पुणे- कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकाने जिझिया कराप्रमाणे भाडे आकारणी ची कार्यवाही करा सांगितल्याने उपोषणाला बसलेल्या पथारीवाल्यांच्या समस्या आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पर्यंत पोहोचल्याने उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी विधानभवनात या विषयावर खुद्द उपमुख्यमंत्री आदेश देणार असल्याने हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती पथारी व्यावसायिक पंचायतीचे बाळासाहेब मोरे यांनी येथे दिली .
ते म्हणाले माफ्को शेजारील तालेरा गार्डन नजीकच्या पट्ट्यात पथारीवाल्यांना बसण्यासाठी सुमारे १४ ते १६ वर्षांपासून खुद्द अजित पवार यांनीच मान्यता दिली होती . तेव्हापासून येथे हे पथारी व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत. एवढ्या वर्षानंतर गेल्या दिनांक 2 नोव्हेंबर रोजी प्रशासक गरड यांनी या पथारीवाल्यांवर कारवाई केली असता ,त्यांच्या शी बैठक घेऊन आम्ही त्यांना वास्तविकता सांगून पथारीवाल्यांवर कारवाई करू नये असे सांगितले असता त्यांनी दररोज ५०० रुपये भाडे अधिक ९० रुपये जीएसटी आकारून तुम्ही व्यवसाय करा असे सांगितले. ५९० रुपये रोज भरून पथारीवाले व्यवसाय करणार म्हणजे अति झाले .. त्यांना सांगूनही समजेना म्हणून आम्ही उपोषणाचा मार्ग पत्करला.आम्ही बाजार समितीच्या दारात उपोषण सुरु केले .संतोष नांगरे इकबाल आळंद मोहन चिंचकर जब्बार शेख ताराबाई नलावडे नीलम अय्यर अफरोज बागवान फिरोज बागबन शिवसरण गायकवाड राजेंद्र पिसाळ शुभम मानकर आदी या वेळी उपस्थित होते. आता उपमुख्यमंत्री पवार यांच्या समवेत होणार्या बैठकीत काय निर्णय होतील यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असे मोरे यांनी सांगितले.
पुणे- कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना , माकप , विविध कष्टकरी आणि कामगार संघटना यांच्या संयुक्त आंदोलनाने आज पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकरली असतानाही येथेच निदर्शने करत दिलेल्या घोषणांनी अलका चौक आज दुपारी निनादून गेला. असंख्य पोलीस , सुरक्षा रक्षक जवानांची तुकडी, पोलिसांच्या गाड्या अशा ताफ्यात सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते त्यात शीख समाजाचा महत्वपूर्ण सहभाग , आणि विशेष म्हणजे अत्यंत आर्त घोषणाबाजीने, काव्यात्मक घोषणांनी आजचे हे आंदोलन विशेष वैशिष्ट्यपूर्ण ठरले. शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे , राष्ट्रवादी चे अध्यक्ष आ. चेतन तुपे, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण , शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे ,रजनी त्रिभुवन, अविनाश बागवे, विशाल धनवडे, सुभाष जगताप ,नंदा लोणकर , अश्विनी कदम,नारायण लोणकर ,प्रकाश कदम ,अजित दरेकर ,अमित बागुल, रवींद्र माळवदकर, शेखर कपोते, बाळासाहेब अमराळे, संतोष शिंदे ,यांच्या सह , ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, कामगार नेते अजित अभ्यंकर ,नितीन पवार यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रीय सहभाग घेऊन आपल्या तीव्र भावना येथे व्यक्त केल्या .
कात्रज मध्ये प्रकाश कदम यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने
आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाला पाठिंबा देत नगरसेवक प्रकाश कदम यांच्या नेतृत्वाखाली कात्रज कोंढवा रोड येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रतिक कदम,प्रणव कदम, सुधीर डावखर, संजय खोपडे, सागर शेवाळे, श्रीकांत जाधव ,शडगे काका , जाधव काका, विजूदादा पवार,शिवाजी राऊत व प्रभाग क्र 38 मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
विश्रांतवाडी परिसरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला टिंगरेनगर, विश्रांतवाडी परिसरात संमिश्र प्रतिसाद लाभला. विश्रांतवाडी, विमानतळ रस्ता, धानोरी, टिंगरेनगर आदी परिसरातील काही दुकाने बंद, तर काही चालू होती.
बाणेर बालेवाडीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा तरी सर्व व्यवहार सुरू शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीने ‘भारत बंद’ची हाक दिली असली, तरी बाणेर बालेवाडी येथे सकाळपासूनच सर्व व्यवहार नेहमी प्रमाणे सुरू होते. रस्त्यावर ही वाहणांची गर्दी पाहायला मिळाली. तर सर्व दुकानं आणि सर्व व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरू होते.
व्यावसायिकांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. पण कोरोना काळात अनेक महिने दुकाने बंद होती त्यामुळे बरेच आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. त्यातच आज पुन्हा एक दिवस दुकान बंद ठेवण्यास या भागातील व्यवसायिक उत्सुक नाहीत. त्यामुळे या भागातील सर्व दुकाने आज सुरू ठेवण्यात आली आहेत. तसेच या बंदला शेतकरी समर्थन करणाऱ्या राजकीय पक्षांकडून ही दुकाने सुरु ठेवण्याला कोणताही विरोध नसल्याने या भागातील व्यवहार सुरळीतपणे सुरू होते.
बाणेर बालेवाडी येथील रस्त्यावर वाहतूक सुरळीत सुरू होती. या भागातील हॉटेल सदानंदजवळ वाहतूक पोलीस तसेच चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन कडून नाका बंदी करण्यात आली होती.
धनकवडीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी महापौर तथा नगरसेवक दत्तात्रेय धनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजीनगर येथील एलोरा पॅलेस जवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्या तर्फे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून मंगळवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपप्रणित केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात घोषणा देत, विरोध प्रदर्शन करत आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीचा विजय असो मोदी सरकारचा धिक्कार असो… भाजप सरकारचा धिक्कार असो… ,भाजप सरकार हाय हाय…, अशा पद्धतीने घोषणा देण्यात आल्या.
शेतकऱ्यांच्या आंदोलनला पाठिबा देण्यासाठी वारजेत आंदोलन वारजे महामार्ग उड्डाणपुलाखाली महाविकास आघाडी आणि समविचारी संघटनाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. वारजे भागातील पक्षीय,समविचारी संघटना यांनी सकाळी साडेदहा वाजता निदर्शन आंदोलन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक सेल पुणे उपाध्यक्ष जावेद शेख, सौ प्राची दुधाणे, युवक कॉंग्रेस अध्यक्ष सचिन बराटे व शिवसेना वारजे अध्यक्ष अजय पोळ यांनी संयोजन केले.आंदोलनात विरोधी पक्षनेत्या सौ दिपाली धुमाळ, माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, जिल्हा परिषद सदस्य सौ इंगळे, नगरसेवक सचिन दोडके,जावेद शेख श्रीकृष्ण बराटे, बाबा खान,एड विठ्ठल वांजळे,सौ प्राची दुधाणे या सर्वानी मत प्रदर्शन केले व निषेध आंदोलनाला मार्गदर्शन केले. सौ सायली वांजळे यांनी आभार मानले . जावेद शेख व देवेंद्र सुर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.या आंदोलनात पंतप्रधान मोदी तसेच भाजप सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. मोदी सरकार हाय हाय, ह्या सरकारचे करायचे काय, खाली डोकी वरती पाय, वापस लो, वापस लो, काला कानून वापस लो अशा घोषणाबाजीने आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. पुण्यात “किसान बाग” सुरु करण्याची माहीती जावेद शेख यानी दिली आणी शेवटी राष्ट्र गीताने सांगता करण्यात आली.
कोथरुडमध्ये बंदला संमीश्र प्रतिसाद; चांदणी चौकात निदर्शने केंद्राने केलेल्या शेतकरी कायद्या विरोधात देशभरात बंदचे आयोजन केले आहे. कोथरुडमध्ये या बंदला संमीश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कोथरुडमधील चांदणीचौक येथे निदर्शने करण्यात आली. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अलका चौकात जावून निदर्शने करणे पसंद केले. मोदी सरकारचा निषेध करत चांदणी चौकात निदर्शने करण्यात आली.
मुंढवा चौकात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा केशवनगर-मुंढवा भागातील महाविकास आघाडीतर्फे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून या परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येवून, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंढवा येथील महात्मा फुले चौकात आपापल्या पक्षाचे झेंडे घेवून केंद्रसरकारच्या धोरणाविरोधात घोषणा देत आंदोलन केले. महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. त्याला केशवनगर-मुंढवा परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला.
पुणे- वाढते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुणे महानगरपालिका ने इलेक्ट्रॉनिक बाईक्स ला मान्यता दिली आहे. या शिवाय मिळकत कर वसुली साठी, कोविड च्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून अभय योजने ला मुदत वाढ देण्यात आली आहे. हि योजना प्रजासत्ताकदिना पर्यंत राबविण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती देताना रासणे पुढे म्हणाले की, प्रायोगिक 6 ते 12 महिने तत्वावर ही योजना राबविली जाणार आहे. यासाठी 3-5 हजार दुचाकी इलेक्ट्रॉनिक बाईक उपलब्ध असणार आहे. या सर्व बाईक कंपनी उपलब्ध करणार असून तिची निगा कंपनी द्वारे राखली जाईल. या मध्ये मनपा ची गुंतवणूक शून्य असुन मनपा ला 2% रेव्हेन्यू मिळनार आहे. यासाठी 500 ठिकाणी सर्वे करण्यात आला आहे. या बाईक साठी साधारण प्रती किमी 4 रुपये आकारले जाणार आहेत.
शहर सुधारणा समितीचे तत्कालीन अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेतून विट्रो मोटर्स प्रा. लि. या कंपनीने मांडला होता. प्रकल्पासाठी सर्व गुंतवणुक विट्रो मोटर्स प्रा.लि. कंपनी करणार असुन पुणे महानगरपालिकेची शुन्य अर्थिक गुंतवणुक असणार आहे.
त्याच बरोबर मनपा द्वारे 50-60 सीएनजी मिनी बस खरेदी करुन पीएमपीएल मध्ये सहभागी केली जाणार आहे. यातून रेव्हेन्यू वाढीस मदत होईल.
रासणे पुढे म्हणाले कि, अभय योजनेला दिलेली मुदत वाढ 10 ते 31 डिसेंबर पर्यंत दंड भरण्यासाठी 75% सवलत तथा 1 ते 26 जानेवारी पर्यंत दंड भरण्यासाठी 70% सवलत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ आता पर्यंत 1 लाख 14 हजार लोकांनी घेतला आहे. या योजने पासून अजून 4 लाख 52 हजार लोक प्रलंबित आहेत.
ही योजना ऑक्टोबर मधे राबविण्यात आली होती. या योजने मधून पालिकेला 354 कोटी चा महसूल भेटला. या योजनेला पुन्हा मुदत वाढ दिल्याने मनपा चे महसूल उत्पन्न वाढीस मदत होईल. तरी पुण्यातील सर्व नागरिकांनी या संधी चा लाभ घ्यावा असे आवाहन करताना रासणे म्हणाले की अन्यथा कडक कारवाई केली जाईल.
पुणे विभागातील 5 लाख 14 हजार 519 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 5 लाख 43 हजार 484 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव पुणे, दि. 8 :- पुणे विभागातील 5 लाख 14 हजार 519 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 43 हजार 484 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 783 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 182 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.67 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. पुणे जिल्हा पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 48 हजार 295 रुग्णांपैकी 3 लाख 29 हजार 148 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 731 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.50 टक्के आहे. सातारा जिल्हा सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 52 हजार 63 रुग्णांपैकी 49 हजार 809 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 510 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 879 रुग्णांपैकी 43 हजार 325 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 924 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 630 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हा सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 61 रुग्णांपैकी 44 हजार 989 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 367 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 705 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 186 रुग्णांपैकी 47 हजार 248 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 251 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 761 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 480, सातारा जिल्ह्यात 116, सोलापूर जिल्ह्यात 100, सांगली जिल्ह्यात 39 तर कोल्हापूर जिल्ह्यात 26 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण – पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 98 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयात 660, सातारा जिल्हयामध्ये 230, सोलापूर जिल्हयामध्ये 128, सांगली जिल्हयामध्ये 45 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 35 रुग्णांचा समावेश आहे. पुणे विभागातील सर्व्हेक्षण आजपर्यत विभागामध्ये एकुण 29 लाख 73 हजार 999 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 43 हजार 484 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 7 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
पुणे,दि.8: परंपरागत व्यवसाय प्रशिक्षणात सुधारणा करुन उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही गृह (ग्रामीण), कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध या संस्थेला राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट देऊन येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच विभागाच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे विभागाचे सहसंचालक अनिल गावित, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे उपायुक्त शरद आंगणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध चे प्राचार्य प्रकाश सायगावकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी.आर.शिंपले, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी(सातारा)सचिन धुमाळ, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त (सातारा) सचिन जाधव, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार आदी उपस्थित होते.
उद्योग आस्थापनांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोबरच औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना देऊन राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, तरुणांना लवकरात लवकर रोजगार मिळवून देण्यासाठी शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी नवनवीन अभ्यासक्रम व प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीतून व्यवसाय निहाय अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे उपलब्ध होण्यासाठी संस्था स्तरावर प्रयत्न करावेत, असे सांगून इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, सीएनसी लॅब, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स अशा प्रगत अभ्यासक्रमांच्या कार्यशाळा पुण्यातील औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत असल्याबद्दल राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अशा अभ्यासक्रमांचे शिक्षण व प्रशिक्षणाचा उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या नामांकित कंपन्यांच्या कार्यशाळांना राज्यमंत्री देसाई यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. परंपरागत व अत्याधुनिक अभ्यासक्रमाच्या कार्यशाळांना भेट देऊन पाहणी केली.
सहसंचालक अनिल गावीत यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत सादरीकरण केले.
संस्थेचे प्राचार्य प्रकाश सायगावकर यांनी संस्थेमधून देण्यात येत असलेल्या विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली.
पुणे, दि. 8 : ‘सर्वांसाठी घरे-2020’ हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केला आहे. ‘सर्वांसाठी घरे -2020’ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन अभियान अधिक गतिमान व गुणवत्तापुर्ण करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ अनिल रामोड यांनी दिल्या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या १०० दिवसाच्या कालावधीत विभागात राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी तसेच अपेक्षित उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त डॉ अनिल रामोड यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण गृहनिर्माण राज्य व्यवस्थापन कक्षाचे उपसंचालक निलेश काळे, सहसंचालक संतोष भाड विकास उपायुक्त राजाराम झेंडे, आस्थापना आयुक्त पाटील, विकास सहायक आयुक्त डॉ सिमा जगताप, सातारा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यासोबतच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ रामोड म्हणाले, ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कार्यास अधिक गतिमान करण्याबरोबरच आदर्श घरकुल निर्मितीवर भर द्यावा. समाजातील सर्व घटक यामध्ये पंचायत राज, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, खासगी संस्था, तंत्र शिक्षण संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ इत्यादीचा सक्रीय सहभाग वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्यक असून लाभार्थ्यांसाठी विविध योजनांचा कृतीसंगम घडवून आणावा, जनजागृतीद्वारे लोकचळवळ उभी करावी तसेच जिल्हाधिकारी यांनी बॅकाशी समन्वय साधून लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची तातडीने कार्यवाही करुन अभियान यशस्वीरित्या पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच अभियान राबवित असतांना कोरोनाच्या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे असेही अतिरिक्त आयुक्त डॉ. रामोड यांनी यावेळी सांगितले. अभियानाअंतर्गत गरजू व पात्र भूमीहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करणे. प्रलंबित घरकुले पूर्ण करणे. घरकुलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कुशल गवंडी तयार करणे. घरकुलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना मार्गदर्शक ठरण्यासाठी विभागात पंचायत समितीनिहाय डेमो हॉऊसेस उभारणी करणे. घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्यांचे 100 टक्के वितरण करणे. घरकुलांच्या उद्दिष्टानुसार 100 टक्के घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे. सर्व घरकुलधारकांना भौतिक प्रगतीनुसार सर्व हप्ते प्रदान करुन घरकुले आर्थिकदृष्ट्या पूर्ण करणे. कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांचे आधार सिडींग तसेच जॉब कार्ड मॅपिंग 100 टक्के पूर्ण करणे यासह राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. प्रारंभी विकास उपायुक्त श्री झेंडे यांनी विभागात राबविण्यात येणाऱ्या ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ याबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. यावेळी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
पुणे दि.8 ( प्रतिनिधी ) : मालवाहतूक व विस्तारीकरणाच्या योजनेसाठी लोहगाव विमानतळावरील हवाई दलाच्या ताब्यातील अडीच एकर जागा विमानतळ प्राधिकरणाकडे सुपूर्त करण्यास आज संरक्षण मंत्रालयाने तत्वश: मान्यता दिली. खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत नवीदिल्ली येथे झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार या बैठकीस उपस्थित होते .या निर्णयामुळे लोहगाव विमानतळावरील मालवाहतूकीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल असे मानले जाते. खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांना आज या बैठकीची माहिती दिली.ते म्हणाले की लोहगाव विमानतळावर कार्गोसेंटर नाही.त्यासाठी जागाही नाही. आपल्याला हवाई दलाच्या व प्राधिकरणाच्या अपु-या जागेवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे मालवाहतूकीवर आपोआप मर्यादा येतात. चंदिगढ येथील एका ईमारतीच्या बदल्यात लोहगाव विमानतळावरील अडीच एकर जागा विमातळ प्राधिकरणास देण्यास आज हवाईदलाने या चर्चे दरम्यान हिरवा कंदील दाखविला.चंदिगढ येथील जागा पडून आहे. ती मिळावी. अशी विचारणा हवाई दलाने केली. कारण लडाख लेह या परिसरात जवानांची नेआण करण्यासाठी. त्यांची उतरण्याची सोय करण्यासाठी ही जागा त्यांना उपयुक्त आहे. अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्त्वतः मान्यता देण्यात आली. बापट पुढे म्हणाले की कोरोनाच्या लसीची पुण्यात सिरम इंस्टिट्यूट मार्फत मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आहे. ही लस देशभरात तसेच परदेशात जलदगतीने पाठविण्यासाठी लोहगाव विमानतळावर खास सुविधा निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी हवाई दलाच्या अडीच एकर जागेची तातडीने गरज असल्याच्या मुद्यावर मी भर दिला. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव प्रदीपसिंह खरोळा यांना आज मी एक निवेदन दिले. भारतीय वायुसेनेच्या अडीच एकर जागेवर बांधकाम करण्यास तातडीने परवानगी द्यावी. अशी विनंती या पत्राद्वारे मी संरक्षण मंत्रालयाला केली आहे. त्या ठिकाणच्या नियोजित टर्मिनलचे बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वास जावे .यासाठी ही परवानगी आवश्यक आहे .याकडे लक्ष वेधून एस्टिमेट कमिटीच्या मागील बैठकीत हा विषय चर्चेत आला होता .त्यावेळी अडीच एकर जागेवरील बांधकामाची परवानगी देण्याबाबत आपण आश्वासन दिले होते आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या विषयावर तोडगा काढण्याचे मान्य केले होते. असे या निवेदनात मी म्हटले आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून निर्माण होणाऱ्या लसीच्या वितरणासाठी विमानतळावरील सुविधा वाढविणे आवश्यक आहे. हे ही मी संरक्षण मंत्रालयाच्या आज निदर्शनास आणून दिले .
पुणे- आज भारत बंद’ आंदोलनाच्या दिवशी पुण्यात पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये बिबेवाडी,सहकारनगर, लक्ष्मीनगर,शिवदर्शन, पर्वती दर्शन, मित्र मंडळ,सारस बाग, टिळक रोड अलका टॉकीज चौकापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून पाठिंब्यासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली.त्यानंतर अलका टॉकीज चौकात होणाऱ्या निदर्शन सभेमध्ये आज पर्वती विधानसभा राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले.
दुचाकी रॅली दरम्यान “शेतकरी विरोधी कायदा रद्द करा.. रद्द करा..” तसेच जय जवान जय किसान व “हल्लाबोल हल्लाबोल” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.देशभरातील शेकडो संघटना आणि 22 पक्षांचा बंदला पाठिंबा असताना पर्वती मतदार संघात सुद्धा या दुचाकीरॅलीमुळे बंद पाळण्यात आल्याचे दिसून आले. पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष नितीनभैया कदम दिलीप अरूंदेकर,अश्विनी कदम, प्रिया गदादे, महेश शिंदे, शिवाजी भाऊ गदादे पाटील,मृलाणिनी वाणी,श्वेता होनराव-कामठे, आनंद बाफना, वैजनाथ वाघमारे, संतोष पिसाळ, अमोल ननावरे, समीर पवार, प्रशांत कुदळे, उषाताई घोगरे, प्रशांत कदम, रूपाली कदम, श्रीकांत मेमाने, प्रशांत शिरसागर प्रमोद संचेती, बलवंत शिवशरण संजय दामोदरे, तुषार नांदे, अमोल ननावरे,संग्राम होनराव,संग्राम वाडकर, सचिन जमदाडे, दत्तात्रय चव्हाण, गौरव कापरे,आशुतोष बोडके,रोहित कांबळे,वैभव डोळस, गणेश दामोदरे, गणेश हनवते, साईनाथ ढावरे, सिद्धार्थ बनकर प्रदीप शिवशरण,प्रशांत किर्तै,सुशील कचरे,प्रदीप शिवशरण,महेश पवार,अमोल साळुंखे, सुमित थोपटे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते..
मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद, नागपूर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून आणि पुणे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या ५ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी विधानभवनात झाला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या पाच नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अभिजित वंजारी (काँग्रेस), पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस), पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले जयंत आसगांवकर (काँग्रेस) आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले किरण सरनाईक (अपक्ष) यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली.
विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित या शपथविधी कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रीमंडळातील विविध विभागांचे मंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित होते.
पुणे – शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी पुकारलेल्या बंदमध्ये आधार सेवा केंद्राचे कार्यकर्ते सहभागी झाले. निदर्शने, मोर्चा असा मार्ग न हाताळता त्यांनी शिवदर्शन भागात गांधीमार्गाने आंदोलन केले.
आधार सेवा केंद्राचे अध्यक्ष हेमंत बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवदर्शन परिसरातील दुकानदार आणि व्यावसायिकांना गुलाबाचे फूल देवून बंदमध्ये सहभागी व्हावे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती केली. सर्व दुकानदारांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद दिला आणि दुकाने बंद ठेवली. गांधीमार्गाने झालेल्या आंदोलनात हेमंत बागुल, अशोक शिंदे,महेश ढवळे, योगेश निकाळजे, निखिल सोनावणे, राहुल जाधव, कुमार खटावकर, सुयोग धाडवे, इर्शाद शेख, सचिन पवार, प्रज्ञावंत जाधव,रोहित शिंदे, विशाल लोणारे, राम रणपिसे,आकाश खटावकर,दिनेश पवार,आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राळेगणसिद्धी- दिल्लीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून आंदोलन सुरू असलेल्या या आंदोलनाला अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. अण्णांनी राळेगणमधील पद्मावती परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसून एक दिवसीय उपोषणाला बसले आहेत. केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावे अशा मागणीही अण्णांनी केली. अण्णा म्हणाले की, हे आंदोलन संपूर्ण देशात पसरले पाहिजे, जेणेकरून नवीन कृषी कायदे रद्द करण्यास सरकारला भाग पाडले जाऊ शकते.
अण्णा हजारे म्हणाले की, केंद्र सरकारने यापूर्वीही ही दोन वेळेस लेखी आश्वासन दिले असतानाही ते पाळलेले नाहीत. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी यावेळी केला. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने शेतकर्यांचे प्रश्न सुटले नाही, तर माझ्या आयुष्यातील शेवटचे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीमध्ये करेल, असा इशाराही अण्णांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे.अण्णा हजारे म्हणाले की, शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार लाभ दिला पाहिजे. पण सरकारने आतापर्यंत केवळ आश्वासन दिले आहे. या मागण्या पूर्ण केल्या नाहीत असा आरोपही अण्णा हजारेंनी केला.
पुणे- भारत बंद च्या आजच्या दिवशी पोलिसांनी आंदोलकांनी आणलेला कामगाराचा पुतळा , शेतकऱ्यांच्या नांगराचे फाळ अशा प्रतीकृती आणल्या होत्या पण यातील कामगाराचापुताला पीएम नरेंद्र मोदी यांचाच आहे असे वाटल्याने पुण्याच्या पोलिसांनी तो जप्त करून गाडीत घालून ताब्यात घेतला यावरून आंदोलनासमयी पोलीस आणि आंदोलकांत थोडा तणाव निर्माण झाला होता. कामगारहितासाठी कामगार आणि शेतकऱ्याच्या प्रतिक म्हणून हे आंदोलनात शोभा वाढविण्यासाठी आणले गेले आहे असा दावा आंदोलकांचा होता, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी यावेळी मोबाईल वरून संपर्क साधला मात्र पोलिसांना तो पीएम मोदी यांचाच पुतळा भासल्याने त्यांनी जप्त केलेला पुतळा सोडला नाही . पोलीस यावर तणाव असल्याने काही बोलायला तयार नव्हते . कामगार नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर यांनी यावेळी शेतकरी बड्या व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधण्याचा डाव असल्याचा आरोप केला तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी थेट फत्तेचंद रांका यांचे नाव घेत … त्यांना आणि पुण्यातील ठराविक व्यापाऱ्यांना शेतकरी राजाचे महत्व सांगत सणसणीत इशारा देऊनच आपल्या भाषणाचा समारोप केला .. पहा व्हिडीओ झलक
पुणे – दहाव्या पुणे लघुपट महोत्सवात आशुतोष जरे दिग्दर्शित ‘कावळा उड’ लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर ‘सायलेंट टाईज’ लघुपटासाठी सई देवधर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. मराठी चित्रपट परिवारतर्पेâ आयेजित महोत्सवाचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ समीक्षक दिलीप कुकडे आणि ज्येष्ठ कॅमेरामन राम झोंड यांच्या हस्ते झाले. ‘मिश्टी दोई’ लघुपटासाठी शिबु साबळे यांना दिग्दर्शनाचे दुसरे पारितोषिक मिळाले तर ‘सायलेंट टाईज’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचे दुसरे पारितोषिक मिळाले. ‘अ सायलेंट व्हर्बल’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट संकलन सह सर्वोत्कृष्ट स्टुडंट लघुपटाचे पारितोषिक पटकाविले. सर्वोत्कृष्ट जाहीरातीचे पारितोषिक ‘युएसएलपी शॉवर’ लघुपटाला मिळाले तर ‘ह्ू इज द विमेन्स डे फॉर’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाचे पारिातोषिक पटकाविले. केरळमधील ‘मारवैरी’ लघुपटाला सर्वोत्कृष्ट सांगितिक लघुपटाचे पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारिताषिक शरद जाधव यांनी ‘एक एमआर कि मौत’ या लघुपटातील अभिनयासाठी पटकाविले तर वीणा जामकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ‘कावळा उड’ साठी पारितोषिक मिळाले. ‘कुंभिल शिवा’ या लघुपटाने सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि पटकथचे पारितोषिक मिळाविले. ‘गर्ल’ लघुपटाने सर्वोत्कृष्ट संंकल्पनेचे पारितोषिक मिळाविले तर दुर्गा आजगांवकर यांच्या ‘दि ईटरनल फ्लो’ लघुपटाने बेस्ट नॅरेटिव्ह लघुपटाचे पारितोषिक मिळाविले. ज्येष्ठ निर्मात्या मार्था बेकर, सारथी निरंजन आणि मायकेल सिव्हेला यांनी परिक्षण केले.
पुणे-आज संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘शेतकरी विरोधी काळे कृषी विधेयक कायदे रद्द करावे व दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरील दडपशाही थांबवावी या मागणीसाठी पाषण रुद्रणी दगड रूपी केंद्र सरकार विरोधात ‘धरणे आंदोलन’ करण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी देशमुख यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, शेतीमाल विक्री कायदा 2020 बऱ्याच कालावधीपासुन शेतकरी त्यांच्या मालाला आधारभुत किंमत मिळावी म्हणून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करा म्हणत असताना शेतीमाल विक्री कायदा लागु करून कृषी उत्पन्न बाजार समीतीचे खच्चीकरण करूण भांडवलशाही व्यवस्था निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे तो थांबविण्यात यावा व शेतकरी विरोधी शेतीमाल विक्री कायदा 2020, कंत्राटी शेती कायदा 2020, अत्यावश्यक वस्तु कायदा हे कायदे रद्द करावे, स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरील दडपशाही तात्काळ थांबवावी, दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, दिल्लीतील आंदोलन शेतकर्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजेत व आगामी काळात प्रस्तावित असलेले शेतकरी विजबिल विधेयक पुढे रेटणे थांबवावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, तेजस्विनी पवार, सागर पोमन, निलेश ढगे, मारुती काळे, जोतिबा नरवडे, महेंद्र जाधव, सुमेध गायकवाड, राजेश गुंड, दिनकर केदारी, बाळू थोपटे, शिवाजी पवार, सोनू शेलार, जयदिप रणदिवे, सुनील वाडेकर, साजिद सय्यद इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१) दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा. २) केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधी कायदा रद्द करा. ३) शेतीमालाला हमीभाव जाहीर करावा. ३) ‘भारत बंद’ ला संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा.
एस.जी.एम फिल्म्स प्रदर्शित मैत्री आणि प्रेम या दोन एक सारख्यच तरीही वेगळ्या नात्यांची सांगड घालणारा ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले. या पोस्टरमधून चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्रींचे नाव उघड करण्यात आले आहे. या सिनेमात नायिकेच्या भूमिकेत अपूर्वा एस. दिसणार असून, सोबतच अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) ही हिट जोडी देखील महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.
अपूर्वाने ‘यंटम’ या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला होता. ‘फ्री हिट दणका’ सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अपूर्वा मोठा पडदा गाजवायला सज्ज आहे. मैत्री आणि प्रेम यातली गंमत उलगडणारी तीन पात्र आपल्या समोर आली असली तरी चौथे पात्र म्हणजेच चित्रपटाचा मुख्य अभिनेता कोण असणार आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा सुनिल मगरे यांनी केले असून चित्रपटाचे निर्माते अतुल रामचंद्र तरडे आणि आकाश बापू ठोंबरे, उमेश नारके, प्रसाद शेट्टी आणि सुनिल मगरे हे आहेत. सहनिर्माता म्हणून सुधाकर लोखंडे आणि नितीन बापू खरात यांनी काम पाहिले आहे. संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवाद आणि गीतलेखन केले आहे. सिनेमाला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटाचे छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे आहे.