जळगाव-दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात आणखी एका एसटी महामंडळाच्या कंडक्टरने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. ‘माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याची सुसाईट नोट लिहून जळगावातील एका कंडक्टरने आपले जीवन संपवले.
जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले आणि एस मंडळात कंडक्टर असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मनोज चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईट नोट लिहून ठेवली. ”एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा” असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.
एसटी मंडळामध्ये गेले तीन चार महिने पगार मिळत नसल्याने मनोज कर्जबाजारी झाला होता. त्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती मयत मनोज चौधरीच्या वडिलांनी दिली आहे.
रत्नागिरी एसटी महामंडळाच्या बस आगारात एका बस कंडक्टरने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पांडुरंग संभाजीराव गडदे असे या बस वाहकाचे नाव आहे.
बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची धडक कारवाई सुरु असून आता अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी धाड टाकण्यात आली आहे . तसेच या कारवाई दरम्यान अभिनेता अर्जुन रामपालच्या वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एनसीबीला कारवाईदरम्यान अर्जुनच्या घरात ड्रग्ज सापडले की नाही, याचा अद्याप खुलासा होऊ शकलेला नाही.
काही दिवसांपूर्वीच अर्जुनच्या मेहुण्याला झाली होती अटक
या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सचा भाऊ अॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक केलीहोती. दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला एनसीबीने लोणावळ्यातून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर आता अर्जुन रामपालच्या घरी धाड टाकण्यात आली आहे.
दीपिकाच्या ड्रग्ज चॅटमध्ये अर्जुन रामपालच्या नावाचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता गेल्या महिन्यात दीपिका पदुकोणचे ड्रग्ज चॅट उघडकीस आल्यानंतर एनसीबीने तिची चौकशी केली होती. दीपिकाच्या चॅटमध्ये ए नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होता. ए अर्जुन रामपाल असू शकतो असा अंदाज वर्तवला गेला होता.
मुंबई-अर्णब गोस्वामी प्रकरणात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. फडणवीसांनी सोमवारी ट्विट करुन अर्णब गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी केली.
याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अर्णब गोस्वामींना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत. या सगळ्याची न्यायालयाने दखल घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
अर्णब गोस्वामींकडून सातत्याने पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहेत. अलिबागवरून तळोजा तुरुंगात नेत असताना अर्णब गोस्वामींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. माझा जीव धोक्यात आहे. मला माझ्या वकिलांशी बोलून दिले जात नाही. पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचे अर्णव गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.
While deciding on the matter today, it is our humble request to the Hon High Court to take suo moto cognizance of the way MVA State Government in Maharashtra has treated Arnab Goswami during the entire process of arrest to handling under custody, as alleged by him.
एका महिन्याचा पगार, ही तर तात्पुरती मलमपट्टी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर मुंबई , दि. ९ नोव्हेंबर- एसटी कर्मचा-यांना गेले तीन महिने पगार न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार मिळत नसल्यामुळे गेल्या दोन दिवसात एसटीच्या दोन कर्मचा-यांनी आत्महत्या केली आहे. तरीही हे ठाकरे सरकार अजूनही झोपले आहे. त्यामुळे या एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येला जबाबदार असणा-या ठाकरे सरकारवर ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचा-यांना आजच एका महिन्याचे पगार देण्याची केलेली घोषणा म्हणजे तात्पुरती मलपटटी करण्याचा प्रयत्न आहे. एसटी कर्मचा-यांना सरकारकडून अर्धवट न्याय मिळाला आहे, पण जोपर्यंत कर्मचा-यांना पुर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहणार असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले. वेतन न दिल्यामुळे एसटी कर्मचा-यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. काल जळगाव येथे मनोज चौधरी व आज रत्नागिरीत पांडुरंग गडदे या एसटी चालकाने गळफास लावून आत्महत्या केली, या दोन्ही घटना या सरकारला शोभा देणा-या नाहीत, तसेच मनोज चौधरी यांनी आत्महत्या करताना चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये एसटीच्या व्यवस्थेवर आरोप केलाय व या अव्यवस्थेला एसटी महामंडळ व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. एसटी कर्मचा-यांच्या चिठ्ठीत ठाकरे सरकारचे नाव आहे. त्यामुळे जर अर्णब गोस्वामी यांचे नाव अन्वय नाईक प्रकरणात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली मग आता ठाकरे सरकारमध्ये कोणावर गुन्हा दाखल करणार असा स्पष्ट सवालही दरेकर यांनी उपस्थित केला. त्यामुळे एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येला जबाबदार असणा-या ठाकरे सरकारविरुध्द भारतीय दंड संहिता ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली. परिवहन मंत्र्यांनी आज घाईघाईत केलेल्या घोषणेमुळे एसटी कर्मचा-यांना पूर्ण न्याय मिळालेला नाही. त्यामुळे जोपर्यंत एसटी कर्मचा-यांना सर्व महिन्यांचा पगार मिळत नाही तोपर्यंत भाजपाचा संर्घष सुरु राहणार आहे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
पुणे : ‘कोरोना महामारीमध्ये परिसरातील नागरीकांवर असलेले आर्थिक संकट पाहता दिपमय आनंदी दिवाळी कशी साजरी करायची हा अनेक कुटुंबासमोर असणारा प्रश्न होता, परंतु दिवाळी सरंजाम वाटपाचा समाज उपयोगी उपक्रम करुन लोकप्रतिनिधी या नात्याने नगरसेवक अमोल बालवडकर हे अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत आहेत.संकटकाळात लोकप्रतिनिधींनी समाजाच्या पाठीशी कसे उभे राहावे,याचा हा वस्तुपाठ आहे’, असे प्रतिपादन माजी केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
बालेवाडी येथे नगरसेवक अमोल बालवडकर आयोजित दिवाळी सरंजाम वाटप या समाज उपयोगी उपक्रमाचा समारोप माजी केंद्रिय मंत्री खासदार रावसाहेब दानवे-पाटील व पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीमध्ये समारोप करण्यात आला. चार दिवस सुरु असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातुन परिसरातील ५००० दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आले.५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान बालेवाडीमध्ये या कृतज्ञता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.रविवारी सायंकाळी या उपक्रमाचा समारोप झाला.
खासदार गिरीष बापट म्हणले,’या दिवाळी सरंजाम वाटपासारख्या उपक्रमांमधुन दिसुन येते कि आमचे लोकप्रतिनिधी विकास कामांच्या बाबतीत जरी गगनाला आपले हात भिडवत असतील तरी त्यांचे पाय अजुन जमिनीवरच आहेत आणि म्हणुन आम्ही सर्व समाजासाठी कार्य करणार्या अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी कायम ठामपणे उभे आहोत.” यावेळी पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धिरज घाटे, नगरसेवक किरण दगडे- पाटील, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर, भाजपा कोथरुड विभाग अध्यक्ष पुनित जोशी, नगरसेवक दिपक पोटे, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, ॲड.सत्या मुळे, मंदार राराविकर, आत्माराम बालवडकर तसेच अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद व नागरीक उपस्थित होते.
पुणे : “समाजाची चांगली जडण-घडण घडवण्यासाठी प्रत्येकाने निर्मळ योगदान देणे गरजेचे आहे. जगातील जात-पात, रंग भेद बाजूला ठेवून प्रत्येकाच्या आतमध्ये दडलेला चांगुलपणा बाहेर आला पाहिजे. चांगुलपणाची चळवळ छोट्या स्वरूपाची असली तरी संपूर्ण जगाला एक देश बनवण्याची शक्ती यामध्ये आहे.” असे प्रतिपादन संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मानसोपचारतज्ञ डॉ. पी एन कदम यांनी केले.
चांगुलपणाची चळवळ संस्थेतर्फे या संस्थेचे अध्यक्ष आणि माजी प्रशासकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सलग बारा तास फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून व्याख्यान पर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात विविध क्षेत्रातील 64 मान्यवरांनी विविध विषयावर मार्गदर्शन करत ज्ञानेश्वर मुळे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन यशवंत शितोळे आणि प्रणोती शितोळे यांनी केले. डॉ. मुळे यांनी आभार मानले.
डॉ. कदम म्हणाले, चांगुलपणाची चळवळ देशव्यापी झाली असून ज्ञानेश्वर मुळे यांचे मार्गदर्शन तरूण पिढीला प्रेरणादायी आहे. मुळे हे उत्तम व आदर्शवत असे हे व्यक्तिमत्व सर्वांना सकारात्मक ऊर्जा देणारे आहे. सर्वांना प्रोत्साहन देण्याबरोबरच सर्वांशी आपुलकीने वागणारे असे आहे. मुळे यांनी चांगुलपणाची चळवळ ही संस्था उभारून प्रभावी समाजपरिवर्तनाच्या सकारात्मक कृतिशील उपक्रमाची वाट दाखवून दिली.
माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, “चांगुलपणा म्हणजे सध्या नेभळटपणा असा समज समाजामध्ये झाला आहे. कारण चांगला माणूस हतबल असतो ज्या बाजूने खेचला जाईल त्या बाजूने ढकलला जातो. ही अशी अवस्था कोणावर ही येऊ नये. म्हणूनच चांगुलपणाच्या चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय होय. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समाजपरिवर्तनाची चळवळ पुढे नेऊया सुंदर सार्थक समाज बनवूया. एका अर्थाने समाजाच्या शुद्धीकरणाची छोटी का असेना पण फार महत्वाची मोहीम हाती घेतलेले आहे. सामान्य माणसाची शक्ती प्रबळ असते. त्यामुळे तिचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे.
पुणे: लॉकडाऊनवेळी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या अनेक गावांतील माणसांचे परत स्थलांतर झाले आहे. रिव्हर्स मायग्रेशन म्हणजे “खेड्याकडे चला” हा वनराईच्या कामाचा मोठा पैलू आहे. याद्वारे गावातील व्यक्तींना गावामध्येच रोजगार निर्माण होऊन गावाचा विकास कसा साधता येईल यावर वनराई भर देत आहे. गावातील मुलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे असून वनराई संस्था ग्रामीण विकासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. गावातील पाणी प्रश्न, शिक्षण आणि आरोग्य प्रश्न तसेच लोकांचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी काम सुरू आहे. प्रत्येक संकटात संस्थेचे कार्यकर्ते सातत्याने झोकून काम करत असतात. त्यामुळे सर्व संस्थानी एकत्र येऊन काम केले तर सगळया संस्थेचे ज्ञानात भर आणि ताकद वाढेल. समाजाची नाळ जोडलेली आहे ती तुटता कामाने ही महत्त्वाची बाब लक्षात ठेले पाहिजे.”असे मत वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी रविवारी व्यक्त केले.
अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात” वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ देण्यात आला यावेळी ते बोलत होते. तसेच माजी राज्य जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, राज्याचे माजी तुरुंग महानिरीक्षक विठ्ठल जाधव, महाएनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते पुरस्कार पुरस्काराचे वितरण झाले. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या वीस जणांना ‘समाजरत्न पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे, अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष धोंडीराम जवान आदी उपस्थित होते.
धारिया म्हणाले, हा पुरस्कार माझा सन्मान नसून गावा गावात जे माझे सहकारी काम करतात त्यांचा हा बहुमान आहे. तसेच लहान मुलांमध्ये आणि शाळेतील मुलांमध्ये पर्यावरणबद्दलचे संस्कार घडावे यासाठी गेली २० वर्ष विविध स्पर्धेचे आयोजन करून पर्यावरणाविषयी जनजागृती केली जाते.
प्रा. राम शिंदे म्हणाले, कोरोनाच्या महामारी मध्ये संपूर्ण राज्य, देश, जग कोरोनाग्रस्त झाले होते. शासन आणि प्रशासन काम करत असताना विविध सामाजिक संस्थाने सातत्याने लोकांच्या अडचणी समजुन घेऊन त्यांना शक्य तेवढी मदत केली. त्यामुळे समाजातील विविध संघटनांचे काम कौतुकास्पद आहे. जीवनात अनेक प्रसंग येतात आणि जातात त्यातून माणूस बऱ्याच गोष्टी शिकतो.”
विठ्ठल जाधव म्हणाले, कोरोनाच्या काळात संपूर्ण राज्यात-परराज्यामध्ये विविध संस्थानतर्फे अन्न धान्य वाटप, सॅनिटाईज, मास्क, रक्तदाब शिबिरे आयोजित करून मदत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे या विविध सामाजिक संस्था व्यक्ती मध्ये सामाजिक संवेदना आणि माणुसकी जिवंत आहे याची जाणिव होते. हे चांगलं समाज रचनेसाठी चांगल्या समाज जीवनासाठी आवश्यक आहे. या संस्थेचे काम हे तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. जीवनामध्ये स्वतःसाठी काय मिळवले यापेक्षाही दुसऱ्यासाठी काय करू शकलो यांचा आनंद खुप मोठा आहे.
शेखर मुंदडा म्हणाले, कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात फेडरेशनसह सर्व सामाजिक संस्था एकत्रित करून तीन लाख लोकांना मदत दिली. त्यामुळे सर्व संस्था एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यामुळे अधिक गरजूंना मदत करण्यासाठी सोपे होईल. जेव्हा एखाद्या पुरस्काराने आपण सन्मानित होत असतो त्यावेळेस अजून काम करण्याचा उत्साह आणि जबाबदारी वाढते.
मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांच्यातर्फे कोझिकोड एअर इंडिया एक्स्प्रेस विमान दुर्घटनेतील मृत राजीवन यांच्या कन्येस विवाहानिमित्त एक लाख रुपये विशेष भेट
· दातार यांनी दिली अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची आर्थिक मदत
मुंबई – केरळमधील कोकालुर (जिल्हा – कोझिकोड) येथील रहिवासी चेरिक्का परंबिल राजीवन (वय ६१) हे गेल्या ७ ऑगस्ट २०२० रोजी दुबईहून विमानाने भारतात येत होते. दुबईतील एका कार वर्कशॉपमध्ये गेल्या २० वर्षांपासून स्प्रे पेंटर म्हणून काम करत असलेले राजीवन त्यांची मुलगी अनुश्री हिच्या आगामी विवाह सोहळ्याची तयारी करण्यासाठी गावाकडे परत येत होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ते प्रवास करत असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाला कोझिकोड विमानतळावर उतरताना झालेल्या अपघातात वैमानिक व सहवैमानिकासह २० प्रवाशांचा मृत्यू झाला. राजीवन हे त्या दुर्दैवी बळींपैकी एक ठरले. राजीवन यांचे कुटुंबीय दुःखात बुडाले आणि अनुश्रीसाठी तर हा मोठाच धक्का होता कारण विवाहासाठी आशीर्वाद द्यायला तिचे वडील या जगात नव्हते. पण या दुःखावर फुंकर घालणारी एक घटना घडली. दुबईस्थित मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी या मुलीला विवाहासाठी एक लाख रुपये विशेष भेट दिले आणि तिच्यासाठी विवाहाचा क्षण अविस्मरणीय ठरला.
हा विमान अपघात झाल्यानंतर लगेचच अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक असलेल्या डॉ. धनंजय दातार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना व्यक्तीगत निधीतून सहानुभूतीपूर्वक २० लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली व ती काही दिवसांतच संबंधित कुटुंबाच्या खात्यात हस्तांतर झाली. या सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन कारीपूर नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला आणि एक झूम मीटिंग घेऊन त्यामध्ये डॉ. दातार यांचे आभार मानण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. या बैठकीत दिवंगत राजीवन यांच्या आठवणीने त्यांच्या पत्नी निशी यांच्या अश्रूचा बांध फुटला. अनुश्रीच्या साखरपुडा समारंभात राजीवन उत्साहाने सहभागी झाले होते पण विवाहासाठी मात्र ते राहिले नव्हते. त्यांच्या मृत्यूमुळे अनुश्रीचा विवाह लांबणीवर पडला होता. अशा वेळी दातार यांनी केलेली आर्थिक मदत समयोचित ठरल्याचे निशी यांनी बोलून दाखवले.
अनुश्रीच्या विवाहाबाबत समजताच डॉ. दातार यांनी त्याच बैठकीत तिच्यासाठी आणखी एक लाख रुपये खास विवाहभेट म्हणून जाहीर केले व त्वरीत ती रक्कम हस्तांतरही केली. दिवंगत राजीवन यांच्या कुटुंबाने त्यातून अनुश्रीसाठी जास्तीचे सुवर्णालंकार खरेदी केले आणि घराची दुरुस्तीही करुन घेतली. नुकताच हा विवाह सोहळा करोना साथीच्या नियमांचे पालन करत मोजक्या ४० नातलगांच्या उपस्थितीत संपन्न झाला. डॉ. दातार यांच्या सहृदयतेने भारावून गेलेल्या राजीवन कुटूंबाने साश्रू नयनांनी त्यांचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. दातार विनयपूर्वक म्हणाले, “मी काही फार महान काम केलेले नाही. विमान अपघातातील बळींच्या कुटूंबांवरील आर्थिक दडपण दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला इतकंच. आपल्याकडून शक्य होईल तेवढे समाजाला देणे द्यावे आणि गरजूंना मदत करुन त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणावे, अशी शिकवण माझ्या आई-बाबांनी मला दिली. मी त्याच संस्कारांच्या वाटेवर चालत आहे. सध्या मी व माझी कंपनी आखातात अडकलेल्या रोजगारवंचित भारतीय कामगारांना मायदेशात सुखरुप पाठवण्यासाठी काम करत आहोत. आतापर्यंत पाच हजारांहून अधिक निर्धन भारतीयांना आम्ही विमान प्रवास, वैद्यकीय चाचण्या व वाहतूक-खानपान यांचा संपूर्ण खर्च सोसून घरी पोचवले आहे. कुटुंबासमवेत एकत्र आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद ही माझ्यासाठी सर्वाधिक समाधानाची गोष्ट आहे.”
पुणे- गोरगरीबांसाठी राबविलेल्या सामाजिक उपक्रमांमुळेच राज्यात पुण्यासह अनेक महापालिकांवर भाजपची सत्ता आहे . पुण्यातील नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी गरिबांसाठी राबविलेले उपक्रम आदर्शवत आहेत त्यांच्याप्रमाणे इतरांनीही उपक्रम राबविले पाहिजेत असे उदगार येथे केंदीय अन्नधान्य आणि ग्राहक संरक्षण राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी काढले .नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी आयोजित केलेल्या दिवाळी सरंजाम वाटप आणि ऑनलाईन भव्य नौकरी महोत्सवाचे उद्घाटन आज मंत्री दानवे तसेच खासदार गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी आ. भीमराव तापकीर , भाजयुमोचे अध्यक्ष बाप्पू मानकर आणि या भागातील नगरसेवक आदी भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
दानवे यावेळी म्हणाले कि , कोरोनाच्या महामारीच्या काळात गरीब हैराण झालेला असल्ये त्याच्या मदतीला धाऊन जाणे भाजप कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे तो ते पार पाडीत आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी वेळीच लॉक डाऊन चा निर्णय घेऊन आणि गरिबांसाठी मोठ्या मदतीची कवाडे खुली करून जनतेला दिलासा द्यायचा प्रयत्न केला आहे. प्रधानमंत्री यांच्या प्रमाणेच नगरसेवक हि गरिबांसाठी उपक्रम राबवीत आहेत . वेडेपाटील यांचे कार्य त्या अनुषंगाने कौतुकास्पद आहे त्यांच्याप्रमाणे अन्य नगरसेवकांनी देखील कार्य सुरु केले आहे. खा. बापट ,आ .तापकीर यांची यावेळी भाषणे झाली . प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी दिवाळी सरंजाम वाटप करून ६००० कुटुंबासाठी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला आणि ऑनलाईन नौकरी महोत्सवाचा हि प्रारंभ करण्यात आला .आपल्या प्रास्ताविकात वेडेपाटील यांनी खा. बापट आणि आ. तापकीर तसेच महापालिकेच्या माध्यमातून विकास कामे करत असताना त्यांच्याच नेतृतावाखाली आणि प्रेरणेने केलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल नमूद केला. पहा या कार्यक्रमाची व्हिडीओ झलक …
मुंबई, दि. ८ : राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टिव्ह रुग्ण) संख्या एक लाखाच्या आत आली आहे. आज ८२३२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७१ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५०९२ नवीन रुग्णांचे निदान झाले, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात आज रोजी एकूण ९६ हजार ३७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज ११० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ४० हजार ५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १९ हजार ८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ५१ हजार ३२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण –
राज्यात आज रोजी एकूण ९६,३७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –
अ.क्र.
जिल्हा
बाधित रुग्ण
बरे झालेले रुग्ण
मृत्यू
इतर कारणामुळे झालेले मृत्यू
ऍक्टिव्ह रुग्ण
१
मुंबई
२६४५४५
२३५७७६
१०४४५
७२१
१७६०३
२
ठाणे
२२७७७२
२०७४५६
५२९२
४४
१४९८०
३
पालघर
४३६२८
४०९९९
८८६
९
१७३४
४
रायगड
६०५७८
५५४७५
१४३३
६
३६६४
५
रत्नागिरी
१००४४
९०९८
३७७
५६९
६
सिंधुदुर्ग
५१३०
४६०८
१३३
३८९
७
पुणे
३३८५८३
३१४२११
७०६०
३३
१७२७९
८
सातारा
४९१९४
४३७०२
१५११
९
३९७२
९
सांगली
४७५४१
४३८८९
१६८२
२
१९६८
१०
कोल्हापूर
४७५५१
४५५६६
१६५९
३
३२३
११
सोलापूर
४५३८९
४१४२७
१५३६
५
२४२१
१२
नाशिक
९८११५
९३६५९
१६१०
१
२८४५
१३
अहमदनगर
५७७७४
५२७२१
९०१
१
४१५१
१४
जळगाव
५३९५१
५१२४८
१३६४
८
१३३१
१५
नंदूरबार
६५४७
५९७४
१४३
१
४२९
१६
धुळे
१४४१७
१३७६२
३३६
२
३१७
१७
औरंगाबाद
४२९९३
४०७३३
९८६
१३
१२६१
१८
जालना
१०९३६
१०१३०
२९७
१
५०८
१९
बीड
१४५६९
१३०१४
४३९
४
१११२
२०
लातूर
२११२०
१९४१५
६२९
३
१०७३
२१
परभणी
६७९७
५९३७
२३८
११
६११
२२
हिंगोली
३७५७
३१३०
७६
५५१
२३
नांदेड
१९४८२
१७१०९
५७५
५
१७९३
२४
उस्मानाबाद
१५६५९
१४००८
५०६
१
११४४
२५
अमरावती
१७३५७
१५९२२
३५१
२
१०८२
२६
अकोला
८७२३
८१५०
२८८
५
२८०
२७
वाशिम
५८३६
५५८२
१४५
२
१०७
२८
बुलढाणा
१०९७४
१०००३
१८३
४
७८४
२९
यवतमाळ
११३१६
१०३१६
३२८
४
६६८
३०
नागपूर
१०६८५२
१०१०५४
२८२३
१५
२९६०
३१
वर्धा
६९८७
६१८४
२१५
२
५८६
३२
भंडारा
९५०६
८१३४
२०९
११६३
३३
गोंदिया
१०४५५
९५८४
११३
६
७५२
३४
चंद्रपूर
१७४६५
१३८०६
२६८
३३९१
३५
गडचिरोली
६०८१
५११२
५१
१
९१७
इतर राज्ये/ देश
२२३४
४२८
१५२
१६५४
एकूण
१७१९८५८
१५७७३२२
४५२४०
९२४
९६३७२
(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)
करोना बाधित रुग्ण –
आज राज्यात ५,०९२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,१९,८५८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
अ.क्र
जिल्हा महानगरपालिका
बाधित रुग्ण
मृत्यू
दैनंदिन
एकूण
दैनंदिन
एकूण
१
मुंबई महानगरपालिका
१००३
२६४५४५
२३
१०४४५
२
ठाणे
९५
३५०८४
१
८७६
३
ठाणे मनपा
१३६
४७८३९
०
११४७
४
नवी मुंबई मनपा
१२२
४८९२६
१
१००६
५
कल्याण डोंबवली मनपा
१५३
५४९५४
१
९४१
६
उल्हासनगर मनपा
३२
१०४८८
६
३२५
७
भिवंडी निजामपूर मनपा
१५
६३९३
१
३४२
८
मीरा भाईंदर मनपा
६९
२४०८८
१
६५५
९
पालघर
२७
१५६४६
०
२९१
१०
वसई विरार मनपा
३७
२७९८२
२
५९५
११
रायगड
३२
३५२७२
१
९०४
१२
पनवेल मनपा
५०
२५३०६
३
५२९
ठाणे मंडळ एकूण
१७७१
५९६५२३
४०
१८०५६
१३
नाशिक
२३२
२७९१७
३
५७२
१४
नाशिक मनपा
१८५
६५९८१
०
८८६
१५
मालेगाव मनपा
३
४२१७
०
१५२
१६
अहमदनगर
१६६
३९१५०
२
५४६
१७
अहमदनगर मनपा
३०
१८६२४
१
३५५
१८
धुळे
१८
७८०६
०
१८४
१९
धुळे मनपा
८
६६११
०
१५२
२०
जळगाव
२१
४१५०७
१
१०७५
२१
जळगाव मनपा
१५
१२४४४
०
२८९
२२
नंदूरबार
२०
६५४७
०
१४३
नाशिक मंडळ एकूण
६९८
२३०८०४
७
४३५४
२३
पुणे
१८५
७८९७४
३
१८१७
२४
पुणे मनपा
२१६
१७४०८१
४
४०६६
२५
पिंपरी चिंचवड मनपा
१११
८५५२८
८
११७७
२६
सोलापूर
१२८
३४८७०
९
१००९
२७
सोलापूर मनपा
१३
१०५१९
०
५२७
२८
सातारा
१५०
४९१९४
९
१५११
पुणे मंडळ एकूण
८०३
४३३१६६
३३
१०१०७
२९
कोल्हापूर
१९
३३८१३
२
१२५४
३०
कोल्हापूर मनपा
१४
१३७३८
०
४०५
३१
सांगली
५०
२८२३२
४
१०८२
३२
सांगली मिरज कुपवाड मनपा
११
१९३०९
१
६००
३३
सिंधुदुर्ग
९
५१३०
०
१३३
३४
रत्नागिरी
२
१००४४
३
३७७
कोल्हापूर मंडळ एकूण
१०५
११०२६६
१०
३८५१
३५
औरंगाबाद
७४
१४९६५
०
२७९
३६
औरंगाबाद मनपा
१०४
२८०२८
०
७०७
३७
जालना
८८
१०९३६
०
२९७
३८
हिंगोली
४०
३७५७
०
७६
३९
परभणी
६
३८१९
०
१२६
४०
परभणी मनपा
४
२९७८
०
११२
औरंगाबाद मंडळ एकूण
३१६
६४४८३
०
१५९७
४१
लातूर
३६
१२६३६
३
४२१
४२
लातूर मनपा
२७
८४८४
०
२०८
४३
उस्मानाबाद
३७
१५६५९
०
५०६
४४
बीड
११३
१४५६९
४
४३९
४५
नांदेड
१०
१०३४६
१
३१९
४६
नांदेड मनपा
२०
९१३६
४
२५६
लातूर मंडळ एकूण
२४३
७०८३०
१२
२१४९
४७
अकोला
६
३९००
०
११५
४८
अकोला मनपा
२०
४८२३
१
१७३
४९
अमरावती
२२
६४२२
०
१४७
५०
अमरावती मनपा
५२
१०९३५
०
२०४
५१
यवतमाळ
४८
११३१६
०
३२८
५२
बुलढाणा
५३
१०९७४
३
१८३
५३
वाशिम
१२
५८३६
०
१४५
अकोला मंडळ एकूण
२१३
५४२०६
४
१२९५
५४
नागपूर
७४
२५१६७
०
५३८
५५
नागपूर मनपा
३७८
८१६८५
१
२२८५
५६
वर्धा
४३
६९८७
०
२१५
५७
भंडारा
९७
९५०६
२
२०९
५८
गोंदिया
१०१
१०४५५
०
११३
५९
चंद्रपूर
९५
१०५६३
१
१३३
६०
चंद्रपूर मनपा
५६
६९०२
०
१३५
६१
गडचिरोली
९१
६०८१
०
५१
नागपूर एकूण
९३५
१५७३४६
४
३६७९
इतर राज्ये /देश
८
२२३४
०
१५२
एकूण
५०९२
१७१९८५८
११०
४५२४०
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ११० मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू पुणे-८, सातारा-६, ठाणे-६, लातूर-३, नांदेड-३, रत्नागिरी-३, बीड-१, कोल्हापूर-१, नाशिक-१, सांगली-१, सोलापूर-१, नागपूर-१ आणि अहमदनगर-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
पोर्टलवरील रुग्णसंख्येच्या आकडेवारीच्या रिकंसिलीयेशन प्रक्रियेमध्ये आज मुंबई महानगरपालिकेच्या प्रगतीपर रुग्णसंख्येत ४९३ ने वाढ झाली आहे. तसेच, पोर्टलवरील मृत्युंच्या आकडेवारीच्या रिकंसिलीयेशन प्रक्रियेमध्ये आज राज्याच्या प्रगतीपर मृत्यूसंख्येत १५ ने वाढ झाली आहे. हे मृत्यू ठाणे-१४ आणि कर्नाटक-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. )
केंद्रीय निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या रिक्त असलेल्या विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार कम्बाईन हायर सेकंडरी (१०+२) पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव :-
१) लोअर डिव्हिजन लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
२) पोस्टल सहाय्यक/सॉर्टिंग सहाय्यक
३) डाटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिकपात्रता :-
मान्यताप्राप्त मंडळामधून १०+२ (वरिष्ठ माध्यमिक) उत्तीर्ण झालेला उमेदवार
पुणे – आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोथरुडकरांची दिवाळी गोड होणार असून, अतिशय नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याला कोथरुडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनावर नियंत्रणासाठी देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर श्री. पाटील यांनी आपल्या मतदारसंघात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले होते. यामध्ये अतिशय नाममात्र शुल्क आकारुन पोळी-भाजीची व्यवस्था करणे, वयोवृद्धांना २५% सलवतीच्या दरात औषधे देणे. त्याबरोबरच हॅंड सॅनिटायझर, मास्क, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप यासारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले होते. त्याच धर्तीवर कोथरुडकरांची दिवाळी गोड करण्यासाठी श्री. पाटील यांनी पुढाकार घेतला असून, १०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारुन दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला आहे.
श्री. पाटील यांच्या कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयात याची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक ६ नोव्हेंबर ते मंगळवार दि. १० नोव्हेंबर दरम्यान दुपारी ३ ते ६ या वेळेत फराळ विक्री होणार आहे. याला कोथरुडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पुणे विभागातील 4 लाख 79 हजार 622 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 5 लाख 11 हजार 339 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 08 :- पुणे विभागातील 4 लाख 79 हजार 622 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 11 हजार 339 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 326 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 391 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.80 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. पुणे जिल्हा पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 27 हजार 566 रुग्णांपैकी 3 लाख 8 हजार 728 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 862 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 976 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.25 टक्के आहे. सातारा जिल्हा सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 754 रुग्णांपैकी 43 हजार 638 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 513 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 603 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 860 रुग्णांपैकी 38 हजार 125 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 241 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 494 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हा सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 715 रुग्णांपैकी 43 हजार 076 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 976 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 663 रुग्णांचा मृत्यू झाला आहे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 444 रुग्णांपैकी 46 हजार 055 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 734 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 655 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 848 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 441, सातारा जिल्ह्यात 145, सोलापूर जिल्ह्यात 150, सांगली जिल्ह्यात 76 तर कोल्हापूर जिल्ह्यात 36 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 292 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 772 ,सातारा जिल्हयामध्ये 150, सोलापूर जिल्हयामध्ये 165, सांगली जिल्हयामध्ये 164 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 41 अशा रुग्णांचा समावेश आहे. पुणे विभागातील सर्व्हेक्षण आजपर्यत विभागामध्ये एकुण 24 लाख 96 हजार 559 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 11 हजार 339 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 7 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
पुणे : विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करायचाय? तोही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. तर मग ‘ऐकाकी’ हा मंत्र लक्षात ठेवा. कारण आठवी ते दहावीच्या एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व पुस्तके विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरिता एका विशेष ऑडिओ लर्निंग ॲपमध्ये आली आहेत. त्यामुळे ‘हल्लीची मुले ऐकतात’ हे विधान धाडसाने करता येत आहे, अशी माहिती इन्स्पायरच्या मंजुषा वैद्य व सचिन पंडित यांनी दिली.
पुण्यातील इन्स्पायर संस्थेने स्टार्टअपच्या माध्यमातून हे ‘ऐकाकी’ ॲप विकसित केले आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे संपूर्ण शिक्षण ऑनलाईन झाले आहे. परंतु, या पद्धतीत अनेक समस्यांचा सामना विद्यार्थी पालक व शिक्षकांना करावा लागत आहे. ऑनलाईन शिक्षणपद्धती अधिकाधिक सोपी करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. यातूनच या ‘ऐकाकी’ विशेष ऑडिओ लर्निंग ॲपची निर्मिती झाली आहे.
मंजुषा वैद्य म्हणाल्या,”लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळांमध्ये जाऊन मिळणाऱ्या प्रत्यक्ष शिक्षणाला मुकत आहेत. शाळा ऑनलाईन सुरू असल्या, तरी शिक्षणातून मिळणार्या कल्पनाशक्तीला वाव मिळणे कमी झाला आहे. विद्यार्थ्यांना सतत मोबाईल, लॅपटॉप, संगणकाच्या माध्यमातून शिक्षण घ्यावे लागत आहे. अभ्यासही त्यावरच करावा लागतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचा वाढता त्रास पाहून पालकही चिंतेत आहेत. त्यामुळे ऐकूनही उत्तम अभ्यास होऊ शकते, ही गरज ओळखून ‘ऐकाकी’ या ॲपची निर्मिती झाली आहे.”
‘ऐकाकी’ ॲपची वैशिष्ट्ये… – आठवी ते दहावी महाराष्ट्र बोर्डाची संपूर्ण पाठ्यपुस्तके रेकॉर्डे स्वरूपात. – विविध कलाकारांच्या आवाजात सर्व धडे ध्वनिमुद्रित – विद्यार्थ्यांच्या भाषा विकसनास मदत. – शब्दसंग्रह वाढण्यासह शब्दोच्चार सुधारतील. – विद्यार्थ्यांची ऐकून ग्रहण करण्याची क्षमता वाढेल – कल्पनाशक्तीचा (इमॅजिनेशन पॉवर) विकास होण्यास मदत. – अंध विद्यार्थ्यांना या ॲपचा अधिक चांगला फायदा – गुगल प्लेस्टोअरवर विनामूल्य डाउनलोड उपलब्ध
‘ऐकाकी’मुळे विद्यार्थी गुंतून राहतील तंत्रज्ञानाच्या या युगात मुलांच्या कानी हेडफोन दिसले नाहीत, तर नवलच! या हेडफोनद्वारे त्यांच्या डोक्यात अभ्यास मनोरंजनात्मक पद्धतीने जावा, यासाठी ‘ऐकाकी’ ऑडिओ ॲप उपयुक्त ठरेल. हलक्या स्वरूपातील पार्श्वसंगीत विद्यार्थ्यांना धडे ऐकताना गुंतवून ठेवण्यास मदत करेल. ‘प्लेस्टोवर’वर हे ऍप उपलब्ध असून, त्याचा वापर करण्यासंदर्भातील माहिती व्हिडीओद्वारे देण्यात आली आहे. इंग्रजी तसेच मराठी माध्यमातील विद्यार्थी याचा उपयोग करू शकतात. – सचिन पंडित- इन्स्पायर, पुणे
मुंबई, : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे 10 वे भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अभिनेते सुनिल शेट्टी, पार्श्वगायक सोनू निगम, अभिनेत्री रिचा चड्डा आणि झरा खान, आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्यासह दहा व्यक्ती व संस्थांना हे पुरस्कार कोरोना काळातील समाजकार्याबददल प्रदान करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतिशय प्रेरणादायी असून त्यांचे विचार भावी पिढ्यांनादेखील नेहमीच मार्गदर्शन करीत राहतील, असे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
संसदीय राजकारणात हार-जीत होत असते. परंतु समाजसेवेत नेहमी लोकांचे प्रेम मिळते. निस्वार्थ सेवेचा आनंद अवर्णनीय आहे. त्यामुळे सर्वांनी जीवनातील थोडा वेळ तरी समाजकार्यासाठी दिला पहिजे, असे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.
कोरोना काळात सामान्य लोकांना मदत केल्याबददल राज्यपालांच्या हस्ते इस्कॉन मंदिर, जुहू, सेंट पिटर्स चर्च, आययूव्ही फाउंडेशन, तसेच युवा संगीतकार तनिष्क बागची, साईबाबा हॉस्पिटलचे डॉ एन ए हेगडे, व्यवसायी मेहूल मेहता, समाजसेवक अब्दुल रहेमान वानू यांसह निवडक व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
बुद्ध क्रिएशन ऑफ इंडियन सिनेमा या संस्थेने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष कैलास मासूम व आश्रयदाते कृष्णा पिंपळे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन अभिनेते अमन वर्मा यांनी केले.