंढवा रस्त्यावरील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण महापालिकेच्या सहाय्याने उभारलेल्या पाण्याचे टाकीचे उद्घाटन जे आज होणार होते त्याची तारीख पाहूनच राष्ट्रवादीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविल्याचे श्रेय मिळू नये आणि आपण आंदोलन केल्याने , पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असा आभास निर्माण करण्यासाठीच भाजपचे माजी आमदार टिळेकर यांनी दिशाभूल करून कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन कायदा हातात घेऊन आंदोलन केल्याचा आरोप राष्ट्रवादी चे नगरसेवक प्रकाश कदम यांनी केला आहे.महापौर यांनी आज होणारे पाण्याच्या टाकीचे उद्घाटन याच राजकीय श्रेयवादातून पुढे ढकलून येथील लोकाना पाणी देण्याचे कामास दिरंगाई केल्याचा ठपका हि त्यांनी महापौर यांच्यावर ठेवला आहे. ते म्हणाले ,’ माझ्या सौभाग्यवती भारती कदम या नगरसेविका असताना पाण्याच्या टाकीच साठी आर्थिक तरतूद करून टाकीचे काम सुरु करण्यात आले. हि टाकी झाल्यास या भागातील लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल म्हणून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भूमिपूजन केलेल्या ठिकाणी आपण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने हि टाकी पूर्णत्वास आणली . आणि महापौरांनी या टाकीचे उद्घाटन आज दिनांक ९ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविले हे समजताच भाजपचे माजी आमदार यांनी स्वारगेट पाणीपुरवठा केंद्र येथे आंदोलन केले . नुसते निवेदन दिल्यावर काही गुन्हा दाखल होत नाही किंवा अटक होत नाही पण लक्ष वेधून घ्यावे म्हणून राजकीय स्टंट म्हणून इथे काही थोडीफार तोडफोड करण्याचा यत्न केला . तो केवळ लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठीच होता. आणि आपल्या या आंदोलनामुळे टाकी कार्यरत होऊन पिण्याचे पाणी मिळू लागले असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न होता. पण या प्रयत्नात त्यांना अटक झाली आणि तब्बल १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली . ते पाहून , आता या कार्यक्रमास आपले स्थानिक नगरसेवक उपस्थित राहू शकणार नाहीत हे लक्षात आल्याने ७ तारखेला महापौरांनी या टाकीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलला . या सर्व राजकीय लुट मारीत निव्वळ आमच्या कामाचे श्रेय लाटण्याचा तर प्रयत्न झालाच पण महापौरांच्या स्वार्थी निर्णयाने टाकी चे टाकीचे उद्घाटन पुढे ढकलल्याने या भागात आज मिलाणारे पाणी हिसकावले गेले. आणि ते नागरिकांपासून अजून दूरवर नेऊन ठेवण्यात आले. भाजपचे हे कारस्थान ,षड्यंत्र याचा आपण निषेध करतो . असे ते म्हणाले.
पुण्यातील दुकाने आता रात्री 9 पर्यंत उघडी राहणार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा आदेश
पुणे – अत्यावश्यक सेवा वगळून जी दुकाने आहेत ती रात्री 9 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याबाबतचा आदेश आज (शुक्रवार) काढण्यात आला आहे.
यापुर्वी अत्यावश्यक वस्तूंचे दुकाने तसेच सेवा, औषध विक्रीची दुकाने, दवाखाने हे यापुर्वीच्याच वेळेत दररोज सुरू राहणार आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अन्य अत्यावश्यक वस्तूंची दुकाने, सेवा (औषधी विक्री दुकाने, दवाखाने वगळून), अत्यावश्यक सेवा दुकानांव्यतिरिक्त इतर वस्तूंची दुकाने, त्याकरिता निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत उघडी राहणार आहेत. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आजच काढला असून तो दि. 9 ऑक्टोबर म्हणजे आजपासूनच लागू करण्यात आला आहे. शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स हे देखील सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान खुली राहणार आहेत. मात्र, त्यामधील सिनेमागृह बंदच राहणार आहेत.
प्रा. वानखेडे, प्रा. कदम यांची संमेलनाध्यक्षपदी निवड

पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०२१ मध्ये होणाऱ्या २२ राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ कवी, काषाय प्रकाशनाचे संचालक प्रा. चंद्रकांत वानखेडे, तर पुढील महिन्यात होणाऱ्या सातव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली.
प्रा. वानखेडे यांच्या नावावर १२ काव्यसंग्रह असून, काळीजशिल्प, आई नावाचं महाकाव्य, बाप नावाचा वटवृक्ष, काव्यमाला, कृपाछत्र आणि कन्यारत्न या पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे. अलीकडेच त्यांचे बंधुतेचा अनुबंध हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. प्रा. कदम यांची आतापर्यंत पाचशेहून अधिक व्याख्याने झाली असून, छत्रपती शिवराय व आजचा समाज, छत्रपती संभाजी राजे, ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज, असे त्याच्या व्याख्यानांचे विषय आहेत. ही दोन्ही ही संमेलने पिंपरी चिंचवड शहरात होणार आहेत, असे रोकडे यांनी सांगितले.
