Home Blog Page 2143

नवले पुलाजवळ पुन्हा अपघात ,आज पुन्हा 3/4 दगावले…

0

पुणे-कात्रजहून पुण्याकडे येणार्‍या नवीन सातारा – पुणे महामार्गावरील नवले पुल हा अपघाताचा हॉट स्पॉट बनला आहे. आज सकाळी पुण्याहून सातार्‍याकडे जाणार्‍या एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना उडवले. त्यात तिघांचा जागीच मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. याबाबतची प्राथमिक माहिती अशी, पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने एक ट्रक जात होता. नवले पुलापासून पुढे काही अंतरावर भूमकर पुलाजवळ त्याने पुढे असलेल्या एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. त्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला काही जण थांबले होते. रस्त्याकडेला थांबलेल्यांवर ट्रक गेला. त्यात तिघांचा जागीच मृत्यु झाला. या तरुणांच्या हातात बॅगा होत्या. ट्रकने त्यांना अक्षरश फरफटत नेले. महामार्गावर अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. सिंहगड वाहतूक विभाग तसेच सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत कणसे व पोलिस कर्मचारी वाहतूक सुरळीत करत आहेत. दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी बघ्यांनीसुद्धा मोठी गर्दी केली आहे.

अन्न व औषध प्रशासनच्या कारवाईत कमी दर्जाचा फूड सप्लिमेंट साठा जप्त

0

मुंबई, दि. 28 : अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत अन्न सुरक्षा कायद्यांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने कमी दर्जाचे फूड सप्लिमेंट साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन, दक्षता व गुप्तवार्ता विभागास प्राप्त माहितीनुसार मेसर्स सिग्मा लाइफसायन्स, बंगलो भूखंड क्रमांक-२०४-२४४, आरएससी-४१, गोराई 2, प्रगती शाळेसमोर, बोरिवली पश्चिम, मुंबई-400092 या पेढीची ऑनलाईन तपासणी केली असता तेथे Health Supplements चे उत्पादन होत असल्याचे आढळून आले. या ठिकाणी Health Supplement 100% Whey Protein(Ammolabz) व Dietary Supplement Progenix Mass Addict चा उत्पादित करून ठेवलेला साठा आढळून आला.

या ठिकाणी Health Supplement 100% Whey Protein(Ammolabz) व Dietary Supplement Progenix Mass Addict चे अन्न नमुने घेवून Health Supplement 100% Whey Protein (Ammolabz) ह्या अन्नपदार्थाचा उर्वरित 76 जार (कंटेनर), ५,७५,३२०/- रुपये चा साठा तर Dietary Supplement Progenix Mass Addict ह्या अन्नपदार्थाचा उर्वरित १०० जार (कंटेनर), १,४५,०००/- रुपये चा साठा हा काही घटकांचे प्रमाण हे RDA पेक्षा जास्त असल्याने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळे तसेच साठा कमीदर्जाचा असल्याच्या संशयावरून व जन आरोग्य हितार्थ जप्त करण्यात आला.

अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्रलंबित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. ही कारवाई  अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आली असल्याचे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने कळविले आहे.

कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौक येथील दुहेरी उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण- महापौर मोहोळ

0

उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार !

पुणे – कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौक येथील दुहेरी उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून लवकरच वाहतुकीसाठी कसा खुला होईल याकडे आपण लक्ष पुरवीत असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

मोहोळ यांनी असेही म्हटले आहे कि,’पुण्याच्या पश्चिम भागाच्या सुरळीत वाहतुकीसाठी वरदान ठरणाऱ्या नळ स्टॉप येथील दुहेरी उड्डाणपुलाच्या कामाची मेट्रो अधिकारी, नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन मी आज आढावा घेतला. महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. ब्रीजेश दीक्षित, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, स्थानिक नगरसेवक जयंत भावे, माधुरीताई सहस्रबुद्धे, मंजुश्रीताई खर्डेकर, दीपक पोटे यांच्यासह महापालिका आणि मेट्रो अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून हा उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी सुरु होत आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्या कडे असताना पश्चिम पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मी या दुहेरी उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. शिवाय या कामाला गती यावी यासाठी सातत्याने पाठपुरावाही सुरु होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. आता हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच काम पूर्ण होऊन वाहतूक सुरु होऊ शकेल.

वैभवशाली मुंबई विद्यापीठाने आपली ख्याती अधिक वाढवावी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 27 : आज देशातील आयआयटी संस्थांनी सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान पटकावले आहे. मुंबई विद्यापीठाला अलिकडेच ‘नॅक’कडून ए प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान असणाऱ्या वैभवशाली मुंबई विद्यापीठाची ख्याती जगभर अधिक वाढावी यासाठी विद्यापीठाने पावले टाकावीत, अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.

राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचा २०२१ या वर्षाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ सोमवारी (दि. २७) विद्यापीठाच्या फोर्ट येथील सर कावसजी जहांगीर सभागृहात झाला त्यावेळी ते बोलत होते.

दीक्षांत समारंभाला पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, गोवा येथील राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेचे संचालक प्रा. सुनील कुमार सिंह, कुलगुरू सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, संचालक परीक्षा व मूल्यांकन डॉ विनोद पाटील, कुलसचिव डॉ सुधीर पुराणिक, विविध शाखांचे अधिष्ठाता, विद्यापीठाच्या प्राधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक व स्नातक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी डोळ्यांसमोर मोठे लक्ष्य ठेवून त्याच्या प्राप्तीसाठी परिश्रम करून विलक्षण असे काही प्राप्त केले तर भारताला जगद्गुरू होता येईल असे सांगताना विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरीच्या संधी निर्माण करणारे उद्योजक व्हावे, असे राज्यपालांनी सांगितले. देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रत्येक स्नातकाला आत्मनिर्भर व्हावे लागेल असे त्यांनी सांगितले.

नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आंतरशाखीय अध्ययन व ॲकॅडेमिक क्रेडिट्स देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विविध शाखांमधील विषय देखील शिकता येणार आहे असे राज्यपालांनी सांगितले. मुलींचा उच्च शिक्षणातील टक्का वाढत असल्याबद्दल तसेच सुवर्णपदके अधिकांश मुलींनी प्राप्त केल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.   दीक्षांत समारंभात विविध शाखांमधील एकुण २,१२,५७९ स्नातकांना पदव्या, २४३  स्नातकांना पीएचडी तसेच सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला विधानसभेत शिफारस करण्याचा ठराव

0

मुंबई, दि. 27 : इतर मागास वर्गातील व्यक्तींना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व मिळणे आवश्यक आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतर मागास वर्गातील व्यक्तींना वगळून घेण्यात येऊ नये अशी शिफारस राज्य निवडणूक आयोगाला करण्याचा ठराव विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला. या ठरावास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनुमोदन देऊन एकमताने हा ठराव पारित करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्यादृष्टीने प्रक्रिया सुरु केली. मात्र राज्य शासनाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेवू नये अशी शिफारस राज्य निवडणूक आयोगाला करण्याबाबतचा ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला. तो सर्वपक्षीय सहमतीने एकमताने पारित करण्यात आला.

विधानपरिषदेत हा ठराव ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडला, तोही सर्वपक्षीय सहमतीने एकमताने पारित करण्यात आला.

राज्यातील ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला ओबीसी आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी, त्या आयोगामार्फत ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार करावा आणि आयोगाच्या शिफारसीसह जमा झालेली माहिती सर्वोच्च न्यायालयात  सादर करावी असा तीन सूत्री कार्यक्रम दिला. याची पूर्तता करण्यासाठी राज्य शासनाने तीन महिन्यांचा कालावधी मागितला होता.

०००

पीएमजीपी वसाहतीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय येत्या महिनाभरात – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

0

मुंबई, दि. 27 : मुंबईतील अंधेरी पूर्व येथील पीएमजीपी वसाहतीतील जुन्या व जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी येत्या महिनाभरात उच्चस्तरीय बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली.

सदस्य सुनिल प्रभु, रविंद्र वायकर, अमिन पटेल यांनी मुंबईतील अंधेरी पूर्व, कामाठीपूरा, उमरखाडी या भागातील पीएमजीपी अंतर्गत येणाऱ्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यास उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री श्री. आव्हाड बोलत होते.

गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड म्हणाले, अंधेरी पूर्व येथील परिसरात 17 इमारती 6.41 एकरात असून, 984 गाळे आहेत. तीन वेळा देकार पत्र देऊनही विकासक पुनर्विकास करत नसल्याने, चौकशी केली असता विकासक आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने तो पुनर्विकास करू शकत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईतील म्हाडाअंतर्गत येणाऱ्या सोसायटीच्या रहिवाशांना निवासस्थानाची अडचण भासू नये तसेच जीर्ण इमारत आणि स्थानिकांच्या जीवला धोका होवू नये यासाठी  पीएमजीपी अंतर्गत येणाऱ्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी महिनाभरात उच्चस्तरीय बैठक घेऊन तातडीने निर्णय घेवून कार्यवाही करण्यात येणार असल्याचे श्री.आव्हाड यांनी सांगितले.

मुंबईतील म्हाडाअंतर्गत येणाऱ्या वसाहतीतील नागरिकांना निवासाचा प्रश्न भेडसावणार नाही यासाठी भविष्यात निर्णय घेण्यात येतील. पीएमजीपी अंतर्गत येणाऱ्या इमारतींचा प्रश्नही तातडीने सोडविण्यात येईल यासाठी संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विकासक यांच्याशी चर्चा करण्यात येईल. इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासनाकडून घेण्यात येणाऱ्या विविध मान्यताही लवकर घेऊन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही श्री.आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

बंद केलेले सार्वजनिक शौचालय तातडीने सुरू करा : आम आदमी पक्षाचे आंदोलन

0

पुणे-आज आम आदमी पक्षाच्या वतीने विकास चौक कर्वेनगर येथे बंद केलेले सार्वजनिक शौचालय तातडीने सुरू करावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.आजच्या या आंदोलनामध्ये डॉ अभिजीत मोरे (कोथरुड विधानसभा अध्यक्ष), प्रा सुहास पवार (कोथरुड विधानसभा उपाध्यक्ष), सुशील बोबडे (कर्वेनगर वॉर्ड कार्याध्यक्ष), सुजित अगरवाल (कोथरूड विधानसभा खजिनदार), रोहन रोकडे (कोथरुड वॉर्ड कार्याध्यक्ष), घनश्याम मारणे, विक्रम गायकवाड (मुळशी विधानसभा अध्यक्ष), किशोर मुजुमदार, ऋषिकेश मारणे, यश खेतान, किर्तीसिंग चौधरी, अविनाश सावंत, दत्तात्रय भांगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ अभिजीत मोरे यांनी या प्रकरणी सांगितले कि ,’कर्वेनगर परिसरामध्ये असलेल्या भाजी मंडई, दुकानदार, हॉटेल येथील विक्रेते, ग्राहक तसेच नागरिकांसाठी महिलांसाठी विकास चौक कर्वेनगर येथे असलेले सुस्थितीतील सार्वजनिक शौचालय हे सोयीचे असून देखील गेल्या काही महिन्यांपासून या सार्वजनिक शौचालयाला टाळे लावण्यात आले आहे. हे शौचालय सुरू करावे यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने सहाय्यक आयुक्तांकडे विचारणा केली असता सदर सार्वजनिक शौचालय महिला व बालकल्याण समिती ठराव क्रमांक 40 (दिनांक ९/९/२०२०) अनुसार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे पत्र महानगरपालिकेने आम आदमी पक्षाला दिले आहे.

स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी दिशाभूल करून हेतूपुरस्सर हे सार्वजनिक शौचालय पाडण्याचा आणि ही जागा हडपण्याचा डाव आखला आहे. पुणे शहरामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सार्वजनिक शौचालय आणि मुताऱ्यांची संख्या अपुरी असून त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची गरज असताना चालू स्थितीतील सार्वजनिक शौचालय बंद करून पाडण्याचा घाट घातला जात आहे. याविरोधात आम आदमी पक्षाच्या वतीने स्थानिक नागरिकांनी मध्ये सह्यांची मोहीम सुरु केली असून असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात आहे.

बेकायदा ऑनलाईन लॉटरी व गेमिंगमुळे युवा पिढी उध्दवस्त -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0


मुंबई, दि. २७ डिसेंबर- राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तीन पक्षाने आपल्या वचननाम्यामध्ये महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे वचन देण्यात आले. पण गेल्या दोन वर्षाच्या काळात राज्यातील महिला सर्वांत असुरक्षित आहेत. पिडीत महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेसाठी सरकारने एक दमडीचीही तरतूद केलेली नाही. आर्थिक मदतीसाठी पीडित महिलांना मदत देण्याकडे सरकारने आतापर्यंत दुर्लक्ष केले आहे. विदेशी दारुवरील कर माफ करणा-या सरकारकडे पीडिता महिलांसाठी मात्र पैसे नाहीत. पीडित महिलांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी ही योजना असून हे सरकार त्यांचे मनोधैर्य उंचावण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करीत आहे. महिला अत्याचाराच्या अनेक गंभीर घटना रोज घडत असून कोरोनातही डान्सबार सुरुच असून महाराष्ट्राला अंमली पदार्थाचा विळखा बसला आहे, पण सरकार खंडणीमध्ये व्यस्त आहे. तर राज्यात सुरु असलेली बेकायदा ऑनलाईन लॉटरी व गेमिंगमुळे युवा पिढी उध्दवस्त होण्याच्या मार्गावर असल्याची घणाघाती टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
विधानपरिषदेत नियम २५९ अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतना विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारच्या कारभारावार टिका केली. तसेच मुंबई व एमएमआरडीए क्षेत्रातील रखडलेल्या विविध प्रकल्पामधील दिंरगाई, तसेच मुंबई महानगरपालिकेचे रखडलेले प्रकल्प, रस्ते, नालेसाफाई, यामध्ये झालेला गैरव्यहार तसेच मुंबई मेट्रोची रखडलेले कामे आदि विषयावंर दरेकर यांनी सविस्तर आकडेवारी सादर करीत या सर्व विषयांवर सरकारने वस्तुस्थिती सादर करण्याचे आवाहनही दरेकर यांनी केले.

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, “राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे, हत्या, अपहरण, दरोडे, घरफोड्या यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गृहविभागाला या घटनांना आळा घालण्यात अपयश आहे आहे. गृह विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे, अंमली पदार्थ, गुटखा व्यापार, जुगार, मटका या अवैध धंद्यात वाढ झाली आहे, अल्पवयीन मुले, मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झाली असून काही प्रकरणांमध्ये क्रुरतेने कळस गाठला आहे. पुणे येथील पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या तपासात संथगती दिसत असून, डान्सबार, पब, डिस्कोथेक, ऑनलाईन गेमिंग, विशेषत: ऑनलाईन लॉटरीमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यात सरकार अपयशी ठरले आहे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
मनोधैर्य योजनेसाठी 2020 आणि 2021 मध्ये सरकारने योजनेसाठी एक रुपयाचा निधी दिला नाही. 2019 मध्ये 30 हजार रुपयांची प्राथमिक मदत 638 आणि 2020 मध्ये 599 पीडितांना दिली. पुढील 75 टक्के मदत अजूनही पिडितांना मिळालेली नाही असेही दरेकर यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिली.
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण सध्या वाढत असून, पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या शहरात संघटित गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे, वाळू माफियांकडून व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. तसेच मागासवर्गीय समाजावर होणारे हल्ले व त्यांच्यात असुरक्षिततेची भावना वाढतेय, जातीय हिंसाचार व दंगलींचे प्रमाणही या सरकारच्या कारकिर्दीत वाढले असल्याचे स्पष्ट करताना दरेकर यांनी सांगितले की, पोलीस दलातील वाहतुक शाखेमार्फत टोईंग व्हॅनच्या नावाखाली कोट्यवधीचा घोटाळा झाला आहे. तर , राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींवर या सरकारच्या इशा-याने सुडबुध्दीने कारवाई केली जात आहे. आमदारांना गुंडांकडून धमक्या मिळत आहेत तर , अतिरेक्यांशी जमिनीचे व्यवहार करणाऱ्यांना सरकारकडून अभय मिळत आहे, यामुळे महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब जनतेमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनेक मोठ्या व जनउपयोगी प्रकल्पांचे काम रखडलेले आहे. वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार व अनियमिततेची प्रकरणे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. पुनर्विकास प्रकल्पांची कामेही रखडलेली आहेत. मुंबईच्या विविध समस्यांनी उग्र स्वरुप धारण केले आहे. अशी टिका करतानाच दरेकर यांनी स्पष्ट केले की, मुंबईतील विकास कामे रखडलेली आहेत. महानगरपालिकेने गेल्या 10 वर्षात केलेला खर्च व त्यात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत याची श्वेत्रपत्रिका जाहीर करण्याची आवश्यकता आहे. तसेच राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या विभागात भ्रष्टाचार व गैरव्यवहाराची प्रकरणे उघड होत आहेत, जलसंपदा विभागातील निविदांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. आदिवासींच्या खावटी योजनेच्या वस्तू खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.
मुंबईतील खड्डे बुजवण्यावर महानगरपालिकने कोट्यवधीचा खर्च केला तरीही खड्डे समस्या तशीच आहे. नालेसफाईवर कोट्यवधीचा खर्च तरीही दरवर्षी मुंबईची तुंबई होत आहे. रोज दोन जीव लोकल प्रवासात जातात, तरीही राजकीय स्वार्थापायी मेट्रोला खो घातला जात आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांचा बट्टयाबोळ झाला असून त्यामुळे आजही 40 टक्के जनता झोपडीत राहत आहे. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या नावाखाली हजारो कुटुंबांना घरातून बाहेर काढले गेले, आजही त्यांना हक्काची जागा मिळालेली नाही. स्वच्छ मुंबई, हरीत मुंबईचे नारे प्रत्येक निवडणुकीत देऊनही 25 वर्षात मुंबई स्वच्छ झाली नाही. डंम्पिंग ग्राऊंडच्या नावाने प्रकल्पात कोट्यवधीचा खर्च झाला आहे. पण हा प्रश्न सुटला नाही. वन-रुपी क्लिनिकच्या दिलखेचक घोषणा देण्यात आल्या परंतु एक क्लिनिक मुंबईत दिसत नाही, त्यामुळे आणखी किती काळ मुंबईकरांची फसवणूक करणार असा सवालही दरेकर यांनी यावेळी केला.

मढ आयलंड येथील 830 बंगल्याचे बोगस नकाश्यांचा कोट्यवधींचा घोटाळा उघड 102 बंगल्यांचे अनधिकृत बांधकाम-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0

जमावबंदी आयुक्तांमार्फत चौकशी करुन दोषींविरुध्द कारवाई करणार
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि.२७ डिसेंबर- भूमि अभिलेख विभागाच्या 1967 च्या मूळ नकाशांच्या बोगस प्रती तयार करुन पश्चिम उपनगरातील मढ आयलंड येथे नो-डेव्हलपमेंट झोन, सीआरझेड आणि एनअे नियमांचे उल्लंघन करुन दुरुस्तीच्या नावाखाली धनाढ्यांनी नवीन बांधकामे केल्याबाबतच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत केला. भूमि अभिलेख कार्यालय, मुंबई महानगरपालिका व धनदांडगे यांच्या भ्रष्ट साखळीने संगनमत करुन 830 बंगल्याचे बोगस नकाशे तयार केले. यामधून कोट्यवधी रुपयांच्या किंमतीचा घोटाळा झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या उप अधीक्षक, भूमी अभिलेख, अनधिकृत बंगल्यांना सोयीसुविधा देणारे मुंबई महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दरेकरांशी सहमती व्यक्त करुन बोगस नकाशांच्या आधारे 102 अनधिकृत बंगले बांधले गेल्याचे आपल्या उत्तरात कबूल केले. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची जमावबंदी आयुक्तांमार्फत 1 महिन्याच्या आत चौकशी करुन या प्रकरणी जे जबाबदार आहेत, त्या संबंधित दोषींविरुध्द कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही महसुल मंत्री थोरात यांनी दिले.
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून पश्चिम उपनगरातील मढ आयलंड येथील कोट्यवधी रुपयाच्या बोगस नकाशे आणि अनधिकृत बंगले बांधकामाच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. उच्चभ्रू, धनाढय लोक अनधिकृत बंगले बांधून चित्रिकरणासाठी हे बंगले भाडयाने देऊन यामधून कोटयवधी रुपयांची कमाई करण्याचा धंदा सुरु आहे. १९६७ मध्ये सर्वेक्षण करुन नकाशे तयार करण्यात आले होते, त्यापेक्षा वेगळे, बोगस नकाशे तयार करुन नव्याने बांधकामे करण्यात आले, या घोटाळ्यात महानगरपालिका, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व काही धन दांडगे गुंतल्याचा गंभीर आरोपही दरेकर यांनी केला.
या परिसरातील ८३० नकाशे बोगस असल्याचे उघड झाले असून विभागाच्या अधिकृत मूळ अभिलेखात छेडछाड करुन खोट्या नोंदी नोंदवून राज्य सरकार तसेच उच्च न्यायालयाची व मूळ जमीनधारकांची सुनियोजित फसवणूक करण्यात आल्याचेही दरेकर यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिले. या प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमून तातडीने सखोल चौकशी करावी तसेच संबंधित उपअधीक्षक, भूमिअभिलेख व पालिकेचे वॉर्ड ऑफिसरच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणीही दरेकर यांनी केली.

पहिल्याच प्रयत्नात चंदीगड महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचा ऐतिहासिक विजय.

0

एकूण ३५ पैकी १४ जागांवर विजय मिळवून चंदीगड महानगरपालिकेतील आम आदमी पार्टी सर्वाधिक मोठा पक्ष बनला आहे.

मुंबई- आम आदमी पार्टीने आज चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीत अभूतपूर्व विजयी मिळवला आहे. एकुण३५पैकी तब्बल १४ जागा जिंकत आम आदमी पार्टी चंदीगड महानगरपालिकेतील सर्वात मोठा पक्ष बनला. आम आदमीच्या भल्यासाठी काम करण्याच्या पक्षाच्या इच्छेमुळे, समर्पक नागरी समस्यांकडे लक्ष देणारी परिणामाभिमुख धोरणे देण्याच्या क्षमतेमुळे, आप ला भारतभर मिळणाऱ्या प्रचंड सार्वजनिक पाठिंब्याचा हा विजय एक पुरावा आहे. आप हा भारतीय मतदारांसाठी एकमेव धर्मनिरपेक्ष पर्याय आहे.असं वक्तव्य राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि मुंबई प्रभारी प्रीती शर्मा मेनन यांनी केलं आहे.

त्या म्हणाल्या ,’हे सिद्ध झालं आहे की आज आप हा एकमेव राजकीय पक्ष आहे जो भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या उजव्या विचारसरणीच्या विरोधात स्पर्धा करू शकतो आणि जिंकू शकतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सपशेल अपयशी ठरली आहे, कारण तिने वारंवार निवडणुकीतील आश्वासने मागे टाकून आपल्या मतदारांना कमी केले आहे आणि स्वतःला प्रचंड वाद आणि भ्रष्टाचाराने लपेटून घेतले आहे. आम आदमी पक्षाच्या संपूर्ण भारतातील वाढीमागे सार्वजनिक समर्थन झपाट्याने वाढल्याने, आम्हाला खात्री आहे की बीएमसी २०२२ निवडणुकीत मध्ये आप बहुमताने विजयी होईल. एकमात्र पक्ष कारण आप हा एकमात्र पक्ष आहे ज्याने सिद्धपणे चांगले प्रशासन दिले आहे, परिणामाभिमुख होण्याचा मार्ग मोकळा केला आहे, राजकारण आणि नागरिकांप्रती उत्तरदायीत्व क य असते हे आपल्या कार्यातून वारंवार स्पष्ट केलं आहे.”

आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांचा विरोध, अध्यक्ष पदाची निवडणूक आणखी लांबणार?

0

मुंबई-आवाजी मतदानाने निवडणूक घटनाबाह्य असल्याची भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा असताना हे वृत्त आल्याने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. आता यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान आज संध्याकाळपर्यंत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेविषयी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून उत्तर दिलेले आहे. राज्यपाल म्हणाले आहेत की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलची प्रक्रिया घटनाबाह्य आहे. म्हणजेच आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र पाठवत शिफारस केली होती. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत दोन पत्रे पाठवली. मात्र राज्यपालांनी वेगवेगळी कारणे दिली आहेत. यानंतर आता मुख्यमंत्री तिसऱ्यांदा राज्यपालांना पत्र पाठवणार आहेत.राज्य सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल केला होता. यापूर्वी गुप्त मतदानाने ही निवडणूक घेतली जात होती. मात्र, सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदललेला होता. आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याने तो घटनाबाह्य आहे असे राज्यपाल म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी घेतली होती राज्यपालांची भेट
महाविकास आघाडी सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. यानुसार सोमवारी या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार होता. तर मंगळवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही निवडणूक पार पडणार अशी शक्यता होती. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून निवडणूक कार्यक्रमाला मंजूरी देण्यात आलेली नाही. यासाठी महाविकासआघाडीतील नेते रविवारी राज्यपालांना भेटले होते. मात्र, राज्यपालांनी मी कायेदशीर अभ्यास करुन निर्णय देईल असे उत्तर दिले होते. यानंतर आज त्यांनी पत्र पाठवत राज्य सरकारला उत्तर दिले आहे. यामध्ये त्यांनी आवाजी मतदानास विरोध केला आहे.

कालीचरण यांच्यावर रायपूरमध्ये काँग्रेसने दाखल केला गुन्हा, ढोंगी बाबा हाय-हायच्या दिल्या घोषणा

0

रायपुर –

रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत गांधीजींचा अपमान करणाऱ्या तथाकथित संत कालीचरण यांच्यावर रायपूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम यांनी ‘ढोंगी बाबा हाय..हाय…’च्या घोषणा दिल्या.कालीचरण यांच्यावर IPC च्या अजामीनपात्र कलम 505(2) अंतर्गत शांतता भंग करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह विधाने करणे, समुदायांबद्दल द्वेष निर्माण करणे आणि कलम 294 अंतर्गत अश्लील अपमानास्पद भाषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सिव्हिल लाइन्सचे CSP वीरेंद्र चतुर्वेदी यांनी सांगितले की, मोहन मरकम यांचा अर्ज पोलिस ठाण्यात कारवाईसाठी पाठवण्यात आला आहे. इकडे, वादग्रस्त विधान केल्यानंतर लगेचच कालीचरण महाराष्ट्रात रवाना झाले.कालीचरण यांच्यावर FIR दाखल करण्यासाठी आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मरकाम म्हणाले, गांधींचा अपमान हा देशाचा अपमान आहे. रविवारी रात्री उशिरा सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या महापालिकेचे अध्यक्ष प्रमोद दुबे यांच्या अर्जाच्या आधारे टिकरापारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


रायपूरमध्ये दोन दिवस चाललेल्या धर्मसंसदेचा समारोपाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. रावणभट मैदानावर आयोजित या कार्यक्रमात मध्य प्रदेशातील भोपाळजवळील भोजपूर मंदिरात शिव तांडव स्त्रोत्र गाऊन प्रसिद्ध झालेल्या संत कालीचरण यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. कालीचरण मंचावर आले आणि त्यांनी प्रथम शिव तांडवा स्त्रोत्र गायले.

एमसीए’विरुद्ध आता साखळी उपोषण

0

बेकायदेशीर निवडणुकाविरुद्ध आंदोलनाची तीव्रता वाढविणार

पुणे : माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) बेकायदेशीर निवडणुकांविरुद्ध मागील सात दिवसांपासून आमरण उपोषण केले. त्यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला. त्यांना मिळणारा पाठिंबा लक्षात घेता आता हे उपोषण साखळी पद्धतीने सुरू होणार आहे. अनेकांनी ‘एमसीए’ विरोधातील आंदोलनात उडी घेतली आहे. पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन  विजय प्रकाश ढेरे यांनी  साखळी उपोषणाची सुरुवात केली आहे. 
अनिल वाल्हेकर म्हणाले, ‘महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची कार्यकारिणी चुकीची आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च न्यायालय नियुक्त समितीने त्यांची २०१९ ते २०२२ या कालावधीसाठी झालेली निवडणूक रद्दबातल ठरवली आहे. यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी ‘चेंज रिपोर्ट’ बदलून निवडणूक घटनेनुसार असल्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत.’ या विरोध वाल्हेकर हे मागील सात दिवसांपासून आमरण उपोषण करीत होते. त्यांना माजी रणजीपटू सुभाष रांजणे, मिलिंद गुंजाळ, महाराष्ट्राचे माजी कर्णधार शंतनु सुगवेकर, रॅन्डाॅल्फ डॅनियल, राहुल कानडे, प्रसाद कानडे, रणजित खिरिड, श्रीकांत काटे, युवराज कदम, पूना क्लबचे पदाधिकारी अभिषेक बोके, नितीन कोकाटे, स्टेडियम क्लबचे संस्थापक भारत मारवाडी, आनंद केदारी  यांच्यासह राज्यभरातील आजी-माजी खेळाडूंनी पाठिंबा दर्शविला आहे. त्याचबरोबर अनेक पालक, क्रिकेटप्रेमी त्यांच्या भेटीला आले. 
त्याचसोबत अनेकांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या संघ निवडीत कसा दुजाभाव केला जातो, हेदेखील निदर्शनासह आणून दिले. धनकवडीतील अश्विनीकुमार जोशी यांनी प्रसिद्धी माध्यमांना पत्र लिहून संघनिवडीबाबत आक्षेप नोंदविला आहे. जोशी म्हणाले, ‘एमसीएकडून महाराष्ट्रातील प्रतिभावान क्रिकेटपटूंवर अन्याय होत आहे. आता आगामी विजय मर्चंट, रणजी करंडक, २५ वर्षांखालील स्पर्धांसाठी तरी एमसीएकडून सदोष संघ निवड होईल, का मुद्दा आहे. निवडणुकीच्या गैरकारभाराबाबत वाल्हेकर यांनी उभारलेल्या लढ्याला माझा पाठिंबा आहे.

जलशक्ती अभियान अंमलबजावणी नोडल अधिकारी म्हणून जिल्हा जलसंधारण अधिकारी

0

पुणे, दि. 27 : जागतिक जल दिवसाचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ हे देशव्यापी अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाची जिल्ह्यात 20 डिसेंबर रोजी सुरुवात करण्यात आली असून त्याची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जलशक्ती अभियानांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आदिवासी विकास विभाग, कृषी विभाग, नगर विकास, भूजल सर्वेक्षण आणि विकास विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वने विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वयाने जलशक्ती अंतर्गत कामे करण्यात येणार आहेत. अभियानाद्वारे पावसाच्या पाण्याचे संधारण करून भूजल पातळीत वाढ करण्याचे नियोजित आहे.

पावसाची अनियमितता लक्षात घेता जास्तीत जास्त पाणी स्थानिक पातळीवरच अडवून जिरविण्यासाठी प्राधान्य देण्याच्यादृष्टीने व त्याचे प्रबोधन करण्यासाठी जलशक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. पर्जन्य जल पुनर्भरणासाठी (रेन वॉटर हार्वेस्टिंग) बांधकाम व दुरुस्तीतून जास्तीत जास्त पाणी साठविण्यासाठी या मोहिमेद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती श्रीमती हांडे यांनी दिली आहे.

सध्या अस्तित्वातील जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन, नूतनीकरण करणे व जलसंधारणाच्या विविध उपचारांद्वारे जलसाठा तयार करणे व ते अडवून जमिनीत जिरवणे व भूजल पातळीत वाढ करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेंतर्गत साध्य केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व जलाशयांचे जिओ टगिंग करून एकत्रित माहिती संकलित करण्याचे देखील नियोजन असल्याचे यांनी माहिती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे, दि. 27 : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

२०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षाच्या कोरोना-१९ च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये शैक्षणिक संस्था, महाविद्यालये प्रत्यक्ष बंद असल्या तरी ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण सुरू होते. या कालावधीत ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण पूर्ण केले आहे अशा विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षणासाठी सहामाही ७५ टक्के उपस्थितीचे संस्था, महाविद्यालयाचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे, असेही श्रीमती डावखर यांनी कळविले आहे.