Home Blog Page 2129

५ राज्यांमध्ये फेब्रुवारीपासून ७ टप्प्यांत मतदान, १० मार्चला मतमोजणी!

0

नवी दिल्ली –

5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले .

पहिला टप्पा: 10 फेब्रुवारी
उत्तर प्रदेश

दुसरा टप्पा: 14 फेब्रुवारी
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा

तिसरा टप्पा: 20 फेब्रुवारी
उत्तर प्रदेश

चौथा टप्पा : 23 फेब्रुवारी
उत्तर प्रदेश

पाचवा टप्पा: 27 फेब्रुवारी
उत्तर प्रदेश, मणिपूर

सहावा टप्पा : 3 मार्च
उत्तर प्रदेश, मणिपूर

सातवा टप्पा : 7 मार्च
उत्तर प्रदेश

निकाल: 10 मार्च

5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कोरोना चा कडक प्रोटोकॉल पाळला जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले. 15 जानेवारीपर्यंत रोड शो, रॅली, पदयात्रा, सायकल आणि स्कूटर रॅलीला परवानगी दिली जाणार नाही. व्हर्च्युअल रॅलीद्वारेच निवडणुकीच्या प्रचाराला परवानगी असेल. विजयानंतर कोणतीही विजयी मिरवणूक काढली जाणार नाही.उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. या सर्व राज्यांतील विधानसभांचा कार्यकाळ येत्या दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होत आहे.मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र म्हणाले की, देशातील 5 राज्यांच्या 690 विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. 18.34 कोटी मतदार या निवडणुकीत भाग घेतील. कोरोना दरम्यान निवडणुका घेण्यासाठी नवीन प्रोटोकॉल लागू केले जातील. सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळालेले असतील. ज्यांना गरज असेल त्यांनाही खबरदारीचे डोस दिले जातील.आतापर्यंत 5 मोठ्या गोष्टी1. कोरोना दरम्यान आव्हानात्मक निवडणुका – नवीन कोविड प्रोटोकॉल लागू केले जातील.2. कोरोना बाधित देखील मतदान करू शकतील – रुग्णांना पोस्टल बॅलेट सुविधा.3. 16% मतदान केंद्र वाढवण्यात आले आहेत. 2.15 लाखांहून अधिक मतदान केंद्रे बांधण्यात आली आहेत.4. मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1500 ते 1250 मतदार.5. निवडणूक खर्च मर्यादा वाढली, आता मोठ्या राज्यांमध्ये 40 लाख रुपयेराजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे1. सर्व कार्यक्रमांची व्हिडिओग्राफी केली जाईल.2. पक्षांना त्यांच्या उमेदवारांचे गुन्हेगारी रेकॉर्ड घोषित करावे लागेल.3. उमेदवाराला गुन्हेगारी इतिहास देखील सांगावा लागेल.4. प्रत्येक उमेदवार यूपी, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये 40 लाख रुपये खर्च करू शकेल.5. मणिपूर आणि गोव्यात ही खर्च मर्यादा 28 लाख रुपये असेल.या राज्यात विधानसभा निवडणूक होणारपंजाब, गोवा, युपी, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यात यावर्षी विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. भाजपने उत्तर प्रदेश विधानसभेसाठी कंबर कसली असून, भाजपचे अनेक दिग्गज नेते उत्तरप्रदेशमध्ये तळ ठोकून आहे.

सर्व प्रवाशांना भारतात आल्यावर सात दिवसांसाठी गृहविलगीकरणात राहणे अनिवार्य तसेच आठव्या दिवशी- आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार

0

नवी दिल्‍ली, 7 जानेवारी 2022

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये 6 जानेवारी 2022 पासून बदल केले आहेत. कोविड-19 विषाणूचे बदलते स्वरुप आणि ओमायक्रॉन सारख्या उत्परिवर्तित विषाणूमुळे तसेच जगभरात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे या नव्या मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. या नव्या सूचना 11 जानेवारी 2022 , मध्यरात्रीपासून लागू होतील.

या आधीच्या मार्गदर्शक सूचना 30 नोव्हेंबर रोजी लागू झाल्या होत्या. 

सुधारित मार्गदर्शक सूचना, आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्या खालील लिंकवर बघता येतील.

https://www.mohfw.gov.in/pdf/RevisedGuidelinesforInternationalArrivalsdated7thJanuary2022.pdf

नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील बदल करण्यात आले आहेत.

सर्व प्रवाशांना, ( यात ज्यांची अचानक चाचणीसाठी निवड करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची चाचणी निगेटिव्ह आली अशा 2% प्रवाशांचाही समावेश असेल) सात दिवस गृह विलगीकरणात राहावे लागेल आणि आठव्या दिवशी आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल.

प्रवाशांना आठ दिवसांनी केलेल्या आपल्या कोविड RT-PCR चाचणी अहवालाचा फोटो ,एअर सुविधा पोर्टलवर  अपलोड करावा लागेल ( यावर संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेश  देखरेख ठेवतात)

सर्व प्रवाशांना, ज्यांना ही चाचणी करायची आहे, त्यांना एअर सुविधा पोर्टलवर चाचणीची पूर्वनोंदणी करावी लागेल, जेणेकरुन, त्यांची चाचणी वेळेत होऊ शकेल.     

राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा ; दापोली नगर पंचायतीचा देशात दुसरा क्रमांक

0

नवी दिल्ली, दि. 7 : केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार-2020’ची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला असून  महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार जाहीर झाले आहेत.

जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने विविध राज्ये, संस्था आणि व्यक्तींना  11  श्रेणींमध्ये एकूण 57 पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले . यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. २०१८ पासून राष्ट्रीय जल पुरस्काराची सुरुवात झाली आहे.

दापोली नगर पंचायत आणि सुर्डी ग्रामपंचायत पुरस्कारांच्या मानकरी

सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्थेच्या श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट तीन संस्थांची निवड करण्यात आली असून यात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या श्रेणीमध्ये पश्चिम विभागातून निवड करण्यात आलेल्या तीन ग्रामपंचायतींमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी ग्रामपंचयातीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जलव्यवस्थापनात उत्कृष्ट कार्यासाठी देशातून तीन गैर शासकीय संस्थांची निवड करण्यात आली असून या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्थेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

जनतेमध्ये जलजागृतीकरिता उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील एक वृत्तपत्र आणि एका वृत्तवाहिनीचीही सर्वोत्कृष्ट माध्यम श्रेणीत निवड करण्यात आली असून सकाळवृत्तपत्र समूहाच्या ‘ॲग्रोवन’ वृत्तपत्रास सर्वोत्कृष्ट वृत्तपत्राचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार स्वरूप रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येतील.

रत्नागिरी-कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या तीन घाट रस्त्यांच्या सर्वेक्षणासह अंदाजपत्रक तयार करा – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण

0

मुंबई,दि. ७- रत्नागिरी जिल्ह्यात दळणवळणाच्या दृष्टीने उपयुक्त आणि पर्यायी मार्ग असलेल्या भांबेड ते गावडी, देवडे ते विशालगड आणि काजिर्डा ते पडसाळी या  तीन घाट रस्त्यांच्या कामांचे प्राथमिक सर्वेक्षण करुन त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिले.

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या बैठकीस आमदार डॉ. राजन साळवी, महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस समितीचे राज्य समन्वयक प्रा. विनय खामकर, सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते . या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड-कोळेवाडी-मांजरे-गावडी जि. कोल्हापूर, संगमेश्वर तालुक्यातील देवडे-भोवडे ते विशालगड (जि. कोल्हापूर), राजापूर तालुक्यातील मौजे काजिर्डा ते पडसाळी घाट या तीन घाट रस्त्यांबाबत चर्चा करण्यात आली. दळणवळणाच्या दृष्टीने उपयुक्त आणि पर्यायी मार्गासाठी  भांबेड ते गावडी या घाट रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेण्याच्या सूचनाही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी दिल्या.

भांबेड ते गावडी, देवडे ते विशालगड आणि काजिर्डा ते पडसाळी हे रत्नागिरी आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे जोडणारे पर्यायी रस्ते आहेत, या घाट रस्त्यांच्या सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी तसेच सविस्तर प्रकल्प अहवालासाठी येत्या अर्थंसंकल्पात निधीची तरतूद करण्याचे निर्देश देतानाच या तीनही घाट रस्त्यांच्या कामाचे प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे निर्देशही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी दिले. दरम्यान, रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबाघाट अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला असून तो खुला करण्याची मागणी यावेळी रत्नागिरी जयगड पोर्ट ट्रान्सपोर्टस युनियनच्या वतीने अध्यक्ष रमेश कीर यांनी सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडे यावेळी केली.

राजापूर पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या जागेचे सर्वेक्षण करुन आवश्यक जागेची मागणी जिल्हा परिषदेकडून प्राप्त करुन घ्यावी. आणि त्यानुसार नवीन जागा पंचायत समिती इमारतीसाठी हस्तांतरित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही श्री. चव्हाण यांनी याप्रसंगी दिल्या.

‘संकल्प’चे प्रतिकारशक्तीवर संशोधन; ‘आरोग्य निर्भर किट’ची निर्मिती.

0

कोरोना रुग्ण आणि परिवारासाठी मदत केंद्र सुरु

पुणे, दि. ७ जानेवारी: कोरोनाकाळात आधुनिक वैद्यकीय विश्व भूतो न भविष्यति असा लढा देत आहे. डॉक्टर, नर्सेस आणि इतर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अतिशय धोकादायक स्थितीत काम करावे लागत आहे. पण याच वेळी निदान उपचार आणि वापरात येणाऱ्या औषधांची निश्चिती याविषयी जगभर संभ्रमावस्था झालेली आहे. मात्र संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने मार्च २०२० मध्ये याविषयी एक महत्त्वाचा निष्कर्ष मांडला होता, तो म्हणजे आज सांसर्गिक आजार केवळ प्रतिकारशक्ती वर अवलंबून आहे आणि केवळ आधुनिक वैद्यक शास्त्रावर अवलंबून न राहता अंतर्गत प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटीसाठी आपण प्रयत्न करायला हवा. इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती ही केवळ आणि केवळ आपल्या नियमित आहारातून किंवा आयुर्वेदातील औषधी आहारातूनच तयार होऊ शकते. कोणत्याही केमिकलमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता नाही. ‘संकल्प’ने निष्णात आणि तज्ञ डॉक्टर्स आणि संशोधकांच्या मदतीने १३ वर्षाचा अनुभव बरोबर घेऊन गेल्या दीड वर्षामध्ये एक विश्वसनीय उपाय शोधून काढला आहे. कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसलेले ‘आहारातून औषधोपचार’ म्हणजेच मेडिकल न्यूट्रिशिअन थेरपी या पूरक आहाराची निर्मिती केली आहे. यातूनच ‘आरोग्य निर्भर’ या सुरक्षित पुरक आहार आणि सुरक्षित आर्युर्वेद याचे एकत्रिकरण आहे. ‘संकल्प’चे आरोग्य निर्भर किट मान्यताप्राप्त असून संपूर्णपणे सुरक्षीत असल्याची माहिती संकल्पचे कार्यकारी संचालक डॉ. पी.एन. कदम (M.B.B.S., M.S.(Psy)) यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

पत्रकार परिषदेवेळी संकल्पचे कार्यकारी संचालक डॉ. पी.एन. कदम (M.B.B.S., M.S.(Psy)), रिसर्च हेड शर्वरी डोंबे, प्रकल्प व्यवस्थापक रघुवीरसिंग राठोड, नीरज भाटीया उपस्थित होते.डॉ. पी.एन. कदम (M.B.B.S., M.S.(Psy)) म्हणाले की, कोणत्याही आजारात प्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे असते. प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर कोणताही आजार सहसा होत नाही. आपले शरीर आजाराला बळी पडू नये यासाठी ‘विष द्रव्यांचे निर्मूलन’, ‘आहार हेच औषध’, ‘उत्साह हेच जीवनाचे रहस्य’, ‘नैसर्गिक प्रतिकारशक्तीत वाढ’ ही चतुःसूत्री पाळल्यास तुम्ही आजाराला बळी पडण्याची शक्यता कमी असेल आणि बरे होण्याचा कालावधी देखील कमी असतो. मॉडर्न मेडिसिनमध्ये शरीरातील विषद्रव्य काढून टाकण्याची व्यवस्था नाही, मात्र अवयव काढण्याची व्यवस्था आहे. हे लक्षात घेऊन विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदाची मदत घ्यावी लागते. “आपली रोगप्रतिकारशक्ती ही जेनेटिक आणि नैसर्गिक देण आहे. ‘आहार- विहार आणि विचार’ हे तिन्ही घटक यासाठी महत्त्वाचे आहेत. केवळ भीतीमुळे प्रतिकार शक्तीवर परिणाम होऊन गेल्या वर्षी अनेक मृत्यू झाले. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा फारसा विचार न करता क्वांटम फिजिक्स आणि क्वांटम हिलिंगचा वापर करून तयार केलेले ‘आरोग्य निर्भर किट’ ही एकविसाव्या शतकातील रोगप्रतिकारक शक्ती तयार करणारा जगमान्य औषधी आहार होईल.” घरी विलगीकरणात असलेले ९० टक्के रुग्ण  ‘आरोग्य निर्भर किटद्वारे बरे होऊ शकत असल्याचा दावा डॉ. कदम यांनी केला आहे. तसेच कोरोना आणि इतर आजारांची गुंतागुंत याद्वारे टळू शकते. मात्र ज्या रुग्णांना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा इतर आजार पूर्वीपासून असतील तर त्यांना रुग्णालयात दाखल करुन ‘आरोग्य निर्भरद्वारे’ प्राण वाचू शकतो.

डॉ. अपूर्वा अहिरराव म्हणाल्या की, गेली २४ वर्षे अखंड ध्यास घेऊन ‘सक्षम प्रतिकारशक्ती आणि आहार’ या विषयावर सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. पी. एन. कदम यांनी केलेले संशोधन येणाऱ्या काळात खर्‍या अर्थाने वैद्यकीय क्षेत्रातील संभ्रम दूर करुन सर्वांना दिलासा देणारे सिद्ध झाले आहे. कोरोना-कोविडपासून कोणत्याही विषाणूंना प्रतिकार करण्यासाठी प्रत्येकाच्या शरीरात एक सक्षम सुरक्षाकवच आहेच. शिवाय पांढऱ्या पेशी, टी सेल्स आणि ‘इम्यूनोग्लोब्युलिन नावाचे विशिष्ट प्रोटीन ही आपली फौज आहे. औषध रसायनशास्त्र (Pharmocology) कितीही कुठे गेलं असलं तरी आजही जगाच्या पाठीवर प्रतिकारशक्ती वाढवणारे एकही औषध तयार होऊ शकले नाही. मात्र ‘आरोग्य निर्भर’ किटद्वारे शरीरातील प्रत्येक पेशीला आवश्‍यक असणारी ऊर्जा तयार करणारी पोषणमूल्ये आणि मुख्यत: शरीरातील इम्युनो ग्लोब्युलीन आणि पांढऱ्या पेशी यांची व्यवस्थित वाढ होते. शरीरातील फ्री रॅडिकल्स म्हणजे विषद्रव्ये यांना नियंत्रित करणे आणि अ‍ॅंटीऑक्सिडंचा सहाय्याने पेशींचे पुनरुज्जीवन करणे यासाठीचा हा शास्त्रशुद्ध आहार आहे.

संकल्पच्या रिसर्च हेड शर्वरी डोंबे म्हणाल्या की, आयुर्वेद आणि नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करुन ‘आरोग्य निर्भर’ची उत्पादने बनविण्यात आली आहेत. जनसामान्यांना परवडेल असे प्रतिदिन केवळ २४ रुपयांमध्ये ‘आरोग्य निर्भर बेसिक किट’ आहे. ज्यांना घरी थांबता येणे शक्य नाही आणि बाहेर जागोजागी कोरोनाचा धोका आहे अशा वेळी प्रतिदिन ४८ रुपयांमध्ये ‘आरोग्य निर्भर १.०’ जवळजवळ ९० ते ९५ टक्के सुरक्षा प्रदान करतो. यामुळे कोरोना कोविड होणारच नाही असे नाही पण आपली प्रतिकार शक्ती चांगली राहिल्यामुळे धोक्याची स्थिती असणार नाही. याशिवाय दुर्दैवाने कोविडची व इतर कोणत्याही विषाणूंची लागण झालीच तर “आरोग्य निर्भर २.०” हा परिपूर्ण इम्युनिटी आणि एनर्जी बुस्टर असल्याचे त्यांनी सांगितले. 

पंतप्रधानांविषयीच्या कारस्थानाच्या चौकशीत हस्तक्षेपाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करा-आ. चंद्रकांत पाटील

0

मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पंजाबमध्ये झालेल्या गंभीर व धोकादायक गफलतीबाबत तपास चालू असताना देशाच्या गृहमंत्र्यांबद्दल शंका व्यक्त करून तपास प्रभावित केल्याचा व तपासात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी आपली मागणी आहे. पटोले यांनी देशाच्या सुरक्षतेच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्याची सूचना आपण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी दिली.

          ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या बाबतीत जी घटना घडली ती अत्यंत गंभीर होती. पाकिस्तानच्या सीमेजवळ घडलेल्या या प्रकारामागे पंतप्रधानांच्या हत्येचे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त होत आहे. देशाच्या सुरक्षितेविषयी अत्यंत गंभीर विषयावर आता सर्वोच्च पातळीवर चौकशी सुरू आहे. अशा स्थितीत नाना पटोले यांनी ही घटना नौटंकी असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली तसेच त्यांनी या घटनेमागे देशाच्या गृहमंत्र्यांचा हात असल्याचा संशय जाहीरपणे व्यक्त केला. हा तपासावर प्रभाव टाकण्याचा व तपासाची दिशा भरकवटण्याचा प्रयत्न आहे. याचा आपण निषेध करतो आणि पटोले यांच्यावर कारवाईची मागणी करतो. पंतप्रधानांच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दल त्यांच्याकडे काही माहिती आहे का याचा तपास करावा, अशीही आपली मागणी आहे. देशाच्या सुरक्षिततेविषयी जनतेची दिशाभूल केल्याबद्दल पटोले यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची सूचना आपण भाजपा कायकर्त्यांना दिली आहे.

          ते म्हणाले की, केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा अनेक दशकांचा मोठा प्रश्न सोडविल्याबद्दल आपण प्रदेश भाजपातर्फे त्यांचे आभार मानतो. ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त भाव दिल्यामुळे साखर कारखान्यांना आयकर विभागाने नोटिसा दिल्या होत्या. हा निर्णय १९८० च्या दशकातील आणि काँग्रेसच्या राजवटीतील होता. पण त्यामुळे साखर कारखान्यांवर टांगती तलवार होती. तसेच शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त भाव देऊ नये, असाही संदेश त्यातून जात होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मा. अमित शाह यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यातील साखर कारखान्यांची साडेनऊ हजार कोटी रुपये देणे देण्यातून सुटका झाली व त्याचसोबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा दर मिळण्याची संधी निर्माण झाली. मा. अमित शाह यांनी राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

          मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री होण्याविषयी शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांनी जाहीर वक्तव्य केले. बिहारमध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री लालूप्रसाद यांनी पद सोडल्यावर त्यांच्या पत्नी राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या तसाच प्रकार राज्यात होण्याची शक्यता शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वक्तव्याने निर्माण झाली. अशा स्थितीत ट्वीटरवरून कोणी तूलना केली तर सत्ताधाऱ्यांनी इतके अस्वस्थ होण्याचे कारण नव्हते. याबाबत आपण भाजपाच्या संबंधित पदाधिकाऱ्याला समज दिली आहे. तथापि, मुख्यमंत्रिपद हे सार्वजनिक पद असताना ते वैयक्तिक मालकी असल्याप्रमाणे कोणी त्याविषयी अती संवेदनशील होऊ नये.

कृषी विभागामार्फत 18 जानेवारीपर्यंत प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज मंजुरी पंधरवडा

0

पुणे दि.7 : कृषी विभागामार्फत 3 ते 18 जानेवारी या कालावधीत अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज मंजुरी पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने इच्छुक व्यक्ती व गटांनी, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या (पीएमएफएमई) माध्यमातून “एक जिल्हा एक उत्पादन” (ओडीओपी) या आधारावर राबवली जाते. वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणूकीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के कमाल 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान आहे. तसेच गट लाभार्थी जसे स्वयं:सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संस्था व उत्पादक सहकारी संस्था यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणूक याकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के अनुदान आहे. याशिवाय इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटींग व ब्रॅन्डींग आणि प्रशिक्षण या घटकांसाठीही लाभ देता येणार आहे.

2021-22 या वर्षात पुणे जिल्हयासाठी योजने अंतर्गत भांडवली गुंतवणुकीकरिता 325 वैयक्तिक उद्योगांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तसेच 15 स्वयंसहाय्यता गट, 6 शेतकरी उत्पादक कंपन्या व 2 सहकारी संस्थांनाही अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

31 डिसेंबर 2021 पर्यंत 483 लाभार्थ्यांनी या योजनेसाठी सहभाग नोंदवला असून त्यापैकी 48 सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले आहेत. 34 आराखडे बॅंक कर्ज मंजूरीसाठी विविध बँकेकडे सादर करण्यात आले आहेत. बँकाकडून कर्ज मंजुरीस सुरवात झाली आहे. 7 प्रकल्पांना कर्ज मंजुरी मिळाली आहे.

इच्छुक व्यक्ती व स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था आदी गटांनी प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी www.pmfme.mofpi.gov.in या एमआयएस पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावेत. सविस्तर प्रकल्प आराखडे करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संसाधन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. प्रकल्प आराखडे तयार करण्यासाठीचे सेवाशुल्क शासनामार्फत अदा करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

रेल्वेच्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेजलाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण

0

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते खातेदारांचा सत्कार
पुणे, दि. 7: रेल्वेच्या पुणे- नाशिक सेमी हायस्पीड दुहेरी ब्रॉडगेज लाईनच्या बांधकामासाठी खासगी वाटाघाटीद्वारे जमीनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून याअंतर्गत संपूर्ण प्रकल्पातील पहिले खरेदीखत आज पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी खरेदीने जमीन दिलेल्या चंद्रकांत गंगाराम कोलते आणि स्मिता चंद्रकांत कोलते यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी या खरेदीखतासाठी पुढाकार घेतलेल्या भूसंपादन क्र. 4 च्या उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे- फडतरे, रेल्वेचे सहमहाव्यवस्थापक (प्रकल्प) सागर अग्रवाल, सहमहाव्यवस्थापक (नियोजन) व्ही. के. गोपाल उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यावेळी कोलते दांपत्याचे अभिनंदन केले. ते म्हणाले, पुणे व नाशिक जिल्ह्यातील कृषीमाल वाहतूक, मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूकीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असून प्रकल्प गतीने मार्गी लावण्यासाठी अशाच प्रकारे शेतकऱ्यांचा पुढाकार आवश्यक आहे. शेतकऱ्यांना जमिनीसाठी योग्य मोबदला मिळत आहे असा संदेश आजच्या खरेदीखतातून जाणार आहे, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

हवेली तालुक्यातील 12 गावांचे भूसंपादनाचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यातील 8 गावांची पूर्ण तर 2 गावांची अंशत: संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. आज झालेले खरेदीखत हे हवेली तालुक्यातील पेरणे गावातील असून प्रकल्पात समावेश असलेल्या तीनही जिल्ह्यातील हे पहिले खरेदीखत आहे, अशी माहिती यावेळी श्रीमती आखाडे- फडतरे यांनी दिली.

सेमी हायस्पीड प्रकल्पाची वैशिष्टये
महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.मार्फत या रेल्वे मार्गाचे बांधकाम होणार आहे. पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर अशा चार तालुक्यात मिळून एकूण 54 गावांचा यात समावेश आहे. पुणे जिल्ह्यात पुणे या पहिल्या स्थानकासह हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या स्थानकांचा समावेश आहे. प्रमुख स्थानकांपैकी चाकण, मंचर तसेच नारायणगाव ही स्थानके कृषी उत्पादन व खासगी मालवाहतूक टर्मिनल असणार असून राजगुरूनगर स्थानक हे फक्त प्रवासी रहदारीसाठी असणार आहे.

भूसंपादन प्रक्रियेला गती
जिल्ह्यात प्रकल्पासाठी भूसंपादन करावयाच्या गावांपैकी 37 गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. तसेच उर्वरित प्रकरणात मोजणी प्रक्रिया, मूल्यांकन टिपणी सहाय्यक नगररचना कार्यालयाकडे पाठवणे आदी प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पासाठी खासगी वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यात येत आहे. जमिनीसाठी रेडी रेकनरच्या 5 पट दर देण्यात येत असून इमारत तसेच इतर बांधकामे, झाडे आदींसाठी मूल्यांकनाच्या अडीच पट रक्कम दिली जाणार आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
000

महामारीच्या संकटात वाढ होत असताना आंतरराष्ट्रीय व्यापाराला आधार देण्यासाठी डीजीएफटीने कोविड-19 मदत कक्ष स्थापन केला

0

नवी दिल्‍ली, 7 जानेवारी 2022

देशभरात कोविड बाधितांच्या संख्येत अचानकपणे मोठी वाढ होत असताना, डीपीआयआयटी अर्थात उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने कोविड संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनी उचललेल्या पावलांची दखल घेतली आहे. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून आणि आपल्या व्यापारविषयक परिसंस्थेला आधार मिळावा म्हणून, डीपीआयआयटी, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जर काही कोविड विषयक निर्बंध जारी केले असतील तर त्यामुळे, वस्तू आणि अत्यावश्यक सामानाची वाहतूक तसेच वितरण प्रक्रिया आणि त्यामध्ये उद्भवू शकणाऱ्या अडचणी यांवर लक्ष ठेवणार आहे.

निर्मिती, वाहतूक, वितरण, घाऊक क्षेत्रातील  किंवा ई-वाणिज्य कंपन्यांना, साधन संपत्तीची जमवाजमव तसेच वस्तूंची वाहतूक आणि वितरण या बाबतीत कोणतीही अडचण आल्यास त्याविषयीची माहिती डीपीआयआयटी विभागाच्या खालील दूरध्वनी क्रमांकांवर तसेच ईमेल पत्त्यावर देता येईल:-

दूरध्वनी क्रमांक: + 91 11 23063554, 23060625

ईमेल: dpiit-controlroom@gov.in

वर दिलेले दूरध्वनी क्रमांक 5 जानेवारी 2022 पासून सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत कार्यरत असतील. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून विविध भागधारकांनी नोंदविलेल्या समस्यांबाबत संबंधित राज्य आणि केंद्र सरकारे उपाययोजना करतील. म्हणून भागधारकांना येणाऱ्या समस्या नियंत्रण कक्षाच्या वरील सुविधांच्या माध्यमातून नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाणिज्य विभाग आणि डीजीएफटी अर्थात परदेश व्यापार महासंचालनालय यांनी देखील, कोविड-19 बाधितांच्या संख्येत होत असलेली तीव्र वाढ लक्षात घेऊन आयात आणि निर्यात प्रक्रिया तसेच व्यापार क्षेत्राशी संबंधित भागधारकांना येत असेलल्या समस्यांवर  बारकाईने लक्ष ठेवण्याचे काम हाती घेतले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित अडचणींवर योग्य उपाय शोधणे आणि या व्यापाराला आधार देणे यासाठी डीजीएफटीने कोविड-19 मदत कक्ष स्थापन केला आहे.

हा ‘कोविड-19 मदत कक्ष’ वाणिज्य विभाग आणि डीजीएफटी यांच्याशी संबंधित मुद्दे, आयात-निर्यात परवानेविषयक अडचणी, सीमाशुल्क विभागाची मंजुरी मिळण्यास लागणारा विलंब, आयात-निर्यातीशी संबंधित कागदपत्रांबाबतच्या समस्या, बँकिंग बाबतचे मुद्दे इत्यादी घटकांची संबंधित समस्यांमध्ये लक्ष घालणार आहे.केंद्र तसेच विविध राज्य सरकारांची इतर मंत्रालये, विभाग आणि संस्था यांच्याशी संबंधित असणाऱ्या व्यापारविषयक समस्यांचे एकत्रीकरण आणि पडताळणीचे काम देखील हा कक्ष करणार असून केंद्र तसेच विविध राज्य सरकारांची मदत मिळवून शक्य त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना शोधण्यासाठी योग्य समन्वय देखील साधेल.

आयात-निर्यात समुदाय डीजीएफटीच्या संकेतस्थळावर माहिती नोंदवू शकेल आणि त्यांना ज्या अडचणींची सोडवणूक अपेक्षित आहे त्यांची माहिती खालील टप्प्यांमध्ये सादर करू शकेल- 

  1. डीजीएफटीच्या https://dgft.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन–> सेवा –> डीजीएफटी मदत कक्ष सेवा
  2. ‘नवी विनंती नोंदवा’ आणि नंतर ‘कोविड-19’ ही श्रेणी निवडा
  3. योग्य उप-श्रेणीची निवड करून त्यात संबंधित माहिती भरून सादर करा

अथवा, त्यांना त्यांच्या समस्यांची माहिती dgftedi@nic.in या ईमेल पत्त्यावर कोविड-19 मदत कक्ष या विषय शीर्षकासह पाठविता येतील, किंवा 1800-111-550या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून कळविता येतील.

सादर करण्यात आलेल्या समस्यांवरील उपाययोजना आणि प्रतिक्रिया यांच्यावर डीजीएफटी मदतकक्ष सुविधेत असलेल्या स्थिती ट्रॅकरचा वापर करून लक्ष ठेवण्यात येईल. जेव्हा या समस्यांबाबत काही कार्यवाही होईल तेव्हा त्याबाबतचे ईमेल आणि लघु संदेश देखील संबंधित व्यक्ती/कंपन्यांना पाठविण्यात येतील. या सुविधेचा समर्पक पद्धतीने उपयोग करून घेण्याचे आवाहन व्यापार समुदायाला करण्यात आले आहे.

नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशमध्ये 14,169 कोटी रुपयांच्या 336 किलोमीटर लांबीच्या 10 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी

0

नवी दिल्‍ली, 7 जानेवारी 2022


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे 14169 कोटी रुपयांच्या 336 किलोमीटर लांबीच्या 10 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची आभासी माध्यमातून पायाभरणी केली. मथुरा-हाथरस-बुदौन-बरेली महामार्गाच्या विकासामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होईल आणि तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांवरील वाहतुकीच्या समस्या दूर होतील. आग्रा इनर रिंग रोड आणि यमुना द्रुतगती मार्गाला जोडणारा बायपास बांधल्यामुळे, आग्रा शहराची वाहतूक कोंडीपासून सुटका होईल. आग्रा-जलेसर-एटा रस्त्याच्या बांधकामामुळे पितळ उद्योगाच्या व्यापाऱ्यांची सोय होणार आहे.

गडकरी यांनी आज ब्रजच्या 84 कोसी परिक्रमा मार्गाच्या विकासाची घोषणा केली. हा मार्ग नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला जाईल आणि भारतमाला प्रकल्प टप्पा -2 मध्ये समाविष्ट केला जाईल. हा मार्ग अयोध्येच्या 84 कोसी परिक्रमा मार्गासारखा बनवला जाईल आणि परिसरातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रांशी जोडला जाईल, असे ते म्हणाले. मथुरा व्यतिरिक्त हा मार्ग राजस्थान, हरियाणाच्या सीमावर्ती भागातून जाईल, असेही ते म्हणाले.

एकूणच या प्रकल्पांमुळे व्यापार सुविधा आणि व्यवसाय सुलभता निर्माण होईल. काच आणि बांगड्या उद्योगाला विशेष चालना मिळणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे आर्थिक विकासाबरोबरच रोजगाराच्या संधी वाढतील.

सार्वजनिक क्षेत्रातील बँका भांडवली दृष्टीने सक्षम असून, भविष्यातील कोणत्याही आर्थिक तणावांचा सामना करण्यास सज्ज असल्याची बँकिंग प्रमुखांची हमी

0

नवी दिल्‍ली, 7 जानेवारी 2022

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांसोबत नवी दिल्ली इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेण्यात आली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, आणि वित्तीय सेवा विभगाचे सचिव देबाशीष पांडा यांच्यासह या विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. 

केंद्र सरकार आणि भारतीय रिजर्व बँकेने कोरोना महामारीशी संबंधित उपाययोजनांची घोषणा केली होती, या उपाययोजनांची अंमलबजावणी सार्वजनिक बँकानी कशी केली, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्याशिवाय, सध्या असलेल्या कोविड महामारीच्या नव्या लाटेमुळे भविष्यात येऊ शकणाऱ्या संकटांचा सामना करण्याची सज्जता, यावरही यावेळी चर्चा झाली.

आपत्कालीन पत-हमी योजना- ईकीएलजीएस च्या यशाबद्दल आनंद व्यक्त करतांनाच अर्थमंत्री म्हणाल्या की अद्याप आपल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करण्याची वेळ  आलेली नाही.आपल्या एकत्रित प्रयत्नांतून आपल्याला कोविड महामारीचा अजूनही फटका बसत असलेल्या क्षेत्रांना आधार देण्याची गरज आहे. कृषीक्षेत्र, शेतकरी, किरकोळ वस्तू व्यापार तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांना मदत करणे सुरूच ठेवावे, अशी सूचनाही,सीतारामन यांनी बँक प्रमुखांना केली.

जगभरात ओमायक्रॉनचा वाढता प्रसार आणि जागतिक स्तरावरील घडामोडी यामुळे, वारे उलट्या दिशेने वाहत असले तरीही, देशात व्यवसायाबाबतच्या दृष्टिकोनात प्रगती होत आहे, असे सीतारामन यांनी नमूद केले. संपर्क क्षेत्राशी संबंधित उद्योग व्यवसायांना या  महामारीच्या काळात अधिक आधार देण्याची गरज आहे, असेही सीतारामन यावेळी म्हणाल्या.

पतविषयक मागणीच्या बाबतीत बोलतांना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, किरकोळ क्षेत्रात होत असलेली वृद्धी, एकूणच समग्र अर्थव्यवस्थेत असलेल्या प्रगतीच्या संधी आणि कर्जदारांच्या आर्थिक क्षमतेत झालेली सुधारणा, यामुळे  येत्या काळात कर्जाची मागणी वाढू शकेल.

देशातील कर्ज परतफेडीच्या संस्कृतीत सुधारणा झालेली आहे, असे निरीक्षण बँकप्रमुखांनी या आढावा बैठकीत नोंदवले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकानी उत्तम कामगिरी केली आहे, तसेच, महामारीमुळे आलेल्या आर्थिक संकटातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी, आवश्यक ती उभारी दिली असल्याचे, या आढावा बैठकीत सांगण्यात आले.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कामगिरी (PSBs) —

  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 31,820 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, जो गेल्या 5 आर्थिक वर्षांतील सर्वोच्च आहे.
  • आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत 31,145 कोटी रुपयांचा निव्वळ नफा, जो आर्थिक वर्ष 2020-21 च्या जवळपास सारखाच आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या 7 आर्थिक वर्षांमध्ये 5,49,327 कोटी रुपयांची वसुली केली आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे पुरेसे भांडवल आहे आणि सप्टेंबर 2021 पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नियामक आवश्यकतेच्या 11.5% (CCB सह) तुलनात्मक भांडवल आणि जोखीमयुक्त मालमत्ता गुणोत्तर CRAR 14.4% आहे.
  • सप्टेंबर 2021 पर्यंत PSBs चा CET1 10.79% होता नियामक आवश्यकता 8% आहे.
  • PSBs ने सप्टेंबर 2021 पर्यंत कालानुरूप वैयक्तिक कर्जामध्ये 11.3%, कृषी कर्जामध्ये 8.3% आणि एकूण पत वृद्धी  3.5% सह वार्षिक पत वाढ नोंदवली आहे.
  • ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू झालेल्या क्रेडिट आउटरीच कार्यक्रमांतर्गत, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एकूण 61,268 कोटी रुपयांची कर्जाची रक्कम मंजूर केली आहे.
  • कोविड-19 महामारीच्या काळात, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ECLGS अर्थात आपत्कालीन पत हमी योजना (कोविड-19 महामारीच्या काळात विशेषतः MSME क्षेत्राला दिलासा देण्यासाठी मे 2020 मध्ये सुरू केलेले), LGSCAS अर्थात कोविड बाधित क्षेत्रासाठी कर्ज हमी योजना आणि पीएम स्वनिधी सारख्या विविध सरकारी योजनांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
  • सरकारने प्रदान केलेल्या 4.5 लाख कोटी रुपयांच्या आपत्कालीन पत हमी योजनेच्या विस्तारित मर्यादेपैकी 64.4% किंवा 2.9 लाख कोटी रुपये, नोव्हेंबर 2021 पर्यंत मंजूर झाले आहेत. ECLGS मुळे 13.5 लाखांहून अधिक छोटे उद्योग महामारीपासून तरले, 1.8 लाख कोटी रुपयांची MSME कर्जे अनुत्पादित मालमत्ता होण्यापासून वाचली, आणि अंदाजे 6 कोटी कुटुंबांची रोजीरोटी वाचली.

त्यांच्या एकूण परिस्थितीचे मूल्यांकन करताना, बँकर्सना खात्री होती की PSB चे पुरेसे भांडवल आहे आणि बँका भविष्यात कोणत्याही संकटकालीन परिस्थितीसाठी तयार आहेत.

कोविड-19 महामारीच्या सुरुवातीपासून देशाला विलक्षण पाठिंबा दिल्याबद्दल अर्थमंत्र्यांनी बँकर्सचे आभार मानले. ECLGS च्या यशाचे श्रेय त्यांनी बँकिंग समुदायाच्या सामूहिक प्रयत्नांना दिले. सीतारामन यांनी बँकिंग समुदायाला आवाहन केले की त्यांनी त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठी कोविड-19 योग्य वर्तन ठेवावे आणि प्रत्येकाने लसीकरण केले आहे याची खात्री करावी.

बँकर्सना संबोधित करताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड म्हणाले की सार्वजनिक क्षेत्रातील बँका या आपल्या अर्थव्यवस्थेचे पॉवर इंजिन आहेत आणि महामारीच्या काळात बँकर्सच्या कामगिरीबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. कराड म्हणाले की, काळासोबत बँकिंग हे अधिक खुले आणि ग्राहक केंद्रित झाले आहे.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची 2022 ची आगळी दिनदर्शिका: “याद करो कुर्बानी”

0

पुणे, 7 जानेवारी 2022

“भारतीय सिनेमातील वेगवेगळ्या ‘प्रतिमांचा वापर करून दरवर्षी आगळ्यावेगळ्या दिनदर्शिकेची (कॅलेंडर) निर्मिती करण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय नेहमीच अग्रेसर असते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने यावर्षीही (2022) अशाच एका वेगळ्या आणि आकर्षक दिनदर्शिकेची त्यामध्ये भर घातली आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही डिजिटल पद्धतीने दिनदर्शिका तयार करण्यात आली असून चित्रपट रसिकांना अतिशय आवडू शकेल अशी ही आकर्षक दिनदर्शिका राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. – https://www.nfai.gov.in/ 

भारतीय स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरूद्ध हजारो महिला आणि पुरुषांनी निर्भयपणे लढा देऊन आपल्या मातृभूमीसाठी बलिदान केले. भारतीय स्वातंत्र्याचे यंदाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त ”याद करो कुर्बानी” या  संकल्पनेच्या आधारावर ही दिनदर्शिका तयार करण्यात आली असून त्यामध्ये मोठ्या पडद्यावरील स्वातंत्र्याची गाथा समाविष्ट करण्यात आली आहे.  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने जतन करून ठेवलेल्या विविध भाषांमधील चित्रपटांमधील स्वातंत्र्ययोद्ध्यांची   अतिशय दुर्मिळ छायाचित्रे या दिनदर्शिकेत पाहावयास मिळणार आहेत.

“आझादी का अमृतमहोत्सव” साजरा करताना या दिनदर्शिकेमागे मोठ्या पडद्यावर चितारलेल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अनेक धाडसी स्वातंत्र्ययोद्ध्यांना आदरांजली अर्पण करण्याचा आमचा मुख्य हेतू होता असे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक श्री प्रकाश मगदूम यांनी सांगितले.

या दिनदर्शिकेत भारतीय स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या भूमिका साकार केलेल्या अनेक नामवंत अभिनेते आणि अभिनेत्री यांची दुर्मिळ छायाचित्रे पाहावयास मिळणार आहेत. अतिशय निवडक अशा बारा दुर्मिळ छायाचित्रांमध्ये, ‘झाँशी की रानी ‘ ( हिंदी – १९५३ ) या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची भूमिकेतील मेहताब., ‘ शहिदे -ए  -आझम -भगतसिंग ‘ ( हिंदी- १९५४ ) या चित्रपटातील चंद्रशेखर आझाद यांच्या भूमिकेतील पी. जयराज, ‘ वीरपांडीय् कट्टाबोम्मन ( तमिळ — १९५९ ) या चित्रपटातील वीरपांडीय् कट्टाबोम्मनची  भूमिका करणारे शिवाजी गणेशन,  ‘कडू मकरानी’ ( गुजराती- १९६० ) या चित्रपटातील कादिर बक्श ची भूमिका करणारे अरविंद पंड्या, ‘ उमाजी नाईक ‘ ( मराठी – १९६० ) या चित्रपटात उमाजी नाईकांची भूमिका करणारे गजानन जहागीरदार, ‘कित्तूर चेन्नम्मा’ ( कानडी – १९६१ ) या चित्रपटात राणी चेनम्माची भूमिका साकारणाऱ्या बी. सरोजा देवी,  ‘शहीद’ (हिंदी — १९६५ ) या चित्रपटात भगतसिंग यांची भूमिका साकारणारे मनोज कुमार , ‘ सुभाषचंद्र ‘ ( बंगाली — १९६६ ) या चित्रपटात सुभाषचंद्र बोस यांची भूमिका करणारे अमर दत्ता, ‘कुंजली मरक्कर’ ( मल्याळम — १९६७ ) या चित्रपटात कुंजली मरक्कर ची भूमिका साकारणारे कोट्टारक्कर श्रीधरन नायर,  ‘शहीद ऊधमसिंग” ( हिंदी– १९९९ ) या चित्रपटात ऊधमसिंग यांची भूमिका करणारे राज बब्बर,  ‘मंगल पांडे द रायझिंग’ ( हिंदी — २००५ ) या चित्रपटात मंगल पांडे यांची भूमिका साकारणारे अमीर खान, आणि ‘एक क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके’ ( मराठी — २००७ ) या चित्रपटात क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची भूमिका साकारणारे अजिंक्य देव आदींचा समावेश आहे.

यावर्षी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची ‘ई – दिनदर्शिका’ https://www.nfai.gov.in/calendar-2022.php  या अधिकृत संकेतस्थळावर  वर ऑनलाइन उपलब्ध आहे. तसेच दिनदर्शिकेतील प्रत्येक महिन्याची ‘प्रतिमा’  डाउनलोड करून ती इतरांशी शेअर करता येऊ  शकेल.

“तें – एक श्राव्य अनुभव” हा ऑडिओ नाट्य महोत्सव!

0


विजय तेंडुलकर यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली उपक्रम स्टोरीटेलवर प्रकाशित!

सुप्रसिध्द नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा ६ जानेवारी हा जन्मदिवस. या निमित्ताने स्टोरीटेल ही आंतरराष्ट्रीय ऑडिओ स्ट्रिमिंग कंपनी “तें – एक श्राव्य अनुभव” या नावाने विजय तेंडुलकर ऑडिओ नाट्य महोत्सव स्टोरीटेलवर साजरा करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबईतील स्टोरीटेलच्या कार्यालयात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे प्रकाशन केल्यानंतर तेंच्या चाहत्यांसाठी स्टोरीटेल ऐकण्यास उपलब्ध करण्यात आले. या सोहळ्यास लोकप्रिय अभिनेते डॉ. मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक, पुष्कराज चिरपुटकर, दुष्यंत वाघ, पुष्कराज चिरपुटकर, संगीतकार मिलिंद जोशी, रत्नकांत जगताप, दिग्दर्शक मंगेश कदम, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, स्टोरीटेल (इंडिया) निर्मिती प्रमुख राहूल पाटील, कंटेंट अँड बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर उमेश बर्वे आदि मान्यवर कलावंत उपस्थित होते. संवेदनशील पत्रकार असलेल्या विजय तेंडूलकरांच्या जन्मदिनीच पत्रकार दिवसही असल्याने हा महोत्सव खऱ्या अर्थाने विशेष असल्याचे स्टोरीटेलच्या वतीने प्रसाद मिरासदार यांनी सांगितले.

स्टोरीटेल आयोजित या उपक्रमाचा भाग म्हणून तयार करण्यात आलेला “वारसा तेंचा” हा प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित लघुपट या वेळी स्टोरीटेलवर प्रदर्शित करण्यात आला. पंचेचाळीस मिनिटांच्या या लघुपटात विजय तेंडुलकर यांच्या नाटकांचे वैशिष्ट्य, आजही नव्या पिढीतील दिग्दर्शकांना त्यांच्या नाटकांबद्दल वाटणारे आकर्षण, स्टोरीटेलवर ऑडिओ रूपात ही नाटके सादर करत असताना आलेले अनुभव तसेच विजय तेंडुलकर यांच्या व्यक्तिमत्वाचा तसेच साहित्याचा समीक्षेच्या अंगाने घेतलेला आढावा असणार आहे. सुप्रसिध्द अभिनेते मोहन आगाशे, संदीप पाठक, दिग्दर्शक विजय केंकरे, प्रतिमा कुलकर्णी, अक्षय शिंपी, समीक्षक रेखा इनामदार साने, राजीव नाईक, राजु परूळेकर आदींनी या लघुपटात सहभाग घेतला आहे.

याच दिवशी, विजय तेंडुलकर यांच्या अजरामर ठरलेल्या नाटकांपैकीच ‘कावळ्यांची शाळा’, ‘सखाराम बाईंडर’, ‘बेबी’, ‘कन्यादान’ आणि ‘शांतता! कोर्ट चालू आहे!’ या स्टोरीटेलवर सादर होणाऱ्या ऑडिओ नाटकांचे स्टोरीटेल ॲपवर प्रकाशन करून नाट्यरसिकांसाठी अनमोल अशी भेट देण्यात आली आहे.

स्टोरीटेलवर प्रकाशित झालेल्या या नाटकांपैकी ‘सखाराम बाईंडर’, ‘बेबी’, ‘कन्यादान’ आणि ‘शांतता! कोर्ट चालू आहे!’ या नाटकांचे दिग्दर्शन मंगेश कदम यांनी केले आहे तर ‘कावळ्यांची शाळा’ या नाट्यकृतीचे दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले आहे. तेंडूलकरांच्या या कलाकृतींचे ऑडिओ रूपातील सादरीकरण करतानाचे त्यांना आलेले अनुभव त्यांनी उपस्थितांसोबत कथन केले.
विजय तेंडुलकर ऑडिओ नाट्य महोत्सवातील नाटकांचे अभिवाचन अभिनेते संदीप पाठक, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत, आदिती देशपांडे, आनंद इंगळे, अमिता खोपकर, लीना भागवत, स्पृहा जोशी, अद्वैत दादरकर, मंगेश कदम, सुहास शिरसाट, पुंडलिक धुमाळ, राजन भिसे, पुष्कराज चिरपुटकर, डॉ. शिरीष आठवले, विश्वास जोशी, शैलेश दातार, शर्वरी पाटणकर, दुष्यंत वाघ, अक्षय शिंपी, शिरीष जोशी, संजय देशपांडे, जितेंद्र आगरकर, धनश्री खांडकर, भुषण गमरे, रोहित मोरे, धनश्री करमरकर आदि कलावंतांनी केले आहे. या ऑडिओ नाटकांना संगीत तेजस पडवे, सागर सपकाळे, तसेच तन्मय आणि विनय यांनी दिले आहे तर साऊंड रेकॉर्डिंग योगेश जाधव यांनी तर साऊंड डिजाईन मयूर मोचेमाडकर यांचे आहे. तर संगीत संकल्पना आणि संपूर्ण प्रकल्पाची आखणी व आयोजन स्टोरीटेलचे निर्मिती प्रमुख राहूल पाटील यांचे आहे.

‘स्टोरीटेलवर ‘तेंडूलकरांच्या अजरामर नाट्यकलाकृती’ ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

तेंडूलकरांच्या या नाट्यकलाकृती स्टोरीटेलवर ऐकण्यासाठील लिंक
https://www.storytel.com/in/en/authors/199859-Vijay-Tendulkar?pageNumber=1
तेंडूलकरांच्या या नाट्यकलाकृतीचे प्रोमो पहाण्यासाठी लिंक
https://www.youtube.com/watch?v=9Ng6w_eaCQw
https://www.youtube.com/watch?v=WHt3zYB2fYQ
https://www.youtube.com/watch?v=3gWhmqs5Cr8
Visuals footage Download link
https://wetransfer.com/downloads/11a052b5d935303c0c65027aac74de6d20220107120407/ffa6df08acabe0f3342a14be17db1b9f20220107120421/66aa30

क्रीडामंत्री सुनील केदार यांची राष्ट्रीय रोईंग स्पर्धेला भेट

0

पुणे, दि. ७: क्रीडामंत्री सुनील केदार यांनी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आर्मी रोईंग नोड येथे सुरू असलेल्या ३९ व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय रोईंग चॅम्पियनशीप स्पर्धा तसेच २३ व्या स्प्रिंट रोईंग स्पर्धेस भेट दिली.

यावेळी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सीएमई रोईंग नोडचे कमांडींग ऑफिसर कर्नल संदीप चहल, रोईंग फेडरेशन ऑफ इंडियाचे तहहयात अध्यक्ष कर्नल (निवृत्त) सी. पी. सिंग देव, वरिष्ठ उपाध्यक्ष राजपाल सिंग, रोईंग क्रीडाप्रकारच्या आंतरराष्ट्रीय पंच स्मिता शिरोळे- यादव आदी उपस्थित होते.

कर्नल चहल यांनी रोईंग नोडच्या स्थापनेबाबतची, आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. ही देशातील रोईंग अभ्यासक्रमाची एकमेव मानवनिर्मित सुविधा आहे. कंपन्यांच्या रसायनमिश्रित पाण्याचे शुद्धीकरण करून ते या रोईंगच्या तलावात सोडले जाते, असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत देशभरातील २६ संघटनांचे संघ सहभागी झाले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठीतून शिक्षण घेतलेल्या १५० उमेदवारांवर अन्याय-शिवसेनेचे मराठी प्रेम बेगडी

0

राजकीय फायद्यासाठी मराठीवर प्रेम-शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे

मुंबई- महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी निवड प्रक्रिया पूर्ण झाली असतानाही नोकरीसाठी उमेवारांना डावलणे जाणे, ही दुर्दैवी बाब आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता उपभोगत असलेल्या शिवसेनेचे मराठी प्रेम बेगडी असून राजकीय फायद्यासाठी मराठी माणसाचा वापर केला जात असल्याची टीका करत मुंबई भाजपा सचिव व शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे पुढे म्हणाले की, या उमेदवारांची तात्काळ शिक्षकपदी नियुक्ती न केल्यास मराठी माणसांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी त्यावेळी दिला.

महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी निवड प्रक्रिया पूर्ण झाली असतानाही नोकरीसाठी डावललेल्या उमेदवारांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षनेते विनोद मिश्रा, स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट, शिक्षण समिती सदस्य प्रतीक कर्पे, नगरसेवक पंकज यादव यांच्या शिष्टमंडळाने अन्यायग्रस्त उमेदवारांची भेट घेतली. आंदोलनात सहभागी झालेल्या उमेदवारांना आश्वासन देण्यात की, तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. भाजपा तुमच्या पाठीशी आहे.

त्यावेळी प्रतिक कर्पे म्हणाले की, मागील दोन वर्ष मराठी माध्यमामधून शिकलेली मुलं नोकरी करीता संघर्ष करत आहेत. नोकरीसाठी बोलवून त्यांना परत पाठवण्यात आले. आम्ही या बाबी महानगरपलिका अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिल्या. अनेक बैठका झाल्या तसेच शिक्षण समिती बैठकीत शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांच्या समोर देखील हे मुद्दे मांडण्यात आले पंरतु मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या मुलांना डावलण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. सदर उमेदवारांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले असले तरी व्यावसायिक शिक्षण इंग्रजीमधून झाले असतानाही शिवसेनेचा मराठी विषयीचा आकस अनाकलनीय आहे. सत्ताधारी शिवसेना मराठी माणसांसोबत असं वागून त्यांना मुंबई बाहेर काढायच्या प्रयत्नात असल्याचा आरोप प्रतिक कर्पे यांनी केला.

महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर, भूमिपुत्रांवर अन्याय करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी गाठ भाजपशी आहे, हे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे असा इशारा भारतीय जनता पक्षाचे गटनेते श्री. प्रभाकर शिंदे यांनी यावेळी दिला.