Home Blog Page 2125

या हंगामात भारतीय आंब्यांची अमेरिकेला निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारला मंजुरी प्राप्त

0

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2022

केंद्र सरकारने अमेरीकेच्या कृषी विभागाकडून या हंगामात भारतीय आंब्यांची अमेरिकेला निर्यात करण्यासाठी आवश्यक मंजुरी मिळविली आहे.आता अमेरिकेतील ग्राहकांना उत्कृष्ट प्रतीचे भारतातून पाठविलेले आंबे उपलब्ध होणार आहेत.
कोविड-19 महामारीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे, अमेरिकेच्या कृषी विभागातील निरीक्षकांना आंब्यांवरील विकिरण सुविधेची तपासणी करण्यासाठी  भारतात येणे शक्य नसल्यामुळे वर्ष 2020 पासून भारतीय आंब्यांच्या अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले होते.

23 नोव्हेंबर 2021 रोजी 12 वी भारत-अमेरिका व्यापार धोरण मंचाची बैठक झाली. त्यातील निर्णयांना अनुसरून नुकताच भारताचे कृषी मंत्रालय आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांच्यादरम्यान परस्परांच्या कृषीबाजारांमध्ये सुगमतेने प्रवेश देण्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या आराखडा करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या करारानुसार, भारतीय आंबे तसेच डाळिंबे यांची अमेरिकेला निर्यात आणि अमेरिकेच्या चेरी आणि अल्फाल्फा हे या पिकांची भारतात आयात करताना दोन्ही देश विकिरण संबंधी संयुक्त नियमावलीचे पालन करतील असे ठरविण्यात आले आहे.

परस्परांशी केलेल्या कराराचा भाग म्हणून, भारत हापूस आंब्याच्या येत्या मार्च महिन्यापासून सुरु होणाऱ्या हंगामात अमेरिकेला आंब्यांची निर्यात करू शकणार आहे.भारताने 2017-18 मध्ये 2.75 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स निर्यात मूल्याच्या 800 टन आंब्यांची अमेरिकेला निर्यात केली होती. त्यामुळे अमेरिकेत भारतीय आंब्यांना मोठी पसंती आणि तेथील ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. तसेच भारताने, 2018-19 मध्ये 3.63 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स निर्यात मूल्याच्या 951 टन आंब्यांची तर 2019-20 मध्ये 4.35 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स निर्यात मूल्याच्या 1,095 टन आंब्यांची अमेरिकेला निर्यात केली होती.

निर्यातदारांकडून व्यक्त झालेल्या अंदाजांनुसार, 2022 मधील आंबा निर्यात 2019-20 पेक्षा अधिक असेल, अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या निर्यात मंजुरीमुळे, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश तसेच तेलंगणा या आंबा उत्पादक पट्ट्यात पिकणाऱ्या आंब्यांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की या निर्णयामुळे, भारताच्या उत्तर तसेच पूर्व भागातील उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या लंगडा, दशहरी, फझली इत्यादी इतर जातींच्या चवदार आंब्यांच्या निर्यातीला देखील संधी मिळेल.

डाळिंबाच्या निर्यातीला एप्रिल 2022 मध्ये सुरुवात होईल तर अमेरिकेच्या अल्फाल्फा हे आणि चेरी यांची आयात देखील एप्रिल 2022 मध्येच सुरु होईल.

युवक आणि राष्ट्र उभारणीत स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीची समर्पकता विषद करणाऱ्या वेबिनारचे आयोजन

0

मुंबई, 11 जानेवारी 2022

“सामर्थ्य म्हणजेच जीवन आहे आणि दुर्बलता म्हणजे मृत्यू आहे,  चारित्र्याचे सामर्थ्य वापरून आपला युवावर्ग भविष्यात आपल्या देशामध्ये प्रगती घडवून आणेल,”असे विवेकानंद म्हणत असत. देशातील युवकांच्या सामर्थ्यावर त्यांना प्रचंड विश्वास होता. विवेकानंदांच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी आज 11 जानेवारी 2022 रोजी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे  पत्र सूचना कार्यालय, मुंबई यांनी नेहरू युवा केंद्र संघटनेसह संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘युवावर्ग आणि राष्ट्र-उभारणी: स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीची समर्पकता’ या विषयावरील वेबिनारमधे हे विचार मांडण्यात आले.

विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्यात येतो, त्याचसोबत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा उत्सवाचा भाग म्हणून या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता  दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, पुदुचेरी येथे साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.

स्वामीजींनी दिलेली विश्व बंधुत्वाची हाक आणि भारताला भूतकाळातील वैभव मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी मला सर्वात जास्त मोहित केले असे उद्गार जळगावच्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी या प्रसंगी काढले. समाजात सकारात्मक बदल घडवून आणणारे आयुष्य जगण्यासाठी त्यांनी संपूर्ण मानवतेला केलेल्या, “जर तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला असाल तर तुमचे नाव स्मरणात राहील असे काही कार्य करून नंतरच हे जग सोडून जा, नाहीतर तुमच्यात आणि इतर निर्जीव गोष्टींमध्ये काय फरक आहे” या आवाहनाची देखील महाजन यांनी यावेळी उपस्थितांना आठवण करून दिली. 

भारतीय स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेल्या, महात्मा गांधीजींसारख्या अनेक महान नेत्यांवर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव होता असे आनंद जनसेवा संथेचे अध्यक्ष आनंद दुबे यांनी सांगितले. स्वातंत्र्य चळवळीतील प्रत्येक नेता महापुरुष होता पण तरीही त्यांनी विवेकानंदांच्या उदात्त दूरदृष्टी आणि विचारांचे आदर्श ठेवले असे ते म्हणाले. दुबे यांनी याप्रसंगी, प्रत्त्येकाच्या आयुष्यात गुरु असण्याचे महत्त्व अधोरेखित करत, रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर कसा अमित ठसा उमटविला याचे वर्णन केले. आपल्या एकूण लोकसंख्येच्या 65% इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या युवकांनी चारित्र्य बांधणीचे कार्य केले तर भारत जागतिक नेता म्हणून स्थापित होण्याचा दिवस दूर नाही अशी आशा दुबे यांनी व्यक्त केली.

स्वामी विवेकानंदांनी अशा भारत मातेचे स्वप्न पाहिले जी सर्व शक्तीने आपल्या वैभव आणि सामर्थ्याबद्दल जागृत आहे आणि सर्व जगाला मार्गदर्शनपर शिकवण आणि संरक्षण देत आहे  असे उद्गार अमरावती येथील भारतीय मास कम्युनिकेशन संस्थेचे संचालक प्राध्यापक अनिल कुमार सौमित्र यांनी काढले. केवळ माहिती गोळा करण्याऐवजी ज्ञानार्जन करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, “आपण खऱ्या अर्थाने जाणकार समाज असण्याऐवजी माहितीने परिपूर्ण समाज बनत आहोत. दिवसेंदिवस यंत्रांनी आपले दैनंदिन जीवन नियंत्रित करण्यास सुरुवात केली आहे. परंतु हळूहळू आपण स्वामी विवेकानंद यांच्या संकल्पनेनुसार ज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यातील संतुलनाकडे वाटचाल करत आहोत. स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की पाश्चात्य आणि पूर्वेकडील जगाच्या विचारांमध्ये समतोल असायला हवा आणि त्यासाठी जगाच्या दोन्ही भागांनी एकमेकांच्या विचारसरणीला आपापल्या विचारधारेत आत्मसात केले पाहिजे”.

अतिरिक्त महासंचालक, स्मिता वत्स शर्मा यांनी महामारीच्या काळात देश कठीण परिस्थितीतून जात असताना देशातील तरुणांनी दिलेल्या योगदानाबद्दल  माहिती सांगितली,त्या म्हणाल्या,”  “गेल्या दोन वर्षात कोविड-19 च्या महामारीच्या रोगाच्या विरूद्ध करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये तसेच मागील वर्षभरात देशात राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत या देशातील तरुणांचे मोठे योगदान आहे,” असे त्यांनी कौतुक केले.  समाजातील नवोदित महिला उद्योजिका म्हणजे आपल्या देशाच्या ‘कन्या’ समाजातील जवळपास सर्वच क्षेत्रात विजय मिळवत आहेत, याविषयीही त्यांनी सांगितले.

विवेकानंदांच्या तेजोमयी आणि दैवी सामर्थ्याने राष्ट्र उभारणीसाठी कसे योगदान दिले आणि प्रत्येकाने स्वतःच्या जीवनातील प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवले पाहिजे याबाबत ते कसे आग्रही होते याबाबत नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठीचे संचालक प्रकाश मनुरे यांनी माहिती दिली. जर तुम्हांला भारताविषयी जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचले पाहिजे, स्वामीजी हे एक दैवी व्यक्तिमत्त्व होते आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी होते असेही त्यांनी सांगितले.

या वेबिनारच्या अखेरीस प्रश्नोत्तरांचे सत्र झाले. अमरावतीच्या आयआयएमसीतील विद्यार्थ्यांनी वक्तव्यांना प्रश्न विचारले.

माहीती प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म्स डिव्हिजनने निर्माण केलेली विवेकानंदांच्या जीवनावर आधारीत चित्रफीतही यावेळी दाखविण्यात आली.  

सीओईपी जम्बो कोविड रुग्णालयाला तीन महिने मुदतवाढ

0

पुणे–शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) येथील जम्बो कोविड रुग्णालयाला तीन महिने मुदतवाढ दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या जम्बो रुग्णालयात एकूण ८०० बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी ६०० ऑक्सिजन बेड, १०० आयसीसू बेड आणि १०० एचडीयू बेडसचा समावेश आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी या रुग्णालयाला मुदतवाढ देण्यात आली होती. कोविडच्या संभाव्य तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेता या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला.

रासनु पुढे म्हणाले, सध्या मेडबोज हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने खाटा आणि उपचाराचे व्यवस्थापन केले जाते. एका ऑक्सिजन बेडसाठी १४०४ रुपये, एका आयसीयू बेडसाठी ४३८५ रुपये, एका एचडीयू बेडसाठी ३८४३ रुपये आणि कोविड केअर सेंटरसाठी प्रत्येकी ९५० रुपये आकारले जातात. दीपाली डिझार्इन्स अण्ड एक्झिबीटस कंपनीच्या वतीने मूलभूत सुविधा पुरविणे, स्वच्छता आणि सुरक्षिततेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना दरमहा १ कोटी ८८ लाख इतका दर प्रतिमाह मान्य करण्यात आला होता.

रासने पुढे म्हणाले, जे. एस. के. मेडिकल सिस्टिमच्या वतीने बायोमेडिकल उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. मेडब्रोज हेल्थकेअरने नियुक्त केलेल्या सीर्इओपी जम्बो कोविड सेंटर इमर्जन्सी सर्व्हिसेस कंपनी औषधाचा पुरवठा करीत आहे. जेनेरिक औषधांच्या छापील किंमतीवर ७७ टक्के आणि बॅण्डेड औषधांच्या छापील किंमतीवर ३६ टक्के सवलत देण्यात येते. या कंपनीला दरमहा पाच लाख ५० हजार दर मान्य करण्यात आला होता. वरील नियमांनुसार जम्बो रुग्णालयाला तीन महिन्यांसाठी मान्यता देण्यात आली आहे. कोविड १९ अंतर्गत जम्बो रुग्णालयासाठी करण्यात आलेल्या पंचाहत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीतून हा खर्च केला जाणार आहे.

देवाची उरुळी येथील कचरा प्रकल्पाची क्षमता वाढणार-रामटेकडी येथील कचऱ्यावर प्रक्रियेसाठी पावणेनऊ कोटीचे टेंडर मंजूर

0

पुणे- देवाची उरूळी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची दैनंदिन क्षमता वाढविण्यासाठी आणि त्यानुसार प्रत्यक्ष प्रक्रिया होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात देखभाल दुरुस्तीसाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट २३ गावांमुळे शहरातील कचरा निर्मितीत वाढ झाली असून, दररोज २२०० ते २३०० मेट्रिक टन कचर्याची निर्मिती होत आहे. यापैकी २५० ते ३०० मेट्रिक टन कचर्याची कचरा वेचकांमार्फत निर्मितीच्या ठिकाणी विल्हेवाट किंवा पुन:प्रक्रिया केली जाते. यामुळे दररोज १८०० ते १९०० मेट्रिक टन कचर्याचे संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. समाविष्ट गावांमध्ये २५० ते ३०० मेट्रिक टन कचर्याची निर्मिती होत असून, त्याची विल्हेवाट करण्याची यंत्रणा महापालिकेकडे सध्या नाही. त्यामुळे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) निविदा मागविण्यात आल्या होत्या.रासने पुढे म्हणाले, या निविदांना आलेल्या प्रतिसादानुसार पहिल्या टप्प्यात समाविष्ट गावांतील कचरा व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने देवाची उरुळी येथील २०० मेट्रिक टन मिश्र कचरा प्रकल्पाचे प्रकल्पधारक भूमी ग्रीन एनर्जी यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार या प्रकल्पाची दैनंदिन प्रक्रिया क्षमता धारकाच्या खर्चाने किमान १५० मेट्रिक टनने (५० टन जुना आणि १०० टन ओला) वाढविण्यास आणि त्यासाठी प्रकल्प धारकाला लगतची एक एकर जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रक्रिया होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात देखभाल दुरुस्तीसाठी चालू निविदा दराला म्हणजेच प्रती मेट्रिक टन रुपये ५०२ (जीएसटी शिवाय) देण्यास आणि प्रतिवर्ष साडेआठ टक्के दरवाढ याप्रमाणे पुढील १५ वर्षांसाठी सुधारीत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.रासने म्हणाले, रामटेकडी येथे साठलेल्या एकूण ७५ हजार ८६३ मेट्रिक टन कचर्यापैकी ६४ लाख २३५ मेट्रिक टन कचर्याच्या विल्हेवाटीचे काम बाकी आहे. गेल्या दोन महिन्यांत ११ हजार ६३८ मेट्रिक टन कचर्यावर प्रक्रिया करण्यात आली होती. रामटेकडी येथे प्रक्रियेसाठी पुरेशी जागा नसल्याने तेथून कचर्याची वाहतूक करून अन्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रति मेट्रिक टन ८७५ रुपये या प्रमाणे निविदेला मान्यता देण्यात आली असून, सुमारे एक लाख मेट्रिक टन कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी ८ कोटी ७५ लाख रुपये पर्यंतचे काम करून घेण्यास मान्यता देण्यात आली.

२६ फेब्रुवारीला आयुक्तांचे अंदाजपत्रक

महापालिका आयुक्तांना येत्या २६ फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजता पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मांडण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.रासने म्हणाले, महापालिका अधिनियम कलम ९५ नुसार महापालिकेचे महसूली, भांडवली इत्यादी उत्पन्न आणि खर्चाच्या अंदाजपत्रकाचा आराखडा आयुक्तांनी दरवर्षी १५ जानेवारीपूर्वी स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. या वर्षी सार्वत्रिक निवडणूक कामकाज असल्यामुळे २६ फेब्रुवारीला अंदाजपत्रक मांडण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाने ठेवला होता. स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली.

कोथरुड बालनाट्यगृहात विविध विकासकामे-३ कोटी १० लाख ८२ हजार रुपयांचे टेंडर मंजूर

कोथरुड येथे नव्यान बांधण्यात येणार्या बालनाट्यगृहात मल्टिलेव्हल पार्किंगवरील पोडियम व सभागृह इत्यादी विकासकामे करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली.रासने म्हणाले, विविध विकासकामांसाठी ३ कोटी १० लाख ८२ हजार रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली. सुमारे ३८ लाख रुपये जीएसटी, १ लाख ५८ हजार रुपये रॉयल्टी चार्जेस आणि ३२ हजार रुपये मटेरियल टेस्टिंग शुल्कापोटी अदा करण्यात येणार आहेत.

शिक्षण मंडळातील रोजंदारीवरील ९६ सेवकांना मिळणार बोनस

शिक्षण मंडळातील रोजंदारीवरील ९६ सेवकांना बोनस आणि सानुग्रह अनुदान देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.रासने म्हणाले, बोनस मिळण्यासाठी सेवकांना १७४ दिवस काम करणे बंधनकारक असते. परंतु या वर्षी कोरोनामुळे या सेवकांना कामावर रुजू करुन घेण्यासाठी प्रशासनाकडून विलंब झाल्याने त्यांचे १७४ दिवस पूर्ण भरू शकले नाहीत. मात्र कोरोना काळात या कर्मचार्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंतर्गत त्यांना दिलेली कामे आणीबाणीच्या स्थितीतही योग्य पद्धतीने पार पाडली. या बाबीचा सकारात्मक विचार करुन ९६ कर्मचार्यांना बोनस आणि सानुग्रह अनुदान देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

मनपा सेवकांच्या गणवेश दरांना मान्यता

पुणे – महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या गणवेश आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी दरांना स्थायी समितीने मान्यता दिली.रासने म्हणाले, महापालिकेच्या मान्य गणवेश नियमावलीनुसार तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्यांना गणवेश आणि इतर साहित्य खरेदीसाठी या दरांनुसार रोख स्वरुपात त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. सेवक, निरीक्षक, शिपाई, वाहनचालक, सुरक्षारक्षक, रखवालदार आदी सेवकांना गणवेश दिले जातात. गणवेशासह बूट, चप्पल, सॅण्डल, हॅण्डग्लोज, गमबूट, हेल्मेट, मास्क, रेनकोट, सेफ्टी गॉगल, जंतुनाषक साबण, ऑफीस बॅग आदी साहित्याचा आवश्यकतेनुसार समावेश केला जातो.

राज्य क्रीडा पुरस्कारार्थींचा सत्कार

राज्य सरकारच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त आणखी ६ खेळाडू आणि ११ मार्गदर्शकांचा पुणे महापालिकेच्या वतीने पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती रासने यांनी दिली.रासने म्हणाले, शिवछत्रपती पुरस्काराच्या धर्तीवर शहरातील गुणवंत खेळाडूंना पुणे महापालिका क्रीडा पुरस्कार देते. प्रत्येकी पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पूर्वी २३७ खेळाडू आणि प्रशिक्षकांची निवड करण्यात आली होती. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आणखी ६ खेळाडू आणि ११ प्रशिक्षकांनी क्रीडा समितीकडे नव्याने अर्ज केले होते. त्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण २५५ खेळाडूंचा गौरव होणार आहे. त्यासाठी आवश्यक निधीला मान्यता देण्यात आली.

आपच्या इशाऱ्यानंतर कमला नेहरु रुग्णालयाच्या आयसीयूत वातानुकूलीत यंत्रणा बसविण्यास मान्यता

0

पुणे- कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षे बंद असलेला मेडिकल आयसीयू अद्यापही सुरु नाही अशी ओरड करत आम आदमी पार्टीने इशारा दिल्यानंतर आज पुणे महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) वातानुकूलीत यंत्रणा बसविण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात महापालिकेचा अतिदक्षता विभाग विकसित करण्यात येत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांना तातडीचे आणि अतिदक्षता विभागातील उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. या अतिदक्षता विभागासाठी आवश्यक असणारी वातानुकूलीत यंत्रणा बसविण्यासाठी स्थायी समितीने सुमारे ३४ लाख १५ हजार रुपयांच्या निविदेला मान्यता दिली.

आम आदमी पार्टीच्या डॉ. अभिजित मोरेंनी आरोग्य विभागातील अनेक गैरप्रकारांवर आवाज उठविला आहे, डॉक्टर भरती रखडवलीच्या आरोपांपासून अनेक महापालिकेच्या रुग्णालयांच्या बाबत तक्रारी केल्या आहेत.

सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी १५ लघुपटांमध्ये चुरशीचा सामना!

0

मुंबई: १९७२ साली स्थापना झालेल्या आणि मुंबई व महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, खेळ आदी क्षेत्रात जाणीवतेने कार्य करणार्‍या ‘प्रबोधन गोरेगाव’ संस्थेद्वारे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त “प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा”चे आयोजन महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

लघुपट करणार्‍या करू इच्छिणार्‍या जगभरातील मराठी कलावंतांसाठी एक भरभक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन लघुपटांच्या निर्मितीसोबत त्यांचे मार्केटिंग आणि विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत सहभाग घेण्यातील मार्गदर्शनही देण्यात येणार आहे. प्रख्यात जागतिक कीर्तीचे चित्रपट अभ्यासक, समीक्षक व दिग्दर्शक अशोक राणे हे या ‘महोत्सव संचालक’ म्हणून कार्यभार पहात आहेत तर मंगेश मर्ढेकर यांनी या महोत्सवाच्या ‘कार्यक्रम संचालक’पदी योगदान दिले आहे.

महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दि. १४ जानेवारी २०२२ रोजी पु. ल. देश्पांडे कला अकादमी, दादर, मुंबई येथे या वेळेत संपन्न होणार असून या सोहळ्यास लोकप्रिय अभिनेते संदीप कुलकर्णी  प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यासोबतच चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार मिळविणार्‍या गोदावरी या मराठी चित्रपटाचे अभिनेते जितेंद्र जोशी व दिग्दर्शक निखिल महाजन यांचा विशेष सन्मान व गौरव या समारंभात करण्यात येण्यात आहे. महोत्सवाचा समारोप समारंभ सायंकाळी ५ : ३० वा. ते ६ : ३० वा. या वेळेत संपन्न होणार असून केवळ निमंत्रितासाठी प्रवेश दिला जाणार आहे. जगभरातील प्रेक्षकांना हा समारंभ संस्थेच्या अधिकृत https://www.facebook.com/prabodhanisff या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येणार आहे.

या महोत्सवासाठी ७० हून अधिक मराठी लघुपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.  त्यामधून निवड समितीने दक्षतेने १५ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे.

अधिकृत निवड झालेले चित्रपट:

१. अंकुर / दिग्दर्शक: महादेव आनंदराव धुलधर / २७ मि. ३७ से.

२. अर्जुन / दिग्दर्शक: शिवराज वाईचळ / १४ मि. ४५ से.

३. बटर चिकन / दिग्दर्शक: मयुरेश वेंगुर्लेकर / १८ मि. १४ से.

४. फक्त १४४ / दिग्दर्शक: अशोक यादव / १२ मि. ५५ से.

५. खिसा / दिग्दर्शक: राज मोरे / १५ मि. ५६ से.

६. लगाम / दिग्दर्शक: मदन काळे / २० मि.

७. लाल / दिग्दर्शक: सुमीत पाटिल / २६ मि. ३३ से.

८. वन्स ही डिड अ टीनएज पेंटिंग / दिग्दर्शक: ओमकार दामले / २० मि. ०२ से.

९. प्रयोग / दिग्दर्शक: पुष्पक जळगावकर / २४ मि. ३१ से.

१०. राजा / दिग्दर्शक: संतोष बांदेकर / १७ मि. १४ से.

११. सप्पर / दिग्दर्शक: अमोल साळवे / १६ मि. १२ से.

१२. साईड मिरर / दिग्दर्शक: विराज झुंजारराव / २६ मि. ५० से.

१३. ताजमहाल / दिग्दर्शक: प्रविण खाडे / १० मि. ५४ से.

१४. द कॉईन / दिग्दर्शक: रुपेश वेदे / ११ मि. ३६ से.

१५. विकट / दिग्दर्शक: देवदत्त मांजरेकर / ०६ मि. ३० से.

या १५ लघुपटांमधून प्रथम निवडल्या जाणाऱ्या एकास सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळणार असून रु. ७५,०००/- रोख रक्कम व ट्रॉफी व प्रमाणपत्र बक्षिस देण्यात येईल. तसेच द्वितीय लघुपटाला रु. ५०,०००/- रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र आणि तृतीय लघुपटास रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

संपुर्ण पुरस्कारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे –

सर्वोत्कृष्ट लघुपट – प्रथम पुरस्कार

रु. ७५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

सर्वोत्कृष्ट लघुपट – द्वितीय पुरस्कार

रु. ५०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

सर्वोत्कृष्ट लघुपट – तृतीय पुरस्कार

रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

सर्वोत्कृष्ट अभिनेता

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट पटकथालेखक

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट संकलक

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट ध्वनि

(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

याशिवाय अन्य विशेष पुरस्कारही महोत्सवाकडून देण्यात येणार आहेत –

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक महाराष्ट्र यापैकी एखाद्या विषयांवरील सर्वोत्कृष्ट लघुपट

(रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

मराठी साहित्यकृतीवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपट

(रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

फिल्म स्कूल किंवा मास मिडिया इन्स्टिट्यूट्समध्ये फिल्ममेकिंगचे प्रशिक्षण घेणार्‍या दिग्दर्शकांपैकी सर्वोत्कृष्ट लघुपट

(रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

मराठी नाट्यकृतीवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपट

(रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

महोत्सव व पुरस्कार वितरण समारंभ:

महोत्सवामधे निवडलेल्या १५ लघुपटांचे स्क्रीनिंग आणि त्यानंतर विजेत्यांना पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दि. १४ जानेवारी २०२२ रोजी मिनी थिएटर, पु. ल. देशपांडे अकादमी (दादर, मुंबई) येथे आयोजित करण्यात येत आहे. हा समारंभ सायंकाळी ५ : ३० वा. ते ६ : ३० वा. या वेळेत संपन्न होणार असून केवळ निमंत्रितासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनेने राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेऊन काम करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
  • महाराष्ट्र दिनी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धे’चे आयोजन करणार.

मुंबई, दि. ११:- राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी तसेच अगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात येत्या महाराष्ट्र दिनापासून ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ या नावाने मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा ठराव उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पदके जिंकून देण्यासाठी ऑलिम्पिक असोसिएशनने राज्याच्या क्रीडा विभागाशी समन्वय ठेऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार मंत्रालयातील त्यांच्या दालनातून ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, उपाध्यक्ष अशोक पंडीत, उपाध्यक्ष जय कवळी, महासचिव नामदेव शिरगावकर, सदस्य दीपक मेजारी, अभय छाजेड यांच्यासह व्हिसीद्वारे बाळासाहेब लांडगे, धनंजय भोसले, प्रकाश तुळपुळे, प्रशांत देशपांडे, स्मिता यादव, सुंदर अय्यर, उदय डोंगरे, राजाराम राऊत, सोपान कटके, निलेश जगताप, संदीप चौधरी, गोविंद मुथुकुमार, खासगी सचिव अविनाश सोलवट, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 2024, 2028, 2032 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सर्व संघटनांनी ‘ऑलिम्पिक व्हिजन डॉक्यूमेंट’ लवकरात लवकर तयार करुन राज्याच्या क्रीडा विभागाला सादर करावे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटाशी आपण सामना करत आहोत. या कोविड संकटामुळे खेळाडूंचे मनोबल खचू नये, यासाठी ऑलिम्पिक असोसिएशनने काम केले पाहिजे. राज्याच्या क्रीडा विकासात भरीव योगदान देण्यासाठी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल. कोरोना संकटात सर्व खेळाडूंची काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणपालन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून ऑनलाइन साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

राज्यातील १४ महापालिका व २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकां होणार किंवा नाही …

0

मुंबई- राज्यातील १४ महापालिका व २६ जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या मार्चअखेर पार पडतील असा समीक्षकांचा दावा आहे. १७ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर राज्य निवडणूक आयोग यावर भूमिका स्पष्ट करणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसोबतच मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडाव्यात, अशी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची इछ्या असल्याचे वृत्त आहे .दरम्यान कोरोना ,ओमायक्रोन च्या महामारीचा हि विचार याबाबत करावा लागणार आहे.

२०१७ मध्ये राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. सध्या १४ महापालिका आणि २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारने तीन महिने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाला विचारणा केली असता सध्या प्रभाग रचनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. ज्या सुधारणा सुचवल्या आहेत त्या पुढच्या आठवड्यापर्यंत पूर्ण होतील. नंतर हरकती मागवल्या जातील. मात्र १७ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षण सुनावणीत काय होते ते पाहून आयोग भूमिका मांडेल असे सांगण्यात आले.

दरम्यान, बहुसदस्यीय प्रभाग पद्धती आणि मुंबईत ९ प्रभाग वाढवण्यात आल्या प्रकरणाच्या दाखल याचिकेची सुनावणी पूर्ण होईल. मुंबईत ३९ टक्के मतदार अमराठी आहेत. त्यात मोठा वाटा उत्तर प्रदेशातील मतदारांचा आहे. पश्चिम उपनगरात ज्या पक्षांचे ५० नगरसेवक निवडून येतात त्यांचा महापौर होतो. उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने पश्चिम उपनगरातच आहेत. हा मतदार मुंबई महापालिकेतील विराेधी पक्ष असलेल्या भाजपचा पाठीराखा आहे. त्यामुळे यूपीबरोबर महापालिकांच्या निवडणुका घ्या, असे शिवसेनेतील नेतेगण नेतृत्वाकडे आग्रही मागणी करीत आहेत. म्हणूनच उत्तर भारतातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच राज्यातील मिनी विधानसभा निवडणुका पार पडतील, अशी चिन्हे आहेत.

फेब्रुवारी महिन्यात निवडणूक कार्यक्रमांची घोषणा अपेक्षित
जानेवारीअखेरपर्यंत प्रभाग रचना आराखड्यांची दुसरी फेरी संपणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीत निवडणूक कार्यक्रम घोषित केला तरी मार्चमध्ये निवडणुका होतील असा अंदाज आहे. पाच राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने ओमायक्राॅनचे कारण पुढे करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्राचा ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराने सन्मान ‘गुणवत्ता सुधार’ वर्गवारीत महावितरणचा तृतीय क्रमांक

0

मुंबईदि. ११ जानेवारी २०२२ : नवनवीन संकल्पनांचा प्रभावी वापर, महावितरणच्या ग्राहकांना उच्चदर्जाची सेवा मिळावी व त्याकरिता आधुनिक  तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून  वीजहानी कमी करण्याचे यशस्वी प्रयत्न करणे या निकषांवर महाराष्ट्राची ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराकरिता प्रथम क्रमांकाने तर ‘गुणवत्ता सुधार’ या वर्गवारीत महावितरणची तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

१५ व्या इंडिया एनर्जी समिटमध्ये देशभरातील २९ वीज वितरण कंपन्यांनमधून विविध निकषांच्या आधारे हे पुरस्कार देण्यात आले. आज ऑनलाईन संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महावितरणच्या वतीने संचालक(प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

इंडियन चेबर ऑफ कॉमर्सच्यावतीने आज दि.१० व ११ जानेवारी असे दोन दिवस या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत भारताचे माजी मुख्य ऊर्जा सचिव अनिल राजदान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्काराची  निवड केली. राज्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता महावितरण ही अत्यंत कठीण परिस्थितीतही चांगले काम करत असल्याचे गौरव उद्गार अनिल राजदान यांनी काढले.

महावितरणला हा सन्मान म्हणजे अधिकारी-कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्ना चे फलित आहे. ग्राहकसेवेचे हे व्रत असेच जोपासत त्यात गुणात्मक वाढ करण्याचा मानस यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या पुरस्कारकाच्या निमित्ताने व्यक्त केला.

महावितरणने राज्यात गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधा व वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उभारण्यात यशस्वी ठरली आहे. महावितरणने आपल्या दैनंदिन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढविला असून यामुळे ग्राहकांना वीजबिल भरणे, नवीन वीजजोडणी घेणे, मीटर रीडिंग पाठवणे, तक्रार नोंदणी करणे अशा अनेक सुविधा एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. ईआरपी प्रणालीमुळे महावितरणच्या कामात अधिक पारदर्शकता व गतिशीलता आली आहे. येत्या काही वर्षात महावितरणकडून स्मार्ट मीटरचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.

लोकांच्या जिवाची सुरक्षा हीच रस्ता सुरक्षेची मुख्य संकल्पना – परिवहन मंत्री ॲड.अनिल परब

0

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. रस्ते सुरक्षेसाठी आपण काय उपाययोजना करतो याकडे सर्वांचे लक्ष असते. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण कुठे कमी पडतोय याचे आत्मचिंतन करुन रस्ते सुरक्षा ही लोकांची सुरक्षा आहे, त्यांच्या जिवाची सुरक्षा आहे असे समजून घेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची 11वी बैठक संपन्न झाली. बैठकीला परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन उपायुक्त राजेंद्र मदने, सह परिवहन आयुक्त (रस्ता सुरक्षा) जितेंद्र पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव मो.बा. कुलकर्णी, आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

परिवहन मंत्री ॲड.परब म्हणाले, अपघातामुळे निष्पाप लोकांचा जीव जातो आणि त्यांचे कुटुंब संकटात सापडते. घरातला एखादा कर्ता व्यक्ती मृत्यु पावल्यास त्या कुटुंबाची आर्थिक आणि मानसिक अवस्था काय होते ही आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे लोकांच्या जिवाची सुरक्षा हीच रस्ता सुरक्षेची संकल्पना असली पाहिजे. यासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तरावर गठीत केलेल्या समित्यांनी वारंवार आढावा घेऊन राज्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे.

रस्ते सुरक्षेसाठी कायद्याच्या धाकाबरोबरच प्रबोधनाची सुद्धा गरज आहे. यासाठी प्रमुख महामार्गावर वेगाची मर्यादा दर्शविणारे फलक, गतिरोधक, अपघात ठिकाणाची माहिती, वळण असलेल्या रस्त्याची माहिती असे माहिती फलक असले पाहिजे. अपघातामध्ये होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे.

अपघात झालेल्या रुग्णाला वेळेत उपचार मिळणे आवश्यक असते. त्यासाठी आरोग्य यंत्रणेनी सहकार्य करावे.  ग्रामीण भागामध्ये ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागे रेडियमच्या पट्ट्या दर्शनी भागावर असाव्यात अशा सूचना करून  महाराष्ट्रातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही ॲड.परब यांनी यावेळी केले.

अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह म्हणाले, गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी अपघाताची संख्या कमी झाली तरी ती समाधानकारक नाही. ही संख्या कमी दिसत असली तरी मृत्यू आणि जखमींची संख्या अधिक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार सर्व उपाययोजना करुन शून्य अपघाताचे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्हा स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच शिस्त, नियमांचे पालन, संवेदना, सुरक्षितता आणि कारवाई यातून वाहनचालकांची मानसिकता अनुकुल करुन सकारात्मक मानसिकतेकडे नेले पाहिजे आणि चांगले वाहनचालक तयार होतील याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

यासाठी एक वेबपोर्टल तयार करण्यात यावे. यावर झालेल्या रस्ते अपघातांविषयी माहिती, अपघाताचे प्रकार, ठिकाण, अपघाताची वेळ, नेमके कारण याची माहिती स्थानिक समितीने त्यावर दिली पाहिजे.  जिथे अपघात झाला त्याठिकाणी जावून स्थानिक प्रशासनाने संबंधित विभागाला  अपघाताचे कारण कळविले पाहिजे, अशा सूचनाही श्री.सिंह यांनी यावेळी केल्या. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या विभागाचे आणि सेव्ह लाईफ फांऊडेशन, परिसर या सेवाभावी संस्थेने सादरीकरण केले.

13 आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत -शरद पवार

0

मुंबई- लवकरच भाजपला गळती लागणार आहे ,आज उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.आणखी भाजपचे 13 आमदार भाजप सोडणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.मौर्य यांच्याकडे चार विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. योगी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मौर्य हे श्रम आणि सेवायोजन व समन्वय मंत्री होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मौर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्याची माहिती देखील शरद पवारांनी दिली.उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आगामी विधानसभा लढवणार आहोत. असे भाष्य शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केले.

भाजपला गळती लागणार
आज भाजपचे नेते तसेच उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का पोहोचला आहे. आणखी भाजपचे 13 आमदार भाजप सोडणार असून, यापुढे भाजपला गळती लागणार असल्याचा इशारा शरद पवारांनी दिला आहे.

लोकांना बदल हवा आहे
उत्तर प्रदेशातील लोकांना आता बदल हवा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढणार असून, नक्कीच परिवर्तन घडेल असे पवार म्हणाले. उत्तर प्रदेशात अल्पसंख्याक समाज असुरक्षित असून, मुद्दामुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात संप्रदायाचे विचार रुजवण्याची गरज आहे. असे देखील पवार म्हणाले.

“विकासाचा महामार्ग”

0

शहरी भागामध्ये सुविधा पुरवतानाच नागरी जीवन सुखकर करण्यासाठी गेल्या दोन वर्षात नगरविकास विभागाने विविध निर्णय घेतले असून या निर्णयांची अंमलबजावणी करण्यावर विशेष भर दिला आहे. शिवाय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या माध्यमातून अधिक सुखकर प्रवासाकरिता उभारण्यात येणारे रस्ते प्रकल्प विकासाचे राजमार्ग ठरत आहेत.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदूमिल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवून पादपीठ 30 मीटर (100 फूट) उंच व पुतळा 106.68 मीटर (350 फूट) वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच आता पुतळा 136.68 मीटर उंचीचा (450 फूट) करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुधारित अंदाजित खर्च 1089.95 कोटी रुपये अपेक्षित आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क, दादर येथील महापौर निवास परिसरातील जागेवर प्रस्तावित केलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणीस 28 फेब्रुवारी 2021 च्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित मान्यता देण्यात आली आहे. सुधारित आराखडयाप्रमाणे दोन टप्प्यांमधील कामांसाठी 400 कोटी रुपयांचे ढोबळ अंदाज पत्रक तयार केले आहे.

मेट्रोची कामे प्रगतिपथावर

यंदाच्या वर्षी राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी भरीव आर्थिक तरतूद केल्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर येथील मेट्रोची कामे प्रगतिपथावर आहेत. राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी 2021-22 यावर्षासाठी 3693.14 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. नागपूर मेट्रो मार्गिकेला उपमार्ग सेवेने जोडण्यासाठी नागपूर शहर आणि परिसरातील भारतीय रेल्वेच्या मार्गांवर आधारित आधुनिक वातानुकूलित ब्रॉडगेज मेट्रोट्रेन्स सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी महामेट्रोच्या सुमारे 305 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता दिली आहे. पिंपरी-चिंचवड ते निगडी मार्गिका क्र. 1-ए या उन्नत मेट्रो मार्गाच्या अंमलबजावणीस सुधारित मान्यता देण्यात आली आहे.

नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम सुधारणेनुसार नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर महानगरपालिका आणि नगरपरिषदेत देखील बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका, नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण :महाराष्ट्र सर्वोत्तम

 ‘स्वच्छ शहर’ पुरस्कारामध्ये विटा, लोणावळा आणि सासवड या नगरपालिकांनी देशात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे देशातील एकूण पुरस्कारांच्या 40 टक्के पुरस्कार या वर्षी महाराष्ट्राला मिळाले ही अभिमानाची बाब आहे. फाईव्ह स्टार मानांकनांमध्येदेशातील 9 शहरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा समावेश झाला आहे. नवीमुंबई महापालिका महाराष्ट्राच्या  पहिल्या वॉटरप्लस सर्टिफिकेटची आणि सफाई मित्रसुरक्षा चॅलेंज द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.

महत्त्वाचे निर्णय

  इलेक्ट्रिक वाहनधोरण 2021– इलेक्ट्रिक वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन्स उभारणाऱ्या स्थानिक नाग़री संस्थांमधील नागरिकांना, गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या मालमत्ता करात सूट देण्यात येणार आहे. त्याशिवाय मा. बाळासाहेब ठाकरे माजीसैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजनेंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील माजीसैनिकांना देखील मालमत्ता करातून सूट देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत गेल्या दोन वर्षात 1301 कोटी रुपये किमतीच्या 23 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. महानगरपालिका, नगरपरिषदा तसेच इतर नियोजन प्राधिकरणां करिता एक त्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू करण्यात आली आहे. प्रचलित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकापोटी आकारण्यात येणाऱ्या अधिमूल्यामध्ये सवलत दिली आहे. ही सवलत सध्या सुरू असलेल्या व नव्या प्रकल्पांना लागू आहे. त्याशिवाय पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिनियमात सुधारणा

31 डिसेंबर 2020 पर्यंत ज्या ठिकाणी गुंठेवारी योजना झाल्या आहेत परंतु त्यांचे नियमितीकरण झालेले नाही त्यांना या अधिनियमातील दुरुस्तीचा लाभ घेता येणार आहे. शासनाच्या ताब्यात आलेल्या 5 टक्के स्वेच्छाधिकार कोट्यातील सदनिका शासकीय विभागांनी मागणी न केल्यास व मागणी शिवाय शिल्लक असलेल्या सदनिका जाहिरातीद्वारे वाटप करण्यासाठी म्हाडाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनावरील उपचारांसाठी मुंबई आणि एमएमआर प्रदेशात आरोग्याच्या जम्बो सुविधांची निर्मिती या विभागाने केली आहे. वांद्रे-कुर्लासंकुल, मालाड (प.), कांजूरमार्ग, कांदरपाडा डेपो, रिचर्डसन व क्रुडास कंपनी परिसरात आणि पनवेल व उरण भागात कोविड हेल्थसेंटर्स तसेच दहिसर जकात नाका येथे अलगीकरण केंद्र उभारली. कोविडमुळे लावलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर अधिकृत फेरीवाले- पथविक्रेत्यांना, अधिकृत सायकल रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला.

महामार्गांचे काम प्रगतिपथावर

राज्यातील रस्त्यांचा विकास, बांधकाम आणि देखरेखीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकासमहामंडळ कार्यरत आहे. नागपूर-मुंबई दरम्यान बांधण्यात येणार्‍या 701 कि.मी. लांबीच्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे ’हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करण्यात आले असून, आजपर्यंत या प्रकल्पाचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. नांदेड शहरातील रस्ते व गोदावरी पूल ही कामे नांदेड-जालना या 194 कि.मी. लांबीच्या समृद्धी महामार्ग या प्रस्तावित रस्त्याचा भाग म्हणून घेण्यास मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मान्यता दिली आहे. एकूण साडेसहा हजार कोटी रुपये अंदाजित किमतीचा हा प्रकल्प असून नांदेडशहर व परभणी, हिंगोली जिल्हे समृद्धी महामार्गास जोडण्यासाठी लवकरच काम सुरू होणार आहे.

रस्ते प्रकल्पांना गती

मुंबई-पुणे (यशवंतराव चव्हाण) द्रुत गतीमार्गाची क्षमता वाढ करण्यात येत असून 10.50 कि.मी. लांबीचे 2 भुयारी मार्ग आणि 2 कि.मी.चे 2 लांब पूल अशा 6695 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू या 17.17 कि.मी. लांबीच्या 11 हजार 333 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. ठाणे खाडीपूल क्र. 3 या 1837 मीटर लांबीच्या रुपये 776 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या नवघर ते बलावलीप्र कल्पाच्या (सुधारित) प्रस्तावित केलेल्या 39841.93 कोटी रुपये

एकनाथ शिंदे

मंत्री, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर विधानसभा लढवणार ; लवकरच उत्तर प्रदेशचा करणार दौरा

0

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांवर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांविषयी मोठी घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी 3 राज्यात निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती पवारांनी दिली आहे.उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार हटवण्याची गरज आहे. उत्तरप्रदेशात परिवर्तन होणार असून नागरिकांना बदल हवा आहे. याकरिता सिराज मेहंदी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. येत्या दिवसात त्यांचे अनेक सहयोगी राष्ट्रवादीत येणार आहेत. असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार उत्तर प्रदेशचा दौरा करणार

उत्तरप्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच उत्तरप्रदेशात जाणार असल्याचंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच एकत्र बैठकीत जागा वाटप धोरण ठरणार असल्याचे शरद पवार म्हणाले.

भाजपचे गोव्यातून सरकार हटवण्याची गरज

मणिपूरमध्ये पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. मणिपूर राज्यात काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे. तसेच गोव्यातही काँग्रेस पक्षासोबत आणि तृणमूल काँग्रेस पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. गोव्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. भाजपचे गोव्यातून सरकार हटवण्याची गरज आहे. येत्या दोन दिवसांत आघाडीचा निर्णय होईल असेही शरद पवार म्हणाले.

स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत चंद्रोस क्रिकेट अकादमी संघाचा पहिला विजय

0

पुणे, दि.11 जानेवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजीत स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत अमन शेख(2-6) याने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर चंद्रोस क्रिकेट अकादमी संघाने अजिंक्य क्रिकेट क्लबचा 6 गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला.
ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत चंद्रोस क्रिकेट अकादमीच्या अमन शेख(2-6), दिप पाटील(2-8), स्वराज मासगुडे(2-11), रिंकू सांगवन(1-9)यांच्या अचूक गोलंदाजीपुढे अजिंक्य क्रिकेट क्लबचा डाव 14.5षटकात 43 धावावर कोसळला. यात अंबरेश सय्यालीच्या 15धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. चंद्रोस क्रिकेट अकादमी संघाने हे आव्हान  7.2 षटकात 4बाद 44धावा करून पूर्ण केले. यामध्ये दिप पाटील 13, स्वराज मासगुडे 8, स्वरीत परंदकर नाबाद 7 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी अमन शेख ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:अजिंक्य क्रिकेट क्लब: 14.5षटकात सर्वबाद 43 धावा(अंबरेश सय्याली 15, अमन शेख 2-6, दिप पाटील 2-8, स्वराज मासगुडे 2-11, रिंकू सांगवन 1-9)पराभूत वि.चंद्रोस क्रिकेट अकादमी: 7.2 षटकात 4बाद 44धावा(दिप पाटील 13, स्वराज मासगुडे 8, स्वरीत परंदकर नाबाद 7, वेदांत अरुतवार 2-16, आभास दाणी 1-5, अक्षत गणेश 1-6);सामनावीर-अमन शेख; चंद्रोस क्रिकेट अकादमी संघ 6 गडी राखून विजयी.

‘चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ऍव्हेंजर्सचा संघर्षपूर्ण विजय

0

पुणे, दि. 11 जानेवारी 2022: मुकुंद जोशी आणि डॉ.अमित पाटणकर यांच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन ऍव्हेंजर्स संघाने टेनिस द मिनास संघावर 18-17 असा संघर्षपूर्ण विजय मिळवत विजयी सलामी दिली. 
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात केतन जाधव, अभिजीत मराठे, मंगेश प्रभुदेसाई, शंतनू शौरी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्कन ऍव्हेंजर्स संघाने टेनिस द मिनास संघावर 18-17 असा सनसनाटी विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात लायन्स संघाने मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन संघाचा 24-05 असा एकतर्फी विजय मिळवला. विजयी संघाकडून अमित नाटेकर, राहुल मुथा,  सारंग पाबळकर, ध्रुव मेड,  नरहर गर्गे, रोहन दळवी,  सारंग देवी, अमोघ बेहरे यांनी अफलातून कामगिरी बजावली. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 
डेक्कन ऍव्हेंजर्स वि.वि.टेनिस द मिनास 18-17(100 अधिक गट: आनंद कोटस्थाने/सुरेश घुले पराभूत वि.राजीव पागे/पराग चोप्रा 2-6; 90 अधिक गट: केतन जाधव/अभिजीत मराठे वि.वि.अमित महाजनी/संग्राम पाटील 6-2; खुला गट: गोपीनाथ/आनंद कोटस्थाने पराभूत वि.अभिजीत शहा/सचिन पुरोहित 4-6; खुला गट: मंगेश प्रभुदेसाई/शंतनू शौरी वि.वि.अजिंक्य मुठे/अभिजीत खानविलकर  6-3);
लायन्स वि.वि.मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन 24-05(100अधिक गट: अमित नाटेकर/राहुल मुथा वि.वि.विकास/सूरज झंझोटे 6-0; 90 अधिक गट: सारंग पाबळकर/ध्रुव मेड वि.वि.संजीव/सचिन बी. 6-3; खुला गट: नरहर गर्गे/रोहन दळवी वि.वि.विकास/धैर्यशील गोहिल 6-0; खुला गट: सारंग देवी/अमोघ बेहरे वि.वि.सुयश/नरेश 6-2);