Home Blog Page 2204

फेरफार अदालतीमध्ये प्रलंबित नोंदी निर्गत करून घेण्याचे जिल्हांधिकाऱ्यांचे आवाहन

0

            पुणे दि. 22 : जिल्हा प्रशासनातर्फे 24 नोव्हेंबर रोजी सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले असून फेरफार अदालतीमध्ये फेरफारविषयक प्रलंबित नोंदी निर्गत करुन घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.

            आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड 19 बाबतच्या नियमांचे पालन करुन जिल्हयातील सर्व तालुक्यात फेरफार अदालत चौथ्या बुधवारी 24 नोव्हेंबर आयोजित करण्यात येणार आहे. कोविड -19 चा प्रादुर्भाव कमी झाल्याने सप्टेंबर महिन्यात 8 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या अदालतीमध्ये 2 हजार 941 नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.  पुणे जिल्हयात 22 नोव्हेंबर अखेर मुदत पूर्ण झालेल्या 21 हजार 561 नोंदी प्रलंबित असून यामध्ये प्रामुख्याने साध्या/वारस/तक्रार व मुदत पुर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गत करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

            फेरफार अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी यापूर्वीच नियुक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी मंडळाच्या मुख्यालयी आवश्यक ती कागदपत्रांसह नोंदी निर्गत करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहनही  प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

0

            पुणे, दि. 22:- पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी मोटार वाहन कर व दंड भरुन येत्या ७ दिवसांत सोडवून घ्यावी.

         या कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. त्यापैकीच २७ वाहनांच्या मालकांना या कार्यालयाने नोटीस पाठविल्या होत्या परंतु वाहन मालक नोंदणीकृत पत्त्यावर आढळून न आल्याने अशा नोटीस वाहन मालकांना पोच झालेल्या नाहीत. अशा वाहनांची यादी या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे.

        मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार वाहन मालकांनी नोंदणी प्रमाणपत्रावर पत्ता बदल केल्यानंतर याबाबत नोंद ७ दिवसात करावयाची आहे. परंतू पत्ता बदल नोंद न केल्याने वाहन मालकांच्या नवीन पत्त्यावर  पत्रव्यवहार करता येत नाही तसेच त्यांच्यासोबत संपर्कही होत नाही.  अशा वाहन मालकांनी लवकरात लवकर कार्यालयास संपर्क साधावा, अन्यथा ही वाहने बेवारस वाहने असल्याचे समजून सक्षम प्राधिकारी यांच्या परवानगीने अशा वाहनांचा जाहीर ई-लिलाव करण्यात येईल, असे उप प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

कृषि निविष्ठा विक्रेत्यासाठी सीसीआयएम व आएनएम अभ्यासक्रम

0

नोडल प्रशिक्षण संस्थेत  नोंदणी करुन अभ्यासक्रमात सहभागी होता येणार

            पुणे दि22.: कृषि निविष्ठा विक्रेत्यासाठी सीसीआयएम आणि आएनएम ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. कृषि निविष्ठा परवानाधारकांना आवश्यकतेनुसार नोडल प्रशिक्षण संस्थेत  नोंदणी करुन अभ्यासक्रमात सहभागी होता येणार आहे.

            जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेत्यापैकी बऱ्याचशा निविष्ठा विक्रेत्याकडे कृषि विषयक पदवी,पदविका शैक्षणिक अर्हता नाही. त्यानुषंगाने केंद्र शासनाच्या सुचनेनुसार अशा विक्रेत्यांनी वेळेत आवश्यक तो अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण होणार नाही.

            केवळ खतांचा परवाना असलेल्यांनी आयएनएम प्रमाणपत्र अभ्यासक्रम करणे गरजेचे आहे, तर फक्त किटकनाशकांचा परवाना असलेल्यांनी केवळ सीसीआएम प्रमाणपत्र अभ्यासक्रम (ऑनलाईन पदधतीने) करणे गरजेचे आहे.

            कृषि निविष्ठा विक्रेत्याकरिता कृषि पदविका अभ्यासक्रम (देसी/डीएईएसआय) आहे. अभ्यासक्रम १ वर्ष (४८ आठवडे रविवार किंवा आठवड्यातील एक दिवस) असून वर्गाची क्षमता एकुण ४० प्रशिक्षणार्थी प्रति वर्ग यानुसार आहे. सदर अभ्यासक्रमासाठी अनुदानित तत्त्वावरील वर्गास प्रशिक्षणार्थी शुल्क रूपये १० हजार प्रति निविष्ठा विक्रेता तर विनाअनुदानित तत्त्वावरील अभ्यासक्रमास २० हजार रूपये प्रति निविष्ठा विक्रेता यानुसार आकारण्यात आले  आहे.

            पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक अर्हता प्राप्त नसलेल्या खते, औषधे व बि-बियाणे अशा तिनही निविष्ठा विक्रेते धारकांना ‘देसी’ अभ्यासक्रम आवश्यक आहे. सदर निविष्ठा विक्रेता हा किमान दहावी उत्तीर्ण असावा व त्यांनी ‘देसी’ अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित नोडल प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करावी. प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती), शिवाजीनगर, पुणे, कृषि विज्ञान केंद्र, बारामती या संस्थांना नोडल प्रशिक्षण संस्था म्हणून मंजूरी आहे.

            कीटकनाशके कृषि विक्रेत्याकरिता तीन महिन्याचा (१२ आठवडे रविवार किंवा आठवडयातील एक दिवस) सीसीआयएम ऑफलाईन अभ्यासक्रम आहे. वर्गाची क्षमता एकुण ४० प्रशिक्षणार्थी प्रति वर्ग यानुसार आहे. मार्गदर्शक सूचनेनुसार सदर अभ्यासक्रम हा विनाअनुदानित तत्त्वावर असून ७ हजार ६०० प्रति विक्रेता यानुसार शुल्क आकारणी करण्यात आली आहे.

            जिल्ह्यातील आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त नसलेल्या फक्त किटकनाशके विक्रेतेधारकांसाठी सीसीआयएम अभ्यासक्रम आवश्यक आहे. सीसीआयएम अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विहित नमुन्यातील अर्ज भरुन कृषि विज्ञान केंद्र बारामती या नोडल प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करावी.

            कीटकनाशके विक्रेत्याकरिता सीसीआयएम ऑनलाईन हा सलग बारा दिवसाचा अभ्यासक्रम असून वर्गाची क्षमता एकुण ४० प्रशिक्षणार्थी प्रति वर्ग यानुसार आहे. मार्गदर्शक सुचनेनुसार सीसीआयएम हा विनाअनुदानित तत्त्वावर असून ४ हजार ५०० रूपये  प्रति विक्रेता यानुसार शुल्क आकारणी करण्यात  आली आहे.

            आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त नसलेल्या फक्त किटकनाशके विक्रेतेधारकांना या अभ्यासक्रमासाठी विहित नमुन्यातील अर्ज पुर्णपणे भरुन कृषि विज्ञान केंद्र बारामती/नारायणगाव, पद्मश्री प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था (रामेती) पुणे, पशुसंवर्धन महाविद्यालय बारामती, पद्मश्री  अप्पासाहेब पवार कृषि तंत्रनिकेतन महाविदयालय बारामती, ग्रामोन्नती मंडळ कृषि तंत्रनिकेतन महाविद्यालय नारायणगाव, कृषि व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नारायणगाव , शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान पुणे यापैकी एक प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करता येईल.

            खते विक्रेत्यांकरिता सीसीआयएनएम हा १५ दिवसाचा विनाअनुदानित अभ्यासक्रम असून वर्गाची क्षमता एकुण ३० प्रशिक्षणार्थी  प्रति वर्ग यानुसार आहे. अभ्यासक्रमासाठी रूपये १२ हजार ५०० प्रति विक्रेता यानुसार शुल्क आकारण्यात आले आहे.

            जिल्ह्यातील आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त नसलेल्या खत विक्रेतेधारकांसाठी  सीसीआयएनएम अभ्यासक्रम आवश्यक आहे. खत विक्रेता हा किमान दहावी उत्तीर्ण असावा. सीसीआयएनएम अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विहित नमुन्यातील अर्ज पुर्णपणे भरुन कृषि विज्ञान केंद्र बारामती, कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव, कृषि महाविद्यालय पुणे किंवा शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान पुणे यापैकी कोणत्याही नोडल प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करावी.

            कृषि निविष्ठा परवानाधाराकांनी आवश्यकतेनुसार नोडल प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करुन अभ्यासक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक आर.डी. साबळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक आत्मा  पुणे कार्यालयाच्या 020-25530431 या  क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक नगरसेवकाला ‘या’साठी १० /१० लाखाचा निधी

0

पुणे- ऐन महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना आज झालेल्या मुख्य सभेत प्रत्येक नगरसेवकाला बेंचेस म्हणजे , नागरिकांना बसण्यासाठी बाके खरेदी साठी ५ लाख रुपये आणि कचऱ्यासाठी बकेट व अन्य कामासाठी पिशव्या खरेदी साठी ५ लाख असे १० /१० लाखाचा निधी देण्याचा विषय संमत करण्यात आला. या पूर्वीच्या काळात बेंचेस व कचऱ्याच्या बकेट मधील चर्चित घोटाळ्यानंतर या वस्तूंच्या खरेदीला महापालिका आयुक्तांनी लावलेला ‘ब्रेक’ या विषय मंजुरीने ‘सैल’ होणार आहे काय हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे

आज मुख्य सभेत वॉर्ड स्तरीय निधीतून बेंचेस, कापडी पिशव्या आणि बकेट खरेदी प्रत्येकी पाच लाख रुपयांपर्यंत खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.मागील काही वर्षात नगरसेवकांनी कचऱ्याच्या बकेट, बेंचेस, कापडी पिशव्या आणि कचऱ्याच्या ढकल गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. परंतु या खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.खुद्द भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड यांनीही बेंचेस ची मुल किंमत आणि काह्र्देची किंमत यात असलेला चौपट खर्चाची तफावत काही वर्षांपूर्वीच उघड केली होती .

गेल्या २ वर्षात कोरोनामुळे मागीलवर्षी महापालिकेचे उत्पन्न घटले. यामुळे शासन आदेशानुसार महापालिकेने खर्चावर मोठ्याप्रमाणावर निर्बंध आणले आहेत. आयुक्तांनी पालिकेची विकासकामे व खरेदीची प्राथमिकता आणि निर्णय घेण्यासाठी वित्तीय समिती स्थापन केली. या समितीने उत्पन्न व खर्चाचा मेळ घालत अनावश्यक कामे व खरेदीला लगाम लावला. एवढेच नाही तर मागील दोन आर्थिक वर्षात ही खरेदी जवळपास बंद करण्यात आली होती .मात्र आज मुख्य सभेत स्थायी समितीने 2018 मध्ये मंजूर केलेला प्रस्ताव आज एकमताने मंजूर केला.या प्रस्तावानुसार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वॉर्ड स्तरीय निधी वअन्य वर्गीकरणातून एकाच प्रभागात 5 लाख रुपयांपर्यंत बेंचेस, 5 लाख रुपयांपर्यंत बकेट किंवा पिशव्या किंवा ढकलगाडी खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महापालिकेतील भाजपा आणि राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा हातात हात : कॉंग्रेस एकाकी -हतबल सेना तटस्थ.

पुणे- अनेकदा दिसते तसे नसते हे पुणे महापालिकेच्या राजकारणात दिसून आले आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्षपदावर प्रशांत जगताप विराजमान झाल्यानंतर, निवडणूक तोंडावर असतानाही विशेषतः हे जास्त जाणवू लागले आहे . एकीकडे एकमेकांवर तुटून पडणारे हे विरोधक मैत्रीपूर्ण लढती देताना अनेकदा जाणवले आहे . कुठल्या कट्ट्यावर जाणे , किंवा कुठल्या समारंभात जाणे सोडा महापालिकेचे सभागृह अशा बाबींनी रंगमंच बनू पाहते कि काय ? असे वाटावे अशी स्थिती आहे. वास्तविक पाहता महापालिकेचे सभागृह हे जनहितासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील रणधुमाळी माजविणारे सभागृह जनहितासाठी कोण पुढे . याचे वास्तव इथे दिसले पाहिजे असा आजवरचा व्होरा या सर्व पार्श्वभूमीवर आता कुचकामी ठरू पाहत आहे . राष्ट्रवादीने एच सी एम टी आर च्या आरक्षण रचनेत बदल करणारे प्रस्ताव भाजपाला बरोबर घेऊन, कॉंग्रसच्या उघड विरोधात जाऊन मंजूर करवून घेतल्याची घटना १२ ऑक्टोबरच्या मुख्य सभेत दिसून आल्यावर आज चक्क अॅॅडपटीव्ह ट्रॅफिक मॅनेज मेंट सिस्टीम च्या स्मार्ट सिटी च्या 58 कोटीच्या खर्चाला मान्यता देताना भाजपा ला राष्ट्रवादीने उघड पणे मतदान करतच बिनदिक्कत पणे साथ दिली , यावेळी बुचकळ्यात पडलेली सेना तटस्थ राहिली आणि एकाकी पडलेल्या काँग्रेसने अवघ्या ३ मतांनी या प्रस्तावाला विरोध करत अवघ्या ३ विरुद्ध ४५ मतांनी हार मानली आणि हा विषय ४२ मताधिक्याने आजच्या मुख्य सभेत संमत झाला . राष्ट्रवादीच्या आणि कॉंग्रेसच्या ज्या ज्या नेते असलेल्या नगरसेवकांनी या प्रस्तावास जाहीरपणे माध्यमांपुढे येऊन विरोध केला होता ते सर्व या प्रस्तावाच्या वेळी गैरहजर राहिले . राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी तर या विषयावरून भाजपवर प्रचंड टीका केली असताना ऐन वेळी ते हा विषय मतदानाला आला तर भाजप बरोबर राहा असे आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना सांगून सभा अर्ध्यावर सोडून गेले. 

गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या १६० कोटी रुपयांच्या ‘एटीएमए’स प्रकल्पामध्ये महापालिकेने देखभाल दुरुस्तीचा खर्च उचलावा यासाठी पुढील पाच वर्षात ५८ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आयत्यावेळी मंजूर करण्यात आला. यामुळे शहरातील सिग्नल व्यवस्था सुधारणार असल्याचा दावा भाजपने केला. दरम्यान, हे ५८ कोटी रुपयांचे काम भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या संबंधित ठेकेदाराला मिळाले असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला होता . तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याविरोधात पत्रकार परिषद घेतली होती. तसेच काँग्रेसच्या दोन गटांनी याचा स्थायी समितीमध्ये फेरविचार प्रस्ताव हि दिला होता.हा विषय आज मुख्यसभेत मंजुरीसाठी आल्यानंतरफेरविचारासोबत आंदोलन करणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने आज पुन्हा एकदा ‘युटर्न’ घेतला तर फेरप्रस्ताव देणारे कॉंग्रेसचे नगरसेवक सभागृहातून गायब झाले होते. 

काँग्रेसचे अविनाश बागवे व शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांनी विरोध करत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती द्यावी अशी मागणी केली. या प्रस्तावास विरोध झाल्याने मतदान घेण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अचानक भाजपसोबत हात वर करत या प्रस्तावाला मान्यता दिली. तर विरोधात काँग्रेसच्या केवळ तीन जणांनी मतदान केले.पृथ्वीराज सुतारांचा हि विरोध गलितगात्र झाल्याने शिवसेनेने तटस्थ भूमिका घेत भाजपला अप्रत्यक्ष फायदा करून दिला.

त्यांना ‘ उघडे पाडण्यात भाजपाला यश ?

एकीकडे कॉंग्रेसच्या अवघ्या ३ मतांचा विरोध पत्करत भाजपाने हा विषय राष्ट्रवादी ची मते मिळवीत शिवसेनेला तटस्थ ठेऊन मंजूर करवून घेतल्याने भाजपने देखील राष्ट्रवादी ला उघडे पाडल्याचे बोलले जाते आहे. सभागृह नेते बिडकर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षांच्या टीकेला उत्तरे देताना ‘यांना फक्त टेंडर्स मध्येच रस असल्याचे वक्तव्य केले होते .एवढेच नव्हे तर त्यांचा ‘टेंडर जगताप’ असाही उल्लेख करत टीका केली होती . आजच्या या सभागृहातील राष्ट्रवादीच्या घुमजाव ने आणि शहर अध्यक्ष व माजी महापौर असलेल्या जगताप यांच्या आयत्या वेळी कलटी मारण्याच्या घटनेने आता बिडकर यांनी आपल्या वक्तव्याची प्रचीती आणून दिली आहे असा दावाही केला जाऊ शकणार आहे .

सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

0

मुंबई, दि. 23 : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली.

सायबर क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हे सर्वासाठी मोठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. सायबर गुन्हेगारी आणि फॉरेन्सिक सायन्स या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य मिळावे तसेच उभय देशातील संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत अशी अपेक्षा गृहमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्र पोलिसांना पोलिसिंगसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहु असे वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्र्यांना यावेळी सांगितले.

पुढील आठवड्यात सिंगापूर विमानसेवा लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांसाठी सुरु होत आहे. यासाठीही मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळावे असे ही वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी सांगितले. तसेच सिंगापूर राज्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी, कम्युनिटी पोलिसिंग तसेच पोलिसांची कार्यपद्धती या बाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.

युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

0

मुंबई, दि. २२ :- दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक सतिश ननवरे या बारामतीच्या सुपुत्राने यशस्वी कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, अवघ्या अठराव्या वर्षी अभिषेकने केलेल्या या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात, शारिरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेकने १८० किलोमीटर सायकलींग, ४२.२ किलोमीटर धावणे आणि समुद्रात ३.८ किलोमीटर अंतर समुद्रात पोहणे ही आव्हाने १३ तास ३३ मिनीटे अशा विक्रमी वेळेत पूर्ण केली. अभिषेकचे वडील सतिश ननवरे यांनी यापूर्वी आयर्न मॅन हा किताब पटकविला आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अभिषेकने अवघ्या अठराव्या वर्षीच ही यशस्वी कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीचा  सर्वांना अभिमान आहे, त्याच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिषेकचे कौतुक केले आहे.

लांगूलचालनाचे राजकारण करणाऱ्यांना सावरकरांच्या विचारांची भीती-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

0

पुणे, ता. २२ : सावरकरांनी मांडलेले विचार तरुण पीढीला भावतील या भीतीने लांगूलचालनाचे राजकारण करणाऱ्यांनी त्याला विरोध सुरू केला असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
‘मी सावरकर मंच’ आणि ‘हिंदवी स्वराज्य महासंघा’च्या वतीने केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या ‘वीर सावरकर : द मॅन हू कुड हॅव्ह प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना पाटील बोलत होते.
माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, लेखक उदय माहुरकर व चिरायू पंडित, सामाजिक कार्यकर्त्या शेफाली वैद्य, महासंघाचे उपाध्यक्ष विक्रमसिंह मोहिते, मंचाचे अध्यक्ष *धनंजय* बर्वे, *महासंघाचे महामंत्री* रणजित नातू, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांची या वेळी उपस्थिती होती.
पाटील पुढे म्हणाले, ‘ज्या वेगाने सावरकरांनी मांडलेले विचार पुन्हा एकदा समोर येऊ लागले, त्या वेगाने त्यांना विरोध सुरू झाला आहे. सावरकरांचे विचार तरुणांना पटतील, त्याबाबत तरुण आग्रही होतील, राज्यकर्त्यांना जाब विचारु लागगतील ही विरोध करणार्यांना भीती आहे. मात्र आजची पीढी भरपूर वाचन करते, भावनिक विषयांवर नाही तर तथ्यांच्या आधारे आपली मते बनविते त्यामुळे त्यातूनच सावरकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. ‘
प्रकाशनानंतर झालेल्या चर्चासत्रात धर्माधिकारी, माहूरकर आणि पंडित यांनी आपले विचार मांडले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आत्मसात केले असते तर फाळणी टाळता आली असती असे मत धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. घटनेतील ३७० कलम हटविल्याने आणि राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाल्याने सावरकर युगाचा उदय होत आहे.
सावरकरांचा राष्ट्रीय सुरक्षेच्या  विचाराची अंमलबजावणी करणे आवश्यक होते, असे मत माहूरकर यांनी व्यक्त केले. नवीन पीढीच्या विझून गेलेल्या चेतना प्रज्वलित करण्यासाठी चेतविण्याचे काम सावरकर नावाने केले आहे. त्यांचे साहित्य वाचल्यानंतर तुम्ही तटस्थ राहू शकत नाही, त्यांचे भक्तच व्हाल असे पंडित यांनी मत मांडले.रणजित नातू यांनी प्रास्ताविक आणि अमेय कुंटे यांनी आभार प्रदर्शन केले

समाज विकासासाठी तिर्थक्षेत्रांचे ज्ञानतीर्थ क्षेत्र होणे गरजेचे-डॉ. कमल टावरी

0

 विश्‍वशांती केंद्रातर्फे तिर्थक्षेत्राचे रुपांतर ज्ञानतीर्थ क्षेत्रात करणे या परिसंवादाचे उद्घाटन    

पुणे, २२ नोव्हेंबरः आज समाजामध्ये क्रुरता, द्वेष, मत्सर यांबरोबरच अन्य अवगुणांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. या पार्श्‍वभूमीवर करुणा, भावना, सभ्यता, संस्कृती, शास्त्र आणि शांती इत्यादीचे  विकास हा केवळ तिर्थक्षेत्राचे ज्ञानतीर्थ क्षेत्रात रूपांतर झाल्यासच होईल. ती आजच्या काळाची गरज आहे. त्यातूनच समाजाचा सर्वांगिण विकास होईल. अशी भावना भारत सरकारचे माजी सचिव डॉ. कमल टावरी यांनी व्यक्त केली.
अ‍ॅडिशनल अ‍ॅक्शन फॉर पिपल्स प्लॅनिंग अ‍ॅण्ड पॉलिसिज कमिशन्स अ‍ॅपकॉम, नवी दिल्ली व विश्‍वशांती केंद्र आळंदी, पुणे, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने विश्‍वराजबाग, लोणीकाळभोर येथील एडीटी विद्यापीठातील राजकपूर मेमोरिअल सभागृहात तिर्थक्षेत्राचे रुपांतर ज्ञानतिर्थ क्षेत्रात करणे या विषयावर  आयोजित एक दिवसीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्‍वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.  
यावेळी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, इस्लामिक विचारवंत व समाजसेवक डॉ. रफीक सय्यद, पुणे येथील जामा मस्जिदचे मौलाना अयुब अशरफी, थोर साहित्यिक प्रा. रतनलाल सोनाग्रा, डीडी सह्याद्रीचे माजी संचालक मुकेश शर्मा आणि अण्णाहजारे यांच्या आंदोलनातील कार्यकर्ता कल्पना इनामदार हे उपस्थित होते.
डॉ. कमल टावरी म्हणाले, आज समाजामध्ये मोठी स्पर्धा निर्माण झालेली आहे. प्रेम आणि वात्सल्य यावर लक्ष्य केंद्रीत करणे गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन होतांना दिसत आहे. ज्ञान आणि विवेक बुद्धिवर तरुणांनी लक्ष केंद्रीत  करुन त्याला विज्ञानाची जोड दयावी.
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, सध्याच्या जगात वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षणाची अत्यंत गरज आहे. श्री क्षेत्र आळंदी, देहू, पंढरपूर, काशी, बनारस, मक्का मदिना, चर्च, गुरद्वार व अन्य सर्व तीर्थ क्षेत्रे हे खर्‍या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्र आहेत. येथे संतांनी व ऋषीमुनींनी जे ज्ञान उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळेच या तीर्थ क्षेत्रांना विशेष महत्व प्राप्त झाले आहेत. संतानी दिलेला संदेश आजच्या तरूण पिढीने आत्मसात करून जीवनाची वाटचाल करावी.
 प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले, संस्कृती, सभ्यता आणि परंपरेचा विचार केल्यास ते देशातील प्रत्येक धार्मिक स्थळांमध्ये दिसून येते. येथे सुख, शांतीची अनुभूती होत असल्याने लाखो भाविक येथे रोज येतांना दिसतात. याचे मुख्य कारण म्हणजे देशाला एकरुप करण्याची ही एक योजनाच असते. यामुळेच सर्व धार्मिक स्थळे हे ज्ञानाचे केंद्र बनावे.
मौलाना अयुब अशरफी म्हणाले, प्रत्येकाच्या आत्म्यात खुदाचे अस्तित्व जरी असले तरी आपण खुदाने सांगितलेल्या मार्गावर चालल्यास सृष्टीवर कलह होणार नाही. रोजगाराभिमूख शिक्षण असल्याने यातून आदर्श व्यक्तीची निर्मिती होतांना दिसत नाही. शिक्षणातून चांगले व्यक्तित्व निर्माण झाल्यास त्यातून चांगले डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, तंत्रज्ञ घडतील. त्यातूनच एक सुसंस्कृत समाज घडेल.
डॉ. रफीक सय्यद म्हणाले, देवाने या सृष्टीवर मानवाला सर्वोत्कृष्ट बनविले आहे. परंतू मानवाने स्वतःच्या कर्माने स्वतःला खालच्या स्तरावर पोहचविले आहे. जीवन जगतांना आपला उद्देश्य काय आहे. जीवन कसे जगावे हे आम्हाला आमचे देवस्थान शिकवितात. त्यामुळेच मानवाला मानव बनविण्याचे कार्य हे तिर्थक्षेत्रातून होतांना दिसत आहे.  हिच तीर्थक्षेत्र आता ज्ञानतिर्थ क्षेत्र व्हावे.
डॉ. एस.एन.पठाण यांनी प्रस्तावनेत सांगितले की भारत हा मंदिरांचा देश आहे. त्यातच डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी बद्रीनाथ येथे माता श्री सरस्वती धाम मंदिराची निर्मिती केली. देशातील शिक्षण प्रणालीमध्ये विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वयक केल्यास या जगात सुख, शांती नांदेल. त्यासाठी देशातील प्रत्येक धार्मिक स्थळे ही ज्ञानाचे दालन बनावे. याच पार्श्‍वभूमीवर तिर्थक्षेत्राचे रुपांतर ज्ञानतीर्थ क्षेत्रात करणे या विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले आहे.
यावेळी मुकेश शर्मा यांनी विद्यार्थ्यांना विचार करुन भविष्यातील निर्णय घेण्याचा सल्ला दिला.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक घुगे यांनी केले.

1 कोटीच्या बोगस कामांच्या बिलानंतर आता २ कोटी च्या साहित्याची नाट्यगृहातून चोरी, ६ महिन्यांनी उघड ..(व्हिडीओ)

0

पुणे- महापालिकेतील १ कोटीची बोगस कामे, बोगस बिले, यांची फाईलचा भांडाफोड पैसे अदा करण्याच्या अखेरच्या टप्प्यात होतो ना होतो तोच आता सुमारे २ कोटीहून अधिक रकमेच्या साहित्याची महापालिकेच्या नाट्यगृहातून चोरी झाल्याचा प्रकार आज महापालिकेच्या मुख्य सभेतून चव्हाट्या वर आला आहे. आजवर हा प्रकार का दडपला गेला. सुरक्षा रक्षक,सीसीस टीव्ही असताना झालेल्या या गूढ चोरीचे मोठे रंजक गौडबंगाल नगरसेवक सुभाष जगताप यांनी महापालिकेच्या सभागृहात मांडले आहे. असे म्हणतात कि ओरीजनला साहित्य चोरट्यांनी नेले आणि त्याजागेवर नकली साहित्य आणून ठेवले . या प्रकरणी पोलिसात गुन्हा का ,कधी दाखला झाला याबाबतही माहिती विचारली जाते आहे .

बिबवेवाडीमधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील जवळपास दोन कोटी रुपये किंमतीचे साउंड बॉक्स चोरून नेल्याची घटना घडल्याची कबुली आज मुख्य सभेत प्रशासनाच्या वतीने देण्यात आली . नगरसेवक सुभाष जगताप यांनी हा मुद्दा उपस्थित करून सर्वांना धक्का दिला आणि चोरून नेलेल्या साउंड बॉक्सच्या ठिकाणी डुप्लिकेट साउंड बसवलेले आहेत. हा प्रकार लॉकडाउनमध्ये घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाट्गृहाला सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही असतानाही हा प्रकार घडला आहे. त्यामुळे मख्यसभेत यामध्ये महापालिकेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

महापालिकेचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नाट्यगृह उभारताना दोन कोटी रुपयांची अत्याधुनिक साऊंड सिस्टीम बसवण्यात आली होती. कोरोनाच्या काळात जवळपास दीड वर्षांपासून नाट्यगृह बंद होती. याकाळात साठे नाट्यगृहातील बॉश कंपनीचे सुमारे १२ साऊंड चोरीला गेले आहेत. हा प्रकार लक्षात येऊ नये म्हणून याठिकाणी डुप्लिकेट साऊंड बसवण्यात आल्याची घटना घडली आहे. महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवक सुभाष जगताप यांनी हा विषय मांडताच खळबळ उडाली आहे. यामध्ये महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग असल्याशिवाय हा प्रकार होऊ शकत नाही त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जगताप यांनी केली.

मुरलीधर मोहोळ ठरले भारतातील महानगरातील सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असणारे महापौर

0

पुणे -पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शिरपेचात सोशल मीडियावर मानाचा तुरा रोवला गेला असून महापौर मोहोळ यांनी ट्विटरवर एक लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. या टप्प्यासह महापौर मोहोळ भारतातील महानगरातील ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय महापौर झाले असून त्यांना सर्वाधिक फॉलोअर्स असल्याची नोंद झाली आहे. लोकसंवादासाठी महापौर मोहोळ यांचा ट्विटरचे व्यासपीठ महत्त्वाचे ठरले आहे.

मोहोळ यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर थेट नागरिकांशी संपर्क व्हावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे सुरु केला. त्यात फेसबुक, इन्स्टाग्रामचाही समावेश असला तरी त्यांना ट्विटवर कमी काळात अधिक लोकप्रियता मिळाली आहे. विशेष म्हणजे पुण्यासह महापौर मोहोळ यांना देशभरातून फॉलोअर्स मिळाले आहेत. त्यातही सर्वपक्षीय फॉलोअर्स असणे, ही महापौर मोहोळ यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. देशातील महानगरात महापौर मोहोळ सर्वाधिक लोकप्रिय असताना त्यांच्या पाठोपाठ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा क्रमांक आहे. मात्र त्यातही पेडणेकर यांच्यापेक्षा दुप्पट फॉलोअर्स मोहोळ यांना मिळाले.

ट्विटरवरील यशाबद्दल माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘जनसंवादाची पारंपरिक माध्यमे काहीशी मागे पडत असताना सोशल मीडिया हे थेट नागरिकांशी संवाद साधण्याचे प्रभागी माध्यम आहे. माझ्याकडे महापौरपदाची जबाबदारी आल्यावर प्रत्यक्ष फिल्डवर काम करतानाच या माध्यमाचा वापर करण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला. त्याला नागरिकानीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. पुण्यासारख्या महानगराचे नेतृत्व करत असताना नागरिकांकडून ट्विटवर नव्या कल्पना, सूचना, समस्या याची थेट माहिती मिळत राहिली. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आणि समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. यामुळेच नागरिकांचा प्रतिसाद वाढत गेला’.

समाज माध्यमांच्या जाणकार सायली नलवडे या बाबतीत माहिती देताना म्हणाल्या, महापौरांना ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स मिळण्याचे कारण म्हणजे त्यांच्या ट्विटर हँडलबद्दल असलेली विश्वासार्हता आणि संवाद कौशल्य. कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या काळात महापौर मोहोळ यांना अधिकाधिक फॉलोअर्स जोडले गेले. कोरोनाची दैनंदिन आकडेवारी, कोरोनासंदर्भात फिल्डवर उतरून केलेल्या उपाययोजना, बेड्सची उपलब्धता आणि त्यानंतर लसीकरणाची माहिती त्यांच्या ट्विटरवरुन दैनंदिन दिली जात आहे. शिवाय नागरिकांच्या प्रश्नांना थेट उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढतो आहे. महापौरांचे ट्विटर हँडल एकेरी नाही तर दुहेरी संवादाचे माध्यम असल्यानेही फॉलोअर्सची संख्या अधिक दिसते’.

महानगर/महापौर/ट्विटर फॉलोअर्स
१) पुणे/मुरलीधर मोहोळ/१ लाख +
२) मुंबई/किशोरी पेडणेकर/४९ हजार+
३) हैदराबाद/विजयालक्ष्मी गडवाल/२३ हजार+
४) आग्रा/नवीनकुमार जैन/९ हजार +
५) सुरत/हेमाली बोघावाला/८ हजार+
६) अहमदाबाद/कीर्तीकुमार परमार/४ हजार+

(निवडलेली शहरे १० लाखपेक्षा अधिक लोकसंख्येची)

ओटीटी प्लॅटफॉर्म ही नव्या दमाच्या चित्रपट निर्मात्यांना उत्तम संधी

0

पणजी, 21 नोव्‍हेंबर 2021 

उत्तम चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी उदयोन्मुख आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांकडे दर्जेदार कथानक असणे अत्यंत आवश्यक असून, त्यांचा आपल्या कथेवर दृढ विश्वास असायला हवा, असा सल्ला राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक, मधुर भांडारकर यांनी दिला . 52 व्या इफ्फीदरम्यान ‘चित्रपट निर्मिती’ या विषयावर झालेल्या मास्टरक्लासमध्ये ते बोलत होते. 

“माझ्या चित्रपटाच्या संकल्पनेचा जन्म कायम माझ्यापासूनच होतो. माझा माझ्यावर आणि माझ्या कथांवर पूर्ण विश्वास असतो. जेव्हा कधी माझ्या कथानकाबद्दल, माझ्या मनात पूर्ण विश्वास असतो, तेव्हाच मी चित्रपट निर्मिती करण्यास सुरुवात करतो.”, असे भांडारकर यावेळी म्हणाले.

आपला कॅमेरा जे क्षण चित्रबद्ध करतो, ते आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. त्यामुळे चित्रपटाची गती प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी असावी. मी नेहमीच कला आणि व्यावसायिक चित्रपटांमधील समतोल राखण्याचा प्रयत्न करतो तसेच, वास्तववादी चित्रपट बनवण्यावर माझा भर असतो.” असेही ते पुढे म्हणाले.

चित्रपट रासिकांशी संवाद साधतांना ते म्हणाले, “आजच्या काळात, ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे, नवोदित दिग्दर्शक आणि निर्मात्यांना उत्तम संधी मिळाली आहे.”

पेज थ्री आणि ट्रॅफिक सिग्नल अशा पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या मधुर भांडारकर यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीविषयी माहिती देतांना सांगितले की चाँदनी बार चित्रपटामुळे माझा या क्षेत्रात पुढे जाण्याचा आत्मविश्वास वाढला, “या चित्रपटाच्या सुरुवातीपासून मी गुंतलो होतो. जरी हा चित्रपट अत्यंत गडद आणि निराशाजनक विषयावरचा होता, तरीही, तो शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असेल, असा तयार करण्याचा मी प्रयत्न केला, असे त्यांनी पुढे सांगितले.

आपल्या भविष्यातील योजनांविषयी बोलतांना ते म्हणाले, “या कोरोना महामारीच्या काळात, आपण सगळेच अत्यंत कठीण आणि खडतर परिस्थितीतून गेलो, त्यामुळे आता मी लवकरच विनोदी चित्रपट निर्मितीसाठी काम करणार आहे.” 

चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अखेरीस, राष्ट्रीय चित्रपट विजेत्या दिग्दर्शिका नीला माहताब पांडा यांच्या हस्ते मधुर भांडारकर आणि तरुण आदर्श यांचा सत्कार करण्यात आला.

योगींच्या खांद्यावर हात ठेवून चालताना दिसले पंतप्रधान..नेमके काय सुचवायचे योगींना ?

0

हम निकल पड़े हैं प्रण करके.. अपना तन-मन अर्पण करके.. जिद है एक सूर्य उगाना है.. अम्बर से ऊँचा जाना है.. एक भारत नया बनाना है!!

या कॅप्शनसह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. सोबत दोन फोटो पोस्ट केले आहे. यामध्ये त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत. पीएम मोदी सीएम योगींच्या खांद्यावर हात ठेवून राजभवनाच्या कॉरिडॉरमध्ये फिरताना दिसत आहेत. यादरम्यान दोघांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांमधील केमिस्ट्रीही स्पष्ट दिसत आहे. मोदी योगींना काहीतरी धडा, काही सल्ला देत आहेत, असे वाटते.

अमरावती हिंसाचाराबाबत देवेंद्र फडणवीसांची चौकशीची मागणी

0

 अमरावती -राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये हिंसक वळण लागलेल्या भागांना भेट देऊन तिथल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये खोट्या माहितीच्या आधारावर हे मोर्चे कोणी आयोजित केले याची पहिल्यांदा चौकशी व्हायला हवी. त्यांची याच्या पाठीमागची भूमिका काय होती. दंगल होण्यासाठी हे आयोजन केले होते का या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

अमरावतीत झालेल्या हिंसाचारची घटना दु्र्दैवी आहे. 12 नोव्हेंबरला जो मोर्चा निघाला तो मोर्चा चुकीच्या माहितीतून काढला गेला. त्रिपुरामधे जे घडलेच नाही ते झाल्याचे दाखवून हा हिंसाचार घडवण्यात आला. जी घटना घडलीच नाही ते जनतेत घडल्याचे दाखवून अल्पसंख्याक समाजाच्या भावना भडकवण्यात आल्या.महाराष्ट्रात अराजकता तयार झाली पाहिजे, दंगे झाले पाहिजेत अशा मानसिकतेततून तयार केलेला हा कट होता का? याची चौकशी झाली पाहिजे? अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 12 तारखेला जे काही घडले, जो हिंसाचार झाला त्याबद्दल सरकार मूग गिळून गप्प का बसले आहे? असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

कुणाच्या परवानगी मोर्चा निघाला

12 नोव्हेंबरला जो मोर्चा निघाला तो कुणाच्या परवानगीने निघाला? किती लोकांना त्यात संमती देण्यात आली होती? का परवानगी देण्यात आली होती? हे सगळे स्पष्ट झाले पाहिजे. सरकारने ते सांगितले पाहिजे. असे फडणवीस म्हणाले. हा मोर्चा परतत असताना जे काही घडले ते दंगे, हिंसाचार घडावा या उद्देशाने करण्यात आले.विशिष्ट धर्माच्या लोकांची दुकाने फोडण्यात आली. आता राज्यकर्ते 12 तारखेची घटना पुसून टाकण्याचा प्रयत्न करून, 13 तारखेला जे घडले तेच पुन्हा पुन्हा सांगत आहेत. 13 तारखेला घडलेली घटना ही देखील चुकीचीच होती. आम्ही हिंसाचाराचे समर्थन करत नाही. असे मत फडणवीसांनी व्यक्त केले.

आम्ही गप्प बसणार नाही

चुकीच्या घटनेसाठी जर लांगुलचालन होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आधी न घडलेल्या घटनेवरून हिंसा घडवून आणायची दुसऱ्या दिवशी त्याचे रिअॅक्शन आल्यानंतर फक्त दुसरा दिवस काय घडले तेच बघायचे. हे चालणार नाही. जे लोक या हिंसाचारात नव्हते त्यांनाही यात गोवण्यात येते आहे. एका महिलेने मला सांगितले की, माझा मुलगा फक्त गाडी घराच्या आतमधे घेऊन येत होता.मात्र नंतर त्याला नेऊन त्याच्यावर कलम 307 लावण्यात आले. हा इतका मोठा गुन्हा होता का? हे न तपासता त्याला अटक झाली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये अडकवले जात आहे. टार्गेट करून आणि याद्या तयार करून तरूणांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. असाही आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

12 नोव्हेंबरची घटना डिलिट करून 13 तारखेच्या घटनेत जे लोक सहभागी झाले तेवढेच पाहिले जात आहे. जे लोक हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत त्यांनाच जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई करत आहेत. त्यामुळे या कारवाईचा आम्हाला निषेधही करावा लागेल. जर अशीच कारवाई होत राहिली तर भाजपचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते जेलभरो आंदोलन करतील. असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट , नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

0

भाजपाचे आ संभाजी पाटील निलंगेकरयांचा घणाघाती आरोप

पुणे-अतिवृष्टीग्रस्तांना तसेच वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीबाबतही बळीराजाची फसवणूक केली. पीक विमा कंपन्यांना फायदेशीर अटी बनवून नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित ठेवले. नैसर्गिक संकटांमुळे खचलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या भ्रष्ट , नाकर्त्या आणि कोडग्या कारभारामुळे उद्ध्वस्त केले , असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
श्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या पत्रकार परिषदेत आघाडी सरकारच्या शेतकरी द्रोही भूमिकेचा पंचनामाच सादर केला. ते म्हणाले की, सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार , हेक्टरी ५० हजार मदत द्या अशा मागण्या करणाऱ्या उद्धव ठाकरे , अजित पवार यांनी गेल्या दोन वर्षात राज्यातील अतिवृष्टीचा , महापुराचा आणि चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना किरकोळ मदत करत शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अलीकडेच आघाडी सरकारने १० हजार कोटी मदतीचे पॅकेज जाहीर केले. त्या आधी जुलै मध्ये पूर आणि पावसाचा फटका बसलेल्यांना ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. या मदतीमधील ७ हजार कोटी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तर ३ हजार कोटी पुनर्बांधणी , पुनर्वसनासाठी आहेत. याचा अर्थ पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांसाठी केवळ १५०० कोटींची तातडीची मदत करण्यात आली.

संपूर्ण मराठवाड्यात , विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीमुळे ५० लाख हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. त्याचबरोबर हजारो हेक्टर जमीन खरवडून निघाली, जनावरे वाहून गेली , घरे पडली. मात्र सरकारी मदतीत शेतकऱ्यांच्या या नुकसानीचा विचारही केला गेला नाही. शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आली की केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचा निर्लज्जपणा आघाडी सरकारने गेल्या २ वर्षांत वारंवार केला. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात बंद पाळणाऱ्या शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेतृत्वाला नैसर्गिक आघाताचा मारा सहन करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी वेळ काढता आला नाही , असेही ते म्हणाले.

श्री .संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले की , मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफीही आघाडी सरकारला प्रत्यक्षात आणता आली नाही. आघाडी सरकारने कर्जमाफीसाठी फक्त १५० कोटींची तरतूद केली आहे. महाआघाडी सरकारने पीक विमा काढणाऱ्या कंपन्यांना फायदेशीर अटी तयार केल्याने राज्यातील ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी या वर्षी पीक विमा काढलाच नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असताना २०१९-२० या वर्षी ८५ लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी भरपाई मिळाली होती. त्यावर्षी पीक विमा कंपन्यांना १ हजार कोटींचा तोटा झाला होता. या सरकारने पीक विमा कंपन्यांशी तीन वर्षांसाठी उंबरठा उत्पादन गोठवून करार केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षी फक्त १५ लाख शेतकऱ्यांना ९७५ कोटी रु. ची भरपाई विमा कंपन्यांकडून मिळाली. मात्र विमा कंपन्यांना मागील वर्षी ४ हजार कोटींहून अधिक नफा मिळाला. लॉकडाऊन व कोरोना संकटामुळे अडचणीत आलेला शेतकरी महाविकास आघाडी सरकारच्या थापेबाजी व नाकर्तेपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे.