Home Blog Page 1992

पोलिसांच्या ताब्यातील राष्ट्रवादीच्या महिलेला मारहाण करण्याची भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्याची मस्ती उतरलीच पाहजे,पूर्ण सत्ता मिळाल्यावर हे काय करतील ?

महिलांवर हाथ उचलणांऱ्यावरील  गुन्हे मागे घ्या म्हणणाऱ्यांना काय म्हणावे ? अपप्रवृत्तीला पाठीशी घालणारी भूमिका त्यांच्यासह सर्वांनाच मारक

पुणे- आंदोलक महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर देखील पोलिसांच्या समक्ष ,पोलिसांचेकडे तोडून या महिलेला भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्याने मारहाण करणे म्हणजे हि किती मस्ती ,कोणत्या थराला गेलेली आहे यांना पूर्ण सत्ता मिळाल्यावर ती कुठपर्यंत पोहोचेल ? असा सवाल उपस्थित करत आज पुण्यातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर मूक निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,प्रवक्ते अंकुश काकडे, ,शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे,संजय मोरे, आम आदमी पार्टीचे मनोज माने, कॉंग्रेसच्या संगीताताई तिवारी तसेच बाबुराव चांदेरे,बाळासाहेब बोडके,प्रदीप देशमुख,मृणालीनीताई वाणी, सदानंद शेट्टी,उदय महाले,किशोर कांबळे,सुषमा सातपुते,विक्रम जाधव,महेश हांडे,दयानंद इरकल,दिपक कामठे, निलेश वरे आदींसह मोठ्या अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ज्यांना मारहाण झाली त्या वैशाली नागवडे देखील या आंदोलनात सहभागी होत्या.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले,’देशाची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे शहरात राजकीय पक्ष व राजकीय नेते यांची देखील एक आदर्श संस्कृती आहे. गेल्या अनेक वर्षात राज्यासह देशातील इतर शहरांमध्ये राजकीय पक्षांमध्ये अनेक चुकीच्या घटना घडल्या परंतु पुणे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी एक आदर्श आचार संहिता जपत कितीही टोकाचे आंदोलन असले तरी कधी कुठल्या महिला भगिनीवर हात उचलल्यापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाची मजल आजपर्यंत गेली नाही. परंतु दोन दिवसांपूर्वी बालगंधर्व येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमांमध्ये आपले निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला भगिनींना पुणे भाजपच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी अक्षरशः जोर-जोरात फटके मारले त्यांचा पदर ओढण्यापर्यंत या कार्यकर्त्यांची मजल गेली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून पुण्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी आहे. राजकारणात राजकीय मतभेद असू शकतात विचारसरणी मध्ये भिन्नता असू शकते. परंतु विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे,त्या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये. असे असताना काल घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. पुण्याची हीच राजकीय संस्कृती टिकवण्यासाठी पुणे शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत आज निषेध आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास चाललेल्या या निषेध आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत काळया रंगाच्या फिती लावत सुमारे एक तास शांतपणे बसून या घटनेचा निषेध व्यक्त केला. प्रशांत जगताप पुढे म्हणाले की, “कार्यकर्त्यांनी कुठल्याही आंदोलनात कसे वागावे याबाबतची आचारसंहिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ठरवून दिली असून कुठल्याही आंदोलनात वैचारिक मतभेद असले तरी विचारांची लढाई विचारानेच लढली गेली पाहिजे.प्रत्येक आंदोलन हे आदर्श आंदोलन झाले पाहिजेत यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. आम्हाला तशी शिकवण आम्हाला पवार साहेबांनी घालून दिलेली आहे. असे असताना आमच्या महिला भगिनींना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह असून या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. त्या आरोपींवर परवा गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रशासनास विनंती आहे की, सदर आरोपींवर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी , या कारवाईमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला जाईल की पुन्हा कोणीही अशा प्रकारची गैरवर्तन करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. परवा ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे गैरवर्तन झाले त्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस ,चंद्रकांत पाटील यांनी साधी दिलगिरी देखील व्यक्त केली. नाही याउलट यापुढील काळात यापेक्षा उत्तमप्रकारे प्रत्युत्तर काढण्याची भाषा करत असतील तर ते एक प्रकारे महिलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची पाठराखण करण्यासारखेच आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या फडणविसांनी, भाजप सारख्या पार्टी विथ डिफरन्सचा नारा पिटनाऱ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशी भाषा करणे खरोखरच अशोभनीय आहे. या गोष्टीचा देखील आम्ही या मूक आंदोलनात निषेध व्यक्त करतो”.

राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार,भाजपच्या कार्यकर्त्यांवरील विनयभंगासारखे गुन्हे तातडीने मागे घ्या, म्हणाले भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक

पुणे -शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करीत असून, त्यांच्यावर पोलिसांचा आणि सरकारचा अंकुश राहिलेला नाही. शहराची संस्कृती बुडविण्याचे पाप करणार्या राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार असल्याचा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.राष्ट्रवादीच्या गुंडगिरीचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आज अलका टॉकिज चौकात मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. प्रदेश चिटणीस धीरज घाटे, शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुळीक म्हणाले, सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्याचा नियोजनबद्ध कट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आखला होता. त्याप्रमाणे सेनापती बापट रस्त्यावरील चौकात आंदोलन करणारे हॉटेल मेरियेटच्या प्रवेशद्वारातून आत पोहोचले. त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर आक्रमण केले. बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंडी आणि शाईच्या बाटल्या घेऊन आले होते. या गुंडांवर कोणतेही गंभीर गुन्हे दाखल झालेले नाहीत. उलट भाजपच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि राष्ट्रवादीच्या गुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही करीत आहोत.

मुळीक पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या पदाधिकार्यांवर हल्ले करीत आहेत. नागरिकांना दमदाटी करीत आहेत. ठिकठिकाणी हप्ते वसुल करीत आहेत. त्यांच्या विरोधात जे आवाज उठवतील त्यांची पोलिसांच्या मदतीने गंभीर गुन्हे दाखल केले जात आहे. अशा गळचेपीला भाजपचे कार्यकर्ते घाबरत आहेत. शंभर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही. गुंडगिरी विरोधातील आमचा लढा सुरूच राहील.

अखेर महापालिका प्रशासक आम आदमी पार्टीच्या जल हक्क आंदोलनासमोर नमले,म्हणाले ,’30 जून पासून समाविष्ट सर्व गावांना नळाने पाणीपुरवठा करू

पुणे-गेले वर्षभरापासून आम आदमी पार्टी AAP PMC जल हक्क आंदोलन समिती पुणे, हे पुणे महानगरपालिका आयुक्त श्री विक्रम कुमार यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून पुणे शहर आणि महानगरपालिकेच्या परिसरातील पाण्याचा प्रश्न उपस्थित करत होते, अखेर AAP PMC जल हक्क आंदोलन समितीने महापालिका आयुक्त श्री विक्रम कुमार यांना पाण्याच्या गंभीर प्रश्नाचे अनेक निवेदने दिल्यानंतर आणि 24 एप्रिल 2022 रोजी AAP PMC जल हक्क आंदोलन छेडल्या नंतर प्रशासनाने ‘’आम्ही पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांना नळाने पाणीपुरवठा करू “असे मान्य केले’’ आणि यापूर्वी PMC प्रशासन बांधकाम व्यवसायीकाकडून जे पाण्याचे अंडरटेकिंग घेत होते ते चुकीचे आहे, असे सांगून नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची आपली जबाबदारी झटकत होते. आता पुणे महानगरपालिका आयुक्त श्री विक्रम कुमार यांनी भविष्यात अशा कुठल्याही प्रकारचे अंडरटेकिंग घेणार नाही असे सांगितले आहे आणि येत्या 30 जून पासून महापालिकेत समाविष्ट असलेल्या सर्व गावांना नळाने पाणीपुरवठा करू असे आश्वासन दिले आहे. परंतु बाणेर, बालेवाडी सारखी गावे 25 वर्षापूर्वी महानगर पालिकेत् समाविष्ट होवुन अजूनही या गावांचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. मग आता दिले गेलेले आयुक्तांचे हे आश्वासन कितपत खरे ठरेल हे नळाने प्रत्यक्ष पाणी सुरू झाल्यानंतरच सांगता येईल. जोपर्यंत प्रशासन महानगरपालिका हद्दीतील सर्व समाविष्ट गावे आणि सोसायट्यांना पाणी देणार नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी पुणे शहर या पाणी प्रश्नाचा गांभीर्याने पाठपुरावा करत राहील. असे आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष श्री विजय कुंभार आणि AAP PMC जल हक्क आंदोलन समितीचे समन्वयक श्री सुदर्शन जगदाळे आणि आबासाहेब कांबळे यांनी सांगितले.

अध्ययन आणि विश्लेषणाच्या जोरावर प्रगती होते केंद्रीय राज्यमंत्री जनरल (डॉ) व्ही. के. सिंग यांचे प्रतिपादन;


 मिटसॉगच्या १४ व १५ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ

पुणे, १८ मे : “ अध्ययन आणि विश्लेषण या दोन तत्वांच्या जोरावर सदैव प्रगतीपथाची पायरी चढता येते. देश व समाज ही प्राथमिकता ओळखून कार्य केल्यास येणार्‍या काळात राजकारणात खूप मोठे बदल दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  विकासाचे धोरण देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले आहे. राजकारणाच्या प्रचंड अभ्यासामुळेच ते एक यशस्वी नेता बनले आहे.” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतुक, महामार्ग आणि नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री जनरल डॉ व्ही. के. सिंग (रिटायर्ड) यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या मास्टर्स प्रोग्रॅम इन गव्हर्नमेंटच्या १४ व १५ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरि बाबू कंभमपति होते. खासदार गजानन कीर्तिकर  हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे संस्थापकीय विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी डब्ल्युपीयूचे कार्यध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, मिटसॉगचे संचालक डॉ. के. गिरीसन, प्रा. परिमल माया सुधाकर, परिक्षा विभागाचे प्रमुख गणेश पोकळे, डॉ. जयश्री कंभमपति व विदिशा गजानन किर्तीकर उपस्थित होते. तसेच, धिरज सिंग, डॉ. शालिनी शर्मा व डॉ. सौरभ चतुर्वेदी उपस्थित होते.
डॉ. व्ही. के. सिंग म्हणाले, “आर्मीमध्ये ज्या पद्धतीने जाती भेदाला थारा दिला जात नाही, सेवा हाच सर्वात मोठा धर्म असतो आणि एकता या तीन गुणांच्या जोरावर देशात आर्मीवर सर्वांचा विश्वास आहे. हेच तत्व राजकारणात वापरल्यास देश बदलेल. या क्षेत्रात लक्ष निर्धारित करून सकारात्मक भावनेने कार्य करावे. राजकारणात वाईट आणि चांगल्या दोन्ही गोष्टी असून संपत्ती कमविण्याच्या जाळ्यात फसू नये. समाज आणि देशाची आर्थिक स्थिती ओळखून सदैव कार्य करावे.”
डॉ. हरि बाबू कंभमपति म्हणाले,“ कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. एमआयटी शिक्षण संस्थेने सर्व विद्याशाखा उघडून ती गरज पूर्ण करीत आहे. त्यातच राजकारणाचे प्रशिक्षण देणारी संस्था देशाचे भविष्य बदलेल. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी राजकारणी मंडळींना  प्रशिक्षण देणारी संस्था उघडली  जावी. राजकारणात ३५ वर्षाखालील ३२ नवे खासदार निवडून  येणे हे चांगले संकेत आहेत.  युवकांसाठी इंटर पार्लमेंट यूथ म्हणजेच आयपीयू सुरू केले आहे.”
गजानन किर्तीकर म्हणाले,“ जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला शिक्षित नेते मिळाले तर कायापालट होईल. नेत्यांचा पीए प्रशिक्षित असून तो मिटसॉगच्या तुकडीचा विद्यार्थी असला तर उत्तम कार्य होईल. मिटसॉगचा विद्यार्थी गौरव कळंबकर च्या जोरावर मी राजकारणात बरेच कार्य करीत आहे. प्रशिक्षित राजकारणाच्या जोरावर देशातील बर्‍याच समस्या संपविता येतील.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ धर्म हे कर्तव्याची जाणीव करून देते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी माता पिता, समाज आणि देशाप्रतिचे कर्तव्य समजून घ्यावे. नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आपले कर्तव्य कधीही विसरता कामा नये. विश्वशांती निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या सर्वात मोठा डोम ही आध्यात्माची प्रयोगशाळा आहे. जीवनात सर्व गोष्टींचे संतुलन ठेवावे.”
प्रा. राहुल वि. कराड म्हणाले,“ देशाचे भविष्य बदलण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे. राजकारणात सुशिक्षित तरूण आले तर देश प्रगतीपथावर जाईल. या उद्देशाने मिटसॉगची स्थापना झाली. वर्तमानकाळात वसाहतवादी मानसिकता बदलण्याची वेळ आली असून भारतीय संस्कृतीची मुळ धारणा स्विकारावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना एनसीसीचे प्रशिक्षण अनिवार्यपणे करावे.  मिटसॉगच्या मंचावरून भारतीय छात्र संसद, राष्ट्रीय महिला संसद, नॅशनल टिचर्स कॉग्रेससारखे कार्यक्रम राबवून देशात नवी चळवळ उभी करण्यात येत आहे.”  यावेळी मान्यवरांच्या हस्ते १४ व १५व्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान समारंभ संपन्न झाला. या बॅचमध्ये उत्तम कमगिरी करीत सुवर्ण पदक मिळविणारे संदीप बी, सार्थक साऊजी, मुथुरासन, स्नेहल देसाई, ज्युडा जेबा कुमार आणि प्रविण कुमार झा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच एकुण ३८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
 यावेळी वैभव नलगुंडवार, संभल झा व जयंती या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. के. गिरीसन यांनी स्वागत पर भाषण केले. प्रा. परिमल माया सुधाकर यांनी १४ व १५ व्या तुकडीच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले.
सूत्रसंचालन डॉ. अनुराधा पै यांनी केले. गणेश पोकळे यांनी आभार मानले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला ५९ नवीन वाहने; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण

0

 मुंबई, दि. 18 : अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन महसूल वाढीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रभावीपणे प्रयत्नशील राहील. यामुळे देश व राज्याच्या महसुलातही मोठी  भर पडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. या गाड्या विभागाचे सक्षमीकरण करण्यासाठी दिलेल्या असून गुन्हा अन्वेषणातील कामगिरी उल्लेखनीय करण्यास आणि महसूल उद्दिष्टाची पूर्तता करण्यास त्यामुळे मदत होईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

            विधानभवन समोरील वाहनतळावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ५९ नवीन वाहनांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फीत कापून व वाहनाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा-नायर सिंह, आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त विश्वनाथ इदिसे, संचालक दक्षता व अंमलबजावणी श्रीमती उषा वर्मा, उपाआयुक्त सुनील चव्हाण, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            प्रधान सचिव वल्सा- नायर सिंह म्हणाल्या की, या नवीन गाड्यांच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजात नक्कीच अधिक गती येईल आणि त्याचा चांगला परिणाम होईल. या विभागात अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सऍप क्रमांकही देण्यात आले आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाईस गती आली आहे. नवीन वाहने विभागातील अधिकाऱ्यांना गुन्हा अन्वेषणातील उल्लेखनीय कामगिरी करण्यास सहाय्यभूत ठरतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            या वेळी महिंद्रा अण्ड महिंद्रा, कंपनीचे अधिकारी गुरुप्रिंतसिंग रंधावा, मारोती सुझुकीचे अधिकारी  जावेद सय्यद यांनी प्रतिनिधिक स्वरूपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चावी दिली. या नवीन 59 वाहनात महिंद्रा अंड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ मॉडेलच्या 51 स्कॉर्पिओ व मारोती सुझुकी  कंपनीच्या इर्टिगा 8 कारचा समावेश आहे. विभागासाठी एकूण 271 वाहने मंजूर करण्यात आली आहेत.

शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लॅडींग सुविधा सुरू करणार-व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर

0

शिर्डी येथून आतापर्यंत २ लाख किलो मालाची निर्यात,

कार्गो क्षमता वाढविण्यासाठी कॉर्गो हब बांधणार

शिर्डी : शिर्डी विमानतळाहून नाईट लॅडींग विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी उड्डयन महानिदेशनालय (DGCA) ची टीम मे 2022 अखेर येथील नाईट लॅडींग सुविधेची तपासणी करणार आहे. डीजीसीएची परवानगी प्राप्त झाल्यावर शिर्डी येथून लवकरात लवकर नाईट लॅडींग सुविधा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी आज दिली.

शिर्डी विमानतळ व परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी श्री.कपूर यांनी शिर्डी विमानतळावर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिर्डी विमानतळ प्रवेश व निर्गमन सुविधा, अग्न‍िशमन व्यवस्था, नाईट लॅडींग, कॉर्गो सेवा, काकडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, परिसरातील स्वच्छता अशा विविधांगी प्रश्नांचा आढावा घेऊन त्यांनी शिर्डी विमानतळाची पाहणी केली.

व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर म्हणाले, शिर्डी विमानतळ हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे विमानतळ आहे. शिर्डी येथून आतापर्यंत २ लाख किलो मालाची निर्यात करण्यात आली आहे. कार्गोने भाजीपाला, फुले व फळे हे बंगळुरू, चेन्नई व दिल्ली येथे नियमित पाठण्यात येत आहे. ही सुविधा व्यापक व मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी २० कोटी रूपये खर्च करुन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या माध्यमातून कॉर्गो हब बांधण्यात येणार आहे.

काकडी गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींसोबत सखोल चर्चा करून तेथील पाण्याच्या टाकीची संपूर्णपणे डागडुजी करून दुरुस्ती करण्यासाठी लवकरात लवकर निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले. त्याशिवाय इतर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, रस्ता, शाळा, उपाहारगृह याबाबत साधक-बाधक चर्चा करण्यात आली. विमानतळावरील विक्रेत्यांच्या अडी-अडचणी यावेळी जाणून घेऊन त्यांच्या हिताचे योग्य ते निर्णय घेण्यात आले. विमानतळावरील अग्न‍िशमन यंत्रणेचा आढावा घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती दीपक कपूर यांनी दिली.

शिर्डी विमानतळावरील प्रवेश व निर्गमन ठिकाणावरील अभ्यागत आरामदायी कक्ष सुविधेविषयी व्यवस्थापकीय संचालक श्री.कपूर म्हणाले, अभ्यागत आरामदायी कक्ष मधील यात्री- सुविधेची यावेळी सखोल पाहणी करण्यात आली. येथे चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेल्या फरशीची तत्काळ दुरूस्ती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी शिर्डी विमानतळाचे संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव, टर्मिनल व्यवस्थापक मुरली कृष्णा, स्थापत्य अभियंता कौस्तुभ ससाणे, मुख्य वित्तीय अधिकारी संजय कांजणे, अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी, अजय देसाई, कृष्णा शिंदे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ओबीसी आरक्षण:मध्य प्रदेशातील स्थानिक निवडणुकांसाठी सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदिल

0

नवी दिल्ली-मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. राज्यात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सोबतच ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर शिवराज सरकारने कोर्टात पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाचा निर्णय आला आहे.

या निर्णयानंतर मध्य प्रदेशातील त्रिस्तरीय पंचायत आणि शहरी संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी वर्गाला आरक्षण मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना आठवडाभरात आरक्षण अधिसूचित करावे, असे सांगितले. पुढील आठवड्यात निवडणुका घेण्याबाबत अधिसूचना जारी करावी. अधिवक्ता वरुण ठाकूर म्हणाले की, निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आरक्षण कोणत्याही परिस्थितीत 50% (ओबीसी, एससी/एसटीसह) पेक्षा जास्त नसावे.

ओबीसी प्रवर्गाला आरक्षण देण्यासाठी सरकारने 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुधारणा याचिका (फेरबदल अर्ज) दाखल केली होती. यावर 17 मे रोजी सुनावणीही झाली होती. ओबीसी आरक्षण देण्यासाठी सरकारने 2011च्या लोकसंख्येची आकडेवारी सादर केली होती. त्यानुसार राज्यात ओबीसींची 51 टक्के लोकसंख्या नोंदवण्यात आली आहे. याआधारे ओबीसींना आरक्षण मिळाल्यास त्यांच्यासोबत न्याय होईल, असा सरकारचा विश्वास होता. त्याचवेळी दुसरीकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असले तरी इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) त्यांचे घटनात्मक अधिकार (आरक्षण) मिळाले पाहिजे, असे सांगण्यात आले.

राज्यातील 18 महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या गोंधळानंतर ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. या निवडणुकांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला विरोधकांनी चांगलीच घेरले. अशा परिस्थितीत ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने नवीन विधेयकाद्वारे कायदा मंजूर करत राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, त्या याचिकेवर 25 एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. यासंदर्भातला अंतिम निकाल दोन आठवड्यांपूर्वी सुप्रीम कोर्ट दिला आहे. या निकालात दोन आठवड्यांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षण विरहित प्रभाग रचना जाहीर केली होती. अंतिम प्रभाग रचना दुरुस्तीसह प्रसिद्धीचे वेळ आली असताना अचानक राज्य सरकारने ओबीसी आरक्षण नसल्यामुळे विधिमंडळात विधेयक कायद्याद्वारे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार आपल्याकडे घेतले होते. आता पावसाळा असल्याने जून किंवा जुलै महिन्यामध्ये निवडणुका घेणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने दाखल केले होते.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाचे आरक्षण टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले नाही, तसेच ओबीसी आरक्षण बाबतही राज्य सरकार आपली स्पष्ट भूमिका मांडू शकत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपच्या वतीने करण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी समाजाला बांधून ठेवण्यासाठी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार आपल्याकडे घेत निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. परंतु आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 15 दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जात 

हार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, काँग्रेस अध्यक्षपदासह सर्व पदांचा राजीनामा

युवा नेता हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते नाराज होते. जनता या निर्णयाचे स्वागत करेल याची मला खात्री आहे, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे . राहुल गांधी यांनी 15 दिवसांपूर्वी हार्दिक पटेल यांच्यासोबत चर्चा केली होती. गुजरातमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. ते पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र त्यांच्या नुकत्याच आलेल्या वक्तव्यांनुसार ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हार्दिक पटेल यांनी अखेर पक्षाच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हार्दिक पटेल यांनी ट्विटरवर सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यांचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.रविवारी नरेश पटेल यांनी खोडलधाममध्ये पास नेते अल्पेश कथिरिया, दिनेश बांभनिया आणि गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांच्यासोबत बंद दाराआड बैठक घेतली. बैठकीनंतर हार्दिक पटेल म्हणाले की, मी काँग्रेसवर नाराज आहे. कोण नाराज होणार नाही? हे जनतेलाही माहिती आहे. कोणत्याही पक्षात एखाद्या नेत्याची जबाबदारी निश्चित असते.

विशेषत: राहुल गांधी गुजरातमध्ये आले असताना त्यांनी हार्दिकशी बोलणे टाळले आणि त्यांची दखलही घेतली नाही. राजस्थानमधील उदयपूर येथील काँग्रेसच्या चिंतन शिबिरातही हार्दिक पटेल यांची सूचक अनुपस्थिती दिसून आली होती.2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल यांनी 12 मार्च 2019 रोजी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर अवघ्या 19 महिन्यांच्या प्रवासात हार्दिक पटेल यांना गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले. मात्र, हार्दिक पटेल काँग्रेस हायकमांडसमोर आपल्या मागण्या मांडत राहिले. गुजरात काँग्रेसच्या नेत्यांनी आपली कारकीर्द खराब केल्याचा आरोपही हार्दिक यांनी केला.

भेसळयुक्त चहा पावडर जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

0

मुंबई : शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त चहा पावडर व खाद्यरंग या अन्न पदार्थाचा ८५ हजार २४० रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे.

शिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनमंत कुंभारे यांना दि १४ मे २०२२ रोजी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मे ए आर एम ट्रेडर्स ३८, तळमजला, रामगड हटमेंट, शिवडी मुंबई १५ या ठिकाणची तपासणी केली. चहा पावडर या अन्नपदार्थास खाद्यरंग लावून विक्रीसाठी साठा केला असल्याचा आढळला तसेच खाद्यरंग आढळून आला. हा साठा सकृतदर्शनी भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तेथून चहा पावडर व खाद्यरंग या अन्नपदार्थाचे अन्न नमुने घेवून उर्वरित ४२९ किलोग्रॅमचा चहा पावडरचा साठा किंमत ८५ हजार २४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत .

संबंधित हजर व्यक्ती , पेढीमालक यांचे विरुद्ध शिवडी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद देण्यात आलेली आहे. ही कारवाई म.ना.चौधरी, सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई व एस.एस.जाधव, सहायक आयुक्त (अन्न), परिमंडळ ३ यांचे मार्गदर्शनाखाली ल.सो.सावळे, अन्न सुरक्षा अधिकारी, र.ज.जेकटे, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली आहे.

माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांची शिर्डी उप माहिती कार्यालयास भेट कामकाजाचा घेतला आढावा

0

शिर्डी – राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक  श्री.दीपक कपूर हे आज येथे शिर्डी आले असता त्यांनी उपमाहिती कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालय व उप माहिती कार्यालय, शिर्डी कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी महासंचालक श्री.दीपक कपूर यांनी अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालय व शिर्डी उप माहिती कार्यालया मार्फत करण्यात येणाऱ्या प्रसिद्धी, आस्थापना, सोशल मीडिया व इतर कार्यालयीन कामकाज या विषयांचा आढावा घेतला.  समाज माध्यमांच्या विविध शाखांचा प्रभावीपणे वापर करून शासनाच्या विकासात्मक कामांना प्रसिद्धी द्यावी. असा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रवींद्र ठाकूर यांनी बैठकीपूर्वी स्वागत केले. यावेळी उप माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी श्री.सुरेश पाटील, छायाचित्रकार सुनिलदत्त शिवदे, सिनेयंत्रचालक धनंजय जगताप, लिपिक प्रविण पाटील ,‌प्रविण मुठे, नागेश निकम उपस्थित होते.

सार्वजनिक वितरणातून ६०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याची नावी फिनसर्व्ह लिमिटेडची योजना

●     300 कोटी रुपयांच्या बेस इश्यू सह ३०० कोटी रुपयांपर्यंत आणि एकत्रितपणे ६०० कोटी रुपयांपर्यंत ओव्हरसबस्क्रिप्शन कायम ठेवण्याच्या पर्याय

●     प्रस्तावित एनसीडींना इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च प्रायव्हेट द्वारे IND A/ रेट केले गेले आहे

●     गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीवर ९.८%* पर्यंत प्रभावी उत्पन्न मिळवू शकतात

●     सोमवार २३ मे २०२२ रोजी इश्यू खुला होईल

बंगळूरू, १७ मे २०२२: नावी टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Navi) ची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या नावी फिनसर्व्ह लिमिटेड (NFS)ने आज ३०० कोटी रुपयांच्या बेस इश्यूसह आणि आणखी ३०० कोटी रुपयांच्या ओव्हरसबस्क्रिप्शन कायम ठेवण्याच्या पर्यायासह ६०० कोटी रुपयांचे सुरक्षित, रेटेड, सूचीबद्ध आणि रिडीम करण्यायोग्य नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCDs) ची सार्वजनिक विक्री योजना जाहीर केली आहे. हा इश्यू सोमवार २३ मे २०२२ रोजी खुला होईल आणि लवकर बंद होण्याच्या किंवा विस्ताराच्या पर्यायासह शुक्रवार १० जून २०२२ रोजी बंद होणार आहे.

प्रस्तावित एनसीडींना इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडचे ​​ए (स्थिर) रेटिंग आहे. हे रेटिंग आर्थिक जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करण्याबाबत पुरेसे सुरक्षित मानले जाते. अशा साधनांमध्ये कमी क्रेडिट जोखीम असते.

गुंतवणूकदारांना १८ महिने आणि २७ महिन्यांच्या कालावधीसाठी ९.८०%* पर्यंत प्रभावी उत्पन्न आणि किमान अर्ज आकार १०,००० ₹ सह विविध मालिका अंतर्गत सुरक्षित NCD मध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.

एनसीडी इश्यूबद्दल बोलताना एनएफएसचे व्यवस्थापकीय संचालक अंकित अगरवाल म्हणाले, “आगामी कर्ज देणे आणि वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने निधी उभारणे हे येत्या एनसीडी इश्यूचे उद्दिष्ट आहे. यामुळे आमच्या कर्जाच्या प्रोफाइलमध्ये आणखी विविधता येईल आणि संस्थात्मक भागीदारांच्या आमच्या विस्तृत आधाराला पूरक आमच्या पोर्टफोलिओमध्ये अधिक किरकोळ गुंतवणूकदार जोडले जातील. हे A (स्थिर) रेटिंग, कमी उपयोजन आकार आणि ९.८०%* पर्यंत प्रभावी उत्पन्न असलेले सुरक्षित साधन आहे.

एनएफएसचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बन्सल पुढे म्हणाले: “नावी मध्ये आमचे ध्येय साधे, परवडणारे आणि सुलभ अशी आर्थिक उत्पादने पुरविणे हे आहे. माझा विश्वास आहे की आमच्या मजबूत अंडररायटिंग आणि संकलन क्षमतांच्या जोडीला ग्राहककेंद्री आणि सर्वप्रथम तंत्रज्ञान या दृष्टीकोनामुळे नावी फिनसर्व्हच्या पब्लिक डेब्ट इश्यूचे मूल्य वाढेल.”

एनएफएस “नावी” ब्रँड अंतर्गत वैयक्तिक कर्ज आणि गृह कर्ज देते आणि आम्ही सर्व भारतीय पिन कोडपैकी ८४%पेक्षा जास्त ग्राहकांना वैयक्तिक कर्ज मंजूर केले आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत कंपनीची एकूण संपत्ती ११,८९५.७२ दशलक्ष रुपये होती आणि ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत २.१x च्या इक्विटी रेशोशी सुव्यवस्थितपणे डेब्ट राखले आहे.

एनएफएसने ०.०८% (३१ डिसेंबर २०२१पर्यंत) च्या निव्वळ एनपीए द्वारे प्रतिबिंबित केलेली मजबूत मालमत्ता गुणवत्ता राखली आहे, जी ९६.६३% च्या संकलन कार्यक्षमतेद्वारे समर्थित आहे (१ एप्रिल २०२१ नंतर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वितरित केलेल्या वैयक्तिक कर्जांसाठी). ३१ मार्च २०२२ पर्यंत *२७,७४९.७६ दशलक्ष स्टँडअलोन आधारावर त्याची थकबाकी कर्जे एनसीडी, सब-डेब्ट, मुदत कर्जे, मार्केट लिंक्ड डिबेंचर्स, कमर्शियल पेपर्स आणि सिक्युरिटायझेशन इन्स्ट्रुमेंट्स जसे की PTCs सारख्या साधनांच्या श्रेणीमध्ये वैविध्यपूर्ण होती.

पुण्यात रंगणार रोलबॉल च्या राष्ट्रीय स्पर्धा

पुणे-महाराष्ट्र रोल बॉल संघटना व रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने १८ वी राष्ट्रीय स्पर्धा आपल्या श्री. शिव छत्रपती क्रीडा नगरी, पुणे मध्ये दि.. १९ मे ते २२ मे २०२२ दरम्यान होत आहेत अशी माहिती संघटनेचे संस्थापक आणि या खेळाचे जनक राजू दाभाडे आणि संघटनेचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धसाठी संपूर्ण देशामधील २४ राज्याचे एकूण ४० संघ सहभागी होत आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन दि . १९ मे २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वा. श्री. ओम प्रकाश बोकरिया IAS, आयुक्त क्रिडा व युवक सेवा संचानालय, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व डॉ. सुधांशू शेखर राय- एक्झिट डायरेक्टर NS NIS, sports authority of India, पतियाळा (निवृत) श्री. विलास कानडे अतिरिक्त आयुक्त पुणे मनपा आणि मा. श्री सूर्यकांत काकडे उद्योजक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

तसेच स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस समारंभ दि.. २२ मे २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वा माननीय श्री उदय सामंत उच्च शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील आमदार, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य आणि डॉ.एस बी मुजुमदार पद्मश्री, पद्मभूषण संस्थापक सिंबायोसिस इंटरनेशनाल युनिव्हर्सिटी यांच्या शुभहस्ते दिनांक २२ मे 2022 रोजी दुपारी ४.३० वा. करण्याचे ठरविले आहे.

 ‘सुरत’ आणि ‘उदयगिरी’ या दोन स्वदेशी बनावटीच्या आघाडीच्या युद्धनौकांचे मुंबईत जलावतरण

0

नवी दिल्ली/मुंबई, 17 मे 2022

स्वदेशी युद्धनौका निर्मितीच्या  इतिहासात आज देश एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार झाला. संरक्षण  मंत्री राजनाथ सिंह  यांच्या  उपस्थितीत भारतीय नौदलाच्या दोन आघाडीच्या युद्धनौका  प्रोजेक्ट 15B श्रेणीतील मार्गदर्शित क्षेपणास्त्र  विनाशिका   ‘सुरत’ , आणि प्रोजेक्ट 17A श्रेणीतील  ‘उदयगिरी’, या स्टेल्थ लढाऊ जहाजाचे  आज  मुंबईतील माझगाव डॉक्स लिमिटेड  येथे एकाच वेळी जलावतरण  झाले. प्रोजेक्ट 15B श्रेणीतील जहाजे ही मुंबईतील  माझगाव डॉक्स लिमिटेड  येथे तयार करण्यात आलेली  भारतीय नौदलाची अद्ययावत स्टेल्थ मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका आहेत.

संरक्षणमंत्र्यांनी  आपल्या भाषणात या युद्धनौकांचे वर्णन देशाच्या सागरी क्षमता वाढविण्याच्या सरकारच्या अटल वचनबद्धतेचे मूर्त स्वरूप असे  केले.  रशिया -युक्रेन संघर्ष आणि कोविड-19मुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय येत असताना  भारताने  ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केले. महामारी असूनही  जहाज निर्मिती  सुरू ठेवून  सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत भारतीय नौदलाच्या धोरणात्मक गरजा पूर्ण केल्याबद्दल त्यांनी माझगाव डॉक्स लिमिटेडचे अभिनंदन केले.

या दोन युद्धनौका भारतीय नौदलाच्या शस्त्रागाराचे  सामर्थ्य वाढवतील आणि भारताच्या सामरिक सामर्थ्याचे तसेच आत्मनिर्भरतेच्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतील,असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.

हिंद-प्रशांत क्षेत्र खुले आणि सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडत असल्याबद्दल  संरक्षणमंत्र्यांनी  भारतीय नौदलाचे कौतुक केले. “हिंद-प्रशांत क्षेत्र  संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे  आहे. भारत या क्षेत्रातील एक जबाबदार सागरी भागधारक आहे. क्षेत्रातील  सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासाचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन  (SAGAR-Security and Growth for All in the Region) शेजाऱ्यांसोबत मैत्री, मोकळेपणा, संवाद आणि सहअस्तित्व या भावनेवर आधारित आहे. त्याच दृष्टिकोनातून  भारतीय नौदल आपले कर्तव्य प्रभावीपणे पार पाडत आहे,”असे  ते म्हणाले.

हिंद महासागर आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात सतत बदलणारी  सुरक्षा परिस्थिती यामुळे येणाऱ्या काळात  भारतीय नौदलाला  अधिक महत्त्वपूर्ण  भूमिका बजावावी लागू शकते , असे मत  राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.

जागतिक सुरक्षा, सीमा विवाद आणि सागरी वर्चस्व यामुळे जगभरातील राष्ट्रांना त्यांच्या सैन्याचे आधुनिकीकरण करणे भाग पडत आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्र्यांनी केले. सरकारच्या धोरणांचा फायदा घेऊन क्षमतांचा पुरेपूर वापर करून भारताला  स्वदेशी जहाज बांधणी केंद्र बनवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांना केले.

स्वदेशी जहाजे, पाणबुड्या इत्यादींच्या निर्मितीद्वारे स्वावलंबन सुनिश्चित करण्यात भारतीय नौदल नेहमीच आघाडीवर असल्याचे कौतुक राजनाथ सिंह यांनी केले.

नौदलाच्या परंपरेनुसार, नेव्ही वाईव्हज वेलफेयर  असोशिएशन(पश्चिम क्षेत्र)च्या  अध्यक्षा श्रीमती चारू सिंग आणि माझगाव डॉक्स लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या पत्नी श्रीमती जयश्री प्रसाद यांनी शुभेच्छा देत  जहाजांचे अनुक्रमे ‘सुरत’ आणि ‘उदयगिरी’ असे नामकरण केले. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार आणि भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सुरत‘ आणि उदयगिरी‘, यांच्याविषयी

‘सुरत’ ही  प्रोजेक्ट 15B या  श्रेणीतील  चौथी विनाशिका आहे,  ज्याची निर्मिती P15A (कोलकाता श्रेणी )  विनाशिकेत महत्त्वपूर्ण बदल करून केली आहे. गुजरातची आर्थिक राजधानी आणि मुंबई पाठोपाठ पश्चिम भारतातले दुसऱ्या क्रमांकाचे व्यावसायिक केंद्र असलेल्या सुरत शहराच्या नावावरून या विनाशिकेचे  नाव ठेवण्यात आले आहे. सुरत शहराला  समृद्ध सागरी आणि जहाज बांधणीचा इतिहास आहे आणि 16व्या आणि 18व्या शतकात शहरात बांधलेली जहाजे त्यांच्या प्रदीर्घ सेवेसाठी  (100 वर्षांपेक्षा जास्त) ओळखली जात होती. सुरत ही  विनाशिका ब्लॉक बांधकाम पद्धती वापरून तयार केली  गेली  आहे, ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांवर नौकेच्या सांगाड्याचे बांधकाम झाले  आणि माझगाव डॉक लिमिटेड , मुंबई येथे ते एकत्र जोडले गेले आहे. या श्रेणीतील  पहिली विनाशिका 2021 मध्ये कार्यान्वित झाली . दुसऱ्या  आणि तिसऱ्या विनाशिकांचे  यापूर्वीच जलावतरण  झाले असून  त्या चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत.

आंध्र प्रदेशातल्या पर्वतरांगांवरून ‘उदयगिरी’ या फ्रिगेट  युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे.  ही प्रोजेक्ट 17A श्रेणीतील  तिसरी   फ्रिगेट युद्धनौका  असून  सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालीसह  P17 फ्रिगेट  (शिवालिक श्रेणी ) नुसार याची बांधणी केली आहे.’उदयगिरी’ हे  पूर्वीच्या लिअँडर क्लास एएसडब्ल्यू फ्रिगेट ‘उदयगिरी’चे नवे रूप  आहे, जे 18 फेब्रुवारी 1976 ते 24 ऑगस्ट 2007 या तीन दशकांत आपल्या गौरवशाली सेवेत  देशासाठी असंख्य आव्हानात्मक मोहिमांमध्ये  सहभागी होते.  प्रोजेक्ट 17A कार्यक्रमांतर्गत सात युद्धानौकांपैकी 4 माझगाव डॉक लिमिटेड( एमडीएल) इथे आणि 3 जीआरएसई  येथे निर्माणाधीन आहेत. प्रोजेक्ट 17A प्रकल्पातील पहिल्या दोन युद्धानौकांचे  2019 आणि 2020 मध्ये अनुक्रमे एमडीएल आणि जीआरएसई  येथे जलावतरण करण्यात आले  .

प्रोजेक्ट 15B आणि प्रोजेक्ट 17A या दोन्ही युद्धानौकांची रचना नौदल आरेखन  संचालनालयाने (DND) केली आहे, जे  देशातील सर्व युद्धनौकांच्या संरचनेचे काम पाहते. कारखान्यात उभारणीच्या टप्प्यात असताना उपकरणे आणि अन्य प्रणालीच्या सुमारे 75% ऑर्डर्स एमएसएमईसह स्वदेशी कंपन्यांना देण्यात आल्या. देशातील ‘आत्मनिर्भरतेचे ‘ हे ठळक उदाहरण आहे.

माझगाव डॉक लिमिटेडविषयी

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL),हा संरक्षण मंत्रालयाचा  सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.  सुरुवातीपासून नागरी आणि संरक्षण दोन्ही क्षेत्रात जवळपास 800 जहाजे बांधण्याचा आणि वितरित करण्याचा समृद्ध वारसा या उपक्रमाला आहे. सध्या भारतीय नौदलासाठी तीन मोठे प्रकल्प इथे राबवले जात आहेत  ज्यामध्ये विनाशिका, युद्ध्नौका आणि पाणबुड्या यांची  निर्मिती विविध टप्प्यांवर  आहे. कोविड19 महामारीच्या काळातल्या आव्हानांना सामोरे जात या काळातही माझगाव डॉक लिमिटेडने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

पुणे शहरातील नगरसेवकांचे सौजन्य व संकल्पनेचे बोर्ड मनपाने काढून टाकावेत : आपची मगणी

हे बेकायदेशीर बोर्ड काढून टाकण्याचा व झाकण्याचा खर्च नगरसेवकांकडून वसूल करावा अन्यथा निवडणूक खर्चात ग्राह्य धरावा : आपची मागणी

पुणे- महानगरपालिका क्षेत्रात अक्षरशः काही लाखभर बोर्डवर नगरसेवकांच्या नावाचे सौजन्य आणि संकल्पना यांचे बोर्ड लागले आहेत. जनतेच्या कराच्या पैशातून पुणे मनपा प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सुविधा, सेवा, बांधकामे, रस्ते, उड्डाणपूल, बगीचे, शौचालये, स्मशानभूमी, समाजमंदिर, मंडई, अग्निशमन केंद्र इत्यादी ठिकाणी याशिवाय खासगी आस्थापना, निवासी इमारतीबाहेर देखील नगरसेवकांच्या नावे सौजन्य / संकल्पना यांचे बोर्ड लागले आहेत. त्यावर कोट्यवधी रुपये उधळले आहेत. पैसे पुणेकरांचे, काम सार्वजनिक यंत्रणेकडून मग संकल्पना, सौजन्य यांचे बोर्ड नगरसेवकांच्या नावाचे का ? अगदी स्मशानभुमी व सार्वजनिक शौचालयावर सुद्धा संकल्पनेचे बोर्ड लागले आहेत.

अशा पद्धतीने नगरसेवकांच्या नावाचे बोर्ड लावणे हे बेकायदा कृत्य आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. तसेच सार्वजनिक मालकीवर केलेले अतिक्रमण व फुकटची जाहिरात आहे. आता पुणे मनपा निवडणुका आल्यावर आचारसंहिता काळात हे बोर्ड झाकण्यासाठी पुन्हा पालिकेला पुणेकरांचे कोट्यवधी रुपये खर्च करावे लागणार आहेत. ह्यांचे बोर्ड लावण्यासाठी आणि प्रत्येक मनपा, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हेच बोर्ड झाकण्यासाठी कोट्यवधी रुपये पुणेकरांचे का खर्च करायचे ? असा सवाल आम आदमी पक्ष विचारत आहे.

आप राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी मनपा आयुक्तांकडे मागणी केली आहे की, “सौजन्य व संकल्पना लिहिलेले नगरसेवकांचे बोर्ड बेकायदेशीर असल्यामुळे कायमस्वरूपी काढून टाकावेत आणि हे बोर्ड काढण्याचा खर्च या नगरसेवकांकडून वसूल करावा. दरम्यान मनपा निवडणूक आचारसंहिता काळात हे बोर्ड झाकण्याचा खर्च पुणे मनपाला करावा लागल्यास तो खर्च देखील सदर नगरसेवकांकडून वसूल करावा. जर ह्या वसुलीला नगरसेवक विरोध अथवा टाळाटाळ करत असतील तर सदर खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात ग्राह्य धरावा यासाठी पुणे मनपा आयुक्तांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करावा, अशी मागणी आम आदमी पक्ष करत आहे.”

टनेल लाँड्री निविदा प्रक्रियेची पुनर्तपासणी करून दोषींवर कारवाई करा – आमदार अमित साटम

0

मुंबई :मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने अत्याधुनिक टनेल लाँड्री उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयात घोटाळा झाल्याचा संशय भाजपा आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला होता. तरीही प्रशासनाकडून सारवासारव करत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी हे १६० कोटींचे कंत्राट रद्द करावे आणि संपूर्ण निविदा प्रक्रियेची निप:क्षपातीपणे तपासणी करत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आमदार अमित साटम यांनी लेखी पत्राद्वारे महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.

भाजपा आमदार अमित साटम यांनी महानगरपालिका आयुक्त-प्रशासक इक्बाल चहल यांना लिहिलेल्या पत्रात खळबळजनक आरोप केले आहेत. आमदार श्री. साटम यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, आम्ही, टनेल लॉन्ड्री कंत्राटात होत असलेला संशयास्पद तसेच अनेक नियम धाब्यावर बसवून उघड उघड चाललेला भ्रष्ट कारभार आपल्या निदर्शनास आणून दिला होता. परंतु ज्या पद्धतीने आपल्याकडून कोणताही थेट प्रतिसाद न मिळता प्रमुख अभियंताच्या मार्फत अत्यंत चालाख आणि सारवासारव करणारं उत्तर मिळाले. हे अतिशय धक्कादायक आहे. जिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेच्या कराचा पैसा लागलेला आहे तिथे पारदर्शकतेचा अभाव व नियमांची पायमल्ली होत असेल तर आपल्यावरही कुणाचा तरी राजकीय दबाव आहे का ? अशी शंका येतेय. सदर कंत्राट फक्त टनेल लाँड्री बनविण्यासाठी नसून टक्केवारीसाठी, आपले हात धुवून घेण्यासाठीच काढले आहे का ?

मला मिळालेले प्रमुख अभियंत्याचे उत्तर निव्वळ धूळफेक करणारे आहेच परंतु या पत्राचा सर्व खटाटोप कंत्राटदाराला वाचविण्यासाठीच होता. यामुळे महानगरपालिका प्रशासनाची टक्केवारीसाठी चाललेली केविलवाणी परिस्थिती तसेच अवस्था जनतेसमोर आली आहे असेही आमदार श्री. अमित साटम यांनी म्हटले आहे.

महापालिका आयुक्तांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत

१) बॅच वॉशिंग संकल्पनेबाबत यांत्रिकी व विद्युत विभागाने सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानावर काही सर्वेक्षण केले आहे का ? हे तंत्रज्ञान लागू करण्यासाठी संबंधित विभागाने लॉन्ड्री तज्ञांचा सल्ला घेतला आहे का ? बाजार सर्वेक्षण आणि तंत्रज्ञान निष्कर्ष काय आहेत? तसेच कृपया तज्ञ किंवा फर्म नियुक्त करण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली गेली याचा तपशील द्या.

२) आम्हांला प्राप्त झालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेचे एक माजी वरिष्ठ अधिकारी या निविदेमध्ये टनेल लॉन्ड्री संदर्भातील टेक्निकल एक्सपर्ट म्हणून कंत्राटद्वाराला साह्य करत आहेत. महानगरपालिकेमधील सेवेमध्ये असताना त्या अधिकाऱ्याला या निवेदेमधील सर्व बारकावे माहिती होते आणि त्या सर्व गोपनीय माहितीचा वापर आणि फायदा आता ते पूर्णपणे संबंधित कंत्राटदाराला करून देत आहेत.

३) निविदेत दिलेल्या तांत्रिक वैशिष्ट्यांना (Technical Specifications) अंतिम रूप देण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या टनेल लॉन्ड्री (Tunnel Laundry) उत्पादन कंपनीच्या तांत्रिक वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला ? कृपया यासंबंधी विभागाद्वारे केलेल्या उत्पादन / बोली लावणाऱ्या कंपन्यांना केलेले सर्व संप्रेषण (communication) द्यावे.

४) संबंधित निविदेचा अंतिम अंदाज (Financial Estimate) कसा काढला गेला? कृपया निविदेत नमूद केलेल्या कामासाठी निविदेचा अंतिम अंदाज तयार करण्यासाठी विचारात घेतलेल्या अंदाजपत्रकीय ऑफरचा तपशील द्या.