Home Blog Page 22

18 नवदांपत्यांचा सामूहिक विवाह सोहळा पुण्यधाम आश्रमात संपन्न।

पुणे-

पुण्यधाम आश्रमात दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याने यंदाही मनाला स्पर्श करणारा अनुभव दिला. महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या 18 जोडप्यांनी, त्यापैकी 9 दृष्टिबाधित दांपत्यांनी, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी पूर्णतः निःशुल्क आणि विनादहेज आयोजित केलेल्या या सोहळ्यात एकमेकांच्या साथीने नवीन जीवनाची सुरुवात केली. हा उपक्रम सलग 10व्या वर्षी साजरा होत असून, आजतागायत 165 हून अधिक विनम्र कुटुंबातील कन्यांचे विवाह येथे थाटामाटात पार पडले आहेत।

सुमारे2500 हून अधिक लोकांच्या उपस्थितीत  पुण्यधाम परिसर लग्नाच्या तयारीची धावपळ, शहनाईचे मंगल निनाद, फुलांची आकर्षक सजावट आणि सर्वत्र सणासुदीचे वातावरनात न्हाऊन निघाला

स्वर्णलाल साड्यांमध्ये दिमाखात सजलेल्या वधू आणि शेरवानी, फेटे व मोजडीमध्ये रुबाबदार दिसणाऱ्या वरांची बारात उत्साहात नाचत सोहळा स्थळी दाखल झाली। सुंदर सजवलेल्या मंडपात वर-वधू स्थिरावल्यानंतर विद्वान पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये विवाहविधी आरंभ केला। पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीतील अंतरपट, फेरे आणि कन्यादान यांच्या उपस्थित मान्यवरांच्या शुभाशीर्वादात संपन्न झाले।

पुण्यधाम आश्रमाच्या अध्यक्षा कृष्णा कश्यप म्हणाल्या:“पुण्यधाम आश्रम दरवर्षी अशा कन्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करतो, ज्यांच्या कुटुंबांना भव्य विवाह सोहळ्याचा खर्च उचलणे शक्य नसते। आमचे ध्येय म्हणजे या मुलींचे लग्न त्यांच्या स्वप्नांसारखे, कुटुंब-मित्रांच्या उपस्थितीत, सन्मानाने पार पाडणेतसेच दहेज प्रथेविरुद्ध जनजागृती घडवून समाजाच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवणे हा आमचा प्रयत्न आहे।”त्यांचे जीवनमंत्र: “मानव सेवेतूनच ईश्वर सेवा”

सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष सीए सदानंद शेट्टी, सचिव घनश्याम जावार, विश्वस्त गणेश कामठे, प्रसिद्ध समाजसेविका श्रीमती ममता सिंधुताई सपकाल, विजय सोनी, विश्वनाथ टोडकर, तसेच प्रतिष्ठित व्यक्ती महादेव बाबर, वीरसन जगताप, संगिता ठोसर, जलिंदर कामठे यांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले।

विवाहविधी पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षा कृष्णा कश्यप, अध्यक्ष, विश्वस्त मंडळ व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते नवविवाहित जोडप्यांना गृहस्थ जीवनाची सुरुवात सुखकर व्हावी यासाठी घरगुती साहित्य, डिनर सेट, कुकर, चादरी, नव्या साड्या, सलवारकमीज सेट इत्यादी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। “सर्व नवदांपत्यांना आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा — त्यांच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि एकोप्याचे चिरंतन आशीर्वाद राहोत” – मा. कश्यप

यापूर्वी याच उपक्रमातून विवाहबद्ध झालेले काही दांपत्यही या विशेष समारंभात सहभागी झाले होते हा दृश्य अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारा ठरला। सर्व पाहुण्यांसाठी पारंपरिक महाराष्ट्रीय जेवणाची स्वादिष्ट मेजवानीही आयोजित करण्यात आलीया भव्य आणि अत्यंत उदात्त सेवाकार्यातील संपूर्ण श्रेय कृष्णा कश्यप यांनाच जाते त्यांच्या सूक्ष्म नियोजनाशिवाय, अथक परिश्रमांशिवाय आणि प्रेरणेशिवाय पुण्यधाम आश्रमातील एकही उपक्रम शक्य नाही।

बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले-इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत

: समर्थ भारत व्याख्यानमाला

पुणे – जगाच्या इतिहासात अजिंक्य योद्धा बाजीराव पेशव्यांनी अवघ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात ४० पेक्षा अधिक युद्धे केली आणि एकही युद्ध ते हरले नाहीत. परंतु त्यांच्या या महान पराक्रमाकडे जाणूनबुजून दुर्लक्षित केले गेले. अवघ्या हिंदुस्थानात त्यांची दहशत एवढी होती की, इराणचा बादशहा नादीरशहा याने दिल्ली लुटण्यासाठी दिल्लीवर आक्रमण केले पण त्याच वेळी बाजीराव पेशवे आपला समाचार घेण्यासाठी दिल्लीला येत आहे ही बातमी कळताच नादिरशहा हा पळून गेला. खरं तर बाजीराव हे दिल्लीला पोहोचले देखील नाहीत. त्यामुळे त्यांचा पराक्रम आठवून आता तरी पेशवाईची बदनामी करू नका, असे आवाहन इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी केले.

समर्थ भारत व्याख्यानमालेत जगन्नाथ लडकत बोलत होते. मार्केटयार्ड जवळील संदेश नगरमध्ये समर्थ भारत व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. यावेळी पालखेड युद्ध स्मारक समितीचे संस्थापक सदस्य प्रशांत गोऱ्हे, अशोक धोका, निलय संघवी, मंगेश कुलकर्णी, संदीप खोत आदी उपस्थित होते. जगन्नाथ लडकत यांनी अजिंक्य योद्धा बाजीराव यांच्या विविध शौर्यगाथा तसेच पालखेडच्या लढाईचा संपूर्ण इतिहास उलगडला. 

जगन्नाथ लडकत म्हणाले, पेशवाई कालखंडामध्येच अटकेपार झेंडे लावले गेले. पानिपताच्या पराभवाचा कलंक देखील धुवून काढला. स्मार्ट पुणे या संकल्पनेचा पाया देखील याच कालखंडात घातला गेला. पुणे शहर हे त्याकाळी केंद्रस्थानी होते. तरी देखील या महान व्यक्तींच्या नावाखाली विनाकारण जाती-जातींमध्ये द्वेष पसरवण्याचे काम आज देखील केले जात आहे. आता तरी पेशवाई कालखंडाची बदनामी थांबवा. जी शक्ती अशा प्रकारे बदनामी करीत आहे त्यांना पुन्हा एकदा इतिहासाची आठवण करून देण्याची गरज आहे.

घोडदळाचा सर्वश्रेष्ठ सेनानी म्हणजे बाजीराव पेशवे होते असे वर्णन इंग्रज इतिहासकारांनी करून ठेवले आहे तसेच इंग्रज फील्ड मार्शल मॉन्टगोमरी यांनी त्यांच्या ‘A Concise History of Warfare’ या युद्धशास्त्र विषयक ग्रंथात जगातील पहिल्या दहा लढायांमध्ये पालखेडच्या लढाईचा उल्लेख केला आहे. एक बरे झाले हे इंग्रजांनी लिहून ठेवले आहे नाहीतर आज देखील मराठी इतिहासकारांनी लिहून ठेवले असते तर त्यांच्यावर देखील टीका झाली असती.

 निलय संघवी यांनी सूत्रसंचालन केले.

हलाल सर्टिफिकेशन नियमावलीत बदल करावा- खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची ‘झिरो अवर’मध्ये मागणी

पुणे:  ‘हलाल’ ही संकल्पना एका विशिष्ट धर्माशी संबंधित असून मुख्यत्वे मांसाहारी खाद्यपदार्थांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे ‘हलाल’ सर्टिफिकेशन आणि त्यासंबंधित तांत्रिक व प्रशासकीय अनियमितता दूर करून ते सर्टिफिकेशन केवळ सरकारी प्रणालीद्वारेच व्हावे. तसेच या नियमावलीत आवश्यक ते बदल करावेत, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी बुधवारी सभागृहात केली.

‘झिरो अवर’मध्ये मुद्दा उपस्थित करीत प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून, विविध आस्था असलेले लोक इथे राहतात. हिंदू आणि शीख धर्मीयांमध्ये हलाल मांसाहार मान्य नाही. त्यांच्यावर हलाल मांसाची सक्ती होणे, हे संविधानातील धार्मिक स्वातंत्र्याच्या तरतुदींना बाधक आहे. आरोग्यशास्त्रामध्येही हलाल केलेले मांस खाणे आरोग्यास धोकादायक असल्याचे समोर आले आहे.

दूध, साखर, तेल, औषधी, प्रसाधन सामग्री, तसेच सिमेंट, स्टील, प्लास्टिक यांसारख्या गैर-खाद्य वस्तूंनाही हलाल प्रमाणपत्र देण्याची प्रवृत्ती वाढल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रमाणनासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामुळे उत्पादनांच्या किमती वाढून त्याचा परिणाम सर्व ग्राहकांना भोगावा लागतो, तसेच स्वातंत्र्य, बाजारातील पारदर्शकता आणि समान न्यायावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सध्या हलाल इंडिया लिमिटेड, हलाल सर्व्हिसेस इंडिया प्रा. लिमिटेड, जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट, जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र या संस्था हलाल प्रमाणन देत असून, देशभरात सुमारे ७० ते ८० अवैध आणि बोगस प्रमाणन संस्था कार्यरत असल्याचा दावा त्यांनी सभागृहात केला. उत्तर प्रदेशात अशा काही संस्थांवर गुन्हेही नोंदवले गेल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तसेच अन्नपदार्थांसाठी ‘एफएसएसएआय’, तर औषधांसाठी ‘एफडीआय’ या अधिकृत प्रमाणन संस्था अस्तित्वात असताना खासगी व धार्मिक संस्थांना खाद्य प्रमाणनाचा अधिकार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

प्रा. डॉ. कुलकर्णी यांच्या मागण्या:
– मांसाहारी उत्पादनांचे हलाल प्रमाणन सरकारी यंत्रणेद्वारेच व्हावे
– खासगी व स्वयंसेवी संस्थांना प्रमाणन देण्याचा अधिकार रद्द करावा
– आवश्यकतेनुसार इस्लाम धर्मातील तज्ज्ञ सदस्याची सरकारी समितीत नियुक्ती करावी
– हलाल प्रमाणनातून मिळणारे शुल्क सरकारी कोषात जमा करावे
– बोगस व देशविरोधी कारवायांशी संबंधित संस्थांवर कारवाई करावी
– गैर-मांस आणि गैर-खाद्य वस्तूंवरील हलाल प्रमाणन पूर्णपणे बंद करावे

कोरोना रेमिडीज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 08 डिसेंबर पासून

0

         कोरोना रेमिडीज लिमिटेडच्या प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“Equity Shares”) 1008 रु. ते 1062 रु. किंमतपट्टा निश्चित

·         बोली/ऑफर सोमवार 08 डिसेंबर 2025रोजी खुली होईल आणि बुधवार, 10 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार 05 डिसेंबर 2025आहे.

·         बोली किमान 14 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 14 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

·         कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 54 रु. ची सवलत

·         रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक: https://live.jmfl.com/od/UploadedFiles/D85CD184-902B-431E-8620-18ABC2F68BE8.pdf

मुंबई, 03 डिसेंबर 2025: कोरोना रेमिडीज लिमिटेड (CRL) ने इक्विटी शेअर्ससाठी सोमवार 08 डिसेंबर 2025पासून प्राथमिक समभाग विक्री बोली/ऑफर खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. बोली/ऑफर बुधवार, 10 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रति इक्विटी शेअरसाठी 1008 रु. ते 1062 रु. किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. जे एम फायनान्शियल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार 05 डिसेंबर 2025आहे. बोली किमान 14 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 14 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. या ऑफरमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सचा समावेश असून त्याची एकूण रक्कम 6,553.71 दशलक्ष रु. इतकी आहे.

एकूण ऑफर साइजमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची एकूण रक्कम 6,553.71 दशलक्ष रु. इतकी असून यात खालीलप्रमाणे समावेश आहे: डॉ. कीर्तिकुमार लक्ष्मीदास मेहता (प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्याकडून प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सची 1,298.41 दशलक्ष रु. इतकी रक्कम; मिनाक्षी कीर्तिकुमार मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक ) यांच्याकडून प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सची 766.07 दशलक्ष रु. इतकी रक्कम; दिपाबेन निरवकुमार मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक) यांच्याकडून 103.87 दशलक्ष रु. पर्यंतचे प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले जास्तीत जास्त [●] पर्यंत इक्विटी शेअर्स; ब्रिंदा  अंकुर मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक) यांच्याकडून 103.87 दशलक्ष रु. पर्यत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स; सेपिया इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 4,046.00 दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स; अँकर पार्टनर्स (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 151.25 दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स; सेज इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 84.24 दशलक्ष रु पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स यांचा यात समावेश आहे.

कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 54 रु. ची सवलत दिली जात आहे.

कंपनीचे रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) द्वारे हे इक्विटी शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) आणि BSE लिमिटेड (BSE आणि NSE बरोबर एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

कोरोना रेमेडीज ही भारत-केंद्रित ब्रँडेड फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कंपनी असून महिलांच्या आरोग्य, कार्डिओ-डायबेटो, वेदना व्यवस्थापन, यूरोलॉजी आणि इतर उपचारात्मक क्षेत्रांमध्ये उत्पादनांची निर्मिती, विकास, आणि विपणन करण्याचे कार्य करते. 30 जून 2025 पर्यंत कंपनीकडे 71 ब्रँड्सचा वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ असून तो विविध उपचारात्मक क्षेत्रांना पूरक आहे.

CRISIL इंटेलिजन्स रिपोर्टनुसार, कोरोना रेमेडीज ही MAT जून 2024 ते MAT जून 2025 या कालावधीत भारतीय औषधनिर्माण बाजारपेठे (“IPM”) मधील आघाडीच्या 30 कंपन्यांमध्ये देशांतर्गत विक्रीच्या दृष्टीने सर्वात वेगाने वाढणारी कंपनी आहे. MAT म्हणजे चालू वर्षातील एकूण वार्षिक संख्या. MAT जून 2022 ते MAT जून 2025 या कालावधीत देशांतर्गत विक्रीच्या दृष्टीने IPM मधील अग्रणी 30 कंपन्यांमध्ये कोरोना रेमेडीज ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगाने वाढणारी कंपनी होती.

• महिलांचे आरोग्य : किशोरावस्था ते वंध्यत्व, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ तसेच रजोनिवृत्तीपूर्व आणि रजोनिवृत्तीनंतरच्या श्रेणींमध्ये महिलांच्या संपूर्ण आरोग्य जीवनचक्राला कव्हर करणारे ब्रँड्स;

• कार्डिओ-डायबेटो: मधुमेह उपचाराच्या विविध टप्प्यांना कव्हर करणारे ब्रँड्स. यामध्ये इन्सुलिन प्रतिकारशक्ती, प्री-डायबेटीसपासून डायबेटीस आणि डायबेटीसशी संबंधित गुंतागुंतींपर्यंत, तसेच उच्च रक्तदाब, डिस्लिपिडेमिया आणि इस्केमिक हार्ट डिसीज यांसारख्या हृदयविकारांपर्यंत

• वेदना व्यवस्थापन: वेदना व्यवस्थापनासाठी कंपनी चार प्रकारचे डोस फॉर्म्स देते – गोळ्या, कॅप्सूल, स्प्रे आणि इंजेक्शन्स. त्यांचा उपयोग मस्क्युलोस्केलेटल स्पॅझम्स आणि डायबेटिक न्युरोपथी पेन यांसह इतर संबंधित उपचारांसाठी केला जातो;

• यूरोलॉजी: बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लेशिया,  ओव्हरअ‍ॅक्टिव्ह ब्लॅडर, युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स आणि स्टोन मॅनेजमेंट यांसारख्या अनेक यूरोलॉजिकल विकारांसाठी ब्रँड ऑफरिंग्ज.

ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 50% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. SEBI ICDR नियमांनुसार त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या (“Anchor Investor Allocation Price”) बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील.

जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स (प्रमुख गुंतवणूकदार भाग वगळून) नेट QIB Portion मध्ये (“Net QIB Portion”) समाविष्ट केले जातील.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, म्युच्युअल फंडांकडून एकत्रित मागणी Net QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंड भागांत  वाटपासाठी उपलब्ध असलेल्या शिल्लक इक्विटी शेअर्सची उर्वरित Net QIB Portion मध्ये भर घातली जाईल आणि QIBs साठी प्रमाणानुसार वाटप केले जाईल.

पुढे, नेट ऑफर पैकी 15% पेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Investors”) उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी अ) एक तृतीयांश भाग 200,000  रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000  रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि ब) दोन तृतीयांश भाग 1,000,000  रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. SEBI ICDR नियमांनुसार ऑफरपैकी किमान 35% वाटप रिटेल इंडिव्हिज्युअल बिडर्स साठी उपलब्ध असेल. ऑफर प्राईसच्या बरोबर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर वैध बोली प्राप्त झाल्या असतील तर हे लागू होईल.

पुण्यातील कोपा मॉलमध्ये ‘इंडियन ओशियन (Indian Ocean)’ चा दमदार लाईव्ह शो; त्यानंतर विपुल गोयलची धमाल कॉमेडी

0

पुणे : पुणेकरांच्या मनोरंजनाला नवी झिंग देण्यासाठी कोपा मॉलमध्ये यंदाच्या आठवड्याअखेर दोन खास कार्यक्रमांची मेजवानी सजली आहे५ आणि ६ डिसेंबर रोजी सलग दोन संध्याकाळी संगीत व विनोदाचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.

 डिसेंबर रोजी भारतीय फ्युजन रॉक संगीताला नवा आयाम देणाऱ्या प्रतिष्ठित ‘Indian Ocean’ बँडचा बहारील ओपनएअर लाईव्ह परफॉर्मन्स टेरेसवर होणार आहे. पुणेकरांना भावपूर्ण सुरावटी आणि बँडची खास ध्वनीशैली यांचे मनमोहक मिश्रण एका वेगळ्या वातावरणात ऐकण्याची संधी मिळणार आहे.

यानंतर, दुसऱ्या दिवशी  डिसेंबर रोजी कॉमेडी फेस्ट अंतर्गत लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन – विपुल गोयलप्रेक्षकांसाठी आपली खास निरीक्षणाधारित विनोदी शैली आणि टोकदार हजरजबाबीपणा घेऊन येणार आहेत. आजच्या शहरी जीवनशैलीशी जुळणारी, सहजसुंदर कथा आणि विनोद यांचे अनोखे सादरीकरण पुणेकरांना भरभरून हसवणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी नाममात्र शुल्क ठेवण्यात आले असून, अधिकाधिक पुणेकरांनी सहभागी व्हावे, यासाठी आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

कोपा मॉलचे हे सलग दोन संध्याकाळीचे कार्यक्रमं पुणेकरांना संगीत आणि हास्याचा दुहेरी आनंद देणारे ठरतील. शहराच्या बदलत्या सांस्कृतिक धाटणीला अनुसरून, समुदायाला अधिक समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक अनुभव देणे, हे मॉलचे उद्दिष्ट आहे. डिसेंबरच्या उत्सवी दिवसांत या मनोरंजनमय कार्यक्रमांमुळे पुण्याचे सांस्कृतिक कॅलेंडर अधिक रंगतदार होणार आहे!

कार्यक्रम:

1.       Indian Ocean Live – ५ डिसेंबर २०२५ (सायं. ७ वाजता!)

2.       Comedy Fest with Vipul Goyal – ६ डिसेंबर २०२५ (सायं. ६.४५ वाजता!)

पार्थ पवारला अजूनही अभय -शीतल तेजवाणीला अटक

पुणे – मुंढवा येथील कोट्यवधीच्या जमिन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शितल किसनचंद तेजवाणी विदेशात पलायन केल्याची चर्चा रंगविण्यात आली होती. मात्र आज पुणे पोलिसांकडून तेजवाणीला अटक केल्यानंतर पोलीस तपासात या प्रकरणी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे तेजवाणी यांच्या विरुद्ध जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन आणि खडक पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहे. तसेच खडक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, या जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेली अमेडिया कंपनी सहभागी आहे.

मुंढवा येथील तब्बल 1800 कोटी रुपये बाजारभाव असलेली ही जमीन केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे, या कोट्यवधींच्या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून अवघे 500 रुपये मोजण्यात आले होते. पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीसाठी हा व्यवहार झाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ज्या कंपनीचे भांडवल केवळ एक लाख रुपये आहे, ती कंपनी तीनशे कोटींचा व्यवहार कसा करू शकते, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. प्रशासकीय पातळीवरही या व्यवहाराला प्रचंड गती देण्यात आली होती. उद्योग संचालनालयाने केवळ 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केली होती आणि अवघ्या 27 दिवसांत हा संपूर्ण व्यवहार पूर्ण करण्यात आला होता.महाराष्ट्र शासनाच्या नावावर नोंद असलेल्या या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी शीतल तेजवानी यांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. शीतल तेजवानी आणि मूळ मालक गायकवाड कुटुंब आरोपांच्या घेऱ्यात आहे. शीतल तेजवानी ही जमीन गैरव्यवहारातील बडा मासा आहे. बनावट कागदपत्र तयार करून जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जमिनीचे बोगस कागदपत्र कुणी तयार केले असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 2014 ला न्यायालयाने तेजवाणी, मूळ मालकांचा दावा फेटाळला होता.

शिवणे खराडी रस्त्याच्या कामाची श्वेतपत्रिका काढा,राजाराम पूल ते म्हात्रे पूल,डीपी रस्त्यावरील अनेक समस्याही जैसे थे…

पुणे-रखडलेल्या शिवणे खराडी रस्त्याच्या कामाची श्वेतपत्रिका काढा तसेच राजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यान च्या अपूर्ण कामांबाबत , डीपी रस्त्यावरील दुभाजका संदर्भात महापालिकेच्या पथ विभागाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

या संदर्भात महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि,’
शिवणे ते खराडी ह्या रस्त्याच्या कामाला आता बारा / तेरा वर्षांचा कालावधी लोटला असून हा महत्वकांक्षी प्रकल्प केवळ रखडला असे नाही तर ह्या रस्त्याबाबत प्रशासकीय अनास्था व इतर कारणांमुळे सद्यस्थितीत हा रस्ता बासनात गुंडाळल्यासारखी परिस्थिती आहे. तरी आपण त्वरित ह्या रस्त्याच्या स्थिती बाबत श्वेतपत्रिका काढावी व हा रस्ता कधीतरी पूर्ण होईल किंवा कसे याची माहिती करदाते पुणेकरांसमोर उघड करावी अशी आग्रही मागणी करत आहे.
शिवणे ते म्हात्रे पूल ह्या दरम्यान देखील महालक्ष्मी लॉन्स जवळ हा रस्ता अडकला आहे.
राजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यान च्या 2 किमी अंतरातील समस्यांबाबत माझ्या पुढाकाराने 2013 साली आयोजित केलेल्या बैठकीला आता 12 वर्षे पूर्ण झालीत.
मात्र ह्या प्रचंड वाहतूक असणाऱ्या रस्त्यावरील अनेक समस्या जैसे थे आहेत.
1) ह्या डी पी रस्त्यावर राजाराम पुलाकडून येणारी वाहतूकीची विठ्ठल मंदिर चौकात मोठी कोंडी अनुभवायला मिळते.त्यावर उपाययोजना करावी.
2) “हॉटेल आमची” ते नवसह्याद्री चौका पर्यंत ( पंडित फार्म समोर ) रस्ता दुभाजक नसल्याने या ठिकाणी वाहनांची बेफाम वाहतूक व रोजच अपघात होत असतात.
येथे रस्ता ओलांडणेसुद्धा अवघड झाले आहे.
3) ऐन संध्याकाळी गर्दीच्या वेळेत अनेक ठिकाणी बेकायदा फेरीवाले, पथारीवाले यांनी बस्तान बसविले आहे.
या परिसरातील नागरिक आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पहात असून आपण त्वरित याबाबत सूचना देऊन पथारीवाल्यांवर कारवाई करावी ही विनंती.
4) ह्या रस्त्यावर ज्ञानदा शाळा,शुभारंभ लॉन्स, घरकुल लॉन्स अश्या अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी जागा ( दुभाजकातून ओपनिंग ) ठेवण्यात आली आहे. हे आवश्यक आहेच मात्र धोकादायक देखील आहे. सदर ओपनिंग हे अश्या ठिकाणी केलेत की येणारी वाहने दिसतं नाहीत ( Blind Turn वर ) आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यास हा धोका आपल्या लक्षात येईल.त्यामुळे याठिकाणी पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता येईल यासाठी पादचारी क्रॉसिंग उभाराव्यात अशी आग्रही मागणी करत आहे.यामुळे वेगाला ही नियंत्रण बसेल आणि नागरिकांची सुरक्षितता देखील राखली जाईल.आपण त्वरित कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्याल अशी अपेक्षा आहे.


‘संचार साथी’ने हेरगिरी शक्य नाही, आणि होणार नाही:केंद्र म्हणाले- आदेश बदलण्यास तयार

नवी दिल्ली- , संचार साथी ॲपद्वारे हेरगिरी करणे शक्य नाही आणि हेरगिरी होणारही नाही असे केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ॲपबाबत काँग्रेस नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले,ते असेही म्हणाले ,’ फीडबॅकच्या आधारावर मंत्रालय ॲप इन्स्टॉल करण्याच्या आदेशात बदल करण्यास तयार आहे.संचार मंत्र्यांनी लोकसभेबाहेरही माध्यमांशी या मुद्द्यावर चर्चा केली. त्यांनी सरकारच्या आदेशातील कलम 7(बी) बाबतच्या वादावर सांगितले की, 7(बी) फक्त एवढेच सांगते की, फोनमध्ये ॲप इन्स्टॉल केलेले असावे आणि वापरकर्त्याला ते वापरण्यात कोणतीही अडचण येऊ नये.

सिंधिया म्हणाले की, 7(बी) कुठेही असे म्हणत नाही की वापरकर्ता ॲप डिलीट करू शकत नाही. 7B वापरकर्त्यांसाठी नाही. हे फोन उत्पादकांसाठी आहे, कारण ते फोनमध्ये ॲप इन्स्टॉल करतात. त्यांना सांगण्यात आले आहे की, ॲप डिसेबल नसावे, जेणेकरून वापरकर्ता त्याचा वापर करू शकणार नाही.

संचार साथी ॲपवरून संपूर्ण वाद 28 नोव्हेंबर रोजी सुरू झाला, जेव्हा दूरसंचार विभागाने (DoT) सर्व मोबाईल फोन उत्पादकांना एक आदेश जारी केला होता. यामध्ये कंपन्यांना भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व नवीन मोबाईल फोनसोबतच सध्याच्या हँडसेटमध्ये सॉफ्टवेअर अपडेटद्वारे ॲप इन्स्टॉल करणे बंधनकारक केले होते.

2 डिसेंबर : विरोधकांचा आरोप- हे एक हेरगिरी ॲप

विरोधकांनी याला नागरिकांच्या ‘हेरगिरी’चा प्रयत्न असल्याचे सांगत केंद्र सरकारवर ‘हुकूमशाही’ लादल्याचा आरोप केला. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी मंगळवारी राज्यसभेत कामकाज स्थगितीचा प्रस्ताव दिला. मात्र, यावर चर्चा होऊ शकली नाही.

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या- हे पाऊल लोकांच्या गोपनीयतेवर थेट हल्ला आहे. हे एक हेरगिरी ॲप आहे. सरकारला प्रत्येक नागरिकावर पाळत ठेवायची आहे. सायबर फसवणूक रोखण्यासाठी प्रणाली आवश्यक आहे, परंतु सरकारचा हा आदेश लोकांच्या खाजगी आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप करण्यासारखा आहे.

2 डिसेंबर : सिंधिया म्हणाले- जेव्हा हवे तेव्हा ॲप काढू शकता

विरोधकांच्या प्रश्नांदरम्यान, सिंधिया यांनी मंगळवारी संसदेत सांगितले की, हे ॲप पर्यायी आहे. तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा ते तुमच्या फोनमधून काढू शकता. जर तुम्हाला ते वापरायचे नसेल, तर ॲपवर नोंदणी करू नका. नोंदणी केली नाही तर ॲप निष्क्रिय राहील. हे ॲप फक्त तोच नंबर किंवा SMS घेते, जो वापरकर्ता स्वतः फसवणूक किंवा स्पॅम म्हणून रिपोर्ट करतो, याव्यतिरिक्त काहीही घेत नाही.

तर, भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले की, हे ॲप वैयक्तिक डेटा आणि मेसेज वाचत नाही किंवा कॉल ऐकत नाही. हे फसवणूक रोखण्यासाठी, चोरी झालेले मोबाईल ट्रॅक करण्यासाठी आणि बनावट सिम ओळखण्यासाठी आहे. हे पाळत ठेवण्यासाठी नाही, तर लोकांच्या डिजिटल सुरक्षेसाठी एक साधन आहे.

28 नोव्हेंबर: केंद्राने मोबाइल कंपन्यांना 90 दिवसांची मुदत दिली

केंद्र सरकारने 28 नोव्हेंबर रोजी आपल्या आदेशात मोबाइल फोन उत्पादकांना सांगितले होते की, त्यांनी स्मार्टफोनमध्ये सरकारी सायबर सेफ्टी ॲप आधीच इन्स्टॉल करून विकावे. या आदेशात ॲपल, सॅमसंग, विवो, ओप्पो आणि शाओमी सारख्या मोबाइल कंपन्यांना 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

आदेशानुसार, हे ॲप वापरकर्ते डिलीट किंवा डिसेबल करू शकणार नाहीत. जुन्या फोनवर सॉफ्टवेअर अपडेटद्वारे हे ॲप इन्स्टॉल केले जाईल. तथापि, हा आदेश सध्या सार्वजनिक करण्यात आलेला नाही, तर निवडक कंपन्यांना खाजगीरित्या पाठवण्यात आला आहे.

सरकारचा दावा आहे की, संचार साथी ॲपद्वारे सरकारचा उद्देश सायबर फसवणूक, बनावट IMEI नंबर आणि फोनची चोरी रोखणे हा आहे. यामुळे आतापर्यंत 7 लाखांहून अधिक हरवलेले किंवा चोरी झालेले मोबाइल परत मिळाले आहेत. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले, ‘बनावट IMEI मुळे होणारी फसवणूक आणि नेटवर्कचा गैरवापर रोखण्यासाठी हे ॲप आवश्यक आहे.’

संचार साथी ॲप काय आहे, ते कशी मदत करेल?

संचार साथी ॲप हे सरकारने तयार केलेले सायबर सुरक्षा साधन आहे, जे 17 जानेवारी 2025 रोजी लाँच करण्यात आले होते.
सध्या हे ॲपल आणि गुगल प्ले स्टोअरवर ऐच्छिक डाउनलोडसाठी उपलब्ध आहे, परंतु आता नवीन फोनमध्ये ते आवश्यक असेल.
ॲप वापरकर्त्यांना कॉल, मेसेज किंवा व्हॉट्सॲप चॅट रिपोर्ट करण्यास मदत करेल.
IMEI नंबर तपासून चोरी झालेले किंवा हरवलेले फोन ब्लॉक करेल.
डुप्लिकेट IMEI नंबरमुळे सायबर गुन्हे वाढत आहेत

भारतात 1.2 अब्जाहून अधिक मोबाइल वापरकर्ते आहेत, जे जगातील सर्वात मोठे मार्केट आहे, परंतु बनावट किंवा डुप्लिकेट IMEI नंबरमुळे सायबर गुन्हे वाढत आहेत. IMEI हा 15 अंकी एक युनिक कोड असतो, जो फोनची ओळख पटवतो.

गुन्हेगार तो क्लोन करून चोरीच्या फोनला ट्रॅक होण्यापासून वाचवतात, घोटाळे करतात किंवा काळ्या बाजारात विकतात. सरकारचे म्हणणे आहे की हे ॲप पोलिसांना डिव्हाइस शोधण्यात मदत करेल. सप्टेंबरमध्ये DoT ने सांगितले होते की 22.76 लाख डिव्हाइस शोधले गेले आहेत.

केंद्राने म्हटले – वापरकर्त्यांना थेट फायदा मिळेल

केंद्र सरकारने म्हटले आहे की संचार साथी ॲपमुळे वापरकर्त्यांना थेट फायदा मिळेल. चोरीचा फोन असल्यास IMEI तपासणी करून तो त्वरित ब्लॉक करता येईल. फसवणुकीचे कॉल रिपोर्ट केल्याने घोटाळे कमी होतील, परंतु ॲप डिलीट न झाल्यामुळे प्रायव्हसी ग्रुप्स प्रश्न उपस्थित करू शकतात.

सरकारच्या मते, वापरकर्त्याचे नियंत्रण कमी होईल. भविष्यात ॲपमध्ये आणखी वैशिष्ट्ये जोडली जाऊ शकतात, जसे की उत्तम ट्रॅकिंग किंवा एआय-आधारित फसवणूक शोधणे. DoT चे म्हणणे आहे की हे टेलिकॉम सुरक्षेला पुढील स्तरावर घेऊन जाईल.

ॲपलच्या धोरणात थर्ड पार्टी ॲपला परवानगी नाही

उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे की केंद्राच्या आदेशानंतर कंपन्या चिंतेत आहेत. विशेषतः ॲपलची अडचण वाढू शकते, कारण कंपनीचे अंतर्गत धोरण कोणत्याही सरकारी किंवा थर्ड-पार्टी ॲपला फोनच्या विक्रीपूर्वी प्री-इंस्टॉल करण्याची परवानगी देत नाही.

यापूर्वीही ॲपलचा अँटी-स्पॅम ॲपवरून दूरसंचार नियामकाशी संघर्ष झाला होता. उद्योग तज्ज्ञांचे मत आहे की ॲपल सरकारशी वाटाघाटी करू शकते किंवा वापरकर्त्यांना ऐच्छिक सूचना देण्याचा सल्ला देऊ शकते. मात्र, अद्याप कोणत्याही कंपनीने या आदेशावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते शिक्षक व पदवीधर प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध

पुणे, दि.३ : पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. त्याअंतर्गत विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या.

यावेळी अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर तसेच नोंदणीकृत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमांतर्गत आत्तापर्यंत पदवीधरसाठी २ लाख ७२ हजार ४४ तर शिक्षक मतदार संघासाठी ४४ हजार २१४ मतदारांनी नोंदणी केली असल्याचे सांगून विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, मतदार याद्या नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत १८ डिसेंबर २०२५ पर्यंत नमुना क्रमांक ७ व ८ मध्ये दावे व हरकती दाखल करता येतील. याद्वारे प्रारुप मतदार यादीतील नावांबाबत आक्षेप असल्यास दाखल करता येईल. विद्यमान यादीतून नाव वगळण्यासाठी अथवा नावात दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ७ सादर करावा लागेल. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या दावे व हरकतींवर सहायक मतदान नोंदणी अधिकारी ५ जानेवारी पर्यंत निकाल देतील. त्यानंतर १२ जानेवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची प्रक्रिया निवडणूक जाहीर होईपर्यंत सातत्याने सुरु राहणार असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितले.

सन २०२६ मध्ये पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते मतदार नोंदणीचे काम सुरु असून सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पात्र मतदारांना नाव नोंदणीसाठी प्रवृत्त करावे, असे आवाहनही डॉ. पुलकुंडवार यांनी केले.

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहंस्तातरणाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

▪️ जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहंस्तांतरण प्रकरणाचा आढावा

पुणे, दि. 3: सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तातंरणाबाबत प्रलंबित प्रकरणांचा विचार करता प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच मानीव अभिहंस्तांतरण आदेश व प्रमाणपत्र निर्गमित केल्यानंतर मानीव अभिहसतांतरण दस्त म्हणजेच खरेदीखत ची लवकर नोंदणी व्हावी व त्यात एकसूत्रीपणा असावा याकरिता पुणे शहरातील एकूण 27 सह दुय्यम निबंधक कार्यालय पैकी 2-3 सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी यांना पदनिर्देशीत अधिकारी म्हणून करण्यात घोषित करण्यात येईल. त्याचं बरोबर नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यावर प्रशासन व पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे मानीव मानीव अभिहंस्तांतरण जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर संजय राऊत, पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त पंकज पाटील, पुणे शहरचे प्रशासकीय अधिकारी मंगेश खामकर, पुणे ग्रामीणचे प्रशासकीय अधिकारी अनिल जगताप, महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट्स महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पुणे गृहनिर्माण सोसायटी फेडरेशनचे ॲड वसंत कर्जतकर आदी उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, महाराष्ट्र मालकी हक्काच्या संदनिकांबाबत (त्या बांधण्यास प्रोत्सहान देणे, त्याची विक्री, व्यवस्थापन व हस्तातरण यांचे नियमन करण्याबाबत) नियमन 1963 नुसार नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांबाबत संस्था नोदंणी झाल्यानंतर 4 महिने कालावधी पूर्ण होताच अभिहस्तांतरण पूर्ण करण्यात यावेत. तथापि याअनुषंगाने अद्यापही ठोस कार्यवाही होतांना दिसून येत नाही, त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अभिहस्तांतरण पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशकपणे कार्यवाही करावी. सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्थांचे अभिहस्तांतरण पूर्ण करण्यासाठी कायद्यानुसार गतीने कार्यवाही करुन प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावेत, विकासकानेही स्वत:हून पुढे येवून मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही श्री. डुडी म्हणाले.

श्री. राऊत म्हणाले, पुणे शहराअंतर्गत एकूण पुणे शहरातंर्गत एकूण नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था २२ हजार ९५५ आहेत. मानीव अभिहस्तांतरण प्राप्त प्रस्ताव एकूण ६ हजार ५५३ पैकी निर्णय ६ हजार २२४ प्रकरणावर कार्यवाही करण्यात आली आहे. थेट विकसकाने अभिहस्तांतरण करुन दिलेल्या ३ हजार ५७ संस्थां आहेत. मानीव अभिहस्तांतरणबाबत अडीअडचणी आल्यास जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था कार्यालय तसेच पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. राऊत म्हणाले.

श्री. पटवर्धन म्हणाले, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहंस्तांतरणबाबत महासंघाच्या वतीने प्रशासनाला सहकार्य करण्यात येत आहे. समितीच्या वतीने नोंदणी व मुद्रांक विभागाकडे पाठपुरावा करुन याप्रकरणी एक खिडकी योजना आण्यात यावी, अशी सूचना श्री. पटवर्धन यांनी केली.

नवीन आधार ॲपमध्ये घरी बसून पत्ता-नाव बदलता येईल:मोबाइल नंबर बदलण्याची सुविधा सुरू; कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही

आता तुम्ही घरबसल्या आधार कार्डमध्ये नोंदणी केलेला मोबाइल नंबर बदलू शकता. सरकारने आधार ॲपमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. तसेच, पत्ता, नाव आणि ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधा लवकरच सुरू होईल. नवीन डिजिटल सेवेची घोषणा आधारचे नियमन करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) या संस्थेने केली आहे.

या बदलांसाठी वापरकर्त्यांना कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता भासणार नाही. ॲपवर ओटीपी पडताळणी आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे सर्व काही बदलता येईल. या सेवेमुळे दुर्गम भागातील लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि स्थलांतरितांना सोपे होईल.
नवीन सेवा कशी काम करेल?

UIDAI नुसार, ॲपद्वारे आधारमधील अपडेट प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची किंवा प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होईल.

जर तुम्ही ॲप डाउनलोड केले नसेल तर ते डाउनलोड करून सेटअप करावे लागेल. यासाठी पायऱ्या…

सर्वात आधी वापरकर्त्यांना AADHAAR ॲप डाउनलोड करावे लागेल.
येथे वापरकर्त्यांना आपला आधार क्रमांक टाकून लॉगिन करावे लागेल.
नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, त्याचे व्हेरिफिकेशन करावे लागेल.
पुढील वापरासाठी 6 अंकी लॉगिन PIN सेट करावा लागेल.
ॲपमध्ये मोबाइल नंबर कसा अपडेट होईल?

6 अंकी पिन टाकून आधार ॲपमध्ये लॉगिन करा.
खाली स्क्रोल करा, सेवांमध्ये ‘माय आधार अपडेट’ वर क्लिक करा.
सर्वात आधी मोबाइल नंबर अपडेट करण्याचा पर्याय दिसेल, क्लिक करा.
येथे आवश्यक तपशील वाचा, कंटिन्यू वर क्लिक करा.
सध्याचा मोबाइल नंबर टाका, ओटीपी (OTP) व्हेरिफाय करा.
नवीन मोबाइल नंबर टाका, ओटीपी (OTP) व्हेरिफाय करा.
फेस ऑथेंटिकेशन होईल, कॅमेऱ्यात पाहून एकदा डोळे मिटा आणि उघडा.
पेमेंट करण्याचा पर्याय दिसेल, ₹75 जमा केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.

आधार मोबाइल अपडेट का आवश्यक आहे?

आधार कार्ड ही देशातील सर्वात मोठी ओळख सेवा आहे, ज्यामध्ये 130 कोटींहून अधिक लोकांचा डेटा जोडलेला आहे. मोबाईल नंबर हा त्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण याच नंबरवर OTP द्वारे बँक खाते, सरकारी सबसिडी, आयकर पडताळणी आणि डिजीलॉकरसारख्या डिजिटल सेवांपर्यंत पोहोच मिळते.

जर क्रमांक जुना झाला किंवा हरवला तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आतापर्यंत तो अपडेट करण्यासाठी नोंदणी केंद्रात जावे लागत होते, जिथे बायोमेट्रिक पडताळणी आणि लांब रांगांचा त्रास होता. पण आता UIDAI डिजिटल पद्धतीने हे सोपे करणार आहे.

UIDAI ने गेल्या महिन्यात आधार ॲप लॉन्च केले होते

एक महिन्यापूर्वी UIDAI ने आधार कार्डचे नवीन मोबाईल ॲप लॉन्च केले होते. यात वापरकर्ता एकाच फोनमध्ये 5 लोकांचे आधार ठेवू शकतो. यात आधारची फक्त तीच माहिती शेअर करण्याचा पर्याय आहे, जी आवश्यक असते.

या ॲपमध्ये तुम्ही UPI मध्ये ज्या प्रकारे स्कॅन करून पेमेंट करता, त्याच प्रकारे आधार तपशील शेअर करू शकता. ॲपला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी यात फेस ऑथेंटिकेशनसारखी वैशिष्ट्ये जोडली गेली आहेत.

आधारच्या नवीन ॲपची वैशिष्ट्ये

फोनमध्ये आधार सोबत ठेवा: ई-आधार नेहमी सोबत राहील, कागदी प्रतीची गरज नाही.
फेस स्कॅन शेअरिंग: आयडी शेअर करण्यासाठी फेस स्कॅन करावे लागेल, पिन-ओटीपीप्रमाणे सुरक्षित.
सुरक्षित लॉगिन: बायोमेट्रिक प्रमाणीकरणाने ॲप उघडेल.
बहु-भाषा समर्थन: हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध.
ऑफलाइन वापर: इंटरनेट नसतानाही आधार पाहता येईल.

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 21 व्या ‘सेवा कर्तव्य त्याग’ सप्ताह उपक्रमाचे उद्घाटन

0

समाजात बुद्धिभेद निर्माण करणे भाजपचे काम तर, एखाद्या गोष्टीवर ताबा मिळवणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम _ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

पुणे _
प्रामाणिकपणा हा आपल्या देशाचा मूळ स्वभाव असून तो सध्या आपण विसरत चाललो आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) काम समाजात बुद्धिभेद निर्माण करणे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम एखाद्या गोष्टीवर ताबा मिळवणे आहे.आपला स्वाभिमान आपली भाषा ,धर्म, लिंग यात नाही तर इतिहासात आणि कर्तृत्ववात आहे. आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आपण समजून घेतला पाहिजे असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.

काँग्रेसचे माजी आमदार मोहनदादा जोशी यांच्या संकल्पनेतून काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व यूपीएच्या अध्यक्षा खा. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त २१ व्या ‘सेवाकर्तव्यत्याग’ सप्ताह या उपक्रमाचे आयोजन दि. २ ते ९ डिसेंबर २०२५ या कालावधीत करणात आले आहे. याचे उद्घाटन मंगळवारी एस.एम.जोशी फाउंडेशन सभागृह नवी पेठ, पुणे येथे करण्यात आले.काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रदेश काँगेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहनदादा जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, संजय बालगुडे, श्रीरंग चव्हाण, कैलास कदम,अविनाश साळवे, सुनील मलके, वीरेंद्र कराड, चंद्रशेखर कपोते,अमीर शेख, हनुमंत पवार, अविनाश बागवे,काँग्रेस महिला शहराध्यक्ष स्वाती शिंदे, युवक काँग्रेस अध्यक्ष चेतन अग्रवाल, सौरभ अमराळे, लता राजगुरू उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले, महात्मा गांधी यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो कारण हा देश एकसंध कधी नव्हता पण गांधी यांनी भारत नावाचे स्पंदन निर्माण करून “राष्ट्र” नावाची संकल्पना सर्वांच्या मनात रुजवली. भारत या संकल्पनेला जन्म देण्याचे महत्वपूर्ण काम गांधी यांनी केले. राजकारणात सध्या सेवेचे नाही तर मेवा मिळवण्याचे खटाटेप सुरू आहे. सेवाच्या मागे मेवा आहे की भय आहे हे तपासून पहिले पाहिजे. जेल मध्ये गेल्यावर माणसाचे मानसिक संतुलन बिघडते कारण तिथे डांबून ठेवले जात कोणते स्वातंत्र्य मिळत नाही. त्यामुळे काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिले हे समजून घ्यावे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या योगदानाबाबत आपण विसरत आहे. सोनिया गांधी यांना अनेक अडचणी राजकारणात आल्यावर आल्या परंतु त्यावर त्यांनी मात केली. २२ वर्षाचा असताना त्या विवाह करून भारतात आल्या आणि २२ वर्ष संसार राजीव गांधी यांच्या सोबत केला. पण,त्यानंतर देखील देशाची सून म्हणून त्या अद्याप काम करतात याचा अभिमान देशवासीयांना वाटला पाहिजे.सोनिया गांधी एक विचार असून त्या त्याग, विचार संस्कृती पुढे घेऊन जात आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्याचे काही पडले नाही. काँग्रेस नेतृत्व आणि विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे ते काम करत आहे.राज्याचे मुख्यमंत्री हे समता, बंधुता, मूल्यांवर नांगर फिरवत आहेत.सगळ्या जातीत भांडणे लावली जात आहेत.राज्यघटना आणि लोकशाही फासावर लटकवण्याचे प्रकार सुरू आहेत.महाराष्ट्रातील सामाजिक व्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे मी त्यांची तुलना औरंगजेबाशी केली होती यात माझी जीभ काय घसरली.संविधान दिनाच्या दिवशी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना पकडण्यात आले त्यामुळे मी त्यांना जल्लाद म्हणालो. नथुराम, जल्लाद, औरंगजेब, गजनी असे शब्द आजच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलावे लागणे दुःखदायक आहे.मात्र,आज देखील मी माझ्या या शब्दाबाबत मतावर ठाम आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले.

उल्हास पवार म्हणाले, पुणे हे सुशिक्षतांचे शहर असून लोकांना काँग्रेसने काय केले हे माहिती नाही असे नाही. धर्मांधता आणि जातीयवाद याचे विष मोठ्या प्रमाणात सध्या पेरले गेले असल्याने लोकांना कोणते भान राहिले नाही.भाजपच्या काळात अनेक गोष्टी नामशेष करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे हे जनतेच्या समोर आले पाहिजे. एनडीए मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असताना त्याच महत्वपूर्ण संस्थेजवळ बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्याचा नेमका हेतू काय हे तपासले पाहिजे. भाजप जवळ सांगण्यासारखे त्यांच्या सत्ता काळातील काहीच नाही. देशाचे ऐक्य हे सर्वधर्म समभाव मध्ये आहे.

मोहनदादा जोशी म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर झंझावती दौरा करून ६५ पेक्षा अधिक जाहीर सभा घेतल्या. मुख्यमंत्री यांच्या विरोधात कोणी बोलण्याची हिंमत करत नसताना,त्यांचा पर्दाफाश करून खरा चेहरा लोकांसमोर आणला. पक्षात संघटन बांधणी मधून काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचे काम हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत सत्ताधारी यांना संदेश देण्यासाठी यंदाच्या वर्षी या सप्ताहाची सुरवात महत्वपूर्ण राहील. काँग्रेस पक्षाचे पक्ष “पंजा” चिन्हे एक आठवड्यात पाच हजार दुचाकीवर लावले जाईल. पुण्याला जागतिक दर्जाचे शहर करण्यात काँग्रेसचे योगदान महत्त्वपूर्ण असून काँग्रेस काळातील मोठया प्रकल्पाची माहिती प्रचार करण्याकरिता “होय हे काँग्रेसने केले” ही प्रचार मोहीम होर्डिंग्जद्वारे राबविण्यात येत आहे. आतापर्यंतचे काँग्रेस पक्षाचे योगदान प्रत्येक पुणेकर यांना अभिमान वाटावा असे आहे. पुणे शहर उभे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे याबाबत कार्यकर्त्यांनी प्रचार करावा.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘सेवाकर्तव्यत्याग’ सप्ताह या उपक्रमाचे संयोजक माजी आमदार मोहनदादा जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश अबनावे यांनी तर आभार प्रदर्शन गौरव बोराडे यांनी केले.

पुणे-अबु धाबी विमानसेवेला सुरुवात : मुरलीधर मोहोळ

  • आंतराष्ट्रीय संपर्क वाढविण्यासाठी आणखी एक पाऊल

पुणे : एअर इंडिया एक्सप्रेसने आजपासून पुणे–अबू धाबी थेट उड्डाण सेवा सुरू करत पुणे विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठून दिला आहे. शहराच्या वाढत्या जागतिक संपर्काच्या मागणीला प्रतिसाद देत सुरू करण्यात आलेली ही सेवा दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री २१:१० वाजता पुण्याहून अबू धाबीकडे रवाना होणार आहे. या नव्या मार्गामुळे पुण्याच्या नागरिकांसह व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थ्यांना आणि मध्यपूर्वेत कार्यरत असलेल्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुण्याला शिक्षण, आयटी, उत्पादन, स्टार्टअप्स, संशोधन, संरक्षण उद्योग आणि सांस्कृतिक वारसा या विविध क्षेत्रांत देश-विदेशात वेगळी ओळख आहे. अशा पार्श्वभूमीवर थेट आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांची उपलब्धता ही शहराच्या वाढत्या आर्थिक आणि औद्योगिक क्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. या नव्या उड्डाणामुळे परदेशी गुंतवणूक, व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना अधिक चालना मिळेल, ज्यामुळे पुण्याचे आंतरराष्ट्रीय पदचिन्ह आणखी विस्तारेल.

नवी सेवा सुरू झाल्यामुळे पुणे विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जा अधिक बळकट झाला असून, शहराच्या प्रगतीचा मार्ग अधिकच वेगाने खुला होत असल्याचे जाणवते. या कनेक्टिव्हिटीमुळे फक्त प्रवास सुकर होणार नाही तर जागतिक व्यापार, औद्योगिक संधी आणि नव्या बाजारपेठांमध्ये पुण्याच्या सहभागाला नवे दार खुले होणार आहे.

आंतरराष्ट्रीय कनेक्टिविटी वाढवायला आणखी प्राधान्य देणार: केंद्रीय मंत्री मोहोळ

या सेवेचे स्वागत करत केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे–अबू धाबी थेट उड्डाणाची सुरूवात ही शहराच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाची साक्ष देणारी आहे. मध्यपूर्वेशी कनेक्टिव्हिटी वाढल्याने व्यापार, उद्योग, पर्यटन, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. पुण्याच्या नागरिकांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील विमानतळ विकासाला आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला अभूतपूर्व गती मिळाली आहे. पुणे विमानतळाच्या सर्वांगीण विस्तारासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

संस्थेची संस्थाने झाली की चळवळ संपते : प्रा. मिलिंद जोशी

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे साहित्यप्रेमी भगिनी मंडळाला आदर्श संयोजक पुरस्कार प्रदान

पुणे : सरकारी यंत्रणांचा वापर करून संस्था ताब्यात घेणाऱ्या टोळ्यांचा सध्या सर्वत्र सुळसुळाट दिसून येत आहे. साहित्यसंस्था त्यांच्या केंद्रस्थानी आहेत. साहित्यबाह्य शक्तींना रोखण्यासाठी संस्थेतील कार्यकर्त्यांनी खंबीरपणे भूमिका घेऊन लढा उभारला पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. 61 वर्षे अव्याहतपणे काम करून संस्थात्मक कार्याचा आदर्श वस्तूपाठ उभा केला आहे, अशा शब्दात त्यांनी साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचे कौतुक केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल साहित्यप्रेमी भगिनी मंडळाला आदर्श संयोजक पुरस्कार प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते आज (दि. 2) प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्ष अंजली कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला.

साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. मंदा खांडगे, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर यांची उपस्थिती होती. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम झाला.

प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, एखाद्या पारंपरिक अथवा अभिमत विद्यापीठाने संशोधनाचे जे काम करायला हवे ते कोणत्याही पायाभूत सुविधा आणि अनुदानाशिवाय साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने केलेले आहे. मराठी साहित्यातील संशोधनाचे दालन या संस्थेच्या संशोधनात्मक प्रकल्पामुळे समृद्ध झाले आहे. ते पुढे म्हणाले, ज्या महाराष्ट्राला महात्मा गांधी यांनी कार्यकर्त्यांचे मोहोळ असे म्हटले होते त्या महाराष्ट्रात आज कुठे गेले कार्यकर्ते असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो. संस्थात्मक कार्यासाठी कार्यकर्त्यांचा पुरवठा करण्याचे काम आजवर समाजातील मध्यमवर्गाने केले. आत्ममग्नतेमुळे मी आणि माझे या पलीकडे तो विचार करायला तयार नाही. त्यामुळे संस्थात्मक कार्याची मोठी हानी होत आहे. संस्थांची संस्थाने झाली की चळवळ संपते. संस्थात्मक कार्य करताना समाज मानस समजून घेत वेध-प्रबोध शक्तीचा वापर होणे आवश्यक आहे. समाजाने साहित्याभिमुख होणे गरजेचे असून सकारात्मकतेचा दीप सतत मनात ठेवून संस्थात्मक पातळीवर कार्य केल्यास ते यशस्वी होते.  

सत्काराला उत्तर देताना अंजली कुलकर्णी म्हणाल्या, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ सातत्याने साहित्यिक उपक्रम राबवित आहे. या मंडळातर्फे गेली २८ वर्षे संशोधनात्मक कार्य अविरतपणे सुरू आहे हा संस्थेचा मानबिंदू आहे. डॉ. मंदा खांडगे यांच्या प्रयत्नाने सर्व साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे स्त्री साहित्य मुख्य प्रवाहात आणले गेले.

संस्थेच्या स्थापनेपासूनच्या आठवणी सांगत डॉ. मंदा खांडगे म्हणाल्या, एखाद्या संस्थेला उत्तम कार्यकर्ते लाभल्यास ती संस्था अवितरपणे कार्यरत राहू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे साहित्यप्रेमी भगिनी मंडळ होय.

सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात रंगत-संगत प्रतिष्ठानच्या वाटचालीची माहिती विशद करत पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. मानपत्राचे लेखन प्रभा सोनवणे यांचे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनात प्रभा सोनवणे, आश्लेषा  महाजन, शलाका माटे, मृणाल जैन, वासंती वैद्य, तनुजा चव्हाण, ऋचा कर्वे, यामिनी रानडे, आरती देवगावकर, नंदिनी चांदवले, कांचन सावंत, ज्योती देशपांडे यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.

शिवद्रोही भाजपा विरोधात आंदोलन,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक .

पुणे:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास भंडारा येथे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी गमजा व टोपी चढवण्याचा निंदनीय प्रकार केला असून शिवभावनेला हा सरळ-सरळ धोका आहे. राज्यपाल, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार भाजपचे कुणीच शिवरायांचा मान राखताना दिसत नाही.
महाराष्ट्रात अशा शिवद्रोहाला कागदावर नाही तर रस्त्यावर उतरून उत्तर देणार असे सांगत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहर तर्फे लाल महाल चौकात भाजपा विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.भाजपने वारंवार केलेला शिवद्रोह महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. छत्रपतींच्या अस्मितेचा प्रश्न आला की शिवसेना रस्त्यावर उतरणार असा इशारा यावेळी देण्यात आला .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून भाजपाच्या झेंड्यावर काळी शाई फेकण्यात आली यावेळी शिवप्रेमींनी एकसुरात घोषणा दिल्या
“छत्रपतींचा अपमान नाही सहेगा हिंदुस्थान!”
“शिवद्रोही भाजपा चा निषेध असो”
संपूर्ण लाल महाल परिसर घोषणांनी दणाणून गेला. पर्यटनासाठी आलेले नागरिकही स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभागी झाले आणि भाजपच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला.
शिवसेना सांगते
“छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. जो शिवद्रोह करेल त्याला रस्त्यावर उतरून उत्तर देऊ!”

आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, प्रशांत राणे, पंढरीनाथ खोपडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, कार्यालयीन सचिव मकरंद पेठकर, संघटक संतोष गोपाळ, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण, संतोष भुतकर, प्रवीण डोंगरे, रूपेश पवार, अमर मारटकर, आरोग्य सेना समन्वयक रमेश क्षीरसागर, ग्राहक संरक्षण चे दिपक जगताप,महिला आघाडी च्या रोहिणी कोल्हाळ, पद्मा सोरटे, अंगणवाडी सेनेच्या गौरी चव्हाण,
शिवसैनिक वैभव दिघे, जुबेर शेख, अभिषेक जगताप, सूर्यकांत पवार, मोहन दिघे, निलेश वाघमारे, दत्ता करपे, संजय साळवी, रमेश परदेशी, संजय लाहोट, मिलिंद पत्की, राहुल शेडगे, प्रवीण रणदिवे, संतोष ढोरे, संजय वाल्हेकर, नागेश खडके, बकुळ डाखवे, जुबेर तांबोळी, निलेश पवार, अमित जाधव, सुधीर डाखावे, सुनील देवळेकर, मंगेश जाधव, प्रदीप विश्वासराव, अनिल जाधव, राजा गांजेकर, संतोष कांबळे, विनोद वांजले, शिवाजी मेलकेरी, प्रशांत काकडे, बंडू बोडके,
युवासेना सरचिटणीस परेश खांडके, विभाग संघटक सोहम जाधव, चिंतामणी मुंगी, वैभव कदम, निरज नांगरे, अक्षय हबीब, कैवल्य डोईफोडे
सहभागी झाले होते .