Home Blog Page 2203

आमचा चित्रपट देशभरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देणारा ठरेल: अनुज दयाल

0

सरमाउंटिंग चॅलेंजेस: दिल्ली मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यातील अभियांत्रिकी आव्हानाचे चित्रण

पणजी, 23 नोव्‍हेंबर 2021 (शरद लोणकर )-

दिल्ली शहराची जीवनवाहिनी होण्यापासून ते शहरातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण आणि जीवघेणे अपघात कमी करण्याऱ्या दिल्ली मेट्रोने आज सर्वच दृष्टीने जागतिक दर्जाची जलद वाहतूक व्यवस्था म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र हे यश साध्य करण्याआधी, ही मेट्रो बांधत असताना संबंधित विभागांसमोर आलेल्या आव्हानांची आपल्या सर्वांना कल्पना आहे का?

गोव्यात सुरु असलेल्या 52व्या इफ्फी दरम्यान ‘सरमाउंटिंग चॅलेंजेस’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “हा चित्रपट दिल्ली मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या बांधकामावर आधारित आहे. 2011 साली सुरु झालेले हे बांधकाम जवळपास 2020 साली संपले. या दहा वर्षांच्या काळात आम्ही मेट्रो बांधकामातल्या सर्व घडामोडींचे सातत्याने चित्रीकरण करत होतो.”

या मेट्रोचे बांधकाम करताना विभागाला आलेल्या विविध अडचणी आणि आव्हानांचे प्रतिबिंब या चित्रपटात आहे. या आव्हानांवर विभागाने कशी मात केली त्याचीही कथा यात आहे.मेट्रोसोबतचा आपला जिव्हाळा व्यक्त करताना राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सतीश पांडे म्हणाले, की त्यांचा मेट्रोशी असलेला ऋणानुबंध खूप जुना आहे. 27 वषांपूर्वी त्यांनी दिल्ली मेट्रोवरच आपला पहिला चित्रपट बनविला होता. त्या चित्रपटाची संकल्पना दिल्लीला ‘मेट्रोची गरज का आहे’ अशी होती. ‘द ड्रीम फुलफिल्ड – मेमरीज ऑफ द इंजिनीअरींग चॅलेंजेस’ या चित्रपटासाठी पांडे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

“आणि तिथून मी माझ्या चित्रपट निर्मितीच्या प्रवासाला सुरुवात केली. दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावर आधारित चित्रपट मी निर्माण केले. मी मुंबई, नागपूर,पुणे,लखनौ,कानपूर,गोरखपूर,आग्रा आणि जयपूर या शहरांतील मेट्रो प्रकल्पांवर देखील अनेक चित्रपट तयार केले आहेत.” असे त्यांनी पुढे सांगितले.

ते म्हणाले की, ‘सरमाऊंटिंग चॅलेन्जेस’ हा मुख्य चित्रपट 2 तासांचा आहे आणि तो अत्यंत तांत्रिक पद्धतीचा असल्याने आयआयटीतील विद्यार्थी तसेच अभियंते यांच्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा असेल. सध्या प्रदर्शित होत असलेला चित्रपट म्हणजे मूळ चित्रपटाची लहान आवृत्ती आहे.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना निर्माते अनुज दयाल म्हणाले की, कोलकाता मेट्रोवर आधारित चित्रपट निर्मिती हा एक तापदायक अनुभव होता आणि या प्रक्रियेमुळे शहराला मोठ्या गोंधळाला तोंड द्यावे लागले.एका प्रश्नाला उत्तर देताना अनुज म्हणाले की, मेट्रोचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी स्थानिक समुदायांशी विचारांची देवाणघेवाण करण्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. खरेतर, ही अविरत सुरु असणारी संवाद प्रक्रिया होती जिच्या माध्यमातून सर्वांच्याच समस्यांवर उपाय शोधले गेले.

चित्रपटाविषयी थोडेसे

मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर दिलीतील सर्व प्रमुख भागांपर्यंत मेट्रोची सेवा पोहोचली. मात्र, या टप्प्यातील काम सुरु असताना अनेक मोठ्या अभियांत्रिकी आव्हानांना तोंड द्यावे लागले, त्यामुळे या टप्प्याचे बांधकाम हा देखील सर्वात कठीण भाग होता. 11 विविध मार्गिकांच्या कामासाठी 160 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर बोगदे खणणारी 30 महाकाय यंत्रे आणि सुमारे 30,000 कामगारांचे हात लागले. अशा अभियांत्रिकी आव्हानांवर मात करण्यासाठी डीएमआरसीने कशा प्रकारे वेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या यावर हा चित्रपट भर देतो. 

कलाकार आणि श्रेयनामावली

दिग्दर्शक : सतीश पांडे

निर्माता : अनुज दयाल

पटकथा : अहाद उमर खान

जाहिरात विभाग : राजन कुमार श्रीवास्तव

संपादक : पवन कुमार

अंगारकीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिराला गजलक्ष्मी महालाची पुष्पआरास -भाविकांची दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी-पहा फोटो ..

0

पुणे : मंगलमूर्ती मोरया…ओम् गं गणपतये नम :… गणपती बाप्पा मोरया…अशा गणेशनामाच्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. वर्षातील शेवटचा अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली गजलक्ष्मी महालाची आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युतरोषणाने संपूर्ण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उजळून निघाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायनसेवा दिली. त्यापूर्वी ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. स्वराभिषेकानंतर श्री गणपती विशेष महाअभिषेक पार पडला. याशिवाय श्री गणेशयाग सहस्त्रावर्तने व मंगलआरती आदी कार्यक्रम मंदिरात पार पडले.

मंदिरावर केलेल्या गजलक्ष्मी महाल पुष्पसजावटीमध्ये ५० हत्ती साकारण्यात आले. त्याकरीता ८ हजार किलो झेंडू, पर्पल-पांढरा-पिवळया शेवंती, अस्टर, गोल्डन बॉल्स यांसह विविध फुलांचा समावेश होता. पुष्पसजावट २०० महिला व पुरुषांनी सलग तीन दिवस काम करुन साकारली.

मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी पहाटेपासूनच मोठया संख्येने गर्दी केली. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकाच्या पुढेपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिरावर आकर्षक तोरण आणि रांगोळ्यांची सजावट देखील करण्यात आली होती.

पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन भूसंपादनामधील देय असलेली रक्कम लवादाच्या निवाड्याप्रमाणे देण्यात यावी :-राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

0

मुंबई, दि. 23 :- पुणे – इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन भूसंपादनामधील देय असलेली रक्कम लवादाच्या (आर्बिट्रेटरच्या) निवाड्याप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (सा.उ.वगळून) दतात्रय भरणे  यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पुणे -इंदापूर या महामार्गासाठी  संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री दतात्रय भरणे बोलत होते. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रादेशिक अधिकारी अंशुमनी श्रीवास्तव, पुणेचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस दूरदृश्यप्रणालीव्दारे तसेच उपसचिव श्री.कुलकर्णी, ॲड. शीतल चव्हाण उपस्थित होते.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन भुसंपादनाबाबत शेतकऱ्यांना लवादाने (आर्बिट्रेटरच्या) निर्णय दिला आहे. या लवादाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे तात्काळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कार्यवाही करावी, असे आदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रादेशिक अधिकारी अंशुमनी श्रीवास्तव यांनी भूसंपादित शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारीवर तसेच प्राधिकरण करत असलेली कार्यवाहीची माहिती या बैठकीत दिली.

‘भारत गौरव ट्रेन’ सुरू होणार …

0

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021

रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी आज  पर्यटक सर्किट ट्रेन्स  संकल्पना आधारित भारत गौरव रेल्वेगाड्या (ट्रेन्स) सुरू करण्याची घोषणा केली. या रेल्वेगाड्या भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे भारतातील आणि जगातील पर्यटकांना दाखवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टी साकार करण्यास मदत करतील असे पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले.पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मुख्य क्षमतांचा फायदा पर्यटन सर्किट ओळख पटवण्यासाठी, विकसित करण्यासाठी आणि भारताच्या विशाल पर्यटन क्षमतेचा फायदा  करून घेण्यासाठी संकल्पना-आधारित ट्रेन चालवून  केला जाईल असे ते म्हणाले.

पाणीपुरवठा योजनांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून पूर्ण करावित – राज्यमंत्री संजय बनसोडे

0

मुंबई, दि. 23 :- जल ही जीवन हे ब्रीद लक्षात घेऊन राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद आदी संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून कामे पूर्ण करावित, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

श्री. बनसोडे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत शिरूर-हवेली, रिसोड-मालेगाव, नांदेड दक्षिण आदी मतदारसंघांमधील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. यावेळी संबंधित क्षेत्रातील विधानसभा सदस्य सर्वश्री अशोक पवार, अमित झनक, मोहनराव हंबर्डे यांच्यासह विधानसभा सदस्य  शेखर निकम, संदीप क्षीरसागर, आशुतोष काळे, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जल जीवन अभियानचे संचालक ऋषिकेश यशोद तसेच संबंधित मुख्य अभियंता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. बनसोडे म्हणाले, ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे प्रती व्यक्ती 55‍ लिटर गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जल जीवन अभियान आदी यंत्रणांनी आपल्याकडे प्रलंबित असलेल्या कामांना तातडीने मंजुरी घेऊन कालबद्ध पद्धतीने ती पूर्ण करावित. ज्या कामांना मंजुरी प्राप्त झालेली आहे ती कामे डिसेंबर अखेर पर्यंत तर इतर कामे जानेवारी अखेरपर्यंत सुरू करावीत. जेथे जलस्त्रोत उपलब्ध नाहीत अशा गावांसाठी जलस्त्रोतांची निर्मिती करणे व जेथे जलस्त्रोत उपलब्ध आहेत त्यांचे बळकटीकरण करणे, पूरक स्त्रोत निर्मिती करणे, लोकसंख्या वाढीनुसार जुन्या योजनांची आवश्यकतेनुसार पुनर्जोडणी करणे या कामांना प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली. कोणतीही शाळा आणि अंगणवाडी पाणी पुरवठ्याविना राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

प्रधान सचिव श्री.जैस्वाल यांनी पाणी पुरवठ्याच्या संबंधित कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी तांत्रिक मनुष्यबळ अपुरे आहे तेथे कंत्राटी पद्धतीने पद भरण्याबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत, त्यांच्या मदतीने योजनेची प्रशासकीय कामे तातडीने पूर्ण करून दिलेल्या मुदतीत कामे सुरू करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी संबंधित लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रातील प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण व्हावीत, अशी मागणी केली.

अमरावतीच्या हिंसक घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील

0

कोल्हापूर -त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल करून; महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला गेला. या घटनेचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापुरात तीव्र निषेध करण्यात येत आहे. आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना भेटून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावयाचे निवेदन सादर केले.

याप्रसंगी माजी मंत्री सुभाषबापू देशमुख, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, भाजपा शहराध्यक्ष राहूल चिकोडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, भाजपा शहर संघटन सरचिटणीस अशोक देसाई, भाजपा ग्रामीण संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील, सरचिटणीस विजय जाधव, विठ्ठल पाटील, दिलीप मेत्रांणी, जिल्हा उपाध्यक्ष राहूल देसाई यांची उपस्थिती होती.

त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करावी, ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजे, दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे, स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी, भारतीय जनता पार्टीच्या नेते – कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत; अशा मागण्या करण्यात आल्या. या सर्व मागण्या आम्ही फक्त राजकीय विरोधीपक्ष म्हणून न करता हि घटना महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याने करत असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर हे निवेदन मुख्यमंत्री महोदय यांना आहे तसे न पाठवता या जिल्ह्यातील याविषयातील घटनांचा जिल्हास्तरीय अहवाल सोबत पाठवा अशी विनंती देखील करण्यात आली.

यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यात अराजकता माजली असून कोणत्याही गोष्टीवर शासनाचा वचक राहिला नाही. पोलीस यंत्रणा हप्ते, दडपशाही, न्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणा-या लोकांना धाक दाखवण्यापुरती वापरली जात आहे. दंगलखोरांना अभय देण्याचे काम सुरु आहे. झुंडशाहीची प्रकार घडत आता पोलिसांवर देखील हल्ले होऊ लागले आहेत. फक्त जातीच्या राजकारणासाठी, सत्तेच्या हव्यासापोटी अशा गंभीर घटनेकडे कानाडोळा करण्याचे कार्य हे सरकार करत आहे. २०१४ ते २०१९ मध्ये केंद्रातील मोदीजींचे सरकार आणि २०१४ ते २०१९ मध्ये राज्यात देवेंद्रजी यांचे सरकार असताना एकही दंगल घडली नाही. आता मात्र चाळीस हजाराचे मोर्चे निघत आहेत. याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला माहित नसणे हे दुर्देवी आहे. अशा हिंसक मोर्चावर पोलीस कारवाई होत नाही पण अन्याया विरुद्ध लढा देण्यासाठी शांततेने सुरु असणाऱ्या मोर्चावर कारवाई असा अजब न्याय सुरु आहे. या घटनेची निपक्षपणे चौकशी व्हायची असेल तर याची पाळेमुळे शोधून काढली पाहिजेत. त्यामुळे भाजपाच्या वतीने काल झालेली निदर्शने, धरणे, निवेदने हा सरकारला इशारा असल्याचे सांगितले. कान-नाक-डोळे बंद ठेवून आजचा दिवस पुढे ढकलणा-या या राज्यकर्त्याकडे राज्यातील जनता लक्ष ठेवून असून योग्य वेळ धडा शिकवेल असे नमूद केले.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर शहरांमध्ये हवेचा दर्जा अत्यंत वाईट- केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव

0

वायूची गुणवत्ता सुधारण्याचे काम म्हणजे मानवतेचे काम

मुंबई , 23 नोव्हेंबर 2021-मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर इत्यादी शहरांमध्ये हवेचा दर्जा अत्यंत वाईट आहे.वायूची गुणवत्ता सुधारण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांचे योगदान महत्त्वाचे असले पाहिजे . प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींबरोबरच स्वयंसेवी संस्था, युवा वर्ग, विद्यार्थी या सर्वांना एकत्रितपणे वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करावे लागेल, असे मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम जागरुकता आणि आढावा या विषयावर पश्चिम विभागाच्या कार्यशाळेमध्ये बोलत होते. वायूची गुणवत्ता टिकवण्यासाठी होणारे काम हे मानवतेचे काम आहे हे लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्रालयाचे महत्त्व स्पष्ट केले.

“पर्यावरण मंत्रालय हे केवळ मंजुरी देणारे किंवा अडथळे आणणारे मंत्रालय नाही, तर समाजाला चांगल्या प्रकारे राहता यावे यासाठी उपाय शोधणारे मंत्रालय आहे,” असे ते म्हणाले.

गेल्या 200 वर्षात केलेली प्रगती उर्जानिर्मितीची क्षमता प्राप्त करून केली, मात्र, ज्या स्रोतांद्वारे ही उर्जानिर्मिती झाली त्यांनीच पर्यावरणविषयक चिंता निर्माण केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी आंतरराष्ट्रीय हवामानबदल समितीच्या अहवालाचा दाखला दिला. या स्रोतांद्वारे उर्जानिर्मिती होत राहिली तर पृथ्वीचे तापमान 2 अंशांनी वाढण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. सध्याच्या काळात अवकाळी पाऊस, निसर्गाचा प्रकोप, ढगफुटी, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ अशा आपत्तींमधून आपल्याला धोक्याचा इशारा मिळत आहे. त्यामुळेच उर्जेच्या स्रोतांची व्याख्या नव्याने निर्धारित करावी लागेल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पर्यावरण रक्षण आणि हवामानबदल प्रतिबंधक उपाययोजनांच्या क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रयत्नांचे महत्त्व विषद केले.भारताने पॅरिस परिषदेच्या वेळी अपारंपरिक उर्जा स्रोतांद्वारे उर्जानिर्मितीचे उद्दिष्ट 40 टक्क्यांपर्यंत निर्धारित केले होते, आज त्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचलो आहोत, कार्बन उत्सर्जन कमी केले आहे, कारण भारत व्हिजन आणि ऍक्शन या दोन्हीवर विश्वास ठेवून काम करतो, असे ते म्हणाले. पंतप्रधानांच्या खंबीर नेतृत्वामुळे आणि दृढनिश्चयामुळे भारत आपली पर्यावरणविषयक उद्दिष्ट साध्य करणाऱ्या जगातल्या मोजक्या देशांपैकी एक बनला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधानांच्या नेतृत्वामुळे भारत अतिशय खंबीरपणे आपली कृती आणि दृष्टीकोन पर्यावरणाच्या क्षेत्रात लागू करत आहे आणि त्याचबरोबर विकसनशील देशांचा बुलंद आवाज बनला आहे, असे त्यांनी सांगितले.

पॅरिस परिषदेत पर्यावरण रक्षणविषयक कार्यक्रमांसाठी 2020 पासून दरवर्षी विकसनशील देशांना 100 अब्ज डॉलर मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याची पूर्तता झाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या आश्वासनाची पूर्तता विकसित देशांनी केली पाहिजे, असे ते म्हणाले.

 कॉप-26 परिषदेत भारताने तीन महत्त्वाच्या विषयांसंदर्भात जगासोबत भागीदारी केली आहे. आपण युकेसोबत आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. भारत, युके आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकत्रितपणे लहान द्वीपराष्ट्रांसाठी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा संघटना स्थापन केली आहे. यामध्ये 10 दशलक्ष डॉलर योगदान देण्याचा निर्णय भारताने घेतला आहे, असे ते म्हणाले. द्वीपराष्ट्रांना आपत्ती प्रतिबंधक उपाययोजनांसाठी इस्रोच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरण रक्षणासंदर्भात भारताने पुढाकार घेतला असून आपल्या भावी पिढ्यांना या ग्रहाचे योग्य स्थितीत हस्तांतरण करता यावे या उद्देशाने पंतप्रधानांनी ग्लासगोमधील कॉप26मध्ये वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड या उपक्रमाची सुरुवात केली, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाची प्रशंसा केली. ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राने एलईडी दिव्यांचा वापर वाढवण्यासंदर्भात केलेले कार्य कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि पंतप्रधानांनी निर्धारित केलेले देशभरात 36 कोटी एलईडी बल्बचे लक्ष्य साध्य करण्यात मोलाचे योगदान देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि गुजरातचे पर्यावरणमंत्री उपस्थित होते. स्वच्छ हवेसाठी मुंबईतल्या बेस्ट बसच्या ताफ्यात विजेवर चालणाऱ्या बसची सातत्याने भर घालत असून 2023 पर्यंत बेस्ट बसच्या निम्म्याहून अधिक बस विजेवर चालणाऱ्या असतील तर 2027 पर्यंत बेस्ट बसचा संपूर्ण ताफाच विजेवर चालणाऱ्या बसचा असेल अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.

केंद्र सरकारने देशभरातील वायू प्रदूषणाच्या समस्येच्या सर्वसमावेशक हाताळणीसाठी दीर्घकालीन, कालबद्ध राष्ट्रीय धोरण म्हणून ‘राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम’ सुरु केला आहे. 2024 पर्यंत हवेतील प्रदूषणकारी घटक, 2017 हे आधारभूत वर्ष ठेवून, 20% ते 30% कमी करण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. 2014 ते 2018 दरम्यानच्या हवेच्या गुणवत्तेच्या आकडेवारीवर आधारित, NCAP अंतर्गत देशभरातून 132 नॉन अटेंनमेंट- म्हणजेच सातत्याने पाच वर्षे हवेत धोकादायक प्रदूषणकारी घटक असणारी शहरे निश्चित करण्यात आली आहेत. या NA शहरांच्या यादीत वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारच्या विविध शहरांचा समावेश आहे. यापैकी प्रमुख शहरांमध्ये मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर इत्यादी शहरांचा समावेश आहे. या सर्व शहरांमध्ये हवेचा दर्जा अत्यंत वाईट आहे.

यावेळी राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम(एनसीएपी) आणि महाराष्ट्रातील शहरांदरम्यान पंधराव्या एफसी मिलियन प्लस सिटी चॅलेंज फंड अंतर्गत विविध सामंजस्य करार करण्यात आले.

कोरेगाव-भीमा येथील क्रांती स्तंभाच्या परिसर विकासासाठी महापालिका देणार एक कोटी रुपये-हेमंत रासनेंची घोषणा

0

पुणे-शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव-भीमा येथे उभारण्यात आलेल्या क्रांती स्तंभाच्या परिसरातील सुशोभिकरण आणि विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी एक कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, ‘दरवर्षी एक जानेवारीला लाखो भीम अनुयायी क्रांतिस्तंभाला मानवंदना करण्यासाठी येत असतात. त्यांना चांगल्या प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुशोभिकरण आणि विकासकामे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली.’

मिनाताई ठाकरे रुग्णालयात डायलेसिस केंद्र

कोंढवा पुणे महापालिकेच्या मिनाताई ठाकरे रुग्णालयात न्यू ग्लोबल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने १० खाटांचे डायलेसिस केंद्र पी. पी. पी. तत्वावर सुरू करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘शहरातील मधुमेह आणि हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. किडनीचे आजार वाढत असून, त्याचा परिणाम रुग्णांचे मूत्रपिंड निकामी होण्यात होतो. या रुग्णांना डायलेसिसचे उपचार घ्यावे लागतात. हे उपचार महागडे असतात. ते सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाहीत. त्यामुळे मिनाताई ठाकरे रुग्णालयात डायलेसिस केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रति डायलेसिस ३५७ रुपये दर आकारण्यात येणार आहे. हा प्रकल्प दहा वर्षांच्या मुदतीच्या कराराने चालविण्यासाठी आवश्यक तो करार करण्यास् स्थायी समितीने मान्यता दिली.’

महापालिका शाळातील दहावी, बारावी गुणवंतांना मिळणार ५१ हजार रुपये

पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाळांतील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुक्रमे ८५ टक्के आणि ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्या गुणवंत विद्यार्थ्यांना शारदाबाई पवार योजनेअंतर्गत प्रत्येकी ५१ हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या वर्षी इयत्ता दहावीच्या १५८ आणि इयत्ता बारावीच्या ३०३ अशा एकूण ४६१ विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रत्येकी ५१ हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी २ कोटी ३५ लाख ११ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात एक कोटी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. उर्वरित एक कोटी रुपयांचे वर्गीकरण पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएल मोफत बससेवेच्या तरतुदीतून करण्यात आले आहे. या वर्षी पहिल्या सत्रात शाळा सुरू नसल्याने एकूण सात कोटी रुपयांपैकी बहुतांश तरतूद शिल्लक असल्याने त्यापैकी एक कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.’

पाषाण आणि भांबुर्डा येथे पाण्याच्या टाक्यांसाठी भूसंपादनास निधी

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाषाण आणि भांबुर्डा येथे टाक्या उभारण्यासाठी वन विभागाकडून भूसंपादन करण्यास आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात ८२ टाक्या उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी दोन टाक्या पाषाण आणि भांबुर्डा, शिवाजीनगर येथे आहेत. या जागा वन विभागाच्या अखत्यारीत आहेत. पाषाण येथे ०.५७१ हेक्टर आणि भांबुर्डा येथे ०.७०३१ हेक्टर जागा संपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी अनुक्रमे ११ लाख ७४ हजार आणि १३ लाख ९२ हजार रुपये असे एकूण २५ लाख ६८ हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.’

कर्मचा-यांना कोरडी सहानुभूती नको,फक्त विलिनीकरणाचा निर्णय घ्या विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0

‘मातोश्री’चे पॉवर सेंटर आता ‘वाय.बी.चव्हाण सेंटर‘ मध्ये

मुंबई, दि. २३ नोव्हेंबर- एकेकाळी मातोश्री हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे पॉवर सेंटर होते. सरकार कोणाचेही असो बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे रिमोट कंट्रोल होता, त्यामुळे मातोश्री पॉवर सेंटर होतं, परंतु हे पॉवर सेंटर आता यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांकडे गेले आहे, अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
संजय राऊत यांनी सांगितलं की मोर्च्यामध्ये आग ओतण्याचे काम काही लोक करीत आहेत, त्याबद्दल प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, संजय राऊत एसटी कर्मचाऱ्यांना मूर्ख समजत आहेत. पण एसटी कर्मचा-यांना सर्व कळतंय. एसटी कर्मचारी काही लहान बाळ नाही की त्यांना कळत नाही. त्यामुळे तुमची कोरडी सहानुभूती नको, तर विलिनीकरणावर बोला. कोरड्या सहानभूतीची एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यकता नाही. तुम्ही किती क्लुप्त्या करा व किती दबावशाही करा पण जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचारी माघार घेणार नाहीत असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाचा पोरखेळ सरकारने चालविला आहे. मंत्रालय सोडून अन्य ठिकाणी चर्चा कशाला करीत आहात. चर्चा करावयाची असतील तर रितसर कर्मचा-यांचे प्रतिनिधी तसेच सदाभाऊ खोत व गोपीचंद पडाळकर यांच्याबरोबर सरकारने चर्चा करावी. सरकारचा प्रतिष्ठेचा विषय असेल तर चर्चेसाठी सर्व एसटी कर्मचारीही येतील. पण आता अजून चर्चा तरी करायची आहे. सरकारने आता एका वाक्यात जाहिर करावे की, विलीनीकरण करणार की नाही व याचा निर्णय जाहीर करा असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
सरकारमध्ये विलिनीकरण केल्यानंतर एसटी कशी नफ्यात आणायची व त्याचे आर्थिक गणित कसं जमवायचं ते देवेंद्रजी फडणवीस आपल्याला सांगतील, परंतु सरकारची विलिनीकरण करण्याची इच्छाच नाही. कारण तुमच्या पोटात एक आणि ओठात दुसरे आहे. सरकारच्या पोटामध्ये एसटीचे खासगीकरण करण्याचा डाव आहे असा आरोपही प्रविण दरेकर यांनी केला.
मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि परिवहन मंत्री यांनी एकत्रित येऊन एसटी कर्मचा-यांच्या भल्यासाठी निर्णय घ्याव्या. आवश्यकता असेल तर दोन्ही विरोधी पक्षनेते व कर्मचारी प्रतिनिधी चर्चेसाठी येतील पण हा विषय मार्गी लावावा असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, खोत आणि पडळकर यांच्याबद्दल कोणाला जेलसी होत असेल तर आम्ही काय करणार. दोघेही नेते बहुजनांसाठी व कष्टकऱ्यांसाठी काम करतात. पण सरकार फक्त टिका करण्याचे काम करीत आहे.
पुन्हा पुन्हा सरकारचे तेरावे घालण्याची वेळ येऊ देऊ नका. आमचे आंदोलन सनदशीर व शांततेच्या मार्गाने सुरु आहे. पण उद्या जर या कर्मचाऱ्यांची खरच माथी भडकली , तर एसटी कर्मचारी सरकारला सळो की पळो करून सोडतील आणि म्हणून सरकारने कर्मचाऱ्यांचा फार अंत पाहू नये असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.

प्रत्येक संकटावर मात करुन महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने पुढे जात राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

अलिबाग, दि.23 :- महाराष्ट्राने अनेक संकटे पाहिली, अनेक संकटे झेलली. परंतु हा महाराष्ट्र कधी थांबला नाही. यापुढेही हा महाराष्ट्र निर्धाराने, एकजुटीने प्रत्येक संकटावर मात करून पुढे जात राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी आज येथे केले.

श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगार येथील सुवर्ण गणेश मंदिरातील सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, सरपंच उदय बापट, सुवर्ण गणेश मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर, उपाध्यक्ष निलेश वाणी, श्रीमती सुनेत्रा पवार, श्रीमती वरदा तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी उपस्थित होते.

आज अंगारकी चतुर्थी आणि याच दिवशी दिवेआगारचे वैभव असलेल्या सुवर्ण गणेश मुखवट्याचा प्रतिष्ठापना सोहळा, म्हणूनच आजचा दिवस दिवेआगारवासियांसाठी सुवर्ण क्षण मानला जात आहे. येथील चोरीस गेलेल्या सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याच्या प्रतिष्ठापना सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री  अजित  पवार यांना सपत्नीक सुवर्ण गणेशाची पूजा करण्याचा मान मिळाला.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर आज हा सुवर्ण दिन आपल्या सर्वांना पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने कोकण आणि कोकणवासियांचा विकास अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून कोकणचा विकास साध्य करण्यासाठी हे शासन सदैव प्रयत्नशील आहे.

दिवेआगार ग्रामपंचायत व ग्रामसचिवालय कार्यालयासाठी एक कोटी रुपये निधीची घोषणा करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, फलोत्पादन योजनेचे यश हे खरंतर कोकणवासियांमुळेच पाहायला मिळाले आहे. राष्ट्रीय गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. एसटी कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. रायगडच्या भौगोलिक दृष्टीने येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कायमस्वरूपी स्थापित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असून शासन या कामात सर्व प्रकारचे सहकार्य करीत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये करावयाच्या मदतीबाबत एनडीआरएफच्या निकषांमध्ये काही बदल काही सुधारणा आवश्यक आहेत, त्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. रायगडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होत आहे. त्याचबरोबर फळप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

तसेच कृषी पर्यटन धोरण, समुद्रकिनाऱ्यावरील बीच शॅक, निसर्ग पर्यटन धोरण, शामराव पेजे महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद, अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा विकास, जेट्टी विकास कार्यक्रम, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, मॉडेल आश्रमशाळा, वसई-विरार- अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर, अशा विविध विकास कामांविषयी उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी आश्वासक भाष्य केले.

दिवेआगार समुद्रकिनारा विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, त्याचबरोबर करोनाबाबत सावधगिरी बाळगा, काळजी घ्या. शाळा-कॉलेजेस सुरू करायचे आहेत, यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. यानुषंगाने दुसऱ्या लससाठी प्रभावी मोहीम राबवावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र  कल्याणकर यांना यावेळी केल्या.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  उदय सामंत यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कोकण विभागातील विकासकामांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे सहकार्य मिळत असून महा विकास आघाडीचे हे शासन राज्यातील प्रत्येक संकटात खंबीरपणे उभे राहिले आहे. करोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असून आता कोकण विभागात पर्यटनाबरोबरच शैक्षणिक विकासासाठीही उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

यावेळी पालकमंत्री  आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या सहकार्यामुळे रायगड तसेच कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांना आवश्यक ती मदत वेळोवेळी मिळत असून येथील पर्यटन विकास, शैक्षणिक विकास त्याचबरोबर इतर विकास कामेही येत्या काळात मोठ्या प्रमाणावर विकसित होताना दिसून येतील, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित  पवार यांचे मिळणारे मार्गदर्शन हे अनमोल आहे, या शब्दात त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

दि.24 मार्च 2012 रोजी सुवर्ण गणेश मंदिरातील मुखवट्याच्या चोरीनंतर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने केलेल्या अथक प्रयत्नांची सविस्तर माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थितांना दिली व आजच्या या सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी योगदान असलेल्या सर्वांचे आभार मानले.

त्या पुढे म्हणाल्या की, सन 2012 साली सुवर्ण गणेश मुखवट्याच्या चोरीची दुर्दैवी घटना घडली. तपास सुरू झाला, काही काळ थांबला, मात्र महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्याचा तपास युद्धपातळीवर करण्यात आला. आणि आज श्री गणेशाच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात येऊन आपल्या सर्वांना या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होता आले. निसर्गरम्य दिवेआगार पर्यटनाला चालना मिळाली होती, मात्र चोरीच्या या घटनेमुळे येथील पर्यटनाला ब्रेक लागला होता. परंतु आजच्या दिवसानंतर पुन्हा एकदा श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला उभारी प्राप्त होईल ती आजच्या या दिवेआगार सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना सोहळ्यामुळे.

याप्रसंगी खासदार सुनील तटकरे म्हणाले की, आजचा अंगारकीचा योग विशेष आहे. गेली 9 वर्षे दिवेआगार येथील वर्ण मुखवट्याच्या चोरीच्या घटनेनंतर येथील अंगारकी चतुर्थी उत्साहात साजरी होऊ शकत नव्हती. मात्र आजच्या या सोहळ्याने येथील नागरिकांमध्ये पूर्वीचा उत्साह पुन्हा संचारला आहे.

दिवेआगार येथील पर्यटनाला पुन्हा एकदा उभारी मिळण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी शासनाकडून आम्हाला बळ मिळत आहे असे सांगून श्रीवर्धन तालुक्याला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळाली आहे, त्यासाठी महाविकास आघाडी शासन विशेष प्रयत्नशील आहे. येत्या काही काळात सागरी महामार्गाचा विकास, कोकण विभागातील समुद्रकिनाऱ्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास अशा विविध माध्यमातून कोकणचा कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही. चिपी विमानतळामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोकणातील अनेक भागात पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे पर्यटन व्यवसाय आता बहरु लागला आहे. दिवेआगर येथील साडेचार किलोमीटरचा समुद्रकिनारा विकसित केल्यास येथील पर्यटनही विकसित होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथे सन 1997 साली अंगारकी चतुर्थीच्या दिवशी एका नारळ पोफळीच्या बागेत सुवर्ण गणेशाची मूर्ती सापडली आणि जिल्ह्यातील दिवेआगार हे ठिकाण प्रसिद्धी झोतात आले. सुवर्ण गणेश पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी सुरू झाल्यामुळे येथील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळाली. मात्र सन 2012 साली येथील सुवर्ण गणेश मूर्तीच्या सोन्याच्या मुखवट्याची चोरी झाली आणि पर्यटनाच्या माध्यमातून प्राप्त झालेले येथील वैभव लयास गेले. तब्बल 9 वर्षांचा काळ लोटल्यानंतर रायगड पोलीस, विविध शासकीय यंत्रणा आणि स्थानिक पत्रकार या सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळे आज मंगळवार, दि.23 नोव्हेंबर 2021 रोजी अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने शासकीय अधिकाऱ्यांच्या, पोलीस प्रशासनाच्या, स्थानिक पत्रकार आणि नागरिकांच्या साक्षीने सुवर्ण गणेशाच्या सुवर्ण गणेश मुखवट्याचा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला. यामुळे पुन्हा एकदा दिवेआगार पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. येथे चोरीसारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून या ठिकाणी रायगड पोलीस दलामार्फत पोलीस चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. या नूतन पोलीस चौकीचे उद्घाटन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले, तसेच पालकमंत्री  आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून 2 कोटी रुपये खर्च करून नळपाणी योजना मंजूर करण्यात  आली असून यावेळी या योजनेचे देखील अजित  पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे जेष्ठ प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या अभंगवाणीने करण्यात आली. प्रास्ताविक दिवेआगार चे सरपंच उदय बापट यांनी केले तर सूत्रसंचालन सुधीर शेठ यांनी केले.

सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याची चोरी झाल्यापासून ते त्या मुखवट्याची पुन्हा प्रतिष्ठापना होईपर्यंत ज्या व्यक्तींनी आपले प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या योगदान दिले, त्या सन्मानमूर्तींचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यामध्ये सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री.कांबळे, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल गायकवाड, संजय शुक्ला, संजय शितोळे, ॲड. प्रसाद पाटील, ॲड.ए.सी.गावंड, ॲड.भूषण साळवी, ॲड.विलास नाईक, श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, श्रीवर्धन तहसिलदार सचिन गोसावी,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पु.गाडगीळ ज्वेलर्स, पोलीस निरीक्षक  धर्मराज सोनके, महेंद्र शेलार, विराज काशिनाथ पाटील, श्रीमती अनिता घडशी, श्रीमती उषा भगत, माया हिऱ्या चौगुले, सचिन निजामपूर, सचिन खैरनार, संजय खोपकर, रत्नाकर शिरकर, उल्हास खोपकर, देवेंद्र नार्वेकर, परिमल भावे, पत्रकार वैभव तोडणकर आदिंचा सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य स्पर्धांना 15 डिसेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत तर सादरीकरणाला सुरुवात होणार 15 जानेवारी पासून

0

-सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची घोषणा

मुंबई, दि. 23 : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1 जानेवारी 2022 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने अनेक रंगकर्मी तसेच सहभागी संस्था व संघटना यांनी प्रवेशिका सादर करण्याची मुदत तसेच सादरीकरणासाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती. या विनंतीचा विचार करुन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी राज्य नाट्य व बालनाट्य स्पर्धेची प्रवेशिका सादर करण्याची मुदत 15 डिसेंबर पर्यंत तर नाट्य स्पर्धा सादरीकरण दिनांक 15 जानेवारी पासून सुरुवात होईल, अशी घोषणा आज केली.

राज्यातील जास्तीत जास्त संस्थांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री महोदयांनी केले आहे. तसेच कोविड विषयक नियमांचे पालन करून नाटकांची तालीम व प्रयोग सादरीकरण करावे असेही आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या घोषणेस अनुसरून संचालनालयामार्फत प्रसिद्ध पत्रक काढण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केले आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

डॉ.प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड

0

मुंबई, दि. 23 : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विधानपरिषदेतील ज्येष्ठ सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती.

 या पोटनिवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या डॉ.प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली असल्याचे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी जाहीर केले आहे.

महाविकास नव्हे महाविनाश आघाडी-खासदार विनय सहस्रबुद्धे

0

पुणे, 23 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही धोरण स्पष्टता नाही, कारभारात समन्वय नाही, एकमुखी नेतृत्व नाही, आणि राज्यकारभार चालवण्यासाठी एकसंध टीम नाही. त्यामुळे या आघाडीचे नाव जरी महाविकासआघाडी असले तरी प्रत्यक्षात गेल्या दोन वर्षाचा कारभार बघता महाराष्ट्राच्या दृष्टीने ही महाविनाश आघाडी म्हणून सिद्ध झाली असल्याची टीका खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीच्या दोन वर्षांच्या पूर्ततेवर भाजपची भूमिका मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सहस्रबुद्धे बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पश्चिम महाराष्ट्र प्रसिध्दी प्रमुख संजय मयेकर, शहर सह प्रसिद्धी प्रमुख हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर प्रशांत कोतवाल उपस्थित होते.

सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, ‘या सरकारचा कारभार बघताना महाराष्ट्राची जनता ही आज हतबल झाली आहे. अनुनयवादाची कास आणि गुन्हेगारांना संरक्षण हा एकमेव कार्यक्रम घेऊन हे सरकार आज काम करताना दिसत आहे अमरावती आणि इतर ठिकाणी नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. २०१२ मध्ये मुंबईत निघालेला मोर्चा आणि त्यावेळी तिथे हुतात्मा स्मारकावर झालेला हल्ला, त्याची मोडतोड या सगळ्या घटनांची राज्यातील जनतेला पुन्हा आठवण व्हावी अशा प्रकारचा हा अमरावतीचा सगळा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसा कारभार करण्यामध्ये महा विकास आघाडीचे सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे.’

सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, ‘परकीय गुंतवणूक, महिला सुरक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या किंवा अन्य आरोग्य विभागाच्या परीक्षांचे नियोजन, विद्यार्थ्यांचे प्रश्न, एसटी कामगारांचे प्रश्न, पिक विमा संदर्भात सरकारची कार्यवाही या सर्व विषय महा विकास आघाडी सरकारने पूर्णपणे गोंधळ निर्माण केलेला आहे. महीला अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी शक्ती बिल आणणार अशा प्रकारची घोषणा झाली होती ते येणार त्याच्या बद्दलची कुठलीही चर्चा सरकारचे नेतृत्व करणारे करत नाहीत. फडणवीस सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्त जनतेसाठी जो शासनादेश काढला होता त्यात आघाडी सरकारने कपात केल्याचे दृश्य आहे. या सरकारच्या नेत्यांनी पूर्वी एसटीच्या कामगारांबद्दल खूपच संवेदनशील पद्धतीने मांडणी केली होती ती मांडणी विस्मरणात गेल्याच. शिवसेनेने आपली हिंदुत्वाची भूमिका बाजूला ठेवली परंतु नवीन कोणती भूमिका घ्यायची हे अजून ठरत नाही. सत्तेचे व्यसन लागलेले तिघेजण एकत्र येऊन आज सत्ता उपभोगत आहेत परंतु त्यातून महाराष्ट्राच्या जनतेची कुठल्याही प्रकारचा बदल होताना दिसत नाही ही वास्तविकता आहे ते लोकांसमोर ठळकपणे राज्यातील जनतेच्या लक्षात आले आहे. हे सरकार संपूर्णपणे अंतर्विरोधाने ग्रस्त असून आज सरकार म्हणून यांचे अस्तित्व राहिलेले नाही.’

औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी 48 लाखांचा साठा जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

0

मुंबई, दि. 23 : “मायफेअर क्रिम” चे उत्पादक झी लॅबोरटरीज लि., पोआंटा साहिब, हिमाचल प्रदेश या औषधांच्या लेबलवर अविश्वसनीय सौंदर्यता व त्यामध्ये असलेल्या माहितीपत्रकावर ‘त्वचेचा रंग उजाळते’ अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर छापल्यामुळे भिवंडी येथील गोडाऊनमधून 14 लाखांचा व नागपूर येथून 34 लाखांचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त व औषध नियंत्रण प्राधिकारी दा.रा. गहाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 106, अनुसूचीचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्याचे औषध निरीक्षक प्रशांत आस्वार व रासकर यांनी भिवंडी येथे तर नागपूर येथे औषध निरीक्षक महेश चौधरी यांनी साठा जप्त केला आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे.

औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादकांनी औषधे व जादुटोणा आदी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 व नियम 1955 आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 च्या तरतुदीचे उल्लंघन  करणा-या जाहिराती प्रसिध्द करु नयेत. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह जाहिराती आढळल्यास अन्न व औषध प्रशासनास हेल्पलाईन क्रमांक 1800222365 वर संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

5 लाख घरे पूर्ण करण्याचा संकल्प – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

0

मुंबई, दि. 23 : गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकारचे असून राज्यातील जनतेकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी कमीत कमी वेळेत घरे बांधून ते स्वप्न पूर्ण करावे. या महाआवास अभियानामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मिळालेले यश पाहता महाआवास अभियान टप्पा-2 मध्ये 5 लाख घरे बांधण्याचे माझे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्याचा आज संकल्प करून महाराष्ट्र राज्य अन्य राज्याच्या तुलनेत अधिक सक्षमपणे आणि गतिमानतेने पुढे नेऊ, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केला.

महाआवास अभियान- ग्रामीण टप्पा-2 चा शुभारंभ आज मंत्रीमहोदय श्री.मुश्रीफ यांच्या हस्ते आज मंत्रालयातून करण्यात आला. या राज्यस्तरीय शुभारंभ प्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे याचबरोबर दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील विभागीय आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, उपायुक्त (विकास), जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री.मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील ग्रामीण भागात ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून विविध ग्रामीण आवास योजनांमधून शासन बेघरांना सर्व सुविधांनी युक्त असा हक्काचा निवारा पुरविण्यात यशस्वी होत आहे. याचाच भाग म्हणून दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबविलेल्या महा आवास अभियान – ग्रामीण (टप्पा-1) मध्ये 1260 पेक्षा जास्त बहुमजली इमारती, 630 पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच 750 घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर 50 हजार 112 भूमीहिन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या टप्पा-1 मध्ये आपण 4 लाख 25 हजार घरकुले भौतिकदृष्ट्या बांधून पूर्ण केली असून उर्वरित घरकुले तात्काळ पूर्ण करण्यात येणार आहे. महाआवास अभियान टप्पा-2 हा 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत असून हे अभियान अधिक गतिमानतेने आणि गुणवत्तेने राबविण्यात येणार असल्याचे मंत्रीमहोदयांनी सांगितले.

दृरदूष्यप्रणालीद्वारे राज्यमंत्री श्री.सत्तार म्हणाले की, बेघर व्यक्तींना घरे देण्यात काही अडचणी येत असेल, त्यांच्या घरांकरिता रेती, वाळू, आदी साहित्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असतील, तर त्या शासन स्तरावर तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. या घरांकरिता काही रक्कम केंद्र सरकारकडून मिळत असून ती रक्कम मिळण्यास अडचणी असल्यास त्याही प्राधान्याने सोडविल्या जातील. या महाआवास अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय तसेच ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची कल्पना अतिशय उत्तम असल्याचे श्री.सत्तार यांनी यावेळी सांगितले.

अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार म्हणाले की, महाआवास अभियान टप्पा-1 मध्ये संस्था आणि व्यक्तींनी खूप चांगले काम केले आहे. राज्यातील गरीबांकरिता बांधण्यात येणाऱ्या घरांचा बांधकाम कालावधी हा आज 1 वर्षाचा असून तो निश्चितच आणखी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी आय.आय.टी. मुंबईच्या मदतीने राज्यातील 1 हजार 300 ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची तांत्रिकदृष्ट्या क्षमता बांधणी केली असल्याचाही या अभियानाकरिता निश्चितच उपयोग होणार असल्याचेही राजेशकुमार म्हणाले.

ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.दिघे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना इत्यादी ग्रामीण गृहनिर्माण योजनांबरोबर जागा नसलेल्या लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करून देणे आदींबाबत सर्व शासकीय यंत्रणांनी खूप चांगले काम केले आहे. आता महा आवास अभियान टप्पा-2 हा अधिक गतिमान करण्यात येणार असल्याचे श्री.दिघे यांनी सांगितले.

याप्रसंगी मंत्रीमहोदय यांच्या हस्ते महाआवास अभियान-ग्रामीण 2021-22 च्या घडीपुस्तिका तसेच पोस्टरचे विमोचन करण्यात आले. यावेळी राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणच्या महाआवास हेल्पलाईन 1800 22 2019 या टोल फ्री क्रमांकही सगळ्यांसाठी खुला करण्यात आला.