Home Blog Page 2416

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शैक्षणिक शुल्क वाढ करु नये – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

0

मुंबई, दि. २७ : कोविड – १९ या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करु नये, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयाच्या संघटनेला केले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी आज खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, एसएनबीटी एज्युकेशनल ट्रस्टचे डॉ. हर्षल तांबे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांवर फी वाढीचा बोजा लादणे योग्य होणार नाही आणि त्यामुळेच या शैक्षणिक वर्षात कोणतीही अतिरिक्त फी वाढ करण्यात येऊ नये यासाठी आपण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी देखील प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत.

गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी

0

बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी त्याच्या जन्मापूर्वी आईच्या प्रकृतीची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. गुटगुटीत आणि निरोगी बाळ सर्वांनाच आवडतं, मात्र असे बाळ जन्माला येण्यासाठी आईचे योग्य पोषण व्हावे, शरीरासाठी आवश्यक घटक तिला अन्नातून योग्य प्रमाणात मिळावे याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते. हे टाळण्यासाठी गरोदर महिलांच्या आरोग्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.

गरोदरपणात रोज एक आयएफए म्हणजे आयर्नची गोळी रात्री जेवणानंतर घेणे आवश्यक आहे. आईने कमीत कमी 100 दिवसांपर्यंत रोज आयएफएची गोळी घ्यायला हवी. आयर्न नवजात बालकांच्या योग्य मानसिक आणि शारीरिक विकासासाठी आवश्यक आहे. गरोदरपणात गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी रक्ताची पूर्तता आईपासून होत असते.

एक ॲनॅमिक आई आपल्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला पुरेशा प्रमाणात रक्त पोहोचवू शकत नाही.  ज्यामुळे बाळ जन्मापासून कमी वजनाचं आणि ॲनॅमिक होत. ॲनॅमिक गर्भवती महिला एका निरोगी महिलेच्या तुलनेत बाळंतपणाच्या वेळी रक्त जाण्यामुळे खूप अशक्त होते आणि त्यात तिचा मृत्यूही होऊ शकतो.

आयर्नची गोळी खाण्यामुळे विष्ठा काळी येणे, बद्धकोष्ठ होणे, पोट खराब होणे, अस्वस्थ वाटणे आदी परिणाम होऊ शकतात. हे दुष्परिणाम गंभीर स्वरुपाचे नसून ते काही दिवसांत समाप्त होतात. काळी विष्ठा, बद्धकोष्ठता आणि पोट खराब झाल्यास तीन ते चार बाटल्या पाणी रोज प्यावे. आयर्नची गोळी रात्री जेवणानंतर घ्यावी. लिंबू, चिंच यासारख्या आंबट खाण्यामुळेही अस्वस्थता कमी होईल.

आयर्नची गोळी घेण्याच्या एक तास आणि आणि नंतर चहा-कॉफी घेऊ नका, कारण त्यामुळे आयर्न शरीरात योग्य प्रकारे विरघळू शकणार नाही. जेवणात लिंबू, संत्री किंवा आवळा यासारखी फळं खावी,  त्याची आयर्नचं पचन होण्यास मदत होईल.

गरोदरपणात आहारावरही योग्य लक्ष देणे आवश्यक आहे.  हिरव्या आणि पिवळ्या,नारंगी रंगाची फळं, भाज्या आणि दूध दह्यासारखे पोषक घटकांचा समावेश रोजच्या आहारात असावा. हे घटक बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी मदत करतात. मांसाहारी कुटुंबामध्ये खाल्ल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्येही असे पोषक घटक असतात. हे घटक बाळ आणि आईच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.

गरोदरपणात खाण्याचे प्रमाण वाढवावे. एकाच वेळी संपूर्ण जेवण जेवू शकला नाहीत तर दिवसातून बऱ्याच वेळा थोडे खावे. दिवसातून 3 वेळा खाण्यापेक्षा, 5 ते 6 वेळा खावे. दिवसातून किमान  1-2 तास आराम करावा, त्यामुळे तुमच्यातील ऊर्जेची बचत होईल आणि  बाळाचा विकास होण्यास मदत होईल. योग्य काळजी घेतल्यास मातेचे आरोग्य  चांगले राहील आणि बाळाचे पोषणही योग्यप्रकारे होऊ शकेल.

  • जिल्हा माहिती कार्यालय,नंदुरबार

शंतनू गोयल यांची बदली …

0

पुणे -महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांची नागपूर येथे मनरेगा आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.अर्थात केवळ एक वर्षापुर्वी त्यांची पुणे महापालिकेच्या विशेष अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती.त्यामुळे हि बदली नसून उचलबांगडी असल्याचे म्हटले जाते आहे.

आंबिल ओढा सुधारणा, सीमाभिंत बांधणीला गती देणे. शहरातील घनकचरा व्यवस्थापन आणि मलनिस्सारण व्यवस्थापनामध्ये महत्वपूर्ण भूमिका त्यांना निभावता आल्या नाहीत .

चेन बुलडोझर ची निविदा फेटाळली…

0

नगरसेवक अरविंद शिंदे ,बाळासाहेब ओसवाल यांनी घोटाळ्याचा केला होता आरोप

पुणे- १३ लाखाचा जुना चेन बुलडोझर घेतलाय आणि कोपऱ्यात उभा ठेऊन त्या द्वारे कामे झाल्याचे दाखवून अर्थ मुव्हर्स या ठेकेदाराला आतापर्यंत १५ कोटी हून अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे . वास्तविक पाहता महापालिका शहरातील कचरा डंपिंग करत नसतानाही डंपिंग च्या नावाने होणाऱ्या या गैरव्यवहाराचा कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे ,शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी आवाज उठ्विल्यानंतर अनेकवेळा पुढे ढकलत आलेला चेन बुलडोझर च्या १० कोटीची निविदा आज अखेरीस स्थायी समिती मध्ये फेटाळण्यात आली .

याबाबत अरविंद शिंदे आणि बाळा ओसवाल यांनी सांगितले कि, घनकचरा व्यवस्थापण विभाग किती भ्रष्टाचाराने पोखरला आहे याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. प्रचलित बाजारभावानुसार एका चेन बुलडोझर ची किंमत १ कोटी ७३ लाख एवढी आहे. यांनी हा ३० वर्षे जुना बुलडोझर मशिनच्या तांत्रिक कार्यक्षमतेचे प्रमाण पत्र न घेता १३ लाखाला खरेदी केला आहे. आणि ठेकेदाराला आतापर्यंत १५ कोटीहून अधिक रक्कम अदा केली आहे. या भाडे रकमेत महापालिका स्व मालकीचे ८ बुलडोझर खरेदी करू शकली असती .

सर्वात कमी रकमेची निविदा म्हणून , कमी भाडे दरात आपल्याला हे मशीन मिळत असल्याचे दाखवून करदात्यांची फसवणूक करण्याचे काम होत होते .त्यामुळे मशीन ची तांत्रिक कार्यक्षमता तपासून आणि उत्पादन तारीख तपासून ते कालबाह्य नाही ना ?याची खातरजमा शासकीय संस्थांकडून करवून घ्यावी असे अरविंद शिंदे आणि बाळा ओसवाल यांनी लेखी कळविले होते .

पुन्हा एकदा पहा अरविंद शिंदे यांनी काय म्हटले होते ….

पुन्हा एकदा पहा बाळा ओसवाल यांनी काय म्हटले होते…..

मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकारच्या अपयशामुळे संपूर्ण राज्य वेठीला

0

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केला निषेध

राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही व हे सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही हे आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या घडामोडींमुळे दिसले. राज्य सरकारच्या अशा भूमिकेमुळे केवळ मराठा समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वेठीला धरला गेला आहे. महाविकास आघाडी सरकारचा आपण निषेध करतो व मराठा आरक्षण हा विषय गांभिर्याने घेण्याची मागणी करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी सांगितले.
ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बातचित करत होते. ते म्हणाले की, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय आल्यानंतर सरकारचे वकील वेळेवर कोर्टात हजर राहिले नाहीत. त्याबद्दल न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली. नंतर न्यायालयाने सुनावणी घेतली त्यावेळी सरकारच्या बाजूच्या दोन वकिलांमध्ये दुमत दिसले. खटल्याच्या तयारीसाठी सरकारने पुरेसे प्रयत्न केले नाहीत. हे चिंताजनक आहे. या विषयामध्ये सरकार गंभीर नाही. हा प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नात विरोधी पक्षांना सहभागी करून घेतले जात नाही. परिणामी मराठा समाज अनिश्चिततेच्या वातावरणातून जात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात अनिश्चिततेचे वातावरण आहे. शैक्षणिक क्षेत्रात व नोकऱ्यांच्या क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे. भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अकरावीचे तसेच मेडिकलचे प्रवेश थांबले आहेत. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
त्यांनी सांगितले की, आपली महाविकास आघाडी सरकारला सूचना आहे की, या क्षेत्रातील तज्ञांशी सविस्तर चर्चा करून मराठा आरक्षणाच्या बाबतीत नेमक्या कोणत्या दिशेने जायचे आहे हे ठरवा. महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेय की नाही, त्या आरक्षणाला आलेली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठवायची की नाही, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.
ते म्हणाले की, भाजपच्या सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरविले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेल्यानंतर एक वर्षे आम्ही तेथे लढा दिला आणि मराठा आरक्षणाला स्थगिती दिली जाणार नाही, याची खबरदारी घेतली. पण महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले. मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठविण्यासाठीही ते गंभीर प्रयत्न करत नाहीत.
महाविकास आघाडी सरकारला पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करायच्या होत्या. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्या घ्यावा लागल्यानंतर आता परीक्षांची केवळ औपचारिकता पूर्ण केली जात आहे. परीक्षांबाबतही गोंधळ चालू आहे. पण त्यामुळे राज्यात या परीक्षातून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे करिअरचे नुकसान होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

आता पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या झाली 24 हजार 473

0

पुणे विभागातील 4 लाख 58 हजार 855 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 97 हजार 142 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.27 :- पुणे विभागातील 4 लाख 58 हजार 855 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 97 हजार 142 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 473 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 814 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.30 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 20 हजार 112 रुग्णांपैकी 2 लाख 98 हजार 677 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 13 हजार 794 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 641 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.39 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.30 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 373 रुग्णांपैकी 39 हजार 692 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 178 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 503 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 409 रुग्णांपैकी 34 हजार 626 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 368 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 416 रुग्णांपैकी 40 हजार 768 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 26 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 622 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 832 रुग्णांपैकी 45 हजार 92 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 107 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 633 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 899 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 369, सातारा जिल्ह्यात 113, सोलापूर जिल्ह्यात 139, सांगली जिल्ह्यात 223 तर कोल्हापूर जिल्ह्यात 55 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 967 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 922 ,सातारा जिल्हयामध्ये 535, सोलापूर जिल्हयामध्ये 161, सांगली जिल्हयामध्ये 244 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 105 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 23 लाख 14 हजार 716 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 97 हजार 142 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 26 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

केंद्रिय मंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात अभिनेत्री पायल घोष यांचा जाहीर प्रवेश

0

मुंबई दि. 26 – केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) या पक्षात अभिनेत्री पायल घोष यांनी आज जाहीर प्रवेश केला. अभिनेत्री पायल घोष यांची रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष निवड करीत असल्याची घोषणा ना.रामदास आठवले यांनी केली. जुहू येथील इस्कॉन च्या गोविंदा हॉल मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ना रामदास आठवले यांच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल घोष तसेच अभिनेत्री सोनी कनिष्का ; बिल्डर योगेश करकेरा; उद्योजक अंकुश चाफेकर;ऍड. नितीन सातपुते ; आयशा सय्यद आदींनी यावेळी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला.

दिग्दर्शक अनुराग कश्यप वर अभिनेत्री पायल घोष यांनी अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यप विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. त्याबाबत मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप यांची चौकशी केली आहे मात्र अद्याप त्यांना अटक केली नसल्याची नाराजी यावेळी अभिनेत्री पायल घोष यांनी व्यक्त केली. अनुराग कश्यप यांच्यावर आपण केलेले आरोप गंभीर असून त्याची चौकशी चालू आहे तो दोषी सिद्ध होईल. तो निर्दोष नाही. मात्र या प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत बॉलिवूड ने अनुराग कश्यप वर बहिष्कार टाकला पाहिजे असे आवाहन अभिनेत्री पायल घोष यांनी केले. महिला म्हणून मला न्याय देण्यासाठी मला खंबीर साथ दिल्या बद्दल आपण केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे आभारी आहे. गरिबांची मदत करावी; महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना साथ द्यावी ; देशाची सेवा करावी यासाठी मी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असल्याचे मनोगत यावेळी अभिनेत्री पायल घोष यांनी व्यक्त केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा मी पूजा करते असे सांगत अभिनेत्री पायल घोष यांनी जय भीम चा नारा दिला.
बॉलिवूड मध्ये करियर करण्यासाठी ;अभिनेत्री म्हणून नाव कमविण्यासाठी येणाऱ्या नवीन मुलींचे जर शोषण झाले; त्यांच्यावर कोणी अन्याय केला तर न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून खंबीर साथ देईल असे आवाहन यावेळी ना रामदास आठवले यांनी केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लाखमेन्द्र खुराणा; जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव;किशोर मासुम; एम एस नंदा;गुजराती भाषिक आघाडी चे अध्यक्ष जयंती गडा; सोना कांबळे; रमेश पाईकराव; रतन अस्वारे; रमेश पाळंदे; महिला आघाडी च्या जिल्हा अध्यक्षा रेशमा खान; छायाताई राऊत:; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र आणि अफगणिस्तानमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर भर देणार-सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

0

मुंबई : भारतीय सिनेमा आणि कलाकार अफगणिस्तानमध्ये लोकप्रिय आहे. हीच लोकप्रियता येणाऱ्या काळातही अबाधित ठेवत महाराष्ट्र आणि अफगणिस्तानमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले.

अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूत (कॉन्सल जनरल) झाकिया वारदाक यांच्यासह शफीऊल्ला इब्राहीमी, रफीऊल्ला केलेवल, आसिफ नवरोझे, अहमाद वारीस या शिष्टमंडळाने आज सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र आणि अफगाणिस्तानमध्ये येणाऱ्या काळात वैद्यकीय, सांस्कृतिक देवाण घेवाण वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून या दृष्टीने आराखडा तयार करण्याचे काम करण्यात येईल.अफगणिस्तान हा ऐतिहासिक देश असल्याने तेथे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. प्रख्यात बौध्द बामीयान लेणी, काबूल कंदहार ही शहरे व तेथील अनेक वास्तू त्यांचे म्युझियम, इदगाह मशीद, बाबर गार्डन, तसेच अनेक निसर्गरम्य डोंगर, दऱ्या आणि धबधबे हे चित्रीकरणासाठी उत्तम पर्याय आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात येथे चित्रीकरण करण्यासाठी काय करता येईल याबाबत आज सांस्कृतिक कार्य मंत्री आणि अफगणिस्तान यांच्यामध्ये प्राथमिक बोलणी झाली.

अफगणिस्तानच्या वाणिज्यदूत झाकिया वारदाक यांनी महाराष्ट्र आणि अफगणिस्तानमध्ये येणाऱ्या काळात सांस्कृतिक देवाण घेवाण वाढावी, वेगवेगळे सांस्कृतिक महोत्सव/ सेमिनार आयोजित केले जावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

उद्गारतर्फे दीपावली प्रदर्शन: स्वदेशी उद्योगांना व्यासपीठ देण्यासाठी अभिनव उपक्रम

0

पुणे ता. २७: स्वदेशी उद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम राबवत उद्गार संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दीपावली प्रदर्शनाचे काल माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते उद् घाटन झाले. यावेळी संस्थेच्या संचालिका आसावरी पाटणकर आणि लेखक सुजीत भोगलेही उपस्थित होते. वारजे उड्डाणपूलाजवळील पाटणकर सभागृह येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले असून येत्या १० नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ४ ते ८ या वेळेत ते सर्वांसाठी मोफत खुले असेल.

 यावेळी कुलकर्णी म्हणाल्या,  “आज ज्याला ग्लोबल ब्रॅण्ड आपण म्हणत आहोत ते कधीकाळी लोकल ब्रॅण्डच होते. मात्र, तिथल्या स्थानिक लोकांनी त्या वस्तूंचा अवलंब केला. त्याचा जागतिक पातळीवर पद्धतशीरपणे प्रचार आणि प्रसार केला. याशिवाय त्या वस्तूंविषयी अभिमान बाळगला. त्यामुळेच त्या वस्तू लोकल ते ग्लोबल हा पल्ला गाठू शकल्या. येत्या काळात आपणही स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्यायला हवे. आज हाच व्यापक दृष्टीकोन समोर ठेवत उद्गार संस्थेने घेतलेला पुढाकार अतिशय स्तुत्य आहे. या प्रदर्शनास अधिकाधिक पुणेकरांनी भेट देऊन, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे.”

यावेळी पाटणकर यांनी प्रदर्शनाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, कोणताही व्यावसायिक हेतू न बाळगता संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून,आम्ही हा उपक्रम राबविला आहे. सणासुदीची दिवस लक्षात घेऊन यामध्ये कलात्मक रंगवलेल्या पणत्या, टी कॅण्डल, ॲरोमॅटिक कॅण्डल, दिवाळी गिफ्ट (आयुर्वेदिक उटणे, सुगंधी तेल, साबण, दोन पणत्या इ.), सुकामेवा, इंदोरी नमकिन, नैसर्गिक अत्तरे, मार्बल मूर्ती आणि इतरही अनेक आकर्षक अशा शोभिवंत वस्तूंचा प्रदर्शनात समावेश आहे. 

त्या पुढे म्हणाल्या की, लॉकडाऊननंतर हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असले तरी या काळात सर्वाधिक फटका हा स्थानिक उद्योजकांना बसला आहे. बाजारपेठेतील निर्बधांमुळे आपले उत्तम दर्जाचे उत्पादन असूनही ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास त्यांना मर्यादा आल्या आहेत, ही परिस्थिती लक्षात घेत उद्गारने स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न  आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी प्रदर्शन स्थळी घेतली जात असून चोखंदळ पुणेकरांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असा विश्वासही पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.

दिव्यांग मुलांना द्या प्रोत्साहन

या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षक म्हणजे दिव्यांग मुलांनी रंगविलेल्या अत्यंत सुबक आणि रेखीव पणत्या तसेच त्यांनी स्वत: तयार केलेल्या आकर्षक शोभेच्या वस्तू, कानातले, गाळातले इ. दागिने. शारीरिक कमतरतेवर मात करत प्रत्येक कलेकडे संधी म्हणून बघणार्‍या दिव्यांग मुलांनी दिवाळीनिमित एकाहून एक कलाकृती साकारल्या आहेत. तरी या वस्तूंची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही उद्गारतर्फे करण्यात आले आहे.  

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय  येथे भ्रष्टाचार निर्मुलन प्रतिज्ञा

0

राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या संदेशाचे वाचन
पुणे दि.27: दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा देण्यात आली तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदेशांचे उपस्थितांसमोर वाचन करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी  यांना प्रतिज्ञा देण्यात आली, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी प्रतिज्ञा तसेच राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या संदेशांचे वाचन केले. देशाच्या आर्थिक, सामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा असून सर्व कामे प्रामाणिकपणे करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे,उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ताडीमध्ये फ्लोरल हायड्रेड ची भेसळ – परवाने रद्द करून १२ जणांवर फौजदारी कारवाईचे आदेश

0

पुणे, दिनांक 27- पुणे जिल्ह्यातील मंजूर ताडी अनुज्ञप्तीमधील ताडी नमुन्यामध्ये फ्लोरल हायड्रेड मिसळून भेसळ केलेल्या 12 अनुज्ञप्त्या कायमस्वरुपी अपात्र करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या समक्ष सुनावणी घेवून अनुज्ञप्तीधारक यांच्या विरुध्द गुन्हा नोंदवून न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यात सन 2019-20 करीता एकूण 16 ताडी अनुज्ञप्ती कार्यरत होत्या, सदर मंजूर ताडी अनुज्ञप्तीमधून ताडीचे नमुने घेण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी विशेष मोहिम घेतली होती. ताडीचे नमुने घेवून हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था मुंबई यांचे पाठविण्यात आले असता सदर तपासणी अहवालामध्ये एकूण 12 अनुज्ञप्तीमधून काढण्यात आलेल्या ताडी नमुन्यामध्ये फ्लोरल हायड्रेड मिसळून भेसळ केल्याचे सिध्द झाले आहे. भेसळयुक्त ताडी सेवनाने मानवी प्रकृतीवर घातक परिणाम होत असल्याची बाब स्पष्ट होत असल्याने सदर अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करून अनुज्ञप्तीधारकाविरुध्द गुन्हा नोंद करुन फौजदारी कारवाई होणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या समक्ष सुनावणी घेवून एकूण 12 ताडी अनुज्ञप्त्या कायमस्वरुपी रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच संबधीत अनुज्ञप्तीधारक यांना यापुढे ट.ड. 1 अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपी अपात्र करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अनुज्ञप्तीधारकाविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांचे 15 जुलै 2003 मधील निर्देश तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 77, 78(अ) व 82 तसेच भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 272 अन्वये संबंधीताविरुध्द गुन्हा नोंदवून न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. तसेच यापुढेही अवैध ताडी निर्मिती विक्री केंद्र यावर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेशही देण्यात आले आहेत. ताडी नमुन्यामध्ये फ्लोरल हायड्रेड मिसळून भेसळ केलेल्या 12 अनुज्ञप्त्या कायमस्वरुपी अपात्र करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे,
श्री. अशोक साहेबराव भंडारी, ताडी दुकान कळंब वालचंदनगर, ता. इंदापूर जि. पुणे,
श्री. चंद्रकांत हनुमंत शिंदे, ताडी दुकान अंथुर्णे क्र. 1, ता. इंदापूर जि. पुणे
श्री. वसवराज वालाप्पा भंडारी, ताडी दुकान थेरगाव, ता. मुळशी जि. पुणे
श्री. सुरेश भिमराव भंडारी, ताडी दुकान केडगाव बोरीपाथी, ता. दौंड, जि. पुणे
श्री. लक्ष्मीनारायण फकिरय्या गौड, ताडी दुकान भिगवन, ता. इंदापूर जि. पुणे
श्री. अविनाश प्रल्हाद भंडारी, ताडी दुकान निरा, ता. पुरंदर, जि. पुणे
श्री. विजय गोपीनाथ भंडारी, ताडी दुकान सणसर, ता. इंदापूर जि. पुणे
श्री. निलम साया गौड, ताडी दुकान लोणावळा क्र. 1, ता. मावळ , जि. पुणे
श्री.अमृत माणिक भंडारी, ताडी दुकान शिंगवे पारगाव, ता. आंबेगाव जि. पुणे
श्री. व्यकटेंश दस्तय्या कलाल, ताडी दुकान बावधन, ता. मुळशी जि. पुणे
श्री. चंद्रकांत हनुमंत शिंदे, ताडी दुकान इंदापूर जि. पुणे
श्री. राजशेखर अनंतराम गौड, ताडी दुकान जक्शन ता. इंदापूर जि. पुणे

राष्ट्रीय शिक्षणासाठी एनसीसी भूमिका महत्वाची -ब्रिगेडियर डॉ. सुनील लिमये

0

पुणे-  नवीन शैक्षणिक धोरणात अभिप्रेत असणारे राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) भूमिका महत्त्वाची ठरेल असा विश्‍वास एनसीसीच्या पुणे विभागाचे प्रमुख बि‘गेडियर डॉ. सुनील लिमये यांनी व्यक्त केला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे (बीएमसीसी) माजी विद्यार्थी असणार्‍या डॉ. लिमये यांनी महाविद्यालयाला भेट दिली. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणीक, डॉ. सुरेश वाघमारे, एनसीसीचे समन्वयक लेफ्टनंट यशोधन महाजन, आस्मा बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. लिमये पुढे म्हणाले, ‘देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य एनसीसी करीत असते. सैन्याविषयी आवड निर्माण करणारे उपक‘म राबविले जातात. देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक घडविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच नवीन शैक्षणिक  धोरणात अभिप्रेत राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी एनसीसीची भूमिका महत्त्वाची ठरेल.’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या त्रिपुरामध्ये 9 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करणार

0

नवीदिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या त्रिपुरात नऊ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. सुमारे 262 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यांसाठी 2752 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग, जनरल (निवृत्त) व्ही के सिंग, राज्याचे मंत्री,आमदार तसेच केंद्र आणि राज्याचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यांतर्गत आणि बांग्लादेशाशी  वेगवान आणि सुलभ कनेक्टीव्हिटी  स्थापन होऊन राज्याच्या पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातली  विविध पर्यटन स्थळे, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे   सुरक्षित आणि जलद वाहतुकीद्वारे जोडली जाणार आहेत. यातून या भागातल्या कुशल, अर्ध कुशल आणि अ कुशल मनुष्य बळाला रोजगाराच्या आणि स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन तसेच वाहनांच्या देखभालीचा खर्च कमी होणार आहे. स्थानिक भागांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी याची मदत होणार आहे. यातूनच कृषी मालाची वाहतूक आणि मोठी बाजारपेठ यासाठी वाहतुकीत सुधारणा होऊन वस्तू आणि सेवांच्या किमती कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवा तत्काळ आणि सहजपणे उपलब्ध व्हायलाही मदत होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या भागाच्या पर्यटन, आर्थिक विकासाला आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टीव्हिटीला मोठी चालना मिळणार आहे. राज्याच्या जीडीपीलाही  यामुळे चालना मिळणार आहे.

गुलटेकडी एकता प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य सेविकांचा सन्मान

0

पुणे- भातीय जनता पार्टी पुणे शहर झोपडपट्टी आघाडी व गुलटेकडी एकता प्रतिष्टान यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षीनगर येथील संतनामदेव शाळेत पुणे मनपा आरोग्य सेविकांचा साडीचोळी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बिबवेवाडी प्रभाग समितीच्या अध्यक्षा राजश्री शिळीमकर , पर्वती महिलाअध्यक्ष अनिता दीक्षित,भाजप झो.आघाडीचे किरण वैष्णव पर्वती आर.पी आय चे महेश सकट महापालिका मुकादाम बाळासाहेब शेलार ,संतोष पिटले ,सचिन खंडागळे ,महेश साळुंखे, व गुलटेकडी एकटा प्रतिष्ठान चे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश शेरला म्हणाले दरवर्षी नवरात्रमध्ये देवीला आम्ही तोरण अर्पण करतो.यंदाच्या वर्षी मंदिरे बंद असल्याने देवीचे तोरण आम्ही आरोग्य सेविकांना अर्पण केले. कोरोना सारख्या महामारीतून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आरोग्य सेविकांनी दिलेल्या योगदानाची समाजात नोंद राहील.

रिलायंस जिओला केबल टाकण्यासाठी फुटपाथवर खोदकाम करण्यास परवानगी देऊ नये – आबा बागुल

0

पुणे- रिलायंस जिओला केबल टाकण्यासाठी फुटपाथवर खोदकाम करण्यास परवानगी देऊ नये आशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि शहरातीलरस्ते खाेदून केबल टाकणेबाबत कार्यवाही हाेवून शहर खडडेमय हाेत असल्याने तत्कालीन आयुक्त श्री.कुणाल कुमार यांनी पुणे महानगरपालिकेने शहरात ओपन डक्टींग करू नये असा धाेरणात्मक निर्णय पूर्वीच केलेला आहे. तदनंतर शहरात अनेक ठिकाणी डक्ट केले असून यामधूनच केबल टाकण्याबाबत धाेरण ठरले असून त्याचे दर देखील ठरलेले आहेत.


सदयस्थितीत पुणे महापालिकेकडे मे.रिलायंस जिओ इन्फोकॉम लि. यांचेकडून शहरात सुमारे 6783 मीटर डक्ट पुलिंग तसेच डक्ट पुलिंग नसेल त्याठिकाणी रस्ते व फूटपाथ खाेदून ओ.ए\.सी केबल टाकणेकरिता परवानगीसाठी अर्ज करण्यात आले असून सदर प्रकरणी चालू असलेली प्रक्रिया तातडीने स्थगित करण्यात यावी. अशा प्रकारे परवानगी दिल्यास पुणे शहरात सर्वत्र खडडे हाेवून रस्त्यावर पॅच तयार हाेतील. पुणे शहर स्मार्ट सिटी करणेचे धाेरण आपण स्विकारले असून स्मार्ट सिटीच्या दृष्टीकाेनातून ओपन डक्टिंग करणेची परवानगी देणे हे संयुक्तिक हाेणार नाही.

पुणे महापालिकेचे रस्ते खाेदाई बाबत 10 हजार रूपये प्रति मीटर दर ठरविण्यात आलेले आहेत. मे.रिलायंस जिओ इन्फोकॉम लि. यांस कमी दरामध्ये परवानगी देणे अगर मोफत देणे हे पुणे मनपास आर्थिक संकटात टाकण्यासारखे आहे. रिलायंस कंपनीचे माेबाईल टाॅवरबाबत काेटयावधी रूपयांची थकबाकी असताना या कंपन्यांच्या प्रस्तावावर कार्यवाही करणे, विचार विनिमय करणे हे पुणे महापालिकेस जाणीवपूर्वक आर्थिक संकटात आणण्याचा प्रकार आहे. माेबाईल टाॅवरबाबत असलेली थकबाकी वसूल करणेबाबत आपण आग्रही भूमिका घेतली पाहिजे. ही रक्कम वसूल केल्याशिवाय त्यांना काेणतीही नवीन परवानगी दिल्यास सदर प्रकरणी थकबाकीदारांना प्राेत्साहन दिल्यासारखे हेाईल. पहिली थकबाकी भरा व नवीन परवानगी मागा असे मनपाचे धाेरण असताना आपण त्यांची थकबाकी न घेता वारंवार माेबाईल कंपन्यांना केबल टाकणेची परवानगी देत आहाेत हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.


पुणे महापालिकेच्या धाेरणानुसार ओपन डक्टिंग करू नये. केबल टाकावयाची असल्यास अस्तित्वात असलेल्या डक्टमधून केबल टाकण्यात याव्यात. त्याचा दर निश्चित असून त्या दरानेच आकारणी करावी. थकबाकी असणा-यांना कुठलीही परवागनी देवू नये असे श्री. बागुल यांनी निवेदनात म्हटले आहे.