Home Blog Page 1978

बांग्लादेशच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ यंदा मिफ्फ2022 मध्ये बांग्लादेश असणार ‘कंट्री ऑफ फोकस’

भारत सध्या आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्याचवेळी आपले शेजारी राष्ट्र, देखील त्याच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. मुंबईत उद्यापासून सुरु होणाऱ्या 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ मध्ये याच दोन्ही उत्सवांचे औचित्य साधत, यंदा, बांग्लादेशची ‘‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

बांग्लादेशच्या निर्मितीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, 11 बांग्लादेशी चित्रपटांचे विशेष पॅकेज, ‘कंट्री ऑफ फोकस’ अंतर्गत, मिफ्फ मध्ये दाखवले जाणार आहे. यात, समीक्षकांनी नावाजलेला चित्रपट, “ हसीना- ए डॉटर्स टेल’( पिपलू खान दिग्दर्शित) चा देखील समावेश आहे. हा चित्रपट बांगलादेशच्या पंतप्रधान आणि जेष्ठ राजकीय नेत्या, शेख हसीना, यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे.

त्याशिवाय, कंट्री ऑफ फोकस पॅकेजमधील इतर चित्रपट,बांगला मुक्ती संग्रामाच्या आठवणी ताज्या करणारे आहेत. बांगला भूमी स्वतंत्र करण्यासाठी, तिथल्या लोकांनी दिलेले बलिदान आणि 71 च्या युद्धाच्या आठवणी सांगणारे “ नॉट ए पेनी, नॉट ए गन”, ‘जोलो गुरीला ‘ यांसारखे चित्रपट बांगलादेश पाकिस्तानपासून मुक्त करणाऱ्या 71 च्या युद्धाची कथा सांगत, बांगलादेशच्या नागरिकांना प्रेरणा देणारे ठरले आहेत. स्वातंत्र्यासाठी बांगलादेशच्या नागरिकांनी काय काय छळ आणि हालअपेष्टा सोसल्या, त्या वेदनांना ह्या चित्रपटांनी वाचा फोडली आहे. दिलारा बेगम जॉली यांनी दिग्दर्शित केलेल्या, “जोथोरलिना’ ह्या चित्रपटात, बांग्लादेशी लेखिका, रोमा चौधरी यांनी, युद्धकाळात घालवलेल्या अत्यंत वेदनादायी आणि संघर्षमय आयुष्याची कथा सांगितली आहे. ‘कान पेटे रोई’ या माफिदुल हक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात, 1971 च्या युद्धकाळात झालेल्या अत्याचारांविरोधात खंबीरपणे उभ्या राहिलेल्या, एका गणिताच्या प्राध्यापकाची संघर्षमय कथा साकारली आहे.

सामाजिक विषयांशी संबंधित चित्रपट, ज्यात, मध्यपूर्वेतून मायदेशी परतेल्या घरगुती कामगारांच्या व्यथा-वेदना, बांग्लादेशमधील महिलांना भेडसावणाऱ्या समस्या, अशा विषयांवरील चित्रपटही आहेत. भारतीय चित्रपट संघटनांच्या महासंघाचे उपाध्यक्ष, आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट संघटनांच्या महासंघाचे सचिव (आशिया-पॅसिफिक) प्रेमेंद्र मजुमदार यांनी या विभागासाठीच्या चित्रपटांची निवड केली आहे.

‘‘कंट्री ऑफ फोकस’ मधील चित्रपटांकडे नजर टाकूया:

निशब्दोतर शोहोर (शांतता )

दिग्दर्शक : अमिताभ रझा चौधुरी

प्रकार : लघुपट

कालावधी : 12 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : 31 मे, 2022(6 pm to 8 pm)

रिपल्स

दिग्दर्शक : सुबरणा सेनजुती तुशी

प्रकार : लघुपट

कालावधी : 45 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : 03, जून , 2022 (6 pm to 8 pm)

नॉट ए पेनीनॉट ए गन

दिग्दर्शक : मकबुल चौधुरी

प्रकार : माहितीपट

कालावधी : 40 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ: जून 02,2022 (6pm to 8 pm)

जोथोरलिना

दिग्दर्शक : दिलरा बेगम जॉली

प्रकार : चरित्र पट

कालावधी : 40 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ: 01 जून, 2022 (3.45 pm to 5.45 pm)

हसीना- ए डॉटर्स टेल

दिग्दर्शक : दिलरा बेगम जॉली

प्रकार : चरित्र पट

दिग्दर्शक: पिपलू खान

प्रकार: माहितीपट

कालावधी : 70 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : जून 02,2022 (6pm to 8 pm)

बगानिया (स्मृति बाग )

दिग्दर्शक: हुमाइरा बिलकीस

प्रकार: माहितीपट

कालावधी : 55 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : 30 मे, 2022 ( 6 pm to 8 pm )

दोजाहान (त्यांच्या कथात्यांची सत्ये)

दिग्दर्शक: रतन पॉल

प्रकार: माहिती कथापट

कालावधी : 73.10 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : 31 मे ,2022 (6 pm to 8 pm)

जोन्मशथी (एकत्र जन्म )

दिग्दर्शक: शबनम फिरदौसी

प्रकार: माहितीपट

कालावधी : 72 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : 01 जून 2022 (3.45 pm to 5.45 pm)

आराइमोन शोप्नो

दिग्दर्शक: अबू रशीद एमोन

प्रकार: लघुपट 

कालावधी : ३५ मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ 30 मे , 2022 (6 pm to 8 pm)

कान पीते रोई

दिग्दर्शक: मोइदुल हक़

प्रकार: माहितीपट

कालावधी : 35 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : 03, जून 2022 (6 pm to 8 pm)

जोलो गुरिला

दिग्दर्शक: सुमन देलोवर

प्रकार: लघुपट

कालावधी : 48 मिनिटे

भाषा : बांगला

प्रदर्शनाची तारीख आणि वेळ : 03, जून , 2022 (6 pm to 8 pm)

अमृत सरोवरामुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागामध्ये जलसमृद्धी निर्माण होऊन येथील शेतकरी कृषीसमृद्ध आणि अर्थसंपन्न होईल-केंद्रीय मंत्री नितिन गडकरी

0

अकोला/नागपूर – 28 मे 2022

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधल्या जाणाऱ्या अमृत सरोवरा मुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागामध्ये जलसमृद्धी निर्माण होऊन येथील शेतकरी कृषीसमृद्ध आणि अर्थसंपन्न होईल असे प्रतिपादन   केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज अकोला येथे  केले . डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ –पीकेव्ही तसेच महाराष्ट्र पशू विज्ञान आणि मत्स्य विद्यापीठ-माफ्सू  परिसरात २० अमृत सरोवरांचे   लोकार्पण हे  गडकरी यांच्या हस्ते कृषी विद्यापीठाच्या परिसरातील   के .आर . ठाकरे सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, माफ़्सूचे कुलगुरू डॉ . आशिष पातुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे  अकोला जिल्ह्यातील कृषी विद्यापीठ   परिसरामध्ये 34 तलावांचे निर्माण होणार असून यातील 20 अमृत सरोवरांचे लोकार्पण आज होत आहे.  या शेततळ्यातील खोलीकरणातून आलेली माती तसेच  गाळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्ते बांधकामासाठी  वापरण्यात येणार असून या माध्यमातून तयार होणाऱ्या शेततळ्याला भर उन्हाळ्यात पाणी आहे . या उपक्रमामुळे आज या प्रक्षेत्राच्या  दहा ते बारा गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून तेथील शेतकती आता   लिंबाची शेती देखील  करत आहे . या योजनांमुळे मोठमोठे तलाव-धरणे बांधण्याची गरज राहणार नाही. विदर्भ खऱ्या अर्थान सुजलाम् सुफलाम् होईल असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं.

रस्तेबांधणीसाठी शेततळी खोलीकरणातून निघालेला गाळ आणि माती रस्त्याच्या बांधकामात वापरून शेतकऱ्यांना कुठलाही खर्च न उचलता शेततळी बांधण्याचा उपक्रम 2017 पासून महाराष्ट्र शासनाच्या एका आदेशान्वये सुरू करण्यात आला होता .त्याला बुलढाणा जिल्ह्यात भरघोस प्रतिसाद मिळाला असून त्या ‘बुलढाणा पॅटर्नमुळे’ बुलडाणा जिल्ह्यात 132 तलावाचे खोलीकरण झाल असून 22 हजार विहिरी पुनर्जीवित झाल्या तर 152 गावांना पाणी उपलब्ध झाले अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली . आज अकोल्यातील जलसंवर्धनाच्या कामाची पाहणी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांनी आज राज्याचे कृषी मंत्री दादा भूसे , विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास  भाले  यांच्यासोबत केली.  कृषि विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या तलावाचे जलपूजनही  याप्रसंगी करण्यात आले. केंद्र शासनाच्या ‘अमृत सरोवर ‘ या धर्तीवर या तलावाची निर्मिती करण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून जलसोत्राचे संवर्धन करून सुमारे 75 हजार तलाव –अमृत सरोवर देशात निर्माण करण्याचे ध्येय आहे .याकामी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण  कार्यरत असल्याच  त्यांनी सांगितलं . शेतक-यांनी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जा दाता देखील होणे काळाची गरज असून ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल निर्मिती या क्षेत्रात देखील त्यांनी उतरले पाहिजे असे आवाहन गडकरी यांनी केलं .

महाराष्ट्र शासनाने पुढील तीन वर्षासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना  प्रत्येकी 50 कोटी असे एकूण 600 कोटी रुपये देण्याचे नियोजन केले असून या माध्यमातून संशोधनाला चालना मिळणार आहे. राज्याचा जमिनीचा पोत, पीक, वाण,  उत्पादकता, प्रक्रिया यांचा समावेश असलेला विभाग निहाय कृषी आराखडा  तयार करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे  कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली .

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले की अकोला जिल्ह्यातील वनी रंभापुर आणि बाभूळगाव प्रक्षेत्रावर 30 मोठे शेततळे तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून   सुमारे 1,400 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे . याप्रसंगी त्यांनी कृषी विद्यापीठाच्या विविध उपलब्धतेविषयी उपस्थितांना माहिती दिली

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी राजेश अग्रवाल यांनी केले . त्यांनी सांगितले की  2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक शासन आदेश काढला होता ज्यामध्ये शेततळ्याच्या निर्माणाकरिता आणि  राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माण याकरिता   राजस्व शुल्काशिवाय माती उपलब्ध करून देण्यात येईल . या उपक्रमामुळे पर्यावरणाचे संरक्षण झाले असून मृदा तसेच जलसंधारण सुद्धा झाले आहे . रस्त्याच्या बांधकामाचे टॉप सॉईलचा उपयोग होत असे, तो आता या उपक्रमामुळे न झाल्याने  मृदा संवर्धन सुद्धा होत आहे. अकोला जिल्ह्यात 34 अमृत सरोवराचे निर्माण    नियोजन असून त्यातील 20 अमृत सरोवराचे काम पूर्ण झाले असून या   या कामातून  12.50 लाखघनमीटर माती काढण्यात आली  आहे .  या 34  अमृत सरोवराच्या माध्यमातून या क्षेत्रातील 2,468 हेक्‍टरवर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे तर  1,276 क्युबिक सेंटीमीटर पाणी साठाक्षमतेचे लक्ष आहे .

अमृत सरोवर ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात ‘ मधून मांडलेली संकल्पना  असून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी प्रत्येक जिल्ह्यात 75 असे   देशात एकूण 75 हजार अमृत सरोवर निर्माणाचे ध्येय आहे . या अंतर्गत  जलाशय, नाले, तळे या जलसोत्राचा कायाकल्प करून, त्यांचे खोलीकरण तसेच संवर्धन करून या अमृत  सरोवराचे निर्माण करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे सरोवर निर्माण करण्याचे काम   राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बुलढाणा जिल्ह्यात केले होते त्याला ‘बुलढाणा पॅटर्न’ म्हणून नावलौकिक मिळाला त्याचे कौतुक निती आयोगाने सुद्धा केले होते.अमृत सरोवरमधून शेतकऱ्यांमधून मत्स्यपालन करता येणार असून गावकऱ्यांना राजस्व सुद्धा मिळणार आहे. या  सरोवराच्या परिसरामध्ये कडुलिंब, पिंपळाच्या वृक्षाची लागवड होऊन यामुळे भूजल पातळीचे पुनर्भरण आणि जलसंवर्धन सुद्धा होणार आहे

याप्रसंही  शेततळ्याचे  रूपांतर अमृतसरोवरात झाले अशा पीकेव्ही अकोला आणि माफसू नागपूर यांच्या मॉडेल प्लान वर आधारित एका पुस्तकाचे  प्रकाशन  सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे, शिक्षक,  विद्यार्थी,शेतकरी  आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात उभारलेल्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई-पुणे दि. 28 मे 2022

भारताच्या युवा खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करता यावी, यासाठी देशभरात प्रत्येक स्तरावर क्रीडाविषयक पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती व्हायला हवी, ही बाब केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी अधोरेखीत केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं उद्घाटन  आणि कुस्तीपटू खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांच्या  पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण  आज केंद्रिय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. खासदार गिरीश बापट  , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, अध्ययन परिषदेच्या सदस्य सुनेत्रा पवार , क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दिपक माने यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्याला भारतीय खेळाडूंना अधिकाधिक पदकं जिंकण्याच्यादृष्टीनं सक्षम बनवायचं आहे. मात्र त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारं, राष्ट्रीय खेळ प्राधिकरण, राज्य क्रीडा संघटना आणि क्रीडाविषयक कॉरपोरेट संस्था या सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखीत केली.

स्वतंत्र भारताला पहिलं ऑलिम्पिक वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांचे पूर्णाकृती प्रत्येकी ६ फूट उंचीचे पुतळेही या क्रीडा संकुलाच्या आवारात उभारले आहेत. हे क्रीडा संकुल उभारल्याबद्दल, आणि क्रीडा संकुलाला स्वतंत्र भारताला पहिलं ऑलिम्पिक वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचं नाव दिल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ व्यवस्थापनाचं अभिनंदन केलं. १९५२ साली झालेल्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे पुणे विद्यापीठाचेच विद्यार्थी होते .

स्वामी विवेकानंद सर्व युवांचं प्रेरणास्त्रोत आहेत. खेळलात तरच शारीरिक आणि मानसिक पातळीवर सुदृढ राहू शकतो असा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा पुतळा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारावरच त्यांचा पुतळा उभारणं ही गौरवाची बाब आहे असं ते म्हणाले.

जगभरातील विद्यापीठांचं पदक विजेते खेळाडू तयार करण्यात  मोठं योगदान आहे.  भारतातही अलिकडेच बंगळुरू इथं पार पडलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत ७,००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याचं आपण पाहीलं. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही चांगली कामगिरी करत, पहिल्या ५ विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलं आहे असे ठाकूर म्हणाले. या संकुलाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं क्रीडा विषयक पायाभूत सोयीसुविधा उभारण्याचं मोठं काम केलं आहे, आणि जेव्हा अशा पायाभूत सोयी सुविधा उभ्या राहतात, तर त्याच्या वापराचा खेळाडूंना लाभ होतो, म्हणूनच अशा सुविधा उभारण्याची गरज आहे असं ते म्हणाले. आपल्याकडची राज्य आणि विद्यापीठं यांच्यामध्ये खेळांबाबतची निकोप स्पर्धा असायला हवी, तरच आपल्याकडची विद्यापीठं देशासाठी अधिकाधिक पदकं जिंकून देऊ शकतील  असं ते म्हणाले.

महाराष्ट्र सरकारला खेलो इंडिया अंतर्गत इथल्या विद्यापीठांची स्पर्धा आयोजित करायची असेल, तर तसं करायला केंद्र सरकारची कोणतीही हरकत नाही, आमचं पूर्ण सहकार्य असेल असे ते म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या या क्रीडा संकुलाला आपल्या मंत्रालयाचं कोणतंही सहकार्य हवं असेल तर ते दिलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं.

अलिकडच्या काळात भारत खेळांचं केंद्र होऊ लागलं आहे असे सांगत  ठाकूर यांनी क्रीडा क्षेत्रातल्या भारताच्या अलिकडच्या कामगिरीचाही आढावा घेतला. भारतानं टोकियो ऑलिंम्पिक मध्ये ७ पदकं, तर टोकियो पॅऱालिम्पिकमध्ये १९ पदकं जिंकली. ऑलिम्पिक प्रमाणेच पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या पदक विजेत्यांना रोख रकमेची बक्षीसं दिली गेली. कर्णबधिरांच्या आलिम्पिकमध्ये भारतानं १६ पदकं जिंकण्याची कामगिरी केली, तर थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत ७३ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतानं सुवर्णपदक मिळवलं. सिनेमा आणि क्रीडा क्षेत्र ही भारताची सॉफ्ट पॉवर आहे. याची जाणिव असल्यानंच पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच खेळाडूंशी सातत्यानं संवाद साधत असतात असं त्यांनी नमूद केलं. याच तऱ्हेनं आपण सगळ्यांनीही सतत खेळांडूंचं मनोधैर्य वाढवलं पाहीजे, त्यांना सहकार्य केलं पाहीजे, आणि त्यातूनच भारताचं क्रीडा क्षेत्रातलं स्थान उंचावायला मदत होईल असे ठाकूर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनच बदलला आहे. त्यामुळेच क्रीडा क्षेत्रात हे आमूलाग्र बदल घडू शकले, असं ते म्हणाले.

खेलो इंडिया सारखी योजना सुरु करून त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यातल्या खेळाडूंना प्रगतीची संधी मिळवून आहे असं ते म्हणाले. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा, क्रिकेटपटू कपील देव यांच्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांनी, एका चांगल्या खेळाडूची कामगिरी लाखो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरते असं त्यांनी  सांगितलं.

खेळ आणि त्यासाठीच्या पायाभूत सोयीसुविधांचं महत्व लक्षात घेऊनच केंद्र सरकारने खेलो इंडिया उपक्रमाची अर्थसंकल्पीय तरतूद ५० टक्क्यांनी वाढवून ६५७ कोटी रुपयांवरून ९७४ कोटी रुपये इतकी केली आहे. २०१३-१४ च्या तुलनेतही खेळांसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद ३ पटीनं वाढवत १,२१९ कोटी रुपयांवरून ३,०६२ कोटी रुपये इतकी केली आहे. राज्य सरकारंही आपल्या खेळांसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या मंत्रालयाच्या वतीनं देशभरात खेलो इंडियाची १ हजार केंद्र तयार करायचा आपला प्रयत्न असेल. या केंद्रामध्ये प्रशिक्षक म्हणून येणाऱ्या माजी खेळाडूंना ५ लाख रुपयांचं आर्थिक सहकार्य दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आजवर ४५० केंद्रांना मान्यता मिळाली, आहे उर्वरीत केंद्रांना १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत मान्यता मिळेल असा विश्वासही त्यांनी सांगितलं.

कब्बडी प्रमाणेच खोखो, मल्लखांब, तांगटा, योगाभ्यास यांसारख्या भारतातल्या इतर पारंपरिक खेळांनाही आंतरराष्ट्रीय खेळांचं स्थान मिळवून देण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. खेळांशी संबंधित विविध स्पर्धा अधिकाधिक प्रमाणात व्हायला हव्यात, त्यातूनच खेळाडूंना स्वतःची मानसिक शारिरीक क्षमता प्रत्यक्षात तपासून पाहण्याची संधी मिळू शकते असे ते म्हणाले.

अनेक चांगल्या खेळाडूंना अभ्यासात अनेक समस्या येत असतात, मात्र शिक्षकांनी खेळाडूंना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करायला हवं आणि त्यांना अभ्यासत मदत करण्यासाठी अतिरिक्त वर्ग घ्यायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. चांगलं शिक्षण हे खेळाडूंसाठीदेखील खूप महत्वाचं असतं असं ते म्हणाले.

खेळांविषयीच्या सुविधा या केवळ खेळाडूंसाठी आहेत, हाच स्पष्ट संदेश केंद्र सरकारला द्यायचा आहे, त्यामुळेच अलिकडे दिल्लीत सनदी अधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी असलेल्या सुविधेचा गैरवापर केल्याबद्दल, केंद्रीय गृहमंत्रालयानं कठोर कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं. या सुविधांचा वापर सर्वांसाठी खुला असायला हवा, मात्र त्याचवेळी या सुविधांचा कोणी आणि कसा करावा याबद्दलचे स्पष्ट नियम असायला हवेत आणि त्याचं प्रत्येकानं पालन करायला हवं असं ते म्हणाले. खेळांशी संबंधित कोणत्याही गोष्टीमध्ये राजकीय हस्तक्षेप नसायला हवा असंही ते म्हणाले.

खाशाबा जाधव क्रीडा संकुलाविषयी

हे संकुल विद्यापीठातील २७ एकर परिसरात असून त्यामध्ये सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक, फुटबॉल, अस्ट्रो टर्फ लॉन टेनिस कोर्ट, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शुटींग रेंज, अद्यावत व्यायामशाळा आहे. याशिवाय खो-खो, कबड्डी, कॉर्फ बॉल, हॅण्डबॉल अशा  मैदानी खेळाच्या  क्रीडांगणांचा या संकुलात समावेश  आहे. तसेच बहुउद्देशीय इनडोअर हॉल असून त्यामध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, ज्युदो, कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स आदी विविध क्रीडा प्रकार खेळता येणार आहेत. लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरणतलाव, क्रिकेट व अस्ट्रो टर्फ हॉकी क्रीडांगण तयार करण्यात येणार आहे. या अद्यावत क्रीडा संकुलामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यास मदत होणार असून यातून नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील.

Union Minister Shri Anurag Thakur with ace shooter Anjali Bhagwat

ॲनीमेशन चित्रपट ‘रामायण: द लीजंड्स ऑफ प्रिन्स राम’ आणि ‘मायटी लिटल भीम: आय लव्ह ताज महाल” मुलांसाठी दाखवले जाणार

मुंबई. मे, 28, 2022

महोत्सवातील सिनेमांचा अव्याहत आनंद साजरा करत असताना आपण आपल्या लहानग्या सर्जनशील मित्रांना कसे काय दूर ठेऊ शकतो! हो, या वर्षी पहिल्यांदाच 18 वर्षांखालील मुले 17व्या मुंबई अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भाग घेणार आहेत. माहितीपट आणि ॲनीमेशनपट यांना समर्पित असलेला हा चित्रपट महोत्सव दक्षिण आशियातल्या सर्वात जुन्या आणि मोठ्या महोत्सवांपैकी एक आहे. या महोत्सवात मुलांना दोन मास्टर क्लास ॲनिमेशन चित्रपट ‘रामायण: द लीजंड्स ऑफ प्रिन्स राम’ आणि ‘मायटी लिटल भीम: आय लव्ह ताज महाल’ बघण्याची सुवर्णसंधी, मुंबईत 27 मे ते 4 जून, 2022 दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या 17व्या महोत्सवात मिळणर आहे.

या दोन्ही ॲनिमेशन चित्रपटांना सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे. मित्रांनो जर तुम्ही लहान आहात आणि MIFF प्रतिनिधी म्हणून नोंदणी केली नसेल तरीही तुम्ही हे शो बघु शकाल. लहान मुलांना फिल्म्स डिविजन इथे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट देण्याची आणि चित्रपट क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

‘रामायण: द लीजंड्स ऑफ प्रिन्स राम’ 31 मे 2022 रोजी दुपारी 3.45 वाजता जी बी प्रेक्षागृह, फिल्म्स डिविजन कॉम्प्लेक्स इथे दाखवला जाईल. त्याच प्रमाणे ‘मायटी लिटल भीम: आय लव्ह ताज महाल’ हा चित्रपट 30 मे 2022 रोजी दुपारी 3.45 वाजता ऑडी – II, फिल्म्स डिविजन येथे दाखविला जाईल.

अॅनिमेशन पटांविषयी माहिती:

भारत आणि जपान यांनी एकत्रितपणे तयार केलेल्या ‘रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा’ या पहिल्या अॅनिमेशन चित्रपटाचे  मिफ्फ मधे विशेष सादरीकरण होणार आहे. हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित होऊन यंदा 30 वर्षे पूर्ण होत आहेत. वाल्मिकी रामायणावर आधारित, ‘रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा’ मध्ये, अॅनिमेशनची फ्यूजन म्हणजे मिश्रित शैली वापरण्यात आली असून, त्यात, जपानचे अॅनिमेशन-मॅग्ना, अमेरिकेतील डिस्ने आणि रवीवर्माची चित्र शैली अशा तिन्ही कलांचा संगम करण्यात आला आहे. भारतातील विख्यात अॅनिमेशन पट दिग्दर्शक राम मोहन आणि जपानचे प्रसिद्ध दिग्दर्शक युगो साको आणि कोईची सास्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

नेटफ्लिक्सची मूळ मालिका “मायटी लिटल भीम: आय लव्ह ताजमहाल” च्या भागाचा मिफ्फ 2022 मध्ये वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. झी इंस्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट्स (झिका) चे माजी विद्यार्थी, कृष्णा मोहन चिंतापाटला, यांना अॅनिमेशन पट निर्मितीचा 25 वर्षांचा अनुभव आहे. अनेक उत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या या अनुभवी दिग्दर्शकाने ह्या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0

मुंबई, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. ते प्रतिभावान साहित्यिक, परखड वक्ते आणि उत्कृष्ट असे संघटक होते.  उच्चविद्याविभूषित स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात रान उठवले. त्यांचे विज्ञानवादी विचार आणि प्रखर राष्ट्रभक्ती आजही प्रेरणादायी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.”

पीएमडीटीए एसेस करंडक पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रवी कोठारी, निखिल भगत, होझेफा हकीम, जस्मित सहानी यांचा बाद फेरीत प्रवेश

पुणे, 28 मे 2022: एसेस टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एनरझरलचे निखिल राव प्रायोजित पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पीएमडीटीए एसेस करंडक पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत रवी कोठारी, निखिल भगत,  होझेफा हकीम,  जस्मित सहानी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला. 
एसेस टेनिस अकादमी, उंड्री या ठिकाणी आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत अ गटात पहिल्या सामन्यात रवी कोठारीने सौरभ देशपांडेचा 5-0 असा तर दुसऱ्या सामन्यात रवी कोठारीने राज हिरेमठचा 5-0 असा पराभव केला. ड गटात होझेफा हकीमने प्रफुल आशेरवर 5-3 असा विजय मिळवला. इ गटात निखिल भगत याने अझहर जोदाटीला 5-1 असे पराभूत केले. ह गटात जस्मित सहानी याने भृमीस सुब्रमणियनला 5-1 असे नमविले. 
निकाल: राउंड रॉबिन फेरी: गट अ: रवी कोठारी वि.वि.सौरभ देशपांडे 5-0; रवी कोठारी वि.वि.राज हिरेमठ 5-0; राज हिरेमठ वि.वि.सौरभ देशपांडे 5-1;गट ब: राहुल कोठारी वि.वि.योगेश नेगी 5-0;गट क: पंकज बोनीकर वि.वि.श्रेयश प्रसाद 5-3;गट ड: होझेफा हकीम वि.वि.प्रफुल आशेर 5-3;गट इ: अमन रैथथा वि.वि.सचिन कसमळकर 5-0; निखिल भगत वि.वि.अझहर जोदाटी 5-1;गट फ: अमित किंडो वि.वि.कवलजीत परदेशी 5-0;गट ह: जस्मित सहानी वि.वि.भृमीस सुब्रमणियन 5-1;

बोरिवलीत तीन दिवसीय खादी महोत्सवाचे उद्घाटन

0

गोपाळ शेट्टी, सुनील राणे यांच्या हस्ते तीन दिवसीय खादी महोत्सवाचे उद्घाटन झाले

  मुंबई-: बोरिवली पश्चिम येथील अथर्व स्कूल ऑफ फॅशन अँड आर्ट्स आणि मुंबई खादी ग्रामोद्योग संघटना ट्रस्ट (कोरा केंद्र) यांच्यातर्फे तीन दिवसीय ‘खादी महोत्सव 2022’ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, बोरिवलीचे आमदार सुनील राणे आणि भाजपचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुढील तीन दिवस चालणाऱ्या खादी महोत्सवात देशभरातील अनेक नामवंत कलाकारांनी स्टॉल्समध्ये खादीच्या कपड्यांसह इतर अनेक कलाकुसरीचे प्रदर्शन केले. देशातील अनेक राज्ये तसेच दूरवरच्या शहरांनी उत्कृष्ट कलाकृतींच्या प्रदर्शनात मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे. महोत्सवात २८ आणि २९ मे रोजी संध्याकाळी फॅशन शो होणार आहे. अथर्व फाउंडेशनचे अध्यक्ष आणि बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांनी खादी महोत्सवाची संकल्पना मांडली आहे. खादी फेस्टिव्हलमध्ये भारताचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा दाखवण्यासाठी १० डिझायनर स्थानिक फॅशन परिधानांवर काम करत आहेत. या खादी महोत्सवाचे डिझायनर एक अनोखा उत्सव आणि विविध भारतीय संस्कृती आणि परंपरांचे प्रदर्शन असेल. खादी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक बदलाचे साधन आहे आणि आधुनिक काळात पुनरुज्जीवन आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. आणि आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या माफक पेहरावामुळे, खादी फॅशनचे प्रतीक बनली आहे.
खादी महोत्सव २०२२ च्या आयोजनाबाबत सुनील राणे म्हणाले की, खादी उद्योग आणि हाताने विणलेल्या कापडांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक फॅशन डिझायनर्सना मुख्य प्रवाहात आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यासोबतच या खादी फॅशन शोच्या माध्यमातून भारतातील संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवायचे आहे. या खादी फॅशन शोच्या माध्यमातून खादीतील साधेपणा, शुद्धता आणि टिकाऊपणाचे सार मांडण्यात येणार आहे. फॅशन शोकेस खादीच्या आधुनिकतेसह आपली संस्कृती आणि वारसा सादर करते.

मांसाहार केल्याने शरद पवार दगडूशेठ मंदिरात गेले नाहीत …. ३० वर्षांनंतर दाखल झाले मात्र,बाहेरून दर्शन घेऊन मार्गस्थ

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात ३० वर्षांनंतर दाखल झाले. मात्र, मांसाहार केल्याने बाहेरून दर्शन घेऊन पवार मार्गस्थ झाल्याचे सांगण्यात आले.

गणरायाचे दर्शन घेण्यापूर्वी त्यांनी भिडे वाड्यालाही खालूनच भेट देऊन पाहणी केली. पुणे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख उपस्थित होते.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी ते नास्तिक असल्याची टीका केली होती. त्याचप्रमाणे ब्राह्मण संघटनांनी “पवार इफ्तार पार्टी करतात. मात्र, मंदिरात जात नाहीत,’ असाही आरोप केला गेला होता. पवार शुक्रवारी दुपारी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास भेट देणार असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. अनेक वर्षांनंतर पवार शुक्रवारी मंदिर परिसरात दाखल झाल्याने त्यांचे दगडूशेठ ट्रस्टतर्फे मंदिराच्या दारातच स्वागत करण्यात आले. मात्र, आपण मांसाहार केल्याने मुखदर्शन घेतल्याचे सांगत ते पुढील कार्यक्रमास मार्गस्थ झाले.

प्रशांत जगताप म्हणाले, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला मंदिरामागील जागा पाहिजे आहे. त्या दृष्टीने त्यांनी गृहमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केल्याचे आहे. ही बाब गृहमंत्र्यांनी पवारांना सांगितल्यानंतर तेही गृहमंत्र्यांसोबत जागेची पाहणी करण्यास आले होते. दरम्यान, पवार यांच्या दर्शनावरून दिवसभर एकच चर्चा सुरू होती.

थाटामाटात पार पडला दिव्यांगांचा विवाह सोहळा

12 जोडपी अडकली विवाहबंधनात; सक्षम पुणे महानगरचा पुढाकार
पुणे : सनई चौघड्याचा नाद, बँडचा ताल, वाजत-गाजत निघालेली वरात, घोड्यावर दिमाखात बसलेले नवरदेव,  लाजत मुरडत बोहल्यावर चढणारी नवरी, नटलेली वऱ्हाडी मंडळी, मांडलेला रुखवत, मंगलाष्टकांची सुरावट, डोईवर पडलेल्या मंगल अक्षता अन जोडीदाराशी नजरानजर करताना ओसंडून वाहणारा चेहऱ्यावरचा आनंद अशा या अनोख्या दिव्यांगांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे नेत्रदीपक क्षण पुणेकरांनी शुक्रवारी अनुभवले.


सक्षम पुणे महानगर, दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र, वानवडी, श्री अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाऊंडेशन, रतनलाल हुकुमचंद गोयल यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांचा सामुदायिक विवाह सोहळा थाटामाटात बिबवेवाडी येथील गोयल गार्डन मंगल कार्यालयात पार पडला. सक्षम पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे, पुणे महानगर अध्यक्ष डॉ. संजीव डोळे, सचिव दत्तात्रय लखे, प्रांत सचिव महेश टांकसाळे, सहसचिव गहिनीनाथ नलावडे, शिवाजी भेगडे, सुहास मदनाल, विजय पगडे आदी उपस्थित होते.
दारातील तुळशी वृंदावनापासून ते देवघर, स्वयंपाक घरातील सर्व भांडी, बाथरूममधील साहित्य, सोफा-बेड अशा बारीकसारीक प्रत्येक गरजेच्या वस्तू रुखवतात मांडण्यात आल्या होत्या. १२ जोडप्यांचे यावेळी संपूर्ण थाटामाटात लग्न करून देण्यात आले. संपूर्ण विवाह सोहळ्याचा खर्च उद्योजक रतनलाल गोयल यांनी केला.

ऍड. मुरलीधर कचरे म्हणाले, “दिव्यांगांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी तीन-चार वर्षांपासून हा उपक्रम घेतला जात आहे. त्यांना परिपूर्ण करण्याचा हा प्रयत्न आहे. यंदा १२ जोडपी विवाहबंधनात अडकली. गोयल गार्डनचे मालक रतनलाल गोयल यांनी पुढाकार घेत सक्षम पुणे महानगरच्या मदतीने हा सोहळा केला आहे.” रतनलाल गोयल व डॉ. संजीव डोळे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या.
सामुदायिक विवाह सोहळ्याचे समन्वयक दत्तात्रय लखे म्हणाले, “मार्च महिन्यात दिव्यांगांचा परिचय मेळावा घेतला. यावेळी खास समुपदेशन करण्यात आले. उपवरांच्या घरी भेटी देऊन विवाह निश्चित केले. आज प्रत्यक्ष सामान्य जोडप्या प्रमाणे थाटात यांचा संपूर्ण कन्यादान सह विवाह संपन्न झाला. सर्व संसारोपयोगी साहित्य दिले आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.”

दिव्यांग नवरी स्वाती भोज म्हणाली, “हा माझ्या आयुष्यातील खूप महत्वाचा क्षण आहे. नवी वाटचाल सुरू होते आहे. घरच्यांचा आणि सक्षम संस्थेचा फार आधार मिळाला. भविष्याची नवीन वाटचाल आनंदात सुरू होत आहे.”

बुलढाण्याचा नवरदेव सतीश थावराणी म्हणाला, “हा आनंदाचा क्षण अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल ‘सक्षम’चे खूप आभार मानतो. सर्वसामान्य जोडप्यांसारखे आमचेही लग्न थाटात झाले याचे समाधान वाटते. मी सीए असून, स्वाती बीकॉम करत आहे. आम्ही दोघे सुखाचा संसार करू.”

१३३ कोटींच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासंदर्भात दोन व्यक्तींना अटक

0

मुंबई दि 27:- महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाईद्वारे १३३.६८ कोटीच्या रुपयांच्या खोटया बिलांद्वारे शासनाची १९.९३ कोटी रुपयांची महसूल हानी करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली आहे.

मे. देवराम ट्रेडर्स व मे. अपोलो एंटरप्राईज या व्यापा-यांच्या उल्हासनगर व नालासोपारा येथील ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी दि. २७ मे २०२२ रोजी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती, अन्वेषण भेटी दरम्यान या व्यापाऱ्यांनी बनावट वीजबिल, आधार आणि पॅनकार्ड द्वारे नोंदणी प्रमाणपत्र घेतल्याचे आढळून आले. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहीमेअंतर्गत संबंधित कंपन्यांचे मालक अनिल देवराम जाधव व संतोष अशोक शिंदे यांना दि. २७ मे २०२२ रोजी अटक करण्यात आली.

महानगर दंडाधिका-यांनी दि. २७ मे २०२२ रोजी या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही धडक कारवाई राज्यकर सहआयुक्त, (अन्वेषण-अ, मुंबई) राहुल द्विवेदी (भा.प्र.से.) व राज्यकर उप आयुक्त संजय वि. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त नंदकुमार दिये व रविकांत कांबळे यांनी केली.

या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण सोळा जणांना अटक केले आहे. सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवणा-या व्यापा-यांचा शोध घेत असल्याने अटक कारवायांच्या वाढत्या संख्येदवारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणा-यांस कडक इशारा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला-युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले..आता मी स्वराज्य उभारणी साठी सज्ज … राज्यसभेच्या रिंगणातून माघार .. 42 आमदारांपेक्षा, घोडेबाजारापेक्षा … मला जनता महत्वाची

मुंबई-राज्यसभेच्या उमेदवारीवरून आज छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली होती. अपक्ष उमेदवारी देण्याबाबत ड्राफ्टही तयार करण्यात आला होता. मात्र, अचानक माझाच कार्यकर्ता संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, असा आरोप संभाजीराजेंनी केला आहे.राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी मी निवडणूक लढणार नाही, अशी घोषणाही पत्रकार परिषदेत संभाजीराजेंनी केली. जनता हीच माझी खरी ताकद आहे. यापुढे माझ्या स्वराज्य संघटनेला मी बळकट करणार आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आणि विस्थापित मावळा संघटित करणार, असे संभाजीराजे म्हणाले. मागील 15 वर्षे मी जनतेसाठी अहोरात्र काम केले. यापुढेही अधिक बळकटीने हे काम पुढे नेणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.संभाजीराजे म्हणाले, माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुण्यात मी दोन मोठ्या घोषणा केल्या होत्या. राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आणि स्वत:ची स्वराज्य संघटना स्थापन करणार. या पत्रकार परिषदेतच मी सर्वपक्षीयांना राज्यसभेसाठी मला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काही दिवसांतच मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाचे दोन खासदार माझ्याकडे पाठवले. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये आमची पहिली बैठक झाली. त्या बैठकीतच खासदारांनी मला शिवसेना पक्ष प्रवेशाची अट सांगितली होती. मात्र, आपण त्यास तेव्हाच स्पष्ट नकार दिला होता, असे संभाजीराजे यांनी सांगितले.संभाजीराजे म्हणाले, ओबेरॉय हॉटेलातील चर्चेत राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीबाबत मी स्पष्टपणे भूमिका मांडल्यानंतर दोनच दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला व चर्चेसाठी वर्षावर निमंत्रित केले. लोकशाहीत मुख्यमंत्रीपद हे राज्याच्या केंद्रस्थानी असते म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी छत्रपती आम्हाला शिवसेनेत हवेत, असे प्रपोजल दिले. त्याचक्षणी मी तो प्रस्ताव नाकारला. तसेच, अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेना आपल्याला पाठिंबा देऊ शकत नसेल तर शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून मला उभे करा, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली. मात्र, शिवसेनेचे 2 उमेदवार राज्यसभेवर पाठवायचे आहेत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मला नकार दिला. तरीदेखील या प्रस्तावावर विचार करून दोन दिवसानंतर पुन्हा भेटू, असे दोघांमध्येही ठरले होते, अशी माहिती त्यांनी दिली.संभाजीराजे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मला पुन्हा शिवसेनेच्या मंत्र्यांनी फोन केला. त्यानंतर शिवसेनेचा एक मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या एका स्नेहीसोबत पुन्हा ओबेरॉय हॉटेलात चर्चा झाली. त्यात मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चेप्रमाणे शिवसेनेकडून महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी मला देण्याबाबत ड्राफ्ट करण्यात आला आणि हाच ड्राफ्ट फायनल असल्याचे तेव्हा मंत्र्यांनी मला सांगितले होते, असा दावा संभाजीराजेंनी केला. मात्र, या बैठकीनंतर मी कोल्हापूरला रवाना होताच कोल्हापुरातील माझाच कार्यकर्ता संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याचे वृत्त माध्यमांवर झळकले. मी ताबडतोब शिवसेनेच्या मंत्र्यांना फोन करून याचा जाब विचारला. मात्र, ते मंत्री काहीच बोलले नाहीत. मी मुख्यमंत्र्यांनाही फोन केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही, असे संभाजीराजेंनी सांगितले.संभाजीराजे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही स्मारकाला भेट द्यावी. शिवाजी महाराजांना वंदन कारवे व मी खोटे बोलत असेल तर तसे सांगावे, असे आव्हान यावेळी संभाजीराजेंनी दिले. मुख्यमंत्र्यांनी शब्द का पाळला नाही, हे आपल्याला कळले नाही. मात्र, यामुळे आपल्याला फार दु:ख झाले, असे संभाजीराजे म्हणाले. तसेच, सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी आपली भूमिका होती. मात्र, काही आमदारांनी आपल्यावर पक्षाचा दबाब आहे, असे सांगितल्याचे संभाजीराजे म्हणाले. मात्र, आता निवडणूक लढणार नसल्यामुळे पूर्ण वेळ आपल्या स्वराज्य संघटनेला देणार असल्याचे ते म्हणाले.संभाजीराजे म्हणाले की, आपल्याला कोणत्याही राजकीय पक्षाचे वावडे नाही. मात्र, प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते. त्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर त्या भूमिकेचा तुम्हाला सन्मान ठेवावा लागतो. त्यामुळे नकळत आपल्यावर बंधन येते. असे कोणतेच बंधन मला नको असल्यामुळेच मी अपक्ष उमेदवारीबाबत आग्रही होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

12वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या सृष्टी सूर्यवंशीला दुहेरी मुकुट 

एकेरीत आर्यन किर्तने याला, तर दुहेरीत स्मित व वरद उंद्रे यांना दुहेरीत विजेतेपद
पुणे, 27 मे 2022: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित मित्तल ब्रदर्स व हेड इक्विपमेंट प्रायोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ओम दळवी मेमोरियल वनप्लेस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात सृष्टी सूर्यवंशी हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
महाराष्ट्र पोलीस जिमखाना, औंध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम फेरीत सहाव्या मानांकित आर्यन कीर्तने याने सर्वज्ञ सरोदेचा 6-2, 7-5 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. आर्यन हा बिशप्स शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून आदर पुनावाला टेनिस अकादमी व डेक्कन जिमखाना क्लब,मध्ये प्रशिक्षक प्रसनजीत पॉल व नितीन किर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे.
दुहेरीत मुलांच्या गटात स्मित उंद्रे व वरद उंद्रे या अव्वल मानांकित जोडीने वीरेन चौधरी व अथर्व डकरे यांचा 6-3, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 
मुलींच्या गटात अंतिम लढतीत चौथ्या मानांकित पुण्याच्या सृष्टी सूर्यवंशीने दुसऱ्या मानांकित कोल्हापूरच्या रितिका डावलकरचा 6-3, 2-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. सृष्टी ही केंद्रीय विद्यालय शाळेत शिकत असून ईटेनसिटी टेनिस अकादमीत प्रशिक्षक कपिल किन्नरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दुहेरीत अंतिम फेरीत सृष्टी सूर्यवंशी व रितिका डावलकर या जोडीने रित्सा कोंडकर व काव्या पांडे यांचा 6-0, 2-6, 10-7 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस सुनील फुलारी, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस अतुल पाटील, ओडीएमटीचे ट्रस्टी डॉ.जयसिंग पाटील आणि डीवायएसपी गायत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओम दळवी ट्रस्टचे ट्रस्टी व स्पर्धा संचालक उमेश दळवी, मारुती राऊत, एमएसएलटीए सुपरवायझर प्रणव वाघमारे व कल्पिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी): मुले: आर्यन कीर्तने[6] वि.वि.सर्वज्ञ सरोदे 6-2, 7-5; मुली: सृष्टी सूर्यवंशी[4] वि.वि.रितिका डावलकर[2]6-3, 2-6, 6-3;
दुहेरी: मुले:अंतिम फेरी: स्मित उंद्रे/वरद उंद्रे[1]वि.वि.वीरेन चौधरी/अथर्व डकरे[2] 6-3, 6-1;
मुली: सृष्टी सूर्यवंशी/रितिका डावलकर[1]वि.वि.रित्सा कोंडकर/काव्या पांडे[2] 6-0, 2-6, 10-7.

आयसर पुणे मधील नव्या विभागांमुळे विविध शाखांसाठी अत्याधुनिक उपाय विकसित करण्यासाठी मदत होईल- धर्मेंद्र प्रधान

0

पुणे -केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पुण्यातील आयआयएसईआर,आयसर इथे,  डेटा सायन्स विभागाच्या संशोधन आणि कार्यालयीन इमारतीची पायाभरणी केली. या एकाच विभागात, डेटा सायन्स शी संबंधित तीन मूलभूत अभ्यासक्रम एकत्रित येणार आहेत. यात- 1) सांख्यिकी आणि संभाव्यता, 2) अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि 3) कॉम्प्युटर सायन्स यांचा समावेश आहे. या विभागाचा भर, शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष अशा तीन स्तरीय धोरणांवर असणार आहे. त्याद्वारे, थीअरॉटिकल अंडरपिनिंग म्हणजे गृहीतक कल्पनाशक्ति, नव्या पद्धतींचा विकास आणि विविध अॅप्लिकेशनसाठीची क्षमता विकसित केली जाईल.

धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते, आरोग्य आणि  आजार यांच्या संदर्भात जनुकीय कार्यविषयक राष्ट्रीय सुविधेचेही उद्घाटन झाले. या सुविधेमुळे, आजारांचा अभ्यास करण्यासाठी महत्वाची मदत होईल तसेच आरोग्य आणि औषधे यांच्यासाठी महत्वाची माहिती मिळू शकेल.  या सुविधेत, मॉलिक्यूलर बायोलॉजी प्रयोगशाळा मायक्रोइंजेक्शन व्यवस्थेचाही समावेश आहे . ज्याद्वारे, नॉक आऊट किंवा नॉक इन माऊस मॉडेल  निर्माण करता येईल.  या सुविधेत, शुक्राणू आणि गर्भ क्रायोप्रीझर्वेकशन म्हणजे संवर्धन आणि कृत्रिम फलन, तसेच स्टीरिओ-टॅक्सीक शस्त्रक्रियेच्या सुविधेचाही समावेश आहे. आयआयएसईआर पुण्यातील 10 संशोधन समूह या सुविधेचा उपयोग करतील. त्याशिवाय, टीआयएफआर, आयुष मंत्रालय, सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अशा विविध संस्थांनाही या सुविधेद्वारे आवश्यक त्या सेवा पुरवल्या जातील.

धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी भारत सरकारच्या राष्ट्रीय सुपरकंप्युटिंग मिशनच्या माध्यमातून बसवण्यात आलेल्या  सी-डॅकच्या परम (PARAM)ब्रह्म सुविधा केंद्राला देखील भेट दिली. परम ब्रह्म येथे 1.7 पीएफ (पेटाफ्लॉप्स) इतकी गणन क्षमता असलेल्या सीपीयू आणि जीपीयूचे मिश्रण आहे. त्याशिवाय,  1 पीबी ( पेटाबाईट्स) साठवणूक क्षमतेवर आधारित, उच्च कामगिरीक्षम समांतर यंत्रणाही आहे.

त्याशिवाय, त्यांनी इंद्राणी बालन, विज्ञान कृती केंद्रालाही भेट दिली. या केंद्रात कमी खर्चातली वैज्ञानिक संवादात्मक खेळणी विकसित केली जातात, ज्याद्वारे सहभागात्मक आणि सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवले जाते. त्यानंतर अटॉमिक फिजिक्स आणि क्वांटम ऑप्टिक प्रयोगशाळेला आणि सूक्ष्मजीव दर्शक सुविधा केंद्रालाही त्यांनी भेट दिली.

आयआयएसईआर, पुणे इथला डेटा सायन्स विभाग, भारताला भविष्यासाठी सज्ज, विशेषतः आरोग्यासारख्या आघाडीच्या क्षेत्रांत सुसज्ज होण्यास मदत करेल आणि वैज्ञानिक दृष्ट्या, प्रयोगशाळेत सिद्ध  अशा अद्यायवत वैद्यकीय ज्ञानामुळे आरोग्य चिकित्सा करण्यात मदत होईल. आरोग्य आणि आजार निदानासाठी जनुकीय कार्यविषयक राष्ट्रीय सुविधेमुळे, जीवशास्त्रात संशोधनाच्या क्षमता वाढतील आणि सूक्ष्म जीवाणूला समजून घेण्यात आज असलेल्या कमतरता यातून भरुन निघतील. आयआयसीईआर पुणे, मध्ये समाविष्ट झालेल्या या नव्या सुविधेमुळे, शिक्षणाच्या कक्षा विस्तारतील, संशोधनात सुधारणा होईल आणि जीवशास्त्र, रसायनशास्त्र, मानवशास्त्र, पृथ्वीविज्ञान, हवामान बदल अशा विषयात सुधारणा होईल.

भारतातील अग्रगण्य माहितीपट चित्रपट महोत्सव- मिफ्फ 2022 येत्या रविवारपासून होणार सुरु

मुंबई- फिल्म्स डिव्हिजनचे परिसर, जिथे भारतातील सुप्रसिद्ध असे, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय देखील आहे, तिथेच, येत्या रविवारपासून 17 वा  मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ  सुरु होणार आहे. हा महोत्सव माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपटांना समर्पित असतो.

आठवडाभर चालणाऱ्या या द्वेवार्षिक  महोत्सवाचा उद्घाटन समारंभ वरळीतल्या नेहरू केंद्रात होणार आहे, तर चित्रपटांचे प्रसारण, फिल्म डिव्हिजनच्या संकुलात असलेल्या विविध अत्याधुनिक चित्रपटगृहात होईल.

मिफ्फ 2022 साठी, जगभरातील चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. या महोत्सवासाठी, 30 देशांतून एकूण 808 प्रवेशिका आल्या आहेत. महोत्सवाच्या  स्पर्धा विभागात, 102 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यापैकी 35 आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गटात आणि 67 राष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गटात असतील. 18 चित्रपट मिफ्फ प्रीझ्म विभागात दाखवले जातील.

या महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या सिनेमाला सुवर्णशंख पुरस्कार आणि 10 लाख रुपये रोख दिले जातील. दुसऱ्या क्रमांकावरील चित्रपटाला रौप्य शंख आणि पाच लाख रुपये पुरस्कार दिला जाईल. त्याशिवाय, चषक आणि प्रमाणपत्रही प्रदान केले जाईल. आयडीपीए च्या वतीने दिला जाणारा, विद्यार्थ्यांनी बनवलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि उत्तम पदार्पण करणाऱ्या नवोदित दिग्दर्शकाला महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी  दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार  दिला जाईल.

प्रतिष्ठेचा डॉ. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कारदेखील हया महोत्सवात दिला जातो. दहा लाख रुपये, चषक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे  स्वरूप आहे. माहितीपट क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सिनेसृष्टीतील नामवंत दिग्गजांना हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत, एस. कृष्णमूर्ती, श्याम बेनेगल, नरेश बेदी, विजया मुळये यांसारख्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. फिल्म डिव्हिजनशी दीर्घकाळ संबंधित आणि 50 च्या दशकांत ते या संस्थेचे मानद चित्रपट निर्मातेही असलेल्या सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो.

बांगलादेशच्या स्वातंत्र्याला 50  वर्ष पूर्ण होत असल्याच्या स्मरणार्थ या वर्षी त्याची ‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवड झाली आहे. मिफ्फ 2022 मध्ये बांगलादेशातील विशेष 11 चित्रपट दाखवले जातील यात  समीक्षकांनी गौरवलेल्या हसीना-अ डॉटर टेल या चित्रपटाचाही समावेश आहे.

नेटफ्लिक्सची मूळ मालिका “मायटी लिटल भीम: आय लव्ह ताजमहाल” च्या भागाचा मिफ्फ 2022 मध्ये वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.

भारत आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रामायण: द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा’ या पहिल्या अॅनिमेशन चित्रपटाचे देखील मिफ्फ मधे विशेष सादरीकरण होणार आहे. चित्रपट प्रभागाचे (फिल्म्स डिविजन)

भारतातील माहितीपट संस्कृतीमधील योगदान, इमेज-नेशन या विशेष विभागात प्रदर्शित केले जाईल.

ऑस्करच्या धर्तीवर या महोत्सवातही   विशेष  चित्रपट  पकेजेस तयार करण्यात आली असून त्यात  इटली आणि जपानमधील विशेष चित्रपट पॅकेज , इफ्फीच्या अलीकडील महोत्सवांमधील इंडियन पॅनोरमा यांचा समावेश आहे  आणि हे  खास चित्रपटांचे विभाग रसिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतील.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी), अहमदाबाद, सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय), कोलकाता, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) पुणे, के आर नारायणन फिल्म इन्स्टिट्यूट, केरळ यांसारख्या नामांकित संस्थांच्या विद्यार्थ्यांचे चित्रपट तरुण प्रतिभेचा अविष्कार घडवतील.  याबरोबरच म्यानमारमधील विद्यार्थ्यांचे अॅनिमेशन माहितीपट आणि ब्राझीलमधील विद्यार्थी अॅनिमेशन चित्रपट महोत्सवातील चित्रपट ही खास चित्रपट मेजवानीच असेल.

त्याचप्रमाणे, ईशान्य भारतातील निवडलेले चित्रपट, पॉकेट फिल्म्स मंचावरील सर्वोत्कृष्ट लघुपट आणि सत्यजित रे यांच्या सुकुमार रे चित्रपटाच्या पुनर्संचयित आवृत्तीचे विशेष प्रदर्शन केले जाईल.

मिफ्फ, जगातील प्रतिष्ठित माहितीपट महोत्सवांपैकी एक आहे. माहितीपटकर्मी, सिनेरसिक, चित्रपट समीक्षक, प्रसारणकर्ते आणि ओटीटी मंच तसेच विद्यार्थ्यांना एकत्र आणते, ते मिळून माहितीपट क्षेत्रातील समकालीन कल काय आहे त्यावर मंथन आणि चर्चा करतात.

विनापरवाना रक्तदाब मोजणारे उपकरण उत्पादन करणाऱ्या अपोलो फार्मसी आणि कंन्सेप्टरेन्युअर व्हेंचर वर कारवाई

0

मुंबई, दि. 27 : मेसर्स  Conceptreneur Ventures प्रा. ली. गोवंडी मुंबई ही संस्था B.P.monitor या रक्तदाबासाठी वापरात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणाचे (Medical Devices) में विनापरवाना उत्पादन करत असल्याची माहिती प्रशासनास प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे उक्त संस्थेच्या शाह इंडस्ट्रीयल इस्टेट देवनार, गोवंडी या ठिकाणी बृहन्मुंबई कार्यालयातील अधिकाऱ्यांनी छापा टाकून पडताळणी करण्यात आली.

कारवाईचे वेळेस वरील संस्थेत विनापरवाना Blood Pressure Monitor या रक्तदाब मोजणाऱ्या वैद्यकीय उपकरण उत्पादन करण्यात येत असल्याचे आढळून आले.  या उपकरणाच्या उत्पादनासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. केंद्र शासनाने या उपकरणाच्या उत्पादनासाठी परवाना देण्यास जून २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली होती वरील संस्थेने जून २०२१ नंतर देखील उत्पादन परवाना न घेता या उपकरणाचे उत्पादन विक्री करणे सुरू ठेवले होते. त्यामुळे सदर ठिकाणी उपलब्ध असलेला विनापरवाना उत्पादित Beep Blood B.P. monitoring Machine या उपकरणाचा रु १०,३५, ००० साठा जप्त करण्यात आला.

पुढील तपासात संस्थेस सदर उपकरणाच्या खरेदी विक्रीचा तपशिल व विक्री करण्यात आलेला साठा बाजारातून परत मागविण्याचे निर्देश देण्यात आले होते. सादर करण्यात आलेल्या माहितीवरून ही उपकरणे New Era Corporationn, China या संस्थेकडून आयात करण्यात आले होते. सदर आयातीसाठी लागणारा परवाना देखीन मंजूर नसल्याचे तपासात आढळून आले में Conceptreneur Ventures व मे Apollo Pharmacy (A unit of Aplollo Hospitals Enterprises Ltd) यांच्यात करार असून सदर उपकरणाने ब्रांड नाव (Apollo Pharmacy fully automatic upper arm style Blood Pressure Monitor) हे Apollo Pharmacy च्या मालकीचे Conceptreneur Ventures ने सुमारे ८२,५१० इतक्या मोठ्या संख्येने सदर उपकरणे Apollo Pharmacy साठी बिना परवाना तयार करून त्याची विक्री केली आहे.

या दोन्ही संस्थानी Covid-१९ या रोगाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर सदर उपकरणे संगनमताने विनापरवाना उत्पादन त्याची गुणवत्ता चाचणी न करता विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. दाब मोजण्याचे उपकरण जर सदोष असेल तर त्याचा परिणाम रुग्णास देण्यात येणाऱ्या उपचारावर पडून चुकीच्या निदानामुळे रुग्णाच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

या प्रकरणात औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० मेडिकल डीवायसेस नियम, २०१७ से उल्लघन केल्याने तसेच संस्थेने Covid-१९ या जागतिक महामारीच्या काळात गुणवत्ता चाचणी न करता संगनमताने विनापरवाना वैद्यकीय उपकरणाचे उत्पादन केल्याने भा.द.वी. च्या कलम ४२० व ३४ सहवाचन औषधे सौदर्य प्रसाधने कायदा १९४० कलम १८ (क) अंतर्गत गोवंडी पोलीस स्टेशन येथे पुढील तपास चौकशीसाठी दि. ४/५/२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आहे.

मे Apollo Pharmacy Conceptreneur Ventures या संस्थाना बाजारात विक्री करण्यात आलेल्या प्रत्येक ग्राहकाकडून सदर उपकरणाचा साठा परत घेण्यासाठी सर्व प्रमुख वर्तमानपत्रात नोटीस देण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार Apollo Pharmacy ने विविध वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिल्याचे प्रशासनास कळविले आहे.