Home Blog Page 2006

पुण्याच्या एसटीपी अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या प्रवास आणि वाहतूक यांच्याशी संबंधित स्टार्ट अप उत्पादनांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले परीक्षण

पुणे, 6 मे 2022

पुण्याच्या एसटीपीने अर्थात विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कने आयोजित केलेल्या विशेष संवादात्मक कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज वाहतूक आणि प्रवास यांच्याशी संबंधित निवडक स्टार्ट अप उत्पादनांचे परीक्षण केले.  केंद्रीय मंत्री गडकरी यांनी, कृषीक्षेत्राशी संबंधित उद्योगांमधून निर्माण झालेल्या टाकाऊ पदार्थांचे वापरायोग्य डीझेल इंधनात रुपांतर करणाऱ्या आणि पुण्याच्या एसटीपीच्या अखत्यारीतील ग्रीन ज्युल्स या स्टार्ट अपचे आभासी पद्धतीने उद्घाटन देखील केले.
या कायर्क्रमात बोलताना, गडकरी यांनी युवा पिढीमध्ये असणाऱ्या नवोन्मेषी ऊर्जेबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की हे युवक भारताला उज्ज्वल आणि शाश्वत भविष्याकडे घेऊन जातील.

ते पुढे म्हणाले की, येत्या काळात पुणे वाहन उद्योगांतील उत्पादनांचे मोठे केंद्र होणार आहे. नवे उद्योजक स्थानिक गरजांनुसार संशोधनावर आणि स्टार्ट अप उद्योगांवर लक्ष केंद्रित करतील कारण नजीकच्या भविष्यात जैव आणि इथेनॉल आधारित पर्यावरणस्नेही इंधनावर चालणारी वाहने विकसित होतील असे त्यांनी पुढे सांगितले. स्टार्ट अप परिसंस्थेबद्द्ल बोलताना,  सध्याच्या गरजा पूर्ण करणाऱ्या आणि सध्याच्या तसेच भविष्यकाळातील समस्यांवर उत्तर शोधणाऱ्या “गरजेवर आधारित” संशोधनावर त्यांनी भर दिला.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाच्या सल्लागार आणि अध्यक्ष डॉ. अनिता गुप्ता म्हणाल्या, “स्टार्ट अप्समध्ये उद्योजकतेची रुजवात करणे हे  विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे आणि आम्ही महत्त्वाकांक्षी अभिनव संशोधकांना त्यांचे प्रकल्प सत्यात उतरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहोत.”

माजी प्रशासकीय अधिकारी  तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क मंडळाचे अध्यक्ष दिलीप बंड, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क मंडळाचे उपाध्यक्ष प्रताप पवार, पुण्याच्या एसटीपीचे महाव्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र जगदाळे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळाच्या सौजन्याने 1986 साली सायटेक पार्कची स्थापना झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक अभिनव संशोधने आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग क्षेत्र, संशोधन क्षेत्र आणि शिक्षणक्षेत्र यांच्या दरम्यान दुवा निर्माण करण्याचे काम ही संस्था करते.

पुण्याची एसटीपी ही संस्था उद्योजक आणि स्टार्ट अप्सना पुढील सर्व प्रकारची मदत आणि सेवा पुरविते: (i)आयपीआर मधील शिक्षण आणि मार्गदर्शन, धोरणात्मक नियोजन, व्यवसाय विकास, आर्थिक बाजूंची व्यवस्था, हिशोब, मनुष्यबळ, इत्यादी आणि (ii) प्रोटोटायपिंग सुविधा, लहान उत्पादन एकके, सामायिक संशोधन आणि विकास सुविधा, सह-कार्यस्थळे इत्यादी भौतिक पायाभूत सुविधा एसटीपी उद्योजकतेसंदर्भात प्रशिक्षण कार्यक्रम देखील आयोजित करते, मुख्यतः विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने जाहीर केलेली आणि डीपीआयआयटीकडे नुकतीच आलेली,  नव्या संशोधकांना टिकाव धरून राहण्यासाठी अनुदाने देते, प्रोटोटायपिंग अनुदाने देते आणि स्टार्ट अप्सना बीज निधी पुरविते. आतापर्यंत 168 स्टार्ट अप्सना सायटेक पार्कने मदत केली आहे; आणि विजेवर चालणारी वाहने, कचऱ्यावर प्रक्रिया, नूतनीकरणीय उर्जा, प्रदूषण नियंत्रण, आरोग्य आणि रोगनिदान, शिक्षण, उर्जा कार्यक्षम साधणे, हरित इमारतीच्या उभारणीसाठी लागणारे साहित्य, इत्यादी क्षेत्रांमधील 81 स्टार्ट अप्सना सुमारे 13 कोटी रुपयांचे (1.75 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे) अर्थसहाय्य दिले आहे.

या कार्यक्रमात सादर करण्यात आलेली स्टार्ट अप उत्पादने:

  • ग्रीनज्युल्स प्रा.लि.आणि उत्पादन प्रकल्पाने कृषीसंबंधित उद्योगांतून निर्माण झालेल्या कचऱ्यातून तयार केलेले इंधन
  • जी.डी.एन्व्हायर्नमेंटल प्रा.लि. ने प्लॅस्टिक आणि थर्माकोल पासून तयार केलेले इंधन आणि रंग
  • पिक्सी इलेक्ट्रिक कार्स प्रा.लि.तर्फे निर्मित इलेक्ट्रिक जिप्सी रेट्रोफिट कीट
  • अश्नी मोटर्स प्रा.लि. तर्फे निर्मित दूरवर वितरण करू शकणारी इलेक्ट्रिक स्कूटर
  • रोबोटिक्स अॅगटेक प्रा.लि. ने तयार केलेले इलेक्ट्रिक पेरणी यंत्र

ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी न्यायालयाच्या सूचनेनुसार काय केले सांगा

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आघाडी सरकारला आव्हान

पुणे, ६ मे २०२२-सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी चाचणी पूर्ण केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू होणार नाही, असा स्पष्ट निकाल दिल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने त्या दृष्टीने कोणतेही गंभीर प्रयत्न केले नाहीत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी शक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार काय काम केले, याची माहिती देणारी श्वेत पत्रिका प्रसिद्ध करावी, असे आव्हान त्यांनी आघाडी सरकारला दिले.
त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी समर्पित आयोग नेमणे, त्याच्या माध्यमातून एंपिरिकल डेटा गोळा करणे आणि एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर जाऊ न देणे, अशी तिहेरी चाचणी पूर्ण करण्यास सांगितले आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने काही दिवसांपूर्वी समर्पित आयोग नेमला आहे. अजून एंपिरिकल डेटा गोळा केलेला नाही. आघाडी सरकारने न्यायालयाच्या सूचनेनुसार काही काम केले नाही तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असाच येणार.
ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार हे स्पष्ट आहे. तरीही आघाडी सरकारचे नेते ओबीसी आरक्षणासहच निवडणूक होईल, असे कशाच्या आधारावर सांगतात ? ओबीसी आरक्षण रद्द झाल्यावर राज्यात १०६ नगरपंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या, पाच जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींच्या जुन्या राखीव जागा रद्द होऊन त्या खुल्या समजून पोटनिवडणूक झाली. सरकारला हे रोखता आले नाही. आघाडीचे नेते ओबीसी समाजाला लॉलिपॉप दाखवत आहेत. ते ओबीसींना फसवत आहेत. आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

ते म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ओबीसींसाठी आरक्षण नसले तरीही भारतीय जनता पार्टी २७ टक्के जागांवर ओबीसींनाच उमेदवारी देईल. इतर राजकीय पक्षांनीही अशी बांधिलकी दाखवावी.

त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील एका भाजपा खासदाराने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे वैयक्तिक वक्तव्य आहे. ही पक्षाची भूमिका नाही.

भाजपा व मनसेची निवडणुकीत युती करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. मनसेकडून तसा काही प्रस्तावही आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त त्यांना चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपातर्फे आदरांजली अर्पण केली.
भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी यांच्या संघटनात्मक प्रवासाची माहिती प्रदेशाध्यक्षांनी दिली.

पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ६- पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महानगरासह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

            पुणे शहरातील हडपसर येथे कै. महादेवराव (आप्पासाहेब) बडदे उद्यान लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे, वैशाली बनकर, बापूसाहेब बडदे आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,  राज्याच्या सर्वांगीण विकासासोबत  मानवी जीवनमान उंचावण्यासाठी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी, आणि त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी प्रयत्नव करण्यात येत आहेत. त्यासाठी  राज्यात दळणवळणला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

            कोरोना काळातही राज्य शासनाने विकासासाठी निधी कमी पडू दिला नाही. समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी या काळातही विशेष प्रयत्न करण्यात आले. शहराच्या विकासासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने करावे, असे आवाहन त्यांनी केले.

            आमदार चेतन तुपे यांनीही मनोगत व्यक्त के

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग सामाजिक समस्या सोडविण्यासाठी करावा-डॉ.रघुनाथ शेवगावकर

पुणे- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई  व  अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमतेत अखंडपणे योगदान देणारे तंत्रज्ञ घडावेत या हेतूने ‘टेक्नोथॉन २०२२’  या दोन दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन  करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड , डॉ.विनोद मोहितकर संचालक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, डॉ.रघुनाथ शेवगावकर माजी संचालक आय.आय.टी. दिल्ली, डॉ.संजय कोयंडे संचालक, सीसीआरटी मटेरीअल्स प्रा.ली.,  डॉ. एन.बि.पासलकर माजी संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या उपस्थितीत झाले.या प्रसंगी बोलताना संशोधन आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडत आहेत. रोज नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी  सामाजिक समस्या सोडविण्यासाठी करावा असे अवाहन केले. विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना सत्यात उतरविण्यासाठी हे एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. रोबोटिक्स,ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सारख्या नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे मार्गदर्शन डॉ. एन.बि.पासलकर यांनी केले. समाजाचा शाश्वत विकास साधण्यासाठी तांत्रिक कौशल्यासोबतच नैतिक व सामाजिक मूल्ये आपण अंगिकारली पाहिजेत असे मार्गदर्शन डॉ.विनोद मोहितकर यांनी केले. डॉ.संजय कोयंडे  यांनी समाजाचा शाश्वत विकास साधायचा असेल  तर नव तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे असे मत मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे  व स्पर्धेचे समन्वयक डॉ.अभय शेलार यांनी हि स्पर्धा घेण्याचा हेतू व महत्व पटवून सांगितले. यास्पर्धेमध्ये प्रकल्प स्पर्धा,पेपर प्रेझेटेशन, पोस्टर अशा तीन प्रकारामध्ये सबंध महाराष्ट्रातील  ३००  तंत्रनिकेतन च्या २२०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमासाठी   संस्थेच्या सरचिटणीस मा.प्रमिला गायकवाड, डॉ.रघुनाथ शेवगावकर, डॉ.विनोद मोहितकर, डॉ.संजय कोयंडे व डॉ. एन.बि.पासलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे, स्पर्धेचे समन्वयक प्रा.अभय शेलार, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नेहा देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.स्नेहा साळवेकर  यांनी केले.

पुण्यात दादा जेपी वासवानी चौकाचे उद्घाटन!

पुणे-6 मे 2022 रोजी पुण्यात थोर संत गुरुदेव दादा जे.पी. वासवानी यांचे नाव असलेल्या चौकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या नाव असलेला हा पुण्यातील पहिलाच चौक आहे. हा चौक सेंट मीरा कॉलेजजवळ, ताज ब्लू डायमंड समोर, मंगलदास रोडच्या क्रॉसिंगवर आहे.
योगायोगाने, दादा जे.पी. वासवानी चौक हा साधू वासवानी पुलाच्या खाली असलेल्या पहिल्या क्रॉसिंगवर आहे.
या चौकाचे उद्घाटन साधू वासवानी मिशनच्या कार्यकारी प्रमुख दीदी कृष्णा कुमारी आणि पुणे महानगरपालिकाच्या (पीएमसी) नगरसेविका सौ.मंगला मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभात हवन (पवित्र अग्नि), कीर्तन आणि प्रार्थना यांचा समावेश होता. पूज्य दादा जे.पी. वासवानी यांच्या प्रतिमेसह संगमरवरी फलकाचे अनावरण करण्यात आले – हा फलक कायमस्वरूपी चौकात  राहणार आहे. यावर लिहिले आहे “प्रेमापेक्षा मोठी शक्ती नाही.”
या उद्घाटनप्रसंगी दीदी कृष्णा कुमारी यांनी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्‍या म्हण्याल्या, “शंकराचार्यय जेव्हा पुण्यात भेटी साठी आले होते त्‍यांनी संगितले  होते हे शहर गुरुदेव साधु वासवानी आणि दादा जे.पी. वासवानी यांच्या सारख्या महान व्यक्तींच्या संरक्षणाखाली आहे. हे अगदी खरे आहे. त्यांची उपस्थिती या शहराचे रक्षण करत आहे.” त्‍या पुढे म्हणाल्‍या, “दादा आम्हाला या शाश्वत रूपी जगात वावरण्यासाठी त्याच्या प्रेमळ आणि करुणारुपी साद घालून आम्हाला जागवायला आले होते; त्‍यांना स्वतःसाठी कधीच काही नको होते. ते नेहमी म्हणत:
‘‘जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर इतरांना आनंदित करा.’’ जर प्रत्येकाने हा एक संदेश स्वतःसोबत घेतला तर जग एक नवीन ठिकाण होईल. आपण मिळून पुण्याला, आपल्या भारताला शांतता आणि आनंद देणारे ठिकाण बनवू या.
श्रीमती मंत्री उद्घाटनप्रसंगी बोलताना म्हणाल्या, “मिशनने मला आनंदाचे कारण दिले आहे. मी कृतज्ञ आहे कारण देवाने मला एक साधन बनवले.आज या सोहळ्यात समाज्‍यातील विविध क्षेत्रातील लोक सामील झाले आहेत. मला आशा आहे की ते सराव करतील मिशनच्या शिकवणी बददल सत्य, प्रेम आणि करुणा.”
या समारंभास उपायुक्त श्री.संजय गावडे, प्रभाग अधिकारी ज्ञानेश्वर तुपे, डॉ. गलांडे, वैद्यकीय अधिकारी, प्रकाश रामेश्वर मंत्री, माजी उपमहापौर, पीएमसी, पुणे, धैर्यशील वांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२९ अंतर्गत २५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

0

मुंबई, दि. 3 : राज्य शासनाने 7 वर्षे मुदतीचे 2500 कोटी रुपयांचे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहेत. या मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.

रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील. भारतीय राज्य घटनेनुसार सदरील कर्ज उभारणीस केंद्र शासनाची मंजुरी घेण्यात आली आहे.

दि. 16 मे 2019 मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येतील. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 10 मे, 2022 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 10 मे, 2022 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाची आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते दुपारी 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत.

अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 11 मे, 2022 रोजी करण्यात येईल.

यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 11 मे, 2022 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा कालावधी 7 वर्षांचा असेल. रोख्यांचा कालावधी हा दि. 11 मे 2022 पासून सुरु होईल. दि. 11 मे, 2029 रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परतफेड करण्यात येईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कुपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या प्रतिवर्षी दिनांक 11 नोव्हेबर आणि 11 मे रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 6 मे 2022 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

तालुका व जिल्हा न्यायालयात ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

पुणे, दि. ७ :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशाने विधी सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७ मधील तरतुरदीअंतर्गत जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ७ मे २०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

धनादेश अनादराची प्रकरणे, बॅंकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकाबाबतची प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, आयकर कायद्यातील फौजदारी स्वरूपातील तडजोड प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रकरणे, वैवाहिक वाद, संपादन प्रकरणे व दिवाणी दावे तसेच उपरोक्त नमूद स्वरूपातील दाखल पूर्व प्रकरणे सुनावणीकरिता ठेवण्यात येणार आहेत.

लोक न्यायालयात सामोपचाराने वाद मिटविण्याची इच्छा असल्यास पक्षकारांनी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडे अथवा संबंधित तालुका विधी सेवा समितीकडे त्वरीत संपर्क साधावा अथवा ८५९१९०३६१२ या क्रमांकावर किंवा dlsapune2@gmail.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
  • शाहू महाराज हे लोकोत्तर राजा. त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं. त्यांच्या जाहीरनाम्यात माझ्या राज्यातील जनता सुखी समाधानी असली पाहिजे हे वचन होतं
  •  शाहू स्मारकासाठी जेवढा लागेल तेवढा निधी शासन उपलब्ध करून देईल
  •  प्रत्येक शाळेत शाहू महाराजांच्या विचारांचा जागर होण्यासाठी शाहू महाराजांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवावे
  • शाहूंच्या विचारांचा जागर नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कृतज्ञता पर्व महत्त्वाचे

कोल्हापूर, दि.6 :- ज्या वृत्ती विरोधात छत्रपती शाहू महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे लढूया व सामाजिक समता स्थापित करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 100 वा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त शाहू मिल येथे आयोजित कृतज्ञता सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरभाष प्रणालीद्वारे मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुरभाष्य प्रणालीद्वारे पुणे येथून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाहू महाराज होते.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध ऐकत मी मोठा झालो. आजोबांनी त्यांची जीवनगाथा लिहिली त्यात हे नातं नमूद केलं आहे. आज देखील शाहू महाराज कोल्हापूरात आहेत असं वाटतं. ते आपल्यातून जाऊन १०० वर्षे झाली हे जाणवत नाही. छत्रपती शाहू महाराज हे महामानव होते. महाराजांची केवळ २८ वर्षाची कारकीर्द. ४८ व्या वर्षी शाहू महाराजांचे निधन झाले. असं वाटतं की, त्यांना आणखी आयुष्य मिळालं असतं तर आज राज्याचं चित्र वेगळ असतं. पायाभूत सुविधांच्या बाबतीत नाही तर समाज सुधारणेच्यादृष्टीने वेगळं चित्र असतं.

आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना छत्रपती शाहू महाराजांचे १०० व स्मृतीवर्ष साजरं करत आहोत. अस्पृश्यांचा उद्धार, शिक्षण प्रसार, धरणे, वसतिगृहे, कृषी, उद्योग क्षेत्रात राजर्षि शाहू महाराजांचे काम डोंगराएवढे. हा दूरदृष्टी असलेला राजा, आज या कामासाठी वेगवेगळे विभाग आहेत पण या सगळ्या खात्यांचे काम एका माणसानं केलं असे सांगून श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याचे वारे वाहत असतांना अनेक राजे होऊन गेले. नुसते गादीवर बसले म्हणून राजे झाले असेही अनेकजण होते. पण शाहू महाराज हे गादीवर बसलेले राजे नव्हते. या राजाने सातत्याने दीनदुबळ्यांसाठी काम केलं, त्यांच्यासाठी संघर्ष केला. त्यांनी अस्पृश्य वर्गाला माणसाप्रमाणे वागवण्यासाठी संघर्ष केला. याचा उल्लेख प्रबोधनाकारांनी आपल्या पुस्तकात केला आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले पाहिजेत, ते देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी जे काम केलं ते मार्गदर्शक आहे.

शाहू महाराज हे लोकोत्तर राजा. त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं. त्यांच्या जाहीरनाम्यात माझ्या राज्यातील जनता सुखी समाधानी असले पाहिजे हे वचन होतं. आज जी वृत्ती दिसते आहे त्याच्याविरोधातच शाहू महाराज लढले. आजोबांकडून जे ऐकले, मी वाचले त्यावरून दिसतं की छत्रपती शाहू महाराज कोणत्या व्यक्ती विरोधात नव्हते तर वृत्तीविरोधात होते. वंचित वर्गासाठी छत्रपती शाहू महाराजांनी काम केलं. शिक्षणातील भेदभाव दूर करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. छत्रपती शाहू महाराजांना वंदन करतांना त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून पुढं जाऊया, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारावर राज्य चालत असून प्रत्येक पिढीने शाहू विचारांचा अंगिकार केला पाहिजे. शाहूंच्या विचारांचा जागर नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे कृतज्ञता पर्व महत्त्वाचे आहे असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा शाहू महाराजांनी पुढे नेला. शाहू महाराजांचे काम हे डोंगरा एवढे मोठे असून त्यांचा प्रत्येक विचार हा क्रांतिकारी होता. त्यांच्या सामाजिक न्याय विचारावरच सामाजिक क्रांती घडली, असेही त्यांनी यावेळी विशद केले. तसेच छत्रपती शाहू महाराज हे रयतेचे काळजी घेणारे, आधुनिकतेचा स्विकार करणारे व दूरदृष्टी असलेले लोकराजा होते व त्यांनी सर्व जाती धर्मांना एकत्रित ठेवून विविध क्षेत्रात विकास घडवून आणला.

कोणत्याही महापुरुषाच्या स्मारकासाठी अंदाजपत्रकातील निधी ठेवण्याची आवश्यकता नाही तर अशा स्मारकासाठी जेवढा आवश्यक निधी असेल तो सर्व निधी देण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची असून शाहू स्मारकासाठी जेवढा लागेल तेवढा निधी शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली. तसेच कोल्हापुरात सारथी संस्थेसाठी जागा देण्यात आलेली असून त्याबाबतचा आराखडा पुढील पंधरा दिवसात पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच मानवतावाद व समतावाद यावर विशेष लक्ष देऊन देशभरात जातिवाद पसरणार नाही याची काळजी घ्यावी व महाराजांचे समतेचे विचार देशभरात पोहोचावेत, असे आवाहन शाहू महाराज छत्रपती यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती दिनाचा हा कार्यक्रम ऐतिहासिक कार्यक्रम असून आपण पुरोगामी विचारांचे वारसदार आहोत याचा अभिमान वाटतो, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगून सर्व संत परंपरातील विचारधारा ही समतेवर आधारित असून शाहू महाराज हे समतेचा विचार कृतीत आणणारे लोकराजा होते असे त्यांनी म्हटले. तसेच शाहू मिलच्या या 27 एकर जागेवर शाहू स्मारकाचा जो अभिनव प्रकल्प राबविण्यात येणार आहे, त्या प्रकल्पाच्या कामासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल याची ग्वाही देऊन ते म्हणाले की या ठिकाणी शाहू महाराज यांच्या विचाराचे एक दालन निर्माण करावे. त्या माध्यमातून राज्य व देशाला समता आणि मानवतावादी विचारांची दिशा मिळेल, असे त्यांनी सूचित केले.

देशभरात जातिवाद व भेदभाव भडकावण्याचे काम केले जात आहे अशा परिस्थितीत छत्रपती शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांची देशाला गरज असून हे विचार देशभर पोहचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिनस्त सर्व महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराजांचे चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येईल व शाहू विचारांचा जागर विद्यार्थ्या पर्यंत पोहोचविला जाईल असे उच्च व तंत्र शक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगून छत्रपती शाहूंच्या शंभर वर्षापूर्वीच्या नियमावलीचे पालन शासन आजही करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रयतेचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले व त्यांचे समतेचे विचार देशभरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपण प्रथमच संसदेमध्ये शिवजयंती व शाहू जयंती साजरी केली,अशी माहिती माजी खासदार संभाजीराजे यांनी दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा शंभरावा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून दिनांक 18 एप्रिल 2022 ते 22 मे 2022 या कालावधीत साजरा केला जात आहे. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास केला. राज्य व देशाला समतेचा संदेश दिला. त्यांचे हे विचार या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी राहुल रेखावार व कृतज्ञता पर्व समितीने मोठी मेहनत घेतली असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

शाहू स्मारक आराखड्यात सर्व मान्यवरांनी दिलेल्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येईल तसेच लोकांना जे अपेक्षित आहे ते सर्व शाहू महाराजांच्या समारकात निर्माण केले जाईल, असे पालकमंत्री श्री पाटील यांनी सांगून राज्य शासनाने कृतज्ञता पर्व वर्षभर साजरे करून शाहू विचारांचा जागर राज्यात सर्वत्र करण्यात येईल असे सांगितले. तसेच आज सकाळी दहा वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आहे त्या ठिकाणी शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून मानवंदना दिली.

प्रत्येक शाळेत शाहू महाराजांच्या विचारांचा जागर होण्यासाठी शाहू महाराजांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. तसेच शाहू स्मारकामध्ये वस्त्रोउद्योगाशी संबंधित एक दालन समाविष्ट करून महाराजांचे समतेचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 100 वा स्मृतिदिन हा कृतज्ञता पर्व म्हणून साजरा करण्याबाबत दिनांक 18 एप्रिल पासून ते आजपर्यंत केलेल्या विविध कामांची माहिती दिली. तसेच या पर्वाचा समारोप दिनांक 22 मे 2022 रोजी शाहू मिल येथे होणार असल्याचे सांगून छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच शाहू महाराजांचे विचार व आदर्श तरुण पिढी समोर आणण्यासाठी हे पर्व अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त श्रीमती बलकवडे यांनी शाहू मिल येथे शाहू महाराजांचे स्मारक होणार असल्याचे सांगून त्या बबतचा आराखडा व त्यानुसार केलेली चित्रफीत दाखवण्यात आली.

छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारावर आधारित असलेले “ग्लिम्पसेस ऑफ राजर्षी शाहू महाराज” या इंग्रजी भाषेच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर छत्रपती संभाजीराजे राजकोट येथे गेले असताना त्यांना तेथील शिक्षण संस्थेकडून देण्यात आलेल्या शाहूमहाराजांच्या दुर्मिळ चित्राचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. त्याप्रमाणेच गोकुळ दूध संघामार्फत कृतज्ञता पर्व निमित्त निर्माण केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही यावेळी झाले. त्यानंतर सभागृहाबाहेर कृतज्ञता पर्वा निमित्त तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन ही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर शाहूप्रेमी नागरिक उपस्थित होते. त्या सर्वांचे व सर्व मान्यवरांचे आभार श्री. उदय गायकवाड यांनी मानले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प अर्पण केले. यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री, सतेज ऊर्फ बंटी पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य कृषी प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार शिक्षक मतदार संघ पुणे विभाग जयंत आसगावकर, आमदार विनय कोरे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे, आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव, सचिव वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य सौरभ विजय, जिल्हाधिकारी, राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

एमटीडीसीच्या माध्यमातून कृषि पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न – राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

पुणे, दि. ६:- महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून कृषि पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न करण्यात येत असून त्याद्वारे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क, पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.

खेड तालुक्यात कुरकुंडे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या नवीन इमारतीत स्थलांतर कार्यक्रमात  त्या बोलत होत्या.यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, निर्मला पानसरे,  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, सहायक निबंधक हरीचंद्र खेडकर,  मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप चव्हाण, दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, माजी सभापती मार्केट समिती चाकण रमेश राजे, वरिष्ठ अधिकारी गौतम कोतवाल, सरपंच सागर  जावळे आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, ग्रामीण भागात ‘ॲग्रो टुरिझम’ला चांगली संधी आहे. सहकारी संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा. प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर झाल्यास निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील एक उत्कृष्ट संस्था असल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बँकेने दर्जा टिकवावा. कुरकुंडे शाखेच्या नवीन इमारतीचे कामकाज चांगले झाले आहे. या ठिकाणी ग्राहकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना परराज्यात शिक्षणासाठी पाठवण्यासाठी बॅंकेच्या माध्यमातून मदत होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करताना त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी तालुक्यात  ९० टक्क्यापर्यंत वसुली करणाऱ्या  विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचा राज्यमंत्री तटकरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार मोहिते पाटील आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दुर्गाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

आडगाव येथे पुलाचे भूमिपूजन

कार्यक्रमानंतर राज्यमंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते आडगाव येथील नाबार्ड अर्थसाहाय्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे, सरपंच प्रकाश गोपाळे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

जादूटोणाविरोधी कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होण्यासाठी व्यापक प्रयत्न आवश्यक – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

0

मुंबई, दि. 6 : जादूटोणाविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून अंधश्रद्धाळू अफवा व त्यामधून घडणाऱ्या कुप्रथा यांना आळा घालण्यासाठी या कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने या कायद्याची प्रचार व प्रसार समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून व्यापक प्रयत्नांची गरज असून सर्वांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीच्या वतीने पुणे येथे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले  होते. या कार्यशाळेचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते (ऑनलाईन) उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत, मात्र आजही काही भागात नरबळी, अंधश्रद्धांच्या माध्यमातून लैंगिक शोषण, अत्याचार असे अनेक प्रकार घडल्याचे कानावर येतात, त्यात कायदा आपले काम करतोच परंतु या कायद्याची कडक अंमलबजावणी होऊन हे प्रकार कायमचे थांबले पाहिजेत, यासाठी या कायद्याचा अधिकाधिक प्रसार जनसामान्य वर्गात व्हायला हवा, या दृष्टीने एक कृती आरखडा तयार करण्याचे निर्देशही श्री.मुंडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढून वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्यासाठी हा कायदा पोषक असून, विभागाच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक प्रसार मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे विभागाचे सचिव सुमंत भांगे यावेळी म्हणाले.

कार्यशाळेस जादूटोणाविरोधी कायदा प्रसार समितीचे सहअध्यक्ष शाम मानव तसेच समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.

औपचारिक उद्धाटन प्रसंगी सचिव सुमंत भांगे, समितीचे सहअध्यक्ष शाम मानव, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त दिनेश डोके, भारत केंद्रे, प्रशांत चव्हाण, रवींद्र कदम, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी तसेच समाज कल्याण विभागाचे सर्व जिल्ह्यातील सहायक आयुक्त, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी आदी उपस्थित होते.

लोकमान्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र कोणीही हिरावून  घेऊ शकत नाही -पी. चिदंबरम 

टिमविचा वर्धापन दिन साजरा-अद्ययावत प्रॉडक्शन कंट्रोल रूम आणि ब्रॉडकास्ट रूमचा शुभारंभ
पुणे : लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हे चतुःसूत्री मांडून देशाला स्वातंत्र मिळवून दिले आहे. जन्मतः जगण्याचे स्वातंत्र असल्याचे महत्व त्यांनी पटवून दिले. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये बोलण्याचा, आंदोलन करण्याचा व मते मांडण्याचा अधिकार उरला आहे, का?असा सवाल उपस्थित करीत आपले स्वातंत्र कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे  प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या 101 व्या वर्धापन दिनानिमित्त मास कम्युनिकेशन विभागामध्ये अद्ययावत प्रॉडक्शन कंट्रोल रूम आणि ब्रॉडकास्ट रूमचा शुभारंभ माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते शुक्रवारी झाला.  अत्याधुनिक प्रॉडक्शन रूम आणि ब्रॉडकास्ट दालनाचे उदघाटन चिदंबरम यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाचा 100 वर्षांच्या वाटचालीचा ग्रंथाचे प्रकाशन यावेळी त्यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, प्रभारी कुलगुरु डॉ. गीताली टिळक-मोने, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅड. संतोष शुक्ला, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. प्रणति रोहित टिळक, सचिव अजित खाडिलकर यावेळी उपस्थित होते.
पी. चिदंबरम म्हणाले, लोकमान्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आधिकार असल्याचे इंग्रजांना ठणकावून सांगितले होते. स्वातंत्र्याशिवाय आपण काहीच साध्य करु शकत नाही, हे त्यांना माहित होते. सहा दशकाच्या आयुष्यात ते भारतीय जनमाणसाचे ते जननायक बनले होते. लोकमान्यांची स्मृतीशताब्दी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, की आपण स्वातंत्र स्वीकारले पाहिजे. प्रत्येक दिवशी आपण गमावलेल्या स्वातंत्र्याचा अनुभव आपण घेत असून सध्या आपले स्वातंत्र हिरावून घेतले जात आहे. लिहीणे, एकत्र जमणे, तसेच बोलण्याचा स्वतंत्र  हिरावले जात आहे. आपण जन्मतः स्वातंत्र असून ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असेही यावेळी पी. चिंदबरम यांनी सांगितले.
आमच्या मुलभूत अधिकारावर कोणीही गदा आणू शकत नाही. आजपर्यंत हजारो वर्षांपासून राजे, सरकार अवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. आमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही, असेही यावेळी पी. चिंबरम यांनी स्पष्ट केले. आणखी लाखो लोकांना या देशात शिक्षण, आरोग्यसेवा मिळत नाही. त्यांच्या अधिकाराबद्दल त्यांना कल्पनादेखील नाही. या वंचितांना आरोग्य, शिक्षण त्यांचे अधिकार मिळवून देणे हे आपले कर्तव्य असून त्यांना अधिकार मिळवून दिला पाहिजे. राजकीय आणि निवडणूकीचे स्वातंत्र्य आहे. मात्र खरं स्वातंत्र्य हे गरीबी, अन्याय बेरोजगारीपलीकडेदेखील असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
डॉ. दीपक टिळक म्हणाले, ‘विद्यापीठाने गेल्या 100 वर्षांमध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे पाहिले आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये विद्यापीठाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लोकमान्यांच्या विचारधारेवर विद्यापीठाची वाटचाल सुरु आहे. रोजगारभिमूख अभ्यासक्रमापासून ते अत्याधुनिक अभ्यासक्रमापर्यंत विद्यापीठात शिकविले जात आहे. विद्यापीठात कनिष्ठ महाविद्यालयाला परवानगी मिळाली असून एलएलएम व फिजिओथेरपीची पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. गीताली टिळक-मोने यांनी विद्यापीठाच्या विविध विभागाचा कार्याचा आढावा घेतला.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्पोर्स्टस् लिग वर्ल्ड बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद झाल्यानिमित्त वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅड. संतोष शुक्ला यांच्या हस्ते विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.  

 ‘मॉं कोई तुझसा नहीं’ गाणं प्रदर्शित

राष्ट्रीय पुरस्कार विजेती, सुमधुर गळ्याची गायिका सावनी रवींद्र आणि तीची मुलगी शार्वी यांच्यासाठी यंदाचा मातृदिन फारच खास आहे. कारण सावनी पहिलाच मातृदिन तीच्या मुलीसोबत साजरा करणार आहे. तिने नुकतंच सावनी ओरिजनल या तीच्या युट्यूब सिरीजमधून आई आणि मुलीचं गोड नातं मांडणारं, ‘मॉं कोई तुझसा नहीं’ हे हिंदी गाणं‌ नुकतंच प्रदर्शित केलं आहे. या आधी तिने शार्वीसाठी ‘लडिवाळा’ ही अंगाई गायली होती.  सावनीच्या चाहत्यांनी या गाण्याला भरघोस प्रतिसाद दिला आहे.

गायिका सावनी रविंद्र गाण्याविषयी सांगते, “सर्वप्रथम सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! सावनी ओरिजनल या युट्यूब सिरीजमधून मी याआधी विविध भाषेतील गाणी गायली आहेत. यावर्षीचा मातृदिन माझ्यासाठी खूप खास आहे. कारण मी आई झाल्यानंतरचा हा पहिलाच मातृदिन आहे. माझ्यासाठी एक वेगळीच अनुभूती आहे. आई होणं हे अजिबात सोप्पं नाही. आता स्वतः आई झाल्यावर कळतंय आपली आई किती श्रेष्ठ आहे. आईने आपल्यासाठी किती गोष्टी केल्या आहेत. आपण एरवी  गृहीत धरतो. परंतु प्रत्येक मुलीला स्वतः आई झाल्यावर कळतं आई होणं म्हणजे काय! अर्थातच मलाही आता कळलंय. माझ्याकडून मी सर्व मातांना ‘मॉं कोई तुझसा नहीं’ हे गाणं समर्पित करते!”

पुढे ती सांगते, “मी आणि शार्वी या गाण्यात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहोत. अत्यंत स्वीट आणि क्यूट हा म्यूझिक व्हिडिओ आहे. बरीच लोकं मला सोशल मीडियावर विचारत असतात. की आम्हाला शार्वीला बघायचंय. या गाण्यात आमच्या दोघांची दिनचर्या तुम्हाला पाहायला मिळेल. एक वर्कींग मदर या नात्याने माझा दिवस शार्वीला सांभाळत कसा जातो. हे तुम्हाला या गाण्यात पाहायला मिळेल. या गाण्याचं संगीत तेजस चव्हाण याने केलं आहे, तर या गाण्याचे गीतकार पुलकीत मुसाफिर आहे. आपली आपल्या आईप्रतीची कृतज्ञता केवळ मातृदिनाच्या दिवशी न व्यक्त करता रोज व्यक्त करायला हवी. आई होणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. लडिवाळा या अंगाईत शार्वी फारच लहान होती. त्या गाण्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. तर आता शार्वी मोठी झाली आहे. या गाण्यात शार्वी काय काय धम्माल करते हे जरूर पाहा. तुम्हा रसिक प्रेक्षकांचे प्रेम असंच कायम असू दे. हीच सदिच्छा!!”

बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत केतन धुमाळ, नितीन कीर्तने, योगेश शहा यांना दुहेरी मुकुट 

पुणे, 6 मे 2022: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 35वर्षांवरील गटात पुण्याच्या केतन धुमाळ, 45वर्षांवरील गटात नितीन कीर्तने, तर 65वर्षांवरील पुरुष एकेरीत योगेश शहा यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.   . 
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 35वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत केतन धुमाळ याने तिसऱ्या मानांकित अर्जुन उप्पलचा 6-2, 6-1 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. दुहेरीत अंतिम लढतीत केतन धुमाळने अभिषेक ताम्हाणेच्या साथीत सुजय महादेवन व अर्जुन उप्पल या चौथ्या मानांकित जोडीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद मिळवले.  
45वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत अव्वल मानांकित नितीन कीर्तनेने दुसऱ्या मानांकित सुनील लुल्लाचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. दुहेरीत अंतिम लढतीत नितीन किर्तने व प्रशांत सुतार यांनी सुनील लुल्ला व गगनदीप वासू यांचा 6-1, 6-0 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 65वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित योगेश शहा याने पाचव्या मानांकित एकनाथ किणीकरचा टायब्रेकमध्ये  7-6(2), 7-6(4) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.  

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे प्रायोजक बाबा रॉड्रिक्स, सुभाष सुतार, स्पर्धा संचालक डीएस रामा राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा सविस्तर निकाल: 35वर्षांवरील पुरुष एकेरी: अंतिम फेरी:
केतन धुमाळ(भारत)वि.वि.अर्जुन उप्पल(भारत)[3] 6-2, 6-1; 

महिला 35: राउंड रॉबिन: 

प्रियांका मेहता(भारत)[1]वि.वि.गायत्री मेवाडा(भारत)6-3, 6-1; 
प्रणिता पेडणेकर(भारत) पुढे चाल वि. रिंकू कुमारी(भारत) 40वर्षावरील पुरुष एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
आदित्य खन्ना(भारत)[1]वि.वि.सुरेंद्र अल्लम(भारत)[8] 6-0, 6-1; मंदार वाकणकर(भारत)[4] वि.वि. रमजान शेख(भारत)[5] 6-1, 6-2; स्वरनदीप सिंग दोडी(भारत)[3]वि.वि.बद्री विशाल(भारत)[6]  6-4, 6-2; नीरज आनंद(भारत)[7]वि.वि.कमलेश शुक्ला(भारत) 6-4, 6-2;   

45वर्षांवरील पुरुष एकेरी: अंतिम फेरी:
नितीन कीर्तने(भारत)[1]वि.वि.सुनील लुल्ला(भारत)[2]  6-0, 6-1; 

महिला 45वर्षांवरील: राउंड रॉबिन: 

मायुक्ता सकाय(जपान)[1] पुढे चाल वि.प्रेरणा आपटे(भारत) 
नंदिता नूलकर(भारत)वि.वि.सोनिया बिजू सॅम्यूअल(भारत) 6-2, 6-3; 55वर्षांवरील पुरुष:उपांत्य फेरी:
आलोक भटनागर(भारत)वि.वि. उल्हास फुलझेली(भारत)6-1, 6-4;अजय कामत(भारत)वि.वि. आशिष डिके(भारत)[3] 6-1, 6-1; 
65वर्षांवरील पुरुष:अंतिम फेरी:
योगेश शहा(भारत)[1]वि.वि.एकनाथ किणीकर(भारत)[5] 7-6(2), 7-6(4); 
70वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी: 
ताहीर अली(भारत)(1)वि.वि. रत्नाकरराव आनी(भारत)[4] 6-1, 6-0; रामराव दोसा(भारत)(3) वि.वि. धवल पटेल(भारत)(2) 6-1, 6-1.


दुहेरी: 35 वर्षांवरील पुरुष एकेरी: अंतिम फेरी:

केतन धुमाळ/अभिषेक ताम्हाणे वि.वि.सुजय महादेवन/अर्जुन उप्पल[4] 6-3, 6-2; 

40 वर्षांवरील पुरुष एकेरी: उपांत्यपूर्व फेरी: 

कमलेश शुक्ला/मंदार वाकणकर[2] वि.वि.पार्थसारथी मोहपात्रा/प्रफुल नागवाणी 6-1, 6-2;

45वर्षांवरील पुरुष: अंतिम फेरी:

नितीन किर्तने/प्रशांत सुतार(भारत)वि.वि.सुनील लुल्ला/गगनदीप वासू(भारत)6-1, 6-0. 

अलाहाबाद हायकोर्ट म्हणाले -अजान इस्लामचा भाग, भोंगा नाही

अलाहाबाद -येथील उच्च न्यायालयाने शुक्रवारी भोंग्यावरुन अजान देण्याची मागणी करणारी एक याचिका धूडकावून लावली. भोंग्यावरुन अजाण देणे मुलभूत अधिकार नसल्याचे कोर्टाने या प्रकरणी सांगितले आहे. “अजान इस्लामचा भाग आहे, भोंगा नाही,” असे कोर्ट म्हणाले.उत्तर प्रदेशच्या बयायूंतील इरफान नामक व्यक्तीने एका याचिकेद्वारे अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे नूरी मशिदीतून भोंग्यावरुन अजान देण्याची परवानगी मागितली होती. पण, न्यायमूर्ती बी.के विडला व न्यायमूर्ती विकास यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.

उत्तर प्रदेश व महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांत लाउडस्पीकरच्या मुद्यावरुन मोठा वाद सुरू आहे. त्यानुसार, उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यातील अनेक मंदिर व मशिदींवरील भोंगे काढलेत. याशिवाय अनेक धार्मिक स्थळांवरील भोंग्याचा आवाजही कमी केला आहे.दुसरीकडे, महाराष्ट्रातही भोंग्यावरुन देण्यात येणाऱ्या अजानच्या मुद्यावर मुस्लिम धर्मगुरुंनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यापुढे सकाळची अजान भोंग्यावरुन दिली जाणार नाही. मुंबईच्या सुप्रसिद्ध सुन्नी बडी मशिद मदनपुरा व मिनारा मशिदीतून सकाळी अजान देण्यात आली. पण, यासाठी लाउडस्पीकरचा वापर टाळण्यात आला.

शिरुरमध्ये जाऊन राऊत म्हणाले, पुढचे खासदार आढळरावच असणार, आता अमोल कोल्हेंना आव्हान ?

पुणे : सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे भविष्यात संसदेत असतील, असा एल्गार खासदार संजय राऊत यांनी शिरुरमध्ये जाऊन केला. आढळरावांचं शिवसेनेसाठीचं काम मोठं आहे. त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, असंही राऊत म्हणाले. त्यामुळे सध्या शिरुर लोकसभेचे खासदार असलेले राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांना हे आव्हान मानायचं काय ? असा प्रश्न राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

खासदार संजय राऊत कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी आढळरावांचं होम ग्राऊंड असलेल्या शिरुर-आंबेगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आढळराव पाटील यांचं शिवसेनेसाठीचं योगदान अधोरेकित करताना एकप्रकारे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना इशारा दिला. शिरुर लोकसभेच्या जागेसाठी आम्ही एकत्रित बसणार आहोत. पण एवढं नक्की सांगतो, भविष्यात शिवाजीराव आढळराव पाटील संसदेत असतील, असं राऊत म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. येणाऱ्या काळातील सगळ्या निवडणुका एकत्रित लढवणार असल्याचंही राऊत म्हणत आहेत. पण शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेदरम्यान पारंपारिक लढत होते. २०१९ च्या लोकसभेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर अभिनेते अमोल कोल्हेंनी शिवसेनेला धक्का देत आपल्या मनगटावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं आणि लोकसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारण्यापासून आढळरावांना रोखलं. शिरुरच्या राजकीय मैदानात नवख्या कोल्हेंनी दिग्गज आढळरावांना चारी मुंड्या चित केलं. आता लोकसभा निवडणूक दीड वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्रित लढण्यासंबंधी निर्णय घेतला तर शिरुरच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मोठी गरमागरमी होणार हे निश्चित… त्यामुळे दोन्ही नेत्यांची महत्त्वकांक्षा आणि त्यांचा समझोता, शिवसेना-राष्ट्रवादी कशा पद्धतीने घडवून आणते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“शिरुर लोकसभेसंदर्भात आम्ही एकत्र बसणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढळरावांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. आढळरावांनी गेल्या अनेक वर्षांपासून सेनेसाठी केलेलं काम, त्यांच्या कामाची इतिहासात नोंद आहे. कुणी काहीही म्हणत असतील, पण भविष्यात शिवाजीराव आढळराव पाटील हे संसदेत असतील”, असं राऊत म्हणाले.