Home Blog Page 2391

भाजपने केली वीज बिलांची होळी

0

पुणे, ता. 23 : वाढीव वीज बिलांच्या विरोधात निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या झोपडपट्टी आघाडीच्या वतीने भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज रास्ता पेठेतील एमएसईबी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली.

यावेळी सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दत्तात्रय खाडे, महिला अध्यक्ष अर्चना पाटील, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीत जोशी, रवी साळेगावकर,उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुळीक म्हणाले, ‘गेल्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये वीज वितरण कंपनीने ग्राहकांना नियमित वीज बिले दिली नाहीत.
दरम्यानच्या काळामध्ये वीज मीटरची रिडींग घेण्यासाठीही कधी कोणी फिरकले नव्हते. ग्राहकांवर अतिरिक्त भार टाकत  सर्वसामान्य ग्राहकांना विज वितरन कंपनीने विजेचा शॉक दिला असून भूलथापा देणार्‍या सरकारने जनतेची माफी मागावी व दिलेल्या शब्दाप्रमाणे वीज बिल माफ करावे आणि वारंवार शब्द फिरून लोकांची फसवणूक करणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा.’

ते पुढे म्हणाले, ‘1 ते 100 युनिट पर्यंत  विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना  वीज वितरण कंपनी 3 रुपये प्रति युनिट प्रमाणे वीज बील आकारते तर शंभर युनिटचे वर वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रतियुनिट सात रुपयाचे दर आकारले जातात तर हजार युनिट च्या पुढे वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना बारा रुपये युनिट प्रमाणे बिल आकारले जाते मात्र कोरोणा संकटाच्या काळामध्ये पाच ते सहा महिने कुठल्याही प्रकारची रिडींग न घेता गेल्या महिन्याभरापूर्वी रिडींग घेऊन सर्वसामान्य ग्राहकांनी वापरलेले  शंभरच्या वरचे जे युनिट आहेत ते पाच महिन्यात वापरले होते मात्र प्रत्येक महिन्याला वीज बिल न दिल्यामुळे  या ग्राहकांना तीन रुपया ऐवजी सात रुपये युनिटप्रमाणे वीज बिलाचा भरणा करावा लागत आहे तर 300 ते 400 च्या पुढे प्रतिमहिना युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना  हजार च्या पुढे युनिट वापरानंतर  विज बिल दिल्यामुळे  त्यांना बारा रुपये युनिट प्रमाणे वीज दर आकारला गेला असून त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वीज वितरण कंपनी लुटून खात आहे. ऊर्जामंत्री मात्र केंद्रावर आरोप करण्यात व्यस्त आहेत प्रत्यक्षात स्वतः मात्र कोणतीही कृती करताना दिसत नाहीत त्यामुळे हे सरकार जनतेप्रती कृतघ्न आहे.’

मुळीक पुढे म्हणाले, ‘वीज वितरण कंपनीने सुद्धा ग्राहकांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता केवळ आणि केवळ सरकारच्या इशार्‍यावर नाचत सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरुन अव्वाच्या सव्वा बिले देण्यात आली आहे त्यात आलेली दरमहा आलेली नसून तब्बल सहा सात महिन्यांनंतर विज बिल देण्यात आले आहे त्यामुळे प्रति युनिटचा दर देखील वाढून आला आहे त्यासाठी सर्वसामान्य ग्राहक जबाबदार नसून हेतुपुरस्सर ऊर्जा मंत्र्यांचा आणि ऊर्जा विभागाच्या सांगण्यावरून ही वीज बिले वाढीव स्वरूपात उत्तर देण्यात आली नाहीत ना असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकाला पडला आहे विज वितरन कंपनीने हा सावळा गोंधळ थांबवत विज ग्राहकांना न्याय द्यावा अन्यथा आज केवळ वीज बिलांची होळी केली आहे यापुढे सरकार ताळ्यावर न आल्यास यापेक्षाही आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल.’

एनयुजे इंडियाचे सचिवपदी शीतल करदेकर

0

मुंबई-एनयुजे इंडियाचे सचिवपदी शीतल करदेकर तर कार्यकारिणी सदस्यपदी सुवर्णा दिवेकर,संजना गांधी व शिवाजी नलावडे यांची निवड झाली आहे.

एक्झिक्युटिव मेंबर म्हणून
सुवर्णा दिवेकर , रायगड
संजना गांधी , पुणे
शिवाजी नलावडे, औरंगाबाद
यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात युनियनचे अधिक बळकटीसाठी आणि राष्ट्रीय स्तरावर शिवेंद्रकुमार यांचे मार्गदर्शनाखाली भरीव योगदान निश्चितच देऊ असे प्रातिनिधिक मत शीतल करदेकर यांनी व्यक्त केले.
सीमा भोईर, वैशाली आहेर, कैलास उदमले, सर्व जिल्हाध्यक्ष, सचिव , कोषाध्यक्ष तसेच एनयुजे महाराष्ट्र चे सर्व टीमने ,
मार्गदर्शक ज्येष्ठ एनयुजे नेते शिवेंद्रकुमारजी व एनयुजे इंडियाचे अध्यक्ष रासबिहारीजी यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत!

कृषी पर्यटनामुळे आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल-प्रा. डॉ. संजय चोरडिया

0

पुणे : “हॉटेल मॅनेजमेन्ट क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळले पाहिजे. हॉटेल मॅनेजमेंट व कृषी पर्यटन एकमेकांना पूरक आहे. कृषी पर्यटनाला चालना मिळाली, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळेल. सूर्यदत्ता संस्थेतर्फे उपलब्ध होणाऱ्या कृषी पर्यटनातील नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत होईल,” असे मत कृषी पर्यटन क्षेत्रातील प्रख्यात उद्योजक पांडुरंग तावरे यांनी व्यक्त केले.
‘नॅक’ मानांकन प्राप्त नामांकित सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमतर्फे (एससीएचएमटीटी) ‘एक्झेनिया : बेस्टोविंग हॉस्पिटॅलिटी’ या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी पांडुरंग तावरे बोलत होते. इंडस्ट्री-कनेक्ट अँड नॉलेज मॅनेजमेंट इनिशिएटिव्ह’ अंतर्गत झालेल्या या वेबिनारला ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, सिद्धांत चोरडिया यांच्यासह उद्योगातील तज्ज्ञ, ज्येष्ठ अभ्यासक, वैश्विक स्तरावर पसरलेले सूर्यदत्ता संस्थेचे माजी विद्यार्थी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. उद्योगातील दिग्गजांनी या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना मौल्यवान ज्ञान आणि उद्योगातील अंतर्भाव स्पष्ट करून सांगितले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “कृषी पर्यटनाशी संलग्नित अनेक क्षेत्र आहेत. स्थानिक उत्पादने, ठिकाणे आणि गोष्टींना व्यवस्थितपणे मार्केट केले, तर रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकेल. हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी पर्यटनामुळे अनेक संधी खुल्या होतील. भारत कृषिप्रधान देश असल्याने येथे कृषी पर्यटन मोठ्या प्रमाण विकसित झाले, तर आत्मनिर्भर भारत बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास हातभार लागेल.”
विद्यार्थ्यांना हॉस्पिटॅलिटीच्या सर्व विभागांशी संबंधित बदलत्या संकल्पना आणि नाविन्यपूर्ण कल्पनांची ओळख झाली. फूड स्टाइलिंग, फूड ब्लॉगिंग, एअरपोर्ट केटरिंग, वाईन अ‍ॅप्रिसिएशन, मिक्सोलॉजी अँड स्क्रब्स, क्लाऊड किचेन्स, फूड हिस्टरीयन, सुविधा व्यवस्थापन यासह इतर अनेक गोष्टी समजून घेता आल्या. ‘एससीएचएमटीटी’सह महाराष्ट्रातील इतर संस्था व महाविद्यालयातील एकूण २५० विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी या वेबिनारमध्ये सहभाग घेतला.
क्लियर वॉटर हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेफ नितीन टंडन यांनी फूड स्टाईलिंगवरील रोमांचक सामग्रीचे वर्णन केले आणि फूड स्टायलिस्टच्या करियरविषयी आणि करिअरच्या मार्गांवरही चर्चा केली. फूड स्टायलिस्ट होण्यासाठी स्वयंपाकघरात प्रमुख मूलभूत तत्त्वे ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. 
कार्यक्रमाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या सत्रात युरेका अराझो शेफ अमर श्रीवास्तव यांनी धाडसी करिअर व प्रॉफेशनल पेस्ट्री मेकिंग यावर, शेफ राहुल वली यांनी खाद्य इतिहास, रमेश उपाध्याय यांनी फॅसिलिटी मॅनेजमेंटमधील करिअर, बापजी जिनगा यांनी मिक्सिंग फ्ल्यूड्स शास्त्र, शेफ राजेश शेट्टी यांनी एअरपोर्ट केटरिंग, श्री. कार्तिक यांनी लॉंड्री मॅनेजमेंट, शेफ रविराज यांनी क्लाउड किचन कॉन्सेप्ट आणि शेफ अकल्पित प्रभुणे यांनी फ्रुट वाईन्स या क्षेत्रातील करिअरवर मार्गदर्शन केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स नियमितपणे त्यांचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण उपक्रम, कार्यशाळा आणि उद्योग कनेक्ट उपक्रम आयोजित करतात. अलिकडच्या काळात ‘एससीएचएमटीटी’ने आपल्या इंडस्ट्री कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत उद्योग तज्ज्ञ, थीमलंच, माजी विद्यार्थी मेळावा, स्वयंपाकासंबंधी कला कार्यशाळा, बेकरी, एफ अँड बी सर्व्हिस, निवास व्यवस्था, मिक्सोलॉजी, फूड स्टाईलिंग, हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
हॉटेल मॅनेजमेंट आणि ट्रॅव्हल टुरिझमच्या विविध क्षेत्रांतील विविध सत्रांमधून मौल्यवान मार्गदर्शन मिळाल्याची भावना विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी सूर्यदत्ताच्या या उपक्रमाचे कौतुक करून धन्यवाद दिले.

तुम्ही टरबूज्या , चंपा म्हटलेले चालते काय ? मी घाबरत नाही तुमच्या ट्रोलींगला – आ. चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर (व्हिडीओ)

0

पुणे- पवार साहेबांबद्दल मला चुकीचे बोलायचे नव्हते,त्यांच्याबद्दल जेव्हा आदर व्यक्त केला तेव्हा नाही बाईट दिला आणि तुम्ही मोदीवर अमित शहावर बोललेले चालते. देवेंद्र फडणवीस यांना टरबूज्या म्हणतात ते चालते, मला चंपा म्हणतात ते चालते. मी कुठल्याही ट्रोलिंगला घाबरत नाही. असे सांगत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आ. चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्यावर पवारांच्या विधानावरून टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले .

ते म्हणाले,’ सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेत्यांकडून भीती निर्माण केली जाते आहे. मी कालच्या ओबीसी मेळाव्यात यासंदर्भात बोलताना मला कुणाचा अनादर करायचा नव्हता. पण तुम्ही मोदीबद्दल आणि माझ्याबद्दल बोलतात ते चालतं का ? उद्धव ठाकरे बद्दल पण बोलतो. त्याबद्दल कधी शिवसेना कधी काय बोलत नाहीत, राजकारण म्हटलं कि अस बोललं जाते. मी माझी बाजू मांडली, माझ्या दृष्टीने हा विषय संपला, त्यांना यावर बोलायचं असेल तर बोलत राहू दे!

ज्यांचा झेंडा एक नाही, ज्यांचे विचार एक नाहीत ते मांडीला मांडी लावून बसले आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होत आहे. तसेच अजित पवार महाराष्ट्राच्या प्रश्नावर कधी बोलत नाहीत आणि यावर बोलायला त्यांना वेळ कसा मिळाला. या सरकारमध्ये प्रचंड गोंधळ आहे, शाळांच्या बाबतीत एकमुखाने निर्णय होत नाही. मुलांच्या मनाशी हे सरकार खेळत आहे. यावर काही बोलले तर ट्रोल करण्यासाठी त्यांची पेड टीम तयार आहे. ट्रोलला आम्ही घाबरत नाही.

राज ठाकरे हे चांगले नेते आहेत , जनसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीने रियाक्ट होतात. मात्र परप्रांतीयाबाबतचे धोरण त्यांचे ठीक नाही. ते त्यांनी बदलायला हवे .८० टक्के मराठी माणसाला नोकरी मिळालीच पाहिजे या धोरणाशी आम्ही सहमत आहोत .मात्र परप्रांतीयाबाबतचे , त्यांनी इथे व्यवसाय देखील करू नये अशा पद्धतीचे धोरण बदलल्याशिवाय त्यांना यश मिळणार नाही. असे धोरण बदलल्याशिवाय त्यांच्यासोबत भाजपची युती होऊ शकत नाही. असेही आ. पाटील म्हणाले.

लॉकडाऊनपेक्षा स्वयंशिस्त पाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

आपण धोक्याच्या वळणावर

मुंबई दि २२: महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.आज ते समाज माध्यमांवरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते.

वारकऱ्यांना आवाहन

ते म्हणाले की, मला राजकारण करायचे नाही. पण कोरोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे देखील उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. आजपासून ४ दिवसांनी मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण होतील. शूरवीर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच कमांडोज यांनी प्राणपणाने अतिरेक्यांशी सामना केला. आजही आपण काही महिन्यांपासून या कोविड नावाच्या छुप्या दहशतवाद्याशी कडवा मुकाबला करतो आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपले सण, उत्सव थांबलेले नाहीत. उत्तर भारतीयांची छट पूजा झाली. चार दिवसांवर कार्तिकी एकादशी आली आहे. आषाढीला जसे आपण सर्वांनी सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करावे असे विनम्र आवाहन मी वारकरी बंधू भगिनींना करतो आहे.

यंदा दसऱ्याला शिवसेनेचा मेळावा देखील शिवतीर्थावर मोठेपणाने साजरा न करता साधेपणाने केला, मी आपला मुख्यमंत्री आहे त्यामुळे लोका सांगे ब्रह्मज्ञान असे असू नये म्हणून नियम माझ्यापासून काटेकोरपणे पाळले नाही तर तुम्हाला काही सांगायचा अधिकार नाही. दिवाळीत फटाके वाजवू नका असे मी सांगितले आणि आपण माझे ऐकले आणि यंदा खूप कमी फटके उडाले. प्रत्येक गोष्टींसाठी कायदे करण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.

आरोग्याची चौकशी जिव्हाळ्याने व्हावी

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविताना यंत्रणेतील सर्व लोकांनी अफाट काम केले आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जन जागृती करणे हे साधेसुधे काम नाही. या मोहिमेचा हेतू केवळ चौकशी करणे नाही तर आरोग्य नकाशा तयार करणे आहे. यामध्ये आपल्याला किती जणांना सहव्याधी आहे ते कळले. या सर्वांशी यंत्रणेतील लोकांनी एक जिव्हाळा दाखवून संपर्क साधणे व चौकशी करणे महत्वाचे आहे.

दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल

मला काहीशी नाराजी व्यक्त करायची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे तसे होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट नाहीसे झालेले नाही तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावले गेले आहे. दिल्लीत दुसरी तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे कीकाय असे वाटतेय. आपल्याकडे वैद्यकीय यंत्रणा तयार आहे पण त्यावर किती ताण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. कृपा करून सगळं उघडे केले म्हणजे कोरोना गेला आहे असा अर्थ होत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ज्येष्ठ नागरिक , सहव्याधीना सांभाळा

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्यांना आहे. आजपर्यंत आपण त्यांना सांभाळून होतो. आता कोरोनाचा संसर्ग तरुणांमध्ये वाढतोय आणि त्यांच्या माध्यमातून घराघरातल्या ज्येष्ठ मंडळीपर्यंत होतोय हे निश्चितच खूप धोकादायक आहे. आज आपल्या हातात लस नाही, कधी येईल ते सांगता येत नाही. आली तरी राज्यातल्या सर्व लोकांना अगदी दोन डोस द्यायचे म्हटले तरी २४ ते २५ कोटी जनतेला द्यावी लागेल.
त्यामुळे केवळ मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, हात धूत राहणे हीच त्रिसूत्री आहे.

कोविडनंतर रुग्ण खडखडीत बरे सुद्धा होत आहेत पण पण पोस्ट कोविड दुष्परिणाम सुद्धा दिसताहेत. आपण कशासाठी विषाची परीक्षा बघायची असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि, . आपण शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन सावधपणे पावले टाकत आहोत.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 571…. कालच्या तुलनेत रुग्णसंख्येमध्ये एकूण 1 हजार 465 ने वाढ

0

पुणे विभागातील 4 लाख 96 हजार 102 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 24 हजार 448 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.22 :- पुणे विभागातील 4 लाख 96 हजार 102 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 24 हजार 448 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 571 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.60 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.कालच्या तुलनेत रुग्णसंख्येमध्ये एकूण 1 हजार 465 ने वाढ झाली आहे.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 35 हजार 425 रुग्णांपैकी 3 लाख 17 हजार 388 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 863 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 174 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.62 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 566 रुग्णांपैकी 47 हजार 53 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 835 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 140 रुग्णांपैकी 40 हजार 698 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 878 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 564 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 422 रुग्णांपैकी 44 हजार 326 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 408 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 688 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 895 रुग्णांपैकी 46 हजार 637 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 587 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 465 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 914, सातारा जिल्ह्यात 162, सोलापूर जिल्ह्यात 274, सांगली जिल्ह्यात 80 तर कोल्हापूर जिल्ह्यात 35 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 272 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 760, सातारा जिल्हयामध्ये 232, सोलापूर जिल्हयामध्ये 181, सांगली जिल्हयामध्ये 53 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 46 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 26 लाख 90 हजार 636 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 24 हजार 448 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 21 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

चंद्रकांत पाटलांचं ‘ते’ विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी-अजित पवार

पुणे-राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी काल एका मेळाव्यात शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनाश काले, विपरीत बुद्धी म्हणावं लागेल, अशा शब्दात निशाणा साधला आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही. त्यांनी काय टीका करावी, ज्या पवार साहेबांनी समाज आणि राजकारणात 60 वर्ष काम केले आहे. महाराष्ट्राची जाण असणारे नेते आहेत. दिल्लीमध्ये ज्यांच्या शब्दाला वजन आहे. ते सर्वांनी पाहिले आहे. अशा वेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सारख्याला पवार साहेबाबद्दलचे विधान शोभत नाही. ऐकेकाळी साहेबांबद्दल काय विधान केले आहे. हे सर्वांना आठवत असेल, त्यामुळे त्यांचे आजचे विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी म्हणावी लागेल अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

‘चंद्रकांत पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखे खुळ्यासारखं बडबडत आहेत’-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

0

कोल्हापूर-महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. त्यामुळेच चंद्रकांत पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत, असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूरातील आजरा येथे झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रचार मेळाव्यात खरपूस समाचार घेतला मंत्री मुश्रीफ म्हणाले, बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. दहा ते बारा लोकसभेच्या व दहा ते बारा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत.

ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा केवढी मोठी संधी मिळाली होती. किती भाग्यवान आहेत ते. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही.

आरोग्य सेवकांमधील असंतोषाची वेळीच दखल घ्या – अजय शिंदे

0

पुणे- गरज सरो, वैद्य मरो ‘ या उक्तीप्रमाणे न वागता आरोग्य सेवकांच्या मधील असंतोषाची वेळीच दखल घ्यावी अशी मागणी मनसे चे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे .

या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहेकी, दुसऱ्या करोना लाटेची सध्यान मोठी चर्चा आहे या लाटेच्या पार्श्वभूमीवर मनसे पुणे शहर आपल्या सर्वांचे लक्ष आणखीन एका गंभीर प्रकारा कडे वेधू इच्छितो,जर दुर्देवाने दुसरी लाट आली तर प्रशासकीय आणि सरकारी पातळीवरील आरोग्यसेवकाच्या पिळवणुकी मुळे गंभीर समस्या निर्माण होणार आहे
जीव धोक्यात घालून कोविड रुग्णाची सेवा करणाऱ्या या सर्व स्तरांवरील आरोग्य सेवकाचे पगार सर्वच ठिकाणी प्रचंड अडवणूक करून तुकड्या तुकड्यात दिले आहेत जम्बो असो की ससून सरासरी 2 ते 3 महिन्याचे पगार अजून ही मिळणे बाकी आहे त्यांना काम असेल तर बोलावले जाते काम नसेल तर ब्रेक दिला जातो हे सगळं गरज सरो आणि वैद्य मरो या प्रकारचे आहे .
दुर्देवाने दुसरी लाट आली आणि रुग्ण संख्या वाढली तर पहिलं हा मेलेला वैद्य जिवंत करावा लागेल त्यात जो वेळ जाणार आहे त्यात पुन्हा हकनाक बळी जाऊ शकतात ही भीती आहे कारण पुण्यातले सुरवातीच्या टप्यातील दुर्देवी करोना बळी हे उपचार करणारे तज्ज्ञांच्या अभावी आणि सधन सामग्री नसल्या मुळे झाले आहेत,आज साधन सामुग्री आहे उपचाराचा मेडिकल प्रोटोकॉल आहे पण कदाचित उद्या शासकीय हेडसाळी मुळे व पगार थकवण्या सारख्या प्रकारा मुळे आरोग्यसेवक नसतील अशी परिस्थिती नक्की येऊ शकते.
जम्बो कोविड सेंटर हे मोठे कोविड रुग्णालय शेकडो कोटी खर्च करून उभे करण्यात आले त्याच्या अगोदर ससून व नायडू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्ण उपचार घेत होते आजच्या घडीला जम्बो कोविड सेंटर व ससून या ठिकाणी काम करणारे सर्व स्तरावरील आरोग्यसेवकाच्या पगारा साठी सातत्याने चालढकल करण्यात येत आहे प्रत्येक ठराविक कालावधी नंतर आरोग्यसेवकाना अनिश्चित कालावधी साठी ब्रेक देणे हे प्रकार सातत्याने होत आहेत. त्यामुळे मोठा असंतोष आरोग्य सेवकां मध्ये आहे असे अजय शिंदे यांनी म्हटले आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर तर आरपीआयचा उपमहापौर निवडुन येईल – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

0

मुंबई दि. 22 – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप सोबत आरपीआय युती करेल. भाजप आरपीआय च्या युतीचा मुंबई महापालिकेत विजय नक्की होईल त्यात भाजपचा महापौर तर आरपीआय चा उपमहापौर निवडून येईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी आज व्यक्त केला.
आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि शिवसेना आपआपल्या पद्धतीने कार्यरत झाले आहेत. भाजप विरुद्ध शिवसेना असा प्रमुख सामना मुंबई महापालिका निवडणुकीत होणार असुन त्यात आरपीआय ची भीमशक्ती ज्यांच्या बाजूने त्यांचा विजय निश्चित असल्याने रिपब्लिकन पक्ष भाजपला समर्थन देणार आहे. त्यासाठी लवकरच आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीची व्यूहरचना ठरविणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

एजंटमार्फत वसुलीच्या तक्रारींची अर्थमंत्र्यांनी घेतली दखल-आमदार सिद्धार्थ शिरोळे

0

पुणे : कर्जाचे हप्ते वसुलीसाठी एजंट वापरून कर्जदाराला छळण्याच्या तक्रारींची दखल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतली असून एजंट पध्दत वापरणाऱ्या वित्तीय संस्थांच्या तपासणीचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

एजंट मार्फत वसुलीचा तगादा लावून मनस्ताप दिला जातो, दादागिरी केली जाते अशा तक्रारी अनेक कर्जदारांनी केल्या होत्या. त्या विरोधात कारवाई करावी, अशा एजंटच्या दहशतीला पायबंद बसवा अशी मागणी पोलीस खात्याकडे यापूर्वी आमदार शिरोळे यांनी केली होती. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही पत्र पाठविण्यात आले होते. या पत्राची दखल त्यांनी घेतली.एजंट वापरणाऱ्या वित्तीय संस्थांची तपासणी करावी असे निर्देश रिझर्व्ह बँकेला मंत्रीमहोदयांनी दिले, असे आमदार शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा ठाकरे सरकारचा डाव-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा आरोप

0

जालना, दि. २२ नोव्हेंबर: एसटी महामंडळ तोट्यात असताना राज्य कर्मचाऱ्यांची देणी, तसेच इतर प्रशाकीय खर्चासाठी महामंडळाने एसटी बस डेपो तसेच एसटी बसेस तारण ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एसटीच्या आगारांना तारण ठेवायला कर्मचाऱ्यांचा आणि संघटनांचा विरोध आहे. त्यात बस सुध्दा गहाण ठेवण्यात येणार आहेत त्यामुळे २ हजार कोटींच्या कर्जाच्या नावाखाली एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा हा डाव असल्याचा जोरदार आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज केला.
औरंगाबाद विभाग (मराठवाडा) पदवीधर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ परतुर, जालना येथे पदवीधर-शिक्षकांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बोलत होते. यावेळी माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर, उमेदवार शिरीष बोराळकर, युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य मनोज पांगारकर, मदनलाल, संदीप गोरे, जिजाबाई जाधव आदि मान्यवर आणि पदवीधर उपस्थित होते.
यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या चुकीच्या धोरणावर सडकून टिका केली. ते म्हणाले की, राज्य सरकारला कर्ज उभारणीसाठी परवानगी असतानासुध्दा एसटी महामंडळ वेगळे कर्ज का घेत आहे. कारण एसटी महामंडळाला कर्जाचा हप्ता भरण्याची क्षमता दिस नाही तो हप्ता त्यांना भरता आला नाही तर हळूहळू एसटीचे आगार आणि बस यांचा लिलाव करावा लागेल. त्यामुळे एसटीच्या खासगीकरणाच्या डाव यामागे आखला जात असून यास आम्ही विरोध करु असेही त्यांनी स्पष्ट केले.

पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले आमदार व सध्याचे राष्ट्रवादी कॉंग्रसचे उमेदवार गेली १२ वर्ष आमदार होते. या इतक्या वर्षात ते कधी आपले प्रश्न विचारायला आले का…शिक्षकांचे काय प्रश्न आहेत…पदवीधरांची काय प्रश्न आहेत याची त्यांना परवा नाही अशी टिका करताना दरेकर म्हणाले की, जर १२ वर्ष या आमदाराने फुकट घालवली असतील तर त्यांना अजून संधी देणार आहे का…ते विधानपरिषद सभागृहाचे प्रतिनित्व करतात, त्याच सभागृहाचा मी विरोधी पक्ष नेता आहे पण या आमदारांनी सभागृहात शिक्षक , पदवीधर यांच्या प्रश्नांवर एकही प्रश्न विचारली ना त्यांच्या समस्या मांडल्या. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणतात ते आमदार म्हणजे समस्यांची जाण असलेला नेता आहे. पण यांना त्या समस्यांची जाण तरी दिसायला पाहिजे, त्या जाणून घेण्यांसाठी लोकांमध्ये तरी जायला पाहिजे असा टोलाही दरेकर यांनी मारला.

भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर गेली २५-३० वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते म्हणून सर्वांना परिचित आहेत, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे , क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणारे बोराळकर यांना छत्रपती पुरस्कार मिळाला आहे तसेच त्यांचे कार्य सांस्कृतिक क्षेत्रातही आहे. पदवीधारांचे मुद्दे ते नेहमीच मांडत असतात तसेच ते पदवीधरांचा प्रतिनिधी म्हणून ते काम करतात. त्यांच्या प्रश्नांना तडीस नेतात व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे असे सामाजिक कार्य करणा-या उमदेवारांना पदवीधर मतदारांनी संधी द्यावी असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केले.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक (भाग-२)

0

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या लेखामध्‍ये सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्‍या कर्तव्‍ये व जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वाच्या सूचना थोडक्यात मांडण्‍यात आल्‍या आहेत. निवडणुकीचे काम नि:पक्षपातीपणे व आत्मविश्वासाने पार पाडण्‍यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत असतेच. या लेखाचा भाग दुसरा प्रसिद्ध करण्यात येत आहे त्‍यामुळे मतदार आणि वाचकांनाही या माहितीचा उपयोग होईल, अशी आशा आहे.

मतपत्रिकेवर मत नोंदविण्याबाबत सूचना

मत नोंदविण्यासाठी मतदारास जांभळा स्केच पेन देवून मतदान कक्षात जाण्यास सांगेल. मतदान कक्षात मतदार ज्या उमेदवारास मत देऊ इच्छित असेल त्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केच पेनने फक्त एकाच अंकात पसंती क्रमांक दर्शवावा. पसंती क्रमांक फक्त अंकातच द्यावयाचा आहे. तसेच पसंतीचे अंक मराठी, इंग्रजी, रोमन किंवा भारतीय घटनेच्या आठव्या अनुसूचीमधील कोणत्याही एका भाषेतील अंकात नमूद करावयाचे आहे.  (उदा. रोमन-I, II, III, – मराठी 1,2,3, – इंग्रजी १, २, ३). मतपत्रिकेवर एकापेक्षा अधिक उमेदवाराच्‍या नावासमोरील रकान्यात एकसारखा पसंती क्रमांक देता येणार नाही. मतदारास पसंतीनुसार निवडणुकीस उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्‍या नावासमोर पसंतीचे आकडे लिहिलेल्या आकड्यापैकी एक अंक येईल.

मतपत्रिकेवर पसंती क्रमांक व्यतिरिक्त इतर कोणताही मजकूर लिहू नये. मतदाराने मतपत्रिकेवर मतदान नोंदविल्यावर पूर्वीच्या घडीवर त्या मतपत्रिकेची घडी घालावी. त्यानंतर घडी केलेली मतपत्रिका मतदान कक्षातून बाहेर आणावी आणि मतपेटीत टाकावी. मतदार  ही घडी केलेली मतपत्रिका मतपेटीत टाकेल व स्केच पेन तेथेच ठेवेल. मतदाराने खऱ्या मतपत्रिकेशिवाय इतर कोणतीही वस्तू अथवा कागद मतपत्रिकेत टाकता कामा नये, यासाठी मतपत्रिकेच्या घडीवरील विभेदक चिन्ह व केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी दिसेल अशा रितीने घडी केलेली मतपत्रिका मतपेटीत टाकण्याची प्रत्येक मतदाराला वेळोवळी सूचना देईल. यासाठी प्रत्येक मतदार मतपेटीमध्ये घडी केलेली मतपत्रिका टाकताना दक्ष राहून लक्ष ठेवील. मतपत्रिका मतपेटीत टाकल्यानंतर मतदार मतदान केंद्रातून बाहेर जाण्यापूर्वी त्याच्या बोटावरील पक्क्या शाईची खूण स्पष्टपणे उमटली असल्याची तसेच बोटावरील शाई पुसली नसल्याची खात्री करेल.

मतदान केंद्राध्‍यक्ष – चिन्हांकित फोटो मतदार यादी, सर्व नमुने व लिफाफे, (मतदान अधिकारी-१) चिन्हांकीत फोटो मतदार यादी, इंडेलीबल इंक बॉटल, मतदानाच्‍या आकडेवारीचा तक्ता, (मतदान अधिकारी-२)-मतपत्रिका, स्थळ प्रतिपासून मतपत्रिका वेगळे करण्याचे कटर,  (मतदान अधिकारी-३) जांभळ्या शाईचे पेन व ढकल पट्टी.

मतदान केंद्रात प्रवेशपात्र व्यक्ती – 1) मतदान अधिकारी 2) एकावेळी एक उमेदवार/ त्याचा निवडणूक प्रतिनिधी /एक मतदान प्रतिनिधी 3) आयोगाने परवानगी दिलेली व्यक्ती 4) निवडणूक कामावरील सरकारी सेवक 5) आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक 6) मत नोंदविण्यासाठी आलेले मतदार 7) मतदारासोबत येणारे बालक / मूल 8) दिव्यांग व नि:समर्थ मतदारासोबत येणारी स्थानिक व्यक्ती (मदतनीस/सहाय्यक) 9) मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान केंद्रात अपवादात्मक परिस्थितीमध्ये  प्रवेश दिलेली व्यक्ती.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम,1951 चे कलम 128 अन्वये उपस्थित प्रतिनिधींना व निवडणूक कर्तव्यावरील सर्व संबंधितांना गोपनियतेची तरतूद वाचून दाखविणे आवश्यक आहे. संबंधितांना त्यांच्‍या कर्तव्याची व गोपनियतेची पूर्ण जाणीव करून द्यावी. उमेदवाराचा मतदान प्रतिनिधी म्हणून आमदार / खासदार किंवा मंत्री किंवा झेड प्‍लस सुरक्षा प्राप्त अशा व्यक्तींना  मतदान प्रतिनिधी म्हणून नेमणूक करता येणार नाही. सुरक्षा प्राप्त मतदाराच्या सुरक्षा रक्षकालाही साध्या कपड्यामध्ये येवून त्याच्‍याकडील शस्त्र कपड्याखाली लपवून ठेवावे लागेल. सुरक्षा रक्षक मतदार नसेल तर त्याला मतदान केंद्राच्या खोलीच्या बाहेर थांबावे लागेल.

मतदान प्रतिनिधीकडे ओळखपत्र आणि त्यांचे नेमणुकीबाबत उमेदवार किंवा त्याचे निवडणूक प्रतिनिधी यांनी सही केलेला फॉर्म नंबर 10 असणे आवश्यक आहे. प्रत्येक उमेदवारास प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान प्रतिनिधी व दोन बदली मतदान प्रतिनिधी नेमता येतील. तथापि, कोणत्याही वेळी उमेदवाराचा एकच प्रतिनिधी केंद्रात उपस्थित राहील. तथापि, एका वेळी एका उमेदवाराचा एकच मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रावर उपस्थित राहील. मतदान प्रतिनिधींचे हालचाल रजिष्टरमध्ये त्यांच्या नोंदी घ्याव्यात. मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये कोणत्याही मतदान प्रतिनिधीला मतदान केंद्रामधून बाहेर जाण्यास किंवा ते सोडण्यास परवानगी देता येणार नाही.

मतदान प्रतिनिधींना मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, बिनतारी संदेश यंत्र, रेकॉर्डर, कॅमेरा, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे इ. घेऊन जाण्यासाठी मुभा नाही. तसेच त्यांच्‍याकडील मतदार यादी बाहेर घेऊन जाण्यास परवानगी असणार नाही. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक रितीने पार पाडण्यास तुम्ही बांधील असल्याचा विश्वास प्रतिनिधीमध्ये निर्माण करावा.

मतदान प्रक्रियेमध्‍ये उद्भवणाऱ्या विविध परिस्थिती 

  • मतदान गुप्त राहण्यासाठी घ्यावयाची काळजी (नियम ३९)
  • मतपत्रिका रद्द करणे
  • अंध किंवा दिव्यांग मतदाराकडून मतदान (नियम – 40)
  • प्रदत्त मतपत्रिका (TENDER VOTE)  (नियम ४२)
  • आक्षेपित मते (CHALLANGED VOTE)(नियम ३६)
  • मतदाराने मतपेटीमध्ये बनावट मतपत्रिका {Spurious Ballot Paper} टाकणे

मतदान गुप्त राहण्यासाठी घ्यावयाची काळजी (नियम-39)  

नियम ३८ अनुसार किंवा या नियमांच्या दुसऱ्या कोणत्याही तरतुदीनुसार ज्याला मतपत्रिका दिली आहे असा प्रत्येक मतदार, मतदान केंद्रावर मताची गुप्तता राखील आणि त्यासाठी यापुढे घालून दिलेली मतदान पद्धती अनुसरील.

मतपत्रिका मिळाल्यावर मतदार ताबडतोब –

  1. मतदान पटापैकी एका कक्षात जाईल.
  2. तेथे मतपत्रिकेवर, त्याला ज्या उमेदवारास मत देण्याची इच्छा असेल त्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केचपेनने फक्त एकाच भाषेतील अंकात पसंती क्रमांक दर्शवील.

III. आपले मत गुप्त राखण्यासाठी मतपत्रिकेची घडी करील.

  1. आवश्यक वाटल्यास मतदान केंद्राध्यक्षास मतपत्रिकेच्या घडीवरील विभेदक चिन्हाचा ठसा दाखवील.
  2. घडी केलली मतपत्रिका मतपेटीत टाकील.
  3. मतदान केंद्रातून निघून जाईल.

प्रत्येक मतदार गैरवाजवी विलंब न लावता मत देईल. दुसरा मतदार मतदान कक्षात असतांना कोणत्याही मतदारास तेथे प्रवेश दिला जाणार नाही. मतपत्रिका मिळालेल्या मतदाराने पोट-नियम (२) मध्ये घालून दिलेली पद्धत अनुसरण्यास, मतदान केंद्राध्यक्षाने सूचना दिल्यानंतरही नकार दिला तर त्याला दिलेली मतपत्रिका, त्यावर त्याने आपले मत नोंदलेले असो किंवा नसो, मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतदान केंद्राध्‍यक्षाच्‍या निदेशानुसार मतदान अधिकारी परत घेईल. त्या मतपत्रिकेच्या पाठीमागे “रद्द केली-मतदान पध्दतीचा भंग” असे लिहून त्या खाली सही करेल.

मतपत्रिका रद्द करणे 

जर एखाद्या मतदाराने मतपत्रिकेच्या स्थळप्रतिवर सही करण्यास नकार दिला तर त्याला मतपत्रिका देवू नये.

मतदार अंध/दिव्यांग/कुष्‍ठरोगी असल्यास व तो सही करण्यास असमर्थ असल्यास त्याच्या मदतनीसाचा मतपत्रिकेच्या स्थळ प्रतीवर सही /अंगठा घेईल व प्रतिज्ञापत्र भरेल.

मतदार यादीतील क्रमांक लिहिलेल्या ज्या मतपत्रिकेच्या स्थळप्रतिवर सहीसाठी नकार दिला तर तसे मतदान अधिकारी यांनी नमूद केले असेल, ती मतपत्रिका रद्द करण्यात  यावी आणि ती व तिच्‍या स्थळ प्रत दोन्हीवर पाठीमागे “रद्द-सही करण्यास नकार” असा शेरा लिहून ती मतपत्रिका रद्द केलेल्या मतपत्रिकेसाठी असलेल्या लिफाफ्यात ठेवावी.

सदोष किंवा खराब झालेली मतपत्रिका देखील वरीलप्रमाणे कृती अनुसरुन त्यावर  “रद्द -सदोष मतपत्रिका”  असे लिहून ती मतपत्रिका रद्द मतपत्रिकेच्या लिफाफ्यात ठेवावी.

वरील दोन्ही प्रकारे रद्द केलेल्या मतपत्रिकांचा हिशोब “मतपत्रिकांचा हिशोब” नमुना -16 च्या बाब क्रमांक 4 (ब) मध्ये दर्शवावा. (नियम -41 )

मतपत्रिका मिळालेल्या मतदाराने पोट-नियम (२) मध्ये घालून दिलेली पद्धत अनुसरण्यास, मतदान केंद्राध्यक्षाने सूचना दिल्यानंतरही नकार दिला तर त्याला दिलेली मतपत्रिका, त्यावर त्याने आपले मत नोंदलेले असो किंवा नसो, मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतदान केंद्राध्‍यक्षाच्‍या निदेशानुसार मतदान अधिकारी परत घेईल.

मतपत्रिका परत घेतल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष, त्याच्या मागच्या बाजूला ‘रद्द केली -मतदान पध्दतीचा भंग’ असे लिहिल आणि त्याखाली आपली सही करील. त्याचा हिशोब नमुना 16 च्या बाब क्रमांक 4 (अ) मध्ये लिहिल.  (नियम -39 )

000000

– राजेंद्र सरगजिल्‍हा माहिती  अधिकारी,  पुणे

रिक्षा चालकांना विमा हप्त्याचा परतावा मिळावा-आमदार सिद्धार्थ शिरोळे

0

पुणे – सव्वाचार महिने रिक्षा बंद होत्या. त्यामुळे प्रादेशिक परिवहन मंडळाने तसे प्रमाणपत्र देवून बंद कालावधीचा विमा हप्त्याचा परतावा रिक्षा चालकांना द्यावा अशा मागणीचे पत्र आमदार शिरोळे यांनी मुख्य मंत्र्यांना पाठवले आहे.

वाहन (रिक्षा) बंद असल्याचे प्रमाणपत्र संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) द्यावयाचे असते. ते प्रमाणपत्र रिक्षा चालकांना मिळाल्यास त्यांना, सव्वाचार महिन्यांचा विमा हप्त्याचा परतावा विमा पॉलिसीनिहाय परत मिळेल असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.

थर्ड पार्टी विमा असेल तर रिक्षा बंदच्या कालावधीतील विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनी पुढील विमा पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी त्या हप्त्यापोटी वजा करेल किंवा पुढील पॉलिसीचा कालावधी रिक्षा बंद असलेल्या काळाइतका वाढवेल. या दोन्हीपैकी एक पर्याय पॉलिसीधारक रिक्षाचालक निवडू शकतो. पूर्ण विमा असेल तर विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार राहील. अशा तरतुदींच्या आधारे काही अटींवर रिक्षा चालकांना परतावा देता येवू शकेल. सव्वाचार महिने रिक्षा सक्तीने बंद असल्याने विमा हप्त्याचा परतावा मिळणे हा रिक्षा चालकांचा अधिकार आहे असे पत्र आमदार शिरोळे यांनी मुख्य मंत्र्यांना पाठवले असून या पत्राची प्रत उप मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि कामगार मंत्र्यांनाही पाठवली आहे.

तसेच टाळेबंदी (लॉकडाऊन) काळात एसटी, पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांप्रमाणे रिक्षा चालकांनाही दरमहा किमान वेतन मिळावे, शेतकरी कर्जमुक्तीच्या धर्तीवर पकेज देवून टाळेबंदी काळातील वाहन कर्जाच्या हप्त्यात सूट द्यावी. हप्ते वसुलीसाठी फायनान्स कंपन्यांकडून होणारा छळ थांबवावा अशाही मागण्या आमदार शिरोळे यांनी मुख्य मंत्र्यांकडे केल्या आहेत.

13 कोटींपेक्षा अधिक चाचण्या करीत भारताने ओलांडला महत्त्वपूर्ण टप्पा

0
  • मोठ्या संख्येने केलेल्या चाचण्यांमुळे बाधित रुग्णांच्या दरातील घसरण सुनिश्चित.
  • एकूण रुग्णसंख्येपैकी सक्रिय रुग्ण संख्या 4.86 %

नवी दिल्ली – जागतिक महामारीशी लढा देत असताना भारताने आता आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. दररोज दहा लाखांहून अधिक चाचण्या करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, गेल्या 24 तासांत, 10,66,022 चाचण्या करण्यात आल्या असून त्यामुळे एकूण चाचणी क्षमतांमध्ये वाढ होऊन ती आता 13,06,57,808 पर्यंत पोहचली आहे.

शेवटच्या एक कोटी चाचण्या या केवळ 10 दिवसांच्या कालावधीमध्ये झाल्या आहेत.दररोज घेतल्या जाणाऱ्या सरासरी 10 लाखांपेक्षा जास्त चाचण्यांनी हे सुनिश्चित केले आहे की, एकत्रित बाधित रुग्णांचा दर कमी स्तरावर कायम आहे आणि तो सध्या कमी होण्याच्या मार्गावरच आहे. एकूण राष्ट्रीय स्तरावरील बाधित रुग्णांचा दर हा 6.93 % इतका असून, तो 7 % पेक्षा कमी आहे. दैनंदिन बाधित रुग्णांचा दर काल केवळ 4.34 % इतका होता. मोठ्या संख्येने चाचणी क्षमता वाढली असल्यामुळे सहाजिकच बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

गेल्या 24 तासात, 46,232 रुग्ण कोविड बाधित आढळले आहेत. दैनंदिन दरामधील 4.34 % बाधित रुग्ण संख्येचा दर हे दर्शवितो की लोकसंख्येमधून मोठ्या प्रमाणावर चाचण्या करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. युरोपीय आणि अमेरिकेन देशांच्या तुलनेत दैनंदिन रुग्णांमध्ये होणारी वाढ पाहता, भारताने ही महामारी नियंत्रित करण्यासाठी अनेक प्रतिबंधात्नक उपाय योजले आहेत. भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता, केंद्राने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ती कमी करण्याचा सल्ला दिला आहे.

  • भारतात 24 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसंख्येच्या प्रति दशलक्षपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या.
  • 12 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरीच्या प्रति दशलक्ष चाचण्या कमी झाल्या आहेत आणि त्यांना चाचणीच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भारतातील सक्रिय रुग्णसंख्या 4,39,747 इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या प्रमाणात 4.68 % इतकी आहे आणि ते प्रमाण 5 % च्या खाली आहे.

गेल्या 24 तासात भारताने 49,715 इतकी नव्याने बरे झालेल्या रुग्णांची नोंद केली आहे, तर एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 84,78,124 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आज 93.67 टक्के इतका सुधारला आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यांच्यातील दरी सातत्याने वाढत आहे आणि सध्या ती 80,38,377 इतकी आहे.

78.19 % बरे झालेली रुग्ण संख्या ही दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहे.10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 77.69 टक्के नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णसंख्या काल 5,640 इतकी नोंदविण्यात आली आहे.82.62 टक्के मृत्यूची नोंद गेल्या 24 तासांमध्ये 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून करण्यात आली आहे. नव्याने नोंदविलेल्या मृत्यूंपैकी 27.48 टक्के मृत्यू महाराष्ट्रातून नोंदविले आहेत, जी संख्या 155 इतकी आहे.