Home Blog Page 2152

अखेर गुलाबराव पाटलांनी मागितली माफी

0

मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केलेत, गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना टोला लगावताना केलेले वक्तव्य भोवले .

हेमा मालिनी देखील संतापल्या

जळगाव- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्याची तुलना थेट दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालाशी केली होती. धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये बोलताना पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर आज सकाळपासून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू होते. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी अखेर माफी मागितली आहे. गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना डिवचताना रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांशी केली आहे. गुलाबरावांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण तापले होते.गुलाबराव रावांनी केल्याल्या त्या वक्तव्यानंतर खुद्द हेमा मालिनीने देखील आक्षेप घेतला होता. तर भाजप नेत्यांनीही जोरदार टीका केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील गुलाबराव कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर अखेर गुलाबरावांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.दिलगिरी व्यक्त करताना गुलाबराव पाटील म्हणाले की,‘भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो’ असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.

प्रवीण दरेकरांची कारवाईची मागणी
‘गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांचे गाल आणि रस्ते यांची तुलना केली आहे हे खरोखर चुकीचे विधान आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर कारवाईचे आदेश देतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नेहमीच त्यांच्या नेत्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आपापसात विसंवाद सुरु आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्कीच भाजपला पसंती देईल’, असे ट्विट करत प्रवीण दरेकर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली.

पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचा दीक्षांत समारंभ संपन्न

0

पुणे-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी आज त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या (VAMNICON) दीक्षांत समारंभाला संबोधित केले यावेळी बोलताना ते म्हणाले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष आहे, 75 वर्षात अनेक सरकारे आली आणि गेली, पण सहकार मंत्रालय स्थापन करण्याची गरज कोणालाच वाटली नाही. तथापि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या वर्षी निर्णय घेतला की सहकार हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि त्याला आता एक संपूर्ण मंत्रालय देण्याची गरज आहे आणि त्यांनी सहकार मंत्रालयाची स्थापना केली

शहा यांनी दीक्षांत समारंभात सहभागी विद्यार्थ्यांना आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात केल्याबद्दल त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सहकार क्षेत्रात रोजगाराच्या आणि विकासाच्या अनेक संधी असून त्यात करिअरची क्षमता तसेच आत्म-समाधानाची क्षमता असल्याचे सांगितले.

गरीबातील गरीबांचे जीवनमान उंचावण्याचे आणि छोट्या शेतकऱ्यांना सहकाराच्या माध्यमातून समृद्ध करण्याचे काम केवळ तरुणच करू शकतात. पगाराबरोबरच नोकरीतील समाधानही खूप महत्त्वाचे आहे आणि सहकाराच्या विस्तारासाठी काम केले तरच ते साध्य होऊ शकते. भारताच्या 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार मंत्रालय आणि सहकार चळवळ मोठी भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सहकाराचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले कि अमूल सारखी सहकारी संस्था देशातील 36 लाख भगिनींकडून सकाळ संध्याकाळ दूध संकलित करते आणि दरवर्षी 52,000 कोटी रुपये वितरित करते.

आज देशाला आत्मनिर्भर म्हणून जगासमोर उभे करायचे आहे, तेव्हा सहकार क्षेत्राला खूप महत्त्व आहे, असे श्री शाह म्हणाले.

आत्मनिर्भर म्हणजे देशाच्या सर्व गरजा देशातूनच पूर्ण करणे, तसेच देशातील 130 कोटी लोकांना त्यांचे जीवन जगण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे होय. 130 कोटी लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि देशात समान विकास घडवून आणण्यासाठी सहकारापेक्षा दुसरे कोणतेही क्षेत्र असू शकत नाही.

ते म्हणाले कि अनेक कारणांमुळे सहकार क्षेत्र हळूहळू कमकुवत होत चालले होते, परंतु आज सहकार क्षेत्र पुन्हा बळकट करून देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात मोठा योगदानकर्ता बनवायचे आहे. सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. आम्ही मल्टी स्टेट ऑपरेटिव्ह अॅक्टमध्ये सुधारणा करून त्यातील सर्व उणिवा दूर करू, तसेच सहकार क्षेत्राचा आत्मा असलेल्या प्राइमरी अॅग्रिकल्चर सोसायटीचे (PACS) संपूर्ण संगणकीकरण करू.

PACS जिल्हा सहकारी बँकेशी, जिल्हा सहकारी बँका राज्य सहकारी बँकांशी आणि राज्य सहकारी बँका नाबार्डशी जोडल्या जातील आणि नाबार्डपासून गावापर्यंत संपूर्ण पारदर्शक कृषी वित्त व्यवस्था तयार केली जाईल. देशातील निम्म्या गावांमध्ये पीएसीएस बसवून ते पारदर्शक पद्धतीने चालवल्यास या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल आणि देशातील शेतकऱ्यांना आणि विशेषतः गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा थेट लाभ मिळेल असे शहा यांनी सांगितले.

ते म्हणाले कि अनेक सहकारी योजना अनेक विभागात पडून होत्या, आजपर्यंत त्यांना कोणी वाली नव्हता, मात्र आता सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून 23 विभागांमध्ये अनेक सहकाराशी निगडित योजना खालच्या स्तरापर्यंत पोहोचत आहेत. सहकार मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी आणि उत्पादनासाठी जागतिक स्तरावर वैध प्रमाणपत्र देण्याबरोबरच, एक मोठी बाजारपेठ साखळी तयार करण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक मूल्य मिळू शकेल आणि ते निर्यातही करू शकतील.

देशात सहकारी क्षेत्राची व्याप्ती वाढावी असा निर्णय आपण घेतला आहे आणि पुढील 25 वर्षांसाठी लागू करता येईल असे सहकारधोरण आपण आखायला हवे.

सहकार मंत्रालयाने असे धोरण आखण्याचे काम सुरू केले आहे, असे स्पष्ट करत केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपण काही काळातच मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण देशासमोर नवी सहकार धोरण आणू जे सहकाराला देशातील प्रत्येक गावात नेईल, असे नमूद केले.

लवकरच सहकार विद्यापिठाची स्थापना केली जाईल. त्या विद्यापिठाशी देशभरातील अनेक राज्यांमधील महाविद्यालये संलग्न असतील.

सहकार शिक्षण संस्थांमधून विद्यार्थ्यांना प्लेसमेंटनंतरच पदवी दिली जाईल अश्या तऱ्हेची व्यवस्था सहकार शिक्षण संस्थांमध्ये असली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची दोन उद्दिष्टे देशातील जनतेसमोर ठेवली आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वस्वाचे बलीदान करणाऱ्या ज्ञात, अज्ञात हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहणे आणि दुसरे म्हणजे देशभरातील युवकांमध्ये पुन्हा एकवार देशभक्तीची ज्योत जागवण्यासोबतच स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षी देश कसा असेल याबद्दल संकल्प घेणे.

जेव्हा 130 कोटी जनता एखादा संकल्प करते तेव्हा या संकल्पाचे संचित जगाचे डोळे दिपून जावे अशा प्रगतीपथावर देशाला घेउन जाईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.

आपल्या देशातील सामूहिक संकल्पांची प्रथा संपुष्टात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्याला पुन्हा वेग दिला, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

उद्धव ठाकरेजी हिम्मत असेल तर राजीनामा द्या – पुन्हा दोन हाथ करू ,पुण्यात येऊन ठाकरेंना दिले शाहांनी आव्हान

पुणे – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला आहे. शिवसेनेने 2019 विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत विश्वासघात केला. आमच्यामुळेच त्यांच्या जागा निवडणून आल्या. आता त्यांच्यातर हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.हिंमत असेल तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र लढावे. असे आव्हान देखील आज येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दिले आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी अमित शहांनी राज्य सरकारला खुले चॅलेंज केले असून, एकाप्रकारे शहांनी प्रचाराची सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

शहा सध्या पुणे दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला..पुणे देशाला दिशा दाखवणारेपुणे हे देशाला दिशा दाखवणारे शहर आहे. असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहा यांनी केले आहे. शहा सध्या पुणे दौऱ्यावर असून, आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय या पवित्र भूमिला लागले आहेत. लोकमान्य टिळक पुण्यात वास्तव्य करत होते. मी महापालिकेत गेलो होतो तिथे मी महात्मा फुलेंच्या प्रतिमेला अभिवादन केले. देशाला दिशा देण्याचे काम या शहराने केले आहे. पुणे ही महान व्यक्तिमत्त्वाची भूमी आहे. ज्या सगळ्यांनी देशाला दिशा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षात देशाची प्रगती केली. त्यांनी परिवर्तनाची लाट या देशात आणली. असे अमित शहा म्हणाले.नरेंद्र मोदींच्या आधी दहा वर्षे काँग्रेसचे सरकार होते. सोनिया गांधी आणि मौनीबाबा सत्तेत होते. देशावर हल्ले झाले, काहीही झाले तरीही मौनीबाबा काहीच बोलत नसत. मोदी सत्तेत आल्यानंतर जेव्हा उरी आणि पुलवामा हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानला आपण घरात घुसून उत्तर दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानला कळले आहे की, भारतात काँग्रेसचे सरकार नाही. आपण जर कुरापती काढल्या तर आपल्याला उत्तर मिळणार ते पाकिस्तानला कळले.भारतीय जनसंघाचे बीज ज्यांनी लावले त्यांना हे माहित होते की, उद्या याचा वटवृक्ष होणार आहे. त्याचाच परिणाम आपण आज पाहत आहोत. आज भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पार्टीचे भविष्य हे कार्यकर्ते आहेत. या पक्षाने कार्यकर्त्यांनाच कायम मोठे केले आहे. त्याचे उदाहरण मी आहे. मी चटाया पसरवणारा कार्यकर्ता होतो. पक्षात जो मागत राहतो त्याला काहीच मिळत नाही पण जो मागत नाही त्याला कधी काही कमी पडत नाही. असे म्हणत अमित शहांनी आपल्या पक्षाची वाहवाही केली.

या महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरवात पुणे महापालिकेच्या निवडणुकीतून होईल, असा इशाराही शहा यांनी दिली. नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि-डिझेलचे दर कमी केले. महाराष्ट्र सरकारने मात्र, दारुचे दर कमी केले. आम्ही दारुचे नाहीत तर पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यास सांगितले होते, असा चिमटा शहा यांनी काढला. या सरकारचे दोनच लक्ष्य आहे. एक वसुली आणि दुसरे राजकारणाचे गुन्हेगारी करणे. विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या सोबत जे झाले ते बदलायचे असेल तर पुण्यामधून त्याची सुरुवात करावी लागेल, असेही शहा म्हणाले. शिवसेनेने विधानसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद मोदी यांचे नाव घेऊन लढवली. त्या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. मात्र, शिवसेनेने सत्तेसाठी गद्दारी केली, असा आरोप शहा यांनी केला. विश्वासघात करुन सत्तेवर बसले. महाराष्ट्राचे आघाडी सरकार म्हणजे तीन पायांची ऑटो रिक्षा आहे. त्यांचे तीनही चाके वेगवेगळ्या दिशांना आहेत आणि ते चाके पंच्चर आहेत. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राचा विकास करु शकत नाही, असेही शहा म्हणाले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महापालिकेच्या निकालानं व्हायला हवी. लक्ष्य कधी कमी ठेऊ नका मित्रांनो. मी ऐकत होतो कोणी १०० तर कोणी १२० नगरसेवक असं म्हणतं होतं. पण जनता तुम्हाला जास्त नगरसेवक द्यायला बसली आहे, त्यामुळं मागण्यात कंजुषी करु नका. पुण्याची जनता फुलानं तुमचं स्वागत करायला तयार आहे. परिश्रम करा हे आपोआप होईल, दरम्यान, भारतीय जनता पक्ष हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारी संधी आहे, मी सुद्धा एक बुथ प्रमुख म्हणून काम केलं होतं, त्यानंतर पक्षाने मला थेट अध्यक्ष होण्याची संधी दिली असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं.

पीवायसी-पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग 2021 स्पर्धेत स्कायलार्कस व स्नोलेपर्ड्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

0

पुणे, 19 डिसेंबर 2021 – पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित आठव्या पीवायसी-पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2021 स्पर्धेत उपांत्य फेरीत स्कायलार्कस,  स्नोलेपर्ड्स या संघांनी अनुक्रमे जॅगवॉर्स व चिताज या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात इशांत रेगे(नाबाद 46 धावा व 1-5) याने केलेल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर स्कायलार्कस संघाने जॅगवॉर्स संघाचा 4 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्यांदा खेळताना जॅगवॉर्स संघाने 6 षटकात 3बाद 95 धावा केल्या. यात कुणाल कासटने 17 चेंडूत 2चौकार व 6 षटकाराच्या मदतीने 53धावा, रवी कासटने नाबाद 28धावा केल्या. स्कायलार्कसकडून प्रसाद जाधव(2-12), इशांत रेगे(1-5)यांनी सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान स्कायलार्कस संघाने 5.5षटकात 4 गड्याच्या बदल्यात बाद 96धावा करून पूर्ण केले. यामध्ये इशांत रेगेने 16 चेंडूत 4चौकार व 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 46 धावा करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्याला अनुज साबडे 20, अंकुश जाधव 19 धावा काढून साथ दिली. सामनावीर इशांत रेगे ठरला. 
दुसऱ्या सामन्यात आश्विन शहा(2-8 व 21धावा) याने केलेल्या सुरेख खेळीच्या जोरावर स्नोलेपर्ड्स संघाने चिताज संघाचा 7 गडी राखून पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली.
काल रात्री उशिरा झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इशांत रेगे(29 धावा व 2-12) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर स्कायलार्कस संघाने टस्कर्स संघाचा 25 धावांनी पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. तर, दुसऱ्या सामन्यात नचिकेत जोशी(नाबाद 16 व 1-16) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर स्नोलेपर्ड्स संघाने डॉल्फिन्स संघावर 2धावांनी विजय मिळवला. 
निकाल: उपांत्य फेरी: जॅगवॉर्स: 6 षटकात 3बाद 95 धावा(कुणाल कासट 53(17,2×4,6×6), रवी कासट नाबाद 28(15,3×4,1×6), प्रसाद जाधव 2-12, इशांत रेगे 1-5) पराभूत वि.स्कायलार्कस: 5.5षटकात 4बाद 96धावा(इशांत रेगे नाबाद 46(16,4×4,4×6), अनुज साबडे 20, अंकुश जाधव 19, गौरव सावगावकर 2-14, रवी कासट 1-17);सामनावीर-इशांत रेगे; स्कायलार्कस संघ 4 गडी राखून विजयी;
चिताज: 6षटकात 8बाद 57 धावा(अनवीर नन्ना 16(9), शिरीष आपटे 8, योगेश भोंगळे 7, देव शेवाळे 2-11, नचिकेत जोशी 2-3, आश्विन शहा 2-8) पराभूत वि.स्नोलेपर्ड्स: 6 षटकात 1बाद 60 धावा(अक्षय ओक नाबाद 28(17,4×4), आश्विन शहा 21(15, 1×4,1×6), नचिकेत जोशी नाबाद 11(4,2×4), अक्षय कश्यप 1-9);सामनावीर-आश्विन शहा; स्नोलेपर्ड्स संघ 7 गडी राखून विजयी;
उपांत्यपूर्व फेरी: स्कायलार्कस: 6षटकात 6बाद 101 धावा(अनुज साबडे 35(10,4×4, 3×6), इशांत रेगे 29(12, 2×4,3×6), अंकुश जाधव 18, कल्पक पत्की 2-16, क्रिश कासट 1-8) वि.वि.टस्कर्स: 6 षटकात 3बाद 76 धावा(कर्ना मेहता 31(13,2×4,3×6), समीर बाकरे नाबाद 18(11,1×4,2×6), हर्षल गंद्रे 11, राहुल पाठक नाबाद 11, इशांत रेगे 2-12);सामनावीर-इशांत रेगे; स्कायलार्कस संघ 25 धावांनी विजयी;
स्नोलेपर्ड्स: 6षटकात 3बाद 69 धावा(अक्षय ओक 22(14,4×4), आश्विन शहा 18(11), नचिकेत जोशी नाबाद 16(4,2×4,1×6), देवेंद्र चितळे 1-7, रोहन छाजेड 1-8) वि.वि.डॉल्फिन्स: 6 षटकात 2बाद 67 धावा(अभिजीत गानू नाबाद 39(18,4×4,2×6), रोहन छाजेड 22(12,1×4,1×6), नकुल पटेल 1-11, नचिकेत जोशी 1-16);सामनावीर-नचिकेत जोशी; स्नोलेपर्ड्स संघ 2 धावांनी विजयी.

अमित शाहांनी केले केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

0

पुणे-केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळा, येथील परिसरात नव्या इमारतीचे उद्घाटन केले.या प्रसंगी बोलताना ते म्हणले, वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तपासकार्य पारदर्शक आणि वेगवान करून देशाची फौजदारी न्यायव्यवस्था सशक्त करण्यात केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळा महत्वाची भूमिका पार पाडत आहे.

न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांचे जाळे प्रत्येक जिल्ह्यात विस्तारण्याचा प्रस्ताव आहे, असं त्यांनी सांगितलं. गृह मंत्र्यांनी प्रत्येक राज्य सरकारला न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालये स्थापन करून ती राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाशी संलग्न करून घेण्याचे आवाहन केले. यामुळे मनुष्य बळ आणि कौशल्य विकासातील अडथळे दूर होण्यास मदत होईल, असं ते म्हणले.

पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांशी गृह मंत्र्यांनी संवाद साधला. या वेळी बोलताना ते म्हणाले राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दल यांनी आपली एक प्रतिमा बनविली आहे, कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी, विनाविलंब लोकांची सुटका केली आहे.

या आधी अमित शाह यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट आली आणि गणपतीची पूजा केली.

अमित शाह यांनी एनडीआरएफ़च्या जवानांबरोबर भोजन घेतले आणि त्यांच्याशी संवादही साधला

0

पुणे-केन्द्रीय गृह आणि सहकार  मंत्री अमित शाह यांनी आज आपल्या  महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात एनडीआरएफच्या  पाचव्या  बटालियनच्या  शिबीर  परिसराचे  औपचारिक उद्घाटन केले आणि नवीन परिसराची पाहणी केली, तसेच  फॉरेंसिक साइंस लैबोरेट्री सेंटर  अर्थात न्यायवैद्यक प्रयोगशाळा परिसरातील नव्या इमारतीचे  लोकार्पण केले.  अमित शाह यांनी एनडीआरएफ़च्या जवानांबरोबर भोजन घेतले आणि त्यांच्याशी संवादही साधला .  केन्द्रीय गृह सचिव आणि  एनडीआरएफ़च्या महासंचालकांसह  अनेक मान्यवर  यावेळी उपस्थित होते.  एनडीआरएफ़च्या  नवनिर्मित परिसरात जवानांसाठी   बराक , मेस, अधिकारी आणि जवानांसाठी  निवासी घरे, शाळा, रुग्णालय, एटीएम, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि  हेलिपॅड  सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

याप्रसंगी आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफ हे विश्वासाचे प्रतीक आहे आणि त्याची केवळ उपस्थिती ही  लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करते. एवढ्या कमी कालावधीत एनडीआरएफ च्या 16 बटालियन संपूर्ण देशात आपले काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या देशात आणि एवढ्या कठीण क्षेत्रात इतक्या कमी अवधीत हा विश्वास निर्माण करणे खूप कठीण आहे आणि जेव्हा सेनाप्रमुखापासून शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण त्याच्या कार्यासाठी समर्पित असेल तेव्हाच हे शक्य होते. श्री. शहा म्हणाले की, तुम्ही अल्पावधीतच देशातील जनतेचा विश्वास संपादन केला असून ही कीर्ती केवळ भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये पसरली आहे. एनडीआरएफला अनेक वेळा परदेशातही पाठवण्यात आले आणि तेथेही खूप चांगले परिणाम बघायला मिळाले आणि तुम्ही तिथून भारतासाठी खूप चांगला संदेश आणला आहे.

श्री अमित शाह म्हणाले की एनडीआरएफची स्थापना 2006 मध्ये झाली आणि त्यावेळी आठ बटालियन होत्या ज्यात बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ मधील जवानांचा सहभाग होता. आज या दलाच्या देशभरात 16 बटालियन आणि 28 शहरांमध्ये प्रादेशिक प्रतिसाद केंद्रे आणि प्रादेशिक प्रतिसाद पथके देखील आहेत. आज  एनडीआरएफची गणना संपूर्ण जगातील सर्वोत्तम आणि सर्वात मोठ्या आपत्ती निवारण दलांमध्ये केली जात आहे, ही संपूर्ण देशासाठी आणि भारत सरकारसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमचे समर्पण, इतिहास आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे ते सिद्ध झाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

आज पुण्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचेही लोकार्पण झालं आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, यांनी सांगितले.आतापर्यंत देशातल्या सात केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळा देशात स्थापन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी गुजरातच्या न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेला जागतिक दर्जानुसार अद्ययावत बनवण्यासाठी, अतिशय परिश्रम घेऊन, नियोजन केले होते. आज गुजरातची न्यायवैद्यक प्रयोगशाळा जगातील सर्वोत्तम प्रयोगशाळांपैकी एक मानली जाते. प्रत्येक राज्यात सरकारने एक-एक महाविद्यालय बनवावे आणि या विद्यापीठाशी ते संलग्न करावे, असे आमचे उद्दिष्ट आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, देशभरात, न्यायवैद्यक महाविद्यालयांचे एक जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.  तसेच, तिथे प्रशिक्षित झालेल्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेच्या आधारावर, देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये तीन चार न्यायवैद्यक प्रयोगशाळा उभारल्या जाव्यात. यानंतर शहरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापन केल्या जाव्यात, ज्या प्रत्येक पोलीस स्थानकांशी जोडलेल्या असतील. ज्या दिवशी आपण हे उद्दिष्ट साध्य करु, त्या दिवशी गुन्हे सिद्धतेचे प्रमाण खूप वाढेल आणि आपल्याला देशाची अंतर्गत सुरक्षा आणि गुन्हेनियंत्रण या दोन्हीसाठी मोठी मदत मिळेल, असा मला विश्वास आहे, असे अमित शाह म्हणाले.

आज आपण जे पेरणार आहोत, त्याचाच पुढे वटवृक्ष बनणार आहे. आणि हे बीज पेरण्याचे काम मोदी सरकार करत आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळांमधील मनुष्यबळ वाढवण्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासोबतच, वैज्ञानिक पुरावे लवकरात लवकर, थेट न्यायालये आणि पोलिस स्थानकांपर्यंत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पोचवले जावेत, हे ही आम्ही सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आम्ही करु.  आज देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेसमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. जसे के अमली पदार्थ, शस्त्रास्त्र तस्करी, बनावट नोटा, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, इत्यादी गुन्ह्यांची उकल करण्यातही न्यायवैद्यक प्रयोगशाळांची मोठी मदत होऊ शकते, असे अमित शाह म्हणाले.

विरोधी पक्षनेत्यांनी केला भाजपचा शहर अध्यक्षांसह महापौरांचा निषेध

0

डॉ. आंबेडकर पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कार्यक्रमास विरोधी पक्षांनी उपस्थित राहू नये यासाठी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप

पुणे- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेच्या आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन अशा कार्यक्रमांना विरोधी पक्षांचे नेते आणि नगरसेवक उपस्थित राहू नये म्हणून भाजपचे शहर अध्यक्ष आणि महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी यांनी गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केला आहे.

दिपाली धुमाळ म्हणाल्या आज महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आवारात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा व छत्रपती शिवाजीमहाराज स्मारकाचे भुमिपुजन समारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते संपन्न झाला . या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. परंतु पास मात्र आज सकाळी अकरा वाजता घरी मिळाले. हे पास दिल्यानंतर काही वेळाने महापौर कार्यालयातून निरोप आला की कार्यक्रमाला येताना कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करून येणे आवश्यक आहे व तशा प्रकारचे रिपोर्ट देणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले. खर तर ऐनवेळेस सत्ताधारी भाजप ने केलेले गलिच्छ राजकारण आहे. आधीच या दोन महापुरुषांचे फोटो जाहिराती मध्ये न टाकुन एक प्रकारचा अवमान केलेला आहे. आणि विरोधकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहूच नये अशा प्रकारची ऐनवेळेस नियोजन केले आहे. कोरोना टेस्ट करून घ्यायची बंधनकारक होते तर यासंबंधी ची सुचना दोन दिवस अगोदर देणे आवश्यक होते. ही टेस्ट केल्यानंतर साधारण चोवीस तासांनी रिपोर्ट मिळतो याची जाणीव असताना सुध्दा सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला का सुचना दिल्या नाहीत. हे जाणीवपूर्वक केले कृत्य आहे. या भाजपच्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. महापालिकेच्या एका चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला ईच्छा असताना हजर राहता आले नाही. भाजप ने स्वत:च्या पक्षाचा अजेंडा राबवून कार्यक्रम केला.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बेकायदेशीर निवडणुकीच्या विरुद्ध जनआंदोलन-माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांचा पुढाकार

0

पुणे : माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बेकायदेशीर निवडणुकीच्या विरुद्ध  जन आंदोलनाची सुरुवात एमसीएचे अध्यक्षांच्या घरासमोर घंटानाद करीत झाली. 
या आंदोलनासाठी माजी रणजीपटू सुभाष रांजणे , राहुल कानडे, प्रसाद कानडे ,रणजीत खिरीट, पूना क्लबचे पदाधिकारी अभिषेक बोके, नितीन कोकाटे ,स्टेडियम क्लबचे संस्थापक भारत मारवाडी ,आनंद केदारी उपस्थित होते.
अनिल वाल्हेकर म्हणाले,महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची कार्यकारिणी मुळात चुकीची असून, ती बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वांविरोधात काम करत आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च न्यायालय नियुक्त समितीने त्यांची २०१९ ते २०२२ या कालावधीसाठी झालेली निवडणूक यापूर्वीच रद्दबातल ठरवली आहे. त्यामुळे बीसीसीआयने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा मताधिकारही काढून घेतला आहे. यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी चेंज रिपोर्ट बदलून निवडणूक घटनेनुसार असल्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे बदललेल्या घटनेनुसार हे पदाधिकारी काम करत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याविरोधात जनआंदोलन करण्यात आले आहे.
पीएमटीचे व माजी खेळाडू निरंजन साळवी यांनी यावेळी निवेदन केले. आजच्या घंटानादामुळे झोपेचे सोंग घेतलेले एमसीएचे पदाधिकारी जागे होतील, अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली. 

काँग्रेसने बाबासाहेबांचा त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानच केला; अमित शहांचा हल्लाबोल

पुणे–भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान लिहून या देशाला आकार दिला आहे. त्यांनी देशाच्या विकासासाठी आपले मोठे योगदान दिले आहेत. मात्र काँग्रेसने त्यांच्या हयातीत आणि नंतरही त्यांचा सातत्याने अपमान केला, असा घणाघात भाजप नेते आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा केला आहे.अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे देखील लोकार्पण केले. त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. ते म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीत आणि नंतरही अपमानित करण्याचे काम काँग्रेसने सातत्याने केले. गैरकाँग्रेसी सरकार असतानाच बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला. काँग्रेसची सत्ता असताना त्यांना भारतरत्न दिला गेला नाही.देशातील जनतेला बाबासाहेबांचे काम आणि त्यांची थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जेव्हा-जेव्हा आम्ही संविधान दिवस साजरा केला. त्या त्यावेळी काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला. असे म्हणत शहा यांनी काँग्रेसवर हल्ला केला.संविधान सर्वश्रेष्ठस्वातंत्र्यानंतर संविधान बनवण्यात बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान राहिले आहे. सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर सर्वांना एकत्र आणण्याचे काम बाबासाहेबांनी केले आहे. दलित वंचितांना संविधानातून संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी अपमान सहन केला. पण संविधान निर्मिती करताना त्यांनी कधी त्यात कटुता येऊ दिली नाही. जगभरात आपले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांना समान अधिकार देणारे संविधान भारताचे आहे. हे केवळ बाबासाहेबांमुळेच घडू शकले. असे शहा म्हणाले.शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी समर्पित केलेजेव्हा देशात अंधारयुग होते. आशेचा एक किरणही देखील दिसत नव्हता. स्वराज्य आणि स्वधर्म शब्द उच्चारणे देखील जेव्हा कठिण होते. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी समर्पित करून टाकले. त्यांच्या या प्रयत्नामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील दोन तृतियांश शहरात स्वराज्य मिळवण्याचे सौभाग्य मिळाले, असे शहा म्हणाले. शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासनाची पायाभरणी केली. न्याय, नाविक दल, प्रशासकीय काम आदी गोष्टी त्यांनी प्रत्यक्षात उतरवल्या, असे देखील शहा म्हणाले.पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकारने अनेक कामे केली. विमानतळापासून ते मेट्रोपर्यंतच्या कामाला हिरवा कंदिल दिला. पुणेकरांना आता लवकरच मेट्रो मिऴणार आहे. स्मार्ट सिटीसाठी 100 कोटी दिले. बस सेवा सुधारण्यासाठी केंद्राने एक हजार अतिरिक्त बसेस दिल्या. मुळा मुठा निधी संवर्धनासाठी 110 कोटींचे काम सुरू आहे. सर्वाधिक स्टार्टअप पुण्यातच आले आहेत. पुण्याच्या विकाससाठी मोठी सरकार संकल्पबद्ध आहे. आम्ही पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही. अशी शाश्वती अमित शहांनी पुणेकरांना दिली आहे.

‘मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन २०२१’ ठरली देशातील सर्वोत्तम अभिजात सौंदर्य स्पर्धा

0

पुणे – ‘दिवा पेजंट्स’चे संचालकद्वय कार्ल व अंजना मस्कारेन्हास यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मिसेस इंडिया २०२१’ उपक्रमाने देशातील सर्वाधिक चमकदार सौंदर्य स्पर्धा ठरण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. यंदा या स्पर्धेचे हे सलग तिसरे वर्ष असून तिला सर्वोत्तम राष्ट्रीय सौंदर्य़ स्पर्धेचे मानांकन मिळाले आहे. यंदा हा सोहळा अधिकच झगमगता ठरला. हॉटेल हयात पुणे (आतिथ्य प्रायोजक) येथे नुकत्याच झालेल्या महाअंतिम फेरीत तब्बल ३१ स्पर्धकांनी आपल्या सौंदर्य व बुद्धिमत्तेचे प्रदर्शन घडवले. विनय अरान्हा यांनी ‘जहांगीर ओराकेअर डेंटल सेंटर’च्या सहयोगाने या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. आंतरराष्ट्रीय निवेदिका व गायिका दिलरुबा पांडे यांच्या स्वराने श्रोतृवृंद मुग्ध झाला.

‘दिवा पेजंट्स’तर्फे या स्पर्धकांची तज्ज्ञ पद्धतीने तयारी करुन घेण्यात आली. स्वपरिचय, स्वरनियमन, मंचावरील वावर, प्रश्नोत्तरे अशा अनेक पैलूंमधील त्यांचे कौशल्य अंजना व कार्ल यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली वृद्धिंगत करण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून नामवंत तारका व व्यक्तींनी काम पाहिले. त्यात विनय अरान्हा (‘रोझरी फाऊंडेशन’चे व्यवस्थापकीय संचालक), महेक चहल (अभिनेत्री), डॉ. आकाश शाह (‘जहांगीर ओराकेअर’चे व्यवस्थापकीय संचालक), कमल दीप शर्मा (‘हयात पुणे’चे विक्री व विपणन संचालक), पवित्रा पुनिया (अभिनेत्री), निष्ठा कारखानीस (एमआयईएन २०१९ स्पर्धा विजेत्या) व कार्ल मस्कारेन्हास (‘दिवा’चे संचालक) यांचा समावेश होता.

सिल्व्हर श्रेणीतील विजेते (वयोगट २० ते ३८)

–    सिसिलिया संन्याल – विजेत्या

–    भक्ती पुंडे – फर्स्ट रनर अप

–    झोया पटेल – सेकंड रनर अप

गोल्ड श्रेणीतील विजेते (वयोगट ३९ ते ५५)

–    डॉ. लीना गुप्ता – विजेत्या

–    वेणी कृष्णा – फर्स्ट रनर अप

–    सोनाली काकडे – सेकंड रनर अप

प्लस श्रेणीतील विजेत्या – दीप्ती चाको बांगेरा

इंटरनॅशनल क्वीन्सचा मुकूट विजेत्या

–    हेमा तुपे

–    नीता सात्रस

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक पूजा सिंग यांनी या कार्यक्रमाचे संचालन व नृत्य दिग्दर्शन केले तर त्याला तितक्याच समर्थ समन्वयाची जोड श्रद्धा रामदास, नेहा चौहान व मृणाली तायडे यांनी दिली.

राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध गायिका सिंथिया फुर्टाडो यांनी मिसेस इंडिया राष्ट्रगीताची रचना केली.

भारताच्या या सर्वाधिक अभिजात स्पर्धेने उपस्थितांची केवळ मनेच जिंकली नाहीत तर त्यांना धाडस, स्वप्न व प्रसिद्धीसाठी प्रेरणाही दिली.

Partners :

1. प्रेझेंटिंग पार्टनर- विनय अरन्हा

2. सह द्वारा समर्थित- जहांगीर डेंटल ओरकेअर सेंटर.

3. अधिकृत पोषण भागीदार- पोषण जीवनशैली

4. अधिकृत स्किनकेअर पार्टनर- स्किनटिलेटिंग

5. अधिकृत मीडिया पार्टनर- लोकमत

6. द्वारा समर्थित- हयात पुणे

7. अधिकृत धर्मादाय भागीदार- आम्ही कल्याण फाउंडेशनला मदत करतो.

8. वेस्टर्न राउंडसाठी अधिकृत वॉर्डरोब पार्टनर- Adore

9. अधिकृत टॅरो पार्टनर- रिहिता रंजन

10. अधिकृत ऑनलाइन मीडिया पार्टनर- टीजीपीसी

11. अधिकृत व्हिडिओग्राफी भागीदार- I प्लस मीडिया सोल्यूशन्स

12. पारंपारिक गोल गोल्ड श्रेणीसाठी अधिकृत वॉर्डरोब पार्टनर – युराझल

13.अधिकृत पोर्टफोलिओ शूट पार्टनर- विजय पोवार फोटोग्राफी

14. अधिकृत केस आणि मेकअप पार्टनर- एस्थेवा अकादमी. भागीदारांची यादी

15. अधिकृत स्किन केअर आणि गिफ्टिंग पार्टनर- Aura Essentials

16. अधिकृत वॉर्डरोब पार्टनर पारंपारिक राउंड सिल्व्हर श्रेणी- फिनिटो फॅशन हब

17. अधिकृत एनजीओ पार्टनर- बी ह्युमन, बी काइंड फाउंडेशन.

18. अधिकृत चॉकलेट पार्टनर- AmaTaz

19. अधिकृत मीडिया पार्टनर- दैनिक शहर बातम्या पुणे

20. अधिकृत भेटवस्तू भागीदार- नारायणी सिल्क

21. अधिकृत PR भागीदार- प्रेरणा

22. अधिकृत भेटवस्तू भागीदार- मोदसूत्र

23. अधिकृत पेय भागीदार- किंगफिशर

24. अधिकृत इव्हेंट फोटोग्राफी पार्टनर- SJ illuminations

25. अधिकृत कास्टिंग पार्टनर- दिवा टॅलेंट हब

26. अधिकृत फिटनेस पार्टनर- भारती खंडेलवाल

27. अधिकृत सहाय्यक भागीदार- Weaa मनोरंजन

28. अधिकृत सहाय्यक भागीदार- आम्ही भागीदारांची इव्हेंट यादी आहोत

29. अधिकृत ज्वेलरी पार्टनर- स्टार ज्वेलर्स

30. अधिकृत सलून भागीदार ब्लोंड हेअर सह.

31. रचना द्वारे अधिकृत समर्थन भागीदार-ADA

32. मिसेस इंडिया अँथम सिंगर आणि संगीतकार- सिंथिया फुर्टाडो

33. अधिकृत रनवे डायरेक्टर आणि कोरिओग्राफर- पूजा सिंग

34. अधिकृत सामग्री डिझायनर- उर्जा घर

35. टॅलेंट राउंड अँकर- विभूती पांडे

36.अधिकृत डीजे-डीजे संकेत

37. कार्यक्रम व्यवस्थापित- कुबेर इव्हेंट

38. बेव्हरेज पार्टनर- ग्रँडमास्टरचा

39. अधिकृत समन्वयक- मृणाली तायडे, नेहा चौहान, श्रद्धा रामदास.40. अधिकृत अँकर- दिलरुबा पांडे 

महागाई आणि बेरोजगारीने देश हैराण झाला असताना भाजपाला केवळ सत्तेचेच वेध -रमेश बागवे

0

पुणे – संपूर्ण देश महागाई आणि बेरोजगारीने हैराण झालेला असताना केवळ भ्रष्टाचार आणि सत्तेचे वेध भाजपाला लागलेले असल्याचा आरोप येथे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष , माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केला आहे.

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकारच्या अनियंत्रित महागाई विरोधात जनजागरण पदयात्रा संत कबीर चौक, नाना पेठ ते महात्मा फुले स्मारक, गंज पेठ, पुणे पर्यंत काढण्यात आली व आंदोलन करण्यात आले.या जनजागरण पदयात्रेत केंद्र सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आल्या. या जनजागरण पदयात्रेत आबा बागुल, अविनाश बागवे,  संजय बालगुडे, कमलताई व्यवहारे,रफिक शेख, संगीता पवार, भीमराव पाटोळे, अनिल सोंडकर, उस्मान तांबोळी, शेखर कपोते, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, रवि पाटोळे, क्लेमेंट लाजरस, रॉबर्ट डेविड, वाल्मिक जगताप, सुनिल पंडित, मुख्तार शेख, अशोक जैन, बाबा धुमाळ, मुन्नाभाई शेख, अरूण वाघमारे, रमेश सकट, सुनील घाडगे, प्रवीण करपे, सतीश पवार, प्रदिप परदेशी, शिलार रतनगिरी, सुजित यादव, जयकुमार ठोंबरे, जावेद निलगर, नंदू मोझे, रजनी त्रिभुवन, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, मंजूर शेख, विठ्ठल गायकवाड, विजय मोहिते, दिपक ओव्‍हाळ, छाया जाधव, आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, “केंद्रातील मोदी सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची शुद्ध फसवणूक केलेली आहे. पेट्रोल-डीजेलच्या भाववाढी बरोबरच दैनंदिन वस्तूंच्या भाववाढीने सुध्दा आकाशाला गवसणी घातलेली आहे. यामुळे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. भाजपने पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यामुळे भ्रष्टाचार म्हणजे भाजप, खोटे बोलणारा पक्ष म्हणजे भाजप असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. भाजपच्या नगरसेवकांनी अनावश्यक ठिकाणी खोदकाम करून टक्केवारी व ठेकेदारीच्या माध्यमातून भ्रष्टाचार केलेला आहे. याचा कळस म्हणजे टेंडर न काढता बिल काढण्याचे पाप भाजपने केलेले आहे. यांच्या कथनी आणि करनीमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. मोदींनी देशातील जनतेला ज्याप्रकारे जुमलेबाजी करून फसविले तसाच नेमका प्रकार पुण्यात देखील भाजपची मंडळी करत आहे. एकीकडे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम ठेवतात तर दुसरीकडे त्या कार्यक्रमाच्या होर्डिंग्ज मधून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला गायब करतात. महामानवांपेक्षा यांच्यासाठी यांचे नेते मोठे झाले आहेत. आज भाजपच्या ‘मुहं में राम और बगल में छूरी’ या नीतीच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता आहे.’’यावेळी उपस्थित असणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, ‘‘देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असतांना फक्त काँग्रेस पक्षच रस्त्यावर उतरून या अनियंत्रीत महागाई विरोधात लढत आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदींनी जनतेची शुद्ध फसवणूक केली आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महागाई वाढवून देशाची अर्थव्‍यवस्था उध्दवस्त केली आहे. जे सरकार महागाईवरनियंत्रण ठेवू शकत नाही त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आज मोदी सरकारने महागाईचा उच्चांक गाठला आहे त्यामुळे त्यांनी त्वरीत महागाईवर नियंत्रण आणावे अन्यथा त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.’’ याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, महिला अध्यक्षा सोनाली मारणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूट मध्ये मुक्कामी

पुणे- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत आणि त्यांची राहण्याची सोय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूट मध्ये करण्यात आली आहे.आज शनिवारी रात्री शहा पुण्यात मुक्कामी आहेत.महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी पुण्यात असल्याने भाजपने शक्तीप्रदर्शन करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.महापालिकेतील कार्यक्रमासह गणेश कला क्रीडा मंच येथी मेळाव्यात अमित शहा काय बोलणार याकडे लक्ष लागलेले आहे.नोव्हेंबर महिन्यात अमित शहा यांचा दौरा होणार होता, पण तो अचानक पुढे ढकलण्यात त्यानंतर हा दौरा रविवारी होत आहे. रविवारी सकाळी १० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन, त्यानंतर चाकण येथील एनडीआरएफचा कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार आहेत. दुपारी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्थेच्या कार्यक्रम झाल्यानंतर पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमीपुजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळण्याच्या लोकर्पण शहा यांच्या हस्ते होणार आहे.भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केला असून, त्यात शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पक्षाकडून तसेच नगरसेवक व इच्छुक उमेदवरांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी शहा पर्वती पायथा येथील घरी जाणार आहेत.दरम्यान, महापालिकेची निवडणूक जवळ येत असताना भाजपने संघटनात्मक बांधनी सुरू केली आहे. तसेच नुकतेच पक्षाच्या नव्या कार्यालयच्या उद्घाटनप्रसंगी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला लक्ष करत पराभव करून दाखवा असे आव्हान दिलेले आहे. त्यानंतर आता अमित शहा हे भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याने यानिमित्ताने निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

अजित पवारांच्या नावावर बुक होता सूट…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज ते पुण्यात मुक्कामी आहे. पुण्यातील क्विन्स गार्डन येथे व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस आहे. या गेस्ट हाऊसमध्ये अमित शहा यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने चाचपणी केली.पण, कोणताही व्हीव्हीआयपी सूट उपलब्ध नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. या व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासाठी सूट राखीव असतो. तसंच प्रीमिअम सूट हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासाठी असतो. अजितदादा शनिवारी आणि रविवारी पुण्यात मुक्कामी असल्यामुळे त्यांच्या नावावर सूट बूक होता.प्रशासनाने अमित शहा यांच्या सूट उपलब्ध नसल्याची माहिती अजित पवार यांच्या कानी घातली. अजित पवार यांनी क्षणाचा विलंब न करता अमित शहा यांच्यासाठी आपला व्हीव्हीआयपी सूट उपलब्ध करून दिला. अजित पवार यांनी तातडीने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रशासनानेही सुटकेचा श्वास सोडला. कारण, केंद्रीय मंत्र्यांसाठी पुण्यातील खासगी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. पण, सुरक्षेच्या मुद्दा उपस्थितीत झाल्यामुळे खासगी हॉटेल्समध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था ऐनवेळी करता आली नाही.

‘प्रॉक्सीवॉर’ विरुद्ध आंतरराष्ट्रीय कायद्यात बदल करणे गरजेचे- पद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम

0

एमआयटी डब्ल्यूपीयूत पहिल्या आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिषदेचा समारोप

पुणे:“आतंकवाद्यांच्या व्याख्येचे स्पष्टीकरण देता येऊ शकत नाही. सध्या प्रॉक्सीवॉर सुरू आहे. देशातील २६ नोव्हेंबर ची घटना ही याचे उदाहरण आहे. हा हल्ला भारता विरूध्द पुकारलेले एक छुपे युद्धच होते. कायदयांच्या आड लपून जे सूत्रधार हल्ले करीत आहेत त्यांसाठी अंतरराष्ट्रीय कायद्यात बदल करणे गरजेचे आहे.”असे विचार ज्येष्ठ कायदे तज्ञ व सरकारी वकील पद्मश्री डॉ.उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे भारत तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘अंतरराष्ट्रीय कायदा आणि शांतता परिषदे’च्या ऑनलाइन समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी राज्य सभेचे खासदार सुजीत कुमार, यूएन इंटरनॅशनल लॉ कमिशनचे सदस्य डॉ. अनिरुद्ध राजपूत, सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती ज्ञान सुधा मिश्रा, पद्मश्री अ‍ॅड.प्रविण पारीख व सुप्रीम कोर्टाचे वकील डॉ. ललित भसीन हे सन्माननीय पाहुणे म्हणून होते.अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा कराड होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, लिबरल ऑर्ट विभागाच्या अधिष्ठाता प्रा.डॉ.अनुराधा पराशर आणि स्कूल ऑफ लॉ च्या प्रमुख डॉ. पोर्णिमा इनामदार उपस्थित होते.
पद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम म्हणाले,“ मुुबईवरील हल्ला हा भारता विरूध्द पुकारलेले युद्ध आहे हे न्यायालयात सिद्ध करण्यास ब्रिटिशकालीन कायदयामुळे अडचणी आल्यात. शांती भंग करणार्‍या या घटनेत कित्येक मारले गेले. घटनेचे धागे दोरे हे कराची येथे सापडले. त्या घटनेत जीवंत सापडलेला कसाब यावर केस चालली. त्याने संपूर्ण देश ढवळून निघाला. कायद्याच्या माध्यमातून खरच शांती स्थापन केली जाऊ शकते का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जगात आतंकवाद थांबवू शकणार नाही, परंतू कायदयाच्या माध्यमातून शांतीसाठी कार्य केले जाऊ शकते. एकंदरीतच समाज कल्याणासाठी शांती ही गरजेची आहे.”
सुजीत कुमार म्हणाले,“न्यायव्यवस्थेमधील जागतिक स्तरावरील तुलनात्मक अभ्यास करता असे दिसून येते, की देशात न्यायमूर्तींची संख्य खूपच कमी आहे. कदाचित त्या कारणांमुळेच कोर्टात करोडो केसेस पेंडिंग पडून आहेत. यातील ७७ टक्के केसेस वर्षाभरापासून पडलेल्या आहेत, जे देशासाठी चिंतेची बाब आहे.आज संसदेमध्ये न्यायसंस्था, प्रशासन आणि शासन यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होतांना दिसते. एमआयटीने आयोजित केलेली ही परिषद देशासाठी खूप महत्वाची आहे.”
डॉ. अनिरुद्ध राजपूत म्हणाले,“आंतरिक शांती असल्या शिवाय बाह्या शांती निर्माण होऊच शकत नाही. संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानात वाढणारे एमआयटी विद्यापीठ जगात शांती निर्माण करण्यासाठी जे कार्य करीत आहे ते अप्रतिम आहे. आज कायद्याच्या माध्यमातून शांती निर्माण होईल का हा एक मुद्दा आहे. आधुनिक आंतरराष्ट्रीय कायदांच्या विचार केला तर ते आपल्या येथील समाजानुसार नसेल. विदेशी संस्कृती ही वेगळी आहे. तसेच कौटिल्य यांनी आध्यात्मिक पद्धतीने लिहिलेले ज्ञान अप्रतिम आहे. त्यांवर नव्याने विचार व्हावा. आजच्या युवकांनी सर्वात प्रथम एक विदेशी व इंग्रजी भाषा शिकावी.”
पद्मश्री अ‍ॅड.प्रविण पारीख म्हणाले,“समाजिक सुरक्षेसाठी कायदे व नियम महत्वाचे आहे. जागतिक शांतता निर्मितीसाठी राज्यघटनेत काही गोष्टींची नोंद करुन ठेवली आहे. एमआयटी ने आयोजित केलेली ही परिषद शांतीसाठी महत्वपूर्ण असेल.”
ज्ञान सुधा मिश्रा म्हणाल्या,“समाजाला शिस्त लागण्यासाठी कायदा आणि नियम गरजेचे आहे. कायद्यांच्या माध्यमातून समाज आणि सरकार यांच्यात उत्तम प्रकारचा ताळमेळ बसतो. तसेच मानवी जीवनामध्ये शांती किती महत्वाची आहे हे कळण्यासाठी वाईट घटनाना आळा घालण्याचे कार्य कायद्याच्या माध्यमातून होते. कायद्याचे उल्लंघन केल्यास कोर्टाच्या माध्यमातून त्याला आळा घालण्याबरोबरच शिक्षा दिली जाते.”  
डॉ. ललीत भसीन म्हणाले,“जगात शांती संस्कृतीचा प्रचार आणि प्रसारासाठी कायद्याची भूमिका या विषयावर आयोजित पहिल्या परिषदेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या वकिलांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. याचा लाभ विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच होईल.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“जागतिक स्तरावर शांती निर्माण करण्याची जवाबदारी ही सर्वांची आहे. जगात चाललेली शर्यत ही मानवजातीसाठी घातक आहे. मन शांती आणि आत्मशांतीच्या माध्यमातून समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकेल. त्यासाठी वैश्विक कायद्याचे पालन केल्यास जगामध्ये शांती नांदेल.”
राहुल विश्वनाथ कराड यांनी या परिषदेमागची भूमिका स्पष्ट करून समाजात शांतता नांदण्यासाठी जे काही करता येईल त्यावर विचार मांडले.
डॉ.आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.
प्रा.डॉ. अनुराधा पराशर यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व डॉ. पोर्णिमा इनामदार यांनी आभार मानले.

पीएमपीएमएल कडून कोंढणपूर येथील श्री तुकाईदेवी यात्रेनिमित्त १ जादा बसची सोय

0

पुणे-पीएमपीएमएल कडून कोंढणपूर येथील श्री तुकाईदेवी यात्रा निमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी कात्रज सर्पोद्यान बसस्थानक ते कोंढणपूर अशी बससेवा दिनांक २१/१२/२०२१ ते २८/०२/२०२२ या कालावधीत दर रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी १ जादा बस सोडण्यात येणार आहे.
सध्या कात्रज सर्पोद्यान बसस्थानक ते कोंढणपूर या मार्गावर पीएमपीएमएल च्या ६ बसेस दर २५
मिनिटांच्या वारंवारीतेने सुरु आहेत. या ६ बसेस व्यतिरिक्त १ जादा बसचे नियोजन दिनांक २१/१२/२०२१ ते २८/०२/२०२२ या कालावधीत दर रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी करण्यात आले आहे. तसेच पुणे सातारा रोडवर कात्रज सर्पोद्यान बसस्थानकावरून बसमार्ग क्र. ६१- कात्रज सर्पोद्यान ते सारोळा, मार्ग क्र. २९३- कात्रज सर्पोद्यान ते बालाजी मंदिर (केतकावळे), मार्ग क्र. २९६- कात्रज सर्पोद्यान ते विंझर व मार्ग क्र. २९६अ- कात्रज सर्पोद्यान ते वांगणीवाडी या मार्गावर संचलनात असणाऱ्या बसेस कोंढणपूर फाट्यापर्यंत जाणेसाठी सरासरी १० मिनिटे वारंवारीतेने उपलब्ध आहेत. तरी कोंढणपूर येथील श्री तुकाईदेवी दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांनी सदर बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.

जनसामान्यात ‘हरेकृष्ण’ पाहणे हीच खरी ईशसेवा’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 18 : पैसा, शक्ती, विद्या अनेकांकडे असते परंतु त्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी करण्याची प्रेरणा कमी लोकांना मिळते. ईश्वराची पूजा करणे सोपे आहे; परंतु जनता जनार्दनाच्या आत जो ‘हरेकृष्ण’ आहे त्याची सेवा करणे हे श्रेष्ठ कार्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

कोरोना काळात राज्यातील गरजू लोकांना अन्नामृत  फाउंडेशनच्या माध्यमातून तयार शिजवलेले भोजन देण्यात सहकार्य करणाऱ्या विविध दानशूर उद्योग संस्था, कंपनी व अन्न वितरण संस्थांचा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

इस्कॉनची सहयोगी संस्था असलेल्या अन्नामृत फाउंडेशनतर्फे राजभवन येथे अन्नदान कार्यात सहयोग देणाऱ्या संस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ‘आभार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला आमदार मंगल प्रभात लोढा, अन्नामृत फाउंडेशनचे संस्थापक व मुख्याधिकारी राधा कृष्ण दास, विश्वस्त कुशल देसाई व नुपूर देसाई प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, येशू ख्रिस्त यांनी दानाचे महत्व विशद केले होते. भारतात प्राचीन काळापासून करुणेचा भाव आहे. करुणेमुळेच युवराज गौतम हे भगवान बुद्ध झाले व अनेक देशात बौद्ध धर्माचा प्रचार झाला. दया व करुणा मनुष्याला देवत्व प्रदान करते व समाजात समता प्रस्थापित करण्यास मदत  करते,  अन्नामृत फाउंडेशनच्या अन्नदानाच्या कार्यातून अनेक संस्था व व्यक्तींना प्रेरणा मिळेल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

अन्नामृत फाउंडेशनच्या माध्यमातून २.६० कोटी तर सहयोगी संस्थांच्या माध्यमातून १५ कोटी थाळी  भोजन वाटण्यात आल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त कुशल देसाई यांनी यावेळी दिली. अन्नामृत फाउंडेशनच्या कार्याला शालेय मध्यान्ह भोजन योजनेपासून सुरुवात झाली व आज लाखो लोकांना उत्कृष्ट भोजन दिले जाते असे संस्थापक राधा कृष्ण दास यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महानगर गॅस लिमिटेड, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स नेकलेस चॅरिटेबल ट्रस्ट, दाणी फाउंडेशन, पिरामल ग्रुप, अपार इंडस्ट्रीज लिमिटेड, कोटक फॅमिली फाउंडेशन, बारवाले कुटुंबीय,केशव सृष्टी व अन्नामृत फाउंडेशन यांसह विविध संस्थांचा राज्यपालांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.