Home Blog Page 2361

महाराष्ट्र राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त का होतात याचे कारण काय?अण्णा हजारेंचा सवाल

0

महाराष्ट्रामध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार चार कृषी विद्यापीठ आहेत. या विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञ त्या त्या भागातील शेतकऱ्यांच्या पिक उत्पादनावर झालेला खर्च उदा. नांगरट, पाळी, पेरणी, बियाणे, खते, पाणी, पिकांची काढणी, पिक तयार करून बाजारात नेईपर्यंत एकरी किती खर्च येतो (लागत मूल्य) याचा हिशोब काढतात आणि प्रत्येक पिकावर शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागती पासून पिक तयार करे पर्यंत एक क्विंटलला किती कर्च आला याचा हिशेब राज्य कृषीमूल्य आयोगाकडून ही माहिती केंद्रीय कृषीमूल्य आयोगाकडे पाठवतात.

            स्वामीनाथन आयोगाने भारत सरकारला शेतकऱ्यांच्या शेती मालाला उत्पन्नावर झालेल्या खर्चाच्या 50 टक्के वाढवून C2+50 द्यावा अशी शिफारस केलेली असून भारत सरकार ने तो स्वामीनाथन आयोगाचा अहवाल स्विकारला आहे. ज्या अर्थी स्वामीनाथन आयोगाचा अहवाल केंद्र सरकारने स्विकारला आहे त्या अर्थी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. C2+50 % शिफारस मान्य केली आहे. भारत सरकार जनतेला वेळोवेळी सांगत आहे की, आम्ही स्वामीनाथन आयोगाचा अहवाल स्विकारला असून C2+50 % म्हणजे शेतकऱ्यांना येणाऱ्या खर्चाच्या दिडपट भाव देण्याचा निर्णय घेऊन 2018 च्या खरीप हंगामा पासून त्याप्रमाणे दीड पटीने भाव देण्यास सुरूवात केली आहे.

            शेतकऱ्यांच्या शेती मालाला खर्चावर आधारीत भाव अधिक 50 टक्के वाढवून मिळावा यासाठी 23 मार्च 2018 ला दिल्लीच्या रामलिला मैदानावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झालेल्या आमच्या उपोषणामध्ये प्रधानमंत्री कार्यालयाने मला लेखी आश्वासन दिले आहे की शेतकऱ्यांच्या पिकावर झालेल्या खर्चाच्या दीडपट मुल्य देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे आश्वासन पत्र घेऊन केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीच्या रामलिला मैदानावर उपोषण स्थळावर 29 मार्च 2018 रोजी येऊन लेखी आश्वासन दिले. 29 मार्च 2018 रोजी दिल्लीच्या रामलिला मैदानावर दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे मी राळेगणसिद्धी येथे 30 जानेवारी 2019 रोजी स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी म्हणून पुन्हा उपोषण सुरू केले. उपोषणाच्या सात दिवसानंतर राळेगणसिद्धी च्या उपोषणामध्ये मला केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 फेब्रुवारी 2019 रोजी पुन्हा लेखी आश्वासन दिले आहे. आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे C2+50 % भाव देण्यास सुरूवात केली आहे. असे मला सांगण्यात आले.

            सोबतचा केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने शेतकऱ्यांना दिलेल्या शेतीमालाचा भावाचा तक्ता जोडला आहे. तो पहावा. त्यावरून दिसून येईल की स्वामीनाथन आयोगाच्या अहवाला प्रमाणे झालेल्या खर्चावर 50 टक्के अधिक द्यायला हवा. पण तसे न होता उलट राज्य कृषीमुल्य आयोगाने केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला पाठविलेल्या अहवालामध्ये केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने मोठ्या प्रमाणावर काटछाट केलेली आहे. एका बाजुला आम्ही C2+50% भाव देण्यास सुरूवात केली असे केंद्र सरकार म्हणते तर दुसऱ्या बाजुला शेतकऱ्यांनी पिक उत्पन्नावर केलेला खर्च सुद्धा दिला जात नाही. उलट केंद्र सरकार त्यामध्ये काटछाट करते. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो.

            विदर्भ, मराठवाड्यामध्ये कापूस, सोयाबीन, तांदूळ (पॅडी) ज्वारी, बाजरी, ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आपल्या माहीतीसाठी राज्य कृषिमुल्य आयोगाने शेतकऱ्यांना पिक उत्पन्नावर केलेला खर्च आणि केंद्र सरकारने दिलेले भाव आहे. सोबतचा तक्ता पहा. 2019-20 मध्ये पिवळा सोयाबिन राज्याने केंद्राला शिफारस केलेली रक्कम प्रति क्विंटल रुपये 5755/- मिळावी अशी शिफारस केली होती. त्यावर 50 टक्के किंमत वाढवून देणे आवश्यक आहे. पण 50 टक्के वाढवून न देता 5755/- रुपये ऐवजी 3710/- रुपये एवढीच आधारभूत किंमत दिली. म्हणजे प्रति क्विंटल 2045/- रुपये कमी केले आहेत. 2020-21 मध्ये राज्याने शिफारस केलेली किंमत 6070/- रुपये होती त्यात 50 टक्के वाढवून देण्याऐवजी 3880/- रुपयेच दिले म्हणजे 3190/- रुपयांनी कमी दिले आहे.

            कपास 7485/- रुपये भाव राज्याने शिफारस केली पण केंद्राने 4160/- रुपयेच दिले. तांदुळ 2016-17 मध्ये 3053/- रुपये शिफारस केली होती. त्यात 50 टक्के वाढवून देणे आवश्यक होते पण फक्त 1330/- रुपयेच दिले. म्हणजे 1723/- रुपयांनी कमी दिले. याप्रमाणे राज्य कृषीमूल्य आयोगाकडून केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला खर्चावर आधारीत जे भाव पाठविले जातात त्यात 50 टक्के वाढवून देण्याऐवजी केंद्रीय कृषीमूल्य आयोगाकडून प्रत्येक पिकामध्ये काटछाट होते. शेतकऱ्यांना झालेला खर्च सुद्धा मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. केंद्रीय कृषीमूल्य आयोग हा केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या नियंत्रणात असल्याने ही काटछाट होते. त्यासाठी केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता देणे आवश्यक आहे. संवैधानिक दर्जा मिळाला तरच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळू शकेल.

            केंद्र सरकार आम्हा जनतेला सांगत आहे की, स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाप्रमाणे शेतकऱ्यांचा झालेला खर्च आम्ही किमान आधारभूत किंमत (MSP) अधिक 50 टक्के वाढवून शेतकऱ्यांना देतो. पण प्रत्यक्षात ते मिळत नाहीत याउलट काटछाट होते. म्हणून विदर्भ, मराठवाड्यात आत्महत्या जास्त होतात. भाजीपाला, फळे, फुले, दुध यांचा MSP अद्याप ठरविलेलाच नाही. त्यामुळे आज विदर्भातील संत्र्याची काय अवस्था आहे? संत्र्याला शेतकऱ्यांनी उत्पन्नावर केलेल्या खर्चावर 50% वाढवून मिळायला हवा मात्र आज केलेला खर्च ही मिळत नाही. दुधाला MSP दिला जात नाही. म्हणून शेतकरी दुध रस्त्यावर ओततो आहे. भाजीपाल्याला MSP नसल्यामुळे टोमॅटो, बटाटा, कांदे रस्त्यावर फेकतो आहे. खर्चावर आधारीत 50 टक्के वाढवून तर मिळत नाहीच उलट 40 ते 50 टक्के पर्यंत कपात केली जाते. म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आत्महत्या होतात.

            शेतकऱ्यांच्या वरील मागण्यांसाठी 23 मार्च 2018 मध्ये आम्ही दिल्लीच्या रामलिला मैदानावर उपोषण झाले. 29 मार्च 2018 मध्ये पंतप्रधान कार्यालयाने लेखी आश्वासन देऊन ही पाळले नाही. म्हणून 30 जानेवारी 2019 रोजी रालेगणसिद्धी मध्ये उपोषण केले. केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धी मध्ये आले. सहा तास चर्चा होऊन पुन्हा लेखी आश्वासन देण्यात आले आणि पाळले नाही म्हणून मी आता पुन्हा दिल्लीच्या रामलिला मैदानावर जानेवारी 2021 मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझे आंदोलन कोणत्याही पक्ष-पार्टी, व्यक्तीच्या विरोधात नसते. 25 वर्षाच्या वयात मी व्रत घेतले आहे की, जगायचे ते फक्त जनसेवेसाठी आणि मरायचे ते ही जनसेवा करता करताच. धन, दौलत, सत्ता, पैसा कोणतीही अभिलाषा न बाळगता फक्त जन सेवेसाठीच आंदोलन असते. कुठेही बँक बॅलन्स ठेवलेले नाही. फक्त झोपण्याचे एक बिस्तर व जेवणाचे एक ताट यापेक्षा जास्त काही ठेवलेले नाही.  मागील 1980 ते 2020 या चाळीस वर्षात 20 उपोषणे झाली. त्यामुळे माहितीचा अधिकार सारखे दहा जनहिताचे कायदे झाले.

            सोबत राज्य कृषिमूल्य आयोगाने शेतकऱ्यांना खर्चावर आधारीत भाव किती मिळावा ही शिफारस केली असून त्या शिफारशी मध्ये केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने किती काटछाट केली याची माहिती दर्शविणारा तक्ता जोडला आहे. यावरून लक्षात येईल की विदर्भ आणि मराठवाड्या मध्ये आत्महत्या जास्त का होतात?

धन्यवाद.  

आपला,

कि. बा. तथा अण्णा हजारे

उत्‍कंठावर्धक ‘हिकमत’

0

            ‘हिकमत’ ही सुवर्णा पवार (खंडागळे) लिखीत कादंबरी वाचली. लेखिकेनं सांगितल्‍यानुसार ‘हिकमत’ या हिंदी शब्‍दाचा अर्थ ‘शहाणे’ असा होतो. जीवन जगण्‍यासाठी आवश्‍यक असणारं ‘शहाणपण’ नसेल तर त्‍या व्‍यक्‍तीच्‍या वाट्याला अनेक कठीण प्रसंग येतात. जीवन जगण्‍याला ती व्‍यक्‍ती एक प्रकारे अपयशी ठरते.  या कादंबरीतील काळ साधारण 1925 ते 1970 पर्यंतचा जाणवतो. अत्‍यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या दगडू आणि धोंडा (सरस्‍वती उर्फ सरु) या दाम्‍पत्‍याची ही कहाणी आहे. बहिष्‍कृत समाजातील असूनही शिक्षणाचं महत्‍त्‍व जाणून गावातील शाळेसाठी तसंच बारवाचा गाळ काढण्‍यासाठी दान देणारं हे जोडपं.  गावकी-भावकीमुळं निर्माण झालेला गुंता, परिस्थितीमुळं जीवनात निर्माण झालेले भोवरे, त्‍यातून मार्ग काढण्‍यासाठी चाललेली धडपड, जाती-धर्मातील बदलता कल्‍लोळ, नीती-अनितीचा संघर्ष हे सारं ‘हिकमत’ कादंबरीत लेखिकेनं आपल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण शैलीनं मांडलं आहे.

लेखिका- सुवर्णा पवार(खंडागळे),मुखपृष्‍ठ – दत्‍ता माघाडे,प्रकाशक –यशोदीप पब्लिकेशन्स,पुणे ,पृष्‍ठं- 192,किंमत-200 रुपये,(लेखिका मो. – 7977571848)

            दगडू आणि धोंडा या मुख्‍य पात्रांभोवती गुंफलेली ही कादंबरी धक्‍कादायक, उत्‍कंठावर्धक, अनपेक्षित प्रसंगांनी भरलेली आहे. वयस्‍कर दगडूशी सरुचा (धोंडा हे विवाहानंतरचं नाव) मनाविरुद्ध होणारा बालवयातील विवाह, धोंडाची बापाशी होणारी अनपेक्षित भेट, गर्भवती धोंडाला माहेरी जातांना होणारा अपघात, अपघाताचा निरोप घेवून जाणाऱ्यापारध्‍यांवर चोर समजून होणारा हल्‍ला, पांडुरंगाचा जन्‍म, धोंडा दुसऱ्यांदा गर्भवती, आवडाचा जन्‍म, धोंडाचा बाप (कोंडाचा नवरा) घरी परतणे, पांडुरंगाचं शाळेत न जाणं नंतर रात्रशाळेत शिकणं, दगडूला जीवघेणा अपघात होवून जायबंदी होणं, धोंडूच्‍या कानात गोम जावून बहिरेपण येणं, नणंद गजराला लकवा येणं, लेक आवडाचं हरवणं, कोंगाडी (केरळ) राज्‍यात जाणं, तिथून पुण्‍याच्‍या महिलाश्रमात जाणं, गांजा विकणाऱ्या हवई मावशीकडं पांडुरंग मदत मागायला जाणं, नंदू वाण्‍याची शेती करणं असे असंख्‍य प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणं एकामागून एक येतात आणि वाचकाचं चित्‍त खिळवून ठेवतात.

            धोंडाचा नवरा दगडू हा झाड, पाला, मुळ्यांचा गुणधर्म जाणणारा असतो.  धोंडाही त्‍यांच्‍याकडून ही कला शिकून घेते, ती घरकाम, शेतीकाम, गुरं-ढोरं, औषधपाणी, बाळंतपण अशा साऱ्या आघाड्यांवर हुशार असते. अत्‍यंत लाघवी बोलणं, तत्‍पर सेवा आणि प्रसन्‍न हास्‍य असणाऱ्या धोंडाची पुढं-पुढं परिस्थिती बदलत जावून तिची एकप्रकारे परीक्षाच सुरु होते. तिची मुलगी आवडा हिला पोलीस व्‍हायचं असतं, पण दुर्दैवानं तिचं स्‍वप्‍नं अपूर्ण राहतं. तिच्‍याच वयाच्‍या रतन, साखर नोकरीला लागतात. स्‍वप्‍न पूर्ण न झाल्‍यामुळं आवडा गावी परत येते. गावातील पाटलांचा जग्या (जगन्‍नाथ) आणि यमिनी यांचं प्रेम जुळतं. यमिनी अशिक्षीत असते, तिच्‍या चिठ्ठया आवडा लिहून देत असते. जग्या प्रेमाला नकार देतो, यमिनी आत्‍महत्‍या करते. पाटलाला आणि जग्‍याला अटक होते. गावात सामाजिक कलह निर्माण होतो.. एकूणच कादंबरीतील शेवट उत्‍सुकता वाढवणारा आहे.  

            छत्रपती शाहू महाराज, महात्‍मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा महाराज यांनी दिलेल्‍या समतेच्‍या संदेशाचाही अंतर्भाव कादंबरीत पहावयास मिळतो. तत्‍कालिन समाजावर या महान व्‍यक्‍तींच्‍या संस्‍काराचा असलेला प्रभाव जाणवतो. कुणाचाच बाट पाळायचा नाही, समदी एकाच देवाची लेकरं, पोरांना शाळा शिकवा ही शिकवणूकही सहजतेनं कादंबरीत येते. याशिवाय मरगा, साखर, माणिक या पात्रांच्‍या नावनिर्मिती मागची कहाणीही रंजक आहे. लेखिका सुवर्णा पवार या महिला व बालविकास विभागात अधिकारी म्‍हणून सेवारत असल्‍यानं या कादंबरीत शाळेत मुलं यावी म्‍हणून त्‍यांना गूळ-शेंगदाणे देणं (माध्‍यान्‍ह भोजन आहार), कमवा व शिका संकल्‍पना, रात्रीची शाळा, छात्रावास, निराधार महिलांसाठी असणारा महिलाश्रम या योजनांचा संदर्भ आढळून येतो.

            साहित्यिकदृष्‍ट्या या कादंबरीचं आणखी एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे भाषा. लेखिकेनं त्‍या काळाचं भान राखून बोलीभाषेचा वापर केला आहे. लेखिकेचं बालपण बार्शी परगण्‍यातच गेलेलं असल्‍यामुळं येथील जीवनपद्धतीचा, रिती-रीवाजांचा, स्‍वभावविशेषांचा त्‍यांनी जवळून अनुभव घेतला. कादंबरीतील पात्र तपशीलवार, सहानुभूतीनं रेखाटतांना लेखिकेला त्‍याचा फायदा झाला. वाचकांनाही या अनुभवाचा आविष्‍कार प्रत्‍ययास येतो. कादंबरीतील परिसर याच भागातील, त्‍यामुळं त्‍या भागातील म्‍हणी, वाक्‍प्रचार यांचा सहजतेनं वापर झालेला दिसतो. पात्रातील अनुभवांचं शब्‍दरुप घेणारी ही संपदा अनेकांना नवीन वाटू शकते. ‘गव्‍हू तवा पोळ्या’, ‘चलतीकडं भलती’, ‘शेळीनं हुटाचा मुका घेणं’, ‘खात्‍या ताटात मुतणं, ‘चुलीचं लाकूड चुलीतच गॉड दिसतंय, त्‍यानं इसीवर (वेशीवर) झेंडा लावला तर बरं दिसणार नाही’, ‘दुकणं (दुखणं) काय घर बांधून राहातंय व्‍हय?’, ‘जगण्‍याचा बी अर्थ कळला अन् मरणाचं बी मोल कळलं’, ‘म्‍हशीची शिंग म्‍हशीला जड हायेत व्‍हय?’, ‘माणूस कर्मानंच मोठा असायला हवा होता, पण दुर्दैवानं तसं घडलं नाही’, ‘दोन प्रकारची माणसं असत्‍यात, एक प्रकार सत्‍यानं वागणारी अन् दुसरी सत्‍य कळूनबी असत्‍याची कास धरणारी’, ‘बारा चौकशा’, ‘बारा कामं, ‘बारा भानगडी’, ‘सात भार’ ही वाक्‍यसंपदा या कादंबरीचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. निबारथड, नखाएवढ्या लेकराला, नवानवाळा, अगर, बैलगाड्याच्‍या चंगळ्याचा आवाज, बदामी, मेढका, घंगाळ, वसरी, ढेर, उलीसा, इराकत, कडूस, केळी, खोंगाभर, विव्‍हल, कैचान, टेपूर, खडूळीन, शिकुरी, गुरमाळत, दुकनकरणी, आभाळातलं  तिकुटणं, कोटा, गुंडा, दोरकांड, मावाची बहिण, परवरी, कनाळी, दुनी, तिनी, खुलवर, अटकळी, ढाळज, ओश्‍याट, आधन, पालव्‍या, गळवट, आस्‍तुरी, सराजम, माश्‍याच्या चिंगळ्या, गारी, डागडुग, कलागत, छकाटी, निरशा दूध, खैयदान कुकड्या, मानमरिदा, घुमाट, उभकडी, पूस, हिवाळवास, शेजंची बायको, टणक नवरी, आग लावल्यावाणी देखणी, हडदुंबा, हिलगडी, सौन्‍या, च्‍या दारी, मुरमुस्‍या, बरसान, तडुप, शिसबास दोड, आंबट ओले लाकडे, इगीन, हामसाखोमसा, सादमूद, चिंदोरी, रबाडा, टरमाळी, पडतळ, डापरली यातील अनेक शब्‍द काळाच्‍या ओघात लोप पावले आहेत किंवा त्‍यांची जागा पर्यायी शब्‍दांनी घेतली आहे.              

             मंजुळा, भिकनराव, तायमा, सुमा, सोना म्‍हतारी, गुरबा पखाले, खाटीकशकूर, अनिसाबानू, महेबूब, बाबू वाणी, बावीचा धनगर, घारीपुरीचा पाटील, हौसी, तावडगावचे वामन गुरुजी, माळी गुरुजी, पांडुरंगाची बायको पद्मिनी, केरबा, सोना अशी अनेक पात्रं कादंबरीत येतात. कादंबरीच्‍या रुपबंधाला धक्‍का न लावता  वाचकांना आशयात गुंतवून ठेवतात. चित्रकार दत्‍ता माघाडे यांनी रेखाटलेलं मुखपृष्‍ठ विषयाला साजेसं आहे. अॅड. पुरुषोत्‍तम खेडेकर यांची प्रस्‍तावना आणि ज्‍येष्‍ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांचं ब्‍लर्ब (पुस्‍तपरिचय) वाचनीय आहे.

            लेखिका सुवर्णा पवार (खंडागळे) यांनी म्‍हटल्‍याप्रमाणं ‘जातीयता जीवंत ठेवून स्‍वार्थ साधू पहाणाऱ्या समाजविघातक कृतीला आणि जातीयतेचा बागुलबुवा निर्माण करुन सवर्णांना वेठीस धरणाऱ्या बेगडी प्रवृत्‍तीला ही कादंबरी सणसणीत उत्‍तर देते’. या कादंबरीचं आणखी एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे पूर्वी गाव-खेड्यात एकमेकांच्‍या अडी-अडचणींना लोकं धावून जायचे, ‘इर्जिक’ हे त्‍याचंच एक उदाहरण. या कादंबरीतही दगडूच्‍या आपत्‍कालिन परिस्थितीत अनेक लोकं मदतीला आलेले दिसून येतात. पूर्वीची ती परंपरा, प्रथा आता लोप पावली आहे. गावातील लोकं संकटकाळी एकमेकांच्‍या मदतीसाठी पुढं आले पाहिजेत. असं झालं तर नैसर्गिक संकटाला घाबरुन कोणताही शेतकरी आत्‍महत्‍येसारखा निर्णय घेणार नाही, अशी आशा लेखिका व्‍यक्‍त करतात.  या कादंबरीतून आत्‍महत्‍येसारखं कठोर पाऊल उचलून आपल्‍या कुटुंबाला निराधार करु पाहणाऱ्या शेतकऱ्याला सकारात्‍मक विचार करण्‍याची नक्‍कीच प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे. ‘हिकमत’ ही कादंबरी कथात्‍म गद्याचं दीर्घ रुप घेवून आलेली आहे. यातील घटना, वातावरण, व्‍यक्‍ती आणि तत्‍कालिन जीवनाच्‍या आर्थिक, सामाजिक, सांस्‍कृतिक, राजकीय चढ-उतारांचं स्‍वरुप दाखवण्‍यात यशस्‍वी झाली आहे.

राजेंद्र सरग

9423245456

आमची सत्ता आली तर पहिल्यांदा औरंगाबादचे संभाजीनगर करू – आ. चंद्रकांतदादा पाटील (व्हिडीओ )

0

पुणे-  औरंगाबाद महानगरपालिकेत सत्ता आली तर पहिल्याच दिवशी औरंगाबादचे नामकरण संभाजी नगर असे करू असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे म्हटले आहे. या शिवाय नाल्यांच्या संरक्षक भिंती बांधण्याच्या कामासाठी राज्य सरकारकडून १०० ते १२५ कोटीचा निधी मिळावा म्हणून सरकारला पत्र पाठविण्यास देखील आ. पाटील यांनी प्रशासनास सांगितले आहे.

चंद्रकांत पाटील पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी सभागृहनेते गणेश बिडकर ,नगरसेवक दीपक पोटे, तसेच संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

ते म्हणाले,’ आज आम्ही शहराच्या विविध विकासाच्या कामांच्या मुद्द्यांवर बैठक घेतली .प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळविण्यासाठी संदीप खर्डेकर यांनी वारंवार प्रशासनाशी बैठका आयोजित केल्या .आता विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका आता घेणार आहोत .ज्यात प्रशासनाचा सहभाग असेल .२४ बाय ७ योजनेतील ८४ टाक्या  डिसेंबर २१ पर्यंत  पूर्ण होऊन काही साध्य होणार नाही जोपर्यंत पाण्याच्या वितरणाच्या नलिका ,आणि ट्रांसमिशन लाईन्स  पूर्ण होत नाहीत . त्यामुळे असे ठरविले कि 1 विभाग आपण असा पूर्ण करू , ज्याच्या डिसेंबर अखेर पर्यंत टाक्या आणि नलिका सर्व पूर्ण करून व्यवस्था सुरु करू ज्यामुळे शहरात एक चांगला मेसेज जाईल . दरवर्षी पाऊस झाला की नाल्यांचे पाणी शहरात घुसते. त्यासाठी भिंती बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी ३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. खासगी सोसायट्यांच्या भिंती पालिकेच्या खर्चातून बांधणे शक्य नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. पालिकेच्या भिंती वगळून सोसायट्यांच्या भिंतींबाबत प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवावा. त्याचा पाठपुरावा केला जाईल. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र पावसाळ्यापूर्वी महापालिका नाल्यातील गाळ काढून टाकेल. सरकारने तातडीने १०० ते १२५ कोटीचा निधी दिल्यास सर्व सरसकट नाल्याच्या संरक्षक भिंती उभारण्याचे काम हातही घेता येईल .

अपुरे राहिलेल्या  डीपी रस्त्यांचे रुंदीकरण करताना लोकांना ज्यांना टीडीआर नको असतो त्याना कॉम्पेन्सेशन बॉंड देण्यात यावेत या दृष्टीने हे बॉंड लवकरात लवकर आणणार असेही ते म्हणाले.  

पाटील म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यास शिवसेनेने भूमिका घ्यावी. याविषयात राजकारण करू नये. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादची नावे बदलली जाणे हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. औरंगजेब हा कोणाचा पूर्वज आहे का? मुंबईत बसविण्यात आलेले आक्रमकांचे पुतळे हटविण्यात आलेले आहेत. तसेच ज्यांनी देशावर राज्य केले, जुलूम केले त्यांची नावे का मिरवायची ? औरंगजेबाचे नाव मिरवायचे ज्यांना इच्छा असेल त्यांनी ते मिरवावे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर हे नामकरण करावे याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. .

औरंगाबादचे नामकरण हा श्रद्धेचा विषय आहे, संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य असून हा राजकारणाचा विषय नाही, असेही ते यावेळी म्हणाले. औरंगाबाद महानगरपालिकेने नामकरणासाठी नवा प्रस्ताव द्यावा लगणार आहे. महापालिका आमच्या हातात द्या पहिल्याच दिवशी नामांतर करून देतो, असे म्हणत एक आश्वासनच चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

रश्मी ठाकरेंना पत्र: “माझ्यासाठी विषय संपला” 

“माझ्या दृष्टीने विषय संपला आहे. मी फक्त वहिनींना तुम्ही सुसंस्कृत महिला संपादक असताना ही भाषा तुमच्या नावाला चिकटतेय. असं म्हणून शेवटी असं म्हटलं होतं की, पण तुम्हाला जर ती भाषा चालणार असेल, तर शुभेच्छा. आता काय चाललंय हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे,” असं पाटील यांनी म्हटले आहे.

नमो ‘स’ हॅंड हे औजार सर्व स्वच्छता सेवकांना उपलब्ध केले जावेत – आ.चंद्रकांतदादा पाटील.

0

पुणे-स्वच्छता सेवकांना काम करताना अनेक अडचणी येतात,अनेकदा रस्त्यावरील घाण साफ करताना त्यांना ती हाताने किंवा पुठ्ठा वा अन्य तत्सम गोष्टींचा वापर करुन गोळा करावी लागते.मात्र सुधीर बर्वे यांनी यावर उपाय म्हणून निर्मिती केलेल्या Namo’s hand या औजाराचा सर्व स्वच्छता सेवकांनी वापर करावा व हे औजार त्यांना उपलब्ध करुन दिले जावे यासाठी आपण प्रयत्न करु असे भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.कोथरूडला आयोजित एका कार्यक्रमात क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी हे औजार चंद्रकांतदादांना भेट दिले त्यावेळी दादांनी हे मत व्यक्त केले.
श्री.सुधीर बर्वे हे लंडन मधे रहात होते मात्र त्यांचे मन तेथे रमले नाही आणि मातृभूमीच्या ओढीने ते पुण्यात परतले.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या स्वच्छता अभियानाने ते प्रभावित झाले आणि त्यांनी या क्षेत्रात काम करण्याचे ठरवले याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे संदीप खर्डेकर म्हणाले.
यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेवक दीपक पोटे,भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी इ उपस्थित होते.
श्री.सुधीर बर्वे म्हणाले की मी अनेक ठिकाणी स्वच्छता सेवकांना हाताने कचरा / घाण गोळा करताना बघून व्यथित झालो आणि त्यातून अश्या प्रकारची निर्मिती करण्याचे ठरवले.हे औजार वापरण्यास सुलभ असून याद्वारे स्वच्छता सेवकांचे काम सुलभ होइल व प्रत्यक्ष हाताने कचरा गोळा करण्याची गरज नसल्याने त्यांचे आरोग्य रक्षण देखील होइल.हे औजार मनपा,जिल्हा परिषद,ग्राम पंचायत येथील सेवकांसाठी माफक किमतीत उपलब्ध केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 483

0

पुणे विभागातील 5 लाख 42 हजार 605 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 65 हजार 781 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.4 :- पुणे विभागातील 5 लाख 42 हजार 605 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 65 हजार 781 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 483 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 693 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.90 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 64 हजार 696 रुग्णांपैकी 3 लाख 50 हजार 274 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 670 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.05 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 532 रुग्णांपैकी 52 हजार 102 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 663 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 352 रुग्णांपैकी 46 हजार 705 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 916 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 731 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 638 रुग्णांपैकी 45 हजार 720 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 184 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 734 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 563 रुग्णांपैकी 47 हजार 804 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 50 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 709 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 672 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 543, सातारा जिल्ह्यात 31, सोलापूर जिल्ह्यात 65, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 22 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 756 आहे. पुणे जिल्हयामध्ये 681, सातारा जिल्हयामध्ये 21, सोलापूर जिल्हयामध्ये 21, सांगली जिल्हयामध्ये 18 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 15 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 33 लाख 48 हजार 288 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 65 हजार 781 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 3 जानेवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

छोटा राजनसह तिघांना 2 वर्षांची शिक्षा-पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात २६ कोटीच्या खंडणी चे प्रकरण

0

मुंबई -सत्र न्यायालयाकडून सोमवारी गँगस्टर छोटा राजन आणि त्याच्या तीन साथीदारांना खंडणी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. छोटा राजनवर 2015 मध्ये पनवेलमधील बिल्डर नंदू वाजेकर यांना धमकावून 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. पोलिसांकडे नंदू वाजेकर यांच्या ऑफिसचे सीसीटीव्ही फुटेज आहेत, ज्यात आरोपी वाजेकर यांच्या ऑफिसमध्ये आल्याचे दिसत आहे. याशिवाय, कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांच्या हाती लागली आहे, ज्यात छोटा राजन वाजेकर यांना धमकावत असल्याचे उघड झाले.2015 मध्ये नंदू वाजेकरांनी पुण्यात एक जमीन खरेदी केली होती. त्याबदल्यात एजंट परमानंद ठक्करला 2 कोटी रुपये कमीशन देण्याचे ठरले होते. ठक्करने या प्रकरणी अजून पैशांची मागणी केली, पण वाजेकरांनी नकार दिला. यानंतर ठक्करने छोटा राजनशी संपर्क केला आणि राजनने आपल्या साथीदारांच्या मदतीने वाजेकरांकडून 26 कोटी रुपयांची खंडणी घेतली होती. या प्रकरणात ठक्कर मुख्य आरोपी असून, सध्या तो फरार आहे.

छोटा राजनला भारतात आणल्यानंतर त्याच्यावरील सर्व प्रकरणे सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. त्यातच हे प्रकरण जोडण्यात आले आहे. हे प्रकरण पनवेलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या राजन तिहार तुरुंगात कैद आहे.

वर्षा राऊत चौकशीच्या एक दिवस आधीच ED कार्यालयात हजर

0

मुंबई- संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना PMC बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून 4 वेळा समन्स बजावण्यात आले होते. त्यांना चौकशीसाठी 5 जानेवारी रोजी बोलावले होते. मात्र वर्षा राऊत एक दिवस आधीच आज 4 जानेवारी (सोमवार) रोजी दुपारी EDच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत.

EDने वर्षा राऊत यांना 4 वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. मात्र दरवेळी व्यक्तिगत कारण देत त्यांनी चौकशीसाठी त्या गेल्या नाहीत . ईडी सूत्रांच्या माहितीनुसार वर्षा यांच्याकडून 55 लाखांच्या व्यवहारासाठी 55 प्रश्नांची लांबलचक यादी तयार केली आहे.

वर्षा राऊत यांना देण्यात आलेल्या कर्जाचे पीएमसी घोटाळ्याशी काही संबंध असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले होते. EDच्या दाव्याला उत्तर देताना राऊत कुटुंबीयांनी सांगितले की, हे पैसे दहा वर्षांपूर्वी घेतले होते आणि या संदर्भात, आयकर विवरण देखील दाखवला आहे.

काय आहे PMC बँक घोटाळा?

पीएमसी बँक खोटे खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास 6500 कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला 2019 मध्ये मिळाली होती. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर 24 सप्टेंबर 2019 रोजी निर्बंध लादले. हे निर्बंध 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली होती. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचे कर्ज बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल (HDIL) आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.

स्वदेशी लिथियम आयन बॅटरीमुळे भारताचीआत्मनिर्भरतेकडे वाटचाल-डॉ. राजेंद्रकुमार शर्मा

0

पुणे : “मोबाईल, लॅपटॉप, ई-व्हेईकल्स आदी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर होतो. देशात प्रथमच लिथियम आयन बॅटरी उत्पादित करण्याचे संशोधन पुण्यातील शास्त्रज्ञांनी केले आहे. या संशोधनाला उत्पादनात रूपांतरित करून स्वदेशी लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन सुरु होणार असल्याने भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे,” असे मत संशोधक आणि स्पेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांनी व्यक्त केले.

टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशनतर्फे (टीटीए) भारतीय बनावटीच्या लिथियम आयन बॅटरीची प्रगती यावर आयोजित व्याख्यानात डॉ. शर्मा बोलत होते. रविवारी झूम मिटद्वारे झालेल्या या व्याख्यानावेळी ‘टीटीए’चे यशवंत घारपुरे, सचिव विलास रबडे, विश्वास काळे आदी उपस्थित होते. ‘टीटीए’चे हे ३६ वे व्याख्यान होते. सुपर कॅपॅसिटरचे उत्पादन करणारी स्पेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड भारतातील एकमेव कंपनी आहे.

डॉ. राजेंद्रकुमार शर्मा म्हणाले, “लिथियम आयन बॅटरीच्या जगातील संशोधनात भारतीयांचा वाटा ७० टक्के आहे. शिवाय ही बॅटरी बाजारात येऊन २० वर्षे होत आली. मात्र, दुर्दैवाने या बॅटरीच्या उत्पादनात एकही भारतीय कंपनी नाही. ही बाब लक्षात घेऊन मिनिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि स्पेल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने सेंटर ऑफ मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) येथे सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन रिचार्जेबल बॅटरी टेक्नॉलॉजी उभारण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावर येथे बॅटरीचे संशोधन उत्पादन होत आहे.”


“या बॅटरीची भारतात मोठी गरज आहे. त्यामुळे लघु व माध्यम उद्योगांनी पुढाकार घेऊन लिथियम बॅटरीच्या उत्पादनात उतरले पाहिजे. त्यांना उत्पादनासाठी लागणारे संशोधन, परीक्षण व अन्य सर्व प्रकारचे सहकार्य या सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारा केले जाणार आहे. आर्थिक विकासात आज ‘एमएसएमई’चा हातभार मोठा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात याचे उत्पादन सुरु झाले, तर भारताला चीनवर अवलंबून राहावे लागणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले.

“सी-मेटच्या पुण्यातील केंद्रात ३५ हजार स्क्वेअर फूट परिसरात हा प्रकल्प उभारला जात असून, प्रायोगिक तत्वावर येथे बॅटरीचे उत्पादन सुरु होणार आहे. सेल, इलेक्ट्रोड व लागणाऱ्या अन्य गोष्टी पुरविण्यात येतील. ज्या कंपन्यांना या बॅटरीचे उत्पादन करायचे आहे, त्यांच्याशी सामंजस्य करार केला जाईल. त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन व सहकार्य करण्याची भूमिका या सेंटर ऑफ एक्सलन्सची आहे.” विलास रबडे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास काळे यांनी आभार मानले.

‘अनसंग वॉरिअर्स’च्या लढ्यामुळेच पिंपरी- चिंचवडकरांची कोरोनावर मात!-महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर

0

– शहरातील प्रातिनिधिक 25 कोरोना योध्यांचा सन्मान 
– महापौर माई ढोरे, आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती
 
पिंपरी —
‘अनसंग ‘वॉरीयर्स’ पुरस्काराने चांगल्या विचारांची देवाण- घेवाण करण्याचे काम केले. अधिकारी हे फक्त ‘सह्याजीराव’ म्हणजे सही करण्याचे काम करतात. मात्र लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि पाठपुराव्याने शहराचा विकास घडतो. प्रशासन आणि राजकारण यांनी सकारात्मक पद्धतीने घेतले, तर विकासाचा आलेख मांडता येतो. कोरोनाच्या काळात कोरोनामुक्त करण्यात यश मिळेल, असे मत महापालिका आयुक्त  श्रावण हार्डीकर यांनी व्यक्त केले. 
चिखली, मोशी, चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशन, अविरत श्रमदान, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी आयुक्त हर्डीकर बोलत होते. या वेळी महापौर माई ढोरे, आमदार महेश लांडगे उपस्थित होते. 
आयुक्त  श्रावण हार्डीकर म्हणाले की, पिंपरीतील नागरिकांचा अभिमान वाटतो. कोरोनाच्या काळात भीतीचे वातावरण होते. मात्र एकजणही कामचुकार वागले नाहीत. या काळात अनेक अडचणी आल्या. आरोग्य विभागातल्या कर्मचार्यांना पिपिई किट सुरुवातीला मिळाले नाही. सुरक्षा रक्षक मिळाले नाही. या काळात खुप वाईट गोष्टी पहिल्या. मात्र शहरातील नागरिकांच्या प्रेमामुळे कोरोनामुक्त शहर झाले. कोरोना पूर्ण गेला नाही. या प्रकारचे अनेक संकटे येतील. त्याला तोंड देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना वॉरीयर्सचा सन्मान हा माझा सन्मान आहे. निसर्गाशी पंगा घेणे चुकीचे आहे. त्यामुळे निसर्गाला जपत कार्यक्रम घ्यावे लागतील. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त हर्डीकर यांनी केले. 
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पाठीमागे वळून पहिले तर १० महिने कोणी हसले नाही. कोरोनामुळे सगळे चिंतेत होते. मात्र, कोरोनावर आपण मात केली. त्यामुळे कोरोना योद्धे यांच्या विषयी बोलताना मला आनंद होत आहे. काम करत असताना दरम्यानच्या काळात मलाही  कोरोना झाला. सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. जवळच्या सर्वांनी मला फोन करून आधार दिला. त्यानंतर सर्वच कुटुंबातील अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कोरोना काळात वेळ इतकी वाईट होती की, माझ्या घरच्यांना नंतर कोणी फोनही केले नाही. माझ्या घराच्या बाहेर कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याचा फलक लावला. गल्लीतील रस्ताही बंद केला. अशी वेळ इतरांवर येऊ नये, दुसऱ्याचे मनोबल वाढावे म्हणून दुसर्या दिवशी मी फेसबुकला सांगितले की, कोरोना झालेल्या प्रत्येक रुग्णांच्या घरच्यांना आधार द्या. त्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. प्रत्येक जण कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या लोकांच्या घरच्यांना आधार देत होते. प्रत्येक तासनतास काळजीने चौकशी करत होते. त्यामुळे लोकांचे मनोबल उंचावले. त्या आधार देणाऱ्या नागरिकांचा मला अभिमान असल्याचे आमदार लांडगे म्हणाले. आयुक्त हर्डीकर यांच्याविषयी बोलताना आमदार लांडगे म्हणले की तुमचे काम कोणीही विसरू शकत नाही. आयुक्तांनी समतोल राखून काम केले. लोकांना आधार दिला. 
महापौर माई ढोरे म्हणाल्या की, कोरोना योध्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम तो कौतुकास्पद आहे. शहरात कोरोनामुळे भीतीचे वातावरण होते. सर्वत्र स्मशान शांतता होती. कोरोनामुक्त शहर करण्यासाठी अधिकारी ते सफाई कामगार सर्वच कामात होते. आमदार यायचे. विकास नाही झाला तरी चालेल. मात्र २५ लाख लोकांचा जीव महत्वाचा मानला. विकास नंतर करता येतो. हा सर्वसमावेशक निर्णय झाला. त्यानंतर १० महिने लोकांच्या आरोग्याकडे लक्ष दिले. घरात राहा असे आवाहन केले. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे सिंहाचा वाटा सर्वच लोकांचा आहे. बाहेर फिरणाऱ्या लोकांना कोरोना झाला. क्वारंटाईन सेंटर मध्ये गर्दी होती. अनेक वेळा गैरसोयीचा नागरिकांना सामना करावा लागला. मात्र तरीही कोरोना मुक्त शहर करून दाखविले. चिखली परिसराचा आमदार महेश लांडगे यांनी विकास केला. आणखी पुढे शहराच्या विकासासाठी निधी नाही म्हणू नका, अशी मागणी या वेळी महापौर माई ढोरे यांनी आयुक्त हर्डीकर यांना या वेळी केली.   
 पैलावानामधील संवेदनशील माणूस दादांच्या रूपाने दिसला…
माणसातला माणूस ओळखण्याचे सामर्थ्य असायला पाहिजे. हे सामर्थ्य निर्माण झाल्यास शहर आपोआपच स्मार्ट बनत जाते. विकासासाठी नागरिकांचे मन खुले असावे लागते. पिंपरी- चिंचवड शहरातील कोरोना योद्धे यांचा सन्मान करण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केले. त्यांची ओळख पैलवान आमदार अशी आहे. मात्र आज त्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे पैलवानातला संवेदनशील असलेला माणूस दिसला, अशा  भावना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केल्या.   
कोरोना योध्यांचे काम सिमेवरील जवानासारखे : आमदार महेश लांडगे

कोरोनातून बरा झालो म्हणून अनेक जणांनी कोरोना योद्धा म्हणून माझाही सत्कार केला. मात्र ज्यांनी स्वताची व घराची काळजी न करता ज्यांनी काम केले ते खरे कोरोना योद्धे आहेत. जवळ न जाणाऱ्या लोकांजवळ हि लोक गेली. सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकासारखे काम शहरातील कोरोना योद्ध्यांनी केले. गोळी लागणार हे माहित असताना देखील आपले जवान देशसेवा करतात. तसेच कोरोना योद्ध्यान्ही काम केले. सोडून गेलेल्या लोकांचे स्मरण आणि काम आठवत असल्याचे आमदार महेश लांडगे म्हणाले.

न्यू इंग्लिश स्कूलचा १४१ वा वर्धापनदिन साजरा

0

पुणे:  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचा १४१ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सोसायटीचे कार्यवाह धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांचा बौध्दिक, शारीरिक, मानसिक, आत्मिक, सामाजिक आणि कौशल्य विकास हे शिक्षणाचे कार्य आहे. व्यक्तिमध्ये असलेल्या उत्तम गुणांचे प्रगटीकरण हे शिक्षणाचे साध्य आहे. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास महत्त्वाचे आहे. असे मत श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

शाळेने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण, विद्यार्थी निवडणुका आणि स्नेहसंमेलन साजरे केल्याची माहिती प्रशालेच्या मु‘याध्यापिका मनिषा मिनोचा यांनी दिली. शाला समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, सदस्य डॉ. विनय आचार्य, उपशाला प्रमुख दीपा अभ्यंकर, पालक-शिक्षक संघाच्या सहकार्यवाह सुकेशिनी खवळे, विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णव जाधव, प्रणिता विधाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

मु‘याध्यापिका मनिषा मिनोचा यांनी प्रास्ताविक, योगेश पाटील, देविदास झोडगे यांनी सूत्रसंचालन, सुरेशा जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता:नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी

0

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई, दि. 4 : पुणे शहरात नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसह वाढते शहरीकरण लक्षात घेऊन पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता देण्यात आली. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील वाघोली, ऊरळीकांचन, बाणेर, काळेपडळ, खराडी, फुरसुंगी, म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव या नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी पोलीस दलाला दिल्या.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अशोक पवार, आमदार चेतन तुपे, गृह विभागाचे अपरमुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अपरमुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल, ‘पीएमआरडीएचे’ आयुक्त सुहास दिवसे (व्हीसीव्दारे), पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील तीन झोनचे रुपांतर पाच झोनमध्ये करणे, कायदा-सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने आणि योग्य व्यवस्थापनासाठी लोणीकाळभोर, वाघोली व लोणीकंद पोलीस ठाण्यांचा पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर लोणीकंद पोलीस ठाण्यातून नवीन वाघोली पोलीस ठाणे, लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातून उरळीकांचन पोलीस ठाणे, हवेली पोलीस ठाण्यातून नवीन नांदेड सिटी पोलीस ठाणे, चतु:श्रृंगी व हिंजवडी पोलीस ठाण्यातून नवीन बाणेर पोलीस ठाणे, हडपसर-कोंढवा व वानवडी पोलीस ठाण्यातून नवीन काळेपडळ पोलीस ठाणे, नवीन फुरसुंगी पोलीस ठाणे, चंदननगर पोलीस ठाण्यातून नवीन खराडी तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव अशा नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्यात आली आहे.
कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शिरुरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून पुणे शहर पोलीस आयुक्तालयाला आणि जिल्हा ग्रामीण पोलीसांना वाहन खरेदीसाठी प्रत्येकी एक कोटी तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
राज्यात कायदा-सुव्यवस्था कायम राखली जावी, पोलीस आणि सामान्य जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करण्याच्या सूचना करत पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

महापालिकेतील ‘त्या ‘ धक्काबुक्की वर अशी व्यक्त झाली दिलगिरी (व्हिडीओ )

0

पुणे- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उमुख्यमंत्री अजितदादा पवार, विपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे वार्तांकन  करावयास सभागृहात प्रवेश करताना काही वाहिन्यांच्या प्रतिनिधींना झालेल्या धक्कबुकी प्रकरणामुळे आज महापौर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्रकार परिषदेवर काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी महापौर कार्यालयात उपस्थित रहाणे टाळून महात्मा फुले यांच्या पुतळ्या समोरील हिरवळीवर आम्ही चंद्रकांतदादा यांच्याशी बोलू असा पवित्रा घेतला . महापौर कार्यालयात काही माध्यमांच्या प्रतीनिधींसमवेत या वेळी आपली पत्रकार परिषद उरकून चंद्रकांतदादा आणि सभागृहनेते गणेश बिडकर यांनी हिरवळीवर थांबलेल्या ‘या ‘ माध्यम प्रतिनिधींशी बातचीत केली . आणि यावेळी त्यांनी त्या धक्काबुक्की बाबत  दिलगिरीही व्यक्त केली. ज्यांना धक्काबुक्की झाली त्यांनी याप्रकरणी खंबीर पवित्रा घेतला तसेच एन यु जे च्या महाराष्ट्रप्रदेश अध्यक्षा   शीतल करदेकर ,मराठी पत्रकार परिषदेचे सुनील लोणकर यांनी या धक्काबुक्कीचा निषेध व्यक्त केला होता . 

वास्तवता….नेमके झाले तरी काय होते ….

1 जानेवारी रोजी कार्यक्रमाचे  नियोजन महापौर ,नगरसचिव  या दोहोंच्या कार्यालयाकडून करण्यात आले होते . यावेळी कोरोना  महामारी  च्या पार्श्वभूमीवर सभागृहात गर्दी नको म्हणून त्यांनी माध्यमांच्या कॅमेरांना देखील सभागृहात मज्जाव करण्याचे धोरण अंगीकारत  त्यांना पत्रकार कक्षातून चित्रीकरण करण्यास सांगितले. जो पत्रकार कक्ष प्रत्यक्षात व्यासपीठाच्या मागे आहे.सभागृहात असलेल्या व्यासपीठा समोर मात्र  महापालिकेच्या वतीने नियुक्त केलेल्या ठेकेदाराचे,आणि अन्य असे सुमारे  ५ ते ६ कॅमेरे, संगणक आणि त्यांच्या सहायकांना हवी ती सुविधा पुरविण्यात आली होती . व्यासपीठा समोर यांच्यासह अन्य एका बड्या  वाहिनीचा कॅमेरा नंतर समाविष्ट झाला. पत्रकार आणि माध्यमांच्या अन्य कॅमेरांना व्यासपीठाच्या मागे वरच्या बाजूला असलेल्या पत्रकार कक्षातूनच वार्ताकन,चित्रीकरण करण्यात सांगण्यात आले होते .पत्रकारांची  येथून वार्तांकन करण्यास हरकत नव्हतीच . परंतु येथून आम्ही फोटो कसे काढणार .. नेत्यांची भाषणे आणि चित्रीकरण कसे करणार ? हा प्रश्न नेहमीप्रमाणे आ वासून या कॅमेरामन पुढे उभा होता .त्यामुळे नामवंत अशा वृत्तपत्राच्या छायाचीत्रकारांना हि मनस्ताप होताना  दिसत होते. त्यात त्यांना सभागृहातील हे ५/६ कॅमेरे दिसत होते त्यामुळे काहीना सभागृहात मुक्त प्रवेश मिळतो आणि काहीना अशाप्रकारे दूर ठेवले जाते हि भावना बळावली आणि अखेरीस वाहिन्यांच्यासह काही  वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांनी देखील सभागृहात जाण्यासाठी धाव घेतली . तिथे त्यांना पोलिसांनी नव्हे तर महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी अडविले आणि  यावेळी प्रत्यक्षात कार्यक्रम सुरु होऊन पुढे वेगाने सरकत होता . या स्थितीत सुरक्षा रक्षकांनी केलेल्या धक्काबुक्कीत वरिष्ठ प्रतीनिधीनाही अवमानित होण्याची वेळ आली. एकाचे घड्याळ हरविले. तर चांगलीच जोरदार बाचाबाची झाली . 

चूक कोणाची -जबाबदारी कोणाची ?

कोरोना काळात खबरदारी म्हणून गर्दी होऊ नये म्हणून घेण्यात येणारी खबरदारी महापौर आणि नगरसचिव कार्यालयाने निश्चितच घ्यायला हवी याबाबत कोणाचे दुमत नाही . पण हि खबरदारी घेताना सर्वांना एकच न्याय ..या पद्धतीचे आचरण निश्चित असायला हवे. सभागृहात कॅमेरा नको तर कुणाचाच नको हि भूमिका घेतली गेलेली  दिसली नाही. व्यासपीठाच्या पुढे ठेकेदाराची सुमारे  १० जणांची टीम चित्रीकरण आणि फोटोग्राफीसाठी ठेवणाऱ्या या कार्यालयाने  त्यांची काळजी घेतली तशी  माध्यम  प्रतिनिधी आपले काम  व्यवस्थितपणे कसे करू शकतील याबाबत मात्र पर्वा केली कि नाही याबाबत चौकशी गरजेची आहे  . सभागृहातील व्यासपिठा समोर सर्वात मागील आणि मध्य बाजूस एक  तात्पुरता पण भक्कम उंचवटा  करून तिथे कॅमेरामन साठी जागा करवून देता येणे शक्य होते. अशा प्रकारची जागा असंख्य बड्या  कार्यक्रमांना  करवून दिली जाते .पण याबाबत कोणी का  विचार केला नाही हाही प्रश्न आहेच .

‘एआयसीटीई-सीआयआय’ सर्वेक्षणात’सूर्यदत्ता’ला;सलग सहाव्यांदा;’प्लॅटिनम’ मानांकन

0

पुणे : ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणात टॉप इंडस्ट्री-लिंक्ड टेक्निकल इन्स्टिट्यूट्समध्ये सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (एसआयएमएमसी) आणि सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (एसआयबीएमटी) या दोन महाविद्यालयांना प्लॅटिनम कॅटेगरीत स्थान मिळाले असून, भारतातील टॉप मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये येण्याचा बहुमान सूर्यदत्ता संस्थेला मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या व्हर्च्युअल सीआयआय एजुकेशन समिटमध्ये सर्वेक्षणाचा अहवाल सादर झाला. ‘एसआयएमएमसी’ला सलग सहाव्या वर्षी प्लॅटिनम श्रेणीमध्ये येण्याचा बहुमान मिळाला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी अशा संस्थांसमवेत सूर्यदत्ताला हा बहुमान मिळाला आहे.
औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांतील सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने एआयसीटीई आणि सीआयआय यांनी संयुक्तपणे २०१२ पासून हे सर्वेक्षण सुरु केले आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माण आणि आर्किटेक्चर या विद्याशाखांचा सर्वेक्षणात समावेश आहे. या सर्व्हेक्षणात तांत्रिक संस्था उद्योगांशी जोडल्या गेल्या असून, गेल्या नऊ वर्षांपासून ‘सीआयआय’ने ‘एआयसीटीई’च्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरु ठेवले आहे. मूल्यांकन मापदंडांमध्ये गव्हर्नन्स (१०%), अभ्यासक्रम (२०%), प्राध्यापक वर्ग (२०%), पायाभूत सुविधा (१०%), सेवा / प्रकल्प व कौशल्य विकास (२०%) आणि प्लेसमेंट (१०%) यांचा समावेश आहे. एकूण ८१४ शिक्षण संस्थांनी या सर्वेक्षणात भाग घेतला. त्यात १८४ इन्स्टिट्यूट प्लॅटिनम कॅटेगरीत आल्या. उद्योगांना पूरक अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि उपक्रम, बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रतिभा निर्मिती, अभ्यासक्रमाची रचना करताना उद्योग जगताचा सहभाग, उद्योगांना अभ्यास भेटी, प्रत्यक्ष प्रशिक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रकल्प, उद्योगभिमुख प्रकल्प आणि कौशल्ये प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्लेसमेंट, रोजगार संधी, स्टार्टअप्स अशा अनेक मुद्द्यांवर आधारित असे हे सर्वेक्षण होते.
या मानांकनाबद्दल आनंद व्यक्त करून ‘एसआयएमएमसी’चे संचालक आणि ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “संस्थेच्या ‘एसआयएमएमसी’ला सलग सहाव्यांदा आणि ‘एसआयबीएमटी’ला प्रथमच प्लॅटिनम प्रकारात स्थान मिळाले, हे अभिमानास्पद आहे. हे यश सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहयोगी सभासद, संस्था, प्लेसमेंट देणाऱ्या कंपन्या यांच्या सक्रिय सहभागामुळे शक्य झाले. सूर्यदत्ता संस्था जगातील सर्वोकृष्ट संस्था बनवण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि उच्च गुणवत्तेच्या संशोधनाची नेमणूकी केली असून, आम्ही व्यवस्थापन-विकास कार्यक्रम, कन्सल्टन्सी, अप्लाइड रिसर्च, इंटर्नशिप टेंअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट आदी उपक्रमही राबवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.”
सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (सीएमएमसी) ही भारतातील अशा काही मोजक्या संस्थांपैकी एक आहे ज्यांना सलग सहा वर्षे प्लॅटिनम प्रकारात स्थान देण्यात आले आहे. हे यश सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि संस्थेच्या सक्रिय पाठिंबा सहभागामुळे शक्य झाले. सूर्यदत्ता संस्था जगातील सर्वोकृष्ट संस्था बनवण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि उच्च गुणवत्तेच्या संशोधनाची नेमणूकी केली असून, आम्ही व्यवस्थापन-विकास कार्यक्रम, कन्सल्टन्सी, अप्लाइड रिसर्च, इंटर्नशिप टेंअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट आदी उपक्रमही राबवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते, असे डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न ‘एसआयएमएमसी’ हे ‘एआयसीटीई’, महाराष्ट्र राज्य व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय मान्यताप्राप्त आणि ‘नॅक’द्वारा अधिस्वीकृती असलेले महाविद्यालय आहे. शिक्षणासोबतच सूर्यदत्तामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार इतर क्षेत्रात त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या व्यावसायिक आणि व्यक्तिगत विकासाच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची जडणघडण उत्तम होते. विविध कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे नियमित आयोजिली जातात. विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्याच्या उद्देशाने आजवर जवळपास ३०० हुन अधिक पद्म आणि नोबेल विजेत्यांना सूर्यदत्ताने सन्मानित केले आहे,” असेही डॉ. चोरडिया यांनी नमूद केले. 


सर्वेक्षणातील ठळक मुद्दे-पूर्ण सर्वेक्षणासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या संस्थांची संख्या : ४४८६-
पूर्ण सर्वेक्षणात सहभागी झालेल्या संस्थांची संख्या : ८१४प्लॅटिनमची मिळालेल्या संस्थांची संख्या : १८४प्लॅटिनममध्ये महाराष्ट्रातील संस्था : ५३गोल्ड श्रेणी मध्ये : २४६सिल्व्हर श्रेणी मध्ये : ३८४

महाकाली गुंफाची एक इंचही जागा विकू देणार नाही…विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0


मुंबई- महाविकास आघाडी सरकारने अंधेरी येथील महाकाली गुंफा बिल्डरला विकण्याचा घाट घातला आहे. सुमारे २ हजार वर्षांपुर्वीच्या या गुंफा व मंदिराचा टीडीआर बिल्डरला आंदण देण्याचा निर्धार करणा-या ठाकरे सरकारच्या या बेकायदेशीर कृतीचा निषेध आज भाजपाच्यावतीने करण्यात आला. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज महाकाली गुंफा येथे सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात आला. यावेळी हा प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजपाचे नते किरिट सोमैय्या यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिल्डरच्या चरणी लोटांगण घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करित असून मुंबईची एक इंचही जागा बेकायदेशीरपणे बिल्डरला विकू देणार नाही व असा कोणीही प्रयत्न केला तर त्याची किंमत ठाकरे सरकारला मोजावी लागेल असा जोरदार इशारा प्रविण दरेकर यांनी आज दिला.
मुंबई महापालिका व ठाकरे सरकारने खाजगी बिल्डर शाहिद बालवा, अविनाश भोसले व विनोद गोएंका यांना अंधेरी येथील सुमारे २००० वर्ष जुन्या महाकाली गुंफा व मंदिरचा जागेचा टी डी आर देण्याचा निर्धार केला आहे. विरोधी पक्ष नेते दरेकर व सोमैय्या यांनी आज त्या जागेची पाहणी केली. तेथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व तेथील वस्तुस्थिती जाणून घेतली. मुंबई महापालिका व सरकारच्या बेकायदेशीर कृतीचा यावेळी भाजपाच्यावतीने निषेध करण्यात आला. ठाकरे सरकारचा निषेध असो…आघाडी सरकार हाय हाय…अशा जोरदार घोषणाबाजी भाजपाच्यावतीने करण्यात आली.
यावेळी बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगतिले की, ठाकरे सरकार मुंबई विकायला निघाली आहे. येथील स्थानिकांच्या विकासाकडे लक्ष दयायला सरकारला वेळ नाही. पण येथील टीडीआरच्या माध्यमातून सुमारे २०० कोटी बिल्डरच्या घशात कसे जातील याकडे सरकारचे जास्त लक्ष आहे. आज झोपडीत राहणाऱ्याला, चाळीत राहणाऱ्याला, गोरगरिबाला घर घेण्यात अडचणी येत आहे. त्यांची काळजी नाही या ठाकरे सरकारला नाही, त्यांचा विकास रखडला आहे. त्यांच्यासाठी विशेष काही करायचं नाही परंतु सत्तेसाठी बिल्डरपुढे लोटांगण घालण्याचे काम या सरकारचा सुरु असल्याची टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.
सरकार सत्तेत आल्यापासून मराठी अस्मिता विसरली आहे. सरकराच्या संवेदना मेलेल्या आहेत. ठाकरे सरकारची भूमिका ही केवळ सत्ता टिकविणे हीच आहे. मात्र भाजप नेहमी जनतेच्या पाठीशी आहे, म्हणूनच जेव्हा येथील नागरिकांवर अन्याय होत आहे, तेव्हा आम्ही आज येथे आलो. मुंबईच्या इंच इंच जागेच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ, पण मुंबईची जागा कोणालाही बेकायदेशीररित्या विकू देणार नाही असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष संतोष मेढेकर, मुंबई भाजप उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, नगरसेवक पंकज यादव, नगरसेविका प्रिती साटम व भाजप महामंत्री मुरजी पटेल, पदाधिकारी अशोक गोगरी,संदीप दुबे, रमण झा, सुभाष दरेकर, शेखर तावडे यांच्यासह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

संभाजीनगरच्या नामांतरावरून शिवसेनेची भूमिका सत्तेसाठी लाचारी पत्करणारी- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0


मुंबई – संभाजीनगरच नामांतर असो किंवा कुठलाही विषय ठाकरे सरकारची सध्याची भूमिका फक्त सत्ता टिकवणे हिच आहे. केवळ सत्तेच्या लाचारीपोटी आपल्या सर्व भूमिका बासनात गुंडाळणं अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे, अशी टिका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, शिवेसनेची आता ती धमक राहिली नाही. कॉंग्रसेने जाहिर केले की आमचा नामांतराला विरोध असेल व त्यानंतर महाविकास आघाडी सरकरामधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने तलवार म्यान केली आहे. कारण आता मला बाळासाहेबाची शिवसेना दिसत नाही. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेची जी धमक होती ती आताच्या शिवसेनेत नाही, सत्तेसाठी शिवसेना वेळोवेळी लाचारी पत्करत आहे. त्यामुळे नामांतराच्या विषयावरुन जर कॉंग्रेसचा दबाव आला तर शिवसेना ही कॉग्रेससमोर नांगी टाकेल असा टोलाही दरेकर यांनी लगाविला.
शिवसेना नेते संजय राऊत यांची वक्तव्ये अर्धवट माहितीच्या आधारे केलेली असतात, गेल्या पाच वर्षांमध्ये संभाजीनगर महापालिकाकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेला नाही, नामांतरावरून पालिकेकडून प्रस्ताव आल्यास राज्य सरकारने त्याला मंजुरी देणे व नंतर केंद्राकडे आवश्यक असल्यास पाठवला जातो. कुठलीही राजकीय प्रक्रिया समजुन न घेता. कोणतीही गोष्ट त्याचा अंगाशी आली. की भाजपवर ढकलून दिली जाते.अश्या प्रकारची त्यांची भूमिका आहे अशी टिका प्रविण देरकर यांनी केली.
दरेकर यांनी यावेळी सांगितले की, जर आता त्यांना खरंच संभाजीनगर नामांतर करायचं असेल तर महापालिका तुमची आहे तिकडे ठराव द्या राज्याला केबिनेट मध्ये ठराव पास करा. केंद्राची काही आवश्यकता लागली तर आम्ही निश्चितपणे करू. आता बाळासाहेब थोरात यांनी नामांतरावरून विरोध केला आहे. म्हणून अडचण होईल यासाठी पळवाट काढली जात आहे असा टोलाही दरेकर यांनी मारला.