Home Blog Page 2091

दगडूशेठ गणराजाला सूर्यकिरणांचा अभिषेक

0

सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सूर्यकिरणांचा गाभा-यात प्रवेश

पुणे : धार्मिक कार्यक्रमांनी गणेशभक्तांतर्फे करण्यात येणा-या अभिषेक व पूजा-अर्चनेप्रमाणे शुक्रवारी दगडूशेठ गणपती बाप्पांना सूर्यनारायणाने सूर्यकिरणांनी अभिषेक केला. गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडली आणि जय गणेश…जय गणेशचा जयघोष झाला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभा-यात प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडतात.

 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शुक्रवारी सकाळी उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभविला. सकाळी ८ वाजून २५ मिनीटे ते ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला. श्रीं च्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती. त्यासोबतच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या चांदीच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणांनी स्पर्श केला. गेले तीन दिवस दररोज सकाळी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडत आहेत. दगडूशेठ गणपती मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने ही किरणे मूर्तीवर पडतात. मंदिराची रचना पूर्वाभिमुख व उंच असल्याने गाभा-यात सूर्यकिरणांचा यावेळी प्रवेश होतो. माघ गणेशजन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये हा सोहळा दरवर्षी अनुभवायला मिळतो. त्यामुळे भाविकांना हा सोहळा गणेशजयंतीनंतर एका आठवडयामध्येच अनुभवता आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील विविध राज्यांच्या मंत्रीगटाकडून जीएसटी चोरी रोखण्यासह संकलनातील त्रूटी दूर करण्यासाठी सात शिफारशी सादर

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा सहभाग असलेल्या स्थायी मंत्रीगटाच्या दुसऱ्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. 1० :- जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा प्रभावी वापर, व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष पाहणी, यंत्रणेद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारांची प्रत्यक्ष तपासणी, बोगस व्यावसायिक नोंदणी रोखण्यासाठी प्रत्यक्ष तपासणी, जीएसटीएन नोंदणीवेळी वीजग्राहक क्रमांक अनिवार्य करणे, करदात्यांच्या बँकखात्यांचे ‘एनपीसीआय’ कडून प्रमाणिकरण, संशयित व्यावसायिकांचे गैरव्यवहार शोधण्यासाठी ‘फिडबॅक’ यंत्रणेची स्थापना, अशा सात शिफारशी जीएसटी परिषदेला करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या विविध राज्यांच्या स्थायी मंत्रीगटाच्या आजच्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जीएसटी संकलन प्रक्रियेतील करगळती, करचोरी रोखण्यासाठी यंत्रणेचे संपूर्ण संगणकीकरण हा प्रभावी उपाय आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करुन जीएसटी वसुलीतील गैरप्रकारांना आळा घालणे, करचोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जीएसटी लागू झाल्यापासून या यंत्रणेत, व्यवस्थेत सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करचोरी रोखण्यासाठी करतानांच ग्राहकांना सहज, सुरळीत सेवा देण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. जीएसटी नोंदणीकृत व्यावसायिकांच्या माहितीची पडताळणी, विश्लेषण करणारी यंत्रणा उपलब्ध असली पाहिजे. प्राप्तिकर प्रणालीशी जोडलेली ‘चेक्स अॅन्ड बॅलन्स’ यंत्रणा जीएसटीसाठी वापरल्यास करगळती रोखण्यास आणि महसुलवाढीस उपयोग होऊ शकतो. जीएसटी प्रणालीत सुधारणा करताना ती कर अधिकाऱ्यांप्रमाणेच  करदात्यांना वापरण्यासही सहज, सुलभ, उपयुक्त असली पाहिजे. करदात्यांची गैरसोय होणार नाही, करदात्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत संबंधीत अधिकाऱ्यांना केली.

व्यावसायिकांची जीएसटी नोंदणी करताना सखोल पडताळणी करावी, नियमांचे पालन न करणाऱ्या बोगस व्यावसायिकांची नोंदणी तात्काळ रद्द करण्यात यावी, रिटर्न फाईल करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करावी, आयटीसी साखळी नियमित ठेवणे तसेच खोट्या बिलांची तपासणी करण्यासारख्या उपाययोजना राबवण्यात याव्यात, करचोरी करणाऱ्या व्यावसायिकांची तसेच मोठ्या रकमेच्या आणि संशयित व्यवहारांची चौकशी करणे, जीएसटी प्रणालीतील माहितीचे अचूक विश्लेषण करणारी प्रभावी यंत्रणा विकसित करणे, आदी सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत केल्या.

व्यावसायिकांकडून रिटर्न फाईल करताना झालेल्या चुका सुधारण्यासाठी त्यांना ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करुन द्यावी, सिक्वेन्शियल फायलिंग यंत्रणेची अंमलबजावणी, नोंदणी रद्द झालेल्या बोगस व्यावसायिकांची माहिती ठळकपणे प्रसिद्ध करणे, पीओएसद्वारे होणाऱ्या व्यवहारांची माहिती बँकांद्वारे उपलब्ध करुन घेणे आदी मुद्यांवर राज्यांकडून मतं मागवून त्यावर पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत जाहीर केले.

हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, तामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पालनिवेल थियागा राजन, आसामाच्या अर्थमंत्री श्रीमती अजंता नियोग यांनीही बैठकीत विचार मांडले.

विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करावा – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे शिक्षकांना आवाहन

0

मुंबई, दि. १०- कोरोनामुळे मागील दोन वर्षे सर्वांसाठीच आव्हानात्मक होती. शिक्षण क्षेत्रही त्यापासून अलिप्त राहू शकले नाही. तथापि आता दहावी व बारावीच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा होत असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शासन आणि शिक्षण मंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांवरील दडपण दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रा.वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य प्रकल्प संचालक राहूल द्विवेदी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंह यांच्यासह शिक्षण विभागाचे संचालक, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक आदी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, दहावी बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. यावर्षी विद्यार्थी आणि पालकांना दडपण वाटणे साहजिक आहे. तथापि आपण सर्वांनी त्यांची मदत करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी अभ्यासक्रम तातडीने पूर्ण करून विद्यार्थ्यांची उजळणी घ्यावी, विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करावा. शासन आणि मंडळाच्या माध्यमातून परीक्षेची वेळ वाढवून देणे, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम कमी करणे, सरावासाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून देणे, मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन उपलब्ध करून देणे अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांकरिता परीक्षेसाठी चांगले, सुदृढ वातावरण तयार करून देणे ही आपली जबाबदारी असून मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अजूनही काही समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना त्यांनी केली.

आरोग्य जपण्याबरोबरच शिक्षण पूर्ण होणे देखील महत्त्वाचे होते. मुख्यमंत्र्यांनी देखील अतिशय कठीण काळात शिक्षण बंद राहणार नाही यासाठी सूचना केल्या होत्या. आव्हानात्मक दोन वर्षात शिक्षकांनी ऑनलाईन, ऑफलाईनसह विविध माध्यमातून शिक्षण देण्याचे काम केले. याचे कौतुक करून शिक्षण सुरू ठेवण्यासाठी हातभार लावलेल्या सर्व संबंधितांचे प्रा.वर्षा गायकवाड यांनी आभार मानले.

श्रीमती वंदना कृष्णा म्हणाल्या, कोरोना ही आयुष्यात एकदा घडणारी बाब समजून पुढे जाण्याची ही वेळ आहे. कोरोनासोबत जगण्याची सवय करून घ्यावी लागणार असून कोरोनामुळे जीवन ठप्प करता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षांविषयीचे दडपण दूर करून शिक्षकांनी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा.

श्री.गोसावी यांनी शिक्षण मंडळामार्फत उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांबाबत यावेळी माहिती दिली. उपसंचालक विकास गरड यांनी सूत्रसंचलन केले.

महालक्ष्मी मंदिराच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘ब्रह्मोत्सव’

0
  • श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन

पुणे : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हा उत्सव होणार असून त्यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल यांनी दिली.

राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुजाचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्याजी महाराज यांच्या आशिर्वादाने आणि उपस्थितीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. धार्मिक कार्यक्रमामध्ये होम-हवन, महाअभिषेक, सुवर्ण कमल अर्चना, पालखी सोहळा व फुलांची होळी तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये उत्सव मूर्तीची धान्यतुला करुन ते धान्य गरजूंना वाटप अशा उपक्रमांचा समावेश आहे.

राजकुमार अग्रवाल म्हणाले, शनिवार, दिनांक १२ फेब्रुवारी रोजी गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापना होणार आहे. शनिवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता १०८ कलश अभिषेक होणार असून रात्री ८ वाजता श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू भगवान यांच्या उत्सवमूर्तीची धान्यतुला होणार आहे. तसेच रात्री ८.३० वाजता सुवर्ण कमल अर्चना व रजत कमल अर्चना होईल.

रविवार, दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता केशर दूध अभिषेक, रात्री ८ वाजता मंदिरात पालखी सोहळा आणि रात्री ८.३० वाजता पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी होणार असून ब्रह्मोत्सवाची सांगता होईल. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून पुणेकरांनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

‘त्याच’पायरीवर सोमैयांचा सत्कार ? कॉंग्रेसने आयुक्तांना खडसावले ,हा काय प्रकार आहे ?

0

पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना मागील आठवडयात महापालिकेत शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने उद्या ( शुक्रवारी) महापालिकेत सोमय्या यांचा ज्या ठिकाणी ही घटना झाली त्याच ठिकाणी सत्कार करणार असल्याचे वृत्त पसरले आहे.या कार्यक्रमास शहर कॉंग्रेसने विरोध केला असून या कार्यक्रमास महापालिकेने परवानगी दिल्यास त्याच ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष रमेश बागवे आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांना दिला आहे.गुरूवारी शहर कॉंग्रेसच्या वतीने गुरूवारी महापालिके समोर आंदोलन केले असता कार्यकर्त्यांना आत सोडण्यात आले नाही. त्यावेळी नागरिकांना आणि खुद्द नगरसेवकांना ही मज्जाव करत त्रास देण्यात आला. त्यामुळे सोमय्यांच्या सत्कारास परवानगी देऊ नये अशी मागणी बागवे यांनी केली आहे.या पत्रानुसार, शहराच्या परंपरेनुसार पुणे महानगरपालिकेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही. पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त जनतेच्या हिताचे उपक्रम आणि महानगरपालिकेच्या कार्यक्रमांनाच परवानगी दिली जाते. जर पालिका प्रशासनाने भारतीय जनता पक्षाला माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला परवानगी दिली तर त्या ठिकाणी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

सुट्टीच्या दिवशी कोणालाही न भेटणारे आयुक्त महापालिकेत कोणी नसताना सोमैय्यांना भेटीसाठी वेळ कसा काय देतात ? तिथे कोणी पदाधिकारी, कोणत्याही पक्षाचे नगरसेवक ,अधिकारी नसताना काही वादग्रस्त घटना घडतात यास आयुक्तांना जबाबदार का धरू नये ? असे सवालही उपस्थित करण्यात आले आहेत .

कर्नाटकातील हिजाब वाद:पुण्यात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

0

पुणे:कर्नाटकमधील हिजाब वाद प्रकरणातून मुस्लीम समुदायातील मुलींना पाठींबा दर्शवण्यासाठी आज पुण्यातील महात्मा फुले वाड्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर निषेध आंदोलन केले. कर्नाटकमधील भाजप सरकारचाही यावेळी निषेध नोंदवण्यात आला.या आंदोलनाप्रसंगी महिला देशातील विविध परंपरांच्या वेशभूषेत आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,प्रवक्ते प्रदीप देशमुख , सौ.मृणालिनी वाणी, सुषमा सातपुते, दिपक जगताप , झुबेर शेख , समीर शेख, ॲड.रुपाली ठोंबरे , अजिंक्य पालकर , विक्रम मोरे
आदींसह मोठ्या प्रमाणात विविघ समाजातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

या वेळी बोलताना शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप म्हणाले की” हे आंदोलन कुठल्याही समाजाच्या महिलांच्या समर्थनार्थ नसून समाजातील प्रत्येक ती स्त्री जिच्या मूलभूत हक्कांवर , व्यक्तिस्वातंत्र्यावर भारतीय जनता पार्टी आपली तालिबानी विचार लादू पाहत आहे , त्या स्त्रियांच्या मूलभूत हक्कांसाठी हा लढा आहे. रतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व्हॅलेंटाईन डे ला विरोध करत कुठेही पाश्चिमात्य वेशभूषा परिधान केलेल्या महिला व मुलींना नावे ठेवतात तर दुसरीकडे त्याच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हिजाबला विरोध करत आहेत ही एक प्रकारची वैचारिक दिवाळखोरीच आहे. अश्या प्रकारचा दुट्टपीपणा भाजपा नेहमीच करीत असते “.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. या पवित्र भारतीय संविधानात सर्व नागरिकांना संपूर्ण स्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे. यात भारतातील सर्वच नागरिकांना धर्माचे, अभिव्यक्तीचेही स्वातंत्र्य देण्यात आले. परंतु भारतीय संविधानाबद्दल आकस बाळगणाऱ्या भारतीय जनता पार्टीने नागरिकांचे हे स्वातंत्र्य हिरावण्यास सुरुवात केली आहे. याच षडयंत्राचा भाग म्हणून कर्नाटकमधील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मुस्लिम समाजातील हिजाब परिधान करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यास सुरुवात केली. यास समाजातून विरोध सुरु होताच इतरधर्मीय विद्यार्थ्यांना मुस्लिम धर्मीय विद्यार्थिनींच्या विरोधात भडकावण्यात आले. भाजप म्हणजे द्वेष, भाजप म्हणजे हिंसा, भाजप म्हणजेच ‘सत्तेसाठी काहीही’ ही वस्तुस्थिती आहे. कर्नाटकमधील ही घटना हा याचा पुरावाच आहे. विद्यार्थिजीवन म्हणजे देशाचे भविष्य घडवण्याचा काळ असतो, याच काळात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मनात धार्मिक द्वेष पेरला जातोय.

पुण्यात सरकारविरोधात रिक्षावाले रस्त्यावर

0

पुणे : पुण्यात बघतोय रिक्षावाला संघटनेच्या वतीने पुन्हा बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले आहे. आरटीओजवळ हजारॊ रिक्षाचालक रस्त्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनात जवळपास १० हजार रिक्षाचालक सहभागी झाल्याचे संघटनेने यावेळी सांगितले आहे.

राज्य सरकार सरकार आणि प्रशासन यांनी बाईक टॅक्सी बेकायदा आहे. हे त्यांनी मान्य केलेले असून सुद्धा प्रत्यक्षात प्रशासन ओला/ उबेर / रॅपीडो सारख्या कॅब ऍग्रीगेटर कंपन्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास धजावत नाही. ते फक्त जे युवक बाईक टॅक्सी व्यवसाय करत आहेत, त्यांनाच वेठीस धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. परंतु ज्या मोठमोठ्या कंपन्या या युवकांना फसवून,या बेकायदा व्यवसायामध्ये आणत आहेत. त्यांच्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाने केलेली नसून, त्यांच्यावर साधा एक रुपयाचा दंड सुद्धा लावलेला नाही. परंतु बेकायदा बाईक टॅक्सी चालवणाऱ्या गरीब युवकांना हजारो रुपये दंड हे सरकार आणि प्रशासन लावत असल्याचा आरोप बघतोय रिक्षावाला यांनी सरकरावर केला आहे.”हे सरकार आणि प्रशासन या बेकायदा बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांबरोबर सामील असून, गोरगरीब रिक्षाचालक आणि बेकायदा बाईक टॅक्सीच्या जाहिरातींना बळी पडणाऱ्या युवकांच्या आयुष्याशी खेळत असल्याचे ते म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी 4 जानेवारी रोजी, आठ दिवसात बाईक टॅक्सी बंद करण्याचे आश्वासन दिले होते. आता जवळपास सव्वा महिना उलटून गेला तरीही बाईक टॅक्सी सर्रास चालू आहे, याचा निषेध म्हणून बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन सुरु केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विविध राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांकडून 16 प्रस्ताव प्राप्त

0

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2022

शहर विकासाचा अविभाज्य भाग असलेला शहरी वाहतूक हा राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. म्हणून मेट्रो रेल्वे प्रकल्पाससह इतर शहरी वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचा आरंभ, विकास तसेच निधी उभारणी ही संबंधित राज्य सरकारांची जबाबदारी असते, असे गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात नमूद केले. मेट्रो रेल्वे प्रकल्प 2017 नुसार एखाद्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील शहरांमधील किंवा शहरी भागातील प्रकल्पाची व्यवहार्यता आणि संसाधनांची उपलब्धता या आधारावर राज्यांच्या मागणीवरुन अशा प्रकल्पांना केंद्राकडून आर्थिक मदत मिळू शकते.

विविध राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांकडून प्राप्त झालेल्या प्रकल्पांची यादी खाली दिली आहे.

गुजरात सरकारकडून केंद्र सरकारच्या आर्थिक सहाय्यासाठी कोणत्याही नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव आलेला नाही.

महाराष्ट्राकडून मिळालेल्या प्रस्तावात नागपूर मेट्रो IIरा टप्पा, नाशिकच्या नाशिक मेट्रो निओ आणि ठाणे शहरांतर्गत रिंगरूट प्रकल्प या तीन प्रकल्पांचा समावेश आहे.

Annexure I

Sr NoState/UTName of Metro Rail ProjectCities CoveredProposed Length(in Km)Expected Date of Completion
 DelhiDelhi Metro Phase IV (Balance 03 corridors)Delhi43.6775 years from the date of start of work
 MaharashtraNagpur Metro Phase IINagpur43.805 years from the date of approval
 Nashik MetroNeoNashik33.004 years from the date of approval
 Thane Internal Ring ProjectThane29.005 years from the date of approval
 KeralaKochi Metro Phase 1AKochi2.00June, 2022
 Kochi Metro Phase II11.204 years from date of sanction
 Uttar PradeshExtension of Noida Metro from Sector 51 to Knowledge ParkNoida, Greater Noida14.95838 months from the date of sanction
 Gorakhpur MetroLiteGorakhpur15.144 years from date of sanction
 Jammu & KashmirMetroLite in JammuJammu23.00March, 2026
 MetroLite in SrinagarSrinagar25.00March, 2026
 Tamil NaduChennai Metro Phase IIChennai118.96 years from date of sanction of the project
 HaryanaMetro Rail Connectivity from HUDA City Centre toCyber City, GurugramGurugram28.505 years from date of sanction of the project
 UttarakhandMetroNeo project in DehradunDehradun22.4243 years from date of sanction
 Delhi, Haryana, RajasthanDelhi-SNB Regional Rapid Transit System (RRTS)Delhi, Gurugram,Shahjaha-npur,Neemrana,Behror107.006 years from date of sanction of the project
 SNB – Sotanala Regional Rapid Transit System(RRTS)33.305 years from date of sanction of the project
 Delhi, HaryanaDelhi-Panipat Regional Rapid Transit System(RRTS)Delhi,Sonipat,Panipat103.026 years from date of sanction of the project

पलक्कडमध्ये उंच कड्यावर अडकलेल्या ट्रेकरची भारतीय लष्कराकडून सुटका

0

चेन्नई-

भारतीय सैन्याने पलक्कडमध्ये एका उंच कड्यावर अडकलेल्या एका ट्रेकरची सुटका केली. भारतीय सैन्याने केरळच्या पलक्कड मधील मलमपुझा राखीव  वनक्षेत्रात टेकडीच्या कडेला 600 मीटर खोल दरीत घसरलेल्या 23 वर्षांच्या आर बाबू या युवकाची यशस्वीपणे सुटका केली. हा युवक  48 तास तिथे अडकून पडला होता. ऑपरेशन पलक्कड मध्ये, काल सकाळी 10:15 च्या सुमारास, सैन्याच्या  तुकड्यानी  एकत्रित प्रयत्न करून  ट्रेकरची सुरक्षित आणि सुखरूप सुटका केली आणि त्याला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले.

बंगळुरूच्या पॅराशूट रेजिमेंटल सेंटर आणि वेलिंग्टन येथील मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या कुशलपथकांनी आज पहाटे 5. 45 वाजता बचाव मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान  युवकाचे मनोबल  उंचावण्यासाठी नियमित संपर्क आणि संभाषण ठेवले गेले. अत्यंत आनंदित झालेल्या पालकांनी आणि कृतज्ञ राज्य प्रशासनाने  भारतीय लष्कराचे मनापासून आभार मानले. भारतीय हवाई दलाची हेलिकॉप्टर  आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्ज  ठेवण्यात आली होती.

केरळ राज्य सरकार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अध्यक्षांकडून प्राप्त झालेल्या विनंतीनुसार बंगळुरूच्या पॅराशूट रेजिमेंटल सेंटर आणि वेलिंग्टन येथील मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या  निष्णात पर्वतारोहक आणि रॉक क्लाइंबिंग तज्ञांसह लष्कराच्या विशेष तुकड्या दक्षिण भारत एरिया, चेन्नई यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आणण्यात आल्या. संपूर्ण पाहणी केल्यानंतर पथकांनी मोहिमेला  सुरुवात केली. तत्पूर्वी, भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर्ससह स्थानिक लोक, पोलीस, अग्निशमन आणि बचाव सेवेचे  प्रयत्न धोकादायक भूभागामुळे यशस्वी होऊ शकले नाहीत. पथकांनी दिलेला जलद प्रतिसाद आणि दाखवलेले कौशल्य यामुळे भारतीय लष्कराच्या अदम्य शक्तीवरील देशाचा विश्वास पुन्हा एकदा दिसून आला आहे.

४ फेब्रुवारी ‘ब्रिलियंटाईन डे’ साजरा करणार

0

पुणे, दि.१० फेब्रुवारी: १४ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. भारतातही तो मोठ्या प्र्रमाणात साजरा केल्याचे दिसून येते. त्याच अनुषंगाने देशात ब्रिलियंटाईन डे साजरा करावा. केवळ शारिरीक रुपाला व दिसण्याला महत्व न देता बुद्धिला व स्वतःच्या अस्तित्वाला महत्व दिले जावे. या उद्देशाने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे या वर्षापासून १४ फेब्रुवारी हा दिवस ‘ब्रिलियंटाईन डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे व त्यासाठी ब्रिलियंटाईन स्पर्धा घेण्यात येणार आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सल्लागार व मार्गदर्शक डॉ. संजय उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. संजय उपाध्ये यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती, परंपरा, पौराणिक कथा, अध्यात्म, धर्म, योग, इतिहासाबरोबरच अन्य क्षेत्रातील विषयांना अनुसरून विद्यापीठाने ‘ब्रिलियंटाईन’ या नव्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरूणांना सक्षम करण्यासाठी हा एक अभिनव उपक्रम आहे. यामध्ये वेगवेगळ्या विषयांसहित विज्ञान, राजकारण, क्रीडा, चित्रपट इत्यादी समकालीन विषयांवर ऑनलाइन निबंध, प्रश्‍नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम एमआयटी डब्ल्यूपीयूच्या पीस स्टडीज विभागाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
स्पर्धेतील प्रथम विजेत्या स्पर्धकांना ‘एमआयटी डब्ल्यूपीयू पीस किंग’ आणि ‘एमआयटी डब्ल्यूपीयू पीस क्वीन’ म्हणून मुकुट घातला जाईल. त्याच बरोबर सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र दिले जाईल. समग्र आयोजनातून दोन मुले आणि दोन मुली अशा चार विजेत्यांना रौप्य पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. हे सहा विजेते एमआयटी डब्ल्यूपीयूच्या विश्‍वशांती उपक्र्रमांचे नेतृत्व करतील. तसेच, इतर महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्रतिनिधित्व करतील.
सोमवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सायं. ५.३० वा. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संत श्री ज्ञानेश्‍वर सभागृह, कोथरुड येथे ‘ब्रिलियंटाईन डे’ हा कार्यक्रम होणार आहे. या मध्ये विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत. या समारंभासाठी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा.डॉ.आर.एम.चिटणीस, दूरदर्शनचे माजी संचालक श्री. मुकेश शर्मा, पीस स्टडीजचे सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ. मिलिंद पात्रे, पीस स्टडीजचे प्रा.आशिष पाटील, स्कूल ऑफ योगाच्या प्रा.मृण्मयी गोडबोले आणि विद्यार्थी प्रतिनिधी प्रणय करकळे आणि वैष्णवी बावठणकर उपस्थित होते.

महिलांचा वाईनला पाठिंबा हा रुपाली चाकणकरांचा दावा धक्कादायक -नेत्यांच्या लाभासाठी विधान : आ. चंद्रकांत पाटील

0

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांचा वाईनला पाठिंबा असल्याचा केलेला दावा धक्कादायक आहे. त्या एका सुसंस्कृत कुटुंबातील आहेत. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना लाभ होण्यासाठी त्यांनी असे विधान करू नये, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे म्हटले आहे. त्याबरोबरच भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची तक्रार देण्यास पुणे महानगरपालिकेत गेले असताना शिवसैनिकांनी त्यांच्यावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याची आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केली असून गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. भाजपा हा विषय सोडणार नाही आणि किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल, असा इशारा आज पुन्हा येथे आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.

ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर उपस्थित होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेच्या इमारतीत गेले असता शिवसैनिकांनी हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. राज्यात टोळीचे सरकार चालू आहे का ? याबद्दल आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. सोमय्या यांना झेड सुरक्षाव्यवस्था असल्याने त्यांच्या भेटीच्या आधी पोलिसांनी तपासणी करणे आवश्यक असते. तरीही त्यावेळी शंभरजण इमारतीत लाठ्या व दगड घेऊन कसे होते, पुणे महानगरपालिकेची सुरक्षा व्यवस्थाही काय करत होती, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनाही धक्काबुक्की झाली. केंद्र सरकारने या हल्ल्याची दखल घेतली आहे. केंद्र सरकारचे सुरक्षा प्रमुख तीन दिवस पुण्यात आहेत. त्यांनी पुण्याच्या पोलीस प्रमुखांनाही नोटीस दिली आहे.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आणि सर्वाधिक कोरोना मृत्यू झाले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला. कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, एका चितेवर २४ मृतदेहांचे दहन केले, एका रुग्णवाहिकेतून २० मृतदेह नेले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला. कोरोनाच्या लाटेत परप्रांतीय मजुरांना भरवसा देण्यात राज्याचे सरकार कमी पडले व त्यामुळे त्यांनी पलायन केले, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. या सर्वाचा जाब खरे तर काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना विचारायला हवा होता व त्यांच्याकडे माफीची मागणी करायला हवी होती.

त्यांनी सांगितले की, किराणा दुकानांमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी, परमविरसिंग यांनी सचिन वाझेबाबत आरोप केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देण्याचे टाळणे, पोलिसांच्या बदल्यांबाबत अनिल देशमुख यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केल्यानंतरही परब मंत्रिपदावर चिटकून राहणे यांच्या विरोधात भाजपा लवकरच राज्यव्यापी आंदोलन छेडेल.

मुंबईत ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ होणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

0

मुंबई, दि. 10 : संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास, विकास, प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधा असलेले आणि लता मंगेशकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने रामनारायण रुईया महाविद्यालयात भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी (दूरदृश्य प्रणालीद्वारे), तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, सहसंचालक डॉ. सोनाली रोडे, श्री. प्रकाश बच्छाव, रुईया महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती अनुश्री लोकुर, राज्यातील प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय पातळीचे संगीत महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी लतादीदी यांनी फोनद्वारे संगीत महाविद्यालय कसे असावे, त्याचा स्तर काय असावा, अभ्यासक्रम कसा असला पाहिजे आणि त्याच्या गुणवत्तेबाबत जगाने दखल घ्यावी असे महाविद्यालय असावे यासाठी मार्गदर्शन केले होते. मात्र लतादीदी यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ मुंबईत सुरु करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आला आहे.

दिवंगत लता मंगेशकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, लतादीदींचा विचार, व्यक्तीमत्व जगासमोर असावे म्हणून वस्तुसंग्रहालयसुद्धा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संगीत, गायनापलीकडेही लतादीदींचे सामाजिक कार्यसुद्धा मोठे होते. वर्ल्डकपपासून ते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांसाठी मदत करण्यासाठी लतादीदींनी पुढाकार घेतला होता. जगात गायनाचे उत्तुंग नेतृत्व करणाऱ्या लतादीदी होत्या. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.

लता मंगेशकर यांची कारकीर्द त्यांच्या संगीतातून कायम राहील त्यासाठी त्यांचे विचार-गाणी यावरसुद्धा संशोधन केंद्र सुरु करण्यात येईल, असे सांगून लता मंगेशकर यांना श्री.सामंत यांनी श्रद्धांजली वाहिली.

या कार्यक्रमामध्ये लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. यावेळी उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली तर समारोप पसायदान गायनाने झाला.

राज्यांच्या मंत्रीगटाकडून जीएसटी चोरी रोखण्यासह संकलनातील त्रूटी दूर करण्यासाठी सात शिफारशी सादर

0

मुंबई, दि. 1० :- जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा प्रभावी वापर, व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष पाहणी, यंत्रणेद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारांची प्रत्यक्ष तपासणी, बोगस व्यावसायिक नोंदणी रोखण्यासाठी प्रत्यक्ष तपासणी, जीएसटीएन नोंदणीवेळी वीजग्राहक क्रमांक अनिवार्य करणे, करदात्यांच्या बँकखात्यांचे ‘एनपीसीआय’ कडून प्रमाणिकरण, संशयित व्यावसायिकांचे गैरव्यवहार शोधण्यासाठी ‘फिडबॅक’ यंत्रणेची स्थापना, अशा सात शिफारशी जीएसटी परिषदेला करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या विविध राज्यांच्या स्थायी मंत्रीगटाच्या आजच्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जीएसटी संकलन प्रक्रियेतील करगळती, करचोरी रोखण्यासाठी यंत्रणेचे संपूर्ण संगणकीकरण हा प्रभावी उपाय आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करुन जीएसटी वसुलीतील गैरप्रकारांना आळा घालणे, करचोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जीएसटी लागू झाल्यापासून या यंत्रणेत, व्यवस्थेत सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करचोरी रोखण्यासाठी करतानांच ग्राहकांना सहज, सुरळीत सेवा देण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. जीएसटी नोंदणीकृत व्यावसायिकांच्या माहितीची पडताळणी, विश्लेषण करणारी यंत्रणा उपलब्ध असली पाहिजे. प्राप्तिकर प्रणालीशी जोडलेली ‘चेक्स अॅन्ड बॅलन्स’ यंत्रणा जीएसटीसाठी वापरल्यास करगळती रोखण्यास आणि महसुलवाढीस उपयोग होऊ शकतो. जीएसटी प्रणालीत सुधारणा करताना ती कर अधिकाऱ्यांप्रमाणेच  करदात्यांना वापरण्यासही सहज, सुलभ, उपयुक्त असली पाहिजे. करदात्यांची गैरसोय होणार नाही, करदात्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत संबंधीत अधिकाऱ्यांना केली.

व्यावसायिकांची जीएसटी नोंदणी करताना सखोल पडताळणी करावी, नियमांचे पालन न करणाऱ्या बोगस व्यावसायिकांची नोंदणी तात्काळ रद्द करण्यात यावी, रिटर्न फाईल करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करावी, आयटीसी साखळी नियमित ठेवणे तसेच खोट्या बिलांची तपासणी करण्यासारख्या उपाययोजना राबवण्यात याव्यात, करचोरी करणाऱ्या व्यावसायिकांची तसेच मोठ्या रकमेच्या आणि संशयित व्यवहारांची चौकशी करणे, जीएसटी प्रणालीतील माहितीचे अचूक विश्लेषण करणारी प्रभावी यंत्रणा विकसित करणे, आदी सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत केल्या.

व्यावसायिकांकडून रिटर्न फाईल करताना झालेल्या चुका सुधारण्यासाठी त्यांना ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करुन द्यावी, सिक्वेन्शियल फायलिंग यंत्रणेची अंमलबजावणी, नोंदणी रद्द झालेल्या बोगस व्यावसायिकांची माहिती ठळकपणे प्रसिद्ध करणे, पीओएसद्वारे होणाऱ्या व्यवहारांची माहिती बँकांद्वारे उपलब्ध करुन घेणे आदी मुद्यांवर राज्यांकडून मतं मागवून त्यावर पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत जाहीर केले.

हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, तामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पालनिवेल थियागा राजन, आसामाच्या अर्थमंत्री श्रीमती अजंता नियोग यांनीही बैठकीत विचार मांडले.

वर्तमानाची जाणीव आणि भविष्याचा वेध नागरिकांना महत्वाचा: कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा कल (व्हिडीओ)

0

कॉंग्रेस किंगमेकर -मोहन जोशी

५८ प्रभागात स्वबळाची तयारी- रमेश बागवे

पुणे-इतिहासाच्या जंजाळात लोकांना दिशाभूल करत गुरफटून ठेवण्यात भाजपा मग्न असली तरी कॉंग्रेसने त्यास प्रत्युत्तर जरूर द्यावे परंतु त्यात फार अडकून न पडता लोकांना वर्तमानाची जाणीव आणि भविष्याचे वेध घेण्याकडे घेऊन गेले पाहिजे असा सूर आज विविध प्रभागांची रचना करताना केलेल्या मोडतोडी कडे लक्ष वेधताना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनात व्यक्त केला हे करताना हायटेक प्रचार करण्यास जुन्यांना बरोबर घेऊन नव्या चेहऱ्यांनी आघाडी घेतली पाहिजे असाही आग्रह यावेळी धरण्यात आला. कॉंग्रेस भवनात शहर अध्यक्ष रमेश बागवे, उल्हास पवार, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, आबा बागुल आदी नेत्यांच्या समोर प्रभाग रचनेवरील आक्षेप नोंदविण्यात आले . यावेळी विविध प्रभागातील कार्यकर्त्यांनी देशा च्या हितासाठी कॉग्रेस प्रत्येक प्रभागात आघाडीवर असणे गरजेचे आहे असे मत मांडले . यावेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी , आणि माजी महापौर कमल व्यवहारे यांच्याशी केलेली हि बातचीत .

पंतप्रधान संसदेत खोटे बोलले आणि आपल्या अपयशाचे खापर त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर फोडले-रमेश बागवे

0

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत असे सांगितले की, महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरला. पंतप्रधानांच्या या वक्तव्‍याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यव्‍यापी आंदोलनाची घोषणा केली. त्यानुसार आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका जवळील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर निदर्शने – आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान मोदींचा धिक्कार असो’, ‘माफी मागों माफी मागों, मोदीजी माफी मागों’ अशा प्रकारचे फलक घेवून कार्यकर्ते निदर्शनाच्या ठिकाणी जमले होते.

      यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘१२ फेब्रुवारी २०२० साली राहुल गांधी यांनी मोदी सरकारला कोरोना संसर्गाबाबत, योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे असे सांगितली होते. परंतु तात्कालीन केंद्रिय आरोग्य मंत्री यांनी त्या विषयाचे गांभीर्य समजून न घेता राहुल गांधीची खिल्ली उडविली होती. पतंप्रधान मोदी यांनी चीनवरून येणाऱ्या विमानावर बंदी घातली नाही. ते नमस्ते ट्रम म्हणत अमेरीकेचे तात्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाहुणचार मग्न होते. परिणामी देशात कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला. २४ मार्च २०२० रोजी कोठलेही पूर्वनियोजन न करता पंतप्रधांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे गोरगरीब, कष्टकरी, मजूर व छोट्या व्‍यावसियिकांचे हाल झाले.‌ भितीपोटी गोरगरीब कष्टकरी मजूर आपल्या गावाकडे हजारो किलोमीटर चालत गेले. यात त्यांना वाटेत अन्न व पाणी न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडले. मोदी सरकारने कोरोना संसर्ग हाताळण्यात हलगर्जीपणा दाखविला. कोरोनावर मात करण्यासाठी उपयोजना न ठरवता मोदींनी देशातल्या जनतेला थाळी वाजवा, टाळी वाजवा, घराची लाईट बंद करून आपल्या घराबाहेर दिवे पेटवण्यास भाग पाडले. आपले अपयश झाकण्यासाठी ते महाराष्ट्र काँग्रेसवर आपले खापर फोडत आहे. पंतप्रधान संसदेत खोट बोलले आणि त्यांनी जाणून बुजून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या व देशाच्या जनतेची माफी मागावी अन्याता जनता त्यांना सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही.’’

      माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्यापासून प्रत्येकवेळी कोणत्या न कोणत्या कारणावरून महाराष्ट्राचा अपमान करीत आहे. संसदेत कोरोना विषयी ते खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करीत आहेत.महाराष्ट्रात भाजपाची सरकार आली नाही म्हणून आकसापोटी महाराष्ट्राचा अपमान करीत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी सुरूवातीच्या काळात कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही त्यामुळे लाखो देशवासियांच्या जीव गेला. गंगेत बहुसंख्य प्रेत फेकून देण्यात आले होते. अनेकांचे संसार उध्वस्त होऊन मुले अनाथ झाले. राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील संसदेत आपली भूमिका मांडली. त्यांनी सरकार अनेक धोरणावर कसे अपयशी ठरले याचा पर्दाफाश केला. परंतु पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या भाषणावर न बोलता निवडणुकीचे भाषण करत होते. भारताच्या संसदेत आजपर्यंत अशा पध्दतीने कोणतेही पंतप्रधान बोलले नाही. महाराष्ट्र काँग्रेसने यु.पी. आणि बिहारच्या लोकांना रेल्वेने आपल्या गावाला पाठविले त्यामुळे कोरोना पसरला असे खोटे आरोप पंतप्रधानांनी केले. रेल्वे तर केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. मग महाराष्ट्र काँग्रेसने कसा काय कोरोना पसरविला याचे उत्तर द्यावे.’’

      यानंतर नगरसेवक अरविंद शिंदे यांचेही भाषण झाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, कमल व्‍यवहारे, दिप्ती चवधरी, गटनेते, आबा बागुल, वीरेंद्र किराड, नीता रजपूत, शानी नौशाद, अविनाश बागवे, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, अरूण वाघमारे, कैलास गायकवाड, शखेर कपोते, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, सुरेखा खंडागळे, प्रविण करपे, सचिन आडेकर, सतीश पवार, रमेश सोनकांबळे, प्रदिप परदेशी, सुनिल घाडगे, अजित जाधव, विनय ढेरे, नुरूद्दीन सोमजी, विजय वारभुवन, दिपक ओव्‍हाळ, राहुल वंजारी, जयकुमार ठोंबरे, परवेज तांबोळी, सादिक कुरेशी, नितीन परतानी, राजू नाणेकर, गणेश शेडगे, भगवान कडू, राजेंद्र पेशने, वाल्मिक जगताप, राहुल तायडे, सुजित यादव, यासीन शेख, दयानंद अडागळे, रोहित अवचिते, दत्ता जाधव, हेमंत राजभोज, शाबिर खान, चेतन अगरवाल, रवि पाटोळे, भारत पवार, कोन्होजी जेधे, अभिजीत रोकडे, डॉ. अनुप बेगी, रवि आरडे, बबलू कोळी व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.