पुणे- पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे जाणे अनेकांना हेलावून गेले . सोशल मिडीयावर सिंधूताईंच्या मायेबद्दल स्पष्ट चित्र दिसते आहे . राजकारणी हि त्यातून सुटले नाहीत आणि संघर्ष करत पुढे वाटचाल करणारे विविध क्षेत्रातील तरुण हि सिंधुताई यांच्यावरील माया व्यक्त केल्या शिवाय राहू शकलेले नाहीत , पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनीही आल्या आठवणींचा खजिना समोर मांडला आणि मग ‘ अशी माय होणे नाही ‘ असे उद्गारही काढले ,तर कधी परतून येशील माये अशी साद हि प्रतिक्रिया व्यक्त करताना घातली . पहा मानकरांच्या शिदोरीतील लेकरांची माय कशी धैर्याची साय बनलेली हि दिसून येते …
देशातील समाजसुधारक व महामानवांच्या यादीत अण्णाभाऊंचे नाव नाही : कॉंग्रेसकडून निषेध
पुणे- देशातील समाजसुधारक आणि महामानवांच्या यादीत अण्णाभाऊ साठेंचे नाव नसल्याचे निदर्शनास येताच या प्रकारचा तीव्र शब्दात पुणे शहर कॉंग्रेस ने निषेध केला आहे.
या संदर्भात शहर कॉंग्रेसच्या वतीने प्रसिद्धीस पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि ,’केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर फॉऊंडेशनच्या वतीने देशातील व राज्यातील थोर समाजसुधारक व महामानवांची एक यादी तयार केलेली असते. त्या यादीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव नाही. या थोर महामानवांच्या जयंतीला फॉऊंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत सुद्धा केली जाते. जेव्हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या फॉऊंडेशनच्या अण्णाभाऊ साठे यांचे नाव नाही, ही बातमी जेव्हा माजी आमदार सुधाकर भालेराव यांना समजली तेव्हा त्यांनी त्यासंदर्भात फॉऊंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी यांना पत्र लिहून खंत व्यक्त केली की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव त्या यादीत समाविष्ट करावे.अण्णाभाऊ साठे हे थोर समाजसुधारक होते,ज्येष्ठ साहित्यिक, लेखक होते.त्यांच्या अनेक साहित्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी अशा समाजसुधारकाचे नाव यादीत नसणे संतापजनक आहे। मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो.केंद्रात भाजपचे शासन आहे. भाजपच्या लोकांना, नेत्यांना देशाचा खरा इतिहास माहीत नाही.खोटा इतिहास सांगून लोकांना हे लोक भ्रमित करत आहेत.मी या निवेदनाद्वारे केंद्र सरकारला आवाहन करतो की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव या यादीत समाविष्ट करून त्यांच्या कार्याचा सन्मान करावा. अन्यथा मातंग समाज व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
‘अनाथांच्या माये”ला शासकीय इतमामात दुखःद अंतकरणाने अखेरचा सलाम (व्हिडीओ)
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील ठोसर पागा याठिकाणी महानुभाव पंथानुसार अंत्यसंस्कार
पुणे- अनाथ, निराधार जीवांना आपल्या मायेच्या पदराखाली घेत आधार देणाऱ्या आणि त्यांची ‘माय’ झालेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ (७४) यांचे काल मंगळवारी रात्री 8 वाजून दहा मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील ठोसर पागा येथे आज दुपारी 12 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर महानुभाव पंथीयांच्या प्रथेनुसार आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनीही स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली.स्वर्गीय सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.
जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री 8 वाजून दहा मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई गेल्या दीड महिन्यापासून गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, उपचार सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
‘मुलांची परवड होऊ देऊ नका, त्यांना नीट सांभाळा’
‘माझी मुलं कशी आहेत, त्यांना व्यवस्थित सांभाळा. त्यांची परवड होऊ देऊ नका.!’ हे माईंचे अखेरचे उद्गार. शेवटपर्यंत ती मुलांचाच विचार करीत होती. तीन दशके सोबत काम करणाऱ्या सिंधुताईंच्या मानसकन्या कीर्ती वैराळकर यांनी आपल्या लाडक्या ‘माई’विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या .
‘मी माईंसोबत ३० वर्षांपासून काम करते आहे. त्यांनी अत्यंत कष्टातून राज्यातील विविध भागात संस्थात्मक कामे उभी केली आहेत. मांजरी येथील आश्रमात शंभर मुले आहेत. सासवड येथील ममता बालिकाश्रमात शंभर मुली राहतात. शिवाय वर्धा येथे ३५० गाईंचा सांभाळ करण्यासाठी गोशाळा आहे. शिरूरला संस्था आहे. त्यांनी संपूर्ण जीवनभर लेकरांच्या पुनर्वसनासाठी कष्ट केले. मंगळवारी दुपारी अडीच वाजता मृत्यू ओढवणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळेच त्यांनी ‘माझी मुलं कशी आहेत..? त्यांचा नीट सांभाळ करा, त्यांना काही कमी पडू देऊ नका. त्यांची काळजी घ्या. मुलांकडे लक्ष ठेवा..!’ असेच उद्गार काढले.
माईंच्या अखेरच्या क्षणी ममता दिदींसह माईंचे सर्व सहकारी सोबत होते. त्यांचे अकाली जाण्याने आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काहीच सुचेनासे झाले आहे. माई देहाने जरी आमच्यात नसल्या तरी त्यांनी उभे केलेल्या कार्याच्या रूपाने सातत्याने आमच्यातच राहणार आहेत. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळतच राहणार आहे. त्यांची प्रेरणा पाठिशी राहणार आहे. त्यांनी सुरू केलेले कार्य आम्ही अविरतपणे सुरूच ठेऊ.
समाजातील हजारो अनाथांच्या डोक्यावर मायेची पखरण करणारं मातृछत्र हरपलं -उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 4 :- ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, सिंधुताई सपकाळ यांनी समाजातल्या हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला, त्यांना शिक्षण देऊन आपल्या पायावर उभे केले, त्यांना मायेची सावली दिली. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करत, त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. आयुष्यभर संघर्ष, कष्ट करत त्यांनी सामाजिक कामाचा वसा जपला. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथांचे मातृछत्र हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
‘अनाथांची माय’हरपली ..पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे निधन
पुणे- अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं आज येथे दुःखद निधन झालं.त्यांच्या निधनाची बातमी येताच सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. तसेच त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली जात आहे.पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २४ डिसेंबर रोजी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.दरम्यान, सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. पण अखेरीस त्यांचे दुःखद निधन झाले.. सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री किताब जाहीर झाला. मध्यंतरी त्यांना पद्मश्रीने गौरविण्यात आलं होतं.२०११साली सिंधूताईंना सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तेव्हापासून त्यांचं ‘सलाम पुणे ‘शी स्नेहपूर्ण नातं होतं.

सिंधुताईंचा खडतर प्रवास…
आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे लहानपणी सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर देखील त्यांचा संघर्ष संपला नाही. त्यांना घर सोडावे लागले. गोठ्यात मुलीला जन्म द्यावा लागला. रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकावर त्यांना भीक मागावी लागली. स्वतःला आणि मुलीला जगविण्याचा त्यांचा पुन्हा संघर्ष सुरू झाला. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईनी आपल्या जीवनाचे धडे घेत महाराष्ट्रात अनाथांसाठी सहा अनाथाश्रम स्थापन केले त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला.
त्यांच्यामार्फत चालविल्या जाणार्या संस्थांनी असहाय्य आणि बेघर महिलांना मदत केली. आजवर सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.”मी सिंधुताई सपकाळ” या सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित चित्रपटाची ५४ व्या लंडन चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियरसाठी निवड करण्यात आली होती.
सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे –
- बाल निकेतन हडपसर, पुणे
- सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
- अभिमान बाल भवन, वर्धा
- गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
- ममता बाल सदन, सासवड
- सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे
अष्टविनायक विकास आराखड्याबाबत पर्यटन मंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. 4 : अष्टविनायक विकास आराखड्याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीला पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह उपस्थित होत्या.
पर्यटन मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, नोडल एजन्सीमार्फत पर्यटनविषयक कामाला प्राधान्य देवून प्राथमिक स्वरुपातील जमीन, रस्ते, बसस्टॉप, वीज, पाण्याची टाकी, माहितीफलक, स्वागत कमानी, विद्युतीकरण या पायाभुत सुविधा पर्यटनस्थळी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. अष्टविनायक ट्रस्टला विश्वासात घेवून काम करावे. तसेच अष्टविनायक आराखडा निधीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
राज्यमंत्री कु आदिती तटकरे म्हणाल्या, अष्टविनायकसंदर्भातील दोन प्रस्ताव नियोजित आहेत. यापैकी मुलभूत सुविधा देण्यासंदर्भात 115 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दुसरा प्रस्ताव सुशोभिकरण, व्हीआयपी पास, उपहारगृह, यात्री निवास, वाहनतळ, भक्तनिवास याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रस्तावासाठी 130 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. या आराखड्यासाठी ऐकूण 245 कोटी रुपये प्रस्तावित आहेत. ‘प्रसाद’ योजनेंतर्गत अनेक कामे प्रस्तावित असून या कामाला एक ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. नवीन कामांचे प्रस्ताव आले आहेत याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री कु.तटकरे यांनी यावेळी दिले.
पर्यटन विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने पर्यटन, नगरविकास, ग्रामविकास या विविध विभागाकडून प्रभावी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री कु. तटकरे यांनी यावेळी दिल्या.
झोजी खिंड ठेवली डिसेंबरनंतरही खुली
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2022
सीमा रस्ते संघटनेने (BRO) ने 11,649 फूट उंचीवर असलेल्या झोजिला खिंडीचा प्रवेश सुगम्य करत पुन्हा एकदा उत्कृष्टतेचा मापदंड उंचावला आहे, जो लडाख या केंद्रशासित प्रदेशाला देशाच्या इतर भागाशी जोडतो. प्रथमच झोजी खिंड 31 डिसेंबरनंतरही वाहतुकीसाठी खुली राहिली आहे.
विजयक आणि बीकन या आघाडीच्या प्रकल्पांद्वारे सीमा रस्ते संघटनेने हे यश संपादन केले. लडाखच्या सामाजिक-आर्थिक कल्याणाबरोबरच धोरणात्मक परिणाम असणारी रेषा राखण्यासाठी ही खिंड खुली असण्याचा कालावधी महत्वाचा आहे. मागच्या वर्षी 31 डिसेंबर 2020 पर्यंत ही खिंड खुली असण्याचा कालावधी वाढवण्यात आला होता, सीमा रस्ते संघटनाशांतपणे मात्र निश्चितपणे अत्याधुनिक उपकरणांसह आणखी काही बर्फ हटवून नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.
लडाख केंद्रशासित प्रदेश प्रशासन आणि स्थानिकांनी या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. या अतिरिक्त कालावधीमुळे केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या लॉजिस्टिक व्यवस्थेवरील भार कमी झाला शिवाय स्थानिक रहिवाशांना कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी अतिरिक्त धान्यसाठा आणि इतर सामुग्रीचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने मदत झाली .
2022 च्या पहिल्या तीन दिवसांत, बीआरओ आणि पोलिस कर्मचार्यांच्या सामूहिक मदतीमुळे सुमारे 178 वाहने या खिंडीतून प्रवास करू शकली आहेत. अशा प्रकारे, बर्फ साफ करण्याव्यतिरिक्त, रस्ता वाहतुकी -योग्य ठेवण्यासाठी दररोज देखभाल ठेवावी लागते, जी बीआरओच्या कर्मयोगींच्या अथक आणि निस्वार्थ प्रयत्नांमुळे साध्य होते आहे.


प्रसारमाध्यमातील अहवाल चुकीचा आणि दिशाभूल करणारा -केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा खुलासा
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2022
केंद्राने आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज टप्पा-II अंतर्गत केवळ 26.14% निधी जारी केल्याचा दावा करणारा प्रसारमाध्यमातील अहवाल चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे.केंद्र सरकारने प्रसारमाध्यमातील बातम्यांमध्ये केलेल्या दाव्यानुसार 26.14% नव्हे तर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी राखून ठेवलेल्या निधीपैकी 50% निधी जारी केला आहे.एका वृत्तवाहिनीने अलीकडेच दावा केला आहे की केंद्र सरकारने केवळ 26.14% ECRP-II अर्थात आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज टप्पा-II निधी राज्यांना वितरित केला आहे. वृत्त वाहिनीने पुढे दावा केला आहे की केंद्राने नोव्हेंबर 2021 पर्यंत निधी वितरित केला आहे आणि राज्यांनी मंजूर निधीपैकी 60% निधी वापरला आहे. बातमीतील अहवाल चुकीचा आहे आणि दावे खोटे, दिशाभूल करणारे आणि चुकीच्या तथ्यांवर आधारित आहेत.असे केंद्रीर आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे
पुढे असेही म्हटले आहे कि ,’मंत्रिमंडळाने 8 जुलै 2021 रोजी “भारत कोविड-19 आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज टप्पा-II” (ECRP-फेज-II) ला मंजूरी दिली. 1 जुलै 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत 23,123 कोटी रुपये किमतीची (केंद्रीय हिस्सा – 15,000 कोटी रुपये आणि राज्याचा हिस्सा – 8,123 कोटी रुपये) ही योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना काही केंद्रीय क्षेत्र (CS) घटकांसह एक केंद्र पुरस्कृत योजना (CSS) आहे.
योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच, केंद्र सरकारने कृतीशील उपाययोजना केल्या आणि 22/07/2021 रोजी राज्य/केंद्रशासित प्रदेशांना केंद्राच्या वाट्यापैकी 15% निधी जारी केला. निधीचा दुसरा हप्ता ऑगस्ट 2021 मध्ये राज्यांना आगाऊ म्हणून लवकरच जारी करण्यात आला. 24 ऑगस्ट 2021 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) द्वारे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना एकूण 6075.85 कोटी रुपये (केंद्रीय वाटा 50%) आधीच जारी केले गेले आहेत. राज्यनिहाय जारी करण्यात आलेला केंद्रीय वाटा आणि आजपर्यंतचा खर्च परिशिष्ट I मध्ये पाहता येईल.
वृत्तवाहिनीच्या अहवालात अनेक तथ्यात्मक त्रुटी आहेत.
केंद्र सरकारने प्रसारमाध्यमातील बातम्यांमध्ये केलेल्या दाव्यानुसार 26.14% नव्हे तर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी राखून ठेवलेल्या निधीपैकी 50% निधी जारी केला आहे.
सर्व निधी बातमीत दावा केल्यानुसार नोव्हेंबर 2021 मध्ये नव्हे तर 24 ऑगस्ट 2021 पर्यंत जारी केला गेला.
केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या 6075.85 कोटी रुपये निधीपैकी, बातम्यांच्या अहवालात दावा केल्यानुसार 60% नव्हे तर 1679.05 कोटी रुपये, (म्हणजे 27.13%), राज्यांनी 31/12/21 पर्यंत खर्च केले आहेत.
उर्वरित निधी आधीच जारी केलेल्या किमान 50% निधीच्या प्रगती आणि वापराच्या आधारावर राज्यांना दिला जाईल. प्रत्यक्ष प्रगती आणि खर्च या दोन्हीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दैनंदिन निरीक्षण केले जात आहे.
Annexure I
ECRP-II Financial Progress (Source: NHM-PMS Portal) (As on 3rd January 2022)
| S. No. | Name of the State / UT | Amount Approved (Rs. In Crore) | Funds Available with State/UT (Rs. In Crore) | Expenditure (Rs. In Crore) | % Expenditure | State Share Released to SHS (Y/N) |
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6=5/4 | 8 |
| 1 | Andaman & Nicobar Islands | 14.23 | 7.11 | 0.00 | 0.00% | NA |
| 2 | Andhra Pradesh | 662.09 | 348.26 | 66.88 | 19.20% | Y |
| 3 | Arunachal Pradesh | 118.50 | 70.97 | 1.16 | 1.64% | Y |
| 4 | Assam | 657.03 | 387.48 | 1.47 | 0.38% | Y |
| 5 | Bihar | 1,368.70 | 860.72 | 160.62 | 18.66% | Y |
| 6 | Chandigarh | 5.68 | 2.84 | 0.79 | 27.77% | NA |
| 7 | Chhattisgarh | 626.60 | 188.03 | 25.65 | 13.64% | N |
| 8 | DNH & DD | 9.38 | 4.76 | 0.82 | 17.17% | NA |
| 9 | Delhi | 50.34 | 25.17 | 34.92 | 138.74% | Y |
| 10 | Goa | 17.51 | 9.82 | 0.03 | 0.35% | Y |
| 11 | Gujarat | 661.99 | 323.98 | 78.94 | 24.37% | Y |
| 12 | Haryana | 272.71 | 152.02 | 91.41 | 60.13% | Y |
| 13 | Himachal Pradesh | 203.87 | 120.29 | 11.95 | 9.94% | Y |
| 14 | Jammu & Kashmir | 211.04 | 128.82 | 3.14 | 2.44% | NA |
| 15 | Jharkhand | 569.81 | 319.45 | 0.00 | 0.00% | Y |
| 16 | Karnataka | 831.80 | 420.03 | 2.57 | 0.61% | Y |
| 17 | Kerala | 267.35 | 144.90 | 30.20 | 20.84% | Y |
| 18 | Ladakh | 34.51 | 31.26 | 2.32 | 7.41% | NA |
| 19 | Lakshadweep | 1.50 | 0.50 | 0.00 | 0.00% | NA |
| 20 | Madhya Pradesh | 1,447.51 | 728.62 | 192.39 | 26.40% | Y |
| 21 | Maharashtra | 1,294.69 | 683.98 | 2.22 | 0.32% | Y |
| 22 | Manipur | 78.07 | 38.67 | 3.00 | 7.76% | N |
| 23 | Meghalaya | 79.65 | 42.37 | 1.42 | 3.34% | Y |
| 24 | Mizoram | 44.30 | 1.66 | 0.00 | 0.00% | N |
| 25 | Nagaland | 62.46 | 28.11 | 0.00 | 0.00% | N |
| 26 | Odisha | 807.33 | 430.98 | 55.09 | 12.78% | Y |
| 27 | Puducherry | 7.18 | 4.52 | 0.84 | 18.52% | Y |
| 28 | Punjab | 330.94 | 165.73 | 144.93 | 87.45% | Y |
| 29 | Rajasthan | 1,472.28 | 708.33 | 34.00 | 4.80% | Y |
| 30 | Sikkim | 18.80 | 9.98 | 0.00 | 0.00% | Y |
| 31 | Tamil Nadu | 798.94 | 399.66 | 325.58 | 81.46% | Y |
| 32 | Telangana | 456.08 | 229.34 | 42.83 | 18.68% | Y |
| 33 | Tripura | 87.33 | 46.51 | 0.60 | 1.29% | Y |
| 34 | Uttar Pradesh | 2,690.07 | 939.94 | 87.05 | 9.26% | N |
| 35 | Uttarakhand | 254.78 | 135.86 | 8.54 | 6.28% | Y |
| 36 | West Bengal | 983.97 | 503.82 | 267.69 | 53.13% | Y |
| TOTAL | 17,499.00 | 8,644.49 | 1,679.05 | 19.42% |
22 कोटी रुपये मूल्याच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघड ; दोन व्यापाऱ्यांना अटक
मुंबई, 4 जानेवारी 2022
मुंबई झोनच्या ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 22 कोटी रुपयांचे जीएसटी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघडकिस आणले आहे. सेंट्रल इंटेलिजेंस युनिट, मुंबई सीजीएसटी झोन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत अधिकाऱ्यांनी याप्रकरणी दोन व्यावसायिकांना अटक केली आहे जे वडील आणि मुलगा आहेत. मेसर्स शाह एंटरप्रायझेस आणि मेसर्स यूएस एंटरप्रायझेस या दोन वेगळ्या फर्मचे ॲाफिस कांदिवली पश्चिम, मुंबई येथे आहे. दोन्ही कंपन्या फेरस वेस्ट आणि भंगार इत्यादींच्या व्यापारासाठी जीएसटीमध्ये नोंदणीकृत आहेत. 11.80 कोटी रुपये आणि 10.23 कोटी रुपयांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेउन त्यांना मंजूर करण्याच्या प्रक्रियेत या व्यक्ती गुंतल्या होत्या. सीजीएसटी कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा प्राप्त न करता बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट हे बनावट संस्थांकडून मिळवून ईतर नेटवर्कच्या संस्थांना देत होत्या.
या दोघांना सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत कलम 132(1)(b) आणि (c) चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करून मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लनेड, मुंबई यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
प्रामाणिक करदात्यांना अनुचित स्पर्धा निर्माण करणाऱ्या आणि योग्य कर न भरून फसवणूक करणाऱ्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट नेटवर्कचा बंदोबस्त करण्यासाठी सीजीएसटी मुंबई झोनने ही कारवाई सुरू केली होती. येत्या काही दिवसांत फसवणूक करणाऱ्या आणि करचोरी करणाऱ्यांविरुद्धची मोहीम विभाग अधिक तीव्र करणार आहे अशी माहिती ठाणे आयुक्तालयाचे सीजीएसटी आणि उत्पादन शुल्क आयुक्त राजन चौधरी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
एमबीबी विमानतळ आता दरवर्षी 30 लाख प्रवाशांना सेवा देईल
अत्याधुनिक विमानतळ त्रिपुराच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवेल
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजा बीर बिक्रम (MBB) विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री त्रिपुरा ग्राम समृद्धी योजना आणि 100 विद्याज्योती शाळा प्रकल्प मोहीम ,यासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभही त्यांनी केला. यावेळी त्रिपुराचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया आणि प्रतिमा भौमिक उपस्थित होते.

नवीन अत्याधुनिक टर्मिनलच्या उद्घाटनामुळे त्रिपुराच्या गौरवशाली इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला असल्याचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी यावेळी सांगितले. एकात्मिक टर्मिनल हे पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे आणि दृढनिश्चयाचे उदाहरण आहे. यामुळे राज्य आणि ईशान्य प्रदेशात विकासाची नवी कवाडे खुली होतील, असे ते म्हणाले.
10,000 चौरस मीटर क्षेत्रफळाचा आगरतळा विमानतळ आता 30,000 चौरस मीटरपर्यंत विस्तारला असून त्रिपुराचा सांस्कृतिक वारशाचे दर्शन त्यातून घडेल. महाराजा बीर बिक्रम विमानतळ आता वर्षाला 13 लाखांऐवजी 30 लाख प्रवाशांना सेवा देऊ शकेल. केंद्र सरकारच्या कृषी उडान 2.0 योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2021 मध्ये 4500 किलो कृषी उत्पादनांची निर्यात करण्यात आली आहे. यात त्रिपुरातील अननस आणि फणसाचा समावेश आहे.
आगरतळा विमानतळ त्रिपुराच्या राजधानीत स्थित ईशान्य भागातील प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. 4C प्रकारचे विमान कार्यन्वयन हाताळण्याची त्याची क्षमता आहे. इंडिगो, एअर इंडिया, फ्लायबिग या सारख्या विमानकंपन्या इथून सध्या कोलकाता, दिब्रुगढ , गुवाहाटी, इंफाळ, शिलॉन्ग, लेंगपुई, बंगळुरू आणि दिल्ली या ठिकाणांसाठी आठवड्याला 230 उड्डाणे चालवत आहेत.
उपलब्ध प्रमुख सुविधा:
- धावपट्टी (18/36) परिमाणे – 2286m x 45m
- विमान पार्क करण्यासाठी (ऍप्रन)संख्या 04. C प्रकार A-321 आणि 1 क्र. एका वेळी ATR-72 प्रकारचे विमान.
- टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 10725 चौ. मी. 500 प्रवासी हाताळण्यासाठी (250 आगमन + 250 निर्गमन) 1.3 दशलक्ष प्रवासी वार्षिक क्षमतेसह (MPPA).
- एनएव्ही/कॉम.साधने, जसे की ,विमान अवतरण यंत्रणा (ILS), डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओम्नी रेंज (DVOR) इत्यादी उपलब्ध.
- CAT-VII चे ATC नियंत्रण टॉवर तथा तांत्रिक कक्ष आणिअग्निक्षमन स्थानक .
- रात्री विमान उतरवण्याची सुविधा.
- नवीकरणीय ऊर्जेसाठी 2 मेगा वॅट सौर पॅनेल
30,000 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत पूर्ण झाली असून [गर्दीच्या कालावधीत ] 1200 पीक अवर पॅसेंजर (PHP) हाताळण्याच्या क्षमतेसह वार्षिक क्षमता 3 MPPA आहे. A-321 प्रकारच्या विमानांसाठी 6 अतिरिक्त पार्किंग मार्गांसाठी एप्रन. नवीन टर्मिनल इमारत (जीएसटी वगळता) 450 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आली आहे .
वारसा: स्थानिक सांस्कृतिक / वास्तुशास्त्रीय प्रेरणा
a. इमारतीचे गतिमान आणि प्रतिष्ठित स्वरूप त्रिपुरा राज्याच्या डोंगराळ प्रदेशातून प्राप्त झाले आहे.
b. टर्मिनल इमारतीच्या दर्शनी भागात फुलांच्या नक्षीकामातून बांबूची वास्तुकला या प्रदेशातील जंगले आणि हिरवळीचे चित्रण करणारी आहे .
c. उनाकोटी टेकड्यांवरील स्थानिक आदिवासी दगडी शिल्पे आणि बांबूच्या स्थानिक हस्तकलेचा आतील भागात मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.
d. इमारतीच्या आतील भागात कलाकृती आणि शिल्पांद्वारे स्थानिक संस्कृती आणि वास्तुकलाचे चित्रण केले गेले आहे.
आगरतळा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची छायाचित्रे

टर्मिनल बिल्डिंग- शहराच्या बाजूचे दृश्य

परिसरातील फूड कोर्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. ४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेकरिता सन २०२०-२१ व २०२१-२२ मधील पात्र विद्यार्थ्यांनी स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण अर्ज इतर कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर यांच्याकडे २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असणाऱ्या परंतू, प्रवेश न मिळालेल्या तसेच भाडेतत्वावर राहत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामधील प्रवेशित मुलां-मुलीप्रमाणे भोजन भत्ता, निवास भत्ता, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत नियमानुसार पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रती वर्षी 60 हजार इतकी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट शासनामार्फत जमा करण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण भरलेला अर्ज इतर कागदपत्रांसह २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पाठवावा, असे आवाहन समाधान इंगळे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
देहू नगरपंचायत कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये निर्बंध लागू
पुणे दि.4: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील नवनिर्मित देहू नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेअंतर्गत 13 प्रभागांसाठी मतदान झाले असून 18 जानेवारी रोजी उर्वरित 4 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत व निर्भय वातारवणात पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी 19 जानेवारीपर्यंत देहू नगरपंचायत कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र निवडणूक आयोगाने नुकताच राज्यातील नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये नवनिर्मित देहू नगरपंचायतीची निवडणूकही जाहीर झाली असून 13 प्रभागांसाठी मतदान झाले असून 18 जानेवारी रोजी उर्वरित प्रभागांसाठी मतदान होणार आहे. 19 जानेवारी रोजी 17 प्रभागांची मतमोजणी होणार आहे. निवडणूक आचारसंहिता 28 डिसेंबरपासून सुरु झाली असून निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत (19 जानेवारी 2022) राहणार आहे.
देहू नगरपंचायत कार्यक्षेत्रात शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालगत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विरूपता करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी संबंधीत पक्षाची चित्रे, चिन्हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
निवडणूक कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसिल कार्यालये, सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृह याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मिरवणूक काढणे, मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे तसेच कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे व गाणी म्हणणे आदी तसेच कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
प्रचारादरम्यान कोणत्याही वाहनांच्या ताफ्यामध्ये ५ पेक्षा जास्त मोटारगाड्या अथवा वाहने वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. संरक्षण वाहनांच्या ताफ्यासह केंद्र किंवा राज्य शासनाचे मंत्री किंवा उच्च पदस्थ व्यक्ती घेवून जात असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेविषयी लागू असलेल्या आदेशास अधिन राहून हा आदेश अमलात राहिल व शासकीय कामावर असलेल्या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही.
कोणतीही व्यक्ती, संस्था, पक्ष कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपकाचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. तसेच फिरते वाहन रस्या पवरून धावत असताना ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. ध्वनीक्षेपकाचा वापर सकाळी ६ वाजता पुर्वी व रात्री १० वाजल्यानंतर करता येणार नाही.
निवडणूक कालावधीत सर्व धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापित करता येणार नाहीत, असेही पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
भक्त निवास परिसरातही कलम 144 लागू
देहू नवनिर्मीत नगरपंचायतीचे उर्वरीत ४ प्रभागांचे नामनिर्देशन प्रक्रियेचे कामकाज देहूगाव येथील वैकुंठ गमन मंदिराशेजारील भक्त निवास येथे चालणार आहे. हे कामकाज सुरळीतपणे व शांततेत पार पाडण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासोबतच सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व उपद्रव टाळण्यासाठी भक्त निवासाच्या २०० मीटर परिक्षेत्रात १० जानेवारी २०२२ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
त्यानुसार उमेदवारी नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवारासोबत ४ पदाधिकारी किंवा सूचक, कार्यकर्ते यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस आत जाण्यास मनाई आहे. त्या परिसरात कोणताही प्रचार करण्यास सभा घेण्यास व कोणतीही घोषणाबाजी, ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास, कोणताही मजकूर लिहिण्यास किंवा छापील मजकुर चिटकविण्यास मनाई करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी जात असताना निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयापासून १०० मिटरच्या आत ३ वाहने घेऊन जाण्यास परवानगी आहे, असेही असेही आदेशात नमूद आहे.
कलम ३६ प्रमाणे आदेश
देहू नगरपंचायत निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ प्रमाणे 19 जानेवारीपर्यंत देहूरोड पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकारी यांना लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
त्यानुसार रस्त्यावरून जाणाऱ्या जमावाचे अगर मिरवणुकीत व्यक्तीचे वागणे किंवा कृत्याबाबत आदेश; मिरवणुकीचा मार्ग व वेळ निश्चित करणे; सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या ध्वनीक्षेपकाच्या ध्वनीची तीव्रता निश्चित करून दिलेल्या वेळेवर नियंत्रण करणे, मिरवणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत नियंत्रण करणे याबाबतचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून महापालिकेचे डायलिसिस, सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर सुरू
नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य-जलसंपदामंत्री जयंत पाटील
पुणे, दि. ४: नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण हेच सर्वोच्च प्राधान्य मानून आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यात येत आहे. कै. अरविंद बारटक्के रुग्णालयात सोनाग्राफी तसेच एक्स रे यंत्रणा उपलब्ध झाल्याने आजाराचे निदान वेळीच शक्य होऊन तत्काळ उपचार होऊ शकतील. डायलिसिस सेवाही उपलब्ध असल्याने वारजे परिसरातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होऊन रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले .
पुणे महानगरपालिकेच्या कै. अरविंद बारटक्के दवाखाना येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डायलिसिस, सोनोग्राफी व एक्स रे सेंटरचे लोकार्पण जलसंपदामंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार सुप्रिया सुळे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ ,माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदिप धुमाळ उपस्थित होते आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, वारजे परिसरात आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी या भागातील नगरसेवकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. कै. अरविंद बारटक्के दवाखाना येथे डायलिसिस, सोनोग्राफी व एक्स रे सेंटरच्या माध्यमातून अत्यंत कमी दरात या सेवा मिळणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सेवा देणे ही मोठी सेवा आहे. सर्वसामान्य नागरिकांना या सेवा अत्यंत उपयोगी ठरतील असे त्यांनी सांगितले.
राज्यात आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर शासनाने भर दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षाही गतीने वाढते आहे. त्यामुळे यापुढील काळात अधीक दक्षता घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कुणीही गाफील न राहता कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
खा. सुळे म्हणाल्या, आरोग्यासह सर्व सोईसुविधा वारजे परिसरात उपलब्ध आहेत. पुण्यातील चांगला परिसर अशी नवी ओळख वारजे परिसराने निर्माण केली आहे. कोरोना कालावधीतही चांगले काम नगरसेवकांनी केले आहे. सामूहीक प्रयत्नातून कोरोनावर नक्कीच मात करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्रीमती चाकणकर म्हणाल्या, वारजे परिसरात डायलिसिस, सोनोग्राफी व एक्स रे सेंटरच्या माध्यमातून आरोग्याच्या चांगल्या सेवा वारजेकरांना मिळतील. नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सेवा देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.श्री.पाटील यांनी यावेळी डायलिसिस केंद्राची पाहणी केली. तसेच येथील तज्ज्ञांशी संवाद साधून उपचार सुविधांची माहिती घेतली.
‘ईडब्ल्यूएस’ आरक्षण: ५ एकरची अट शिथिल करण्याबाबत ‘कॅबिनेट’मध्ये होणार चर्चा
मुंबई, दि. ४ – आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणासाठी कमाल ५ एकर जमीन धारणेच्या मर्यादेची अट शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असून, यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून ही अट शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली जाईल, असे सूतोवाच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या अटीचा उल्लेख आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यात एकत्रित कुटुंबांची संख्या मोठी असून, अन्य कोणत्याही आरक्षणाचे लाभ मिळत नसलेले बहुतांश शेतकरी कुटूंब केंद्र सरकारच्या या अटीमुळे १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणापासून देखील वंचित राहणार आहेत. या गंभीर विषयासंदर्भात राज्य सरकारकडून केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. याबाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात जमीनधारणेचे प्रमाण जास्त आहे. केवळ या विभागांमध्येच नव्हे तर इतरही विभागांत अविभाजित कुटुंबांमध्ये ५ एकर पेक्षा जास्त शेतजमीन असू शकते. ५ एकर पेक्षा जास्त जमीन असली तरी बहुतांश शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रूपयांपेक्षा कमीच असते. त्यामुळे मराठा समाजासह इतर अनेक समाजातील शेतकऱ्यांना केंद्राच्या या शिफारसीमुळे मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने कमाल ५ एकर जमीनधारणेच्या अटीवर फेरविचार करावा आणि सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुधारित प्रतिज्ञापत्र दाखल करावे, अशी आमची मागणी असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने ओलांडला १० लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा
मुंबई, दि. ४ : चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने १० लाख प्रवासी वाहतुकीचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. विमानसेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांशी संपर्कात राहून नवीन प्रवासी सुविधा निर्माण केल्यामुळे हे लक्ष्य साध्य करता आले.
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमातळावरून ०१ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली होती. या विमानसेवेने ३ जानेवारी २०२२ रोजी १० लाख प्रवासी वाहतुकीचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे.
हे लक्ष्य संपादन करताना शिर्डी विमानतळावर जवळपास १३ हजार विमान उड्डाणांची नोंद करण्यात आली. टाळेबंदीमुळे मागील काही महिने शिर्डी विमानतळ बंद होते. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत शिर्डी विमानतळावर अत्यंत काळजीपूर्वक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
राज्यात पुणे, मुंबई, नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर शिर्डी हे चौथे तसेच देशातील वेगाने वाढणारे एकमेव विमानतळ आहे. शिर्डी विमानतळावर स्पाइस जेट, इंडिगो एअरलाईन्सची सेवा दिल्ली – हैदराबाद आणि चेन्नई या ठिकाणांसाठी सुरु करण्यात आली.
