Home Blog Page 2121

अतुल जयप्रकाश गोयलांना अजित पवारांच्या नावाने खंडणी मागण्याच्या प्रकारावर अजित पवारांची प्रतिक्रिया , म्हणाले कठोर कारवाई करा

0

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून पुण्यातील बडे आणि बहुचर्चित राहिलेले बांधकाम व्यावसायिक अतुल जयप्रकाश गोयल यांना वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता.परंतु पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत सहा जणांना अटक केली. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील सर्किट हाउस या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी गृहमंत्र्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले.

अजित पवार म्हणाले, माझ्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार घडल्याचे माझ्या कानावर आले आहे. ज्या अतुल गोयला खंडणीसाठी फोन गेला होता तो मला ओळखतो. अतुल गोयलला माहीत आहे की, मी ज्यावेळी फोन करतो तेव्हा पलिकडच्या बाजूला प्रायव्हेट नंबर येतो. परंतु आरोपींनी सॉफ्टवेअरचा वापर केल्यामुळे तिकडे माझं नाव गेलं, यामुळे अतुलला संशय आला आणि त्यांनी मला हा प्रकार कळवला. माझ्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्याबरोबर मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना संपर्क साधला. तेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे देखील माझ्यासोबत होते. त्यानंतर आम्ही सायबर पोलिसांना याविषयीची माहिती दिली. सायबर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करून सहा लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन त्याद्वारे त्यांचा पी ए बोलत असल्याचे भासवून एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून २० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा व त्यातील २ लाख रुपये स्विकारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने सापळा रचून ६ जणांना अटक केली आहे.

याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अतुल जयप्रकाश गोयल (वय ४७, रा. वानवडी) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय २८, रा. हवेली), सौरभ नारायण काकडे (वय २०, रा. हडपसर), सुनिल ऊर्फ बाळा गौतम वाघमारे (वय २८, रा. हवेली), किरण रामभाऊ काकडे (वय २५) चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय १९, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) आणि आकाश शरद निकाळजे (वय २४, रा. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ऊर्जा समृद्धीच्या दिशेने

0

विजेशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही. त्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षात ऊर्जा विभागाने देदीप्य मान कामगिरी केली. राज्यात विजेची मागणी लक्षात घेता नव्या पर्यायांचा विचार करून विभागाने कृषीपंप वीज जोडणी धोरण, अपारंपरिक ऊर्जा धोरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण आदी योजनांच्या माध्यमातून ऊर्जा समृद्धीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

डॉ. नितीन राऊत

मंत्री, ऊर्जा

          राज्यातील कृषि क्षेत्रात विकासामध्ये ऊर्जाक्षेत्राचा मोठा वाटा असून कृषि ग्राहकांना नवीन वीज जोडणी देणे व त्यांच्या वीजबिलाच्या थकबाकीचा प्रश्न सोडवण्याकरिता राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी असे अभिनव कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 जाहीर केले.

          या कृषीधोरण 2020 नुसार 30 मीटरच्या आत सर्व कृषी ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी मिळणार आहे. ज्या कृषिपंप अर्जदाराचे अंतर लघुदाब वाहिनीच्या 200 मीटरच्या आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्थ आहे, अशा नवीन कृषीपंप ग्राहकांना एरियलबंच केबलद्वारे तीन महिन्यात नवीन वीज जोडणी मिळणार आहे. वरील वीजजोडणी करिता आवश्यक असणारी लघुदाब वाहिनी एरियलबंच केबल स्वतःच्या खर्चाने उभारायची असून, त्यासाठी झालेल्या खर्चाचा 100% परतावा त्या ग्राहकांच्या वीज बिलामधून केला जाणार आहे. जर अर्जदार आर्थिक कारणामुळे खर्च करण्यास सक्षम नसेल, तर त्याला अर्जदारांच्या क्रमवारीनुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार वीज जोडणी देण्यात येईल.

200 ते 600 मीटरच्या आत असलेल्या कृषी ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीचा (एचव्हीडीएस) पर्याय तसेच पारेषण विरहित सौरऊर्जेवरील पंपाचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. जुन्या थकबाकीवर 5 वर्षांपूर्वीच्या म्हणजेच सप्टेंबर 2015 पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज  माफ करण्यात येत आहे. तसेच 5 वर्षापर्यंतच्या म्हणजेच सप्टेंबर 2015 पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज आयोगाने ठरवलेल्या भांडवलावरील व्याजदरानुसार सुधारित थकबाकी संगणकात निश्चित करून चालू बिल वेळेत भरल्यास थकबाकी 3 वर्षांत भरण्याची मुभा राज्यातील सर्व कृषीग्राहकांना देण्यात आली आहे.

अपारंपरिक ऊर्जा धोरण

          राज्याचे नवीन अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा धोरण – 2020 तयार करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत राज्यात विजेची वाढती मागणी विचारात घेता पुढील पाच वर्षात 17,360 मेगावॅट इतकी पर्यावरणपूरक वीज क्षमता वृद्धीचे नवीन अपारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे.

जीवन प्रकाश योजना

14 एप्रिलते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणाद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय या योजनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीजपुरवठ्या संबंधी असणार्‍या तक्रारी/ समस्यांचे निवारण करण्याबाबतही समावेश असेल.

सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण

          राज्य शासनाने 18 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या कृषिपंप वीज जोडणी धोरण-2020 नुसार सर्व शेतकर्‍यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा सुनिश्चित वीज पुरवठा करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने व केंद्रशासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून शेतकर्‍यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थाण महाभियान (कुसुम) विचारात घेऊन राज्यातील कृषिपंप वीज जोडण्यांचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान जाहीर करण्यात आले आहे.

          शासनाने 31 मार्च 2018 पर्यंत नवीन विद्युत पुरवठ्याकरिता पैसे भरलेल्या ग्राहकांना वीज पुरवठा करण्याकरिता 5 मे 2018 च्या शासन निर्णयाप्रमाणे 5048 कोटी रुपयांच्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेत एका रोहित्रावर फक्त एक किंवा दोन ग्राहकांना कृषिपंप जोडणी देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पैसे भरलेल्या 2.24 लाख कृषी ग्राहकांना वीज पुरवठा देण्याकरिता तसेच विद्यमान व संभाव्य कृषिपंपांचा वीज भार वितरित करण्याकरिता 226 वीज उपकेंद्र स्थापित करण्याचा समावेश आहे. उच्च दाब वितरण प्रणाली योजनेच्या 4734.61 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेंतर्गत 31 मार्च 2018 अखेर वीज जोडणीकरिता प्रलंबित असणार्‍या कृषि पंप अर्जदारांना वीज जोडण्या देण्याकरिता या योजनेची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सौरऊर्जा प्रकल्पांना मान्यता

          वाशिम येथील वाशिम-1 येथे 130 मेगावॅट, वाशिम-2 येथे 40 मेगावॅट, मौजे. कचराळा जि. चंद्रपूर येथे 145 मेगावॅट, यवतमाळ येथे 75 मेगावॅट असे एकूण 390 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणी. तसेच मौजे कौडगाव, जिल्हा उस्मानाबाद येथे 50 मेगावॅट, मौजे सिंदाला (लोहारा), जिल्हा लातूर येथे 60 मेगावॅट, औष्णिक विद्युत केंद्रा मधील सद्य:स्थिती वापरात नसलेल्या उपलब्ध जागेवर (भुसावळ – 20 मेगावॅट, परळी – 12 मेगावॅट, कोरडी – 12 मेगावॅट व नाशिक – 8 मेगावॅट) असे एकूण 52 मेगावॅट आणि मौजे शिवाजीनगर, साक्री जिल्हा धुळे येथे 25 मेगावॅट असे एकंदरीत 187 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीला मान्यता देण्यात आली आहे.

तौक्तेनिसर्ग चक्रीवादळ

          तौक्ते चक्रीवादळामुळे 16 ते 18 मे 2021 या कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, व पालघर जिल्ह्यातील वीज वाहक तारा तुटल्यामुळे व वीज खांब उन्मळून पडल्यामुळे वीज वितरणयंत्रणा कोलमडून पडली. यामध्ये 201 उच्चदाब उपकेंद्रे, 1342 उच्चदाब वाहिन्या व 36,030 वितरण रोहित्रे बाधित झाले होते व 8623 विजेचे खांब पडले होते. तौक्ते चक्रीवादळामुळे 5,575 गावातील 36.13 लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तौक्ते चक्रीवादळामध्ये महावितरणचे अंदाजे रुपये 58.5 कोटी इतक्या रकमेचे नुकसान झाले, तर निसर्ग चक्रीवादळामुळे 3 जून 2020 रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, मालेगाव, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील वीज वाहकतारा तुटल्यामुळे व वीज खांब उन्मळून पडल्यामुळे वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडल्याने 7,578 गावातील 51.62 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. निसर्ग चक्रीवादळामध्ये महावितरणचे अंदाजे रुपये 196.99 कोटी इतक्या रकमेचे नुकसान झाले. तौक्ते व निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले असले तरी ऊर्जा विभागाने कंबर कसून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, यासाठी प्रभावित भागातील सर्व विद्युत यंत्रणा युद्धपातळीवर पूर्ववत केली.

          या दोन वर्षात या सरकारने केलेल्या कामाचा लेखा जोखा देताना आणि त्यावर घेतलेले निर्णय या राज्यातील जनतेला समोर ठेऊन घेण्यात आले. त्यामुळे आपल्याला उत्तमोत्तम सेवा देऊ शकलो आणि येणार्‍या उर्वरित काळातही राज्यातील जनता लोडशेडिंग, शॉर्टेज यांसारख्या समस्यांना सामोरे जाणार नाही. सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऊर्जा विभाग निरंतर काम करत राहील, यासाठी आपले वीज बिल वेळेत आणि विहित मार्गाने भरा आणि राज्याच्या विकासात आपलीही भूमिका योग्य रीतीने बजावा.

शब्दांकन :संजय डी. ओरके,

विभागीय संपर्क अधिकारी

गेल्या 24 तासांत, देशात 2,64,202 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद

0

महाराष्ट्राकडे कोवॅक्सिन या लसीच्या न वापरलेल्या 24 लाखांपेक्षा जास्त मात्रा

15 कोटी 17 लाखांपेक्षा जास्त न वापरलेल्या (15,17,25,871) मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप शिल्लक

नवी दिल्ली- गेल्या 24 तासांत, देशात 2,64,202 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 12,72,073 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 3.48% आहे. केंद्र सरकारने हि माहिती जारी केली आहे .

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 73 लाखांहून अधिक (73,03,669) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 155 कोटी 39 लाखांचा (1,55,39,81,819)टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 1,65,59,387 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

गेल्या 24 तासांत 1,09,345 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून)आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,48,24,706 झाली आहे. परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 95.20% झाला आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 2,64,202 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 12,72,073 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 3.48% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 17,87,457 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 69 कोटी 90 लाखांहून अधिक (69,90,99,084) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 11.83% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 14.78%.इतका आहे.

इतर अपडेट्‌स :-

केंद्र सरकारने आतापर्यंत लसींच्या 157 कोटी 50 लाखांपेक्षा जास्त (1,57,50,62,435) मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य पध्दतीने) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. 15 कोटी 17 लाखांपेक्षा जास्त न वापरलेल्या (15,17,25,871) मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप शिल्लक आहेत.


भारतामध्ये कोविड-19 च्या पहिल्या दोन लाटांमध्ये ज्या लोकांचे मृत्यू झाले त्यांच्या प्रत्यक्ष संख्येपेक्षा खूपच कमी प्रमाणात मृत्यूंची संख्या दाखवली गेली अशा प्रकारचे आरोप करणारे आणि प्रत्यक्षात मृत्यूंची एकूण संख्या खूपच जास्त म्हणजे तीस लाखांपेक्षा जास्त असू शकेल असा दावा करणारे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तासंदर्भात असे स्पष्ट करण्यात येत आहे की हे वृत्त पूर्णपणे असत्य आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहे. कोणत्याही वस्तुस्थितीला ते धरून नाही आणि अतिशय खोडसाळ स्वरुपाचे आहे.


महाराष्ट्रात लसींचा तुटवडा असल्याचे सांगणारे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर लसींच्या तुटवड्यामुळे राज्याला लसीकरणाची गती वाढवणे शक्य होत नसल्याचे देखील या वृत्तात म्हटले आहे. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आणि अपुऱ्या माहितीवर आधारित आहे. याबाबत असे स्पष्ट करण्यात येत आहे की आज उपलब्ध झालेल्या अहवालानुसार(14 जानेवारी 2022) महाराष्ट्राकडे कोवॅक्सिन या लसीच्या न वापरलेल्या 24 लाखांपेक्षा जास्त मात्रा आहेत.

उत्तर प्रदेशात भाजपचे 8 आमदार समाजवादी पक्षात

0

लखनऊ-उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपला गळती लागली आहे. आमदार स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह 8 आमदारांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी स्वामी प्रसाद मौर्य आणि धर्म सिंह सैनी यांनी भाजप आणि योगी सरकारवर हल्लाबोल केला. यासोबत, बसप सुप्रीमो मायावती यांच्यावरही निशाणा साधला. समाजवादी पक्षात प्रवेश करताच या नेत्यांनी मोठी विधाने केली आहेत.

योगींच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले, भाजपचा सफाया करून उत्तर प्रदेशला भाजपच्या शोषणातून मुक्त करायचे आहेत. अखिलेश यांच्यासोबत मिळून भाजपचा नायनाट करू. अखिलेश तरुण-तडफदार आहेत. शिकलेले आहेत आणि त्यांच्यात नवीन ऊर्जा आहे.

मायावतींना सुद्धा अहंकार

मौर्य यांनी मायावतींवर सुद्धा हल्लाबोल केला. “ज्यांची साथ सोडतो त्यांना काहीच पत्ता नसतो. बहनजी त्याचेच एक उदाहरण आहेत. त्यांच्यात अहंकार आला होता. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विसरल्या होत्या. काशीराम यांनाही विसरल्या. परिवर्तन आंदोलनाच्या घोषणेलाच बदलले. पिशवीवाल्याच्या मागे उभ्या राहिल्या. मी साथ सोडताच काय हाल झाले त्यांचे.”

योगींनी दलित आणि मागास लोकांचा हक्क हिरावून उच्चवर्णीयांना दिला

भाजपचे मोठ-मोठे नेते कुंभकरणासारखे झोपले होते. त्यांना कधी आमदार किंवा मंत्र्यांशी बोलायला वेळ नव्हता. आता आम्ही राजीनामा दिला तेव्हा त्यांची झोप उडाली आहे. आजही सत्तेत आलेल्यांपैकी 5 टक्के लोक केवळ मलई खातात. आता 80 आणि 20 ची नाही तर 15 आणि 85 अशी लढाई आहे. 85 आमचे आहेत आणि 15 मध्ये आधीच फूट पडली आहे. योगींनी दलित आणि मागास लोकांचा हक्क हिरावून उच्चवर्णीयांना दिला आहे असा आरोपही मौर्य यांनी केला.

सीएमच्या खुर्चीवर बसून पाप करत आहेत योगी

एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्री पदावर बसून योगी आदित्यनाथ पाप करत आहेत आणि हिंदूंचा दाखला देतात. दलित हिंदू नाहीत का? तुमच्या नजेर केवळ 5 टक्के लोक हिंदू असतील तर मग आम्ही तुमची वाट लागणे निश्चित आहे अशा शब्दांत मौर्य यांनी योगींना सुनावले.

भाजपचे आणखी एक मंत्री राहिलेले धर्म सिंह सैनी यांनी तर अखिलेश भावी नाही तर मुख्यमंत्रीच आहेत असे म्हटले आहे. कोरोना आणि आचारसंहिता नसती तर त्यांना 10 लाख लोकांची सभा घेऊन सन्मानित केले असते. दलित आणि मागास वर्गाने त्यांनाच मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. भाजपच्या तुलनेत कित्येक पट अधिक सन्मान समाजवादी पक्षात येणाऱ्यांना मिळत आहे.

चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य, नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

0

नवी दिल्ली-चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आले असल्याचे नितीन गडकरींनी म्हटले आहे. एअरबॅग अनिवार्य करण्याला मंजुरी दिली आहे असेही गडकरींनी स्पष्ट केले.

नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. हा मसुदा GSR अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच एक जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 01 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती. असे गडकरी यांनी म्हटले आहे.

चारचाकी गाडींमध्ये पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांना टक्करांचा प्रभाव कमी करण्यासाठी, M1 वाहन श्रेणी म्हणजेच आठ आसनी वाहनामध्ये 4 अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील वाहनांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एअरबॅग नियमांमुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक चांगली होईलस असेही गडकरी यांनी सांगितले.

किंमत 3000 ते 4000 रुपयांपर्यंत वाढेल
एअरबॅग्सची संख्या वाढली तर कारमधील अतिरिक्त एअरबॅगमुळे कारची किंमत प्रति एअरबॅग 3,000 ते 4,000 रुपयांनी वाढेल. मात्र रस्ते अपघात झाल्यास आपल्या देशातील गरिबांनाही संरक्षण मिळाले पाहिजे. एका अहवालानुसार, मागच्या सीटवरील प्रवाशांसाठी चार एअर बॅग्स लावल्या तर किंमत फक्त 8 ते 9 हजारांनी वाढेल. एअर बॅग्सची किंमत 1800 रुपये आहे आणि त्याचं मॉडिफिकेशन करण्यासाठी 500 रुपयांचा खर्च येईल. यात मजुरी आणि महागाई दरही आहे. दुसरीकडे, कंपनी उत्पादकांच्या मते एअरबॅग्स दिल्यास गाड्यांची किंमत 30 हजारांनी वाढेल.

आर्वी तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

मुंबई, दि. १४ : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात  केल्याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांकडून संबंधित डॉक्टर व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी. घटनेच्या अनुषंगाने  शहानिशा करुन गृहमंत्री तसेच गृह राज्यमंत्री यांना पत्राद्वारे या घटनेबद्दल माहिती दिली असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

या प्रकरणात आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मदत करणारे, त्यांचे साथीदार यांचा शोध घेऊन त्यांना त्वरित अटक करण्यात यावी. कायदेशीर गर्भपात करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समिती असते. या समितीची बैठक प्रत्यक्ष किंवा दूरदृश्य प्रणालीमार्फत नियमित होणे गरजेचे आहे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत अखत्यारित येणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयातील ‘जैव वैद्यकीय कचरा’ किती होतो, किती प्रमाणात गोळा केला जातो याबाबतचा तपशील, अहवाल सर्व हॉस्पिटल यांनी संबंधित प्रशासनाला द्यावा. पीडितेला मनोधैर्य योजनेतून तात्काळ मदत मिळवून देण्यात यावी, अशा मागण्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी  निवेदनाद्वारे केल्या आहेत.

225 फूट लांब, 150 फूट रुंद वजन (अंदाजे) 1400 किलोग्रॅम चा ध्वज फडकविणार

0

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2022

खादी कापडापासून बनवलेला जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज शनिवारी “सैन्य दिन” साजरा करण्यासाठी जैसलमेर मधील भारत-पाकिस्तान सीमेवर भव्य सार्वजनिक प्रदर्शनासाठी फडकवला जाईल. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक युद्धाचा केंद्रबिंदू असलेल्या लोंगेवाला येथे हा राष्ट्रीय ध्वज फडकवला जाईल.

2 ऑक्टोबर 2021 रोजी लेहमध्ये अनावरण केल्यापासून या राष्ट्रीय ध्वजाचे हे 5 वे सार्वजनिक प्रदर्शन असेल. 8 ऑक्टोबर 2021 रोजी हवाई दल दिनानिमित्त हिंडन हवाई तळावर आणि 21 ऑक्टोबर रोजी भारतात 100 कोटी कोविड लसीकरण पूर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर हा ध्वज फडकवण्यात  आला होता. 4 डिसेंबर 2021 रोजी, नौदल दिन साजरा करण्यासाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील नौदल गोदी येथे हा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात  आला.

भारतीयत्वाच्या सामूहिक भावनेचे आणि खादीच्या कारागिरीचे  प्रतीक असलेल्या  या राष्ट्रीय ध्वजाची संकल्पना  स्वातंत्र्याची 75 वर्षे , ‘ स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव’,  साजरा  करण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC)  तयार केली आहे.. ऐतिहासिक प्रसंगी प्रमुख ठिकाणी  प्रदर्शित करण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने हा ध्वज संरक्षण दलांकडे सुपूर्द केला आहे.

हा राष्ट्रीय ध्वज 225 फूट लांब, 150 फूट रुंद असून वजन (अंदाजे) 1400 किलोग्रॅम आहे. हा ध्वज तयार करण्यासाठी 70 खादी कारागिरांना 49 दिवस लागले. या राष्ट्रीय ध्वजाच्या निर्मितीमुळे खादी कारागीर आणि संबंधित कामगारांसाठी सुमारे 3500 मनुष्य तास अतिरिक्त रोजगाराची निर्मिती झाली .

एकूण 33, 750 चौरस फूट क्षेत्रफळ असलेला ध्वज तयार करण्यासाठी हाताने कातलेल्या, हाताने विणलेल्या तब्बल 4500 मीटर खादी कापडाचा  वापर करण्यात आला आहे. ध्वजातील अशोक चक्र 30 फूट व्यासाचे आहे.”


4.500 कोटींहून अधिक किमतीच्या बनावट पावत्या ; 1 अटक

0

जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाची कारवाई

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2022

व्यवसायाच्या मुख्य ठिकाणी अस्तित्वात नसल्याचे आढळून आलेल्या काही बनावट कंपन्यांविरुद्ध DGGI अर्थात वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाद्वारे अलीकडेच गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बनावट कंपन्यांमागील खऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी, जीएसटी विवरणपत्र प्रत्यक्षात कोठून भरले गेले याचा प्रत्यक्ष पत्ता तपासण्यात आला. त्यानंतर 06.01.2022 रोजी दिल्लीतील त्या जागेची झडती घेण्यात आली. मालक त्याच्या सर्व्हरवर विविध ग्राहकांना त्यांची आर्थिक खाती राखण्यासाठी ‘क्लाउड स्टोरेज’ सेवा पुरवण्यात गुंतलेला असल्याचे शोध मोहिमेदरम्यान आढळून आले.

शोध मोहिमेदरम्यान मोबाईल फोन, विविध चेकबुक, विविध कंपन्यांचे शिक्के आणि सिमकार्डसह मोठ्या प्रमाणात सदोष कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या व्यक्तींची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे, मोबाईल आणि ई-मेलचे विश्लेषण केल्यावर असे आढळून आले आहे की, या व्यक्ती दिल्लीतील संकुलात सापडलेल्या सर्व्हरवर दूरस्थपणे डेटा ठेवत आहेत.

टॅली डेटाच्या छाननीत असे दिसून आले आहे की या सिंडीकेटद्वारे 636 कंपन्या कार्यरत आहेत. त्याच्या सूत्रधाराने मान्य केले आहे की त्यांनी या कंपन्यांमध्ये फक्त पावत्या जारी केल्या आहेत आणि त्यांना कोणताही माल पुरवठा केलेला नाही. त्यांनी अंदाजे 741 कोटी रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) निहित असणाऱ्या अंदाजे 4,521 कोटी रुपये करपात्र मूल्य असलेल्या पावत्या जारी केल्या आहेत.

आत्तापर्यंत या कंपन्यांच्या विविध बँक खात्यांमध्ये असलेले 7 कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. या संपूर्ण रॅकेटमागील सूत्रधाराला 13.01.2022 रोजी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेमध्ये सूर्यनमस्कारांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन

0

पुणे , 14 जानेवारी 2022

14 जानेवारी 2022 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने आजादी का अमृतमहोत्सव सोहळ्यांतर्गत आभासी माध्यमांद्वारे व्यापक प्रमाणात सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले. मकर संक्रांतीचा सण आपल्या सभोवताली आरोग्य, संपत्ती आणि आनंदाचा प्रसार करणाऱ्या निसर्गमातेचे आभार व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. सध्याच्या काळात पुन्हा पसरत चाललेल्या कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मकर संक्रातीच्या निमित्ताने सूर्यनमस्कारांची प्रात्यक्षिके अधिकच समर्पक ठरतात. आज 14-1-2022 रोजी जगभरातून सुमारे 75 लाख लोक सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था(एनआयएन) या स्वायत्त संस्थेने, कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करत  हा दिवस मातोश्री रमाबाई आंबेडकर मार्गावरील आपल्या संकुलात तसेच गोहे, आंबेगाव येथील आदिवासी केंद्रातही आपले कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्व आरोग्यप्रेमींच्या उपस्थितीत सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांचे आयोजन करून साजरा केला. 

मकर संक्रातीच्या निमित्ताने पुण्यामध्ये राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेत आयोजित सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक कार्यक्रमात प्रोफेसर डॉ. के. सत्यलक्ष्मी यांनी मार्गदर्शन केले

यावेळी संस्थेच्या संचालक प्रो. डॉ. के सत्यलक्ष्मी यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. प्रत्येकाने नियमितपणे सूर्यनमस्कार करण्यासाठी आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करण्यासाठी वचनबद्ध असले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. सूर्यनमस्काराच्या नियमित सरावाने शरीरातील उर्जेमध्ये आणि रोगप्रतिकार क्षमतेमध्ये वाढ होते, असे त्यांनी सांगितले. हा सराव सूर्यप्रकाशात केल्यास शरीरात ड जीवनसत्व देखील निर्माण होते जे संसर्गांना रोखण्यासाठी महत्त्वाचे असते, अशी माहिती त्यांनी दिली.   

पुण्यात आंबेगावमधील गोहे येथील एनआयएनच्या आदिवासी केंद्रामध्ये सूर्यनमस्कार सादरीकरण

यावेळी एनआयएनचे डॉक्टर, उपचार देणारे आणि एनआयएनच्या विद्यार्थ्यांनी देखील प्रात्यक्षिके सादर केली आणि आजादी का अमृतमहोत्सव सोहळ्यातील जागतिक स्तरावरील 75 लाख सूर्यनमस्कार सादरीकरणात आपले योगदान दिले.

पवारांवर विश्वास नसेल तर अन्य सहकाऱ्याकडे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवा-भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी

0

पुणे, ता. १४ : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढत असताना सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्रात प्रचंड अनागोंदी माजली असून प्रकृतीच्या कारणामुळे प्रदीर्घ काळ राज्य कारभारापासून दूर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किंवा अन्य  सहकाऱ्यांकडे सोपवावीत, आणि राज्याला अनागोंदीपासून वाचवावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी शुक्रवारी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृतीस आराम पडावा अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.पवारांवर  किंवा राष्ट्रवादीवर विश्वास नसेल तर अन्य ‘विश्वासू’  सहकाऱ्याकडे कार्यभार सोपवा, पण राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्या, असेही ते म्हणाले.गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया झाली, तेव्हापासून पूर्णवेळ मुख्यमंत्री नसल्याने महाराष्ट्र निर्नायकी झाला असून मंत्रिमंडळही भरकटले आहे. अगोदरच कोरोना महामारीचे संकट वाढत असताना कायदा सुव्यवस्था स्थितीही बिघडली आहे. बलात्कार, खून, दरोडे, फसवणूक, भ्रष्टाचाराची प्रकरणे दिवसागणिक वाढत असून राज्य दिशाहीन झाल्याचीच ही लक्षणे आहेत. अशा स्थितीत, मुख्यमंत्री मात्र प्रकृतीच्या कारणामुळे दैनंदिन कारभारातही लक्ष घालू शकत नसल्याने राज्याचे अतोनात नुकसान होत आहे. दीर्घकाळ अनुपस्थित असल्यास पदभार अन्य ज्येष्ठ सहकाऱ्याकडे सोपविण्याची प्रथा अमलात आणण्याची हीच ती वेळ असून आता राज्याला अधिक अस्थिरतेकडे ढकलण्याऐवजी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हस्तांतरित करून ठाकरे यांनी राज्यकारभारात स्थैर्य आणावे अशी मागणी श्री. भांडारी यांनी केली.राज्याच्या कानाकोपऱ्यात जनता असंख्य समस्यांचा सामना करत असताना मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर देखील पडू शकत नाहीत, व मंत्रालयापर्यंत जाणेही त्यांना शक्य होत नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनासही ते उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे सरकार दिशाहीन व निर्नायकी झाले आहे. कोरोनास्थितीचा आढावा घेण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी निमंत्रित केलेल्या महत्वपूर्ण दूरसंवाद बैठकीसही ते प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. सलग अडीच तास बसणेदेखील त्यांना शक्य नाही अशी कबुली राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीच दिलेली असल्याने, उद्धव ठाकरे यांनी पूर्ण विश्रांती घेऊन ठणठणीत बरे व्हावे अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे अनेक गंभीर प्रश्न टांगणीवर लागले असून संकटे आणि समस्यांनी घेरलेल्या महाराष्ट्रात अधिक काळ निर्नायकी ठेवणे योग्य नाही, असेही श्री. भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.

तब्येत बरी होईपर्यंत उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा-आ.चंद्रकांतदादा पाटील

0


मुंबई-राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल कोरोनाच्या प्रश्नावर झालेल्या देशव्यापी बैठकीत मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सलाही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली पाहिजे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.मुख्यमंत्र्यांनी पदभार दुसऱ्याकडे सोपविण्याची वेळ आली आहे का, असे एका पत्रकाराने विचारले असता आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा वेळी निर्णय घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नाहीत. संकटाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वतीने कोणी मुख्यमंत्री म्हणून काम करावे हे ठरविण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपण मुख्यमंत्र्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो पण तब्येत बरी होईपर्यंत त्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा.महाराष्ट्रातील परिस्थिती देशात चांगली आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल्याचे एका पत्रकाराने निदर्शनाला आणले असता आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते गेले ७० दिवस कोणालाही उपलब्ध नाहीत. एसटीचा संप चालू असून ७० पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकारी भरतीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटत आहेत. निराशेमुळे तरुणांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता नाही. त्यांना विमा मिळत नाही आणि नुकसानभरपाईही मिळत नाही. असे असूनही महाराष्ट्राची परिस्थिती चांगली आहे असे संजय राऊत यांना वाटत असेल तर ठीक आहे.
नशिबाने काल परवा प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या संजय राउतांसारख्या नेत्याने आपल्या दृष्टीची चिंता करू नये. ती तपासायला भाजपाचे नेतृत्व समर्थ आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत चेअरमनपद मिळवले पण उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कसा पडला हे त्या पक्षाला समजत नाही. तुम्हाला पूर्णपणे संपविण्याचा डाव चालू असून त्यात तुम्ही फसत चालला आहात. त्याची आधी चिंता करा, असा टोला त्यांनी हाणला

प्रेमाचं वादळ “लॉ ऑफ लव्ह” ४ फेब्रुवारीला

0


प्रेमाचा अर्थ नव्याने उलगडून सांगण्याकरता चित्रपट निर्माते जे. उदय यांचा “लॉ ऑफ लव्ह” हा सिनेमा व्हॅलेंटाईन महिन्यात ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख त्यांच्या सोशल मीडियाद्वारे जाहीर करत चाहतेवर्गाला ही गोड बातमी दिली आहे.
अभिनेता जे. उदय यांचा चित्रपट निर्मिती तसेच अभिनयाचा पहिलाच अनुभव असून त्यांच्या सोबत असलेली अभिनेत्री शालवी शाह देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याप्रमाणेच या सिनेमात जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर अनिल नगरकर, रवी कदम, योगेश पवार आणि सचिन मस्के तसेच अभिनेत्री प्राची पालवे यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत.
यानिमित्ताने चित्रपटाचे निर्माते तसेच अभिनेते जे. उदय सांगतात,”प्रेमाची नवी परिभाषा चित्रपटामार्फत सांगण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, आम्हाला खात्री आहे की या चित्रपटातुन आम्ही प्रेक्षकांची मने जिंकू.” 
वेदिका फिल्म क्रिएशन निर्मित “लॉ ऑफ लव्ह” येत्या ४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

काजु फळपिकावरील प्रमुख किडींच्या व्यवस्थापनाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

0

पुणे, दि. 14 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स्वी वर्षानिमित्त कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम 2021-22 मध्ये राबविण्यात येणाऱ्या मोहिमेअंतर्गत ‘काजु फळपिकावरील प्रमुख किडींचे व्यवस्थापन’ या विषयांबाबत 25 जानेवारी रोजी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

विकेल ते पिकेल अभियानातंर्गत ‘चर्चा करु शेतीची कास धरु प्रगतीची’ या वेबीनार मालिकेचे दर बुधवारी प्रसारण होते. या मालिकेच्या 25 जानेवारी रोजीच्या 68 व्या भागाकरीता कृषी आयुक्तालयाचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते आणि वेंगुर्ला प्रादेशिक फळसंशोधन केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. व्ही. एस. देसाई हे काजु फळपिकावरील प्रमुख किडींच्या व्यवस्थापनबाबत मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम कृषि विभागाच्या युट्युब https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या लिंकवरुन शेतकऱ्यांना बघता येईल.

प्रत्येक मंडळ कृषि अधिकारी कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्रीय स्तरावर 25 जानेवारी रोजी ‘काजु फळपिकावरील प्रमुख किडींच्या व्यवस्थापन’ या विषयांबाबत किमान एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्येर शेतकरी- शास्त्रज्ञ परिसंवाद, क्षेत्रीय भेटी, शेतीशाळा, शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, शेतकरी सभा आदी आयोजित केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, संशोधन संस्थाचे शास्त्रज्ञ, काजु पिकामधील प्रगतशील शेतकरी व कृषि विभागाचे तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ

0

पुणे, दि.14 : पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची (इ.आठवी) अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in  व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द झाली आहे. परीक्षेच्या नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी 1 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत मुदत देण्यात आली होती.

शाळांना माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी 15 ते 31 जानेवारी 2022 या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी 31 जानेवारी पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी. 31 जानेवारी नंतर ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र किंवा शुल्क भरता येणार नाहीत.

आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त एच. आय. आतार यांनी कळवले आहे.

नमामि चंद्रभागा प्राधिकरणाअंतर्गत शक्ति प्रदत्त समितीची तिसरी बैठक संपन्न

0

पुणे, दि. 14 : चंद्रभागा (भीमा) नदी व तिच्या उपनद्यांमध्ये होणारे जलप्रदूषण कमी करण्यासाठी नमामि चंद्रभागा प्राधिकरणाअंतर्गत शक्ति प्रदत्त समितीच्या तिसऱ्या बैठकीचे आयोजन मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती अध्यक्षतेखाली गुरुवारी करण्यात आले. जलप्रदूषण कमी करण्यासाठी तयार केलेले प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना श्री. चक्रवर्ती यांनी दिल्या.

बैठकीस  पुणे विभागीय आयुक्त तथा नमामि चंद्रभागा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सौरभ राव, शक्ति प्रदत्त समितीचे सदस्य तथा पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सोलापुरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदी उपस्थित होते.

श्री. राव म्हणाले, महाराष्ट्रामधील भिमा (चंद्रभागा) नदी ही भाविकांसाठी महत्वपूर्ण आहे. परंतू भीमा नदीचे व तिच्या उपनद्यांचे विविध मार्गांनी प्रदूषण होत असल्याने या नद्यांना प्रदुषणमुक्त करणे गरजेचे आहे. नदीकाठावरील गावे आणि शहरात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांची उभारणी केल्यास नदीपात्रामध्ये अस्वच्छ पाणी येण्यास प्रतिबंध होण्यास मदत होईल.

देहू, आळंदी, पंढरपुर यांसारख्या धार्मिक ठिकाणी वारकरी व भाविकांसाठी शौचालय बांधणे व इतर सुविधा उपलब्ध करून देणे. नद्यांच्या काठांवर वृक्षलागवड करणे व हरित पट्टे विकसित करणे आदी उपाययोजना राबविणे व त्या अनुषंगिक प्रस्तावांना मान्यता देणे, नविन प्रस्ताव मांडणे याबाबत श्री. राव यांनी माहिती दिली.

श्री. शंभरकर यांनी भीमा नदीच्या काठांवर असलेल्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारणी आणि पंढरपुर येथे येणाऱ्या भाविकांसाठी प्राधिकरणाअंतर्गत करावयाच्या सुविधांबाबात, तर श्री.आयुष प्रसाद यांनी  पुणे जिल्ह्यामधील गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीबाबत प्रस्तावांचे समितीसमोर सादरीकरण केले. त्याचप्रमाणे भीमा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी भीमा नदीच्या खोऱ्याचा अभ्यास करून आवश्यक उपक्रमांचा बृहत आराखडा तयार करण्याबाबत यावेळी माहिती देण्यात आली.

बैठकीस सामाजिक वनीकरण विभागाचे वन संरक्षक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आदी उपस्थित होते.