Home Blog Page 2432

पोटे दवाखान्यात बालकांचे लसीकरण रोज मोफत: अश्विनी कदम

0

पुणे -शहरातील एक अत्याधुनिक आरोग्य केंद्र म्हणून ओळख असलेल्या प्रभाग क्र. ३५ मधील पुणे महानगरपालिकेच्या कै. शिवशंकर पोटे दवाखान्यामध्ये आता लहान बाळांचे लसीकरण फक्त मंगळवार व शुक्रवार न होता, आठवड्याचे ६ दिवस (दररोज, रविवार बंद) मोफत होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी च्या नगरसेविका अश्र्विनी नितिन कदम यांनी येथे दिली.

त्या म्हणाल्या,’ लहान बालकांचे लसीकरण करणे महत्त्वाचे तर असतेच पण हे लसीकरण करताना खाजगी दवाखाने व खाजगी व्यवसायिक डॉक्टरांकडे हजारो रुपये खर्च करावे लागतात व अनेकवेळा गरजू व गोरगरीब माता-पितांना अशा मोठ्या खर्चामुळे बाळांना लस देणे शक्य होत नाही आणि त्यामुळे बालकांच्या आरोग्याला नुकसान पोहचू शकते…!

या सर्व कारणांचा योग्य विचार करत पोटे दवाखान्यामध्ये गर्भवती व नवजात बालकांना मोफत लसीकरण सेवा आठवड्याच्या प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी उपलब्ध होती पण या सदरच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात गर्दी होत असत व त्यामुळे अनेकांना खूप वेळ थांबावे लागायचे किंवा अनेक वेळा दुसऱ्या वेळी यावे लागत असे या सर्व तसदीच्या बाबी लक्षात घेऊन आता आठवड्याचे ६ दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवार स. ९:३० ते दु. १२:०० आणि दु. २.३० ते सायं ४:०० वा. व शनिवार स. ९:३० ते दु.१२:०० वाजेपर्यंत (रविवार बंद) उपलब्ध असणार आहेत.

माझ्या अनेक वेगवेगळ्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या कै. शिवशंकर पोटे दवाखानामध्ये सन २००७ पासून सर्वसामान्य नागरिकांच्या निरोगी आरोग्याचा सर्वांगीण विचार करत संपूर्ण इमारतीचे नूतनीकरण करुन वर्षागणिक वेगवेगळ्या आरोग्य सेवासुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामध्ये शासकीय दरात डायग्नोस्टिक सुविधांमधील एम्.आर.आय, डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, कलर डॉप्लर, २डी इको, रक्त तपासणी, प्राथमिक आरोग्य तपासणी, लसीकरण, गर्भवती स्त्रियांची तपासणी, मोफत औषधे, क्षयरोग उपचार केंद्र यांसारख्या महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध केल्या आहेत. आज फक्त पुणे जिल्हातूनच नव्हे तर सबंध महाराष्ट्रातून या आरोग्य सेवांचा लाभ अनेक गरजू रुग्ण घेत आहेत. आज समाजातील सर्वसामान्य गरजू नागरिकांसाठी या आरोग्य सुविधा कार्यान्वित असून अनेकजण यांचा लाभ घेत आहेत याचे अत्यंत समाधान वाटत आहे.

लसीकरणाविषयी महत्त्वाचे?
लसीकरण हा बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच न देणे आवश्यक असते. सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोफत मिळते. खेडे गावात लसीकरणा संबंधित माहिती नसल्या कारणाने अनेक बालकांचे नुकसान झालेले दिसून येते.

लस म्हणजे काय?
लस म्हणजे खुद्द त्या त्या रोगचे मेलेले किंवा अर्धवट मेलेले जंतू असतात, किंवा त्या जंतुचा अंश असतो.
ही लस शरिरात गेली की त्याच जंतु मुले होणा-या आजार विरोधी अँन्टीबोडी तयार करते. लसीत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत च नाही पण रोगजंतू बरोबर लढण्याचा अनुभव प्राप्त होतो.

लसीकरणाची गरज
प्राथमिक लसीकरण एक वर्ष पूर्ण होण्या अगोदर होणे गरजेचे असते. लहान मुलांना घातक असलेले सहा रोग आहेत. घटसर्प, गोवर, डांग्या खोकला, धनुवार्त, क्षयरोग, पोलिओ (पक्षाघात) हे आजार रोगप्रतिबंदक लस दिल्याने टाळता येतात.

लहान मुलांना देण्यात येणा-या लसी:
1) बी.सी.जी. (BCG Vaccine) :
ही लस क्षयरोग होऊ नये म्हणून वापरली जाते. जन्माताच किंवा १-२ दिवसात ही लस बाळाला दिली जाते.
2) त्रिगुणी लस (Triple Vaccine)
खोकला, घटसर्प, धनुर्वात या तीन लसीचा समावेश यात होतो. ही लस जन्मल्या नंतर तिसर्या महिन्यानंतर दर महिन्याला सलग तीन महिने घेतली जाते.
3) पोलिओ (Polio Vaacine):
हे डोस म्हणजे लाल रंगाचे थेंब असतात. पोलिओ चा पहिला डोस बाळ जन्मल्या वर १-२ दिवसात देतात. बाकी पोलिओ चे बाकी डोस त्रिगुणी लसी बरोबर तोंडने पाजावेत. पोलिओ चा डोस देणे पुर्वी अर्धा तास गरम पाणी किंवा दूध पिवू नये. कारण उष्णते मुळे डोसची शक्ती कमी होते.
4) गोवर प्रतिबंध लस (Measles Vaccine):
गोवर हा तसा साधा आजार आहे. पण जे मूले अशक्त किंवा कुपोषित असतात त्यांच्यासाठी तो जीवघेणा सुद्धा ठरू शकतो. अशा कुपोषित मुलांना गोवर नंतर काही इतर आजारांना तोंड द्यावे लागू शकते. जसे की न्यूमोनिया, छातीत कफ (श्वसनलिकदाह) किंवा दबलेला क्षयरोगाचा आजार उफाळून येऊ शकतो. कित्येकदा या आजारानंतर हगवण, रक्ती आव लागते. त्यामुळे आधीपासून सौम्य किंवा कुपोषित असलेली मुले जास्त कुपोषित होतात. म्हणून गोवर महत्त्वाची गोष्ट असते.
बाळाला नवव्या महिन्यात एक गोवर लसीचे व पंधराव्या महिन्यात किंवा दीड वर्ष पूर्ण झाल्यावर बुस्टर (फेरडोल) इंजेक्शन द्यावे. गोवर लसी नंतर ताप किंवा गाठ येत नाही.हे इंजेक्शन त्वचेखाली देतात. या लसीसाठी शितकापाट आवश्यक आहे.
5) द्विगुणी लस (Double Vaccine)
यामध्ये दोन प्रकारच्या लस असतात. एक म्हणजे घटसर्प व धनुर्वात प्रतिबंधक लस आहे. यात डांग्या खोकला विरुद्ध लस नसते. कारण चौथ्या वर्षानंतर दांड्या खोकला होण्याची शक्यता कमी असते. चौथ्या वर्षाच्या बुस्टरसाठी या लसीची इन्जेक्शन व पोलिओ डोस दिला जातो. कधीकधी काही कारणांमुळे मुलांना तीन वर्षे कोणतीच लस दिली नसेल तर प्रत्येक महिन्यात द्विगुण लसीची तीन इंजेक्शने व पोलिओ डोस द्यावेत. एक वर्षाने दोन्हीचे बूस्टर व पाच वर्षाने दुसरा बूस्टर द्यावा. द्विगुणी लस हि देखील महत्वाची लस आहे.

लसीकरण हा महत्वाचा विषय आहे याबद्दल जागृतता घडून यावी असे बरेच प्रयत्न सुरु आहेत. मुलांसाठी लसीकरण हे खूप महत्वाचे आहे कारण याने आपण बरेच भावी आजार टाळू शकतो. बरेच आजार हे लसीकरणामुळे पूर्ण नाहीसे करण्यात यश आले आहे. तसेच लसीकरणामुळे मृत्युदर देखील बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. मुलाच्या भावी आयुष्यातील सदृढ शारीरिक जीवनासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे ठरले आहे. लसीकरणबाबत जागृतीसाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये लसीच्या किमती देखील कमी आहेत तर काही लसी मोफत देखील असतात. लसीकरणाने हानी पोहचत नाही उलट फायदाच होतो म्हणून हे मूल्य लक्षात घेऊन प्रत्येक मुलाला लसीकरण करणे महत्वाचे आहे.

केंद्रीय कॅबिनेटमध्ये आता भाजपच्या बाहेरचे कुणीही नाही,निधनांनी मंत्री संख्या झाली कमी

0

गेल्यावर्षी 30 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त 57 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यामध्ये 24 कॅबिनेट मिनिस्टर, 9 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 24 राज्यमंत्री सामिल होते. अरविंद सावंत, हरसिमरत कौर बादल यांचा राजानामा आमइ रामविलास पासवान यांच्या निधनानंतर आता 21 कॅबिनेट राहिले आहेत. रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर राज्यमंत्र्यांची संख्या कमी होऊन 24 वरुन 23 वर आली आहे.

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर मोदी सरकारमध्ये भाजपव्यतिरिक्त NDA युतीमध्ये केवळ रामदास आठवले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) राहिले आहेत. तर केंद्रीय कॅबिनेटमध्ये तर भाजपच्या बाहेरचे कुणीही नाही, कारण आठवलेही राज्यमंत्री (मिनिस्टर ऑफ स्टेट) आहेत. त्याच्याजवळ सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री ही जबाबदारी आहे.

मोदी सरकारच्या दूसऱ्या कार्यकाळात केंद्रीय कॅबिनेटमध्ये सुरुवातीला NDA युतीमधून शिवसेनेचे अरविंद सावंत, शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल आणि लोकजनशक्ति पार्टीचे रामविलास पासवान होते.

JDU केंद्र सरकारमध्ये सामिल नाही, मात्र समर्थन आहे
शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत NDA चा राजीनामा दिला होता. अकाली दलाने गेल्या महिन्यात शेतकरी बिलाच्या विरोधात सरकारची साथ सोडली होती. यापूर्वी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी मोदी कॅबिनेटमध्ये फूड प्रोसेसिंग मिनिस्टरचे पद सोडले होते. नीतीश कुमारचा पक्ष JDU का कोणताही सदस्य मोदी कॅबिनेटमध्ये नाही, मात्र NDA चा भाग असल्याच्या नात्याने सरकारला समर्थन जारी ठेवले आहे.

माजी नगरसेवक दत्तोबा ससाणे यांचे निधन

0

पुणे-माजी नगरसेवक दत्तोबा ससाणे यांचे शुक्रवारी (ता. 9) निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. ससाणेनगरचे सरपंच ते महापालिकेचे नगरसेवक असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. ससाणे यांनी 2001 पर्यंत सुमारे 25 वर्षे किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीत नोकरी केली.

1984 ते 1997 या काळात ते ससाणेनगरचे सरपंच होते. तर 2002 ते 2012 असे सलग दोन टर्म नगरसेवक म्हणून हडपसरचे प्रतिनिधित्व केले. नगरसेवक असताना त्यांनी रामटेकडी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा प्रश्न सोडविला. त्यामुळे हडपसर परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला. सोलापूर रस्त्याच्या रुंदीकरणाचा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या कारकिर्दीतच सोडविला गेला. त्यामुळे हडपसरचा विकास होण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. नगरसेवक असताना त्यांचे सर्व पक्षीयांशी सलोख्याचे संबंध होते.

हडपसरच्या विकासाबाबत त्यांनी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केली. सध्या त्यांचे पुत्र योगेश ससाणे त्यांचा वारसा चालवित असून ते नगरसेवक होण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हडपसर परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

चित्रपट निर्माते अण्णा देशपांडे यांचे निधन

0

सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसैनिक, प्रसिद्ध चित्रपट निर्माते, मराठी – हिंदी चित्रपटांचे वितरक व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संचालक मधुकर उद्धव तथा अण्णा देशपांडे (74) यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, महेश व दिनेश ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या इच्छेखातर काल मध्यरात्रीनंतर त्यांना सातारला आणले जात असताना आनेवाडीजवळ त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चित्रपट सृष्टीत दुःखाची छाया पसरली. अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी प्रभावित
अण्णा देशपांडे यांचे मूळ गाव जावली तालुक्यातील रायगाव. पण अनेक वर्षांपासून त्यांचे सातारा शहरात वास्तव्य होते. धडाडीचे व परखड बोलणारे धडाडीचे शिवसैनिक होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेसाठी वाहून घेतले होते. काही काळ त्यांनी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती. अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे.

जिल्ह्यात शिवसेना वाढावी ही त्यांची तळमळ होती. याच भूमिकेतून त्यांनी शिवसेनेच्या बैठका, मेळावे यासाठी स्वतःचे मंगल कार्यालय हवे तेव्हा उपलब्ध करून दिले. शिवसेनेवर त्यांची इतकी श्रध्दा होती, की त्यांच्या हॉटेलचे प्रवेशद्वारही त्यांनी धनुष्याच्या आकाराचे बनवले आहे. सातारकरांच्या सेवेसाठी अनेक वर्षांपासून त्यांनी रूग्णवाहिकाही ठेवली आहे.

अजरामर चित्रपटांची निर्मिती
चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचे ते साक्षीदार होते. जवळपास तीस वर्षे त्यांनी मराठी – हिंदी चित्रपटांचे वितरक म्हणून काम पाहिले. या काळात गावोगावी जावून त्यांनी 16 एमएम मशिनद्वारे चित्रपट प्रदर्शन केले. या अनुभवाच्या जोरावर ते चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरले. ‘तांबव्याचा विष्णू बाळा’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘बेभान’, ‘जखमी कुंकू’ या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. त्यातील ‘तांबव्याचा विष्णू बाळा’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ हे त्यांचे चित्रपट तुफान यशस्वी झाले. त्यांना लोकप्रियता मिळाली आणि आणि विविध पारितोषिकांच्या रूपाने राजमान्यताही लाभली.

मार्केट यार्डातील नवीन फुलबाजाराची आमदार अशोक पवार यांनी केली पाहणी

0

पुणे- मार्केट यार्डातील प्रस्तावित फुलबाजाराची शिरूर, हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यानी प्रस्तावित फुलबाजारातील अडचणींचा पाडाच त्यांच्यासमोर मांडला. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या मागण्यांचे त्यांना निवेदन देण्यात आले. यावर चर्चा करून मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासन पवार यांनी दिले.

त्यावेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, अखिल पुणे
फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर, सागर भोसले, बापू कड आदी उपस्थित होते
पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आडत्यांनी मागणी केल्याप्रमाणे फुलबाजार बांधण्यात आलेला नाही. नवीन फुलबाजार बांधताना ठराविकच लोकांना विश्‍वासात घेतले असून इतरांचा विचार केला नाही. बाजार समितीने आडत्यांकडून एक लाख रुपये अनामत रक्कम घेतली आहे.

ही रक्कम आडत्यांनी स्वखुशीने दिलेली नाही. फुलांच्या बाजार हा गोलाकार आसावा. त्यामध्ये प्रत्येकाला समोरील भाग सारखा असावा. प्रत्येकाला सारखे गाळे असावेत. जागा वाढवून देण्याबाबत कोणताही विचार करण्यात आला नाही. सध्याच्या जागेपेक्षा नवीन बाजारात कमी जागा मिळणार आहे. नवीन फुलबाजारात दहा मजल्यांचा असणार आहे. त्यामुळे नवीन बाजारात आवक जास्त झाल्यास बाजार विस्कळीत होईल.

पहिला गाळा सहाव्या मजल्यावर येत आहे. पाचव्या मजल्यावर ऑक्‍शन हॉल शेतकऱ्यांनी विकल्यावर आमच्याकडे सहाव्या मजल्यावर शेतकरी कसे येणार आणि एवढी मोठी किंमत देवून आम्ही गाळे विकत तरी कशासाठी घ्यायचे, असा सवालही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला

आज महाराष्ट्रात ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान- तर २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी

0

मुंबई, दि.१०: राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.७६ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. सध्या २ लाख २१ हजार १५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७५ लाख ६९ हजार ४४७ नमुन्यांपैकी १५ लाख १७ हजार ४३४ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५ टक्के) आले आहेत. राज्यात  २२ लाख  ६८ हजार ५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २४ हजार ९९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले ११,४१६ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३०८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२२०३ (४८), ठाणे- २०८ (२), ठाणे मनपा-३७५ (६), नवी  मुंबई मनपा-३०९ (६), कल्याण डोंबिवली मनपा-३१५ (२), उल्हासनगर मनपा-३१, भिवंडी निजामपूर मनपा-३२ (१२), मीरा भाईंदर मनपा-१६६ (१), पालघर-६८, वसई-विरार मनपा-१७१ (४), रायगड-१६२ (१), पनवेल मनपा-१६३ (६), नाशिक-२२७ (८), नाशिक मनपा-४९८ (८), मालेगाव मनपा-१६, अहमदनगर-५१५ (१८), अहमदनगर मनपा-२९८ (६), धुळे-४१, धुळे मनपा-२३ (१), जळगाव-१२२ (५), जळगाव मनपा-६० (१), नंदूरबार-३१, पुणे- ६३४ (२२), पुणे मनपा-७२४ (१६), पिंपरी चिंचवड मनपा-४१४ (८), सोलापूर-१९२ (२२), सोलापूर मनपा-५१, सातारा-४५२ (२६), कोल्हापूर-११३ (१), कोल्हापूर मनपा-३४, सांगली-२५२ (७), सांगली  मिरज कुपवाड मनपा-४८ (३), सिंधुदूर्ग-४४ (२), रत्नागिरी-५६ (४), औरंगाबाद-९७ (२),औरंगाबाद मनपा-१७५ (२), जालना-८७ (१), हिंगोली-२०, परभणी-३४, परभणी मनपा-२९, लातूर-५४ (२), लातूर मनपा-४७ (३), उस्मानाबाद-८९ (७), बीड-१२५ (८), नांदेड-८१, नांदेड मनपा-८८ (२), अकोला-१३, अकोला मनपा-२४, अमरावती-५५ (४), अमरावती मनपा-४९ (२), यवतमाळ-६० (२), बुलढाणा-६१, वाशिम-३० (४), नागपूर-२४८ (५), नागपूर मनपा-३४७ (१३), वर्धा-७९ (१), भंडारा-९४ (४), गोंदिया-६४ (३), चंद्रपूर-१०९ (३), चंद्रपूर मनपा-४८ (४), गडचिरोली-१४२, इतर राज्य-१९.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (२,२७,२७६) बरे झालेले रुग्ण- (१,९२,०९६), मृत्यू- (९३९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४३७), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५,३५२)

ठाणे: बाधित रुग्ण- (२,०३,०१६), बरे झालेले रुग्ण- (१,६६,४७१), मृत्यू (५१६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,३७८)

पालघर: बाधित रुग्ण- (३९,६७१), बरे झालेले रुग्ण- (३२,९३०), मृत्यू- (९४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८००)

रायगड: बाधित रुग्ण- (५५,३१०), बरे झालेले रुग्ण-(४७,३६५), मृत्यू- (१३३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६०४)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (९१९५), बरे झालेले रुग्ण- (७०७५), मृत्यू- (३११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८०९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४४३५), बरे झालेले रुग्ण- (३३६९), मृत्यू- (११६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५०)

पुणे: बाधित रुग्ण- (३,१४,११८), बरे झालेले रुग्ण- (२,६१,३१६), मृत्यू- (६२१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६,५८३)

सातारा: बाधित रुग्ण- (४२,१९७), बरे झालेले रुग्ण- (३३,१११), मृत्यू- (१२४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८३६)

सांगली: बाधित रुग्ण- (४२,६७१), बरे झालेले रुग्ण- (३४,५९८), मृत्यू- (१३११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७६२)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४५,७१४),बरे झालेले रुग्ण- (३९,८२८), मृत्यू- (१४५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४३२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३९,५३९), बरे झालेले रुग्ण- (३३,५०४), मृत्यू- (१२५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७७८)

नाशिक: बाधित रुग्ण- (८५,०९९), बरे झालेले रुग्ण- (६९,५१०), मृत्यू- (१४३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४,१५२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४९,६२०), बरे झालेले रुग्ण- (४१,५४९), मृत्यू- (७७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(७२९४)

जळगाव: बाधित रुग्ण- (५०,८३७), बरे झालेले रुग्ण- (४४,७०१), मृत्यू- (१३०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८३३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५८१५), बरे झालेले रुग्ण- (५००९), मृत्यू- (१२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७९)

धुळे: बाधित रुग्ण- (१३,२१४), बरे झालेले रुग्ण- (१२,२४१), मृत्यू- (३३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३८,७४३), बरे झालेले रुग्ण- (२८,२००), मृत्यू- (९३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६०८)

जालना: बाधित रुग्ण-(८३३८), बरे झालेले रुग्ण- (६६८६), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२५)

बीड: बाधित रुग्ण- (११,८३४), बरे झालेले रुग्ण- (८९८५), मृत्यू- (३४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०८)

लातूर: बाधित रुग्ण- (१९,११९), बरे झालेले रुग्ण- (१५,०६५), मृत्यू- (५४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५११)

परभणी: बाधित रुग्ण- (६०७९), बरे झालेले रुग्ण- (४३८२), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४७०)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३३०७), बरे झालेले रुग्ण- (२७५२), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८९)

नांदेड: बाधित रुग्ण- (१७,५८३), बरे झालेले रुग्ण (१३,८३९), मृत्यू- (४५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२८७)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१३,९२९), बरे झालेले रुग्ण- (१०,७२१), मृत्यू- (४२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७८५)

अमरावती: बाधित रुग्ण- (१५,२६५), बरे झालेले रुग्ण- (१३,०२१), मृत्यू- (३१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९२९)

अकोला: बाधित रुग्ण- (७८४६), बरे झालेले रुग्ण- (७०४६), मृत्यू- (२४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५०)

वाशिम: बाधित रुग्ण- (४९६१), बरे झालेले रुग्ण- (४२३६), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२३)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (८९२१), बरे झालेले रुग्ण- (६७७०), मृत्यू- (१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०१९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (९६५९), बरे झालेले रुग्ण- (८२०६), मृत्यू- (२७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११८२)

नागपूर: बाधित रुग्ण- (८६,२९९), बरे झालेले रुग्ण- (७३,९८१), मृत्यू- (२२९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,०१३)

वर्धा: बाधित रुग्ण- (५४५५), बरे झालेले रुग्ण- (३७५४), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५७१)

भंडारा: बाधित रुग्ण- (७००२), बरे झालेले रुग्ण- (५१८०), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७७३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७९६७), बरे झालेले रुग्ण- (६९०८), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६२)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१२,२९२), बरे झालेले रुग्ण- (८५०१), मृत्यू- (१७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६१२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३३३८), बरे झालेले रुग्ण- (२४४५), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१७७०), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११८८)

एकूण: बाधित रुग्ण-(१५,१७,४३४) बरे झालेले रुग्ण-(१२,५५,७७९),मृत्यू- (४०,०४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४५९),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,२१,१५६)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३०८ मृत्यूंपैकी १६८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ८० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८० मृत्यू  पुणे – २६, सातारा – ७, अहमदनगर -७, बीड – ६, नागपूर -६, नाशिक -६, सोलापूर -६, भंडारा -२, चंद्रपूर -२, गोंदिया -२, जळगाव -२, नांदेड -२, यवतमाळ -२, अकोला -१, औरंगाबाद -१, रायगड – १ आणि सांगली -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

समाजाभिमुख संशोधने व्यवसायात रूपांतरित व्हावेत

0

डॉ. नितीन करमळकर यांचे मत; एसीपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन व ‘टीटीए’ यांच्यात सामंजस्य करार
पुणे : “उद्योग आणि शिक्षणसंस्थांमधील दरीविषयी नेहमी बोलले जाते. पण अलीकडच्या काळात ही दरी दूर करण्यासाठी औद्योगिक संस्था आणि शिक्षणसंस्था एकत्रित येत आहेत. उद्योगांना आवश्यक आणि समाजाभिमुख संशोधनावर शिक्षण संस्थांनी भर देण्याची आवश्यकता आहे. तसेच अशा संशोधनांना व्यवसायात रूपांतरित करण्याची गरज असून, त्यासाठी एकमेकांतील सामंजस्य करार उपयुक्त ठरतील,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसीपीपीयू) रिसर्च पार्क फाउंडेशन आणि टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशन (टीटीए) यांच्यात सामंजस्य करार झाला, त्यावेळी डॉ. करमळकर बोलत होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. भारत आहुजा, रिसर्च पार्क फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत घारपुरे, सचिव विलास रबडे, विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश गोसावी, उद्योजक विश्वास काळे, अनिल चैतन्य आदी उपस्थित होते.

डॉ. नितीन करमळकर पुढे म्हणाले, ” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधनांना बाजारपेठेत व्यावसायिक रूपात आणण्याच्या दृष्टीने रिसर्च पार्क फाउंडेशनची स्थापना झालेली आहे. या फाउंडेशनबरोबर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असोसिएशनचा करार होणे ही चांगली बाब आहे. उद्योग क्षेत्रात अनेक वर्षे काम केलेली मंडळी या असोसिएशनमध्ये असल्याने विद्यापीठातील संशोधकांना उद्योजकता विकास साधण्यासाठी त्यांचा अनुभव कामी येईल. तसेच या संशोधकांचे तंत्रज्ञान कंपन्यांपर्यंत पोहोचले, तर त्यांना स्टार्टअप सुरु करण्यात, व्यवसाय उभारण्यात मदत होईल. त्यातून अनेक नवतंत्रज्ञान विकसित होतील. हे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवून त्याचा त्यांना लाभ करून देता येईल.”

यशवंत घारपुरे म्हणाले, “शिक्षणसंस्थांतील संशोधनांना कंपन्यांशी जोडून देण्याचा आमचा उपक्रम आधीपासूनच सुरु झाला आहे. मॉडर्न कॉलेजबरोबर इलेक्ट्रिकल व्हेइकलवर संशोधन करून तीनचाकी वाहने निर्मितीचे काम सुरु आहे. पीएचडी करत असलेल्या तरुण लोकांच्या ज्ञानाचा उपयोग उद्योगांना करून घेऊन त्यातून व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न कसा करता येईल, यासाठी आमची संस्था काम करत आहे.”
 डॉ. अरविंद शाळीग्राम म्हणाले, “या करारामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उद्योगांशी संवाद करता येणार आहे. उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ पदावरील आणि अनुभवी लोकांचा समावेश ‘टीटीए’मध्ये असल्याने त्याचा लाभ होईल. येथील संशोधन व्यवसायाच्या रूपात समाजापर्यंत पोहोचताना आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल.” विलास रबडे यांनी या कार्यक्रमाचे समन्वयन केले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा जनसंवाद उपक्रम

0

कोथरूड मधील सोसायटीतील नागरिकांच्या भेटीगाठी

पुणे-कोरोनानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या मतदारसंघात जनसंवाद उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत मतदार संघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच, कोरोनानंतर आवश्यक उपाययोजना संदर्भात चर्चा करत आहेत.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्व प्रशासकीय यंत्रणा काही लागल्यामुळे नागरी समस्यांकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या मतदारसंघात जनसंवाद उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमाअंतर्गत ते नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन समस्या जाणून घेत आहेत.

आज त्यांनी बाणेर-पाषाण लिंक रोड, हॅप्पी कॉलनी, अनंतकृपा सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. तर गेल्या आठवड्यात मतदार संघातील विविध सोसायटीतील नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच कोरोनानंतरच्या आवश्यक उपाययोजना संदर्भात चर्चा केली.

यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आयुक्तांची भेट घेऊन, तोडगा काढणार असल्याचेही सांगितले. तसेच, आगामी काळात मतदार संघातील कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्यांसाठी एक काऊन्सिलिंग शिबीर राबवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘पंतप्रधानांना 8400 कोटींचे विमान अन् जवानांना नॉन बुलेटप्रूफ ट्रकमधून शहीद होण्यासाठी पाठवले जातेय’, राहुल गांधींचा मोदी सरकारवर आरोप

0

काँग्रेस नेते राहुल गांधी विविध कारणांवरुन शिवसेनेवर निशाणा साधताना दिसत असतात. आता त्यांनी व्हीव्हीआयपींसाठी विमान खरेदी केल्यानंतर केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्रकमधून प्रवास करणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत लिहिले की, ‘आपल्या जवानांना नॉल बुलेटप्रूफ ट्रकमधून शहीद होण्यासाठी पाठवले जात आहे आणि पंतप्रधानांसाठी 8400 कोटींचे विमान…हा न्याय आहे का?’ असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे. केंद्र सरकारकडून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठी खरेदी करण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी विमानांच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

आज पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एका ट्रकमध्ये जवान बसले आहे जे आपसात बोलत आहेत. त्यामधील एक जवान म्हणतो की, नॉन बुलेट प्रूफ गाड्यांमध्ये पाठवून आपल्या जीवाशी खेळ केला जात आहे. गेल्या आठवड्यात शेतकरी विरोधी बिलाच्या विरोधात पंजाबमधील आंदोलनादरम्यान राहुल गांधींनी आरोप लावला होता की, पीएम मेदींनी देशाच्या विरोधी निती आणि कार्यांनी देशाला कमजोर केले आहे.

आम्ही फक्त सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तीनच राजांना मानतो; प्रकाश आंबेडकरांचे उदयनराजे समर्थकांच्या टीकेला प्रत्युत्तर

0

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले आमनेसामने आले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही तर सगळ्यांचे आरक्षण रद्द करा अशी मागणी उदयनराजे यांनी केली होती. यावरून उदयनराजे बिनडोक असल्याची टीका आंबेडकर यांनी केली होती. यानंतर उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडले होते. आता त्यालाच प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे.” पुतळे जाळा, काहीही केले तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका वैचारिक आहे, आणि ती कायम राहील, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. ते म्हणाले होते की, ‘दोन्ही राजांचा मराठा आरक्षणप्रश्न बंदला पाठिंबा असल्याचे वाचनात कुठेही आलेले नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. मात्र ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर देत असल्याचे दिसत आहे. ज्या माणसाला राज्य घटना माहिती नाही. ‘आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर सर्वांचे आरक्षण रद्द करा’, अशी ते भूमिका मांडतात. त्यावरून त्यांना भाजपने राज्यसभेवर कसे पाठवले? हाच प्रश्न उपस्थित होतो’ असा टोलाही त्यांनी उदयनराजेंना लगावला होता.

भोसरी येथील मृतांच्या कुटुंबियांना महावितरणकडून मदतीचा धनादेश

0

पिंपरी, दि. 10 ऑक्टोबर 2020 : भोसरी येथील विद्युत रोहित्राच्या स्फोटाच्या दुर्दैवी घटनेतील तीन मृतांच्या कुटुंबियांना महावितरणकडूनशुक्रवारी (दि. 9) प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

भोसरी येथील इंद्रायणीनगरमध्ये राजवाडा बिल्डींग 2 जवळ विद्युत रोहित्राचा दि. 4 सप्टेंबरला दुपारी दीडच्या सुमारास स्फोट झाला होता. या घटनेत शारदा दिलीप कोतवाल, हर्षदा सचिन काकडे व त्यांची मुलगी शिवण्या यांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुबियांना महावितरणकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. त्याप्रमाणे भोसरी विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता श्री. अमित बारटक्के यांनी मदतीच्या रकमेचे धनादेश कुटुबियांना सुपूर्द केले. महावितरणकडून ही मदतीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इतर शासकीय विभागांकडून काही कागदपत्रांची प्रतीक्षा सुरु होती. कोरोनाच्या संकटामुळे त्यास विलंब होत असल्याचे पाहून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन वैयक्तिकस्तरावर पाठपुरावा करीत आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता केली. त्यानंतर मृतांच्या कुटुबियांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आले.

दरम्यान, पिंपरी व भोसरी शहरामधील रोहित्रांच्या परिसरातील साफसफाई तसेच देखभाल व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत 2412 रोहित्रांच्या परिसरातील झाडीझुडपे, वेली काढणे, रोहित्रांची तपासणी करणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे आदी कामे करण्यात आली आहे.

सूक्ष्म- लघुउद्योग निर्यात पदोन्नती महाराष्ट्र संचालकपदी डॉ. आदित्य पतकराव यांची निवड

0

पुणे– नवी सांगवी येथील आदित्य डेंटल केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ . आदित्य पतकराव यांची केंद्र शासनाच्या सुक्ष्म , लघु , मध्यम उद्दोग मंत्रालयातील निर्यात परीषदेच्या संचालक पदी निवड करण्यात आली.

नवीदिल्ली येथे नुकतेच केंद्र शासनाच्या सुक्ष्म , लघु , आणि उद्दोग परीषदेचे अध्यक्ष तथा भाजपाचे राष्ट्रीय परीषदेचे अध्यक्ष तथा हरिणारायण राजभार यांच्या हस्ते सदरील निवडीचे पत्र डॉ.आदित्य पतकराव यांना देण्यात येवून सन्मान करण्यात आला. केंद्र शासनाच्या सुक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातील निर्यात पदोन्नती परिषदेच्या संचालक करण्यात आलेल्या निवडी बद्दल डॉ . आदित्य पतकराव यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग एम एस एम ई चे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , एम.एस. एम. ईचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापचंद्रा सारंगी, माजी मंत्री आणि भाजप राष्ट्रीय परिषदेचे सदस्य तथा सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्दोग मंत्रालय परीषदेचे अध्यक्ष हरिनारायण राजभार यांचे आभार मानले. आपण यापुढे राष्ट्रकार्यासाठी सदैव कर्तव्य तप्तर राहुन आपल्याला केंद्र शासनाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास व्यक्त केला आहे . विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी प्रयत्न करणार केंद्र शासनाच्या सुक्ष्म , लघु आणि मध्यम उद्दोग मंत्रालयाच्या निर्यात परीषदेच्या संचालक पदी झालेली निवड महाराष्ट्रातील एकमेव निवड असुन तीन वर्षासाठी राहणार आहे.

माणुसकीचे नाते दृढ करणाऱ्या सेवावृत्तींचा सन्मान प्रेरणादायी-राजेश पांडे

0

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे ‘सूर्यगौरव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ वितरण
पुणे : “कोरोनाने माणसातील जातीभेद नष्ट करत सेवाकार्य हेच अधिक महत्वपूर्ण असल्याचे अधोरेखित केले आहे. लॉकडाऊनच्या काळात लाखो लोकांना अन्न, आरोग्यसुविधा पुरविण्याचे काम अनेक सेवावृत्तींनी केले. माणुसकीचा बंध घट्ट करणाऱ्या या सेवाकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे,” असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य व नॅशनल युथ को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन राजेश पांडे यांनी व्यक्त केले.

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर्यगौरव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ‘सूर्यगौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे सचिन इटकर, भाजप नेत्या श्वेता शालिनी, प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या सरिता दीदी, पत्रकार राजू वाघमारे, उद्योजक डॉ. दीपक तोष्णीवाल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेश बाहेती यांना, तर ‘सुर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ राजेश पांडे, ‘रक्ताचे नाते’ संस्थेचे राम बांगड, ‘जागृती ग्रुप’चे राज देशमुख, कौशल्य विकास क्षेत्रातील संजय गांधी, युवा सामाजिक कार्यकर्ते किरण साळी, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, ‘उचित माध्यम’चे संचालक जीवराज चोले यांना प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्ता’च्या बावधन प्रांगणातील बन्सीरत्न सभागृहात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी ‘सुर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, कार्यकारी संचालक प्रा. अक्षीत कुशल, मुख्य विकास अधिकारी प्रा. रामचंद्रन यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राजेश पांडे म्हणाले, “तरुणांमध्ये मोठी क्षमता असते. त्यांना दिशा दिली, तर त्यांच्या हातून भरीव कार्य घडते. राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना आम्ही मास्क शिवण्याचा उपक्रम दिला. आजवर ७० हजार विद्यार्थ्यांनी मिळून जवळपास ३५ लाख मास्क शिवले आहेत. त्याचबरोबर गेल्यावर्षी हरित वारी उपक्रमात पालखी मुक्कामावर विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली होती. विद्यापीठात एक लाख वृक्षलागवडीचा कार्यक्रम झाला होता. त्याची नोंद अनेकांनी घेतली.”
सचिन इटकर म्हणाले, “लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत होते. त्यावेळी समाजातील अनेक सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांनी त्यांना आधार दिला. अशा व्यक्ती-संस्थांना सन्मानित करून सूर्यदत्ता परिवाराने सेवेचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे.”
श्वेता शालिनी म्हणाल्या, “सूर्य जसा शाश्वत आणि प्रेरणादायी असतो, तसेच निस्वार्थ सेवाकार्य आपल्या सगळ्यांकरिता प्रेरणा देणारे असते. भारतीयांनी आलेल्या या संकटाचा सामना धैर्याने केला. लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य भावनेतून नाते जपले. संकटाला संधी मानून काम करण्याची प्रेरणा पंतप्रधानांनी दिली.”
डॉ. दीपक तोष्णीवाल म्हणाले, “कोरोना काळात अडकलेल्या लोकांना आरोग्य सुविधा, निवास-भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली. अनेक सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी पुढाकार घेतला. कोरोनाच्या या लढ्यात अनेक डॉक्टर, पोलिसांनी आपले जीवनदान दिले. त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ राहावे.
राम बांगड म्हणाले, “रक्ताची, प्लाझ्माची आज मोठी गरज आहे. राज्याच्या विविध भागातून, तसेच बाहेरूनही प्लाझ्माला मागणी आहे. पुणेकरांचे त्यात योगदान मोठे आहे. जास्तीत जास्त गरजूना रक्त आणि प्लाझ्मा पुरविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मी स्वतः तीनवेळा प्लाझ्मादान केले आहे. त्यामुळे लोकांनी पुढे येऊन प्लाझ्मा, रक्तदान करावे.”
सरिता दीदी म्हणाल्या, “भारतीयांनी निस्वार्थ दातृत्वाची भावना आहे. सेवेची संधी मिळणे हा ईश्वराचा प्रसाद असतो. आपण लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोरोनाच्या भीतीने अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे निडर बनून लोकांना कोरोनाच्या भीतीपासून दूर नेले पाहिजे. आपल्यातील करुणा जागृत ठेवून त्यांच्यासाठी काम करावे.”
राजेंद्र सरग म्हणाले, “या कठीण काळात अफवांचे पीक वाढत असताना माहिती खात्याकडून अधिकृत बातम्या देण्याचे काम करता आले. विभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्यातील निर्णयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम गेल्या सात महिन्यात नियमितपणे केले.”

राजेश बाहेती म्हणाले, “समाजातील अनेकांना गरज होती आणि ती पूर्ण करण्याचे काम ईश्वराने माझ्या हातून करून घेतले. कम्युनिटी किचनच्या माध्यमातून लाखो लोकांना जेवण देण्याचे सत्कर्म आमच्या हातून घडले.” राज देशमुख यांनी जागृती ग्रुपच्या माध्यमातून, तसेच पायी जाणाऱ्या मजुरांसाठी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल सांगितले.
संजय गांधी यांनी कौशल्य विकास क्षेत्रात करत असलेल्या कार्याविषयी माहिती दिली. जीवराज चोले यांनी विद्यार्थी सहायक समिती, माजी विद्यार्थी मंडळ आणि पत्रकार मित्र परिवाराच्या माध्यमातून कोरोना काळात केलेल्या कार्याविषयी सांगितले. मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पुरस्कार सोहळ्यामागील भूमिका स्पष्ट केली. प्रा. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रामचंद्रन यांनी आभार मानले.

पुण्याचा निर्धार – कोरोना हद्दपार

0

आरोग्‍य शिक्षण हा मूळ पाया असलेल्‍या ‘माझे कुटुंब -माझी जबाबदारी’ या मोहिमेची पुणे जिल्‍ह्यात यशस्‍वी अंमलबजावणी होत आहे. तथापि, सप्‍टेंबर महिन्‍यात कोरोनाबाधितांच्‍या संख्‍येत अचानक वाढ झाल्‍याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. ऑक्‍टोबर महिन्‍यात कोरोना बाधितांच्‍या संसर्गाचे प्रमाण स्थिर आहे, हे प्रमाण हळूहळू कमी होण्‍यासाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागात सामूहिक प्रयत्‍नांतून ‘पुण्याचा निर्धार – कोरोना हद्दपार’चा नारा देण्‍यात आला आहे.

            9 मार्च 2020 पासून पुणे शहर आणि परिसरात कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते. शासन-प्रशासन स्‍तरावर आवश्‍यक त्‍या उपाययोजना केल्या जात होत्‍या. अर्थव्‍यवस्‍थेचे चक्र सुरळीत चालू राहण्‍यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ अर्थात ‘पुनश्‍च हरि ओम’ करण्‍यात आले. ‘अनलॉक’ची प्रक्रिया टप्‍प्‍याटप्‍प्‍याने चालू असतांना नागरिकांनी स्‍वयंशिस्‍त पाळणे गृहित धरण्‍यात आले होते. तथापि, स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष करुन इतरांचे आरोग्‍य धोक्‍यात आणणाऱ्या व्‍यक्‍तींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला. कोरोना विषाणूबाबत अजून संपूर्णपणे माहिती नाही. त्‍यावरील लशींचे संशोधन चालू आहे. या परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, अशा उपाययोजना करणे, हाच प्रतिकाराचा खरा मार्ग उरतो. यामध्‍ये बाधित रुग्‍ण शोधणे, त्‍यांच्‍यावर लक्षणे पाहून तातडीने उपचार सुरु करणे, बाधित रुग्णांच्‍या संपर्कात आलेल्या व्‍यक्‍ती शोधणे, सहव्‍याधी रुग्‍णांवर आवश्‍यकतेनुसार उपचार करणे, संसर्गाची साखळी तोडण्‍यासाठी विलगीकरण करणे यावर भर देण्‍यात आला. हे करत असतांना कोरोनाबाधित किंवा त्‍यांच्‍या संपर्कातील व्‍यक्‍ती घाबरुन जाणार नाही, याचीही काळजी घ्‍यावी लागत होती.  पुणे जिल्‍ह्यात पहिला रुग्‍ण सापडल्‍यानंतर राज्‍याचेच नव्‍हे तर देशाचे लक्ष पुण्‍याकडे होते. संभाव्‍य धोके लक्षात घेवून वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्‍यात येत होत्‍या. जिल्‍ह्यातील भौगोलिक रचना, हवामान, उपलब्‍ध साधने यांचा विचार करुन सर्व संबंधित यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहेत. प्रसंगी कायद्याचा वापर करुन लोकांमध्‍ये आरोग्‍यविषयक शिस्‍त निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न झाला. समुपदेशनाचाही प्रयत्‍न झाला. उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधींच्‍या सूचना लक्षात घेवून आवश्‍यकते निर्णय घेतले. कोरोनाचा संसर्ग रोखणे हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून संबंधित यंत्रणांना निर्णयाचे पूर्ण स्‍वातंत्र्य दिले.

विभागीय आयुक्‍त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्‍त विक्रमकुमार, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्‍त श्रावण हर्डीकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, माजी आरोग्‍य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, डॉ. दिलीप कदम, आरोग्‍य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्‍यासह विविध विभागाचे अधिकारी हेही निर्णयप्रक्रियेत सहभागी होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍यासाठी सामाजिक कृतीशील गटाची आवश्‍यकता दिसून आल्‍याने या गटाची स्थापना करण्‍यात आली.

            हिवाळ्याचा ऋतू, आगामी नवरात्रीचा सण, उघडण्‍यात आलेले हॉटेल-रेस्‍टॉरंट-बार या सर्व बाबी लक्षात घेऊन कोरोनाचा संसर्ग वाढण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन आणि स्‍वयंसेवी संस्‍था- संघटनांचा एकत्र कृतीशील गट स्‍थापन करण्‍यात आला. माजी आरोग्‍य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांच्‍या मार्गदर्शनाखाली लोकसहभाग, त्याद्वारे कोविडसंबंधी गैरसमज दूर करणे, प्रतिबंधक उपायांची योग्य अंमलबजावणी, शासन व नागरिकांमध्ये सुसंवाद आणि प्रशिक्षण व संवाद साहित्य तयार करणे अशी कार्यपध्‍दती ठरविण्‍यात आली. प्रशासकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य क्षेत्र आणि सामाजिक चळवळीतील अनुभवी कार्यकर्त्यांच्‍या समूहातून अधिकाधिक लोकसहभाग मिळवण्‍यावर भर देण्‍यात आला आहे. यासाठी 1) लोकसहभाग 2)  सार्वजनिक आरोग्य आणि 3) माहिती-शिक्षण-संवाद (आयइसी) या विषयांवरील तीन उप गट स्‍थापन करण्‍यात आले आहेत.

            पुण्यासाठी समांतर अभियान का? याबाबत माजी आरोग्‍य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले की, सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ती तशीच ठेवण्यासाठी किंबहुना कमी करण्‍यासाठी अभियान प्रयत्न करेल. आर्थिक घडी परत बसविण्यासाठी अनलॉक आवश्यक आहे. मात्र,  अनलॉक ५.० नंतर विविध ठिकाणी होणारी लोकांची गर्दी, सणासुदीमुळे वावर वाढणार त्यामुळे नव्या दमाने लोकांशी संवाद साधला जाईल. लोकांच्या पुढाकारातून ६ प्रमुख विषयांवर फोकस्ड उपक्रम आणि संदेश दिले जातील. प्रशासनासोबत व्यावसायिक संघटना, संस्था, लोकप्रतिनिधी, सीएसआर, सामान्य नागरिक स्वतः पुढे येतील, यासाठी प्रयत्‍न केले जातील.  लोकसहभागातून तयार झालेले संवाद साहित्य (आयइसी मटेरियल ) मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोचेल.

            अभियानाचे प्रमुख विषय –  आम्ही सावध आहोत. कोरोना अजून गेलेला नाही. आम्हाला कोरोना टाळायचा आहे. आम्ही नेहमी आणि योग्य प्रकारे मास्क घालू, इतरांनाही सांगू. कोरोनाची लागण झाल्यावर आम्ही घरी विलग राहू. सर्व काळजी घेऊन बरे होऊ, घरच्यांना सुरक्षित ठेवू. आम्ही गर्दीच्या ठिकाणी जायचे टाळणार. आम्हाला कोरोनाचा संसर्ग नकोय. मी वयस्कर आहे. बीपी/शुगर/दमा आहे. मी घराबाहेर पडणार नाही आणि विशेष काळजी घेणार. कोरोनाची लक्षणं दिसली तर आम्ही लगेच तपासणी आणि उपचार घेणार.

            अभियानाचे स्वरुप- १४  ते २५ ऑक्टोबरच्या दरम्यान पुढील क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारे कार्यक्रम घेण्‍यात येणार आहेत.  बाजारपेठा आणि व्यावसायिक क्षेत्र (मार्केट यार्ड, मंडई, दुकाने, पथारीवाले), हॉटेल, बार, हातगाडीवरील अन्न विक्रेते, चौपाट्या, शहरी वस्ती, निवासी सोसायटी, कॉलनी, सार्वजनिक वाहतूक – सरकारी बस सेवा, रिक्षा कॅब, अति जोखमीचे गट- कचरा वेचक, घरेलू कामगार, हमाल, पथारीवाले, वयस्क व्यक्ती इत्यादी.

            हे अभियान जनरल प्रॅक्टिशनर व मनोविकारतज्ज्ञ यांच्‍याकडून विलगीकरण आणि पोस्ट कोविड सेवा देण्यासाठी दुवा ठरणार आहे.  पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा व पुणे ग्रामीण या क्षेत्रात राबवले जाईल. ही अभियानाची केवळ सुरुवात असेल. यानंतरही ३ ते ६ महिने लोकांपर्यंत पोहचण्यासाठी अभियान काम करत राहील, असे माजी आरोग्‍य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांनी सांगितले. अभियानाच्‍या अंमलबजावणीसाठी सफाई कामगार, माथाडी कामगार संघटना, हमाल पंचायत, बाजार-मंडई अधिकारी, व्‍यापारी संघटना, बार असोसिएशन, वॉर्ड अधिकारी, कर्मचारी, घरकामगार संघटना, स्‍वच्‍छ, प्रवासी संघ, हॉटेल व्‍यावसायिक संघटना, तरुणांचे गट, वेटर्स, बँक कर्मचारी, रिक्षा पंचायत, वाहतूकदार संघटना, पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल), परिवहन कार्यालय, जनसंघटना, स्‍त्रीसंघटना, वस्‍तीत काम करणा ऱ्या संस्‍था, सायकियाट्रिस्‍ट असोसिएशन समुपदेशक गट, दिव्‍यांग आयुक्‍तालय पालकगट, हाऊसिंग फेडरेशन यांची मदत घेण्‍यात येणार आहे. मास्कचा नियमित वापर, वारंवार हात धुणे, विनाकारण घराबाहेर न पडणे आणि सुरक्षित अंतर राखणे याबाबत लोकांमध्‍ये जागृती करण्‍यासाठी हे अभियान पोषक ठरेल, असा विश्‍वास आहे.

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे

9423245456/ 9309854982

मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांचे समाजकार्य

0

पुणे, 10 ऑक्टोबर: कोरोनाच्या वाढत्या संसर्गजन्य काळात प्रत्येक व्यक्तीने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे, पण या बद्दल खेड्यांमध्ये अशी जागृती दिसत नाही. ही गोष्ट लक्षात ठेऊन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीमधील (टीम फार्मा पिक्सेल) च्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जागृती करण्याचा विडा उचलला आहे. याकरीता त्यांनी मुळशी मधील अंबडवेट गावाला भेट देऊन मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.
जेमतेम हजारो वस्तींच्या या गावातील सर्व लहान मुले, स्त्रिया, पुरूषां आणि शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक सूचनांबद्दल मार्गदर्शन केले. या गावातील समस्त ग्रामवासियांना मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. एमआयटीच्या स्कूल ऑफ फार्मसीमधील विद्यार्थी प्रथमेश मारणे, इशा ओसवाल, सुयश बागड, देविका नाईक, हर्षल मुंदडा, सिद्धेश जोगळेकर, निधी सबणे आणि आर्या गिजारे यांनी येथील नागरिकांना समजावून सांगितले की मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर कसा करावा. तसेच वेळो वेळी साबणाचा वापर करून स्वच्छ हात धुण्याचे लाभ काय आहेत.
विद्यार्थ्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ.बी.एस. कुचेकर, हेड ऑफ स्कूल डॉ. अक्षय बाहेती व इतर सर्व पदाधिकार्‍यांनी आणि शिक्षकांनी कौतुक केले.