पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती साजरी होत असतानाच पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार विजयी झाले, वर्षापूर्तीनंतरची ही पहिलीच निवडणूक जिंकल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया पुणे महापालिकेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या घटक पक्षांच्या एकजुटीचा विजय विधानपरिषद निवडणुकीत झाला असे बागुल यांनी म्हटले असून पदवीधर मतदारसंघातील विजयी उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातील विजयी उमेदवार जयंत आसगांवकर यांचे अभिनंदन केले आहे.
यापुढील काळातही आघाडी एकजुटीने काम करेल, असा विश्वास बागुल यांनी व्यक्त केला आहे.
पुणे– दलित अत्याचार प्रतिबंधित कायद्याची (अट्रोसिटी ) कडक अमंलबजावणी पोलीस आणि प्रशासनाकडून व्हावी यासाठी लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्च्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अट्रोसिटी ऍक्ट कायद्याचे वाचन करून अभिनव पध्द्तीने आंदोलन करण्यात आले व पोलीस ,प्रशासन आणि शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला .यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्त्व रिपब्लिकन युवा मोर्च्यांचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले .या वेळी बोलताना डंबाळे म्हणाले की ,दलीत पीडितांना न्याय देण्यासाठी हा कायदा आहे परंतु या कायद्याचा वापर प्रभावी पोलीस प्रशासन करीत नाही त्यामुळे त्यांना या कायद्याचा अभ्यास व्हावा व त्यांनी करावा म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन केल्याचे सांगितले .या वेळी संविधानातील अट्रोसिटी कायद्यातिल कलमाचे सामूहिक वाचन करण्यात आले .
या आंदोलनात राहुल डंबाळे,दलित कोब्राचे भाई विवेक चव्हाण ,भीम छावा चे अध्यक्ष श्याम गायकवाड ,कष्टकरी पंचायतीची नेते बाबासाहेब कांबळे, भीम आर्मी चे अभिजीत गायकवाड, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या स्नेहल कांबळे, अजय लोंढे, रिपब्लिकन पक्षाचे किरण भालेराव, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भोसले,अश्विन दोडके यासह पुणे शहरातील महिला ,युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
मुंबई, दि. ४ : शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.
नरिमन पॅाईंट येथे आयोजित लोकार्पण सोहळ्यात महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्रकुमार बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम II’ उपक्रमांतर्गत (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक वेहिकल्स) इलेक्ट्रिक बस योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत ‘फेम’कडून ३४० बस गाड्या मंजूर झाल्या आहेत. यापैकी आज 26 बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आजपासून त्या प्रवाशांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, या इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत आजपासून सुरु झाल्या ही आनंदाची बाब आहे. मुंबईत सद्यस्थितीला 46 बस सुरु असून एकूण 340 बस उपलब्ध होणार आहेत. येणाऱ्या काळात उर्वरित बसगाड्यांपैकी जास्तीत जास्त संख्येत बस उपलब्ध होतील यासाठी पाठपुरावा केला जाईल. शाश्वत आणि वातावरणातील बदलासाठी अशा इलेक्ट्रिक बसगाड्यांसारखे उपक्रम राबविले पाहिजेत. तसेच मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर होईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे, असेही पर्यावरणमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा ‘बेस्ट‘ प्रवास
या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी बसची पाहणी केली. त्यानंतर जनतेसाठी सोयीची आणि सुखकारक ठरेल याची खात्री करण्यासाठी स्वत: या नवीन इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
अमरावतीची जागा जिंकली असती तर समाधान मिळालं असतं. तिथं जे घडलं त्याचं दुःख असल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बोलून दाखवली. “नागपूर आणि पुण्यात बऱ्याच वर्षांपासून पदवीधर मतदारसंघांमध्ये एका पक्षाची मत्तेदारी होती. मात्र सुशिक्षित वर्ग देखील महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. पदवीधर, शिक्षक मतदार आमच्या पाठीशी आहेत हे सिद्ध झालं. बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मी त्यांची नावं घेऊन कारण नसताना वेळ घालवू इच्छित नाही. मात्र हा निकाल म्हणजे त्या वाचाळविरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे. आता लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय हे या निकालांवरुन स्पष्ट झालं आहे,” असं अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवारांनी या निवडणुकीच्या माध्यमातून तिन्ही पक्षांनी एकत्र येत एक वेगळा राजकीय प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला याचा सामाधान असल्याची भावना व्यक्त केली. मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो. हा एक वेगळा प्रयोग शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंनी केला. त्याचं हे यश आहे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आणि सहपोलीस आयुक्तांनी केली संयुक्त पाहणी
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे करण्यात आलेल्या तयारीसह थेट प्रक्षेपण व्यवस्थेची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल आणि सहपोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे-पाटील यांनी गुरुवारी संयुक्त पाहणी केली.
यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे रविवार दिनांक ६ डिसेंबर २०२० रोजी चैत्यभूमी येथे होणार्या शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये केले जाणार आहे. सोबत विविध समाजमाध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहून अभिवादन करता येणार आहे. त्यासाठी यूट्यूब: bit.ly/abhivadan2020yt / फेसबूक: bit.ly/abhivadan2020fb / ट्विटर: bit.ly/abhivadan2020tt या लिंकचा उपयोग करता येईल.
दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती, पुष्प सजावट आदी कामे केली जातात. प्रतिवर्षाप्रमाणे ही सर्व कामे पूर्णत्वास आली असून त्याची पाहणी श्री. जयस्वाल यांनी केली. यावेळी पोलीस प्रशासनाच्या तयारीची पाहणीदेखील त्यांनी श्री. नांगरे-पाटील यांच्यासह केली.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे दरवर्षी पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधा यंदा कोरोना पार्श्वभूमीवर दिल्या जाणार नाहीत. या नागरी सेवा-सुविधा अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही विशेष सुविधा यंदा दिल्या जाणार आहेत.
या पाहणी दौऱ्याला अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ २) श्री. विजय बालमवार, प्रसारभारतीचे डॉ. अश्विनी कुमार, पोलीस उपायुक्त श्री. प्रणय अशोक, महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक तथा सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघडे, जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. किरण दिघावकर यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यंदा कोरोना विषाणू संक्रमण पाहता, मोठ्या संख्येने एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे न येता आपापल्या घरी राहून तसेच स्थानिक परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन यापूर्वी देखील करण्यात आले आहे. प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना अभिवादन करता यावे यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून महापरिनिर्वाणदिनी सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसेच दुपारी १२.५० वाजता दर दहा मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राद्वारे देण्यात आली आहे.
मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज अफगाणिस्तानच्या महावाणिज्यदूत झाकिया वर्दक यांची मलबार हिल येथील अफगाणिस्तानच्या दूतावासात सदिच्छा भेट घेतली.
सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे सहसंचालक संजय कोरबु, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विश्वस्त आशिष पेडणेकर, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे सचिव अजिंक्य देसाई यावेळी उपस्थित होते.
श्री.पटोले म्हणाले की, भारत व अफगाणिस्तानचे ऐतिहासिक संबंध आहेत. पुढेही प्रत्येक क्षेत्रामध्ये हे संबंध असेच वृद्धींगत होतील. मुंबई हे पयर्टनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. असे सांगून राज्यातील संस्कृती, शिक्षण, उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी विधामंडळाविषयी माहिती दिली. महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या विविध योजना चांगल्या आहेत त्या अफगाणिस्तानच्या विधानमंडळासाठी विधायक ठरतील, असे त्यांनी सांगितले. तर राज्यातील संस्कृती, शिक्षण, उद्योग या क्षेत्राशी निगडीत संबंधित अधिकाऱ्यांनी या विषयाची माहिती दिली.
अफगाणिस्तानच्या राजदूत झाकिया वर्धक म्हणाल्या, अफगानिस्तानमध्ये बॉलीवूडचे आकर्षण आहे. भविष्यात वाणिज्य क्षेत्र व उद्योग क्षेत्रामध्ये एकत्रित काम करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे- २०२२ मध्ये महापालिका निवडणुका होतील आणि आता महापालिकेतील महापौरांसह उपमहापौर आणि सभागृहनेते अशा पदांच्या नेमणुकांना वर्षपूर्ती देखील होऊन गेली आहे. हे पदाधिकारी आता बदला अशी मागणी होत असताना भाजपचे सर्वेसर्वो असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या अखेरच्या वर्षात महापालिकेतील पदाधिकारी बदलताना मोठी विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. असे असताना गेल्या निवडणुकीत ज्यांनी भाजपाचे सुमारे ५० नगरसेवक निवडून आणले असा दावा केला जातोय ते राज्यसभेचे माजी सदस्य संजय काकडे यांचा सहभाग मात्र कमी झाल्याने हि भाजपासाठी धोक्याची घंटा ठरली तर नवल वाटणार नाही .जेवढी निष्ठा आणि भक्ती खा.गिरीश बापटांची पक्षावर आहे तेवढीच गरज निवडणुका जिंकण्यासाठी व्यूहरचना करण्याकरिता काकडे यांची लागणार आहे हे आजही कोणी नाकारू शकणारे नाही . या पार्श्वभूमीवर आता पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचा बदल ,नव्याच्या नेमणुका येऊन घातल्याने हि दूर दूर दिसू लागलेल्या काकडे यांना जवळ आणण्याची भाजपला आयतीच संधी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नव्या नेमणुका करताना आगामी महापालिका निवडणुकीची व्यूहरचना डोळ्यापुढे ठेउनच, फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना काकडे आणि बापट या दोहोंना विश्वासात घेऊनच या नेमणुका कराव्या लागतील असा व्होरा आहे. प्रत्यक्षात फडणवीस आणि पाटील याबाबत कोणते धोरण घेणार हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बापट यांची कसबा मतदार संघावर जशी पकड आहे तसेच वर्चस्व आता भाजपचे कोथरुड असल्याचे मानले जाते .पण केवळ कसबा आणि कोथरूड म्हणजे पुणे महापलिका होणार नाही तर शहरातील अन्य परिसरासह चहुबाजूला पसरलेली उपनगरे हि विंचारात घ्यावी लागणार आहेत . बहुधा जिथे तिथे राष्ट्रवादीने आपले मजबूत स्थान निर्माण करून ठेवले आहे.दक्षिण पुण्यात खडकवासला तसेच शिवाजीनगर,पर्वती,वडगाव शेरी सह कोथरूड कसबा आणि पूर्व पुण्यात हडपसर मतदार संघ असतील अशा बहुतेक ठिकाणी काकडे यांनी निर्माण करून ठेवलेले भाजपचे वर्चस्व आता हळू हळू कमी होत चालले आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व इथे वाढू लागले आहे, जेव्हा कलमाडी आणि शरद पवार एकत्र आले होते त्या काळात देखील या दोहोंना ७८ च्या पुढे संख्या गाठता आली नव्हती. गेल्या ४० वर्षात भाजपचे २५ च्या वर नगरसेवकांची संख्या पोहोचू शकली नव्हती . पण गृहखात्याच्या माहितीवरून काकडे यांनी केलेल्या नियोजानानुसारच काकडे यांनी २०१७ च्या निवडणुकीत ९२ चा जादुई आकड्याचा दावा केला होता .सध्या काकडे पक्षात सक्रीय होण्यापासून काकडे दूर होत गेले तर केवळ बापट आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्व मदार राहणार आहे.त्यानुसार विचार केला तर हेमंत रासने आणि दीपक पोटे यांच्या प्रभागात भाजपचे पूर्ण प्राबल्य आहे. सिंहगड रस्त्यावरील नागपुरे यांच्या मुळे त्यांच्या प्रभागात भाजपचा प्रभावी प्रभाव आहे. अन्य ठिकाणी जिथे पूर्णतः भाजपचा प्रभाव होता तिथे तो आता निम्म्यावर घसरला आहे. अशा परिस्थितीत १०० नगरसेवकांचा आकडा कायम ठेवणे भाजपसाठी मुश्कील बनणार असल्याचे स्पष्ट आहे. अशात काकडे यांची साथ सुटली तर केवळ बापट आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष किती जागा जिंकेल यावर आता पासूनच मंथन होताना दिसते आहे.आणि या मंथनातून 50 च्या आतच संख्या वर्तविली जाते आहे. पण फडणवीस आणि पाटील पक्षाच्या हितासाठी पुन्हा २०२२ च्या निवडणुकीसाठी बापट -काकडे यांच्या नेतृत्वाची जोडी देखील वापरून घेतील अशी शक्यता नाकारता येत नाही.पण त्याची मुहूर्तमेढ आता पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकातूनच होणार आहे असे बोलले जाते आहे.
भाजपचे मुख्यालय असलेल्या नागपुरात उमेदवार पराभूत झाल्याने भाजपला हादरा बसला आहे. 1958 नंतर पहिल्यांदाच भाजप गड ढासळला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
1958 पासून होता भाजपचा बालेकिल्ला नागपुरात महाविकास आघाडीने भाजपच्या गडाला सुरुंग लावला आहे. 1958 पासून हा गड भाजपच्या ताब्यात होत्या. नागपुरात भाजपचे मुख्यालय असल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या आधिपासून हा गड भाजपच्या ताब्यात होता. 1958 मध्ये पंडीत बच्छराज व्यास हे जनसंघाचे नेते होते. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपकडे होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर राव फडणवीस हे देखील येथून निवडून आले होते. केंद्रीय मंत्री गडकरीही सलग चार वेळा निवडून आले. एकदा त्यांनी सर्वाधिक विक्रम केला. ते अविरोध निवडूण आले. हे संघाचे मुख्यालय आहे. येथे पराभव होणे हा भाजपला मोठा धक्का आहे.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत अभिजीत वंजारी ५५ हजार ९४७, संदीप जोशी ४१ हजार ५४०, राजेंद्रकुमार चौधरी २३३, इंजीनियर राहुल वानखेडे ३ हजार ७५२, ॲङ सुनिता पाटील २०७, अतुलकुमार खोब्रागडे ८ हजार ४९९, अमित मेश्राम ५८, प्रशांत डेकाटे १ हजार ५१८, नितीन रोंघे ५२२, नितेश कराळे ६ हजार ८८९, डॉ. प्रकाश रामटेके १८९, बबन तायवाडे ८८, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ६१, सी.ए. राजेंद्र भुतडा १ हजार ५३७, प्रा.डॉ. विनोद राऊत १७४, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ६६, शरद जीवतोडे ३७, प्रा.संगीता बढे १२० आणि इंजीनियर संजय नासरे ५६ मते पडली आहेत. प्रत्येक फेरीत २८ हजार मतांची मोजणी होत होती. तथापि, पाचव्या फेरीमध्ये उर्वरित २१ हजार ५३ मतांची मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत एकूण वैध मते १ लक्ष २१ हजार ४९३ ठरली. ११ हजार ५६० मते अवैध ठरली.
विधान परिषद निवडणुकीत अभिजित वंजारी निवडून आले आहेत. औपचारिक घोषणा बाकी आहे. थोड्याच वेळात प्रमाणपत्र घ्यायला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे
पुणे, दि. 04- पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. अरुण गणपती लाड विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले. श्री. अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. एकूण मतदान 2 लाख 47 हजार 687 इतके झाले त्यापैंकी 2 लाख 28 हजार 259 मते वैध तर 19 हजार 428 इतकी मते अवैध ठरली. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले, निवडणूकीसाठी एकूण 62 उमेदवार निवडणूक लढवीत होते.
हा विजय संपूर्ण महाविकास आघाडी, सर्व नेते, कार्यकर्ते पदाधिकारी आणि पाचही जिल्ह्यातील मतदारांचा आहे. आपण ज्या विश्वासाने मला प्रतिनिधी म्हणून निवडले तो विश्वास साध्य करण्यासाठी मी अहोरात्र काम करेन. पुन्हा एकदा सर्वांचे आभार धन्यवाद आमदार अरुण गणपती लाड
पदवीधर करिता २ लाख 47 हजार 50 इतके मतदान झले होते. एकूण मतदानाच्या तुलनेत ही टक्केवारी 57. 96 टक्के इतकी होती. गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. मतमोजणीत यापैकी 2 लाख 28 हजार 272 हे वैध मतदान ठरले. त्यामुळे विजयी उमेदवारास 1 लाख 14 हजार 137 हा विजयी कोटा ठरविण्यात आला. एकूण 112 टेबल वर ही मतमोजणी सुरू होती. अपेक्षेप्रमाणे ही मतमोजणी शुक्रवारी सायंकाळपर्यंत चालेल असे बोलले जात होते. मात्र पहिल्याच पसंती क्रमांकात लाड यांनी तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळवून आपला विजय निश्चित केला. पदवीधर निवडणूक च्या निकषानुसार वैध मतांच्या 50 टक्के अधिक 1 अशी मते लाड यांनी मिळविल्याने शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास लाड यांचा विजय निश्चित झाला
पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार अरुण लाड यांना विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तर शिक्षक मतदारसंघात प्रा. जयंत आसगावकर यांची विजयाकडे घोड़ दौड सुरू; अधिकृत निकाल दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
नागपूरमध्येही महाविकास आघाडी जिंकली विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत पाचही फेऱ्यांत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भाजपाच्या जोशी यांना मोठ्या मतफरकाने पराभव पत्करावा लागला.
गेल्यावेळी लाड यांच्या बंडखोरीचा राष्ट्रवादीला फटका
पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून आले होते, पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र तेव्हाच्या निवडणुकीत सांगलीच्या अरूण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. यानिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना ६२ हजारांच्या आसपास मतदान झाले होते, तर सारंग पाटील यांना ५९ हजारांच्या वर मतदान झाले, अवघ्या २ हजारांच्या फरकाने भाजपाने ही जागा राखली होती, यात विशेषत: अरूण लाड यांनी घेतलेली २५ हजारांहून अधिक मते लक्षणीय होती, त्यामुळे लाड यांच्या बंडखोरीचा फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर मतदारसंघात निसटता पराभव सहन करावा लागला होता.
दबदबा
गेल्या ३० वर्षांत पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. २००२ ला जनता दलाचे प्रा. शरद पाटील यांचा अपवाद वगळता २४ वर्षे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच प्रतिनिधित्व केले. मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीमध्ये निकराची झुंज झाली आणि चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. यात अरूण लाड यांच्या बंडखोरीचा फटका पक्षाला बसला
जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही: वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
मुंबई, दि. ३ : जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला त्यावेळी श्री.ठाकरे बोलत होते. खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार,आमदार यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे, खासदार श्री. पवार, उपमुख्यमंत्री श्री. पवार, महसुल मंत्री श्री. थोरात, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.अदिती तटकरे, सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र थांबला नाही,थांबणार नाही’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, जनतेच्या आशीर्वादामुळे तीन पक्षांचे सरकार वर्षभरापूर्वी अस्तित्वात आले. वर्षभरात नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील जनतेच्या पाठीशी ठामपणे हे सरकार उभे आहे. नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला सावरतानाच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी भक्कमपणे काम केलं जात आहे. कोरोनाकाळात रुग्णसंख्या असो की मृत्यूसंख्या त्यात राज्य शासनाने लपवाछपवी केलेली नाही,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संत गाडगेबाबांच्या दशसुत्रीनुसार काम
संत गाडगेबाबांच्या दशसुत्रीनुसार हे शासन काम करीत असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही देतानाच वर्षभरात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांचे प्रतिबिंब या पुस्तिकेत उमटले असून पुस्तिकेच्या उत्तम निर्मितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम- खा. शरद पवार
खासदार शरद पवार म्हणाले की, हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ असून त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत आहे. वर्षभरात संकटग्रस्ताला धीर देण्याचे काम या शासनाने केले आहे. त्यामुळे संकटकाळात बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही. नविन उमेद आणि प्रदीर्घ अनुभव या समन्वयातून या शासनाची वाटचाल सुरू असल्याचे सांगतानाच लोकांचा सहभाग यात दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
समर्थ महाराष्ट्राला घडविण्याचा निर्धार- उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,जनतेच्या विकासासाठी हे सरकार बांधील आहे. या शासनाची वर्षपूर्ती ही समर्थ महाराष्ट्राला घडविणाऱ्या निर्धाराची असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जनता आणि प्रशासन यांच्यात संघभावना निर्माण करण्याचे काम केल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना योद्धयांचे आभार मानत कोरोना काळात विकासकामांना खीळ बसणार नाही याची ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. विविध विभागांच्या निर्णयांचा समावेश असलेली ही पुस्तिका प्रकाशीत केल्याबद्दल त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कौतुक केले.
नागरिकांना विविध उपाययोजनांनी दिलासा- महसुलमंत्री बाळासाहेब थोरात
महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करीत असून अतिवृष्टी,चक्रीवादळ कोरोना याकाळात नागरिकांना विविध उपाययोजनांनी दिलासा देण्याचे काम केले आहे. गेल्यावर्षी शिवतीर्थावर झालेला शपथविधी सोहळा ऐतिहासिक क्षण असल्याचा उल्लेख महसुलमंत्री श्री. थोरात यांनी केला. यावेळी त्यांनी राज्य शासनाने वर्षभरात शेतकरी, सामान्य नागरिक,विद्यार्थी आदी घटकांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
मुंबई, दि. ३ : देशावरील कोरोना महामारीचे सावट अद्यापही कायम आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे येत्या १४ आणि १५ डिसेंबर २०२० पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून सर्वांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय विधानमंडळाने घेतला आहे. यासाठी दि १२ आणि १३ डिसेंबर रोजी विधानभवन परिसरात तपासणी शिबीर घेतले जाणार आहे.
यासंदर्भात विधानभवनात सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
या अधिवेशनासाठी येणाऱ्या राज्यातील दोन्ही सभागृहातील आमदारांसह विधानभवन आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांना विधानभवनात प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकांची वर्गवारी करण्यात आली असून त्यानुसार तपासणी शिबिरात एकूण सात बुथ उभारले जाणार आहेत. त्याचबरोबर तपासणी झालेल्यांना अहवाल प्राप्त करुन घेण्यासाठी टोकन देण्यात येणार आहेत. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल अशा रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. रुग्णांनी घाबरुन न जाता तपासणी शिबिरातील आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांना शासनमान्य खासगी प्रयोगशाळेत तपासणी करावयाची आहे, त्यांनी अधिवेशनाला येताना आपला अहवाल 12 आणि 13 तारखेचाच असला पाहिजे याची नोंद घ्यावी.
सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था पावसाळी अधिवेशनाप्रमाणे करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असणार आहे. आमदारांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, स्वीय सहायकांची आणि वाहनचालकांची बसण्याची तसेच अल्पोपहार आदी व्यवस्था विधानमंडळ परिसरात तंबू टाकून करण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव महेंद्र वारभुवन, उपसचिव विलास आठवले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
मुंबई दि 3 : कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील रासायनिक प्रकल्पांमधून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर ‘निरी’ (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था) च्या अहवालानुसार प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
विधानभवन येथे कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील रासायनिक प्रकल्पामधून सोडण्यात येणारे दूषित सांडपाणी व वायुमुळे होणारे प्रदूषण, दौंड तालुक्यातील रस्ते व पुल, खडकवासला धरणाशी संबंधित कामांचा आढावा याबाबत बैठक झाली. बैठकीस आमदार राहूल कुल, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, रस्ते सचिव उ.प्र. देबडवार, जलसंपदा सचिव संजय घाणेकर, उपसचिव अभय पाठक, ‘एमआयडीसी’चे सह कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ.सोनटक्के, मुख्य अभियंता सुभाष तुपे, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक न्याय विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले म्हणाले, कुरकुंभ एमआयडीसी येथील पर्यावरण नियोजन आणि तंत्रज्ञान केंद्राचे काम प्रदूषण करणाऱ्या संस्थांना देण्यात येऊ नये. ‘एमआयडीसी’ भागात झालेल्या अपघातांच्या माहितीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. याचबरोबर शिरूर तालुक्यातील व न्हावरा-केडगाव-चौफुला रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासंदर्भात तसेच दौंड व शिरूर तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाच्या बांधकामासंदर्भात संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन पुढील आठ दिवसात कार्यवाही करण्यात यावी. जुना मुठा उजवा कालवामधील अस्तरीकरण कामासाठी एप्रिलपर्यंत निविदा काढण्यात यावी. तसेच, पुणे महानगरपालिकेला नियमानुसार पाणी देण्यात यावे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने वितरीत करण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण राहण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, असे निर्देशही विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी दिले.
दौंड येथे निवासी शाळा सुरू करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या सूचनांची नोंद घेऊन शाळा सुरू करण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देशही श्री.पटोले यांनी दिले.
मुंबई, दि. ३ : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री ॲड.अनिल परब, मंत्री सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, दिलीप वळसे-पाटील, सुभाष देसाई, अनिल देशमुख, सतेज पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह विधानपरिषद आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.
पदाचे नाव – जतन सहायक, छायाचित्रचालक, माळी, पहारेकरी, रोजंदारी पहारेकरी
एकूण पद संख्या– ५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ डिसेंबर २०२० सायंकाळी ५.४५ पर्यंत
अर्ज सादर करण्याचा पत्ता : पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन, सेंट जॉर्जेस किल्ला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, मुंबई ४००००१.