Home Blog Page 1935

महाराष्ट्राचा हरियाणात विजयी जल्लोष

0

पंचकुला, दि. 9 : खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या कबड्डी, मल्लखांब, कुस्ती, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, सायकलिंग आदी संघांनी चांगली कामगिरी केली आहे. काही खेळाडूंनी बुधवारी बारावीच्या निकालातही आपली छाप पाडली. प्रत्येक विजयानंतर हरियाणाचे मैदान विजयी जल्लोषाने दुमदुमून जात आहे.

सांघिक विजयानंतर विजयाचा जल्लोश केला जात आहे. अॅथलेटिक्समध्ये मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविल्यानंतर जल्लोषात खेळाडूंसह क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, मुख्य व्यवस्थापक अरूण पाटील, अॅथलेटिक्सचे प्रशिक्षक महेश पाटील, जयकुमार टेंबरे, खेळाडू यांच्यासह पालकही सहभागी झाले.

यांनी गाजवले बारावीचे मैदान

दरम्यान खेळासोबतच बारावीच्या निकालातही या खेळाडूंनी आपली छाप पाडली. आयएससी पॅटर्नमधून शिकत असलेल्या आर्यन कदम याला बारावी परीक्षेच्या पहिल्या सत्रात ८२ टक्के गुण मिळाले. तर बुधवारी बारावी परीक्षेच्या निकालात आर्यन पाटील (५६ टक्के, पनवेल) आणि सार्थक शेलार (५० टक्के, कोल्हापूर) यांनीही चांगले गुण घेतले. तर आर्यन कदमने ४ बाय १०० रिलेमध्ये सुवर्ण आणि २०० मीटरमध्येही सुवर्ण कामगिरी केली आहे. आर्यन पाटीलला उंच उडीत रौप्य मिळाले. सार्थकला रिलेमध्ये सुवर्ण पदक मिळाले. मुलींच्या संघातील वाणिज्य शाखेतील वैष्णवी कातुरे मैदान गाजवताना ६८.३३ टक्के गुण मिळवले. कॉम्प्युटर सायन्सला असलेल्या रिया पाटील ७५.१७ टक्के गुण मिळाले.

दृष्टीदान सप्ताह

0

सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० जून हा दिवस ‘दृष्टिदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. मृत्यूनंतर नेत्रदान करावे, याच्या प्रसारासाठी स्वयंसेवी संस्था पुढे सरसावत आहेत. आज २१ व्या शतकातील विज्ञान इतके पुढे गेले आहे, की एका व्यक्तीचे डोळे आणि पर्यायाने त्याची दृष्टी घेऊन ते दुसऱ्याला म्हणजे ज्या व्यक्तीला दृष्टी नाही, अशा व्यक्तीला सहज देता येतात.

डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे. परंतु, काही व्यक्ती यापासून वंचित असतात. काही कारणास्तव त्यांना अंधत्व प्राप्त होते. त्यामुळे अशा व्यक्ती जगाचे सौंदर्य पाहू शकत नाहीत, सौंदर्याने भरलेली सृष्टी ज्यांना पाहता येत नाही. या व्यक्तींना नेत्र मिळाले, तर ते सृष्टीचा आस्वाद घेऊ शकतील. परमेश्वराने माणुसकी या नात्याने दृष्टी असणाऱ्या व्यक्तीने दृष्टिहीन व्यक्तीला नेत्रदान केले, तर दात्याच्या जीवनाचे नक्कीच सार्थक होईल. एकंदरित काय, दृष्टी ही फार महत्त्वाची आहे. कलियुगात दानाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. अवयवदान, रक्तदान, नेत्रदान आदींना फार महत्त्व आहे.

भारत सरकारने यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. दृष्टिविकार प्रतिबंधक आणि अंधत्व नियंत्रण कार्यक्रम हा शंभर टक्के केंद्र सरकार पुरस्कृत असून, अनेक नेत्रपेढ्या, फिरती नेत्रपथके कार्यरत आहेत. राज्यात सुमारे नऊ लाखांपेक्षा जास्त अंध व्यक्ती असून, या नेत्रदान जागृतीमार्फत लाखो व्यक्तींना दृष्टी प्राप्त होऊ शकते. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान मानण्यात आले आहे. शिवाय नेत्रदान हे मृत्यूनंतर करायचे असल्याने कसलीच भीती नाही. नेत्रदानासाठी व्यक्तीच्या मृत्यूनंतर दोन तासांच्या आत डोळे काढले पाहिजेत. ज्या लोकांना बुबुळाच्या विकारामुळे अंधत्व आले आहे. अशा लोकांना नेत्रदानाचा फायदा होतो. त्यालाच कॉर्नियल ब्लाइंडनेस असे म्हणतात. नेत्रदानानंतर केवळ डोळ्याच्या बुब्बुळाचे प्रत्यार्पण केले जाते. पूर्ण डोळा बदलला जात नाही.

बुब्बुळ (कॉर्निया) म्हणजे काय?

घडळयाच्या तबकडीवर ज्याप्रमाणे संरक्षक काच असते, त्याचप्रमाणे डोळ्यामध्ये पूर्ण पारदर्शक आवरण असते. त्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते. मुख्यतः बाहेरील प्रकाशकिरण डोळ्यात जाऊन दृष्टी प्राप्त होते. ज्यावेळी हे पारदर्शक बुब्बुळ अपारदर्शक होते, तेव्हा साहजिकच अंधत्व येते.

अंधत्वाची कारणे

डोळ्याला होणारी इजा उदा. बुब्बुळाला होणाऱ्या जखमा, असंरक्षितरित्या पेटविलेले फटाके, कुपोषणामुळे, इन्फेक्शन (जंतू प्रादुर्भाव) मुळे, देवी, कांजिण्या, इ. विकारामुळे, डोळयात काही केमिकल्स गेल्यास व अनुवंशिकता या कारणांमुळे अंधत्व येऊ शकते.

नेत्रदान कोण करू शकतो?

नेत्रदान केवळ मृत्यूनंतर करता येते. बालकापसून वृध्दांपर्यंत कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.

ज्यांना चष्मा आहे, ते सुध्दा नेत्रदान करू शकतात. ज्यांना ब्लडप्रेशर, डायबिटीस, दमा, इ. विकार असतील व मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती सुध्दा नेत्रदान करू शकतात.

नेत्रदान कोण करू शकत नाही?

एड्स, हिपेटेटिस (लिव्हरचे आजार), सेप्टिसिमिया (रक्तातील जंतू प्रादुर्भाव), ब्लड कॅन्सर, इ. आजार झालेले रुग्ण नेत्रदान करु शकत नाहीत.

नेत्रदानाच्या वेळी घ्यावयाची काळजी –

मृत व्यक्तीस ज्या खोलीत ठेवले आहे. तेथील पंखा बंद करावा. त्याचे डोळे बंद करून डोळयावर ओला कापूस अथवा ओला रुमाल ठेवावा व डोक्याखाली जाड उशी ठेवावी. आपल्या डॉक्टरांकडून डेथ सर्टिफिकेट (मृत्यूचा दाखला) तयार ठेवावा. डोळ्यातील बुब्बळ मृत्यूनंतर सहा तासाच्या आत काढावे लागतात. जरी मृत व्यक्तीने नेत्रदानाचे इच्छापत्र भरले नसेल, तरीही नातेवाईकांना त्या व्यक्तीचे नेत्रदान करता येते.

नेत्रपेढीचे काम –

नेत्रदानाचा फोन आल्याबरोबर नेत्रपेढीचे तज्ज्ञ डॉक्टर त्वरित जाऊन रुग्णाचे बुबुळे काढून नेतात. त्यावेळी नेत्रदात्याचे रक्तही तपासणीसाठी काढले जाते.नेत्रदानाने चेहरा विद्रूप होत नाही. दान केलेले नेत्र सुरक्षित रित्या नेत्रपेढीत नेऊन त्याची तपासणी करून योग्य त्या रुग्णावर आरोपण केले जाते. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. तरी आजच नेत्रदानाचा संकल्प सोडा व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करा.

मोतीबिंदू, दृष्टिदोष, अ जीवनसत्त्वाचा अभाव, बुबुळाचे विकार, बुबुळाची अपारदर्शकता ही अंधत्वाची कारणे पहायला मिळतात. या प्रकारचे अंधत्व हे तात्पुरत्या स्वरूपात मोडते. हे अंधत्व दूर करता येणे शक्य आहे. काचबिंदू नेत्रपटल विकृती यामुळे कायमस्वरूपी विकृती येऊ शकते. जगातील एकूण अंधांपैकी भारतात एक चतुर्थाश अंध आहेत. या आकडेवारीत वर्षानुवर्षे वाढच होत आहे. यासाठी वेळीच उपाययोजना व्हायला हवी.

भारतात असणा-या एकूण दीड कोटी अंधांपैकी सुमारे 90 टक्के व्यक्ती या 45 पेक्षाही कमी वयोगटातील आहेत. भारतात दरवर्षी 12 ते 13 दशलक्ष व्यक्ती मृत होतात. यापैकी केवळ 7,500 लोकच नेत्रदान करतात. ही तफावत दूर होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. डोळ्यांच्या बाह्य आवरणांपैकी एक षष्ठांश भागाला बुब्बुळ म्हटले जाते. बुबुळ हे घड्याळाच्या काचेप्रमाणे एक पारदर्शक पटल आहे. प्रकाशची पटले दृष्टिपटलावर एकत्रित करण्याचे प्रमुख कार्य बुबुळ करते. डोळ्यांना बुबुळांमुळे संरक्षण मिळते. ज्या कारणांमुळे प्रामुख्याने अंधत्व येऊ शकते त्यात जंतुसंसर्ग, मार लागणे, शस्त्रक्रियेची गुंतागुंत, शस्त्रक्रियेनंतर आरोग्याची काळजी, कुपोषण, आनुवंशिकता, भोंदू-वैदूंकडून केले जाणारे उपचार यामुळे बुबुळ खराब होऊन अपारदर्शकता प्राप्त होते. यावर बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हे फार मोठे वरदान आहे. या शस्त्रक्रियेत अपारदर्शक बनलेले बुबुळ काढून त्याजागी मरणोत्तर नेत्रदान करणा-या व्यक्तीचे बुबुळ प्रत्यारोपित करण्यात येते. यामुळे रुग्णाला पुन्हा दृष्टी मिळते. डोळ्याचा आकार स्थिर ठेवण्यासाठी किंवा बुबुळाच्या ब-या न होणा-या आजारांसाठी करण्यात येते. संकलित केलेली बुबुळे 4 डिग्री तापमानात एक विशिष्ट रसायन असणा-या बाटलीत 48 तासांपर्यंत ठेवता येतात. तसेच इतर विशेष रसायनांमध्ये ते बुबुळ दोन ते तीन ते आठवड्यांपर्यंत सुरक्षित ठेवता येतात.

नेत्रदानासाठी काय हवे? मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 मध्ये पारित करण्यात आला. या कायद्याच्या आधारे एमबीबीएस नोंदणीकृत डॉक्टरच नेत्रसंकलन करु शकतात. हे नेत्रसंकलन घरी, रुग्णालयात, स्मशानभूमीत वा इतरत्रही करण्यात येते. नेत्रसंकलनासाठी दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी लागतो. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यादीही नेत्रपेढीकडे तयार असते.

नेत्रदानाची सर्व माहिती गुप्त ठेवण्यात येते. बुबुळ प्रत्यारोपित व्यक्तीला याबाबत काहीही माहिती देण्यात येत नाही. मृत्युपूर्व नेत्रदानाचा संकल्प नसला तरीही मृतांच्या जवळील नातेवाईकही यासाठी संमती देऊ शकतात. यात महत्त्वाची बाब ही की पूर्ण डोळा प्रत्यारोपित केला जात नाही तर केवळ बुबुळ प्रत्यारोपित करण्यात येते. नेत्रदानामुळे मृताच्या चेह-यावर कुठेही विद्रूपता येत नाही.

नेत्रदानाबाबत समाजात आजही काही अंधश्रद्धा आहेत. या दूर व्हायला हव्यात. यामध्ये डोळ्याच्या जागी खड्डा पडणे, पुढच्या जन्मी येणारे अंधत्व, अतिवृद्ध व्यक्तीचे डोळे नेत्रदानासाठी योग्य नसणे, नेत्रदान खर्चीक बाब असल्याचा समज, नेत्रदानात धर्म किंवा जातीचा येणारा अडसर, अंत्यविधीला विलंब होणे यासारखे खोटे समज समाजमनावरून पुसले जायला हवेत.

कसे होते नेत्रदान-

नेत्रपेढीची भूमिका महत्त्वाची असते. नेत्रदात्याचे मरणोत्तर नेत्र संकलन करणे हे या पेढीचे प्रमुख कार्य, नेत्रदात्याची मरणोत्तर रक्ततपासणी एचआयव्ही व हिपेटायटिससाठी करण्यात येते. सूक्ष्म यंत्रांच्या माध्यमातून या बुबुळांची तपासणी करून त्यांची प्रत्यारोपणासंदर्भात योग्यता तपासण्यात येते. नेत्रदानाबाबत कॉल आल्यानंतर संबंधित रक्तपेढीच्या डॉक्टारांची टीम त्वरित त्या ठिकाणी पोहोचते. यामुळे अंत्यविधीला कोणत्याही प्रकारचा विलंब होत नाही.

अन्नदान यापेक्षा जर नेत्रदान करून एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी दिली, तर आयुष्यात आपल्या कर्तबगारीने दाता खूप मोठा होईल. त्याच्या हातून कदाचित समाजकार्यदेखील घडेल.

१० जून हा जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो, कारण त्या दिनाचे औचित्य साधून दृष्टिदानाचे स्मरण राहील. त्यामुळे मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्ती आताच नेत्रपेढीत जाऊन विहित नमुन्याचा फॉर्म भरून दिला, की मरणोत्तर नेत्रदानाचे कार्य सत्कारणी लागेल.

दृष्टी नसेल तर जीवन अंध:कारमय बनते. दृष्टीहिनतेमुळे आज कोट्यवधी लोक हे सुंदर जग बघू शकत नाहीत. या अंधांचे जीवन सुखकर बनण्यासाठी नेत्रदानाची चळवळ देशात उभी राहिली. त्याविषयी सातत्याने जागृती केली जाते. नेत्रदानाचा संकल्प अनेकजण करतात. मरणोत्तर नेत्रदानाची चळवळ हळूहळू वाढते आहे. त्याचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. प्रत्यक्षात बायपटल रोपणाची मागणी आणि होणारा पुरवठा यात तफावत आहे. ती दूर झाल्यानंतरच चळवळ खऱ्या अर्थाने यशस्वी होईल.

(डॉ. एस. एफ. देशमुख)

प्राचार्य

आरोग्य व कुटूंब कल्याण,

प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर

‘बार्टी’ मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी ३०० विद्यार्थांना प्रशिक्षण ,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार निर्णय

0

पुणे, दि. ९: सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे अनुसूचित जातीतील २०० विद्यार्थ्यांना मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येत असून त्यामध्ये १०० ने वाढ करुन आता २०२२-२३ या वर्षापासून ३०० विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

बार्टीमार्फत विशेष चाचणी परीक्षा घेऊन यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे. दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेस देण्यात येणारे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क, विद्यार्थ्यांना उपस्थितीनुसार विद्यावेतन दरमहा २ हजार रुपये दिले जाते. याशिवाय पहिल्या महिन्यातील आर्थिक सहाय्य ३ हजार रुपये आणि सुरुवातीच्या दिल्ली येथील प्रवासाकरिता ५ हजार रुपये व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रक्कम रुपये ५ हजार प्रवास भत्ता विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

मागील दोन वर्षात टाळेबंदीच्या काळातदेखील उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाइन प्रशिक्षण पद्धतीला आत्मसात करत बार्टीमार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित केले होते. बार्टीचे २०२० साली ९ तर २०२१ साली ७ उमेदवार यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी बार्टीच्या https://barti.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी ऑनलाईन प्रणाली सुरू

0

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही
– हसन मुश्रीफ

मुंबई, दि. 9 : ग्रामविकास विभागामार्फत होणाऱ्या जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. मात्र आता या ऑनलाईन संगणकीय प्रणालीमुळे शिक्षकांच्या बदल्याना गती मिळेल. राज्यात आजमितीस जवळपास 2 लाख प्राथमिक शिक्षक असून या प्रणालीमुळे कोणत्याही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार नाही, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून सन 2022 मधील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या प्रणालीचे अनावरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव का.गो.वळवी, पुणे जिल्हा परिषद सीईओ तथा समिती अध्यक्ष आयुष प्रसाद, सातारा जिल्हा परिषद सीईओ विनय गौडा, पुणे स्मार्ट सीटीचे सीईओ संजय कोलते, जिल्हा परिषद सीईओ वर्धा सचिन ओंबासे, मुंबई मनपा सहआयुक्त अजित कुंभार, एमएमआरडीए सहआयुक्त राहुल कर्डीले, त्याचप्रमाणे आज्ञावली विकसित करणारे विन्सीस आयटी सव्हिसेस आणि साय-फ्युचर इंडिया प्रा.लि.चे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, नियुक्त अभ्यासगटाने मागील बदली प्रक्रियेत असलेल्या सर्व त्रुटी दूर करून सर्वसमावेशक अशी ऑनलाईन आज्ञावली विकसित केली आहे. पूर्वी शिक्षकांची बदली करताना विविध समस्या निर्माण होत होत्या. आता ऑनलाईन प्रक्रियेमुळे बदली प्रक्रियाच पारदर्शक होईल. त्याचप्रमाणे आता यापुढे शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन न होता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अपर मुख्य सचिव श्री.राजेशकुमार म्हणाले की, या ऑनलाईन प्रणालीद्वारे बदली प्रक्रिया अतिशय सोपी व पारदर्शक झाली आहे. गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशासाठी शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतात, त्या आता या संगणकीय प्रणालीमुळे पूर्ण होणार आहे. या संगणकीय प्रणालीत चुकीची माहिती भरल्यास ती अन्य शिक्षकांना पाहता येईल, अशी सुविधा देण्यात आली आहे. ही प्रणाली देशातील कोणत्याही राज्यात नसून या आज्ञावलीला अन्य राज्यातून मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदलीच्या प्रचलित संगणकीय प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली होती. या अभ्यासगटाने राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी विभागवार भेटी व चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्यक्ष बदल्या करतांना त्यांना बदल्यांसंदर्भात येणाऱ्या अनुभवांचा तौलनिक अभ्यास करून या अभ्यासगटाने आपला अहवाल शासनाला सादर केला.

जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षक संवर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने ग्रामविकास विभागाच्या 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयाद्वारे बदलीचे सुधारित धोरण निश्चित केले आहे. यात विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता, शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना येणाऱ्या अडी-अडचणी आदी विचारात घेण्यात आल्या.

आंतरजिल्हा बदली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यास किमान 5 वर्षे सलग सेवा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पक्षघात, दिव्यांग कर्मचारी, शस्त्रक्रिया झालेले, विधवा, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता तसेच वयाने 53 वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी त्याचबरोबर पती-पत्नी एकत्रिकरण आदींची विशेष संवर्ग शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्हांतर्गत बदली : जिल्हांतर्गत बदली करतांना ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण आणि विद्यमान शाळेत 5 वर्षे पूर्ण झाली आहे, अशा शिक्षकांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हातील अवघड क्षेत्र आणि शाळाची यादी घोषित करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली असून यासंदर्भात प्रशिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. बदलीस पात्र शिक्षकांना जिल्ह्यातील 30 शाळांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे पक्षाघाताने आजारी शिक्षक, दिव्यांग शिक्षक, शस्त्रक्रिया झालेले शिक्षक, विधवा शिक्षक, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता-घटस्फोटीत महिला शिक्षक तसेच व्याधिग्रस्त शिक्षकांबरोबरच पती-पत्नी एकत्रिकरण आदी या विशेष संवर्ग शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदली नको असल्यास अर्ज करावा लागणार आहे.

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी 6 टप्पे ठरविण्यात आले असून त्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या बदल्यांबाबत अनियमिततेची तक्रार आल्यास त्याचा निपटारा करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

या जिल्हा परिषद शिक्षकाची बदली धोरणांची बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामविकास विभागाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती. या समितीने निविदा प्रक्रिया राबवून आज्ञावली तयार केली आणि आज या प्रणालीचा प्रत्यक्ष वापर सुरू होत आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा तर वर्धा मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे यांनी आभार मानले.

महाराष्ट्र नेत्रदानाच्या चळवळीत उदासीन -डॉ. संजय पाटील यांचे मत

आम्ही पुणेकर व साई सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने ‘नेत्रसेवा तपस्वी’ पुरस्कार प्रदान

पुणे : नेत्रदानासाठीची आव्हाने संपुष्टात आणायची असतील, तर नेत्रदानासाठी जनजागृती करण्यासोबतच संघटनांच्या माध्यमातून नेत्रदान सक्तीचे केले पाहिजे. अपघातात मृत घोषित केलेल्यांचे नेत्रदान आणि नेत्रदान केलेल्या कुटुंबीयांचा सन्मान, अशा अनेक प्राथमिक गोष्टी केल्यानंतरच नेत्रदानाची आव्हाने संपतील. महाराष्ट्र मात्र नेत्रदानाच्या चळवळीत अजूनही उदासीन असल्याचे हॉस्पिटल बोर्ड आॅफ इंडियाचे संचालक डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले.

आम्ही पुणेकर व साई सामाजिक सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रसेवा तपस्वी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे करण्यात आले. यावेळी शारदा विद्यापीठम् चे  पं. वसंत गाडगीळ, आम्ही पुणेकरचे अध्यक्ष हेमंत जाधव, साई सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास काबरा, संजय लढ्ढा, हर्ष भूतडा, रमेश लाहोटी, सुरेश लावंदर, प्रणव पवार, संतोष फुटक आदी उपस्थित होते. यावेळी नेत्रदानासाठी समाजात काम करणारे डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. विश्वास डाके, डॉ. राजेश पवार यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह, पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. मधुसूदन झंवर म्हणाले, आज देशात एक डोळा असणाऱ्यांची संख्या २० लाख आणि दोन्ही डोळे नसणाऱ्यांची संख्या ६ लाख इतकी आहे. दुदैर्वाने दररोज २० हजार रुग्णांची भर यामध्ये पडत आहे. सामाजिक परिस्थिती, अंतर आणि उपचारासाठी वेळेत न पोहोचल्यामुळे अनेकांना अंधत्वाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नेत्रदानासाठी उदासिनता कमी करण्यासाठी सामाजिक संस्थांनी देखील नेत्रदानासाठी काम केले पाहिजे. त्यासाठी काम करणाऱ्या संस्था आणि डॉक्टर यांना सरकारकडून अनुदान मिळाले पाहिजे. नेत्रदान केलेल्या कुटुंबियांची माहिती समाजासमोर आणून त्यांचा सन्मान झाला, तर इतरांना नेत्रदानासाठी प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. विश्वास डाके म्हणाले, आजही समाजात नेत्रदान केल्यानंतर होणाऱ्या परिणांमाचा मोठा गैरसमज आहे. त्याचबरोबर देशात नेत्रदानासाठीची यंत्रणा अत्यंत संथ आहे. त्यामुळे नेत्रदान करणाऱ्यांचा अभाव दिसून येतो. त्याचबरोबर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मृतव्यक्तीने केलेल्या नेत्रदानाबद्दल कल्पना नसते, म्हणून अडथळे येतात.  त्यामुळे तुम्ही नेत्रदानाचा अर्ज भरल्यानंतर त्याची कल्पना तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की द्यावी, असे ही त्यांनी सांगितले. डॉ. राजेश पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्योती गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, अखिल झांजले यांनी प्रास्ताविक केले. सुभाष सुर्वे यांनी आभार मानले.    

सेझ प्रकल्प बाधित ९१८ शेतक-यांची ३७२ एकर जमीन शेतक-यांना परत ..

0

मुंबई-
खेड सेझ प्रकल्पातील प्रकल्प बाधित शेतक-यांची जमीन व परतावा परत मिळावी याकरिता गेल्या ८ वर्षापासून सुरू असलेल्या आंदोलनास आज यश मिळाले असून राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या विशेष सहकार्यामुळे या लढ्याला आज पुर्णविराम मिळाला. याबद्दल राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा खेड प्रकल्पातील बाधित शेतक-यांना घेऊन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांनी त्यांचा सत्कार करून आभार मानले.
२००७ साली शासनाने भारत फोर्जच्या माध्यमातून खेड परिसरातील निमगांव , दावडी , कन्हेरसर , केंदूर या गावातील जागेवर सेझ टाकण्यात आले होते. यावेळी या जमिनीच्या बदल्यात शेतक-यांना १५ टक्के जमीन व मोबदला देण्याचे ठरले होते. मात्र शासनाकडून सदर प्रकल्प रखडला गेल्यामुळे शेतक-यांना मोबदला व जमिनीचा परतावा मिळाला नव्हता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मार्च २०१५ मध्ये खेड सिटी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा काढून आंदोलनास सुरवात केली.
२०१८ साली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर जमीनीवरील सेझ रद्द केला. पण शासनाकडून मुद्रांक शुल्क व जी एस टी ची होणारी जवळपास ३० कोटी रूपयाची रक्कम शेतक-यांनी भरावी लागणार असल्याचे सांगितले. यामुळे पुन्हा केंद्र सरकार व राज्य सरकार यांचेकडे पाठपुरावा करून सदर ३० कोटी रूपयाचे मुद्रांक शुल्क व जी. एस टी माफ करून घेतल्यानंतर आज सदरची जमीन शेतक-यांचे नावाने करण्याचा भारत फोर्ज व सरकारकडून लीज डीड करून ९१८ शेतक-यांचे ३७२ एकर जमीन शेतक-यांना देण्यात आली. त्याबरोबरच सदर जमीन डी झोन केल्याने शेतकरी व नवीन उद्योजकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
यावेळी केडीएल चे संचालक चंद्रकांत भालेकर ,संतोष शिंदे , काशिनाथ दौंडकर , विष्णु दौंडकर , मारुती सक्रे , धोंडीभाऊ साकोरे , मारुती गोरडे , राहूल सातपुते यांचेसह भारत फोर्ज कंपनीचे एम. व्ही. कृष्णा उपस्थित होते.

१५ जुलै रोजी होणार पुणे-बालेवाडीत राज्य कबड्डी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा

0

मुंबई, दि. ९: राज्यात कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी व कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. तसेच राज्यात मॅटवरील कबड्डीच्या स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचना, उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज दिल्या. दि. १५ जुलै रोजी बालेवाडी-पुणे येथे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणी समितीच्या सभेचे आयोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणी समितीच्या सभेचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आमदार भाई जगताप, उपाध्यक्ष शशिकांत गाडे, उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, उपाध्यक्ष नेत्रा राजेशिर्के, सरकार्यवाह ॲड आस्वाद पाटील, खजिनदार मंगल पांडे, सहकार्यवाह रविंद्र देसाई, मनोज पाटील, जिल्हा प्रतिनिधी बाबुराव चांदेरे, नितीन बरडे, लिना करपे-कांबळे, सचिन भोसले, कबड्डी असोसिएशनचे समन्वयक अविनाश सोलवट यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कबड्डी महर्षी बुवा साळवी यांनी कबड्डी खेळाला मोठ्या उंचीवर पोहोचवले आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने विशेष प्रयत्न करावेत. तसेच कबड्डी खेळाच्या क्रीडा नियमात होणारे बदल आत्मसात करुन ते अंगिकारावेत. कबड्डी खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणीच्या सभेत कबड्डी दिन साजरा करणे, विविध गटाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, व्यावसायिक गट व इतर मान्यताप्राप्त स्पर्धेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक मुद्यावर चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा संहिता २०११ नुसार तीन उत्कृष्ट व प्रख्यात खेळाडूंची राज्य सल्लागार समितीवर नियुक्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. असोसिएशनच्या शिवाजी पार्कस्थित इमातरतीच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला मान्यता यावेळी देण्यात आली.

पेरणीसाठी स्वत:कडील चांगले सोयाबीन बियाणे वापरण्याचे कृषी आयुक्तांचे आवाहन

पुणे, दि.9: खरीप हंगाम 2022 मध्ये किमान 75 ते 100 मी.मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी तसेच पेरणीसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले सोयाबीन बियाणे वापरावे, असे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.

जमिनीत चांगली ओल झाल्यावर म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. प्रती हेक्टरी बियाणे प्रमाण 75 किलोग्रॅमवरून 50 ते 55 किलोग्रॅमवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करुन पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे.

पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे उपयुक्त ठरते. प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतरच त्याची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी, असेही त्यांनी कळवले आहे.

शिरूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकियेस सुरुवात

पुणे, दि.9: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शिरूर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रकिया सुरु करण्यात आलेली आहे.

शासकीय वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, शारिरीकदृष्ट्या दिव्यांग व अनाथ या प्रवर्गातील विद्यार्थीनींना आरक्षित टक्केवारी प्रमाणे त्या-त्या प्रवर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.

नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या 8 वी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थीनींना प्रवेशाबाबतचा छापील अर्ज, अटी व शासकीय वसतिगृहात मिळणाऱ्या सोयी सुविधाबाबतच्या सविस्तर माहितीसाठी गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, शिरूर यांच्याशी कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून संपर्क साधावा. शासकीय वसतिगृहाचे प्रवेश अर्ज विनामूल्य मिळतील.

शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थीनींना विनामूल्य भोजन व निवासाची व्यवस्था असून शिक्षण संस्था प्रमुखाच्या शिफारशीनुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरीता आवश्यक असलेली क्रमिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश आदीकरीता विहित रक्कम विद्यार्थीनींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. तसेच दरमहा रूपये ६०० इतका निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. जिल्ह्यातील गरजू व गरीब विद्यार्थीनींनी वसतिगृह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन गृहपाल श्रीमती आर. व्ही. साखरे यांनी केले आहे.

३८ किल्ले सर करणाऱ्या अऋजा माने (५ वर्षे) आणि ज्येष्ठ माने (८ वर्षे) यांचा सन्मान

गो.नी. दांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘दुर्गदिन’ साजरा

पुणे : दुर्गमहर्षी गो.नी. दांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने ‘दुर्गदिन’ साजरा करण्यात आला. यावेळी साहित्यिका वीणा देव, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे उपस्थित होते. कार्यक्रमात अऋजा माने (वय ५ वर्षे), ज्येष्ठ माने ( वय ८ वर्षे) यांचा ३८ किल्ले सर केल्याबद्दल  गौरव करण्यात आला. यावेळी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ निर्मित ‘किल्ले पाहिलेला माणूस: गोपाल नीलकंठ दांडेकर’ ही चित्रफित दाखवण्यात आली.

वीणा देव म्हणाल्या, गोनीदांच्या दृष्टीने गडकोट हे इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत. यावेळी त्यांनी गो.नी. दांडेकरांच्या दुर्गभ्रमंतीच्या आठवणींना उजाळा दिला.

मोहन शेटे म्हणाले, पुढील वर्षी गो.नी. दांडेकर आणि शाहीर किसनराव हिंगे यांची २५ वी पुण्यतिथी आहे म्हणून इतिहास प्रेमी मंडळ आणि शाहीर हिंगे लोककला, प्रबोधिनी या दोन संस्था पुढील वर्षात वंचित मुलांच्या २५ किल्ल्यांवर सहली आयोजित करून या दोन महान व्यक्तींना आगळीवेगळी आदरांजली अर्पण करणार आहेत.

किल्ले सिंहगडावर साजरा होणार शिवराज्याभिषेक सोहळा 

विश्व हिंदू परिषद श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) तर्फे आयोजन

पुणे : भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. शिवराज्याभिषेकाचा हा उत्सव यंदा देखील सिंहगडावर साजरा होणार आहे. विश्व हिंदू परिषद, पुणे  श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ त्रयोदशी, रविवार दिनांक १२ जून रोजी सकाळी १० वाजता सिंहगडावर पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण दिली. 
अभिवादन सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष आहे. सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी ८ वाजता छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅलीने होणार आहे. विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा या मार्गीने सिंहगडावरील वाहनतळ येथे रॅलीचा समारोप होईल. सोहळ्यामध्ये तब्बल २ हजार शिवभक्त सहभागी होणार आहेत.
किशोर चव्हाण म्हणाले, रविवारी सकाळी १० वाजता सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी मिरवणुकीत ढोल-ताशा पथक, शंखनाद पथक आदी सहभागी होणार आहेत. यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेशदादा मोहिते यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस अभिषेक होणार आहे. तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन देखील करण्यात येणार आहे. 
सोहळ्याला विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त मंत्री व सहसत्संग प्रमुख दादा वेदक, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांत मंत्री संजय मुरदाळे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन देखील यावेळी होणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  

वाणिज्य प्रथम वर्षासाठी बीएमसीसीत प्रवेश परीक्षा

पुणे, ता. 9 जून : ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालया’त (बीएमसीसी) प्रथम वर्ष वाणिज्य शाखेसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मान्यताप्राप्त बोर्डाची बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे प्रवेशासाठी आवश्यक आहे. या परीक्षेसाठी 12 जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. 16 ते 18 जून या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे.

बीकॉम, बीबीए, बीबीए (इंटररनॅशनल बिझनेस), बीबीए (कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन), बीव्होक (फिल्म मेकिंग अ‍ॅण्ड ड्रामॅटिक्स), बीकॉम (ऑनर्स), बीकॉम (फिनटेक), बीएमएस (बॅचरल ऑफ मॅनेजमेंट स्टडिज इन ईकॉमर्स) या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार आहे.

प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणांच्या प्रत्येकी 20 टक्के आणि प्रवेश परीक्षेच्या गुणांच्या 60 टक्के ‘वेटेज’ असणार आहे.

प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी http://www.bmcc.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

आयुष्याची भाग्यरेषा आपणच आखायला हवी-पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका

रोटरी क्लब आॅफ पूना मिडटाऊनतर्फे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार २०२१-२२ प्रदान सोहळा
पुणे : यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या यशस्वी व्यक्तींनी स्वत:चे जग शून्यातून निर्माण केले. केवळ पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर नव्हे, तर व्यवहारिक ज्ञान देखील आत्मसात करुन त्यांनी ही वाटचाल केली. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलो, तरी देखील आयुष्याची भाग्यरेक्षा आपणच आखून त्यावर वाटचाल करायला शिकले पाहिजे, असे मत पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी व्यक्त केले
रोटरी क्लब आॅफ पूना मिडटाऊनतर्फे एरंडवण्यातील सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात व्यावसायिक सर्वोत्तम गुणवत्ता पुरस्कार २०२१-२२ प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष पराग सुरा, सचिव सुरज पाषाणकर, संचालक धनंजय काळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जोशी वडेवाले चे संस्थापक शैलेश जोशी व पूना शिम्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक सचिन गुप्ते यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. 
फत्तेचंद रांका म्हणाले, तरुणांना आज कोणतीही गोष्ट सांगायला किंवा शिकवायला गेले, तर ते पुरावा मागतात. पुराव्याप्रमाणेच पूर्वजांचे संस्कार देखील महत्वाचे आहे. पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये देखील तथ्य आहे. त्यावरच अनेकजण आजमितीस वाटचाल करुन यशस्वी झाले आहेत. तरुणांना देखील यशस्वी व्हायचे असेल, तर त्यांनी तसे उद्दिष्ट समोर ठेवायला हवे. नकारात्मकता दूर ठेऊन नवनवीन संकल्पना राबविणे गरजेचे आहे. 
पुरस्काराला उत्तर देताना सचिन गुप्ते म्हणाले, आई-वडिल आणि शिक्षकांनी केलेले संस्कार न विसरता ते आचरणात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. नियमानुसार व नैतिकतेनुसार व्यवसाय किंवा कोणतेही काम करायचे ठरविल्यास ते शक्य आहे. मात्र, त्याकरीता जिद्द आणि चिकाटी गरजेची आहे. सरळ व्यवसाय केला तरी देखील त्यात फायदाच होतो. 
पराग सुरा म्हणाले, रोटरी क्लब आॅफ पूना मिडटाऊन हा ५२ वर्षे जुना क्लब आहे. नदीवर बंधारे बांधून पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे, विशेष मुलांसाठी बस व्यवस्था, कामासाठी मशिन, डायलिसीस मशिन उपलब्ध करुन देण्याचे काम क्लबने अनेक ठिकाणी केले आहे. ग्रामीण भागातील शाळा नूतनीकरण व तेथील सोयी-सुविधांची पूर्तता करण्यावर भर देणार आहे. आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल या व्यवसायिकांना पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिभा कर्णिक यांनी मानपत्रांचे वाचन केले. शोभा कमलाकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरज पाषाणकर यांनी आभार मानले.

विधान परिषदेसाठी भाजपचा सहावा उमेदवार अपक्ष सदाभाऊ खोत

मुंबई -विधान परिषदेच्या रिंगणात भाजपने खरे तर पक्षाने पाच उमेदवार घोषित केलेत. त्यातल्या चार अधिकृत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बुधवारी भरण्यात आले असून, पाचव्या जागेसाठी उमा खापरे यांचा उमेदवारी अर्ज आज भरला गेला. तर सहाव्या जागेसाठी भाजपने शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना पाठिंबा दिलाय. सदाभाऊ यांनी अपक्ष म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे.

पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करणार आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. उमा खापरे आणि सदाभाऊ खोत यांच्या उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले की, सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांमधले एक लोकप्रिय नेतृत्व आहे. एसटी कर्मचारी संपामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. शेतकरी तसेच अनेक मुद्यावर ते आवाज उठवत असतात. त्यांना आमदार मतदान करतील. भाजपचे पाच आणि अपक्ष एक असे सर्व सहा उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीतील आमदार देखील सदाभाऊंना मत देतील, असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला आहे.

विजयासाठी हवी 27 मते

  • विधानसभा सदस्यांमधून परिषदेवर 10 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये भाजप 4, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी 2 असे एकूण 10 आमदार निवडले जाऊ शकतात.
  • भाजपचे 106, आघाडीचे 152, अपक्ष 13 आणि छोटे पक्ष 16 असे 287 आमदार विधानसभेत आहेत. विधान परिषदेवर जाणाऱ्या प्रत्येक उमेदवारास विजयासाठी 27 मते आवश्यक आहेत.
  • मतदान गुप्त पद्धतीने आहे. भाजपने 5 वा उमेदवार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यापैकी एक उमेदवार निवडून जाऊ शकतो.

भाजप, शिवसेना, काँग्रेसचे उमेदवार झाले जाहीर

भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड

शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी

काँग्रेस : भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे

राष्ट्रवादी : एकनाथ खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर

नवाब मलिक, अनिल देशमुखांचा मतदानाचा अर्ज कोर्टाने फेटाळला,मविआला झटका

मुंबई-राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला आज मोठा झटका बसला. अनिल देशमुख व नवाब मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन माजी-आजी मंत्र्यांचा मतदानाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी एका दिवसाचा तात्पुरता जामीन मिळावा, असा अर्ज दोघांनी विशेष पीएमएलए न्यायालयाकडे केला होता. या निकालाविरोधात हे दोन्ही नेते आता उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.आज मलिक आणि देशमुख यांच्याबाबत पीएमएलए न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे मविआला झटका बसला आहे. निवडणुकीत ही दोन्ही मते मिळवण्यासाठी मविआकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. पीएमएलए न्यायालयाच्या निकालाविरोधात मविआचे दोन्ही नेते उच्च न्यायालयात जाणार असले तरी उद्याच मतदान असल्याने मविआसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मतदानासाठी एका दिवसाचा जामीन देण्यास ईडीचा विरोध
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मतदानासाठी एका दिवसाचा जामीन देण्यास ईडीने ​​​​​विरोध केला. ईडीने 1951 कलम 62(5) या कायद्याचा हवाला दिला. कायद्यानुसार, एखादा व्यक्ती तुरुंगामध्ये असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. या कायद्यान्वये कैद्यांना मतदान करण्याचा अधिकार नसल्याची भूमिका ईडीने विशेष न्यायालयापुढे मांडली.

अनिल देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल असून, ते गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून तुरुंगात होते. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असल्याचे ईडीने सांगितले. नवाब मलिकदेखील अंडरवर्ल्डशी संबंधित आरोपांमुळे कोठडीत असल्याने या दोन्ही नेत्यांना मतदानासाठी बाहेर जाता येणार नाही, अशी भूमिका ईडीने मांडली. न्यायालयाने ती मान्य करत दोन्ही नेत्यांचे अर्ज आज फेटाळून लावले.

भाजपने कंबर कसली
राज्यसभेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवारास 4 हजार 200 मते आवश्यक आहेत. पण, सध्या 500 मतांचे मूल्य असलेल्या 5 लोकप्रतिनिधींच्या मतदानाविषयीच अनिश्चितता असल्याने भाजप आणि मविआ या दोन्ही बाजूकडे चिंता आहे. चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना 10 जून रोजी राज्यसभेच्या मतदानासाठी एअर लिफ्ट करून मुंबईत आणण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे.