Home Blog Page 2090

पुणे महापालिकेत किरीट सोमैय्या आज आले तेव्हा …..हुल्लडबाजी कोणी केली ?

0

पुणे- भाजपच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली नाही , भाजपा शहर अध्यक्ष मुळीक म्हणाले ,’ साहेब हुल्लडबाजी तुम्ही केली,असा आरोप केला तर चालेल काय ?पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे सगळी गडबड झाली ….आज पुणे महापालिकेत किरीट सोमैय्या आले तेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांची आणि पोलीस सुरक्षा रक्षक यांची झालेली प्रचंड गर्दी , गाड्यांची होणारी पळापळ कार्यकर्त्यांचे आणि माध्यम प्रतिनिधींचे धावणे यामुळे प्रचंड गोंधळ झाला . यावर माध्यम प्रतिनिधींनी भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांना छेडले असता झालेला संवाद ऐका पहा …

राज्यात जानेवारीमध्ये ७ हजार ७१३ बेरोजगारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

0

मुंबई, दि. 11 : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये जानेवारी 2022 मध्ये 7 हजार 713 बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.

अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी 2021 मध्ये राज्यात 2 लाख 19 हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तत्पूर्वी 2020 मध्ये 1 लाख 99 हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत 94 हजार 345 इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

श्री. मलिक म्हणाले की, माहे जानेवारी 2022 मध्ये विभागाकडे 25 हजार 981 इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात 5 हजार 888, नाशिक विभागात 5 हजार 152, पुणे विभागात 6 हजार 556, औरंगाबाद विभागात 4 हजार 711, अमरावती विभागात 1 हजार 540 तर नागपूर विभागात 2 हजार 134 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे जानेवारीमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 7 हजार 713 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक 2 हजार 847, नाशिक विभागात 2 हजार 795, पुणे विभागात 535, औरंगाबाद विभागात 1 हजार 285, अमरावती विभागात 213 तर नागपूर विभागात 38 बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

नोकरी इच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन श्री. मलिक यांनी केले आहे.

सदाशिव-शनिवार आदर्श प्रभागासाठी प्रशासकीय जबाबदारी कुणाल खेमणार यांनी स्वीकारली

0

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

पुणे- सदाशिव पेठ-शनिवार पेठ प्रभाग आदर्श करण्याची प्रशासकीय जबाबदारी अतिरिक्त कुणाल खेमणार यांनी स्वीकारली असून याच धर्तीवर शहर आदर्श करण्यासाठी महापालिकेचे तीन अतिरिक्त आयुक्त, पंचवीस विभाग प्रमुख आणि पाच क्षेत्रिय अधिकार्यांवर अशाप्रकारची एकएका प्रभावाची जबाबदारी टाकण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

मध्यवर्ती पेठांचा भाग असलेल्या सदाशिव पेठ-शनिवार पेठ प्रभागातील विकासकामांची आज पाहाणी करण्यात आली. यावेळी रासने यांच्यासह अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, नगरसेविका अड. गायत्री खडके, पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, मैलापाणी विभाग प्रमुख संतोष तांदळे, उपायुक्त अविनाश सपकाळ, आशीष महाडळकर, उमेश गोडगे, काशिनाथ गांगुर्डे, उदय लेले, किरण जगदाळे, परेश मेहेंदळे, अमित गोखले, मनिष जाधव, दिलीप पवार, अनिल बेलकर, विनायक घाटे, निलेश कदम, अमित कंक, सौरभ रायकर, बिरजू ननावरे उपस्थित होते.

रासने म्हणाले, हा प्रभाग आदर्श करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मी व्यक्तिश: लक्ष घालून पाठपुरावा करीत आहे. आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी तीन वेळा भेटी देऊन विकासकामांचा आढावा घेतला आहे. या दर्जाच्या अधिकार्यांच्या आदेशानंतर विकासकामांना गती मिळाली असली तरी अनेक छोटी-मोठी विकासकामे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर नागरिक प्रश्न उपस्थित करतात. यावर उपाययोजना म्हणून प्रशासकीय अधिकार्यांवर प्रभाग आदर्श करण्याची जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला., लक्ष्मी रस्ता आणि केळकर रस्त्यावरील पथ विभागाची कामे पूर्ण झाली आहेत. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता आणि टिळक रस्त्यावरील पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्मार्ट सिटी विभागाची कामे आठवड्याभरात पूर्ण होतील. त्यानंतर दहा दिवसात पथ विभागाची डांबरीकरणाची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. अंदाजपत्रकात महत्त्वाच्या २५ रस्ते सुशोभीकरणासाठी निधीची विशेष तरतूद करण्यात आली आहे. मध्यवर्ती पेठांतील सर्व रस्त्यांचा त्यात समावेश असून, सुशोभिकरण, सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत.

रासने पुढे म्हणाले, रस्त्यांवरील ड्रेनेज चेंबर समपातळीत आणणे, पदपथांची दुरूस्ती व पादचार्यांना अडथळा एमएसईबीचे डीपी आणि अनधिकृत बांधकामे हटविणे, ठिकठिकाणी साठलेला राडारोडा साफ करणे, काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरच ठेवलेले पाईप उचलणे, पेव्हर ब्लॉकची दुरुस्ती करणे, स्वच्छतेच्या उपायययोजना करणे, पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे, सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, अनधिकृत पोस्टर, बॅनर लावणार्यांवर कारवाई करणे अशाप्रकारच्या सुचना करण्यात आल्या. ही छोटी-मोठी कामे पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या भोवताली ठिकठिकाणी राडारोडा पसरला आहे. परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. प्रकाश व्यवस्था पुरेशी नाही. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे गरजेचे आहे,या वास्तूचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. त्यासाठी दोन दिवसांत रंगरंगोटीसह सर्व कामे प्राधान्याने करण्याचे आदेश रासने यांनी दिले.

वृत्तपत्र विक्रेत्याचे शिल्प

शंभर वर्षांपासून आप्पा बळवंत चौक हे वृत्तपत्र वितरणाचे मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी वर्तमानपत्रांचे संकलन करून विक्रेते शहराच्या विविध भागांमध्ये त्याचे वितरण करतात. या चौकाचे ऐतिहासिक महत्त्व जतन करणे आणि वृत्तपत्र विक्रेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्याचे शिल्प उभारण्यात येणार असल्याचे रासने यांनी सांगितले.

भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून दैनंदिन कामकाजात अडथळे आणल्याने विरोधी पक्षनेत्या संतापल्या , म्हणाल्या हि नागरी हक्कावर गदा

0

पुणे-महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या सौ दिपाली प्रदीप धुमाळ यांनी आज महापालिकेत भाजपा कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून दैनंदिन कामात अडथळे आणल्याचा ठपका ठेऊन हा गोंधळ सामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारा अत्यंत वाईट प्रकार असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या ,’पुणे महानगरपालिकेमध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरक्षा विभागाने पोलिसांच्या सहकार्याने कडक बंदोबस्त ठेऊन सर्वसामान्य नागरिकांना पुणे महानगरपालिकेत प्रवेश दिला नाही….परंतु भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांबरोबर त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने महानगरपालिकेमध्ये फिरताना दिसत होते.दुपारी चार ते साडेचार च्या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र येऊन नवीन इमारतीतील जुन्या इमारतीमध्ये जात असताना नागरिक व विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक यांची देखील पोलिसांनी अडवणूक केली , त्यामुळे नागरिकांचा व विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांच्या महत्वाच्या कामांमध्ये अडथळा आणला गेला आहे.सर्व प्रकार महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी तसेच पत्रकार यांच्या देखतच घडत होता.टॅक्स भरणारे सर्वसामान्य पुणेकर नागरिक तसेच हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे नातेवाईक शहरी गरीब योजनेसाठी महानगरपालिकेत पत्र घेण्यात येतात त्यांची देखील अडवणूक भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेत आल्यामुळे त्यांच्या सत्काराचा अट्टहास करणा-या सत्ताधारी भाजपमुळे झाली. ही बाब अत्यंत निंदनिय व पुणे शहराच्या लौकिकास लाजविणारी आहे.असेही धुमाळ यांनी म्हटले आहे .

“….मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे”, गिरीश बापट यांचं पुण्यात विधान

0

पुणे- भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे, असं वक्तव्य केलंय. ते भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याविरोधात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांना समोर ठेवलेला चहा घेण्याबाबात सांगण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
गिरीश बापट म्हणाले, “चहाचा तर घोट घ्यायचा आहे, पण अनेकांच्या गळ्याचा देखील घोट घ्यायचा आहे. किरीट सोमय्या अनेकांची वाट लावण्याचं काम करत आहे. गेली अनेक वर्ष किरीट सोमय्या आणि मी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका, आंदोलनं, कार्यक्रमाला जातो. त्यावेळी ज्या पद्धतीने त्यांची तलवार चालते.”
काँग्रेसवाले गोमुत्र घेऊन गेलेत. तपासायला पाहिजे. कदाचित वाईन असेल. त्याचा वास इथपर्यंत येतोय. मी फक्त वासावर आहे, पित नाही कधी. त्यामुळे मी किरीट सोमय्या यांचे आभार मानतो. संजय राऊतपासून अनेक जण म्हणत असतील या किरीट बाबाला तुम्ही यूपीत का नाही पाठवलं? पण अनेक अखिलेश इथं देखील आहेत. त्यांची वाट लावण्याचं काम सोमय्या करत आहेत,” असंही गिरीश बापट यांनी म्हटलं.
किरीट सोमय्या म्हणाले, “पुण्यातील कोविड सेंटरचा ठेका मिळालेल्या कंपनीचा मालक चहावाला आहे. तसेच हा चहावाला केईएम रुग्णालयामागे असतो. ठाकरे सरकारने पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला. संजय राऊत यांची ही बेनामी कंपनी आहे. पुणे महापालिकेने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत ४ ठेके दिले.”
“उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बेनामी कंपनी आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” असंही सोमय्या यावेळी म्हणाले.

सोमय्यांचा सत्कार झालेल्या पायऱ्यांवर गोमुत्र टाकून केले शुद्धीकरण

0

पुणे-पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्या विरूद्ध महाविकास आघाडी वाद चांगलाच रंगतो आहे . आज भाजपने पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करून किरीट सोमय्यांचा पायऱ्यांवर सत्कार केल्याच्या काही तासानंतरच आता कॉंग्रेसने पायऱ्यांवर गोमुत्र टाकून शुद्धीकरण केले.आप चे कार्यकर्तेही मागे राहिले नाहीत त्यांनीही तातडीने या शुद्धीकरण सुरु केले. कॉंग्रेसचे सचिन आडेकर तर आप चे अभिजित मोरे आणि कृष्णा गायकवाड यांनी यास प्रारंभ केला. त्यामुळे सोमय्या विरूद्ध महाविकास आघाडी वाद रंगलेला दिसत असला तरी या वादात प्रचंड गोंधळाने नागरिकांचे मात्र हाल होताना दिसत आहेत .

शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्यावी : महापौर मोहोळ

0
  • परवानगीसाठी महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
  • शिवजयंती उत्सव समिती, पोलीस अधिकारी, महापालिका अधिकाऱ्यांची बैठक
  • यंदा शिवजयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्धार

पुणे (प्रतिनिधी)

कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यास सलग दोन वर्षे बंधने आल्याने यंदाचा शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा व्हावा, असा सूर शिवप्रेमींकडून उमटला असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी शिवजयंती साजरी करण्याच्या नियोजनाची बैठक घेतली. या बैठकीस पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे, प्रतिनिधी, महापालिका अधिकारी यांची उपस्थिती होती.

याबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा पद्धतीने साजरी केली जावी? यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळातील निर्बंधांमुळे शिवजयंतीचा उत्सव साजरा करताना मर्यादा आल्या, अशा भावना शिवप्रेमींनी व्यक्त केल्या होत्या. शिवजयंती उत्सवासाठी आवश्यक अटी आणि शर्थी घालून देऊन राज्य सरकारने मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यशासनाच्या नियमावलीत मिरवणुकीच्या परवानगीचाही समावेश असावा, अशी भूमिका आहे’

शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा !

◆ मिरवणुकीच्या स्वागतासाठी महापालिकेचा स्वागत कक्ष असणार

◆ पुणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना विद्युत रोषणाई करण्यात यावी.

◆ मिरवणुकीचे परवाने हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार

◆ पुणे शहरातील सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.

◆ शिवजंयती महोत्सवासाठी रथयात्रा आणि मिरवणूक यासाठी स्थानिक पोलीस विभागाने लवकरात लवकर बैठका घेऊन आवश्यक त्या परवानग्या द्याव्यात.

◆ शिवजयंतीबाबत काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीकरिता राज्य शासनाकडून नियमावली लवकरात लवकर जाहीर करावी.

◆ पुणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यासाठी येणार्याा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच फिरत्या शौचालयाची व्यवस्था करणे.

◆ मिरवणुका निघणाऱ्या मार्गांवरील खड्डे बुजविण्यात यावे, रस्त्यावरील राडारोडा उचलण्यात यावा, अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्यात याव्यात.

किरीट सोमैयांचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप

पुणे : पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे पोलीस आयुक्त नसून ठाकरे-पवारांचे एजंट असल्यासारखे वागतात. पीएमसी बँकेचे सहा हजार 400 कोटी रुपये लाटणाऱ्या राकेश वाधवान यांना ते वॉन्टेड असताना पळवलं होतं.शनिवारी मी जेव्हा महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो तेव्हा या ठिकाणी पुणे पोलिसांचा एकही कर्मचारी नव्हता. तेव्हा सर्व पोलीस अमिताभ गुप्ता यांनी गायब केले होते.किरीट सोमय्या आज पुणे महानगरपालिकेत आले होते. पुणे शहर भाजपच्या वतीने त्यांचा महापालिकेत सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केले.माझ्यावर दगडांनी हल्ला झाल्यानंतर ही अमिताभ गुप्ता यांनी किरकोळ कलम लावले. ज्यांनी माझ्या गाडीवर दगडांनी हल्ला केला त्याच्या बाजूला पोलीस उभे आहेत. त्यानंतरही त्यांनी शिवसेनेच्या गुंडावर किरकोळ कलम लावलेत. माझ्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर हत्येचे कलम लावले पाहिजे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या 64 लोकांना अटक केली पाहिजे. याचा सूत्रधार कोण याचा देखील तपास झाला पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच १०० कोटींचं कॉन्ट्रॅक्ट घेणारा चहावाला कोण? किरीट सोमय्यांचा सवाल

पुणे : पुणे महापालिकेत आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच भाजपने आज प्रचंड गर्दी ,पोलिसांच्या बंदोबस्तात पण नागरिकांच्या गोंधळात, रेटा रेटीत पण त्याच पायऱ्यांवर पुष्पगुच्छ देण्याचा हट्ट पूर्ण करतच स्वागत केलं.यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी काही वेळ पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये महापालिका आवरात येताना राडा झाला. पुणे महापालिकेत भाजपकडून पुणे महापालिकेत शक्तीप्रदर्शन अन घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी गेल्या शनिवारी पुणे महापालिकेत किरीट सोमय्या यांना घेराओं घालताना धक्काबुकी झाली आणि पडून सोमैय्या ते जखमी झाले होते. किरीट सोमय्या जिथे पडले त्याच पायरीवर त्याच ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी सोमय्या याचा सत्कार केला.

यावेळी सोमय्या म्हणाले, पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच १०० कोटी कॉन्ट्रॅक्टर कोणाला दिलं त्या कंपनी मालकाच नाव उद्धव ठाकरे यांनी हिंमत असलं तर सांगाव. तो एक चहावाला आहे आणि तो चहावाला हा के एम हॉस्पिटल पाठीमागचा एक चहावाला आहे. तो त्या कंपनीचा मालक आहे. असा उल्लेख केला. तर तो चहावाला कोण असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील लोकांच्या जीवाशी खेळला आहे. त्याचे मित्र संजय राऊत यांची बेनामी कंपनी आहे. उद्धव ठाकरे यांच्या गुंडानी मागच्या शनिवारी हल्ला केला. त्यामुळे जोपर्यंत आता हा कोविड सेंटर घोटाळा उघड होत नाही,यात सहभागी असणाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हा किरीट सोमय्या गप्प बसणार नाही.

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली

0

मुंबई-राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारेंनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

बच्चू कडूंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती लपवणे त्यांना महागात पडले. बच्चू कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असुन देखील 2014 ची विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नसल्याचा आरोप बच्चू कडूंवर होता. याच आरोपांवरुन 2017 मध्ये कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल झाला होता.

बच्चू कडूंनी फेटाळले होते आरोप
बच्चू कडू यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी ते फेटाळून लावले होते. राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घर उपलब्ध करुन दिले होते. त्यासाठी बँकेचे 40 लाख रुपये कर्ज देखील उपलब्ध करुन दिले होते. मात्र कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने चार महिन्यांपूर्वीच ते विकण्यात आल्याचा दावा बच्चू कडू यांनी त्यावेळी केलेला होता. त्यामुळे आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे 2017 मध्ये बच्चू कडूंनी म्हटले होते.

तब्बल पंधरा हजार नागरिकांनी घेतला आधार सुविधा केंद्राचा लाभ – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर

0

पुणे -नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांना सहाय्य करणारे उपक्रम एह्मीच कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना अशा दोहोनाही आनंददायी ठरतात असे येथे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या सहकार्याने दिव्यांग आधार केंद्र सुरु केले त्याच्या उदघाट्नास मी उपस्थित होतो, आज ह्या केंद्राच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने पुन्हा येथे येण्याचा योग आला ह्याचा आनंद आहेच पण त्याहीपेक्षा एखादा प्रकल्प किंवा उपक्रम हातात घेतल्यावर तो यशस्वीपणे चालविणे हे महत्वाचे आहे आणि ह्याचा आनंद जास्त होतो आहे असे गौरवोदगार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने सुरु केलेल्या दिव्यांग आधार व सुविधा केंद्राच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकप्रतिनिधिंनी नागरिकांना आधार वाटेल असे काम केले पाहिजे आणि नेहमीच्या भौतिक कामांसोबत ज्या सेवा सुविधांची नागरिकांना गरज आहे ते पुरविण्यावर भर दिला पाहिजे असे ही मुरलीधर मोहोळ म्हणाले. आता लोकप्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी ड्रेनेज, रस्ता, कचरा, पदपथ ह्याच्या पलीकडे जाऊन काम करावे असेही महापौर म्हणाले.दोन वर्षांपूर्वी येथे दिव्यांग आधार केंद्राचे उदघाट्न भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले, त्यानंतर येथे आधार हा शब्द वाचून अनेक नागरिकांनी आधार कार्डशी संबंधित कामे करून मिळतील का अशी विचारणा केली, त्यावरून मला येथे आधार सुविधा केंद्र सुरु करण्याची कल्पना सुचली असे नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. सुरवातीला नागरिक अगदी पहाटे 5:30/6 वाजल्यापासून रांग लावायचे त्यातून वादावादीचे प्रसंग ही व्हायचे, मात्र येथे टोकन ची व्यवस्था केली व त्यानंतर तब्ब्ल 15000 नागरिकांनी ह्या सुविधेचा लाभ घेतला असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. या ठिकाणी मन लावून काम करणारे सूरज शिंदे, आशिष केदारी आणि अंकित कडू यांचा यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आधार सुविधा केंद्रासोबतच येथे असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी बनविलेल्या कायमस्वरूपी विक्री केंद्रास ही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. दिव्यांग कलाकारांनी विविध वस्तू देऊन महापौरांचा सत्कार केला. केंद्राच्या संचालिका सौ. श्रीजा ठाकूर आणि शैलाताई पटवर्धन यांनी केंद्राची माहिती दिली. यावेळी शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे,शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर,नगरसेवक दिलीप वेडे पाटील,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे स्वीकृत सदस्य बापूसाहेब मेंगडे व ऍड.मिताली सावळेकर,शहर चिटणीस प्रशांत हरसुले,प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, प्रभाग सरचिटणीस निलेश गरुडकर, ऍड. प्राची बगाटे,उद्योग आघाडीचे प्रदेश सह संयोजक विश्वजित देशपांडे,शिरीष भुजबळ, उद्योग आघाडीचे सरचिटणीस रामदास गावडे,नारायण वायदंडे, प्रतीक खर्डेकर,हेमंत बोरकर, श्रीकांत गावडे,महिला मोर्चा उपाध्यक्ष पल्लवी गाडगीळ, आय टी सेल च्या संयोजिका कल्याणी खर्डेकर,माणिकताई दीक्षित,वैभवजी जमदाडे,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संदीप खर्डेकर यांनी स्वागत, मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक, निलेश गरुडकर यांनी सूत्रसंचालन तर राजेंद्र येडे यांनी आभार प्रदर्शन केले.

हुजूरपागेतील विद्यार्थीनीना स्वसंरक्षणाचे धडे

0

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी आणि कन्सर्न इंडिया फाऊंडेशनतर्फे २२४ विद्यार्थीनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण 

पुणे : शालेय वयामध्येच छेडछाडीला विरोध करण्याचे कौशल्य व तंत्र विद्यार्थीनींमध्ये विकसित व्हावे आणि स्वसंरक्षणाचे धडे घेत विद्यार्थींनी शारिरीकदृष्टया देखील आत्मनिर्भर व्हावे, याकरीता हुजूरपागेमध्ये विद्यार्थीनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. कोणत्याही ठिकाणी छेडछाडीच्या प्रसंगाला सामोरे जाताना स्वसंरक्षण करण्यासोबतच समोरच्यावर आघात कसा करावा, याची प्रात्यक्षिके सादर करीत शालेय विद्यार्थीनींनी उपस्थितांना थक्क केले. 


महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी आणि कन्सर्न इंडिया फाऊंडेशनतर्फे लक्ष्मी रोड विभागातील एचएचसीपी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि सौ. शोभाताई रसिकलाल धारिवाल हुजूरपागा इंग्रजी माध्यम या शाळांमधील इ . ९ वी तसेच  इंग्लिश मिडीयम ज्युनियर कॉलेज, लक्ष्मी रोड इ .११ वीच्या २२४ विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. लक्ष्मी रस्त्यावरील सभागृहात या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमप्रसंगी कन्सर्न इंडिया फाऊंडेशन पुणे विभागाच्या प्रमुख हायसिंथ डिकोस्टा, सोसायटीच्या अध्यक्षा रेखा पळशीकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका रंजना वाठोरे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका प्रियदर्शनी पुरोहित आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 
हायसिंथ डिकोस्टा म्हणाल्या, नागरिकांचे सबलीकरण हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन फाऊंडेशन कार्यरत आहे. शालेय वयातच विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे मिळावे, याकरीता हे प्रशिक्षण देण्यात आले. दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण झाल्यास याचा उपयोग होणार आहे. यामध्ये सर्व प्रकारचे कौशल्य व तंत्र विद्यार्थीनींना शिकविण्यात आल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आहे. 
प्रियदर्शनी पुरोहित म्हणाल्या, शाळा ही फक्त शिक्षणापुरती मर्यादित नसून विद्यार्थीनींच्या सर्वांगिण विकासाकरीता काम करते. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे असे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. शारिरीक, मानसिकदृष्टया मुली व महिलांनी सक्षम होणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलींना शारिरीकदृष्टया सक्षम करण्याचे काम या उपक्रमाने केले आहे. 
स्वसंरक्षण प्रशिक्षणाने आमच्यामधील आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आमच्या आजूबाजूच्या मैत्रिणींना देखील असे प्रशिक्षण घेण्याकरीता उद्युक्त करु. भविष्यात देखील या प्रशिक्षणाचा आम्हाला खूप उपयोग होणार असल्याची भावना विद्यार्थीनींनी व्यक्त केली. श्रद्धा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता वेळापुरे यांनी आभार मानले.

केरळ सफरनामा…. भाग 5

0

पूवरला जायचे आणि जाता जाता वाटेत तीन महत्त्वाची मंदिरं करायची, असे ठरवले. त्याप्रमाणे सकाळी ४ वाजता उठलो. पहाटे पहाटे आल्लेपीहून प्रवास सुरू झाला. पहाटेचे प्रसन्न वातावरण. रस्त्यात मंदिरं दिसत होती. तसेच मंदिरात जाणाऱ्या भाविकांची लगबगही. हा अनुभव आम्ही जिथे कुठे जात होतो तिकडे आला. तिकडची लोकं तशी श्रद्धाळू आणि धार्मिक. आपल्या परंपरेचा आदर करणारी आणि जोपासणारी. मंदिरांवर रोषणाई केलेली. सर्वत्र स्वच्छता. प्रशस्त आवार आणि सभामंडप. प्रसन्न, चैतन्यमय वातावरण. आजूबाजूचा परिसर पाहण्यात गुंग झालेलो आम्ही वायकोमला कधी येऊन पोहोचलो ते कळलेच नाही. सकाळचे ५ वाजले होते. समोरच वायकोम महादेव मंदिराचे प्रवेशद्वार होते. पारंपरिक वाद्ये वाजत होती. थोडे पुढे जाऊन उभे राहिलो तर दिसणारे दृश्य डोळे दिपवणारे होते. सजवलेले हत्ती…त्यावर बसलेली व्यक्ती बहुदा मुख्य पुजारी असावी, त्यामागून पालखी, प्रदक्षिणा घालणारे भक्तगण आणि या सर्वांच्या पुढे बंदूकधारी शिपाई. अगदी शाही लवाजमा होता! हत्ती प्रदक्षिणा घालून मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याशी आला की तिथे उभे असलेले पुजारी मंत्रोच्चार करत असावेत. आणि परत पुढची प्रदक्षिणा घालायला सुरूवात.

एक-दोन प्रदक्षिणेनंतर हत्तीने गाभाऱ्यासमोर स्वतःलाही प्रदक्षिणा घातली. आम्ही सगळेच मंत्रमुग्ध होऊन हा सोहळा याची देही याची डोळा पाहात होतो. प्रदक्षिणेचा हा सोहळा पार पडल्यानंतर भक्तांसाठी दर्शन खुले झाले. वायकोम महादेवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर पुढे एत्तुमनूर शिव मंदिर आणि कडूथुरुथी महादेवाचे मंदिर या दोन्हीचे दर्शनही घेतले. असं म्हणतात की या तिन्ही ठिकाणचे दर्शन घेतले की कैलासाचे दर्शन झाल्याचे भाग्य मिळते. सकाळी ८ च्या आतच आमची तीन मंदिरं करून झाली होती, आता पुढे पूवर आयलँडच्या दिशेने प्रवास सुरू झाला. पूवर महिंद्रा क्लब पोहोचेपर्यंत दुपार झाली होती. सकाळपासून प्रवास करून दमलोही होतो. आमच्या रूमची रचना केरळी स्थापत्य शैलीतील घरासारखी होती, अगदी प्रवेशद्वार सुद्धा! आतमध्ये स्वतंत्र छोटा स्विमिंग पूल होता. पूवर आयलँडचं स्वतःचं एक वेगळेपण होतं जे दुसऱ्या दिवशी मॅन्ग्रोव्ह बॅक वॉटर करताना अनुभवलं. तिथेही नदी आणि समुद्राचा संगम पाहायला मिळाला. या दोहोंच्या मधेच किनाऱ्यावर आम्ही उतरलो. शुभ्र फेसाळणाऱ्या लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. समोर अथांग निळाशार समुद्र. फोटो तरी किती काढायचे. हा अनुभवलेला  क्षण गच्च डोळे मिटून आठवणीतल्या कॅमेऱ्यातच बंदिस्त करून टाकला.

गुरुवायूरपासून सुरू झालेली ट्रिप पूवरला येऊन संपली. परत निघण्याचा दिवस उजाडला. या ८ दिवसांत अनुभवलेलं सगळं काही आठवलं. स्वच्छ सुंदर रस्ते, मंदिराचं पावित्र्य, निळाशार अथांग सागर आणि महत्त्वाचं म्हणजे अपघाताच्या दरम्यान झालेलं माणुसकीचे दर्शन. आमच्या आधीचा ड्रायव्हर राकेशही कोचीला आम्हाला भेटायला आला होता. त्याचे आणि मुस्तफाचे आभार मानून आम्ही मुंबईकडे प्रयाण केले.

सगळे सुखरूप परत आलो म्हणूनच तर मस्त झाली ना आपली केरळ ट्रिप. मुंबई एअरपोर्टवर आम्हा सगळ्यांच्या तोंडी हे एकच वाक्य होते आणि चेहऱ्यावर सगळे नीट पार पडल्याचे समाधान.

म्हणतात ना…प्रवासातल्या आठवणींचा सुगंध झाला की प्रवास सुरूच राहातो…संपत नाही आणि तसच झालं… पुढील ट्रिप कोणती यावर चर्चाही सुरू झाली…

लेखिका – पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

देशाच्या संविधानाला ठेच पोहचू देणार नाही-रमेश बागवे,

0

पुणे –

     कर्नाटकातील भाजप सरकारने आपल्या राज्यातील शाळा व महाविद्यायलयामध्ये विद्यार्थीनींनी हिजाब (गुरखा) परिधान करू नये आस आदेश काढला. या आदेशाच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली कोहिनूर चौक, एम.जी.रोड, कॅम्प येथे निदर्शने-आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कर्नाटकातील भाजप सरकारचा धिक्कार असो अश्या घोषणा दिल्या.

     यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘कर्नाटकातील भाजप सरकारने शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी हिजाब घालू नये असा आदेश काढला तो संविधानाच्या विरोधात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये सर्व जाती धर्मांना समान अधिकार दिलेला आहे. अल्पसंख्यांकांना सुध्दा त्यांनी आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणत्या धर्माच्या व्‍यक्तीने कोणते कपडे घालायचे हे सरकार ठरवू शकत नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्‍यक्ती स्वातंत्र्य आहे. भारतीय जनता पक्ष ५ राज्यात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेवून जाणून बुजून अशा प्रकारचे आदेश काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. काँग्रेस पक्ष हा धर्म निरपेक्ष पक्ष आहे. जर भारतीय जनता पक्ष सत्तेचा गैर वापर करून अशा प्रकारचे आदेश काढून संविधानाला धोका निर्माण करीत असेल तर काँग्रेस पक्ष संविधानाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. संविधानाला ठेच पोहचू देणार नाही. स्वातंत्र्याच्या लढाईल देशातील सर्व जाती जमातीचे नागरिक सहभागी झाले होते. भारत देश राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे आणि त्याचे रक्षण प्रत्येक भारतीयाने केले पाहिजे. विविधता मध्ये एकता ही आपल्या देशाची परंपरा आहे. कर्नाटक सरकारने त्वरीत त्यांनी काढलेले आदेश मागे घ्यावा.’’

   निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, नगरसेवक अरविंद शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली. यावेळी मुस्लिम महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

     यावेळी गटनेते आबा बागुल, कमल व्‍यवहारे, शिवाजी केदारी, मुख्तार शेख, मंजूर शेख, रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, अजित दरेकर, चाँदबी नदाफ, नीता रजपूत, संगीता तिवारी, पूजा आनंद, राजेंद्र शिरसाट, अरूण वाघमारे, नुरुद्दीन सोमजी, आस्मा शेख, रमेश सोनकांबळे, प्रदीप परदेशी, सुनिल घाडगे, प्रविण करपे, सुजित यादव, अनिल अहिर, अविनाश अडसूळ, देविदास मगर, हेमंत राजभोज, परवेज तांबोळी, हार्दिक परदेशी, बबलू कोळी, क्लेमंट लाजरस, रॉबर्ट डेविड, आयुब पठाण, सुनिल पंडित, अमित बांडे, प्रेरणा गायकवाड आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा सुपरमार्केट आणि माॅलमध्ये वाईन विक्रीला विरोध

0

पुणे :  सुपरमार्केट आणि माॅलमध्ये सुलभरित्या वाईन विक्री आणि दारु परवाने देण्यास पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.  शेतकर्‍यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अन्य अनेक उपाययोजना करता येण्यासारख्या आहेत. त्यासाठी वाईनला सर्वसामान्यता देणे हा पर्याय कदापि होऊ शकत नाही. शेतकर्‍यांना हातभार देणारे आणि समाजालाही हितकारक ठरणारे निर्णय घेण्याऐवजी शासन येणार्‍या पिढीला व्यसनाधीन करणारे पाऊल उचलत आहे.  राज्यकर्त्यांनी निर्णय घेताना केवळ तिजोरीचा विचार करायचा नसतो तर लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे असते. शासनाने सुलभरित्या वाईनविक्रीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन आपली चूक सुधारली पाहिजे, अशी भूमिका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने घेतली आहे.

राज्य सरकारने राज्यापुढील सर्व महत्त्वाचे, ज्वलंत आणि कळीचे प्रश्न बाजूला सारत हिरीरीने आणि तत्परता दाखवत सर्वसामान्यांसाठी वाईन खुली करण्याचा आणि दारु परवाने देण्यास पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर शेतकर्‍यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे लेबलही जोडून आपल्या असंवेदनशील मानसिकतेचे दर्शन घडवून आणले. समाजाला व्यसनांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणार्‍या अनेक संतांची, समाजसुधारकांची परंपरा  महाराष्ट्राला लाभली आहे. त्यांच्या आजवरच्या कार्यावर बोळा फिरवण्याचे काम या निर्णयाने शासनाने केले आहे.

सुर्यकांत पाठक म्हणाले, शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक प्रक्रिया उद्योगांना चालना देता येणे शक्य आहे. यामध्ये  कांदा सुकवणे, डाळींबाचा रस काढणे, टोमॅटो केचअप तयार करणे, मोरावळा तयार करणे, द्राक्षापासून जेली, जॅम, ज्यूस, ग्रेप सिड ऑईल तयार करणे, आंब्याचा पल्प काढणे, संत्र्याचा ज्यूस काढणे या उद्योगांचा समावेश होतो. यातून दरवर्षी बाजारव्यवस्थेतील भावांच्या चढउतारामुळे फेकून द्यावा लागणार शेतमाल वाया जाण्यावर नियंत्रण येईल आणि उद्योगांच्या साखळीमुळे शेतकर्‍यांना चांगला भाव मिळण्यास मदत होईल. यामधून रोजगारनिर्मिती होऊन राज्यालाही महसूल मिळाला असता; पण या पर्यायांऐवजी वाईनला चालना देणारे पाऊल उचलून सरकारने आपल्या मानसिकतेचे दर्शन घडवले आहे.