Home Blog Page 2397

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0

मुंबईदि. 15 : आदिवासी समाजक्रांतीचे जनक आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या गुलामीत असलेल्या आदिवासी समाजाला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक चळवळ सुरु केली. त्यांनी आदिवासी बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी आदिवासी समाजामध्ये चैतन्य निर्माण केले. स्वराज्याच्या घोषणेने इंग्रजांपुढेही आव्हान निर्माण केले होते. बिरसा यांच्या ‘उलगुलानʼ या मुक्तीआंदोलनात हजारो आदिवासी सहभागी होते. आद्यक्रांतिवीर, आदिवासी समाजक्रांतीचे जनक बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

प्रेयसीवर अ‍ॅसिड टाकून पेटवून देणाऱ्या प्रियकराला 24 तासां आत पोलिसांनी ठोकल्या ‘बेड्या’

0

बीड – बीड जिल्ह्यात एका तरूणाने प्रेयसीवर अॅसिड हल्ला केल्याची व नंतर पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने अवघा महाराष्ट्राला हदरला होता. अखेर नराधम प्रियकाराला पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश राजुरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी अविनाश राजुरेला पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून ताब्यात घेतले आहे. घटनेच्या अवघ्या 24 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात 22 वर्षीय प्रेयसीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती. घटनेनंतर आरोपी अविनाश राजुरे फरार झाला होता.

सावित्रा असे पीडित तरूणीचे नाव आहे. ती शेळगावातीलच आरोपी अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघेही पुण्याहुन दुचाकीवरून गावी परतत होते.

गावी परतत असताना पहाटे 3 च्या दरम्यान बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी अविनाशने गाडी थांबवली. त्यानंतर त्याने सावित्रावर अॅसिड टाकले. त्यानंतर तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. नंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता.

घटना घडल्यानंतर जवळपास 12 तास तरूणी रस्त्याच्या बाजूच्या खड्यात तडफडत होती. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पाहिलं. त्यावेळी पीडित तरूणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून आली. लोकांनी त्वरित पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणीला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू झाला.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन ठिकाणी आगीची घटना

0

पुणे-शहरात शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन ठिकाणी किरकोळ स्वरुपाच्या आग लागण्याच्या घटना घडल्या. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

गुरूवार पेठेतील फुलवाला चौक तसेच पौड रस्त्यावरील कचरा डेपोजवळ असलेल्या बाबाज गार्डन हॉटेलमध्ये शनिवारी रात्री किरकोळ स्वरुपाची आग लागली. दोन्ही ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत आग आटोक्यात आणली. यंदाच्या वर्षी फटाके उडविणाऱ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना कमी झाल्या, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर व्यापारी पेठेत सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. फटाक्यांमुळे धूर झाल्याने प्रदुषणातही वाढ झाली, असे अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील जवानांनी सांगितले.

नको म्हटले तरी पुण्यात फटाक्यांचा धूर पसरलाच ..कात्रज धनकवडी धोकादायक पातळीत ..

0

पुणे- कोरोनामुळे दिवाळीला फटाके फोडण्यावर काहीसे बंधने घालण्यात आली होती. परंतु, असंख्य नागरिकांनी फटाके फोडलेच . दरवर्षीप्रमाणे यंदा ‘आवाज’ जरा कमीच होता. पण रात्री बारा नंतरही काही ठिकाणी सर्वत्र धूर धूर दिसत होता. परिणामी शहरातील पीएम २.५ ची पातळी दोनशेवर गेली होती. जी आरोग्यासाठी धोकादायक आहे.धनकवडी ,कात्रज ,शिवाजी नगर परिसरात हवेतील प्रदूषणाची पातळी धोकादायक होती , लक्ष्मी पूजन झाल्यावर आज दुसऱ्या दिवशी संध्याकाळीही काही अतिउत्साही फटाके फ्द्ताना दिसत होते, ऐकायला येत होते .मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही पुण्यातून अशा पद्धतीने घेतलेला या आवाहनाचा समाचार निश्चितच चांगला नसल्याची ओरड होत होती मात्र त्यावर कारवाई करायला कोणी पुढे येत नव्हते .

लॉकडाऊनमुळे हवेची पातळी धोकादायकवरून चांगली या स्थितीवर आली होती. अनलॉकनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली. त्यात दिवाळीत फटाके फोडल्याने ती धोकादायक बनली. प्रदूषणामुळे विविध आजारांचा त्रास होतो. कोरोनामुळे दिवाळीत फटाके फोडणे अत्यंत धोकादायक असल्याची जनजागृती फुप्फुसविकारतज्ज्ञ यांनी केली होती. त्याबाबतचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. ज्यांना फुप्फुसाचा, हृदयाचा आजार आहे, अस्थमा, ब्लडप्रेशर आहे, त्यांना या फटाक्यांच्या धुराने अधिक त्रास होऊ शकतो.

प्रदूषणाचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो

शहरात कार्बन डायऑक्साइड, धुलिकण, बॅक्टेरिया, विषाणू, विविध परागकण आपण श्वासाद्वारे शरीरात घेत असतो. जे आपल्या शरीराला हानी पोचवतात. यामुळे हृदयावर परिणाम होऊन हायपरटेंशन, हृदयाचे आजार, हृदय बंद पडणे असा धोका असतो. फुप्फुसांना इन्फेक्शन, विसराळूपणा, अस्थमा, फुप्फुसाचा कॅन्सर, स्ट्रोक, अल्झायमर असे आजार होऊ शकतात.

पीएम २.५ हवेची पातळी
० ते ५० : उत्तम
५० ते १०० : समाधानकारक
१०० ते २०० : धोकादायक
२०० ते ३०० : अत्यंत धोकादायक

शिवाजीनगर :२००
कात्रज : १३५
हडपसर : १०२
भूमकर चौक : १३२
भोसरी : १०२
पाषाण : ८४

राजस्थान मध्ये घरांच्या छतावर पसरली बर्फाची चादर-अचानक बदलले वातावरण

0

 जयपूर -रविवारी अचानक वातावरण बदलले. जयपूर आणि बारांमध्ये अचानक वादळासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जयपूरमध्ये काही ठिकाणी गाराही पडल्या. यामुळे अनेक घरांच्या छतावर बर्फाची चादर पसरलेली दिसली.जयपूरमध्ये सकाळपासून वातावरण बदलेले आहे. दुपारपर्यंत सर्वत्र ढग पसरले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. शहरातील मानसरोवर, दुर्गापूरा, मालवीयनगर, सोडाला, सहकार मार्ग, बाइस गोदाम, सी स्कीम सिव्हिल लाइंसमध्ये गाराही पडल्या.

हवामान विभागाने पूर्व राजस्थानच्या कोटा, बारां, भरतपूर, अलवर, झुंझनूं, सीकर, सवाई माधोपूर, टोंक, धौलपुर आणि जयपूर जिल्ह्यांसह पश्चिम राजस्थानच्या हनुमानगड, चूरू, श्रीगंगानगरसाठी रविवारी रात्रीपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.अफगाणिस्तान आणि आसपासच्या क्षेत्रात बनलेल्या पश्चिम क्षेत्र वादळात बदलत आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. राज्यात काल तापमान 2 ते 3 डिग्रीपर्यंत वाढले होते, पण पावसामुळे परत थंडी वाढली. हिवाळ्यात आलेल्या या पावसामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या पावसामुळे सर्दी-तापेचे रुग्ण वाढू शकतात.

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण

0

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. मात्र खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहिणी यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

रोहिणी खडसे या जळगावातील राजकारणात सक्रीय आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. रोहिणी खडसे यांनी कोरोनाची चाचणी केल्यानंतर आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रोहिणी खडसे ट्विट करत म्हणाल्या की, ‘माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे सावधता म्हणुन रुग्णालयात दाखल होत आहे.’

ही मानवतेला काळीमा फासणारी घटना-कठोर कारवाईची फडणवीसांची मागणी

0

बीड -येळंब घाट परिसरामध्ये प्रेयसीवर अ‍ॅसिड आणि पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. यानंतर जखमी अवस्थेमध्ये पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

‘एका तरुणीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले गेले, 12 तास ती रस्त्यावर तशीच पडून होती आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. राज्यात सातत्याने महिला अत्याचारात वाढ होते आहे. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी.’ असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तरुणी नांदेड जिल्ह्यातील शेळगावची रहिवासी होती. ती शुक्रवारी संध्याकाळी पुण्यावरुन एका तरुणासोबत आपल्या घरी जाण्यासाठी निघाली होती. तरुणाने तिला मध्यरात्री 2-3 वाजेच्या सुमारास येळंब घाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी नेले आणि अॅसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळले.ही घटना घडल्यानंतर 12 तास तरुणी रस्त्याच्या बाजूच्या खड्यात तडफडत होती.

दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पाहिले. यावेळी त्यांना तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, तरुणीला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव अविनाश राजुरे आहे. सध्या तो फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. आरोपीविरोधात भा. दं. वि. कलम 326A आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेयसीवर अॅसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळले-प्रियकर फरार

0

बीड-एका तरुणीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. तरुणी नांदेड जिल्ह्यातील शेळगावची रहिवासी होती. ती शुक्रवारी संध्याकाळी पुण्यावरुन एका तरुणासोबत आपल्या घरी जाण्यासाठी निघाली होती. तरुणाने तिला मध्यरात्री 2-3 वाजेच्या सुमारास येळंब घाट परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी नेले आणि अॅसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळले.

ही घटना घडल्यानंतर 12 तास तरुणी रस्त्याच्या बाजूच्या खड्यात तडफडत होती. दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने त्यांनी खड्ड्यात पाहिले. यावेळी त्यांना तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, तरुणीला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव अविनाश राजुरे आहे. सध्या तो फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. आरोपीविरोधात भा. दं. वि. कलम 326A आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी रामसर पाणथळ साईट म्हणून घोषित – वनमंत्री संजय राठोड

0

मुंबई, :- लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील एक्केचाळीसवी रामसर पाणथळ साईट म्हणून रामसर कन्वेंशन ऑन वेटलँड सेक्रेटरिएट स्वित्झरलँड या आंतरराष्ट्रीय संस्थेने घोषित केल्याची माहिती, वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.  मागील दहा वर्षापासून या संदर्भात आंतरराष्ट्रीय संस्थेकडे पाठपुरावा चालू होता आणि जुलै २०२० मध्ये याबाबत अंतिम कागदपत्रे सादर करण्यात आली होती. या कागदपत्रांच्या आधारे लोणार सरोवर ही जागतिक रामसर साईट म्हणून घोषित झाले असून याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन विभागाचे अभिनंदन केले आहे असे श्री.राठोड यांनी सांगितले.

वनमंत्री म्हणाले,लोणार सरोवर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठिकाण असून हे सरोवर पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. ते प्राचिन असून या सरोवराची निर्मिती ही उल्कापातापासून झाली आहे. हे वर्तुळाकार असे मोठे सरोवर आहे. या सरोवराला कोठूनही पाण्याचा पुरवठा नसल्याने व साठलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने येथील पाणी खारट झाले आहे. या सरोवरात काही सायनो बेक्टरिया आणि फायटोप्लांक आढळून येतात. सरोवराच्या आजूबाजूच्या परिसरात पक्ष्यांच्या १६० प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ४६ प्रजाती तर १२ प्राण्यांच्या प्रजाती आढळून येतात. या सरोवराची खोली सरासरी १३७ मीटर आहे. या सरोवराचा व्यास हा १.८० किलोमीटर असून त्याचे क्षेत्र हे ११३ हेक्टर इतके आहे.

इराण मधील रामसर या शहरात १९७१ मध्ये आंतराष्ट्रीय रामसर परिषद पार पडली होती. या परिषदेमध्ये जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या पाणथळ साईट घोषित करून या साईटचे संरक्षण व संवर्धन करायचे असा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला होता. जैवविविधता व परिस्थितिकीच्या दृष्टीने जागतिकस्तरावरील महत्त्वाच्या साइट या रामसर साइट म्हणून घोषित केल्या जातात.

यापूर्वी नांदूर मध्यमेश्वर ही राज्यातील पहिली रामसर पाणथळ साईट म्हणून घोषित झाली होती. आता लोणार ही राज्यातील अशा प्रकारे घोषित होणारी दुसरी साईट आहे. लोणार सरोवर ही रामसर साईट म्हणून घोषित झाल्याने जागतिक पर्यटकांचा ओघ या साईटकडे वाढणार आहे. निसर्ग पर्यटनाच्या अनुषंगाने लोणार सरोवर परिसर निसर्ग पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत लोणार सरोवर पर्यटन विकासाबाबत आपली चर्चा झाली असून पर्यटन विभाग व वन विभाग संयुक्तपणे यासाठी काम करेल अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली.

‘त्या’ कुटूंबियांना महापौरांकडून अनोखा ‘आधार’ !

0

पुणे : प्रतिनिधी

शहरातील चार हजार कुटुंबातील एक नाते कोरोनाच्या आपत्तीने हिरावून नेले. घट्ट नात्यांमधील एक जरी नाते दूरावले तरी सणाचा आनंद घेता येत नाही. कुटुंबावर कोसळलेल्या संकटाने प्रत्येकाचेच मन खिन्न आहे. मात्र अशा कुटूंबियांमध्येही दिवाळीचे पर्व आणि परंपरा अबाधित राहून अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारी दिवाळी साजरी करताना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने फराळ किटची अनोखी भेट घरपोच देण्यात आली. शिवाय यात भावनिक पत्र लिहून महापौर मोहोळ यांनी त्या कुटुंबियांना आधार देण्याचाही प्रयत्न केलाय.

कोरोनाच्या संकटात शहरातील जवळपास चार हजार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. रूढ चालीरीतीनुसार घरातील व्यक्तीचे निधन झाल्यास साधारण वर्षभर सणांचा आनंद घेता येत नाही. मात्र दिवाळीसारखा आनंद पर्व देणारा सण नकारात्मकता मागे टाकून नव्या दिशांच्या वाटेने जाणारा ठरावा, यासाठी महापौर मोहोळ यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल ‘ते’ कुटुंबीयही सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत.

या अनोख्या उपक्रमाबद्दल महापौर मोहोळ म्हणाले, ‘दिपावलीचा पुरेपूर आनंद घेता येईल, असे हे वर्ष नाही. हे वर्ष यातना देणारे ठरले. कोरोनाच्या साथीत पुण्यात चार हजाराहून अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याचा प्रथम नागरीक या नात्याने मीही या खिन्नतेचा अनुभव घेतो आहे’

‘दिपावलीचे प्रकाशवर्ष हे नवी आशा जागवणारे असते. दिपावलीमुळे उजळलेल्या दिशांमध्ये नवी वाट शोधूया, अशी या मागची भावना होती. दिपावलीचा हा उत्सव आपल्या परंपरेचा भाग आहे. ही परंपरा त्या कुटूंबियांनाही जपता यावी आणि दुःख मागे सारून त्यांना नव्याने आयुष्याची घडी बसवायला आपलाही आधार मिळावा, शिवाय ही घडी बसवतांना तुम्ही एकटे नाहीत, ही भावनाही त्या कुटूंबियांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

अक्षय कुमारच्या , ‘राम सेतु’चे पोस्टर्स प्रकाशीत

0

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार इंडस्ट्रीतील सर्वात बिझी स्टार आहे. नुकताच अक्षय कुमारचा लक्ष्मी चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. दरम्यान आता दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षयने आणखी एक नवीन सिनेमा साइन केला आहे. या चित्रपटाचे नाव आहे राम सेतु. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार असून या चित्रपटाचे दोन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहेत. यात अक्षय कुमार एका सामान्य माणसासारखा दिसतो आहे मात्र बॅकग्राउंडला प्रभू श्रीरामाचे पोस्टर पहायला मिळतंय.

अक्षय कुमारने राम सेतुबद्दल सांगत लिहिले की, या दिवाळीला. भारत राष्ट्रातील आदर्श आणि महानायक प्रभू श्रीराम यांच्या पुण्य स्मृतींना कित्येक युगांपर्यंत भारताच्या संवेदनात सुरक्षित ठेवण्यासाठी असा एक सेतू बनवला आहे जो आगामी पिढींना रामाशी जोडून ठेवेल. याच प्रयत्नात आमचादेखील एक छोटा संकल्प आहे राम सेतु. तुम्हाला सर्वांना दिवाळी शुभेच्छा.

राम सेतु चित्रपटाची अरूण भाटिया आणि विक्रम मल्होत्रा सहनिर्मिती करत आहेत. क्रिएटिव्ह निर्माते डॉक्टर चंद्र प्रकाश द्विवेदी आहेत. राम सेतुचा पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी अक्षयचे चाहते उत्सुक आहेत.

दिवाळीनिमित्त ‘आयसीएआय’तर्फे गरजूना जीवनावश्यक वस्तूंची भेट

0

पुणे : गरिबांच्या दिवाळी सुखाची जावी, या भावनेतून दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा, ग्लोबल इंडियन फाउंडेशन व ‘आयसीएआय’च्या वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (विकासा) यांच्या वतीने गरजुंना जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली. पुणे आयसीएआयचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, खजिनदार व सचिव सीए काशिनाथ पाठारे, पुणे ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष आणि ‘विकासा’चे अध्यक्ष सीए समीर लड्डा यांच्या नेतृत्वात हा उपक्रम पार पडला.

दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ झाला. सामाजिक बांधिलकी अंतर्गत झालेल्या या उपक्रमांवेळी दीपक कोरगावकर, मन्मथ शिवलकर, मोनिका त्रिवेदी, रोहन कासट, संकेत गुजलवार आदींनी मेहनत घेतली. दांडेकर पूल, जनता वसाहत, लक्ष्मीनगर, मीनाताई ठाकरे वसाहत आदी भागातील जवळपास १००० गरीब व गरजू लोकांना या वस्तूंचे वाटप केले.

सीए अभिषेक धामणे म्हणाले, “सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्थेच्या वतीने नियमित उपक्रम राबविण्यात येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरिबांच्या घरातही आनंदात व सुरक्षित दिवाळी साजरी व्हावी, या उद्देशाने ग्लोबल इंडियन फाउंडेशनच्या मदतीने या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये फ्रुट ज्यूस, मिल्कशेक, टूथपेस्ट, सॅनिटायझर, स्वच्छतेचे साहित्य, तेल, साबण आदी गोष्टींचा समावेश होता. कॅल्शियम, व्हिटॅमिन, स्वच्छता आणि प्रतिकारक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने या वस्तू उपयुक्त आहेत. डाबर कंपनीने या उत्पादनांसाठी सहकार्य केले.”

नृत्य, काव्य, गोष्टींनी रंगली बालदिन दिवाळी 

0

पुणे : नृत्य, काव्यवाचन, गोष्टी, कलाकृती आणि मार्गदर्शन आदी विविध कार्यक्रमांनी बालदिन दिवाळी साजरी झाली. ‘नाच रे मोरा, अंब्याच्या बनात’ या बालगीताने सुरू झालेला कार्यक्रम. चिंटूच्या गोष्टी व चिंटूच्या कलाकृतीपर्यंत पोहचला. राजीव तांबे यांच्या गंमतशीर व विनोदी मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 
संवाद पुणे व अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालदिनानिमित्त बालदिन दिवाळीचे पत्रकार भवनात आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, चारूहास पंडित, डॉ. संगीता बर्वे, राजीव तांबे, नितीका मोघे, सचिन ईटकर, माधुरी सहस्त्रबुद्धे, कविता मेहेंदळे, निर्मला सारडा आदी उपस्थित होते. 
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बालदिन दिवाळीला सुरूवात झाली. पायलवृंद संस्थेच्या वतीने व निकीता मोघे दिग्दर्शित ‘नाच रे मोरा’ या बालगीतावर भार्गवी ईटकर, शौर्या थोरवे, आराध्या जराड या बालकांनी नृत्य केले. त्यानंतर संस्कृती प्रतिष्ठानतर्फे पडद्यामागील कलाकारांच्या 45 मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप महापौरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पडद्यामागील 50 तंत्रज्ञांने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. चारूहास पंडित यांनी चिंटूच्या गोष्टी सांगितल्या व चिंटूची कलाकृती सादर केली. त्यानंतर  डॉ. संगीता बर्वे यांनी काव्यवाचन केले. यावेळी मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, संजीवनी मराठे, इंदिरा संत, लीलावती भागवत यांच्या कवितांचेही वाचन करण्यात आले. तर राजीव तांबे यांनी बालक-पालकांना मार्गदर्शन केले. 
सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. दुष्यंत मोहोळ यांनी शैक्षणिक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाबद्दल माहिती दिली. मुकुंद तेलीचरी यांनी सुत्रसंचालन केले. तर डॉ. दिलीप गरुड यांनी आभार मानले. 

त्यांना स्वत:लाच सरकार पडणार असल्याची सारखी भीती वाटतेय-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0

मंदिरे उघडण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशिराने सुचलेले शहाणपण

मुंबई दि. १४ नोव्हेंबर- राज्यातील सरकार पाडून दाखवा..पाडून दाखवा… असे कोणीही बोलले नसताना त्यांना केवळ भीतीने ग्रासले आहे, म्हणूनच त्यांनाच स्वत: सरकार पडणार असल्य़ाची सारखी भीती वाटत असावी, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मारला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांना माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही, पोटशूळ बाहेर काढल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. सरकारने एक वर्षे पूर्ण केल्याचे राऊत सांगत आहेत, पण सरकारचा कारभार कोणीही करीत असतो, गाडी पुढे जात असते, पण या एका वर्षात काय केले असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. सरकारने महाराष्ट्रातील शेतक-यांना दिलेला शब्द पाळला नाही, शेतकरी अतिवृष्टीने हैराण झाला आहे, कोकणात निर्सग वादळातील शेतक-यांना मदत नाही, कामगार बेजार आहे, बेरोजगारीचे करार करतात पण प्रत्यक्षात काही होत नाही, आजही कोविड नियंत्रणात आणू शकत नाही, या परिस्थितीत आमच्या सरकारने एक वर्षे पूर्ण केले अशा गमजा ते मारत असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
ऑपरेशन लोटसबाबत आम्ही काहीच बोललो नाही. तेच म्हणतात की, यामुळे साधे खरचटले नाही, पण भाजपाने काही ठरविले तर खरचटायचे तर दूर राहिले, रक्तबंबाळ व्हाल असा इशारा देतानाच दरेकर म्हणाले की, थडगी उकरून काढण्यची भाषा राऊत करीत आहे, पण बोलायाला फक्त त्यांनाच येते असे त्यांनी समजू नये. सगळ्यांना बोलायला येते. मग थडगी काय आणि दुसरे काय सर्वांनाच पर्दाफाश करता येईल, त्यामुळे कोणी आव्हान देण्याची भाषा करु नये, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

सरकारला उशिराने सुचलेले शहाणपण
राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला निर्णय म्हणजे सरकारला उशिराने सुचलेले शहाणपण असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील लाखो वारकरी, हिंदुत्वप्रेमी जनता, मंदिरावर उपजिविका अवलंबून असणा-यांची ही मागणी होती. त्यांचा रेटा व दबाव सरकारवर होता, त्यामुळेच उशिरा को होईना सरकारला निर्णय घ्यावा लागला. त्याचे स्वागत असल्याचे सांगतानाच दरेकर म्हणाले की, हा निर्णय अगोदरच व्हायला हवा होता. मंडई, मॉल्स, रेस्टॉरन्टस, बार,जीम्स, व अन्य सार्वजनिक स्थळे खुली केली होती. वारकरी सांप्रदायाने अतिशय जिव्हाळ्याने मंदिरे उघडण्याची भूमिका मांडली होती, त्यामुळे सरकारने आधीच हा निर्णय घेणे अपेक्षित होते. पण केवळ अहंकार व प्रतिष्ठेमुळे सरकारने हा निर्णय घेतला नाही. कोरोनाचे संकट असताना मंदिरे उघडल्यामुळे जनतेला दिलासा मिळेल, त्यामुळे जनेतेने सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केली आहे.

गृहमंत्र्यांच्या पत्राने गहिवरले कोरोना शहीद पोलीसाचे कुटुंबीय

0

पुणे : कोरोनाच्या महामारीत कर्तव्य बजावत असताना पोलीस पतीचे निधन झालेले. पण पोलीस दलाचे कुटुंब प्रमुख म्हणून गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पाठविलेले पत्र स्वत: पोलीस आयुक्त घेऊन आले. आपल्या पतीच्या कार्याप्रति पोलीस दलाने व्यक्त केलेलेल्या कृतज्ञतेमुळे शहीद पोलीसाचे कुटुंबिय गहिवरले.

सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये राहणारे दिलीप लोंढे हे फरासखाना पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला. या कुटुंबियांचे दु:ख हलके करण्यासाठी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पत्र लिहिले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वत: त्यांच्या निवासस्थानी जाऊन हे पत्र दिलीप लोंढे यांच्या पत्नी उषा आणि केतन यांना सुपूर्द केले. यामुळे उषा लोंढे गहिवरून गेल्या होत्या. त्या म्हणाल्या, पोलीस दलाने दाखविलेल्या संवेदनेने जगण्याचे बळ मिळाले आहे. गृह मंत्री आणि पोलीस आयुक्तांनी कुटुंब प्रमुखाने आमची काळजी घेतली आहे.

पोलीस दलातील सेवेसाठी आपल्याला मिळालेले शासकीय निवासस्थान सेवा कायम असेपर्यंत आपल्याकडेच राहिल, असे आश्वासन गृह मंत्र्यांनी या पत्रामध्ये दिले आहे.
संपूर्ण पोलीस दल तुमच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास अमिताभ गुप्ता यांनी दिला.
या वेळी प्रदीप देशमुख, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विष्णु ताम्हाणे , विनोद पवार उपस्थित होते.