Home Blog Page 2202

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२०० रूपयांपर्यंत वाढ – मंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणा

0
  • दरमहा वेतनाची हमी राज्य शासन घेणार
  • कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे परिवहन मंत्र्यांचे आवाहन

मुंबई,  दि.२४ :- एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे.  संपावर तोडगा म्हणून एसटीच्या चालक,  वाहक,  यांत्रिकी कर्मचारी  व लिपिकांच्या पगारात सुमारे 7200 रुपयांपासून 3600 रूपयांपर्यत घसघशीत वाढ केली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री, अॅड. परब यांनी आज झालेल्या पत्रकार परीषदेत केली.

एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक पगारवाढ आहे. तसेच यापुढे कामगारांचा पगार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यत होण्याची हमी राज्य शासनाने घेतली आहे, असे सांगतानाच कामगारांनी आता संप मागे घेऊन तातडीने कामावर रूजू होण्याचे आवाहनही श्री. परब यांनी यावेळी केले.

श्री. परब म्हणाले,एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे  ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.  प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. एसटी कर्मचारी कामावर रूजू होऊन वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू व्हावी यासाठी कामगारांनी तातडीने कामावर रूजू व्हावे, तसेच संपकाळात निलंबित व सेवा समाप्तीची कारवाई केलेल्या  कर्मचाऱ्यांनी सुद्धा कामावर रूजू व्हावे. कामावर रूजू होताच त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल. परंतु, जे कर्मचारी कामावर रूजू होणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे श्री. परब यांनी  जाहीर केले. तसेच नव्याने झालेली वेतनवाढ नोव्हेंबरच्या पगारापासून देण्यात येईल, वेतनासाठी आवश्यक निधी राज्य शासन देणार असून पगार वेळेत देण्याची हमीही राज्य शासनाने घेतली आहे.असेही मंत्री, अॅड.  परब यांनी यावेळी  स्पष्ट केले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत गेल्या दोन दिवसांपासून सह्याद्री अतिथिगृह येथे कामगारांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा सुरु होती. मंगळवारी झालेल्या बैठकीत मंत्री परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.  मा.न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळास समोर ठेवला होता तसेच शिष्टमंडळाने याबाबत पर्याय द्यावे असे  आवाहन केले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीला एसटी कामगारांबरोबरच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदी उपस्थित होते. त्यानंतर आज  सायंकाळी झालेल्या  पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री श्री. परब यांनी  कामगारांच्या वेतनवाढीची घोषणा केली.

दरम्यान, कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार श्री. शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचे श्री. परब यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीसंदर्भात माननीय न्यायालयाने  समिती नेमली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 12 आठवड्यांची मुदत दिली आहे. परंतु, समितीला दिलेल्या मुदतीच्या दरम्यान ग्रामीण भागातील जनता, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे नुकसान होऊ नये, म्हणून ही वेतनवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. समितीचा अहवाल जो येईल त्यावर शासन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.  संपाचा तिढा सोडविण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. कामगारांनी ही एक पाऊल पुढे टाकून संप मागे घ्यावा, असे आवाहनही परिवहनमंत्री श्री. परब यांनी यावेळी  केले.

दरम्यान एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चालक-वाहक यांचा मोठा हातभार असतो. यापूढे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी  चालक-वाहक यांनी विशेष कार्य केल्यास त्यांना उत्पन्नवाढीबाबत प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. कामगारांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन ही श्री. परब यांनी यावेळे केले. आत्महत्या करणाऱ्या कुटुंबियांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाआवास अभियानात अपूर्ण घरकूलांचे काम पूर्ण करा-डॉ. अनिल रामोड

0

पुणे, दि. 24 : महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अपूर्ण घरकूलांची कामे पूर्ण करावीत आणि मंजूर घरकूलांची कामे त्वरीत सुरू करावी, अशा सूचना अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयातून महाआवास अभियानाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेस उपायुक्त विजय मुळीक, राज्य कक्षाचे उपसंचालक नितीन काळे, सहायक आयुक्त डॉ. सीमा जगताप आदी उपस्थित होते.

डॉ. रामोड म्हणाले, गरजूंना घरकूल उपलब्ध करून देण्यासाठी 20 नोव्हेंबरपासून अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात करण्यात आली आहे. शासनाच्या विविध गृहनिर्माण योजनांच्या कामांना गती देण्यासाठी आणि क्षेत्रीय यंत्रणांच्या समस्या दूर करण्यासाठी अभियानाबाबत कार्यशाळेचे विविध स्तरावर आयोजन करण्यात येत आहे. अभियानांतर्गत लाभार्थ्यांना घरकूल बांधण्यास जागा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. ग्रामसभा घेऊन प्रतिक्षा यादी त्वरीत अंतिम करावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा स्तरावरदेखील ‘डेमो हाऊस’ बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पुणे विभागाने  चांगली कामगिरी केल्याचे सांगून दुसरा टप्पा यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे, अशी अपेक्षा डॉ. रामोड यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात श्री. मुळीक यांनी सादरीकरणाद्वारे अभियानातील विविध उपक्रमांची माहिती दिली. अभियान राबविताना मनरेगा आणि घरकूल योजना कक्षाचा परस्पर समन्वय ठेवून अभियानाला गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. काळे यांनीदेखील अभियानाच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेस दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.

गुणपडताळणीसाठी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये ५ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध

0

पुणे दि.२४: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती, भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम (तात्पुरता) निकालाबाबत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये ५ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल २४ नोव्हेंबर २०२१ रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता ५० रूपये याप्रमाणे शुल्क रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी तसेच ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी ५ डिसेंबर २०२१ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.

इमाव विभागाच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ७३२ कोटी रूपये वितरित

0

मुंबई, दि.२४ :-  इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी आज ७३२ कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत.तर ऑक्टोबर २०२१ पर्यंत ७३२ कोटी रूपये यापूर्वीच वितरित करण्यात आले होते. त्यामुळे सन २०२१-२२ या वर्षासाठी शंभर टक्के निधी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती सन २०२१-२२ या वर्षासाठी १४६४ कोटी रूपये इतका निधी अर्थसंकल्पित केला होता. त्यापैकी ऑक्टोबर २०२१ पर्यंत ५० टक्के निधी ७३२ कोटी रूपये वितरित करण्यात आला होता. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उर्वरित निधी वितरित करण्याबाबत विनंती केली होती. दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी एकूण अर्थसकंल्पीत १४६४ कोटीमधील उर्वरित ५० टक्के रक्कम ७३२ कोटी रूपये रक्कम वितरित करण्यात आली आहे. अशा प्रकारे अर्थसंकल्पीत  मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठीची  २०२१-२२ या वर्षासाठीची शिष्यवृत्तीची रक्कम शंभर टक्के वितरित करण्यात आली आहे.

महत्त्वाची धोरणे प्रतिबिंबित करणाऱ्या महाराष्ट्र दालनास आयआयटीएफमध्ये उत्तम प्रतिसाद

0

नवी दिल्ली , २४ : राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ)  विद्युत धोरण, स्टार्टअप व हस्तकलांच्या वस्तूंनी सज्ज महाराष्ट्र दालनास देश-विदेशातील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे .

महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रगतीमैदान येथील हॉल क्र. २ मध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ या मध्यवर्ती संकल्‍पनेवर सुबक असे महाराष्ट्र दालन साकारण्यात आले आहे. या दालनात राज्यशासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या विद्युत वाहन धोरण, विविध स्टार्टअप, औरंगाबाद औद्योगिक शहर, कोस्टल रोड प्रकल्पाची माहिती देणारे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. राज्याची समृध्द हस्तकला दर्शविणारे उद्योग समूह (क्लस्टर्स),बचतगट  आदींचे उत्पादने  प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेच्यावतीने (इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशन) प्रगती मैदानावर सुरु असलेल्या ४०व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात भेट देणाऱ्या देश-विदेशातील ग्राहकांना महाराष्ट्र दालन आकर्षित करीत आहे.

विद्युत वाहन धोरण व स्टार्टअप्सचे आकर्षण

दालनाच्या दर्शनी भागात स्थित टाटा नेक्सॉन या चार चाकी विद्युत गाडीकडे ग्राहकांची ओढ दिसते. या गाडीत बसून तसेच गाडीचे निरिक्षण करून ही ग्राहक मंडळी राज्याच्या विद्युत धोरणाचीही माहिती घेत आहेत  व आपल्या जिज्ञासा, शंका व प्रश्नांचे निरसण करून घेत आहेत. येथून बाहेर पडताना ‘वा, महाराष्ट्र सरकार अच्छी पहल कर रही है’ अशा उत्स‌्फुर्त प्रतिक्रियाही देत आहेत.दालनाच्या प्रवेशद्वारावरच महाराष्ट्रातील स्टार्टअप्सची उत्पादने व त्यांचे उत्तम सादरीकरण ग्राहकांची पसंती मिळवत आहे. आत्मनिर्भरतेचा संदेश देणारी भली मोठी वज्रमुठ आणि त्याभोवती फिरणा-या खास सायकली,ड्रोन आणि वॉशरुम ओडर फ्री इंस्ट्रुमेंट तर दालनाला भेट देणा-यांना येथेच थबकवते. पुणे येथील जीएमएस स्टार्टअप्सने तयार केलेल्या टायटेनियमपासून निर्मित, वजनाने हलक्या  व आकर्षक सायकली, मुंबईच्या स्कायडॉक स्टार्टअपकडून तयार करण्यात आलेले आकर्षक ड्रोन व त्याचे ॲडव्हान्स फीचर जाणून  घेण्यासही येथे गर्दी दिसत आहे. न्हानी घरातील दुर्गंध बाहेर काढणारे खास यंत्रही (वॉशरुम ओडर फ्री इंन्ट्रुमेंट) येथे ग्राहकांच्या  पसंतीस उतरत आहे.

महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य केंद्र ‘मैत्री’, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ‘उमेद’, महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या ‘माविम’, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या आणि खादी ग्रामोद्योग विभागाशी  संलग्न आठ उद्योग समुहांची  (क्लस्टर) उत्पादनेही येथील स्टॉलवर प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. राज्याची प्रसिध्द पैठणी साडी, सांगलीची प्रसिध्द हळद, कोल्हापुरी चप्पल व अन्य पादत्राणे, चंद्रपूर  व गडचिरोलीचे अनुक्रमे कारपेट क्लस्टर आणि हस्तकलांचे स्टॉल्स, कुडाळ येथील वुडीग्रास हे बांबू पासून निर्मित फर्निचर व वस्तुंच्या स्टॉललाही या दालनास भेट देणाऱ्या  ग्राहकांची पसंती मिळत आहे व ते विक्रीही करीत आहेत.

बृह्नमुंबई महानगर पालिकेचा स्टॉलही या दालनात उभारण्यात आला असून देशाची आर्थिक राजधानी म्हणून गौरव असणा-या मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासाला चालणा देणारे कोस्टल रोड प्रकल्पाविषयी येथे सविस्तर माहिती व आकर्षक प्रदर्शन करण्यात आले आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरीडॉर अंतर्गत सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज व पर्यावरणपूरक अशी एक हजार एकरावर तयार होत असलेले औरंगाबाद औद्योगिक शहराविषयी माहिती देणारा आकर्षक स्टॉलही  या  दालणास भेट देणा-या व्यापार व उद्योग क्षेत्रातील मंडळींचे लक्ष वेधून घेत आहे.

राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत

0

मुंबई, दि. 24 : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत सर्व खाद्यतेल व खाद्य तेलबियांच्या साठवणुकीवर दि. 31 मार्च, 2022 पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर साठा निर्बंधाची मर्यादा किती प्रमाणामध्ये असावी याबाबत राज्य शासनाने निर्णय घ्यावयाचा आहे. राज्यात व्यापाऱ्यांसोबत झालेल्या प्राथमिक चर्चेनुसार राज्यात खाद्यतेल व खाद्य तेलबियांवर साठा निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.

सर्व खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर साठा निर्बंधाची मर्यादा किती प्रमाणामध्ये असावी याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली कृषि व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तसेच खाद्यतेल व्यापारी संघटनांबरोबर बैठका घेण्यात आल्या होत्या. त्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार येत्या दोन-तीन महिन्यात खाद्यतेलबियांचे नवीन उत्पादन येणार आहे त्यामुळे साठा निर्बंध लावल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल. याशिवाय देशात मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात करण्यात येते. त्यावर निर्बंध लागू नाहीत. सध्या खाद्यतेलाचे भाव स्थिर आहेत.त्यामुळे केवळ देशांतर्गत खाद्यतेलावर साठा निर्बंध लावणे योग्य होणार नाही, असा निर्णय सविस्तर चर्चेनंतर या बैठकांमध्ये घेण्यात आला आहे. खाद्यतेलाचे भाव  तीस टक्के पेक्षा जास्त वाढल्यास साठा निर्बंध लावण्यासाठी संबंधित व्यापारी संघटनासोबत पुन्हा बैठक घेऊन कार्यवाही करावी, असाही निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.त्यामुळे केंद्र शासनाच्या दि. 08 ऑक्टोबर, 2021 च्या अधिसूचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात खाद्यतेल व खाद्य तेलबियांवर साठा निर्बंध लावण्यात आलेले नाहीत अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत प्रसिध्दीस देण्यात आलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नामकरण

0

पुणे : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येस राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नामकरण, तैलचित्राचे अनावरण आणि पु. ल. देशपांडे ग्रंथालयाचा उद्घाटन समारंभ बुधवारी पार पडला.

डेंगळे पूल, शिवाजी नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथील दुसऱ्या मजल्यावर कार्यकर्ता प्रशिक्षणासाठी उभारण्यात आलेल्या सभागृहाचे स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह असे नामकरण करण्यात आले. मराठी साहित्य समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते नामकरण समारंभ पार पडला. तसेच, या सभागृहातील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राचे अनावरण व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी उभारण्यात आलेल्या पु. ल. देशपांडे ग्रंथालयाचे उद्घाटनही मिलिंद जोशी यांच्या हस्ते पार पडले.

श्री. मिलिंद जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनचरित्राचे अनेक पैलू उलगडून सांगितले तसेच पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.ग्रंथालयाच्या माध्यमातून विचारांची पकड अधिक मजबूत होण्यास मदत होईल. सध्याच्या या असहिष्णू काळात विचारांची लढाई विचारानेच लढण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची गरज असून येत्या काळातील ही लढाई जिंकताना पु. लं.च्या विचारांचा निश्चित उपयोग होईल, याची खात्री आहे असेही मिलिंद जोशी म्हणाले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते श्री.अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधीपक्ष नेत्या सौ.दिपाली धुमाळ, शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर,राष्ट्रवादी युवकचे महेश हांडे,युवती शहराध्यक्षा सुषमा सातपुते, कार्याध्यक्षा अँड.श्रुती गायकवाड आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

सावित्रीच्या लेकींना सुरक्षा देण्यात आघाडी सरकार अपयशी -चित्रा वाघ यांची टीका

0

पुणे-बीड, साकीनाका, परभणी , डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या घटना घडल्या तरी राज्यातील निर्भयांचा आक्रोश सरकारच्या कानी पडलेला नाही . महिला सुरक्षेच्या विषयात आघाडी सरकारची बेफिकीरी आणि निष्क्रीयता चीड आणणारी आहे. आता महिलांनी स्व सुरक्षेसाठी स्वत:च कायदा हाती घ्यायचा की घरकोंबड्या सरकार प्रमाणे त्यांनीही घरातच बसून रहायचे ? असा संतप्त सवाल भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या तसेच प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला. महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारला सत्तेत रहाण्याचा अधिकारच नाही , असा घणाघात ही त्यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीच्या दोन वर्षांच्या पूर्ततेवर भाजपची भूमिका मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ बोलत होत्या. पश्चिम महाराष्ट्र प्रसिध्दी प्रमुख संजय मयेकर, शहर सह प्रसिद्धी प्रमुख हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर, प्रशांत कोतवाल यावेळी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी महिला सुरक्षाप्रश्नी सरकारच्या अपयशाचा पाढाच वाचून दाखवला. त्या म्हणाल्या की, ह्या सरकारने दोन वर्षे महिला सुरक्षेसंदर्भात केवळ महिलांची घोर निराशा आणि फसवणूक केली.ज्या शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी देऊन सन्मानाने घरी पाठवले ,त्या छत्रपतींचा दाखला वेळोवेळी देणा-या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यच रोजच महिलांचा अवमान करताना दिसत आहेत . महिलांच्या सुरक्षेसाठी तत्कालिन गृहमंत्र्यांनी २०१९ च्या हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा आणण्याच्या घोषणा केल्या तो कायदा अजूनही लागू झालेला नाही . महिला अत्याचार प्रश्नी चहुबाजूंनी रान उठल्यानंतर जवळपास दीड वर्षांनंतर अखेर सरकारला महिला आयोग अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा ऑक्टो २०२१ हा मुहूर्त सापडला .वाढत्या अत्याचाराविरोधात आंदोलन असो अथवा भाजपाच्या १२ महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र असो प्रत्येक वेळी भाजपाने ‘ धक्का’ दिला की या सरकारची गाडी हलणार अशी स्थिती राज्यात आहे.
मोदी सरकारकडून महिला सबलीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत तसेच महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला अत्याचार रोखण्यासाठी 2020 साली नवी नियमावलीही जाहीर करण्यात आली . त्यानुसार महिलांवरील अत्याचाराचा एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई , बलात्काराचा तपास दोन महिन्यात पूर्ण करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रात एफआयआर नोंदवण्यात हलगर्जी , पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यात टाळाटाळ होत आहे.
त्या म्हणाल्या की, महिला अत्याचारांच्या असंख्य घटना घडत असताना सरकारमधील मंत्र्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही . एका मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप झाल्याने राजीनामा द्यावा लागला तर दुसरे मंत्री सेलिब्रिटींच्या मुलाच्या अटकेविरोधात , जावयांवरील कारवाई विरोधात पत्रकार परिषदा घेण्यात आणि वायफळ चर्चा करण्यात मग्न आहेत. लोकप्रतिनिधी , राष्ट्रवादी युवा प्रदेशाध्यक्ष यांच्यावर सत्तेचा गैरवापर करत महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप होत आहेत . लखीमपूर प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद ची हाक देणा-या सरकारमधील मंत्र्यांना राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना दिसत नाहीत . महाराष्ट्र बंद साठी जितकी यंत्रणा कामाला लावली गेली तितकी मेहनत जर महिला सुरक्षेसाठी केली असती तर लेकीसुनांना सुरक्षित वाटले असते असे त्या म्हणाल्या.

बँकेत घुसून दोन दरोडेखोरांनी मॅनेजरवर झाडली गोळी, घटना कॅमेऱ्यात कैद

0

पुणे-पुण्यातील जुन्नर ग्रामीण भागात आज मोठा दरोडा पडला आहे. येथे दोन दरोडेखोरांनी सहकारी बँकेत घुसून पिस्तुलाच्या धाकावर बँकेत ठेवलेले अडीच लाख रुपये लुटले. दरोड्याचा विरोध करणाऱ्या बँक मॅनेजरवर दरोडेखोरांनी गोळी झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बँकेच्या आत आणि बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोड्याची ही घृणास्पद घटना कैद झाली आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोन दरोडेखोर दुचाकीवरून आले. दोघांनी हेल्मेट घातले होते. दोघेही हातात पिस्तुल घेऊन बँकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये घुसले, तिथे अनंत ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था बँकेचे व्यवस्थापक दशरथ भोर हे एका महिला कर्मचाऱ्याशी बोलत होते. दरोडेखोरांनी आधी त्यांना पैसे देण्यास सांगितले आणि त्यांनी नकार दिल्यावर एकाने त्यांच्या छातीत गोळी झाडली. यामुळे ते जागीच पडले. ते पडताच महिला कर्मचाऱ्याने त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना धमकावत दरोडेखोरांनी पिस्तूल दाखवले. यानंतर आरोपींनी पैशांनी भरलेली बॅग घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.या प्रकरणाचा तपास करणारे पुणे ग्रामीण पोलिसांचे एसपी डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले की, बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पुणे ग्रामीण पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महामार्गावरून पळून गेल्याचे तपासात समोर आले आहे, त्यामुळे पोलिसांना त्यांच्या वाहनाचा क्रमांक मिळाला आहे. सध्या वाहनातील क्रमांक खरा की बनावट याचा तपास सुरू आहे. पोलिस बँकेतील सीसीटीव्ही फुटेज आणि गेल्या काही दिवसांपासून येथे आलेल्या लोकांच्या नोंदी तपासत आहेत.

एकीकडे कॉंग्रेसशी आघाडी दुसरीकडे भाजपशी हातमिळवणी-सांगा यालाच आघाडी धर्म म्हणता काय ?

भाजपच्या भ्रष्टाचाराला राष्ट्रवादीचे प्रोत्साहन ?

पुणे-एकीकडे कॉंग्रेस शी आघाडी करून अगोदर भाजपविरोधात शड्डू ठोकायचे आणि नंतर मात्र घुमजाव करत , भाजपशी हातमिळवणी करायची असे वारंवार वर्तन पुणे महापालिकेत शहर राष्ट्रवादीचे वारंवार राहिले आहे .सांगा याला तुम्ही आघाडी धर्म म्हणता काय ? असा खुले आम सवाल शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केला आहे .

या संदर्भात बागवे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि ,’ महाविकास आघाडीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गेल्या ५ वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे ठरविले होते. असे असताना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ऐन वेळी घुमजाव करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सहकार्य केले. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आघाडीचा धर्म न पाळता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत केली हे चिंताजनक आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आत्मपरीक्षण करावे. ज्या उद्देशाने महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम केले त्याच महाविकास आघाडीतील घटक पक्षाने पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत करून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाला प्रोत्साहन दिले असे विधान पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

     गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या १६० कोटी रूपयांचा ‘एटीएमएस’ प्रकल्पामध्ये महापालिकेमध्ये देखभाल दुरूस्तीचा खर्च उचलावा यासाठी पुढील ५ वर्षात ५८ कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव आयत्यावेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मंजूर करून घेतला. या प्रकल्पामुळे शहरातील सिग्नल व्यवस्था सुधारणार असल्याचा दावा भाजपने केला होता. या ५८ कोटी रूपयांचे काम भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या संबंधित ठेकेदाराला मिळाले आहे. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या बाबतीत सभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि काँग्रेस पक्षाने या प्रकल्पाला विरोध केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पत्रकार परिषद घेवून या प्रकल्पाला विरोध केला होता आणि आंदोलनही केले होते. मुख्य सभेमध्ये सत्ताधारी भाजपाने उपसूचना देवून समाविष्ट गावातील १०० सिग्नलचा यामध्ये समावेश केला. हा विषय मंजूरीसाठी आल्यावर काँग्रेसच्या व शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध करीत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याची संपूर्ण माहिती द्यावी अशी मागणी केली. सदर प्रस्ताव महानगरपालिकेच्या अहिताचा आहे आणि पुणे शहरावर आर्थिक बोजा टाकणारा आहे. या प्रकल्पाची पुणे शहराला गरज नसताना स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे शहरावर आर्थिक भार लादणारा हा प्रस्ताव आहे आणि स्मार्ट सिटीने काढलेल्या निविदांची देखभाल दुरूस्ती पुणे मनपाने करावी असा हा पहिल्याच प्रकल्प आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका अनेक सामाजिक संस्थानी, संघटनांनी व पक्षांनी उपस्थित केली. काँग्रेस पक्षाची भूमिका सुरूवातीपासूनच या ठरावाला विरोधाची होती आणि म्हणून मुख्य सभेमध्ये काँग्रेस पक्षाने या विरूध्द आवाज उठविला आणि प्रस्तावाला प्रखर विरोध करून विरोधी मतदानही केले.‌ या उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशी हातमिळवणी करून प्रस्तावाच्या बाजूने मतदान कले. या आधी देखील अनेक विषयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपासोबत मतदान करून अनेक प्रकल्पांना व भ्रष्ट पद्धतीने काढण्यात आलेल्या निविदांना मान्यता देवून पुणे मनपाला आर्थिक अडचणीत आणण्याचे काम केले आहे. ही गोष्ट पुणेकर भविष्यात नक्कीच लक्षात ठेवतील.

      महाविकास आघाडीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गेल्या ५ वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे ठरविले होते. असे असताना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ऐन वेळी घुमजाव करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सहकार्य केले. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आघाडीचा धर्म न पाळता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत केली हे चिंताजनक आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आत्मपरीक्षण करावे. ज्या उद्देशाने महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम केले त्याच महाविकास आघाडीतील घटक पक्षाने पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत करून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाला प्रोत्साहन दिले असे विधान पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणाऱ्या महाविद्यालयाविरुद्ध कारवाई होणार

0

मुंबई, दि. 23 :  समाज कल्याण विभागामार्फत अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाच्या शिक्षण फी, परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेबाबत राज्यातील विविध महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडे रक्कम जमा करण्यासाठी मागणी होत आहे. तसेच कागदपत्र व निकाल देण्यासाठी अडवणुक होत असल्याबाबत विद्यार्थी व पालकांनी शासनाकडे तसेच राज्यातील समाज कल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीची गंभीर नोंद समाज कल्याण विभागाने घेतली असून आयुक्त, समाज कल्याण यांनी जी महाविद्यालये शासनाच्या आदेशांचे पालन करीत नाहीत त्यांच्यावर तत्काळ योग्य ती कारवाई करावी अशा सूचना राज्यातील विद्यापीठांना केल्या आहेत, असे सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी पत्रकाव्दारे प्रसिद्धीस दिले आहे.

केंद्र पुरस्कृत ‘भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती’ आणि राज्य शासनाची  ‘शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती फ्रीशिप योजना’ या महत्त्वाच्या योजना आहेत. या शिष्यवृत्ती योजनांसाठी, शासनाने 2003 पासून वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एखाद्या अभ्यासक्रमांत प्रवेशित असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने अथवा संस्थेने कोणत्याही प्रकारच्या शुल्काची मागणी करु नये अथवा शुल्क भरण्यासाठी आग्रह करून कागदपत्रांची देखील अडवणूक करण्यात येऊ नये अन्यथा महाविद्यालयांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

शासनाची मार्गदर्शक तत्त्वे आणि समाज कल्याण विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्देशांना न जुमानता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अंतर्गत अनेक महाविद्यालये तसेच संस्था सशर्त प्रवेश देत आहेत आणि विद्यार्थ्यांनी आधी शुल्क भरावे व नंतर शिष्यवृत्तीची परतफेड करावी अशी मागणी देखील करत आहेत. ही बाब शासनाने जारी केलेल्या कायद्याच्या आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे.

अशा शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन आणि प्रमुखांना शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना विद्यापीठस्तरावरून त्वरित द्याव्यात अन्यथा शासन आदेशांचे पालन न केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे विद्यापीठांना १५ नोव्हेंबर २०२१ रोजी दिलेल्या पत्रात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती असे पत्रक पत्रक मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे यांनी दिले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम् योजना’; टास्क फोर्सचा अहवाल सादर

0

मुंबई, दि. 23 :- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीसंदर्भात प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘शरद शतम्’ आरोग्य योजनेची कार्यपद्धती व समाविष्ट करावयाच्या आरोग्य तपासण्या यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून या योजनेला मंत्रिमंडळ मान्यतेसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार शरद शतम् योजनेत समाविष्ट करावयाच्या आरोग्य तपासण्या, ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षण, आजारांचे निदान झाल्यास विविध योजनांचा समन्वय साधून उपचार मिळवून देणे अशी योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ संचालक डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागातील संचालक दर्जाचे अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या काही नामांकित सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांची मिळून एक समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीने आपला अहवाल आज सामाजिक न्याय विभागाला सादर केला आहे. त्यानुसार विभागाने मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी या योजनेचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना काही आजार आढळला तरच आपण त्यांना दवाखान्यात घेऊन जातो, बऱ्याचदा शरीरात तोपर्यंत एखादा आजार बळावलेला असतो, त्यामुळे वर्षातून किमान एकदा सर्व प्रकारची आरोग्य तपासणी केली तर वेळेवर लहान-मोठ्या आजारांचे निदान व वेळेवर उपचार केले जाऊ शकतात. या तपासण्या पूर्णपणे मोफत असाव्यात तसेच काही आजाराचे निदान झाल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन कमीत कमी खर्चात इलाज केला जावा, अशी या योजनेची मूळ संकल्पना असल्याचे मंत्री श्री.मुंडे म्हणाले.

अशा प्रकारची योजना राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार असुन, या योजनेचा फायदा राज्यातील लाखो गरीब, निराधार त्याचबरोबर मध्यमवर्गीय कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांनी या योजनेचे स्वागत केले आहे. तर डिसेंबर महिन्यात ही योजना मंजूर करून कार्यान्वित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री श्री.मुंडे यांनी सांगितले.

भारत व दुबई यांच्यातील नाविन्यता परिसंस्थेसंबंधीत धोरणात्मक संबंध मजबूत होतील – मंत्री नवाब मलिक

0

राज्यातील टेक स्टार्टअप्सना पाठबळ मिळणार

मुंबई, दि.23 : राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी आज दुबई सिलिकॉन ओएसिस (DSO) च्या इंटिग्रेटेड फ्री झोन टेक्नॉलॉजी पार्कला भेट दिली.

राज्य शासनाच्या शिष्टमंडळासह मंत्री नवाब मलिक यांनी ‘पिपल हॅप्पीनेस ॲण्ड इनोव्हेशन’चे वरिष्ठ उपाध्यक्ष गनीम अल फलासी यांची भेट घेतली. आपल्या भेटीदरम्यान त्यांनी दुबई सिलिकॉन ओएसिस आणि दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस (DTEC) यांचा दौरा केला.

या भेटीचा एक भाग म्हणून मंत्री नवाब मलिक आणि गनीम अल फलासी यांनी राज्यातील स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राची नोडल एजन्सी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी [MSInS] आणि दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस यांच्यातील संभाव्य भागीदारीच्या मुद्यांचा अभ्यास केला.

दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रिनर कॅम्पस मध्यपूर्वेतील तंत्रज्ञान स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यास कार्यरत आहे आणि सध्या ७५ देशांमधील १,००० हून अधिक स्टार्टअप्सचे केंद्र आहे. यामध्ये प्रगत तंत्रज्ञान जसे की ब्लॉकचैन, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादि क्षेत्रांत काम करणाऱ्या स्टार्टअप्सचा समावेश आहे. तंत्रज्ञानकेंद्रित स्टार्टअप्स, नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच प्रगत सुविधा प्रदान करण्यासाठी दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस बांधील असून याअंतर्गत अत्याधुनिक को-वर्किंग स्पेसेस, एक्सीलेरेटर, व्हीसी फंड, आयडिया व्हॅलिडेशन, सल्लागार सेवा इत्यादी सेवा पुरवण्यात येतात.

महाराष्ट्र राज्यात भारतातील सर्वाधिक स्टार्टअप्स नोंदणीकृत असून, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, महाराष्ट्र शसनाच्या नाविन्यतेस पूरक वातावरणामुळे राज्यातून १६ युनिकॉर्नस तयार झालेले आहेत. भागीदारीविषयी बोलताना मंत्री श्री.मलिक म्हणाले की, ” दुबई सिलिकॉन ओएसिस (DSO) आणि दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस (DTEC) या भेटीचा उद्देश भारत व दुबई यांच्यातील नाविन्यता परिसंस्थेसंबंधित धोरणात्मक संबंध मजबूत करणे आहे. आम्हाला विश्वास आहे की दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जास्तीत जास्त स्टार्टअप्सना मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका (MENA) प्रदेशात विस्तार करण्यास मदत होईल. तसेच कौशल्य विकास विभागाच्या इतर क्षेत्रांसाठी दुबई टेक्नॉलॉजी आंत्रप्रनर कॅम्पस सोबत भागीदारी करण्यात येईल.

गनीम अल फलासी म्हणाले की, जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी दुबई हे एक आकर्षक केंद्रबिंदू असून, दुबईने नाविन्यपूर्ण वातावरण असलेल राष्ट्र म्हणून स्वत:ची ओळख बनवली आहे. “संयुक्त अरब अमिराती आणि भारत शतकानुशतके प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. खरे तर २०१९-२० मध्ये सुमारे ५९.१२ अब्ज डॉलर्सच्या द्विपक्षीय व्यापारासह संयुक्त अरब अमिराती हा भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. भारताबरोबर व्यवसाय आणि व्यापार संबंध सुलभ करण्यासाठी संयुक्त अरब अमिराती आणि दुबईने उचललेली पावले पाहता ही आकडेवारी भविष्यात अजून जास्त वाढेल याची मला खात्री आहे. याचाच एक भाग म्हणून दुबई सिलिकॉन ओएसिस भारतीय कंपन्यांना त्यांचे व्यवसाय धोरण आणि कामकाज सुरळीत करण्यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रतिबद्ध आहे.

अल फलासी यांनी महाराष्ट्रातील कंपन्यांना या प्रदेशात त्यांचे व्यवसाय स्थापित करण्यासाठी आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी अनुकूल वातावरण प्रदान करण्याच्या दुबई सिलिकॉन ओएसिसच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. उद्योजकीय परिसंस्थेस पाठिंबा देण्यासाठी आणि उद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना पडताळून स्थापित करण्यास सक्षम करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहिती केंद्र  म्हणून काम करण्याच्या दुबई सिलिकॉन ओएसिसच्या बांधिलकीवरही त्यांनी भर दिला.

भारतातील थेट परकीय गुंतवणुकीसाठी (एफडीआय) महाराष्ट्र हे सर्वात आकर्षक ठिकाण आहे आणि २००० ते २०२१ या काळात भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या जवळजवळ ३० टक्के गुंतवणूक झाली आहे. या करोना साथीच्या काळात महाराष्ट्राने ऑक्टोबर २०१९ ते जून २०२१ या काळात सुमारे २७.५ अब्ज डॉलर्सची (१०१.१४ अब्ज दिराम) गुंतवणूक आकर्षित केली आहे. भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात राज्याचे योगदान सुमारे १५ टक्के आहे आणि देशासाठी निर्यात आणि रोजगार निर्मितीत त्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

गोरगरिबांसाठी सिटी स्कॅन मशीन खरेदीसाठी झटणाऱ्या माजी अध्यक्षांना आणले रडकुंडीस

0

पुणे- पुणे महापालिकेतील स्थायी समितीचा कारभार आकस बुद्धीने आणि सिनिअर,प्रामाणिक लोकांना जाणून बुजून झुगारून देणारी कार्यपद्धती अंमलात आणून चालविला गेल्याची चर्चा असताना आज स्थायी समिती च्या माजी महिला अध्यक्षांना थेट सभागृहातच रडकुंडीला यावे लागले नव्हे त्यांना रडू आवरेनासे झाले .या महिला नगरसेविका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आहेत आणि त्यांनी त्यांच्या काळात सुरु केलेल्या वैद्यकीय प्रकल्पाच्या वृद्धीसाठी अवघ्या ३१. ५० लाखाच्या निधीची तरतूद करून हवी होती . स्पष्टच सांगायचे झाले तर पद्मावतीच्या पोटे दवाखान्यात अनेक सुविधा आहेत पण सिटी स्कॅन मशीन नाही . या साठी त्यांना ३१ लाख ५० हजार रुपये कमी पडत आहेत म्हणून त्या गेली ३ वर्षे पाठपुरावा करत आहेत . आज त्यांचा विषय स्थायी समितीपुढे आला असताना तो विद्यमान अध्यक्षांनी पुढे ढकलला .यावरून या माजी अध्यक्षांना रडू कोसळले .

या संदर्भात त्या काय म्हणाल्या ते ऐका त्यांच्याच शब्दात …..

व्यंगातून पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करणारा चित्रपट – ‘बबलू बेबीलॉन से’

0

पणजी, 23 नोव्‍हेंबर 2021 (शरद लोणकर )

कुछ लोग आये है  पेड काटने मेरे गांव में

अभी धूप है तो बैठे है उसके छांव में

‘बबलू बेबीलॉन से’या चित्रपटाच्या माध्यमातून हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे. असे मनोगत या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत सारथी यांनी आज पणजी, गोवा इथे 52 व्या इफ्फीमध्ये व्यक्त केले. इंडियन पॅनोरमाच्या नॉन -फीचर फिल्म विभागात त्यांच्या या चित्रपटाचे आज प्रदर्शन झाले, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमातील प्रतिनिधींबरोबर संवाद साधला.

या चित्रपटाच्या निर्मितीमागच्या प्रेरणेविषयी बोलताना अभिजीत सारथी यांनी नमूद केले की, ‘‘ आपण जर कोणत्याही एका बाजूचे नसलो आणि तटस्थपणे जे काही होतेय ते पहात उभे असलो, तरीही त्याचे परिणाम होत असतात, ही गोष्ट मी चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.’’

ते पुढे म्हणाले की, लोक संदेश घ्यायला तयार असतात, परंतु त्यांना त्या दिशेने मार्गदर्शन करावे लागते. प्रेक्षकांनी थोडा वेळ थांबून, आपण नेमके कुठे जात आहोत, याचा जरूर विचार करावा.

चित्रीकरणानंतर या चित्रपटाला अंतीम स्वरूप कसे प्राप्त झाले, याविषयी बोलताना अभिजीत सारथी यांनी सांगितले की, आपण एकूण 22 पानांची पटकथा लिहिली होती. परंतु चित्रीकरणानंतर लक्षात आले की, हा चित्रपट ‘स्लो-बर्न’ व्यंग्यात्मकरितीने आपल्याला चांगला, प्रभावीपणाने दाखवता येऊ शकतो. चित्रपटामध्ये अशी अनेक दृश्ये आहेत, त्यांचा कथेच्या प्रवाहीपणावर कोणताही परिणाम न होता काढता आली असती. मात्र हे विराम, श्वासोच्छवासाच्या जागा मला चित्रपटामध्ये ठेवायच्या होत्या. त्यामुळे चित्रपटाचा स्वतःचा मूड तयार होऊन ती कथा प्रेक्षकांना पुढे घेऊन जाईल. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनामध्ये काही काळ रेंगाळला पाहिजे आणि त्याचा आनंददायी अनुभव त्यांना घेता आला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.’’नायकाविषयी बोलताना दिग्दर्शक म्हणाले, ‘‘ चित्रपट म्हणजे एक सहयोगी प्रयत्न होता. मनोज पाहवा जी यांनी माझ्याकडून या चित्रपटात अभिनय करण्यासाठी कोणतेही पैसे घेतले नाहीत. इतकी वर्षे ते सिनेमा व्यवसायामध्ये काम करीत असूनही त्यांना कामाच्या तालमी करण्याची आवड आहे. चित्रीकरणाच्याआधी ते अतिशय विस्तृत टिपणे तयार करून यायचे. आमच्यासाठी ही गोष्ट म्हणजे नवीन शिकण्याचा अनुभव होता.’’

चित्रपटाबद्दल:

चित्रपटाची कथा  समांतर जगात घडत आहे. बबलू हा एकटा  राहत असलेला म्हातारा माणूस आहे जो ‘बेबीलॉन ’ या कंपनीसाठी काम करतो, जिच्या मालकीची  सर्व झाडे आणि रोपे  आहेत. जेव्हा बबलूला त्याचा  मालक त्याच्या शेवटच्या कामासाठी  पाठवतो, तेव्हा त्याची गाठ चुकून एका बंडखोर गटाशी पडते. हा गट   ‘बेबिलॉन ‘ विरुद्ध गुप्त मोहिमेची योजना आखत असतो.

दिग्दर्शकाबद्दल:

कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी अभिजीत सारथी यांचा दिग्दर्शन आणि पटकथा लेखनात हातखंडा आहे. त्यांनी  काही लघुपट बनवले   आहेत आणि एका लघुपटासाठी सहाय्यक लेखन देखील केले आहे ज्यात पंकज त्रिपाठी यांनी अभिनय केला आहे.  ऑन द रॉक्स या एकल पडदा  चित्रपटगृहावरील लघुपटाचेही ते  लेखक आणि दिग्दर्शक आहेत.