Home Blog Page 1987

पेट्रोल 2.08, तर डिझेल 1.44 रुपयांनी स्वस्त,पेट्रोल-डिझेलवरील राज्याच्या ‘व्हॅट’मध्ये कपात

0

: केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.

मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.

द्वेष वाढवून देश टिकणार नाही. : डॉ.कुमार सप्तर्षी

जमाते इस्लामी हिंद ,पुणे कडून ईद मिलन आणि  परिसंवादाचे आयोजन
पुणे :
जमाते इस्लामी हिंद ,पुणे या संघटनेकडून शनिवारी ईद मिलन कार्यक्रम आणि ‘धर्म, अधर्म आणि धार्मिकता ‘ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला.शनिवार, दिनांक २१ मे २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड येथे झाला. 
युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष  डॉ. कुमार सप्तर्षी, ख्रिश्चन धर्मगुरू रेव्हरंड चित्रलेखा जेम्स आणि जमाते इस्लामी हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तौफीक अस्लम खान हे या परिसंवादात सहभागी झाले.
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ धर्माच्या नावाखाली वाह्यात गोष्टी सांगीतल्या जातात, त्यामुळे धर्म लांब जातो. माणसाला जोडतो, तो धर्म, आणि माणसाला माणसापासून तोडतो, तो अधर्म होय. भारताच्या भूमीत बंधूभाव आहे. सर्व धर्मात सच्चाई आहे, त्यामुळे धर्मांतराची गरज नाही.
सर्व धर्मातील चांगल्या कल्पना आपण भारतीयांनी स्वीकारल्या पाहिजेत. भोंग्यावरुन वाद घालणे हा वाह्यातपणा आहे, जणू इतर सर्व प्रश्न संपले आहेत. हिंदू – मुस्लीम एकता होणे गरजेचे असून त्यासाठी त्यांना एकत्र आणणारे कार्यक्रम झाले पाहिजेत. द्वेष वाढवून देश टिकणार नाही.
तौफीक अस्लम खान म्हणाले, ‘ जोपर्यंत शिक्षण होत नाही, तोपर्यंत प्रगती, जागृती होणार नाही. सर्व धर्मांची माहिती होण्यासाठी भेटीगाठी होत राहिल्या पाहिजेत.देशात द्वेष भरला जात आहे. देशच नव्हे तर जग आपले मानले पाहिजे. भारतातील विविधता हीच मोठी शक्ती आहे.
चित्रलेखा जेम्स म्हणाल्या, ‘ शाश्वत जीवन जगायचे असेल इतरांचा कळवळा आला पाहिजे.ज्याला इतरांचा कळवळा येणार नाही, त्याला धर्म कळणार नाही. देवावर आपण जेवढे प्रेम करतो, तेवढे शेजाऱ्यांवर केले पाहिजे.येशू ख्रिस्ताने संवेदनशीलता, प्रेम शिकवले.वाचनातून परिवर्तन होते, त्यामुळे वाचन करीत राहिले पाहिजे. भारतातील आजच्या परिस्थितीत धार्मिकतेचा अर्थ परिपूर्ण न्याय हा असला पाहिजे.
डॉ. भागवत गुरुजी यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. परिसंवाद झाल्यानंतर शिरखुर्म्याचा आस्वाद घेवून कार्यक्रमाचा समारोप झाला. करीमुद्दीन शेख यांनी आभार मानले

उद्धवजी तुम्ही आता तरी इंधनावरील कर कमी करा

0

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर कमी करून देशातील जनतेला मोठा दिलासा दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे आपण पंतप्रधान मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महागाईवर भाषण देण्यापेक्षा मोदी सरकारप्रमाणे पेट्रोल डिझेलवरील कर महाराष्ट्रात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही आपण करतो, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी सांगितले.

ते म्हणाले की, मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतील देशातील नऊ कोटी गॅस ग्राहक महिलांना बारा सिलिंडरपर्यंत प्रति सिलिंडर दोनशे रुपये सबसिडी जाहीर केली आहे. तसेच सिमेंट आणि स्टीलच्या आयातीवरील कर कमी केला आहे तर निर्यातीवरील कर वाढविला आहे. परिणामी सिमेंट व स्टीलचे दर कमी होतील. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्यासोबतच मोदी सरकारच्या या निर्णयांमुळे देशातील महागाई कमी होण्यास मदत मिळेल.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मोदी सरकारने नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलवरील कर पाच रुपये तर डिझेलवरील कर दहा रुपये कमी केला होता. त्यामुळे देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर देशभरातील २२ राज्यांनी त्या त्या राज्यात इंधनावरील कर कमी केल्यामुळे तेथील जनतेला आणखी दिलासा मिळाला. परंतु, महाराष्ट्रात मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्यास नकार दिला. परिणामी महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांमध्ये लोकांना पेट्रोल डिझेल स्वस्त मिळते पण महाराष्ट्रात मात्र दिलासा नाही. मोदी सरकारने आता दुसऱ्यांदा इंधनावरील कर कमी केल्यानंतर तरी महाविकास आघाडी सरकारने जनतेला दिलासा दिलासा पाहिजे व हे कर कमी केले पाहिजेत. महागाईवर भाषणे करण्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून महागाई कमी करण्यास हातभार लावला पाहिजे.

राज्यसभा उमेदवारीसाठी शिवसेना जे नाव सांगेल त्यांनाच आमचा पाठींबा; मग संभाजी राजे असो की कुणीही- पवार

पुणे -”राज्यसभा उमेदवारीसाठी शिवसेना जे नाव सांगेल त्यांनाच आमचा पाठींबा आहे. आता आामच्याकडे जागा शिल्लक नाही. संभाजीराजे असो की आणखी कुणीही असो शिवसेनेलाच आम्ही मत देणार आहोत असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.”पुण्यात शरद पवारांनी ब्राह्मण समाजासोबत आज 5 वाजता बैठक घेतली. या बैठकीला वीसपेक्षा अधिक संघटनांची उपस्थिती होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवरुन आपली भूमिका स्पष्ट केली.कुठल्याही जाती-धर्माविरुद्ध बोलु नये यासाठी मी पक्षातील लोकांना समज देणार आहे, अमोल मिटकरींनाही समज दिली.”असे पवार म्हणाले .

पवार म्हणाले, ”साधारणतः वेगवेगळ्या जिल्ह्यातून आजच्या बैठकीला चाळीस लोक आले होते. त्यांच्यात अस्वस्थता होती. माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांनी विधान केली. त्यानंतर आमची पक्षात चर्चा झाली पुन्हा अशा पद्धतीने कुठल्याही जाती-धर्मावर टीका होणार नाही. जात-धर्मावर कुणी स्टेटमेंट करु नये असे आम्ही सांगितले.

ब्राह्मणांची आरक्षणाची मागणी

दुसरी मागणी अशी होती की, ”समाजातील ग्रामीण भागातील वर्ग नागरी भागात जास्त येत आहे. त्यांना संधी हवीअशीही त्यांची मागणी होती असे पवार म्हणाले. कुणालाही आरक्षण नको अशी त्यांची भूमिका होती. पण मी म्हटलो की ते रद्द करता येणार नाही आरक्षण द्यावेच लागेल.”

महामंडळ स्थापन करा

तिसरा मुद्दा असा होता की, ”विविध समाजाला व्यवसायात मदत करण्यासाठी महामंडळे आहेत. प्रभू परशुरामाच्या नावाने महामंडळ स्थापन करावे अशी त्यांची मागणी होती. मी म्हणालो की, माझ्या हातात हा विषय नाही पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे विनंती करुन बैठकीची तारीख निश्चित करुया. समाजाचे चार ते पाच प्रतिनिधींसोबत बैठक घेऊ ब्राह्मण समाजाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री ऐकुन घेतील असेही मी त्यांना सांगितल्याचे पवार म्हणाले. पक्षातून टीका होत असेल आणि त्यातून समज-गैरसमज होत असतील तर जाणकारांनी ते दुर करावे असेही मी त्यांना सुचना केली.”

औरंगजेबाच्या कबरीवर ओवैसी गेले की, कुणी यावर मी काय मत व्यक्त करु. या देशात महागाई, कायदा-सुव्य़वस्था आणि ईतर प्रश्नाला दुर्लक्षित करण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी ज्ञानवापीचा मुद्दा उकरुन काढला असेही ते म्हणाले.

नवाब मलिकांवर जे आरोप होत आहेत ते निराधार आहेत त्यांना मी स्वतः अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांचा डी. गॅंगशी संबंध आहे यावर माझा यत्किंचितही विश्वास नाही असेही ते म्हणाले.

आमदार अमोल मिटकरींना समज देणार, शरद पवारांचे ब्राह्मण संघटनांना आश्वासन

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार अमोल मिटकरींना पक्षातंर्गत समज देणार असल्याची माहिती गोविंद कुलकर्णी यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांची बैठक संपली आहे. यानंतर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे गोविंद कुलकर्णी यांनी पवारांशी चर्चा झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी पवारांनी ब्राह्मण संघटनाना हे आश्वासन दिले आहे .

शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांची आज बैठक पार पडली. यावेळी त्यांच्यासमोर समाजाचे अनेक प्रश्न घेत चर्चा करण्यात आली, यावेळी ब्राह्मण समाजासाठी अर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. देशातील 5 राज्यात असे महामंडळ आहे. महाराष्ट्रात देखील महामंडळ स्थापन करावे अशी मागणी संघटनानी केली आहे. या संदर्भातील एक निवेदन त्यांनी स्वीकारले आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या कक्षेतील विषय असल्याने लवकरच महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू असे शरद पवारांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पुरोहितांवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ब्राह्मण महासंघाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट नाकारली आहे. शरद पवार यांची आज पुण्यात बैठक झाली यात महासंघाने सहभाग घेतला नाही.

ब्राह्मण महासंघ, परशुराम सेवा संघ यांनी त्यांची भेट नाकारली आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे पवारांनी भुजबळ आणि मिटकरींच्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी बाह्मण संघटनानी केली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी लग्नावेळीच्या मंत्रोच्चार आणि इतर विधीवरून मिटकरी यांनी वादग्रस्त विधान केले होते. तर छगन भुजबळांनी देखील ज्योतिष आणि पौरोहित्यावर बोलताना अयोग्य शब्द वापरल्याचा महासंघाचा आरोप आहे.

पेट्रोल साडेनऊ रुपयांनी आणि डिझेल ७ रुपयांनी स्वस्त; केंद्राने कमी केला अबकारी कर-नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू

0

नवीदिल्ली – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महागाईने होरपळणाऱ्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. केंद्राने शनिवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कांत मोठी कपात केली. यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 9.50 रुपये, तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या करकपातीची माहिती दिली. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यांना महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात करण्याचा सल्ला दिला होता. अर्थमंत्री म्हणाल्या -‘सरकारने उज्ज्वला योजनेतील गॅस सिलिंडरवर यंदा 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत एका कुटुंबाला वर्षाकाठी 12 सिलिंडर मिळतील. त्याचा फायदा देशातील 9 कोटी कुटुंबांना मिळेल.’

रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांचे पुनर्वसन आणि स्कीझोफ्रेनियावर चर्चासत्र संपन्न

पुणे- येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसएबिलिटीज च्यावतीने कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन व मनोसामाजीक समाजकार्य विभागाने जागतिक स्किझोफ्रेनिया दिन व सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा केला.

नुकतेच सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसएबिलिटीज चे अध्यक्ष सहा प्रा चेतन दिवाण व स्नेहालय संस्थेचे मनोसामाजीक कार्यकर्ते रमाकांत दोडी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर परिसरातील विविध रस्त्यांवर फिरणाऱ्या अनेक मनोरुग्णांना उचलून त्यांच्या मानसिक आजारावर उपचार करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेमध्ये पुढील उपचार व पुनर्वसनासाठी पाठविण्यात आले.

तसेच महाविद्यालयामध्ये आज स्किझोफ्रेनिया आजाराची लक्षणे, उपचारपद्धती व पुनर्वसन या विषयावर सहा प्रा चेतन दिवाण व सोहम माईंड पॉवर संस्थेचे डॉ सचिन पोतदार यां तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते

या चर्चासत्रात संस्थेच्या व्यावसायिक समाजकार्य अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी तसेच समुपदेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून चर्चासत्रात सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या प्रभारी संचालिका डॉ. शर्मिला रामटेके या होत्या तर प्रा प्रियांका कुमारी यांची प्रमुख उपस्थिती होती 

संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकर पाठक, सचिव एम.शिवकुमार, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विनायक कराळे, श्री प्रसाद कोल्हटकर, डॉ. महेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्किझोफ्रेनिया सप्ताह साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहल पवार, मृण्मयी अस्वर,ओमकार तोरणे, माणिक शिरसाट, अलीशीबा वाकडे, अजिंक्य बोराटे यां विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी अस्वर यांनी केले व आभार अमित इंगळे यांनी मानले

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या बैठकीत सर्वांचेच कायदा सुव्यवस्थेबाबत एकमत

0

पुणे-शहरातील कायदा सुव्यवस्थेला बाधा न आणता शांततेत आंदोलन करा. राजकीय नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करू नका तसेच नेत्यांच्या वाहनांचा ताफाही अडवू नका. आंदाेलन ठरवून दिलेल्या ठिकाणी करा. आंदोलन करताना कायदा सुव्यवस्थेला बाधा आणू नका, अशा सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बैठकीत शनिवारी दिल्या.

गेल्या काही महिन्यांपासून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप तसेच आंदोलनांमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शनिवारी सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार माधुरी मिसाळ, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आदी यावेळी उपस्थित होते.समाजमाध्यमावर एखाद्या पक्षाच्या नेत्याविषयी टीका टिपण्णी करताना भान राखायला हवे. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल, असे कृत्य करता कामा नये. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात येईल, असे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले. सर्व पक्षांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, आंदोलन करताना पुण्यातील राजकीय संस्कृतीला गालबोट लागणार नाही, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांना देण्यात आली, असे राष्ट्रवादी काँँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले जाईल, असे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.

लाल महालात लावणी घडवून आणणारा ‘तो’ भाजपचा पुढारी कोण? राष्ट्रवादीच्या मागणीने कुतूहल वाढले अन त्याच्यासह महापालिका अधिकाऱ्यावर कारवाई ची मागी

पुणे- भाजपाच्या एका पुढाऱ्याच्या सांगण्यावरून पुण्याच्या लाल महालात लावणीचे चित्रीकरण झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केल्याने आता याबाबत कोण तो पुढारी ? असा सवाल उपस्थित करत त्याच्यासह संबधित महापालिका अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

यासंदर्भात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले कि,’ ज्या पवित्र वास्तुमध्ये जिजाऊ माँ साहेबांनी बालशिवबांना संस्काराचे धडे दिले,ज्या लालमहालात मिळालेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या लाल महालात अशलाघ्य लावणीचे चित्रीकरण करणाऱ्या कुलदीप बापट, वैष्णवी पाटील,केदार अवसरे यांच्यासह त्यांना परवानगी देणाऱ्यामहापालिका अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहीजे,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लाल महाल चौक येथे आंदोलन घेण्यात आले.या आंदोलनप्रसंगी ,जेष्ठ लावणी कलाकार सुरेखा पुणेकर, प्रवक्ते प्रदीप देशमुख , विपुल म्हैसुरकर ,यश कुलकर्णी , निता कुलकर्णी, मंदार खरे , केदार कुलकर्णी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

” लाल महाल ही ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे लालमहाल हा संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूतील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या शिल्पाचे पावित्र्य लक्षात घेता, लालमहाल हि वास्तू सिनेमातील नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नाही. याच संबधितानी भान ठेवायला हवं होत. मात्र या वास्तूत एका सिनेमाचे चित्रीकरण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे चित्रीकरण करण्यास ज्या अधिकाऱ्यानी परवानगी दिली. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी.खरं तर लालमहाल हि वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाही. मात्र या ठिकाणी कोणतही ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्रीकरण करण्यास आमचा आक्षेप नाही. पण या वास्तूचा इतिहास लक्षात घेवून चित्रीकरण करणे गरजेचं आहे. केवळ व्यावसायीक हेतूने कोणी या वास्तूचा वापर करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर पोलिसानी कडक कारवाई करावी.या चित्रीकरणासाठी भारतीय जनता पार्टीच्या एका लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून हे चित्रीकरण झाल्याचे समजते,स्वतः त्या लोकप्रतिनिधींनी आपल्या स्वीय सहायकांना पाठवून चित्रीकरणासाठी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांवर दबाव आणल्याचे समजते आहे. त्यामुळे संबंधितांवर देखील कठोर कार्यवाही व्हावी”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप यांच्य वतीने करण्यात आली आहे..

संविधान मजबूत असल्यामुळेच राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे-प्रा. उल्हास बापट

पुणे-देशाचे संविधानामुळे देशाची एकता आणि अखंडता मजबूत आहे. भारत राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे आणि हे टिकून ठेवण्यासाठी आपण सर्वजण कटिबध्द राहिले पाहिजे.’’ असे मत ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी येथे व्यक्त केले .

भारताचे माजी पंतधान, भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिधी निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रा. उल्हास बापट यांचे ‘‘राष्ट्रीय एकात्मता व सविंधान’’ या विषयावर काँग्रेस भवन येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शहराध्यक्ष रमेश बागवे व ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, अनिल सोंडकर, रमेश अय्यर, पुजा आनंद, रजनी त्रिभुवन, वाल्मिक जगताप, भगवान धुमाळ, ॲन्थोनी जेकब, प्रविण करपे, सुरेश कांबळे, ज्योती परदेशी, ॲड. अनुप बेगी, चेतन आगरवाल, भगवान धुमाळ, नितीन परतानी, देवीदास लोणकर, रेखा गहलोत आदी उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतान प्रा. उल्हास बापट म्हणाले की, आपल्या देशाच्या लोकशाहीला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय संविधान १९५० साली अमंलात आले. भारतात संसदिय लोकशाही आहे. केंद्रिय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या शिफारसीने राष्ट्रपती करतात तसेच राज्यपालांची नियुक्ती सुध्दा पंतप्रधानांच्या शिफारसीने राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींची शिफारस सरकार करते आणि त्या अनुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने घटना तयार करताना देशातील सर्व जाती जमाती व देशाचा विचार केला. कालानुसार घटनेमध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. भारतीय संविधान मजबूत असल्यामुळे गेली ७५ वर्षे भारतात लोकशाही टिकून आहे. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे १७ वर्षे भारताचे पंतप्रधान होते. देशाच्या हिताकरीता निर्णय घेताना विरोधी पक्षांना विश्वासात घेत असे पण आजचे राजकर्ते नागपूर विद्यापीठाच्या संमती किंवा आदेशाशिवाय नेमणुक करीत नाही. जगात काही देश वगळता इतर देशात जेथे लोकशाही होती तेथे काही काळानंतर हुकूमशाही आली. परंतु भारतातील राज्यकर्ते आणि जनतेचा लोकशाहीवर असलेल्या विश्वासामुळे देशात लोकशाही टिकून आहे.
इंदिरा गांधींच्या दुर्दैवी निधनानतंर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्या दूरदृष्टीकोनामुळे देशात संगणकाची क्रांती झाली. दळणवळण क्षेत्रात सुध्दा त्यांच्या कारकिर्दीमध्ये देशाची प्रगती झाली. निवडून आलेले लोकप्रतीनिधी पक्षाचा आदेश धुडकावून पैसे घेवून विरोधी मतदान करण्याचा प्रकार वाढत होता आणि काही लोकप्रतिनीधी एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यावर लोकांचा विश्वासघात करून आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात प्रेवश करीत होते. याच्यावर आळा घालण्यासाठी राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा आणला.

तृतीयपंथीयांच्या विकास योजनांसाठी समाज कल्याण विभागाचा पुढाकार जिल्ह्यात २३ मे रोजी विशेष शिबिराचे आयोजन


पुणे दि.२१- तृतीयपंथीय व्यक्तींना समाज कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांची पोर्टलवर नोंदणी करणे आणि त्यांना ओळखपत्र व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या निर्देशानुसार समाज कल्याण विभागातर्फे २३ मे रोजी हडपसर गाडीतळ पुणे येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयातर्फे तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी https//: https://transgender.dosje.gov.in हे स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. सदर पोर्टलवर तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने आणि त्यामुळे तृतीयपंथींयाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी निश्चित आकडेवारी मिळत नसल्याने राज्याच्या समाज कल्याण विभागाने नोंदणीसाठी पुढकार घेतला आहे.

तृतीयपंथी यांचे हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत त्यांच्या विकासासाठी, तसेच त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, उपाययोजनांची माहिती व्हावी व जनजागृती करणे इत्यादींसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत तसेच प्रशासनाच्यावतीने तृतीयपंथीयांसाठी सांस्कृतिक संम्मेलन, कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

समाज कल्याण आयुक्तालय पुणे येथे तृतीयपंथी समूहाचे सामाजिक सहभाग, स्वावलंबन, आरोग्य, स्वयंरोजगार नोंदणीबाबत नुकतेच संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणेरी प्राईंड संस्था, मैत्र क्लिनिक, गायत्री परिवाराचे प्रतिनिधी यांनी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थान, आयुष विभाग, आरोग्य मंत्रालय भारत सरकार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे, इस्कॉन शोध आरंभ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, पुणे वं श्री संत जगद्गुरू संत तुकाराम फाउंडेशन फॉर फिलांथ्रोपी या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये तृतीयपंथीयांची नोंदणी करण्यास प्राधान्य देऊन नोंदणीसाठी विशेष उपक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्तांनी शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे येथे आयोजित शिबिराचा अधिकाधिक तृतीयपंथीयांनी लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी ९८२२१९१५१० किंवा ९६६५५५७९३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

पुणे, दि. २१ : राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समर्पित आयोगासमोर मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक-प्रतिनिधींनी उपस्थित राहून यासंदर्भातील भूमिका मांडली आणि लेखी निवेदनही सादर केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ११ मार्च २०२२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे “महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोग” गठीत केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या आयोगाच्या कार्यकक्षेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी अभिवेदन, सूचना मागविण्यात आल्या आहेत. आयोगाच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निवेदन सादर करण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात व्यक्ती आणि प्रतिनिधींनी नोंदणी केली.

पाचही जिल्ह्यातून निवेदने

पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील ओबीसी संघटनांचे प्रतिनिधींसोबत अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधींनीही निवेदने देत आपली भूमिका मांडली. आयोगाने निवेदने देण्यासाठी सकाळी ९.३० ते ११.३० अशी वेळ ठेवली असताना नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता दुपारी १.३० वाजेपर्यंत निवेदने स्विकारण्यात आली.

राजकीय पक्षांसह विविध ८१ संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनीदेखील आपली मते नोंदवली. यामध्ये अखिल भारतीय कुंभार समाज संस्था,कुणबी समाज संघ पुणे,ओबीसी वेलफेअर फाऊंडेशन, पुणे जिल्हा बारा बलुतेदार महासंघ,राष्ट्रीय छावा संघटना, अखिल भारतीय माळी समाज संघ, समता बेलदार समाज संस्था,कोष्टी समाज सेवा मंडळ,मुंबई, अखिल भारतीय बारी समाज महासंघ, अखिल भारतीय ओतारी समाज सेवामंडळ, मुस्लिम छप्परबंद भटकी विमुक्त विकास संस्था, राष्ट्रीय गुरव समाज महासंघ, प्रांतिक तैलिक महासभा पश्चिम महाराष्ट्र, राष्ट्रीय विणकर सेवासंघ, अखिल महाराष्ट्र सुतार लोहार महासंघ, कोलाटी डोंबारी समाज संघटना, ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशन पुणे, ओबीसी संघर्ष समिती, कुंभार समाज उन्नती मंडळ, अखिल भारती महात्मा फुले समता परिषद पुणे, न्यू सलून पार्लर असो., मराठा सेवक समिती, नाभीक विकास परिषद, शिंपी समाज मंडळ, सकल मराठा समाज सोलापूर, मराठा सेवा संघ सांगली, यासह विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली.

समर्पित आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया, सदस्य महेश झगडे, डॉ.नरेश गिते, ह.बा.पटेल, सदस्य सचिव पंकज कुमार, डॉ.शैलेशकुमार दारोकार, प्रा.जेम्स यांच्या उपस्थितीत निवेदने स्विकारण्यात आली. या सर्व निवेदनांची नोंद आयोग घेत असल्याची माहिती समर्पित आयोगाच्या सदस्य सचिवांनी दिली आहे.

समर्पित आयोगाने यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुणे विभागातील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदा, किंवा महानगरपालिकेत या संदर्भातील निवेदने प्राप्त झाल्यास ती आयोगाकडे पाठवावीत, अशा सूचना आयोगाने दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, माजी सनदी अधिकारी मोहन ठोंबरे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, तसेच आयोगाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.


समर्पित आयोगाला निवेदन देण्यासाठी पुणे विभागाच्या विविध भागातून आलेले प्रतिनिधींनी सकाळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्याच्या प्रतिनिधींना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. आलेल्या प्रत्येक प्रतिनिधींना आपले म्हणणे मांडण्याची आणि निवेदन देण्याची संधी देण्यात आली. आयोगाने पुणे विभागाने केलेल्या व्यवस्थेविषयी समाधान व्यक्त केले.

मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचविण्यात यशस्वी होऊ – कान चित्रपट महोत्सवात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचा विश्वास

0

मुंबई, दि. २१ – मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट दिग्दर्शक, चांगले तंत्रज्ञ आणि कसदार अभिनेते आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दर्जेदार मराठी चित्रपटांना कान चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याची संधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटाला जागतिक स्तरावर नेण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्‍वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी कान चित्रपट महोत्सवात व्यक्त केला.

कान फिल्म फेस्टिव्हलमधील इंडिया पॅव्हिलियनमध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक चित्रपट उद्योगात मराठी चित्रपटांचे स्थान’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ समीक्षक  आणि अभ्यासक अशोक राणे, चित्रपट दिग्दर्शक मनोज कदम तसेच फिल्म मार्केटसाठी निवड करण्यात आलेल्या  ‘ कारखानीसांची वारी ‘, ‘ तिचं शहर होणं ‘ आणि ‘ पोटरा ‘ या  मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक अनुक्रमे अर्चना बोरहाडे, मंगेश जोशी, सिध्दार्थ मिश्रा, रसिका जोशी, समीर थोरात आणि शंकर धोत्रे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले, मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच विविध देशांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून मानाचे स्थान मिळाले पाहिजे. विशेषतः  विविध देशांमध्ये संयुक्त चित्रपट निर्मितीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत हा महाराष्ट्र शासनाचा विविध योजना राबविण्यामागील व्यापक दृष्टिकोन आहे.

याच कार्यक्रमात कान चित्रपट महोत्सवासाठी निवड करण्यात आलेल्या मराठी चित्रपटांच्या माहितीपत्रकांचे तसेच  बॉलिवूड म्युझियम या चित्रनगरीत सुरू करण्यात येणाऱ्या नव्या उपक्रमाच्या फोल्डरचे अनावरण सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, फिल्मसिटीचे महाव्यवस्थापकीय संचालक विवेक भिमानवार यांनी यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण आणि फिल्म सिटीची सविस्तर माहिती दिली.  ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.

यानंतर मंत्री श्री. देशमुख यांनी कान फिल्म मार्केटला भेट दिली आणि ए.आर. रेहमान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ सिनेमा ऑफ फ्युचर ‘ या चित्रपटाच्या नव्या तंत्राच्या आविष्काराबाबत माहिती घेतली. मार्केटमधील कन्फडरेशन ऑफ इंडस्ट्रीजच्या बूथलाही त्यांनी भेट दिली.

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

0

मुंबई, दि.21 : भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एकतिसाव्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.

राज्यपालांचे प्रधान सचिव  संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी व अधिकारी, तसेच राजभवन येथील पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली.

सुरुवातीला दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली. अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 16 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अनुष घनबहादूर, रुद्रसेन शिंदे, स्वर्णिम येवलेकर, अर्जुन परदेशी यांची आगेकूच  


पुणे,  21 मे 2022: फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16वर्षांखालील  टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात अनुष घनबहादूर, रुद्रसेन शिंदे, स्वर्णिम येवलेकर, अर्जुन परदेशी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली. 
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अनुष घनबहादूर व रुद्रसेन शिंदे यांनी अनुक्रमे अथर्व जोशी  व सिद्धांत थोरवे यांचा 9-3 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. स्वर्णिम येवलेकरने अर्णव चावलाचा 9-5 असा तर, अर्जुन परदेशी याने अरमान मुलचंदानीचा 9-1 असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले: अनुष घनबहादूर वि.वि.अथर्व जोशी 9-3;मिहीर कांतावाला वि.वि.जहान सिद्दीकी 9-5;आर्य कुचीभाटिया वि.वि.रौनक ललवानी 9-4;अर्जुन परदेशी वि.वि.अरमान मुलचंदानी 9-1;आदित्य भटवेरा वि.वि.राघव सरोदे 9-6;आरुष जोशी वि.वि.रोनित नागोरी 9-4;अनन्मय उपाध्याय वि.वि.प्रत्युश बगाडे 9-2;शान वरळीकर वि.वि.रोहन बजाज 9-3;रुद्रसेन शिंदे वि.वि.सिद्धांत थोरवे 9-3;स्वर्णिम येवलेकर वि.वि. अर्णव चावला 9-5.