Home Blog Page 1963

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

पुणे दि.6: साखर आयुक्त शेखर गायकवाड व सहसंचालक मंगेश तिटकारे लिखीत एफआरपी महितीपुस्तिका व साखर उद्योगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा एफआरपी वर परिणाम या पुस्तकांच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ नेते खासदार शदर पवार यांच्या हस्ते झाले.

वसंतदादा साखर इन्स्टिट्युट येथे आयोजित साखर परिषद-२०२२ कार्यक्रमात ऊसतज्ज्ञ डॉ. मधुकर पाटील यांच्या ‘रसराज’ पुस्तकाचेही प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

काश्मिरी पंडीतांवर हल्ले:गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा -शिवसेनेचे पुण्यात आंदोलन

पुणे-महाराष्ट्र सरकारने काश्मीरमधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात शैक्षणिक सोयीसुविधा निर्माण करून त्यांना सुरक्षितता देण्याचे जाहीर केले आहे, मात्र काश्मिरी पंडीतांवर जेव्हा जेव्हा हल्ले होतात तेव्हा तेव्हा भाजप बैठकांशिवाय काहीच करत नाही, आता बैठका खुप झाल्या कारवाईची धमक दाखवणे गरजेचे आहे. यासाठी शिवसेना पुणे शहराच्यावतीने काश्मीर पंडितावर झालेल्या हल्ल्याचा जाहिर निषेध करून, गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी घेऊन येथे शिवसेनेने आंदोलन केले.
या आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला शहर संघटीका संगीता ठोसर, पल्लवी जावळे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, बाळासाहेब मालुसरे, भरत कुंभारकर, आनंद गोयल, किशोर रजपूत, राजेंद्र शिंदे, नंदू घाटे, राजेश मोरे, नंदू येवले, संतोष गोपाळ, उमेश वाघ, मकरंद पेठकर, दिलीप पोमण, नितीन शिंदे, संतोष तोंडे, रुपेश पवार, नितीन रावळेकर, राम थरकुडे, युवराज पारीख, गौरव पापळ, परेश खांडके, रमेश क्षीरसागर, आकाश पहिलवान, अतुल दिघे, संदीप गायकवाड, अर्जुन जानगवळी, बाळासाहेब गरुड, अजय शिंदे, अनंत घरत, राहुल जेकटे, अमर मारटकर, नितीन पवार, राहुल आलमखाने, पराग थोरात, संजय वाल्हेकर, शैलेश मोरे, प्रसाद गिजरे, अनिल माझिरे, बकुळ डाखवे, विकी धोत्रे, मुकुंद चव्हाण, संतोष भुतकर, आकाश रेनुसे, विलास कथलकर, राजेश वाल्हेकर, छाया भोसले, विद्या होडे, अनिता परदेशी, स्वाती कथलकर, भावना थोरात, करुणा घाडगे, गौरी चव्हाण, संगिता भिलारे, अनुपमा मांगडे, ज्योती पवार उपस्थित होते

यावेळी संजय मोरे म्काहणाले,’काश्मिर खोऱ्यात पुन्हा काश्मिरी हिंदू पंडितांवर हल्ले होऊन सलग हत्यासत्र सुरू झाले आहे. ज्ञानवापी मशिद, ताजमहालाखालचे शिवलिंग शोधणारे, रस्त्यावर हनुमान चालिसा पठण करून महागाई आणि काश्मीर हत्या विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करू पाहणारे सर्व नवहिंदुत्ववादी कश्मीरातील हिंदूंच्या हत्या आंधळे बहिरे बनुन पहात आहेत. अशावेळी पंडितांच्या समर्थनासाठी महाराष्ट्रातूनच गर्जना झाली आहे, काश्मिरी पंडितांना महाराष्ट्र आधार देईल, काय हवं ते करेल असा 56 इंच छातीचा दिलदारपणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवून महाराष्ट्र हा आधार या भारताचा आणि हिंदुचा हेच सिद्ध केले काश्मिरी प्रजा तळमळत आहे, आणि राजा सत्तेचा आठवा उत्सव साजरा करीत आहे. महाराष्ट्राने पंडितांच्या आधारासाठी बाहू पसरले आहेत, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची हीच परंपरा आहे…

मराठी भाषा भवन मराठीला जागतिक दर्जा मिळवून देईल : विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

मराठी भाषेच्या नियोजन कार्यशाळेत व्यंगचित्र, ग्राफिटी आणि काव्य या विषयांच्या विशेष विभागाची केली सुचना

मुंबई विद्यापीठ, राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग याबाबत हे काम करीत आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे मराठी प्रेमींना एक जिव्हाळ्याच्या विषयावरचे काम मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मराठी भाषा विभाग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने होत आहे ही एक अत्यंत भावनिक आणि मनाला भिडणारी बाब आहे.

मराठी भाषा भवन उभे राहत असतानाच राज्यात मराठी भाषेच्या विकासाचे काम होत असतानाच पद्य कविता, ग्राफिटी यांच्यासोबत व्यंगचित्र या महत्त्वाच्या कला प्रकाराची निर्मिती व त्याबाबतच्या प्रक्रिया याबाबतचे संहितीकरण भाषेच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे. या माध्यमातून अनेक मराठी साहित्यिक महत्त्वाच्या पैलूबाबत चिंतन व अभ्यास होईल.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्र बाबत विशेष योगदान होते. या अनुषंगाने गेल्या काही वर्षांत या विषयात उल्लेखनीय काम केलेल्या अनेक व्यंगचित्रकारांच्या अभिव्यक्तिला त्यात स्थान असावे, असे आवाहन आज डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

मराठी भाषेच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व काम करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी काम करणार आहे. या कामासाठी निधीची कमतरता पाडणार नाही, असे यावेळी मराठी भाषा विभाग मंत्री ना. श्री. सुभाष देसाई यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवर साहित्यिकांना मराठी शब्दकोश पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मराठी भाषा विभागाचे मंत्री महोदय ना. सुभाष देसाई यांनी हे पुस्तक देऊन विशेष सत्कार केला. या कार्यशाळेत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश देवी, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. हरी नरके, डॉ. राजा दीक्षित, डॉ. सदानंद मोरे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ.रेणुका ओझरकर, श्री. भूपाल रामनाथकर, भाषा संग्रहालयाचे संचालक श्री. सव्यासाची मुखर्जी, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गाग राणी, सहसचिव मिलिंद गवादे, संजय पाटील, विशेष कार्य अधिकारी सुचित्रा देशपांडे, प्रदीप ठाकरे आदी उपस्थित होते.

भारतीय रेल्वेने आयआरसीटीसीचे संकेतस्थळ तसेच ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन आरक्षण केल्या जाणाऱ्या तिकिटांची मर्यादा वाढविली

0

नवी दिल्ली, 6 जून 2022

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने ऑनलाईन पद्धतीने आरक्षण  केल्या जाणाऱ्या तिकिटांची  संख्या वाढवली आहे. आधार क्रमांकाशी संलग्न नसलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे याआधी एका महिन्यात जास्तीतजास्त 6 तिकिटे काढता येत होती मात्र नव्या नियमानुसार, ही मर्यादा 12 तिकिटांपर्यंत वाढविण्यात आली आहे. आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे आता एका महिन्यात 12 ऐवजी 24 तिकिटे काढता येऊ शकतील. अर्थात या तिकिटांचे  आरक्षण  करणाऱ्या प्रवाशांपैकी कोणत्याही एका प्रवाशाच्या तिकीटाची आधार क्रमांकद्वारे  पडताळणी केली जाईल असे रेल्वेने म्हटले  आहे.

सध्या रेल्वे विभागाचे आयआरसीटीसी संकेतस्थळ तसेच ॲप यांचा वापर करून आधार क्रमांकाशी संलग्न नसलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीतजास्त 6 तिकिटे काढता येतात आणि आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीतजास्त 12 तिकिटे काढता येतात आणि यातील कोणत्याही एका प्रवाशाच्या तिकीटाची आधार क्रमांक वापरून पडताळणी केली जाते.

महसुलातील तूट भरून काढण्यासाठी 14 राज्यांना 7,183 कोटी 42 लाख रुपयांचे अनुदान वितरीत

0

वर्ष 2022-23 मध्ये महसुलातील तूट भरून काढण्यासाठी राज्यांना एकूण 86,201 कोटी रुपयांचे अनुदान

नवी दिल्ली, 6 जून 2022

वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने आज 14  राज्यांना 7,183 कोटी 42 लाख कोटी रुपयांचा पोस्ट डिव्होल्यूशन रेव्हेन्यू डेफिसिट (PDRD) अनुदानाचा तिसरा मासिक हप्ता वितरीत केला आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार हे अनुदान देण्यात आले आहे.

पंधराव्या वित्त आयोगाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 14 राज्यांना एकूण 86,201 कोटी  पोस्ट डिव्हॉल्यूशन रेव्हेन्यू डेफिसिट ग्रँटची शिफारस केली आहे. शिफारस केलेले अनुदान शिफारस केलेल्या राज्यांना व्यय विभागाकडून 12 समान मासिक हप्त्यांमध्ये जारी केले जाते. जून, 2022 महिन्यासाठी 3 रा हप्ता वितरीत केल्यामुळे, 2022-23 मध्ये राज्यांना जारी करण्यात आलेल्या महसूल तूट अनुदानाची एकूण रक्कम रु. 21हजार 550 कोटी 25 लाख इतकी आहे.

राज्यघटनेच्या कलम 275 नुसार राज्यांना विकासोत्तर महसूल तूट अनुदान दिले जाते. हस्तांतरणानंतर राज्यांच्या महसूल खात्यातील तफावत भरून काढण्यासाठी वित्त आयोगांच्या शिफारशींनुसार राज्यांना लागोपाठ अनुदान जारी केले जाते.

हे अनुदान मिळण्यासाठी राज्यांची पात्रता आणि 2020-21 ते 2025-26 या कालावधीसाठी अनुदानाचे प्रमाण हे पंधराव्या आयोगाने राज्याच्या महसूल आणि खर्चाच्या मूल्यांकनातील तफावतीच्या आधारे निश्चित केले होते. या काळात.

2022-23 या कालावधीत पंधराव्या वित्त आयोगाने ज्या राज्यांना विकासोत्तर महसूल तूट अनुदानाची शिफारस केली आहे ती पुढीलप्रमाणे आहेत: आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल.

2022-23 साठी शिफारस केलेल्या डिव्हॉल्यूशन रेव्हेन्यू डेफिसिट ग्रँटचा राज्यवार तपशील आणि राज्यांना तिसरा हप्ता म्हणून जारी केलेली रक्कम खालीलप्रमाणे आहे:

(Rs in crore)

S. No.Name of StatePDRDG recommended by FC-XV for the year 2022-23.Amount of 3rd instalment released for the month of June, 2022.Total PDRDG released to States during 2022-23.
1Andhra Pradesh10,549879.082637.25
2Assam4,890407.501222.50
3Himachal Pradesh9,377781.422344.25
4Kerala13,1741097.833293.50
5Manipur2,310192.50577.50
6Meghalaya1,03386.08258.25
7Mizoram1,615134.58403.75
8Nagaland4,530377.501132.50
9Punjab8,274689.502068.50
10Rajasthan4,862405.171215.50
11Sikkim44036.67110.00
12Tripura4,423368.581105.75
13Uttarakhand7,137594.751784.25
14West Bengal13,5871132.253396.75

तीनही वीज कंपन्यांसमोर आर्थिक स्थिती सुधारण्यांचे आव्हान – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

0

मुंबई, दि. ६ जून २०२२: ऊर्जा ही प्रगतीचे इंजिन आहे. या इंजिनाला गती व इंधन देण्याचे आव्हान वीज कंपनीचे कर्मचारी निश्चितपणे पार पाडतील असा विश्वास राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज व्यक्त केला. महावितरणच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथील महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 

६ जून हा जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. या दिवशी मराठी मातीत उगविलेल्या स्वराज्याच्या सुर्याने राज्याला व देशाला हजारो वर्ष पुरेल अशी ऊर्जा निर्माण केली आहे. त्याच दिवशी महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या कंपन्यांचा स्थापना दिन. ऊर्जेचा संबंध थेट प्रगतीशी असल्याने ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, या तीनही कंपन्यांसमोर आज “आर्थिक आरोग्य” सुधारणे, वीज पुरवठ्याची सरासरी किंमत कमी करणे, कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा करणे, शाश्वत आधारावर वाजवी दरात दर्जेदार वीज उपलब्ध करून देणे, कोळसा संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढणे, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांच्या क्रॉस सबसिडीचा भार कमी करून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम करणे, नूतनीकरणक्षम ऊर्जेचे प्रमाण वाढवणे जेणेकरुन कार्बन फूट प्रिंट मोठ्या प्रमाणात कमी केली तरच  या कंपन्या चांगली कामगिरी करू शकतील आणि राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकतील.  

लवकरच बसविण्यात येणारे स्मार्ट मीटर हे प्राधान्याने प्री-पेड आणि पोस्टपेड असतील. स्मार्ट मीटरच्या वापरामुळे वीज उपकंपन्यांची आर्थिक व्यवहार्यता सुनिश्चित होईल,अशी अपेक्षा आहे. स्मार्ट मीटरमुळे मनुष्यबळावरील खर्चही कमी होण्यास मदत होईल, असे नियोजन असल्याची माहिती डॉ राऊत यांनी दिली. अलिकडच्या काळात प्रभावी कोळसा व्यवस्थापनाच्या माध्यमातून उत्पादन खर्च 30 ते 40 पैसे प्रति युनिटने कमी झाला आहे. महानिर्मिती वीज निर्मितीच्या विविध पर्यायांबाबत लवचिक भूमिका घेत आहोत.

शेतकरी हा सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्याला २४ तास वीज पुरवठा व सामान्यांना स्वस्त व गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा करण्याला प्राधान्य दिल्या जात आहे. कृषी पंप धोरणांतर्गत राज्यातील शेतक-यांचा एक तृतियांश थकबाकी माफी करण्याचे ऐतिहासिक काम केले असून नियम व निकषांनुसार सर्व शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेतला तर या शेतक-यांना सुमारे ३० हजार कोटींच्या वीज बिल माफी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात इतर गुंतवणूक दार मोठया प्रमाणात यावेत, त्यांनी गुंतवणूक करावी व इथल्या स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी विभाग कटीबद्ध आहे. स्वितर्झलॅण्ड येथील परिषदेत सहभागी होत ५४ हजार कोटींची गुंतवणूक ऊर्जा क्षेत्रासाठी आणली आहे. यातील ४ हजार कोटी हे केवळ विर्दभासाठी असणार आहेत. अपारंपारीक ऊर्जा हे नवीन उद्योजकांसाठी मोठे दालन म्हणून उपलब्ध होणार आहे. थोडक्यात देशी परदेशी गुंतवणूक दारांना जास्तीच जास्त सोई सुविधा देण्यासाठी ऊर्जा विभाग सिध्द असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील उद्योगजकांनी इतर राज्यांबरोबर स्पर्धात्मक राहण्यासाठी त्यांना वाजवी वीज दर व इतर सोई सुविधा देण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही देत डॉ. नितीन राऊत यांनी व्यवसायीक, औदयोगिक, घरगुती व कृषी वीज पंप ग्राहकांना तसेच उद्योगांना इतर राज्यांपेक्षा स्वस्त व गुणवत्तापूर्ण वीज मिळावी यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजय खंदारे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी महावितरण व महानिर्मितीचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरणचे अस्तित्व टिकवणे ग्राहक-कर्मचाऱ्यांच्या हातात

0

मुंबई : दिनांक ०६ जून २०२२;- ‘महावितरण हे देश पातळीवर अनेक राज्यांच्या तुलनेत सक्षमच आहे. ग्राहकांनी घेतलेल्या सेवेचे मुल्य दिले पाहिजे तरच कोणताही व्यवसाय टिकू शकतो. सरकारी कंपन्याही यास अपवाद नाहीत. मात्र दुर्दैवाने भारतीय समाजास जात धर्म, प्रदेश आदी बाबी कळतात मात्र ऊर्जा क्षेत्राचे महत्व कळत नाही. त्यामुळेच महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत कंपनीचे खाजगीकरण टाळायचे असेल तर महावितरणमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाच्या गुणवत्तेत वाढ केली पाहिजे तसेच वीज बिलाची वसूली केली पाहिजे. ग्राहकांनीही वेळेत बिल भरले पाहिजे. अन्यथा महावितरणचे खाजगीकरण टाळणे अशक्य आहे,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.

            महावितरणच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त प्रकाशगड येथील सभागृहात आयोजित ‘विद्युत क्षेत्रातील सद्यस्थिती व आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल होते. याप्रसंगी संचालक(वित्त) रवींद्र सावंत, संचालक(संचालन) संजय ताकसांडे, संचालक(प्रकल्प) प्रसाद रेशमे, संचालक(वाणिज्य) डॉ.मुरहरी केळे व संचालक (मानव संसाधन) डॉ.नरेश गीते यांची प्रमुख उपस्थिती होती.

            कुबेर पुढे म्हणाले, ‘जगातिक स्तरावर कोणत्याही देशाची विकासाची दिशा व वेग हे ऊर्जा क्षेत्र घडवत असते. नागरिकांना मागेल तेवढी ऊर्जा उपलब्ध असली पाहिजे, हेच प्रगतीचे लक्षण आहे. भविष्यातील विजेच्या गरजेचे नियोजन करताना मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. राज्याच्या बाबतीत विचार करता लोकांनी बिले न भरल्यास व भूमिका न घेतल्यास लोकांच्या मालकीची असलेली कोणतीच सरकारी कंपनी अस्तित्वात राहणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कठोर भूमिका घेऊन वसुली केली पाहिजे, याला कोणताच दुसरा पर्याय नाही. राजकीय भूमिकेतून ग्राहकांकडून वीजबिल वसुलीस विरोध असल्यास सरकारने आपल्या निधीतून महावितरणला पैसे उपलब्ध करून द्यावेत.’

            अध्यक्षीय भाषणात विजय सिंघल म्हणाले, ‘कोरोना काळात आणि त्या नंतर सर्वच कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मात्र आपल्या समोरील आव्हाने अजून संपली नाहीत. अजून व्यावसाईक पद्धतीने काम करावे लागेल. थकीत वीजबिल वसूल करणे, वीजहानी कमी करणे आदी बाबींवर काम करावे लागेल. क्षेत्रीय स्तरावर कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याने अजून प्रयत्न वाढवल्यास हे कामही अवघड नाही.’

            या कार्यक्रमास प्रकाशगड येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली उपस्थिती लावली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली निमजे यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक(प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी मानले. तत्पूर्वी वर्धापन दिनानिमित्त प्रकाशगड इमारतीच्या परिसरात मानवी शृंखला करण्यात आली.

कोलते-पाटील डेव्हलपर्स आणि टाटा पॉवर यांची भागीदारी इलेक्ट्रिक वाहन वापर सुविधाजनक बनवून पर्यावरण पूरक विकासाला चालना देणार

पुणेमुंबई आणि बंगलोरमधील सर्व कोलते-पाटील प्रकल्पांमध्ये इव्ही चार्जिंगच्या पायाभूत सोयीसुविधा पुरवल्या जाणार 

पुणे ६ जून, २०२२:  इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सेवासुविधा पुरवणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी टाटा पॉवरने पुणे-स्थित आणि मुंबई व बंगलोरमध्ये देखील वेगवान आगेकूच करत असलेले, आघाडीचे स्थावर मालमत्ता विकासक कोलते-पाटील डेव्हलपर्ससोबत (केपीडीएल) भागीदारी केली आहे.  पुणे, मुंबई आणि बंगलोर या शहरांमधील सर्व कोलते-पाटील प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांना चार्जिंगच्या सर्वसमावेशक सुविधा पुरवण्यासाठी चार्जिंग स्टेशन्स सेट अप करण्यासाठी टाटा पॉवरसोबत भागीदारी करण्यात आली आहे.

शहरी भागांमध्ये वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या हवामान बदलाच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी हरित, पर्यावरणपूरक वाहतुकीच्या उपाययोजनांमध्ये इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिंगच्या पायाभूत सोयीसुविधा महत्त्वाची भूमिका बजावतात. इव्ही चार्जिंगच्या अखंडित सुविधा पुरवण्यात कौशल्य आणि आजवर बजावलेली यशस्वी कामगिरी यांच्या बळावर टाटा पॉवर कोलते-पाटील डेव्हलपर्सच्या निवासी ग्राहकांना श्रेणीतील सर्वोत्कृष्ट इव्ही चार्जिंग सुविधा प्रदान करेल. यामुळे त्यांची इ-मोबिलिटी अधिक सुविधाजनक बनेल शिवाय त्यांना एकसमान, सर्वव्यापी इव्ही चार्जिंग अनुभव मिळवता येईल.

आपल्या ग्राहकांना सर्वसमावेशक चार्जिंग सुविधा पुरवण्यात टाटा पॉवर आघाडीवर आहे, यामध्ये चार्जर्सची मालकी, उभारणी, देखभाल आणि अपग्रेडेशन यांचा समावेश आहे.  टाटा पॉवर आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स यांच्या भागीदारीमुळे केपीडीएलच्या सर्व प्रकल्पांमधील इव्ही मालकांना त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग करून घेण्याची सुविधा २४X७ उपलब्ध राहील, तसेच टाटा पॉवरच्या ईझेड चार्ज मोबाईल ऍपमार्फत मॉनिटरिंग आणि इ-पेमेंट सुविधांचा देखील त्यांना लाभ घेता येईल.

टाटा पॉवर ही इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रदान करणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे.  त्यांनी १५०० पेक्षा जास्त सार्वजनिक व अर्ध-सार्वजनिक इव्ही चार्जर इन्स्टॉल केले असून अजून ५५० पेक्षा जास्त चार्जर्सचे काम उभारणीच्या विविध टप्प्यांवर सुरु आहे. कंपनीने संपूर्ण भारतभरात १३००० पेक्षा जास्त होम चार्जर्स (खाजगी वापरासाठी) आणि २०० पेक्षा जास्त बस चार्जिंग पॉईंट्सचे नेटवर्क निर्माण केले आहे.

टाटा पॉवरच्या ईझेड चार्ज मोबाईल ऍप्लिकेशनमुळे युजर्सना इव्ही चार्जिंग स्टेशन्स कुठे आहेत ते शोधता येते, स्लॉट्सचे प्री-बुकिंग करता येते, वाहनाचे चार्जिंग, मॉनिटरिंग, इ-पेमेंट इत्यादी सुविधा मिळतात.  ग्राहकांच्या आवश्यकता आणि सोयीनुसार दिल्या जाणाऱ्या इव्ही चार्जिंग सुविधा सातत्याने वाढत असलेल्या इव्ही इकोसिस्टिमसाठी पायाभूत संरचनेचा कणा आहेत आणि त्यामुळे ग्राहकांना ऊर्जा बचतीच्या पर्यायांचा सुलभपणे वापर करता येतो.

टाटा पॉवरचे न्यू बिझनेस सर्व्हिसेसचे चीफ श्री. गुरिंदर सिंग संधू म्हणाले, महामार्गांवरनिवासी व व्यापारी संकुलांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारून टाटा पॉवर भारतामध्ये घडून येत असलेल्या इ-मोबिलिटी परिवर्तनाचे नेतृत्व करत आहे. इव्ही चार्जिंग क्षेत्रात आमच्याकडे असलेल्या तांत्रिक नैपुण्याचे बळ आणि देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये कोलते-पाटील डेव्हलपर्सची प्रचंड मोठी ग्राहकसंख्या यांचा मिलाप झाल्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे प्रमाण वेगाने वाढेल यात काहीच शंका नाही.”

यावर प्रतिक्रिया देताना कोलते-पाटील डेव्हलपर्सचे ग्रुप सीईओ श्री. राहुल तलेले म्हणाले, “टाटा पॉवरसोबत ही भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पर्यावरणसमाजप्रशासन (ईएसजी) आणि ग्राहक-केंद्री दृष्टिकोन या गोष्टी आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. कोलते-पाटील डेव्हलपर्स पर्यावरणस्नेही वास्तू उभारतातज्यांची रचना व अंमलबजावणी आजच्यासाठी सर्वोत्तम आणि भविष्यासाठी सज्ज आहे. टाटा पॉवरसोबत भागीदारीमुळे आम्ही आमच्या प्रकल्पांमधील रहिवाशांची जीवन गुणवत्ता स्मार्ट व पर्यावरणपूरक पद्धतीने अधिक जास्त सुधारू शकणार आहोत.”

येत्या भविष्यकाळात निवासी आणि व्यापारी संकुलांसाठी अत्यावश्यक सुविधा बनण्याची क्षमता इव्ही चार्जिंग स्टेशन्समध्ये आहे.  त्यांच्या या मागण्या वेळेत पूर्ण करण्याची क्षमता टाटा पॉवरमध्ये असून सरकारच्या नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅनला अनुसरून आवश्यक पायाभूत सुविधा पुरवून टाटा पॉवर खाजगी व सार्वजनिक वाहनांच्या इलेक्ट्रिफिकेशनला साहाय्य प्रदान करत आहे.   

लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून कार्य करावे – प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी

0

मुंबई, दि. 06 : छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाचा संदेश देऊन कार्य केले आहे. लोकाभिमुख प्रशासनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय आयोजित ‘शिवस्वराज्य दिन’ राज्य मध्यवर्ती ग्रंथालय नगर भवन, फोर्ट, मुंबईत झाला, त्यावेळी श्री. रस्तोगी बोलत होते.
या प्रसंगी मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ग्रंथ निवड समितीचे अध्यक्ष प्रताप आसबे, साहित्यिक अरुण म्हात्रे, प्र.ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले यावेळी उपस्थित होते.
श्री.रस्तोगी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या सर्वांगिण हितासाठी राज्य कारभार केला. नागरिक व तरुणांनी शिवाजी महाराजांचे चरित्र व त्यांच्या राज्य कारभाराचा अभ्यास करावा व त्यांचे कार्य समजून घ्यावे. राष्ट्रीय ग्रंथसूची आणि शासनमान्य ग्रंथालय यादी ही ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात यावी. राज्य शासनाने 6 जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करावा, असे जाहीर केले होते. त्यानुसार आज राज्यातील सर्व महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येत आहे. तसेच सातारा येथे शिवस्वराज्य दिन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित राहून हा सोहळा साजरा होत आहे, या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आणि विविध गडकिल्ल्याचे फोटो विद्यार्थ्यांसाठी अमुल्य ठेवा आहे. साडेबारा हजार सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून ही ग्रंथसंपदा, वाचकांसाठी उपलब्ध आहे, असेही श्री. रस्तोगी यांनी यावेळी सांगितले.

श्री. निवतकर म्हणाले, शिवस्वराज्य दिनाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासनात मराठी भाषेचा वापर करुन राज्य व्यवहारकोष निर्माण केला. प्रशासनात मराठी भाषेचा वापर सुरु केला. परंतु अजूनही काही बाबी मराठीतच असणे आवश्यक आहे. शिवस्वराज्य दिनापर्यंतचा इतिहास आपण ऐकतो, वाचतो, पाहतो. परंतु शिवस्वराज्यभिषेकानंतरचा इतिहास सुद्धा फार मोठा आहे. त्यावर अधिक काम केले पाहिजे आणि त्याची माहितीसुद्धा झाली पाहिजे. यासाठी साहित्यिकांनी विशेष प्रयत्न करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी यावेळी सांगितले.


साहित्यिक अरुण म्हात्रे म्हणाले, मराठी भाषा ही शिवरायांची, ज्ञानोबांची, संत तुकारामाची भाषा आहे. मराठी भाषेचा अभिमान वाटला पाहिजे. या भाषेतून आपण शिवरायांच्या कार्याची आठवण केली पाहिजे. शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट प्रत्येकांने अभ्यासला पाहिजे. कुटुंबातील, जनतेमधील, रयतेसोबतचे शिवाजी महाराज यांच्या कार्याचा अभ्यास केला पाहिजे. दु:खी माणसांना दिलासा देणारे शिवाजी महाराज होते,

ग्रंथ निवड समितीचे अध्यक्ष प्रताप आसबे म्हणाले, समानतेचा संदेश छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला. व्यक्तीला व्यक्ती म्हणून त्याचा सन्मान केला. क्षत्रियांना-शुद्रांना सामाजिक समानतेची वागणूक दिली, असे सांगून संदर्भ, ग्रंथ राज्यातील सर्व वाचनालयात उपलब्ध झाली पाहिजे. या संदर्भ ग्रंथासाठी विशेष निधी उपलब्ध करुन हे ग्रंथ राज्यात सर्व ग्रंथालयात उपलब्ध करुन द्यावेत. तसेच गड किल्ल्यांचे सुद्धा जतन आणि संवर्धन केले पाहिजे.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते 2019-20 वर्षातील ग्रंथसूची व ग्रंथ निवड यादीचे प्रकाशन करण्यात आले व राज्य ग्रंथ निवड समितीच्या उपस्थित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रातील शिवकाळातील महत्त्वाचे गड-किल्ले यांची छायाचित्रे, प्रदर्शन व शिवाजी महाराजांवरील विविध ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अमित घरड यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. बालशाहीर मन पवार यांनी शाहीरी तर प्रताप फणसे यांनी पोवाडा सादर केला.

शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता व आदरभाव व्यक्त करण्यासाठी सकाळी 9 ते 10 या वेळेत हुतात्मा चौक येथून विविध संदेशांचे फलक, जयजयकार करत शिवप्रतिमा व ग्रंथाची दिंडी काढण्यात आली. ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांनी प्रास्ताविक केले. सहायक ग्रंथालय संचालक, औरंगाबाद सुनील हुसे यांनी सूत्रसंचालन तर प्रभारी ग्रंथपाल, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबईचे संजय बनसोड यांनी आभार मानले

रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडदयावर

0

वीर मुरारबाजी …पुरंदरची युद्धगाथा चित्रपटाची घोषणा

अठरापगड जाती-जमातीच्या शूर मावळ्यांना सोबत घेत शिवरायांनी जाज्वल्य इतिहास घडविला. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात लढाया करणारे शूरवीर आणि पराक्रमी मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी सदैव तयार असत. अशा पराक्रमी आणि निष्ठावंत मावळ्यांमध्ये रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा मराठी रुपेरी पडदयावर पुढच्या वर्षी १७ फेब्रुवारी २०२३ ला येण्यासाठी सज्ज होत आहे. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांची आहे.

१६६५ च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार असलेले मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. अधिकाधिक तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहचवायचा आहे’ त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘पावनखिंड’ सारखा वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा चित्रपटही भव्यदिव्य असेल. चित्रपटासंबंधित इतर घोषणा लवकरच करण्यात येणार आहेत.

किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन सोहळा शिवभक्‍तांच्या अभूतपूर्व उत्साहात संपन्न

0

अलिबाग, दि.06 :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन सोहळा आज किल्‍ले रायगडावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवभक्‍तांच्या अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. युवराज संभाजी राजे छत्रपती व युवराजकुमार शहाजी राजे छत्रपती यांच्‍या हस्‍ते शिवाजी महाराजांच्‍या पुतळ‌्याला मंत्रोच्‍चारांच्‍या जयघोषात जलाभिषेक तसेच दुग्‍धाभिषेक करण्‍यात आला. त्यानंतर मेघडंबरीतील शिवपुतळ्याला मुद्राभिषेक करण्‍यात आला. युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी उपस्थित शिवभक्‍तांना मार्गदर्शन केले.

यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार प्रमोद (राजू) पाटील, आमदार मनोज चव्हाण, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

अखिल भारतीय शिवराज्‍याभिषेक महोत्सव समितीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. हा प्रेरणादायी सोहळा “याची देही याची डोळा” अनुभवण्‍यासाठी शिवभक्‍तांनी प्रचंड गर्दी केली होती. होळीचा माळ, बाजारपेठ, राजदरबार शिवभक्‍तांनी फुलून गेला होता.

सकाळी ध्‍वजपूजनाने सोहळ्याला सुरूवात झाली. त्‍यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी राजसदरेकडे निघाली. यावेळी महाराजांच्या जयजयकार आणि ढोलताशांच्‍या निनादाने आसमंत दुमदुमून निघाला. हजारो शिवभक्त हातात भगवे झेंडे घेवून गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष करीत होते. होळीच्‍या माळावर सुरु असलेल्या मर्दानी खेळांच्या प्रात्‍यक्षिकांनी तर राजदरबारात सुरु असलेल्या शाहिरी पोवाड्यांनी सर्व परिसर वीररसाने न्हावून निघाला होता. महाराजांची पालखी राजसदरेवर येताच मुख्य सोहळ्याला सुरूवात झाली. युवराज संभाजी राजे छत्रपती व युवराजकुमार शहाजी राजे छत्रपती यांच्‍या हस्‍ते शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्याला मंत्रोच्‍चारांच्‍या जयघोषात जलाभिषेक तसेच दुग्‍धाभिषेक करण्‍यात आला. त्यानंतर मेघडंबरीतील शिवपुतळ्याला मुद्राभिषेक करण्‍यात आला. युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी उपस्थित शिवभक्‍तांना मार्गदर्शन केले. त्‍यानंतर मुख्य पालखी सोहळ‌्याला प्रारंभ झाला. श्रीजगदीश्‍वराचे दर्शन घेवून या चैतन्यमय सोहळ्याची सांगता झाली.

रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला येणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी कार्यक्रमाची रुपरेषा, गडावर जाण्याचे व उतरण्याचे प्रमुख मार्ग, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा, अन्नछत्र, स्वच्छतागृहे, महिलांसाठी करण्यात आलेली स्वतंत्र व्यवस्था, गडाच्या पायथ्याला असलेली वाहनतळे, पायथ्याचे अन्नछत्र याची सर्व माहिती व नकाशे QR कोड च्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली होती.

शिवप्रेमींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे. गडावर व पायथ्याशी 35 ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या असून गंगासागर तलावासह 04 ठिकाणी आरओ वॉटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. गडाच्या पायथ्याला,पाचाड व कोंझर येथे वाहने पार्किंग सुविधा केली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहने पाच ते सात किमी दूर उभी करण्यात आली होती. मात्र येथून शिवप्रेमींना ये-जा करण्यासाठी खास बस सुविधा मोफत ठेवण्यात आल्या होत्या. गडावर हॅलोजन व इतर वीजपुरवठा सेवा सज्ज ठेवण्यात आली. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली. रायगडावर ये-जा करताना कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने मदतकार्य मिळावे यासाठी विविध रेस्क्यू टिम व ट्रेकर्स तैनात आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला.

आजच्या या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात “धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची” तसेच “जागर शिवशाहिरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा” व “सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा” हे कार्यक्रम उपस्थित शिवभक्तांचे प्रमुख आकर्षण ठरले.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, अग्निशमन अशा विविध शासकीय यंत्रणांसह विविध संस्था, रेस्क्यू टीम, ट्रेकर्स या सर्वांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

महाराष्ट्र सरकारने नृत्य कलेसाठी राष्ट्रीय पुरस्कार सुरू करावा – डॉ.पुरू दाधीच

पुणे- नामवंत नृत्य संस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटी च्या वतीने जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, येथे मध्य प्रदेश येथील आंतरराष्ट्रीय कीर्ती चे प्रसिद्ध कथक कलाकार महामहोपाध्याय पद्मश्री डाॅ.पुरू दाधीच (वय ८१) यांना महाराष्ट्र प्रदेश पश्चिम विभागाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक सुरेश ( नाना साहेब) जाधव यांच्या हस्ते विमल भास्कर पुरस्कार प्रदान करण्यातआला. तर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष पं. विकास कशाळकर यांच्या हस्ते डाॅ.विभा दाधीच यांना विमल भास्कर हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी रंगमंचावर प्रसिद्ध कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते, सहाय्यक आयुक्त पिं.चिं.मनपा सुषमा शिंदे,पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, नृत्य गुरू शमा भाटे, नृत्य गुरू मनीषा साठे, नृत्य गुरू रोशन दाते , माजी आमदार उल्हास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह, शेला, हार, बुके व रूपये पंचवीस हजार रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी सत्काराला उत्तर देताना डाॅ पुरू दाधीच म्हणाले ” मला अनेक पुरस्कार मिळाले पण हा पुरस्कार माझ्या साठी विशेष आहे. आपल्या जवळच्या व्यक्ती कडुन सन्मान मिळाला त्या मुळे त्याचे महत्त्व अधिक आहे. नंदकिशोर कपोते यांना मी खूप खूप धन्यवाद देतो ,व महाराष्ट्र सरकारने आता राष्ट्रीय पुरस्कार सुरू करावा ही इच्छा व्यक्त करतो”. या वेळी प्रांत संघचालक सुरेश जाधव म्हणाले ” डॉ. पुरू दाधीच यांनी महाराट्र शासनाने राष्ट्रीय पुरस्कार सुरू करावा ही इच्छा व्यक्त केली, त्यांचे हे म्हणणे मी शासनाच्या योग्य व्यक्तीपर्यंत जरूर पोहचवेन.” तर पं.विकास कशाळकर म्हणाले,” डॉ.पुरू दाधीच व डॉ. विभा दाधीच यांची विमल भास्कर पुरस्कारासाठी अतिशय योग्य निवड झालेली आहे, कारण त्यांचे कथक नृत्यातील योगदान मोलाचे आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी कथक नृत्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत व कथक नृत्याचे शास्त्रीय स्वरूप सिद्ध केलेले आहे.”
सर्व मान्यवरांचे डॉ. नंदकिशोर कपोते व राजेंद्र कपोते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यानंतर पद्मश्री डॉ. पुरू दाधीच यांनी मध्ययुगीन कथक नृत्य व कथक शास्त्र यावर व्याख्यान देऊन बहारदार नृत्यप्रदश॔न केले. प्रारंभी स्वतः डॉ.पुरू दाधीच यांनी ८१ व्या वर्षी शिव – पार्वती वंदना सादर करून रसिकांना आश्चर्यचकित केले. यानंतर त्यांचे शिष्य पियूष राज यांनी गणेश वंदना, सुनील सुंकरा यांनी पुष्पांजली व भूमिपूजन सादर केले तसेच हर्षिता दाधीच यांनी रंगदेवतांची पूजा, ‘ कस्तुरी तीलकम् ‘ प्रस्तुत केले. कार्यक्रमाचे निवेदन कीर्ती रामदासी यांनी केले.

प्रशासकांचे नावे ,सत्ता अजितदादांची … मग विकास कामे कशी होत नाहीत ? आप चा सडेतोड सवाल

प्रतिभा आणि प्रतिमा असलेल्या उमेदवारांना निवडून द्या.
“आप”च्या स्वराज्य निर्धार मेळाव्यात नागरिकांना आवाहन

पिंपरी चिंचवड- येथील पाटीदार भवन येथे आप चा स्वराज्य मेळावा मोठ्या जल्लोषात पार पडला. आप चे महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रमुख महादेव नाईक, राज्य अध्यक्ष रंगा राचुरे, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत,राज्य सचिव धनंजय शिंदे,राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार,, युवाध्यक्ष अजिंक्य शिंदे, आप वाहतूक विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, युवा उपाध्यक्ष संदीप सोनावणे, पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, आप पिंपरी चिंचवड प्रमुख अनुप शर्मा व इतर अनेक पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते या सोबतच शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या वेळी आम आदमी पक्षा मधे प्रवेश केला

या मेळाव्यात निवडणूक प्रभारी महादेव नाईक,प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, संघटनमंत्री विजय कुंभार, सचिव धनंजय शिंदे आदी प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते रंगा राचुरे यांनी प्रस्थापित पक्षांच्या विरोधात तोफ डागत,स्थानिक तसेच राज्य पातळीवर सरकारच्या अकार्यक्षमतेची जाणीव करून दिली,मुख्य मुद्द्यांना बगल देत धार्मिक तेढ निर्माण करत सामाजिक वातावरण बिघडवून आपली अकार्यक्षमता झाकण्याचा प्रयत्न सरकारे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आप तर्फे केल्या जाणाऱ्याकामांची माहिती देत राज्य आणि देश पातळीवर पक्षाची होत असलेली वाढ सांगत,स्थानीक पातळीवर देखील पक्षाने लोकांचे प्रश्न हाती घेत घराघरा पर्यंत पोहोचावं असं कार्यकत्यांना आवाहन केलं. निवडणुकीच्या निमित्ताने विविध आंदोलने व कार्यक्रम हाती घेत, सामान्य जनते पर्यंत पक्ष आणि त्याचा विचार पोहोचवण्याचा आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दिला. उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधत, आपल्या कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी जनतेने आम आदमी पक्षाला सत्तेवर आणावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

पिंपरी चिंचवड-ज्या नागरिकांच्या कराच्या पैशांतून महानगरपालिकेचा कारभार चालतो,त्या नागरिकांना दर्जेदार सेवा वेळेत देणे,हे आमचे परम कर्तव्य आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात येथील करदात्या सुजाण,सुविद्य तसेच श्रमिक जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम आदमी पार्टी बांधील आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टक्केवारीच्या राजकारणावर टीका केली मात्र टक्केवारीच्या राजकारणाची परंपरा राष्ट्रवादी ची आणि तीच परंपरा भाजपने पुढे सुरू ठेवली त्यामुळे कमिशन आणि टक्केवारी साठी स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबवताना कोणतेही निर्धारित मुदतीची बंधने नाहीत,आणि अनेक प्रोजेक्ट प्रलंबित आहेत.त्याचे खर्च वाढविले जातात.भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष टक्केवारीसाठीच काम करत आहेत.असा आरोप चेतन बेंद्रे यांनी केला आहे.
सर्वोपचार मोफत आरोग्य सेवा,पूर्ण दाबाने चोवीस तास शुद्ध पाणी पुरवठा,परिपूर्ण सुरक्षित रस्ते,सरकारी घरकुल योजना आणि निवारा हक्क इ मूलभूत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी ‘नागरिकांची सनद’ आम्ही जनतेसमोर सादर करणार आहोत.शहरातील नागरिकांनी आम आदमी पार्टीला येत्या निवडणुकीत विजयी करावे,असे आवाहन कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी निगडी येथील स्वराज्य निर्धार मेळाव्यात केले.

विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 6 – शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून आता जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक आहेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे अंगभूत गुण आणि कौशल्य ओळखून त्यामध्ये त्यांना पारंगत करणारे जगातील सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील बदल, जागतिकीकरणातील अनिश्चितता यांना आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र यंग लिडर्स अस्पीरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम’ (MYLAP- मिलाप) ची सुरूवात होत आहे. याअनुषंगाने ‘एचसीएल’ तसेच ‘ईएन पॉवर’ यांच्यासमवेत आज दोन सामंजस्य करारांचे हस्तांतरण करण्यात आले. त्यावेळी श्री.पवार बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार राहूल नार्वेकर, शिक्षण विभागाचे सचिव रनजितसिंह देओल, समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे आदींसह एचसीएल आणि ईएन पॉवर कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञानावर भर देऊन कौशल्य विकास, जगाला सामोरे जाण्याचे धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समजून घेणे गरजेचे असून शिवराज्याभिषेक दिनी हे करार होणे हा चांगला योग आहे. प्रा.वर्षा गायकवाड यांनी हा योग साधून आजच्या दिवशी या कार्याचा शुभारंभ केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून स्पर्धेच्या युगात टिकून विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी हे करार महत्त्वपूर्ण असल्याचे श्री.पवार म्हणाले. येथेच न थांबता अभ्यासक्रमाचा आशय आणि विषय बदलून बदलांसोबत जुळवून घेणारे तसेच उद्योजकतेची मानसिकता निर्माण करणारे शिक्षण द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे- बाळासाहेब थोरात

बुद्धीमत्ता ही कुठेही असू शकते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात वाडी-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी अपेक्षा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. कोविडच्या प्रादूर्भावामुळे प्रत्यक्ष शिक्षणावर मर्यादा आल्या होत्या. आता दोन्ही करारांच्या माध्यमातून शिक्षण विभाग नवी झेप घेण्यासाठी सज्ज झाला असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या काळानुसार शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे आणि विद्यार्थी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम झाला पाहिजे, यासाठी प्रा.वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभाग करीत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

विद्यार्थी हे राष्ट्राचे भवितव्य- प्रा.वर्षा गायकवाड

आपला देश तरूणांचा देश आहे. विद्यार्थी हे राष्ट्राचे भवितव्य तर आजचे अस्तित्व आहेत. त्यांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेबाबत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आज एचसीएल आणि ईएन पॉवर यांच्यासमवेत सामंजस्य कराराचे हस्तांतरण करण्यात आले आहे. यापुढे इतरही सर्व क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

प्रा.गायकवाड म्हणाल्या, या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विभागाने क्रांतीकारी पाऊल टाकले आहे. विद्यार्थी तंत्रज्ञान, कौशल्य विकास यात कुठेही मागे राहणार नाही यासाठी एचसीएल टेक्नॉलॉजी या जागतिक दर्जाच्या कंपनीमार्फत गणित विषयात 60 गुणांसह 12 वी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहा महिन्यानंतर त्यांना लाईव्ह प्रोजेक्टवर काम करण्याची देखील संधी मिळणार असून दरमहा मानधन देखील दिले जाणार आहे. यामुळे सुमारे 20 ते 25 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊन 12 वी नंतर आयटी प्रोफेशनल बनण्याची संधी मिळणार आहे. यासाठी आजपासून नोंदणी सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, स्वजीवी महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत राज्यातील 488 आदर्श शाळांमधील सहावी ते नववी च्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता घडविणारा अभिनव प्रकल्प सुरू होत आहे. स्वजीवी म्हणजे स्वप्न, जिद्द आणि विश्वास या त्रिवेणीच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याचा तसेच नोकरीच्या संधी कमी होत असलेल्या काळात विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी तयार करणारा प्रकल्प आहे. भविष्यात टप्प्याटप्प्याने इतरही शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन असून विद्यार्थ्यांना इतरही उपयुक्त प्रशिक्षण उपलब्ध व्हावे यादृष्टीने विविध राज्ये आणि देशांसमवेत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षणाला पर्याय नाही- अस्लम शेख

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असून शिक्षणाला पर्याय नसल्याचे सांगितले. जगात सध्या संधींबरोबरच आव्हाने देखील आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, याबद्दल शालेय शिक्षण विभागाचे अभिनंदन केले.

प्रारंभी राज्य प्रकल्प संचालक श्री.पगारे यांनी प्रास्ताविकाद्वारे एचसीएल सोबत होत असलेल्या कराराची तर शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी ईएन पॉवर समवेत होत असलेल्या कराराबाबतची माहिती दिली. एचसीएलच्या वतीने सुब्बारमण यांनी तर ईएन पॉवरच्या वतीने सुशील मुणगेकर यांनी कराराचे हस्तांतरण केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपग्रहाच्या साहाय्याने 35 जिल्ह्यांमध्ये जोडण्यात आलेल्या शाळांमधून अमरावतीच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

अदानी  स्पोर्ट्सलाईनकडे गुजरात, तर जीएमआरकडे तेेलंगणा संघाची मालकी 

पुणे, दि. 6 जून 2022 – अदानी आणि जीएमआर समूह या देशातील प्रमुख उद्योगसमूहांनी अनुक्रमे गुजरात व तेलंगणा संघांची खरेदी केल्यामुळे अल्टिमेट खो खो लीग स्पर्धेला मोठेच पाठबळ मिळाले आहे. भारतातच जन्माला आलेला आणि वाढलेल्या खो खो या खेळाच्या नव्या लीगला 2022 मध्येच प्रारंभ होण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
डाबर समूहाचे अध्यक्ष अमित बर्मन यांच्या पुढाकाराने आणि भारतीय खो खो संघटनेच्या सहकार्याने अस्सल देशी मातीत जन्मलेल्या खो खो या वेगवान खेळाचा नव्या युगाला साजेसा नवा आधुनिक आणि व्यावसायिक अवतार सर्वांच्या घराघरात पाहायला मिळावा, याकरिता प्रयत्न सुरू आहेत.
अल्टिमेट खो खो लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेन्झिंग नियोगी यावेळी म्हणाले की, अल्टिमेट खो खोच्या रूपाने या प्राचीन खेळाचा नवा अवतार सर्वांसमोर आणून त्याची लोकप्रिंयता वाढविण्यासाठी आमच्या प्रयत्नात नव्याने सामील होणार्‍या अदानी आणि जीएमआर या उद्योगसमूहांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. या प्रायोजकांचे पाठबळ आमच्यासाठी बहुमोल ठरणार आहे. खो खोला नवसंजीवनी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
अदानी स्पोर्टसलाईन या अदानी समूहाच्या विभागाने याआधी अनेक क्रीडासमूहांना पाठिंबा दिला असून त्याद्वारे नवनव्या रूपात दर्जेदार खेळाडू आणि नवे स्टार घडविण्यासाठी व देशातील युवकांना प्रेरणा देण्याकरिता त्यांचा प्रयत्न आहे, असे सांगून अदानी स्पोर्टसलाईनचे संचालक प्रणव अदानी म्हणाले, की आणखी एका अस्सल देशी खेळाला पाठिंबा देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. कबड्डी आणि मुष्टियुद्ध या खेळांमधील आमच्या सहभागामुळे खो खो या नव्या देशी क्रीडाप्रकारालाही लोकप्रियता मिळवून देण्याचा विश्‍वास आम्हाला वाटला. गुणवान खेळाडू शोधून काढून त्यांना पुढे आणणे, भारतात नव्याने क्रीडासंस्कृती विकसित करणे आणि त्याद्वारे भारताला जागतिक क्रीडाक्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवून देणे हेच आमचे लक्ष्य आहे.
दरम्यान क्रिकेट आणि कबड्डी यांच्या माध्यमातून जीएमआर समूहाने याआधीच क्रीडाक्षेत्रात पदार्पण केले आहे. आता खो खोच्या रूपाने नव्या देशी खेळाला पाठिंबा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगून जीएमआर समूहाचे कॉर्पोरेट चेअरमन किरणकुमार ग्रांधी म्हणाले, की तेलंगणा संघाची खरेदी करून दक्षिण भारतातही खो खोची लोकप्रियता उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सुमारे 15 वर्षांपूर्वी कंपनीची स्थापना केल्यापासून क्रिकेट आणि मुष्टियुद्धासह कुस्तीसारख्या खेळातूनही क्रीडाक्षेत्राशी असलेली बांधिलकी सिद्ध करण्याचा जीएमआर समूहाने प्रयत्न केल्याचे सांगून श्री. ग्रांधी म्हणाले, की तळागाळाच्या स्तरावरील गुणवान खेळाडू टिपून त्यांच्यासाठी आधुनिक क्रीडा प्रशिक्षण अकादमी स्थापन करण्याचा आमचा मानस आहे.
अल्टिमेट खो खो लीगने आपले अधिकृत प्रक्षेपण हक्क याआधीच सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया यांना दिले असून तेच त्यांचे अधिकृत ब्रॉडकास्टिंग पार्टनर आहेत. त्यामुळे अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या सर्व सामन्यांचे सोनी समूहाच्या सर्व क्रीडा वाहिन्या, तसेच सोनी लिव्ह या ओटीटी वाहिनीवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.