Home Blog Page 2206

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत इंदूरने सलग पाचव्यांदा ‘स्वच्छ शहर’चा किताब पटकावला,5-तारांकित नऊ शहरे, 3-तारांकित,143 शहरे कचरामुक्त

0

एक लाखांपेक्षा कमी’ लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये  महाराष्ट्रातील विटा, लोणावळा आणि सासवड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2021-राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी आज विज्ञान भवन, नवीन दिल्ली येथे स्वच्छ भारत अभियान -शहरी  2.0 चा भाग म्हणून गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सवा’मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला. स्वच्छ भारत अभियान  (शहरी) च्या विविध म्हणजेच स्वच्छ सर्वेक्षण 2021, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज आणि शहरांसाठी कचरामुक्त तारांकित क्रमवारी   प्रमाणपत्रे देण्याच्या  उपक्रमांतर्गत नगरे /शहरे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वच्छतेसाठी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेण्याच्या आणि या कामाला  ओळख देण्याच्या अनुषंगाने  या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे 300 हून अधिक पुरस्कार दिले जात आहेत.सलग पाचव्या वर्षी, इंदूरला स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून सन्मानित करण्यात आले, तर सुरत आणि विजयवाडा यांनी ‘एक लाखांहून अधिक लोकसंख्या’ असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. एक लाखांपेक्षा कमी’ लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये  महाराष्ट्रातील विटा, लोणावळा आणि सासवड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.वाराणसी ‘सर्वोत्कृष्ट गंगा नगर ’ म्हणून घोषित करण्यात आले तर अहमदाबाद छावणीने ‘भारतातील सर्वात स्वच्छ छावणी’ हा किताब पटकावला  त्यानंतर मेरठ छावणी आणि दिल्ली छावणीने अनुक्रमे दुसरा आणि  तिसरा क्रमांक पटकावला.‘फास्टेस्ट मूव्हर’च्या श्रेणीत, 2020 क्रमवारीतील 361 व्या स्थानावरून यावर्षी 87 व्या स्थानावर 274 क्रमांकांनी  झेप घेऊन होशंगाबाद (मध्य प्रदेश) ने यावर्षी ‘फास्टेस्ट मूव्हर सिटी’ मध्ये स्थान मिळवले. (‘1 लाखांहून अधिक लोकसंख्या’ श्रेणीमध्ये) अशा प्रकारे या शहराने अव्वल 100 शहरांमध्ये स्थान मिळवले आहे.राज्य पुरस्कारांमध्ये, छत्तीसगडने   सलग तिसऱ्या वर्षी “100 पेक्षा जास्त शहरी स्थानिक स्वराज्य संस्था” श्रेणीत ‘स्वच्छ राज्य’ म्हणून तर झारखंडने दुसऱ्यांदा “100 पेक्षा कमी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था” श्रेणीत ” स्वच्छ राज्य पुरस्कार पटकावला. कर्नाटक आणि मिझोरम.  हे अनुक्रमे मोठ्या (100 पेक्षा जास्त शहरी स्थानिक स्वराज्य संस्था) आणि लहान (100 पेक्षा कमी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था) राज्य श्रेणीत ‘फास्टेस्ट मूव्हर राज्य ‘ ठरली  आहेत.या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती म्हणाले की,आपण ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करत आहोत त्यामुळे यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांना विशेष महत्त्व आहे.कोविड महामारीच्या काळातही सफाई मित्र आणि स्वच्छता कर्मचारी सातत्याने सेवा देत होते, हे  राष्ट्रपतींनी नमूद केले. ते म्हणाले की, स्वच्छतेच्या असुरक्षित पद्धतींमुळे कोणत्याही स्वच्छता कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात येऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी घनकचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धन हा भारताच्या पारंपरिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे.आज संपूर्ण जग पर्यावरण संरक्षणावर भर देत असून  यात  संसाधनांचा योग्य वापर , पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ‘कचऱ्यातून संपत्ती ‘ या संकल्पनेतून  चांगली उदाहरणे समोर येत आहेत आणि अनेक स्टार्टअप्स या क्षेत्रात सक्रिय असल्याचे त्यांनी नमूद केले. .या क्षेत्रांमध्ये उद्योजकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य योजना विकसित केल्या जाऊ शकतात, असे ते म्हणाले.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यावेळी बोलताना म्हणाले की, स्वच्छ भारत अभियान- शहरी  अंतर्गत मिळालेले  यश हे अभूतपूर्व सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. ते म्हणाले की, आज या अभियानाने लोकचळवळीचे  – खऱ्या ‘जनचळवळीचे ’स्वरूप धारण केले आहे. 2016 मध्ये प्रायोगिक तत्वावावर 73 शहरांमध्ये सुरू झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मोठी वाढ दिसून येत असून हे आजच्या घडीला  जगातील सर्वात मोठे शहरी स्वच्छता सर्वेक्षण आहे.ते म्हणाले की, पुढील काही वर्षे सर्वांगीण स्वच्छतेवर, म्हणजे स्वच्छ हवा, स्वच्छ जमीन आणि शुद्ध पाणी यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी समर्पित असतील. हिरवीगार आणि सर्वसमावेशक शहरे निर्माण करणे हे आपल्या भावी पिढ्यांसाठी देणे लागत आहे, असं मंत्री म्हणाले. स्वच्छ अमृत महोत्सव असे उचित शीर्षक असलेल्या या उत्सवात त्यांनी शहरी भारतातील स्वच्छता पुरस्कार विजेत्यांचे  अभिनंदन केले

श्री हरदीप सिंग पुरी आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री श्री कौशल किशोर यांनी छत्तीसगड आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल  यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारप्राप्त शहरे आणि राज्यांचा सत्कार केला.

गेल्या काही वर्षांत,शहरी परिदृश्य बदलण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण एक प्रभावी साधन म्हणून उदयाला  आले आहे.कोविड-19 मुळे जमिनीवर आव्हाने असूनही, 2,000 हून अधिक मूल्यांकनकर्त्यांच्या पथकांनी  28 दिवसांच्या विक्रमी वेळेत 65,000 पेक्षा जास्त प्रभागांना  भेटी दिल्या. वर्षीच्या सर्वेक्षणात महाराष्ट्राने एकूण 92 पुरस्कार पटकावले आहेत  कोणत्याही राज्याने पटकावले हे सर्वाधिक पुरस्कार आहेत.त्यानंतर 67 पुरस्कारांसह छत्तीसगडचा क्रमांक लागतो.याव्यतिरिक्त, प्रेरक दौर  सन्मान या स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत नवीन कार्यप्रदर्शन  श्रेणीमध्ये, इंदूर, सुरत, नवी मुंबई, नवी दिल्ली नगर परिषद आणि तिरुपती या पाच शहरांना ‘दिव्य’ (प्लॅटिनम) म्हणून वर्गीकृत करण्यात आले. 4,320 शहरांनी भाग घेतलेल्या या वर्षीच्या सर्वेक्षणात अभूतपूर्व संख्येने नागरिकांचा अभिप्रायही  मिळाला – गेल्या वर्षीच्या 1.87 कोटींच्या  तुलनेत 5 कोटींहून अधिक नागरिकांनी अभिप्राय नोंदवला. स्वच्छ सर्वेक्षण  2021 च्या माध्यमातून  संपूर्ण शहरी भारतातील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनातील 6,000 हून अधिक नवकल्पना आणि सर्वोत्तम पद्धती शोधण्यात साहाय्य मिळाले आहे.

आजच्या कार्यक्रमाचे दुसरे सत्र स्वच्छ भारत अभियान -शहरीमध्ये  आघाडीवर असलेल्या  सफाई मित्रांना समर्पित होते.जागतिक शौचालय दिनाच्या (19 नोव्हेंबर) निमित्ताने , या सत्रात पहिल्याच स्वच्छतामित्र सुरक्षा चॅलेंज अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गौरवण्यात आले. गटारे आणि सेप्टिक टँकच्या धोकादायक साफसफाईपासून मानवी मृत्यूचे उच्चाटन करण्यासाठी  केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने  गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या सफाई मित्र  सुरक्षा चॅलेंजमध्ये 246 सहभागी शहरांमधील विविध लोकसंख्येच्या श्रेणींमध्ये इंदूर, नवी मुंबई, नेल्लोर आणि देवास या शहरांनी  अव्वल कामगिरी केली. राज्यांपैकी, छत्तीसगड आणि चंदीगडने या चॅलेंज अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा पुरस्कार पटकावला.गेल्या एका वर्षात, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आर्थिक विकास महामंडळ (एनएसकेएफडीसी ) मार्फत बँकांशी स्वच्छतामित्रांची  पत  जोडणी , सेक्टर स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स मार्फत नोकरीच्या ठिकाणी  प्रशिक्षण आणि 190 हून अधिक शहरांमध्ये हेल्पलाइन क्रमांक 14420 ची स्थापना – नागरिकांचे तक्रार मंच या उपक्रमांद्वारे शहरी भारतात ‘मॅनहोल टू मशीन होल’ ही क्रांती घडवून आणण्यात यश मिळवले आहे.

कचरामुक्त शहरांच्या तारांकित क्रमवारी  नियमाअंतर्गत निर्धारित  केलेल्या 3-तारांकित आणि 5-तारांकित   शहरांचे निकाल जाहीर करून स्वच्छ भारत अभियान -शहरी 2.0 अंतर्गत कचरामुक्त भारताच्या दृष्टिकोनाला आणखी चालना मिळाली आहे. इंदूर, सुरत, नवी दिल्ली नगरपरिषद, नवी मुंबई, अंबिकापूर, म्हैसूर, नोएडा, विजयवाडा आणि पाटण  या एकूण 9 शहरांना 5 तारांकित शहरे, तर 143 शहरांना  3 तारांकित  शहरे म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या  मापदंडांमध्ये शहरांचे समग्र मूल्यमापन करण्यासाठी 2018 मध्ये गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे कचरामुक्त शहरांचे  तारांकित क्रमवारी नियम अद्ययावत आराखडा  म्हणून सादर करण्यात आले. 2018 मध्ये, केवळ 56 शहरांना  स्टार रेटिंगचे म्हणजेच तारांकित क्रमवारीचे  प्रमाणपत्र देण्यात आले. या वर्षी, 2,238 शहरांनी मूल्यांकनासाठी अर्ज केल्याने ही संख्या अनेक पटींनी वाढली आहे.कोविड-19 चे निर्बंध असूनही हे मोठ्या प्रमाणातील मूल्यांकन यशस्वीरीत्या पूर्ण झाले हे मूल्यांकन कालावधी दरम्यान 14.19 लाख नागरिकांचे  प्रमाणीकरण आणि 1 लाख स्थानांसह  3.5 कोटी डेटा पॉइंट्सवरून संकलित करण्यात आलेले 1.4 कोटी छायाचित्र  पुराव्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते.

राष्ट्रपतींनी स्वच्छ भारत अभियान -शरी  2.0 साठी देशाच्या  वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत ‘हर धडकन स्वच्छ भारत की –’ या शीर्षकगीताच्या प्रकाशनाच्या माध्यमातून कार्यक्रमाचा  उत्साह द्विगुणित झाला.हे गाणे स्वच्छता चळवळीचे भावविश्व उलगडते आणि हे गाणे स्वच्छतेच्या  प्रवासातील सर्व नागरिकांच्या, विशेषत: लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बांधिलकीला मानवंदना आहे. स्वच्छ, हरित आणि आधुनिक शहरी भारताचे चित्रण असणारी ही चित्रफीत ,  स्वच्छ भारत अभियान -शहरी  2.0 च्या प्रवासाला आगामी  दिवसात पुढे नेण्यासाठी लोकांना पुन्हा चैतन्यशील करण्याचा प्रयत्न आहे.

1 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू करण्यात आलेले स्वच्छ भारत अभियान -शहरी  2.0, हे सर्वांना  स्वच्छता सुविधा  सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करेल.स्वच्छ भारत अभियान -शहरीच्या गेल्या सात वर्षांच्या प्रवासाअंतर्गत परिणाम साध्य करण्यात तंत्रज्ञानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.या डिजिटल प्रवासात एक मोठी झेप घेत मंत्रालयाने सुधारित स्वच्छ भारत अभियान -शहरी  2.0 संकेतस्थळ आणि एकात्मिक एमआयएस पोर्टल ‘स्वच्छतम’ सुरु केले आहे.

याव्यतिरिक्त, भविष्यासाठी  एक अत्याधुनिक अवकाशीय जीआयएस व्यासपीठ सुरु करण्यात आले आहे.हे व्यासपीठ या अभियानाला अद्ययावत , डेटा आधारित निर्णय घेण्याच्या दिशेने पुढे नेईल. या नवीन डिजिटल सक्षमीकरणांमुळे कागदविरहित अभियान मजबूत आणि पारदर्शक  होईल, तसेच स्वच्छता पंक्तीतील  राज्ये, शहरे आणि हितसंबंधीयांशी  चोवीस तास संपर्क साधला जाईल.

अशा प्रकारे स्वच्छ अमृत महोत्सव हा स्वच्छ भारत अभियान -शहरीच्या  गेल्या सात वर्षांतील शहरांच्या कामगिरीचा उत्सव होता आणि स्वच्छ भारत अभियान -शहरी  2.0 च्या माध्यमातून स्वच्छतेच्या पुढील टप्प्यात नव्या जोमाने पुढे जाण्यासाठी शहरे आणि नागरिकांच्या बांधिलकीचा उत्सव होता.

तपशीलवार निकाल , अहवाल आणि प्रकाशन स्वच्छ भारत अभियान-शहरीवर उपलब्ध आहेत: https://www.ss2021.in/#/home

इलेक्ट्रिक वाहनांमधील बॅटरी चार्जिंगचा वेळ कमी करण्यासंदर्भात एआरएआयने संशोधन करावे

0

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे

पुणे-इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणा-या अॅडव्हान्स केमिस्ट्री सेल (एसीसी) बॅटरीचे भारतात उत्पादन करण्यासाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंन्टिव्ह (पीआयएल) योजना आणि फास्टर अॅडॉप्शन अॅण्ड मॅन्युफ्रॅक्चरिंग ऑफ हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेईकल (एफएएमई) योजना यांच्या प्रभावी
अंमलबजावणी बरोबरच वाहनांमधील बॅटरी चार्जिंगचा वेळ कमी व्हावा, या दृष्टीने पुण्यातील
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) ने संशोधन करावे, असे आवाहन
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी केले.  
केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने एआरएआय, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल
मॅन्युफ्रक्चरर्स (एसआयएएम) आणि ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट मॅन्युफ्रक्चरर्स असोसिएशन ऑफ
इंडिया (एसीएमए) यांच्या सहकार्याने सेनापती बापट रस्त्यावरील एमसीसीआयए येथील बजाज
आर्ट गॅलरी या ठिकाणी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये पुण्यातील उद्योग क्षेत्रास
प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंन्टिव्ह स्कीमची माहिती देत उद्योग क्षेत्रातील प्रातिनिधींशी डॉ. पांडे यांनी
चर्चा केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचे सहसचिव अमित मेहता, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)चे संचालक डॉ. रेजी मथाई, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल
मॅन्युफ्रक्चरर्स (एसआयएएम)चे कार्यकारी संचालक प्रशांत बनर्जी आदी या वेळी उपस्थित होते.
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर देशात वाढावा, या दृष्टीने केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजना व
अनुदानांमुळे गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ झालेली पहायला मिळत आहे. नजीकच्या भविष्यात ही वाढ कायम राहणार असून इलेक्ट्रिक वाहनांच्या जादा किंमती आणि बॅटरी चार्जिंग या दोन्ही समस्या सोडविण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.  
याविषयी अधिक माहिती देताना पांडे म्हणाले, “इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरण्यात येणारी
अॅडव्हान्स केमिस्ट्री सेल (एसीसी) बॅटरी ही भारतात तयार होत नाही. ती बाहेरून आयात करावी
लागत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण किंमतीपैकी ३०% किंमत ही केवळ बॅटरीचीच होते.
मात्र ही बॅटरी तयार करण्यासाठी आवश्यक ७० टक्के सामुग्री भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळे
नजीकच्या भविष्यात ही बॅटरी भारतात तयार करीत इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी करण्यावर आमचा भर असेल. तसेच यामुळे संबंधीच्या उच्च तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सुमारे ७.५ लाख व्यक्तींना रोजगार मिळणे शक्य होईल.”
चार्जिंगची समस्या सोडविण्यासाठी सरकार तर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
ज्यामध्ये देशातील ९ महत्त्वाच्या महामार्गांवर तब्बल ६ हजार चार्जिंग स्टेशन्स उभारणीला मंजुरी मिळाली असून येत्या वर्षात तीन हजार चार्जिंग स्टेशन्स देशात उभारण्यात येतील, अशी
माहितीही पांडे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ५ लाख कोटींची अर्थव्यवस्था बनविण्याचे जे स्वप्न पाहिले
आहे ते पूर्ण करण्याच्या दिशेने वाहनउद्योग क्षेत्राचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे असे सांगत डॉ.
पांडे म्हणाले, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाहनउद्योग क्षेत्राचे योगदान हे १४ ते १५
टक्के असून येत्या काळात हे २५ ते ३० % नेण्याच्या दृष्टीने आम्ही वाहनउद्योग क्षेत्राला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. याबरोबरच भारतातील वाहन उद्योग क्षेत्राला
जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.
प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंन्टिव्ह (पीआयएल) योजना १ व २ आणि फास्टर अॅडॉप्शन अॅण्ड
मॅन्युफ्रॅक्चरिंग ऑफ हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेईकल (एफएएमई) योजना १ व २ यांद्वारे उद्योग
क्षेत्राला कशा पद्धतीने मदत करण्यात येत आहे याविषयी मेहता यांनी माहिती दिली. या
सबसिडीमध्ये सुमारे १०० हून अधिक वाहन उद्योगांशी संबंधित सुट्या भागांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या विविध योजनांमुळे इलेक्ट्रिक वाहने क्षेत्राला प्रति गिगा व्हॅट ३६२ कोटी इतकी मदत होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.        
भविष्यातील ड्रोनची आवश्यकता व उपयुक्तता लक्षात घेत उच्च तंत्रज्ञान असलेल्या ड्रोनची
निर्मिती देशातच व्हावी यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाने १२० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध
करून दिली आहे. सदर प्रकल्पावरील यापुढील काम केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वतीने
करण्यात येईल, असेही पांडे यांनी नमूद केले.

बोपोडीत शासन आपल्या दारी उपक्रमास उदंड प्रतिसाद

0

पुणे: कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पीएमपीएलचे संचालक प्रकाशभाऊ ढोरे व भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या वतीने बोपोडी येथील राजेंद्रप्रसाद विद्यालयात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. म्हणूनच सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात बोपोडी मध्ये करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बोपोडी येथे शासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थतीत राहणार आहेत. हे शिबिर शनिवार (दि. २०) व रविवार (दि.२१) दोन दिवस चालणार आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना संजय गांधी निराधार योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड,श्रावण बाळ योजना, विधवा, अपंग वेतन योजना, नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड दुरुस्ती करणे, नवीन वीज मीटर बसवणे, महा ई सेवा अंतर्गत येणाऱ्या सेवा, शहरी गरीब योजना, नवीन मतदार नोंदणी व नाव दुरुस्ती करणे, तलाठी रहिवासी दाखला, डोमीसाईल सर्टिफीकेट, उत्पन्न दाखला, प्रतिज्ञापत्र आदी सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. औंध बोपोडी भागातील नागरिकांचा याला उत्तम प्रतिसाद लाभत असून सकाळपासून येथे लोकांनी रांगा लावत गर्दी केली होती. 

…अन् ८५ मिनिटांसाठी कमला हॅरिस झाल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष

0

कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या पहिल्या भारतीय वंशाच्याच नाही, तर आशियायी महिला व्यक्ती ठरल्या.अमेरिकेच्या अध्यक्ष देखील आता त्या ठरल्यात . हा इतिहासात नोंद होईल असा विक्रम झालाय. आता त्या ८५ मिनिटांसाठी अमेरिकेच्या अध्यक्ष देखील झाल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्वतः शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) आपले राष्ट्राध्यक्ष म्हणून सर्व अधिकार कमला हॅरिस यांना दिले. बायडन यांचे माध्यम सचिव जेन साकी यांनी याबाबत माहिती दिली.

त्याचे असे झाले …

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांची दैनंदिन आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांची कोलोनोस्कोपीची चाचणी करण्यात येणार होती. या चाचणीसाठी त्यांना काही वेळ भूल देण्यात येणार होती. त्यामुळे या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे सर्व अधिकार बाडयन यांनी कमला हॅरिस यांना दिले. बायडन यांच्या शरिराची पूर्ण तपासणी अमेरिकेतील वॉल्टर रिड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमध्ये करण्यात आली.

अमेरिकेचं अध्यक्षपद स्विकारल्यानंतर जो बायडन यांची ही पहिली ‘फूल बॉडी एक्झामिनेशन’ आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर बायडन यांनी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी कमला हॅरिस आणि व्हॉईट हाऊसचे चिफ ऑफ स्टाफ रोन क्लेन यांच्याशी चर्चा करून पुन्हा कार्यभार स्विकारला.

अमेरिकेच्या अध्यक्षपदावर काम करणाऱ्या कमला हॅरिस पहिल्या महिला ठरल्या आहेत. याआधी त्या उपाध्यक्ष पदावर काम करणाऱ्या पहिला आशियायी महिला ठरल्या होत्या. हॅरिस यांच्याकडे १९ नोव्हेंबरला सकाळी १० वाजून १० मिनिटांनी राष्ट्राध्यक्षपदाचे अधिकार आले. ते ११ वाजून ३५ मिनिटांपर्यंत होते. नंतर बायडन शुद्धीत आल्यावर पुन्हा हे अधिकार बाडयन यांच्याकडे गेले.

आंदोलनात शहीद झालेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक-एक कोटींची भरपाई द्या; आता हमीभावावर कायदा आणा -वरुण गांधी

0

नवी दिल्ली- काल पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आज भाजपा खासदार वरून गांधी यांनी हे कायदे आधीच मागे घ्यायला हवे होते. शेतकरी आंदोलनात तब्बल 700 शेतकरी शहीद झाले. त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक-एक कोटी रुपये द्यावे अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधानांना पाठविले आहे.

आंदोलन सुरू असताना अनेक शेतकऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्या. त्या सुद्धा रद्द करण्यात याव्या. शेतकऱ्यांची दुसरी मागणी होती की त्यांना किमान आधारभूत किंमत अर्थातच हमीभाव मिळावा. केंद्र सरकारने वादग्रस्त कृषी कायदे परत घेतले. आता सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल यासाठी कायदा करावा. जेणेकरून आंदोलक शेतकरी सन्मानाने आपल्या घरी परततील.

भाजप खासदार वरुण गांधी यांनी केवळ शेतकरी आंदोलनच नव्हे तर लखीमपूर खिरी येथील घटनेवरूनही आपल्याच पक्षाच्या सरकारला घेरले. लखीमपूरमध्ये 5 शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. ही घटना लोकशाहीवर काळा डाग आहे. या प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा वरुण गांधी यांनी केली.

उच्च पदस्थ नेत्यांनी सुद्धा कृषी कायद्यांच्या विरोधात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या. त्याच उपेक्षेतून लखीमपूर खिरी सारख्या घटना घडल्या. लखीमपूरमध्ये ऑक्टोबर महिन्यात पाच शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. ही घटना लोकशाहीवर एक काळा डाग आहे. त्या प्रकरणाची सुद्धा निःपक्ष चौकशी व्यायला हवी. यामध्ये सहभागी असलेल्या केंद्रीय मंत्र्यावर सुद्धा कठोर कारवाई करायला हवी. सरकार लवकरच या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेईल अशी अपेक्षा करतो असेही वरुण गांधी यांनी आपल्या पत्रातून लिहिले आहे.

मुंबई हायकोर्ट म्हणाले- आर्यन खानला आरोपी सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही,जामीन आदेश केला सार्वजनिक..

0

मुंबई-क्रूझ ड्रग्ज प्रकरणात 26 दिवस कोठडीत असलेल्या आर्यन खानविरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडे कोणतेही पुरावे नाहीत. बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन आदेश शनिवारी सार्वजनिक करण्यात आला. जामीनाच्या आदेशासह न्यायालयाने 14 पानांचे आदेश देताना आर्यन आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

जामीन आदेशासह, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, “सर्व आरोपींनी बेकायदेशीर कृत्य करण्याचा समान हेतू आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ऑन-रेकॉर्ड सकारात्मक पुरावा कोर्टासमोर सादर केला गेला नाही.” “अर्जदारांविरुद्ध कट रचल्याचा खटला सिद्ध करण्यासाठी पुराव्याच्या स्वरूपात मूलभूत सामग्री असली पाहिजे या वस्तुस्थितीबाबत न्यायालय संवेदनशील आहे,” असेही त्यात म्हटले आहे.

कोर्ट पुढे म्हणाले, ‘केवळ आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा एकाच क्रूझवर होते, त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप होऊ शकत नाही.’

कबुलीजबाबावर विसंबून राहू शकत नाही- हायकोर्ट

मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या 14 पानांच्या रिलीझ ऑर्डरमध्ये असेही म्हटले आहे की एनसीबी तपास अधिकाऱ्याने नोंदवलेल्या सर्व आरोपींच्या कबुली जबाबावर अवलंबून राहू शकत नाही कारण ते बंधनकारक नाही.

2 ऑक्टोबर रोजी घेण्यात आले होते ताब्यात

2 ऑक्टोबरच्या रात्री NCB ने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordeal क्रूझ जहाजावर जाणाऱ्या रेव्ह पार्टीवर छापा टाकला, आर्यन खानसह मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट आणि अनेकांना ड्रग्ज घेण्याच्या आणि व्यापाराच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते. आर्यन आणि त्याच्या साथीदारांना 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर करण्यात आला होता. जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हटले होते की, आर्यन खानला दर आठवड्याला एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागेल.

काय होत्या हायकोर्टाच्या अटी

आर्यन खानला 28 ऑक्टोबर रोजी 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता, परंतु कागदोपत्री उशीर झाल्यामुळे तो 29 ऑक्टोबर रोजी तुरुंगातून घरी पोहोचला होता. त्यांना उच्च न्यायालयाचा 5 पानी आदेश प्राप्त झाला होता, ज्यामध्ये त्यांना दर शुक्रवारी रात्री 11 ते 2 या वेळेत एनसीबी कार्यालयात यावे लागेल, अशी अट घालण्यात आली होती. तसेच आर्यन पोलिसांना माहिती दिल्याशिवाय शहराबाहेर जाऊ शकत नाही. जामिनानंतर आर्यन इतर आरोपींशी संपर्क साधू शकत नाही, तसेच त्याला या प्रकरणात सार्वजनिक किंवा सोशल मीडियावर वक्तव्य करण्याची परवानगी नाही. 14 अटींमध्ये अशीही अट आहे की आर्यन भविष्यात अंमली पदार्थांशी संबंधित क्रियाकलापांचा भाग होणार नाही.

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आता ७५ व ८० टक्के अनुदानावर मिळणार;अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार – कृषि मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

0

मुंबई, दि. २० :-  शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान (केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के) कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते. शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी फिली आहे.

या योजनेमध्ये राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील, शेतकरी आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त अशा एकूण २४६ तालुक्यांचा समावेश होता. शासनाने उर्वरित १०६ तालुक्यांचा समावेश करुन सदर योजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे. राज्यामध्ये आतापर्यंत २५.७२ लक्ष हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून, या नवीन योजनेमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता रु.५८९ कोटी रकमेस शासनाची प्रशासकिय मान्यता आहे. सूक्ष्म सिंचनाची योजना ‘मागेल त्याला ठिबक’ या तत्त्वावर राबविणार असून अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे. लाभार्थ्याची पारदर्शकपणे निवड करणेसाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले असून, त्यावर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन योजनेचा लाभ घेता येईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने सादर करून सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.

ट्रेचिंग निविदेतील घोटाळ्याची चौकशी करा- भाजपाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

0

मुंबई- महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या ट्रेचिंग निविदेत सत्ताधारी शिवसेनेने प्रशासनाच्या मदतीने १०० कोटींचा भ्रष्टाचार केला असून या निविदा तातडीने रद्द करून यातील घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पालिकेतील भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे, प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक भालचंद्र शिरसाट, महापालिकेतील पक्ष नेते विनोद मिश्रा, प्रविण छेडा आदी या प्रसंगी उपस्थित होते.
आ. कोटेचा यांनी सांगितले की, महापालिकेतील पक्ष नेते विनोद मिश्रा यांनी महापालिका आयुक्तांना २८ ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून ट्रेचिंग निविदेत सत्ताधारी शिवसेनेच्या मदतीने काही कंत्राटदार संगनमताने घोटाळे करतील तसेच या निविदांच्या अटी व शर्ती बदलल्या जातील असे कळविले होते. १७ नोव्हेंबर रोजीही मिश्रा यांनी आयुक्तांना पुन्हा पत्र पाठवून निविदा प्रक्रियेतील संभाव्य घोटाळ्यांची पूर्वसूचना दिली होती. कंत्राटदारांकडून आपसात संगनमत करून कोणत्या दरांमध्ये निविदा भरली जाईल याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला होता. १८ नोव्हेंबर रोजी निविदा सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर मिश्रा यांनी आयुक्तांना दिलेली माहिती खरी होती हेच सिद्ध झाले.
मिश्रा यांनी आयुक्तांना पत्र पाठवूनही महापालिका प्रशासनाने निविदेत घोटाळे होऊ नयेत यासाठीची प्रतिबंधात्मक दक्षता घेतली नाही. २६ ऑगस्ट रोजी ट्रेचिंगच्या याच कामाची निविदा प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी पाच कंत्राटदारांनी या निविदेत ३८० कोटींची बोली सादर केली होती. मात्र १८ नोव्हेंबर रोजी ५६९ कोटींची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अवघ्या ३ महिन्यात निविदा रकमेत एवढी मोठी वाढ झाली आहे. या घोटाळ्याची पालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी आ. कोटेचा यांनी यावेळी केली.
एका ‘डीजे’ मालकाने या निविदेसाठी १०० कोटींची सुपारी घेतली असल्याचा आरोप श्री. विनोद मिश्रा यांनी यावेळी केला. या निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांवर पालिकेची फसवणूक केल्याबद्दल एफआयआर दाखल करावा तसेच या या कंत्राटदारांचे मोबाईल वरील संभाषण, व्हाटस अप चॅट तसेच या मंडळींच्या विलेपार्ले येथील हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीचे सीटीव्हीही चित्रीकरण मिळवावे आदी मागण्याही श्री. मिश्रा यांनी केल्या.

‘मर्सिडीज-बेंझ’ची सर्वात शक्तीशाली ‘लक्झरी हॅच’ भारतात दाखल

0

ü नव्याने विकसीत केलेले ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ हे 2.0 लिटर क्षमतेचे, या उत्पादन मालिकेतील जगातील सर्वात शक्तीशाली ‘टर्बोचार्ज्ड फोर-सिलिंडर इंजिन’.

ü ‘मर्सिडीज-एएमजी’कडे आता भारतात ‘एएमजी’ची 13 उत्पादने, कोणत्याही परफॉर्मन्स ब्रँडसाठी ही सर्वात मजबूत बांधणीची वाहने.

ü ‘ए-क्लास लिमोझिन’, ‘एएमजी ए35 सेडान’ आणि ‘मर्सिडीज-एएमजी ए45 एस 4एम+ हॅच’ यांचा समावेश असलेल्या ‘ए-क्लास’ उत्पादन पोर्टफोलिओमध्ये भर.

·         नवीन विकसित 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन हुडच्या खाली बसविलेले; या इंजिनमधून 421 एचपी शक्तीची निर्मिती – भारतातील कोणत्याही हॅचबॅकसाठी ही सर्वात जास्त.

·         जगभरात उपलब्ध असलेल्या सर्वात वेगवान ‘एएमजी हॅच’पैकी एक; शून्य ते शंभर ही गती केवळ 3.9 सेकंदात.

·         ‘एएमजी ए 45 एस’मधील शक्तीशाली इंजिनच्या गरजेनुसार खास ट्यून केलेले ‘एएमजी स्पीडशिफ्ट डीसीटी 8जी’ ट्रान्समिशन; कारच्या चपळ आणि गतिमान वैशिष्ट्यांमध्ये या ट्रान्समिशनचेही योगदान.

·         ‘एएमजी अॅक्टिव्ह राइड कंट्रोल’ आणि ‘एएमजी टॉर्क कंट्रोल’सह ‘फुल्ली व्हेरिएबल एएमजी परफॉर्मन्स 4मॅटिक+ ऑल-व्हील ड्राइव्ह’ यांच्या संयोजनामुळे कारमध्ये प्रभावी चपळता.

·         ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ची किंमत रु. 79.50 लाख (एक्स-शोरूम अखिल भारतात)

पुणे : मर्सिडीज-बेंझ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ ही ‘जगातील सर्वात शक्तिशाली टर्बोचार्ज्ड फोर-सिलेंडर इंजिन सिरीज प्रॉडक्शन कार’ निर्माण करून आपल्या ‘एएमजी’ गाड्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोलाची भर घातली आहे. ही भारतातील आतापर्यंतची सर्वात वेगवान हॅचबॅक ठरली आहे. ‘ड्रायव्हिंग परफॉर्मन्स’ या एएमजी ब्रँडच्या ब्रीदवाक्याला ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ या गाडीमुळे मूर्त स्वरूप मिळाले आहे. डिझाइनमधील नाविन्यतेसाठी आणि उच्च-श्रेणीच्या कामगिरीसाठी या गाडीने नवीन मानके घालून दिली आहेत. त्यामुळे या नवीन पिढीच्या कारमधून कल्पनातीत पातळीवरील वाहन गतिशीलता आणि स्पोर्टी ड्रायव्हिंगचा अनुभव मिळू शकतो. 

‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ची ‘रिइन्फोर्स्ड बॉडी शेल’, शक्तिशाली इंजिन, ‘ड्रिफ्ट’ ते ‘रेस’ असे ड्रायव्हिंगच्या पद्धतीचे प्रकार, ‘रिवर्क्ड सस्पेंशन’ आणि विशिष्ट ‘स्पोर्टी लूक’ यामुळे या लक्झरी कामगिरी विभागात अतुलनीय स्वरुपाचा ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो. ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मार्टिन श्वेंक यांनी ही बहुप्रतिक्षित नवीन ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ सादर केली. भारतातील ही सर्वात वेगवान हॅचबॅक कार ‘मर्सिडीज-बेंझ’च्या देशभरातील वितरकांकडे आणि ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’च्या ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध असेल.

‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक म्हणाले, “देशातील सर्वात वेगवान हॅचबॅक असलेली नवीन ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ सादर करून आम्ही आमचा ‘ए-क्लास’चा पोर्टफोलिओ मजबूत करीत आहोत. आमच्या पोर्टफोलिओमधील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात डायनॅमिक अशी नवीन पिढीतील स्पोर्ट्स कार सादर करून, आम्ही आमच्या एकूण वाढीच्या धोरणात या विभागाचे महत्त्व अधिक दृढ करीत आहोत. भारतातील ही सर्वात वेगवान हॅचबॅक कार एक उत्तम परफॉर्मन्स मशीन आहे. आमचे ‘एएमजी’चे ग्राहक आणि ‘परफॉर्मन्स प्युरिस्ट’ तिची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘ए 45 एस 4मॅटिक+’ सादर करून आम्ही भारतातील विवेकी ग्राहकांसाठी आमच्या जागतिक पोर्टफोलिओमधील सर्वात इष्ट उत्पादने सादर करण्याची कटिबद्धता अधोरेखित केली आहे.”

‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ची प्रमुख वैशिष्ट्ये :

•    रिइन्फोर्स्ड बॉडी शेल : ‘एएमजी’मधील विकसकांनी या गाडीची बॉडी शेल मोठ्या प्रमाणावर मजबूत केली आहे. जास्त वेगाने गाडी चालत असताना अचूक सेल्फ-स्टीयरिंग वैशिष्ट्यांसाठी, तसेच ट्रॅक व कॅम्बर स्थिरतेसाठी अशी बॉडी विशेष आधार देते.

•    शून्य ते शंभर किमी प्रति तास ही गती 3.9 सेकंदा : चार सिलेंडर असलेली टर्बोचार्ज्ड मोटर अत्यंत चपळाईने वेग घेते आणि केवळ 3.9 सेकंदांमध्ये ताशी शून्य ते शंभर किमी हा वेग पकडते. हिचा कमाल वेग इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या ताशी 270 किमी इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे. उत्कृष्ट कामगिरीच्या या आकडेवारीशिवाय, नवीन इंजिन आपल्या त्वरित प्रतिसादानेदेखील प्रभावित करते.

•    नवीन इंजिनातील डिझाइनची वैशिष्ट्ये : अनेक बुद्धिमान स्वरुपाची वैशिष्ट्ये असलेले या गाडीचे इंजिन उत्कृष्ट कामगिरी करते. गाडीच्या पाठीमागून पाहिले असता, तिचा टर्बोचार्जर व एक्झॉस्ट मॅनिफोल्ड यांची जागा आता मागील बाजूस, ‘फायरवॉल’च्या बाजूला ठेवण्यात आली आहे. अर्थातच, तिची इनटेक यंत्रणा पुढील बाजूस आहे. या रचनेमुळे, गाडीची पुढील बाजू शक्य तितकी सपाट व वायुगतिकीयदृष्ट्या सर्वात फायदेशीर स्वरुपाची करता आली आहे. तसेच त्यामुळे तिच्यात मोठ्या प्रमाणात सुधारित एअर डक्टिंगही शक्य होते.

•    इंजिनच्या कमी स्पीडमध्ये जास्त टॉर्क : नवीन ‘ट्विनस्क्रोल टर्बोचार्जर’मुळे इंजिनची गती कमी असतानाही ‘अप्पर आरपीएम रेंज’मध्ये जास्त शक्ती मिळते. परिणामी, इंजिनचा स्पीड कमी असतानाही जास्त टॉर्क मिळतो आणि इंजिनचा प्रतिसाद अत्यंत चांगला मिळतो.

•    ‘नॅनोस्लाइड’ तंत्रज्ञानाचा वापर : पिस्टन आणि सिलिंडरमधील घर्षण कमी करण्यासाठी, इंजिनच्या लायनिंगवर कोटिंग करण्याकरीता पेटंट घेतलेल्या ‘नॅनोस्लाइड’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे लायनिंगवर काचेसारखा पृष्ठभाग तयार होतो व त्यातून घर्षण अगदी कमीतकमी होते. तसेच या तंत्रज्ञानामुळे लायनिंग हे पारंपरिक ‘ग्रे कास्ट आयर्न’पेक्षा दुपटीहून अधिक हार्ड बनते. त्यामुळे त्याचा टिकाऊपणा वाढतो.

•    ‘एक-माणूस एक इंजिन’ : नवीन इंजिन पूर्णपणे हाताने जोडले जाते. या कारणाकरीता जर्मनीतील अफाल्टरबाच येथील एएमजी इंजिनच्या कारखान्यात नव्याने डिझाइन केलेली उत्पादन लाइन तयार करण्यात आली आहे. ‘मर्सिडीज-एएमजी’ने आपल्या कारखान्यात “एक माणूस, एक इंजिन” हे तत्त्व राबविले आहे आणि ‘इंडस्ट्री 4.0’ प्रक्रिया नाविन्यपूर्ण पातळीवर नेल्या आहेत. या पद्धतीमुळे अर्गोनॉमिक्स, सामग्रीचा प्रवाह, गुणवत्तेची हमी, टिकाऊपणा आणि कार्यक्षमता यांमधील नवीनतम निष्कर्ष प्रतिबिंबित होत आहेत. हाताने असेंब्ली करण्याच्या ‘एएमजी’च्या पद्धतीमुळे ‘इंडस्ट्री 4.0’च्या अंमलबजावणीच्या मार्गावर ‘स्मार्ट उत्पादना’चे धोरण अमलात आणणे सोयीचे झाले आहे. 

•    ‘एएमजी टॉर्क कंट्रोल’ : पूर्णपणे नवीन परिमाणांमध्ये डायनॅमिक ड्रायव्हिंग करण्याचा अनुभव हा संपूर्ण ‘व्हेरिएबल ऑल-व्हील ड्राईव्ह’मुळे मिळू शकतो आणि हा अनुभवच या गाडीमध्ये मानक म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. नवीन ‘रिअर एक्सल डिफरेंशियल’मध्ये समाविष्ट करण्यात आलेले ‘एएमजी टॉर्क कंट्रोल तंत्रज्ञान’ हे यामागील खरे रहस्य आहे. यामध्ये दोन इलेक्ट्रॉनिक नियंत्रित मल्टीडिस्क क्लचेस आहेत, त्यापैकी प्रत्येक क्लच ‘रिअर अॅक्सल’च्या ‘ड्राइव्ह शाफ्ट’ला जोडलेला आहे. अशाप्रकारे, ‘ड्राइव्ह पॉवर’ ही केवळ पुढील व मागील चाकांमध्ये पूर्णपणे वितरीत होत नाही, डाव्या आणि उजव्या मागील चाकांमध्येदेखील ती निवडकपणे वितरीत केली जाऊ शकते.

•    ‘एएमजी ड्रिफ्ट मोड’ : ‘ए 45’मध्ये ‘ड्रिफ्ट मोड’ देण्यात आला आहे. त्यामुळे ड्रायव्हिंगच्या अधिक आनंदासाठी “पॉवर स्लाइडिंग” शक्य होते.

•    ‘एएमजी सस्पेंशन’ : विशिष्ट स्प्रिंग घटकांसह नवीन ‘एएमजी सस्पेंशन’ आणि नवीन, ‘फ्रीक्वेन्सी-सिलेक्टिव्ह’ शॉक अॅबसॉर्बर्स यांच्यामुळे गाडीला उच्च दिशात्मक स्थिरता लाभते, तसेच ‘लो-बॉडी रोल’सह उच्च ‘डायनॅमिक कॉर्नरिंग’ वैशिष्ट्यांसाठी आधारही मिळतो.

•    सहा ‘एएमजी डायनॅमिक सिलेक्ट ड्रायव्हिंग मोड्स’ : स्लिपरी, कम्फर्ट, “स्पोर्ट”, “स्पोर्ट +”, “इन्डिव्हिज्युअल” आणि “रेस” या सहा ड्रायव्हिंग मोड्सच्या माध्यमातून चालकाला ही गाडी आरामदायी ते डायनॅमिक अशा पद्धतींनी चालविण्याचे विविध पर्याय मिळतात.

•    नाविन्यपूर्ण ‘रेस स्टार्ट’ : ‘रेस स्टार्ट’ या वैशिष्ट्यामुळे वाहनाला थांबलेल्या स्थितीतून इष्टतम प्रवेग घेणे शक्य होते.

•    ‘एएमजी परफॉर्मन्स पॅकेज’ : ‘एएमजी परफॉर्मन्स पॅकेज’मुळे ताशी 270 किलोमीटरपर्यंतचा टॉप स्पीड गाठून ही गाडी ‘रेस ट्रॅक’ स्वरुपाची कामगिरी करू शकते.

•    ‘एएमजी ट्रॅक पेस’ : विशेषकरून ड्रायव्हिंग क्षमतेचे विश्लेषण आणि सुधारणा करण्यासाठी या गाडीमध्ये ‘पर्सनल रेसिंग इंजिनीअर’ हे वैशिष्ट्य आहे. ते ‘एमबीयूएक्स मल्टीमीडिया’ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. 

बाह्य डिझाइन :

नवीन ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ ही गाडी तिच्या अगोदरच्या मॉडेल्सपेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रथमच एखाद्या ‘कॉम्पॅक्ट क्लास कार’मध्ये ‘एएमजी-स्पेसिफिक रेडिएटर ग्रिल’ देण्यात आले आहे. ही गाडी ‘एएमजी परफॉर्मन्स फॅमिली’ची सदस्य आहे, हे यातून स्पष्ट होते. ‘पॉवरडोम’सह ‘एअरोडायनामिक बॉनेट’, ‘मल्टी-बीम एलईडी हेडलाइट्स’ या बाबी एका आकर्षक व शक्तिशाली कारची छाप निर्माण करतात. पुढील विस्तीर्ण विंग्ज, ‘फ्लेअर्ड व्हील आर्च’ आणि ‘एएमजी अलॉय व्हील’ यांतूनदेखील गाडीची प्रभावशाली उपस्थिती लक्षात येते. या गोष्टींमधून ‘वाईडर अॅक्सल’साठी जागा तयार होते आणि गाडीचे ‘अॅथलेटिक’ स्वरूप दिसून येते. गाडीच्या मागील बाजूस दोन गोल ‘ट्विन टेलपाइप्स’ (90 मिमी व्यासाचे) आणि रुंद स्वरुपाचे ‘रीअर एप्रन’ यांचे दृष्य दिसते.

आतील वैशिष्ट्ये :

या गाडीचे स्वरूप स्पोर्टी असल्याने, तीमधील उच्च-दर्जाचे आतील भाग हे मनुष्य आणि यंत्र यांच्यात जवळचे, वैयक्तिक नाते तयार करतात. ड्रायव्हर आणि पुढचा प्रवासी हे कंटूर केलेल्या ‘एएमजी स्पोर्ट सीट्स’वर सक्रिय स्थितीत बसलेले असतात आणि त्यांना घट्ट आधार मिळालेला असतो. काळे ‘आर्टिको’ मानवनिर्मित लेदर आणि ‘डायनामिका मायक्रोफायबर’ यांचे संयोजन असलेली गाडीतील स्टॅंडर्ड अपहोल्स्ट्री कालातीत आहे आणि लाल रंगात डबल टॉपस्टिचिंग केल्यामुळे ती वैशिष्ट्यपूर्ण ‘एएमजी हायलाइट्स’ तयार करते. गाडीच्या रंगयोजनेमध्ये लाल रंगाचा वापर करण्यात आला आहे. ‘डिझाइनो सीट बेल्ट’ आणि काळ्या ‘डायनामिका मायक्रोफायबर’मध्ये लाल बॉर्डरसह असलेली ‘डॅशबोर्ड सपोर्ट ट्रिम’ ही संरचना खुलून दिसते. ‘सन यलो’, ‘पोलर व्हाइट’, ‘माउंटन ग्रे’, ‘डिझाइनो पॅटागोनिया रेड’, ‘डिझाइनो माउंटन ग्रे मॅग्नो’ आणि ‘कॉसमॉस ब्लॅक’ या रंगांमध्ये ही गाडी उपलब्ध असेल.

ड्रायव्हिंगचा अनुभव :

‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ ही गाडी तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि सुरक्षितता या प्रमुख घटकांना एकत्र आणून एक अतुलनीय ड्रायव्हिंगचा अनुभव देते. स्पोर्टी ड्रायव्हिंगची मजा आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंगचा अनुभव मिळावा, यासाठी ‘हेड-अप डिस्प्ले विंडस्क्री’नचे रुपांतर एका रोमांचक व्यापक ‘डिजिटल कॉकपिट’मध्ये करता येते. मनोरंजनाच्या बाबतीतही, ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ या गाडीत 12 स्पीकरची व 590 वॅट आऊटपुट देणारी ‘हाय-एंड बर्मेस्टर साउंड सिस्टीम’ बसविण्यात आली आहे.

सुरक्षिततेची वैशिष्ट्ये :

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून, ‘ब्लाइंड स्पॉट असिस्ट’सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश केल्याने लेन बदलण्यापूर्वी ड्रायव्हर सावधतेने कारच्या बाजूच्या आणि मागील भागांचे निरीक्षण करू शकतो. तसेच ‘अॅक्टिव्ह लेन कीपिंग असिस्ट’मुळे ड्रायव्हरला लेनमध्ये वाहन चालवण्यात मदत होते. ‘एएमजी परफॉर्मन्स ब्रेकिंग सिस्टीम’चा उपयोग फेड (तीव्र उष्णतेचा परिणाम) कमी करण्यासाठी आणि तातडीने, स्थिरपणे गाडीचा वेग मंदावण्यासाठी  केला जातो.

व्यक्तिगत स्वरुपाचे पर्याय :

ग्राहकांना संपूर्ण व्यक्तिगत अनुभव प्रदान करण्यासाठी, ‘एएमजी एक्सटिरियर सिल्व्हर क्रोम पॅकेज’ देण्यात येते. त्यातून ‘मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+’ या गाडीच्या विशेष गुणधर्मांत भर पडते. यामध्ये ‘फ्रंट स्प्लिटर इन्सर्ट’, ‘एएमजी परफॉर्मन्स सीट्स’, ‘हेड-अप डिस्प्ले’ यांसह इतरही काही गोष्टींना ग्राहक व्यक्तिगत स्वरूप देऊ शकतात.

तांत्रिक माहिती एका दृष्टिक्षेपात

 मर्सिडीज-एएमजी ए 45 एस 4मॅटिक+
इंजिन2.0-लिटर 4 इन-लाईन विथ रोलर वेअरिंग ट्विनस्क्रोल टर्बोचार्जर
डिसप्लेसमेंट1991 सीसी
कमाल आउटपुट421 एचपी – 6750 आरपीएम / 310 केडब्ल्यू / 421 एचपी
पीक टॉर्क500 एनएम – 5000-5250 आरपीएम
ड्राईव्ह सिस्टीमएएमजी परफॉर्मन्स 4मॅटिक+ फुल्ली व्हेरिएबल ऑल-व्हील ड्राईव्ह विथ एएमजी टॉर्क कंट्रोल
ट्रान्समिशनएएमजी स्पीडशिफ्ट डीसीटी 8जी ड्युएल-क्लच ट्रान्समिशन
अॅक्सलरेशन 0-100 किमी/तास3.9 सेकंद
टॉप स्पीड270 किमी / तास ***

इफ्फी 52 चा प्रारंभ होणार स्पॅनिश संगीताचा आनंद देणाऱ्या ‘ द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’ च्या आंतरराष्ट्रीय प्रिमियरने

0

पणजी(शरद लोणकर )

आशियामधील सर्वाधिक जुन्या आणि भव्य चित्रपट महोत्सवाची सुरुवात होणार आहे एका संगीतमय चित्रपटाच्या प्रदर्शनाने. ही सुरुवात नक्कीच संगीतामधील सामर्थ्याविषयी मानवाला असलेला जिव्हाळा आणि परस्परांमध्ये बंध निर्माण करून त्यांची जोपासना करण्याची अमर्याद क्षमता यांची प्रचिती देणारी ठरेल. कारण 52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात होणार आहे,  एका संगीत सोहळ्याच्या आयोजनावर आधारित असलेल्या ‘ द किंग ऑफ ऑल द वर्ल्ड’(El Rey de Todo El Mundo) या स्पॅनिश म्युझिकल ड्रामाने. कार्लोस सौरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. मेक्सिको आणि स्पेन यांची संयुक्त निर्मिती असलेला हा चित्रपट म्हणजे मेक्सिको आणि स्पेन या दोन्ही देशांना कलेच्या माध्यमातून जोडण्याचा आणि या दोन्ही देशांमध्ये एकेकाळी असलेल्या संबंधांचे संगीत आणि नृत्याचे नव्या आणि आधुनिक प्रकारांमध्ये मिश्रण करून पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आहे.

मेक्सिकन कोरिओग्राफर साराच्या भोवती या चित्रपटाचे कथानक फिरते. साराला तिच्या पूर्वाश्रमीचा पती आणि  रंगमच दिग्दर्शक असलेल्या मॅन्युएल जी याने एका नव्या म्युझिकल शो ची निर्मिती करायला निमंत्रित केले आहे. या चित्रपटात इनेस(ऍग्नेस) नावाच्या एका तरुणीची देखील कहाणी आहे जी एक उदयोन्मुख कलाकार आहे आणि तिचे वडील आणि स्थानिक गटांना तोंड देत आहे.

दोन देशांमधील संबंधांचे पुनरुज्जीवन करणाऱ्या या चित्रपटात दोन्ही देशांच्या कलाकारांची आणि नर्तकांची मांदियाळी आहे. ऍना डे ला रेगेरा, मॅन्युएल गार्सिया रुल्फो, डॅमियन अल्काजार, एन्रिक आर्स, मनोलो कार्दोना, आयझॅक हर्नांडेझ आणि ग्रेटा एलिजोंदो यांनी यात भूमिका साकारल्या आहेत.अतिशय उत्तमोत्तम चित्रकृतींचा समावेश असलेल्या या नऊ दिवसांच्या 52 व्या इफ्फी महोत्सवाचा प्रारंभ शोकांतिका, काल्पनिक कथा आणि वस्तुस्थिती यांचा मेळ असलेल्या संगीतमय मेजवानीने होत आहे. हा चित्रपट महोत्सव गोव्यामध्ये हायब्रिड स्वरुपात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत आहे.

नव्या पिढीतील 75 सर्जनशील व्यक्तिमत्त्वे 52 व्या इफ्फी महोत्सवात होणार सहभागी

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इतिहासात प्रथमच नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी आणि सर्जनशील प्रतिभा असलेली 75 व्यक्तिमत्त्वे गोव्यात होत असलेल्या 52 इफ्फीमध्ये सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत सुरु करण्यात आलेला हा अभिनव उपक्रम देशातील नावनिर्मितीक्षम तरुण कलाकारांना आणि उमलत्या प्रतिभांना ओळखून त्यांना आणखी बहरण्याची संधी देईल.

या उपक्रमासाठी निवडलेली  ’उद्याची 75 सर्जनशील मने’ गोव्यात होत असलेल्या 2021 सालच्या इफ्फीचा भाग असतील आणि त्यांना सर्व तज्ञ वर्गांमध्ये तसेच संवादात्मक चर्चा कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल तसेच इतर अनेक उपक्रमांसह चित्रपट उद्योगातील आघाडीच्या व्यक्तींशी विचारांची देवाणघेवाण करता येईल. या उपक्रमाअंतर्गत निवडण्यात आलेल्या प्रत्येक उमेदवाराची प्रवास तसेच निवास व्यवस्था महोत्सवाच्या आयोजकांकडून केली जाईल.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी 22 ऑक्टोबर रोजी या अभिनव उपक्रमाची घोषणा केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की इफ्फीची 52 वी आवृत्ती भारतभरातील उमलत्या युवा प्रतिभांना चित्रपट निर्माते आणि या उद्योगाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठीचा मंच उपलब्ध करून देईल

देशभरात घेण्यात आलेल्या एका स्पर्धेद्वारे या उपक्रमात सहभागी होणाऱ्या युवा चित्रपट निर्मात्यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी देशभरातून 400 पेक्षा अधिक अर्ज सादर करण्यात आले होते.

’उद्याची 75 सर्जनशील मने’ निवडण्याचे काम खालील मुख्य परीक्षक मंडळ  आणि निवड परीक्षक मंडळ  यांच्याकडे होते :

मुख्य परीक्षक

प्रसून जोशी – प्रसिध्द गीतकार आणि सीएफबीसीचे अध्यक्ष

केतन मेहता – प्रसिध्द दिग्दर्शक

शंकर महादेवन – प्रसिध्द भारतीय संगीतकार आणि गायक

मनोज वाजपेयी – प्रसिध्द अभिनेता

रसूल पुकुट्टी – ऑस्कर विजेते ध्वनी मुद्रक

विपुल अमृतलाल शाह – प्रख्यात निर्माते आणि दिग्दर्शक

निवड परीक्षक

वाणी त्रिपाठी टिकू – निर्माती, अभिनेत्री आणि सीएफबीसी सदस्य

अनंत विजय – लेखक आणि चित्रपट विषयावरील उत्तम लेखनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते

यतींद्र मिश्र – प्रख्यात लेखक आणि इतर प्रकारांतील लिखाण करणारे तसेच  चित्रपट विषयावरील उत्तम लेखनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते

संजय पूरण सिंग – चित्रपट निर्माता, उत्कृष्ट चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते

सचिन खेडेकर – अभिनेता, दिग्दर्शक

दुबई एक्सपोमध्ये ६ चित्रपट, एक मराठी वेब सिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा दाखविण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

0

मुंबई,दि.१९ : दुबई येथे 18 ते 23 नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्सपोमध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या स्वरूपात सादर करण्यात येणार आहे. यादरम्यान सहा चित्रपट, एक मराठी वेबसिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा दुबई एक्सपोमध्ये दाखविण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

दुबईच्या सांस्कृतिक कार्य विभागाने 18 ते 23 दरम्यान दुबई एक्सपोचे आयोजन केले आहे. या एक्स्पोसाठी महाराष्ट्रातून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे सहभागी झाले आहेत.

श्री. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राचे सांसकृतिक वैभव ( संगीत, नाटक, लोककला, सिनेमा, सांस्कृतिक परंपरा) याची झलक या एक्स्पोमध्ये दाखविण्यात येईल. कडू गोड, तक तक, ताजमहल, बारडो, गोष्ट एका पैठणीची, गोदाकाठ असे ६ चित्रपट, वेब सिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा यावेळी दाखविण्यात येणार असून यामध्ये २० लोककलाकार सहभागी होणार आहेत.

या एक्सपोदरम्यान महाराष्ट्रामध्ये चित्रीकरणासाठी एक खिडकी योजनेद्वारे काय सुविधा देण्यात येतात, महाराष्ट्रात चित्रीकरण कसे चालते, येणाऱ्या काळात नेमक्या काय सुविधा असणार आहेत याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री यावेळी आयोजित करण्यात येणाऱ्या गोलमेज चर्चासत्रात देणार आहेत.

दुबई एक्स्पो गेल्या वर्षी दुबईमध्ये आयोजित करण्यात येणार होता, परंतु कोविड या जागतिक महामारीमुळे हा एक्स्पो गेल्या वर्षी आयोजित ना करता यावर्षी आयोजित करण्यात आला आहे.

मुख्य सभेतील गदारोळानंतर महापालिकेला १ कोटीची टोपी घालू पाहणाऱ्या प्रकरणात एका कर्मचाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल

0

पुणे : स्मशानभुमीतील वीजेची कामे पुर्ण केल्याचे भासवून महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करुन एका कर्मचाऱ्याने महापालिकेची तब्बल 99 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.महानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत याप्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आला.याप्रकरणी योगेश चंद्रशेखर मोरे ( रा. गणेश पार्क, सिंहगड रोड ) असे गुन्हा दाखल झालेल्या महापालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी प्रल्हाद पवार यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 फेब्रुवारी ते 21 ऑक्‍टोबर 2021 या कालावाधीत घडला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे यांनी दिलेल्या माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेचा कर्मचारी असलेल्या मोरे याने बाणेर, नवी पेठ व कोथरूड महापालिकेच्या स्मशानभूमीतील विद्युत विभागाची काही कामे पुर्ण झाली असल्याचे भासविले. त्यानंतर त्याने 99 लाख 8 हजार रुपयांची बनावट बिले तयार केली. संबंधीत बिले खरी असल्याचे भासविण्यासाठी त्याने महापालिकेच्या सर्वसाधारण फॉर्म बिल तयार केले. त्यावर त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करुन शिक्के मारले. तसेच या बिलांचे परस्पर कार्यालयीन जावक करून ती बिले मंजुरीसाठी आरोग्य विभागाकडे पाठवली होती.मोरे याने बनावट बिले सादर करीत, ती मंजूर करून महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली.

“कंगना, विक्रम गोखले आणि अवधुत गुप्ते यांनी ८ दिवसात माफी मागावी, अन्यथा घराबाहेर…”, उपराकार लक्ष्मण मानेंचा इशारा

0

पुणे- कंगना, विक्रम गोखले आणि अवधुत गुप्ते यांनी ८ दिवसात माफी मागावी, अन्यथा पुण्यात विक्रम गोखले यांच्या  घराबाहेर सत्याग्रह करणार असल्याचे उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले .

सिनेअभिनेत्री आणि पद्मश्री कंगना रणौत हिने देशाला भीक म्हणून स्वातंत्र्य मिळाल्याचे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर तिच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली. मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी त्या विधानचे समर्थन केले. यानंतर गायक अवधूत गुप्ते यांनी देखील गोखले अभ्यासपूर्वक बोलतात म्हणत अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला. त्या पार्श्वभूमीवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आज (१९ नोव्हेंबर) पुण्यात उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन तिघांच्या विधानाचा निषेध नोंदवला. तसेच येत्या ८ दिवसात या तिघांनी देशातील जनतेची माफी मागावी, अन्यथा पुण्यात विक्रम गोखले यांच्या  घराबाहेर सत्याग्रह करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लक्ष्मण माने म्हणाले, “सिनेअभिनेत्री कंगना रणौत हिने पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर एका कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्यानंतर विक्रम गोखले आणि गायक अवधूत गुप्ते यांनी देखील समर्थन केले. त्यामुळे मी तिघांचा निषेध व्यक्त करतो. देशाच्या स्वातंत्र्या लढ्यात जे शहीद झाले त्या सर्वांचा तिघांनी अपमान केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तातडीने कारवाई झाली पाहिजे. याविरोधात आज मी पोलिसांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.”“मी आंबेडकरवादी असून मला महात्मा गांधी, सावरकर आणि लोकमान्य टिळक यांचे विचार पटत नाही. पण त्यांचे देशाच्या जडणघडणीत आणि स्वातंत्र्यामध्ये योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्यावर कोणीही बोलणार असेल तर मी सहन करणार नाही. जे लोक आज स्वातंत्र्याबद्दल बोलत आहे त्या लोकांचे देशासाठी काय योगदान आहे? या तिघांपैकी एकाने पुढे येऊन या प्रश्नाचं उत्तर द्यावं,” असं आव्हान लक्ष्मण माने यांनी तिघांना दिलं.

कंगना, गोखले, गुप्ते यांचे शिक्षण किती हे मला माहीत नाही. मात्र, २०१४मध्ये देश स्वतंत्र झाला, असे यांना वाटत असेल, तर यासारखी दुर्देवी गोष्ट नाही. केंद्र सरकारसह काही मंडळींना देशाचा इतिहास खोडून २०१४पासून इतिहास मांडायचा आहे. २०१४पासून देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही तर या स्वातंत्र्याचा संकोच झाला आहे, असे जग सांगत आहे. २०१४पासून हुकुमशाही वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुन्हा चातुर्वण्य व्यवस्था आणि हुकुमशाही आणायची आहे. त्यांच्याविषयी लोकांमध्ये असंतोष आहे, याकडे लक्ष वेधत, ज्यांना गांधीमार्ग कळत नाही, त्यांनी गांधींबद्दल बोलू नये, अशा शब्दात माने यांनी कंगनाला फटकारले.

शेतकरी- मजुरांच्या विरोधातले षडयंत्र अखेर हरले…

0

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, 700 हून अधिक शेतकरी कुटुंबांचे बलिदान, ज्यांच्या सदस्यांनी या न्यायाच्या लढाईत आपले प्राण दिले, त्यांचे बलिदानाचे चीज झाले आहे. आज आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली त्यानंतर केंद्र सरकारवर निशाणा साधत सोनिया गांधी म्हणाल्या की, आज सत्तेत असलेल्यांनी शेतकरी आणि मजुरांच्या विरोधात रचलेले षडयंत्र हरले आहे, हुकूमशाही राज्यकर्त्यांचा अहंकारही त्यामुळे नष्ट झाला आहे. आज रोजीरोटी आणि शेतीवर हल्ला करण्याचा कट फसला आहे. आणि अन्नदात्यांचा विजय झाला आहे असे सोनिया गांधी म्हणाल्या.

महिला काॅंग्रेस कमिटीच्या वतीने साखर वाटून जल्लोष

0

पुणे-केंद्र सरकारने तीन जुलमी काळे कृषी कायदे मागे घेण्याचे निर्णयाबद्दल आणि शेतकऱ्यांचे एकजूटीचा विजय आहे याबद्दल शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्यासाठी आज पुणे शहर महिला काॅंग्रेस कमिटीच्या वतीने अलका टॉकीज चौक येथे साखर वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी माजी आमदार दिप्ती चवधरी,माजी महापौर कमल व्यवहारे,पुणे शहर महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस सौ. सोनाली मारणे या मान्यवर सह राजश्री अडसूळ, सीमा महाडिक नलीनी दोरगे,पपीता सोनावणे, शर्वरी गोतारणे, रसिका बागवान गीता मारू,कोनिया ओव्हाळ योगिता सुराणा सुंदर ओव्हाळ, ज्योती परदेशी शिवानी माने.हलीमा शेख ज्योती अरवेन,शारदा वीर आणि व स पोळेकर कुणाल काळे मैसि विल्सन विनय ढेरे आषिश व्यवहारे सौरभ अमराळे , भूषण रानभरे मंगल चव्हाण आणि महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां उपस्थित होते