आर्थिक अडचण दूर करण्यासाठी थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन
पुणे, दि. १४ मार्च २०२२ : वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणने वसूलीसाठी नाईलाजाने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह अकृषक वर्गवारीतील १३ लाख १८ हजार ९०० थकबाकीदारांकडे तब्बल २ हजार ३२ कोटी ६२ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये महावितरणकडून २७ हजार ६१८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र या महिन्यातील सर्व सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी देखील कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.
वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करणारी महावितरण कंपनी सर्वसामान्य वीजग्राहकांप्रमाणे एक ग्राहक आहे. वीजबिलांच्या वसूलीतूनच सर्व प्रकारच्या देणी महावितरणला भागवाव्या लागतात. मात्र वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटली आहे. अतिदुर्गम खेड्यापाड्यांपासून सर्वच क्षेत्रात वीजसेवा देणाऱ्या व जनतेच्या मालकीची वीज कंपनी असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती सध्या अतिशय गंभीर आहे. अशा स्थितीत महावितरणचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा असे कळकळीचे आवाहन महावितरणकडून आले आहे.
सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा इतर अकृषक वर्गवारीतील १३ लाख १८ हजार ९०० ग्राहकांकडे २०३२ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये (कंसात थकबाकी) पुणे जिल्हा- ७ लाख ११ हजार ६२५ (७७५ कोटी ६६ लाख), सातारा जिल्हा- १ लाख १९ हजार २८५ (२१५ कोटी ४६ लाख), सोलापूर जिल्हा- १ लाख ९० हजार (६१४ कोटी ३९ लाख), सांगली जिल्हा- १ लाख ४४ हजार २६५ (१७५ कोटी ३६ लाख) आणि कोल्हापूर जिल्ह्यात १ लाख ५३ हजार ७२० ग्राहकांकडे २५१ कोटी ७५ लाख रुपयांची थकबाकी आहे.
कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीमधील ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा दि. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत थकबाकीमुळे कायमस्वरुपी खंडित झाला आहे त्यांच्यासाठी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेनुसार १०० टक्के व्याज व विलंब आकार माफ करण्यात आले आहे. त्यानंतरची मूळ थकबाकी भरण्यास सहा हप्त्यांची सोय उपलब्ध आहे तर एकाच वेळी मूळ थकबाकी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के व लघुदाब ग्राहकांना १० टक्के थकबाकीमध्ये अतिरिक्त सवलत देण्यात येत आहे. यासोबतच कृषिपंप वीजग्राहकांसाठी असलेल्या थकबाकीमुक्ती योजनेत येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येत आहे.
मात्र वारंवार आवाहन करूनही वीजबिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरु करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत पुणे जिल्ह्यात १८ हजार ४४८, सातारा जिल्हा- २५१७, सोलापूर- १९५८, कोल्हापूर- २८९६ आणि सांगली जिल्ह्यातील १७९९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांकडे एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या रूपाने न्हेणारे मॅरॅथॉन मॅन पुणे अथेलेटिक्स चळवळीचे जनक क्रीडा संघटक व क्रीडा पत्रकार स्व प्रल्हाद सावंत यांची स्मृती जागती ठेवण्यासाठी आज पुण्यातील ४२.१ किमी लांबीच्या मार्गास मॅरॅथॉन मॅन पुणे अथेलेटिक्स चळवळीचे जनक क्रीडा संघटक स्व प्रल्हाद सावंत पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन मार्ग असे नामकरण करण्याचा भावनिक कार्यक्रम आज संपन्न झाला. सणस मैदान येथील सणस पुतळ्याजवळ नाम फलकाचे अनावरण पुण्यनगरीचे महापौर मा. मुरलीधर मोहोळ व जेष्ठ गांधीवादी नेते मा. उल्हास पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांच्या पुढाकाराने या संदर्भातला ठराव पुणे महानगरपालिकेत एक मताने मंजूर करण्यात आला.
या प्रसंगी पुणे मनपा गटनेते आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले की , प्रल्हाद सावंत हे क्रीडा विश्वाला वाहून घेतलेले व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अश्या कर्तबगार क्रीडा संघटक व क्रीडा पत्रकाराचे नाव मॅरेथॉन मार्ग म्हणून द्यावे अशी कल्पना माझ्या मनात आली आणि महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी त्यास एक मताने पाठिंबा दिला ही विशेष बाब मानली पाहिजे. या संपूर्ण ४२. १ किमी मार्गास नाव देणे ही जगातील पहिलीच घटना असेल त्यांच्या स्मृतीमुळे बाल युवक व तरुणांमध्ये मॅरेथॉन बद्दलचे प्रेम अधिक वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गरीब कुटुंबातील तरुण परिस्थितीशी झगडत महान कार्य उभे करू शकतो. त्याचे प्रल्हाद सावंत मूर्तीमंत उदाहरण आहे असे ते म्हणाले. पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले की, प्रल्हाद सावंत हे सर्वांशी मिळून मिसळून राहणारे क्रीडा व्यक्तिमत्व होते. तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी या क्रीडानगरीत आंतराष्ट्रीय मॅरेथॉन सुरु केली. त्याचा व्याप वाढवला तो प्रल्हाद सावंत यांनी पुण्याच्या वैभवात या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमुळे सदैव भर पडत गेली. शेकडो आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. जागतिक व आंतरराष्ट्रीय खेळाच्या नकाशावर पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनचे नाव ठळकपणे नेण्यात प्रल्हाद सावंत यांचा मोठा वाटा आहे. पुणे महानगरपालिकेत सत्ता बदल झाला तरी देखील चांगले काम हे नेहमीच कौतुकाची बाब ठरत असते त्यामुळे सत्ता बदल झाला तरी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन अखंडपणे चालू राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ४२. १ किमीच्या मार्गावर ४० ठिकाणी त्यांच्या नावाचे फलक लावण्याचे नियोजन आम्ही लवकरच करू असे शेवटी ते म्हणाले. यावेळी जेष्ठ गांधीवादी नेते उल्हास पवार म्हणाले की , प्रल्हाद सावंत तळागाळातला कार्यकर्ता होता. त्याचे क्रीडा प्रेम अफलातून होते. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात क्रीडा स्पर्धा असली की तेथे आवर्जून जायचे. एवढेच नव्हे तर त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आठ ऑलम्पिक स्पर्धेचे वार्तांकन केले. आठ ऑलम्पिक स्पर्धाचे वार्तांकन करणारे कदाचित ते पहिले मराठी पत्रकार असेल. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन हे त्यांचे जीवन धैय बनले होते. आणि त्यासाठी त्यांनी पूर्णपणे वाहून घेतले होते. अश्या प्रकारे त्यांची स्मृती जतन करण्यासाठी संपूर्ण मॅरेथॉन मार्गाला त्यांचे नाव देणे हि जगातील एकमेव घटना असावी असे आवर्जून नमूद करून यासाठी आबा बागुलांना त्यांनी विशेष धन्यवाद दिले. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्थ ऍड अभय छाजेड म्हणाले की, प्रल्हाद सावंत हे व्यक्ती नव्हे तर संस्था बनले होते. मैत्रीला जगणारे हे उमदे व्यक्तिमत्व होते. पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनची तारीख निश्चित करून त्या नंतर संपूर्ण काळ अत्यंत बारकाईने नियोजन करून सर्व प्रकारच्या,सर्व थरातील लहान थोरांना एकत्र आणून पुणे इंटरनॅशनल स्पर्धा यशस्वी करणं यासाठी ते अहोरात्र झटायचे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनमुळे तयार झाले. त्याचे श्रेय नक्कीच त्यांना जाते. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी प्रल्हाद सावंत यांच्या आठवणी जागवून म्हंटले की , प्रल्हाद सावंत हे सतत हसतमुख व्यक्तिमत्व होते तसेच क्रीडा नेतृत्व होते. पुण्याला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या नकाशावर त्यांनी ठळकपणे नेले त्यात सातत्य राखले कितीही अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग कसा काढायचा क्रीडा स्पर्धा यशस्वी कशी करायची हे प्रल्हाद सावंतांकडून सर्वानी शिकायला हवे. त्यांच्या निधनांनंतर देखील पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन त्याच जोमाने पुढे चालू ठेवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. याप्रसंगी डॉ सतीश देसाई, माजी आमदार दीप्ती चवधरी यांची भाषणे झाली याप्रसंगी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्त व सचिव रोहन मोरे, रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, पुणे जिल्हा हाऊसची ऑथेंटिक्स संघटनेच्या सचिव गुर्बन्स कौर, वैदकीय पथक प्रमुख डॉ राजेंद्र जगताप, मराठा महा संघाच्या केंद्रीय समन्वयक राजेंद्र कुंजीर, ऍड निकम, स्मिता शिरोळे यांसह अनेक छत्रपती व अर्जुन पुरस्कार विजेते, क्रीडा संघटक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल यांनी आभार मान
पुणे, 14 मार्च 2022- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत उपांत्य फेरीत तलवार्स व मस्किटर्स या संघांनी अनुक्रमे एक्स्कॅलिबर्स् व समुराईज संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात तलवार्स संघाने एक्स्कॅलिबर्स् संघाचा 564-535 असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. टेनिस प्रकारात अभिषेक ताम्हाणे, मधुर इंगळहाळीकर, अभिजीत खानविलकर, शान मदन, देवेंद्र चितळे, नेहा ताम्हाणे, विराज खानविलकर, कर्ना मेहता 13-20 यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एक्स्कॅलिबर्स् संघाने तलवार्स संघाचा 159-147 असा पराभव करून आघाडी घेतली. पण टेबल टेनिसमध्ये रोहन छाजेड, राहुल पाठक, शिल्पा पांडे, कौस्तुभ देशपांडे, अंकित दामले, आर्य देवधर, ईशान भाले, अविनाश दोशी, गिरीश मुजुमदार, अक्षय ओक यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर तलवार्स संघाने एक्स्कॅलिबर्स्चा 206-196 असा पराभव करून हि आघाडी भरून काढली. त्यानंतर बॅडमिंटन प्रकारात तलवार्स संघाने एक्स्कॅलिबर्स् संघाचा 211-180 असा पराभव करून विजय मिळवला. तलवार्सकडून आर्य देवधर, मकरंद चितळे, तेजस किंजवडेकर, अंकित दामले , मिहीर आपटे, अविनाश दोशी, राहुल पाठक, वेदांत क्षीरसागर यांनी अफलातून कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत मस्किटर्स संघाने समुराईज संघाचा 404-284 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:तलवार्स वि.वि. एक्स्कॅलिबर्स् 564-535टेनिस: तलवार्स पराभूत वि. एक्स्कॅलिबर्स् 147-159(रोहन छाजेड/रोहन जमेनिस वि.वि.अमोल काणे/संग्राम पाटील 30-21; शिव जावडेकर/तेजस किंजवडेकर पराभूत वि.अभिषेक ताम्हाणे/मधुर इंगळहाळीकर 18-30; कुणाल भुरट/शरयू राव पराभूत वि.अभिजीत खानविलकर/शान मदन 8-30; राहुल पाठक/अवनी क्षीरसागर पराभूत वि.देवेंद्र चितळे/नेहा ताम्हाणे 28-30; अंकित दामले/ईशान भाले वि.वि.सचिन अभ्यंकर/हरीश गलानी 30-12; आर्य देवधर/मकरंद चितळे वि.वि.प्रीती मराठे/विश्वेश कटक्कर 20-16; प्रशांत वैद्य/अक्षय ओक पराभूत वि.विराज खानविलकर/कर्ना मेहता 13-20); टेबल टेनिस: तलवार्स वि.वि. एक्स्कॅलिबर्स् 206-196(रोहन छाजेड/राहुल पाठक वि.वि.अभिषेक ताम्हाणे/देवेंद्र चितळे 30-15; शिल्पा पांडे/कौस्तुभ देशपांडे वि.वि.मधुर इंगळहाळीकर/अजित बेलवलकर 30-29; तेजस किंजवडेकर/कुणाल भुरट पराभूत वि.आनंद शहा/संग्राम पाटील 28-30; रोहन जमेनिस/मनीष शहा पराभूत वि.राधिका इंगळहाळीकर/विश्वेश देशपांडे 12-30; मकरंद चितळे/प्रशांत वैद्य पराभूत वि.अमोल काणे/अनिरुद्ध कोंकर 16-30; अंकित दामले/आर्य देवधर वि.वि.कर्ना मेहता/शान मदन 30-24; ईशान भाले/अविनाश दोशी वि.वि.अभिजीत खानविलकर/विश्वेश कटक्कर 30-23; गिरीश मुजुमदार/अक्षय ओक वि.वि.जय गुजर/विराज खानविलकर 30-15) बॅडमिंटन: तलवार्स वि.वि. एक्स्कॅलिबर्स् 211-180(आर्य देवधर/मकरंद चितळे वि.वि.राधिका इंगळहाळीकर/संग्राम पाटील 30-21; तेजस किंजवडेकर/अंकित दामले वि.वि.देवेंद्र चितळे/हर्षवर्धन आपटे 30-09; मिहीर आपटे/अविनाश दोशी वि.वि.मधुर इंगळहाळीकर/आनंद शहा 30-09; ईशान भाले/प्रशांत वैद्य पराभूत वि.अनिरुद्ध कोंकर/हरीश गलानी 24-30; गिरीश मुजुमदार/अक्षय ओक पराभूत वि.देवेंद्र राठी/कर्ना मेहता 26-30; राहुल पाठक/वेदांत क्षीरसागर वि.वि.अमोल काणे/अभिजीत खानविलकर 30-21; मनिष शहा/हरीश अय्यर पराभूत वि.अभिषेक ताम्हाणे/शान मदन 22-30; रोहन जमेनिस/शिव जावडेकर पराभूत वि.इरा आपटे/विश्वेश कटक्कर 19-30);
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून एनएमआयसीच्या संकुलात आज व्हिंटेज कार आणि बाईक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून हे प्रदर्शन एनएमआयसीने व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया (VCCCI) च्या सहकार्याने आयोजित केले आहे.
यावेळी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर म्हणाल्या की 75 व्हिंटेज कार्स आणि बाईक्सचा अतिशय सुंदर संग्रह आजच्या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे.
आज आपल्याला जे स्वातंत्र्य उपभोगायला मिळत आहे ते मिळवून देण्यासाठी आपल्या आधीच्या पिढ्यांनी किती संघर्ष आणि त्याग केला त्याची आठवण करून देणारे हे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले.
अभिनेता अक्षय कुमार आणि कृती सॅनन यांनी देखील अतिरिक्त सचिवांसोबत या प्रदर्शनाला भेट दिली.
या संग्रहालयाच्या संकुलात उभारलेल्या एका सेल्फी पॉइंटचे यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर आणि फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक रवींद्र भाकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
महामारीमुळे बराच काळ बंद राहिल्यानंतर आता महामारीचे निर्बंध शिथिल केल्यावर भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाला (NMIC) अभ्यागतांचे स्वागत करण्याची देखील एक संधी उपलब्ध झाली. यामुळे चित्रपटरसिक आणि चित्रपटांचे हौशी चाहते यांच्यामध्ये मोठा उत्साह पसरला आहे. भारतीय सिनेमाचा समृद्ध भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य साजरे करणाऱ्या अनेक चित्रपटांची प्रेक्षक प्रशंसा करतील.
महामारीमुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल केल्यावर अलीकडेच या संग्रहालयात पुन्हा अभ्यागतांना प्रवेश देण्यात आला.
हे संग्रहालय जनतेसाठी मंगळवार ते रविवार दरम्यान सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुले आहे, तर त्याची तिकिट खिडकी संध्याकाळी पाच वाजता बंद होईल. सोमवारी आणि सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी संग्रहालय बंद राहील.
या संग्रहालयाविषयी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर म्हणाल्या की या संग्रहालयात गेल्या काही वर्षातील भारतीय चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांच्या कामगिरीचे दर्शन घडते.
“भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे ज्याचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 2019 मध्ये करण्यात आले होते. महामारीमुळे संग्रहालय पाहणाऱ्यांना आणि चित्रपट रसिकांना बराच काळ एनएमआयसीपासून दूर रहावे लागले. पण आता आम्हाला पुन्हा एकदा येथे लोकांचे स्वागत करायचे आहे. हे संग्रहालय संपूर्ण भारतातील दिग्गजांचे योगदान प्रदर्शित करते आणि उपकरणे आणि परस्परसंवादी माध्यम अभ्यागतांना संपूर्णपणे यामध्ये गुंतवून ठेवते. संग्रहालयाचे वेळोवेळी अद्ययावतीकरण होत राहील आणि चित्रपट विश्वात भर पडत राहील. आपल्या चित्रपटांना खूप जुनी परंपरा आहे, अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या देशात 13 भाषांमध्ये चित्रपट बनवले जात आहेत. हा वारसा आणि आपल्या चित्रपट क्षेत्राची समृद्धी एनएमआयसीच्या माध्यमातून प्रदर्शित करणे आम्हाला शक्य झाल्याने आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
हे संग्रहालय इतके वैशिष्ट्यपूर्ण का आहे याची माहिती एनएफडीसी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक रवींद्र भाकर यांनी दिली.
“आगामी काळात हे संग्रहालय इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय म्हणून उभे असल्याचे तुम्हाला दिसून येईल. जगातील सर्वोत्तम संग्रहालयांच्या तोडीस तोड अशा प्रकारची या संग्रहालयाची उभारणी करण्यात आली आहे आणि सध्या आशियामधील हे सर्वोत्तम संग्रहालय आहे. या संग्रहालयात असलेला अतिशय मौल्यवान ठेवा आणि दुर्मिळ संग्रह यामुळे हे संग्रहालय इतरांपेक्षा अधिकच महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरते. ते चित्रपट निर्मात्यांना वेगळी उर्जा प्रदान करते आणि सर्वसामान्य प्रेक्षकांना पुन्हा भूतकाळातील आठवणींच्या सफरीवर घेऊन जाते.”
व्हीसीसीसीआयचे अध्यक्ष नीतीन डोसा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, एनएमआयसी सोबत भागीदारी करणे आमच्यासाठी अतिशय सन्मानजनक आहे आणि त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. संग्रह करण्याची आणि त्याचे प्रदर्शन करण्याची आम्हा दोघांचीही भावना मिळतीजुळती आहे. आम्ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सर्व वाहने आणि संबंधित साहित्याचे प्रदर्शन करतो. व्हीसीसीसीआय काळजीपूर्वक आणि कुशल ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देते आणि रस्ता सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करणे हे आपले कर्तव्य आहे. आमच्या क्लबच्या सदस्यांना येथे आमंत्रित केल्याबद्दल आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की एनएमआयसी सोबतचे आमचे फलदायी संबंध सुरू राहतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा.”
अभिनेते अक्षय कुमार आणि कृती सॅनन यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आणि फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक यांच्यासोबत एनएमआयसीची माहिती देत सफर घडवण्यात आली.
यावेळी बोलताना अभिनेते अक्षय कुमार म्हणाले, “इथे आल्यानंतर मी खरोखच भारावून गेलो आहे. एनएमआयसीसोबत असण्याची भावना अतिशय आनंददायी होती. मी गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक प्रसिद्ध चित्रपट पाहत मोठा झालो आहे आणि प्रत्येकाने हे भव्य चित्रपट संग्रहालय येऊन पाहावे. जर याविषयी आणखी काही बोलायचे झाले तर मी असे सांगेन की हे स्थान एखाद्या चित्रपट निर्मात्यासाठी अतिशय पवित्र, पूजनीय स्थान आहे कारण दिग्गज चित्रपट निर्मात्यांचे कार्य येथे अतिशय सन्मानाने संग्रहित केले आहे आणि त्याचे अतिशय उत्तम पद्धतीने प्रदर्शन केले जात आहे.”
अभिनेत्री कृती सॅनन म्हणाली,“ हे संग्रहालय पाहिल्यावर मी खूपच प्रभावित झाले, त्याची मांडणी इतकी सुंदर आणि मोहक आहे आणि मला हे माहितच नव्हते की चंद्रलेखा हा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट आहे जो संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाला आणि 1940 च्या दशकात प्रदर्शित झालेला हा सर्वात महागडा चित्रपट होता, ज्या चित्रपटाने दक्षिण भारतीय निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांचे उत्तर भारतात मार्केटिंग करण्यासाठी प्रेरित केले. त्यातही बालकांचा विभाग असलेला मजला माझा अतिशय आवडता होता, जो विविध प्रकारच्या प्रत्यक्ष सहभागांच्या कृतींवर आधारित होता आणि त्यामध्ये पूर्णपणे रममाण करून टाकणारा होता.”
एनएमआयसीमध्ये पुरातन मौल्यवान वस्तूंचा विपुल संग्रह आहे. यामध्ये शिवाजी गणेशन यांनी “वीरा पांड्या कट्टाबोम्मम” या चित्रपटात घातलेले चिलखत आणि “आदिमाई पेन्न” या चित्रपटात एम जी रामचंद्रन यांनी घातलेला लाल कोट यांच्यासह चित्रपटांची प्रॉपर्टी, जुनी सामग्री, पोस्टर्स, महत्त्वाच्या सिनेमांच्या प्रती, प्रमोशनल लीफ्लेट्स, गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका, ट्रेलर्स, ट्रान्स्परन्सीज, जुन्या काळातील चित्रपट नियतकालिके, चित्रपट निर्मिती आणि वितरण यांची माहिती देणारी आकडेवारी इ. या संग्रहालयात अतिशय नीटनेटक्या पद्धतीने मांडण्यात आली आहे आणि त्यातून भारतीय सिनेमाच्या इतिहासाचे घटनाक्रमानुसार दर्शन घडत आहे.
भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाविषयी (NMIC) –
हे संग्रहालय दोन इमारतींमध्ये तयार करण्यात आले आहे. एक आहे न्यू म्युझियम बिल्डिंग आणि दुसरी 19 व्या शतकातील ऐतिहासिक गुलशन महल, या दोन्ही इमारती मुंबईतील चित्रपट प्रभागाच्या संकुलात आहेत.
न्यू म्युझियम बिल्डिंगमध्ये चार प्रदर्शन सभागृहे आहेत ज्यामध्ये आहेत:
गांधी आणि सिनेमा: या कक्षात केवळ गांधीजींच्या जीवनावर आधारित असलेलेच चित्रपट नाहीत तर त्यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या सिद्धांतांचा चित्रपटांवर पडलेला सखोल प्रभाव दाखवणारे देखील चित्रपट आहेत.
बालकांचा फिल्म स्टुडियो: यामुळे अभ्यागतांना विशेषतः बालकांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि चित्रपटनिर्मितीच्या कलेबाबत माहिती जाणून घेण्याची संधी उपलब्ध होते. चित्रपटांशी संबंधित कॅमेरा, लाईट, चित्रिकरण, अभिनयाचा अनुभव या सर्व बाबींचा संवादात्मक अनुभव घेता येतो. त्याचबरोबर क्रोमा स्टुडियो, इमर्सिव एक्स्पिरिअन्स झोन, स्टॉप मोशन ऍनिमेशन स्टुडियो, व्हर्चुअल मेकओव्हर स्टुडियो यांचाही आनंद घेता येतो.
तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि भारतीय सिनेमा: या कक्षात भारतीय चित्रपट निर्मात्यांनी रुपेरी पडद्यावर सिनेमॅटोग्राफिक प्रभाव निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या केलेल्या सर्जनशील वापराचे दर्शन घडते.
भारतातील सिनेमाची व्याप्ती: भारतभरात सर्वत्र सळसळत्या उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या चित्रपट संस्कृतीच्या जादुई प्रभावाचे या कक्षात दर्शन घडते.
गुलशन महल ही एक एएसआय श्रेणी-II ची पुरातन वारसा वास्तू असून तिचे एनएमआयसी प्रकल्पाचा भाग म्हणून पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. या ठिकाणी भारतीय सिनेमाचा 100 वर्षांचा प्रवास प्रदर्शित करण्यात आला आहे. याची मुख्यत्वे 9 विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सिनेमाचे मूळ, सिनेमाचा भारतात प्रवेश, भारतीय मूक चित्रपट, ध्वनीचे आगमन, स्टुडियोचे युग, दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव, सर्जनशील अनुनाद, नवी लाट आणि प्रादेशिक सिनेमाच्या पलीकडे असे हे विभाग आहेत.
पुणे दि.१३- जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ या संकल्पनेवार आधारीत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथ आणि एलईडी वाहनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, कृषी आयुक्त धीरज कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पर्यावरण तज्ज्ञ डॉ.महेश गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, माहिती अधिकारी सचिन गाढवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, माहिती सहायक गणेश फुंदे, संदीप राठोड आदी उपस्थित होते.
पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम स्तुत्य असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी जनजागृती उपक्रमाची माहिती दिली. डॉ.मोघे यांनी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रसिद्धी उपक्रमांची माहिती दिली.
चित्ररथ आणि एलईडी वाहन जिल्ह्यातील वनक्षेत्र अधिक असलेल्या भागातील प्रत्येकी १५० पेक्षा अधिक गावातून फिरणार आहे. संकल्पनेशी संबंधित ५ विविध विषयांवर लघुचित्रफीती तयार करण्यात आल्या आहे. त्यात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, डॉ.महेश गायकवाड यांच्या संदेशाचादेखील समावेश करण्यात आला आहे. या चित्रफीती नंतर शाळांमधूनदेखील दाखविण्यात येणार आहेत. 000
मुंबई, दि.१३: विकास करण्याच्या घाईमध्ये माणसाने अनेक गोष्टी गमावल्या आहेत. पर्यावरण बदल हा त्याचाच दुष्परिणाम आहे. त्याची जाणीव झाल्यानंतर देखील सुधारणेला नेमकी कोणी सुरुवात करायची याची जगभरात द्विधा मनस्थिती असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई वातावरण कृती आराखड्यातून सर्वांसमोर आदर्श घालून दिला आहे. विकास हा मुळावर उठणारा नव्हे तर शाश्वत टिकणारा असला पाहिजे, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.
बदलत्या वातावरण स्थितीला सामोरे जाताना मुंबई महानगराचे वातावरण सक्षम बनवण्यासाठी तसेच मुंबईतील विकास कामांना शाश्वत दृष्टिकोन प्रदान करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका निर्मित ‘मुंबई वातावरण कृती आराखडा अहवाल’ चे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य (ऑनलाइन) पद्धतीने आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या लोकार्पण सोहळ्या निमित्ताने सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित समारंभात राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे; पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, मुंबईच्या माजी महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.
या लोकार्पणप्रसंगी संबोधित करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मुंबई महानगराच्या तापमानत देखील अलीकडे मोठा फरक दिसून येतो. मुंबई महानगराचा विकास होताना त्याचे रूपांतर जणू काँक्रीटच्या जंगलात झाले आहे. विकास नेमका कशासाठी हवा याचा विचार आता फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्ण जगाने करण्याची वेळ आली आहे. मुंबई महानगराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई पिंजाळ प्रकल्प हाती घेतला होता. मात्र त्यासाठी पाच लाख झाडांची किंमत मोजावी लागणार होती. त्यामुळे तो प्रकल्प रद्द केला. कारण पाणी मिळवण्यासाठी पर्यावरण गमावून चालणार नाही. आरे वनक्षेत्र वाचवणं हे देखील माझं कर्तव्यच होतं. कारण दुर्घटना घडल्यावर अश्रू गाळून उपयोग नाही. जीव वाचवण्यासाठी वेळीच कृती केली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेच्या वातावरण कृती आराखड्यातून ही कृती सुरू झाली आहे. त्याचा आदर्श देशातील इतर शहरे देखील घेतील, अशी अपेक्षा करू या, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, एका बाजूला जगाचा कोविड विषाणूशी लढा सुरू असताना दुसऱ्या बाजूला वातावरणीय बदलाची समस्यादेखील तीव्र होत आहे. या समस्येवर तातडीने उपाय करण्याची गरज लक्षात घेऊन जागतिक संस्थांबरोबर मिळून मुंबई आणि महाराष्ट्र काम करीत आहे. महाराष्ट्राची अर्धी लोकसंख्या शहरांमध्ये वास्तव्यास असून या सर्व शहरांनी मुंबईप्रमाणेच वातावरण कृती आराखडा तयार करून अंमलात आणणे आवश्यक आहे. त्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना सहभागी होऊन विस्ताराने काम करावे लागेल, अशी अपेक्षा श्री. ठाकरे यांनी व्यक्त केली.
श्री. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, मुंबई कृती आराखडा हा उंच इमारतीपासून झोपडपट्टीपर्यंत आणि शासनापासून समाजापर्यंत सर्व गोष्टींमध्ये शाश्वत विकासाचा दृष्टिकोन प्रदान करणारा आहे. टप्पेनिहाय अंमलबजावणी करताना राज्य शासनाकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. मुंबई वातावरण कृती आराखडा अहवाल हा येत्या काही दशकांसाठी सर्वात महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे हे खरे पर्यावरणवादी नेते आहेत. आरेचे ८०८ एकर जंगल वाचवण्याचे संपूर्ण श्रेय त्यांचे आहे.
पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, यापूर्वी राज्यात पर्यावरण हा विषय फारसा महत्त्वाचा मानला गेला नाही. परंतु गत दोन वर्षात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शासनाने पर्यावरण विषयाची अतिशय गंभीरतेने दखल घेऊन काम केले आहे. याची सुरूवातच विभागाचे नाव पर्यावरण व वातावरणीय बदल असे करून करण्यात आली. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबईसह सर्व मोठ्या शहरांचा वातावरण कृती आराखडा तयार केला जात आहे. आज मुंबई वातावरण कृती आराखड्याचे लोकार्पण हे यादृष्टीने पडलेले अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. याचप्रमाणे इतरही शहरांचा आराखडा तयार करून त्या शहरांच्या गरजांप्रमाणे वातावरणीय बदलांच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. राज्य शासन आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतून या दुष्परिणामांना रोखण्यात आपण यशस्वी ठरू आणि विविध राज्यांसह देश आणि जागतिक पातळीवर पुन्हा एकदा मार्ग दाखविणारे ठरू, असा विश्वास श्री. बनसोडे यांनी व्यक्त केला.
महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल म्हणाले, मुंबई वातावरण कृती आराखडा हा देशातीलच नव्हे तर बहुदा जगातील पहिला वातावरण कृती आराखडा असावा. भविष्यवेधी दूरदृष्टी ही प्रशासनातून नव्हे तर नेतृत्वातून येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व असेच भविष्यवेधी आहे. गारगाई पिंजाळ धरणाचा प्रकल्प अहवाल तयार असताना पाच लाख झाडे वाचवण्यासाठी हा प्रकल्प रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. वातावरण कृती आराखड्याची औपचारिक सुरुवात तेव्हाच झाली होती. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प, नियोजित मलनिस्सारण प्रकल्प, नि:क्षारीकरण (समुद्राचे पाणी गोडे करणे) प्रकल्प, गोरेगांव मुलुंड जोड रस्ता, मध्य वैतरणा धरणावरील संकरित ऊर्जा प्रकल्प असे मिळून सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे पर्यावरणपूरक प्रकल्प मुंबईत सुरू आहेत, अशी माहिती देत वातावरण कृती आराखडा अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कोठेही कमी पडणार नाही, असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.
मुंबईच्या माजी महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबई वातावरण कृती आराखडा हा पर्यावरण पूरक विकासाकडे वाटचाल करणारा उन्नत मार्ग ठरणार आहे. हा अहवाल बनवण्यासाठी मार्गदर्शन करणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांची संपूर्ण टीम ही तरुण पिढी आहे. या तरुण पिढीमध्ये पर्यावरण विषयक असलेले भान कौतुक करण्याजोगे आहे. नैसर्गिक आपत्ती आपण रोखू शकत नसलो तरी त्याची तीव्रता नक्कीच कमी करता येते. मुंबईचा वातावरण कृती आराखडा हा देशालाच नव्हे तर जगाला प्रेरणा देऊ शकेल आणि येणारी काही वर्षे विकासाला दिशा देणारा ठरेल, असे कौतुकोद्गार श्रीमती पेडणेकर यांनी काढले.
प्रधान सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर म्हणाल्या, पूर्वी पर्यावरण विभाग म्हणजे फक्त ना-हरकत दाखले देणारा विभाग म्हणून ओळखला जायचा. पण आता पर्यावरण विभाग प्रत्येक माणसाशी थेट जोडला जातोय. माझी वसुंधरा अभियान त्याचे प्रतीक आहे. राज्याच्या प्राथमिक आणि माध्यमिक अभ्यासक्रमात पर्यावरण विषयक अभ्यासक्रम समाविष्ट केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री यांच्या सहअध्यक्षतेखाली महाराष्ट्र वातावरण बदल परिषद स्थापन करून त्याद्वारे देखील मुख्य सहा मुद्यांवर जोर दिला जाणार आहे, असे सांगून राज्य पर्यावरण विभागाच्या वतीने सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांची तपशीलवार माहिती श्रीमती म्हैसकर यांनी यावेळी दिली. मुंबई वातावरण कृती आराखड्याचे अनुकरण महाराष्ट्रातील इतर ४३ अमृत शहरे देखील करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक करताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मुंबई वातावरण कृती आराखड्याची सविस्तर माहिती दिली. या आराखड्याच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून महानगरपालिकेद्वारे पर्यावरण कक्ष स्थापन करण्यात येत आहे. मुंबईतील प्रत्येक प्रशासकीय विभाग पातळीवर या कक्षाच्या माध्यमातून शाश्वत विकास साध्य केला जाईल, अशी माहिती डॉ. कुमार यांनी दिली.
प्रारंभी माधव पै आणि श्रीमती लुबायना रंगवाला यांनी मुंबई वातावरण कृती आराखडा विषयी संगणकीय सादरीकरण केले.
बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी (पर्यावरण) सुनील सरदार, विशेष कार्य अधिकारी (मुंबई वातावरण कृती आराखडा) एकनाथ संखे, सी४० सिटीजच्या दक्षिण पूर्व आशिया प्रदेश संचालक श्रीमती श्रुती नारायणन आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.
मुंबई वातावरण कृती आराखडा अहवालाविषयी:
बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘मुंबई वातावरण कृती आराखडा अहवाल’ (Mumbai Climate Action Plan – MCAP) तयार केला आहे. भारतातील पहिला वातावरण कृती आराखडा तयार करण्याचा मान यानिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपादित केला आहे.
वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय) इंडिया आणि सी४०सिटीज नेटवर्क यांनी त्यासाठी तांत्रिक सहाय्य पुरवले आहे.
विविध विशेषज्ञ, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक सल्लागार यांचेदेखील आराखडा बनविण्याच्या प्रक्रियेत योगदान लाभले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग, इतर प्रशासकीय विभाग आणि संबंधित खात्यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला आहे.
सन २०५० पर्यंत नेट-झिरो उत्सर्जन साध्य करणे हे मुंबई वातावरण कृती आराखड्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुंबईच्या वातावरण बदलासंदर्भातील परिणामांना तोंड देणाऱ्या, तीव्रता कमी करणाऱ्या उपाययोजना करणे आणि वातावरण बदलानुसार अनुकूलता मिळवणे यासाठी सर्वसमावेशक धोरण म्हणजे हा आराखडा आहे.
ऊर्जा आणि इमारती, शाश्वत कचरा व्यवस्थापन, शाश्वत वाहतूक, शहरातली हरित क्षेत्र आणि जैवविविधता, हवेची गुणवत्ता, पूर व्यवस्थापन व जलस्त्रोत व्यवस्थापन अशा प्रमुख सहा क्षेत्रांवर ह्यामध्ये भर देण्यात आला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासाठी सन २०७० हे नेट-झिरोचे उद्दिष्ट वर्ष असल्याची घोषणा कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (सीओपी२६) ग्लास्गो येथे केली होती. असे असले तरी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई वातावरण कृती आराखड्याद्वारे मुंबईसाठी नेट-झिरोचे उद्दिष्ट, भारत सरकारच्या सन २०७० या निर्धारित वेळेपूर्वीच गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण आणि वातावरणातून काढून टाकलेले उत्सर्जन या दोहोंमध्ये संतुलन साधणे यास नेट-झिरो असे संबोधले जाते.
बदलत्या वातावरणाच्या अनुषंगाने असुरक्षिततेचे मूल्यमापन, गत सहा महिन्यांतील हरितगृह वायूंच्या (Green House Gases) स्रोतांची निश्चिती आणि सद्यस्थिती, नैसर्गिक हरित आच्छादनाची सद्यस्थिती याचा आढावा घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
सद्यस्थितीचा आढावा घेताना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे भविष्यात करावयाच्या कृतीचे नियोजन करणे, या नियोजनानुसार महत्वाचे प्रकल्प राबवताना मनुष्यबळ आणि इतर संसाधने यांची योग्य अंमलबजावणी करणे यादृष्टीने सदर अहवाल म्हणजे भविष्यवेधी आणि महत्त्वाचा धोरणात्मक दस्तावेज ठरणार आहे.
आधारभूत वर्ष २०१९ मध्ये एकूण २३.४२ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन (CO2e) किंवा प्रतिव्यक्ती १.८ टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन मोजण्यात आले आहे.
आधारभूत वर्ष (२०१९) मधील हे उत्सर्जन लक्षात घेता, सन २०३० पर्यंत उत्सर्जनात ३० टक्के घट, २०४० पर्यंत ४४ टक्के घट आणि २०५० पर्यंत नेट-झिरो उद्दिष्ट साध्य करण्याचे ठरविण्यात आले आहे.
मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये भविष्यातील उत्सर्जनाचे विश्लेषण तीन परिस्थितीनिहाय मांडण्यात आले आहे.
कोणतीही कार्यवाही न करता आजची दैनंदिन परिस्थिती कायम राहिली तर सन २०५० पर्यंत उत्सर्जन ६४.८ दशलक्ष टन प्रति वर्ष असेल, असा अंदाज वर्तवला आहे. याचा अर्थ २०१९ आणि २०५० या कालावधीत ते २.७ पटीने वाढेल.
ब) विद्यमान आणि नियोजित (existing and planned) परिस्थिती, ज्यामध्ये उत्सर्जन कमी करण्यासाठी विद्यमान स्थानिक, प्रादेशिक किंवा राष्ट्रीय उपाय, धोरणे आणि कार्यक्रमांचा समावेश आहे, त्यानुसार सन २०५० पर्यंत उत्सर्जन ५१.३ दशलक्ष टन प्रति वर्ष अपेक्षित आहे. आधारभूत वर्षाच्या उत्सर्जनापेक्षा त्यामध्ये ११९.४ टक्के वाढ दिसते.
मात्र, मुंबई वातावरण कृती आराखडा अंमलबजावणी करताना मुंबईसाठी ‘महत्वाकांक्षी’ परिस्थितीत, उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट हे सन २०३० पर्यंत २७ टक्के आणि २०५० पर्यंत ७२ टक्के कमी करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उदघाटन
पुणे, दि. १३: पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा संकल्प असून त्यासाठी सर्वांना बरोबर घेत शहरातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.खराडी येथे ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुनील टिंगरे उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा आणि लसीकरणाचा प्रयत्न केला. दोन वर्षात आपल्याला ऑक्सिजनचे महत्व लक्षात आले. शासनाच्या प्रयत्नांमुळे राज्य ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. ऑक्सिजन पार्क नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्वाचे ठरेल. या प्रकल्पाला निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
ऑक्सिजन पार्क उपयुक्त ठरणार श्री. पवार पुढे म्हणाले, या प्रकल्पावर साडेबारा कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. सर्व वयोगटासाठी उपयुक्त ठरावा अशी याची रचना असणार आहेत. त्यात ओपन थिएटर, जिम, मुलांसाठी अभ्यासिका, सायकल ट्रक, बालकांसाठी खेळाची जागा आदी अनेक सुविधा परदेशातील सुविधांच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. कडुनिंब, अशोका आदी झाडांसह अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने घोषित केलेली सर्वाधिक ऑक्सिजन देणारी झाडे या पार्कमध्ये लावण्यात येणार आहेत. या पार्कसोबत विविध प्रकारची झाडे लावून टेकड्या हिरव्यागार करण्याचा प्रयत्न आहे. शासनाच्या माध्यमातून पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अर्थसंकल्पात पंचसूत्रीच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासाला गती पुढील ३ वर्षात राज्यात सर्व सुविधांच्या निर्मितीसाठी ४ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पुण्यात सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचार सुविधा असलेली देशातील पहिली मोठी ‘मेडिसिटी’ वसाहत उभारण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे मेट्रोसाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रिंग रोडच्या भूमी संपादनासाठी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीं आहे. पुणे- नाशिक सेमी- हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर १६ हजार कोटी रूपये खर्च होणार आहे . मेट्रोची कामे करताना नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.
रोजगारनिर्मितीवर शासनाचा भर कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार गेले. व्यवसाय पडला. त्यामुळे मनुष्यबळाला मदत करण्याची, युवकांसाठी इन्क्युबेशन सेंटर, इनोव्हेशन सेंटर सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना आकर्षित करण्याचे धोरण शासनाने अवलंबले आहे.
विकासासाठी सर्वांना सोबत घेणार पुणे, पिंपरी चिंचवड सह जिल्ह्यात आणि राज्यात शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून सर्व जाती धर्माला बरोबर विकास साधायचा आहे अशी शासनाची भूमिका आहे.
नागरिकांनी कार्यक्रमांना स्वागतावर खर्च करण्याऐवजी वृक्षारोपण किंवा शाळेला मदत करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.
ऑक्सिजन पार्कसारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प महत्वाचे-कु.तटकरे कु.तटकरे म्हणाल्या, परिसराच्या विकासासाठी पायाभूत सुविधांसोबत ऑक्सिजन पार्कसारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प महत्वाचे आहेत. या प्रकल्पासाठी प्रादेशिक पर्यटन प्रकल्पातून अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आणखी ५ कोटींचा निधी पुढील टप्प्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. एकूण प्रकल्प १२ कोटी ५० लक्ष रुपयांचा आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून अशी चांगली कामे करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते असे त्यांनी सांगितले.
विविध विकासकामांचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले.पुणे पंचशील चौक, ताडीवाला रोड येथे नूतनीकृत शिल्पाचे उद्घाटन, फुलेनगर- नागपूर चाळ येथे स्वर्गीय माजी महापौर भारतजी सावंत पाम उद्यानाचे उद्घाटन, धानोरी जकात नाका येथे राजयोग मेडिटेशन सेंटर, अग्निशामक केंद्र, माजी सैनिक सांस्कृतिक भवन तसेच उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी माजी आमदार रामभाऊ मोझे, कमलताई ढोले पाटील, नगरसेवक प्रशांत जगताप, प्रदीप गायकवाड, नगरसेविका शीतल सावंत, रेखाताई टिंगरे, उषाताई कळमकर आदी उपस्थित होते.
पुण्यातील सहेली संघ व मैत्र युवा फाऊंडेशनतर्फे वेश्यावस्तीतील (देहविक्रिय) महिलांसाठी ‘विचारांची पुस्तकपेटी’ उपक्रमाच्या दुस-या टप्प्याला प्रारंभ पुणे : जगणे म्हणजे आशेच्या किरणांचा आवाका गवसणे. अंधा-या कपा-यांमध्ये ज्याठिकाणी सूर्याची किरणे पोहचू शकत नाही, तेथे ज्ञानाची किरणे पोहोचतात. ही ज्ञानाची किरणे पोहोचविण्याचे काम पुस्तके करतात. त्यामुळे या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच अंधारलेल्या जगात उजेडाकडे नेण्याचे काम पुस्तके नावाडी म्हणून करतील. त्यातूनच त्यांचे मनपरिवर्तन होईल, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. बुधवार पेठेत काम करणा-या सहेली संघ ही संस्था आणि मैत्र युवा फाऊंडेशनतर्फे वेश्यावस्तीतील (देहविक्री करणा-या महिला) महिलांसाठी विचारांची पुस्तकपेटी या सुरु असलेल्या उपक्रमाच्या दुस-या टप्प्याची सुरुवात सहेली संघात झालेल्या कार्यक्रमात झाली. यावेळी सहेली संघच्या कार्यकारी संचालिका तेजस्वी सेवेकरी, मैत्र युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, सहेली संघच्या अध्यक्षा महादेवी मदार, अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यादव आदी उपस्थित होते. यावेळी या पुस्तकांचे व पेटीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. डॉ.रामचंद्र देखणे म्हणाले, जाणीवा शोधल्याशिवाय माणसाला माणूस गवसत नाही. या महिलांचे विश्व अंधाराने कोंडलेले आहे. अंधारलेल्या जगाला उजेडाकडे नेण्याचे काम पुस्तके करतात. पुस्तके या केवळ जाणीवा नाहीत, तर जगण्याची दिशा देतात. त्यामुळे पुस्तक पेटीचा उपक्रम महिलांच्या आयुष्याचा विचारांच्या प्रकाशाचा किरणोत्सव घेऊन येईल. तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, देहविक्रीच्या व्यवसायात महिलांनी येण्याची शारिरीक हिंसा, शिक्षणाचा अभाव, गरीबी अशी अनेक कारणे आहेत. अनेक महिलांना यापासून परावृत्त करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न अनेक सामाजिक संस्था करतात. मात्र, त्यांचा मानसिक विकास व्हावा, त्यांचे विचार परिवर्तन व्हावे, याउद््देशाने हा उपक्रम घेतला आहे. बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये आजमितीस १ हजार ५०० हून अधिक महिला आहेत. त्यामध्ये मराठी, हिंदीसह बंगाली, तमीळ आदी भाषा बोलणा-या व वाचू शकणा-या महिलांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेतील पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. संकेत देशपांडे म्हणाले,पुस्तकांनी भरलेली पुस्तकपेटी वस्तीतून फिरविण्यात येणार आहे. महिलांनी या पेटीतून आवडतील अशी पुस्तके घेऊन वाचावी, हा यामागील उद््देश आहे. मैत्र युवा फाऊंडेशनचे युवा कार्यकर्ते पुस्तक पेटी घेऊन वस्तीत जाणार असून काही महिलांना पुस्तके वाचून देखील दाखविणार आहेत. महिलांच्या आरोग्याशी निगडीत पुस्तके, चरित्रे, मासिके, विनोदी किस्से, मनोरंजनपर पुस्तकांचा समावेश देखील पेटीमध्ये आहे.
* संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे यांनी पुस्तक पेटीकरीता दिली २१ पुस्तके विचारांची पुस्तकपेटी या उपक्रमाकरीता संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे यांनी २१ पुस्तके दिली आहेत. यामध्ये कथासंग्रह, आत्मचरित्र अशा प्रकारांचा समावेश आहे. याशिवाय अनेक साहित्यिक व नामवंत देखील याकरीता हातभार लावत आहेत. सामान्य पुणेकरांनी , साहित्यिकांनी, प्रकाशकांनी देखील पुस्तके देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे. त्याकरीता तेजस्वी सेवेकरी मो. ९८८१४०४८११, संकेत देशपांडे मो. ९८५०५०२७२९ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजसमोर असलेल्या सहेलीच्या कार्यालयात पुस्तके आणून द्यावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
पुणे, 13 मार्च 2022: पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल(पीडीसीसी) यांच्या वतीने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र राज्य 8वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटात निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात औरंगाबादच्या भूमिका वागळे हिने तर मुलांच्या गटात मुंबईच्या रियांश वेंकट या खेळाडूंनी आपली आघाडी कायम ठेवत विजेतेपद संपादन केले. सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर, प्रभातरोड, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात नवव्या फेरीत मुंबईच्या रियांश वेंकट याने मुंबई उपनगराच्या विहान अग्रवालला बरोबरीत रोखले व 8.5गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले.रियांश डीबीएस स्कुल येथे पहिल्या इयत्तेत शिकतो. रियांशचे हे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे. यापुर्वी त्याने मुंबई डिस्ट्रीक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तर, मुंबईच्या निर्वाण शहाने औरंगाबादच्या श्रेयस नलावडेचा पराभव करून 8 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात औरंगाबादच्या भूमिका वागळे हिने एमसीडीसीए च्या अमया रॉयचा 8 गुणांसह पराभव करत अव्वल क्रमांक पटकावला. भूमिका केंद्रीय विद्यालत संघटन येथे पहिल्या हिल्या इयत्तेत शिकते. मुले व मुलींच्या गटातील अव्वल दोन खेळाडू हे हरियाणा येथे होणाऱ्या 8 वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत
स्पर्धेत एकूण दहा हजार रूपये, करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्त्रबुद्धे, पीडीसीसीचे उपाध्यक्ष आश्विन त्रिमल, डब्लूजीएम स्वाती घाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीसीसीचे सहसचिव शेखर जोरी, बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, सिबायोसिस स्पोर्ट्स सेंटरचे डॉ.सतीश ठिगळे आदी मान्यवर उपस्थित होते. विनिता क्षोत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी काल नुकताच छत्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर अभिषेक केळकर याचा सत्कार करण्यात आला. निकाल: नववी फेरी: 8 वर्षांखालील मुले:विहान अग्रवाल(मुंबई उपनगर)(7.5गुण)बरोबरी वि.रियांश वेंकट(मुंबई)(8.5गुण);श्रेयस नलावडे(औरंगाबाद)(7गुण)पराभूत वि.निर्वाण शहा(मुंबई)(8गुण);अव्यय गर्ग(मुंबई)(6.5गुण)पराभूत वि.अविरत चौहान(पुणे)(7गुण);चिराग लाहोटी(नागपूर)(7गुण)वि.वि.वरद पाटील(कोल्हापूर)(6गुण);विभोर गर्ग(पुणे)(7गुण)वि.वि.विवान सोनी(कोल्हापूर)(6गुण);आरव धूत(नागपूर)(7गुण)वि.वि.पर्व हकानी(मुंबई उपनगर)(6गुण);आरिव कामत(पुणे)(7गुण)वि.वि.परम झाडे(अकोला)(6गुण);विहान राव(मुंबई शहर)(7गुण)वि.वि.अवी चुग(मुंबई)(6गुण)अर्जुन सिंग(मुंबई उपनगर)(6.5गुण)वि.वि.हितांश गोहिल(मुंबई)(5.5गुण); 8वर्षांखालील मुली: आठवी फेरी:अमया रॉय(एमसीडीसीए)(5गुण) पराभूत वि.भूमिका वागळे(औरंगाबाद)(8गुण);इरा बोहरा(पुणे)(6.5गुण)वि.वि.त्वेशा जैन(6गुण);भक्ती गवळी(औरंगाबाद)(6गुण)वि.वि.स्वरा गांधी(नागपुर)(5.5गुण);देवांश्री गावंडे(औरंगाबाद)(5गुण)पराभूत वि.आरोही पाटील(रायगड)(6गुण);रेवा चरणकर(सातारा)(5गुण)पराभूत वि.आदिती हेलवाडे(पुणे)(6गुण);विश्वजा देशमुख()(5गुण) पराभूत वि.पेहेल गाडा(मुंबई)(6गुण);सान्वी येवलेकर(मुंबई उपनगर)(5गुण)पराभूत वि.आस्था सुरकर(वर्धा)(6गुण);मिहिका बोले(पुणे)(4.5गुण) पराभूत वि.जियाना गाडा(मुंबई दक्षिण)(5.5गुण).
पुणे, 13 मार्च 2022- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत पंडित जावडेकर तलवार्स, एक्स्कॅलिबर्स्, मस्कीटर्स, समुराईज या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पंडित जावडेकर तलवार्स संघाने समुराईज संघाचा 576-542 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. टेनिस प्रकारात पंडित जावडेकर तलवार्स संघाला समुराईज संघाकडून 125 – 178 असा पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यानंतर टेबल टेनिस प्रकारात रोहन छाजेड, रोहन पाठक, रोहन जमेनीस, मनिष शहा, अंकित दामले, आर्या देवधर, ईशान भाले, अविनाश दोशी, गिरीष मुजूमदार, अक्षय ओक यांच्या विजयी खेळीच्या जोरावर तलवार्स संघाने समुराईज संघाचा 230-182 असा पराभव करून हि आघाडी भरून काढली. बॅडमिंटन प्रकारात अंकित दामले, तेजस किंजवडेकर, आर्य देवधर , मकरंद चितळे, मिहिर आपटे, अविनाश दोशी,ईशान भाले, प्रशांत वैद्य, राहूल पाठक, वेदांत खटोड, मनिष शहा, हरिष अय्यर यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर तलवार्स संघाने समुराईज संघाचा 221-186 अशा फरकाने पराभव करून विजय मिळवला. स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी पंडित जावडेकर तलवार्स वि वि समुराईज 576-542टेनिस- तलवार्स पराभूत. वि समुराईज 125 – 178(रोहन जमिनीस/रोहन छाजेड पराभूत वि अमित नाटेकर/अवनी गोसावी 22-30, शिव जावडेकर/तेजस किंजवडेकर वि. वि नकुल फिरोदिया/निशांत बनगे 30-28, कुणाल बुरड/शरयू राव पराभूत वि अमित महाजनी/ राहुल गांगल 4-30, अंकित दामले/अवनी क्षीरसागर पराभूत वि आदित्य अभ्यंकर/सौरभ चिंचणकर 23-30, राहुल पाठक/मकरंद चितळे पराभूत वि विमल हंसराज/चारू साठे 11-30, ईशान भले/आर्य देवधर पराभूत वि शारदा बापट/यश शहा 15-20, अक्षय ओक/प्रशांत वैद्य वि. वि सचिन बेलगलकर/आनंद घाटे 20-10) टेबल टेनिस- तलवार्स वि वि समुराईज 230-182(रोहन छाजेड/रोहन पाठक वि.वि आशिष बोडस/आदित्य अभ्यंकर 30-18, शिल्पा पांडे/कौस्तूभ देशपांडे पराभूत वि सचिन बेलगलकर/नितीन कोंकर 26-30, तेजस किंजवडेकर/कुणाल भुरट पराभूत वि. अमित नाटेकर/आनंद घाटे 28-30, रोहन जमेनीस/मनिष शहा वि.वि विनित रूकारी/सौरभ चिंचणकर 30-20, मकरंद चितळे/प्रशांत वैद्य पराभूत वि राहूल गांगल/आशुतोष सोमण 26-30, अंकित दामले/आर्या देवधर वि.वि अमित महाजनी/शारदा बापट 30-17, ईशान भाले/अविनाश दोशी वि.वि निशांत बनगे/विजय राठी 30-20, गिरीष मुजूमदार/अक्षय ओक वि.वि हेमंत पालांडे/आकाश सुर्यवंशी 20-17) बॅडमिंटन- तलवार्स वि वि समुराईज 221-186(अंकित दामले/तेजस किंजवडेकर वि.वि कुणाल पाटील/आकाश सुर्यवंशी 30-16, आर्य देवधर /मकरंद चितळे वि.वि नितीन कोंकर/विनीत रूकारी 30-17, मिहिर आपटे/अविनाश दोशी वि.वि अमर श्रॉफ/अनिकेत सहस्त्रबुध्दे 30-26, गिरीष मुजूमदार/अक्षय ओक पराभूत वि विमल हंसराज/आनंद घाटे 25-30, ईशान भाले/प्रशांत वैद्य वि.वि अमित नाटेकर/हेमंत पालांडे 30-25, राहूल पाठक/वेदांत खटोड वि.वि निशांत भनगे/विजय राठी 30-18, मनिष शहा/हरिष अय्यर वि.वि जयकांत वैद्य/आदित्य अभ्यंकर 30-24, पोहन जमिनीस/शरयू राव पराभूत वि यश काळे/यश शहा 16-30)
पुणे- वानवडी (प्रभाग क्र -२५) येथील नगरसेविका सौ कालिंदाताई पुंडे यांच्या प्रयत्नातून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले डायलेसिस सेंटर व नगरसेवक धनराज घोगरे यांच्या प्रयत्नातून श्रीमंत महादजी शिंदे बास्केटबॉल कोर्ट आणि पवेलियन,व फुले शाहू आंबेडकर E ग्रंथालयचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे ,आमदार सुनील कांबळे ,ओबीसी आघाडी अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठा उत्साहात पार पाडला.
याप्रसंगी शिक्षण समिती अध्यक्षा सौ मंजुश्री संदीप खर्डेकर ,नगरसेविका सौ मंगला मंत्री,नगरसेविका सौ मनीषा लडकत, कॅन्टोमेंट बोर्ड प्रशासक सचिनजी मथुरावाला, नगरसेवक दिलीप गिरमकर, समता परिषदचे शिवराम जांभुळकर, विशाल कोंडे ,उमेश शिंदे शैलेश म्हेत्रे , सुधीर जानजोत, निखील पंचभाई, यश वालिया , शामजी ठाकूर ,विशाल केदारी,तात्या शेंडकर, सौ लक्ष्मीताई घोगरे ,सौ सुरेखाताई गायकवाड,सौ अरुणाताई शिंदे ,सौ दीप्तीताई शेतीया,सौ अनिता सारवान,सौ अंनी मोरीस,प्रभाग अध्यक्ष विवेक शिंदे व आदी मान्यवर ग्रामस्थ ,भजनी मंडळी,महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते .
विधी महाविद्यालयांनीसंवाद कौशल्यशिकवण्यावर भर द्यावा: न्या. दीपंकर दत्ता
मुंबई, दि. 13: स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे होत आहेत, तरीदेखील आपल्या देशात अनेक ब्रिटिशकालीन कायदे अस्तित्वात आहेत. हे कालबाह्य कायदे बदलण्याची गरज असून त्यासाठी एक समग्र आढावा घेण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
जुहू विले पार्ले मुंबई येथील मा कानबाई विद्याधाम या संस्थेने सुरु केलेल्या अधिया विधी महाविद्यालयाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. १३) संपन्न झाले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
यावेळी न्या. दत्ता यांच्या पत्नी झुमा दत्ता, संस्थेचे अध्यक्ष महेंद्र घेलानी, विश्वस्त जयंत घेलानी, जनक ठक्कर व डॉ. मिनू मदलानी प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार मनोज कोटक, आमदार पराग अळवणी, विधिज्ञ सतीश मानेशिंदे व इतर निमंत्रितदेखील यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थी व उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, विधी व न्याय हा अतिशय व्यापक विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांपलीकडे जाऊन सर्वंकष अध्ययन केले पाहिजे. न्यायशास्त्र व तर्कशास्त्र या विषयांवर प्राचीन काळात भारतात विपुल चिंतन झाले असून विधी विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या न्यायशास्त्राचादेखील अभ्यास केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
आपल्या देशात इंग्रजी भाषेचे ज्ञान कमी लोकांना आहे. त्यामुळे विधी शिक्षण प्रादेशिक भाषेत उपलब्ध झाले पाहिजे तसेच विधी विद्यार्थ्यांनी व वकिलांनी मातृभाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे जेणेकरून सामान्य माणसाला कायदे समजणे शक्य होईल, असे राज्यपालांनी सांगितले.
‘महाविद्यालयांनीविद्यार्थ्यांना मौखिक व लेखी संवाद कौशल्यशिकवण्यावर भर द्यावा‘ : न्या. दीपांकर दत्ता
विधी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मौखिक व लेखी संवाद कौशल्य शिकवण्यावर भर द्यावा. त्यांचेसाठी समूह चर्चा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे, अतिथी व्याख्याने, प्रकल्प व कार्यशाळांचे आयोजन करून त्यांच्या शिक्षणाच्या कक्षा रुंदवाव्या असे न्या. दत्ता यांनी सांगितले.
पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाच्या पहिल्याच तुकडीत प्रवेश घेऊन मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्त होणारे आपण पहिले विधी पदवीधर ठरलो असे न्या. दीपंकर दत्ता यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शिक्षणाला अंत नसतो; न्यायाधीश हा आयुष्यभर विद्यार्थी असतो कारण तो कायद्यांची व्याख्या व उकल विविध रूपाने शिकतच असतो असे न्या. दत्ता यांनी सांगितले.
जीवनात मोठे झाले तरीही विद्यार्थ्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवावे, चिकाटी व संयम बाळगावा तसेच त्याग व सेवा या गुणांचा अंगीकार करून राष्ट्रसेवा करावी असे आवाहन न्या. दत्ता यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. महेंद्र घेलानी यांनी संस्थेची माहिती दिली व अतिथींचा परिचय करून दिला.
पुणे दि.१३- कृषि विभागातर्फे ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शिवाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या तांदूळ महोत्सवाला विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. महोत्सवातील स्टॉलधारक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधत ग्राहक होऊन तांदूळ तसेच विविध शेती उत्पादनांची खरेदी केली.
कृषी विभागाच्या आवारात भरलेल्या महोत्सवाला भेट देत शेतकऱ्यांकडून शेती उत्पादनाची खरेदी करताना शेतकऱ्यांच्या अडचणी, उत्पादनाला मिळणारी बाजारपेठ आदी विषयांसह पुणे महानगरात शेतकरी ते ग्राहक थेट कायमस्वरूपी बाजारपेठ उभारण्याबाबतही त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.
श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना दिशा देण्याचे काम राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून होत आहे. पुणे जिल्ह्यातील कृषि व आत्मा विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून पुण्यात तांदूळ महोत्सवाचे आयोजन करून शेतकऱ्यांना बाजारपेठ देण्याचा चांगला प्रयत्न आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीव्यवस्था कृषी विभागाच्या आवारात कायमस्वरूपी उभी करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तांदूळ महोत्सवातील स्टॉलमध्ये सेंद्रीय शेती, पर्यावरण प्रेमी, आरोग्य, तसेच नवीन गरजेप्रमाणे शेतकऱ्यांनी उत्पादने विक्रीसाठी आणली ही चांगली सुरूवात आहे. आजच्या स्टॉलधारक शेतकऱ्यांची एकत्रित वेबसाईटवर नोंदणी केली तर ग्राहकांना खरेदीही सुलभ होईल. तांदूळ महोत्सव शेतकऱ्यांच्या विकासाचे महत्त्वाचे पाऊस असल्याचा उल्लेखही श्रीमती गोऱ्हे यांनी केला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे यांनी तांदूळ महोत्सवाबाबत माहिती दिली.
पुणे जिल्हा बँक एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे बँकांच्या खाजगीकरणाविरोधात ‘जनसुनवाई’त तज्ज्ञांचे मत पुणे : सरकारी बँका, संस्था या ग्राहक, सामान्य नागरिकांसाठी संरक्षणाची ‘कवचकुंडले’ असतात. त्यांचे खाजगीकरण झाले, तर ही कवचकुंडले काढून घेतल्यासारखे होईल. बँकिंग व्यवसायाचा दृष्टीकोन बदलेल. त्याचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. त्यामुळे बँकांचे खाजगीकरण करता कामा नये,” अशी स्पष्ट भूमिका आर्थिक व कामगार क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडली.
देशातील राष्ट्रीयीकृत बँकांचे खाजगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात पुणे डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने नुकतेच ‘जनसुनवाई’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवार पेठेतील गोवर्धन मंगल कार्यालयात झालेल्या या ‘जनसुनवाई’वेळी अर्थतज्ज्ञ सीए डॉ. दिलीप सातभाई, कामगार नेते कॉम्रेड अजित अभ्यंकर, अन्नपूर्णा परिवाराच्या प्रमुख डॉ. मेधा पूरव सामंत, अर्थतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड नीरज जैन यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे उपाध्यक्ष चंद्रेश पटेल होते. एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष राणे व महासचिव शैलेश टिळेकर यावेळी उपस्थित होते. कॉ. अजित अभ्यंकर म्हणाले, “देशात बँक आणि वित्त क्षेत्राच्या खासगीकरणाचा धडक कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. १९५६ मध्ये आयुर्विम्याचे आणि १९७० मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यामुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली. उद्योगांना, सरकारच्या विकासकामाला मोठा निधी उपलब्ध होऊ लागला आणि वित्तीय पाया भक्कम झाला. बँकिंग व्यवस्थेचा पाया असलेल्या सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण झाले, तर याचे विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहेत. बँकांची कर्ज पद्धती, बँकिंग व्यवसायाचा दृष्टीकोन बदलून, सामान्यांना विश्वास देण्याऐवजी काही मूठभर लोकांना नफ्याची संधी मिळवून देण्याचे काम होईल. २००८ मध्ये जसे आर्थिक संकट ओढवले तसे पुन्हा येऊ शकते.”
डॉ. दिलीप सातभाई म्हणाले, “अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि वित्त संस्थांचे खाजगीकरण करण्याकडे सरकारचा कल आहे. आर्थिक संस्थांचे खाजगीकरण झाले, तर सर्वच बाजूनी मोठे बदल होतील. सरकारी संस्था या ग्राहक, करदाता, नागरिकांसाठी संरक्षणाची कवच कुंडले असतात. त्यांचे खासगीकरण झाले, तर ही कवचकुंडले काढून ग्राहक, सामान्यांचे आर्थिक संरक्षण होणे अवघड होईल. बँकांचे खासगीकरण फार यशस्वी होईल, असे वाटत नाही. नागरिकांना संरक्षण आणि विश्वास द्यायचा असेल, तर या बँका सार्वजनिक स्वरूपातच चालवल्या जाव्यात.”
नीरज जैन म्हणाले ,”शेतकऱ्यांच्या आंदोलनाइतकाच बँकाच्या खाजगीकरणाचा मुद्दा आहे. हे विधेयक मंजूर झाले, तर देशाची आर्थिक घडी विस्कळीत व्हायला वेळ लागणार नाही. ५२ वर्षांपूर्वी खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते. त्याचा लाभ कसा झाला, याचे आपण साक्षीदार आहोत. आता मात्र, राष्ट्रीयकृत बँकांचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. याचा धोका ओळखून आपण याविरोधात जनआंदोलन उभारले पाहिजे. ग्राहकाचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी बँका खाजगी होऊ नयेत.” “बँकिंग सेवा देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासात महत्वाची भूमिका बजावते. सार्वजनिक संस्थांच्या माध्यमातून लाखो लोकांचा लाभ होऊ शकतो, तर खाजगी संस्थांच्या माध्यमातून निवडक लोकांना फायदा होईल. परिणामी, सामान्यांना कर्ज, बँकिंग सुविधा मिळणे कठीण होईल. बचत गटातील महिलांच्या आर्थिक व्यवहारांवर मर्यादा येतील. गरीब-श्रीमंतीची दरी वाढत जाईल. त्यामुळे बँकांचे सार्वजनिक अस्तित्व टिकवून ठेवण्याची गरज आहे,” असे डॉ. मेधा पूरव-सामंत यांनी सांगितले. चंद्रेश पटेल यांनी अध्यक्षीय समारोप करताना बँकांचे खाजगीकरण करण्याचे धोरण चुकीचे असून, केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांचे अस्तित्व अबाधित ठेवावे, जेणेकरून देशाच्या, जनतेच्या हिताची आणि विकासाची कामे होण्यास मदत होऊ शकेल. शैलेश टिळेकर प्रास्ताविकात म्हणाले, “खासगीकरणाच्या विरोधातील संघर्ष तीव्र करण्याची आणि यामध्ये सामान्य नागरिक, ग्राहक यांचा सहभाग मिळणे महत्वाचे आहे. या लढ्यात जनतेचा सहभाग वाढावा, या उद्देशाने हा जनसभेचा कार्यक्रम आहे. अधिकाधिक नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे.”
पुणे- भाजपाच्या नगरसेविका कालिंदाताई पुंडे यांच्या प्रयत्नातून वानवडी येथे साकारण्यात आलेल्या क्रांतिसूर्य महात्मा फुले पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि सावित्री माई फुले डायलेसिस सेंटर चे लोकार्पण आज येथे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले . महेश पुंडे, नगरसेवक धनराज घोगरे , संदीप खर्डेकर , योगेश टिळेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले , मुगल येण्यापूर्वी आपण शिक्षित होतो ,बहुजनांचे शिक्षण कोणी थांबविले ? मुगल महिलांना उचलून नेतील या भीतीने त्यांना घरातून बाहेर पडू दिले गेले नाही , मुगलांनंतरही आपण ते विसरलो आणि महात्मा फुले व सावित्री माई नी नंतर हे ओळखून स्त्रियांना आपला हक्क दिला पारतंत्र्यातून बाहेर आणण्याचे काम केले . ज्यामुळे आज स्त्रिया लोकप्रतिनिधी अधिकारी अशा सर्व स्तरावर दिसू लागल्या . त्यांचे ऋण कधीही विसरले जाणार नाही