पुणे,दि.१६:“शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी ध्यान साधना अत्यंत महत्वाची आहे. बुद्धांचे विचारच शांततामय जीवनाची ताकद आहे. वर्तमान काळात वाढत जाणार्या हत्या आणि आत्महत्या यांतील मधला मार्ग शांतीचा आहे. त्यासाठी बुद्धांच्या ज्ञान मार्गावर चालून जीवन समृद्ध करता येते.” असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. प्रसाद खांडेकर, कवि डॉ. संजय उपाध्ये, पीस स्टडीचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. विनोद जाधव व प्रा. विक्रांत गायकवाड उपस्थित होते.
प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले,“बौध्द धर्माच्या उदात आठ पट मार्गाचे प्रतिनिधित्व करतात. बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश देऊन अहिंसा व करूणा सारखी शिकवण दिली. बौध्द धर्माचा अवलंब करणे म्हणजे शांतता, एकता आणि अहिंसा होय. जगाला सत्य, शांती आणि मानवतेचा संदेश देणारे तथागत बुद्धांचे पंचशील तत्व मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे आहेत.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“भगवान गौतम बुद्धांचे पंचशिल तत्व आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हेच संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकेल. बुद्धांनी विश्वधर्म, मानवकल्याण आणि जातिभेदाच्या भिंती ओलांडून संपूर्ण मानवजातीला एकत्र आणण्याचे महत्कार्य केले आहे. तसेच, विश्व कल्याणाचा खरा ग्रंथ भगवद्गीता आहे. कसे जगावे आणि कसे जगू नये, जीवनाचा उद्देश काय, आपले कर्तव्य काय आहे हे त्यात नमूद आहे. जीवन सुखमय होण्याचे सूत्र म्हणजे त्याग आणि समर्पण आहे. संपूर्ण जगात भारताची ओळख भगवान बुद्ध् आणि महात्मा गांधी यांच्या नावाने आहे.”
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,“ बुद्धांचे विचार हे जीवनाला प्रेरणा देणारे आहेत. त्याच आधारावर डॉ. विश्वनाथ कराड यांनी रामेश्वर रूई येथे बुद्ध स्तूपाची निर्मिती करून समाज एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे. नेपाळ येथे झालेल्या भूकंपानंतर नागरिकांसाठी शेकडो घरांची निर्मिती केली. शांतता नांदावी यासाठी जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती डोमची निर्मिती करून अविरतपणे शांती स्थापनेचे कार्य ते करीत आहेत. आजच्या काळात सायन्स इन सायलेन्स ही संकल्पना खूप गरजेची आहे.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“ गौतम बुद्धांबरोबरच महापुरूषांचे विचार भारताबाहेर पोहचविण्यासाठी सर्वांना समोर यावे लागेल. नकारात्मतेची भावना काढून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रत्येक कार्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. ”
त्यानंतर प्रा. विक्रांत गायकवाड, मिनाक्षी आर्या, डॉ. मिलिंद पात्रे यांनी भगवान गौतम बुद्धांचे विचार मांडून त्यातून बोध घेण्यास सांगितले.
डॉ. आर.एम. चिटणीस यांनी प्रास्ताविक मांडले
बुद्धांच्या विचारातच शांततामय जीवनाची ताकद- ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा
महागाई विरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना घेरू पाहणाऱ्या कॉंग्रेसच्या महिलांना भाजपा कार्यकर्त्यांनी रोखले अन पोलिसांनी ताब्यात घेतले.
पुणे -आज JW मेरियट येथे पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना देशातील वाढती महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी चूल व देश चालविण्यासाठी पंतप्रधान मोदी अयशस्वी असल्याने स्मृती ईराणी यांच्या मार्फत त्यांना बांगड्या भेट म्हणून देण्यासाठी गेलेल्या पुणे शहर महिला काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी रोखले दोघात वाढत्या झटापटी होण्यापूर्वी कॉंग्रसच्या सर्व महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात व स्मृती इराणी यांच्या विरोधात ‘हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई!, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी।, क्योकि गॅस भी कभी सस्ती थी,स्मृती जी याद हैं ना? अशा प्रकारच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या.देशातील महागाईच्या विरोधात लढताना व जनतेचे प्रश्नांवर काम करतांना पोलिसांनी अशा प्रकारे ताब्यात घेणे निषेधार्ह आहे. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या धोरणानुसार आम्ही महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही जनतेच्या प्रश्नांवर लढत राहू. यासाठी पोलिसांनी आम्हाला शंभरवेळा जरी अटक केले तरी आम्ही तयार आहोत .असे आंदोलक महिला म्हणाल्या.
स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे पुरस्कार जाहीर- व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन
भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी व महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. असोसिएशनतर्फे देण्यात येणारा व्यापार भूषण पुरस्कार यंदा भांडारकर रस्त्यावरील गिरीकंद ट्रॅव्हल्सचे विश्वास जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट विक्रेता, उत्कष्ट महिला व्यापारी, कै.साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहेत. सोमवार, दिनांक ३० मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता एस.एम.जोशी सभागृहात हा समारंभ होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष बोधनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला असोसिएशनचे कार्याध्यक्ष सूर्यकांत पाठक, उपाध्यक्ष सचिन जोशी, सचिव गणपतराज जैन, खजिनदार मोहन कुडचे, नितीन पंडित, मदनसिंह रजपूत, सुरेश नेऊरगावकर आदी उपस्थित होते.

पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी हे असणार आहेत. तर, प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड उपस्थित राहणार आहेत. व्यापार भूषण पुरस्काराचे स्वरुप पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे. पुरस्काराचे यंदा २४ वे वर्ष आहे.
शिरीष बोधनी म्हणाले, दरवर्षी २५ मे या व्यापारी एकता दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येते. व्यापारातून समृद्धी साधताना आपले कर्तृत्व सिद्ध करणाºया असामान्य व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यापाºयांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
सूर्यकांत पाठक म्हणाले, यंदाच्या वर्षी उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार नारायण पेठेतील दिप्ती कन्झुमर प्रोडक्टसचे मयूर शर्मा, उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार घोरपडे पेठेतील अश्विनी मसाले च्या अश्विनी पवार आणि कै. साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार तुळशीबागेतील एस.एम.लांजेकर च्या दिक्षा लांजेकर-माने, फिनिक्स पुरस्कार स्वानंद एजन्सीचे कुमार शिंदे आणि उत्कृष्ट दुकान पुरस्कार लोखंडे तालीम जवळील अंबिका स्टोअर्सचे राहुल छेडा यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे स्वरुप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, श्रीफळ असे असणार आहे.
दुकानातील स्वच्छता, सादरीकरण, आधुनिकता आणि ग्राहकांशी संबंध आदी गोष्टी पाहिल्या जातात. तसेच व्यापा-यांच्या उद्योगातील वाढत्या प्रगतीचा आलेख पाहून पुरस्कारार्थींची निवड समितीतर्फे केली जाते. यापूर्वी गुडलक सेल्स डेपोचे खिमजी गाला, दोराबजी अॅन्ड कंपनीचे थ्रिटी पूनावाला आणि फरशिद पटेल, कॉटन किंगचे प्रदीप मराठे, ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका, सुदर्शन स्टेशनरीचे कृष्णचंद्रजी आर्य (करमचंदानी), लक्ष्मीनारायण चिवडा कंपनीचे बाबूशेठ डाटा, जवाहर टेÑडींग कंपनीचे चकोर गांधी, जयराज ग्रुपचे राजेश शहा आदींना व्यापारभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
इस्लामपूर येथील राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली : इस्लामपूर येथे आयोजित राष्ट्रीय महिला व पुरूष व्हॉलिबॉल स्पर्धा पाहताना मनस्वी आनंद होत आहे. आम्हीही राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी,कुस्ती, खो-खो, शरीर सौष्ठवसारख्या स्पर्धांच्या आयोजनाने सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली आहे. पण अशा प्रकारच्या हॉलिबॉलच्या नॅशनल लेव्हलच्या स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन आजपर्यंत आम्ही कधी पाहिलेले नाही, असे सांगून क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. गेल्या पाच दिवसापासून या स्पर्धेसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जवळपास दररोज 15 ते 16 हजार क्रीडा प्रेमी या स्पर्धांचा आस्वाद घेताना पाहावयास मिळाले. त्यामुळे हॉलिबॉल खेळासाठी ही उत्तेजनार्थ व प्रोत्साहन देणारी बाब आहे, असे प्रतिपादन क्रिडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले.
इस्लामपूर येथे लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय महिला व पुरूष व्हॉलिबॉल स्पर्धा – 2022 पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शैलजादेवी पाटील, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, व्हॉलीबॉल फेडरेशनचे महासचिव अनिल चौधरी, बाळासाहेब सुर्यवंशी, नीलकंठ बशीर, शामराव पाटील, नेताजी पाटील, मेहबूब शेख आदि उपस्थित होते.
क्रिडा राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, या स्पर्धेत केरळ, राजस्थान, गुजरात व दिल्ली या चार टीम फायनल मध्ये पाहावयास मिळत आहेत. पुढच्या काळात ज्यावेळी अशा प्रकारच्या स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित होतील त्यामध्ये महाराष्ट्राचा संघ टॉप फोर मध्ये असावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा व्यक्ती जेव्हा क्रीडा प्रेमी असतो, खेळाडूवृत्तीचा असतो त्यावेळी सामाजिक कार्य करत असताना सुध्दा त्याला निश्चितपणाने अधिक ऊर्जा मिळत असते, असे सांगून प्रतिक पाटील यांच्यातील खेळाडूवृत्ती अशीच पुढे जात राहो, प्रगती करत राहो अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, स्वर्गीय राजारामबापू व जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुका घडविताना जिवाभावाची माणसे जपली तीच परंपरा प्रतिक पाटील ही जपतील. देशातील उत्कृष्ट स्पर्धा घेऊन देशातील खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी प्रतिक पाटील यांनी उपलब्ध करून दिली असल्याचे ते यावेळी म्हणाले.
सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, स्वर्गीय राजारामबापू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा जोपासण्यासाठी प्रतिक पाटील यांनी भव्य दिव्य अशा हॉलिबॉल स्पर्धा इस्लामपूर येथे आयोजित केल्या आहेत. या माध्यमातून सांगलीकर व इस्लामपूरकरांना भव्य दिव्य हॉलिबॉल स्पर्धा पाहण्याची संधी मिळाली आहे. सांगली जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भव्य दिव्य अशा दर्जेदार हॉलिबॉल स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेची देशातील टॉप स्पर्धा म्हणून नोंद होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून सांगली व इस्लामपूरच्या मातीचे नाव देश आणि राष्ट्रीय पातळीवर नेहण्याचे काम झाले असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी प्रतिक पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी आपण आयोजित केलेली ही स्पर्धा देशातील सर्वोत्तम स्पर्धा करण्यात सर्व घटकांनी मोलाचे सहकार्य केले. देशातून आलेल्या खेळाडूंनीही खिलाडूवृत्तीने अप्रतिम खेळ केला आहे. यापुढेही जिल्ह्यात, राज्यात खेळाडू घडविण्याचे काम अखंड ठेवू असे सांगितले.
याप्रसंगी शरद लाड, आर.डी.सावंत, विनायक पाटील, देवराज पाटील, विजयराव पाटील, अँड. चिमण डांगे, अँड. धैर्यशील पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, शहाजी पाटील, खंडेराव जाधव यांच्यासह नागरिक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रीडा रसिकांचा उदंड प्रतिसाद व प्रतिक पाटील यांचे उत्कृष्ट नियोजन !!
इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू पाटील क्रीडा नगरीत आयोजित २४ व्या युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या दिल्ली संघाने सुवर्ण पदक,तर राजस्थान संघाने रौप्य पदक,तसेच मुलींच्या गुजरात संघाने सुवर्ण पदक,आणि केरळ संघाने रौप्य पदक पटकाविले. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याहस्ते विजेत्या संघांना बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच ‘प्रतिसाद’ स्मरणिका प्रकाशन, आणि जेष्ठ संघटक, खेळाडू एम.एस. सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.

साधारण २५ हजारच्यावरती क्रीडा रसिकांनी रात्री उशिरापर्यंत या दोन्ही अंतिम सामान्यांचा मनमुराद आनंद लुटला. सर्व गॅलरी क्रीडा रसिकांनी खचाखच भरल्या होत्या. अंतिम सामन्यासाठी एकच मैदान करून रसिकांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली होती. मुलींचा रात्री ९.१५ ला, तर मुलांचा रात्री ११.१५ ला सामना खेळविला. हा सामना रात्री १२.३० वाजता संपला. उपस्थित क्रीडा रसिक, राज्य व देशातून आलेले खेळाडू, पंच व मान्यवरांनी प्रतिक पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे तोंड भरून कौतुक केले.
प्रथम मुलींचा गुजरात विरुध्द केरळ या संघाचा अंतिम सामना खेळविण्यात आला. गुजरात संघाने सलग ३ सेट घेत सुवर्ण पदकावर नांव कोरले. त्यांनी पहिल्यापासून सामन्यावर पकड ठेवत पहिला सेट २५-२१ ने,दुसरा सेट २५-१९ ने, तर तिसरा सेटही २५-१९ जिंकला. या संघातील मुलींनी सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. गुजरात संघाने विजयश्री खेचून आणल्यावर मैदानातच गरबा केला. क्रीडा रसिकांनी या संघास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांच्या दिल्ली संघाने प्रभावी आक्रमण व उत्कृष्ठ बचावाचा खेळ करीत सुवर्ण पदक खेचून घेतला. दिल्ली संघाने ३-० असा थेट विजय मिळविला. त्यांनी पहिला सेट २५- २१,दुसरा सेट २५-१५,तर तिसरा सेट २५-२० फरकाने घेतला.
भाजपा हिंदी भाषी महासंकल्प सभा-“कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे” ; फडणवीसांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा!“
मुंबई-कालच्या सभेला ते म्हणत होते मास्टरसभा मास्टरसभा पूर्ण भाषण ऐकल्यानंतर आमच्या लक्षात आलं लाफ्टर सभा लाफ्टर सभा. कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर निशाणा साधला.मुंबई वेगळी करण्याचा मुद्दा असो की हिंदुत्व आणि बाबरी प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने आज मुंबईत हिंदी भाषिकांची सभा घेतली या सभेत फडणवीस यांनी जोरदार निवडणुकीचे भाषण केले .मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कालची सभा ही लाफ्टर सभा होती, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली आहे. मुंबईत दीड लाख लोकांचा मृत्यू झाला. कोरोना काळात मुंबईत भ्रष्टाचार झाला. काल कौरवांची सभा झाली आणि आजची सभा पांडवाची आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.शिवसेना आणि मुंबई मनपावर जहरी टीकायशवंत जाधवांची संपत्ती 35 हून 53 कोटींवर कशी गेली असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांची उपस्थित करत मुंबई मनपात भ्रष्टाचार केला असा आरोप केला आहे. संभाजीराजेंची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर डोक टेकवणे हा गुन्हा नाही का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. अयोध्येत त्यांचा एकही नेता नव्हता असा टोला त्यांनी पुन्हा लगावला आहे.बाबरी पाडायला गेलो होतो, सहलीला नाहीबाबरी पाडली याचा गर्व आहे. मात्र तिथे एकही शिवसैनिक नव्हता असा टोला पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. माझ्यावर मुख्यमंत्र्यांचा खुप विश्वास आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझे वजन 128 किलो होते असे म्हणत माझे राजकीय वजन तुम्ही कमी करू शकत नाही असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.वाघांचे फोटो काढून वाघ होता येत नाहीकेवळ वाघांचे फोटो काढून वाघ होता येत नाही. असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. गेली 2 वर्षे उद्धव ठाकरे कुठे होते. असे म्हणत वाघ हा भोळा असतो, आणि बाळासाहेब तसे होते. मात्र धूर्त कोल्हा कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर टीका केली आहे. देशात केवळ एकच वाघ आहे, असे सांगताना त्यांनी मोदीं हेच वाघ असल्याचे म्हटले आहे.खरे हिंदू पंतप्रधान नरेंद्र मोदीच
घंटा बडवणारे नाही अतिरेक्यांना ठोकणारे हिंदुत्व भाजपचे आहे. म्हणून आम्ही पाकिस्तानमध्ये जात एअर स्ट्राईक केला. हिंदुत्वावरून फडणवीसांची ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी देशात खरा हिंदू केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत. असे म्हणत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.मुंबई वेगळी करायची आहेचमुंबई वेगळी करायचीच आहेच, मात्र ती केवळ यांच्या भ्रष्टाचारापासून दूर करायची आहे. ती महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कुणामध्ये नाही असेही त्यांनी म्हटले आहे. मुद्दे नसले की मुंबई तोडण्याचा मुद्दा घ्यायचा हे शिवसेनेचे राजकारण सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. ठाकरे परिवार मुंबईचा बाप कसा झाला? असा सवाल त्यांनी केला आहे.आमच्यासोबत लग्न आणि संसार दुसऱ्यासोबतशिवसेनेने 5 वर्षे आमच्यासोबत संसार केला आणि संपत्ती घेऊन दुसऱ्यासोबत पळून गेले आणि दुसऱ्यासोबत संसार थाटला आहे. असे त्यांनी म्हटले आहे. आता लंकेचे दहन होणार असा मला ठाम विश्वास आहे. 2014 पूर्वी सामनात जे छापून येत होते ते खरे होते का हे शिवसेनेने सांगावे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. विकासावर मुख्यमंत्र्यांचे एकही भाषण नाही म्हणत औरंगाबादचे नामांतर करण्यासाठी भाजप सत्तेत येण्याची वाट पाहावी लागेल असे म्हणत त्यांनी औरंगाबदच्या नामांतराचा मुद्दा भाजप मनपासाठी पुढे करणार असल्याचे जाहीरच केले आहे.मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकवणारगेली अनेक वर्षे मुंबई मनपामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. हा भ्रष्टाचार संपवत आम्हाला मुंबईला तुमच्या भ्रष्टाचारापासून दूर न्यायचे आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपची मुंबई मनपावर सत्ता येणार असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांसाठी तुम्ही सर्वांनी साथ द्यावी असे आवाीन त्यांनी आज केले आहे.विकासाला शिवसेनेकडून विरोध होतोय – शेलारराज्यात हनुमान चालिसा म्हणणाऱ्यावर गुन्हे दाखल होतात. मात्र औरंगजेबाच्या कबरीहून जाणाऱ्या लोकांवर मात्र गुन्हा दाखल होत नाही हे कसले हिंदुत्व म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेकडून अनेक प्रकल्पांना विरोध करण्यात येत आहे. आणि म्हणे हाताला काम जनतेच्या हाताला काम देण्याला शिवसेनेकडून होत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
राजकारणात सगळे पक्ष विचलित आहेत. कोणी संकल्प सभा करतय कोणी झेंडाचा रंग बदलतोय. सत्तेमध्ये बसललेल्यांना तर काहीच कळत नाही, सगळे विचलित आहे. कालची सभा पुचाट सभा होती आणि थू चाट सभा होती. म्हणचे थुंकून चाटणे म्हणजे थुचाट अशी गंभीर टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
गौतम बुद्धांच्या विचारांमध्येच मानवाच्या कल्याणाची ताकद
तथागत गौतम बुद्धांनी दिलेले विचारंच
मानवजीवन प्रकाशमय करत राहतील
- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 15 :- तथागत गौतम बुद्धांनी दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाचा संदेश देऊन आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला. गौतम बुद्धांच्या विचारातंच मानवजातीचं, अखिल विश्वाचं कल्याण सामावलं आहे. बुद्धांचे विचार दु:खांचा विनाश करुन मानवी जीवन कायम प्रकाशमय करत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केलं असून सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त गौतम बुद्धांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री म्हणाले की, समाजातील दु:ख, अज्ञान, अन्याय, अहंकार दूर व्हावा यासाठी भगवान बुद्धांनी कार्य केलं. अखिल मानवजातीला अहिंसेचा, दयेचा, करुणेचा संदेश दिला. समाजात एकता, समता, बंधुता, विश्वशांतीचं, सलोख्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद तथागत गौतम बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. भावी पिढीला जगण्यासाठी आदर्श वातावरण देण्यासाठी गौतम बुद्धांचे विचार प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातूनच आपल्याला आव्हानांवर मात करण्याची दिशा मिळते. त्यांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश आजही समर्पक आहे. त्यांचे अहिंसा, शांती, करुणा, उपेक्षितांच्या सेवेचे संस्कार समाजात शतकानुशतके रुजले आहेत. गौतम बुद्धांची व्यापक समाजहिताची शिकवण दु:खांवर मात करण्याची, संकटातून मार्ग काढण्याची ताकद सदैव देत राहील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
जैन समाजाला जे-जे देता येईल ते-ते देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार
सांगली : अहिंसा परमोधर्म, जगा आणि जगू द्या, या तत्वांचे आचरण करुन संस्कृतीशी एकरुप झालेला जैन समाज आहे. सामाजिक भान जपणाऱ्या जैन समाजाच्या मागण्या, प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी जैन समाजाला जे-जे देता येईल ते-ते देण्याचा प्रयत्न केला जाईल, यासाठी राज्य शासन यत्किंचितही कमी पडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली येथे दक्षिण भारत जैन सभेच्या महाअधिवेशनात बोलताना दिली.
दक्षिण भारत जैन सभेचे १०० वे महाअधिवेशन (त्रैवार्षिक) नेमिनाथ नगर सांगली येथे संपन्न झाले. या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार संजय पाटील, आमदार अरुण लाड, आमदार प्रकाश आवाडे, आमदार सुमनताई पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार अभय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी मंत्री कल्लापाआण्णा आवाडे, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून आलेले श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, जैन समाजाने आपल्या आचार आणि विचारातून अहिंसेच्या तत्वातून प्रेमाचा संदेश दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जैन समाजाने दातृत्वातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजाचे असणारे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्व संबंधितांची मुंबई येथे बैठक घेऊन समाजाचे प्रश्न समाजवून घेऊन ते मार्गी लावले जातील.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, जात-पात, धर्म या यापेक्षा माणुसकीचा विचार मोठा आहे. मानवधर्माचा विसर कोणालाही पडू नये यासाठी जैन धर्माचे विचार आणि आचार आचरणात आणणे गरजचे आहे. जैन समाजाचे या विचारानेच कार्य होत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. सर्वांचे हित साधून प्रत्येक संकट काळात मदतीसाठी पुढे येणाऱ्या या समाजाला शासनही सर्वतोपरी सहकार्य करील. जैन समाजाच्या विकासासाठी अन्य राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनाही महाराष्ट्र राज्यात राबवून या योजनांचा लाभ जैन समाजाला मिळवून दिला जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
समाजातील बहुतांशी वर्ग हा शेतकरी आहे. जमिनीचे प्रमाण कमी होत असल्याने तो अल्पभूधारक बनला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजना केली. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. सहकार विभागाकडून याची यादी प्राप्त होताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार आहे. याबरोबरच 2 लाखावरील कर्जाबाबतही शासन विचार करीत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

दक्षिण भारत जैन सभा समाजाच्या न्याय्य हक्काचा लढा संविधानिक मार्गाने पुढे घेऊन जाण्याची भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दक्षिण भारत जैन सभेने घेतलेले उपक्रम स्तुत्य असून चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार केल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संयोजकांना धन्यवाद दिले.
जैन समाजाचे आचार-विचार, त्यांची परोपकार भावना, मानवता, उद्यमशीलता, शिक्षण तसेच निरोगी आरोग्याची सवय इतर समाजानेही अंगीकृत करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.
ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, भगवान महावीरांच्या तत्वांनुसार जैन समाजातील प्रत्येक घटक काम करुन संस्कार, शिक्षण, आरोग्य या त्रिसुत्रीचे आपल्या जीवनात आचरण करीत आहे. कष्ट करणारा हा समाज असून समाजात बहुतेक वर्ग हा शेतकरी आहे. समाजाच्या प्रलंबित मागण्या व समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, शांततेची सुरुवात जैन धर्मियांच्या विचारातून झालेली असून त्या तत्वानुसार जगणारा हा समाज आहे, त्यांचे अनुकरण सर्वांनी करावे. समाजातील बहुतांश लोक हे शेतीमधून उपजीविका करतात. शेती कमी झाली असल्याने समाजाने शिक्षणाची कास घरुन उद्योग, व्यवसायात पुढे येणे गरजेचे आहे. जैन समाजातील अनेक मान्यवरांनी समाजाला दिशा देण्याचे चांगले काम केले आहे. त्यांचे काम युवकांना प्रेरणादायी असल्याचेही श्री. पाटील म्हणाले.
बाहुबली हे सर्वांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी आवश्यक सेवा सुविध उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच समडोळी येथे शांतीसागर महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष चांगल्या उपक्रमांनी साजरे केले जाईल. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जैन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण आग्रही राहू. तसेच जैन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मदत करतील अशी ग्वाही त्यांनी दिली.यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थिती उद्भवू नये यासाठी जलसंपदा विभागामार्फत धरणात कमीत कमी पाणी ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले, सत्य व अहिंसा या तत्वावर चालणाऱ्या जैन समाजाच्या मागण्या मान्य करणे ही शासनाची जबाबदारी असून शासन यामध्ये मागे पडणार नाही. जैन समाजासाठी जे-जे करता येईल ते प्राधान्याने केले जाईल. शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. यावर्षी या अध्यासनासाठी 3 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. शांतीसागर महाराजांचे विचार सर्वदूर पोहचावेत. भावी पिढीला त्यांच्या विचारांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत त्यांचे पुस्तक प्रकाशित केले जाईल. राज्यातील सर्व ग्रंथालयामध्ये हे पुस्तक उपलब्ध होईल असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, जैन समाज शांतता प्रिय समाज असून तत्वाने काम करणारा आहे. दातृत्व हा या समजाचा विशेष गुण असून असून अडचणीच्या काळात सर्वांना मदत करण्यासाठी समाज नेहमीच पुढे असतो. वीर सेवा दलाच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जात असून विकास कामामध्ये जैन समाजाचे महत्वपूर्ण योगदान आहे. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनाच्या कामास गती दिली जाईल, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी यावेळी दिली.
आरोग्य राज्यमंत्री तथा महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, १२३ वर्षपूर्वी दक्षिण भारत जैन सभेची स्थापना झाली. क्रांतीकारकांच्या सांगली जिल्ह्यात दक्षिण भारत जैन सभेचे 100 वे महाधिवेशन होत आहे ही समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अहिंसेचा पुरस्कार करून जगा आणि जगू द्या..या तत्त्वानुसार आचरण करणारा जैन समाज आहे. नवीन कल्पनांचा स्वीकार समाज नेहमीच करत आहे. भविष्यात शिक्षण, उद्योग, व्यवसाय यामध्ये तरुणांना वाव मिळावा यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि जैन समाजाच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सहकार राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, जैन समाज हा मातीशी नाळ जोडलेला समाज आहे. शेती बरोबरच व्यापार, उद्योग, व्यावसायात या समाजाने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. राज्य, देशाच्या जडणघडीमध्ये समाजाचे फार मोठे योगदान आहे. सर्व धर्म समभाव ही संस्कृती समाजाने आपल्या आचार, विचारातून जपली असून प्रवचनातून समाज प्रबोधनाचे उत्तम रितीने चालले आहे. अल्पसंख्याक विभागामार्फत समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही डॉ. कदम यांनी यावेळी दिली.
दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील म्हणाले १२३ वर्षपूर्वी जैन सभेची स्थापना झाली आहे असे सांगून, जैन समाज दातृत्वाला महत्त्व देणारा समाज आहे. संकटाच्या काळात मदत नेहमीच मदतीसाठी पुढे येतो. कर्तृत्त्व, नेतृत्व करण्याचे गुण समाजात आहेत. शिक्षणात समाज सर्वात पुढे आहे. मात्र शेती कमी झाली आहे त्यामुळे काही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यासाठी अल्पसंख्याक योजनांचा लाभ समाजाला मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात माजी खासदार प्रकाश हुक्केरी, माजी खासदार राजू शेट्टी, कर्नाटकचे आमदार अभय पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, रावसाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माजी मंत्री कलाप्पाण्णा आवाडे यांना शिक्षण सेवक पुरस्कार तर स्व. बापुसाहेब बोरगावे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
“तिरसाट” २० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात
राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेले सूर्यकांत पवार यांचा मुलगा आणि राष्ट्रीय सायकलपटू नीरज सूर्यकांत अभिनयात पदार्पण करत आहे. २० मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या “तिरसाट” या चित्रपटात नीरज प्रमुख भूमिकेत असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला.
दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्मसने “तिरसाट” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अॅड. उमेश शेडगे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. प्रेम मिळवण्यासाठी सहन करावा लागणारा विरोध, प्रेमासाठी करावी लागणारी धडपड “तिरसाट” या चित्रपटात उलगण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातलं “उधाण आलंया, फ़र्मान आलंया, जीवाला या जीवाचं आवताण आलंया,’ असे शब्द असलेलं गाणं आणि टीजर लाँच करण्यात आलं होता. या गाण्याला आणि टीजरला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आता ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल्यानं चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात यतीन कार्येकर, ओंकार यादव, पल्लवी घुले, सुजीत चौरे, विवेक यादव, आनंद साने, रामदेव जमदाडे, नीलिमा कामने, श्रुती उबाळे यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. मुराद तांबोळी, मनिषा भोसले, निलेश कटके यांनी लिहिलेल्या गीतांना पी.शंकर यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, गायिका मुग्धा कऱ्हाडे आणि पी. शंकर यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत.
वडिलांकडून मिळालेला खेळाचा वारसा पुढे चालवत नीरजनं सायकलिंग या खेळात नैपुण्य मिळवलं. जिल्हास्तरापासून सुरुवात करत राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली. मात्र खासगी कारणास्तव सायकलिंग बाजूला पडलं. एका चित्रपटाच्या निमित्ताने राज डावखरे, जय सुरवसे आणि सुरज टक्के या मित्रांमुळे नीरजची भेट दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांच्याशी झाली. त्यानंतर नाटक आणि एकूणच मनोरंजन क्षेत्रातला नीरजचा प्रवास सुरू झाला. वऱ्हाड आलंय लंडनहूनसारखं नाटक, चांडाळचौकडीसारखा वेब सीरिज आणि शॉर्टफिम्स करत आता नीरज “तिरसाट” या चित्रपटातून पदार्पण करत आहे.
महाराष्ट्राचा महासिनेमा ‘सरसेनापती हंबीरराव’ होणार हिंदी, तेलगू, मल्याळममध्ये डब..?
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा मुळशी पॅटर्न गाजला. मुळशी पॅटर्न ह्या सिनेमाने महाराष्ट्रात हाऊसफूलचे बोर्ड झळकवत कमाई केली. काही दिवसांनी त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली. ‘सरसेनापती हंबरराव’ स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मीहिते यांची शौर्य गाथा दाखवणारा सिनेमा बघायला मिळेल याची उत्सुकता आहे, सिनेमाची तारीखही जाहीर झाली आणि अखेर ट्रेलर आला.
ट्रेलर बघून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. आत्तापर्यंत बाहुबली, पुष्पा, केजीएफ आशा अनेक साऊथ सिनेमाच्या भव्यतेबद्दल कौतुक करणारे आपण हा मराठमोळा सरसेनापती हंबीररावचा ट्रेलर बघितल्यावर ट्रेलरमध्ये दिसणारी ती भव्यता आता पडद्यावर बघण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. स्वराज्याचे सरसेनापती यांचे शौर्य आपल्याला पडद्यावर बघताना नक्कीच महाराजांच्या स्वराज्यात आल्याची अनुभूति आल्याशिवाय राहणार नाही असा दावा केला जाऊ लागला.
सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा मराठीतला पहिला सर्वात भव्यदिव्य असा सिनेमा ठरणार आहे. सिनेमात दाखवलेल्या लढाया, त्यातली गनिमाच्या फौजा, स्वराज्याचे मावळे त्यांची संख्या हे सगळ बघताना आपल्याला नक्कीच मराठी सिनेसृष्टीचा अभिमान वाटेल.असेही सांगितले जाते आहे
त्यातली भव्यता, त्यातला व्हीएफक्स, कॅमेरा, कॉस्च्युम हे सगळ बघता ह्या सिनेमाच बजेट किती असेल हा प्रश्न नक्कीच पडेल. परंतु हा मराठीतला सर्वाधिक बजेट असणारा सिनेमा आहे आजपर्यंत आपण हिन्दी डब केलेले साऊथ सिनेमे तमाम महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. पण आता आपला सिनेमा आपल्या महाराष्ट्राचा, मराठमोळा सिनेमा हिंदी, तेलगू, मल्याळम, कन्नड ह्या भाषांमध्ये डब करून साऊथकड हा सिनेमा पोहचेल का आणि सरसेनापती हंबीरराव यांचा प्रताप, शौर्य तिथल्या लोकांसमोर येईल का हे बघण उत्सुकतेच असेल.असे ह्या सिनेमाच लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी म्हटले असून ह्या उर्वीता प्रोडक्शन अंतर्गत ह्या सिनेमाची निर्मिती शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम आणि धर्मेद्र बोरा यांनी केली आहे. या सिनेमाचे डीओपी महेश लिमये हे आहेत.
ह्या सिनेमात प्रवीण तरडे यांनी सरसेनापती हंबीरराव मीहिते यांची भूमिका साकारली आहे. तर गश्मीर महाजन यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. हा महाराष्ट्राचा महासिनेमा येत्या २७ मे ला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
कृष्ण धवल’ चित्रांचा राजा उमाकांत कानडे
पुणे : पांढऱ्याशुभ्र कॅनव्हासवर काळ्या रंगाच्या रेषांनी रेखाटलेले निसर्गचित्रे, त्यातील पांढरे शुभ्र आकाश, उठावदार रंगातील आकर्षक पक्षी, वृक्ष सावलीत हलक्या लहरींचे जाणवत असलेले पाण्याचे अस्तित्व हे सारंच कला रसिकांच्या मनाचा ठाव घेणारं आहे. चित्रकार उमाकांत कानडे यांच्या चित्रातील त्र्मोक्चिल या माध्यमातून साकारलेल्या काळ्या रंगाच्या कमी अधिक जाडीच्या रेषांच्या गुंफणीतून तयार झालेला सहज सुंदर ‘कृष्ण धवल’ हा परिणाम अनेकांच्या नजरेला भुरळ घालत आहे.
निमित्त आहे आर्टक्युब गॅलेरिया, पुणेच्या वतीने शुभारंभ लॅन्स येथे भरवण्यात आलेल्या ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो’चे. यामध्ये देश विदेशातील अनेक चित्रकार, शिल्पकार सहभागी झाले आहेत. यामध्ये काळ्या रंगाच्या छटांचा उपयोग करून साकारलेली चित्रकार उमाकांत कानडे यांची चित्रे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
चित्रकार उमाकांत कानडे यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार म्हणून ओळख आहे. गेल्या 25 वर्षांपासून ते भारती विद्यापीठातील रेखाकला – रंगकला विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी रेखाटलेली अनेक चित्रे ही देश – विदेशातील चित्र प्रदर्शनामध्ये झळकली असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे. भारतात त्र्मोक्चिल या बोरू सारख्या माध्यमप्रकारात काम करणारे हाताच्या बोटावर मोजता येणारे चित्रकार आहेत. त्यात सर्वाधिक काम करणाऱ्या चित्रकारांमध्ये उमाकांत कानडे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर येते.
उमाकांत कानडे यांनी त्र्मोक्चिल या माध्यमातून विकसीत केलेली ही त्यांची स्वतःची एक वेगळी शैली आहे. त्र्मोक्चिलच्या सहाय्याने ते केवळ काळ्या रंगाच्या अॅक्रेलीक रंगात ते तब्बल आठ ते नऊ वेगवेगळ्या छटा निर्माण करून चित्र रेखाटतात. काळा अॅक्रेलीक रंग तसाच न वापरता चित्रकार उमाकांत कानडे हे त्याची शाई बनवतात व मग तो रंग वापरतात. एक एक चित्र साकारताना त्यांना जवळपास 20 ते 25 दिवस लागतात.
या विषयी बोलताना उमाकांत कानडे म्हणाले, अभिनव कला महाविद्यालयातून 1990 साली शिक्षण घेतल्या नंतर मी कॉमिक मध्ये काम करायला सुरूवात केली. त्याचीच छाप माझ्या चित्रात दिसते. प्रसिद्ध चित्रकार दिलीप कदम हे माझे गूरू. आवड असल्यामुळे मी त्र्मोक्चिलच्या सहाय्याने चित्र काढण्याचा प्रयत्न करत गेलो. अनेक प्रयोगानंतर मी माझी वेगळी शैली निर्माण केली आहे. सहाजिकच फक्त काळ्या रेशांचा खेळ साधला असल्यामुळे ही चित्र वेगळी दिसतात.
ज्येष्ठ नेत्यांना राहुल म्हणाले -डिप्रेशनमध्ये जाऊ नका, लढा खूप मोठा; सोनिया म्हणाल्या -काँग्रेस सत्तेत परतेल
भारत को जोड़कर, नफरत को तोड़कर ही भारत की होगी विजय। कॉंग्रेसचा पुन्हा एकदा ‘नव संकल्प’
उदयपूर-काँग्रेस जनतेपासून दूर गेली आहे. त्यामुळे शॉर्टकट न घेता सर्वांनी लोकांपर्यंत जावे.लढाई खूप मोठी आहे. त्यामुळे नैराश्यात जाऊ नका. आपल्याला अंतर्गत पद पाहण्यापेक्षा बाहेरील युद्ध लढावे लागेल.-हे युद्ध प्रादेशिक पक्ष लढू शकत नाहीत. ही लढाई केवळ काँग्रेस लढू शकते. प्रादेशिक पक्ष भाजपला पराभूत करू शकत नाहीत. कारण, त्यांच्याकडे विचारधारा नाही. ते वेगळे आहेत. ते पुढे म्हणाले, मला कशाचीच भीती नाही. मी उभ्या आयुष्यात कुणाचा रुपया घेतला नाही. भ्रष्टाचार केला नाही. मी भारत मातेचा एक पैसा चोरला नाही. त्यामुळे मी खरे बोलताना घाबरत नाही. . त्यामुळे मी नेहमीच संघर्ष करतो. असे प्रतिपादन येथे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या ज्येष्ठ आणि सर्वच वयोगटातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले .

राजस्थानच्या उदयपूरमध्ये सुरू असणाऱ्या काँग्रेसच्या 3 दिवसीय चिंतन शिबिराचा आजचा शेवटचा दिवस आहे. या शिबिरात पक्षाने एक कुटुंब-एक तिकीट, संघटनेत तरुणांना आरक्षण, देशभर पदयात्रा काढण्यासारखे अनेक निर्णय घेण्यात आले. राहुल गांधी यांनी आपल्या समारोपीय भाषणात काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.
शॉर्टकटने देशाची सत्ता मिळणार नाही
राहुल म्हणाले -सत्ता शॉर्टकने मिळणार नाही. त्यासाठी घाम गाळावा लागेल. तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचावे लागेल. काँग्रेसचा जन्मच मुळात सर्वसामान्य जनतेतून झाला. हाच आपला डीएनए आहे. ही संघटना जनतेतून उभी राहिली आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा जनतेत मिसळेल. ऑक्टोबरमध्ये संपूर्ण काँग्रेस पक्ष जनतेच्या दरबारात जाईल. पदयात्रा काढेल. जनतेसोबतचे संबंध पुन्हा सुधारेल. हाच एकमेव मार्ग आहे. याहून दुसरा कोणताही शॉर्टकट नाही.
देश पेटणार आहे
राहुल गांधी म्हणाले -देश पेटणार आहे. मी तुम्हाला कोरोनापूर्वी इशारा दिला होता. आता पुन्हा देत आहे. हे देशाच्या संस्था मोडित काढत आहेत. ते असे करतील तेवढी आग भडकेल. देशात हा भडका उडणार नाही याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. ही आपले नेते व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. हे काम केवळ काँग्रेस करु शकते. या देशातील कोणत्याही जात, धर्म किंवा व्यक्तीने काँग्रेससाठी आपले दरवाजे बंद केले नाहीत. काँग्रेस सर्वांचा पक्ष आहे.
मोदी सकारमध्ये तरुणांना रोजगार मिळणार नाही
राहुल म्हणाले -मोदी व भाजपने रोजगार निर्मिती करणारा कणा मोडला आहे. सरकारने नोटाबंदी व जीएसटी लागू करुन त्याचा फायदा केवळ दोन-तीन उद्योगपतींना मिळवून दिला. यामुळे तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले. यापुढे तरुणांना रोजगार मिळणार नाही. महागाईमुळे नोकऱ्या मिळणार नाहीत. युक्रेन युद्धामुळेही बेरोजगारी वाढेल.
सोनिया म्हणाल्या -काँग्रेस सत्तेत परतेल
सोनिया गांधींनीही यावेळी पक्ष केंद्रीय सत्तेत जोरदार पुनरागमन करेल असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या -सर्वांनी मिळून एकदिलाने काम करा. ज्येष्ठ नेत्यांनी तरुण नेत्यांना पुढे करण्यावर लक्ष्य केंद्रीत करावे. 2 ऑक्टोबरपासून भारत जोडो अभियान सुरू केले जाईल.
अनेक सुधारणांवर सीडब्ल्यूसीचे शिक्कामोर्तब
काँग्रेस कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या बैठकीत पक्षातील अनेक सुधारणांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सीडब्ल्यूसीने काँग्रेस संघटना व राजकारणाशी संबंधित समितीच्या शिफारशीच्या आधारावर यापुढे एका कुटुंबात एक तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबातील दुसऱ्या नेत्यांनाही उमेदवारी मिळेल. पण, यासाठी संबंधित नेता गत 5 वर्षांपासून पक्षात सक्रिय असला पाहिजे. संघटनेत काम केल्याशिवाय दुसऱ्या सदस्यांना तिकीट मिळणार नाही. 5 वर्ष पदावर राहिल्यानंतर त्यांना 3 वर्षांच्या कुलिंग पिरियडमध्ये रहावे लागेल. 3 वर्ष बाहेर राहिल्यानंतरच संघटनेत पद मिळेल. ही शिफारस सीडब्ल्यूसीने मंजूर केली आहे.
नृत्यसम्राट पं बिरजू महाराज महोत्सवाने रसिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले .
पुणे- येथील देशात नामवंत असलेली संस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या वतीने पहिला नृत्यसम्राट पं बिरजू महाराज महोत्सव कथक महायज्ञ नुकताच पं जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला . यामध्ये पं बिरजू महाराज यांच्या ज्येष्ठ शिष्या पद्मश्री शोवना नारायण (दिल्ली) व पं बिरजू महाराज यांचे सुपुत्र पं दीपक महाराज यांनी बहारदार कथक नृत्य सादर केले. प्रारंभी पं बिरजू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नृत्यसम्राट पं बिरजू महाराज पुरस्कार वितरणसोहळा संपन्न झाला. संस्थेच्या वतीने देण्यात आलेला हा पहिला पुरस्कार जागतिक कीर्तीच्या कथक नर्तिका पद्मश्री शोवना नारायण यांना कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष श्री कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर पं बिरजू महाराज यांचे सुपुत्र पं दीपक महाराज यांना माजी आमदार उल्हास पवार व माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतिचिन्ह,शाल, पं बिरजू महाराज जींच्या फोटोची प्रतिमा असे होते. यावेळी लिज्जत पापड समूहाचे अध्यक्ष सुरेश कोते, आई सी सी आर च्या पुणे विभागाच्या संचालीका निशी बाला, पिंपरी चिंचवड विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, कथक नर्तक पं डॉ नंदकिशोर कपोते, सुनील महाजन , निकिता मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना आपल्या भाषणात पदमश्री शोवना नारायण म्हणाल्या ” मला गुरूच्या नावाने मला हा जो पुरस्कार मिळाला आहे हे मी माझे भाग्य व गुरूंचा आशीर्वाद समजते. डॉ नंदकिशोर कपोते यांनी आपल्या गुरूंच्या नावाने पुरस्कार सुरू केला आहे त्यातून त्यांची गुरूप्रति अगाध भक्ती दिसून येते. ” तर पं दीपक महाराज म्हणाले,” या पुरस्कारामुळे माझ्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे. माझे वडील पं बिरजू महाराज यांची ही नृत्य परंपरा मी पुढे नेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन.नंदकिशोर कपोते यांनी या पहिल्या पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे”.कृष्णकुमार गोयल म्हणाले ” पं.बिरजूमहाराज या दिग्गज कलाकाराच्या नावाने हा राष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांनी सुरु केला ही अभिमानाची गोष्ट आहे.” तर उल्हास पवार म्हणाले ” या राष्ट्रीय पुरस्कारामुळे आज पद्मश्री शोवना नारायण व पं.दीपक महाराज यांचे दश॔न आज पुणेकरांना घडले.त्यांच्या अप्रतिम नृत्याचा आस्वाद सर्वांना घेता आला”. या वेळी निशी बाला,मोहन जोशी,सुषमा शिंदे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
या नंतर पं.दीपक महाराज यांनी कथक नृत्य सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांनी थाट चे मनमोहक प्रकार , तकिट तकिट घिन लडी, जोरदार जुगलबंदी आदी प्रकार सादर केले. त्यानंतर पदमश्री शोवना नारायण यांनी कथक नृत्य सादर करून रसिकांवर मोहिनी घातली. या ७४ व्या वयात ही त्यांनी विविध लयकारी , तोडे, चककर पेश करून प्रेक्षकांना आश्चर्य चकित केले. गौतम बुद्धा वरील यशोधरा अभिनय सादर करुन त्यांनी सर्वांना मोहीत, भाव विभोर केले.प्रेक्षकांनी उभे राहून टाळयां च्या गजरात दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किर्ती रामदासी यानी केले तर मानपत्राचे वाचन किरन जावा यांनी केले.
पुणे महानगरपालिका व डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन !
पुणे-डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक सेवाभावी समाजाभिमुख उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान असून पुणे शहरातील विविध भागांत दर वर्षी त्यांचेमार्फत स्वच्छता अभियान राबविले जाते. स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष “पद्मश्री” पुरस्कार सन्मानित डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. १५/०५/२०२२ रोजी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कोथरूड, केळेवाडी मधील मोगल चौक ते ARAI कंपनी गेट, किष्किंधानगर, सुतारदरा मैदान, पर्वती टेकडी, पर्वती जनता वसाहत चुनाभट्टी कॉर्नर, गोसावीवस्ती, वारजे कर्वेनगर जलशुद्धीकरण प्रकल्प, होम कॉलनी वडारवाडी, खानवस्ती रोड, रामनगर, येरवडा कळस धानोरी, स्वीपर चाळ, भैयावाडी, मदारवस्ती, धनकवडी, राऊतबाग धनकवडी, कात्रज नवीन वसाहत, कात्रजतलाव, गुगळे प्लॉट, इत्यादी ठिकाणी मोठया प्रमाणावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ मा. श्रीमती रुख्मिणी गलांडे, एसीपी, पुणे शहर तसेच मा. श्रीमती आशा राऊत, उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन पुणे मनपा व समन्वयक स्वच्छ भारत अभियान यांच्या हस्ते झाला. यावेळी दिपाली धुमाळ . लघुअण्णा निवंगुणे, बारामती लोकसभा अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका व इतर मान्यवर उपस्थित होते. आशा राऊत( उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन व समन्वयक स्वच्छ भारत अभियान) व आरोग्य अधिकारी श्रीमती केतकी घाटगे यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांना कचरा उचलण्यासाठी कर्मचारी व कचरा गाड्या उपलब्ध करून देणेबाबात सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक आणि विभागीय आरोग्य निरीक्षक यांना सूचना केल्या.
यामध्ये शहरातील विविध ठिकाणच्या ६० झोपडपट्ट्यामधील ८.५ किलोमीटर परिसरातील ४,४५४ स्वयंसेवक यांचेमार्फत एकूण १९० टन ६० किलो कचरा गोळा करण्यात आला.
पुणे महानगरपालिकेने स्वच्छता अभियान यशस्वी करणेसाठी केलेले सहकार्य अत्यंत मोलाचे आहे असे सांगून प्रतिष्ठानने पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
थॉमस कप स्पर्धेतील ऐतिहासिक विजयाबद्दलउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचे अभिनंदन
मुंबई, दि. 15 :- ‘तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आज, 14 वेळा अजिंक्यपद जिंकलेल्या इंडोनेशिया संघाला 3-0 असं नमवून मिळवलेला विजय ऐतिहासिक आहे. या विजयानं भारतीय बॅडमिंटन क्षेत्राची, भारतीय क्रीडा जगताची मान उंचावली आहे. पुरुष एकेरीतील विजेते लक्ष्य सेन आणि किदम्बी श्रीकांत, तसंच दुहेरी सामन्यातील विजेते सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या खेळाडूंचे खुप खुप अभिनंदन. तुमच्या कामगिरीनं देशवासियांना अवर्णनीय आनंद दिला आहे. तुमच्या यशाचा देशाला अभिमान आहे. तुमचं यश हे भारतीय बॅडमिंटनच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे.’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी थॉमस कप विजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचं अभिनंदन केलं आहे.
सहकारी आर्थिक संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नशिल-उपमुख्यमंत्री अजित पवार
सांगली : सहकारी आर्थिक संस्था या चांगल्या चालल्या पाहिजेत यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यासाठी आरबीआयचे यापुर्वी ठेवीवर 1 लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळत होते ते आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढविले आहे. याच धर्तीवर राज्यात पतसंस्थांमधील ठेवीवर किती प्रमाणात विमा संरक्षण देता येईल याबाबत लवकरच धोरण ठरविण्यात येणार आहे.सहकारी आर्थिक संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे.संस्था चालविणाऱ्या संचालकांनी शासनाचे धोरण व सभासदाचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कोल्हापूररोड सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था, मर्या सांगली यांच्या नुतन मुख्य कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पृथ्वीराज पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील उपस्थित होते.
सहकारी पतसंस्थांसमोर फार मोठी आवाहने आहेत, संपुर्ण सहकार क्षेत्रासमोरच अनेक अडचणी आहेत. तरीसुध्दा या सर्व अडचणींवर मात करुन सहकार पुढील वाटचाल करीत आहे. सहकराचे सक्षमीकरणासाठी शासनही पुढाकार घेत आहे. वेगवेगळ्या उपाया योजना राबवित आहे असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सहकरी संस्थां योग्य चालण्यासाठी संस्थेतील संचालकांचा कार्यभारही तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे संचालकांची आपल्या सभासदाचे व संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा. येणाऱ्या काळामध्ये सहकार क्षेत्र अधिक लोकाभिमुख व पारदर्शी करावे त्यामध्ये व्यवसायीकता यावी व आधुनिकीकरणाचा आवलंब करावा यामध्ये डीजिटल माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या बँकिंगसेवा उपलब्ध करुन द्याव्यात. याबाबत शासन नेहमीच सहकारी संस्थांच्या पाठीशी राहील असे त्यांनी यावेळी सांगितले
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची इमारत ही अत्यंत देखणी उभारण्यात आली असून ती सांगली शहराच्या वैभवात भर घालेल. असे गौरवोद्गार काढून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यामध्ये अनेक कार्यक्रमांसाठी जाणे होते पण एकाद्या पतसंस्थेची अशी इमारत पाहण्यात आली नाही. ही वास्तु अत्यंत सुंदर पध्दतीने तयार करण्यात आली आहे. या पतसंस्थेच्या जवळपास 51 शाखा कार्यरत आहेत. आता आणखीन 10 शाखा सुरु होणार आहेत. या संस्थेतून चालणारा कारभार कर्मवीर आण्णांच्या नावाला शोभेल अशा पध्दतीचे आहे.
सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यावेळी म्हणाले, सहकार क्षेत्रासमोर खुप मोठी आवाहने आहेत या सर्व आवाहनांवर मत करुन कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्थेने प्रगती साधली आहे. 1987 साली लावलेले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. तळागाळातील कष्टकरी जनतेला मदत करत खऱ्या अर्थांने या संस्थेने त्यांना सक्षम केले आहे. ही पतसंस्था सांगलीच्या वैभवात भर घालेल.
