Home Blog Page 2406

वंचित विकास, महावीर फूड बँकेतर्फे धान्यसंच व फराळ

0

पुणे : “कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग गरजेचे असले तरी मनाची दारे उघडी असावीत. सामाजिक भेदाभेद दूर राहावेत. दिव्यांच्या या उत्सवात आपण सगळ्यांनी इतरांना आनंद देऊन भाऊबीज साजरी व्हावी. गरजू लोकांसाठी, सीमेवरील सैनिकांसाठी आपण करत असलेले कार्य माणुसकीचा बंध दृढ करणारे आहे,” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ यांनी केले.
पुण्यातील वंचित विकास आणि महावीर फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सीमेवरील शूर जवान व शहरातील गरजू नागरिकांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले. प्रसंगी वंचित विकासचे संस्थापक विलास चाफेकर, अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, महावीर फूड बँकेचे संस्थापक प्रा. अशोककुमार पगारिया, सैनिकाचे पालक बंडोपंत कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार उद्धव भडसाळकर, ‘वंचित’च्या संचालिका मीनाताई कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले आदी उपस्थित होते.
श्रीमती प्रमिलाबाई नौपतलालजी सांकला चॅरिटेबल ट्रस्ट आणि सुकांता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे साहित्य देण्यात आले. गरजूंना दिलेल्या धान्यसंचात साखर, हरभरा डाळ, गूळ, तेल, साबण, पोहे, मीठ, रवा आदी वस्तूंचा समावेश आहे.
प्रा. अशोककुमार पगारिया म्हणाले, “समाजात गरजवंतांची संख्या मोठी आहे. पण पणतीसारखे बनून आपल्याला शक्य तितका गरिबीचा अंधकार दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सामाजिक जाणिवेतून आपण या पीडितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो, याचे समाधान वाटते.”

कर्मचाऱ्यांच्या भावनिक हितासाठी बँक ऑफ बडोदाचे अग्रगण्य पाऊल, कर्मचारी सहाय्य कार्यक्रम केला सुरू

0

मुंबई : भारतातील एक महत्त्वाची सरकारी बॅंक असलेल्या ‘बँक ऑफ बडोदा’ने, आता एक नवीन कर्मचारी केंद्रित उपक्रम म्हणजे ‘कर्मचारी सहाय्य कार्यक्रम’ सुरू केला आहे. अनेक नवीन संकल्पना, पद्धती आणि उपक्रम राबविण्यात ही बॅंक नेहमीच अग्रेसर असते.

कर्मचार्‍यांना त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी मानसशास्त्रीय समुपदेशन करणे व योग्य तो सल्ला देणे हे या कर्मचारी सहाय्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. काम करण्याच्या ठिकाणी समुपदेशन करण्याचे महत्त्व ओळखून बॅंकेने कर्मचाऱ्यांच्या समस्यांची दखल घेण्याचे आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचे हे पहिले पाऊल उचलले आहे. याकरीता बँकेने मुंबई विभागात आणि कॉर्पोरेट कार्यालयात प्रयोगिक तत्वावर हा समुपदेशनाचा प्रकल्प राबविला आहे. इएपी इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पात वैयक्तिक समुपदेशनाव्यतिरिक्त तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मदतीच्या अनेकविध मार्गांचा समावेश करण्यात करण्यात आला आहे.

‘’सध्याच्या काळात मानसिक ताण व भावनिक मुद्दे यांच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतो. अशावेळी त्यांना कामाच्या ठिकाणी समुपदेशन मिळणे यास मोठे महत्त्व आहे’’, असे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चढ्ढा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की विशेष सेवा पुरविणाऱ्या कंपनीशी करार करून बॅंकेने दिलेली ही समुपदेशन सेवा अगदी सुरक्षित, निर्विवाद व अत्यंत गोपनीय आहे. कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना ती 24/7 उपलब्ध आहे. 

“आमच्या बँकेत कर्मचारी सहाय्य कार्यक्रमाची अंमलबजावणी करून कर्मचार्‍यांची भावनिक सुदृढता वाढविण्याचे आमचे ध्येय आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचे मनोबल वाढून बॅंकेत आनंदी व सकारात्मक कामाचे वातावरण निर्माण होईल आणि उत्पादकतेवर सकारात्मक परिणाम होईल,’’ असे  बॅंकेचे कार्यकारी संचालक एस. एल. जैन म्हणाले.

सरव्यवस्थापक (एचआरएम) प्रकाश वीर राठी यांनी सांगितले, “बँकेचे सुमारे 60 टक्के कर्मचारी 18 ते 35 या वयोगटातील आहेत. त्यांना इतर सहकाऱ्यांचा दबाव, कारकिर्दीतील समस्या, महत्वाकांक्षांचे प्रश्न, नातेसंबंधांतील तणाव, अॅडजस्टमेंटची मानसिकता इत्यादींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या समुपदेशनातून भावनिक चिंता निवारण्यासाठी त्यांना वेळेवर मदत मिळणे शक्य होईल.”

बँक ऑफ बडोदाने घेतलेला हा एक अग्रगण्य असा मनुष्यबळ विकासाचा उपक्रम आहे. कर्मचार्‍यांचे भावनिक आरोग्य जोपासण्यासाठी व त्यांच्यात गुंतवणूक करण्यासाठी त्यातून बरेच काम केले जाईल.

आयसीआयसीआय होम फायनान्सने सुरु केला ‘महा लोन फेस्टिवल’

0
  • अर्थव्यवस्थेतील अनौपचारिक क्षेत्रांमधील ग्राहकांना मिळू शकणार गृह कर्जाचे लाभ
  • होम लोन्स व गोल्ड लोन्सना दिली जाणार तातडीने मंजुरी

पुणे–  आयसीआयसीआय होम फायनान्सने (आयसीआयसीआय एचएफसी) सध्याच्या सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना अधिक जास्त आनंद मिळवून देण्यासाठी महा लोन फेस्टिवल‘ सुरु करत असल्याची घोषणा केली आहे.  आयसीआयसीआय एचएफसीच्या महा लोन फेस्टिवल‘ मध्ये कर्ज घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांना होम लोन (अपना घर आणि अपना घर ड्रीम्ज)गोल्ड लोन आणि मायक्रो एलएपी (संपत्तीवर कर्ज) यासारख्या उत्पादनांसाठी तातडीने मंजुरी देण्याची सुविधा सुरु केली आहे.  कर्ज प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी आयसीआयसीआय एचएफसीने सर्व कर्ज अर्जासाठी स्थानिकशाखा स्तरीय मंजुरी सुविधा उपलब्ध करवून दिल्या आहेत.

सणासुदीच्या काळात आयसीआयसीआय एचएफसीने अर्थव्यवस्थेतील अनौपचारिक क्षेत्रातील ग्राहकांना गृह कर्ज सुविधा प्रदान केल्या आहेत.  यामध्ये सुतारप्लम्बर्सछोट्या व्यवसायांचे मालक आणि ट्रेडर्स यांचा समावेश आहे.  आपल्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी उत्सुक सर्व लोक आयसीआयसीआय एचएफसी मध्ये अतिशय मोजकी कागदपत्रे  देऊन आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकतात.  पॅन कार्डआधार कार्ड आणि आधीच्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट सादर करून ग्राहक या सुविधांचे लाभ मिळवू शकतात.  व्यावसायिक व व्यापारी आपल्या अत्यावश्यक आर्थिक गरजांसाठी आयसीआयसीआय एचएफसीच्या शाखेमध्ये फक्त एकदा जाऊन गोल्ड लोन मिळवू शकतात.  बुलेट रिपेमेंटकर्जाच्या संपूर्ण कालावधीमध्ये स्थिर व्याज दर आणि कालावधी समाप्त होण्याआधी कर्जाची परतफेड हे विशेष पर्याय गोल्ड लोन योजनेत उपलब्ध आहेत.  

ग्राहक आयसीआयसीआय होम फायनान्सच्या जवळच्या शाखेला भेट देऊन महा लोन फेस्टिवल‘ मध्ये ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. 

शिवाजी नगर शाखा – ११८७/२२वेंकटेश मेहेरदुसरा मजलाघोले रोडपुणे – ४११००५

वाकड शाखा – ऑफिस नंबर १०१पहिला मजलाफॉर्च्युन बिझनेस सेंटरअँबियन्स हॉटेलजवळकस्पटे वस्तीवाकडपुणे – ४११०५७.

आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे एमडी व सीईओ श्री. अनिरुद्ध कमानी यांनी सांगितले, “महा लोन फेस्टिवलमध्ये आम्ही अनेक वेगवेगळी उत्पादने आणि लाभ सादर करत आहोत ज्यामुळे अनौपचारिक क्षेत्रातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक पर्याय त्यांना उपलब्ध होत आहेत.  कमीत कमी कागदपत्रांसह तातडीने कर्ज दिली जावीत यासाठी आमच्या प्रत्येक शाखेमध्ये स्थानिक प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत.”

गृह कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) २.६७ लाख रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकते.  ही अल्प उत्पन्न गट (एलआयजी) आणि मध्यम  उत्पन्न गट (एमआयजी – आणि II) यांना मिळणारी क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (व्याजातील सबसिडी) आहे. 

कोविड-१९ च्या काळात आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी एमएचए आणि एमओएचएफडब्ल्यूच्या सर्व नियमांचे पालन आयसीआयसीआय होम फायनान्समध्ये केले जात आहे.  त्यांच्या सर्वच्या सर्व १३९ शाखांमध्ये सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत.  शाखेत प्रवेश करण्याआधी प्रत्येक कर्मचारी आणि इतर सर्व लोकांचे टेम्प्रेचर स्क्रीनिंगप्रत्येक दोन व्यक्तींदरम्यान सुरक्षित अंतर राहील अशी व्यवस्थाशाखांचे सॅनिटायझेशनऑफिसमध्ये ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवलेले असणेऑफिसमध्ये प्रत्येक व्यक्ती सदासर्वकाळ मास्क्स आणि फेसशिल्ड्स घालून राहील हे पाहणे असे सर्व उपाय काटेकोरपणे केले जात आहेत.  त्याचबरोबरीने सर्व संशयित कर्मचाऱ्यांना टेस्ट रिपोर्ट्स येईस्तोवर आयजोलेशनमध्ये  ठेवले जाते आणि त्यांना क्वारंटाईन / हॉस्पिटलसंबंधी सर्व मदत पुरवली जाते.  आजाराचा प्रसार रोखला जावा यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. 

आता अर्णब गोस्वामींच्या विरोधात तीव्र हक्कभंग समितीचे कामकाज झाले सुरु

0

मुंबई- रिपब्लिक टिव्हीचा मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात अलिबाग च्या केस संदर्भात आज दुपारी 3 वाजता हायकोर्टात सुनावणी होणार असताना , दुसरीकडे त्यावर ३५३ चा गुन्हा पुन्हा दाखल केलेला असताना आता, विधिमंडळाने त्यांस बजावलेल्या विशेषाधिकार भंग समितीच्या कामकाजाला गुरुवारी प्रारंभ झाला. या विशेषाधिकार भंग नोटीसच्या संदर्भात स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी माजी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांची नियुक्ती झाली आहे.अर्णब गोस्वामी यांनी आपल्या टीव्ही चर्चेत मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करून अवमान केला होता. अशा पत्रकाराविरोधात हक्कभंग दाखल करा अशी मागणी करणारा प्रस्ताव शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मांडला होता. तर विधान परिषदेत काँग्रेसचे भाई अशोक जगताप आणि शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी मांडला होता. दोन्ही सभागृहांत हे प्रस्ताव स्वीकारण्यात आले होते. आतापर्यंत हक्क भंग समितीने अर्णब गोस्वामी यांना दोन नोटीस बजावल्या आहेत.

या संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, हक्कभंग दाखल झाल्यावर समितीच्या कामकाजाला सुरवात होते. त्यानुसार पहिली बैठक झाली. या समितीचे कामकाज व अहवाल जाहीर करता येत नाहीत. पण समितीची शिफारस येईल त्या आधारावर पुढील कारवाईचा विषय ठरतो. कारवाईचा अहवाल गोपनीय असतो असे पटोले म्हणाले.

राज्यातील लोककलावंतांच्या महितीची सूची तयार करणार – राजेंद्र पाटील येड्रावकर

0

पुणे – राज्यातील ज्येष्ठ कलावंतांना करोनाच्या संकटामुळे मानधन देण्यास विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत राज्यातील सर्व लोककलावंतांच्या महितीची सूची सांस्कृतिक विभागामार्फत लवकरात लवकर तयार करण्यात येईल आणि सर्वांना मानधन ठरलेल्या दिवशीच मिळेल अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी आज पुण्यात रंगभूमीदिनाच्या पूर्व संध्येला बोलताना दिली.

राज्य शासानाच्यावतीने देण्यात येणारे विठाबाई नारायणगावकर लोककला जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर आणि आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्य कलावंत मधुवंती दांडेकर यांना जाहीर झालेला आहे. रंगभूमी दिनाचे औचित्य साधून या दोन्ही कलावंताचा संवाद पुणे संस्थेने पुणेकरांच्यावतीने राज्यमंत्री येड्रावकर यांच्याहस्ते मानपत्र देऊन कृतज्ञता सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते उल्हास पवार होते. संवाद पुणेचे सुनील महाजन, अभिनेते प्रशांत दामले, प्रवीण तरडे, कोल्हापूरचे डॉ. दशरथ काळे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालक निकिता मोघे, कौन्सिल फॉर लिटरेचर ऍण्ड कल्चरचे महेश थोरवे, महाराष्ट्र कला प्रसारणी सभेचे कार्यवाह सचिन ईटकर आणि महावीर जैन विद्यालयाचे सचिव युवराज शहा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

करोना महामारीच्या लॉकडाऊनच्या काळात पडद्यामागिल कलावंतांना आणि एकूणच सांस्कृतिक क्षेत्रातील गरजूंना मदत करणा-या किशोर सरपोतदार, महाराष्ट्र तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव, प्रियांका चौधरी, गायक मंदार पाटणकर, आरपीआयचे राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, युवासेनेचे किरण साळी, काँग्रेसचे अमित बागूल, मनसने चित्रपट सेनेचे रमेश परदेशी, भाजपचे सनी निम्हण या करोना योद्धांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. संवाद संस्थेच्यावतीने सुनील महाजन यांनी येड्रावकर यांचे स्वागत केले. महावीर जैन विद्यालय आणि विविध सासंकृतिक संस्था, संघटनांनीही राज्यमंत्री येड्रावकर यांच्या सत्कार केला. निकिता मोघे यांनी प्रशांत दामले यांचा तर प्रशांत दामले यांनी दशरथ काळे यांचे स्वागत केले. उल्हास पवार यांचे स्वागत ईटकर यांनी तर प्रवीण तरडे यांचे स्वागत महेश थोरव यांनी केले.

कलावंतांना मानधन द्यायची वेळ आली की शासनाच्यावतीने त्यांची शोधाशोध सुरू होते असे सांगून येड्रावकर म्हणाले, याचे महत्वाचे कारण म्हणजे अशा कलावंतांची सूची शासनाकेड नाही. त्यामुळे राज्यातील सर्व कलावंतांच्या नावपत्यासह महितीची सूची सांस्कृतिक खात्याचेवतीने तयार करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ कलावंतांना मानधन वेळेवर मिळण्यासाठीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आमचे प्रय़त्नत सुरू आहेत. त्यामुळे यापुढील काळात मानधन मिळण्यात विलंब होणार नाही. राज्य शासनाच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी महोत्सवांचे आयोजन करून त्यातून निधीही गोळा करून मानधनाचा प्रश्न सोडवण्याबाबत चर्चा सुरू आहे. या महोत्सवासाठी कलाकारांनीही शासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. कलावंतांशी चर्चा करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्राच्या अडचणी समजावून घेण्यासाठी दोन महिन्यातून एकदा पुण्यात सर्वांबरोबर बैठक घेण्याचेही येड्रावकर यांनी जाहीर केले.

उल्हास पवार म्हणाले, गुलाबबाई संगमनेरकर या मुद्रा अभिनय, अदाकारी, उत्कृष्ट कथ्थक नृत्य अशा सर्व गुणांनी संपन्न आहेत. त्यांच्या अदाकारील खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली दाद आपण बघितली आहे. तसेच मथुबाई इंदुरीकर यांच्या लावणीला पंडित भीमसेन जोशी यानी दाद दिली आहे. नाटकात प्रथम नटराज पूजन होते तसे तमाशात गणेश पूजन होते. त्यात म्हटलेच आहे की, श्री गणेशा लवकर यावे आतूनी किर्तन वरून तमाशा , त्यामुळे तमाशा म्हणजे एक प्रकारचे किर्तनच आहे हे सूज्ञ, बुद्धीजीवींनी समजवून घेतले तर लोककलावंतांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनच बदलेल.

प्रशांत दामले म्हणाले, आज आम्ही जे सांगतो चंद्रपूरला प्रयोग केला. नांदेडला केला याचे सर्व श्रेय्य गुलाबबाई, मधुवंतीताई यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंतांना आहे. त्यांनी कधीही अडचणी न सांगता, बैलगाडीने प्रवास करून असे त्या परिस्थितीत गावोगावी जाऊन प्रयोग केल्यामुळे तेथील रसिकवर्ग टिकला जो आज आमच्या नाटकाला किंवा तमाशाला किंवा कार्यक्रमाला येतो. या कलावंतांनी त्यांचे झालेले अपमान हे अपमान म्हणून न बघता ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि त्यावर मात केली म्हणून ते आज चाळीस, पन्नास, सत्तर वर्षे टिकून आहेत. हे तरूण कलाकारांनी शिकण्यासारखे आहे. तरडे म्हणाले, रंगभूमी दिनाच्या पूर्व संध्येला या ज्येष्ठ कलावंतांचा गौरव होत असतानाच आम्हा कलाकारांसाठी प्राणवायू (ऑक्सिजन) असलेली थिएटर्स उद्यापासून सुरू होत असल्याने हा कार्यक्रम आगळावेगळा ठरला आहे.

गुलाबबाई संगमनेकर यांच्यावतीने त्यांच्या कन्या वर्षी संगमनेरकर आणि मधुवंती दांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी सांस्कृतिक क्षेत्राच्या अडचणी मांडण्यासाठी किंवा शासानाशी संवाद साधता यावा म्हणून सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांनी पुण्यात संपर्क कार्यालय सुरू करावे अशी मागणी केली. कार्यक्रमाची सुरूवात गणेश वंदनाने झाली. मसापचे कार्याध्यक्ष उद्धव कानडे यांनी मानपत्रांच्या वाचनासह कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. महेश थोरवे यांनी आभार मानले.

अर्णबप्रकरणी आज हायकोर्टात नेमकं काय घडलं?

0

मुंबई: अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज मुंबई हायकोर्टाकडून तातडीचा दिलासा मिळू शकला नाही. आता तक्रारदार आणि राज्य सरकारचे उत्तर आल्यानंतरच उद्या अर्णब यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे अर्णब यांना आजची रात्रही न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे. 

उद्या, शुक्रवारी दुपारी ३ वाजता सुनावणी

अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत बुधवारी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या कोठडीला आव्हान देत अर्णब यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली असता तात्काळ सुटकेचा दिलासा अर्णब यांना मिळू शकला नाही. ‘अलिबाग दंडाधिकारी न्यायालयाने १६ एप्रिल २०१९ रोजीच पोलिसांचा ए-समरी अहवाल स्वीकारून हे प्रकरण बंद केलं होतं. त्याला पीडित नाईक कुटुंबानं आव्हान दिलं नाही आणि तो अहवाल आजही तसाच आहे. पोलिसांनीही पुन्हा तपास सुरू करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेतली नसून स्वत:हूनच फेरतपास सुरू केलाय. कायद्यानुसार याला परवानगीच नाही. त्यामुळे गोस्वामी यांचे गजाआड राहणे पूर्णत: बेकायदा आहे’, असा युक्तिवाद गोस्वामींसाठी त्यांच्या वकिलांनी मांडला. मात्र, फिर्यादी आणि पोलिसांचे म्हणणे ऐकल्याविना आदेश करू शकत नाही, असं स्पष्ट करत न्यायालयानं जामिनावरील सुटकेविषयी उद्या, शुक्रवारी दुपारी ३ वाजता सुनावणी ठेवली.

आजच्या सुनावणीतील ठळक बाबी…

– अर्णब गोस्वामी यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी. गोस्वामींच्या तात्काळ जामिनासाठी सुद्धा अॅड. आबाद पोंडा यांच्यामार्फत अर्ज करण्यात आला.

– पोलिसांनी स्वत:हूनच केस पुन्हा ओपन करून तपास सुरू केला आहे. कायद्यानुसार त्याला परवानगीच नाही पण सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे, हे मी कोर्टात बोलू इच्छित नाही. त्यामुळे पुन्हा तपास सुरू करणे आणि गोस्वामींना अटक करणे ही बाब पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा अॅड. पोंडा यांचा युक्तिवाद.

– दोन दिवसांनी दिवाळीच्या सुटीमुळे उच्च न्यायालय कदाचित आमच्यासाठी उपलब्ध नसेल. त्यामुळे हायकोर्टाने आपल्या विशेषाधिकारात याचा विचार करावा आणि या प्रकरणात नागरिकाच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे हायकोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करून अंतरिम दिलासा द्यावा, अशी पोंडा यांची विनंती.   – आम्ही दंडाधिकारी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला तर दंडाधिकारी कोर्टाने योग्य वेळी ऐकू असे सांगितले. त्यामुळे आम्ही तो अर्ज दुपारी १.३० वाजता मागे घेतला. आता अलिबाग सेशन्स कोर्टात जामीन अर्जावरील सुनावणीसाठी प्रयत्न आहे. गोस्वामी यांनी गजाआड राहणे, प्रत्येक सेकंदासाठी बेकायदा आहे – अॅड. पोंडा- अर्णब गोस्वामी प्रकरणात दिवंगत अन्वय नाईक यांची कन्या आज्ञा नाईकचीही मुंबई हायकोर्टात धाव. पोलिसांनी गेल्या वर्षी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला फौजदारी रिट याचिकेद्वारे दिले आव्हान.- अर्णब गोस्वामी यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी आणि त्वरित सुटका होण्यासाठी केलेल्या फौजदारी रिट याचिकेसोबतच आज्ञा नाईकच्या याचिकेवरही मुंबई हायकोर्टात न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी.- अन्वय नाईक आणि कुमुद नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिस उपअधीक्षकांनी १६ एप्रिल २०१९ रोजी समरी अहवाल देऊन पुरावे नसल्याने खटला बंद करण्याची विनंती केली होती. ती मान्य करत दंडाधिकारी न्यायालयाने खटला बंद केला होता. प्रकरणात पुन्हा काही आढळले असले तरी ते आधी दंडाधिकारी कोर्टाला दाखवल्याविना पोलीस पुन्हा केस ओपन करून तपास सुरूच करू शकत नाहीत -अॅड. पोंडा- पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर नाईक कुटुंबीयांतर्फे कोणीही दंडाधिकारी कोर्टात कधी दादच मागितलेली नाही – अॅड. पोंडा
– आम्ही नोटीस जारी करून तक्रारदार आणि राज्य सरकारला उत्तर देण्याची संधी देऊ आणि उद्या जामीन अर्जाविषयी सुनावणी घेऊ – हायकोर्ट

‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी युव्ही-३६० सॅनिटायझर रोबोट उपयुक्त ठरेल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0

मुंबई, दि. ५ : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगाच्या तुलनेत भारत आणि महाराष्ट्र कोठेही मागे नाही. कोविड काळातही या आजाराचा सामना करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यात राज्यातील तंत्रज्ञ काम करीत असून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुढाकाराने तयार केलेले युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट (तारा) उपयुक्त ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

सध्या हा रोबोट नागपुरात ठेवण्यात आला असून त्याचे ई-उद्घाटन मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत झाले. या उद्घाटन सोहळ्यास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डी.टी. शिर्के, प्रा.महेंद्र शिरसाठ, अमित किमटकर, सुबोध भालेराव व संबंधित उपस्थित होते.श्री.सामंत म्हणाले, रुग्णालये, हॉटेल्स, व्यावसायिक जागा आदी ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी या रोबोटचा उपयोग होईल. तंत्रज्ञान विकसन प्रक्रियेत आधुनिक महाराष्ट्र कोठेच कमी नाही. विशेषतः विद्यापीठात हे तंत्रज्ञान विकसित झाले याचा आनंद आहे. राज्यातील रोबोटिक्स क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे प्रेरणा मिळणार असून भविष्यातील संशोधनाला चालना मिळणार असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले.ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले, कोरोनाच्या या जागतिक संकटाशी लढत असताना अजूनही लसीचे संशोधन झाले नसल्यामुळे या रोबोटची भूमिका महत्त्वाची आहे. कोविडचा सामना करण्यासाठी सॅनिटायझिंग टनेल, युव्ही -सी टॉर्च आदी संशोधने होत असताना हे रोबोटचे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या संशोधनाच्या निर्मितीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचे काम कौतुकास्पद असल्याचे डॉ.राऊत यांनी सांगितले.महाराष्ट्रासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण असून या तंत्रज्ञानाचा निश्चितपणे फायदा होणार आहे. जोपर्यंत एखादी चांगली संकल्पना वास्तविक रुपाने लोकांच्या उपयोगात येत नाही तोपर्यंत सर्वसामान्यांना तिचे महत्त्व नसते. अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांना उचलून धरत त्यांच्या जोपासनेसाठी पाठबळ उभे करायला हवे, असेही डॉ. राऊत यावेळी म्हणाले.युव्ही-३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोटचे तंत्रज्ञान हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे आहे. महाविद्यालये, विद्यापीठे आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या एकत्रीकरणातून या संशोधनाची निर्मिती झालेली आहे. संशोधनासाठी अशा पद्धतीने सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. आर.जी. सोनकवडे यांच्या प्रयत्नातून ‘युव्ही – ३६० सॅनिटायझर मॉड्युल रोबोट'(तारा)ची निर्मिती झाली आहे. त्यांच्या या संशोधनामुळे कोरोना विषाणू व तत्सम सुक्ष्मजीवांचे निर्जंतुकीकरण करणे साध्य होणार आहे.या रोबोटची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे रोबोटमध्ये वापरलेले वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय-आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) होय. मानवी उपस्थितीत मानवी हालचाली अचूकपणे ओळखून तात्काळ अतिनील किरणांचे उत्सर्जन थांबवण्यासाठी यामध्ये पीआयआर सेन्सर वापरला आहे. तसेच खोलीमध्ये फिरताना अडथळ्यांवर थडकून तो खराब होऊ नये यासाठी  अँटीकोलिजन सेन्सर वापरला आहे. निर्जंतुकीकरणाच्या ठिकाणाचे मोजमाप घेण्यासाठी एलआयडीएआर सेन्सर बसवला आहे. त्यामुळे रोबोट त्याच्यामध्ये असणाऱ्या ३६० अंश स्कॅनरच्या साहाय्याने द्विमिती किंवा त्रिमितीमध्ये मोजमाप घेऊन त्यानुसार निर्जंतुकीकरणासाठी लागणारी वेळ स्वतःच निश्चित करतो. प्रभावी निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त सिम्युलेशसन्स अँसिस सॉफ्टवेअर प्रा. लि. आणि कॅडफेम यांनी पुरवली आहेत. २० किलोग्रॅम वजन असणाऱ्या या रोबोटची १० बाय १० मापाची  खोली अवघ्या ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत निर्जंतुक करण्याची  क्षमता आहे. यामध्ये वापरलेल्या ११ वॅटच्या एकूण १८ UV-C टयूबमुळे कोरोना विषाणूसोबत इतर विषाणू व जिवाणूंचाही  नायनाट करणे शक्य होणार आहे.रोबोटमध्ये वापरलेल्या लिथियम आयन बॅटरीमुळे चार तास चार्ज केल्यानंतर तो दोन ते अडीच तास कार्यरत राहू शकतो. या रोबोटसाठी बनवलेल्या खास अशा अँड्रॉइड ॲपच्या मदतीने अगदी कुठूनही त्याला चालवणे शक्य आहे. मोबाइल वायफायद्वारे हा काही मीटर अंतरावरून हाताळला जाऊ शकतो. याहीपलीकडे जाऊन हा रोबोट आयओटी (Internet of Things) तंत्रज्ञानाद्वारे अगदी परदेशातूनही चालवता येतो. याव्यतिरिक्त त्याची कार्यस्थिती समजण्यासाठी त्यावर LED बसवले आहेत. हिरव्या रंगाचे LED त्याची चालू स्थिती दर्शवतात तर जेव्हा तो UV-C tube चालू करून निर्जंतूकीकरणाचे काम सूरू करतो तेव्हा लाल रंगाचा LED लागतो.रोबोटच्या डोक्यावर बसवलेल्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्या ठिकाणची  सर्व दृश्ये पाहणेही आपणास शक्य होईल. कोविड-१९ वॉर्ड, मोठमोठे माॅल, रुग्णवाहिका, हॉटेल्स, उपहारगृहे, सार्वजनिक वाहने, खासगी हॉटेल्स, विमानतळ व प्रवाशी कक्ष, रेल्वे, रेल्वेमधील स्वयंपाक कक्ष, धान्य कोठी, घर, कार्यालये, व्यायामशाळा, महाविद्यालये, कारखाने, किराणादुकान, सिनेमागृह, बँक, सार्वजनिक शौचालये आदी ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी  हा रोबोट अत्यंत लाभदायक ठरेल. या रोबोटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्यासोबत बोलूही शकतो आणि कोरोना व इतर विषाणू, सूक्ष्मजीव, विकिरणे,  विद्युतचूंबकीय लहरी, अतिनील किरणे अशा अनेक वैज्ञानिक बाबींवर माहितीही देऊ शकतो.विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या उद्देशाने प्रा.डॉ.आर. जी. सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत सोनकवडे, रत्नदीप कांबळे, पवन खोब्रागडे, समीर रामटेके आणि त्यांच्या संघाने ही संकल्पना सत्यात उतरवली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

२०३० पर्यंतची गरज लक्षात घेऊन वीज पारेषणाचे नियोजन करण्याचे डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश

0

मुंबई, दि. 5 : राज्यात डेटा सेंटर, इलेक्ट्रिकल व्हेईकल स्टेशनसारखी नवी औद्योगिक गुंतवणूक येत आहे, तर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि कोस्टल हायवेसारखे नवे महामार्ग बांधले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर वीजेची मागणी वाढणार आहे हे लक्षात घेऊन 2030 पर्यंतचा वीज पारेषण आराखडा तयार करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

ऊर्जा विभागाअंतर्गत राज्य प्रेषण केंद्र (स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी) ची बैठक घेऊन ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी एस टी यू कडे प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, संचालक संजय ताकसांडे, तांत्रिक सल्लागार उत्तम झाल्टे उपस्थित होते.

राज्य पातळीवर वीज यंत्रणेच्या जाळ्याचे नियोजन अधिक शास्त्रीयदृष्ट्या करण्याचे काम एसटीयूला यापुढे करावे लागणार आहे. सध्याच्या यंत्रणेतील त्रुटी दूर करून लघुकालीन व दीर्घकालीन नियोजन करावे लागेल. 2030 पर्यंतची विजेची गरज आणि ती पुरविण्यासाठी पारेषण यंत्रणा कशी लागणार आहे, यासाठी एक आराखडा तयार करावा. अत्याधुनिक अशी स्काडा यंत्रणा उभारा, असे आदेशही डॉ.राऊत यांनी दिले.

खासगी वीज कंपन्याकडून पारेषण यंत्रणा उभारण्यासाठी कोणते प्रस्ताव आले आहेत आणि ते प्रलंबित असल्यास त्या मागील कारणे काय, याबद्दल उर्जामंत्र्यांनी बैठकीत विचारणा केली. खासगी कंपन्यांकडून आलेल्या प्रस्तावांची व्यवहार्यता आणि गरज तपासून हे प्रस्ताव गतीने वीज नियामक आयोगाकडे सादर करायला हवेत. एमएमआरडीए, एमआयडीसी, सिडको इत्यादी संस्थासोबत बैठक घेऊन विजेची मागणी व आपल्या तयारीचा मेळ घालायला हवा, अशा सूचनाही डॉ.राऊत यांनी दिल्या.

तांत्रिक सल्ला घ्या

विजेची वाढती मागणी पाहता भविष्यात 12 ऑक्टोबरसारखी घटना घडू नये यासाठी आयलँडिंग यंत्रणा यशस्वीपणे राबविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्याची सूचना त्यांनी केली.

सर्व ट्रान्समिशन कंपन्यांनी प्रस्तावित केलेल्या योजना जर त्यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण केल्या नाहीत तर मुंबईच्या भविष्यातील मागणी पुरवठ्यावर काय परिणाम होईल याचे एसटीयुने मुद्देसूद सादरीकरण करावे.

ग्रीड कोऑर्डीनेशन कमिटीला यापुढे आपल्या कार्यशैलीत आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता असून त्यासाठी वेगवेगळ्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी केल्या. यावेळी एस. टी. यु. कडून सादरीकरण करण्यात आले.

आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबई, दि. ५ नोव्हेंबर : राज्यात आज ११,२७७ रुग्ण बरे होऊन घरी, आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate९१.०७ % एवढे झाले आहे.

  • आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात आज ११७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,००३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण १,०६,५१९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई२६१६८१२३४५५११०३७७६३७१६११६
ठाणे२२६१०९२०४६९०५२३७४४१६१३८
पालघर४३३९५४०१६३८८१२३४३
रायगड६०२७२५५०७५१४२८३७६३
रत्नागिरी१००३७८५४८३७३ १११६
सिंधुदुर्ग५०९९४४५५१३३ ५११
पुणे३३६९८२३०६२०८६९९०३३२३७५१
सातारा४८६१९४३२७४१४३९३८९७
सांगली४७३६७४३३३०१६६३२३७२
१०कोल्हापूर४७४६७४५५५४१६५२२५८
११सोलापूर४४९५९४१२२३१५०७२२२४
१२नाशिक९६९८५९१५०७१५९७३८८०
१३अहमदनगर५७१३८५१७१६८९१४५३०
१४जळगाव५३७८६५०९६०१३६११४५७
१५नंदूरबार६४७०५९६७१४२३६०
१६धुळे१४३०८१३७०७३३५२६४
१७औरंगाबाद४२७०१४०५४४९८४१३११६०
१८जालना१०६९५९९५२२९६४४६
१९बीड१४२९९१२७५२४३११११२
२०लातूर२०९८०१८७२५६२३१६२९
२१परभणी६७६१५९१९२३८११५९३
२२हिंगोली३७०१३१०८७६ ५१७
२३नांदेड१९३९३१७०४२५५९१७८७
२४उस्मानाबाद१५५३२१३८९०५०४११३७
२५अमरावती१७१९३१५८८०३५१९६०
२६अकोला८६६४७७५०२८५६२४
२७वाशिम५८१५५५६०१४५१०८
२८बुलढाणा१०७९४१०००११७७६१२
२९यवतमाळ१११८०१०१७३३२४६७९
३०नागपूर१०३६००९६८८८२८१३१५३८८४
३१वर्धा६८४७६१२२२१५५०८
३२भंडारा९२६७७९९०२०५ १०७२
३३गोंदिया१०२६०९४२०१०८७२६
३४चंद्रपूर१७०३६१३२७९२६२ ३४९५
३५गडचिरोली५८४०४९३१५१८५७
 इतर राज्ये/ देश२२१२४२८१५१ १६३३
 एकूण१७०३४४४१५५१२८२४४८०४८३९१०६५१९

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येतेजिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ५,२४६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,०३,४४४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबई महानगरपालिका८४१२६१६८१२५१०३७७
ठाणे९१३४८५८८६२
ठाणे मनपा१६३४७४५१११११३८
नवी मुंबई मनपा१२६४८५८३१०००
कल्याण डोंबवली मनपा१७०५४५४१९३१
उल्हासनगर मनपा२०१०४२१३१४
भिवंडी निजामपूर मनपा६३४८३४१
मीरा भाईंदर मनपा६०२३९०७६५१
पालघर१४१५५८०२९०
१०वसई विरार मनपा५१२७८१५५९१
११रायगड५३३५११५९०३
१२पनवेल मनपा९५२५१५७५२५
 ठाणे मंडळ एकूण१६९३५९१४५७४६१७९२३
१३नाशिक३५२२७२७६५६३
१४नाशिक मनपा१६४६५५१८८८३
१५मालेगाव मनपा१५४१९११५१
१६अहमदनगर१८७३८६२०५३९
१७अहमदनगर मनपा२४१८५१८३५२
१८धुळे१९७७५३१८४
१९धुळे मनपा१२६५५५१५१
२०जळगाव२४४१३९६१०७२
२१जळगाव मनपा१२३९०२८९
२२नंदूरबार१३६४७०१४२
 नाशिक मंडळ एकूण८१७२२८६८७११४३२६
२३पुणे१९०७८३६७१८०४
२४पुणे मनपा२३५१७३४५१४०२०
२५पिंपरी चिंचवड मनपा१२७८५१६४११६६
२६सोलापूर१८६३४५०२१०९८०
२७सोलापूर मनपा३८१०४५७५२७
२८सातारा२७५४८६१९१४३९
 पुणे मंडळ एकूण१०५१४३०५६०३०९९३६
२९कोल्हापूर४२३३७६११२४८
३०कोल्हापूर मनपा१३७०६४०४
३१सांगली७२२८०९३१०६७
३२सांगली मिरज कुपवाड मनपा१४१९२७४५९६
३३सिंधुदुर्ग१३५०९९१३३
३४रत्नागिरी१००३७३७३
 कोल्हापूर मंडळ एकूण१५२१०९९७०३८२१
३५औरंगाबाद३५१४८६३२७९
३६औरंगाबाद मनपा८१२७८३८७०५
३७जालना७०१०६९५२९६
३८हिंगोली१२३७०१७६
३९परभणी१७३७९३१२६
४०परभणी मनपा२९६८११२
 औरंगाबाद मंडळ एकूण२१९६३८५८१५९४
४१लातूर३०१२५६३४१५
४२लातूर मनपा३२८४१७२०८
४३उस्मानाबाद५२१५५३२५०४
४४बीड८८१४२९९४३१
४५नांदेड१०३१०३१०
४६नांदेड मनपा३४९०८३२४९
 लातूर मंडळ एकूण२४१७०२०४१४२११७
४७अकोला११३८८५११४
४८अकोला मनपा१०४७७९१७१
४९अमरावती४०६३६११४७
५०अमरावती मनपा१११०८३२२०४
५१यवतमाळ३६१११८०३२४
५२बुलढाणा६०१०७९४१७७
५३वाशिम१५५८१५१४५
 अकोला मंडळ एकूण१८३५३६४६१२८२
५४नागपूर८९२४८५१५३६
५५नागपूर मनपा३१३७८७४९२२७७
५६वर्धा५८६८४७२१५
५७भंडारा८६९२६७२०५
५८गोंदिया७८१०२६०१०८
५९चंद्रपूर११५१०२७४१२७
६०चंद्रपूर मनपा३७६७६२१३५
६१गडचिरोली१०४५८४०५१
 नागपूर एकूण८८०१५२८५०३६५४
 इतर राज्ये /देश१०२२१२१५१
 एकूण५२४६१७०३४४४११७४४८०४

(टीप– आज मृत्यू रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेमुळे काही जिल्हे आणि मनपाच्या प्रगतीपर मृत्यू संख्येत वाढ झाली आहेही वाढ कोल्हापूर –२६कोल्हापूर मनपा १०सोलापूर – २९सांगली –५१ आणि नांदेड –२३ अशी आहे.  त्यामुळे राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत १३९ ने वाढ झाली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )

पुण्यात स्विमिंग पूल चालू होणार कि नाही याबाबत संदिग्धता कायम

0

पुणे- ५ नोव्हेंबर पासून मिशिन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने अनेक बाबींना मुभा दिली आहे. मात्र तरीही सिनेमागृहे ,नाट्यगृहे सुरु होण्यास अवधी लागणार असतांना आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढलेल्या आदेशामध्ये तर पुण्यातील स्विमिंग पूल चा उल्लेखच नसल्याने ..जलतरण तलावांचे नेमके होणार काय ? हा प्रश्न अधांतरीच आहे. आज रंगभूमी दिना निमित्त कलाकारांच्या एका समुहाने बालगंधर्व रंगमंदिरात जाऊन रंगदेवता पूजनसमारंभ केला. .महापालिकेने सर्वसमावेशक कलाकार आणि सर्व संबधितांना सहभागी करवूनच नाट्यगृहे कशापद्धतीने चालू करता येतील याबाबत नियमावली करावी अशी मागणी होत असताना दुसरीकडे केवळ एका समूहाला प्राधान्य का देण्यात येत आहे या प्रश्नासह आज आयुक्तांनी काढलेले हे आदेश पाहता सिने नाट्यगृहे खरोखर कशी सुरु होतील हा प्रश्नच असणार आहे. ५ नोव्हेंबरपासून राज्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही इनडोअर खेळांना सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर

पहा नेमके आयुक्तांनी काढलेले हे आदेश ….

साहसी पर्यटन आणि साहसी क्रीडा प्रकार यात गल्लत नको: आ. शिरोळे

0

पुणे: पर्यटन खात्याच्या साहसी पर्यटन उपक्रम नियमावलीत साहसी पर्यटन आणि साहसी क्रीडा प्रकार यात गल्लत करण्यात आली आहे, ती दूर करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत आमदार शिरोळे यांनी गुरुवारी सकाळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

महाराष्ट्र शासनाच्या २०१२च्या क्रीडा धोरणानुसार गिर्यारोहण आणि इतर साहसी खेळ हे क्रीडा प्रकार म्हणून शासनमान्य आहेत. त्यांचा वर्गीकरण क्रीडा खात्याच्या अखत्यारीत येते. पर्यटन खात्याने प्रस्तावित केलेल्या जी.आर. मसुद्यात साहसी क्रीडा प्रकार आणि साहसी पर्यटन यात गल्लत करण्यात आली आहे.ती दूर करून साहसी क्रीडा प्रकार क्रीडा खात्याकडे ठेवावा आणि साहसी पर्यटन हा विषय पर्यटन खात्याकडे वर्ग करावा, असे आमदार शिरोळे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना सांगितले.

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे याबाबतचे निवेदनही पर्यटनमंत्र्यांना स्पष्ट केले. आणि या मागणीचा विचार करून पर्यटन खात्याच्या प्रस्तावित जी .आर. मध्ये सुधारणा कराव्यात असे सांगितले.

हवेली तालुक्यात शोभेची दारु व फटाके विक्रीचे परवाने देण्यात येणार

0


पुणे,दि.5 :- दिपावली उत्सवनिमित्त सन 2020 साली हवेली तालुक्यात शोभेची दारु व फटाके विक्रीचे परवाने उपविभागीय अधिकारी हवेली, उपविभाग, पुणे यांचे कार्यालयाकडून देण्यात येणार आहेत. शोभेची दारु व फटाके विक्रीची मुदत ही दि. 22 नोव्हेंबर 2020 अखेर पर्यंत अमंलात राहणार असून परवान्याची मुदत संपल्यानंतर परवाना धारकांनी शिल्लक राहीलेला माल जवळ ठेवू नये तो माल कायमस्वरुपाचा परवाना असलेल्या परवानाधारकाजवळ ठेवणे आवश्यक आहे. असे उपविभागीय दंडाधिकारी, हवेली यांनी प्रसिदधी पत्रकान्वये कळविले आहे.
हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयात 12 नोव्हेंबर 2020 पुर्वी साध्या कागदावर रुपये 10 चा कोर्ट फी स्टॅम्प तिकीट लावून अर्ज करावा. अर्जावर 10 रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे तसेच ज्या जागेत शोभेची दारु व फटाके विक्रीचा व्यवसाय करावयाचा आहे. त्या जागेचा मिळकत रजिस्टरचा उतारा अथवा सदर जागा दुसऱ्याच्या मालकीची असेल तर त्याच्या नावे असलेल्या सदर मिळकतीचा रजिस्टर उतारा सदर व्यवसायासाठी जागेचा वापर करण्यास संबंधितांचे 100रूपयाचे स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र, पोलिस निरीक्षक सहा पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक यांचा शोभेची दारु व फटाके साठा व विक्री करणेच्या सुरक्षततेबाबत आणी दंड व शिक्षा झाली आहे किंवा कसे ? याबाबतचे प्रमाणपत्र तसेच नाहरकत प्रमाणपत्र व व्यवसायाची जागा सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, मागील वर्षाच्या परवान्याची झेरॉक्स प्रत, तात्पुरता फटाका विक्री परवाना रूपये 600 (भारतीय स्टेट बँक शाखा, पुणे येथे) या कार्यालयाकडील चलनाद्वारे भरावी व चलन अर्जासोबत जोडावे, कोविड-19 च्या नियमावलीनुसार (मास्क, सोशल डिस्टनसिंग व इ.) नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
शोभेची दारु व फटाके विक्रीची मुदत 22 नोव्हेंबर 2020 अखेरपर्यंत अंमलात राहील. परवान्याची मुदत संपल्यानंतर परवाना धारकांनी शिल्लक राहीलेला माल जवळ ठेवू नये तो माल कायमस्वरुपाचा परवाना असलेल्या परवानाधारकांजवळ ठेवणे आवश्यक आहे. असेही उपविभागीय दंडाधिकारी, हवेली यांनी कळविले आहे.

‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ची दुसऱ्या तिमाहीत उत्तम आर्थिक कामगिरी

0

ग्राहकोपयोगी उत्पादन (सीपी) विभागाच्या महसुलात 12.9 टक्के, तर करपूर्व उत्पन्नात 159 टक्के वाढ, करपूर्व नफा वाढला 102 कोटी रुपयांनी.

‘बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड’ने 30 सप्टेंबर 2020 रोजी संपलेल्या सहामाहीचा आणि तिमाहीचा आर्थिक निकाल जाहीर केला आहे.

2020-21 या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत कंपनीने आपल्या कामकाजातून 1,218 कोटी रुपयांची विक्री केली / उत्पन्न कमावले. मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीतील 1,096 कोटी रुपयांच्या उत्पन्नापेक्षा यंदाचे हे उत्पन्न 11.1 टक्क्यांनी अधिक आहे. यंदाच्या तिमाहीत कंपनीने 73 कोटी रुपयांचा करपूर्व नफा आणि 53 कोटींचा करपश्चात नफा कमावला आहे. मागील वर्षी दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 29 कोटी रुपयांचा करपूर्व तोटा आणि 33 कोटींचा करपश्चात तोटा झाला होता.

या तिमाहीमध्ये ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या (सीपी) विभागात, कंपनीने 792 कोटी रुपयांचा एकूण महसूल मिळवला. गेल्या वर्षीच्या तिमाहीत तो 702 कोटी रुपये होता. म्हणजे, यंदाच्या महसुलात 12.9 टक्क्यांची वाढ झाली. ‘सीपी’मध्ये करपूर्व नफा 85 कोटी रुपयांचा झाला. गेल्या वर्षीच्या 33 कोटींच्या तुलनेत यंदा ही वाढ 159 टक्क्यांची झाली. सीपी विभागाची ऑपरेटिंग मार्जिन्स 10.7 टक्के आहेत. इपीसी विभागात कंपनीने 425 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळवले. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील 394 कोटींच्या तुलनेत त्यात यंदा 8 टक्के वाढ झाली. इपीसी विभागाने यंदा 7 कोटींचा करपूर्व नफा कमावला. गेल्या वर्षी या विभागाला 18 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.  

सध्याच्या आर्थिक वर्षात 30 सप्टेंबर 2020 रोजी संपलेल्या सहामाहीमध्ये कंपनीने आपल्या कामकाजातून 1,826 कोटी रुपयांची विक्री केली / उत्पन्न कमावले. मागील वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीतील 2,403 कोटी रुपयांच्या उत्पन्नापेक्षा यंदाचे हे उत्पन्न 24 टक्क्यांनी कमी आहे. यंदाच्या सहामाहीत कंपनीने 41 कोटी रुपयांचा करपूर्व नफा आणि 37 कोटींचा करपश्चात नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या सहामाहीत कंपनीला 6 कोटी रुपयांचा करपूर्व तोटा आणि 19 कोटींचा करपश्चात तोटा झाला होता.

या सहामाहीमध्ये ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या विभागात, कंपनीने 1,187 कोटी रुपयांचा एकूण महसूल मिळवला. गेल्या वर्षीच्या सहामाहीत तो 1488 कोटी रुपये होता. म्हणजे, यंदाच्या सहामाहीत महसुलामध्ये 20.2 टक्क्यांची घट झाली. ‘सीपी’मध्ये करपूर्व नफा 93 कोटी रुपयांचा झाला. गेल्या वर्षीच्या 84 कोटींच्या तुलनेत यंदा ही सहामाहीतील वाढ 11.1 टक्क्यांची झाली. सीपी विभागाची ऑपरेटिंग मार्जिन्स 7.8 टक्के आहेत. इपीसी विभागात कंपनीने 639 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळवले. गेल्या वर्षीच्या सहामाहीतील 915 कोटींच्या तुलनेत त्यात यंदा 30.2 टक्के घसरण झाली.

2020-21 या आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीमध्ये कंपनीने आपल्या कामकाजातून 467 कोटी रुपयांचा कॅशफ्लो मिळवला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 294 कोटींचा कॅशफ्लो कंपनीला मिळाला होता. कंपनीवरील कर्जे 31 मार्च 2020 रोजी 962 कोटी रुपयांची होती, ती या सहामाहीत घटून 30 सप्टेंबर 2020 रोजी 559 कोटी रुपयांची झाली.

‘कोविड-19’च्या साथीमुळे जगभरात व भारतात उद्योग व्यवसाय विस्कळीत झाले आणि आर्थिक उलाढाली मंदावल्या. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कारखाने, तसेच विक्री, वितरण आणि इपीसी कंत्राटे यांचे कामकाज बंद राहिले. त्यामुळे कंपनीच्या कामगिरीवर त्याचा परिणाम झाला. आता कंपनीचे देशभरातील कारखाने, शाखा व गोदामांमध्ये कामकाज सुरू झाले आहे. कंपनीच्या ‘इपीसी साईट्स’देखील आता कार्यान्वित झाल्या आहेत. दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा सर्व कारभार सुरळीत सुरू झाल्याने सीपी व इपीसी या विभागांमध्ये करपूर्व नफ्यामध्ये वाढ झाली आहे.

‘बजाज इलेक्ट्रिकल्स लि.’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज म्हणाले, ‘’दुसऱ्या तिमाहीमध्ये झालेल्या आमच्या दमदार कामगिरीमुळे मी खूष आहे. या तिमाहीत ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या विभागात चांगली सुधारणा झाली आणि तिमाहीत होणारा करपूर्व नफा 85 कोटी या सर्वोच्च स्तरावर गेला. या तिमाहीत आमच्या इपीसी विभागाच्या कामगिरीतदेखील चांगली सुधारणा झाली. इतके दिवस या प्रकल्पांची कामे व त्यांची बिलिंग प्रक्रिया खोळंबली होती. आमच्या कामकाजातून मिळणाऱा ‘कॅशफ्लो’देखील आम्ही या तिमाहीमध्ये चांगला राखला व तो 322 कोटींवर गेला. त्यामुळे आमच्यावरील कर्जांचा बोजा काही प्रमाणात कमी झाला. या तिमाहीत आमची कामगिरी उत्कृष्ट झाली, यावरून आमच्या टीमने बाह्य आव्हानांना समर्थपणे तोंड दिल्याचे दिसून येते.’’

कंपनीकडे 1 ऑक्टोबर 2020 रोजीनुसार 1,474 कोटी रुपयांची कामे आहेत. यामध्ये वीज पारेषणाच्या टॉवर्सची कामे 482 कोटींची, वीज वितरणाची कामे 602 कोटींची आणि प्रकाशव्यवस्थेची कामे 390 कोटी रुपयांची आहेत.

नगरसेवक अमोल बालवडकर यांचा  ‘कृतज्ञ दिवाळी ‘सरंजाम वाटप उपक्रम

0
  • ५ हजार कुटुंबामध्ये पोचणार दिवाळीचा आनंद !
  •   ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बालेवाडी मध्ये आयोजन  

पुणे :- शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष  आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने   ‘कृतज्ञ दिवाळी ‘सरंजाम वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या सरंजाम मध्ये दिवाळी साठी जीवनोपयोगी साहित्य असणार आहे. ५ हजार कुटुंबामध्ये दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवून   ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बालेवाडी मध्ये आयोजन  या कृतज्ञता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 
‘कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व क्षेत्रात असलेली मंदी पाहता सर्व कुटुंबियांना दिवाळी चे नियोजन करताना अडचणी येत आहेत. दिवाळी सणाच्या दिवसात हे अडचण ,नैराश्याचे मळभ दूर करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत’,असे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले.

 
५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता या उपक्रमाचे उदघाटन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते होणार आहे .बालेवाडी येथील भारती विद्यापीठ शाळेच्या मैदानात हा उपक्रम होणार आहे .नगरसेवक अमोल बालवडकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती

0

पदाचे नाव व एकूण पदे –

पोस्टमन (PM) – १,०२९ पदे

मेल गार्ड (MG) – १५ पदे

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – ३२ पदे

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सबऑर्डिनेट ऑफिसर) – २९५ पदे

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण. मल्टिटास्किंग स्टाफ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण.
  • मराठी भाषेचे ज्ञान, किमान दहावीपर्यंतच्या शिक्षणात मराठी विषय आवश्यक.
  • संगणकाचे ज्ञान आवश्यक
  • पोस्टमन पदासाठी दुचाकीचा वाहन परवाना आवश्यक

वयोमर्यादा :

पोस्टमन आणि मेल गार्ड पदासाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे

मल्टी टास्किंग स्टाफच पदासाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे